✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. 💥 जन्म :- १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. १९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राजस्थानात १ मार्चपासून बेरोजगारांना भत्ता, युवकांना तीन तर युवतींना साडेतीन हजार रुपये अशी माहिती अशोक गेहलोत यांनी दिली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फटका ; 2017-18 मध्ये सर्वात जास्त बेरोजगार, देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जळगाव : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात शिक्षणाची वारीचा शेवटचा टप्पा उत्साहात संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता घेणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. न्यूझीलंड चौथ्या एकदिवसीय सामन्यात किवी गोलंदाज ट्रेंट बोल्टचा विश्वविक्रम, सर्वात जलद 100 विकेट्सचा पराक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *कल्पना चावला*           कल्पना चावला अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकार्‍यांनी कल्पना महिला आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अलिर्ंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विद्यापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'पृथ्वी शिखर संमेलन'चं आयोजन कोणी केलं होतं ?*             यूएनसीईडी *२) २0१0 मध्ये पार पडलेल्या विश्‍व मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*           रामदास कामत *३) सजीवांच्या रचनेचे आणि कार्याचे एकक कोणते ?*           पेशी *४) एड्स हा रोग कशामुळे होतो ?*             विषाणूमुळे *५) एलआयसीचं मुख्य कार्यालय कुठे आहे ?*              मुंबई *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ∆ नारायण गायकवाड ∆ राजेश हाके ∆ शिवराज रंगावार ∆ शिवा पडोळे ∆ स्वप्नील कैवारे ∆ अतुल भुसारे ∆ प्रिया मदनकर ∆ सादिक शेख ∆ गजेंद्र ढवळापुरीकर ∆ हिलाल पाटील ∆ एम बी शेख ∆ शिवानंद सूर्यवंशी ∆ तानाजी कदम ∆ विठ्ठल चिंचोलकर ∆ जयश्री मगरे ∆ वशिम शेख ∆ सय्यद अक्तर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *सत्तेसाठी* सत्तेसाठी आता मारामारी आहे कोणाला वाटत ही गोष्ट बरी आहे सत्तेसाठी त्यांना हे सर्वच बरे वाटते कोणाला पटो ना पटो त्यांच त्यांना पटते   शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पदव्या-प्रमाणपत्रांनी भौतिक यशाच्या आकाशाला भिडता येते. पण चांगलं सुखा-समाधानाचं जगणं कधी शिकणार आपण? जीवनाशी नातं सांगत नैतिक जगण्याचा 'मंत्र' का होत नाही आपलं शिक्षण. माणसाला माणसापासून तोडणारी धर्मांधता, भोळ्या-भाबड्यांची दिशाभूल करणा-या कालबाह्य परंपरा आणि अंधश्रद्धेच्या खाईत लोटणारी बुवाबाजी... अशी विविध आव्हानं पेलणा-या शिक्षणाची आज गरज आहे. समता आणि बंधुभाव समाजमनात रूजविणे ही काळाची पुकार आहे. खरंतर माणसापुढेच माणूसपणाचं आव्हान उभं असावं, ही आपली शोकांतिका आहे. हा जन्म सार्थकी लागायचा असेल आणि माणसाला पशूपक्ष्यांहून उंच उठायचं असेल तर पारंपारिक शिक्षणाची चौकट मोडून नव्या मूल्यशिक्षणाचं आकाश खुलं व्हायला हवं.* *नद्या समुद्रात जाऊन मिळाल्या की त्या स्वत:च समुद्र होऊन जातात. सर्व जातीधर्मांना एकाच रंगाच्या समुद्रात विलीन करून निखळ माणूस म्हणून जगायला आपण कधी शिकणार? आपण शिकलो, वैभवसंपन्न झालो पण आपल्या समर्थ खांद्यावर कुण्या हताश-निराश माणसाला विश्वासानं मान कधी ठेवता येईल? ही सारी आव्हानं झेलत, वंचितांच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठी माणसांमाणसातलं अंतर कापू या...आणि आपण सारे माणूस होऊ या ! पूजा-प्रार्थना याहून वेगळी काय असते. सा-या विश्वाला घरपण देणारी संताची जीवनशैली मानवतेचे धडे देत आपल्याला वाट दाखवत असते.*    ⭐‼ *रामकृष्णहरी* ‼⭐  ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   ऊँचे पानी ना टिके , नीचे ही ठहराय | नीचा हो सो भारी पी , ऊँचा प्यासा जाय || अर्थ : माणसाला नम्रतेने व शालीनतेने ज्ञानाची प्राप्ती करता येते . गुरूसोबत नम्रतेने वागायला पाहिजे. ताठर ,उद्धट व मी पणाचा अहंकार मिरवणार्‍याला गर्विष्ठपणाशिवाय काही प्राप्त करता येत नाही.उगाच फुशारकीचा रिकामा ताठा मिरवणार्‍याचा भ्रमाचा फुगा फार काळ टिकत नाही. वाकणार्‍या नरम लोखंडालाच हवा तसा आकार देता येतो . पोलादाचा ताठरपणा त्याचे तुकडे व्हायला कारण ठरतो. महात्मा कबीरांनी सुंदर दाखला देत सांगितलंय की पाणी उंच जागेवर कधी थांबतं का? ते सदैव खोलगट जागेकडं धाव घेतं व तिकडंच वास्तव्य करतं. उंच माळरानावर व हवेत वावरणार्‍यांना तहाणेनं तरमळावं लागतं. मात्र खोलगट, सखल जागी वस्ती करणार्‍याला पावसाळ्यात थोडे कष्ट जरूर परंतु उन्हाळ्यात भरपेट पाणी मिळतं. त्याची तहाण भागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥ संकलक - सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हे क्षण हीं निघून जातील  !!!*         एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत , फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.         अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.          बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.         विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.     हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते ,          " *This too shall pass* "                      म्हणजे           " *हाही क्षण निघून जाईल"*          केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले , सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले.          राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.             विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की , महाराज कुठेही अति-उत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले ,            " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे.             " राजा म्हणाला, " नाही , आता मला बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.         *परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही* *राहात नाही , दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले* *आहे.म्हणून दुःखात खचू नये अन्  सुखात नाचू नये."*            *This too shall pass !*              *हे क्षणही निघून जातील.*        ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.                        _______ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते. 💥 जन्म :- १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *21 फेब्रुवारीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात, शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत संतांकडून प्रस्ताव मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिकचे किमान तापमान 7.6 अंशावर, थंडीचा कडका कायम* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट असून, वीज जोडणीसाठी राज्यात ८ हजारांवर शेतकऱ्यांचे अर्ज.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त आजपासून राज्यात जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पूर्णवाद परिवार सेवा मंडळ आणि पूर्णवाद लाईफ मँनेजमेंट इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, प्रसिद्ध वक्ते आणि लेखक चंद्रशेखर टिळक यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राळगेणसिध्दी(अहमदनगर) : संत यादवबाबांचे दर्शन घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज भारत वि. न्यूझीलंड चौथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हसा आणि हसवा* जीवनात हसण्याचे महत्व ....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लातूर*          लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर  राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालांतराने उस्मानाबाद जिल्ह्या्चे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. लातूर हे महाराष्ट्राच्या,आंध्र प्रदेशाच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक परंपरा व रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक मराठी व्यतिरिक्त कन्नड आणि  तेलुगू भाषा सहज बोलतात.   *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) नेपोलियन बोनापार्ट सम्राट कधी बनला ?* १८०४ *२) आंतरराष्ट्रीय वाणिज्य मंडळाचं सचिवालय कुठे आहे ?* पॅरिस *३) वेरुळचं कैलासनाथ मंदिर कोणी बांधलं ?* राष्ट्रकूट राजा कृष्ण (द्व)  *४) मीठाचं सर्वाधिक उत्पादन घेणारं देशातील राज्य कोणतं ?* गुजरात *५) दाचीगाम राष्ट्रीय अभयारण्य कोठे आहे ?*              जम्मू काश्मीर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  विनायक हिरवे ●  राजेश पटकोटवार ●  हिलाल पाटील ●  जयेश पुलकंठवार ●  राजेश्वर रामपुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *थंडीची लाट* राज्यात थंडीची लाट आली आहे काहींची अंथरूणात पहाट झाली आहे थंडीने काही गप्पा गार पडले आहेत सूर्याने नित्याचे कामं कुठं सोडले आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिक्षेत वरचा नंबर हवा, टक्केवारी चांगली हवी; म्हणून क्लास लावला जातो. मात्र, आपल्यातला माणूस घडला पाहिजे, त्याला चांगलं वळण लागलं पाहिजे यासाठी शोधला जातो का एखादा क्लास? संतानी माणसातला माणूस जागविण्यासाठी अभंगांचा शब्द न् शब्द खर्ची घातला. तो समजून घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आपल्याला डाॅक्टर, वकील, इंजिनीयर व्हायचं! पण त्याबरोबर कधी आपण हा विचार केला की मला बाबा आमटे यांच्यासारखी रुग्ण्सेवा करायचीयं. सिंधूताई सपकाळांसारखी अनाथांची माय व्हायचंय.* *'समाजसेवा' घडवेल असा धडाच आपल्या पाठ्यपुस्तकात नाही किंवा असलाच तर समजून घेतला गेला नाही. तसं झालं असतं तर अमानुषतेचं एकही उदाहरण सापडलं नसतं. म्हणूनच-* *"माणूस माणूस, तुझी नियती बेकार* *तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर"* *असा समाचार बहिणाबाई घेतात. संयम, विनम्रता, सौहार्द, सहिष्णुता हे फक्त निबंधातील शब्द आहेत. ते माणसाने आचरणातून हद्दपार केले आहेत. मातीत उगवून आलेल्या पिकांच्या अवतीभवतीचं तण-तणकट निंदणी-खुरपणी करून निर्मळ करावं लागतं. तसंच माणसाचं, माणसाचा सहजी माणूस बनत नाही. संस्काराच्या शाळेत माणूस घडतो. मात्र, माणूस संस्काराच्या शाळेत हजर राहण्यास नाखूष असल्याने, त्याची अॅब्सेंटी वाढत चाललीयं. मग कसा होऊ शकेल त्याचा माणूस ?* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नहाये धोये क्या हुआ , जो मन मेल न जाय | मीन सदा जल में रही , धोये बॉस न जाय || अर्थ : नहाणे धुणे देखावा गेला न मनीचा मळ सदा पाण्यात मासळी दुर्गंध न काढी जळ महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे व सुंगधाने सजणे हा तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व निरामय जीवनशैली विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की, मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मनाचे श्लोक* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एक दिवसाचा पांडुरंग* "पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"  त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा" पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,  श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"  (त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )  गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे" ( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो ) पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे " (असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )  तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा" (हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.) रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"  गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही " ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो .......... पांडुरंग पुढे म्हणतो ........ अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.  पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"  तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.श्रद्धा ठेवली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुतात्मा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने गोळी झाडून खून केला. १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला. २००२ - भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :- १९४८ - राष्ट्रपिता महात्मा गांधी. १९९६ - गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक. २००० - आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. २००१ - प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार. २००४ - रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींची मदत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अहमदनगर - लोकायुक्तांना मंजुरी दिली म्हणजे कायदा झाला असे नाही, आंदोलन करणारच - अण्णा हजारे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जळगाव : शिक्षणाची वारीच्या शेवटच्या टप्याला जळगाव मध्ये प्रारंभ, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी आणि संचालक डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पारा 6 अंशावर, विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीत वन डे मालिका जिंकण्याचा केला पराक्रम.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *प्रामाणिक वसंता* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             जळगाव शहर       जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत.जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात. जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे सातार्‍याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते. जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून तेभारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, चाळीसगाव व पाचोरा हीही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'शांतता! कोर्ट चालू आहे' चे नाटककार कोण ?* विजय तेंडुलकर *२) १९४0 च्या 'ऑगस्ट प्रस्तावा'नुसार कोणत्या तरतुदी सादर करण्यात आल्या ?* वसाहतींचे स्वातंत्र्य  *३) नानासाहेबांनी कुठे स्वत:ला पेशवा म्हणून जाहीर केलं ?* कानपूर *४)कोणतं राज्य अँस्बेस्टसचं सर्वाधक उत्पादन घेतं ?* राजस्थान *५) एक किलोबाईट म्हणजे किती ?*              १०२४ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  प्रा. बालाजी कोंपलवार ●  सौ. सारिका राजेश मद्दलवार ●  मगदूम अत्तार ●  अंकुश निरावार ●  शिवकुमार माचेवार ●  सतीश गंलोड ●  सुरज एडके ●  देवराज बायस *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *प्रदर्शन* नको त्या गोष्टींचा हल्ली  दिखावा जास्त आहे दिखावा करणाराला वाटते हे सर्वच रास्त आहे जे प्रदर्शनीय नाही ते विचारपूर्वक झाकल पाहिजे कशाच प्रदर्शन करतो याच प्रत्येकाने भान राखल पाहिजे     शरद ठाकर सेलू जि.परभणी   8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.*      संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता  बोला  वृक्ष  से , सुनो  वृक्ष  बनराय  | अब  के  बिछड़े  न  मिले , दूर  पड़ेंगे  जाय  || अर्थ :      संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे.  पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर  वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही  भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत  त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन  मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची  दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        आपण काही राक्षसीवृत्तीचे किंवा विध्वसंकवृत्तीचे नाही की, ज्यामुळे कुणाच्याही जीवनात असलेल्या नंदनवनाचे स्मशान बनवण्यासाठी.आपण आहोत सर्वसामान्यपणे एकमेकांच्या आधारे आपल्या जीवनाची नौका पार करण्यासाठी जन्माला आलेली सामान्य माणसे.आपला प्रत्येकाशी कुठे ना कुठे , कोणत्या ना कोणत्या कारणासाठी संबंध येतो.मग तो दु:खाचा असो की सुखाचा.मग आपला संबंध इतरांशी चांगला ठेवायचा असेल तर आपल्या मनात दुस-याविषयीची आत्मियता बाळगायला हवी,जो कोणी संकटात सापडला असेल तर त्याला आणखी संकटात न टाकता आहे त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला कशी मदत करता येईल आणि वाचवता येईल हे प्रथम विचार करायला हवे.जर आज आपण दुसऱ्याच्या विध्वंसाचा विचार केला तर उद्या आपलीही गत तशीच होणार.मग आपण आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी इतरांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या मदतीला कसे धावून येणार ?आपण अशावेळी दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षाही करणे चुकीचे ठरेल.आपली व इतरांची जीवननौका व्यवस्थितपणे पार करायची असेल तर एकमेकांच्या साथीनेच करावी लागणार.आपल्या एकमेकांच्या मनातल्या उभ्या असलेल्या संशयाच्या,भेदाच्या व तिरस्काराच्या भिंती सा-या पाडून टाकायला हव्यात तरच आपले आणि इतरांचे चांगले,प्रेमाचे,सहकार्याचे संबंध प्रस्थापित होतील.ज्या काही असलेल्या मनातल्या राक्षसीवृत्ती आपल्या चांगल्या संबंधांमुळे केव्हाच लोप पावायला लागतील.असा हा आपला एकमेकांना सहाय्य करण्याचा आणि संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे करण्याचा माणुसकीचा खरा धर्म पाळला पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *यशाचे  बीजगणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले.  'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली.  आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!'  'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?'  'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे.  'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले.  'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली.  'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का?  अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते.  'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते.  ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. २००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी. 💥 जन्म :- १८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी. 💥 मृत्यू :- १९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित होऊ शकतात. अधिकृत सूत्रांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य शासनाच्या वतीने मुंबईतील आयआयटी पवई येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २0१९ या काळात चौथ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुणे - साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ, सोन्याच्या दरात ३५० रुपयांची वाढ होत तो प्रति १० ग्रॅम ३३ हजार ६५० रुपयांवर पोहोचला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीत विराट आणि रोहितने दुसर्‍या गड्यासाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाची  हॅट्ट्रिक, मालिकेवर कब्जा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *ऑफरचा भुलभुलैय्या* कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची. रस्त्याने जाता येता ....... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरून ब्लॉगला भेट द्यावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे*         चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे तथा कवी चंद्रशेखर यांचा जन्म 29 जानेवारी 1871 रोजी झाला.  ते मराठी कवी होते. यांचे शिक्षण नाशिक, वडोदरा आणि पुणे येथे झाले. त्यांनी वडोदरा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अलीकडच्या काळातील एक अवतार, असे त्यांना म्हटले जाई.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो जन्माने नव्हे - आर्य चाणक्य *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) वैदिककालीन देवतांमध्ये कोणती देवता सूर्याची आई म्हणून पुजली जाते ?*          आदिती *२) 'स्त्री विचारवती' ही सामाजिक संस्था कोणी स्थापन केली ?*           सरस्वती गणेश जोशी *३) कवितेचा आशय आणि अभिव्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल म्हणजे कोणतं काव्य ?*           नवकाव्य *४) 'अजेंडा २१' हा पर्यावरणविषयक ठराव कुठे संमत झाला ?*            रिओ डी जानेरो *५) जहाजबांधणीमध्ये अग्रेसर देश कोणता ?*              द. कोरिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  मधूसुधन जाधव ●  सुनील वानखेडे ●  कोंडीराम केशवे ◆  नरेंद्र जोशी ◆  वीरभद्र करे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *आनंद* ज्याचे दु:ख त्यालाच इथे भोगावे लागते दु:खात ही आनंदाने सदा जगावे लागते दु:खात आनंदाने जगतो तो खरा आनंदी आहे आनंदातही रडतो कूढतो तो विचारांचा बंदी आहे     शरद ठाकर सेलू जि.परभणी   8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सत्याला 'सत्य' म्हणून ओळखा आणि असत्याला 'असत्य' म्हणून, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सत्य या शाश्वत मूल्याचा  वैयक्तिक आणि सार्वजनिक  जीवनातील आचारासाठी माणसाचं विवेकी मन हाच मूलाधार असतो. वस्तुत: माणसाला सत्य सहज कळतं. सत्य पाहण्याची, बोलण्याची वा कृती करण्याची रूची स्वाभाविक असते. माणूस आसक्तीत अडकला की खोट्या, असत्य, अप्रामाणिकपणाची पुटं मनावर चढतात. विवेक हरपतो. तोंडानं सत्याचा पुरस्कार परंतु आचरण मात्र असत्य.  उच्चार-आचार यात पूर्णत: विसंगती. लग्नातील सातवी प्रतीज्ञा आहे, "सखा सप्तपदी भव" म्हणजे विवाहानंतर स्त्री व पुरूष यांच्यात मालक आणि नोकर असा भाव असता कामा नये. पती व पत्नी यांच्यात सख्याची -मैत्रिची भावना हवी. समानतेचा, कधीही न तुटणारा ऐक्याचा सख्य संबंध हवा. परंतु सत्यपालनाचे आचरण किती घडतं.* *सत्यनिष्ठेनं, सत्य आचरणानं खरंतर माणसाचं ह्रदय व्यापक होतं. अंत:करणात प्रेमभाव वाढतो. वैरभावनेचा लोप होतो. आत्म्याचा विकास होतो. सत्य हे सर्व समर्थ असल्यानं जगण्यातील विश्वास बळावत जातो. व्यापक अर्थानं सत्याचं पालन करण्याने स्वत:चं, कुटुंबाचं जगणं अर्थपूर्ण ठरतं, आनंददायी होतं.*    *दुष्ट कर्म तुम्ही, अजिबात टाळा !*    *पुढे नाही धोका, मुलांबाळा ॥* *सद्यस्थितीत देशात सत्य आचरणाच्या बाबतीत सर्वत्र अंधार दिसतो. सत्याचं पालन करणं हीच सर्वोत्तम समाजसेवा हा विचार रूझला तरच असत्याचा अंधार मिटून  सत्याचा सूर्योदय नक्कीच होईल.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    नारी मदन तलाबरी, भव सागर की पाल नर मच्छा के कारने, जीवत मनरी जाल। महात्मा कबीर परनारी व नारीचा अतिसंग बरा नव्हे हे पटवून देताना म्हणतात . नारी वासनेचा तलावात या भवसागरात माया जालात बुडवून टाकते. माशानं सफाईदारपणे पोहत जलाशयी स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतू तो फसव्या गळांच्या नादी लागून स्वत: शिकार्‍याच्या तावडीत जातो. तसे पुरूषाला आपल्या जाळ्यात जखडून ठेवण्याचं काम स्त्री करीत असते. त्या मुळे स्त्री संगापासूम सांभाळून राहिलं पाहिजे. संन्याशी व ब्रम्हचार्‍यानं स्त्री सान्निध्यात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवणं महा कठीण काम. आगीजवळ राहून लोण्यानं आपलं अस्तित्व कायम जपता येईल का ? तशातलाच हा प्रकार आहे. जप तपात आकंठ बुडून गेलेल्या ऋषी मुनींच्या जन्मभर केलेल्या तपश्चर्येला क्षणात भंग करण्याचं काम नारी सान्निध्यानं केलं आहे. ऋषी विश्वामित्राची तपश्चर्या मेनकेने नाहीशी केली होती , विभांडक ऋषींची तपश्चर्या भंग करण्याचं काम उर्वशीने पूर्ण केले होते. क्रोधी व कोपीष्ट म्हणून ख्याती असणार्‍या पराशरांचंही सत्यवतीपुढे काहीही चाललं नाही. अशी असंख्य उदाहरणे आपणास पोथी पुराणातून पाहता येतात. तेव्हा साधक , ऋषी, मुनींचाही निभाव न लागू देणार्‍या नारीपुढे सामान्यांचं काय खरं आहे?     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   जीवनाच्या जीवनप्रवासाची प्रत्येक वाट ही सरळ असतेच असे नाही तरीही मनुष्य त्या वाटेवरुन चालतच असतो आणि चालायलाच हवे.त्याच्याशिवाय जीवनप्रवास कसा आहे हे कसे समजणार ! त्या वाटेवरील चढ उतार कसा आणि किती आहे हे तरी कसे समजणार.चढ जास्त आहे म्हणून थांबायचे नाही आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही आणि उतार आहे म्हणून संथगतीने ही चालायचे नाही.कमीजास्त असले तरी त्याचपध्दतीने मार्गक्रमण करायचे.जोपर्यंत आपला जीवनप्रवास चालू राहील तोपर्यंत आपण न थकता तेवढ्याच आत्मविश्वासाने निरंतर चालायचे तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे नाही तर आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाऊन पदरी घोर निराशाच स्वीकारावी लागेल.काळ जसा सातत्याने पुढे पुढे चालत जातो तसा आपला जीवनप्रवासही सतत पुढे पुढे चालू द्यावा. किंचितही अडथळा आला तरी ती दूर करण्याची तयारी आपल्यामध्ये असू द्यावी तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे हे नेहमी लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक - समर्थ रामदास स्वामी 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ संकलक : सुभद्रा सानप, बीड 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                 *गुरुपदेश* एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल. तात्पर्य :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🌹 *जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 (दिनांक३०- १२- २०१८) माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्यावर लुब्ध झालेले अतिउत्तम. कारण सौंदर्य हे सत्य शोधण्याच्या दृष्टीत असते. आणि ही सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उपजत करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवावे; म्हणजे सौंदर्याची परिभाषा आपोआपच समजेल, दिसेल. मानवी जीवन सामर्थ्यानं आणि सौंदर्यानं पुलकित झालेलं आहे. या सामर्थ्यमय जीवनाच्या वाटेवर संकटाचे आभाळ कोसळले तर ते मोठ्या हिंमतीने सामर्थ्यशालीपणाने दूर सारावे. आणि सौंदर्याचे क्षण आले तर ते आनंदानं हर्षमय मनाने उल्हासीतपणे जगावेत, अनुभवावेत. असे म्हणतात "सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे." या जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी मानव आहे. स्त्री आणि पुरुष ही त्याची दोन भाग आहेत, रुपं आहे. माणसाने फुलासारखे आपले जीवन जगावे या smt.pramila senkude 'या जगण्यावर या जन्मावर शतदः प्रेम करावे'........ *"सौंदर्य ही परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील श्रेष्ठ सर्जन आहे."* असे मनू ह्या विचारवंताने आपल्या विचारातून स्पष्ट केले आहे. गवताच्या पात्यावर पडलेल्या मोत्यासारखं दवबिंदू हे सौंदर्याचं लेणं आहे.श्रावणातील सौंदर्य मनाला खुदकन हसवत असत. कितीही झालं तरी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 'जशी दृष्टी तशी 'सृष्टी. *तरीही आणखी पुन्हा एकदा सांगावस वाटतं...* माणसाने बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहणे आवश्यक आहे. 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६५ - लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील. १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल. १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष. १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक. 💥 मृत्यू :- १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक. १९८९ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. १९९६ - बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे. १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जयपूर - राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूचे थैमान, महिनाभरात 72 मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर, १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी दिली प्रशासकीय मान्यता* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मेळघाटात गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जळगाव : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणार, एक न्यायमूर्ती अनुपस्थित असल्याने लांबणार सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : दमदार खेळ करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेलवर मात करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे पटकावले विजेतेपद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद वर चार सामन्यांची बंदी, चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *कथा व्यसन* आज सगळं गाव दु:खात बुडालं होत.  हळहळ व्‍यक्‍त होत होती.  बापाच्‍या सरणाला पोराने विस्‍तू लावण्‍याऐवजी आज पोराच्‍या सरणाला बाप विस्‍तू लावीत होता हे चित्र गावातील लोकांना देखवत नव्‍हते.  परंतु काळासमोर कोणाचे चालते, जे व्‍हायचं ते होऊनच राहते.  अखेर आबा पाटलांच्‍या मुलाने पहाटे पहाटे झोपेतच दम तोडला.  वर्षभर खाटल्‍यावरच होता, आज जाईल ................ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *आर. व्यंकटरमण*      माजी राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांचा जन्म २५ जुलै १९१0 रोजी तामिळनाडूतील पट्टूकोट्यय येथे झाला. ते भारताचे ८ वे राष्ट्रपती होते. १९८७ ते १९९२ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर होते. त्यांनी मद्रास विद्यापीठातून स्नातकोत्तर शिक्षण घेतले. तिथेच त्यांनी कायद्याचे शिक्षणही घेतले. मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ते सहभागी झालेत. १९५७ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मद्रास सरकारमध्ये मंत्रीपद ग्रहण केले. त्यांनी उद्योग, समाज, परिवहन, अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले. १९६७ मध्ये त्यांना योजना आयोगाचे सदस्य नियुक्त करण्यात आले. १९७७ मध्ये ते लोकसभेत निवडून आले. इंदिरा गांधी सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री बनविण्यात आले. १९८४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती बनले. त्यांनी इंदिरा गांधी शांती पुरस्कार व जवाहरलाल नेहरू पुरस्कारही मिळाला. २५ जुलै १९८७ रोजी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे कष्ट *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *१) झाडांच्या किती प्रजाती नाहीशा होण्याच्या वाटेवर आहेत ?*          १५०० *२) चिपको आंदोलन कुठून सुरू झालं ?*           टिहरी गढवाल *३) छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत ?*       ९० *४) 'द विंटर पॅलेस' कुठे आहे ?*          रशिया *५) आद्य महाकाव्य कशाला म्हणतात ?*              रामायण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  श्रीनिवास सितावर ●  राजेश अर्गे ●  अनिल सोनकांबळे ●  सलीम शेख ●  राम पाटील ढगे ●  सोपानराव डोंगरे ●  मोगलाजी मरकटवाड ●  कु. चैतन्या माणिक रेड्डी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *भान* योजना आखली पाहिजे योग्य भान ठेवून अन् ती राबवली पाहिजे सदा बेभान होऊन भान ठेवून आखलेली योजना सफल होईल बेभानपणे काम केल्यास कोण कसा विफल होईल     शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान रतन का जतन कर , माटि का संसार | आय कबीर फिर गया , फीका है संसार || अर्थ : ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्याला हा चक्षू प्राप्त झाला त्याला कशाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. ज्ञान हे मौलिक रत्न आहे. माणूस अंगावर हिरे रत्न माणकांचे किमती ,हार घालून श्रीमंतीचं प्रदर्शन करीत असतो. या दागिण्यांमुळे मानवी शरीर काही काळासाठी झगमगून उठेलही ! सदा सर्वकाळ हे उपहार अंगावर मिरवणं सांभाळणंही कमी का जिकीरीचं असतं ! ज्ञानी मात्र कुठल्याही कृत्रिम आभुषणाशिवाय खुलून दिसतो. सदा सर्वकाळ त्याच्या जगण्यात आत्मविश्वास असतो. संपत्तीची वाटणी होवू शकते. ज्ञान प्राप्त कर्त्याची ती कायम जहागीर असते. ज्ञान अक्षय आहे. त्याला मरण नसते. कुठल्याही फसवणुकीची भीती नसते. बाकी सर्व गोष्टी मातीतून मिळणार्‍या व मातीशी एकरूप होणार्‍या नश्वर बाबी आहेत. महात्मा कबीर म्हणतात माणसाने जन्म घेतला की त्याचा मृत्यूही ठरलेलाच आहे. जीवनात ज्ञानप्राप्ती केली नाही. अज्ञानातच चाचपडत राहिला. तर 'सारा जन्म व्यर्थ घालविला.' असं होईल. 'ज्ञानाने उंचावते मान । अपमाना कारण अज्ञान । ' जीवनात काही भरीव काम केलं नाही. तर जगणंच बेचव होईल . जीवनातला आत्मिक आनंद व परमानंद गमावल्यासारखं होईल. म्हणून कार्य तत्पर राहिलं पाहिजे. कार्य प्रवणताच ज्ञानाची कायम अनुभूती देत असते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो. आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ? जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *तल्लीन - Engrossed* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *मनशांती* एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबद्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल . एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले. काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस." तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.  जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली. ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो." एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?" तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले." एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,  "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *भारतीय प्रजासत्ताक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९३० - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून काँग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली. १९३३ - स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड. १९४९ - भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला. १९५० - भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी. १९६५ - भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले. २००१ - गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार. 💥 जन्म :- १९५७ - शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८८५ - एडवर्ड डेव्ही, ब्रिटीश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : नानाजी देशमुख आणि डॉ. भुपेन हजारिकांना यांना मरणोत्तर भारतरत्न तर माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विविधता, लोकशाही आणि विकास हीच भारताची ओळख आणि जगासमोरील आदर्श - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील एकूण 44 पोलिसांना पुरस्कार जाहीर. 4 पोलिसांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली : अयोध्या खटल्यासाठी नव्या घटनापीठाची स्थापना, 29 जानेवारीला होणार सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रणजी करंडक : विदर्भ संघाचा अंतिम फेरीत प्रवेश, केरळ संघावर एक डाव व 11 धावांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नोवाक जोकोव्हीचने लुकासवर 6-0, 6-2, 6-2 असा सहज विजय मिळवित ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम फेरीत मारली धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन* आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते. व्यापारी म्हणून आलेले आणि राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी भारतावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले. ........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://b.sharechat.com/rcO9CGfOLT आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *भारतीय प्रजासत्ताक दिन* प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व अन्यत्र ही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठिकाणी प्रभातफेरी, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्याचा या दिवशी सरकार तर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोषनाई केली जाते. प्राथमिक शाळांतून मुलांना खाऊ ही वाटप केला जातो. मुले ही आनंदित होतात.   *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शील, करुणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *०१) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?*          मोर *०२) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?*           वाघ *०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?*          हॉकी *०४) भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?*           कमळ ०५) भारताचा राष्ट्रगीत कोणते ?*              जन-गण-मन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  रवींद्र मुपडे ●  सचिन पुरी ●  सुरेश पवार ●  बालाजी जोगे ●  कल्याण वतनदार ●  विशाल सोनालकर ●  जावेद शेख ●  सतिशकुमार साटले ●  ओमसाई कोटुरवार ●  चंद्रकांत लांडगे ●  दिलीप सोनकांबळे ●  निखिल मोटघरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भास* वागणं अन् बोलणं विरोधाभास असतो एखादा बोलण्यातच फक्त खास असतो वागणं अन् बोलणं एक असलं पाहिजे बोलण्यापुर्त फक्त नेक नसलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••              🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     जेता मीठा बोलना तेता साधु ना जान पहिले थाह देखि करि, औंदेय देसी आन। सारांश गोड बोलणारा प्रत्येक जण साधू असेलच असे नाही. त्यामुळे गोड बोलणार्‍या सर्वांनाच साधू म्हणून स्वीकारू नये. सुरूवातीला पोपटावानी गोड व खुपच आस्थेवाईकपणे बोलल्यासारखी वाटणारी बरीच माणसे अंतिमतः ढोगीरूपाने सामान्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेवून त्यांना फसवणारे साधुरूपातले लांडगेच निघाल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडलेली अाहेत. तेव्हा खरा साधू ओळखता आला पाहिजे. संताची महत्ती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात . 'जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥' समर्थांनीही सज्जनाची लक्षणे सांगितलेली आहेत. 'वेष असे बावळा परि अंतरी नाना कळा ।। अगदी अलिकडे खर्‍या संताचं प्रात्यक्षिकच ज्यांनी आपल्या जगण्यातून समाजाला दाखवून दिलंय ते दृष्टे सुधारक संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांनी सुधारणावादी दृष्टी घेवून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवला आहे. आम्हाला खरे संत ओळखता आले पाहिजेत. अध्यात्माच्या नावाखाली लोकांना कर्मकांडाच्या व थोतांडाच्या नादी लावून साधू रूपाआडून साध्या भोळ्या लोकांचं शोषण करणारी गोचिडे आम्हाला वेचून फेकता आली पाहिजेत...     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रजासत्ताक - Republic* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *उपयुक्त जीवन* कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. *तात्पर्य - जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~  

१)नभात शुभ्र चांदण्यानी रांगोळी काढली चंद्राच्या जोडीने गणतंञाचा प्रभातीची तयारी केली. २) हिरव्या हिरव्या सृष्टीला शोभे सूर्य लाल प्रजासत्ताक दिनाची उगवली सकाळ.... 〰〰〰〰〰〰 प्रमिला

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *राष्ट्रीय मतदार दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले. १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान. १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान. २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान. 💥 जन्म :- १८६३: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे 💥 मृत्यू :-  १६६५: सोनोपंत डबीर १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर न्यूयॉर्क येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अतिदूर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्हय़ाला नागरी विमान सेवेने जोडण्याची प्रक्रिया लवकरच आकाराला येईल, असा विश्‍वास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लोकसभा, विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्याच होतील, चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आसाममध्ये राजकीय आणि संवदेनशील मुद्दा झालेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेचा अंतिम अहवाल ३१ जुलैपयर्ंत सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यातील सुधारित तरतुदींना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने दिला नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच लोकेश राहुलला बीसीसीआयच्या प्रशासक समितीकडून निलंबनाची कारवाई तूर्त मागे घेण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* मतदार राजा जागा हो....! इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *रमाबाई रानडे* रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदीआणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.   *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) दात मुख्यत: कोणत्या घटकापासून बनलेले असतात ?* डेंटाईन *२) माणसाच्या मेंदूचं वजन साधारणत किती ग्रॅम असतं ?* १३५० ग्रॅम *३) निर्मल ग्राम पुरस्कार कोणाकडून दिला जातो ?* केंद्र सरकार *४) 'नाबार्ड'ची स्थापना कधी झाली ?* १२ जुलै १९८२ *५) बास्केटबॉलचा प्रणेता कोण ?*              जेम्स नाइस्मिथ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  प्रा. वैशाली देशमुख ●  राहुल आवळे ●  नरेश दंडवते ●  कल्पना दत्ता हेलसकर ●  अंबादास कदम ●  इमरान खान ●  ललेश पाटील मंगनाळीकर ●  मुजीब फारुखी ●  राजीव सेवेकर ●  महेबूब पठाण ●  गंगाधर ईबीतवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *जातीयवाद* जे जातीयवाद करतात तेच वाईट म्हणत आहेत किती हे खोटारडे खोट्या गप्पा हाणत आहेत हे फक्त वरवर तोंड चोपड्या गप्पा हाणतात कोण काय करतो हे सर्व लोक जाणतात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कवी कुसुमाग्रज, अब्दुल कलाम, आगरकर किंवा तुकोबा यांना काय म्हणावं, ही खरंच वेगळी माणसं होती का? 'वेडी' होती का? आणि हे 'वेड' असलंच तर ते कोणत्या प्रकारचं होतं? ही एवढी बुद्धिमान, कर्तबगार माणसं पण 'अर्थप्राप्ती' ला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान होतं. 'जोडोनिय धन उत्तम व्यवहारे' हे त्यांना कळलं नसेल का?* *जगरहाटी वेगळी असते. लिओ टाॅलस्टाॅय यांची 'हाऊ मच लँड डज ए मॅन नीड?' ही कथा आहे. पाखोम हा शेतकरी तीचा नायक. त्याला जमीन घेण्याचं वेड आहे. शेवटी त्याची बश्कीर समुदायाच्या लोकांशी ओळख होते. ते पाखोमला अत्यल्प किंमतीला जमीन विकायला तयार होतात. मात्र एक अट असते. पाखोमने सूर्योदयाला धावायला सुरूवात करायची आणि सूर्यास्ताला थांबायचे. त्या दरम्यान जितकी जागा तो चालेल, तेवढी त्याला मिळेल. दुस-या दिवशी पाखोम धावू लागतो. सूर्यास्तापूर्वी तो मूळ जागेवर बश्कीरना भेटायला आणि आपण किती अंतर तुडवले हे सांगायला परततोही. बश्कीरांना तो ते सांगतोही. पण अतिश्रमाने तो कोसळतो.* *वर उल्लेखिलेल्या ध्येय वेड्यांच्या अगदी विरूद्ध टोकाची वृत्ती पाखोमची. माणसाला जन्मत:च काही मूलभूत वृत्ती प्राप्त झालेल्या असतात. काही स्वत:साठी झटतात; काही दुस-यांसाठी. अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्त्या' नावाचा सुंदर लघुनिबंध लिहिला आहे. त्यात रात्रभर तेवत राहून इतरांना प्रकाश देणारी एक आणि जिचा काहीच उपयोग न झाल्याने सडून, कुरतडून गेलेली दुसरी अशा मेणबत्त्यांचे सुरेख दर्शन घडवले आहे. शेवटी ज्याने त्याने आपली मेणबत्ती कोणती हे ठरवायचे आहे !*     ••●🔶‼ *रामकृष्णहरी* ‼🔶●••               🔶🔹🔶🔹🔶🔹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     जा पल दरसन साधू का , ता पल की बलिहारी | राम नाम रसना बसे , लीजै जनम सुधारी || अर्थ : ज्या क्षणी खर्‍या साधूचं दर्शन होतं . त्या क्षणाला शतशः आभार व साधूंना साष्टांग दंडवत ! मी त्या साधूंना पूर्ण रूपाने शरण जात असततो. त्यांच्यामुळेच मला सत्संगती मिळते. माझ्याठायी असणार्‍या विकारांचं दमन होतं. सद्विचारांचा मार्ग मिळतो. साधूंच्या सहवास व परीसरूपी हस्तस्पर्शाने जगणंच आलपार बदलून मी मानवतेची वाट चालू लागतो. वाचेतले अभद्र शब्द नाहिसे होवून वाणीही शुभंकर होते. जीवन कृतार्थ होवून साफल्याची समाधान प्राप्ती होते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो. अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा. म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल. *©व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रवचन - Discourse* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     स्त्री स्वतःच पूर्णरुप ! ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे ही तक्रार केली नाही. आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास नकार दिला. आणि एका सुंदर सकाळी......... ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले. तिने शांतपणे त्यांना विचारले, "आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?" त्यांनी ही तितक्याच शांत पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे ऐकले आहे. " तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?" "जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !"तेम्हणाले. ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली. काही वेळाने ती म्हणाली, "आपण दोघेही काहीतरी नवे शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग सम्रुद्ध होईल पण मी जे शिकले आहे, ते फारसे जगापुढे येणारच नाही." बुद्धांनी तिला विचारले, "तू काय धडा शिकलीस ?" तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. "तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. " यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते. १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले. 💥 जन्म :- १९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. २०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : 6 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या याचिकांवर अंतिम सुनावणीस होणार सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा आठ गडी राखून विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.  http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *राम गणेश गडकरी*        मराठी साहित्याचे शेक्सपिअर म्हणून ओळखले जाणारे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, आणि भावबंधन ही चार पूर्ण नाटके लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. पुण्यात महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी किलरेस्कर नाटक मंडळीत दाखल झाले. रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या करमणूक नियतकालिकातून ते कविता, लेख, नाटके लिहू लागले. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीघार्युषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, पण गडकर्‍यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'वर्ल्ड वाईड वेब कॉन्सोर्टीअम' या संस्थेला कोणत्या नावाने ओळखतात ?*            डब्ल्यू ३ सी *२) देशात अवयवदानात अग्रेसर असणारं राज्य कोणतं ?*            तामिळनाडू *३) 'कवी बी' हे कोणाचं टोपणनाव आहे ?*            नारायण गुप्ते  *४) न्यायमूर्ती सरकारिया आयोग कशासाठी स्थापन केला होता ?*            केंद्र-राज्य संबंध ५) कोणत्या वेदामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे ?*              ऋग्वेद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  राहुल तांबे, मुंबई ●  सोनू राजेंद्र येरमलवाड, येवती ●  प्रशांत उकिरडे, बार्शी ●  रेश्मा कासार, पुणे ●  सिध्दांत मनूरकर, पाथर्डी ●  योगेश फत्तेपुरे, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *माणसं* आपलीच माणसं आपल्याला टाळतात लपून छपून माघारी आश्रूही ढाळतात आश्रूच ढाळायचे तर टाळायचे कशाला टाळण शक्य नसल्यास पाळायचे अशाला   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *स्वत:चं मरण पाहता येत नाही, इतरांच्या मरण्यातूनच हा अनुभव येतो. मृत्यू अटळ आहे, हे कळलेलं असतं. मरण आपल्या जाणिवेत केव्हा प्रवेश करतं ? घरात, शेजारी जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा. प्रत्येकजण या अनुभवातून जातो. मग सुरू होते आपले मरणरंजन. मरणाचे भय वाटत नाही, पण मरावेसे वाटत नाही. इतकी वर्ष जगलो, खूप झाले. तरी अजूनही जगावेसे वाटते. याचे काय उत्तर देणार ? आपले अध्यात्म जन्म-मरणाचा फेरा चुकवायला सांगतं. हा फेरा चुकविणे म्हणजे 'मोक्ष'. हीच 'मुक्ती.'* *निद्रा म्हणजे मरणाची छोटी आवृत्ती असते. आपण निद्रा घेतो म्हणजे नेणिवेच्या प्रांतात सुखनैव संचार करतो. तिथे सुखदु:खाचे भान नसते. निद्रा-जागृतीचा हा खेळ आपण नेहमीच खेळतो. झोपेत स्वप्न पडतात, ती जागेपणी आठवतात. अर्थ इतकाच, की आपण संपूर्णपणे जाणिवेच्या बाहेर गेलेलो नसतो. निद्रा ही विश्रांती आहे म्हणून आपणांस तिचे भय वाटत नाही.* *मरण हीसुद्धा अशीच निद्रा आहे...पण ती अंतिम, चिरनिद्रा आहे. मरण ही वस्तुस्थिती आहे. मरणाची भितीदायक कल्पना दूर सारून मूळस्वरूप न्याहळणे म्हणजे 'मरणसौंदर्य' पाहणे. एखादे ज्ञानेश्वर किंवा तुकारामच हे करू शकतात. मरणातील मरणपण काढायचे तर मरणापाशी समरस झाले पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     रात गवई सोय के दिवस गवाया खाय | हीरा जन्म अनमोल था , कौड़ी बदले जाय || अर्थ : महात्मा कबीर मनुष्य जन्माची दुर्लभता पटवून देतात. सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव जन्म दुर्मिळ असून विश्वाची चिंता वाहण्याचं सामर्थ्य फक्त मानव जन्मातच आहे. मानव प्राणी चिंतनशील व विचारशील आहे. इतरांपेक्षा मानवाला बुद्धी आणि बोलीच वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे तो जगताची काळजी वाहू शकतो. भल्या वाईटाचा विचार करू शकतो,परंतु हल्ली मानव स्वार्थांध झाला आहे. जग आपल्यामुळं सुंदर होवू शकतं. हा भावही तो जणू विसरूनच गेलाय की काय ? अशी परीस्थिती बनलीय. मानवाने विवेकी अन निरामय जगण्यातच त्याची जीवन सार्थकता आहे. परंतु हे मानवा तू देह विलासी बणून रात्र झोपून आळसात गमावत आहेस. दिवसचे दिवस देह शृंगारात व जिभीचे चोचले पुरवण्यातच तू मश्गूल होवून संपवून टाकत आहेस. अशा प्रकारे तू हिर्‍यासमान असणारा अनमोल असा मनुष्यजन्म उगाच कौडीचेही सार्थक न करता व्यर्थच वाया घालवत आहेस. अशा प्रकारे तुझ्या या जन्माला अर्थच काय राहिला बरे ? असे जगणे तर सर्लच पशू पक्षीही जगत असतात. पुढील संत सुवचन पहा. गेला गेला रे जन्म वाया । फुकाची झिजवली काया । नाही केला रे विचार । नराचा झाला रे खर ।     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *रुबाबदार - Bourbon* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जंगलचा राजा !* एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं. सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण... मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही! बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं. 'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण... तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू. जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता... 'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण.... सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन. 💥 जन्म :- १८९७ - भारतीय क्रांतिकारक, नेताजी सुभाषचंद्र बोस १९२६ - मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे 💥 मृत्यू :-  ११९९ - याकुब, खलिफा. १५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *उत्तराखंडः देहरादून जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर; अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीच्या इशाऱ्यानंतरचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - राष्ट्रवादीकडून पाच विद्यमान खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी, उदयनराजे भोसलेंनेही उमेदवारी, सूत्रांची माहिती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी मुंबई : नवी मुंबईतील गावठाणांच्या विस्तारासाठी आवश्यक असलेला सिटी सर्व्हे सिडकोमार्फत होणार - मुख्यमंत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC पुरस्कार सोहळ्यात 'विराट एके विराट'; एकाच वर्षी जिंकल्या तीनही मानाच्या ट्रॉफी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी ऑकलंडला दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *कथा - वेळ नाही मला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *नेताजी सुभाषचंद्र बोस* भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने ब्रिटिशांना लढा देण्यास उभे राहिले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा हुतात्म्यांचा नावे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेलेली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या पायावर उभे रहाण्यात खूप लोकांनी मोलाचा वाटा आहे आणि अशाच काही थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो मै तुमहें आझादी दुंगा अशी गर्जना करून देशातील नवयुवकाना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897  रोजी ओरिसा राज्यातील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. वेणीमाधव हे त्यांचे शिक्षक, त्यांनी सुभाषचंद्र बोस मधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाषचंद्र बोस गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाषचंद्र बोस त्यांचे शिष्य बनले. १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पृथ्वीवर पडणार्‍या गुरुत्वीय दाबाला काय म्हणतात ?* वजन *२) संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय ?* डेबुजी झिंगराजी जानोरकर *३) डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?* प्रार्थना समाज *४) पंडिता रमाबाई यांनी 'शारदा सदन' ही संस्था कुठे सुरू केली ?* मुंबई *५) अजमल शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*              हॉकी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  संतोष बोधनकर ●  भालचंद्र गावडे ●  दिनेश चिंतावाड ●  सुनील बंडेवार ●  शंकर नरवाडे ●  श्याम खंडेलोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *ताठा* कितीही फुगो बेडूक बैला एवढा होत नसतो तसेच सुंभ जळाला तरी पिळ जात नसतो काहींच्या अंगात रिकामा ताठा उरलेला असतो अंगात बळ असो की नसो जोर भरलेला असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• *अंत्ययात्रा निघालेली होती. एक छोटा मुलगा आईचा हात धरून स्वत:च्या वडिलांना शेवटचा निरोप देण्यासाठी सगळ्यांबरोबर चालत होता. दहा-अकरा वर्षाच्या या लाडक्या मुलासाठी वडिलांचं असं जाणं धक्कादायक होतं. अंत्ययात्रा दफनभूमीत आली. खोदलेल्या खड्ड्यात शवपेटी ठेवण्यात आली. विधीवत प्रत्येकाने मूठभर माती वाहिली. आई सोबत छोट्या मुलानेही मूठभर माती आपल्या आवडत्या वडिलांवर वाहिली. नंतर खड्ड्यात फावड्याने माती टाकणे सुरू झाले, मातीखाली झाकले जाणारे वडिल मुलगा पहात होता. एवढ्यात बुजत चाललेल्या खड्ड्यात एका पिटुकल्या बेडकाने उडी मारली, बेडकावर माती पडली. तो बेडूक बुजला गेला.* *दफनविधी उरकून शांतपणे घराकडे चालणा-या मुलाच्या चेह-यावरची अस्वस्थता आईच्या लक्षात आली. वडिलांच्या आठवणीने मुलाच्या डोक्यात काहूर माजले असावे म्हणून आईने मुलाला बोलते केले. पण मुलाने आईला वेगळाच प्रश्न केला,'दफनाचा खड्डा बुजवताना मातीखाली एक जिवंत बेडूक गाडला गेलाय. त्या बेडकाचं काय झालं असेल गं?' मुलाचा हा प्रश्न ऐकून आई अवाक् झाली. मृत वडिलांचे दु:ख बाजूला ठेवून जिवंत बेडकाचा विचार करणारा हा मुलगा म्हणजे प्रतिभावंत रशियन लेखक 'मॅक्झिम गार्की.' या दृष्टांतामधील अधोरेखीत तथ्य म्हणजे जगताना प्रश्न पडणे, हे मानवाचे भागध्येय आहे. मानवी स्वभाव आहे. किंबहुना, प्रश्न पडणे हे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रश्न पडणारे व प्रश्न विचारणारे समाजाला पुढे नेत असतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    पतिबरता मैली भली , गले कांच को पोत | सब सखियाँ में यो दिपै , ज्यो रवि ससी को ज्योत || अर्थ मानसाचं व्यक्तिमत्व त्याच्या वर्तनावरून समजतं. चारित्र्यामध्ये शील जपणं अत्यंत महत्वपूर्ण माणलं गेलंय. ज्याला चारित्र्याची जोपासना करता आली त्याचं व्यक्तिमत्व आपोआपच खुलून दिसतं. रग्गड श्रीमंतीत जगणारी, सर्व सुख सोयीं उपभोगणारी , उंची वस्त्रे, अलंकार मिरवणारी, रूप गर्विता असेल. ती शिलाचं पावित्र्य जपत नसेल तर ती क्षण भंगूरतेला भुलून भौतिक सुखाच्या आहारी आत्मसन्मान गमावलेली व्याभिचारिणीच होय. तिच्यात आणि कळवातनीत काय फरक आहे ? द्रव्य लालसेपोटी आपलं सर्वस्व कुणापाशीही त्या गहान टाकित असतात. त्या देहाच्या व भ्रष्ट वासनेच्या पूजकंच मानल्या पाहिजेत. अशा शेकडो रुपगर्विता लावण्यवतीं पेक्षा फुटक्या मण्याचीही अपेक्षा न ठेवणारी. पतिव्रतेचा पातिव्रत्य धर्म जपणारी स्त्री दिसायला कुरूप असो की रंगाने काळी. भलेही तिच्या अंगावर दागदागिने नसू देत . तिला नेसायला उंची वस्त्र नसली तरी तिच्या पातिव्रत्यामुळे ती इत्तर स्त्रीयांधूनही आपसुकच उठून दिसते. भौतिक दारिद्र्य असलं तरी तिच्याकडं मनाची श्रीमंती असते . भलेही चारचौघीत मिरवण्या इतपत सौंदर्य तिच्याठायी नसलं तरी तिच्या पातिव्रत्यापुढे व तपश्चर्येसमोर त्या रूपगर्विता व लावण्यवती पार फिक्या पडतात. चंद्र सूर्याला तेज पुरवण्याचं सामर्थ्य पतिव्रतेच्या तपोबलात असतं .     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *नियोजन - Planning* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *यशाचा घडा* वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती. एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. 💥 जन्म :- १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार. १८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार. १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. 💥 मृत्यू :- १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते. १९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 10 टक्के आरक्षणाची अधिसूचना जारी, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मेक्सिको : गॅस पाईपलाईनच्या स्फोटातील मृतांची संख्या 79 वर पोहोचली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पालघर : पालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी साधला संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाबमध्ये आप सर्वच जागा लढवणार - अरविंद केजरीवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन 2019 चा विजेता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे : शालेय विद्यार्थ्यांना क्रीडागुण देण्याबाबत राज्य सरकारने अवलंबिली नवी पद्धत, याबाबत येत्या २ दिवसांत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *कथा - मुख्यालय* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *संत नामदेव* संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील  सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली.  शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  भारतीय पूर्व किनारपट्टीवरील सागरजलाची क्षारता किती टक्के आहे?* 👉    34% *२)  सयुंक्त राष्ट्रसंघाने जागतिक शैक्षणिक वर्ष कधी घोषित केले होते?* 👉    १९७० *३)   इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली?* 👉      २० सप्टेंबर १९८५              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● पांडुरंग मामीडवार ●  ऋषीकेश पवार ●  अनिल मुपडे ●  कुलदीप सूर्यवंशी ●  संतोष हेंबाडे ●  साईनाथ जगदमवार ●  वीरभद्र बसापुरे ●  पिराजी कटकमवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकजूट* आमची संख्या मोठी हे डोक्यात खुळ असते संखेत नाही विचारत एकीचे बळ असते संख्येला नाही एकजुटीला कुठेही किंमत असते एकजुटी पुढे जाण्याची कोणातच हिंमत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्‍याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्‍या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ? जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *उद्दिष्ट - Objective* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   . *आयुष्यभराची प्रतिष्ठा* महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.? कृष्णाने उत्तर दिले. ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. *रुक्मिणीने विचारले..* *कोणते पाप.?* कृष्ण म्हणाला. जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. *रुक्मिणीने विचारले.* *मग कर्णाचे काय.?* कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही. पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला. *तात्पर्य :-* तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.! *चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरुपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी. १९९६ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड २००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला. 💥 जन्म :- १८९२ - चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक. १९०६ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते. 💥 मृत्यू :-  १९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी. १९५१ - अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी. १९६० - दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक. १९९० - रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते, विश्‍वसनीय सूत्रांनी दिली माहिती, विद्यमान लोकसभेची मुदत येत्या ३ जून रोजी संपत आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सवर्णांमधील आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकर्‍यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये देण्यात येणार्‍या १0 टक्के आरक्षणाला द्रमुक पक्षाने मद्रास हायकोर्टात दिले आव्हान* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आज होणाऱ्या सभेत सहभागी होण्यासाठी शरद पवार, देवेगौडा आणि अखिलेश यादव कोलकाता येथे दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे अँप म्हणून व्हॉट्सअँपने फेसबुकवर मात करीत पटकावला अव्वल क्रमांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यवतमाळ : जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘स्वामिनी’ या संघटनेच्या नेतृत्वात हजारो महिलांनी दिली धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांची तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार करीत मिळविला ऐतिहासिक विजय, युजवेंद्र चहल सामनावीर तर महेंद्रसिंग धोनी ठरला मालिकावीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालविवाह कसे रोखता येतील ?* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *चिंतामण विनायक जोशी*  *चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी पुण्यात झाला. हे विनोदी साहित्याकर म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते. त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत. दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी केले होते. त्यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १९६३ झाला.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) गाईचं दूध कोणत्या जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?* 'अ' जीवनसत्त्व *२) 'माझे विद्यापीठ' हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणाचा ?* नारायण सुर्वे *३) जमिनीच्या वरच्या थरात पिके घेतात, झाडे लावतात त्यांना काय म्हणतात ?* जिओपोनिक्स *४) भुतिया ही जमात कुठे आढळते ?* कुमाऊ गढवाल *५) सोशल मीडियाचं व्यसन सोडवण्यासाठी देशातलं पहिलं क्लिनिक कुठे उघडण्यात आले ?*              बेंगळुरू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  अजय कोंडलवाडे ●  अजय परगेवार उमरेकर ●  माधव चपळे ●  शिवशंकर स्वामी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंद* दुस-याच्या आनंदासाठी जो हार मानत असतो तो जिंकण्याच महत्त्व स्वतः जाणत असतो आपल्यासाठी हारायला वाघाच काळीज लागत आपल्यांना आनंद द्यायचा तेच अशा प्रकारे वागत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• *बहिणाबाईंनी सांगितलयं ,'जगण्या मरण्यात काय तर एका श्वासाचं अंतर ! एकच श्वास, फक्त एकच. पण तो एकच श्वास केवढं मोठ अंतर निर्माण करतो. असण्या-नसण्यातलं अंतर, जन्मा-मरणातलं अंतर, होत्या-नव्हत्यातलं अंतर, जागण्या-झोपण्यातलं अंतर, क्षणांत आहे आणि क्षणांत नाही, ही असामान्य गोष्ट श्वासाच्या अंतराने प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते.* *माणूस जातो, स्मृती उरतात. त्या चांगल्या उराव्यात असं सा-यांनाच वाटतं पण त्यासाठी काही चांगलं करावं लागतं, हे विसरून कसं चालेल ? मृत्यू अनेक गोष्टी शिकवितो, अर्थातच जिवंत असणारांना ! पण मृत्यूची शिकवण तरी किती वेळ स्मरणात राहते ? मृत्यू नावाचे जळजळीत सत्य उत्तम वागण्याचे, जगण्याचे आत्मभान निर्माण करून देते. माणूस गेल्यावर होणारी कालवाकालव, त्याच्या स्मृतींची असंख्य फुलंच म्हणावी लागतील. या फुलांसाठी तरी श्वासात अंतर पडण्यापूर्वी ' जे जे उत्तम ' आहे तेच करावयास हवे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्‍याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्‍या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची  निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल. जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल.‌ *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *बक्षीस - Prize* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एक कवी व श्रीमंत माणूस* एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही. मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

हस्तरेषा हस्तरेषेवरील भाग्याचा विश्वास नसलेला बरा कष्टाने मोडलेला भाकरीचा तुकडाच खरा 〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा 💥 जन्म :- १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक, राजनीतीज्ञ. १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक. १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक. १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक. १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ * राज्यात पुन्हा डान्स बार सुरू, सरकार डान्सबारबाबत कायद्यात बदल करणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार नियम बनवणार - अधिकृत सूत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *येत्या सोमवारी 21 जून रोजी भारतातून सुपरमून दिसणार; खग्रास चंद्रग्रहणाचीही पर्वणी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कोल्हापूर- अंबाबाई मंदिरात भक्तांना आता मोफत चहा, दुपारी 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोफत चहा मिळणार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महेश एलकुंचवार 99 व्या नाट्य संमेलनाचे उद्धाटक, आज होणार अधिकृत घोषणा.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : शिक्षणाची वारीचा आज शेवटचा दिवस,नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांची अनेक स्टॉलला भेट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पत्रकार हत्या प्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पंजाबमधील पतियाळा येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणतर्फे २१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी औरंगाबादच्या प्रतिभावान जिम्नॅस्ट रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींची निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *एका शेतकऱ्याची आत्मकथा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *महादेव गोविंद रानडे*  महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. माधवराव रानडे व न्यायमूर्ती रानडे नावाने प्रसिद्ध, हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म  नाशिकमधील  निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६ नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यांचा मृत्यू १६ जानेवारी १९०१ रोजी झाला.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) चांदी या धातूचं रेणूसूत्र काय ?*  एजी *२) विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते ?* टंगस्टन *३) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?* कैलास सांकला *४) जागतिक व्यापार संघटना केव्हापासून कार्यान्वित झाली ?* १९९५ *५) १९०९ च्या सुधारणा कायद्याचे नाव काय ?*              मोर्ले मिंटो कायदा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीमती विजया वाड, साहित्यिक ● प्रभाकर कमटलवार ● रामनाथ खांडरे ● त्र्यंबक आडे ● महेश गोविंदवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राजकारण* आत वेगळ बाहेर वेगळ असलं धोरण आहे साहित्यातही पहा कसलं राजकारण आहे साहित्य क्षेत्रही त्या पासून सुटू शकत नाही राजकारणात कोणताच प्रश्न मिटूत शकत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      जेता मीठा बोलना तेता साधु ना जान पहिले थाह देखि करि, औंदेय देसी आन। सारांश गोड बोलणारा प्रत्येक जण साधू असेलच असे नाही. त्यामुळे गोड बोलणार्‍या सर्वांनाच साधू म्हणून स्वीकारू नये. सुरूवातीला पोपटावानी गोड व खुपच आस्थेवाईकपणे बोलल्यासारखी वाटणारी बरीच माणसे अंतिमतः ढोगीरूपाने सामान्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेवून त्यांना फसवणारे साधुरूपातले लांडगेच निघाल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडलेली अाहेत. तेव्हा खरा साधू ओळखता आला पाहिजे. संताची महत्ती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात . 'जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥ ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥' समर्थांनीही सज्जनाची लक्षणे सांगितलेली आहेत. 'वेष असे बावळा परि अंतरी नाना कळा ।। अगदी अलिकडे खर्‍या संताचं प्रात्यक्षिकच ज्यांनी आपल्या जगण्यातून समाजाला दाखवून दिलंय ते दृष्टे सुधारक संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांनी सुधारणावादी दृष्टी घेवून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवला आहे. आम्हाला खरे संत ओळखता आले पाहिजेत. अध्यात्माच्या नावाखाली लोकांना कर्मकांडाच्या व थोतांडाच्या नादी लावून साधू रूपाआडून साध्या भोळ्या लोकांचं शोषण करणारी गोचिडे आम्हाला वेचून फेकता आली पाहिजेत...     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातला भित्रेपणा नष्ट करुन आत्मविश्वासाने बोलण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर उभे राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहोत त्यात सत्यता असली पाहिजे कारण लोक सत्य काय आहे आणि किती सत्य आहे ह्याकडे लोकांचे तुमच्याकडे लक्ष असते. आपल्यावर कुणीही आक्षेप घेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्यामध्ये स्पष्टपणा आत्मविश्वास,सकारात्मक परिणामकारकता आणि सत्यता असल्यामुळे भ्यायची गरज नाही.मग आपोआपच आपल्यातला भित्रेपणा नष्ट व्हायला लागतो.भीती वाटते केव्हा आपल्या विचारात सत्यता नसेल,स्पष्टपणा नसेल आणि लोकांना आपण काहीतरी म्हणून फसवत आहोत तर भीती आपल्यामध्ये राज्य करते. मग ती कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *आत्मविश्वास - Self* confidence •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बुड बुड घागरी* बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🌷🌷जीवन विचार*🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *माणसाचे जीवन हे विद्येवाचून निरर्थक आहे.* विद्येसारखी शरीराराला शोभा देणारी ,दुसरी कोणतीच वस्तू नसते. *विद्या* ही माणसाचे आईप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे कल्याणाची काळजी घेते,व कौटुंबिक उदासिनता घालवते.आणि आपली कीर्ती दशदिशांमध्ये उजळविते.म्हणूनच विद्या ही जणू आपली कल्पकता आहे असे म्हटले आहे. विद्येविना मनुष्य पशूच असतो. विद्यारूपी धन हे सर्व धनापेक्षा अधिक मौलिक आहे.आपल्या जीवनात ह्या रत्नरूपी विद्येचे महत्त्व किती महत्वपूर्ण आहे हे ह्या श्लोकांवरून अधिक कळून येते. "किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिनःl अकुलीनोsपि विद्यावान देवैरपि स पूज्यते l l" *विद्याहीन माणसाच्या थोर कुलाचा काय उपयोग? विद्वान मनुष्य कुलीन नसला तरी त्याची देवदेखील पूजा करतात.* आपल्या सुखी जीवनाची पायरी आहे विद्या.ज्ञानमुळं का जगावं आणि कस जगावं हे कळत.आणि असं जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कस असावं हा प्रश्न ??कधीच पडत नाही.ज्ञानाचा हा प्रकाश सर्वांमध्ये सर्वोतपरी सततचा असावा आणि पसरावा. 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *✍शब्दांकन/संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :-  २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्ल्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शिवस्मारकाच्या कामाला स्थगितीनंतर शिवस्मारक समितीची तातडीची बैठक सुरू* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - सीबीआयच्या नव्या संचालकांच्या निवडीसाठी 24 जानेवारी रोजी निवड समितीची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या कार्यकारी संचालकपदी विशाखा मुळे यांच्या पुनर्नियुक्तीस रिझर्व्ह बँकेने दिली मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : नांदेडात शिक्षणाची वारी कालपासून प्रारंभ, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : नऊ दिवसांनी हायकोर्टमध्ये काही मागण्या मान्य झाल्याने बेस्ट कामगाराचा संप मिटला, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत 893 बेस्टच्या बस रस्त्यावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *खेलो इंडिया 2019 : बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मितिका गुणेलेने 17 वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवीत उपांत्य फेरी गाठली व पदक निश्चित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *सुचित्रा सेन*     बंगाली व हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्म १७ जानेवारी १९३१ रोजी झाला. सौंदर्य आणि उच्च दर्जाचा अभिनयाच्या त्या सम्राज्ञी होत्या. सुचित्रा सेन आणि उत्तम कुमार यांनी अभिनय केलेले अनेक बंगाली चित्रपट लोकप्रिय झाले. सुचित्रा सेन यांचे माहेरचे नाव रमा दासगुप्ता होते. त्यांचे वडील करुणामय दासगुप्ता हे एका शाळेत हेडमास्तर होते. सुचित्रा सेन यांच्या पतीचे नाव दिवानाथ सेन, मुलीचे मुनमुन सेन आहे आणि आईचे नाव इंदिरा होते. मॉडेल रिया सेन या सुचित्रा सेन यांच्या नात आणि मुनमुन सेन यांच्या कन्या आहेत.सुचित्रा सेन यांनी उत्तमकुमार यांच्या सोबत अनेक चित्रपटांत कामे केली आहेत. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना १९७२ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. सारे चतुर हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट होता. तर देवदास हा त्यांचा हिंदीतील पहिला चित्रपट होता. त्यांनी बंगालीतील देवदास चित्रपटात केलेली पारोची भूमिका विशेष गाजली होती. विशेष म्हणजे आतंरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाने छाप सोडली होती. विदेशात सन्मान झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होती. त्यांची आंधी चित्रपटामधील इंदिरा गांधी यांची भूमिका ऐतिहासिक ठरली होती. मात्र रामकृष्ण मिशनच्या कार्यासाठी त्यांनी चित्रपटातून संन्यास घेतला होता.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' केव्हा सुरू झाली ?*          १९५६ *२) कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप होतो ?*         प्लाझमोडियम *३) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची आणि फळांची उत्पादकता वाढवतात ?*            गॅमा *४) मानवी रक्ताचा पीएच किती आहे ?*          ७.५ *५) १९३२ मध्ये न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?*              प्रा.चॅडविक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जयप्रकाश भैरवाड ● शेखर घुंगरवार ● शरद दळवी ● सचिन पाटील पार्डीकर ● धम्मपाल कांबळे ● यश चेलमेल ● राम घंटे ● मन्मथ भुरे ● माधव गडमवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हातच सोडून* लोक हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतात आहे त्यात आनंद मानायचा तर आश्रू ढाळत जगतात        पळत्या मागे लागल्यास आश्रुच ढाळावे लागतील आनंदी क्षणही दु:खाचे म्हणून गिळावे लागतील    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान* *ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।* *ज्ञान आणि कर्म यांचा जीवन व्यवहारात अन्योन्य संबंध कसा असावा आणि त्यानं जीवनविकास कसा घडवावा, हा अर्थपूर्ण संदेश या गीतात आहे. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर ज्ञानानं कर्मशील व्हावं आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश या गीतात आहे. सर्व विद्यामंदिरात ज्ञानसाधना कर्ममार्गानंच झाली पाहिजे, कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले पाहिजेत, तरच ज्ञानाचा उपयोग जीवन उभारणीसाठी होईल.* *विज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी जर विनाशाचा मार्ग दाखवला, तर ते विज्ञान आणि ती विज्ञानाची प्रगती नसलेलीच बरी. विज्ञानानं करूणेच्या चरणाशी नत व्हायला हवं; कारण करूणा हा सामाजिक, सामूहिक उत्थानाचा शांतीमार्ग असतो. या शांतीमार्गाने मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ' ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान ' हा संदेश सर्वांनी अंगी बाणवला पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चाकी चली गुपाल की, सब जग पीसा झार रुरा सब्द कबीर का, डारा पात उखार ।      परमात्म्याच्या चलत्या चक्रात जगातील समस्त माणसे भरडून काढली जात आहेत. सर्व माणसे माया मोहात गुरफटून संभ्रमित अवस्थेत जगत आहेत. आसक्तीने त्यांना असे जखडून टाकले आहे की नियतीच्या चक्रात रगडून त्यांचं  पिठ होत आहे जणू . मोठमोठ्या राजा महाराजांचं वैभव देखील पानांच्या बंगल्यासारखं क्षणार्भात भूईसपाट होवून गेलं आहे. काल भिकारी असणारा आज वैभवात असू शकतो. आजचा श्रीमंत उद्या कवडीमोलाचाही ठरू शकतो. हे सारं ज्याच्या त्याच्या कर्मगतीवर किवा नियतीच्या मनावर अवलंबून आहे. बर्‍याचदा  नियती एखाद्याची खूपच कठीण चाचणी घेत असते. खरं तर अंधार्‍या किर्र रात्रीला भयंकर काळोख भिती दाखवित असला तरी पहाटेपर्यंत हिंमतीनं  टिकायला हवं ! मग पुढे लख्खं प्रकाशाचं अधिराज्य असणार आहे.  महात्मा कबीर म्हणतात की, सत्य व वास्तव खूपच बलशाली आहे. ते लबाडी व चमकोगिरीच्या पुढे थोडं  धुसर भासेलही परंतु चिकित्सेचा हलका वाराही असत्याच्या वांझाड ढगांना पळता भुई थोडी करतो आणि सत्याच्या विवेकाच्या प्रकाशापुदं लबाडी पुरती गारद झालेली असते. माया मोहाने निर्माण केलेली भ्रमिष्ट अवस्था नाहिशी होईल. सत्य मार्ग कठीण असल्याने त्याच्यावरुन चालताना थोडी दमछाक जरूर होईल , फसगत करणारा , चकवा देवून रानभुल करून उरी फोडणारा किवा बदनमी करणारा हा मार्ग नक्कीच नाही.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चार भिंतींच्या आत कुढत बसण्यापेक्षा थोडं बाहेर या.हे जग खरंच किती सुंदर आहे.तुम्ही जे पाहिले नाही ते तुम्हाला पहायला मिळेल.जीवनाची अनेक रंग, अनेक ढंग पहायला मिळतील.प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शैलीत जगताना दिसेल.कुणाच्या चेहरा हसलेला,कुणाचा रुसलेला,कुणाचा चिंतेचा,कुणाचा घामाने माखलेला तर कुणाचा जीवनाला त्रस्त असलेला पहायला मिळेल.जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पहाल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल.नक्कीच तुमच्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे सुंदर उत्तर सुद्धा मिळेल.आपल्या जगण्याच्या शैलीत बदल होईल.तुमचे असलेले दु:ख सहज दूर होण्यास मदत होईल.मनावरचा ताणही कमी होईल.तुमच्या नकारात्मक जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल होईल.मग तुम्हीच म्हणायला लागाल.एकांतात एकाकी जीवन जगण्यापेक्षा बाहेरच्या जगाकडे पाहून आपणही आनंदाने जीवन जगू शकते.जशी लोकांकडे जगण्याची वेगळी कला आहे तशी आपल्याही अवगत करता येईल.आपणही इतरांसारखे हसून खेळून कधी आनंदाने तर कधी कष्टाने जीवन जगू असे वाटायला लागेल.मग आपल्यालाच वाटायला लागेल की,चार भिंतींच्या आत स्वत:ला कोंडून घेऊन जीवाची घालमेल न करता मुक्तपणे बाहेरच्या जगाकडे पाहत पाहत जीवन चांगले जगता येऊ शकते असा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आनंदाने जगण्यासाठी एक आनंदाचा दीर्घ श्वास घेण्यास उत्सुक व्हाल.मग तुमच्या जीवनाचे खरे रहस्य काय आहे हे नक्कीच उलगडेल.माणसे जोडा-मनही जोडा,माणसे जोडा- मैत्री वाढवा आणि माणसे जोडा आयष्य वाढवा असे तुमच्या जीवनाचे सूत्रच बनेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद....९४२१८३९५९०. 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *मंडई - Boarding* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *भावस्पर्श* सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले, शामराव :- तू का रडत आहेस बाळ ? मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........ शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो. मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ). शामराव :- कुठे सोडू तुला ? मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे.  शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!! मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ??  शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श केला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!! तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जी भावना स्पर्श करते तेच भावस्पर्श आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या. १९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण 💥 जन्म :- १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. मृत्यू १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ १९०५ - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार. १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता. २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती 💥 मृत्यू :-  १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय १९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर  २०१८ - विधान परिषदेचे माजी सभापती, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.ना.सि.फरांदे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - सातव्या वेतन आयोगाचे लाभ शिक्षकांनाही मिळणार, केंद्र सरकारकडून 1 हजार 241 कोटींची तरतूद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानातील ३३ पोलीस कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, गडचिरोली भेटीत पोलीस महासंचालकांकडून मंजुरी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मध्यमवगीर्यांना दिलासा देत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच करमुक्त उत्पन्नाची र्मयादा दुपटीने वाढवत पाच लाख करण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड : आजपासून नांदेडात शिक्षणाची वारी होणार प्रारंभ, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार उदघाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, कुमारस्वामी यांच्या सरकारला धक्का, दोन अपक्ष आमदार शंकर, नागेश यांनी काढला काँग्रेसचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक, याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे* प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर* द.रा. कापरेकर हे देवळाली (नाशिक) मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२ मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. १९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) मानवी डोक्याच्या कवटीत असणार्‍या हाडांची संख्या किती ?*      आठ *२) नॉनस्टीकच्या भांड्यावर कशाचा थर असतो ?*        टेफ्लॉन३ *३) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतं ?*         लहान मेंदू *४) कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?*              डोळा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● साईनाथ सायबलू, सहशिक्षक, धर्माबाद ● सचिन होरे, धर्माबाद ● किरण शिंदे ● ज्ञानेश्वर मोकमवार ● भीमसंदेश पतंगे ● रमेश सरोदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *पत्रकार* सर्व सामान्याचे प्रश्न शासनापुढे मांडत असतो जनतेच्या हक्कासाठी तत्त्वाने भांडत असतो सामान्याचे प्रश्न सोडवते तुमच्या हातची लेखणी न्यायासाठी लढून ती अधिकच होते देखणी     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील,  विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..*       ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीराचे बोल ———————— पर नारी पैनी छुरी, मति कौई करो प्रसंग रावन के दश शीश गये, पर नारी के संग। सारांश       पर नारी तीक्ष्ण धार असणार्‍या सुरीसारखी असते. तिच्या सोबत संगती करता कामा नये. तिच्या सोबत संग करणे तर  दुरच राहिले. परनारीचा मनात निर्माण विचारही माणसाची शांती व समाधान हिरावून घेतो. आमचं लोकबोलीचं धन म्हणजे संस्काराचा ठेवाच आहे. जात्यावरच्या ओव्या मधून सुद्धा संस्काराचं दर्शन घडतं. घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा पराया नारीसाठी रहातो वळचणीला उभा ।       पोथी पुराणांमधून परनारीचा मोह बाळगणार्‍यांची काय अवस्था होते, याचे दाखले  वाचायला मिळतात. महारती लंकाधीश राजा रावनाने मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी असताना परनारीचा मोह केला. सीता पळवून नेली गेली. सीतेचा शोध घेताना क्रोधीत हनुमानाकडून लंका दहन केली जाणे, राजा रावणाचीच दाडी जाळली जाणे. यातूनही सावध न होण्यामुळे  रामायण घडले . क्षुल्लक कुंभकर्णासारखा बलशाली भाऊ, इंद्रजितासारखा कुशल मुलगा मारल्या गेला. मोहापायी राज्य बुडालं सेना मारल्या गेली. रावणाची दहाही शीरं उडवल्या गेली. परनारीच्या नादात अख्ख्पा साम्राज्याचा विनाश झाला.  तिथं सामान्य माणसाचं काय होईल ? याची कल्पनाच न केलेली बरी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *समाधान - Solution* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *ज्ञानवर्धक बोधकथा* गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा आजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे."   मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे."     गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत,    ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत, उत्तरायण भारत* 💥 ठळक घडामोडी :-  १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो. १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. 💥 जन्म :- १९५६ - उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती 💥 मृत्यू :-  १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन. १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते. २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागपूर : हक्क असलेल्या स्त्री साहित्यिक कायम संमेलनाच्या अध्यक्ष पदापासून वंचित राहिल्या, मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. अरुण ढेरे यांची खंत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी आज ओरीसा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध योजनाचें उद्धाटन होणार आहे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे : आजपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे सक्तीचे, हेल्मेट न घातल्यास कायद्यातील तरतुदीप्रमाणे शिक्षा होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठा आरक्षणाला स्थगिती नाही; राज्य सरकारला हायकोर्टाकडून मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 बद्दलच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली संमती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बदली खेळाडू म्हणून संघात विजय शंकर आणि शुबमन गिल यांना संधी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हेडफोनपासून दूर रहा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *खाशाबा जाधव* खाशाबा जाधव हे देशातील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू होते.१९५२ सालातल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. सातारा जिल्हय़ामधील कराड तालुक्यातील गोळेश्‍वर या खेडेगावात १५ जानेवारी १९२६ रोजी खाशाबा जाधव यांचा जन्म झाला. ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचे कनिष्ठ पुत्र होते. खाशाबा यांनी वयाच्या आठव्या वर्षी त्या भागातील प्रसिद्ध चॅम्पियनला २ मिनिटात लोळवले होते. खाशाबा यांनी १९४0-१९४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढे त्यांनी त्यांचे लक्ष कुस्तिकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले. १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकसाठी फ्लायवेट गटासाठी यांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. पुढे १९५२ साली त्यांना कास्य पदक मिळाले. पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंम्पिक पदक ठरले. १९५५ मध्ये ते सब इंस्पेक्टर या हुद्दय़ावर महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलिस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलिस कमिशनर या हुद्दय़ावरून नवृत्त झाले. परंतु, पेन्शनसाठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे जीवन गरिबीतच गेले. अखेर १९८४ साली त्यांचे एका रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला-पावलावर भेटतात पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात अशाच सोन्यासारख्या माणसांना मकर संक्रातीच्या हादीँक शुभेच्छा... *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कोणत्या जिवाणुमुळे दुधाचे दही होते ?* लॅक्टोबॅसिलिस *२) सिस्मोग्राफने काय मोजले जाते ?* भूकंपाची तीव्रता *३) सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?* मध्य प्रदेश *४) महानदीचे उगमस्थान कुठे आहे ?* रायपूर *५) 'इच वन टीच वन' हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?*              प्रौढ शिक्षण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  साईनाथ अन्नमवार, नांदेड ●  नामदेव हिंगणे ●  सलीम शेख ●  बौद्धप्रिय धडेकर ●  व्ही. एम. पाटील ●  बालाजी ईबीतदार ●  एकनाथ पावडे ●  दत्ता बेलूरवाड ●  कोमल ए. रोटे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "तिळगुळ " हेवेदावे विसरू सारे चला तिळगुळ देऊ अनोखा हा आनंद आपण सारे घेऊ दिल्या घेतल्याने आनंद बघाच कसा वाढतो चिमूटभर तिळगुळ माणूस माणूस जोडतो मकरसंक्रातीच्या शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *दुस-याचं सुख पाहून सुखी होणारी आणि दुस-याचं दु:खं पाहून दु:खी होणारी माणसं सतत आनंदी वृत्तीनं जगतात. इतरांच्या सुखात आपलं सुख पाहण्यासाठी आपल्याजवळ मोठं अंत:करण असावं लागतं. माणसाच्या ठायीच्या ज्ञानापेक्षा कल्पकतेला आधिक महत्व असतं. कल्पनेला वास्तवतेचे पंख लाभले की, किती सुंदर काम होते याचं उत्तम उदाहरण आहे ताजमहाल! शहाजहानच्या मनात ताजमहालाची कल्पना आली आणि गड्यागवंड्यांच्या बोटांतून सफल साकारली. कलाकारांची पाच बोटं म्हणजे सुंदर महाकाव्यच असतं. कारण त्यातूनच अवीट सौंदर्याची निर्मिती होते. माणसाच्या जीवनातील खरी सौंदर्यप्रसाधनं कोणती ? शांतवृत्ती, उदार स्वभाव, सोशिकता, नम्रता, आचाराची शुद्धता आणि मानवतेचे प्रेम हीच खरी आपल्या आत्म्याची सौंदर्यप्रसाधनं.* *मानवी जीवन महान असल्यानं आपण आपल्या इच्छा-आकांक्षाही महान ठेवल्या पाहिजेत. यासाठी प्राप्त परिस्थितीचे दास होण्यापेक्षा स्वामी होण्यात आनंद असतो. एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे तरी काय ? तो आपला दृढ संकल्प सिद्धिप्रत घेऊन जातो. एकदा सिकंदरला एकानं विचारलं की, 'तुम्ही हे जग कसं जिंकलं?' त्यावर सिकंदर म्हणाला, 'अनिश्चित नीतीचा त्याग केल्यामुळे मी विजयी झालो.' आत्मनियंत्रण आणि आत्मसंयम हे तर यशप्राप्तीचे दोन धवल स्तंभच आहेत.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ● •• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धरती करते एक पग, करते समुद्रा फाल हातों पर्वत तौलते, ते भी खाये काल । सारांश जगी ज्याचा जन्म झाला .त्याला मृत्यूने गिळंकृत केले आहे. हे महात्मा कबीर आपल्या उपदेशपर अमृतवचनातून माया मोहाच्या बंधनात गुरफटलेल्या मानव प्राण्यास मृत्यूची जाणीव करून देताना सांगतात. वामनाची महत्ती सांगताना पुराण कर्त्यानं लिहून ठेवलंय की वामनानं एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. हनुमानाने जन्मत:च एका उड्डाणात सूर्याला जेरीला आणले. सृष्टीच ज्याच्यावर अवलंबून आहे. त्यालाच गिळंकृत करायला निघाल्यामुळे, आता आपलं कसं होणार ? म्हणून सूर्य हनुमानापुढे निस्तेज पडला. आता आपलं कसं होणार म्हणून सर्वजण काळजीत पडले. याच हनुमानाने एकाच उड्डाणात समुद्र ओलांडला. कृष्णाने एका हाताने गोवर्धन पर्वत तोलून धरला आणि सृष्टीला वाचविले. अशा महा पराक्रमी वीरांनाही काळाने सोडलेले नाही. तिथं सामान्य जीवांचं काय चालणार आहे ! नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया । काळाची ही उडी पावेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप । या तुकोबांच्या ओळी किती समर्पक आहेत . जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे . माणूस कितीही महापराक्रमी असला किवा त्याने संपूर्ण जगाला ओरबाडून संपत्तीचा मुबलक साठा केला तरी त्याचे मरण अटळ आहे. जगज्जेत्या सिकंदराचे शेवटचे बोलही याचीच प्रचिती देतात. म्हणून माणसानं माणसासारखं वागून मानव जन्म सार्थक करावा. जीवनात समाधान प्राप्त करावं . कोण जाणे कोणत्या क्षणी आपल्याला काळाचं बोलावणं येईल आणि आपली खेळी संपुष्टात येईल !     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सत्य स्वीकारा,सत्य आचरणात आणा आणि सत्याच्याच मार्गाने मार्गक्रमण करा हेच तुमच्या स्वाभिमानाने,निर्भिडपणे जगण्याचे आणि यशस्वी जीवन जगण्याचे खरे मंत्र आणि तंत्र आहे.तुम्ही स्वीकारलेला मार्ग आज जरी अवघड असला तरी जीवनभर आनंद आणि समाधान देणारा आहे.इतरांना हे सुरवातीला अनुकरण करायला अवघड वाटेल पण कालांतराने नक्कीच ते स्वीकारतील तुमचे अनुयायी बनतील.कोणत्याही कठीण प्रसंगी तुम्ही स्वीकारलेले सत्याचे जीवन चांगली दिशा दाखवून समृद्ध करु शकतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कंजूष - Stinginess* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मोठेपणाचे सोंग* एका गावी एक कंजूष परीट राहात होता. तो दिवसा आपल्या गाढवाकडून भरपूर काम करून घेई, पण त्याला चारापाणी घालताना मात्र हात आखडता घेई. अखेर त्याने एका वाघाचे कातडे मिळविले. ते कातडे तो त्या गाढवाच्या अंगावर चपखलपणे बसवी आणि रात्रीच्या वेळी त्याला दुस याच्या शेतात सोडून देई. त्यामुळे त्या नकली वाघाला खरे समजून शेतातील झोपड्यांमध्ये राहणारे, पिकांचे पहारेकरी घाबरून आपापल्या झोपड्यांची दारे बंद करून घेऊन आत बसत. असे होऊ लागल्याने त्या गाढवाला रात्रभर शेतातले धान्याचे रोप भरपूर खायला मिळे. पहाट होताच तो परीट त्याला घरी घेऊन जाई व त्याच्या अंगावरचे कातडे काढून ठेवी. त्या नकली वाघाची अशा त हेने बरेच दिवस चंगळ झाली आणि त्याची प्रकृतीही सुधारू लागली. पण एके रात्री तो नित्याप्रमाणे शेतात चरत असता, त्याला कुठूनतरी गाढविणीचे ओरडणे ऐकू आले. त्याबरोबर तिच्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी, वाघाच्या कातड्यातले ते गाढवही आपल्या भसाड्या आवाजात 'आँऽ आँऽ आँऽ' असे ओरडू लागले. त्यामुळे त्याचे खरे रूप उघडे झाले आणि शेताच्या रखवालदारांनी काठ्यांचा बेदम मार देऊन त्याला ठार केले. तात्पर्यः मोठेपणाचे सोंग केले त्यामुळे जीवावर बेतले *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मकरसंक्रांत, उत्तरायण भारत* 💥 ठळक घडामोडी :- १७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर. २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान. 💥 जन्म :- १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. १८९२ - दिनकर बळवंत देवधर , क्रिकेटमहर्षी १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री १९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. १९०८ - द्वा.भ. कर्णिक , ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत. १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका. 💥 मृत्यू :- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी मोजावे लागणार शंभर रुपये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सवर्ण आरक्षण 14 जानेवारीपासून राज्यात लागू करणार- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जयपूर- राजस्थानमधील ज्येष्ठ भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांची राजस्थान विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई, कोल्हापूर आणि वर्धा नंतर शिक्षणाची वारी पोहोचली नांदेड नगरीत, येत्या बुधवारपासून नांदेडमध्ये शिक्षणाच्या वारीस प्रारंभ होत असल्याची माहिती वारीचे संयोजक प्राचार्या सौ. जयश्री आठवले यांनी पत्र परिषदेत दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हिमाचल प्रदेशातील शिमल्यात जोरदार हिमवृष्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पोंडेचेरी- पोंडेचारीमध्ये 1 मार्चपासून लागू होणार प्लॅस्टिकबंदी, मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हैदराबाद : तीन दिवसीय पतंग महोत्सवाला आजपासून सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मकर संक्रांती निमित्त लेख* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *दुर्गा खोटे* दुर्गा खोटे मराठी अभिनेत्री होत्या. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६0) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले. दुगार्बाई यांचा जन्म १४ जानेवारी १९0५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसर्‍या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अजमेर शहर कोणत्या सुफी संताशी संबंधित आहे ?* ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती *२) जालियनवाला बाग कोणत्या शहरात आहे ?* अमृतसर *३) भारतातील पहिल्या रेल्वेचा प्रवास कधी सुरू झाला ?* १६ एप्रिल १८५३ *४) आपल्या सौर परिवारात किती ग्रह आहेत ?* 8 *५) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?*              आत्माराम पांडुरंग *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ●  सुनील मुंडकर ●  तानाजी कांबळे ●  शिवहार चपळे ●  पवनकुमार तिकटे ●  दीपक उशलवार ●  बालाजी माळवदकर ●  सुधाकर कदम ●  कैलास तालोड ● रमेश बंडे ● राजू वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भास* वागणं अन् बोलणं विरोधाभास असतो एखादा बोलण्यातच फक्त खास असतो वागणं अन् बोलणं एक असलं पाहिजे बोलण्यापुर्त फक्त नेक नसलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?* *जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो. आत्मविश्वास असणार्‍या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत. मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात. पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *दर्शन - Visions* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बिरबलाची युक्ती* एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला .त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलाला विचारले ,बिरबल एखाध्या नालायक माणसासमोर गाठ पडली तर काय करावे ? बिरबल खूप कामात होता .कामाच्या वेळी बादशाहने असा विचित्र प्रश्न विचारलेले बादशाहाला आवडले नाही .परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते "महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपलेला ह्याच वेळी मिळेल बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आपल्या एका मित्राला घरी बोलवलं तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहा च्या दरबारात ये बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस बादशाहने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस घरी आल्यावर मी तुला इनाम देईन दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहा च्या दरबारात गेला बादशाहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन .विचारा त्याला प्रश्न .बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलाचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला बादशाहने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला परंतु बिरबलाचा मित्र गप्पच शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला ख काय मूर्ख पणा चालवला आहे .तुझा मित्र तर काहीच बोलत नाही .बिरबल नम्र पणे म्हणाला खाविंद माझ्या मित्र ने आपल उत्तर दिले आहे .नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे.बादशाहाला उत्तर मिळाले .परंतु बिरबलाने आपलेला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*माँ जिजाऊ* 🚩🚩🚩🚩🚩🚩 जाधव घराण्याची लेक भोसले घराण्याची सून स्वराज्य स्थापनेसाठी झटली मनापासून... राजमाते तुझ्या जन्मदिनी नतमस्तक मी चरणी तुला कोटी कोटी अभिवादन तुझेच नाव आज मनोमनी.. राजा शिवबाची आहेस तु माता आणि शिल्पकार स्वातंत्र्याची जननी आणि स्वराज्याची निर्मितीकार... जीवनाच्या लढाईत दुःखाचे तू चटके फार सोसीयले शिवबाला रयतेचा राजा तु बालपणीच बनविले.. एकच मागणी आजच्या दिनी एकच आकांक्षा मनातूनी .. शिवबा सारखा पुत्र यावा प्रत्येकाच्या घरातूनी.. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे* ता.हदगाव जिल्हा नांदेड.

*ग्वाही मनाची* जे दिले दुःख नशिबाने झगडून त्याला ना हार मानली आयुष्य जगले असे मी जणू काट्यावरून चालत चालत किती बोचतील काटे तरीही जीवनाशी संघर्ष मी करीन अन् पुन्हा या भारतमातेचा कल्याणासाठी देह मी झीजवीन देह माझा लागो देश कल्याणा राखेतून राहीन पुन्हा उभी मी झिजुन स्वतः चंदनापरी घडविण माझ्या विद्यार्थ्यांना वाटेतल्या काट्यांना नाही मी जुमानणार धरूनी कास सत्याची चालत मी राहणार..... 〰〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड

*तु तिथं मी* *राजाराणीचा संसाराला नाही उणीव कशाची* *तु तिथं मी राहीले मिळूनी* *गोडीने केला संसार सुखानी* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्रीमती प्रमिला सेनकुडे नांदेड (हदगाव)*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *राष्ट्रीय युवक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा. इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी. 💥 जन्म :- १५९८ - जिजाबाई, छत्रपती शिवाजी राजांची आई. १८६३ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ. १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न. १९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक. १९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार. १९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ. 💥 मृत्यू :-  १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त. १९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक. २००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यवतमाळ : विदर्भ राज्य निर्माण यात्रा घाटंजीत दाखल, स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीचा लढा तीव्र करण्यासाठी अॅड. वामनराव चटप आणि राम नेवलेंच्या नेतृत्वात मोर्चा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *महिला अंतराळवीर गगनयान मोहिमेचा भाग असतील- इस्रोप्रमुख के. सिवन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आलोक वर्मांनी दिलेले अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रभारी संचालक एम. नागेश्वर राव यांच्याकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणात राम रहिमसह चार जण दोषी; सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात; कसोटी विजयामुळे भारतीय संघात संचारला उत्साह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *तरुण भारत देश* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *राकेश शर्मा* हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते. पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  डिसेंबरमध्ये इराणमधील कोणत्या बंदराचे उद्घाटन झाले?* 👉    चाबहार *२)  इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली?* 👉  रोहित पवार *३)  इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची स्थापना कोणत्या झाली?* 👉    १९३२              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुधाकर थडके, देगलूर ● कन्हैया भांडारकर, गोंदिया ● रत्नाकर जोशी, जिंतूर ● सुरेश गभाले ● भारत राठोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकल्प* नवे वर्ष आले की नवे संकल्प केल्या जातात नव्या संकल्प सिद्धीच्या घोषणा दिल्या जातात संकल्प सिद्धीस न्यायची गोष्ट मनात पक्की पाहिजे मनातच संकल्प सिद्धीची खुण गाठ नक्की पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील  दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया  आत्मशुद्धीकडे नेणारी असते.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून  व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात  पण त्याकरिता मुखवटे उतरवून  माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....*                                     *" कुछ इस तरह मैने*          *जिंदगी को आसान कर दिया,*                     *किसी से मांग ली माफी,*           *किसी को माफ कर दिया !"*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• खान खर्च बहु अंतरा, मन मे देखु विचार ऐक खबाबै साधु को, ऐक मिलाबै छार। सारांश माणसाने आपल्याकडील संपत्तीचा खर्च बरबादीसाठी न करता सत्कार्यासाठी करावा हे महात्मा कबीर आपल्या मधूर वचनातून सांगतात. खाणे आणि खाण्यासाठी खर्च करणे यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे आपापल्या परीने आपल्या मनाला विचारले व विचारपूर्वक जानले तर लक्षात येईल. माणसाकडे पैसा असेल तर माया उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. ती स्वभावानुरूप उत्पन्न होत असते. जसा ज्याच्या स्वभाव तशी ती प्रतिबिंबीत होत असते. जी व्यक्ती सत्संगतीत असते ती अन्नदानाला महत्व देत असते. अन्न हे भुकेल्यांना मिळालं पाहिजे ते वाया जाता कामा नये. पंक्तीला बसणारा गरीब की श्रीमंत याचा विचार तो करीत नाही. मात्र अन्न ग्रहन करणार्‍याच्या मुखात ते जावे, हा त्याचा सद् हेतू असतो. तो इत्तरांना तृप्त करीत असतो, त्याच्या ठायी परोपकारी वृत्ती विलसत असते. दुसर्‍या प्रकारचा माणूस अन्नाबाबतीत इत्तरांचा विचारंच करीत नाही. तो केवळ स्वत:पुरता मर्यादित विचार करतो. उरलेले अन्न सरळ फेकून देतो. वाया घालवतो. व्यसनी माणूस तर आपल्याकडील धन संपत्ती नको त्याच बाबीवर खर्च करून बरबाद करीत असतो. मदिरा व मांसाहारावर अनाठायी खर्च करीत असतो. या अन्नसेवनातून व मदिरापानातून मनात विकार उत्पन्न होतात व त्याला विनाशाकडे नेत असतात. माणसाने आपल्या कडील धनाचा उपयोग सन्मार्गाने सत्कार्यासाठी केला तर स्वत:ला समाधान मिळते व आनंदानुभूती मिळते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही. म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *धारदार - Sharpened* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मातृभक्त लक्ष्मणदेव* एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई. एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे. एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'. तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाल बहाद्दूर शास्त्री पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :-  १९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला. १९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला. १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला. १९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले. 💥 जन्म :- १८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक. १८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक. १९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी. १९५४ - बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९२१ - वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक. १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान. १९८३ - घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती. २००८ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहास संशोधक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••• 1⃣ *मोदी सरकारकडून मोठी सवलत; आता ४० लाखांपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना GST नाही!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गडचिरोली : बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या आठ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आर्थिक मागास आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; युथ इक्विलीटी संघटना विरोधात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठा आरक्षणाविरोधी याचिकेवर सुनावणी, राज्य सरकारने उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश. एमआयएमचे आमदार इ्म्तियाज जलील यांनी दाखल केली होती याचिका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे झटके, भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टरस्केल इतकी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यवतमाळ - साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेच्या हस्ते होणार; महामंडळाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक ठरलं, बीसीसीआयनं जाहीर केल्या तारखा; ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *शिक्षक आनंदी तर मुले आनंदी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *विष्णू सखाराम खांडेकर* (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. इ.स. १९२० साली खांडेकरांनी  महाराष्ट्रातल्या  सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी) पद्मभूषण पुरस्कार (१९६८) ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  ७८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीट्ग ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले?* 👉    सायली वाघमारे *२) राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस कोणता ?* 👉     12 जानेवारी *३)  राष्ट्रमाता जिजाऊचे जन्मस्थान कोणते?* 👉    सिंदखेडराजा              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालाजी पुलकंठवार ● सिध्देश्वर मोकमपल्ले ● हणमंत पांडे ● राहूल ढगे ● लोकेश येलगंटवार ● साई यादव, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काळ* हे वर्ष सरेल आता नवे वर्ष येईल नव्याच्या स्वागताला मनी हर्ष होईल जुन्या कडून धडा घेऊ नव्याचे स्वागत करू काळ नित्य नूतन असतो एवढ मात्र ध्यानी धरू शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संधी अमर्याद असतात हे खरे; परंतु एकदा आलेली संधी पुन्हा येईल याची खात्री नसते. संधीचे पुनरुज्जीवन होत नसल्याने ती मिळाली, की तिचे सोने करणे शहाणपणाचे असते. आज संपूर्ण मानवजातीचे जीवन संधीच्या शोधात आहे आणि त्यामुळे ते कमालीचे धकाधकीचे आणि वेगवान भोव-यासारखे झाले आहे. जगण्यातील विरोधाभास असा की, जीवनात स्थैर्य लाभावे म्हणून माणूस सतत धावतो आहे ! त्याला स्थिर होण्याची संधी मिळत नाही, असे नाही; पण अभासी संधीच्या मागे तो पळत सुटतो. संधी पकडून ठेवून जगण्याची मजा उपभोगणे त्याला जमत नाही, त्याला सुचत नाही, हातची संधी सुटते.* *मिळालेल्या संधीचे सोने करण्याची कला अनेकांना अवगत असते. विल्यम शेक्सपियर एका नाट्यगृहाचे द्वारपाल होते. तेथेच नाट्यकलेचे स्वयंशिक्षण घेऊन ते जगप्रसिद्ध नाटककार बनले. क्रिकेटचे कौशल्य दाखविण्याची संधी सचिन तेंडुलकर आणि त्याच्या जवळच्या मित्रांना एकाचवेळी मिळाली. सचिनने संधीचे सोने केले; पण त्याच्या मित्रांना ते साधले नाही. क्रिकेटच्या माध्यमातून सचिन भारतरत्न बनला. असे म्हणतात की सामान्यातील अतिसामान्य व्यक्तीलाही देव संधी देतो. ज्याला ही हाक ऐकू येते, तो संधीचे सोने करतो आणि ज्याला संधीचे संकेत समजत नाहीत, तो आयुष्यभर गोंधळलेला राहतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    वचन वेद अनुभव युगति आनन्द की परछाहि बोध रुप पुरुष अखंडित, कहबै मैं कुछ नाहि। सारांश वेदांचे वचन , अनुभव, युक्त्या इत्यादि परमात्माच्या प्राप्तिसाठी मानसानेच आपापल्या कल्पनेतून तयार केलेल्या आहेत. अस्थिर भटक्पा परंतु सश्रद्ध मनाला आधार देणारी केवळ आनंददायी सावलीरूप अशी ती प्रतिके आहेत . वेदा पुरानात तत्कालिन समाज जीवनानुरूप व त्या परिस्थितीनुरूप गरजेप्रमाणे वागणारी सत् पुरूष, नायक, राजांची रूपं पुस्तकात नोंदवली गेली. तीच पुढं दुबळ्या अज्ञानी मनाला तात्पुरता आधार देत देवाचं रूप धारण करून समोर आली. जे माणसात कोल्ह्यासारखे चतुर वृत्तीचे त्यांनी त्या देवाची ठेकेदारी घेतली. अज्ञानी व भाबड्या माणसांना अशा देवांच्या नादी लावून भितीच्पा सावटाखाली ठेवले. हत्तीचं बळ असणार्‍या माणसाला निरर्थक गोष्टींच्या नादी लावून परोपजीवी बांडगुळांनी अज्ञानी जीवांचा आपल्या हाती अंकुश घेतला. अशा भाकड कथांच देवाच्या मुखातलं ज्ञान म्हणून त्यात स्वतःच्या उदरनिर्वाहाची बेगमी करून घेतली. परमात्मा विश्वाला व्यापून उरलेला आहे. तो सर्व चराचरांच्या ठायी वास करतो. त्याचं व्यापकत्व इतकं अगाध आहे की तो केवळ एखाद्या प्रतिकरूप प्रतिमेतून कसा काय साकार होवू शकतो. त्याचं दिव्यत्व पाहायला आपल्याकडे पारखी नजर हवी. ईश्वराचं अस्तित्व चमकत आंडोल उठवणार्‍या विजांच्या तांडवातून कळतं. आभाळाच्या अथांग निळाईशी, दिववसभर सृष्टीशी एकरूप होणार्‍या सूर्याचं उगवताना व मावळताना विरक्त होवून भगवं रूप धारण करण्यातून कळतं . ते पाहाता आलं पाहिजे. वारा ,पाऊस, प्रकाश हिच तर खरी ईश्वराची रूपं. हे सर्व एकात्म स्वरुप असणार्‍या परमात्म्याच्या स्वरूपाबाबतीत मी बापुडा तुम्हाला काय सांगू शकणार आहे? त्याला जाणण्यासाठी आपण प्रत्यक्ष अनुभूती घ्यायला हवी. असे महात्मा कबीर म्हणतात.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आत्मा आणि ईश्वर हे एक असून ज्यांचे अंत:करणं शुद्ध आणि पवित्र आहे अशा ठिकाणीच परमेश्वर वास करत असतो.म्हणून नेहमी आपल्या अंतःकरणाला शुद्ध विचार,पवित्र मन,इतर जीवांना न दुखवता प्रसन्न ठेवणे,इतरांविषयी वाईट भावना न ठेवता जगणे,ह्या सा-यां गोष्टी आपल्या अंत:करणातून पवित्र मनाने जपल्या तर परमेश्वराशी नातं एकरुप होऊन एक आगळा वेगळा अनुभव आपल्या प्रत्ययास आल्याशिवाय राहत नाही.म्हणून आपले अंत:करण,आचार नि विचार पवित्र ठेवण्यास सदैव प्रयत्नशील असावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌄🌺🌄🌺🌄🌺🌄🌺🌄🌺🌄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *पवित्र - Holy* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *माशीने केलेला निरर्थक विचार.* एकदा एक मधमाशी आपल्या मनाशीच विचार करू लागली की, 'मी सारखं कामाला जुंपलेलं असावं असं का? ही फुलपाखरं पहा ! किती आनंदात वेळ घालवतात. मीसुद्धा त्यांच्यासारखं का होऊ नये ?' त्या दिवसापासून तिने काम करायचं सोडले. इतर मधमाशांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्‍न केला, पण तो फुकट गेला. असे होता होता पावसाळा आला व पाऊस पडू लागला तेव्हा ती मधमाशी पोळ्याजवळ आली, पण त्याची सर्व दारे बंद झाली होती. शेवटी भुकेने व थंडीने ती मरण पावली. तात्पर्य - स्वतःच्या पोटाकरता कसलातरी उद्योग करणे योग्य. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🐪 जि.प,प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड येथील *भाषा संगम चे विविध भाषेतील video* *पाहण्यासाठी खालील* *लिंक ला टच करा.* 👇👇👇👇 https://youtu.be/mRALiPRab58 👇 https://youtu.be/fjZQnoqqoO4 👇 https://youtu.be/PIaKv9E5fWQ 👇 https://youtu.be/cBlw_Mybxds 👇 https://youtu.be/sECmvcn2d1M 👇 https://youtu.be/fwx0dOPunDU 👇 https://youtu.be/7jmjdag-Uh0 👇 https://youtu.be/Scbf_O5-yyQ 👇 https://youtu.be/I-isHnJDDvM 👇 https://youtu.be/DgT8-yfchR4 👇 https://youtu.be/mRALiPRab58 🙏🙏🙏🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. १७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 💥 जन्म :- १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन १९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास 💥 मृत्यू :-  १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर; 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार अधिवेशन, 01 तारखेला अर्थसंकल्प होणार सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; 165 मते पडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *औरंगाबादचे पालकमंत्रिपद एकनाथ शिंदें यांच्याकडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचा दिलासा; माथेफिरू एसटीचालक संतोष मानेला फाशीऐवजी जन्मठेप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : 30 हजार घरं मजुरांना दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नरसय्या आडम यांनी मानले आभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी झाला आहे सज्ज, शनिवारपासून होणार सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...           *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर अंतिम भाग बारावा वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2019/01/12.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *गणेश हरी खरे* गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू०५ जून १९८५)  हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री (झारखंड) *२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वॉशिंग्टन *३) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?* जिराफ *४) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड *५) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?*              तामिळनाडू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्रीनिवास रेड्डी ● साईनाथ सोनटक्के ● राजेश कुंटोलू ● गणेश वाघमारे ● शत्रूघन झुरे ● स्वरूप खांडरे ● आकाश क्षीरसागर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शाश्वत* छोट्यांची छोटी अन् मोठ्यांची मोठी रिश्वत आहे ज्याच्या त्याच्यापरीने घेतात ते सारे शाश्वत आहे लपून छपून घेणाराला काहीही पटत असते रिश्वत सुद्धा त्यांना शाश्वत वाटत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    ज्यों गूंगा के सैन को, गूंगा ही पहिचान त्यों ज्ञानी के सुख को, ज्ञानी हबै सो जान। सारांश मुक्याची भाषा मुक्याला बरोबर समजते कारण दोघेही समान संवेदनेचे असतात. त्यांना बोलता येत नसले तरी त्यांची (देहबोली) खुणवाखुणवी इशार्‍याची भाषा असते. त्या खुणवण्यातून त्याला काय सांगायचंय ते समोरचा बहीरा बरोबर ओळखतो. मात्र हे इशारे व सुचित करावयाचा भाव विद्वानालाही कळू शकत नाही. त्यासाठी त्याच्याच पातळीवर यावं लागतं. जसं लहाण बाळाचं रडणं अन त्याचे चेहर्‍यावरचे हावभाव त्याच्या आईला वाचता येतात. म्हणून त्यांच्यात डोळ्याची भाषा विकसित झालेली असते. लेकराचं अर्ध अधिक पालन-पोषण तर आई डोळ्याच्या ईशार्‍यावरंच पूर्ण करते. विशिष्ट वयामध्ये वेगवेगळ्या सांकेतिक भाषा विकसित होतात. किशोरावस्थेपासून अशा सांकेतिक भिषा विकसित होतात. प्रत्येक शब्दात विशिष्ट अक्षर क्रमात एखादे अक्षर टाकून त,व,म,प....ची भाषा बोलता येणे. बोलणार्‍या दोघांनाच कळायचं बाकीचे उगा तोंडाकडं पाहात राहाणार . कुमारावस्थेनंतर अशा भाषांचं आकर्षण ओसरून जातं. जनावरांच्या बाजारात हेड्यांची दलालांची भाषा तरी कुठे कळते दलालांशिवाय दुसर्‍यांना ! कित्येक जणांच्या समुहात वावरणार्‍या दोन प्रेमींनी आपली एक भाषा विकसित केलेली असते. कितीही चौक्या पहारे असले तरी ती त्या दोघांना बरोबर कळते. चौक्या पहार्‍यांना भेदून ती एकमेकांची भेट घडवून आणतेच. त्याप्रमाणे आत्मरूपाच्या आनंदात एकरूप झालेल्या आत्म ज्ञान्याला दुसरा आत्मज्ञानी बरोबर ओळखू शकतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी  आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी. हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या  एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌻🌺🌸🌼🌹🌷🌻🌺🌸🌼🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *अपूर्ण - Incomplete* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *गुरू ,परीक्षा ,शिष्य* गुरुकुलातून तीन शिष्य  उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल.. आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल. आता आपल्या  गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष  परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार   सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले.  एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये  काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी  परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी  थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं. दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला.. तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी  आपल्याला लवकरात लवकर  मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर.. तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू  येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत.. ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे. *तात्पर्यः* अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/01/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना. २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी. 💥 जन्म :- १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्‍या प्रथम लेखिका. १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका. 💥 मृत्यू :-  १९४१: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल  १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित. १९७३: सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ना. भि. परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर  १९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत. १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे- 'आनंद' मासिकाचे माजी संपादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास संवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राज्यसभेचं कामकाज आणखी एक दिवस चालणार; आजऐवजी उद्या अधिवेशन संपणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भाजपा आमदार आणि माजी मंत्री गोपाल भार्गव यांची मध्य प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करा, महामंडळातील वारेमाप खर्चाची श्वेत पत्रिका काढा; महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक) संघटनेची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *10 जानेवारीला ओपन एसएससी बोर्ड लाँच करणार, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात भारताने रोवली 72 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची पताका, रचला नवा इतिहास* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *गोदावरी परुळेकर* मराठी लेखिका आणि साम्यवादी स्त्री कार्यकर्ती       गोदावरी परुळेकर ( १४ ऑगस्ट, १९०८ - ऑक्टोबर ८, १९९६) (माहेरचे नाव- गोदावरी गोखले) या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या.   १९१२मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी ११ ग्रंथालये व १० वाचनालये मोफत चालविली जात.    १९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'जेव्हा माणूस जागा होतो' या पुस्तकासाठी त्यांना देण्यात आला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जे जीवनाशी प्रेम करतात त्यांनी आळसात वेळ घालू नये. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अमिताभ बच्चन यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली ?*         दिल्ली विद्यापीठ *२) भारतात 'राष्ट्रीय फलोद्यान योजना' कधीपासून सुरू करण्यात आली ?*             २००५ पासून *३) 'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात आणि एक देव' हे ध्येयवाक्य कोणाचे ?*           श्रीनारायण गुरू *४) पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?*          ०५ जून *५) पुष्करालू उत्सव कोणत्या नदीच्या काठी साजरा केला जातो ?*              कृष्णा नदीकाठी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालाजी पेटेकर, खतगावकर ● शेख आसिफ ● मंगेश जाधव ● आकाश गाडे ● पोतन्ना मुदलोड ● आनंदा कुमारे ● मारोती गोडगे ● किरण भंडारी ● मन्मथ चपळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••       *लाईक-कमेंट* मदत गेलं बाजूला लोकं फोटो काढत असतात मदत करायची सोडून ग्रुप वर धाडत असतात मदती पेक्षा लोकांना फोटो काढायची घाई आहे अपघातात मदत महत्त्वाची लाईक-कमेंट वाई आहे    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼ ● ••• *तासन् तास पारावर बसून राहणारी मंडळी आपण पाहिली आहेत. येणा-या जाणा-याला चहा पाजणे किंवा कोणाकडून तरी चहा उकळणे एवढेच त्यांचे काम असते. अनेक तरूण-तरूणी रात्रंदिवस राजकीय पुढारी किंवा धनाढ्य शेठजींच्या अवतीभवती असतात. छोट्याशा लाभासाठी ही मंडळी आपला वेळ आणि शक्ती खर्चिला घालतात. अमक्या तमक्याशी ओळख किंवा नाते सांगण्याचे त्यांना वेड असते. अशी मंडळी आपल्या स्वत:चे आणि कुटुंबाचे वाटोळे करतात. त्यांना त्यांचे वेड काही सुचू देत नाही.* *पु.ल.देशपांडे यांनी सुखासीन नोकरी सोडून साहित्य, नाटक, कला या प्रांतात स्वछंद विहार केला. उत्कृष्ट गायक असूनही दीनानाथ मंगेशकर किंवा बालगंधर्वांनी गल्लाभरू कार्यक्रम केले नाहीत. बॅरिस्टर असूनही देशाच्या वकिलीसाठी गांधीजींनी पोटार्थी वकिली सोडून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशप्रेमापोटी हालअपेष्टा भोगल्या. बाबा आमटे यांनी कुष्ठरूग्णांच्या सेवेसाठी विटाळाचे जगणे पसंत केले. खाण्यापिण्याला फाटा देऊन गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, सी. व्ही. रामन या शास्त्रज्ञांनी जगाच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट उपसले...याचे कारण त्यांचे वेड असते. ही सर्व मंडळी वेडी होती* *माणसाला कसले तरी वेड असलेच पाहिजे; पण ते सकारात्मक असले म्हणजे त्याचे हसे होत नाही. असले वेड आपल्याला लागले तर जगावेगळं काम आपल्याही हातून घडून शकेल.*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 👏👏👏👏👏👏👏👏👏 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश      जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो.      आत्मविश्वास असणार्‍या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे  तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत. मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा,महत्वाचा आणि मौल्यवान जर कुठला दागिना असेल तर तो म्हणजे नम्रता हा आहे. ज्यांच्या अंगी नम्रता असेल ती व्यक्ती महनीय, आणि वंदनीय असते.ती व्यक्ती केवळ अंगी असलेल्या नम्रतेमुळे इतरांच्या हृदयावर राज्य करु शकते. ©व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *दागिना - Jewelery* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *दृष्टिकोन*   एका गावात दोन शेतकरी होते, दोगेही मेहनती. खूप काम करत पण मोबदला खूप कमी मिळत असत. . . त्यांचं वय झालं, दोघे देवाघरी गेले.... . . दोघे देवासमोर गेले, देवाने विचारलं, ' पुढच्या जन्मसाठी तुम्हाला काय हवं??' . . पहिला शेतकरी बोलला, '' देवा, मी या आयुष्यात खूप काम केलं...खूप मेहनत घेतली...घाम गाळला..पण मला त्याचा योग्य मोबदला नाही मिळाला..जेवढा पैसा कमवला तो खूप कमी होता, कर्ज देण्यात सर्व पैसा संपला ! मला असा आशीर्वाद दे की या जन्मी मला फक्त पैसा मिळत राहो...कुणाला काही द्यावं लागू नये...'' देव बोलला 'तथास्तु.....' . . दुसर्या शेतकर्याला देखील तोच प्रश्न देवाने विचारला. दूसरा शेतकरी बोलला, '' देवा तू मला या जन्मी जे काही दिलं त्यात मी समाधानी होतो...दोन वेळचं पोट भरत होतं आमच्या कुटुंबाचं.... पण मला एका गोष्टीचं दुख: आहे की माझ्या दारावर आलेल्या भिकार्यांना मी पोटभर जेवण देऊन पाठवू शकत नव्हतो....! या जन्मी असा आशीर्वाद दे की माझ्या दारावर आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट मी भरू शकेल...'' देव बोलला ' तथास्तु....'!! आता ते दोघेही त्याच गावी जन्मले.....मोठे झाले....!! पण, पहिला व्यक्ति ज्याने देवाला मागितलं की मला फक्त मिळत रहावे-मिळत रहावे कुणाला काही द्यावे लागू नये....' तो बनला भिकारी, ज्याला फक्त भिक मिळू लागली....तो इतरांना काहीच देऊ शकत नव्हता....' आणि, दूसरा व्यक्ति बनला त्या गावचा सर्वात श्रीमंत व्यक्ति ' ज्याच्या घरच्या दरवाज्यासमोर आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट भरून तो पाठवत असे....' " या गोष्टीचा तात्पर्य एवढाच की , तुम्हाला सुखी राहायचं असेल तर आगोदर दुसर्यांना सुखी ठेवायला पहा.... तुम्हाला सुख आपोआप मिळेल.. '' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*काटेरी कुंपण* काटेरी निवडूंग असले जरी निसर्गातील तेही वाटेकरी मोहक फुले येती त्यासी संरक्षण करते जणू पहारेकरी पर्णास धारदार काटे दिसते जरी सूईवानी असे काटे रुततील कर तया लागतील पानाफुलांनी सजलेले निवडूंग जरी काट्यातले रक्षणकर्ते फुले बळकट कुंपनापरी भासे मळवट 〰〰〰〰〰〰 ✍ ®प्रमिला सेनकुडे हदगाव जिल्हा नांदेड ☘☘☘☘☘☘☘

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालिका दिन*  *ऑक्युपेशन थेरपी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- *१८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी* १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक 💥 मृत्यू :- १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर - चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा, अधिसूचनेची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते स्थानिक भाजप नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- एआयएडीएमकेच्या 26 खासदारांचं केलं निलंबन, वेलमध्ये उतरून गोंधळ घातल्यानं केलं निलंबित* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे : पंतप्रधान आवास योजनेच्या ठाणे जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षणाची वारीचा तिसरा टप्पा सेवाग्राम परिसर वर्धा येथे आज पासून सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात थंडीचा कडाका कायम, परभणीचं आजचं तापमान 5.5 अंश सेल्सिअस, तर साताऱ्यातील वेण्णालेक परिसरात 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सहावेळा जगज्जेती ठरलेली मेरी कॉम मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी : हदगाव येथील 46 व्या स्काऊट गाईड नांदेड जिल्हा मेळाव्यात गोजेगाव शाळेच्या श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मॕडम यांच्या 'वास्तव ....एक सत्य' या काव्यसंग्रहाचे उदघाटन समयी झाले प्रकाशन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख              *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... ववबाबवव मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *यशवंत दिनकर फडके* यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २०००  साली  बेळगाव  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१  रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत  उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून  पीएच्‌. डी. पदवी मिळवली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉    डॉ. आंबेडकर *२)  भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगररांगामुळे विभक्त झाली  आहेत?* 👉   महादेव *३)  दूरदर्शनने सुरू केलेली सर्वात पहिली मालिका कोणती?* 👉      श्वेतांबरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर ● विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद ● रतन बहिर, भीर, महाराष्ट्र ● शुभांगी परळकर, नांदेड ● माधव पवार, पत्रकार, नायगाव ● संदीप जाधव, देगलूर ● प्रशांत बोड्डेवाड, येवती ● वीरेंद्र डोंगरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *मांजर* मांजर डोळे झाकून दूध पीत असते तिला वाटते कोणीच काही पहात नसते तिने डोळे झाकले तरी जग सारे पहात असते तिचे सारे पराक्रम सा-या  जगाला माहित असते     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश       विधात्याला जाणून घ्यायचं  असेल तर केवळ पोथ्या  पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या.  तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला. मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत. कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी....      खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे .  जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं  ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सोबत - Along with* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *इच्छाशक्तीचा बळावर जग जिंकता येते.* केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव.  आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्‍या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता.  आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली.  यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले.  तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले.  इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/01/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले. 💥 जन्म :- १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे 💥 मृत्यू :-  २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - उत्तर भारतात थंडीची लाट, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मोदी सरकारनं 50 कोटी जनतेला दिलं आरोग्य कवच - भाजपा अध्यक्ष अमित शहा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नयनतारा सहगल यांचं निमंत्रण साहित्य संमेलन आयोजकांकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *देशातील 10 ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ओरिसाचे कृषिमंत्री प्रदीप महाराठी यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हिमाचल प्रदेश- शिमल्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 बर्फवृष्टीमुळे बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *Ind vs Aus 4th test - सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात, कुलदीप यादवचे पाच बळी, भारताला 322 धावांची आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *चंद्रकांत रघुनाथ गोखले* चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते, चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हे देखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी  भावबंधन,  राजसंन्यास,  पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष  ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.      *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉     शेकरू *२)  औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉      ५२ *३)  जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉     २२मार्च              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● कुणाल पवारे, कुंडलवाडी ●  धनाजी माडेवार ●  शिवाजी गुजेवार ●  धनराज बनसुडे ●  संजय पवार ●  रमेश माने ●  आबासाहेब निर्मले ●  रघुनाथ नोरलावार ● संतोष कोयलकोंडे ● पद्माकर मुळे ● रवी पुपलवार ● राजकुमार धावडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *नशा* सत्तेची नशा तर कुठेही न्यारीच असते ज्याची सत्ता त्याचे जरा भारीच असते सत्ता आली की वेगळी नशा चढते सांगायच्या आधी हे सारेच घडते   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये, दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे, का पै काको मोहि। सारांश         विधाता निर्गुण  निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात  विनाकारणंच भांडून घेणार्‍यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच  भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने  त्या अंधावर मुग्ध किवा  प्रसन्न होईल ?       लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे.       तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *रक्षण - Protect* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *स्वतःमध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/01/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले. १८३२ - दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले १९४९ - पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था सुरू झाली १९५७ - भारतात विक्रीकर कायदा लागू झाला. 💥 जन्म :- १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, मराठी संतकवी १८८३ - खलील जिब्रान, अरब कवी, तत्त्वज्ञानी व चित्रकार १८९२ - कृ.पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक. १८९३ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.१९१३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. १९२५ - रमेश मंत्री, मराठी साहित्यिक . १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक . 💥 मृत्यू :- १९७१ - पी.सी.सरकार, भारतीय जादूगार. १९८२ - रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार. १९९० - रमेश बहल – चित्रपट निर्माता व दिग्दर्शक २००४ - ज्येष्ठ चित्रकार गजानन नारायणराव जाधव. २०१८- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••••••••••••••••••••••••••• 1⃣ *मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी. २१ व्या शतकातील तत्व, व्यवस्थेनुसार मराठी अग्रेसर झाली पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपुरात १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नांदेड: वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभेसाठी उमेदवार जाहीर. धनगर समाजाचे नेते प्रा. डॉ. यशपाल भिंगे लढणार नांदेड लोकसभा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *07 जानेवारी पासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वेतनवाढीच्या मागणीसाठी टपाल खात्याच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, कामावर फारसा परिणाम नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आरोग्यमंत्री दीपक सावंत राजीनामा देणार; 7 जानेवारीला सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 598 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया बिनबाद 24* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            पवनार आश्रम पवनार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा शहरापासून ६ की.मी. अंतरावर असलेले एक गाव आहे. आचार्य विनोबा भावे यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलचे योगदान लाभले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भूदान चळवळ उभारली. आश्रम - या गावी धाम नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींनपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्ला असा हा आश्रम ईथे येणार्या लोकांना आकर्शित करतो. ईथे येणारे बहुतेक लोक उच्च शिक्शित असतात. भुदान आंदोलनाचे प्रणेते विनोभा भावे यांनी हा आश्रम सुरु केला. विनोभांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. ईथे येणार्या महीला साध्वी (मीराबाई सारख्या) जिवनाच्या उपासक होत्या. आश्रमात रहाणार्या महीला याला ब्रह्म विद्या मंदिर म्हणून संबोधत. सध्या ह्या आश्रमाचे व्यवस्थापक विनोबा भावेके सहयोगी, श्री गौतम बजाज आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) कटक हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलं आहे ?* महानदी *२) केंद्रीय सिसा संशोधन संस्था कोठे आहे ?* गडसा कुलू (हिमाचल प्रदेश) *३) रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला ?* सॅम्युअल कोल्ट *४) देशात सर्वाधिक शाखा असणारी बँक कोणती ?* भारतीय स्टेट बँक. *५) विश्‍वाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?*              कॉस्मोलॉजी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरेंद्र अकोडे ● भाऊसाहेब चासकर ● सिंकदर डोंगरे ● गणराज गुरुपवार ● संजय घोगरे ● व्यंकटी केंद्रे ● राजकुमार बेरलीकर ● नितीन उत्तरवार ● लक्ष्मण मिरदुडे ● लक्ष्मीकांत पवार ● माधव रामपुरे ● किशन कांबळे ● प्रभाकर मिरेवाड ● बजरंग राजापूरकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घमंड* वय अन् पैशाची घमंड करता येत नाही हे कायम राहील विश्वास धरता येत नाही जे मोजता येत ते नक्की नष्ट होतं नको त्याचा घमंड वाईट हे स्पष्ट होतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनत्वाच्या अनेकविध कसोट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचे बोलणे होय. माणसाच्या जिभेवर खडीसाखर असली तर त्याची न होणारी, लांबणारी कामेसुद्धा झटक्यात होतात याचा अनुभव अनेकदा येतो. वाणीतील मवाळपणा माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाणारा ठरला असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. व्यक्तीजवळ इतर कोणतेही धन नसेल तरी एकवेळ चालेल; पण त्याच्या जीवनव्यवहारात गोडवा हवा. त्याच्याशी बोलावे, नाते निर्माण करावे असा मोह जेव्हा इतरांना होतो तेंव्हा तो त्याचा जीवन-विजय असतो.* *लोक अनेकदा स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दुस-याला दुखावतात, त्यांचा अपमान करतात; पण असे करणे चांगले नव्हे. मार्दवाने बोलल्यास कमीपणा येतो, आपली बाजू सत्याची असली तरी लोक साशंकतेने पाहतात, त्यात ठाशीवपणा नसतो, असा काही लोकांचा गैरसमज असतो. मोठ्याने, ओरडून बोलले तरच समोरचा नमतो, त्याच्यावर प्रभाव पडतो असे मानणे वेडेपणा आहे. ज्याला चांगुलपणाची आस असते, त्याच्या मवाळतेच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या असतात. बोलण्यातील मऊपणा म्हणजे दुय्यमत्व नव्हे. ते तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे एक लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनातील वैशिष्ट्ये वाचली की, त्यांनी जे विराट काम केले, त्यांनी डोंगराएवढी माणसे प्राणपणाने जपली त्यात त्यांच्या स्नेहार्द्र वाचेचा वाटा सर्वोच्च होता.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञानी तो निर्भय भया, मानै नहीं संक इन्द्रिन केरे बसि परा, भुगते नरक निशंक। सारांश ज्ञानी सदा सर्वदा निर्भय असतो. कारण ज्ञानी माणसाला सर्व घटना घडामोडींमागील कार्यकारण भाव लक्षात येतो. अज्ञानी मात्र घटना घडामोडीमागील कार्य कारण भाव लक्षात न आल्यामुळे त्या घटनेला चमत्कार समजू लागतो. प्रत्येक घडामोडीमागे शास्त्र असते. वरवरचा विचार करणार्‍यांना ही घडामोड म्हणजे जादू किवा चमत्कार वाटते. चतुर माणसे अज्ञानी माणसांच्या अज्ञानाचा फायदा उठवत स्वतःचा स्वार्थ साधत असतात. मात्र ज्ञानी, सर्वज्ञ अशा चतुर व फसव्यांच्या ढोंगांना बाधत नाहीत. त्यांनी सृष्टीत सामावलेला परमात्मा जाणलेला असतो. परमात्माच्या रूपाबद्दल ते निशंक असतात. माणूस ज्ञानी असूनही तो जेव्हा माया मोहाच्या भ्रमात फसतो. षडविकारांच्या आहारी जातो, तेव्हा त्याच्या विचार वृत्ती दोलायमान होतात. विवेकी वृत्ती कचमरू लागते. जिथे फसव्या गोष्टी डोळसपणावर पांघरण घालू लागतात, तिथे सत्य व विवेक दबला जातो. चारित्र्यवान माणूसही अधःपतित होतो. त्याला सत्याकडे केलेल्या डोळेझाकीचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून माणसाने सारासार विचाराने इंद्रियांवर अंकुश ठेवला पाहिजे. इंद्रियांवर विजय मिळविणारा जीतेंद्रीय असतो. त्याला जगातल्या कुठल्याही शक्ती विचलित करू शकत नाहीत. स्वतःला इंद्रियांचा दास बनविता कामा नये.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात. त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही.ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते.सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी,अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो.अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो.म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *उदार - Generous* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *स्वतःमध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📱 9423625769 📅 दि. 04/01/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली. 💥 जन्म :- १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• ••••••••••••••••••••••••••••••••••••• 1⃣ *इंग्रजी साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन हा मराठी सारस्वतांचा अपमान; यवतमाळचे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याचा मनसेचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गेल्या दोन वर्षात उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही- योगी आदित्यनाथ* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची बिनविरोध निवड, स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आणखी 900 गावांत दुष्काळ जाहीर होणार; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, राज्य सरकारकडून आज किंवा उद्या जीआर काढला जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महात्मा फुले दांपत्याला भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाटककार महेश एलकुंचवार यांना राज्य शासनाचा यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...           *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग अकरावा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_31.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कवयित्री इंदिरा संत* इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  महाराष्ट्राचा कोणत्या खनिज साठ्यात भारतात प्रथम क्रमांक लागतो?* 👉     मॅगनीज *२)  मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव काय?* 👉     मेरी तेरेसा बोझॉंक्झ्यु *३)  दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?* 👉     सिंकदराबाद              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बालाजी डिगोळे, अहमदपूर अंकुशराजे जाधव माधव बोइनवाड, येवती चंद्रभीम हौजेकर, धर्माबाद राजेश कुकूटलवार निलेश आळंदे माधव सूर्यवंशी, मुंबई *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उजेडाची लेक* सावित्री उजेडाची लेक तू चैतन्याचा ध्यास आहेस सावित्री तू स्त्रीमुक्तीचा खरा खरा श्वास आहेस तुझ्या जन्मामुळे स्त्रीला आज मोकळा श्वास आहे तुझ्यामुळे नारी नरात ख-या अर्थाने विश्वास आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण प्रत्येकाच्या घरीदारी सुख, शांती, समृद्धी नांदो अशीच प्रार्थना करीत असतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच गोष्ट जर पदोपदी जीवनभर आमच्या ठायी वसली, तर कष्टप्रद जीवनाचे आनंदवन व्हायला फार वेळ लागणार नाही. तशी प्रत्येकाला उजेडाची आस असते. म्हणून तो प्रकाश आणि सत्याची आस भाकतो, पण डोक्यात कुठल्या नं कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजाळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते. आपल्या मेंदूतले असे सारे अंधारे कोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण दिपदान का मागू नये ?* *जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक. परंतु दिव्याचं जळणं हे कधी त्याच्यासाठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. लहानपणी दिवाळसणाला तांड्यातल्या मुलींचे उजेडाचे गाणे ऐकले आहे. या मुली अंधारून आलेल्या अमावस्येला रात्रभर तांड्यातल्या प्रत्येक दारी हातात दिवा घेऊन प्रेम, जिव्हाळा व्यक्त करतात. हाच दिवा हातात घेऊन जळता ठेवण्याचं नि उजेडाचं गाणं आजन्म गाण्याचं वचन जर आम्ही प्रत्येकाने स्वत:ला दिले, तर ख-या अर्थाने अंधारावर उजेडाने आम्ही मात करू.!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश विधात्याला जाणून घ्यायचं असेल तर केवळ पोथ्या पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या. तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला. मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत. कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी.... खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे . जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चंदन आणि संत यामध्ये खूप काही साम्य आहे.ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिलो तर चंदनाचा सुगंध आपल्या अंगाभोवती असल्याचे किंवा अंगाला येत असल्याचे जाणवते व आपणच चंदन झालो आहोत असे वाटायला लागते.चंदन जेव्हा सहानेवर पाणी टाकून घासायला लागतो तेव्हा ते स्वत: झिजायला लागते आणि त्याचा गंध सर्वत्र दरवळायला लागते. चंदनाचा गुण जसा आहे तसाच संतांचाही आहे.संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्या जीवनातले सारे दुर्गूण नष्ट होण्यास मदत होते तर त्यांचा सहवास आपल्याला चंदनासारखा नेहमी हवासा वाटायला लागतो.संत हे स्वत: जगाच्या कल्याणासाठी अविरत आपला देह झिजवतात ते स्वत:साठी जगत नाहीत तर आपल्या ईश्वराप्रती प्रेम निर्माण व्हावे,आपण सन्मार्गाला लागावे,आपण मानवतेच्या दृष्टीने आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म घडावे.आपल्यातला खरा माणूस जागा व्हावा.आपला जन्म इतरांच्या काही चांगल्या कारणी लागावा यासाठी नेहमी सांगत असतात झिजवत असतात.चंदन आणि संत हे दोघेही तितकेच मानवाच्या जीवनात महत्वाचे आहेत.म्हणून चंदन आणि संत यांच्यात साम्य आहे आणि यांचा सहवास नित्य राहिला तर नक्कीच आपले कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संपर्क.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रवचन - Discourse* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *कृती महत्त्वाची* स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.  ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/01/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालिका दिन*  *ऑक्युपेशन थेरपी दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात. 💥 जन्म :- *१८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी* १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक 💥 मृत्यू :- १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी. १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर - चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा, अधिसूचनेची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते स्थानिक भाजप नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *दिल्ली- एआयएडीएमकेच्या 26 खासदारांचं केलं निलंबन, वेलमध्ये उतरून गोंधळ घातल्यानं केलं निलंबित* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *ठाणे : पंतप्रधान आवास योजनेच्या ठाणे जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षणाची वारीचा तिसरा टप्पा सेवाग्राम परिसर वर्धा येथे आज पासून सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात थंडीचा कडाका कायम, परभणीचं आजचं तापमान 5.5 अंश सेल्सिअस, तर साताऱ्यातील वेण्णालेक परिसरात 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सहावेळा जगज्जेती ठरलेली मेरी कॉम मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी : हदगाव येथील 46 व्या स्काऊट गाईड नांदेड जिल्हा मेळाव्यात गोजेगाव शाळेच्या श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मॕडम यांच्या 'वास्तव ....एक सत्य' या काव्यसंग्रहाचे उदघाटन समयी झाले प्रकाशन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख              *मी सावित्री बोलतेय* नमस्कार ..... ववबाबवव मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *यशवंत दिनकर फडके* यशवंत दिनकर फडके (जानेवारी ३, १९३१ - जानेवारी ११, २००८) हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २०००  साली  बेळगाव  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे जानेवारी ३, १९३१  रोजी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत  उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. (१९५१) व एम्‌.ए. (१९५३) या पदव्या मिळवल्या. पुढे १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून  पीएच्‌. डी. पदवी मिळवली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१)  रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉    डॉ. आंबेडकर *२)  भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगररांगामुळे विभक्त झाली  आहेत?* 👉   महादेव *३)  दूरदर्शनने सुरू केलेली सर्वात पहिली मालिका कोणती?* 👉      श्वेतांबरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर ● विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद ● रतन बहिर, भीर, महाराष्ट्र ● शुभांगी परळकर, नांदेड ● माधव पवार, पत्रकार, नायगाव ● संदीप जाधव, देगलूर ● प्रशांत बोड्डेवाड, येवती ● वीरेंद्र डोंगरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *मांजर* मांजर डोळे झाकून दूध पीत असते तिला वाटते कोणीच काही पहात नसते तिने डोळे झाकले तरी जग सारे पहात असते तिचे सारे पराक्रम सा-या  जगाला माहित असते     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!*    ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश       विधात्याला जाणून घ्यायचं  असेल तर केवळ पोथ्या  पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या.  तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला. मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत. कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी....      खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे .  जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं  ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.      एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते. © व्यंकटेश काटकर नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सोबत - Along with* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *इच्छाशक्तीचा बळावर जग जिंकता येते.* केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव.  आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्‍या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता.  आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली.  यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले.  तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले.  इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/01/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या. १९५९ - सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले. २0१८ : महिलांसाठी हज यात्रा सुकर. पुरुष पालक बरोबर असण्याची प्रथा संपुष्टात १९५४ : राष्ट्रपतीपदी विराजमान असताना डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी 'भारतर%' या सर्वोच्च किताबाची सुरुवात केली. 💥 जन्म :- १९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म.  ४१९५९ : भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म. ४१९६0: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म.  💥 मृत्यू :- १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष. १९४४ : महाराष्ट्रातील थोर सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. २0१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नगरपालिका, पंचायतच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; प्रधान सचिवांच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगात समावेश करण्याचे आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीपदी पी. एन. पाटील यांची नियुक्ती* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधील शाळांमध्ये  विद्यार्थ्यांना  हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे शहर पोलिसांनी काल (1 जानेवारीपासून) हेल्मेट नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केल्यावर पुणेकरांनी केला विरोध केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सिंघम चित्रपटातील जयकांत शिखरे अर्थात अभिनेते प्रकाश राज निवडणूक रिंगणात, २०१९ ची निवडणूक लढवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ज्येष्ठ अभिनेते कादरखान यांंचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन, कॅनडामधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दुबई : ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची करण्यात आली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बातम्यांची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. https://b.sharechat.com/fWDMPyOy8S Follow me on Share Chat *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सन 1998 मध्ये प्रचंड गाजलेली पुस्तिका खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...           *चंदर - किशोर कादंबरी* खालील ब्लॉगवर *भाग नववा* वाचन करता येईल. https://shabdghar.blogspot.com/2018/12/blog-post_25.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक  *अरुण वि. देशपांडे, परभणी/पुणे* 9850177342 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *विठ्ठल रामजी शिंदे* विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. शिंदे यांनी पुण्याच्या फग्यरुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल.एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ अँक्टोबर, इ.स. १९0६ रोजी महर्षी शिंदे यांनी 'डिप्रेस्ड क्लास मिशन' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फग्यरुसन कॉलेजात शिकत असताना, मग १९0१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३0 साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे. वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन' हे लेखन आहे. दुसरया खंडात महर्षी शिंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे पावणे ४00 पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत. 'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पश्री आहेत. आपल्या वाड्मयात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगतात. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे - भगवान महावीर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) दुसरी गोलमेज परिषद कधी पार पडली ??           १९३१ *२) भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर कोण ?*            कार्निलिया सोराबजी *३) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?*            आयसीआयसीआय *४) एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला कोण ?*              डिक डोमा *५) देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण ?*              अजित डोवाल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ★ संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद ★ मो. विखार, शिक्षक, धर्माबाद ★ कविता जोशी, शिक्षिका ★ साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती ★ महेंद्रकुमार पद्मावार ★ मोगरे शंकर ★ श्रीकांत काटेलवार ★ आनंदराव धोंड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••   *दृष्टीकोन* दृष्टी सर्वांना असते योग्य दृष्टीकोन नसतो दृष्टीकोन नसेल तर नजरेला अर्थ गौण असतो दृष्टी असो की नसो दृष्टीकोन योग्य हवा  अंधत्वालाही ठरू शकतो योग्य दृष्टीकोन दवा    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••● ‼ *विचार धन* ‼ ●••• *नोकरी, कौटुंबिक जबाबदारी, सण-उत्सव, आजारपण, मुलांचं संगोपन यामुळे जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ मिळतोच असं नाही. दैनंदिन कामात इतकं व्यग्र व्हायला होतं, की प्रिय व्यक्तिजवळ प्रेम व्यक्त करायलाही फुरसत मिळत नाही. काहींना तर एकमेकांची साधी विचारपूस करणं होत नाही. खरं तर, एकमेकांसाठी जगणं, एकमेकांचा आनंद समाधान जपणं या गोष्टी नात्यातला गोडवा वाढवण्याचं काम करतात. तुमच्या नात्यामध्ये नव्याने प्रेम आणि ताजेपणा आणतात.* *एकाच छताखाली राहत असूनही कामातील व्यस्ततेमुळे तुमच्यात संवाद होत नसेल, तर तो होऊ द्या. सशक्त नातेसंबंधांसाठी एकमेकांशी विविध विषयांवर बोलणं, चर्चा करण गरजेचं आहे. घराबाहेर एकत्र, एकांतात वेळ घालवणं, बागेत जाऊन, फोन बाजूला ठेऊन भरपूर गप्पा मारल्याने परस्परांतील नाती घट्ट होतात.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     निरजानी सो कहिये का, कहत कबीर लजाय अंधे आगे नाचते, कला अकारथ जाये। सारांश     अज्ञानाच्या आनंदाने पखाली  वाहाण्यात धन्यता मानणार्‍यांना ज्ञान कसे समजावणार ? हे अज्ञानात इतके रमलेले असतात की त्यांना सत्य, ज्ञान ही खोटे वाटायला लागते. अशा मुढमतींना समजावताना आपणावरंच पश्चातापाची वेळ येते. हे अज्ञानी जीव अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना ज्ञानाचा प्रकाश किरण दिसणेही कठीणच. कारण त्यांच्या धारणाच इतक्या कर्मट बनलेल्या असतात. की त्यांना विवेक व विचाराचं काही एक देणं घेणंच नसतं. अशा अविवेकी विचारातूनच आत्मघातकी व दहशतवादी विचारांना खतपाणी मिळतं. अशा विचारांचे अनुयायीच तर कट्टर धार्मिक दहशतवादी बनत आहेत. अन धर्म या शब्दाचीच किव यावी अशी या लोकांनी धर्मांची अवस्था करून टाकलेली आहे.     आंधळ्यासमोर कितीही सुंदर नृत्य करून काय फायदा आहे? कारण तुमच्या नृत्यातलं कसब पाहाण्याची जाणण्याची दृष्टीच त्याच्याजवळ नाही तर त्या आंधळ्याला तुमचं नृत्य कसं कळणार ? जसा बहिर्‍यापुढे गावून उपयोग नाही, तसा आंधळ्यापुढे नाचून उपयोग होत नाही. त्यातल्या त्यात झोपीचं सोंग घेणार्‍या ढोंग्याला कितीही जागवायचा प्रयत्न केला तरी तो प्रतिसादच देत नाही. कारण तो स्वार्थासाठीच ढोंग धारण करीत असतो. अज्ञानी माणसापुढे आत्मा, परमात्मा , अध्यात्म, धर्म सांगून तो कसा काय कळणार आहे ! उपदेशासाठी सांगितलेले शब्दही विनाकारण फुकटंच वाया जाणार आहेत. अशा लोकांना उपदेश करणेही व्यर्थ आहे.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   जीवनाच्या जीवनप्रवासाची प्रत्येक वाट ही सरळ असतेच असे नाही तरीही मनुष्य त्या वाटेवरुन चालतच असतो आणि चालायलाच हवे.त्याच्याशिवाय जीवनप्रवास कसा आहे हे कसे समजणार ! त्या वाटेवरील चढ उतार कसा आणि किती आहे हे तरी कसे समजणार.चढ जास्त आहे म्हणून थांबायचे नाही आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही आणि उतार आहे म्हणून संथगतीने ही चालायचे नाही.कमीजास्त असले तरी त्याचपध्दतीने मार्गक्रमण करायचे.जोपर्यंत आपला जीवनप्रवास चालू राहील तोपर्यंत आपण न थकता तेवढ्याच आत्मविश्वासाने निरंतर चालायचे तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे नाही तर आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाऊन पदरी घोर निराशाच स्वीकारावी लागेल.काळ जसा सातत्याने पुढे पुढे चालत जातो तसा आपला जीवनप्रवासही सतत पुढे पुढे चालू द्यावा. किंचितही अडथळा आला तरी ती दूर करण्याची तयारी आपल्यामध्ये असू द्यावी तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे हे नेहमी लक्षात असू द्यावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣🛤🛣 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *प्रवास - Travel* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *कृती महत्त्वाची* स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं. सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘ ‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.  ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला. ‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले. *तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~