✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.wordpress.com/2019/11/17/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔴 *_मातृसुरक्षा दिन_* 🔴 *_ या वर्षातील १९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ’मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर**२०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.**१९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता**१९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण**१९९२: मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.**१९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.**१९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.**१९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.**१९७३: बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२: ’टेलस्टार-१’ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित**१९४७: ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.**१९४०: 'बॅटल् ऑफ ब्रिटन' या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉबफेक सुरू केली. इंग्लिश हवाईदलाने जर्मनांचा यशस्वी प्रतिकार केला.**१९२५:’तास’ या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना**१९२३: मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.**१८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: अंतरा मित्रा-- भारतीय पार्श्वगायिका**१९८२: एकनाथ विश्वनाथ पवार -- कवी, लेखक व चित्रपट गीतकार**१९८२: शंकर अभिमान कसबे -- नवोदित कवी,नियतकालिकांतून लेखन**१९८०: युवराज भुजंगराव माने -- लेखक* *१९८०: प्रा. डॉ. सखाराम डाखोरे -- कवी* *१९७८: सचिन वसंत पाटील -- प्रसिद्ध कथाकार* *१९७३: प्रा. डॉ. मारोती दशरथ कसाब -- कवी , लेखक**१९६८: अंबादास केदार -- कथाकार* *१९६२: सुभाष प्रभाकर सबनीस -- लेखक, कवी**१९५९: तुकाराम पुंडलिक खिल्लारे -- कवी**१९५४: रविराज गंधे -- माध्यमतज्ज्ञ, लेखक-पत्रकार**१९५१: राजनाथ सिंह -- केंद्रिय संरक्षणमंत्री उतर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५०: ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका**१९४९:सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर – प्रसिद्ध क्रिकेटपटू व समालोचक तथा लेखक**१९४७: ल. म. कडू -- चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक* *१९४५: स्मिता भागवत -- लेखिका**१९४४: डॉ.भास्कर व्यंकटराव गिरिधारी -- लेखक,वक्ते, प्रवचनकार* *१९४३: आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३ )**१९४१: अनिल दहिवाडकर -- प्रसिद्ध लेखक व प्रकाशक* *१९४०: लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद**१९३९: डॉ.विश्वास मेहेंदळे -- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते (मृत्यू: ९ जानेवारी २०२३ )**१९२३: गुरूनाथ आबाजी तथा जी.ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७ )**१९२१: असद भोपाली -- भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार (मृत्यू: ९ जून १९९० )**१९१३: पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८ )**१९०३: रामचंद्र भिकाजी जोशी -- प्रवासवर्णनकार, समीक्षक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९१ )**१८८३: दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन -- पहिले भारतीय वैमानिक (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९४३ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: मंगेश तेंडुलकर -- जेष्ठ व्यंगचित्रकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६ )**२००५: जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१ )**१९९५: डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष* *१९८९: प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक (जन्म: ९ जानेवारी १९१८ )* *१९८६: शंकरराव श्रीपाद बोडस -- शास्त्रीय गायक (जन्म: २० एप्रिल १९०० )**१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (जन्म: १८ डिसेंबर १८८७ )**१९६९: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नोकरीची आशा ; पदरी निराशा*राज्यात नोकर भरती नसल्यामुळे सरकारी नोकरी मिळविणे खूपच कठीण बाब बनली आहे. प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळावी म्हणून जीवतोड मेहनत करत असतो. प्रत्येक दिवशी जाहिरातीची प्रतीक्षा करत असतो, एखादी जाहिरात दिसली की तेथे अर्ज करतो आणि परिक्षेसह मुलाखतीची ही तयारी करतो. ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 'या' शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रयत्न - वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतून तहसिलदारांना मुक्त करण्याची राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेची सरकारकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगासमोरच्या सर्व आव्हानाचा नजरेला नजर देण्याचं सामर्थ्य भारतात असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाळी अधिवेशनात सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसंत मोरे यांचा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला अटक, मदत करणारे 12 जण ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघाचे स्टार जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना आयसीसीने जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार केला जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?*🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे ध्येय सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे, हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० क्रिकेटमधील सर्वात *कंजूष गोलंदाज* ( धावा कमी देणारा ) म्हणून कोणाचे नाव घेतले जाते ?२) भारताचे ३५ वे परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) सर्वाधिक दहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?४) 'झुंज' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?*उत्तरे :-* १) जसप्रीत बुमराह, भारत २) विक्रम मिसरी ३) मोरारजी देसाई ४) लढा, संग्राम, संघर्ष ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तात्रय धुळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, मुखेड👤 युवराज माने, शिक्षक तथा साहित्यिक, अंबाजोगाई👤 दगडू गारकर, साधनव्यक्ती, लातूर👤 नागनाथ वाढवणे, शिक्षक, बिलोली👤 लक्ष्मण मुंडकर, शिक्षक, बिलोली👤 प्रा. संतोषकुमार यशवंतकर, भीर👤 महेश पांडुरंग लबडे, शिक्षक नेते, संभाजीनगर👤 ज्ञानेश्वर जगताप, शिक्षक, उमरी👤 मिलिंद चावरे, शिक्षक, नांदेड👤 प्रा. प्रकाश येलमे, धर्माबाद👤 सुरेश सावरगावकर, धर्माबाद👤 मन्सूर शेख, शिक्षक, नांदेड👤 प्रियंका घुमडे, येवती👤 चरणसिंह चौहान👤 विठ्ठल रामलू चिंचलोड👤 अभिजीत वऱ्हाडे👤 लक्ष्मीकांत पोलादे👤 पिराजी चन्नावार👤 भागवत गर्कल👤 बालाजी दुसेवार, न्यागव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अकह कहन में कहिये कैसा ।आदि ब्रह्म जैसा को तैसा ॥8॥अर्थ – अकह मतलब जो कहने में नहीं आ सकते , अकह जो है आदि पुरुष है (सत्यपुरुष ) जिन्होंने सारी सृष्टि बनायीं है , उन्होंने ने ही आदि शक्ति माता को भी बनाया है , और आदि शक्ति माता और निरंजन जी मिलकर ब्रह्मा ,जी को (रजो गुण ) से , विष्णु जी को (सत्तो गुण ) से और शिव जी को (तमो गुण ) से बनाये उसके बाद से सारी सृष्टि सुरु हुयी।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर परिस्थिती कशीही आली तरी नको त्या ठिकाणी झुकू नये . जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे सदैव आपल्या आठवणीत ठेवावे. संघर्ष हाच मानवी जीवनाचा खरा आधार असतो असे ऐकण्यात आले आहे. म्हणून त्याच संघर्षाच्या आधाराने चालण्याचा प्रयत्न करावे. कारण संघर्षातूनच सर्व काही मिळत असते. व खरे जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे यावर सुद्धा मार्गदर्शक बनून नवी दिशा दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ किंम्मत ❃* एका राजमहालात एक बाईमोलकरीण म्हणुन काम करत असते. तिचा लहान मुलगा ही तिथच तिच्या बरोबर येत असे. एक दिवस त्याला राजमहालात खेळता खेळता हीरा सापडतो , तो मुलगा तो हीरा घेऊन पळत आई कडे जातो. आई बघ मला हीरा सापडला , मोलकरीण हुशार असते , तीला वाटते हा हीरा घेऊन आपण बाहेर नाही जाऊ शकणार , ती मुलाला म्हणते नाही रे काच आहे तो हीरा नाही . असे म्हणुन हीरा बाहेर फेकुन देते . काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हीरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हीरा सोनारा कडे घेऊन जाते. सोनाराला कळत कि हिला हा हीरा सापडला असणार कुठेतरी. हिला काय माहीत हा हीरा च आहे अस म्हणुन; तो तीला म्हणतो हा हीरा नाही ही तर काच आहे.असे म्हणुन तो पण तो हीरा बाहेर फेकुन देतो. जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हीरा घेऊन येतो व जोहरी कडे घेऊन जातो .जोहरी हीरा पाहतो त्याला कळत हा हीरा अनमोल आहे त्याची नियत खराब होते. तो हीरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो काच आहे अस म्हणतो.जसा हीरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात.हे सगळ एक वाटसरु लांबुन पाहत असतो. तो त्या ही-या जवळ येतो आणि त्याला म्हणतो मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकल तेव्हा तु तुटला नाही ,पण आता का तुटला तु ,हीरा म्हणतो जेव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले ते माझी खरी किंमत जाणत नव्हते. परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता, तरी त्याने मला फेकले हा आघात मी सहन करुच शकलो नाही. म्हणुन मी तुटलो. असेच मनुष्याच्या बाबतीत होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमच मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.*_🌀तात्पर्य_ ::~* कधीही आपल्या लोकांचे जराश्या स्वार्था करता मन तोडु नका... आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणस हि-यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://deshdoot.com/teachers-day-blog-by-nagorao-yevatikar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील १९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली. त्याबरोबरच सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.**१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.**१९४९: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना**१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ’ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.**१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.*🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: गणपत विलास माखणे -- कवी* *१९९७: प्राजक्ता देशपांडे -- कवयित्री, लेखिका**१९८६: ईश्वरचंद्र व्यंकटराव हलगरे -- लेखक**१९८२: संदीप निवृत्ती गवई -- कवी, लेखक**१९७७: प्रा.गजानन रामचंद्र लोहावे -- लेखक**१९७५: डॉ. सर्जनादित्य मनोहर -- लेखक* *१९७३: प्रा. डॉ. कल्पना मेहरे -- लेखिका**१९६९:सागी लक्ष्मी वेंकटपथी राजू , (वेंकटपथी राजू) -- माजी भारतीय क्रिकेटपटू**१९६४: डॉ.अनिल मडके-- आरोग्य विषयक लेखक**१९६०: संगीता बिजलानी -- बॉलीवूड अभिनेत्री आणि १९८० मधील मिस इंडिया विजेती**१९४७: सिद्धार्थ काक-- भारतीय माहितीपट निर्माता,दूरदर्शन निर्माता* *१९४४: अनुराधा शशिकांत वैद्य -- कादंबरीकार, कथाकार, लेखिका (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१६ )**१९४४:तबस्सुम (किरण बाला सचदेव) -- भारतीय कलाकार, ज्येष्ठ अभिनेत्री (मृत्यू: १८ नोव्हेंबर २०२२ )**१९३८: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५ )**१९३३: पन्नालाल प्रेमराज सुराणा -- लेखक* *१९३०: के बालाचंदर -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि नाटककार(मृत्यू: २३ डिसेंबर २०१४ )**१९२५:वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (मृत्यू: १० आक्टोबर १९६४ )**१९२१: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,(मृत्यू: ६ मार्च १९८२ )**१८१९: एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (मृत्यू: ३ आक्टोबर १८६७ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:कवी कुमार आझाद-- तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये डॉ. हंसराज बलदेवराजी भूमिकेसाठी प्रसिद्ध भारतीय अभिनेता (जन्म : १२ मे १९७२ )**२०१५: बशर नवाज -- उर्दू कवी (जन्म:१८ ऑगस्ट १९३५ )**२०१४: मनोहर काटदरे -- जेष्ठ नाटककार (जन्म: १६ फेब्रुवारी १९३२ )**२०११: साधनाताई आमटे-- मराठी समाजसेविका,लेखिका (जन्म: ५ मे १९२७ )**२००५: डॉ.रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (जन्म:५ एप्रिल १९२० )**१९९३:संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील सोनिक यांचे निधन* *१९६८: ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (जन्म: २० एप्रिल १८९६ )**१९६७: विष्णू केशव पाळेकर (अप्रबुध्द)-- लेखक, क्रियाशील विचारवंत, चिंतक, प्रज्ञालोक मासिकाचे पहिले संपादक,(जन्म:३१ डिसेंबर १८८७ )* *१९३२: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: ५ जानेवारी १८५५ )**१८५६: अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ ऑगस्ट १७७६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोरोना काळात लिहिलेला व दैनिक देशदूत या वृत्तपत्रात प्रकाशित झालेला एक चिंतनीय लेख*" पालकच बनले शिक्षक ...."*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई : महाराष्ट्र राज्याला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार जाहीर, येत्या (11 जुलै) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *23 जुलै रोजी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! पक्ष व तुतारी चिन्हाला दिली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *23 जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज ताकद दाखवून देईल - नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत मोठा निर्णय, जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्या यांची निवड, 27 जुलै पासून भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 एनिमा म्हणजे काय ? 📕शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'प्रेमाचे प्रतीक'* म्हणून कोणत्या पक्ष्याकडे पाहिले जाते ?२) जून २०२४ मध्ये झालेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्ह्यात एकूण किती सारस आढळले ?३) देशात नवे फौजदारी कायदे केव्हापासून लागू झाले ?४) ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कोण निवडून आले आहेत ?५) वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा मिळण्यासाठी कोणता नंबर डायल करावा लागतो ? *उत्तरे :-* १) सारस २) २५ सारस ३) १ जुलै २०२४ ४) कीर स्टॉर्मर ( लेबर पार्टी ) ५) १०८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश जाधव, साहित्यिक, कोपरगाव👤 साईनाथ विश्वब्रह्म👤 पंडीत पवळे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख, नांदेड👤 अनिल उडतेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है। ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चर्चा किंवा संवाद हा अभिव्यक्तीचा एक मार्ग आहे.कोणत्याही विषयावर चर्चा व्हायलाच पाहिजे. चर्चा कोणत्याही विषयावर का असेना मागे असो किंवा पुढे पण,वेळात, वेळ काढून केली जाते आणि आजच्या घडिला चर्चा करणे आवश्यक आहे. चर्चेतून प्रश्न सोडविले जातात.चर्चामधून एखाद्याला दिशा मिळू शकते.सोबतच एकमेकात संवाद सुद्धा सुरू राहतो. त्याच संवादातून व चर्चेतून काही क्षणासाठी माणूस तणावापासून दूर राहतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ स्वार व त्याचा घोडा ❃* *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. *तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.esakal.com/saptarang/should-we-prefer-primary-school-education-mother-tongue-39069••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील १९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११: रुपयाचे नवीन चिन्ह ( Rs.) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.**२००६: मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९७: बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.**१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ’दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.**१९५४: पंजाब वर राजस्थानला वरदान ठरलेल्या भाकरा नांगल कालव्याचे पंडित नेहरू च्या हस्ते उद्घाटन**१९३०: किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते लंडनमधे ’इंडिया हाऊस’चे उद्घाटन**१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.**१८८९: ’द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.**१८५६: चार्ल्स बर्न याल ’मशिनगन’*चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.**१४९७: वास्को द गामा युरोपातुन भारताच्या पहिल्या थेट सफरीवर निघाला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: अक्षय अंबादास टेमकर -- लेखक**१९८८: जुई गडकरी-- मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री**१९८३: प्रमोद शंकरराव हामंद-- कवी, लेखक* *१९८०: इंद्रजित वीर-- लेखक**१९७८: दत्तात्रय नाथा भापकर-- कवी, लेखक* *१९७८: अमोल अरविंद भावे -- सुप्रसिद्ध मराठी लेखक, निर्माते व दिग्दर्शक**१९७५: प्रा. डॉ. सुनील श्रीराम पवार-- कवी**१९७४: बाळासाहेब राजेसाहेब झोडगे-- कवी**१९७२: सौरव गांगुली –भारताचा माजी क्रिकेट कर्णधार**१९७०: अतुल अग्निहोत्री -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक* *१९६८: भारत केशवराव काळे -- आधुनिक मराठीतील कादंबरीकार, कथाकार व समीक्षक**१९६६: रेवती (जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) -- भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक**१९६२: डॉ.संजय गोविंदराव पोहरकर-- कवी, लेखक (मृत्यू: २२ एप्रिल २०२१ )**१९५८: नीतू कपूर (सिंग )-- भारतीय अभिनेत्री**१९५८: विजया दिपक एंबडवार -- कवयित्री**१९५४: डॉ. राजेश विश्वनाथराव गायकवाड -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: प्रकाश सुकलाल भांडारकर-- लेखक कवी**१९४९: वाय.एस. राजशेखर रेड्डी – आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री (मृत्यू: २ सप्टेंबर २००९ )**१९४४: उषा तांबे -- जेष्ठ मराठी लेखिका* *१९४१: अनिल मोहिले-- ज्येष्ठ संगीतकार(मृत्यू: १ फेब्रुवारी २०१२ )* *१९३०: मधुसूदन नारायण ऊर्फ म. ना. कुलकर्णी -- ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार (मृत्यू: १५ मे २०१८ )**१९२८: श्रीपाद रामचंद्र काळे -- जवळजवळ १२०० कथा व ५० हून अधिक कादंबऱ्यांचं लेखन केले आहे (मृत्यू: १८ जून १९८८ )* *१९२२: अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (मृत्यू: १९ एप्रिल २००९ )**१९१६: गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व. ’गडसम्राट’, ’पवनाकाठचा धोंडी’, ’जैत रेजैत’ या त्यांच्या कादंबर्यांवर चित्रपट निघाले. (मृत्यू: १ जून१९९८ )**१९१४: ज्योति बसू – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: १७ जानेवारी २०१० )**१८३९: जॉन डेव्हिसन रॉकफेलर – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक (मृत्यू: २३ मे १९३७ )**१७८९: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: सैयद इश्तियाक अहमद जाफरी (सुरमा भोपाली) हास्य अभिनेता (जन्म: २९ मार्च १९३९ )**२०२०: दीनानाथ घारपुरे-- ज्येष्ठ नाट्य,सिने पत्रकार* *२०१०: मधुकरराव चौधरी-- समाजसेवी, गांधीवादी,पूर्व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (जन्म: १५ जून १९१९ )**२००७: चंद्रशेखर-- भारताचे माजी पंतप्रधान (जन्म: १ जुलै १९२१ )**२००६: प्रा.राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८ )**२००३: हरी श्रीधर शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक ( जन्म: २२ जानेवारी १९२० )* *२००१: वसंतराव चांदोरकर-- आग्रा, ग्वाल्हेर, जयपुर घराण्याचे गायक (जन्म: २० जून १९२० )**१९९४: डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ’गोवा पुराभिलेख’चे संचालक* *१९८४: कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’ – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )**१९६५: डॉ. कमलाबाई गोपाळराव देशपांडे'-- भारतीय समाजसेविका(जन्म: २२ फेब्रुवारी, १८९८ )**१८३७: विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५ )**१६९५: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद् आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध (जन्म: १४ एप्रिल १६२९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रकाशित झालेला लेख ......*मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा आज शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हरे कृष्णा, हरे रामाच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा सोहळा थाटात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ, ऊर्जामंत्री फडणवीसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली येथून सुरू झालेली शांतता रॅली आज नांदेडमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात VIP दर्शन बंद करण्याचा मंदिर समितीचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा झिम्बाब्वेवर दणक्यात विजय, अभिषेक-ऋतुराजच्या खेळींमुळे सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?* **************************'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले. सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच *नॅशनल आयकॉन अवॉर्ड* ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे ४६ वे सत्र कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?३) भारतातील पारशी समाज कोणती कालगणना पद्धती उपयोगात आणत असतो ?४) 'झुंबड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ? *उत्तरे :-* १) अदिती बोधनकर २) भारत ३) शहेनशाही कालगणना ४) गर्दी, रीघ, थवा ५) पाटलीपुत्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पवार👤 सुरेश तायडे👤 अनिल भेद्रे👤 अहमद काझी👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी👤 मल्लेश भूमन्ना बियानवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षीर रूप सतनाम है नीर रूप व्योहार।हंस रूपी कोई साधुजन है जो शब्द का करत छननहार ॥7॥अर्थ – दूध रूपी सत्यनाम है और पानी रूपी संसारी ब्योहार है , कोई कोई बिरला साधु हैं जो इस संसारी मोह माया में से ऊपर उठ कर उस सार रूपी शब्द को अलग करके उसमे लग जाते है। ओ शब्द , न लिख सकते है और न ही कह सकते है , ओ अकह है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन सुर्यास्त होते म्हणून सुर्योदय होत नाही असे नाही. कारण त्या सूर्याला माहीत असते की, या सृष्टीला माझी आवश्यकता आहे. कोणी त्याला विसरून जातात तर कोणी आठवण करतात. तो कोणालाही दोष न देता आपले कर्तव्य पार पाडत असतो. आपण सूर्य तर होऊ शकत नाही पण या भूमातेवर आपल्याला माणसासारखे अनमोल जीवन मिळाले हेच तर खूप काही आहे. याची प्रत्येकांनी जाणीव ठेवावी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जी माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते, त्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वाने व कामाने सिद्ध होत असते*एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे. खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते. एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला. हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले. मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते. आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले. कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे. ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे. शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल. हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो. मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो. हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे. कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता. शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला. हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते. आणि नंतर ते उडून जातात.*तात्पर्य :- मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जुलै 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/07/which-school-do-you-like.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील १८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.**१९८२: पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.**१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना**१८९२: ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.**१८८५: लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.**१७८५: ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.**१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: रणवीर सिंग( रणवीर सिंग भवनानी) हिन्दी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता**१९८५: श्वेता त्रिपाठी शर्मा -- भारतीय अभिनेत्री**१९८२: अमोल शिवाजीराव सूर्यवंशी -- लेखक**१९७८: मृदुला निळकंठ रायपुरे-जांगडेकर -- लेखिका* *१९७८: तन्वी अमित -- कवयित्री, लेखिका**१९७६: सरला संजय मोते- देशमाने -- लेखिका, कवयित्री* *१९७२: प्रा. डॉ. विशाखा संजय कांबळे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९७०: संजय गंगाराम ठिकाणे-पाटील -- लेखक**१९७०: प्रा. डॉ. संजय केशवराव लाटेलवार -- लेखक* *१९६९: स्मिता बनकर-जाधव -- कवयित्री* *१९६९: प्रा. डॉ. सुनील आनंदराव राठोड-- लेखक**१९६७: ज्योती वामन बन्सोड (पांगुळ) -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६५: अरुंधती नाग -- भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री**१९६१: अशोक शिंदे -- जेष्ठ मराठी अभिनेते**१९५५: राजीव शांताराम शास्त्री-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५२: रेखा शिवकुमार बैजल – जेष्ठ मराठी व हिंदी लेखिका**१९५०: श्रीकांत इंगळहळ्ळीकर -- पर्यावरण अभ्यासक, लेखक* *१९५०: प्रकाश पायगुडे -- स्तंभलेखक, संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०२३ )**१९४६: जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष**१९४३: कालिदास गणपतराव चिंचोळकर -- लेखक* *१९४१: अरविंद नारखेडे -- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९३९: अरविंद प्रभाकर जामखेडकर -- पुरातत्त्वशास्त्रज्ञ व इतिहासकार प्राच्यविद्या पंडित**१९३५: दलाई लामा -- तिबेटी धर्मगुरू* *१९३२: प्राचार्या सिंधूताई मांडवकर -- जेष्ठ लेखिका* *१९३०: मैसूर श्रीनिवास एम.एस. सत्यू -- भारतीय नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी माध्यमांवरील दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, नेपथ्यकार**१९३०: डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)**१९२७: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१ )**१९२०: डॉ.विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५ )**१९०५: लक्ष्मीबाई केळकर – लेखिका, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८ )**१९०१: डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी – माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३ )**१८८१: संत गुलाबराव महाराज--महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५ )**१८६२: एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७ )**१८३७: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५ )**१७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟣 •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: पंडितराव दाजी कुलकर्णी -- ज्येष्ठ उद्योजक (जन्म: ४ जुलै १९२८ )**२००२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२ )**१९९९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९ )**१९९७: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१ )**१९८६: ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८ )**१८५४: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाऊले चालली खाजगी शाळेची वाट*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, प्रत्येक शंकेचे समाधान, अर्थसंकल्पावरील चर्चेअंती अजित पवारांनी मांडली राज्याच्या महसुलाची एकूण एक आकडेवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वाहन फिटनेस सर्टिफिकेट दंड रद्द करून रिक्षा चालकांना दिलासा द्या, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू, मनपा येथे दुचाकी घसरल्याने एकाचा तर बाणेर येथे डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - बालकांच्या सर्वांगीण विकासाला 'बूस्टमायचाईल्ड'ची साथ, कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने शिक्षक-पालकांसाठी विकसित स्टार्टअपला वर्धन ग्रुपची एक कोटीची गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हुजूर पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभव मान्य केला आहे. लेबर म्हणजेच मजूर पार्टी आघाडीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार; कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर ?* 📕जेवल्यानंतरच औषधे घ्यावी, असा एक समज समाजात आढळून येतो. गोळ्या गरम पडतात, उष्ण असतात आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जेवण करून मगच औषध घ्यावे; असेही काही जणांना वाटत असते. औषधे केव्हा घेणे जास्त योग्य ते आता पाहू. एक मात्र नक्की की आजारी पडल्याखेरीज औषधे कधीही घेऊ नयेत! कारण आजकाल काही लोक स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनतात आणि टिव्हीवरच्या जाहिराती पाहून तापाच्या स्मरणशक्ती वाढवण्याच्या किंवा शक्ती वाढवण्याच्या गोळ्या घेतात. अर्थात याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.काही औषधे उपाशीपोटी म्हणजे जेवणाच्या तासभर अगोदर घेतली, तर त्याचे रक्तात शोषण चांगले होते आणि त्यांचा परिणामही चांग घडून येतो. अशा औषधांमध्ये पेनिसिलीन, अॅम्पीसिलीन, रिफॅम्पीसीन, टेट्रासायक्लीन या जंतूनाशकांचा समावेश होतो. टेट्रासायक्लीन घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर तासभर तरी दूध पिऊ नये. अॅस्पीरिन, लोहयुक्त गोळ्या-औषधे, जीवनसत्त्वे, एरिथ्रोमायसीन, पॅराअमायनो सॅलीसिलीक अॅसीड आदी औषधे मात्र जेवणानंतर किंवा जेवताना घ्यावीत. औषधांमुळे जठराच्या आवरणावर दाह निर्माण होऊन आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे मळमळ, उलट्या आदी त्रास होण्याची शक्यता असते. जेल्यूसीलसारख्या गोळ्या पोट रिकामे असताना घेतल्यास त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.औषधांबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक औषध प्रत्येक माणसाप्रमाणेच वेगळे असते. त्यामुळे ते केव्हा, कसे घ्यायचे याची डॉक्टरांकडून माहिती घ्यावी आणि मगच त्यांचा उपयोग करावा. कारण एक लक्षात ठेवा की, औषध आणि विष यांच्यात फक्त देणाऱ्याच्या हेतूचाच फरक असतो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐक्य हेच बळ ते केवळ सुवचन नसून जीवनधर्म आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात पहिले वन सर्वेक्षण केव्हा झाले ?२) विनायक नरहर भावे यांना 'विनोबा' हे नाव कोणी दिले ?३) सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला काय म्हणतात ?४) 'झाड' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो ? *उत्तरे :-* १) सन १९८७ २) महात्मा गांधी ३) पेशी ४) वृक्ष, तरू, पादप, द्रुम ५) सरडा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक इमनेलू, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 आबासाहेब उस्केलवार, केंद्रप्रमुख, धर्माबाद👤 मोहन भूमकर, विषय शिक्षक, धर्माबाद👤 संतोष मानेलू, शिक्षक, धर्माबाद👤 रेवती गायकवाड👤 अभय कासराळीकर, धर्माबाद👤 श्रीकांत पुलकंठवार, धर्माबाद👤 नारायण वानोळे👤 मधुकर कांबळे👤 शंकर सोनटक्के, मा. शिक्षक धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माला फेरत युग गया फिरा ना मनका फेर।कर का मन डारी दे मन का मनका फेर॥5॥अर्थ – यानि हम दुशरो को दिखाते है के हम माला फेर रहे है , लेकिन वो वास्तव में वो एक ढोंग कर रहे है क्यूंकि , सच्ची माला स्वास का होता है , जो आपे आप फिरता है , जो इस माला को जान लिया और फेरने लगा उसका इस संसार के आवागमन से मुक्ति मिल जाती है इसी जाप को ( अजपा का जाप ) कहा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कला ही निसर्गाने दिलेली विशेष देण आहे. त्याच कलेचा योग्य वापर करून प्रचार केल्याने तिचा सन्मान होतोच सोबतच तिच्यामुळे अनेकांना दिशा सुद्धा मिळत असते. पण,त्याच कलेचा स्वार्थापोटी दुरुपयोग केल्याने तिचा अपमान तर होतेच सोबत व्यापार, आणि व्यवसायात तिची गणना केली जाते असे ऐकण्यात आले आहे. म्हणून आपल्या अंगी असलेल्या कलेची पूजा करावी व समाजासाठी तिच्यातून जेवढे योगदान द्यावा वाटते तेवढे द्यावे. पण,तिची गणना व्यापारात किंवा व्यवसायात करु नये.असं केल्याने कलेवर किंवा त्या कलावंतावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुर्खाशी गाठ*एके दिवशी बादशहाने बिरबलाला बोलावले आणि म्हणाला, ''बिरबल, एक प्रश्न असा कायम मला पडतो की, तू जर इतका हुशार आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील. मला एकदा त्यांना भेटायचे आहे. वडीलांइतकी हुशारी तर तुझ्यात नक्कीच नसणार तेव्हा मला त्यांची हुशारी किती आहे हे पहायचे आहे'' बिरबल म्हणाला,''महाराज, माझे वडील ग्रामीण भागात राहणारे एक अडाणी, सरळमार्गी, देवभोळे आहेत. ते कसले हुशार असणार तेव्हा त्यांच्या भेटीतून आपल्याला काय निष्पन्न होणार आहे तेव्हा त्यांच्या भेटीचा नाद सोडून द्या.'' अकबराला वाटले की बिरबल मुद्दाम वडीलांना भेटू देत नाही कारण याच्यापेक्षा याचे वडील खूप हुशार आहेत आणि वडील हुशार आहेत हे बिरबलाला ठाऊक असल्याने आपली पत कमी होईल या भितीने बिरबल त्यांना भेटू देत नाहीये. अकबराने बिरबलाला एक आदेश दिला की आठ दिवसात जर तू तुझ्या वडिलांना दरबारात घेऊन आला नाहीस तर तुला शिक्षा केली जाईल. आता बिरबलापुढे प्रश्न उभा राहिला कारण खरोख्ररीच त्याचे वडील हे सरळमार्गी होते. बिरबलाने गावाकडे निरोप पाठविला आणि वडीलांना बोलावून घेतले. त्यांना दरबारात जाण्यापूर्वी चांगला पोशाख घातला आणि त्यांना काही कानमंत्र दिला. बिरबल वडीलांना म्हणाला,'' बादशहा तुम्हाला भेटू इच्छितात, तिथे गेल्यावर तो तुम्हाला कोणतेही आडवेतिडवे प्रश्न विचारेल पण काही केल्या तुम्ही तोंड उघडू नका. एकही शब्द न बोलता गप्प बसून रहा. बादशहा चिडेल, संतापेल पण तुम्ही कोणतीच प्रतिक्रिया देऊ नका.'' झाले बिरबलाचे वडील बादशहाच्या दरबारात पोहोचले. बादशहा दरबारात येताच वडीलांनी त्यांना सलाम केला. बादशहाने त्यांना बिरबलाचे वडील म्हणून ओळखले पण बोलायला काही तरी सुरुवात करायची म्हणून त्याने विचारले,'' तुम्हीच बिरबलाचे वडील का'' वडील गप्पच. त्याने पुन्हा विचारले,'' तुम्ही कुठे राहाता, गावाचे नाव काय, शेती कशी आहे, पाऊसपाणी कसे आहे, गावातील मंडळी कशी आहेत,'' असे अनेक प्रश्न विचारले तरी बिरबलाने सांगितल्याप्रमाणे वडील गप्पच होते. शेवटी बादशहा वैतागला, चिडला आणि संतापाच्या भरात बोलून गेला, ''काय बुद्धी झाली आणि या मूर्खाला मी बोलावून घेतले. असल्या मूर्खाशी अशीकशी माझी गाठ पडली की जो साध्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे देत नाहीये.'' बिरबलाचे वडील मूर्ख शब्द ऐकून मनातून संतापले होते पण बिरबलाने सांगितले होते की, काही झाले तरी तोंड उघडायचे नाही. बादशहा कंटाळून निघून गेला व वडीलसुद्धा घरी गेले. त्यांनी हा प्रकार बिरबलाच्या कानावर घातला. बिरबलाने त्यांची समजूत घातली व शांत राहाण्यास सांगितले. चार दिवसांनी जेव्हा बिरबल पुन्हा दरबारात गेला तेव्हा बादशहा बिरबलाला म्हणाला,'' बिरबल मला तुझ्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे तेव्हा तू जवळ ये.'' बिरबल जवळ गेला. बादशहा हळूच त्याला म्हणाला,'' बिरबल, आपली गाठ जर मूर्खाशी पडली तर काय केले पाहिजे'' बिरबल तात्काळ उत्तरला,''महाराज आपण शांत राहिले पाहिजे, गप्प बसले पाहिजे.'' बादशहा म्हणाला, '' ते कसे काय'' बिरबल म्हणाला,'' माझे वडील नाही का तुमच्यासमोर गप्प बसले होते तसेच'' हे ऐकून बादशहाचे तोंड बघण्यासारखे झाले.*तात्पर्य :- मुर्खाशी वाद घालू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/oNGVfYuXNUHctWJ9/?mibextid=xfxF2i••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील १८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢 •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.**१९९७: स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.**१९९६: संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर**१९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात**१९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.**१९७५: ’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९७५: ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.**१९६२: अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९५०: इस्रायेलच्या क्वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.**१९१३: किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली.**१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.**१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.**१८११: व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्रा. डॉ. आनंद अहिरे -- कवी, लेखक* *१९८५: राहुल गोविंद निकम -- कवी , लेखक**१९७९: आनंद वासुदेव वाडे-- कवी* *१९७८: मारोती माधव काळबांडे -- कवी, लेखक* *१९७८: प्रा. डॉ. कैलास अंभुरे -- प्रसिद्ध लेखक* *१९७७: नवनाथ विष्णू गडेकर -- कवी* *१९७७: प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे-- देश-विदेशात लोककला पोहोचवणारे**१९७६: मंदा धनराज सुगिरे-- लेखिका, कवयित्री* *१९७३: डॉ स्मिता प्रमोद पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७३: गीता कपूर-- हिंदी चित्रपटांची (बॉलिवूड) कोरियोग्राफर**१९७२: सुरेखा शेषराव बोरकर --- लेखिका**१९६६: प्रा. डॉ. बाबाराव मारोती ठावरी -- लेखक* *१९६३: लक्ष्मण मलगिलवार- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६२: डॉ.साहेब रामराव खंदारे -- कवी, समीक्षक, संपादक* *१९६०: प्रा. डॉ. प्रभावती वाल्मीकराव विहिरे -- कवयित्री, लेखिका**१९५८: अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९५७: अशोक हांडे-- मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार**१९५७: पांडुरंग वसंत कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५४: डॉ.कैलास शंकरराव कमोद -- लेखक, नाशिकचे अभ्यासक* *१९५४: जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४: नारायण गजीराम थोरात -- कवी**१९५२: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० )**१९४९: पांडुरंग मोरे -- कथाकार* *१९४६: राम विलास पासवान – माजी केंद्रीय मंत्री,आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजीअध्यक्ष (मृत्यू: ८ ऑक्टोबर, २०२० )**१९४३: बाळकृष्ण गणपतराव कवठेकर-- जेष्ठ साहित्यिक व समीक्षक**१९३३:सुरेंद्र आत्माराम गावस्कर -- सूचिकार, संपादक (मृत्यू: १३ जानेवारी १९७९ )**१९२९: रोहिणी गवाणकर -- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक , लेखिका* *१९२५:नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ८ आक्टोबर २०१२ )**१९२०: आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६ )**१९१६: के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २०१० )**१९१२: दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे--- पत्रकार, कथाकार, विनोदकार, अनुवादक(मृत्यू: ६ ऑगस्ट १९८३ )**१८८२: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७ )*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: तुळशी परब-- कवी (जन्म: ३० सप्टेंबर १९४१ )**२००५: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४ )**१९९६: चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – प्रसिद्ध रहस्यकथाकार(जन्म: ९ जून १९०६ )* *१९४५: विष्णुपंत गोविंद दामले -- भारतीय प्रॉडक्शन डिझायनर, सिनेमॅटोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि ध्वनी अभियंता (जन्म: १४ ऑक्टोबर१८८२ )**१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिपाठ म्हणजे शाळेचा आत्मा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रिया देशांच्या दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जातीय जनगणना झाली तर आरक्षणाचा प्रश्न सुटेल – खासदार अमोल कोल्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यावर घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिव्य दर्शन; सासवड मुक्कामानंतर पालखी पंढरपूरकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - 'दगडूशेठ' गणपती मंदिरात आरोग्यसंपन्न भारताकरिता अतिरुद्र महायाग, वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह 65 ब्रह्मवृंदांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप, CM शिंदे म्हणाले- निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर ! टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देऊन गौरवण्यात येणार, शिंदे सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅**************************रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं सुंदर विचारांची असतात, ती अंधारातही चमकणाऱ्या काजव्यांसारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा - २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे ?२) कोणत्या संघाने महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विश्वविक्रम केला आहे ?३) कोणता देश पशुधन कार्बन उत्सर्जनावर टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?४) 'ज्येष्ठ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वतः भोवती कडे असणारा ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) विश्वनाथन आनंद, भारत २) भारत ( ६०३ धावा, द. आफ्रिका विरुध्द ) ३) डेन्मार्क ४) मोठा, वरिष्ठ ५) शनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुधाकर चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर कांबळे, आलूर, धर्माबाद👤 सुदर्शन जावळे पाटील👤 डॉ. मनोज तानुरकर, स्वाक्षरी तज्ञ, धर्माबाद👤 मारोती कदम, स्तंभलेखक, नांदेड👤 विजयप्रकाश पाटील गाडीवान👤 नागनाथ भत्ते, मोबाईल टीचर, धर्माबाद👤 चक्रधर ढगे पाटील, बिलोली👤 सुभाष कुलकर्णी👤 गणपत बडूरकर, मा. शिक्षक, धर्माबाद👤 संभाजी कदम👤 अनिल गायकांबळे👤 किशन कवडे👤 संतोष शेळके, साहित्यिक👤 गजानन बुद्रुक, हिंगोली👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद👤 फारुख शेख👤 नरेश शिलारवार, धर्माबाद👤 गिरीश कहाळेकर, नांदेड👤 अजय चव्हाण👤 रमेश अबुलकोड, विमा प्रतिनिधी, धर्माबाद👤 अशोक पाटील👤 राजरेड्डी बोमनवाड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माला फेरत युग गया फिरा ना मनका फेर।कर का मन डारी दे मन का मनका फेर॥5॥अर्थ – यानि हम दुशरो को दिखाते है के हम माला फेर रहे है , लेकिन वो वास्तव में वो एक ढोंग कर रहे है क्यूंकि , सच्ची माला स्वास का होता है , जो आपे आप फिरता है , जो इस माला को जान लिया और फेरने लगा उसका इस संसार के आवागमन से मुक्ति मिल जाती है इसी जाप को ( अजपा का जाप ) कहा जाता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसा फेको,तमाशा देखो या प्रकारची म्हण समाजात प्रचलीत आहे. कदाचित हे, खरे असावे म्हणूनच आजही अनेकांच्या मुखातून नेहमीच ऐकायला मिळत असते. जीवन जगत असताना आवश्यक ठिकाणी पैशाने व्यवहार सुध्दा करावा लागतो. पण प्रत्येक ठिकाणी किंवा काही मिळविण्यासाठी पैसे देणे, घेणे आवश्यक असते का. .? एकदा हाच प्रश्न आपल्या मनाला विचारून बघावा. अनेकदा याच प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडून योग्य मिळेलच असेही नाही त्यासाठी स्वतः च्या मनाला विचारून बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाहय देखावा आणि सौंदर्य*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.*तात्पर्य*-बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EBUZQqR5irXBijYQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛑 *_जागतिक फणस दिन_* 🛑 🛑 *_ या वर्षातील १८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.**१९९७: ’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.**१९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान**१९४७: ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.**१९४६: सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९३६: ’अमरज्योती’ हा ’प्रभात’ चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.**१८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचे निधन झाले.**१७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: गोविंद दत्ताराम कवळे -- कवी**१९८०: संजय माणिक राठोड-- कवी, लेखक**१९७६:सुरेश बाब्या राठोड-- चित्रकार, लेखक**१९७३: वृषाली सानप-काळे -- मराठी आणि हिंदी भाषेतून लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७०: शिल्पा देवळेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६९: प्रतिभा सिन्हा -- भारतीय अभिनेत्री* *१९६८: डॉ. वाल्मीक हिरामण अहिरे -- लेखक, समीक्षक**१९६६: डॉ. प्रभाकर शेळके -- कवी, कथाकार* *१९६५: रमेश पांडुरंग तांबे -- लेखक, कवी* *१९६०: देवेंद्र भुजबळ -- लेखक, संपादक तथा माजी माहिती संचालक* *१९५९: नीना गुप्ता -- हिंदी चित्रपट अभिनेत्री , टीव्ही कलाकार आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता* *१९५६: डॉ.संजीवनी मुळे -- लेखिका, कवयित्री**१९५४: डॉ सुनंदा देशपांडे -- लेखिका* *१९४९: जोगिंदर शेली -- अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गायक, गीतकार आणि वितरक (मृत्यू: १५ जून २००९ )**१९४८: योगिनी वेंगुर्लेकर -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९४७: गणेश आप्पासाहेब धांडगे -- कादंबरीकार कथाकार* *१९४७: डॉ.आनंद पाटील -- जेष्ठ साहित्यिक**१९४४: पंडित प्रभाकर कारेकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९३३: डॉ.अरविंद वामन कुलकर्णी -- प्रख्यात समीक्षक,लेखक,कवी (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००३ )**१९२८: जयराम आचार्य -- प्रसिद्ध भारतीय सितार वादक (मृत्यू: ५ एप्रिल २०१७ )**१९२८: पंडितराव कुलकर्णी -- ज्येष्ठ उद्योगपती ( मृत्यू: ६ जुलै २०२०)**१९२६: विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक (मृत्यू: १७ एप्रिल २०११ )**१९१४: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ –भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७ )**१९१२: पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४ )**१९११: विठ्ठल रामचंद्र सरदेशमुख -- हार्मोनिअम वादक, गायक (मृत्यू: ६ एप्रिल १९८१ )**१८९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू: १५ जानेवारी १९९८ )**१८९०: नारायण केशव बेहेरे -- कवी, कादंबरीकार काव्य समीक्षक (मृत्यू: १९ जानेवारी १९५८ )**१८९०: क्षमादेवी राघवेंद्र राव -- संस्कृत भाषातज्ज्ञ (मृत्यू,:२४ एप्रिल:१९५४ )**१८७२: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३ )**१७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६ )*🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🛑 •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९ )**१९८२: भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: ६ जानेवारी १९१८ )**१९८०: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.(जन्म: २४ एप्रिल १८९६ )**१९६३: पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म:२ ऑगस्ट १८७६ )**१९३४: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७ )**१९०२: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.(जन्म: १२ जानेवारी १८६३ )**१८३१: जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८ )**१८२६: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३ )**१८२६: जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• " सरकारी शाळेची कथा "..... पूर्ण लघुकथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अडवणूक, दिरंगाई किंवा पैशाची मागणी केल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांचा तलाठ्यासह अधिकारी व दलालांना इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जनतेने अपप्रचाराला नाकारून विश्वासाच्या राजकारणाला निवडले - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हाथरस दुर्घटनेत बळींची संख्या १२१ वर, आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सेन्सेक्सने पार केला ८० हजारचा टप्पा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कापूस पिकाच्या खर्च व उत्पन्नातील तफावातीबाबत धोरण ठरवणार - पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 विश्वकप विजेता टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हरभजन सिंह*आपल्या जादूही फिरकीने भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारा आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडविणारा भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू हरभजनसिह याचा 3 जुलै हा वाढदिवस.अगदी लहान वयात भारतीय संघात दाखल झालेल्या हरभजनच्या कारकिर्दीची सुरुवात विचित्र झाली. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वादंग झाले आणि तो संघाबाहेर फेकला गेला. इ.स. २००१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने, कप्तान सौरव गांगुली चिंतेत पडला होता. ऑसी फलंदाज ऑफस्पिन गोलंदाजाला बिचकून खेळतात, याचा पक्का अभ्यास सौरवने केला असल्याने, त्याने हरभजनसिंगला संघात घेण्याकरता निवड समितीला साकडे घातले. निवड समितीने केवळ कप्तानाच्या आग्रहाखातर हरभजनला संघात घेतले. भारतीय संघाच्या कामगिरीला निर्णायक कलाटणी देणाऱ्या त्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत हरभजनने तब्बल ३२ बळी मिळवून कमाल केली. भारताने मालिका २-१ फरकाने जिंकली आणि हरभजनला मालिकेचा मानकरी ठरवण्यात आले.इ.स. २००६ ते इ.स. २००८ चा काळ हरभजनकरता निराशेचा ठरला. १३ कसोटी सामन्यांत जेमतेम ३७ बळी या काळात हरभजनला मिळवता आले. या काळात त्याला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर पडावे लागले. इ.स. २००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात हरभजन नव्हता; पहिल्या टी२० वर्ल्ड कपकरता निवड समितीने हरभजनला संघात परत आणले, तो क्षण मोलाचा ठरला. इ.स. २००८ मध्ये गॉल कसोटीत भारतीय संघाला विजयी करून देताना हरभजनने दोनही डावांत मिळून १० बळी मिळवले. चांगली कामगिरी करून हरभजनवर प्रकाशझोत पडला नाही, कारण सेहवागने त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती.2009 हरभजनला आपल्या फलंदाजीच्या गुणवत्तेची अचानक जाण आली. विंडीज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयात संघाला नितांत गरज असताना हरभजनच्या अर्धशतकी खेळीने कमाल साधली. मायदेशातील मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध हरभजनने लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यांत शतके झळकावून संघातील सहकाऱ्यांना चकित केले. इ.स. २०११ वर्ल्ड कपच्या यशात हरभजनसिंगच्या नावासमोर भरपूर बळी नसल्याने, त्याच्यावर टीका केली गेली. प्रत्यक्षात समोरच्या संघातील खेळाडूंनी विचारपूर्वक हरभजनच्या गोलंदाजीचा धोका न पत्करता, नुसते खेळून काढण्याचा निर्णय घेतला होता. हरभजनच्या नावासमोर जास्त बळी नसले तरी त्याने आपल्या १० षटकांत खूप कमी धावा दिल्या आहेत, तसेच पॉवर प्लेच्या महत्त्वाच्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली आहे. डो मनिका कसोटी सामन्यादरम्यान हरभजन सिंगने ४०० कसोटी बळींचा टप्पा पार केला. असे अचाट काम करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी आणि कपिल देव ४३२ बळी हे दोनच भारतीय गोलंदाज हरभजनच्या पुढे आहेत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आदिमानव ही मानवाची प्रजाती प्रथम कोणत्या खंडात अस्तित्वात आली ?२) *जागतिक प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस* केव्हा साजरा केला जातो ?३) शेअर बाजाराची सुरुवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?४) 'जीर्ण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकतेच कोणत्या देशाने भारताकडून ब्राम्होस क्षेपणास्त्र विकत घेतले आहे ?*उत्तरे :-* १) आफ्रिका खंड २) ३ जुलै ३) नेदरलँड ४) जुने ५) फिलिपाईन्स*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कवी गोविंद कवळे, उमरी👤 श्रीपाद जोशी येवतीकर👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक👤 कमलाकर जमदाडे, बिलोली👤 राजकुमार बिरादार👤 बंडू आंबटकर, कोल्हापूर👤 गणेश मंडाळे👤 बालाजी मदनलवार👤 परमेश्वर मेहेत्रे👤 अविनाश खोकले👤 श्याम उपरे👤 प्रदीप यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माटी कहे कुम्भार से तू क्यों रौदे मोए। एक दिन ऐसा आएगा मै रौंदूंगी तोए॥4॥अर्थ – माटी कुम्भार से कहता है जिस प्रकार तुम मुझे रौद रहे हो एक दिन ऐसा आएगा जिस दिन मई तुम्हे रौंदूंगी ( जब इंसान मरता है तो उसकी शरीर जो मिटटी से ही बनी है वो वापस मिटटी में ही मिल जाती है ) इसी को मिटटी कहता है , के आज इस अभिमान को छोड़ दो क्यूंकि एक दिन तुमको भी मुझ में ही मिल जाना है यानि मिटटी में।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या समाधानासाठी आपण कितीही चांगले काम केले किंवा त्याच प्रकारची वागणूक ठेवून जरी जगून दाखवले तरी समोरच्या व्यक्तीला समाधान होईलच असे नाही. कारण, प्रत्येकांकडेच समाधान या नावाची संपत्ती नसते. म्हणून आपल्याला काय वाटते आपणच ठरवावे. दुसऱ्यांचे समाधान करताना थोडे स्वतः च्या विषयी विचार करावे शेवटी स्वतःलाच जगावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे**त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून**विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण* *वर्षभर काय केले याची आहे.मी आज काय करतो याची नाही.**तात्पर्यः* *"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.**एका दिवसात यश प्राप्त होत नाही. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जुलै 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/7jsB5HcWmR3niU3Z/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_विश्व यूएफओ दिवस_* *_ या वर्षातील १८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.**१९९४:चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड**१९८३:कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.**१९८१:माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य इन्फोसिस या कंपनीची स्थापना**१९७२:भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्या केल्या.**१९६२:रॉजर्स,आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.**१८५०:बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल**१८६५:’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:विशाल देवतळे-- कवी,लेखक* *१९७९:प्रवीण हरिभाऊ चव्हाण-- लेखक**१९७६:प्रा.दिवाकर विश्राम सदांशिव-- लेखक* *१९७३:राजेश रेवले -- कवी* *१९७०:प्रा.डॉ.अनिल शंकरराव काळबांडे-- कवी,लेखक,संपादक* *१९६८:महेंद्र पुंडलिक ताजने-- कवी लेखक**१९६७:किशोर रामराव खेडेकर-- लेखक**१९६५:श्याम ऊर्फ अनंत दत्तात्रय पेठकर-- प्रसिद्ध लेखक,वऱ्हाडी भाषेतील स्तंभ,नाटके, कथा,कवितांचेही सातत्याने लेखन**१९६१:शंकर सीताराम चव्हाण-- लेखक**१९६१:डॉ.गिरीश जखोटिया -- प्रसिद्ध विचारवंत,लेखक**१९६१:प्रदीप निफाडकर-- प्रसिद्ध गझलकार,कवी,लेखक* *१९६०:सतीश सुरवसे--प्रसिद्ध कथाकार**१९५९:विजयालक्ष्मी विजय देवगोजी-- लेखिका* *१९५८:पवन मल्होत्रा-- भारतीय अभिनेता**१९५४:मोहम्मद अझीझ-- भारतीय बहुभाषिक पार्श्वगायक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०१८)**१९५०:अपर्णा आनंद पाटणकर-- लेखिका, कवयित्री**१९५०:काशीराम लक्ष्मण चिंचय --कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर(मृत्यू:१४ जानेवारी २०२२)**१९४४:अरुण गोडबोले-- जेष्ठ कवी,चित्रपट निर्मिती* *१९३३:मधुकर टिल्लू -- मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे ज्येष्ठ कलावंत(मृत्यू:१ जून २०००)**१९३०:कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष**१९२५:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)**१९२३:जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी माजी मंत्री(मृत्यू:२५ नोव्हेंबर १९९७)**१९२२:मोहम्मद फजल-- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल(मृत्यू :४ सप्टेंबर २०१४)*.*१९२२:पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर**१९१६:वामन शिवराम आपटे--कोशकार, संस्कृतचे गाढे अभ्यासक(मृत्यू:९ ऑगस्ट १९९२)**१९०४:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू:१२ आक्टोबर १९९६)**१८६५:कृष्णाजी लक्ष्मण सोमण-- कवी, नाटककार (मृत्यू:२५ मे १९९८)**१८८०:गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक,’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू:२३ डिसेंबर १९६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:लीलाधर कांबळी-- मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते(जन्म:९ मे १९३७)**२०१७:प्रा.मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल-- मराठी लेखक,अनुवादक, रूपांतरकार,नाट्यलेखक,निर्माता,दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते (जन्म:२४ जुलै १९३२)**२०११:चतुरानन मिश्रा – माजी केंद्रीय कृषी मंत्री,कामगार नेते,कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म:७ एप्रिल १९२५)**२००७:दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म:८ ऑगस्ट १९४०)**१९९९:मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म:१५ आक्टोबर १९२०)**१९७२:महेश कौल -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक आणि अभिनेता(जन्म:१० एप्रिल १९११)**१९५०:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म:२३ सप्टेंबर १९०३)**१८४३:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म:१० एप्रिल १७५५)**१७७८:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म:२८ जून १७१२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचे पत्र हरवले ........!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 30 ते 31 रुपयाची कपात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघातप्रवण क्षेत्रात 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेश बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘एक रुपयात पिक विमा योजना’, सेवा केंद्र चालकांनी अधिक रकमेची मागणी केल्यास तक्रार करण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई 'पदवीधर'मधून अनिल परब विजयी : 'शिक्षक'मधून अभ्यंकर; भाजपचे निरंजन डावखरे यांनी कोकणचा गड राखला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काँग्रेसच्या वतीने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी, विधान परिषदेची उमेदवारी जाहीर; मागील वेळी झाली होती बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दोन वर्षानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकसंख्या* 📙साऱ्या जगाच्या पाठीवर लोकसंख्यावाढीचे भूत आरूढ झालेले आहे. अनेक भेडसावणारे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत व ते वाढतच जाणार आहेत. भल्याभल्यांची मती यामुळे कुंठित झाली आहे. भारताची प्रगती खूप झाली, अन्नधान्य उत्पादन वाढले, कारखानदारी वाढली; पण हे सर्व आज महाप्रचंड लोकसंख्येने कुठेतरी पार गिळुन टाकले आहे.पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पट वाढली. दर हजारी मृत्यूचे प्रमाण घटत गेले, साथीचे आजार आटोक्यात आले, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले व बाळंतपणात मृत्यू ओढवून अकाली निधनाचे प्रमाण स्त्रियांत अल्प राहिले. याउलट जन्मप्रमाण मात्र तेवढेच राहिल्याने अत्यंत झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्यावाढीमध्ये आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो. प्रजननक्षम जोडप्यांची संख्या वाढते, तसे वाढीचे प्रमाण वाढत जाते.लोकसंख्यावाढीचा प्रमुख सिद्धांत माल्थस यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत असते. यामुळेच अनेक शतके स्थायी असलेली लोकसंख्या १७५० साली जगभर वाढू लागली. या वाढीवर आरोग्यादायी सेवांचा अनुकूल परिणाम झाल्याने आज ७०० कोटींचा आकडा जगाने पार केला आहेच. लोकसंख्येच्या बाबतीत जगाचे उत्तर व दक्षिण असे उघडउघड मतभेद झालेले आढळतात. उत्तरेकडचे सर्व देश हे सध्या स्थिर लोकसंख्या असलेले बरेचसे प्रगत व प्रजननक्षम जोडप्यांना 'शिक्षित' करण्यात यशस्वी झालेले आढळतात. अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय असल्याशिवाय घरात मूल जन्माला येऊ न देणे हे त्यांनी पटवून घेतले आहे.याउलट जन्माला येणारे मूल जगेल, मोठे होईल याची दक्षिणेकडील अप्रगत, आर्थिकद्रुष्ट्या मागास देशांना खात्री नसते. श्रमाची किंमतच त्यांना माहित असल्याने अधिक मुले म्हणजे श्रम करण्यासाठी अधिक हात, याच समीकरणाचा गोंधळ त्यांच्या डोक्यातून निघत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया व मध्य आशिया हा साराच भाग दक्षिणेचा म्हणून मोडतो.लोकसंख्या मोजणे हा एक शास्त्रीय भाग आहे. जनगणना वा सेन्सस दर दहा वर्षांनी केली जाण्याची गेल्या शतकातील पद्धत आहे. शक्यतोवर एकाच दिवशी साऱ्या देशातली पाहणी व मोजणी करून मग त्याची आकडेवारी एकत्र केले जाते. जनगणनेची पद्धत अमेरिकेत प्रथम १७९० साली वापरली गेली; पण जनगणनेचा वापर व उपयोग शास्त्रोक्तदृष्ट्या होतो, अशा नोंदी प्राचीन चिनी उल्लेखातसुद्धा आढळतात.२०१८ च्या जनगणनेनुसार भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे १.३५ अब्ज इतकी आहे. दर हजारी पुरुषसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त ९३३ आहे. प्रजननक्षम जोडप्यांचा जननदर म्हणजेच फर्टिलिटी रेट २.७ इतका आहे. तो २.१ पर्यंत खाली आणण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे लोकसंख्यावाढीवर आपण नियंत्रण आणू शकू. एक वर्षाच्या आत होणारे बालमृत्यू इन्फंट मॉरटॅलिटी या नावाने ओळखले जातात. त्यांचा आकडा दर हजारी ३०.१५ इतका मोठा आहे. गरोदरपणातून व बाळंतपणाच्या संदर्भातील आजारातून होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाणही एक लाखामागे ४४० आहे. तसेच स्त्रियांमधील साक्षरता आजही बहुतांश राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळते. या साऱ्या आकड्यांना अपवाद फक्त केरळ या राज्याचा. भारतातील वृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के भरते. २० वर्षांखालील व्यक्तींची सध्या संख्या सुमारे ४८ टक्के आहे. यामुळेच सर्वात जास्त तरुण असलेले मोठे राष्ट्र म्हणून आपण २०३० साली मिरवू शकू.लोकसंख्या स्थिर असणे व कमी होणे हा प्रकार जगातील सर्व प्रगत देशात गेली २५ वर्षे घडत आहे. याचे विश्लेषण मात्र अनेक पद्धतीने केले जाते. युरोपमधून अमेरिकेत व जगभर युरोपियन सतत जात राहिले, अन्यथा युरोपमध्ये संख्याविस्फोट झाला असता, असेही काही तज्ज्ञ म्हणतात. यासाठी ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारतातील ब्रिटिश वसाहती यांची एकत्रित आकडेवारी मांडतात. नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या कमी होत आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, भारतातच काय पण जगातही लोकसंख्या सतत वाढत गेली, तर तिला पुरेसे अन्न पुरवणे व गरजा भागवणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कठीणच आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोने होते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या पहिल्या महिलेचे नाव काय आहे ?२) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?३) भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?४) 'जिन्नस' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ऑक्सीजनच्या सिलेंडरची मदत न घेता एव्हरेस्ट सर करणारे देशातील पहिले डॉक्टर दांपत्य कोण ? *उत्तरे :-* १) सुजाता सौनिक २) वसंतराव नाईक ३) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ४) पदार्थ ५) डॉ. हेमंत लुवा व डॉ. शुबिबेन लुवा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित दगडगावे, शिक्षक, धर्माबाद👤 विक्रांत दलाल, नांदेड👤 शैलेश तराळे👤 सतिश अवधूतवार, बोधन👤 चिमणाजी हिवराळे👤 वसंत घोगरे पाटील, संस्थापक, मानव विकास सेवाभावी संस्था👤 श्रीनिवास पुल्लावार👤 शिवानंद चौगुले, पुणे👤 मारोती जाधव👤 जेजेराव सोनकांबळे👤 गोपाळ पामसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्लभ मनुष्य जनम है देह न बारम्बार।तरुवर ज्यों पति झड़े बहुरि न लागे डार ॥1॥अर्थ – मनुष्य का जन्म बहुत ही दुर्लभ है मनुष्य का जन्म पाना बहुत ही भाग्य का बात है। जिस प्रकार डाल से पत्ता टूट कर गिरने के बाद वापस डाल पर नहीं लगता उसी प्रकार मनुष्य का जन्म भी दुबारा बिना सत्कर्म और भजन बिना नहीं मिलता।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे लाल गर्द टोमॅटो भाजीत टाकल्याशिवाय भाजीला रंग येत नाही. तसंच कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. त्या दोघात किती ताकद असते त्यांचा उपयोग केल्यावरच त्यांचे महत्व कळत असते. म्हणूनच आपल्या जीवनात सुध्दा येणारे चांगले, वाईट प्रसंग आपली परीक्षाच घेण्यासाठी येत असतात असेही नाही तर ते,खूप काही शिकायला सुद्धा भाग पाडत असतात म्हणून त्यांना कंटाळून न जाता सदैव त्यांचे स्वागत करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ संत बहिणाबाई ❃* बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला, "मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.*तात्पर्य :- शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)