✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 ऑगस्ट 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - *जागर श्यामच्या कथांचा*भाग - पहिला https://drive.google.com/file/d/1zwGOKGITCyWah7P0rStBTFogYXSmqQma/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟤 *_ या वर्षातील २१४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.**१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.**१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.**१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.**१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१८७६: कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.**१७७४: जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्रवीण शिवाजी अक्कानवरू-- कवी, लेखक**१९७३: एकनाथ माधवराव डुमणे -- कवी**१९६७: डॉ.विक्रांत चंद्रकांत जाधव -- आयुर्वेद तज्ञ, लेखक**१९६६: अरुण नाईक -- कवी**१९६५: पौलस सुगंध वाघमारे -- कवी, लेखक* *१९६५: किशोरी शंकर पाटील-- लेखिका**१९६५: प्रा. डॉ. अनंत दादाराव राऊत -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९६२: दगडू लोमटे -- साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक* *१९६१: डॉ. अच्युत बन -- प्रसिद्ध डॉक्टर तथा लेखक* *१९५७: रामदास धोंडू गमरे -- कवी* *१९५७: डॉ.विनायक तुमराम -- कवी, लेखक, समीक्षक**१९५६: शेषराव माधवराव मोहिते -- ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते**१९५२: सदाशिव गोविंदराव पुंडपाळ -- मराठी साहित्यिक**१९५१: वृक्ष मित्र प्रकाश काळे -- लेखक* *१९५०: डॉ.गणेश नारायणदास देवी --भाषाशास्त्र तज्ज्ञ/भाषाशास्त्र अभ्यासक, लेखक**१९४४: नागोराव सोनकुसरे -- कवी* *१९४४: दामोदर मावजो -- गोव्यातील एक लघुकथा लेखक, कादंबरीकार, समीक्षक त्यांना २०२१ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित* *१९४४: प्रा.भगवान भाऊदेव काळे -- कादंबरीकार* *१९४१: शंकर विठोबा विटणकर -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९३९: सीमा रमेश ओवळेकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९३६: जयश्री गोपाळराव घारपुरे -- लेखिका* *१९३२: मनोहर म्हैसाळकर -- विदर्भ साहित्य संघाचे पूर्वअध्यक्ष आणि कुशल संघटक, साहित्य नाटकाचे जाणकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर २०२२ )**१९३२: महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (मृत्यू: ३१ मार्च १९७२ )**१९२९: डॉ.विश्वास रघुनाथ कानडे -- लेखक* *१९२९: श्री. ग. माजगांवकर -- पत्रकार, लेखक, प्रकाशक (मृत्यू :२० फेब्रुवारी १९९७ )**१९२४: सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू (मृत्यू: १३ मार्च १९६७ )**१९२०: राजारामबापू पाटील-- भारतीय राजकारणी (मृत्यू: १७ जानेवारी १९८४ )**१९२०: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – प्रसिद्ध लेखक, कवी व समाजसुधारक (मृत्यू: १८ जुलै १९६९ )**१९१९: मोती बीए -- भोजपुरी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १८जानेवारी २००९ )**१९१८: बाबूराव गोविंदराव शिर्के -- बांधकाम व्यावसायिक (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१० )**१९१५: श्रीकृष्ण जनार्दन जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: १३जानेवारी १९८९ )**१९१३: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२ )**१८९९: कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६ )**१८८२: पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१),(मृत्यू: १ जुलै १९६२ )**१८३५: महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक.(मृत्यू: ८ आक्टोबर १८८८ )**१७४४: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९ )*🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९१९: अनिल कांबळे -- नामवंत मराठी गझलकार कवी (जन्म :१९५३ )**२००८: हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (जन्म: २३ मार्च १९१६ )**२००८: अशोक मांकड – क्रिकेटपटू (जन्म: १२ आक्टोबर १९४६ )**२००५: फहाद – सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१ )**१९९९: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक.(जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ )**१९२०: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी,भगव्दगीतेचे भाष्यकार (जन्म: २३ जुलै १८५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागर श्यामच्या कथांचा भाग पहिला - सावित्रीचे व्रत" श्यामची आई " या पुस्तकातील 42 कथा शाळेतील मुलासाठी..... Audio Clip ऐकण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *फास्टॅगच्या नव्या नियमानुसार 1 ऑगस्टपासून फास्टॅगचे केवायसी अनिवार्य होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आंदोलनाचा इशारा, 15 दिवसांत संयुक्त गट ब, क ची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दूध उत्पादक शेतकरी करणार महामार्ग मेगाब्लॉक आंदोलन, दूध दराबाबतचा सरकारचा तोडगा शेतकऱ्यांना अमान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तलाठ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार, महसूल मंत्र्यांची ग्वाही; बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील तीन ते चार दिवस कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर बडतर्फ, UPSC ने टाकले काळ्या यादीत, आता कोणत्याही परीक्षेला बसू शकणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत फायनलमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वावटळ* 📙 *****************फार मोठ्या प्रदेशावर पसरलेल्या, अनेक दिवस हिंडत धुमाकूळ घालणाऱ्या चक्रीवादळापेक्षा वावटळ कधीकधी अधिक विध्वंस घडवून आणते. हरिकेन वा टायफून याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वादळी प्रकाराला आपण 'वावटळ' म्हणतो. वावटळीचेसुद्धा एक केंद्र असतेच. या केंद्राभोवती प्रचंड वेगाने फिरणारे वारे घोंगावतात, त्यावेळी मध्ये सापडणाऱ्या कशाचीच धडगत नसते. चक्रीवादळाचा वेग बहुधा मोजता येतो, सांगता येतो; पण वावटळीत अनेकदा वेग मोजायची यंत्रे पार मोडून जातात. ब्युफोर्ट स्केल या प्रकारात बारा हा आकडा सर्वात धोकादायक समजला जातो. या पद्धतीने वाऱ्याचा वेग हे स्केल दाखवते. वावटळ येणार आहे वा येऊन गेली म्हणजे हा बाराचाच आकडा व्यक्त करायची पद्धत पडली आहे. अंदाजे अडीचशे ते चारशे किलोमीटर वेगाने वावटळ येऊन धडकते. वावटळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे समुद्रावर कमी दाबाचा पट्टा गरम हवेमुळे निर्माण होतो, हेच. या पट्टय़ाकडे धाव घेणारी हवा बाष्पही ओढून आणते. बघता बघता हे वायूचे प्रवाह वेग घेत स्वतःभोवती फिरू लागतात. सुमारे तीनशे चारशे किलोमीटर एवढ्याच प्रदेशात या घडामोडी झपाटय़ाने घडतात. वावटळीचे केंद्र पाच ते पंचवीस किलोमीटर एवढे असू शकते. वावटळ बघता बघता किनाऱ्याकडे सरकू लागते. जमीन तापल्यामुळे भर दुपारी या भागात कमी दाब असतो. सुरुवातीला ज्या किनाऱ्याकडे वावटळ जाते तेथे एकदम हवेचा दाब कमी झाल्याचे जाणवू लागते. हवेमध्ये एक प्रकारचा सन्नाटा जाणवतो आणी काही वेळातच भीषण स्वरूपात द्वारे धिंगाणा घालू घालतात. सोसाटय़ाचा, पावसाचा वारा या दरम्यान चालू असतोच. पॅसिफिकमध्ये नेहमीच वावटळी उद्धवतात. उत्तर अमेरिकेचा संपूर्ण पश्चिम किनारा वर्षाकाठी आठ दहा वेळा या वावटळींना सामोरा जातो. नांगरलेली बोट नांगर उखडून कलंडणे किंवा महाकाय लाटेबरोबर किनाऱयावर फेकली जाणे यासारखे अविश्वासार्ह गोष्ट वावटळीत सहज घडते. अमेरिकेत एका वावटळीत रस्त्यावरील मोटार उचलून गरगरत एका घराच्या छपरावर विसावली होती. रस्त्यात उघड्यावर माणसे कधी थांबतच नाहीत; पण चुकून कोणी सापडला, तर रस्त्यातल्या पाचोळ्याबरोबर तोही इकडेतिकडे भिरकावला जातो. झाडे उन्मळून पडणे, घरे पिळवटून वेडीवाकडी होणे, हेही खास वावटळीचेच तांडव. अनेकदा हे भीषण वारे स्वतःबरोबर महाकाय लाटा आणतात. कित्येक फूट उंचीच्या लाटा सारा किनारा उद्ध्वस्त करतात. हा सारा काही तासांचा खेळ आटोपला की पुन्हा आभाळ पूर्ण निरभ्र होते; जसे काही घडलेच नव्हते, असा सूर्यप्रकाश पुन्हा पडतो. अटलांटिकवरील 'हरिकेन', हिंदी महासागरातील चक्रीवादळ हेही वावटळीचेच प्रकार.आजकाल या वावटळी उपग्रहाद्वारे आधी समजू शकतात. त्यांची दिशा कळते. त्या भागातील लोकांना तातडीचे इशारे देऊन जागे करता येते. जे मच्छीमार समुद्रावर निघाले असतील, त्यांना थांबवणे व समुद्रावरील लोकांना परतायची सूचना देणे या स्थानिक रेडिओवरून तातडीने केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या कोणी वावटळी पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत, त्यांना त्या विसरणे आयुष्यात कधीच शक्य होत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटे पाहून जो घाबरत नाही, तोच खरा माणूस.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *भारतीय हॉकी टीमचा कर्णधार* कोण आहे ?२) महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी निवड झाली ?३) 'श्वेत खंड' म्हणून कोणत्या खंडास म्हटले जाते ?४) 'थवा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) शब्दांचा वापर जेव्हा वाक्यात होतो तेव्हा त्यांना काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) हरमनप्रीत सिंग २) राजस्थान ३) अंटार्क्टिका खंड ४) समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव ५) पद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एकनाथ डुमणे, शिक्षक तथा साहित्यिक, मुखेड👤 गोविंद जाधव रोषणगावकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 संजीवकुमार हामंद, शिक्षक, करखेली👤 पवन कुमार भाले, धर्माबाद👤 मंगेश हानवते, गटसमन्वयक, नायगाव👤 आनंदराव पेंडकर, ग्रामसेवक, येवती👤 बंडू पाटील मोरे👤 सतिश दरबस्तेवार, कुंडलवाडी👤 विश्वनाथ चन्ने, कळमनुरी, हिंगोली👤 नागेश टिपरे👤 दिलीप साळुंके👤 साईनाथ पाटील मोकलीकर👤 शिनू दर्शनवाड👤 साईनाथ जायेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु कुलाल शिष्य कुम्भ हैं, गढ गढ काढै खोट ।अन्तर हाथ सहार दै बाहर बाहे चोट ॥ 32 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाजी बनवताना इतर साहित्या सोबत तिखट असलेली हिरवी मिरची आवर्जून टाकली जाते सोबतच मिरचीची चव सुद्धा इतर साहित्यापेक्षा वेगळी असते. भलेही जेवण करताना ताटातून तिला बाजूला सारले जात असले तरी तिच्याशिवाय बरेच पदार्थ बनत नाही. तसेच एखाद्या ज्वलंत, परखडपणे व सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच प्रकारे बाजूला सारले जात असते. म्हणून ती, व्यक्ती आपला सत्य मार्ग सोडते का...? म्हणून एकवेळ तर काय दहा वेळा बाजूला सारले तरी चालेल कधीही सत्याची साथ सोडू नये. शेवटी जशी तिखट मिरचीची आठवण होते तीच आठवण एक दिवस सत्य बोलणाऱ्या व्यक्तीची सुद्धा होत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1kXf3HFBiV2FihBF/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🟣 *_ या वर्षातील २१२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.**२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल**२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.**१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९६२: ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.**१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.**१८९८: विल्यम केलॉग याने ’कॉर्नफ्लेक्स’ विकसित केले.**१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.* * ७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: डॉ. प्रकाश कोयाडे -- लेखक**१९८४: मिमोह चक्रवर्ती -- भारतीय अभिनेता**१९८२: जेम्स मायकेल जिमी अँडरसन -- इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू**१९८१: किशोर विजय बळी -- कवी, स्तंभलेखक* *१९७८: सुनील जगन्नाथ जाधव -- कवी**१९७७: उमेश उत्तमराव बोरकुले -- लेखक* *१९७७: विद्या रमेश जाधव -- कवयित्री* *१९७३: सोनू सूद -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, मॉडेल, मानवतावादी आणि परोपकारी* *१९७३: सोनू निगम – भारतीय पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता**१९६३:यास्मीन जोसेफ (मंदाकिनी) -- भारतीय अभिनेत्री**१९६२: सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार -- महाराष्ट्र राज्याचे मंत्री**१९५९: डॉ.सदानंद नामदेव देशमुख-- सुप्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार,२००४चा साहित्य अकादमी पुरस्कार**१९४७: अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते**१९३५: सुधाकर बलवंत लोखंडे. -- कवी**१९३५: डॉ. अनुराधा अरविंद गोडबोले -- लेखिका(मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२२ )**१९३३: प्रा. गोविंद माधव काळे. -- कवी**१९३२: मधुकर दत्तात्रय जोशी -- कवी, लेखक, संपादक* *१९३१: लक्ष्मणराव बाळकृष्ण सराफ_ शिक्षणतज्ज्ञ,निवृत्त प्राचार्य शा.अ.महा,* *१९२८: सुलोचना (लाटकर) -- हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री (मृत्यू: ४ जून २०२३)**१८६३: हेन्री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (मृत्यू: ७ एप्रिल १९४७ )**१८५५: जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती (मृत्यू: १४ आक्टोबर १९१९ )**१८१८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: प्राचार्य मदन धनकर -- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, संपादक (जन्म:२५ ऑगस्ट १९३५)**२०२१: गणपतराव देशमुख -- महाराष्ट्र विधानसभेवर ५४ वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले.(जन्म: १० ऑगस्ट १९२६ )**२०१७: उस्ताद हुसेन सईदुद्दीन डागर -- सईद भाई म्हणून प्रसिद्ध, धृपद परंपरेशी संबंधित असलेले भारतीय शास्त्रीय गायक (जन्म: २० एप्रिल १९३९ )**२०१३: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर-- संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२६ )* *२०१२: बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले -- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक(जन्म: २८ डिसेंबर१९३४ )* *२०११: डॉ.अशोक रानडे – संगीत समीक्षक (जन्म: २५ आक्टोबर १९३७ )**१९९४: शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक.(जन्म: ८ ऑगस्ट १९२६ )**१९८३: वसंतराव देशपांडे – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक (जन्म: २ मे १९२० )**१९६०: ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे –स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३१ मार्च १८७१ )**१८९८: ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (जन्म: १ एप्रिल १८१५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांचे व्यासपीठ ; शिक्षण परिषद*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिव्यांग नागरिकांसाठी ची कर्ज मर्यादा 50 हजारावरून अडीच लाख करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संसदेत पत्रकारांना बंदी, ग्लास रूममधून कव्हरेज करावं लागणार, प्रेस क्लब ऑफ इंडियाकडून निषेध*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर, 9 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय, तहसीलदार, गटविकास ते उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भव्य स्वागत, या प्रेमाला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही - पंकजा मुंडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पॅरिस ऑलिम्पिक - कॅप्टन हरमनप्रीतचा निर्णायक गोल, भारत - अर्जेंटिना सामना 1-1ने बरोबरीत समाप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो - दुसऱ्या T20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा सात विकेटनी पराभव करत, मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वजनकाटे तराजू* 📙कोणत्याही मालाची विक्री करायची झाली कि, ताबडतोब तराजू समोर येतो. रेल्वे स्टेशनवर गेलो, तर आपले वजन करण्यासाठी वजन करण्याचे मशीन खुणावतच असते. मिठाईच्या दुकानात गेलो, तर तिथे आणखीनच वेगळा प्रकार मिठाई तोलायला वापरतात. किती किलो वजन झाले आहे, ते आपल्यालाही दिसते, तसे तोलणार्यालाही उलट्या बाजूने दिसत असते. सोनाराकडे हल्ली इलेक्ट्रॉनिक आकडे दिसणारे काटे आले आहेत. लहानशी झुळूक आली वा कोणी फुंकर मारली, तरी हे आकडे झटकन हलतात. याउलट जकातनाक्यावर कधी गेलो, तर अख्खा ट्रक उभा राहील, असा वजनकाटा जमिनीतच लोखंडी चौकटींवर आधारलेला असतो.वजनाचा काटा वजनाचा आकडा दाखवतो किंवा तराजू असेल, तर एका तागडीत टाकलेले वजन मोजले जाते. पण हे वजन करण्यामागे मूळतत्त्व कोणते, हे सहसा कोणालाच आठवत नसते. गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक गोष्टीला वजन प्राप्त होते. याच गोष्टीचा कळत नकळत वापर करून तराजूवर वजन करण्याची पद्धत सुरू झाली. तराजूचे तत्त्व अगदी सोपे आहे. आडव्या दांडीला दोन तागड्या दोन बाजूंना बांधल्या व बरोबर मध्यभागी आधार दिला की, तराजू बनतो. अर्थातच तागडीचे वजन अगदी सारखे असणे आवश्यक. आता तागडीत ठराविक माहितीचे वजन एका बाजूला टाकल्यास गुरुत्वाकर्षणाची जितकी ओढ त्या बाजूला असेल, तितकीच ओढ दुसऱ्या बाजूला असलेल्या मालाच्यासाठी आवश्यक ठरते. हा झाला तराजूचा सगळ्यात सोपा आकार व वापर.वर उल्लेख केलेल्या अनेक प्रकारात हे ठराविक नेमके माहितीचे वजन टाकल्यावर आतील स्प्रिंगला बसणारा ताण हा दर्शनी काट्यावर आखला जातो (Calibration). त्यानुसार आपल्याला केलेले वजन कळू शकते. इलेक्ट्रॉनिक वजनकाटय़ामध्येही स्प्रिंग असतेच; पण आखणीऐवजी आतील कंट्रोल पॅनलला मिळणाऱ्या 'सेन्सर'करवी आपल्याला डिस्प्ले युनिटवर आकडे दिसतात. अगदी नाजूक सोन्यासारखे वजन तोलणारे काटे काचेच्या बंद पेटीत ठेवून मग वजन केले जाते. हीच पद्धत रासायनिक वस्तूंच्या वजनासाठीसुद्धा वापरतात. त्यांना 'फिजिकल अँड केमिकल बॅलेन्स' असे म्हटले जाते. अगदी छोटी एक मिलीग्रॅमची वजनेही त्यासाठी वापरली जातात. वजनकाट्यावर वजन केले जाते. पण अनेक वजनकाट्यांवर किती मर्यादेपर्यंत व्यवस्थित वजन मिळेल, याचाही उल्लेख असतो; हे आपण कधी लक्षात घेतले आहे काय ? त्याचप्रमाणे जितका काटा जास्त वजन करता येण्याजोगा, तितकी त्याची लहान चूक कळेनाशी होत जाते, हेही ध्यानात ठेवायला हवे. उदाहरणार्थ, शंभर किलोचे वजन करताना शंभर ग्रॅम वजनाचा फरक सहसा दाखवला चालणार नाही, तर अर्ध्या किलोपर्यंतचाच फरक आढळून येईल. याउलट एक किलोपर्यंतचेच वजन दाखवणारा काटा वजनातील दहा ग्रॅमचाही फरक जाणवून देऊ शकतो.अनेक व्यवहारांत वजनाचा संबंध येतोच. योग्य काट्यावर योग्य पद्धतीचे वजन करण्याचा आग्रह धरला, तर कोणाचेच नुकसान नसते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील एकूण वाघांपैकी भारतात किती टक्के वाघ आहेत ?२) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा - २०२४ चा उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियम ऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर झाला ?३) ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतून पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?४) 'तुरुंग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) ७० टक्के २) सीन नदी ३) मनू भाकर, शूटर ४) कारागृह, कैदखाना, बंदिखाना ५) अशोक मंडप*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय कुऱ्हाडे, शिक्षक, बिलोली👤 नागनाथ इळेगावे, पदोन्नत मुख्याध्यापक, हदगाव👤 प्रियंका घुमडे👤 संगीता ठलाल, चंद्रपूर👤 निलेश कोरडे👤 साईनाथ वाघमारे👤 शेख नवाज👤 प्रवीण चातरवाड👤 सचिन गादेवार, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु धोबी शिष कापडा साबुन सिरजनहार ।सुरति शिला पर धोइये निकसै ज्योति अपार ॥ 30 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या स्वभावासोबत आपुलकी, माणुसकी, स्नेह, आदर तसेच प्रेमाचे बोल तेवढेच आवश्यक आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे, महान गुण असतात त्याच्यात कोणत्याही विकार वासना घर करत नाही, सोबतच त्याच्या जवळ येत नाही. म्हणून याच महान गुणांची साथ धरून मानवी जीवनाचे सार्थक करावे. भलेही ते, दिसत नसतील तरी अनेकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान ठरत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌺पुण्यायी कर्माची*🌺एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले. अचानक त्यांना म्हातारीची झोपडी दिसली आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्रीसाठी आश्रय दिला.म्हातारीने जेवण बनवले सर्वजण जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे ज्याच्या अंगावर वीज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम पहिला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारीची आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत वीज आपल्याच अंगावर पडणार. असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन वीज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.*तात्पर्यः एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/pAxJ9oSvMLcqxkQP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन_* 🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.**१९८७: भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.**१९८५: मल्याळम लेखक टी.एस.पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार**१९५७: ’इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.**१९४८: दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४६: टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.**१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.**१८७६: फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.**१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्राम बागवाड्यात स्त्री शिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: बाळासाहेब गोपाळ कांबळे -- लेखक* *१९७९: प्रतिमा अरुण काळे-- कवयित्री**१९७९: विनोद भगवान राठोड -- कवी**१९७९: प्राची परचुरे-वैद्य -- लेखिका* *१९६९: वेणुताई नागोराव हुलसुरे -- लेखिका**१९६८: सलील वाघमारे -- लेखक**१९६७: अनिल श्रीनिवास ठाकरे -- लेखक, मूर्तिकार**१९६३: संगीता सुनील वाईकर -- लेखिका* *१९६२: हेमंत पटले -- लेखक* *१९५९: संजय दत्त – प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९५३: अनुप जलोटा – प्रसिद्ध भजन व गझलगायक**१९४८: श्याम पेंढारी -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक* *१९४६: डॉ. अनिल गजभिये -- लेखक* *१९४४: तुलसी रामसे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक ( मृत्यू: १३ डिसेंबर २०१८ )**१९४०: डॉ. रंगनाथ नारायण जोशी -- कवी, लेखक* *१९३९: डॉ. लीना प्र. रस्तोगी -- लेखिका व कवयित्री* *१९३८: प्रा. प्रभाकर नारायण परांजपे -- अनुवाद, कथालेखक आणि संपादक* *१९२७: माधवसिंह सोळंकी -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री,केन्दिय मंत्री ( मृत्यू: ९ जानेवारी १९२१)**_१९२५: शिवराम दत्तात्रेय फडणीस -- SD फडणीस म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार_* *१९२२: ब.मो.पुरंदरे(बाबासाहेब )– इतिहासकार आणि लेखक,शिवशाहीर (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०२१ )**१९२१: श्रीकृष्ण नारायण चाफेकर -- कवी लेखक**१९२१: रा.ना.पवार -- जुन्या पिढीतील कवी, गीतकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९२ )**१९०८: रघुनाथ रामचंद्र भांबे -- कवी लेखक**१९०४: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३ )**१८८३: बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल१९४५ )**१८७८: नारायण कृष्णबुवा सुपेकर -- कीर्तनकार कवी (मृत्यू: २७ मे १९६९ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (जन्म: १५ ऑगस्ट १९२६ )* *२०१२: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार ( जन्म: १७ ऑगस्ट १९२३ )* *२००९: महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता (जन्म: २३ मे १९१९ )**२००३: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६ )**२००२: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९ )**१९९६: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९ )**१९६६: राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी, लेखक आणि चित्रपट गीतकार (जन्म:.२३ सप्टेंबर १९१५ )**१८९१: इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक.(जन्म: २६ सप्टेंबर १८२० )**१८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (जन्म: ३० मार्च १८५३ )**१७८१: योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १४ सप्टेंबर १७१३ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला, कवितेच्या जगात*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुरतच्या धर्तीवर ट्राफिक व्यवस्था 'एनजीओ' कडे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी, पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो : भारताला धक्का देत श्रीलंकेच्या महिला संघाने अखेर आशिया चषकावर आपले नाव कोरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.*डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जीवंतपणी इंग्रज सरकारच्या हाती लागणार नाही'* ही प्रतिज्ञा कोणी घेतली होती ?२) कोणत्या भारतीय खेळाडूंना 'टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?३) पहिले फॉर्म्युला वन विजेतेपद कोणी जिंकले ?४) 'तृषा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले तंटामुक्त गाव कोणते ? *उत्तरे :-* १) क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद २) विजय अमृतराज व लिएंडर पेस ३) ऑस्कर पियास्त्री ४) तहान, लालसा ५) मळेगांव, ता. बारामती, जि. पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील कोल्हे, वाशिम👤 संजय पंचलिंग, शिक्षक, नायगाव👤 सुदीप दहिफळे, वसमत👤 दलित सोनकांबळे, बिलोली👤 सौ. गीता शिवा वसमतकर👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 गिरीश श्रीपतराव पाटील, नांदेड👤 सौ. दीपाली अशोक मामीडवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निज मन तो नीचा किया चरण कमलकी ठौर |कहैं कबीर गुरुदेव बिन नजर न आवै और ॥ 26 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादे चांगले काम करण्याची जेव्हा आपल्या मनात इच्छा निर्माण होत असते. ती इच्छा योग्य असते. म्हणून त्यावेळी उगाचच वेळ वाया घालवू नये. भलेही कितीही अडथळे, अडचणी आल्या तरी त्यांचेही हसत, हसत आनंदाने स्वागत करावा. कारण अडचणी आणि अडथळे हे सुद्धा एक प्रकारचे मार्गदर्शकाच्या भूमिकेतच असतात. सोबतच नवी वाट दाखवून पाठीमागे सदैव आधारस्तंभ बनून उभे राहतात. पण, ते आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांचाही मोठ्या मनाने स्वीकार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भेट*एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वतची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला. *तात्पर्य*आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/pAxJ9oSvMLcqxkQP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन_* 🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••🟢 *_ या वर्षातील २११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.**१९८७: भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.**१९८५: मल्याळम लेखक टी.एस.पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार**१९५७: ’इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली.**१९४८: दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४६: टाटा एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.**१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू झाली.**१८७६: फादर आयगेन ला फॉन्ट आणि डॉ. महेन्द्र सरकार यांनी ’इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेची स्थापना केली.**१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्राम बागवाड्यात स्त्री शिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९: बाळासाहेब गोपाळ कांबळे -- लेखक* *१९७९: प्रतिमा अरुण काळे-- कवयित्री**१९७९: विनोद भगवान राठोड -- कवी**१९७९: प्राची परचुरे-वैद्य -- लेखिका* *१९६९: वेणुताई नागोराव हुलसुरे -- लेखिका**१९६८: सलील वाघमारे -- लेखक**१९६७: अनिल श्रीनिवास ठाकरे -- लेखक, मूर्तिकार**१९६३: संगीता सुनील वाईकर -- लेखिका* *१९६२: हेमंत पटले -- लेखक* *१९५९: संजय दत्त – प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९५३: अनुप जलोटा – प्रसिद्ध भजन व गझलगायक**१९४८: श्याम पेंढारी -- प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक* *१९४६: डॉ. अनिल गजभिये -- लेखक* *१९४४: तुलसी रामसे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक ( मृत्यू: १३ डिसेंबर २०१८ )**१९४०: डॉ. रंगनाथ नारायण जोशी -- कवी, लेखक* *१९३९: डॉ. लीना प्र. रस्तोगी -- लेखिका व कवयित्री* *१९३८: प्रा. प्रभाकर नारायण परांजपे -- अनुवाद, कथालेखक आणि संपादक* *१९२७: माधवसिंह सोळंकी -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री,केन्दिय मंत्री ( मृत्यू: ९ जानेवारी १९२१)**_१९२५: शिवराम दत्तात्रेय फडणीस -- SD फडणीस म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय व्यंगचित्रकार आणि चित्रकार_* *१९२२: ब.मो.पुरंदरे(बाबासाहेब )– इतिहासकार आणि लेखक,शिवशाहीर (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०२१ )**१९२१: श्रीकृष्ण नारायण चाफेकर -- कवी लेखक**१९२१: रा.ना.पवार -- जुन्या पिढीतील कवी, गीतकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९२ )**१९०८: रघुनाथ रामचंद्र भांबे -- कवी लेखक**१९०४: जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे. आर.डी.टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३ )**१८८३: बेनिटो मुसोलिनी – इटलीचा हुकूमशहा (मृत्यू: २८ एप्रिल१९४५ )**१८७८: नारायण कृष्णबुवा सुपेकर -- कीर्तनकार कवी (मृत्यू: २७ मे १९६९ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: शिवराम दत्तात्रेय जोशी -- अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्रीय संस्कृत पंडित (जन्म: १५ ऑगस्ट १९२६ )* *२०१२: बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट -- मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार ( जन्म: १७ ऑगस्ट १९२३ )* *२००९: महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता (जन्म: २३ मे १९१९ )**२००३: बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६ )**२००२: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९ )**१९९६: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (जन्म: १६ जुलै १९०९ )**१९६६: राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी, लेखक आणि चित्रपट गीतकार (जन्म:.२३ सप्टेंबर १९१५ )**१८९१: इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक.(जन्म: २६ सप्टेंबर १८२० )**१८९०: व्हिन्सेंट व्हॅन गॉग – डच चित्रकार (जन्म: ३० मार्च १८५३ )**१७८१: योहान कीज – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: १४ सप्टेंबर १७१३ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला, कवितेच्या जगात*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुरतच्या धर्तीवर ट्राफिक व्यवस्था 'एनजीओ' कडे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनू भाकरने इतिहास रचला; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी, पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलंबो : भारताला धक्का देत श्रीलंकेच्या महिला संघाने अखेर आशिया चषकावर आपले नाव कोरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *रातांधळेपणा म्हणजे काय ?* 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.*डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जीवंतपणी इंग्रज सरकारच्या हाती लागणार नाही'* ही प्रतिज्ञा कोणी घेतली होती ?२) कोणत्या भारतीय खेळाडूंना 'टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?३) पहिले फॉर्म्युला वन विजेतेपद कोणी जिंकले ?४) 'तृषा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील पहिले तंटामुक्त गाव कोणते ? *उत्तरे :-* १) क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद २) विजय अमृतराज व लिएंडर पेस ३) ऑस्कर पियास्त्री ४) तहान, लालसा ५) मळेगांव, ता. बारामती, जि. पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील कोल्हे, वाशिम👤 संजय पंचलिंग, शिक्षक, नायगाव👤 सुदीप दहिफळे, वसमत👤 दलित सोनकांबळे, बिलोली👤 सौ. गीता शिवा वसमतकर👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 गिरीश श्रीपतराव पाटील, नांदेड👤 सौ. दीपाली अशोक मामीडवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निज मन तो नीचा किया चरण कमलकी ठौर |कहैं कबीर गुरुदेव बिन नजर न आवै और ॥ 26 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादे चांगले काम करण्याची जेव्हा आपल्या मनात इच्छा निर्माण होत असते. ती इच्छा योग्य असते. म्हणून त्यावेळी उगाचच वेळ वाया घालवू नये. भलेही कितीही अडथळे, अडचणी आल्या तरी त्यांचेही हसत, हसत आनंदाने स्वागत करावा. कारण अडचणी आणि अडथळे हे सुद्धा एक प्रकारचे मार्गदर्शकाच्या भूमिकेतच असतात. सोबतच नवी वाट दाखवून पाठीमागे सदैव आधारस्तंभ बनून उभे राहतात. पण, ते आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांचाही मोठ्या मनाने स्वीकार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भेट*एक जुनी सूफी कथा आहे. एकदा एक मोळीविक्या जंगलात नेहमीप्रमाणे झाडे तोडण्यासाठी गेला. त्याला एक साधू भेटला. तो म्हणाला, अरे इथेच का थांबलास आणखी पुढे जा. जीवनात नेहमीच पुढे जात राहावे. मोळीविक्या म्हातारा झाला होता. तो म्हणाला, महाराज मला आता कुठे पळवता. मी कुठेही जाऊ शकणार नाही. साधू म्हणाला, बघ तुझाच फायदा आहे. पुढे जा. पुढे जा.. असे म्हणत तो साधू अदृश्य झाला. मोळीविक्याला नवल वाटले. साधूने सांगितल्याप्रमाणे करायचे ठरवत तो पुढे गेला. त्याला तांब्याची खाण सापडली. तो आनंदी झाला. त्यातील तांबे विकून तो चरितार्थ चालवू लागला. कालांतराने त्याला पुन्हा साधूचे शब्द आठवले. तो पुन्हा पुढे गेला. त्याला चांदीची खाण सापडली. तो आणखी खुश झाला. त्याचे वर्ष मजेत सरले. त्याला पुन्हा वाटले आणखी पुढे जावे. त्याने असे केले असता, त्याला सोन्याची खाण मिळाली. तो खुश झाला.वर्षभर कमावल्यानंतर तो पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाला. त्याला हि याची खाण मिळाली. तो आणखी आनंदी झाला. आता त्याच्या सात पिढ्या बसून खातील इतके धन त्याच्याकडे जमा झाले होते. पुन्हा त्याला साधू भेटला. साधू म्हणाला, अरे का थांबलास? पुढे जा आणखी. तो मोळीविक्या त्या साधूला म्हणाला, आता मला हि याची खाण मिळाली आहे. मला काही नको. परंतु, त्या साधूने पुन्हा त्याला पुढे जाण्याचा आदेश दिला. तो मोळीविक्या पुन्हा पुढे गेला. त्याला एक गुहा दिसली. या गुहेत एक साधू तपश्चर्या करत होता. आपल्याला नेहमी भेटणारा तो हा साधू नाही हे मोळीविक्याच्या ध्यानात आले. मोळीविक्या खुश झाला. या गुहेतील वातावरण त्याला आवडले. तो म्हणाला, आता मला काही नको. मी इथून कुठेही जाणार नाही. मला जितके जगायचे तितके मी जगलो. आता हाच माझा आसरा. त्या साधूने मोळीविक्याच्या मनातील ही बाब हेरली. तो जोरात ओरडला. तुला सांगितले ना, इथे थांबू नकोस. तुला आणखी पुढे जायचे आहे. थेट परमात्मा मिळेपर्यंत पुढे. तू चालत राहा, निघ इथून. त्या मोळीविक्याला स्वतची चूक कळली. पहिल्यांदा भेटलेल्या साधूने परमात्म्याचे मिलन करण्याविषयी पुढे जाण्यास सांगितले होते. परंतु, आपण तर केवळ भौतिक सुखाचाच विचार करत पुढे जात असल्याचे मोळीविक्याच्या लक्षात आले. त्याने त्या साधूची माफी मागितली व तो पुढच्या प्रवासाला निघाला. *तात्पर्य*आपले ध्येय निश्चित केले असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/Q7mrqJ6psfCkSAGS/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_ या वर्षातील २०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.**१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.**१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.**१९२१: रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.**१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.**१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले.*🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०: प्रा. डॉ. गंगाधर चेपूरवार -- कवी, लेखक**१९९०: सत्यनारायण मनोहर भांडेकर -- कवी**१९७९: प्रसाद पुरुषोत्तम कुमठेकर -- लेखक, निर्माता, दिग्दर्शक**१९७३: गौरी एकनाथ शिरसाठ -- कवयित्री* *१९७२: संतोष श्रीधर महाडेश्वर -- कवी, लेखक* *१९७२: संदेश श्रीकांत बांदेकर -- कोंकणी लेखक तथा अनुवादक**१९७२: छाया अजबराव वाढेकर -- लेखिका**१९७०: सुभाष उमरकर -- कवी**१९६९: जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स- निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू , सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक व कोच* *१९६९:हणमंत पडवळ -- कवी* *१९६७:राहुल बोस -- भारतीय अभिनेता**१९६२: सुनीलकुमार वसंतराव सरनाईक -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६०: श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री**१९६०: मनमोहन रोगे -- कवी, लेखक, पत्रकार**१९५६: प्रा. राज यावलीकर -- प्रसिद्ध साहित्यिक, 'खडू शिल्प' कलेकरिता राष्ट्रीय पुरस्कार* *१९५५: अॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५३: डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे -- सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०१७ मध्ये डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५०: विश्व मोहन भट्ट -- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादक* *१९३९: आशा अरविंद बगे. -- मराठीतील ज्येष्ठ प्रसिद्ध लेखिका* *१९३५: कृष्ण भास्कर परांजपे -- प्रसिद्ध लेखक**१९३०: चंद्रकांत रामचंद्र वर्तक -- कथाकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार (मृत्यू: ११ जुलै २०१० )**१९२८: कृष्ण राघव घरोटे -- कवी, कथाकार**१९२८: उत्तमराव बळीराम राठोड -- माजी खासदार,संस्थापक (मृत्यू: ७ मार्च १९९७ )**१९११: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७ )**१९०७: वामनराव हरी देशपांडे -- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९० )**१८९२: नारायण विनायक कुलकर्णी-- मराठी नाटककार(मृत्यू: १८जानेवारी १९४८ )* *१६६७: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १७४८ )* 🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••• *_२०१५: डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम -- भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७)'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रियता.(जन्म: १५ऑक्टोबर १९३१ )_**२०१०: मारुती माने -- भारतीय माजी कुस्तीपटू (जन्म: १०ऑगस्ट१९३८ )**२०१०: रवी बसवानी. -- भारतीय चित्रपट अभिनेता (जन्म: २९ सप्टेंबर १९४६ )**२००७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (जन्म: ३० जानेवारी १९१७ )**२००२: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७ )**१९९२: अमजद खान. –हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० )**१९८०: मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (जन्म: २६ आक्टोबर १९१९ )**१९७५: त्र्यं. र. ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.* *१८४४: जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ सप्टेंबर १७६६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागरूक पालक घडवतात चांगले नागरिक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीत आज निती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 1 कोटी 70 लाख शिधापत्रिका धारकांना या गौरी गणपतीत ‘आनंदाचा शिधा’ संच मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसच्या 10 नेत्यांच्या नावांची घोषणा:महाराष्ट्रासाठी 7 आणि मुंबईसाठी 3 नावे निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एस.टी. महामंडळालाही पावला विठूराया:आषाढी यात्रेत 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांचा प्रवास; 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *फ्रान्समध्ये बॉम्बचा अलर्ट, संपूर्ण विमानतळ रिकामे केले; ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी गोंधळावर गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रेणुका-राधानं पाया रचला, स्मृती अन् शफालीनं विजयाचा कळस चढवला, भारताचा बांगलादेशवर विजय, आशिया कपच्या फायनलमध्ये दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे ?*************************अमेरिकेच्या संरक्षण खात्यासाठी संशोधन करणाऱ्या काही वैज्ञानिकांना सतत संपर्कात राहणं आणि एकमेकांना आपण वाचलेल्या किंवा लिहिलेल्या लेखांची, अहवालांची साद्यंत माहिती सतत देणं आवश्यक वाटलं. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांनी त्यांना समाधान मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी आपापले संगणक एकमेकांना बिनतारी पद्धतीनं जोडून एक जाळं निर्माण केलं. याला त्यांनी 'अर्पानेट' असं नाव दिलं. त्याचा वापर त्यावेळी तरी मर्यादित होता; पण ती संकल्पना एका क्रांतीची उद्गाती ठरली. ही संकल्पनाच आजच्या इंटरनेटचा आत्मा आहे.त्यावेळी फक्त त्या संशोधकांचेच संगणक एकमेकांशी जोडले गेले होते. ते संशोधकही एकमेकांपासून फार दूर नव्हते; पण एकदा अशा प्रकारे बिनतारी पद्धतीने संगणक एकमेकांशी जोडता येतात हे समजल्यावर त्याचं एक जगड्व्याळ जाळं तयार व्हायला फार वेळ लागला नाही. ते जाळ बांधण्यासाठीच्या पायाभूत सुविधा प्रस्थापित करायला काय वेळ लागला असेल तेवढाच.त्या पायाभूत सुविधांमध्ये अनेक प्रणालींचा समावेश आहे. संगणक एकमेकांशी जोडता येण्यासाठी संगणकांमध्ये काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक घटकांचा अंतर्भाव करावा लागला. यांना इथरनेट कार्ड म्हणतात. पूर्वी ते स्वतंत्रपणे घेऊन संगणकाशी जोडावं लागत असे. आता ते संगणकातच अंतर्भुत केलेलं असतं. टेलिफोनद्वारे संगणकांची जोडणी करण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. आता तर राऊटर वापरून संपूर्ण घरात किंवा मोठ्या परिसरात इंटरनेट प्रमाण उपलब्ध होण्यात होईल अशी 'वायफाय' प्रणाली विकसित केली गेली आहे. संगणकातले संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उपग्रहांचा वापर होतो. आणि या सर्व प्रणाली व्यवस्थित आपापलं काम करतील यासाठी काही खास मंत्रावळी म्हणजेच सॉफ्टवेअरचीही निर्मिती केली गेली आहे. ही मंत्रावली वापराच्या दृष्टीने अधिकाधिक सुलभ व्हावी सर्व गरजांसाठी ती उपयोगी पडावी आणि संदेशवहन वेगवान व्हावं यासाठी नवनव्या सुधारित मंत्रावलीही सतत तयार होत असतात. त्याशिवाय जगभरची विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठीची व्यवस्थाही करावी लागते. पूर्वी अशा प्रकारची माहिती कागदावर लिहिली जाऊन त्याचं दप्तर कपाटांमध्ये साठवून ठेवलं जात असे. आता ते संगणकाद्वारे दृकश्राव्य फितींवर साठवून ठेवलं जातं. 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' या नव्या संकल्पनाद्वारे तर ते आभासी साठवणुकीद्वारे सुरक्षित ठेवलं जातं. यापैकी प्रत्येक सुविधा महत्त्वाची असली तरी ती संपूर्ण जाळ्याचा एक छोटासा भागच आहे. त्या त्या भागांपुरती मालकी निरनिराळ्या व्यक्ती, उद्योग, संस्था, सेवाभावी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्याकडे असली तरी संपूर्ण इंटरनेटवर कोणाचीही मालकी नाही. कोणी एक संस्था वा उद्योग इंटरनेटचा मालक नाही. त्यामुळे बलवान राष्ट्रांनाही इंटरनेट संपूर्णपणे बंद करण्यात यश मिळत नाही. इंटरनेट सुविधा आपल्याला पुरवणाऱ्या संस्थांवर बंदी घालून आपापल्या राज्यापुरती ती यंत्रणा बंद केली जाऊ शकते. इंटरनेटच्या वापरात सुसूत्रता आणणाऱ्या काही नियंत्रक संस्था आहेत. त्या आपल्याला निरनिराळे पत्ते किंवा ओळखपत्र मिळवून देण्याची व्यवस्था करतात; पण त्यांच्याकडेही संपूर्ण इंटरनेटची मालकी नाही. कोणीही मालक नसलेली आणि तरीही सुरळीत चाललेली 'इंटरनेट' ही एकमेव बहुपयोगी यंत्रणा आज अस्तित्वात आहे.*बाळ फोंडके यांचा 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सुर्यफुलाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?२) २०२४ या वर्षाचा कारगिल विजय दिवस कितवा आहे ?३) जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देश कितव्या स्थानावर आहे ?४) भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय कोठे आहे ?५) देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ? *उत्तरे :-* १) कर्नाटक २) २५ वा ३) ८२ व्या ४) मुंबई ५) हिंगोली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हणमंत पडवळ, साहित्यिक, लातूर👤 शशिकला बनकर, साहित्यिक, पुणे👤 स्वाती राधाकिशन बोदगमवार, सहशिक्षिका, नांदेड👤 उत्कर्ष मादसवार, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 श्रीकांत क्यादरवाड, धर्माबाद👤 👤 लक्ष्य घनश्याम पटले, गोंदिया *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु सिकलीगर कीजिये मनहिं मस्कला देइ ।मनका मैल छुडाइके चित दर्पण करि लेइ ॥ 29॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी म्हणतात की, आपण सत्य बोलूनही वाईट होत असतो. त्यापेक्षा एकदाचे न बोललेले केव्हाही बरे. म्हणून कधी, कधी दैनदिन जीवनात असेही काही अनुभव येतात की, आपण कितीही गोड बोलून सुद्धा त्याचा उलट फायदा घेतला जातो त्यावेळी मात्र आपले मन दुखावले जाते. म्हणून कोणासोबत बोलावं वाटत नसेल तर बोलू नये पण, कोणी आपुलकीच्या नात्याने दोन शब्द बोलत असतील तर त्यांचे मन दुखावेल असेही वागू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मूर्खपणा* "एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले.मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे.शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ‘ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.*तात्पर्य - मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/mnZHhjFKkAL1RDPs/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_कारगिल विजय दिवस_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••••••••••••🌸 *_ या वर्षातील २०८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्ब स्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.**२००५: मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.**१९९९: भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड**१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.**१९९८: १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान**१९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९६५: मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.**१८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.**१८४७: लायबेरिया स्वतंत्र झाला.**१७४५: इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.**१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.*🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸 ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९४: माहिका शर्मा -- भारतीय अभिनेत्री**१९८५: मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल**१९७२: जुगल हंसराज. -- भारतीय अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माता**१९७२: प्रा. मिलिंद गोविंदराव जोशी -- प्रसिद्ध लेखक, संपादक, वक्ते* *१९६७: संजय अप्पाराव घाटगे -- कवी, लेखक* *१९६७: शेषराव नथ्थुजी मडावी -- लेखक कवी* *१९५६: कल्पना अय्यर -- भारतीय कलाकार, गायिका**१९५५: असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष**१९५४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४ )**१९४८: सुमन शा. लाघवे -- लेखिका* *१९४३: डॉ.शंतनू चिंधडे -- नेत्रतज्ज्ञ, प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४३: डॉ. नीला चंदकांत पांढरे -- प्रसिद्ध लेखिका (मृत्यू: २६सप्टेंबर २०२१ )**१९४०: प्रा. डॉ. प्रकाश केजकर देशपांडे -- कादंबरीकार, कवी, समीक्षक, प्रभावी वक्ते* *१९३४: दत्तात्रय पंढरीनाथ जोशी -- संपादक* *१९१६: मधुसुदन शंकर कानेटकर -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील नामवंत गायक (मृत्यू: ३ फेब्रुवारी २००७ )**१९११: यशवंत दत्तात्रय भावे -- कवी (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८७ )**१९०२: यशवंत बाळकृष्ण मोकाशी-- कादंबरीकार (मृत्यू: १९८८ )**१८९४: वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू: ३० मार्च १९६९ )**१८९४: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३ )**१८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक.राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९ )**१८८९: बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता -- सर्वोदय विचाराचे प्रचारक, लेखक (मृत्यू: २१ जानेवारी १९८२ )**१८७५: कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू: ६ जून १९६१ )**१८७०: गोविंद सदाशिव आपटे -- ज्योतिर्गणितज्ज्ञ (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३६ )**१८६५: रजनीकांत सेन -- भारतीय कवी आणि संगीतकार (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१० )**१८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५० )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५: बिजॉय कृष्णा हांडिक -- भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १ डिसेंबर १९३४ )**२००९: भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६ )**१९८४: डॉ. गणेश सखाराम महाजनी-- गणिततज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु (जन्म: २७ नोव्हेंबर १८९८ )**१९७२: उमाकान्त केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे. -- प्राचीन भारताच्या इतिहासावरील संशोधक (जन्म: २८ आगस्ट १९०३ )**१९४४: प्रभाकर वासुदेव बापट -- वाड:मय इतिहासकार ( जन्म: १७ फेब्रुवारी १९०२ )**१८९१: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक,भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वयं शिस्त हाच सर्वोत्तम उपाय*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सातारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट, जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेतंर्गत आता दिव्यांगानाही अर्थसहाय मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना आता मिळणार पीक विम्याचा लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पालकमंत्री आणि प्रशासनाने सतर्क राहून मदत करावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक ; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी निधन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमध्ये मिळाला ‘ऑलिम्पिक ऑर्डर' बहुमान, पीएम मोदींनी केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 *वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ?* 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके व मित्र हे थोडकेच असावेत पण ते चांगले असावेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *मनिका बत्रा* ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?२) पर्यावरण सरंक्षणासाठी GEP index सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार कोण आहेत ?४) 'तिमिर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) MMS चा full form काय आहे ?*उत्तरे :-* १) टेबल टेनिस २) उत्तराखंड ३) वेंकट रामन अनंत नागेश्वरन ४) अंधार, काळोख ५) Multimedia Messaging Service*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष वाघमारे, तंत्रस्नेही शिक्षक, धर्माबाद👤 वैभव भोसले, नांदेड👤 रमेश मस्के, पत्रकार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राम नामके पटतरे देवे को कछु नाहिं।क्या ले गुरु संतोषिये हवस रही मनमाहिं ॥ 25 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात चांगली असो किंवा वाईट परिस्थिती नेहमीच येत असते. त्या आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा मोठ्या हिंमतीने सामना करायला शिकले पाहिजे. पण,जी परिस्थिती स्वतः चालून न येता मुद्दामहून आणलेली असते ती, जरा वेगळी असते. सोबतच ज्या मार्गाने ती पाठवली असते तिला तोच मार्ग चांगल्याने माहित असते म्हणून तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नये व मनावर घेऊ नये. दोन्ही परिस्थितीच्या वेळी, आपल्यात हिंमत ठेवून स्वतः वर विश्वास कायम असू द्यावा. कारण आपली हिंमत आणि विश्वास हेच खऱ्या अर्थाने आपले आधार असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/vxnkYRr1YzXLzVdt/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_ या वर्षातील २०७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी**१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.**१९९७: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.**१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड**१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त**१९९२: स्पेनि, मधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.**१९७८: जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.**१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••• *२००६: समृद्धी विजय बनकर -- कवयित्री**१९९२: सचिन जगन नांगरे -- लेखक,कवी**१९८६: प्रफुल्ल उदयन सावरकर -- पर्यावरणावर लेखन करणारे लेखक* *१९८३: संतोष ग्यानिदास गेडाम -- कथाकार, कवी* *१९७७: राम संपत -- भारतीय संगीतकार**१९७७: रागेश्वरी लूंबा-- भारतीय गायिका, अभिनेत्री**१९७१: कविता टिकाराम कठाणे -- मराठी, हिंदी कविता**१९६९: राजेश कुबडे उर्फ शेषराव अमृतराव कुबडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६४: जावेद पाशा कुरैशी -- प्रसिद्ध मराठी लेखक, फुले-शाहू-आम्बेडकरी विचारधारेचे कार्यकर्ते* *१९५८: महेन्द्र शामकांत देशपांडे -- पत्रकार, संपादक, लेखक आणि प्रकाशक* *१९५७: कविता चौधरी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माता आणि लेखिका (मृत्यू: १५ फेब्रुवारी २०२४ )**१९५४: दिनेश केसकर -- बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे एशिया-पॅसिफिक आणि भारतातील विक्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष* *१९५३: रत्नाकर तारदाळकर -- प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट व लघुपट निर्माते**१९४९: बकुळ पंडित -- मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री**१९४१: र. स. गि-हेपुंजे -- कवी (मृत्यू: २७ जानेवारी २०११ )**१९३७: विजय किरपेकर -- ज्येष्ठ तबलावादक, लेखक (मृत्यू: २१ एप्रिल २०२१ )**१९३४: दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललित निबंधकार (मृत्यू: २७ जानेवारी २०१६ )* *१९२९:सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: १३ आगस्ट२०१८ )**१९२२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – सुप्रसिद्ध कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२ )**१९१९: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – सुप्रसिद्ध गायक व संगीतकार तथा लेखक (मृत्यू: २९ जुलै २००२ )**१९१७: सदाशिव शंकर देसाई -- विख्यात साहित्यिक, पत्रकार आणि इतिहास संशोधक.(मृत्यू: ३१ मे १९९६ )**१८८७: नागेशशास्त्री गणेशशास्त्री नवरे -- कवी**१८७५: जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५ )**१८३२: करसनदास मुळजी -- भारतीय पत्रकार (मृत्यू: २८ ऑगस्ट १८७५ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: शिरीष कणेकर -- मराठी लेखक आणि रंगमंच कलाकार (जन्म: ६ जून १९४३ )**२०१५: रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई -- दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९ )* *२०१२: बी. आर. इशारा –चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक(जन्म: ७सप्टेंबर१९३४ )**१९७७: कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: २५ एप्रिल १९०० )**१८८०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छडी लागे ( ना ) छम छम ...*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी होणार शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; अंनिसचे समन्वयक श्याम मानव यांचा गंभीर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग जिवंत होणार, राज्य सरकार शिवरायांच्या पराक्रमाची महती सांगणारा पुतळा उभारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, मठाधिपतींकडून 5 व्या दिवशी ज्यूस प्यायले; आता निवडणुकांची रणनीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'माझी लाडकी बहीण योजना' - 3 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांत आजपासून तीन दिवस नोंदणी शिबिरांचे आयोजन; 5 लाख 13 हजार 130 महिलांची नोंदणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *युवराज सिंह 6 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणार; मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *तंबाखू / पान खाल्ल्याने दात खराब होतात का ?* 📙तंबाखू वा पान खाऊन रस्त्यावर व कोठेही थुंकणाऱ्या लोकांची कोणाला किळस येणार नाही ? दुसरे म्हणजे कार्यालयात वा शाळेत कोणी पानाचा तोबरा भरून तुम्हाला शिकवले व तुमच्याशी बोलू लागले तर बरे वाटणार नाही. तंबाखूची गोळी लोक तोंडात ठेवतात. तंबाखूतील निकोटीन हे द्रव्य लाळेत मिसळते व दाताभोवती जमा होते. तोंडात कायम तंबाखू असल्याने तोंडाची स्वच्छता नीट राखली जात नाही. या दोन्ही कारणांमुळे दात पिवळट होतात. कालांतराने किडतात. पान खाल्ल्याने जीभ रंगते, हे तुम्हाला माहीत आहेच. सुपारीमुळे दातांवरील आवरणाला चिरा पडतात, त्यातून दात किडण्याला सुरुवात होते. कधी कधी तर सुपारी खाताना दाताचा टवकाही उडतो ! अर्थात क्वचित पान खाल्ले व नंतर खळखळून गुळण्या भरल्या तर काही नुकसान होत नाही; पण वारंवार पान खाण्याने आणि त्याची सवय लागण्याने (विशेषत: तंबाखूयुक्त) दातांना पिवळट लालसर रंग येतो व दात कालांतराने किडतात.बसमध्ये सीटच्या बाजूला, जिन्याच्या भिंतीवर, ऑफिसच्या कोपऱ्यात अशा अनेक ठिकाणी हे तंबाखू वा पान खाणारे लोक इतस्तत: थुंकून ठेवतात. त्यामुळे तो सर्व भाग अस्वच्छ दिसतो. "थुंकू नये" अशा सूचनेच्या भोवतीही थुंकून ठेवलेले दिसते. या व्यसनांनी दात तर खराब होतातच, पण परिसरही अस्वच्छ होतो. त्यामुळे या व्यसनांपासून दूर राहिलेलेच बरे !डॉ. जगन्नाथ दीक्षित डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख आहेत. यामुळे सुखरूपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *रोजगार हमी योजनेचे जनक* कोणाला म्हटले जाते ?२) पॅरिस येथे कितव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ?३) महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना कोणत्या राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे ?४) 'तारू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बांग्लादेशच्या पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) वि. स. पागे २) तिसऱ्यांदा ( १९००, १९२४, २०२४ ) ३) मध्यप्रदेश ४) जहाज, गलबत ५) शेख हसीना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ कामीनवार, शिक्षक नेते, धर्माबाद👤 रामकुमार चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 श्यामकुमार चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक, केशव प्रा. शाळा, धर्माबाद👤 लक्ष्मण सुरकार, शिक्षक, भोकर👤 ज्ञानेश्वर पाटील, अंमळनेर👤 प्रा. संगीता भालसिंग, अहमदनगर👤 संगीता चाके-मोहनकर, रामटेक, नागपूर👤 गोविंद मानेमोड👤 साईनाथ भोरे👤 नरेंद्र राठोड👤 गजानन महाजन👤 ऋचाली चंदेल-बायस👤 लिंगन्ना पोतन्ना, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पहिले दाता शिष्य भये तन मन अरप्यो शीश ।पाछे दाता गुरु भये नाम दियो बखशीश ॥ 24 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः हसत राहणारे अनेकजण भेटतील पण, दु:खात पाठीमागे राहून साथ देणारे बोटावर मोजण्याएवढेच भेटतील. हसवणारे फार कमी प्रमाणात भेटतील पण, रडवणारे मात्र जागोजागी भेटतील. म्हणून याची पूर्णपणे जाणीव ठेवून कोणाकडून ही कशाचीही अपेक्षा ठेवू नये. ते आपले काम करत असतात आपण आपले काम करत रहावे. फरक एवढेच की, प्रत्येकांची काम करण्याची पद्धत जरा वेगवेगळी असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य -आपण दुसर्याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जुलै 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.yourquote.in/naa-saa-dlgh/quotes/paauus-aalaa-paauus-aalaa-duhkhii-cehrryaavr-hsuu-aannilaa-b71snn••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••❇️ *_ भारतीय आयकर दिवस _* ❇️•••••••••••••••••••••••••••••••••❇️ *_ या वर्षातील २०६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••❇️ *_महत्त्वाच्या घटना:_* ❇️•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.**२०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.**१९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान**१९९७: ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला.**१९६९: सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.**१९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा - दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.**१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.**१८२३: चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.*❇️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ❇️••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: पंकज अडवाणी-- भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू* *१९८१: प्रा. राजकुमार रघुनाथ मुसने -- लेखक**१९८०: सुधाकर रामधन राठोड-- कवी, लेखक**१९७६: सप्तर्षी अ. माळी-- लेखक* *१९७४: सुभाष खुटवड -- पत्रकार ,लेखक, वक्ते**१९७१: चंद्रशेखर भुयार -- गझलकार**१९६९: जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका**१९६८: किरण सूर्यकांत शिंदे -- कवी**१९६४: विष्णू सूर्या वाघ -- कवी लेखक तथा गोवा विधानसभेचे माजी सभापती* *१९५३: सुचित्रा मधुकर कातरकर-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४९: माधव अनंत विद्वांस -- प्रसिद्ध लेखक* *१९४७:जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज**१९४५: अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन**१९३७: मनोज कुमार( हरिकृष्ण गोस्वामी )-- भारतीय अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,गीतकार आणि संपादक**१९३२: प्रा.मधुकर तोरडमल -- मराठी अभिनेते, लेखक (मृत्यू: २ जुलै २०१७ )**१९२९: बाळ जगन्नाथ पंडित-- क्रिकेट समालोचक, लेखक (मृत्यू: १७ सप्टेंबर २०१५ )**१९२८: केशुभाई पटेल – गुजरातचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: २९ ऑक्टोबर, २०२० )**१९१७: दि. य. देशपांडे -- महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ तत्त्वज्ञ व प्राध्यापक (मृत्यू: ३१ डिसेंबर २००५ )**१९११: अमल ज्योती तथा ’पन्नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (मृत्यू: २० एप्रिल १९६०)**१९११: गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्ति संग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी (मृत्यू: २१ नोव्हेंबर २००२ )**१९०६: चंद्र मोहन -- भारतीय अभिनेते (मृत्यू: २ एप्रिल १९४९ )**१८९९: राजाराम नारायण पराडकर -- ज्येष्ठ गायक (मृत्यू: ४ जून १९७५ )*❇️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ❇️••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: सतीश काळसेकर-- लोकप्रिय कवी, संपादक, अनुवादक (जन्म: १२ फेब्रुवारी १९४३ )* *२०२०: अॅड भास्करराव एकनाथराव आव्हाड -- प्रसिद्ध कवी लेखक तथा ज्येष्ठ विधिज्ञ**२०२०: अमला शंकर -- भारतीय नृत्यांगना (जन्म: २७ जून १९१९ )**२०१७: डॉ. बद्रीनारायण रामुलाल बारवाले -- भारतीय संशोधक, उद्योजक (जन्म: २७ ऑगस्ट १९३०)**२०१४: सुशीला राणी पटेल -- भारतीय शास्त्रीय गायिका, अभिनेत्री, डॉक्टर आणि पत्रकार (जन्म: २० ऑक्टोबर १९१८)**२००७: हरिश्चंद्र भगवंत लचके -- प्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: १८ फेब्रुवारी १९२१)**१९८०: अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म:३ सप्टेंबर १९२७ )**१९८०: पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५ )**१९७४: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१ )**११२९: शिराकावा – जपानी सम्राट (जन्म: ७ जुलै १०५३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कविता - पाऊस आला*पाऊस आला पाऊस आलादुःखी चेहऱ्यावर हसू आणिला..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रोजगार देणाऱ्या संस्थांना सरकारी मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Income Tax च्या स्लॅबमध्ये मोठा बदल; मोदी सरकाकडून दोन मोठ्या घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंचगंगा धोक्याच्या पातळीवर, ३५ रस्ते बंद, अनेक गावातून स्थलांतर सुरू; प्रशासनाकडून निवारा केंद्रांची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नीट-यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र निकाल पुन्हा जाहीर होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'लाडकी बहीण योजने'साठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे 6 बदल; विवाहित महिलांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'वन्समोअरला मराठीत पर्यायी शब्द नाही, एखादा इंग्रजीत यमक जुळवावा लागतो'; मराठीचे वाभाडे काढणाऱ्या कवितेवर शिक्षणमंत्र्यांचं अजब स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाला हरवण्यासाठी श्रीलंकेने आर्मी मेजरला दिली टीममध्ये जागा, चारिथ असालंका या खेळाडूला बनवले कर्णधार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेखणी (पेन)* 📙लेखणीचा वापर नेमका कधी सुरू झाला, हे सांगता येणार नाही; कारण लेखणीचे स्वरूप सतत बदलत गेले आहे. भूर्जपत्रे, धातू यांवर जशी अक्षरे कोरलेली आढळतात, तशीच दगडातही कोरलेली आढळतात. पण त्या काळातील लेखणीचे स्वरूप सध्या ज्ञात नाही. ज्या अर्थी या अन्य स्वरूपात अक्षरे व्यक्त केली जातात होती, त्या अर्थी लेखणीचाही वापर असणारच.ज्ञात इतिहासात दौतीची शाई व बोरू हेच लेखणीचे सुरुवातीचे स्वरूप असावे. त्यानंतरचा वापर सुरू झाला तो ग्राफाइटच्या शिसपेन्सिलीचा. याच वेळी फळ्यावरचा खडू व पाटीवरची पेन्सिल यांचाही वापर सुरू होत गेला. रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबर शाईचे प्रकार बदलत गेले. त्यामध्ये अधिक सुटसुटीतपणा येत गेला. एकोणिसाव्या शतकात दौत-टाकांची जागा ऐटदार फाऊंटनपेनने घेतली. त्यातून निफावाटे गरजेप्रमाणे शाई बाहेर येत असल्याने त्याला फाऊंटनपेन असे नामाभिधानही प्राप्त झाले. प्लास्टिकच्या निर्मितीनंतर त्याचे वजन, आकार, सुबकपणा यात खूपच बदल होत गेले. आजचे अत्याधुनिक फाऊंटनपेन अत्यंत हलके, निमुळते असते. शाई भरण्यासाठी ते उघडावेसुद्धा लागत नाही, तर एखाद्या निर्वात पंपाचा उपयोग करावा, त्या पद्धतीने त्याच्या पोटातील रबरी नळीत शाई खेचून भरण्याची व्यवस्था असते.पेनच्या आकारात बदल होत होते, तसे त्याच्या निफातही बदल होत गेले. नीफ झिजू नये व त्याच्या टोकाचा आकार कायम राहावा, यासाठी विविध धातू आजवर वापरले गेले आहेत. पोलाद, टंगस्टन, प्लॅटिनम या धातूंचा मुख्य वापर व शोभेसाठी सोने वा चांदीची त्याला दिलेली झिलई हे त्यांचे स्वरूप राहिले आहे.गुरुत्वाकर्षणाने खाली उतरणारी शाई व हवेचा पेनमधील व बाह्य वातावरणातील समप्रमाणात दिला जाणारा दाब या तत्त्वावरच पेन काम करते. यामुळेच पेनने लिहिताना नेहमीच कागद खाली व पेन वर या अवस्थेतच लिहावे लागते. फार कशाला भिंतीवर कागद ठेवून त्यावर लिहू लागल्यास काही वेळातच शाई येणे बंद होते.१९५० सालच्या दशकात छापण्याच्या घट्ट शाईचा वापर करून बॉलपेन या प्रकाराची निर्मिती सुरू झाली.खोबणीत बसवलेल्या गोलाकार अत्यंत छोट्या बाॅलच्या कडेने शाई झिरपते, हेच याचे निफ म्हणा ना. पण यामुळे अक्षराचे वळण व त्यातील वैशिष्ट्ये मात्र कमी होतात. आज घटकेला बॉलपेन ही एक अत्यंत लोकप्रिय गोष्ट आहे.बॉलपेनचा शोध लागल्यापासून त्याच्या रिफिलमध्ये वापरली जाणारी शाई, तिचे रासायनिक घटक व टोकाशी वापरले जाणारे गोलाकार बाॅल यांतही खूप बदल होत गेले आहेत. जितक्या लहान आकाराचा बाॅल, तेवढी अक्षराची रुंदी कमीत कमी होत जाते. रेषेची रुंदी कमी झाल्याने पूर्वीचे बॉलपेन व सध्याचे बॉलपेन यांच्या ढोबळ स्वरूपात खूपच बदल झाला आहे.लेखणीचा वापर करणे हे नीट जमण्यासाठी सहा ते सात वर्षांचे वय आवश्यक असते, असे बालतज्ज्ञ म्हणतात. लेखणीचा वापर करता येणे हे मानवी मेंदूच्या उत्क्रांतीचे एक अत्यंत प्रगत लक्षण आहे, असेही मानले जाते. लेखणी ही तलवारीपेक्षाही श्रेष्ठ आहे, असे तलवार वापरणारेही मान्य करतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिश्रमातून आनंद निर्माण होत असतो ; क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत कामात राहिल्याने मनुष्याचे जीवन सुखी बनते. ----- रस्किन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात पहिले वन सर्वेक्षण केव्हा झाले ?२) विनायक नरहर भावे यांना 'विनोबा' हे नाव कोणी दिले ?३) सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला काय म्हणतात ?४) 'झाड' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो ? *उत्तरे :-* १) सन १९८७ २) महात्मा गांधी ३) पेशी ४) वृक्ष, तरू, पादप, द्रुम ५) सरडा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद तुळशीराम कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 विष्णू रामोड, धर्माबाद👤 राजेश पाटील मनुरकर, शिवव्याख्याते👤 संतोष मुलकोड, येवती, धर्माबाद👤 संतोष लवांडे👤 सचिन टेकाळे, कुपटी, माहूर👤 चिं. मनीत माधवराव हिमगिरे, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बूडा था पर ऊबरा गुरुकी लहरि चमक ।वेरा देखा झांझरा उतरि भया फरक॥ 23॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे गोड पदार्थ बनविण्यासाठी कितीही साखर, गुळ घातले तरी त्यात थोडेतरी मीठ घालावे लागते. कारण त्या मीठाशिवाय गोड पदार्थाला चव येत नाही. तसंच आपले कितीही गोड बोलणे असले तरी त्यात थोडेतरी परखडपणे बोलण्याची सवय असली पाहिजे. हे दोन्ही गुण आपल्यात असल्याने कोणालाही घाबरण्याची वेळ आपल्यावर येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोठेपणाचा गर्व*एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.*तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/t7SH2Cenvt1nYvnb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌼 *_वनसंवर्धन दिन_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील २०५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: विस्डेनतर्फे कपिल देव यांची विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवडून* *१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.**१९८६ :जैवअभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.**१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ - २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.**१९८२: 'इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.**१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.**१९२७: मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३: कृष्णा तात्याराव ठाकरे -- लेखक दिग्दर्शक**१९९०: युझवेंद्र चहल -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१०९०: अविनाश अरुणा जगदेव -- लेखक* *१९८३: भरत शेषराव कांबळे -- कवी**१९८०: रमजान मुल्ला -- कवी ,लेखक* *१९७६: ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू**१९७३: हिमेश रेशमिया -- भारतीय संगीतकार, गायक व चित्रपट अभिनेता**१९७०: अलका संजय कुलकर्णी -- कवयित्री, लेखिका* *१९६३: प्रा. डॉ. शोभा इंद्रभान रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९६१: मिलिंद गुणाजी --भारतीय अभिनेता, मॉडेल, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता,लेखक**१९५६: लक्ष्मण मारुती गायकवाड -- प्रसिद्ध मराठी कादंबरीकार* *१९५५: मो. ज. मुठाळ --सुप्रसिद्ध कवी, लेखक**१९५५: रंजना देशमुख -- मराठी अभिनेत्री (मृत्यू: ३ मार्च २००० )**१९५३: ग्रॅहम गूच -- माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू**१९४८: डॉ. जया द्वादशीवार -- स्त्रीवादी साहित्याच्या अभ्यासक, संवेदनशील लेखिका, वक्त्या ( मृत्यू: २० मार्च २०१७ )**१९४७: डॉ. गिरीश गांधी -- ज्येष्ठ विचारवंत आणि वनराई प्रतिष्ठानचे अध्यक्ष,पूर्व विधायक**१९४७: डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ**१९४२: प्रा. डॉ. विवेक गोखले -- जेष्ठ विचारवंत,लेखक* *१९३८: हरिहर शाहुदेव ठोसर -- विख्यात भारतीय पुराभिलेखविद व इतिहासकार (मृत्यू: २२ मे २००५ )**१९३७: विजया चिटणीस- मराठी भाषातज्ज्ञ, अध्यापनतज्ज्ञ,लेखिका (मृत्यू: २४ जुलै १९८४ )**१९३३: सुमा चिटणीस -- एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या माजी कुलगुरू तथा लेखिका**१९३२: यशवंत कृष्णाजी रांजणकर-- मराठीतील पत्रकार,कादंबरीकार,नाटककार, मराठी चित्रपट कथा-पटकथा-लेखक, अनुवादक (मृत्यू: १५ जून २०२० )**१९२७: धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका(मृत्यू: १ जून, २०१४ )**१९०६: चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१ )**१९०३: चिंतामण यशवंत मराठे -- कथालेखक नाटककार (मृत्यू: ४ जुलै १९७९ )**१८८८: पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी -- ज्ञानेश्वर वाड:मयाचे भाष्यकार, लेखक, अनुवादक (मृत्यू: १३ जानेवारी १९५७ )**१८८६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९७६ )**१८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२ )**१८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी,भगव्दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० )*🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••• *२०१६: सईद हैदर "एस. एच." रझा -- भारतीय चित्रकार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२ )**२०१२: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४ )**२००४: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२ )**१९९९: दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त एक रचना*... लोकमान्य टिळक ...*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, खा. वर्षा गायकवाड यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात शिक्षण विभागाची मोठी कारवाई, 29 बोगस शाळा केल्या बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना पोलिसांनी केली अटक; दुबई विमानतळावरच घेतले ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा धुमधडाका:जनजीवन विस्कळीत, कोयना धरणाच्या पाणी पातळीत 7 टीएमसीने वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचे 7 खेळाडू करणार श्रीलंकेत पदार्पण, भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 27 जुलैपासून सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 📙विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••द्वेष व कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. ---- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) झाडाची वय हे झाडाच्या तनावर असलेल्या रिंगाच्या संख्येच्या आधारावर काढले जाते या पद्धतीला काय म्हणतात ?२) केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत ?३) QR CODE चा full form काय आहे ?४) 'तरुण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'सेमिनरी हिल्स' हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) डेंड्रोक्रोनोलॉजी २) धर्मेंद्र प्रधान ३) Quick response Code ४) जवान, युवक ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उदयकुमार शिल्लारे, तंत्रस्नेही शिक्षाक, धर्माबाद👤 अलका कुलकर्णी, साहित्यिक👤 जितेंद्र पाटील मनूरकर, धर्माबाद👤 आनंदराव पाटील, तेलंगणा ओबीसी व्हॉईस प्रेसिडेंट, म्हैसा👤 विकास पाटील👤 शंकर बोईनवाड, येवती👤 लक्ष्मण मलगिरे👤 वैभव पाटील👤 प्रदीप दळवी👤 संतोष सुवर्णकार, धानोरा खु. धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कहना था सो कह चला अब कछु कहा न जाय।एक आया दूजा गया दरिया लहर समाय ॥ 22 ॥।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हत्तीसारखा बलाढ्य प्राणी जेव्हा, रस्त्यानी शांतपणे जात असतो तरी त्याच्यावर कुत्रे भुंकत असतात. तरीही हत्ती चालणे बंद करत नाही आणि कोणाकडे लक्षही देत नाही. भलेही तो शरीराने बलाढ्य असेल तरी त्यापेक्षा त्याच्यात खूप मोठे गुण आहे म्हणून तो, त्या गुणांची कदर करुन आपल्या मार्गाने जात असतो. आपण सुद्धा त्या बलाढ्य असलेल्या हत्ती प्राण्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य :- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dFSYQQS3fSZDnWJR/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_ या वर्षातील २०४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.**१९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.**१९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.**१९४२: वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.**१९३३: विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.**१९३१: फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.**१९०८: ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा*💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: निपुण अविनाश धर्माधिकारी-- मराठी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक* *१९८४: नामदेव कोळी -- प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक**१९७५: गंगाधर गायकवाड-- लेखक**१९७३: मकरंद मधुकर अनासपुरे -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता**१९७०: देवेंद्र गंगाधर फडणवीस -- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री* *१९६९: संजय सुक्रीतदास बर्वे -- प्रसिद्ध लेखक* *१९६६: डॉ.नानासाहेब सूयवंशी -- लेखक, संपादक* *१९६६: विद्या शशिशेखर शिंदे -- लेखिका* *१९६६: सिमंतिनी खेर -- लेखिका**१९६५: सारंग शंतनू दर्शने -- वरिष्ठ सहसंपादक म.टा.मुंबई,लेखक,अनुवादक**१९६२: नानाभाऊ नत्थु माळी -- कवी, लेखक* *१९५९: अजित अनंतराव पवार -- महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री**१९५५: मजहर खान-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक (मृत्यू : १६ सप्टेंबर १९९८)**१९५५: प्रवीण कुलकर्णी (पी.डी)-- रंगकर्मी, नाटय दिग्दर्शक, कवी, लेखक**१९५०: प्रल्हाद आवळसकर -- प्रसिद्ध लेखक* *१९३७: वसंत रांजणे– मध्यमगती गोलंदाज (मृत्यू: २२ डिसेंबर २०११ )**१९३१: शकुंतला विष्णू गोगटे -- कथा व कादंबरी लेखिका (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९९१ )**१९३०: डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर -- बीजगणितीय भूमितीतील योगदानासाठी ओळखले जाणारे भारतीय अमेरिकन गणितज्ञ (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२ )**१९२५: गोविंद श्रीपाद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक ( मृत्यू: २१ मार्च २०१७ )**१९२३: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – सुप्रसिद्ध पार्श्वगायक.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७६ )**१९१८: गोपाळराव बळवंतराव कांबळे (जी. कांबळे) -- नावाजलेले मराठी चित्रकार (मृत्यू : २१ जुलै २००२ )**१९०८: भालचंद्र मोरेश्वर गोरे-- लेखक, अनुवादक* *१८९८: पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५ )*💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म: २आक्टोबर१९४६ )* *२०१८: सुधा नरवणे-- आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका(जन्म: १४ सप्टेंबर १९३० )**२०१५: यशवंत कानिटकर -- मराठी भाषातज्ज्ञ, मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक(जन्म:१२ डिसेंबर १९२१ )* *२०११: डॉ. सुरेशचंद्र गंगाराम नाडकर्णी-- मराठी लेखक, गझलचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ (जन्म: १९२९)**१९९५: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर१९०४ )**१९८४: गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक (जन्म: १९०९ )**१९१८: इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रासंगिक लेख*माझे गुरू : एक आठवण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी बालसाहित्यात विशेष प्रयोग झाले नाहीत, माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांचे परखड मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे थैमान ! नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेशातील सुप्रीम कोर्टाने बहुतांश नोकऱ्यातील आरक्षण रद्द करण्याचे दिले आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधानसभा एकत्र, पण महापालिका स्वतंत्र लढणार; अजित पवारांची पुण्यातून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज आज बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI देणार 8.5 कोटींची मदत - जय शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला दुर्गंधी का येते ? 📒ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत आणि शिक्षण म्हणजे मानवाच्या चैतन्याचा अविष्कार. ----दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यभरात वाचन चळवळीसाठी 'महावाचन उत्सवा'चे ब्रँड ॲम्बेसेडर कोणाला बनवणार आहेत ?२) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?३) छत्रपती संभाजी महाराजांनी धार्मिक धोरणात कोणत्या संताच्या मुलाला वर्षासन दिले होते ?४) 'तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) PIN चा full form काय आहे ? *उत्तरे :-* १) अमिताभ बच्चन २) शिवराज सिंह चौहान ३) संत तुकाराम ( महादोबा या मुलाला ) ४) कासार, सारस, तटाक, तळे ५) Personal Identification Number *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुमंत भांगे, IAS ऑफिसर, मुंबई👤 संजय कदम, पत्रकार, देशोन्नती धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 प्रल्हाद तुमेदवार, शिक्षक, नांदेड👤 महेश व्ही. जाधव, बिजापूर, तेलंगणा👤 अनुराधा हवेलीकर-पदमे👤 श्रीनिवास वाघमारे👤 संतोषकुमार दुरगुडे👤 संतोष जाधव👤 अमोल बबनराव गायकवाड👤 धनराज वाघ👤 विश्वनाथ चित्रलवार👤 दामोदर साळुंके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चकवी बिछुड़ी रैन की आन मिली प्रभात।जो जन बिछुड़े नाम से दिवस मिले न रात ॥ 21 ॥अर्थ – जिस प्रकार चकवी रात में बिछड़ जाने के पश्चात , सुबह आ कर मिल जाती है , लेकिन जो लोग नाम से बिछड़ जाते है ( उस सार नाम ) से उन्हें फिर कोई नहीं बचा सकता और उसे काल खा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणासोबत ही का असेना बोलते वेळी जेव्हा आपण आदराने बोलत असतो. त्यावेळी समोरच्या व्यक्तीला सुद्धा आनंद होत असतो. सोबतच तो आनंद बघून आपल्याला विशेष समाधान मिळत असते. तो मिळालेला आनंद व समाधान त्यावेळी जगावेगळा असतो. पण एखाद्या वेळी नको त्या शब्दात बोलून कोणाचा अनादर केल्याने आपल्यात असलेले एखादे चांगले गुण मात्र नष्ट होण्याच्या मार्गांवर असते. म्हणून कोणासोबतही बोलताना समोरच्या व्यक्तीला दु:ख होणार नाही याची काळजी घ्यावी.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला! *तात्पर्य*शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/YeExVwGXbfmXQdyb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔶 *_आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन_* 🔶 ••••••••••••••••••••••••••••••••••• 🔶 *_ या वर्षातील २०२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔶 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔶•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९७६: मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.**१९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.**१९६९: अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.**१९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.**१९५२: फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.**१९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.**१९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला.**१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.**१९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.**१९०३: फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.**१८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.**१८२८: 'मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.*🔶 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔶••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: दिनेश राठोड ( जिजाईसुत) -- कवी, लेखक**१९८१: प्रा.इंद्रकला प्रीतमलाल बोपचे -- कवयित्री,लेखिका**१९८०: ग्रेसी सिंग -- भारतीय अभिनेत्री* *१९७९: रत्नकुमार निंबाजी गोरे -- कवी* *१९७७: मनोज सिंधुताई सदाशिव बोबडे -- कवी**१९७६: साधना योगेश जोशी -- लेखिका**१९६८: रंगराव बन्ने -- कवी, लेखक**१९६७: मानसी किरण देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१९५३: प्रा.श्रीरंग चोखोबा तलवारे -- लेखक**१९५२: कपूर लहूदास वासनिक --- कवी**१९५२: प्रा.गणेश निवृत्ती आवटे -- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९५०: नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक**१९५०: रंगनाथ गबाजी पठारे -- प्रसिद्ध कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक**१९४८: पंडित सुरेश तळवलकर --- हिंदुस्तानी संगीतातील मराठी तबलावादक**१९४७: प्रा.मुरलीधर महादेव सायनेकर-- लेखक* *१९२९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै १९९९ )**१९२३: विठ्ठल गोपाळ खोबरेकर -- भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार (मृत्यू: २००७ )**१९२१: पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.(मृत्यू: ३१ मे १९९४ )**१९१९: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८ )**१९१९: सुरेंद्र शिवदास बारलिंगे --कथाकार, कादंबरीकार, तत्त्वचिंतक, ललितलेखक (मृत्यू: १९ डिसेंबर १९९७ )**१८३६: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ )**१८२५: विष्णू भिकाजी गोखले( विष्णूबुवा ) -- महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आणि विचारवंत लेखक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १८७१)**१८२२: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४ )*🔶 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔶 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: निर्मला बळवंत पुरंदरे -- भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ज्ञ (जन्म: ५ जानेवारी १९३३)**१९९५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५ )**१९७३: ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४० )**१९७२: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३० )**१९६५: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१० )**१९५१: अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: फेब्रुवारी १८८२ )**१९४३: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२ )**१९३७: गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रासंगिक लेख*" ... आई माझा गुरू ..."*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरटीईतून खाजगी शाळा वगळण्याबाबतचा राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाने केला रद्द !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाडामुळे जगभरातल्या अनेक सेवा विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार- नाना पटोले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विविध योजनांचा प्रचार प्रसार स्थानिक उद्योजकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं - आतिश कुमार सिंग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *१२ न्यायाधीशांची देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पूजा खेडकरची उलटी गिनती सुरु, UPSC गुन्हा दाखल करणार, पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही धाडली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो ; पण शिक्षणाने मनुष्य पक्का होतो. ---- हर्बर्ट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'द वॉल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?२) OTP चा full form काय आहे ?३) छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण किती युद्धे लढली होती ?४) 'ढग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) फिफा क्रमवारीत कोणता देश पहिल्या स्थानावर कायम आहे ?*उत्तरे :-* १) राहूल द्रविड २) One Time Password ३) १२० युद्धे ४) मेघ, जलद, पयोद ५) अर्जेंटिना ( भारत १२४ व्या स्थानावर )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकट चिलवरवार, शिक्षक नेते, नांदेड👤 श्रीराम भंडारे👤 दत्तात्रय तोटावाड, सामाजिक कार्यकर्ते, धानोरा खु.👤 लक्ष्मण दावणकर, केंद्रप्रमुख, लातूर👤 साईनाथ नारायण माळगे, मा. गटसमन्वयक, धर्माबाद👤 गंगाधर पालकृतवार, शिक्षक, धर्माबाद👤 दिनेश राठोड👤 करुणा खंडेलोटे, सामाजिक कार्यकर्ती, नांदेड👤 साईनाथ ईबीतवार, येवती👤 बजरंग आर्गेलू, पांगरी👤 राहुल लोखंडे, पांगरी👤 सचिन राजेंद्र पिसाळ, शिक्षक, बीड👤 मोहन कुलकर्णी, शिक्षक, हदगाव👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगत जनायो जिन्ही सकल सो गुरु प्रगटे आय ।जिन गुरु आँखिन देखियाँ सो गुरु दिया लखाय ॥ 15॥अर्थ – संसार ने जिस परमात्मा का बात करता है , वो मेरे गुरु स्वरुप में प्रगट होकर उस सत्यपुरुष का दर्शन करा दिये।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच दरवाजे बंद नसतात. असले तरी समोर एखादा तरी दरवाजा खुला असतो. ज्या दरवाजातून ये,जा करणारे असतात त्यांना तो दरवाजा चांगल्याने ओळखत असतो. म्हणूनच दरवाजाला महत्व आहे. म्हणून आपण सुद्धा त्या निर्जीव असलेल्या दरवाजाकडून शिकण्याचा प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!*तात्पर्य :- शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/qBfvPj2V9rSFjXVw/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९३: ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९२: ऊर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर**१९८०: सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.**१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.**१९५२: फिनलंडमधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई**१९३५: जगात ’पार्किंग मीटर’चा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: कॉन्जेनिगे दिलहारा फर्नडो -- श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९७२: अजय आर्थर देसाई -- कवी* *१९६३: विजया भालचंद्र गोरे -- कवयित्री तथा निवृत्त न्यायाधीश**१९६३: सुशांत रे -- हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील अभिनेता (मृत्यू: ८ मार्च २००४ )**१९६१: हर्षा भोगले -- भारतीय क्रिकेट समालोचक आणि पत्रकार* *१९६१: स्मिता सतीश दोशी -- कवयित्री, लेखिका**१९६०: देविदास भावराव फुलारी -- प्रसिद्ध कवी , लेखक* *१९५९: शुभांगी कुलकर्णी -- भारतीय माजी क्रिकेटपटू* *१९५५: रॉजर बिन्नी – क्रिकेटपटू**१९५४: विष्णू श्रावण भेंडारकर -- कवी, लेखक* *१९५४: स्नेहलता विलास जोशी -- लेखिका**१९४६: इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू**१९३८: डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणा संदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.**१९३५: प्रा. सु. ग. शेवडे --भारताचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते,प्रवचनकार**१९३५: रमेश मुधोळकर -- बालसाहित्यकार व चित्रकार (मृत्यू: १३ मार्च २०१६ )* *१९३१: प्रेमानंद वासुदेव मडकईकर -- लेखक* *१९३१: मधुकर सुदामा पाटील. -- समीक्षक**१९३०: प्रा.रुपराव पांडुरंग पाजणकर-- समीक्षक, संपादक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९९१ )* *१९२८: अन्वर फर्रुखाबादी -- कव्वालीचे गीतकार(मृत्यू: २९ जून २०११)**१९०८: गोपाळ कृष्ण विनायक चिरमुले-- लेखक* *१९०२: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४ )**१८९६: ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (मृत्यू: ६ जानेवारी १९८१ )**१८२७: मंगल पांडे – क्रांतिकारक (मृत्यू: ८ एप्रिल १८५७ )*🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: रजत मुखर्जी--भारतीयचित्रपट दिग्दर्शक**२०१८: गोपालदास नीरज -- गीतकार, कवी व हिंदी लेखक (जन्म : ४ जानेवारी १९२५ )**२०१७: उमा भेंडे -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९४५)**१९९३: गिरीलाल जैन -- भारतीय पत्रकार(जन्म : १९२४ )**१९६८: प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (जन्म: २९ जून १९०८ )**१९६५: सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ मार्च १८७५ )**१८८२: फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१ )**१३०९: संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सेमी इंग्रजीची समस्या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कलाकाराचे सांगितीक क्षेत्रातील योगदान हे चिरकाल टिकते - संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी 1958 अर्ज, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती, तरुणांना रोजगार सक्षम बनवण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात शेतकरी संघटनाच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक, राज्यातील शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याच्या पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा - पर्यटनमंत्री गिरीश महाजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने दिला रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिवसेना ठाकरे गटाला आता देणगी घेता येणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड, सुर्यकुमार यादव T20 संघाचा कर्णधार, संघामध्ये मराठमोळ्या श्रेयस अय्यरचं कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *घोळाणा फुटल्यास काय करावे ?* 📕उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तस्त्रावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.नाकातून रक्त येणे वा घोळाणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या सोबती असलेला अंतराळवीर कोण ?२) उडीसातील १२ व्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे, भांडाराचे दरवाजे किती वर्षानंतर उघडण्यात आले ?३) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' जाहीर केली आहे ?४) 'डोळे' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) केंद्र सरकारने कोणता दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे ? *उत्तरे :-* १) बझ ऑल्ड्रिन २) ४६ वर्षे ३) महाराष्ट्र ४) चक्षू, अक्ष, नयन, नेत्र, लोचन ५) २५ जून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गजानन शिराळे👤 श्रीनिवास मुरके, नांदेड👤 माधव रेड्डी👤 मनोज बडे, स्वयं उद्योगी, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु को कीजे बंदगी कोटि-कोटि प्रणाम ।किट ना जाने भृंग को वह ( गुरु ) कर लीजिए आप सामान ॥ 14॥अर्थ – गुरु को बंदगी कीजिये करोड़ो बार प्रणाम कीजिये , क्यूंकि गुरू ही ऐसे दानी दाता है जो शब्द रूपी ज्ञान से अपने शिष्य को अपने जैसे बना लेते है , उसी प्रकार जैसे एक कीट को भृंगी अपने शब्द से अपने जैसा बना देता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणुसकी मध्ये खरी श्रेष्ठता असेल म्हणूनच होऊन गेलेल्या थोर महाविभूंतीनी. माणुसकीचे महत्व जाणून तिला जास्त महत्व दिले आहे. म्हणून आपणही त्यांच्या विचारांना आत्मसात करुन जगण्याचा प्रयत्न करावा. व माणुसकी धर्माची जाणीव ठेवून तिचे महत्व इतरांना ही सांगावे आजच्या घडिला अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाघा प्रमाणे स्वतःला ओळखा*स्वामी विवेकानंद आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत असलेली ही गोष्ट. एकदा एका जंगला मध्ये एक वाघच पिल्लू वाघिणी पासून हरवले आणि मेंढ्यांच्या कळपात जावून मिसळले. हळू हळू ते पिल्लू त्या कळपातच वाढू लागले आणि तिथेच मोठे झाले. ते पिलू मेंढ्या प्रमाणेच गवत खायचे, बे बे करायचे, आणि भीती वाटली कि पळून जायचे. त्याच्या सुदैवाने एक दिवस त्याची दुसऱ्या वाघाशी भेट झाली तेव्हा त्याला कळले की तो एक शक्तिशाली वाघ आहे. आणि सर्व त्याला भितात मग मीच का असा आहे, तेव्हा पासून त्याचे बे बे करणे, गवत खाणे, भीतीने पळून जाणे बंद झाले.*तात्पर्य* - स्वतःला ओळखा, प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड शक्ती आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://shopizen.app.link/rALIpo8ljLb••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_ या वर्षातील २०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६: ’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.**१९८०: भारताने ’एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.**१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.**१९६८: सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना**१९२५: अॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.**१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना**१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: स्मृती श्रीनिवास मानधना-- भारतातील प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू**१९८९: भूमी पेडणेकर -- भारतीय अभिनेत्री**१९८२: प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती**१९७९: माला राजेश पारधी -- कवयित्री**१९७९: राकेश काळू वानखेडे -- लेखक, कवी* *१९७५: डाॅ.कमलाकर कोंडिबा राऊत -- लेखक* *१९७२:सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४ )**१९७१: सुखविंदर सिंग -- प्रसिद्ध भारतीय गायक**१९७०: संजय जाधव -- भारतीय सिनेमॅटोग्राफर आणि हिंदी आणि मराठी चित्रपट दिग्दर्शक**१९६९: अर्चना मिरजकर -- कथा,कादंबरी मराठी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित, अनेक ग्रंथांचे भाषांतर* *१९६६: प्रा.शिवाजी वरुडे --- वात्रटिकाकार, लेखक**१९६०: विश्वास नेरुरकर -- संगीत संशोधक व अभ्यासक* *१९६०: अनिल जाधव --- गझलकार**१९५८: रेणू राजाराम दांडेकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका**१९५०: विद्याधर शुक्ल -- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९४९: डेनिस कीथ लिली -- निवृत्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९४८: सुजाता देशपांडे -- मराठी व हिंदी भाषेतील कवयित्री,लेखिका**१९४८: गजेंद्र अनंतरामजी गजभिये -- कवी**१९४८: बाबुलाल माळी -- शैक्षणिक व चरित्रात्मक लेखन करणारे लेखक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९४७: सुभदा मुळे -- लेखिका* *१९४१: निक्षुभा नंदकुमार जोशी -- कवयित्री**१९४०: डॉ.भागवत शिवराम भोयर -- लेखक, कवी* *१९२७: ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२ )**१९२७: डॉ.चंद्रशेखर शिवलिंग कपाळे -- कवी, लेखक, संपादक**१९२४: श्रीधर उर्फ बापूराव दत्तात्रेय आगाशे -- चरित्रकार, प्रवचनकार (मृत्यू: २५ एप्रिल १९९६ )**१९१८: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३ )**१८६१: कादंबिनी बोस गांगुली -- संपूर्ण दक्षिण आशियातील पहिल्या महिला डॉक्टर ( मृत्यू: ३ ऑक्टोबर १९२३ )**१८४८: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५ )**१६३५: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥 •••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९४२ )**२०१२: सुरेश सरैया -- क्रिकेट जगतात रेडिओ क्रिकेट समालोचक (जन्म: २० जून १९३६ )**२००१: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४ )**१९९४: डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक* *१९८९: डॉ.गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक (जन्म: २ मे १९१४ )**१९६९: ’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म: १ ऑगस्ट १९२० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नासा येवतीकर लिखित आणि फेसबुकवर अनेक वाचकांच्या पसंतीस उतरलेली *" कादंबरी ललाटरेषा "*..... कादंबरी वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना, दरमहा १० हजार मिळणार, पंढरपुरातून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *साताऱ्यातील कोयना नगर परिसरात काल दुपारी ३.२६ वाजेच्या सुमारास बसले भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिवाजी महाराजांची वाघनखं मुंबईत दाखल, 19 जुलै रोजी साताऱ्यात होणार भव्य दिव्य सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा भवन’ चे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसच्या 2 महत्वाच्या बैठका होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कल्याण वरून शिर्डीला पायी निघालेल्या यात्रेकरूंना भरधाव वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *“चांगला पाऊस येऊ दे, पीकपाणी चांगलं होऊ दे”, मुख्यमंत्र्यांकडून विठुरायाला साकडं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 ************************आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••द्वेष व कपटवृत्तीचा त्याग करा व संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. ---- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलोवर असलेला १०० मिलियनचा टप्पा पार करणारा जगातील पहिला नेता कोण बनले आहेत ?२) टाइम्स हायर एज्युकेशन २०२४ च्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे ?३) प्रजासत्ताक दिनी सैन्यादलाची मानवंदना कोण स्वीकारतो ?४) 'डोंगर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सलूनो' म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) नरेंद्र मोदी २) ऑक्सफर्ड विद्यापीठ ३) राष्ट्रपती ४) पर्वत, नग, शैल, अचल ५) रक्षाबंधन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास पुसा, बिलोली👤 राज राठोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कथनी अति गुण सी करनी विष की लोए।कथनी तजि करनी करो तो विष से अमृत होए॥13॥अर्थ – सिर्फ कहना गुण से भी मीठा होता है , और उसे करना जहर से भी ज्यादा कड़वा होता है लेकिन जब कहना छोड़ कर उस काम को करने लगते है तब , वो जहर से अमृत में बदल जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या लोकांशी आपला परिचय नसते ते लोक कितीही व कोणत्याही शब्दात बोलले तरी काहीच वाटत नाही. पण,जे लोक विश्वासात घेऊन दिखावूपणाचे वागणे ठेवतात अन् आपले काम झाले की, मग कोणत्याही शब्दात बोलून मोकळे होऊन जातात तेव्हा मात्र क्षणभरासाठी सुद्धा का होईना पण, मन अगदी अशांत होते. म्हणून असेही वागणे नसायला पाहिजे जेणेकरून माणसावरचा पूर्ण विश्वास कायमचा उडून जाईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃* *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले. घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्याने पाहणार्या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.' ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !' *_तात्पर्य_* *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्याच्या सहानुभूतीची अपेक्षा •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/gq2WyREovPs6TK9Q/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_ जागतिक सर्पदिन_* 🟪 🟪 *_ या वर्षातील १९८ वा दिवस आहे_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.**१९९२: भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.**१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणार्या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण**१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.**१९४५: अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: कतरिना कैफ – चित्रपट कलाकार**१९७५: अनंत कराड-- कवी, लेखक* *१९७३: शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू**१९६८: धनराज पिल्ले – हॉकीपटू**१९६७: स्मिता विनोद गालफाडे -- लेखिका**१९६५: डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे -- कवी**१९६२: नंदकिशोर प्रभाकर ठोंबरे -- कवी* *१९५२: वंदना गुप्ते -- भारतीय अभिनेत्री**१९५०: डॉ. विकास कशाळकर -- हिंदुस्तानी शास्त्रीय गायक,संगीत दिग्दर्शक**१९४६: प्रा.डॉ उत्तम रुद्रवार-- सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि वक्ते* *१९४५: लक्ष्मण सिद्राम जाधव -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक (मृत्यू: ५ जून २०१९ )**१९४३: प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे-- प्राध्यापक,मराठी साहित्यिक (मृत्यू: ६ जानेवारी २०१० )**१९२३: सदानंद जोशी -- जेष्ठ एकपात्री कलाकार (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००८ )**१९२३: के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल**१९१७: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक (मृत्यू: १४ मे १९७८ )**१९१४: वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – मराठी साहित्यिक (लघुकथा,लोककथा, बालवाड़्मय,चरित्र,अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५ )**१९१३: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ )**१९०९: अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. (मृत्यू: २९ जुलै १९९६ )**१८९१: देवदत्त नारायण टिळक -- कवी, कथाकार कादंबरीकार, संपादक (मृत्यू: २७ डिसेंबर १९६५ )* 🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सुरेखा सिक्री-- भारतीय अभिनेत्री (जन्म: १९ एप्रिल १९४५ )**२०२०: निला सत्यनारायण - महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला निवडणूक आयुक्त (जन्म: ५ फेब्रुवारी १९४९ )**२०१९: राजाराम पिराजी ढाले ( राजा ढाले) -- भारतीय लेखक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ३० सप्टेंबर १९४० )**२०१९: पुरुषोत्तम बोरकर -- सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार (जन्म: १९५६ )**२०१३: बरुन डी -- भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म: ३० आक्टोबर १९३२ )**१९९३: उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू (जन्म: १९०९ )**१९८६: वासुदेव सीताराम तथा वा.सी.बेन्द्रे – प्रसिद्ध इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने लेख*माझे माहेर पंढरी .......*पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील माझे माहेर पंढरी ...... हे गाणं ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि पायी दिंडी वारी करणारे वारकरी ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.*आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा ......!*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *21 रोजी पुण्यात 5 हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी करणार मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्य सरकार जनतेला देवदर्शन घडवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात नवव्या स्वरमल्हार महोत्सवाची सांगता, पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुपर कॉम्प्युटर ते कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षीदार, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकरांचे मत ; 20 रोजी पुण्यभूषण पुरस्काराचे होणार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पीकविमा भरण्याची दिली मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून के. पी. शर्मा ओली यांनी घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *नखं कापतांना दुखत का नाही ? पण उपटल्यास दुखतात; असे का ?* 📙 दर आठवड्याला तुम्ही नेलकटरने नखं कापत असाल. चांगलीच सवय आहे ही. पण केव्हा तरी नख कापतांना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने तुम्हाला नक्कीच दुखले असेल. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते ? याचे उत्तर कळण्यासाठी नखाची रचना समजून घ्यायला हवी!नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत त्वचेतील पेशींपासून निर्माण होणाऱ्या केरॅटिनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरित तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात. केरॅटिनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापतांना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुरूष एकेरीतील विम्बल्डन चॅम्पियनचा किताब कोणी जिंकला ?२) ट्रॅव्हल्स प्लस लीझरच्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा किताब कोणत्या संघाने जिंकला ?४) 'ठेकेदार' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गावाचा कारभार पाहणारी संस्था कोणती ? *उत्तरे :-* १) कार्लोस अल्काराज २) राजस्थान ३) स्पेन ( २- १ ने ) ४) कंत्राटदार, मक्तेदार ५) ग्राम पंचायत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जयवंत हंगरगेकर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 सुरेश भाग्यवंत 👤 हरीप्रसाद प्रभाकर आरेवार, हडको, नांदेड👤 मारोती गाडेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मात पितु गुरु करहिं ना सेवा चारो ओर फिरत पूजत है देवा।ते नर के काल नचावे आशा दे दे मुआवे॥12॥कबीर साहेब कहते है – जो इंसान माता पिता और गुरु की सेवा नहीं करता वो चाहे सारे तीर्थ-ब्रत पूजा पाठ करले फिर भी काल कुछ न कुछ आशा दे कर फिर से जन्म मरण में डाल देगा।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही निसर्गाने दिलेली विशेष देण आहे. त्याच कलेचा योग्य वापर करून प्रचार केल्याने तिचा सन्मान होतोच सोबतच तिच्यामुळे अनेकांना दिशा सुद्धा मिळत असते. पण,त्याच कलेचा स्वार्थापोटी दुरुपयोग केल्याने तिचा अपमान तर होतेच सोबत व्यापार, आणि व्यवसायात तिची गणना केली जाते असे ऐकण्यात आले आहे. म्हणून आपल्या अंगी असलेल्या कलेची पूजा करावी व समाजासाठी तिच्यातून जेवढे योगदान द्यावा वाटते तेवढे द्यावे. पण,तिची गणना व्यापारात किंवा व्यवसायात करु नये.असं केल्याने कलेवर किंवा त्या कलावंतावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लोभाची शिक्षाएक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस*तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/07/hari-om-vitthala.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟫 *_ या वर्षातील १९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना*🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: सुभाष आ. मंडले -- लेखक* *१९८१: प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे -- लेखक, कवी* *१९८०: राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी, लेखक* *१९७५: आबा गोविंदा महाजन -- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८: सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६६: डाॅ. श्रीनिवास मेघ:श्याम आठल्ये -- लेखक, कवी**१९६०: प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे -- कवी* *१९५७: बळीराम रुपचंद जाधव -- लेखक**१९५६: डॉ. प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१: अनुराधा मराठे -- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट -- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९: प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४९: विजय कोंडके -- चित्रपट दिग्दर्शक**१९४७: आशा वसंतकुमार वडनेरे -- लेखिका, अनुवादक**१९४७: विजय विठ्ठल देवधर -- मराठी लेखक(मृत्यू : ३० नोव्हेंबर २०१२)**१९४३: दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१: माधव गुणाजी कोंडविलकर -- ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२० )* *१९३७: विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू: ३१ जानेवारी १९८६ )**१९३७: प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३ )**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२ )**१९३१: विठ्ठल उमप -- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू: २६ नोव्हेंबर, २०१० )**१९२७: प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१० )**१९१९: बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: ६ नोव्हेंबर २००६ )**१९१८: चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१० )**१९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८० )**१९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१ )**१९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५ )**१८९९: दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७ )*🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: माधवी रणजित देसाई-- मराठीतील लेखिका (जन्म: २१ जुलै १९३३ )**२००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८ )**१९९१: जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: १९२० )**१९८०: गजानन विश्वनाथ केतकर -- निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म: ८ ऑगस्ट १८९७ )**१९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म: २६ जून १८८८ )**१९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२ )**१९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने काही रचनाहरी ओम विठ्ठला । नाम तुझे मुखी ।।एकच प्रार्थना देवा । ठेव सर्वाना सुखी ।।..... रचना वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे माझे ध्येय आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भेटीदरम्यान ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतांना म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *BRS पुन्हा महाराष्ट्रात कमबॅक करणार, विधानसभेला रंगत येणार, दोन पक्षांशी बोलणी सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सव्वालाख विद्यार्थी शाळाबाह्य ? यू-डायस प्रणालीमधील धक्कादायक नोंद, शिक्षण विभाग म्हणतो...विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीतील तफावतीमुळे हा गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांचा भाजपमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *8 आमदारांची कॉंग्रेसमधून होणार हकालपट्टी ? विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळला नाही, 19 जुलैला होणार मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून हरविलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचे तीन भाग आहेतः प्रथम जिज्ञासा - जी सत्याची आराधना असते , दुसरे ज्ञान - जी सत्याची उपस्थिती असते. व तिसरा विश्वास - जो सत्याचा उपभोग आहे. ------ बेकन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विम्बल्डन टेनिस स्पर्धेची महिला एकेरीची चॅम्पियन कोण ठरली आहे ?२) 'विदर्भाचे नंदनवन' असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान झाला ?४) 'ठक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) झिका विषाणू कोणत्या नावाच्या डासापासून पसरतो ? *उत्तरे :-* १) बार्बरा क्रिचिकोवा, झेक प्रजासत्ताक २) चिखलदरा, अमरावती ३) स्पेन व इंग्लंड ४) लबाड ५) एडिस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी हिवराळे, शिक्षक तथा पत्रकार👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 राजेश्वर डोमशेर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, नायगाव👤 श्रीकांत जोशी, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नागोबा हिमगिरे, शिक्षक, धर्माबाद👤 वसंत बोनगिरे👤 शंकर हंड्रे, शिक्षक, देगलूर👤 सचिन खंडगावे👤 गंगाधर वि. बिज्जेवार, सेवानिवृत्त शिक्षक, सिडको, नांदेड👤 राजू कदम👤 विजयकुमार पाटील घुलेकर👤 संतोष ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 विष्णुराज कदम, पांगरी, धर्माबाद👤 नवाज शेख👤 पांडुरंग चंदवाड👤 आनंद गाजेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दस द्वारे का पिंजरा तामे पंछी पौन।रहने को अचरज नहीं जात अचम्भा कौन॥11॥अर्थ – इस शरीर को ही कबीर साहेब पिंजरा कहते है इसमें दस द्वार है , २ आँख , २ कान , २ नाक , १ मुँह , १ मल द्वार , १ मूत्र द्वार , कुल हुए ९ , और एक दसवा जो है जो की गुप्त है , उसी द्वार से इस शरीर में प्राण डाला जाता है और उसे बंद कर दिया जाता है , उसी द्वार को खोलने की चाभी सच्चे सद्गुरु के पास होता , जो भक्त सच्ची लगन से अभ्यास करता है , तो सद्गुरु की कृपा से वो १० वा द्वार खुलता है और वो स्वयं को जान पाता है और उस सत्यपुरुष को देख और जान पता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ सर्वांवर येते आणि एक दिवस निघून जाते. फक्त, त्या आलेल्या वेळेत हिंमत हारू नये. तर त्या बहुमूल्य वेळेचे आनंदाने स्वागत करावे. त्या वेळेत नेमकं काहीतरी विशेष असेल म्हणूनच वेळेचे येणे, जाणे आवश्यक असते असे म्हटल्या जाते. म्हणून त्या प्रसंगी स्वतः खंबीर रहावे व जगण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात सांगता येत नाही त्याच वेळेपायी आपल्याला सर्वस्व काही मिळूही शकते. कारण राजाचा रंक आणि रंकाचा राव होण्यासाठी ती वेळच ठरवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण* एका हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,' या विश्वासाने चरत असे , पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी , होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला. मरतांना हरीण मनात म्हणाले , " अरेरे ! ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला." *_🌀तात्पर्य_ ::~* *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_21.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟦 *_ या वर्षातील १९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०११: मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.**१९७७: रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे. न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.**१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.**१९०८: लोकमान्य टिळकांवर दुसर्या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.**१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.*🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: उर्वशी शर्मा -- भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री**१९८४: लता अनिल बहाकर-तळोकार -- लेखिका* *१९८२: सुनील कालिदास जवंजाळ -- कवी, लेखक* *१९७२: डॉ. शुभांगी लुंगे -- कवयित्री**१९६५: विलास गोपाळ अंभोरे -- कवी, लेखक**१९६२: जयराम हरी पुरंदरे -- लेखक**१९६१: गणेश निळकंठराव पांडे -- प्रसिद्ध कवी* *१९५८: प्रा.डॉ.नमिता अशोक शेंदरे-- लेखिका* *१९५२: प्रा.माधुरी शानभाग -- प्रसिद्ध मराठी लेखिका,अनुवादक* *१९५२: डॉ निर्मल सिन्नरकर -- कवयित्री, गीत लेखन**१९४७: अस्ताद डेबू -- भारतीय समकालीन नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक (मृत्यू: १० डिसेंबर २०२० )**१९४७: डॉ.वासुदेव नारायण विष्णुपुरीकर -- प्रसिद्ध नाटयलेखक* *१९४२: हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता**१९३९: प्रकाश मेहरा -- दिग्गज भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: १७ मे२००९ )**१९३६: सत्यदेव दुबे -- भारतीय पटकथाकार, संवादलेखक, नाट्य-अभिनेते, चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: २५ डिसेंबर २०११ )**१९३१: बीना राय -- भारतीय अभिनेत्री(६ डिसेंबर २००९)**१९३०: स्वरूप किशन -- भारतीय कसोटी क्रिकेट पंच (मृत्यू : २१ नोव्हेंबर १९९२)**१९२७: सावळाराम धागोजी म्हात्रे (सावळाराम महाराज) -- कीर्तनकार, समाजप्रबोधक (मृत्यू:१८ फेब्रुवारी १९९२ )**१९१६: रामकृष्ण धोंडो बाक्रे-- ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २२ डिसेंबर १९९६ )**१९०३: विमलाबाई देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१८९२: केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७ )*🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:यशपाल शर्मा -- भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ११ ऑगस्ट १९५४ )**२०१०: मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१ )**२००९: निळू फुले – प्रसिद्ध अभिनेते (जन्म: ४ एप्रिल १९३० )**२०००: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४ )**१९९४: पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५ )**१९९०:अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: १८९७ )**१९६९: महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.(जन्म: १२ जानेवारी १९०२ )**१९१९: गणेश जनार्दन आगाशे -- अर्थशास्त्राचे अभ्यासक, लेखक, कवी, निबंधकार (जन्म: १ जानेवारी १८५२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुलांचे गुण शाळेतून दिसतात*प्रत्येक गोष्ट शाळेतूनच का शिकावी लागते ? मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी शाळेत पाठवा, मुलांना लिहिण्या-वाचण्यासाठी शाळेत पाठवा, मुले संस्कारी होण्यासाठी शाळेत पाठवा. एखादे मूल काही वाईट केलं किंवा खराब केले की लगेच बोलल्या जाते, गुरुजींनी, तुला शाळेत हेच शिकवलं का ? तसं तर तुला घरी हेच शिकवलं का ? असे फार कमी बोलल्या जाते. वास्तविक पाहता यात गुरुजींचा काहीही दोष नसतो मात्र अगदी सहजपणे असे बोलले जाते............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अखेर पंकजा मुंडे बनल्या आमदार, 10 वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव विधानसभेमध्ये सादर करण्याच्या हालचाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ड्रग्जनंतर एनर्जी ड्रिंकचाही मुद्दा विधिमंडळात; किराणा दुकानातून पेरलं जातंय घातक द्रव्य; सभापतींनी दिले महत्त्वाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एक रुपयात पीक विमा, योजनेसाठी उरले शेवटचे 4 दिवस; 15 जुलैपर्यंत नोंदणी करुन योजनेत सहभाग घ्यावा, शेतकर्यांना प्रशासनाचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित, केंद्राचा निर्णय, अधिसूचना जारी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एक सदस्यीय समितीच्या तपासात दोषी आढळल्यास वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ, केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडने जेम्स अँडरसनला दिला विजयी निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेनवॉटर हार्वेस्टिंग : पाण्याची साठवण व पुनर्भरण* 📙 सर्व मोठ्या गावांचे शहरीकरण झाले. शहरांचे काँक्रिटीकरण झाले. काँक्रिटच्या जंगलाला डांबराच्या रस्त्यांची जोड मिळाली. मग या साऱ्या शहरावर पडणारे पाणी जमिनीत मुरणार कसे ? ते झपाट्याने वाहून जाणार. गटारांतून नालीमध्ये, नालीतून नदीकडे वाहणार. पुन्हा या शहरी वस्तीला पाणी पुरवायचे कुठून ? नळाद्वारे पुरवायला पाणी आणायचे कुठून ? यासारख्या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना जगातील अनेक ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची कल्पना प्राधान्याने मांडली गेली. जेथे पाऊस जास्त पडतो, तो कालावधी अल्प असतो. पडलेला पाऊस स्वतःबरोबर बहुमोल मातीचा थर घेऊन जातो. ती माती गाळा रूपाने नदीतून वाहत धरणांच्या भिंतीजवळ साचते व धरणे हळूहळू निकामी होतात. तसेच डोंगरावरची माती वाहून गेल्याने डोंगर बोडके, खडकाळ होतात व पावसाचे प्रमाण कमी होऊ लागते. हा झाला उघड्या जमिनीसंदर्भातला प्रश्न. दुसरा प्रश्न काँक्रिटच्या जंगलातला वर उल्लेखलेला. दोन्ही प्रश्नांना उत्तर एकच. ते म्हणजे जमेल तसे, जमेल तितके पाणी आडवा, जमवा व जिरवा. पाणी अडवायचे उपाय शहरात सोपे. छपरावरचे, गच्चीवरचे, पावसाचे पाणी पन्हाळीद्वारे एकत्रित करून इमारतीच्या शेजारी वा पोटात बांधलेल्या टाकीत साठवायचे. पावसाळा संपल्यावर त्याचाच वापर पिण्याखेरीज लागणाऱ्या अन्य वापरासाठी करायचा. आसाम, मेघालय, नागालँड या उतारावरच्या टेकड्यांच्या प्रदेशात ही पद्धत गेली अनेक वर्षे घराघरांतून वापरली गेली आहे. टाकी पाण्याने भरली, तर जास्तीचे पाणी जवळच खणलेल्या एका खड्डावजा कुपनलिकेत सोडायचे. आठ ते दहा सेंटीमीटर व्यासाचा दोन तीन मीटर खोलीचा खड्डाही या कामी उपयोगी पडतो. भूजलपातळी वाढण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होतो. शहरात, गावात कूपनलिका खणल्या जातात, पण अनेकदा पाणी लागत नाही. अशा कूपनलिकांमध्येही असे जवळपासचे पाणी भू उदरात भरण्यासाठी सोडता येते. दहा हजार चौरस मीटरच्या सर्वसामान्य इमारतीच्या गच्चीवरचे पाणी साठवल्यास किमान तीन महिने त्या इमारतीत राहणाऱ्या सर्वांना पावसाळ्यात व त्यानंतरचे दोन महिने साठवलेल्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो. महानगरांमधून इमारतीचे नकाशे मंजूर करून तिला परवानगी देताना अशी रचना करणे आता गरजेचे वाटू लागले आहे. पुणे महानगरपालिकेने स्वतःच्या विस्तीर्ण इमारतीत तशी रचना करायला सुरुवातही केली आहे. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या एका वाक्यात अन्य ठिकाणच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा सारा अर्थ सामावतो. उतारावर, डोंगरावर समतल बांधांची रचना यासाठी केली जाते. कंटूरबंडिंग या नावाने ती ओळखली जाते. पावसाचे पाणी या विविध बांधांना अडते, जिरते, माती वाहून नेणे थांबते. याशिवाय मोठ्या पावसात वाहणारे पाणी पाझर तलाव बांधून अडवले जाते. पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपला की, त्यानंतर शेती, जनावरे, पक्षी यांना या पाण्याचा अगदी मार्चपर्यंतही उपयोग होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाझर तलावाचे पाणी जमिनीत मुरल्याने त्या परिसरातल्या व खालच्या भागातल्या विहिरींची भूजलपातळी उंचावते. महाराष्ट्रातील भूजलपातळी १९५० साली होती, त्याच्या दुपटीने खोलवर गेली आहे. याचाच अर्थ ६ मीटरवर विहिरीला बारा महिने पाणी असायचे, तिथे आता २० मीटरपर्यंत खोल जावे लागते. कुपनलिकांची अवस्था याहूनही वाईट आहे. अनेक ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल गेल्याशिवाय पाणी लागत नाही. गावाच्या शिवारात पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी किमान पन्नास टक्के पाणी या पद्धतीने अडवणे, जिरवणे शक्य असते, असे प्रयोगाअंती अनेकांनी सिद्ध केले आहे. अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे, तरुण भारत संघाच्या राजेंद्रसिंह यांनी राजस्थानमध्ये, विलासराव साळुंके यांनी पुरंदर जिल्ह्यातील केलेल्या प्रयोगांतून या गावांची पाण्याची गरज भागू लागली आहे. गावात हिरवाई निर्माण झाली आहे, गरज आहे अशा प्रयोगांतून अन्य गावातील गावकऱयांनी प्रेरणा घेण्याची. शेताच्या खोलगट भागात चर खणून शेततळी घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. पण सार्वत्रिक प्रयोगातून सारा परिसर हिरवागार करण्याचे प्रयत्न मात्र कमी पडत आहेत.छोट्या नदीमध्ये, ओढ्यांमध्ये ठराविक अंतरावर बंधारे घालण्याच्या सरकारी पातळीवरच्या प्रयत्नांनासुद्धा यश येत आहे. ओढ्याच्या पात्रातली दगड, वाळू सिमेंटच्या रिकाम्या पोत्यात भरून व्यवस्थित बंधारा बांधता येतो. असे बंधारे आठ ते दहा वर्षे चांगले टिकतात.इस्रायलसारख्या देशात जेमतेम सहा ते दहा इंच वार्षिक पाऊस पडतो. याउलट भारताच्या अनेक भागांत सरासरी चाळीस ते पन्नास इंच पाऊस पडतो. महाराष्ट्रातील अगदी दुष्काळी भागातसुद्धा पावसाचे वार्षिक प्रमाण वीस इंच एवढे आहे. इस्रायलने पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्याचा गेली पन्नास वर्षे प्रयत्न केला आहे. याउलट भारतातील पावसाचे पाणी आजही बहुतांश वाहून जाते. पावसाळ्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अक्षरश: भेडसावू लागतो.यावरचा एकमेव उपाय म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाण्याचे पुनर्भरण, पुनर्वापर करण्याचा आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे शिक्षण फक्त सत्याचे दर्शनच घडवत नाही, तर ते अमलात आणते आणि तेच त्याचे पूर्ण ध्येय असते. ---- मेरी-बेकर-एडी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे पथक प्रमुख* म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?२) रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत ?३) 'कारगिल वॉर द टर्निंग पॉईंट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) 'ठसा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) देशाची पहिली ट्रांसजेंडर सब इन्स्पेक्टर कोण बनले आहे ? *उत्तरे :-* १) गगन नारंग २) नरेंद्र मोदी ३) कर्नल एम. बी. रवींद्रनाथ ४) खूण ५) मानवी कश्यप, बिहार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुराधा पहाडे राजूरकर, माहूर👤 सुनील जवंजाळ, सांगोला👤 अहमद शेख👤 रवी यलमोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्वास-श्वास में नाम ले बृथा श्वास मत खोए।न जाने इस श्वास को आवन होए ना होए॥10॥कबीर साहेब कहते है – हर स्वास में नाम लेने के लिए कहते है , एक भी स्वास खली नहीं जाना चाहिए बिना नाम का , क्यूंकि इस स्वास का कोई भरोसा नहीं है अभी गया तो वापस लौटे या नहीं।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना मान, अपमान यांचे येणे,जाणे सुरूच राहते. त्या दोन्ही प्रसंगी संयम तसेच शांतपणे रहाण्याचा प्रयत्न करावा. कारण शांत हा एक सर्वोत्तम गुणच नसून संपत्ती सुद्धा आहे म्हणून त्याची महानता कित्येक वर्षापासून जाणली गेली आहे. त्याचा आदर केला जातो. आपणही त्या गुणाचा आदर करावा. कधीकाळी सांगता येत नाही. आपला अपमान करणारे सुद्धा ती शांतता बघून पुन्हा एकदा नव्याने जगायला लागतील तोच आपल्यासाठी मिळालेला सर्वांत मोठा सन्मान असेल.म्हणून शांत राहण्याचा अवश्य प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या या एका प्रयत्नाने एखाद्या भटकलेल्या माणसाला नवी दिशा मिळेल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ फसवे बाह्यरूप ❃* एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्यासारख्या उड्या मारणार्या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !' *_🌀तात्पर्य_ ::~* *बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/my-students-my-valentine.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *जागतिक 'पेपर बॅग' दिवस (Paper Bag Day)* ⭕ *_ या वर्षातील १९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'टिळक पुरस्कार’ जाहीर**१९९९: ’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.**१९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.**१९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८५: पी. एन. भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना**१९७९: किरिबातीला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२: लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.**१९६१: मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.**१९३५: ’प्रभात’ चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.**१९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.**१७९९: रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:मलाला युसूफझाई-- पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती* *१९९५: अक्षया नाईक -- मराठी मालिकेतील अभिनेत्री**१९८९: निलेश दिगंबर तुरके -- लेखक**१९७४: परविन दाबास -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक* *१९७२: जयश्री संजय सातोकर -- कवयित्री, लेखिका* *१९६७: मीना घोडके -- लेखिका**१९६५: संजय मांजरेकर – क्रिकेटपटू**१९६२: शत्रुघ्न कुसंबे -- कवी* *१९५९: प्रा. डॉ. शेषराव नत्थुजी जुडे -- लेखक**१९५८: प्रा. आशालता कांबळे-- कवयित्री, लेखिका* *१९५४: सुलक्षणा पंडित--- भारतीय पार्श्वगायिका, अभिनेत्री* *१९५२: शंकर किसन तांबे -- लेखक* *१९५०: विकास सबनीस -- ज्येष्ठ व्यंगचित्रकार (मृत्यू: २८ डिसेंबर २०१९)**१९४८: उपेंद्र दाते -- मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणारे गायक, नट* *१९४७: सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी -- मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री**१९४५: डॉ. अंजली दामोदरराव टाकळीकर -- कवयित्री* *१९३९: धुंडिराज कहाळेकर -- लेखक कवी**१९३०: वसंत राशिनकर -- प्रसिद्ध कवी, लेखक (मृत्यू: ७ जानेवारी २०१५ )**१९२२: मनोहर कल्लावार-- लेखक* *१९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८ )**१९२०: वसंत गोविंद देशमुख -- लेखक (मृत्यू:१ एप्रिल १९८४ )**१९१३: मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (मृत्यू: १४ जून २०१०)**१९१०: गोविंद रामचंद्र दोडके -- लघु निबंधकार (मृत्यू: १३ जानेवारी १९६३ )**१९०९: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६ )**१८९६: देविदास लक्ष्मण महाजन-- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक (मृत्यू:३ एप्रिल १९६७ )**१८८९: केशव गणेश आठल्ये (केशवबुवा)-- लेखक व प्रवचनकार**१८६४: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६ )**१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३ )**१८५४: जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२ )**१८१७: हेन्री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२ )*⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕ •••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: सुशीलकुमार चढ्ढा तथा हुल्लड मुरादाबादी -- हिंदी हास्यकवी(जन्म:२९ मे १९४२)**२०१३: प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२० )**२०१२: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८ )**१९९९: राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म:२०जुलै १९२९ )**१९९४: वसंत साठे -- हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार (जन्म: १० ऑगस्ट १९१६)**१६६०: बाजी प्रभू देशपांडे (जन्म: १६१५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्यार्थी हेच माझे दैवत*शाळा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे शिक्षक, फळा, शाळेची इमारत, मैदान आणि किलबिल आवाजात नाचणारी विद्यार्थी. विद्यार्थ्याशिवाय कोणतीच शाळा शोभून दिसत नाही. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी यांचे अतूट असे नाते असते. शाळेत सर्वात पहिल्यांदा कोण येत असेल तर तो म्हणजे विद्यार्थी. काही विद्यार्थी तर शाळेला च आपले घर केलेलं असते त्यामुळे ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत येणार, गडकरीही उपस्थित राहणार; लोकसभा निकालानंतर पहिलाच दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र हा कृषी क्रांतीचा जनक, सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'रिपाइं'ला विधानसभेच्या 12 जागा द्या, क्रिमिलेयर मर्यादा 8 लाखांहून 12 लाख करा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांविना भारताचा इतिहास अधुरा, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन; विधानसभेत आमदारांना केले मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रिकेटपटू सुरेश देवभक्त यांचे निधन, वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; वसईचा पहिला रणजीपटू काळाच्या पडद्याआड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० फॉरमॅटसाठी टीम इंडियाची धुरा हार्दिकच्या खांद्यावर; ODI साठी के एल राहुल नवा कर्णधार - बीसीसीआयचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेसर* 📙 लेसर या प्रकाशकिरणांभोवती एक गूढ वलय सामान्य माणसाच्या मनात असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लेसरचा वापर अगदी मर्यादित होता; पण आज मात्र तो अगदी सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या वस्तूच्या वेष्टनावरची किंमत, पुस्तकाचा क्रमांक किंवा क्रेडिट कार्डवरची माहिती वाचण्यासाठी लेसर किरणांचा वापर केला जातो. एवढेच काय, पण बाजारात नवीन आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क स्टिरिओमध्येही लेसरच वापरलेला असतो. डोळे व लेसर यांचे तर अतूट असे समीकरण होण्याइतका डोळ्यांच्या आजारात लेसरचा वापर वाढत आहे. त्यामानाने मेंदूतील कर्करोगात लेसर वापरणे अजून तितकेसे सुलभ झालेले नाही. हा वापर करताना लेसरचा एक महत्त्वाचा गुण वापरला जातो, तो म्हणजे लेसरच्या लहरी ठराविक वेगाने, ठरावीक काळाने एका मागोमाग अत्यंत सुसंघटितपणे वाहत असतात. नेमक्या जागी पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे तितक्या लहान व्यासाचे लेसरचे किरण सोडता येतात व हे किरण अन्य प्रकाशाप्रमाणे पसरत नाहीत. एकाच तरंगलांबीच्या विद्युतचुंबकीय लहरी लेसरमध्ये असतात. त्यामुळे लेसरचा रंगही ज्या उद्गमातून लेसर निर्माण केला जाईल, त्यावर अवलंबून असतो. पण एका वेळी एकच रंग असतो. लेसर हे नाव नसून तो एक शोर्टफॉर्म आहे. लेझर (LASER) म्हणजे 'लाइट अॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन'.लेसरच्या निर्मितीचे सध्या विविध प्रकार वापरले जातात. काहींमध्ये क्र्वार्ट्झचा वापर केला जातो, तर काहींमध्ये हवाबंद नळीतील इलेक्ट्रोड काही विशिष्ट वायूंमध्ये काम करतात. हेलियम, निऑन, कार्बन डायॉक्साइड यांचा वापर या ट्यूबमध्ये केला जातो. दोन इलेक्ट्रोड्समध्ये उच्चदाबाचा विजेचा प्रवाह खेळवल्यावर लेसर निर्माण करण्यासाठी वापरलेल्या द्रव्यातील अणुंना जी ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यातून प्रकाशकिरण बाहेर टाकले जातात. दिलेली विद्युतऊर्जा बाहेर टाकल्या जाणाऱ्या प्रकाशकिरणांची एक साखळी प्रक्रियाच या द्रव्यात सुरू होते. या नळीच्या दोन्ही बाजूंना समोरासमोरच्या दोन आरशांतुन हे प्रकाशकिरण पुन्हापुन्हा पर परावर्तित होत असल्याने ही साखळीप्रक्रिया वाढतच जाते. या अारशांपैकी एका आरशाला ठेवलेल्या पाहिजे त्या व्यासाच्या छिद्रातुन लेसर बीम वा झोत नळीच्या बाहेर टाकला जातो. प्रत्येक अणूतून बाहेर पडणारे किरण हे एकाच तरंग लांबीचे असल्याने बाहेर पडणारा झोतही तसाच असतो. प्रकाशाचा झोत सलग जोडायचा की पुंजक्या पुंजक्यात, हे लेसरच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून ठेवता येते. बाहेर पडणाऱ्या सर्व किरणांचा संघटितपणा (coherence) हा लेसरला नेहमीच्या प्रकाशापेक्षा वेगळा ठरवतो. लेसरची वैशिष्टय़े या गुणधर्मातूनच संभवतात.लेसर किरणांचा विनाशक व उपयोगी असा दोन्ही प्रकारे भरपूर वापर केला गेला आहे. अनेक प्रकारची लष्करी अस्त्रे, आयुधे, विमाने लेसरचा वापर करतात, तर अनेक अत्याधुनिक कारखाने अत्यंत काटेकोरपणे कापाकापी वा जोडाजोडीसाठीही लेसरच वापरतात. डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल निखळले असता ते पुन्हा चिकटवण्यासाठी लेसरचा वापर केला जातो. विविध कथा, सिनेमा व विज्ञान गोष्टींत मात्र लेसर काल्पनिक बंदुकीचा मुक्त वापर आढळतो. कसलाही आवाज न करणारी, पण पाहिजे त्याचा बळी घेणारी ही बंदूकच लेसरबद्दलचे गूढवलय सर्वांच्या मनात वाढत जाते.लेसरबद्दल एक विशेष बाब म्हणजे १९१७ साली आइन्स्टाइन यांनी या स्वरूपाचे किरण निर्माण होऊन त्यांचा वापर करता येईल, असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी १९६० साल उजाडले. थियोडोर मेमन यांनी पहिला लेसर त्या वर्षी वापरात आणला. त्यानंतरही अनेक वर्षांनंतर म्हणजे १९७५ सालच्या आसपास वैद्यकीय क्षेत्रात प्रगत देशात त्याचा वापर सुरू झाला. भारतात प्रमुख शहरात १९९० सालापासून लेसरचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात. प्रामुख्याने ते डोळ्यांच्या बाबतीत असतात.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मृत्यू म्हणजे चेतनेचा अंत आणि शिक्षण म्हणजे मानवाच्या चैतन्याचा अविष्कार. --- दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या २८ सदस्यीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे ?२) जागतिक लिंगभाव विषमता निर्देशांक अहवालानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?३) कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकतेच फ्रान्स देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?४) 'टंचाई' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?*उत्तरे :-* १) नीरज चोप्रा २) १२९ वा ३) रोशनी नादर मल्होत्रा ४) कमतरता ५) महाराष्ट्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हरिहर धुतमल, पत्रकार, लोहा👤 शिल्पा जोशी, साहित्यिक, मुंबई👤 प्रवीण दाभाडे पाटील, साहित्यिक, कन्नड👤 अविनाश पांडे👤 नंदकुमार कौठेकर, शिक्षक, बिलोली👤 नागेश पडकुटलावार👤 अभिजित राजपूत👤 दादाराव जाधव👤 साईनाथ पाटील गादगे नागणीकर👤 दिनेश वाढवणकर👤 माधव उमरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात समंदर की मसी करूँ लेखनी सब बनराई।धरती सब कागद करूँ तापर गुरु गुण लिखा न जाय॥9॥अर्थ – सातो समुन्द्र को स्याही बनाऊ , सारे पेड़ पौधों को कलम बनाऊ , और पूरी पृथ्वी को कागज बनाऊ फिर भी गुरु का गुण गान नहीं लिखा जा सकता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कान भरणे तसेच घास भरवणे या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. घास भरविल्याने एखाद्याची भूक मिटत असते सोबतच पुण्य सुद्धा प्राप्त होत असतो. आणि कान भरल्याने एखाद्याचे जीवन उद्धस्त तर होतोच सोबतच त्या केलेल्या कृत्याने विविध विकारचे आजार वाढत असतात. असे ऐकण्यात आले आहे. त्यांच्या विचाराचा मान ठेवून एखाद्याचे भले होईल असेच कार्य करावे जेणेकरून त्याचा फायदा होईल. व केलेल्या कार्यातून आपल्याला समाधान मिळेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ सचोटी ❃* *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’ *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.wordpress.com/2018/07/09/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚪ *_ या वर्षातील १९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस’जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो._*⚪ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚪••••••••••••••••••••••••••••••••• *२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.**२००१: आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.**१९९४: दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९७९: अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.**१९७१: चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.**१९३०: ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.**१९०८:लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.**१८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.*⚪ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रा. डॉ. ललित रमेश कोलते-- कवी, लेखक**१९८३: विकास वसंतराव गुजर -- लेखक* *१९६९: प्रणव हळबे -- कवी, लेखक* *१९६५: अनुपमा अजय मुंजे -- कवयित्री* *१९६०: जाफर पनाही -- इराणमधील चित्रपट निर्माते**१९५९: डॉ. अचला दि. तांबोळी -- कवयित्री, लेखिका* *१९५६: कुमार गौरव ( मनोज तुली) -- भारतीय उद्योगपती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतकाम करणारा माझा अभिनेता**१९५५: प्रा. सुहास बारटक्के -- लेखक, पत्रकार* *१९५४: मोहन दाते -- दाते पंचांग**१९५३: प्रा. डॉ. सुधा लक्ष्मणराव पेशकर -- लेखिका* *१९५३: सुरेश प्रभू – माजी केंद्रीय मंत्री.**१९५०: सुप्रिया अनंत अय्यर -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९४७: शरद उर्फ गोविंद गणेश अत्रे -- कवी**१९४५: जलाल आगा -- हिंदी चित्रपटांतील अभिनेता (मृत्यू: ५ मार्च १९९५ )**१९२१: शंकरराव रामचंद्र खरात – प्रसिद्ध मराठी लेखक, कादंबरीकार व इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१ )**१८९१: परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१ )**१८८९: नारायण हरी आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार, चित्रपट कथालेखक.(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ )**१८८७: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- लेखक, प्राध्यापक आणि समाजसेवक (२५ जानेवारी १९६४ )* ⚪ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚪•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: मधुसूदन नानिवडेकर -- प्रसिद्ध गझलकार व पत्रकार(जन्म: १८ मे १९६० )**२००९: शांताराम नांदगावकर – मराठी गीतकार, कवी त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६ )**२००३: भीष्म साहनी -- भारतीय लेखक, हिंदी नाटककार आणि अभिनेता (जन्म: ८ ऑगस्ट १९१५)**२००३: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक(जन्म: १५ नोव्हेंबर १९४८ )**१९९४: रामा राघोबा राणे --- भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी(जन्म: २६ जून, १९१८ )* *१९८९: सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसंख्येचा भस्मासूर आणि त्याची कारणे*भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर देशात पहिली जनगणना सन 1951 या वर्षी घेण्यात आली. त्यावेळची लोकसंख्या 36 कोटी 10 लाख होती. आजची लोकसंख्या 144 कोटी 20 लक्ष 39 हजार 740 आहे...... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दप्तराविना भरणार शाळा, केंद्र सरकार शिक्षण धोरणात बदल करणार, वार्षिक शैक्षणिक वर्षातील दहा दिवस विना दप्तराचे असतील, त्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या भितींबाहेरील जगात फिल्ड विजीटसाठी नेले जाईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानसभा निवडणुकीआधी शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, जानेवारीपासून मिळणार थकबाकी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणावरील सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब;आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कॉलिंगचे दर वाढवून सर्वसामान्यांची मोबाईल कंपन्यांकडून पिळवणूक, आम आदमी पक्षाच्या वतीने पुण्यात तीव्र आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी गौतम गंभीर यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने विजयासह मालिकेत घेतली आघाडी, तिसऱ्या सामन्यात T-20 झिम्बाब्वेवर सहज मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *युरीस्टीकने लघवीची तपासणी कशी करतात ?* 📕तुमच्या घरी आजी-आजोबांना मधुमेह अर्थात डायबेटीस असेल, तर तुम्हाला युरीस्टीक माहिती असतील. डायबेटीसच्या रुग्णांच्या रक्तामध्ये साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण जास्त असते. जसे गाठ भरता की वाहून जातो, त्याप्रमाणे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण ठरावीक मर्यादबाहेर गेले तर लघवीवाटे ती बाहेर टाकली जाते. याचाच अर्थ असा की, सामान्यपणे निरोगी माणसाच्या लघवीत ग्लुकोज नसते. लघवीत जर ग्लुकोज ०.५ टक्के वा त्याहून जास्त प्रमाणात असेल, तर व्यक्तीला मधुमेह झालेला असू शकतो. खात्रीच्या निदानासाठी रक्तातील ग्लुकोज तपासावी लागते, युरीस्टीकमध्ये एका पट्टीवर एक विशिष्ट असा रासायनिक पदार्थ लावलेला असतो. ही युरीस्टीक लघवीमध्ये३० सेकंद बुडवतात. लघवीतील ग्लुकोजच्या प्रमाणानुसार मुळचा निळसर हिरवा रंग असलेला हा पदार्थ पिवळा, नारंगी, तपकिरी होऊ शकतो. त्या रंगाचा काय अर्थ हेही युरीस्टीकच्या बाटलीवर लिहिलेले असते. मधुमेहाच्या रुग्णाला नियमित उपचार घ्यावे लागतात. या उपचारांचा मुख्य उद्देश हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर राखणे हाच असतो. म्हणजेच मधुमेह नियंत्रणाखाली असला, तर त्या व्यक्तीच्या लघवीत ग्लुकोज नसेल या असलीच तर ०.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल. यापेक्षा ग्लुकोजचे लघवीतील प्रमाण जास्त असल्यास आहारावर नियंत्रण, औषधे नियमितपणे घेणे किंवा डॉक्टरचा सल्ला घेणे, हे उपाय करावे लागतात. म्हणजेच युरीस्टीकच्या साहाय्याने स्वतःचा मधुमेह नियंत्रणाखाली आहे वा नाही, हे कळू शकते. आजी-आजोबांना या कामात तुम्हीही मदत करू शकाल, कारण काही वेळा त्यांची नजर अधू असल्याने त्यांना युरीस्टीकवरचे रंग नीट दिसत नाहीत. मग काय करणार ना मदत ?डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो ; पण शिक्षणाने मनुष्य पक्का होतो. ---- हर्बर्ट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने* गौरविण्यात आले ?२) रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?३) भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ( कोच ) म्हणून कोणाची निवड झाली आहे ?४) 'झोका' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) रशिया या देशाची राजधानी कोणती ?*उत्तरे :-* १) रशिया ( रूस ) २) ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉसल ३) गौतम गंभीर ४) हिंदोळा ५) मॉस्को*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुपमा अजय मुंजे, साहित्यिक, नागपूर👤 प्रभू देशमुख, शिक्षक, बिलोली👤 संतोष चव्हाण, शिक्षक, नांदेड👤 शिवाजी सूर्यवंशी, शिक्षक, हदगाव👤 प्रकाश नाईक👤 प्रमोद मंगनाळे👤 नरेश गोट्टम👤 स्वप्नील शिंदे👤 शेख सलमान👤 साईकिरण अवधूतवार, तेलंगणा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सात समंदर की मसी करूँ लेखनी सब बनराई।धरती सब कागद करूँ तापर गुरु गुण लिखा न जाय॥9॥अर्थ – सातो समुन्द्र को स्याही बनाऊ , सारे पेड़ पौधों को कलम बनाऊ , और पूरी पृथ्वी को कागज बनाऊ फिर भी गुरु का गुण गान नहीं लिखा जा सकता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तान्हा बाळ जेव्हा जन्माला येतो त्यावेळी त्याच्या रडण्याने सर्वाच्या डोळ्यात आनंदश्रू वाहताना दिसतात. तोच बाळ मोठा होऊन एक दिवस जग सोडून जातो.या प्रसंगी सुद्धा प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू असतात. पण,जेव्हा तोच बाळ वयाने मोठा होऊन अनेक संकटाचा सामना करून जगत असतो त्यावेळी मात्र त्याचे दुःख बघून कोणाच्याही डोळ्यात आपुलकीचे अश्रू येताना दिसत नाही. जी वेळ खऱ्या अर्थाने मोलाची असते त्यावेळी मात्र सर्वांना विसर पडत असतो.म्हणून दिखावूपणाचे अश्रू दाखविण्यापेक्षा आलेल्या प्रत्येक चांगल्या, वाईट प्रसंगी साथ देणे हाच माणुसकी धर्म आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ युक्ती ❃* सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकटधरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली . *_तात्पर्य_* नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.wordpress.com/2019/11/17/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔴 *_मातृसुरक्षा दिन_* 🔴 *_ या वर्षातील १९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ’मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर**२०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.**१९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता**१९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण**१९९२: मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.**१९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.**१९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.**१९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.**१९७३: बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२: ’टेलस्टार-१’ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित**१९४७: ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.**१९४०: 'बॅटल् ऑफ ब्रिटन' या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉबफेक सुरू केली. इंग्लिश हवाईदलाने जर्मनांचा यशस्वी प्रतिकार केला.**१९२५:’तास’ या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना**१९२३: मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.**१८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: अंतरा मित्रा-- भारतीय पार्श्वगायिका**१९८२: एकनाथ विश्वनाथ पवार -- कवी, लेखक व चित्रपट गीतकार**१९८२: शंकर अभिमान कसबे -- नवोदित कवी,नियतकालिकांतून लेखन**१९८०: युवराज भुजंगराव माने -- लेखक* *१९८०: प्रा. डॉ. सखाराम डाखोरे -- कवी* *१९७८: सचिन वसंत पाटील -- प्रसिद्ध कथाकार* *१९७३: प्रा. डॉ. मारोती दशरथ कसाब -- कवी , लेखक**१९६८: अंबादास केदार -- कथाकार* *१९६२: सुभाष प्रभाकर सबनीस -- लेखक, कवी**१९५९: तुकाराम पुंडलिक खिल्लारे -- कवी**१९५४: रविराज गंधे -- माध्यमतज्ज्ञ, लेखक-पत्रकार**१९५१: राजनाथ सिंह -- केंद्रिय संरक्षणमंत्री उतर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५०: ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका**१९४९:सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर – प्रसिद्ध क्रिकेटपटू व समालोचक तथा लेखक**१९४७: ल. म. कडू -- चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक* *१९४५: स्मिता भागवत -- लेखिका**१९४४: डॉ.भास्कर व्यंकटराव गिरिधारी -- लेखक,वक्ते, प्रवचनकार* *१९४३: आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३ )**१९४१: अनिल दहिवाडकर -- प्रसिद्ध लेखक व प्रकाशक* *१९४०: लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद**१९३९: डॉ.विश्वास मेहेंदळे -- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते (मृत्यू: ९ जानेवारी २०२३ )**१९२३: गुरूनाथ आबाजी तथा जी.ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७ )**१९२१: असद भोपाली -- भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार (मृत्यू: ९ जून १९९० )**१९१३: पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८ )**१९०३: रामचंद्र भिकाजी जोशी -- प्रवासवर्णनकार, समीक्षक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९१ )**१८८३: दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन -- पहिले भारतीय वैमानिक (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९४३ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: मंगेश तेंडुलकर -- जेष्ठ व्यंगचित्रकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६ )**२००५: जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१ )**१९९५: डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष* *१९८९: प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक (जन्म: ९ जानेवारी १९१८ )* *१९८६: शंकरराव श्रीपाद बोडस -- शास्त्रीय गायक (जन्म: २० एप्रिल १९०० )**१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (जन्म: १८ डिसेंबर १८८७ )**१९६९: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नोकरीची आशा ; पदरी निराशा*राज्यात नोकर भरती नसल्यामुळे सरकारी नोकरी मिळविणे खूपच कठीण बाब बनली आहे. प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळावी म्हणून जीवतोड मेहनत करत असतो. प्रत्येक दिवशी जाहिरातीची प्रतीक्षा करत असतो, एखादी जाहिरात दिसली की तेथे अर्ज करतो आणि परिक्षेसह मुलाखतीची ही तयारी करतो. ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 'या' शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रयत्न - वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून तहसिलदारांना मुक्त करण्याची राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगासमोरच्या सर्व आव्हानाचा नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य भारतात असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाळी अधिवेशनात सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसंत मोरे यांचा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघाचे स्टार जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना आयसीसीने जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार केला जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?*🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे ध्येय सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे, हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० क्रिकेटमधील सर्वात *कंजूष गोलंदाज* ( धावा कमी देणारा ) म्हणून कोणाचे नाव घेतले जाते ?२) भारताचे ३५ वे परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) सर्वाधिक दहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?४) 'झुंज' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?*उत्तरे :-* १) जसप्रीत बुमराह, भारत २) विक्रम मिसरी ३) मोरारजी देसाई ४) लढा, संग्राम, संघर्ष ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तात्रय धुळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, मुखेड👤 युवराज माने, शिक्षक तथा साहित्यिक, अंबाजोगाई👤 दगडू गारकर, साधनव्यक्ती, लातूर👤 नागनाथ वाढवणे, शिक्षक, बिलोली👤 लक्ष्मण मुंडकर, शिक्षक, बिलोली👤 प्रा. संतोषकुमार यशवंतकर, भीर👤 महेश पांडुरंग लबडे, शिक्षक नेते, संभाजीनगर👤 ज्ञानेश्वर जगताप, शिक्षक, उमरी👤 मिलिंद चावरे, शिक्षक, नांदेड👤 प्रा. प्रकाश येलमे, धर्माबाद👤 सुरेश सावरगावकर, धर्माबाद👤 मन्सूर शेख, शिक्षक, नांदेड👤 प्रियंका घुमडे, येवती👤 चरणसिंह चौहान👤 विठ्ठल रामलू चिंचलोड👤 अभिजीत वऱ्हाडे👤 लक्ष्मीकांत पोलादे👤 पिराजी चन्नावार👤 भागवत गर्कल👤 बालाजी दुसेवार, न्यागव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अकह कहन में कहिये कैसा ।आदि ब्रह्म जैसा को तैसा ॥8॥अर्थ – अकह मतलब जो कहने में नहीं आ सकते , अकह जो है आदि पुरुष है (सत्यपुरुष ) जिन्होंने सारी सृष्टि बनायीं है , उन्होंने ने ही आदि शक्ति माता को भी बनाया है , और आदि शक्ति माता और निरंजन जी मिलकर ब्रह्मा ,जी को (रजो गुण ) से , विष्णु जी को (सत्तो गुण ) से और शिव जी को (तमो गुण ) से बनाये उसके बाद से सारी सृष्टि सुरु हुयी।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर परिस्थिती कशीही आली तरी नको त्या ठिकाणी झुकू नये . जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे सदैव आपल्या आठवणीत ठेवावे. संघर्ष हाच मानवी जीवनाचा खरा आधार असतो असे ऐकण्यात आले आहे. म्हणून त्याच संघर्षाच्या आधाराने चालण्याचा प्रयत्न करावे. कारण संघर्षातूनच सर्व काही मिळत असते. व खरे जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे यावर सुद्धा मार्गदर्शक बनून नवी दिशा दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ किंम्मत ❃* एका राजमहालात एक बाईमोलकरीण म्हणुन काम करत असते. तिचा लहान मुलगा ही तिथच तिच्या बरोबर येत असे. एक दिवस त्याला राजमहालात खेळता खेळता हीरा सापडतो , तो मुलगा तो हीरा घेऊन पळत आई कडे जातो. आई बघ मला हीरा सापडला , मोलकरीण हुशार असते , तीला वाटते हा हीरा घेऊन आपण बाहेर नाही जाऊ शकणार , ती मुलाला म्हणते नाही रे काच आहे तो हीरा नाही . असे म्हणुन हीरा बाहेर फेकुन देते . काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हीरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हीरा सोनारा कडे घेऊन जाते. सोनाराला कळत कि हिला हा हीरा सापडला असणार कुठेतरी. हिला काय माहीत हा हीरा च आहे अस म्हणुन; तो तीला म्हणतो हा हीरा नाही ही तर काच आहे.असे म्हणुन तो पण तो हीरा बाहेर फेकुन देतो. जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हीरा घेऊन येतो व जोहरी कडे घेऊन जातो .जोहरी हीरा पाहतो त्याला कळत हा हीरा अनमोल आहे त्याची नियत खराब होते. तो हीरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो काच आहे अस म्हणतो.जसा हीरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात.हे सगळ एक वाटसरु लांबुन पाहत असतो. तो त्या ही-या जवळ येतो आणि त्याला म्हणतो मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकल तेव्हा तु तुटला नाही ,पण आता का तुटला तु ,हीरा म्हणतो जेव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले ते माझी खरी किंमत जाणत नव्हते. परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता, तरी त्याने मला फेकले हा आघात मी सहन करुच शकलो नाही. म्हणुन मी तुटलो. असेच मनुष्याच्या बाबतीत होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमच मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.*_🌀तात्पर्य_ ::~* कधीही आपल्या लोकांचे जराश्या स्वार्था करता मन तोडु नका... आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणस हि-यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://deshdoot.com/teachers-day-blog-by-nagorao-yevatikar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील १९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली. त्याबरोबरच सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.**१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.**१९४९: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना**१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ’ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.**१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: गणपत विलास माखणे -- कवी* *१९९७: प्राजक्ता देशपांडे -- कवयित्री, लेखिका**१९८६: ईश्वरचंद्र व्यंकटराव हलगरे -- लेखक**१९८२: संदीप निवृत्ती गवई -- कवी, लेखक**१९७७: प्रा.गजानन रामचंद्र लोहावे -- लेखक**१९७५: डॉ. सर्जनादित्य मनोहर -- लेखक* *१९७३: प्रा. डॉ. कल्पना मेहरे -- लेखिका**१९६९:सागी लक्ष्मी वेंकटपथी राजू , (वेंकटपथी राजू) -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९६४: डॉ.अनिल मडके-- आरोग्य विषयक लेखक**१९६०: संगीता बिजलानी -- बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती**१९४७: सिद्धार्थ काक-- भारतीय माहितीपट निर्माता,दूरदर्शन निर्माता* *१९४४: अनुराधा शशिकांत वैद्य -- कादंबरीकार, कथाकार, लेखिका (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१६ )**१९४४:तबस्सुम (किरण बाला सचदेव) -- भारतीय कलाकार, ज्येष्ठ अभिनेत्री (मृत्यू: १८ नोव्हेंबर २०२२ )**१९३८: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५ )**१९३३: पन्नालाल प्रेमराज सुराणा -- लेखक* *१९३०: के बालाचंदर -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि नाटककार(मृत्यू: २३ डिसेंबर २०१४ )**१९२५:वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (मृत्यू: १० आक्टोबर १९६४ )**१९२१: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,(मृत्यू: ६ मार्च १९८२ )**१८१९: एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (मृत्यू: ३ आक्टोबर १८६७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:कवी कुमार आझाद-- तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये डॉ. हंसराज बलदेवराजी भूमिकेसाठी प्रसिद्ध भारतीय अभिनेता (जन्म : १२ मे १९७२ )**२०१५: बशर नवाज -- उर्दू कवी (जन्म:१८ ऑगस्ट १९३५ )**२०१४: मनोहर काटदरे -- जेष्ठ नाटककार (जन्म: १६ फेब्रुवारी १९३२ )**२०११: साधनाताई आमटे-- मराठी समाजसेविका,लेखिका (जन्म: ५ मे १९२७ )**२००५: डॉ.रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (जन्म:५ एप्रिल १९२० )**१९९३:संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील सोनिक यांचे निधन* *१९६८: ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (जन्म: २० एप्रिल १८९६ )**१९६७: विष्णू केशव पाळेकर (अप्रबुध्द)-- लेखक, क्रियाशील विचारवंत, चिंतक, प्रज्ञालोक मासिकाचे पहिले संपादक,(जन्म:३१ डिसेंबर १८८७ )* *१९३२: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: ५ जानेवारी १८५५ )**१८५६: अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ ऑगस्ट १७७६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोरोना काळात लिहिलेला व दैनिक देशदूत या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला एक चिंतनीय लेख*" पालकच बनले शिक्षक ...."*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्याला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार जाहीर, येत्या (11 जुलै) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *23 जुलै रोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! पक्ष व तुतारी चिन्हाला दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *23 जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ताकद दाखवून देईल - नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत मोठा निर्णय, जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्या यांची निवड, 27 जुलै पासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 एनिमा म्हणजे काय ? 📕शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'प्रेमाचे प्रतीक'* म्हणून कोणत्या पक्ष्याकडे पाहिले जाते ?२) जून २०२४ मध्ये झालेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्यात एकूण किती सारस आढळले ?३) देशात नवे फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले ?४) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कोण निवडून आले आहेत ?५) वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा मिळण्यासाठी कोणता नंबर डायल करावा लागतो ? *उत्तरे :-* १) सारस २) २५ सारस ३) १ जुलै २०२४ ४) कीर स्टॉर्मर ( लेबर पार्टी ) ५) १०८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश जाधव, साहित्यिक, कोपरगाव👤 साईनाथ विश्वब्रह्म👤 पंडीत पवळे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख, नांदेड👤 अनिल उडतेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है। ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चर्चा किंवा संवाद हा अभिव्यक्तीचा एक मार्ग आहे.कोणत्याही विषयावर चर्चा व्हायलाच पाहिजे. चर्चा कोणत्याही विषयावर का असेना मागे असो किंवा पुढे पण,वेळात, वेळ काढून केली जाते आणि आजच्या घडिला चर्चा करणे आवश्यक आहे. चर्चेतून प्रश्न सोडविले जातात.चर्चामधून एखाद्याला दिशा मिळू शकते.सोबतच एकमेकात संवाद सुद्धा सुरू राहतो. त्याच संवादातून व चर्चेतून काही क्षणासाठी माणूस तणावापासून दूर राहतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ स्वार व त्याचा घोडा ❃* *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. *तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.esakal.com/saptarang/should-we-prefer-primary-school-education-mother-tongue-39069••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील १९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११: रुपयाचे नवीन चिन्ह ( Rs.) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.**२००६: मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९७: बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.**१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ’दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.**१९५४: पंजाब वर राजस्थानला वरदान ठरलेल्या भाकरा नांगल कालव्याचे पंडित नेहरू च्या हस्ते उद्घाटन**१९३०: किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते लंडनमधे ’इंडिया हाऊस’चे उद्घाटन**१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.**१८८९: ’द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.**१८५६: चार्ल्स बर्न याल ’मशिनगन’*चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.**१४९७: वास्को द गामा युरोपातुन भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: अक्षय अंबादास टेमकर -- लेखक**१९८८: जुई गडकरी-- मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री**१९८३: प्रमोद शंकरराव हामंद-- कवी, लेखक* *१९८०: इंद्रजित वीर-- लेखक**१९७८: दत्तात्रय नाथा भापकर-- कवी, लेखक* *१९७८: अमोल अरविंद भावे -- सुप्रसिद्ध मराठी लेखक, निर्माते व दिग्दर्शक**१९७५: प्रा. डॉ. सुनील श्रीराम पवार-- कवी**१९७४: बाळासाहेब राजेसाहेब झोडगे-- कवी**१९७२: सौरव गांगुली –भारताचा माजी क्रिकेट कर्णधार**१९७०: अतुल अग्निहोत्री -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक* *१९६८: भारत केशवराव काळे -- आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक**१९६६: रेवती (जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) -- भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक**१९६२: डॉ.संजय गोविंदराव पोहरकर-- कवी, लेखक (मृत्यू: २२ एप्रिल २०२१ )**१९५८: नीतू कपूर (सिंग )-- भारतीय अभिनेत्री**१९५८: विजया दिपक एंबडवार -- कवयित्री**१९५४: डॉ. राजेश विश्वनाथराव गायकवाड -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: प्रकाश सुकलाल भांडारकर-- लेखक कवी**१९४९: वाय.एस. राजशेखर रेड्डी – आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री (मृत्यू: २ सप्टेंबर २००९ )**१९४४: उषा तांबे -- जेष्ठ मराठी लेखिका* *१९४१: अनिल मोहिले-- ज्येष्ठ संगीतकार(मृत्यू: १ फेब्रुवारी २०१२ )* *१९३०: मधुसूदन नारायण ऊर्फ म. ना. कुलकर्णी -- ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार (मृत्यू: १५ मे २०१८ )**१९२८: श्रीपाद रामचंद्र काळे -- जवळजवळ १२०० कथा व ५० हून अधिक कादंबऱ्यांचं लेखन केले आहे (मृत्यू: १८ जून १९८८ )* *१९२२: अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (मृत्यू: १९ एप्रिल २००९ )**१९१६: गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व. ’गडसम्राट’, ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रेजैत’ या त्यांच्या कादंबर्यांवर चित्रपट निघाले. (मृत्यू: १ जून१९९८ )**१९१४: ज्योति बसू – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ जानेवारी २०१० )**१८३९: जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक (मृत्यू: २३ मे १९३७ )**१७८९: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: सैयद इश्तियाक अहमद जाफरी (सुरमा भोपाली) हास्य अभिनेता (जन्म: २९ मार्च १९३९ )**२०२०: दीनानाथ घारपुरे-- ज्येष्ठ नाट्य,सिने पत्रकार* *२०१०: मधुकरराव चौधरी-- समाजसेवी, गांधीवादी,पूर्व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (जन्म: १५ जून १९१९ )**२००७: चंद्रशेखर-- भारताचे माजी पंतप्रधान (जन्म: १ जुलै १९२१ )**२००६: प्रा.राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८ )**२००३: हरी श्रीधर शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक ( जन्म: २२ जानेवारी १९२० )* *२००१: वसंतराव चांदोरकर-- आग्रा, ग्वाल्हेर, जयपुर घराण्याचे गायक (जन्म: २० जून १९२० )**१९९४: डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ’गोवा पुराभिलेख’चे संचालक* *१९८४: कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )**१९६५: डॉ. कमलाबाई गोपाळराव देशपांडे'-- भारतीय समाजसेविका(जन्म: २२ फेब्रुवारी, १८९८ )**१८३७: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५ )**१६९५: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद् आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध (जन्म: १४ एप्रिल १६२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झालेला लेख ......*मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा आज शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हरे कृष्णा, हरे रामाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा सोहळा थाटात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ, ऊर्जामंत्री फडणवीसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली येथून सुरू झालेली शांतता रॅली आज नांदेडमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद करण्याचा मंदिर समितीचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा झिम्बाब्वेवर दणक्यात विजय, अभिषेक-ऋतुराजच्या खेळींमुळे सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* **************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच *नॅशनल आयकॉन अवॉर्ड* ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे ४६ वे सत्र कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?३) भारतातील पारशी समाज कोणती कालगणना पद्धती उपयोगात आणत असतो ?४) 'झुंबड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) अदिती बोधनकर २) भारत ३) शहेनशाही कालगणना ४) गर्दी, रीघ, थवा ५) पाटलीपुत्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पवार👤 सुरेश तायडे👤 अनिल भेद्रे👤 अहमद काझी👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी👤 मल्लेश भूमन्ना बियानवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है। ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन सुर्यास्त होते म्हणून सुर्योदय होत नाही असे नाही. कारण त्या सूर्याला माहीत असते की, या सृष्टीला माझी आवश्यकता आहे. कोणी त्याला विसरून जातात तर कोणी आठवण करतात. तो कोणालाही दोष न देता आपले कर्तव्य पार पाडत असतो. आपण सूर्य तर होऊ शकत नाही पण या भूमातेवर आपल्याला माणसासारखे अनमोल जीवन मिळाले हेच तर खूप काही आहे. याची प्रत्येकांनी जाणीव ठेवावी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जी माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते, त्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वाने व कामाने सिद्ध होत असते*एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे. खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते. एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला. हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले. मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते. आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले. कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे. ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे. शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल. हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो. मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो. हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे. कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता. शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला. हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते. आणि नंतर ते उडून जातात.*तात्पर्य :- मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/07/which-school-do-you-like.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील १८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.**१९८२: पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.**१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना**१८९२: ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.**१८८५: लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.**१७८५: ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.**१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: रणवीर सिंग( रणवीर सिंग भवनानी) हिन्दी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता**१९८५: श्वेता त्रिपाठी शर्मा -- भारतीय अभिनेत्री**१९८२: अमोल शिवाजीराव सूर्यवंशी -- लेखक**१९७८: मृदुला निळकंठ रायपुरे-जांगडेकर -- लेखिका* *१९७८: तन्वी अमित -- कवयित्री, लेखिका**१९७६: सरला संजय मोते- देशमाने -- लेखिका, कवयित्री* *१९७२: प्रा. डॉ. विशाखा संजय कांबळे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९७०: संजय गंगाराम ठिकाणे-पाटील -- लेखक**१९७०: प्रा. डॉ. संजय केशवराव लाटेलवार -- लेखक* *१९६९: स्मिता बनकर-जाधव -- कवयित्री* *१९६९: प्रा. डॉ. सुनील आनंदराव राठोड-- लेखक**१९६७: ज्योती वामन बन्सोड (पांगुळ) -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६५: अरुंधती नाग -- भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री**१९६१: अशोक शिंदे -- जेष्ठ मराठी अभिनेते**१९५५: राजीव शांताराम शास्त्री-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५२: रेखा शिवकुमार बैजल – जेष्ठ मराठी व हिंदी लेखिका**१९५०: श्रीकांत इंगळहळ्ळीकर -- पर्यावरण अभ्यासक, लेखक* *१९५०: प्रकाश पायगुडे -- स्तंभलेखक, संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०२३ )**१९४६: जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष**१९४३: कालिदास गणपतराव चिंचोळकर -- लेखक* *१९४१: अरविंद नारखेडे -- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९३९: अरविंद प्रभाकर जामखेडकर -- पुरातत्त्वशास्त्रज्ञ व इतिहासकार प्राच्यविद्या पंडित**१९३५: दलाई लामा -- तिबेटी धर्मगुरू* *१९३२: प्राचार्या सिंधूताई मांडवकर -- जेष्ठ लेखिका* *१९३०: मैसूर श्रीनिवास एम.एस. सत्यू -- भारतीय नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी माध्यमांवरील दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नेपथ्यकार**१९३०: डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)**१९२७: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१ )**१९२०: डॉ.विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५ )**१९०५: लक्ष्मीबाई केळकर – लेखिका, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८ )**१९०१: डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी – माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३ )**१८८१: संत गुलाबराव महाराज--महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५ )**१८६२: एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७ )**१८३७: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५ )**१७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: पंडितराव दाजी कुलकर्णी -- ज्येष्ठ उद्योजक (जन्म: ४ जुलै १९२८ )**२००२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२ )**१९९९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९ )**१९९७: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१ )**१९८६: ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८ )**१८५४: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाऊले चालली खाजगी शाळेची वाट*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, प्रत्येक शंकेचे समाधान, अर्थसंकल्पावरील चर्चेअंती अजित पवारांनी मांडली राज्याच्या महसुलाची एकूण एक आकडेवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वाहन फिटनेस सर्टिफिकेट दंड रद्द करून रिक्षा चालकांना दिलासा द्या, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू, मनपा येथे दुचाकी घसरल्याने एकाचा तर बाणेर येथे डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - बालकांच्या सर्वांगीण विकासाला 'बूस्टमायचाईल्ड'ची साथ, कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने शिक्षक-पालकांसाठी विकसित स्टार्टअपला वर्धन ग्रुपची एक कोटीची गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हुजूर पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केला आहे. लेबर म्हणजेच मजूर पार्टी आघाडीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार; कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत! कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांग घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या-औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसीलसारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसाप्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐक्य हेच बळ ते केवळ सुवचन नसून जीवनधर्म आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात पहिले वन सर्वेक्षण केव्हा झाले ?२) विनायक नरहर भावे यांना 'विनोबा' हे नाव कोणी दिले ?३) सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला काय म्हणतात ?४) 'झाड' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो ? *उत्तरे :-* १) सन १९८७ २) महात्मा गांधी ३) पेशी ४) वृक्ष, तरू, पादप, द्रुम ५) सरडा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक इमनेलू, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 आबासाहेब उस्केलवार, केंद्रप्रमुख, धर्माबाद👤 मोहन भूमकर, विषय शिक्षक, धर्माबाद👤 संतोष मानेलू, शिक्षक, धर्माबाद👤 रेवती गायकवाड👤 अभय कासराळीकर, धर्माबाद👤 श्रीकांत पुलकंठवार, धर्माबाद👤 नारायण वानोळे👤 मधुकर कांबळे👤 शंकर सोनटक्के, मा. शिक्षक धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माला फेरत युग गया फिरा ना मनका फेर।कर का मन डारी दे मन का मनका फेर॥5॥अर्थ – यानि हम दुशरो को दिखाते है के हम माला फेर रहे है , लेकिन वो वास्तव में वो एक ढोंग कर रहे है क्यूंकि , सच्ची माला स्वास का होता है , जो आपे आप फिरता है , जो इस माला को जान लिया और फेरने लगा उसका इस संसार के आवागमन से मुक्ति मिल जाती है इसी जाप को ( अजपा का जाप ) कहा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही निसर्गाने दिलेली विशेष देण आहे. त्याच कलेचा योग्य वापर करून प्रचार केल्याने तिचा सन्मान होतोच सोबतच तिच्यामुळे अनेकांना दिशा सुद्धा मिळत असते. पण,त्याच कलेचा स्वार्थापोटी दुरुपयोग केल्याने तिचा अपमान तर होतेच सोबत व्यापार, आणि व्यवसायात तिची गणना केली जाते असे ऐकण्यात आले आहे. म्हणून आपल्या अंगी असलेल्या कलेची पूजा करावी व समाजासाठी तिच्यातून जेवढे योगदान द्यावा वाटते तेवढे द्यावे. पण,तिची गणना व्यापारात किंवा व्यवसायात करु नये.असं केल्याने कलेवर किंवा त्या कलावंतावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुर्खाशी गाठ*एके दिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्हणाला, ''बिरबल, एक प्रश्न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्कीच नसणार तेव्हा मला त्यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे'' बिरबल म्हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्हा त्यांच्या भेटीतून आपल्याला काय निष्पन्न होणार आहे तेव्हा त्यांच्या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्यांना दरबारात जाण्यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्हणाला,'' बादशहा तुम्हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्यावर तो तुम्हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्न विचारेल पण काही केल्या तुम्ही तोंड उघडू नका. एकही शब्द न बोलता गप्प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.'' झाले बिरबलाचे वडील बादशहाच्या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्यांना सलाम केला. बादशहाने त्यांना बिरबलाचे वडील म्हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्हणून त्याने विचारले,'' तुम्हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्पच. त्याने पुन्हा विचारले,'' तुम्ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्न विचारले तरी बिरबलाने सांगितल्याप्रमाणे वडील गप्पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्यांनी हा प्रकार बिरबलाच्या कानावर घातला. बिरबलाने त्यांची समजूत घातली व शांत राहाण्यास सांगितले. चार दिवसांनी जेव्हा बिरबल पुन्हा दरबारात गेला तेव्हा बादशहा बिरबलाला म्हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे तेव्हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्याला म्हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्काळ उत्तरला,''महाराज आपण शांत राहिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्यासारखे झाले.*तात्पर्य :- मुर्खाशी वाद घालू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oNGVfYuXNUHctWJ9/?mibextid=xfxF2i••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील १८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢 •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.**१९९७: स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.**१९९६: संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर**१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात**१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.**१९७५: ’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९७५: ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.**१९६२: अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९५०: इस्रायेलच्या क्वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.**१९१३: किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली.**१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.**१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.**१८११: व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्रा. डॉ. आनंद अहिरे -- कवी, लेखक* *१९८५: राहुल गोविंद निकम -- कवी , लेखक**१९७९: आनंद वासुदेव वाडे-- कवी* *१९७८: मारोती माधव काळबांडे -- कवी, लेखक* *१९७८: प्रा. डॉ. कैलास अंभुरे -- प्रसिद्ध लेखक* *१९७७: नवनाथ विष्णू गडेकर -- कवी* *१९७७: प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे-- देश-विदेशात लोककला पोहोचवणारे**१९७६: मंदा धनराज सुगिरे-- लेखिका, कवयित्री* *१९७३: डॉ स्मिता प्रमोद पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७३: गीता कपूर-- हिंदी चित्रपटांची (बॉलिवूड) कोरियोग्राफर**१९७२: सुरेखा शेषराव बोरकर --- लेखिका**१९६६: प्रा. डॉ. बाबाराव मारोती ठावरी -- लेखक* *१९६३: लक्ष्मण मलगिलवार- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६२: डॉ.साहेब रामराव खंदारे -- कवी, समीक्षक, संपादक* *१९६०: प्रा. डॉ. प्रभावती वाल्मीकराव विहिरे -- कवयित्री, लेखिका**१९५८: अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९५७: अशोक हांडे-- मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार**१९५७: पांडुरंग वसंत कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: डॉ.कैलास शंकरराव कमोद -- लेखक, नाशिकचे अभ्यासक* *१९५४: जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४: नारायण गजीराम थोरात -- कवी**१९५२: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० )**१९४९: पांडुरंग मोरे -- कथाकार* *१९४६: राम विलास पासवान – माजी केंद्रीय मंत्री,आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजीअध्यक्ष (मृत्यू: ८ ऑक्टोबर, २०२० )**१९४३: बाळकृष्ण गणपतराव कवठेकर-- जेष्ठ साहित्यिक व समीक्षक**१९३३:सुरेंद्र आत्माराम गावस्कर -- सूचिकार, संपादक (मृत्यू: १३ जानेवारी १९७९ )**१९२९: रोहिणी गवाणकर -- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक , लेखिका* *१९२५:नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ८ आक्टोबर २०१२ )**१९२०: आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६ )**१९१६: के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २०१० )**१९१२: दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे--- पत्रकार, कथाकार, विनोदकार, अनुवादक(मृत्यू: ६ ऑगस्ट १९८३ )**१८८२: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७ )*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: तुळशी परब-- कवी (जन्म: ३० सप्टेंबर १९४१ )**२००५: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४ )**१९९६: चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – प्रसिद्ध रहस्यकथाकार(जन्म: ९ जून १९०६ )* *१९४५: विष्णुपंत गोविंद दामले -- भारतीय प्रॉडक्शन डिझायनर, सिनेमॅटोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि ध्वनी अभियंता (जन्म: १४ ऑक्टोबर१८८२ )**१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रिया देशांच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जातीय जनगणना झाली तर आरक्षणाचा प्रश्न सुटेल – खासदार अमोल कोल्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यावर घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिव्य दर्शन; सासवड मुक्कामानंतर पालखी पंढरपूरकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आरोग्यसंपन्न भारताकरिता अतिरुद्र महायाग, वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह 65 ब्रह्मवृंदांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप, CM शिंदे म्हणाले- निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर ! टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देऊन गौरवण्यात येणार, शिंदे सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅**************************रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं सुंदर विचारांची असतात, ती अंधारातही चमकणाऱ्या काजव्यांसारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे ?२) कोणत्या संघाने महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विश्वविक्रम केला आहे ?३) कोणता देश पशुधन कार्बन उत्सर्जनावर टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?४) 'ज्येष्ठ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतः भोवती कडे असणारा ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) विश्वनाथन आनंद, भारत २) भारत ( ६०३ धावा, द. आफ्रिका विरुध्द ) ३) डेन्मार्क ४) मोठा, वरिष्ठ ५) शनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुधाकर चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर कांबळे, आलूर, धर्माबाद👤 सुदर्शन जावळे पाटील👤 डॉ. मनोज तानुरकर, स्वाक्षरी तज्ञ, धर्माबाद👤 मारोती कदम, स्तंभलेखक, नांदेड👤 विजयप्रकाश पाटील गाडीवान👤 नागनाथ भत्ते, मोबाईल टीचर, धर्माबाद👤 चक्रधर ढगे पाटील, बिलोली👤 सुभाष कुलकर्णी👤 गणपत बडूरकर, मा. शिक्षक, धर्माबाद👤 संभाजी कदम👤 अनिल गायकांबळे👤 किशन कवडे👤 संतोष शेळके, साहित्यिक👤 गजानन बुद्रुक, हिंगोली👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद👤 फारुख शेख👤 नरेश शिलारवार, धर्माबाद👤 गिरीश कहाळेकर, नांदेड👤 अजय चव्हाण👤 रमेश अबुलकोड, विमा प्रतिनिधी, धर्माबाद👤 अशोक पाटील👤 राजरेड्डी बोमनवाड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माला फेरत युग गया फिरा ना मनका फेर।कर का मन डारी दे मन का मनका फेर॥5॥अर्थ – यानि हम दुशरो को दिखाते है के हम माला फेर रहे है , लेकिन वो वास्तव में वो एक ढोंग कर रहे है क्यूंकि , सच्ची माला स्वास का होता है , जो आपे आप फिरता है , जो इस माला को जान लिया और फेरने लगा उसका इस संसार के आवागमन से मुक्ति मिल जाती है इसी जाप को ( अजपा का जाप ) कहा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसा फेको,तमाशा देखो या प्रकारची म्हण समाजात प्रचलीत आहे. कदाचित हे, खरे असावे म्हणूनच आजही अनेकांच्या मुखातून नेहमीच ऐकायला मिळत असते. जीवन जगत असताना आवश्यक ठिकाणी पैशाने व्यवहार सुध्दा करावा लागतो. पण प्रत्येक ठिकाणी किंवा काही मिळविण्यासाठी पैसे देणे, घेणे आवश्यक असते का. .? एकदा हाच प्रश्न आपल्या मनाला विचारून बघावा. अनेकदा याच प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडून योग्य मिळेलच असेही नाही त्यासाठी स्वतः च्या मनाला विचारून बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाहय देखावा आणि सौंदर्य*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.*तात्पर्य*-बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EBUZQqR5irXBijYQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_जागतिक फणस दिन_* 🛑 🛑 *_ या वर्षातील १८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.**१९९७: ’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.**१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान**१९४७: ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.**१९४६: सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९३६: ’अमरज्योती’ हा ’प्रभात’ चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.**१८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचे निधन झाले.**१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: गोविंद दत्ताराम कवळे -- कवी**१९८०: संजय माणिक राठोड-- कवी, लेखक**१९७६:सुरेश बाब्या राठोड-- चित्रकार, लेखक**१९७३: वृषाली सानप-काळे -- मराठी आणि हिंदी भाषेतून लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७०: शिल्पा देवळेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६९: प्रतिभा सिन्हा -- भारतीय अभिनेत्री* *१९६८: डॉ. वाल्मीक हिरामण अहिरे -- लेखक, समीक्षक**१९६६: डॉ. प्रभाकर शेळके -- कवी, कथाकार* *१९६५: रमेश पांडुरंग तांबे -- लेखक, कवी* *१९६०: देवेंद्र भुजबळ -- लेखक, संपादक तथा माजी माहिती संचालक* *१९५९: नीना गुप्ता -- हिंदी चित्रपट अभिनेत्री , टीव्ही कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता* *१९५६: डॉ.संजीवनी मुळे -- लेखिका, कवयित्री**१९५४: डॉ सुनंदा देशपांडे -- लेखिका* *१९४९: जोगिंदर शेली -- अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गायक, गीतकार आणि वितरक (मृत्यू: १५ जून २००९ )**१९४८: योगिनी वेंगुर्लेकर -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४७: गणेश आप्पासाहेब धांडगे -- कादंबरीकार कथाकार* *१९४७: डॉ.आनंद पाटील -- जेष्ठ साहित्यिक**१९४४: पंडित प्रभाकर कारेकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९३३: डॉ.अरविंद वामन कुलकर्णी -- प्रख्यात समीक्षक,लेखक,कवी (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००३ )**१९२८: जयराम आचार्य -- प्रसिद्ध भारतीय सितार वादक (मृत्यू: ५ एप्रिल २०१७ )**१९२८: पंडितराव कुलकर्णी -- ज्येष्ठ उद्योगपती ( मृत्यू: ६ जुलै २०२०)**१९२६: विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक (मृत्यू: १७ एप्रिल २०११ )**१९१४: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ –भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७ )**१९१२: पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४ )**१९११: विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख -- हार्मोनिअम वादक, गायक (मृत्यू: ६ एप्रिल १९८१ )**१८९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू: १५ जानेवारी १९९८ )**१८९०: नारायण केशव बेहेरे -- कवी, कादंबरीकार काव्य समीक्षक (मृत्यू: १९ जानेवारी १९५८ )**१८९०: क्षमादेवी राघवेंद्र राव -- संस्कृत भाषातज्ज्ञ (मृत्यू,:२४ एप्रिल:१९५४ )**१८७२: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३ )**१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९ )**१९८२: भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: ६ जानेवारी १९१८ )**१९८०: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.(जन्म: २४ एप्रिल १८९६ )**१९६३: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म:२ ऑगस्ट १८७६ )**१९३४: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७ )**१९०२: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.(जन्म: १२ जानेवारी १८६३ )**१८३१: जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८ )**१८२६: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३ )**१८२६: जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " सरकारी शाळेची कथा "..... पूर्ण लघुकथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची मागणी केल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांचा तलाठ्यासह अधिकारी व दलालांना इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जनतेने अपप्रचाराला नाकारून विश्वासाच्या राजकारणाला निवडले - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हाथरस दुर्घटनेत बळींची संख्या १२१ वर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सेन्सेक्सने पार केला ८० हजारचा टप्पा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावातीबाबत धोरण ठरवणार - पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 विश्वकप विजेता टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हरभजन सिंह*आपल्या जादूही फिरकीने भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारा आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडविणारा भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू हरभजनसिह याचा 3 जुलै हा वाढदिवस.अगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.इ.स. २००६ ते इ.स. २००८ चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.2009 हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. डो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आदिमानव ही मानवाची प्रजाती प्रथम कोणत्या खंडात अस्तित्वात आली ?२) *जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस* केव्हा साजरा केला जातो ?३) शेअर बाजाराची सुरुवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?४) 'जीर्ण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्राम्होस क्षेपणास्त्र विकत घेतले आहे ?*उत्तरे :-* १) आफ्रिका खंड २) ३ जुलै ३) नेदरलँड ४) जुने ५) फिलिपाईन्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कवी गोविंद कवळे, उमरी👤 श्रीपाद जोशी येवतीकर👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक👤 कमलाकर जमदाडे, बिलोली👤 राजकुमार बिरादार👤 बंडू आंबटकर, कोल्हापूर👤 गणेश मंडाळे👤 बालाजी मदनलवार👤 परमेश्वर मेहेत्रे👤 अविनाश खोकले👤 श्याम उपरे👤 प्रदीप यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माटी कहे कुम्भार से तू क्यों रौदे मोए। एक दिन ऐसा आएगा मै रौंदूंगी तोए॥4॥अर्थ – माटी कुम्भार से कहता है जिस प्रकार तुम मुझे रौद रहे हो एक दिन ऐसा आएगा जिस दिन मई तुम्हे रौंदूंगी ( जब इंसान मरता है तो उसकी शरीर जो मिटटी से ही बनी है वो वापस मिटटी में ही मिल जाती है ) इसी को मिटटी कहता है , के आज इस अभिमान को छोड़ दो क्यूंकि एक दिन तुमको भी मुझ में ही मिल जाना है यानि मिटटी में।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या समाधानासाठी आपण कितीही चांगले काम केले किंवा त्याच प्रकारची वागणूक ठेवून जरी जगून दाखवले तरी समोरच्या व्यक्तीला समाधान होईलच असे नाही. कारण, प्रत्येकांकडेच समाधान या नावाची संपत्ती नसते. म्हणून आपल्याला काय वाटते आपणच ठरवावे. दुसऱ्यांचे समाधान करताना थोडे स्वतः च्या विषयी विचार करावे शेवटी स्वतःलाच जगावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे**त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून**विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण* *वर्षभर काय केले याची आहे.मी आज काय करतो याची नाही.**तात्पर्यः* *"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.**एका दिवसात यश प्राप्त होत नाही. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/7jsB5HcWmR3niU3Z/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_विश्व यूएफओ दिवस_* *_ या वर्षातील १८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.**१९९४:चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड**१९८३:कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.**१९८१:माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य इन्फोसिस या कंपनीची स्थापना**१९७२:भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्या केल्या.**१९६२:रॉजर्स,आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.**१८५०:बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल**१८६५:’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:विशाल देवतळे-- कवी,लेखक* *१९७९:प्रवीण हरिभाऊ चव्हाण-- लेखक**१९७६:प्रा.दिवाकर विश्राम सदांशिव-- लेखक* *१९७३:राजेश रेवले -- कवी* *१९७०:प्रा.डॉ.अनिल शंकरराव काळबांडे-- कवी,लेखक,संपादक* *१९६८:महेंद्र पुंडलिक ताजने-- कवी लेखक**१९६७:किशोर रामराव खेडेकर-- लेखक**१९६५:श्याम ऊर्फ अनंत दत्तात्रय पेठकर-- प्रसिद्ध लेखक,वऱ्हाडी भाषेतील स्तंभ,नाटके, कथा,कवितांचेही सातत्याने लेखन**१९६१:शंकर सीताराम चव्हाण-- लेखक**१९६१:डॉ.गिरीश जखोटिया -- प्रसिद्ध विचारवंत,लेखक**१९६१:प्रदीप निफाडकर-- प्रसिद्ध गझलकार,कवी,लेखक* *१९६०:सतीश सुरवसे--प्रसिद्ध कथाकार**१९५९:विजयालक्ष्मी विजय देवगोजी-- लेखिका* *१९५८:पवन मल्होत्रा-- भारतीय अभिनेता**१९५४:मोहम्मद अझीझ-- भारतीय बहुभाषिक पार्श्वगायक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१८)**१९५०:अपर्णा आनंद पाटणकर-- लेखिका, कवयित्री**१९५०:काशीराम लक्ष्मण चिंचय --कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर(मृत्यू:१४ जानेवारी २०२२)**१९४४:अरुण गोडबोले-- जेष्ठ कवी,चित्रपट निर्मिती* *१९३३:मधुकर टिल्लू -- मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे ज्येष्ठ कलावंत(मृत्यू:१ जून २०००)**१९३०:कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष**१९२५:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)**१९२३:जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी माजी मंत्री(मृत्यू:२५ नोव्हेंबर १९९७)**१९२२:मोहम्मद फजल-- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल(मृत्यू :४ सप्टेंबर २०१४)*.*१९२२:पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर**१९१६:वामन शिवराम आपटे--कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक(मृत्यू:९ ऑगस्ट १९९२)**१९०४:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू:१२ आक्टोबर १९९६)**१८६५:कृष्णाजी लक्ष्मण सोमण-- कवी, नाटककार (मृत्यू:२५ मे १९९८)**१८८०:गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक,’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू:२३ डिसेंबर १९६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:लीलाधर कांबळी-- मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते(जन्म:९ मे १९३७)**२०१७:प्रा.मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल-- मराठी लेखक,अनुवादक, रूपांतरकार,नाट्यलेखक,निर्माता,दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते (जन्म:२४ जुलै १९३२)**२०११:चतुरानन मिश्रा – माजी केंद्रीय कृषी मंत्री,कामगार नेते,कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म:७ एप्रिल १९२५)**२००७:दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म:८ ऑगस्ट १९४०)**१९९९:मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म:१५ आक्टोबर १९२०)**१९७२:महेश कौल -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि अभिनेता(जन्म:१० एप्रिल १९११)**१९५०:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म:२३ सप्टेंबर १९०३)**१८४३:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म:१० एप्रिल १७५५)**१७७८:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म:२८ जून १७१२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे पत्र हरवले ........!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 30 ते 31 रुपयाची कपात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघातप्रवण क्षेत्रात 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेश बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘एक रुपयात पिक विमा योजना’, सेवा केंद्र चालकांनी अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार करण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई 'पदवीधर'मधून अनिल परब विजयी : 'शिक्षक'मधून अभ्यंकर; भाजपचे निरंजन डावखरे यांनी कोकणचा गड राखला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काँग्रेसच्या वतीने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी, विधान परिषदेची उमेदवारी जाहीर; मागील वेळी झाली होती बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दोन वर्षानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकसंख्या* 📙साऱ्या जगाच्या पाठीवर लोकसंख्यावाढीचे भूत आरूढ झालेले आहे. अनेक भेडसावणारे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत व ते वाढतच जाणार आहेत. भल्याभल्यांची मती यामुळे कुंठित झाली आहे. भारताची प्रगती खूप झाली, अन्नधान्य उत्पादन वाढले, कारखानदारी वाढली; पण हे सर्व आज महाप्रचंड लोकसंख्येने कुठेतरी पार गिळुन टाकले आहे.पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पट वाढली. दर हजारी मृत्यूचे प्रमाण घटत गेले, साथीचे आजार आटोक्यात आले, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले व बाळंतपणात मृत्यू ओढवून अकाली निधनाचे प्रमाण स्त्रियांत अल्प राहिले. याउलट जन्मप्रमाण मात्र तेवढेच राहिल्याने अत्यंत झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्यावाढीमध्ये आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो. प्रजननक्षम जोडप्यांची संख्या वाढते, तसे वाढीचे प्रमाण वाढत जाते.लोकसंख्यावाढीचा प्रमुख सिद्धांत माल्थस यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत असते. यामुळेच अनेक शतके स्थायी असलेली लोकसंख्या १७५० साली जगभर वाढू लागली. या वाढीवर आरोग्यादायी सेवांचा अनुकूल परिणाम झाल्याने आज ७०० कोटींचा आकडा जगाने पार केला आहेच. लोकसंख्येच्या बाबतीत जगाचे उत्तर व दक्षिण असे उघडउघड मतभेद झालेले आढळतात. उत्तरेकडचे सर्व देश हे सध्या स्थिर लोकसंख्या असलेले बरेचसे प्रगत व प्रजननक्षम जोडप्यांना 'शिक्षित' करण्यात यशस्वी झालेले आढळतात. अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय असल्याशिवाय घरात मूल जन्माला येऊ न देणे हे त्यांनी पटवून घेतले आहे.याउलट जन्माला येणारे मूल जगेल, मोठे होईल याची दक्षिणेकडील अप्रगत, आर्थिकद्रुष्ट्या मागास देशांना खात्री नसते. श्रमाची किंमतच त्यांना माहित असल्याने अधिक मुले म्हणजे श्रम करण्यासाठी अधिक हात, याच समीकरणाचा गोंधळ त्यांच्या डोक्यातून निघत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया व मध्य आशिया हा साराच भाग दक्षिणेचा म्हणून मोडतो.लोकसंख्या मोजणे हा एक शास्त्रीय भाग आहे. जनगणना वा सेन्सस दर दहा वर्षांनी केली जाण्याची गेल्या शतकातील पद्धत आहे. शक्यतोवर एकाच दिवशी साऱ्या देशातली पाहणी व मोजणी करून मग त्याची आकडेवारी एकत्र केले जाते. जनगणनेची पद्धत अमेरिकेत प्रथम १७९० साली वापरली गेली; पण जनगणनेचा वापर व उपयोग शास्त्रोक्तदृष्ट्या होतो, अशा नोंदी प्राचीन चिनी उल्लेखातसुद्धा आढळतात.२०१८ च्या जनगणनेनुसार भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे १.३५ अब्ज इतकी आहे. दर हजारी पुरुषसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त ९३३ आहे. प्रजननक्षम जोडप्यांचा जननदर म्हणजेच फर्टिलिटी रेट २.७ इतका आहे. तो २.१ पर्यंत खाली आणण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे लोकसंख्यावाढीवर आपण नियंत्रण आणू शकू. एक वर्षाच्या आत होणारे बालमृत्यू इन्फंट मॉरटॅलिटी या नावाने ओळखले जातात. त्यांचा आकडा दर हजारी ३०.१५ इतका मोठा आहे. गरोदरपणातून व बाळंतपणाच्या संदर्भातील आजारातून होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाणही एक लाखामागे ४४० आहे. तसेच स्त्रियांमधील साक्षरता आजही बहुतांश राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळते. या साऱ्या आकड्यांना अपवाद फक्त केरळ या राज्याचा. भारतातील वृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के भरते. २० वर्षांखालील व्यक्तींची सध्या संख्या सुमारे ४८ टक्के आहे. यामुळेच सर्वात जास्त तरुण असलेले मोठे राष्ट्र म्हणून आपण २०३० साली मिरवू शकू.लोकसंख्या स्थिर असणे व कमी होणे हा प्रकार जगातील सर्व प्रगत देशात गेली २५ वर्षे घडत आहे. याचे विश्लेषण मात्र अनेक पद्धतीने केले जाते. युरोपमधून अमेरिकेत व जगभर युरोपियन सतत जात राहिले, अन्यथा युरोपमध्ये संख्याविस्फोट झाला असता, असेही काही तज्ज्ञ म्हणतात. यासाठी ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारतातील ब्रिटिश वसाहती यांची एकत्रित आकडेवारी मांडतात. नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या कमी होत आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, भारतातच काय पण जगातही लोकसंख्या सतत वाढत गेली, तर तिला पुरेसे अन्न पुरवणे व गरजा भागवणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कठीणच आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोने होते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या पहिल्या महिलेचे नाव काय आहे ?२) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?३) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?४) 'जिन्नस' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ऑक्सीजनच्या सिलेंडरची मदत न घेता एव्हरेस्ट सर करणारे देशातील पहिले डॉक्टर दांपत्य कोण ? *उत्तरे :-* १) सुजाता सौनिक २) वसंतराव नाईक ३) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ४) पदार्थ ५) डॉ. हेमंत लुवा व डॉ. शुबिबेन लुवा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित दगडगावे, शिक्षक, धर्माबाद👤 विक्रांत दलाल, नांदेड👤 शैलेश तराळे👤 सतिश अवधूतवार, बोधन👤 चिमणाजी हिवराळे👤 वसंत घोगरे पाटील, संस्थापक, मानव विकास सेवाभावी संस्था👤 श्रीनिवास पुल्लावार👤 शिवानंद चौगुले, पुणे👤 मारोती जाधव👤 जेजेराव सोनकांबळे👤 गोपाळ पामसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्लभ मनुष्य जनम है देह न बारम्बार।तरुवर ज्यों पति झड़े बहुरि न लागे डार ॥1॥अर्थ – मनुष्य का जन्म बहुत ही दुर्लभ है मनुष्य का जन्म पाना बहुत ही भाग्य का बात है। जिस प्रकार डाल से पत्ता टूट कर गिरने के बाद वापस डाल पर नहीं लगता उसी प्रकार मनुष्य का जन्म भी दुबारा बिना सत्कर्म और भजन बिना नहीं मिलता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे लाल गर्द टोमॅटो भाजीत टाकल्याशिवाय भाजीला रंग येत नाही. तसंच कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्या दोघात किती ताकद असते त्यांचा उपयोग केल्यावरच त्यांचे महत्व कळत असते. म्हणूनच आपल्या जीवनात सुध्दा येणारे चांगले, वाईट प्रसंग आपली परीक्षाच घेण्यासाठी येत असतात असेही नाही तर ते,खूप काही शिकायला सुद्धा भाग पाडत असतात म्हणून त्यांना कंटाळून न जाता सदैव त्यांचे स्वागत करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ संत बहिणाबाई ❃* बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला, "मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.*तात्पर्य :- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)