✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागतिक नागरी संरक्षण दिवस*💥 ठळक घडामोडी● १९०७- टाटा आर्यन अॅन्ड स्टील कंपनीची स्थापना● १८१८- सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.● १९१९- रॉलट अॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला प्रारंभ केला.● १९५८- कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात💥जन्म● १९१७: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक करतार सिंह दुग्गल ● १९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी ● १९५१: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ● १९६८: सलील अंकोला – क्रिकेटपटू● १९६८: भारतीय वेटलिफ्टर कुंजारानी देवी ● १९८३: भारतीय बॉक्सर मेरी कॉम 💥मृत्यू● १९९९: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर● १९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई● १९९४- महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव दादा पाटील यांचे निधन● २००३: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री● २०१७ - विनोदी लेखक तारक मेहता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *MPSC ची गुणवत्ता यादी जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांवरील औषधांच्या किंमती निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ, मोबाईल मिळणार आणि पेन्शन योजना लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *100 कोटींचा कोविड घोटाळा प्रकरण; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक, याविषयी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यात नाफेडकडून कांदा खरेदी सुरु, दोन दिवसात 3 हजार क्विंटल कांद्याची खरेदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ओदिसामधील तीन जिल्ह्यात नऊ ठिकाणी सोन्याचे साठे सापडल्याची माहिती ओदिसा सरकारने दिली आहे. देवगढ, क्योंझर आणि मयूरभंज येथे सोन्याचे नऊ साठे सापडले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी आजपासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆Class-7th English chapter 3.4 "Please don't read this poem"🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/kXnT2GYHNNU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंतराव बंडूजी पाटील*(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्ष झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या.वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.*संकलन : नासा येवतीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतेच निधन झालेले देविसिंह शेखावत कोण होते ?२) कोणत्या वर्षी शिवाजी महाराज 'छत्रपती' झाले ?३) दिल्लीच्या अगोदर भारताची राजधानी कोणती होती ?४) जीवनसत्त्व ब - ९ चे रासायनिक नाव काय आहे ?५) तुपाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते ?*उत्तरे :-* १) माजी आमदार तथा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती २) सन १६७४ ३) कोलकाता ४) फॉलीक अँसिड ५) भारत*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय कदम👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा। सदा रामनामें वदे नित्य साचा॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कडू शब्दांनी माणसं दुरावतात तर मधुर शब्दांनी जोडली जातात. त्यामुळे शब्द मोजून-मापून-तोलून वापरण्याचा संदेश संत देतात. शब्द हे शस्त्र असल्याचे सांगतात. त्याचा आपण गांभीर्याने विचार करून ते आचरणात आणावे. 'शब्द आणि ते ज्या वाणीतून बाहेर पडतात ती वाणी' हे अमृत असल्याचे आपण आपल्याला रोज समजून सांगू, तेव्हाच उत्कर्ष शक्य आहे. ओजस्वी, प्रासादिकता, मांगल्य या शब्द आणि जिव्हाशक्तीशी निगडीत बाबी जगण्याला बळ देतात. आपण चांगले बोलल्याने समोरच्याच्या चेह-यावर विलासणारा आनंद समाधान देतो. काम भले एक दिवस उशीरा होईल; पण जे होईल ते पुन्हा कधी डोके वर काढणार नाही. त्यामुळे संवादाला सुसंवादाच्या पातळीवर नेण्याचे कसब आपल्याला साधायला हवे.**माणसे येतात आणि जातात लक्षात राहतो तो फक्त त्याचा स्वभाव. गेल्यानंतर "फार चांगला माणूस होता" हे एक वाक्य आयुष्यभराच्या कामाचा विजय असतो. शब्द मागे उरतात ते कसे होते याची चर्चा होते आणि ती फक्त व्यक्तीच्या बोलण्यावर अवलंबून असते. त्यामुळे चांगले वागुया, चांगले बोलुया. त्यासाठी अंत:करण शुद्ध हवे. क्लास लावून अमृततुल्य बोलता येत नाही. तिथे जाऊन फार तर पोपट होता येईल. आपल्याला पोपट नव्हे तर कोकिळ होता यायला हवे. असे होणे म्हणजे उन्नती.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे पाणी पिल्यामुळे तहान भागविता येते.अन्न सेवन केल्यामुळे भूक भागविता येते.त्याचप्रमाणे चांगल्या ग्रंथांच्या आणि चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ज्ञानाचीही भूक भागविता येते.या ज्ञानाच्या भूकेमुळे माणसाला चांगले जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य*-तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/02/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● १९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.💥 जन्म :-● १९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत ● १९५१ : कसोटी क्रिकेटपटू करसन घावरी● १८९७ : डॉ. शंकर दामोदर पेंडसे, मराठी ग्रंथकार व संत साहित्याचे अभ्यासक💥 मृत्यू :- ● १९२६ : स्वातंत्र्य शाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद ● १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू● १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद● १९९८ : विनोदवीर राजा गोसावी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशात लवकरच प्रवासी विमानाची ही निर्मिती होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवमोगा विमानतळाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक : आपली मराठी भाषा अभिजातच, भाषेला जपणं महत्वाचं, जेष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचं मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *येत्या 5 मार्च रोजी होणारी NEET PG 2023 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बारावीचा निकाल रखडणार ? कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे विकास रखडला असल्याचा आरोप करत गोंदियातील आठ गावांनी मध्य प्रदेशात विलीन करण्याची केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंढरपुरातील चंद्रभागेचं पात्र अजूनही अस्वच्छ, लाखोंचा खर्च करुनही चंद्रभागेची दूरवस्था कायम; विठ्ठलभक्त संतप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय विज्ञान दिवस*नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो.सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं.१९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?३) जगातील सर्वात हलका वायू कोणता ?४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणता ?*उत्तरे :-* १) छत्रपती संभाजीनगर २) सईबाई ३) हेलियम ४) बायोटिन ५) बँगलोर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सुरेश येवतीकर विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, सहशिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे। जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥ गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्राचीन काळापासून एखाद्या नैसर्गिक घटनेनंतर अनुभवास आलेल्या चांगल्या अगर वाईट गोष्टींशी त्या घटनेचा संबध जोडला जातो. यातून शकुन आणि अपशकुनाच्या कल्पना जन्म पावतात. भारतातील बहुतांश प्रदेशात 'घुबड' अशुभ मानले जाते. मात्र बंगालमध्ये ते लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. वैदिक संस्कृतीने कबुतराला मृत्यूच्या देवतेशी संबधीत ठरवून अशुभ मानले होते-इतके की कबुतर घरात शिरल्यास शांती करावी लागते. मात्र आता अनेक ठिकाणी लोक कबुतरांना मुद्दाम खाऊ घालतात. पाश्चात्य संस्कृतीने तेरा हा आकडा अशुभ मानल्याने मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्समध्येसुद्धा त्या क्रमांकाचा मजला किंवा खोली नसते.**चमत्कृतींनी भरलेल्या मानवी मनाचा थांग लागणे कठीण असते. लबाड आणि संकुचित मनोवृत्तीचे लोक अनेकदा केवळ आपण असहिष्णु आणि पुढारलेले आहोत हे भासविण्यासाठी आपण रूढी परंपरा वगैरे मानत नाही असे दाखवतात. वास्तविक पाहता पारंपारिक पोशाखातील खेडवळ माणूस विश्वासार्ह, मनमिळाऊ असू शकतो आणि आधुनिक पोशाखातील उच्चशिक्षित व्यक्ति बुरसटलेल्या विचाराची, अहंमन्य आणि लबाड असू शकते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना आपल्या स्वत:च्या रागावर नियंत्रण करता येते त्यांना जग जिंकणे काही अवघड नाही. जर रागावर नियंत्रण करता येत नसेल तर स्वत:चे जीवन स्वत:च्याच हाताने संपवल्यासारखेच आहे. म्हणून माणसाने कधीही राग आला तरी रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९८७: मराठी राजभाषा गौरव दिन● २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.💥 जन्म :-● १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज● १९४३: कर्नाटक चे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा● १९५२: भारतीय चित्रपट निर्माता प्रकाश झा● भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग💥 मृत्यू :- ● १८८७: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी● १९३१: काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद● १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर● १९९७: श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार● २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, मतदारांचा अल्प प्रतिसाद, 2 मार्चला मतदानाचा निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईत शिंदे-फडणवीस सरकारकडून विकासकामांना गती, 320 कामांचं केलं भूमीपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणी जिल्ह्यातील महत्वाच्या विकास कामांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते झाले उद्घाटन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकची द्राक्ष युरोपात, आतापर्यंत 32 हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ग्रीन हाऊससाठी राजस्थान सरकारकडून शेतकऱ्यांना 50 ते 70 टक्के अनुदान देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जी-20 च्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद जिल्ह्यात 1400 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदोर येथील होळकर स्टेडियमवर सुरु होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी राजभाषा गौरव दिन*त्यानिमित्ताने लेख व कविता खालील👇🏼लिंकवरhttps://nasayeotikar.blogspot.com/2021/02/marathi-bhashaa-din.htmlलेख व कविता वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*🏆Class-8th English chapter 3.2 The Song of songs-Story🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/F5N2EOP_wnk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वि. वा. शिरवाडकर*विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सिंहाच्या अगोदर कोणत्या प्राण्याला 'जंगलाचा राजा' म्हटले जायचे ?२) जगात शिक्षण क्षेत्रात आघाडी देश कोणता ?३) कोणत्या नदीला 'महाकाली नदी' असे संबोधल्या जाते ?४) जीवनसत्त्व ब - ६ चे रासायनिक नाव काय आहे ?५) कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत ?*उत्तरे :-* १) हत्ती २) कॅनडा ३) शारदा नदी ४) पायरीडॉक्सीन ५) भारत *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मुटे, वर्धा👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना जे घडी राघवेवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.**विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन**१९३६- क्षयरोग निवारण दिन*💥घडामोडी● १९५२ - भारतात कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरुवात झाली.● १९६१ - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला💥जन्म● १६७० - छत्रपती राजाराम राजे भोसले, मराठा साम्राज्यचे तृतीय छत्रपती● १९४८ - जे. जयललिता, तामिळनाडूची माजी मुख्यमंत्री.● १९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक💥मृत्यू● १६७४ - प्रतापराव गुजर मराठा साम्राज्याचे तिसरे सरसेनापती● १९३६ - लक्ष्मीबाई टिळक, मराठी लेखिका● १९९८- मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार● २०१८ - श्रीदेवी, हिंदी चित्रपट अभिनेत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विदर्भात तापमानात वाढ; अकोला, नागपूरमध्ये कमाल तापमान 3 ते 4 अंश जास्त.. फेब्रुवारीमध्येच 40 अंश सेल्सियसचा आकडा गाठण्याची भीती..*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चीन आणि तजाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 6.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईकर प्रवाशांच्या अडचणीत भर, बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विद्यार्थिनींनी केलल्या आरोपांवर चौकशी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, शहापूर परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अदानींच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी पाण्यात; अदानींची संपत्ती 8.5 लाख कोटींनी घटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *WT20 Semi-Final : फायनलमध्ये भारताचा 5 धावानी झाला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/r5Mvh_V5F_s~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 54 वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो शाळेचे दरवाजे उघडतो तो जेलचे दरवाजे बंद करतो."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणत्या दिवसापासून महाराष्ट्राने 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत म्हणून अंगीकारले ?३) भारत जागतिक अर्थव्यवस्थामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ?४) जीवनसत्त्व ब - २ चे रासायनिक नाव काय आहे ?५) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या महाराष्ट्राचे शिल्पकार कोण ?*उत्तरे :-* १) राजकमल जोब, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक २) १९ फेब्रुवारी २०२३ ३) पाचव्या ४) रायबोफ्लोविन ५) बाळशास्त्री जांभेकर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना रे जनीं मौनमुद्रा धरावी। कथा आदरे राघवाची करावी॥ नसें राम ते धाम सोडूनि द्यावे। सुखालागिं आरण्य सेवीत जावे ॥४४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जिथे काही उगवत नाही, झाडा झुडुपांशिवाय काही असत नाही, तिथे एरंडाचे झाडच वृक्ष मानले जाते. वास्तविक एरंड कधी पिंपळ, वड, औदुंबर अशा वृक्षांची बरोबरी करेल का ? तुकोबांनी म्हटले आहे, 'उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड.' कितीही उंच वाढला तरी एरंड कधी उसाची बरोबरी करू शकणार नाही. एरंड हे एक अतिसामान्य झाड, त्याची पाने गाढवही खात नाही म्हणे.**परंतु अशा झाडालाही कधी कधी आपल्या एखाद दुस-या चकचकीत हिरव्या पानांचा गर्व होतो. क्षुद्र व्यक्तीलाही असा गर्व होतो, की आपण जणू महान आहोत.* *एरंडालाही आपण महावृक्ष असल्याचे वाटते. महावृक्ष केव्हाही थोरच. घनदाट शितल छाया, डेरेदार विस्तार, पशुपक्षी यांचे विसाव्याचे ठिकाण. ऋतुमानाप्रमाणे निरंतर येणारा बहर ही त्यांची श्रीमंती आणि वैभव. वृक्ष कुलातील हे ऋषीमुनी कुठे नि एरंड कुठे?**"जिथे काही उगवत नाही तिथे 'एरंड'लाच वृक्ष मानावे लागते हे दुर्दैव."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १८८७- रिव्हेरा येथे या दिवशी भुकंप💥जन्म● १५६४ - जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअर● १८७६- आधुनिक काळातील एक महान संत गाडगेबाबा💥मृत्यू*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संसदरत्न पुरस्काराची घोषणा; गोपाळ शेट्टी, अमोल कोल्हे, हिना गावित आणि फौजिया खान यांचा सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा सुटणार, 320 कोटी रुपयांचा निधी महिन्याच्या सुरुवातीला वेतनासाठी देण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार, मात्र याचिका सुनावणीसाठी दाखल, दोन आठवड्यांनी सुनावणी, ठाकरे गटांच्या आमदारासाठी व्हीप बजावणार नसल्याचं शिंदे गटाकडून कोर्टातच जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बारावीच्या पहिल्याच पेपरला औरंगाबाद विभागात कॉपीची 32 प्रकरणं; सर्वाधिक 17 जालन्यातील*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ऑलिम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर बनवणार सिनेमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकेतील सिएटल नगरपरिषदेत ऐतिहासिक निर्णय, नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Yt3LFHZtX0o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसिध्दी ही अशी बाब आहेजी कितीही मिळाली तरीमाणसाची तहान भागत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) ११ ते १२ मार्च २०२३ २) अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी ३) चंद्रपूर ४) थायमिन ५) सुधीर मुनगंटीवार *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निलेश सितावार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना एक जीवीं धरावें। जनी आपुलें हीत तूवां करावें॥ रघूनायकावीण बोलो नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?**जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु● १८५७- रत्नागिरीत ’पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.💥जन्म● १७३२ - अमेरिकेचे पाहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन● १९२२ - भारतीय व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग💥मृत्यू● १९४४- कस्तुरबा गांधी यांचे निधन● १९५८ - भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद● २०००- लेखक व पत्रकार वि. स. वाळिंबे● २००९ - डॉ. लक्ष्मण देशपांडे ( वऱ्हाड निघालय लंडनला फेम )*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिक कृषी विभागाने लोकसहभागातून सर्वात जास्त 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 50 पेक्षा जास्त वयाच्या कैद्यांना बेड आणि उशी मिळणार आहे. अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी घेतला याबाबतचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 रोजी बेळगाव दौऱ्यावर, बेळगाव इथे कोट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुर्की आणि सीरीयाच्या सीमेवर 14 दिवसांनंतर आणखी एक भूकंप; तीन जणांचा मृत्यू तर 200 हून अधिक जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच; आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद, मोबाईल टॉर्च लावून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BgjVNBSFkuE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डॉ. लक्ष्मण देशपांडे ( जन्म ५ डिसेंबर १९४३ - मृत्यू २२ फेब्रुवारी २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.लक्ष्मण देशपांडे लहानपणी गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी "वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. प्रतिकार हे त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे पुस्तकही रसिकांना भावले. 'मौलाना आझाद-पुर्नमूल्यांकन' या पुस्तकाचे, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अक्षरनाद या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.*प्रा. लक्ष्मण देशपांडे यांना मिळालेले काही पुरस्कार*◆ २००३ : महाराष्ट्र शासनाचा कलावंत पुरस्कार.◆ २००४ : विष्णूदास भावे पुरस्कार.◆ याशिवाय छत्रपती शाहू महाराज, बेंडे स्मृती, राम श्रीधर, अल्फा टीव्ही, पुरुषोत्तम करंडक, वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठान, सयाजीराव महाराज यांच्या नावाचे पुरस्कार.◆ अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे साहित्यसम्राट आचार्य अत्रे पुरस्कार.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संघर्ष जेवढा कठीण होईल, विजय तेवढाच तल्लख होईल – थॉमस पेन*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••z१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?*उत्तरे :-* १) २० वे २) रेखा शर्मा ३) भारत ४) शिंदे गट ५) देवमासा ( व्हेल )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शाहरुख शेख, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायका आपुलेसे करावें॥ दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सज्जनत्वाच्या अनेकविध कसोट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचे बोलणे होय. माणसाच्या जिभेवर खडीसाखर असली तर त्याची न होणारी, लांबणारी कामेसुद्धा झटक्यात होतात याचा अनुभव अनेकदा येतो. वाणीतील मवाळपणा माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाणारा ठरला असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. व्यक्तीजवळ इतर कोणतेही धन नसेल तरी एकवेळ चालेल; पण त्याच्या जीवनव्यवहारात गोडवा हवा. त्याच्याशी बोलावे, नाते निर्माण करावे असा मोह जेव्हा इतरांना होतो तेंव्हा तो त्याचा जीवन-विजय असतो.**लोक अनेकदा स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दुस-याला दुखावतात, त्यांचा अपमान करतात; पण असे करणे चांगले नव्हे. मार्दवाने बोलल्यास कमीपणा येतो, आपली बाजू सत्याची असली तरी लोक साशंकतेने पाहतात, त्यात ठाशीवपणा नसतो, असा काही लोकांचा गैरसमज असतो. मोठ्याने, ओरडून बोलले तरच समोरचा नमतो, त्याच्यावर प्रभाव पडतो असे मानणे वेडेपणा आहे. ज्याला चांगुलपणाची आस असते, त्याच्या मवाळतेच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या असतात. बोलण्यातील मऊपणा म्हणजे दुय्यमत्व नव्हे. ते तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे एक लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनातील वैशिष्ट्ये वाचली की, त्यांनी जे विराट काम केले, त्यांनी डोंगराएवढी माणसे प्राणपणाने जपली त्यात त्यांच्या स्नेहार्द्र वाचेचा वाटा सर्वोच्च होता.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वप्न तर सारेच पाहतात.स्वप्न पाहणेही काही गैर नाही.परंतू स्वप्न सत्यात उतरावयाचे झाल्यास त्यासाठी परिश्रमही करणे तितकेच महत्वाचे आहे.स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य झाल्यास त्याचे नियोजन करावे.अशक्य वाटत असेल तर स्वप्न म्हणूनच त्याला मागे टाकावे.त्याबद्दल त्याचा जास्त विचारही करु नये. कारण जास्त विचार केला तर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी.जे आहे त्यात बदल होत असेल तर बदल करून जीवनात आनंद आणि समाधान मानावे.विनाकारण स्वप्नांच्या जास्त मागे धावू नये. नाही तर आहे ते ही सुख गमावून बसल्याचा पश्चाताप होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चोर ते चोर अन वर शिरजोर*एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्चा इसम होता. तो गि-हाईकाच्या दळणातील थोडेसे धान्य अथवा पीठ काढून घेत असे. त्याची ही चोरी अनेकांच्या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्याने लोक गप्प बसत असत. एकेदिवशी धान्याच्या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्या उंदराला पकडून तो माणूस त्याच्या मांजराकडे देणार इतक्यात तो उंदीर विनवणीच्या सुरात त्या दळणक-याला म्हणाला, अहो मालक, मी चोर नाही. तुमच्याकडे येणा-या धान्यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्हा मला कृपया तुम्ही सोडून द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्याला म्हणाला,''अरे उंदरा धान्याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.उंदीर म्हणाला, प्रत्येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्ही तर प्रत्येक दळण दळण्याचे पैसेही घेता आणि वरून त्या दळणातील थोडे धान्य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्ही स्वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात. उंदराच्या या बोलण्याने माणूस खूपच संतापला व म्हणाला, चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्याचा अधिकार प्रत्यक्ष परमेश्वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस असे म्हणून त्याने त्या उंदराला मांजराच्या स्वाधीन केले.*तात्पर्य*- जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्ठा मिळते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21/02/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक मातृभाषा दिन💥 ठळक घडामोडी :- १८४२: जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणमशिनचे पेटंट मिळाले.१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.💥 जन्म :-१९४३: ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन१९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर💥 मृत्यू :- १८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा१९६५: कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बोर्ड बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आंदोलन स्थळी स्ट्रीट लाईट बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * G 20 च्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणचे काम 22 फेब्रुवारीच्या आत संपवावे; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच बेमुदत कामबंद आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gncdHXwtvxA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे(उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*01) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* सहा*02) मेढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?* लोकरी*03) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?* बिहार*04) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे?श्रीहरिकोटा05) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात?*डेसिबल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, नायगांव👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥ विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.**हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी⌛१९८७- मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला⌛१९८८- गीता सेठीने राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धा जिंकली 💥जन्म१९३६: माजी भारतीय फुटबॉल खेळाडू जर्नल सिंह १९५६: भारतीय चित्रपट अभिनेता अन्नू कपूर १९७३: भारतीय चित्रपट अभिनेते प्रियांशु चटर्जी 💥मृत्यू१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू १९७४: के. नारायण काळे – नाट्यसमीक्षक १९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू १९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक २००१: इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते२०१२: डॉ. रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच होणार वाढ. यावेळी महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही, पगारवाढही मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील रंजना, प्रतिथा वाघिणी गुजरातला रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार? मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी लोक ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील - नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्ली: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा, जयदेव उनाडकटचा संघात पुन्हा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिवजयंती**व्हिडीओ लिंक👇*https://youtu.be/cFWtCFBYWpE~~~~~~~~~~~~~~~~~ *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••कादंबरी - लक्ष्मीhttp://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते. इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही. आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य आज रोजी इ.स. १९८७ साली स्थापन झाले. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरुणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरुणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरुणाचलमधील प्रमुख पिके आहेत.अरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.*संकलन *••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?२) इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) केवळ एक २) लिथियम ३) रोहीत शर्मा ४) अँटोनियो गुटेरेस ५) उजीयारो केवटीया, समनापुर, जि. डींडोरी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि. प्रा.शा.शिरूर ता.उमरी,जि.नांदेड.👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पाविजे सर्वही सूख जेथे। अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥ विविकें कुडी कल्पना पालटिजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपण स्वत:च्या मनाशी कधीतरी संवाद साधला पाहिजे. बाहेरच्यांशी आपण खूप बोलतो. नको तेवढा वेळ घालवतो, पण त्यात 'स्वसंवाद' साधायला विसरतो. हा विसर आयुष्याच्या शेवटाला आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आपण अनेक गोष्टी सहज करू शकलो असतो, क्षमता असूनही आपण एकही शाश्वत काम उभे करू शकलो नाही, ही जाणीव नैराश्यकडे नेणारी असते.* *" तुका म्हणे होय मनासि संवाद,* *आपुलाचि वाद, आपणाशी।"**असा वाद आता संपला आहे; कारण वाद होण्यासाठी मुळात संवाद व्हावा लागतो. त्यासाठी एकदा स्वत:त डोकावून पाहावे लागते. एकदातरी स्वत:ला कडकडून भेटायला हवे. आपले नेमके उलटे होते.* *हजारों मैंफिले हो,* *लाखो मेले हो,* *खुदसे ना मिलो,* *तो बिलकुल अकेले हो ॥**हे असे एकटेपण कुणालाही, कधीही येता कामा नये. समाजात अनेकांना 'एकांत' आणि 'एकटेपणा' यातला फरक कळत नाही. एकांत साधना, अभ्यास या विषयाशी निगडीत आहे, तर एकटेपणा हा नकारात्मक आहे. एकांताचे अनुमान 'सुखावह' तर एकटेपणाचे 'भयावह' असतात....!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीव कायमस्वरुपी या जगात राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आलेला नाही. एखादी वस्तू चांगली आहे तोपर्यंत त्याचा वापर करतो आणि काम संपले की त्याला खराब झाली म्हणून अडगळीला टाकून देतो कारण त्याची किंमत शून्य होते. तसे मानवी जीवाचे नाही. मानवी जीवाचे वय वाढत जाते त्याबरोबरच मूल्यही (जगण्याचे महत्व) अधिकाधिक वाढत असते.जसजसे वय वाढत जाईल आणि तसे तसे अनुभवाने समृद्ध होत जाईल.जगण्याचे मूल्यही कळायला लागेल.पण त्या मिळालेल्या चांगल्या अनुभवाचे पडसाद मागे राहणा-यावर पडले तर तुमच्या पश्चात ते अजरामरच राहणार आहेत.कारण आपणहीकधी ना कधी या जगातून निघूनच जाणार आहोत.मग आपण जाण्याचे दुःख बाळगायचे नाही तर आपण इतरांना काहीतरी चांगले देऊन गेलो याचे समाधान वाटून जीवन समर्पित करावे.यातच खरे जीवन जगण्याचे सार आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🌅जीवनाचे सार* *एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हालाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.* *🧠थोडक्यात- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.१७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिं💥 जन्म :-१८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे💥 मृत्यू :- १९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार, कॉपी बहाद्दरांवर करडी नजर; पुण्यातील दहावी, बारावीच्या परीक्षाकेंद्रावर इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एअर इंडियाकडून जगातील सर्वात मोठा विमान खरेदी व्यवहार! फ्रान्सच्या एअरबसकडून 250 आणि अमेरिकेच्या बोईंगकडून 220 अशी तब्बल 470 विमाने खरेदी करण्याचा निर्णय, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांकडून स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी, शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन, तीन दिवस कार्यक्रमांची जंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जगभरातील किनारपट्टी भागातील शहरांसाठी धोक्याची घंटा, मुंबईचा काही भाग पाण्याखाली जाण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापुरात पाच मार्चला 'रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट'चे आयोजन; आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऐतिहासिक! विश्व क्रिकेटवर टीम इंडियाचं वर्चस्व! प्रत्येक ठिकाणी भारतीय आघाडीवर, वनडे, टी20 नंतर कसोटीतही टीम इंडिया नंबर 1*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी 20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सहा गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆8 वी शिष्यवृत्ती उत्तरसूची 2023 पेपर-1 व 2🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/rpuiteQHl-U?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकच ध्यास ; वाचन विकास*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *धुंडिराज गोविंद फाळके*धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?*उत्तरे :-* १) नानज अभयारण्य, सोलापूर २) दक्षिण आफ्रिका ३) लिथियम ४) कुतुबुद्दिन ऐबक ५) पाकिस्तान*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाप्पा महाजन, नाशिक👤 प्रदीप वाघमारे, पुणे👤 सतीश चौहान, चौसाळा👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद👤 लता विष्णु वायाळ (स.शिक्षिका) भोकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा। उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.**कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरी नक्कल*भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी :- १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.१९६७: आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.१९७६: मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.२०००: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.२०१०: आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.💥 जन्म :-१५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ१९४७: भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर१९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ१९४९: प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी१९५२: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी१९५४: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल💥 मृत्यू :- १८६९: ऊर्दू शायर मिर्झा गालिब१९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री१९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक१९८०: मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय२००८: भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू, 38 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एअर इंडियाला मिळणार नवी उभारी, टाटा सन्स 250 विमाने करणार खरेदी; पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद - G20 च्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी अतिक्रमण जमीनदोस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक मनपाने पाणीपट्टीतून जमा केले 44 कोटी, चारशेहून अधिक घराचं पाणी बंद, नाशिक मनपाची कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन; लगान, चक दे इंडिया चित्रपटात साकारली होती भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे त्यात मोठे बदल होण्याची शक्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆5 वी शिष्यवृत्ती उत्तरसूची 2023 पेपर-1 व 2🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/vnPaED8nF-o?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमवा आणि शिका*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वसंत गोवारीकर*वसंत रणछोड गोवारीकर (२५ मार्च, इ.स. १९३३; पुणे, ब्रिटिश भारत - २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्याशाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारिकरांचे नाव देण्यात आले आहे.वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च, इ.स. १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) पी. व्ही. सिंधू २) ऑपरेशन दोस्त ३) मरुस्थळ ४) ध्वनीची तीव्रता ५) भोपाळ*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक👤 किरण गौड, धर्माबाद👤 घनश्याम नानम, धर्माबाद👤 रमेश सोनकांबळे👤 गुलाब जाधव👤 रमेश पाटील कदम👤 अविनाश सातपुते👤 गोविंद टेकुलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा.ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान.जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14/02/2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷=========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन डे*💥 ठळक घडामोडी :- १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.१९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.💥 जन्म :-१९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार १९१६: संजीवनी मराठे – कवयित्री१९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया १९३३: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री१९५०: कपिल सिबल – वकील आणि केंद्रीय मंत्री१९५२: भारतीय जनता पार्टी च्या महिला राजनीतिज्ञ तसेच केंद्रात मंत्री राहिलेल्या सुषमा स्वराजमा स्वराज१९६०: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित निरंजनानंद सरस💥 मृत्यू :- १४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग१९८०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक मनहर रसकपूर यांचे निधन२००५: हिंदी साहित्यकार तसेच प्रसिद्ध लेखक विद्यानिवास मिश्र यांचे निधन२००७: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्यामाचरण शुक्ल यांचे निधन.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298=========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या फ्रेश बातम्या*🌷=========ஜ۩۞۩ஜ=========1⃣ *बंगळुरु : आशियातील सर्वात मोठा Air Show, एअरो इंडिया 2023 ला पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात; जगाला दिसणार मेड इन इंडियाची ताकद*-----------------------------------------------------2⃣ *मुंबई : 28 तारखेला महाराष्ट्र एकीककरण समितीचे मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन*-----------------------------------------------------3⃣ *पुण्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन.. १५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा... परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा...*-----------------------------------------------------4⃣ *नाशिकच्या शिवजयंतीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, डीजेलाही बंदी, पोलिसांचं महत्वाचं आवाहन*-----------------------------------------------------5⃣ *घटती प्रवाशी संख्या लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांनंंतर आता पदवीधर, ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकिट दरात सवलत. नागपूर मेट्रो प्रशासनाचा निर्णय.*-----------------------------------------------------6⃣ *कोल्हापूर : फेब्रुवारी मध्यापूर्वीच कोल्हापूर तापण्यास सुरुवात; पारा 35 अंशांवर*-----------------------------------------------------7⃣ *आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला*-----------------------------------------------------*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300=========ஜ۩۞۩ஜ========= 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*=========ஜ۩۞۩ஜ=========*🏆मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी साहित्य प्रदर्शन,नांदेड🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/RcFRyzSLghY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*=========ஜ۩۞۩ஜ========= *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जगाला प्रेम अर्पावे .....!वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.htmlआपले अभिप्राय जरूर द्यावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*📱9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष फ्रेश माहिती* 🌷🍃=========ஜ۩۞۩ஜ========= *कवी संजीवनी मराठे*संजीवनी रामचंद्र मराठे ( १४ फेब्रुवारी, इ.स. १९१६ पुणे, महाराष्ट्र - १ एप्रिल, इ.स. २०००:पुणे) या एक कवितागायनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी कवयित्री होत्या.संजीवनी मराठे यांचे शिक्षण पुण्यात झाले. शाळकरी वयातच त्यांनी कविता करावयास सुरुवात केली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या त्या जी.ए. (गृहीतागमा) व एम. ए. होत्या. आयुष्याच्या उत्तरार्धात संजीवनी मराठे आणि त्यांचे पती खानापूर-बेळगाव सोडून सांगलीस गेले. सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा रामकृपा नावाचा बंगला होता. संजीवनीबाईंनी काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. संजीवनी मराठे यांना मिनी, भारती, अंजू या तीन मुली आणि प्रताप नावाचा मुलगा होता. प्रताप हा वैमानिक होता. अंजूने लग्नानंतर पाठविलेली पत्रे संजीवनी मराठे यांनी संपादित करून प्रकाशित केली.महाराष्ट्र शासनाने ’बरं का गं आई’, आणि ’हसू बाई हसू’ या कवितासंग्रहांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.*संकलित माहिती*=========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""*=========ஜ۩۞۩ஜ=========*" गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764=========ஜ۩۞۩ஜ========= *आजची फ्रेश प्रश्नमंजुषा*=========ஜ۩۞۩ஜ=========१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?२) ट्रान्सजेंडर दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होण्याची देशातील पहिली घटना कोणत्या राज्यात घडली ?३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?*उत्तरे :-* १) रमेश बैस २) केरळ ३) ग्राम पंचायत ४) महात्मा गांधी ५) १ एप्रिल २०२३*संकलन - जैपाल भै. ठाकूर* जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)=========ஜ۩۞۩ஜ=========🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂=========ஜ۩۞۩ஜ=========👤 प्रा. डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*📱9423625769=========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ मनाचे श्लोक @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ=========असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥ *।। जय जय रघुवीर समर्थ ।।*=========ஜ۩۞۩ஜ=========🌟‼ *आजचा फ्रेश विचारधन* ‼🌟=========ஜ۩۞۩ஜ=========*महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.**एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040=========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे फ्रेश विचारवेध......✍🏻*=========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.=========ஜ۩۞۩ஜ=========🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭=========ஜ۩۞۩ஜ========= *चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असतानातिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले.*तात्पर्य :-**एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा.ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार.〰〰〰〰〰〰〰〰〰*📝 संकलन* 📝*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे.**जि.प.प्रा.शा गोजेगाव**ता.हदगाव, जि. नांदेड*http://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक रेडिओ दिन*💥 ठळक घडामोडी⌛१९८४- भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना💥 जन्म :-⌛१८७९ - सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन⌛ १९११ - विख्यात ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म⌛१९२२ - गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्म💥 मृत्यू :-⌛१९१४- ’लल्फ़ान्सो बर्टिलान’ या मानववंश शास्त्रज्ञाचे निधन⌛१९०१- शरीर शास्त्रज्ञ जयवंतसिंग यांचे निधन⌛१९९४ - उत्साद अमीर खाँ यांचं निधन⌛ १९०१ - भाऊराव कोल्हटकर यांचं निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतात येणार नवीन ईव्हीएम मशीन, देशातील कोणत्याही भागातून करता येणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शत्रूच्या काळजात धडकी भरवणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची 25 वर्ष पूर्ण; DRDO कडून शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील सर्वात लांब मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा दीक्षांत समारंभ सोहळा आज पार पडणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेगावमध्ये संत गजानान महाराज यांचा 145 वा प्रकटदिन सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत टी 20 विश्वचषकात विजयी सुरुवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन,नांदेड🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/vU6PsdookuY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~ *👬 मैत्री 👬* ~~~~~~मैत्री ही कापड्यातील धाग्यासारखे आहे. एका मित्राने आपले जीवन परिपूर्ण होतच नाही. अनेक धाग्यासारखे जीवनात अनेक मित्र असतात आणि त्याची आवश्यकता देखील पदोपदी जाणवत राहते. बालपणीच्या मित्रांपासून जी मैत्री चालू होते ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत जाऊन पोहोचते. या सर्व कार्यकाळात असलेले मित्र सुख आणि दुःखाच्या प्रसंगी अधुनमधून जीवनात डोकावत असतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मैत्री होते पण ती काही ठिकाणी तात्पुरते बनते तर काही ठिकाणी ही मैत्री गट्ट दिसून येते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यासाठी जीवनात संकट यावे लागते हे ही सत्य आहे. आपल्या जीवनात संकटेच आली नाहीत तर खरी मैत्री देखील कळणार नाही.*मैत्री असावी जीवाभावाची**नसाव्यात कोरड्या शपथा**क्षणोक्षणी आठवावे आपुल्या**मैत्रीच्या आठवूणी कथा*लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इतिहासात प्रथमच अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे तब्बल आठ मिनिटे जुनेच अर्थसंकलपीय बजेट कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांने वाचन केले ?२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?*उत्तरे :-* १) राजस्थान २) १५ ऑक्टोबर २०२२ ३) नवी दिल्ली ४) महात्मा गांधी ५) उत्तरप्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिकंदर 'जगज्जेता' ठरला, तरीही त्याची अभिलाषा विराम पावली नव्हती, तो मनाच्या घालमेलीत फे-या मारत होता. सारी पृथ्वी जिंकून मी 'जगज्जेता' आणि महान 'सेनापती' ठरलो. मी जेता आहे; पण आता मी जिंकू काय ? त्याचा अहंकार जागा होता. त्याचं मन दु:खी झालं.**सारी छावणी निद्रेच्या अधीन होती. पण या विषण्ण अवस्थेत त्याचा दु:खावेग अनावर झाला अन् तो ढसढसा रडू लागला व ओरडू लागला आता मी जिंकू काय ? मला जिंकण्यासाठी काहीच उरले नाही.**आवाज ऐकून एक वृद्ध सैनिक जागा झाला व म्हणाला.."शहंशाह जिंकायला अजून एक गोष्ट बाकी आहे. ती अत्यंत अवघड गोष्ट म्हणजे माणसाचं मन ! ते जिंकलत तर आपण ख-या अर्थाने 'जगज्जेता' व्हाल !"**" ज्या दिवशी माणूस स्वत:चं मन जिंकेल त्यादिवशी तो खरा जगज्जेता !"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंद हा आनंदच असतो.आनंदाला कोणीही सहज स्वीकारतो.त्याचा कोणीही तिरस्कार करत नाही.जेथे सुख,समाधान,शांती आहे तेथे आनंद आनंदाने नांदत असतो.पण जेथे वाद,नैराश्य,दुःख,अस्थिर मन आहे तेथे आनंद संचार करत नाही.आनंदाला जवळ करायचे असेल तर मनातून त्याला हसत मुखाने व कोणत्याही कठीन परिस्थितीत स्थीर मनाने स्वीकारावे.इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात आनंद मिळवता येतो.त्यासाठी आपणही आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे.कारण आनंद हा चांगल्या प्रयत्नाने आणि सातत्याने केलेल्या कामात व मनाच्या समाधानात मिळत असतो.तो कुणालाही विकत घेता येत नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ एकाग्रता ❃* *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली. *_🌀तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी⌛१८३० : मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.⌛१९३३ : म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.⌛१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.⌛१९९९ : मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.💥 जन्म :-⌛१८४७ : थॉमस अल्वा एडिसन, सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक, विद्युतप्रकाश व ध्वनी उपकरणांचे जनक.⌛१९२३ : प्रसिध्द हॉकीपटू त्रिलोचनसिंग बाबा.⌛१९४२ : गौरी देशपांडे, मराठी लेखिका.💥मृत्यू :-⌛१९७७ : जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.⌛१९६८ : पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.⌛१९७७ : फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.⌛१९९३ : कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय, परीक्षेच्या आधी 10 मिनिटे प्रश्नपत्रिका मिळणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन, सभागृहातील विरोधकांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गेल्या 11 वर्षात 16 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलं, 2022 मध्ये सर्वाधिक नागरिकांनी देश सोडला; केंद्र सरकारची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांच्या मागे सामान्य नागरिकांचे पाठबळ, खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर; आज दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३२१ अशी धावसंख्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Z7aIh7kuNQU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी पेंशन योजना चालू करावी ( दैनिक जनशक्ती )*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://www.ejanshakti.com/जुनी-पेन्शन-योजना-चालू-कर/लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच़. फेब्रुवारी ११, इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते फक्त ३ महिने शाळेत गेले. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यात नदी संवर्धन आणि सरंक्षणासाठी कोणते अभियान राबविण्यात येत आहे ? २) संगणक ( कॉम्प्युटर ) चा शोध कोणी लावला ?३) पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा काय आहे ?४) पंचायत राज हे कोणत्या भारतीय नेत्याचे स्वप्न होते ?५) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात ?*उत्तरे :-* १) चला जाणूया नदीला २) चार्ल्स बॅबेज ३) H2O ४) महात्मा गांधी ५) कर्नाटक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव हिमगिरे, सहशिक्षक, कन्या शाळा धर्माबाद👤 रविशंकर बोडके👤 म. जावीद, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤परमेश्वर कल्याणकर, तंत्रस्नेही शिक्षकचिखली (खु) केंद्र निळा ता जि नांदेड👤 राणी पद्मावार👤 प्रभाकर भेरजे👤 कृष्णकांत लोणे👤 दत्तात्रय दळवी👤 प्रमोद शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मन विषयांकडे प्रमाणाबाहेर ओढ घेऊ लागले, तर मनुष्य कुठच्या कुठे आणि कसा वाहावत जातो, ते त्याचे त्यालासुद्धा समजत नाही. त्याउलट मन जर संतुलित आणि संयमित असेल, तर असा माणूस त्याला अंतर्मुख करून आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. मनुष्यदेह दुर्लभ असल्याने तो लाभल्यावर मन ताळ्यावर ठेवून ही आत्मज्ञानाची वाट चोखाळण्याचा उपदेश संतमंडळी करतात. अर्थात, ही वाट चालू लागायचे तेदेखील देह सुस्थितीत असतानाच, गलीतगात्र झाल्यावर नव्हे. पुष्कळ पुण्य गाठीशी असलेल्या व्यक्तिसच मनुष्यदेह लाभत असल्याने जीवनाचे क्षणभंगुरत्व लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच मनुष्याने देहरूपी नौका फुटण्यापूर्वी पैलतीरी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.**जर मनुष्याची बुद्धी म्हणजेच विवेक जागृत असेल, तर आपले हित नेमके कशात आहे? हे ओळखून विषयांकडे धाव घेणा-या मनाला वेळीच आवरता येते. थोडक्यात, इंद्रिये म्हणजे रथाचे घोडे आणि मन म्हणजे लगाम मानला आहे. या मनाचा योग्य तेव्हा उपयोग करून घोड्यांना कधी आणि किती आवरायचे अगर ढिले सोडायचे हे ठरविणारा सारथी म्हणजे 'सदसद्विवेकबुद्धी' होय. निराळ्या शब्दात सांगायचे झाले, तर मन हे ओढाळ गुराप्रमाणे अत्यंत चंचल असते. जसे अवखळ गुराच्या गळ्यात लोढणे बांधल्याने त्याला काबूत ठेवणे शक्य होते, तसेच विवेक आणि वैराग्याची योजना केल्यास ओढाळ मन काबूत राहते.* *मन हे ओढाळ गुरू* *पर धन पर कामिनीकडे धावे ।* *वास्तव विवेकपाशें* *कंठी वैराग्यकाष्ठ बांधावे ॥* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच वाटतं की,माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं,आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की,मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ?याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल.मग मनच सांगायला लागेल की,तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.आपण जर थोडा स्वार्थ जर सोडला आणि इतरांना आपलसं केलं,त्यांच्याशी आपुलकीची नातं जोडलं,त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील.असं जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील.तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल,संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक : 10/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.● १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना२०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी 💥 जन्म :- १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. 💥 मृत्यू :- १२४२ - शिजो जपानी सम्राट.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानास प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Nagpur ZP : सुरक्षा ठेव घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी; एकाचे निलंबन, वेतनवाढीवरही टांगती तलवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे जिल्ह्यातील राजगुरू विद्यालयात खिचडीतून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका, कोपरी रेल्वे पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेडमधील जि.प. धामदारी शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत, गिरवत आहेत सेंद्रिय शेतीचे धडे; सांडपाण्याचा वापर करत फुलवली परसबाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कसबा मतदारसंघात दोन्ही पक्षांना बंडखोर आणि नाराजांची मनधरणी करण्यात यश.. कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांचा कसब्यातून उमेदवारी अर्ज घेतला मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 5 बळी घेत कसोटी बळीचे शतक केले पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/I-Mt0MNDMu8~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका वोटची किंमत*लिंक 👇🏼http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.४६ शैक्षणिक विभाग आहेत. ४७४ महाविद्यालये आणि सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे. या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे यः क्रियावान् स पण्डितः आणि संकेतस्थळ www.unipune.ac.in असे आहे. संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?*उत्तरे :-* १) राजा हरिश्चंद्र २) अमेरिका ३) सरडा ४) सोडियम कार्बोनेट ५) गावातील सर्व प्रौढ मतदारांचा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमिन जी. चौहान, यवतमाळ👤 विजय रच्चावार, संपादक👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.* *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....**"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."**तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली. १९७३ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.💥 जन्म :- १८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर. १९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते💥 मृत्यू :- १९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक १९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते. १९८१ - न्या.एम.सी.छगला, नामवंत कायदेपंडित १९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक. २००० - शोभना समर्थ, अभिनेत्री. २००१ - दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल. २००६ - नादिरा, अभिनेत्री.२००८ - समाजसेवक बाबा आमटे*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकमध्ये भाजपचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन, गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 9 मार्चला अर्थसंकल्प मांडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तुर्की-सीरिया मृत्यूच्या दाढेत, भूकंपातील बळींचा आकडा 8 हजारांवर, आकडा 20 हजारांपर्यंत वाढण्याची WHOला भीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार जागतिक दूध उत्पादनात भारताने मिळविले प्रथम स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कसबा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापूर शहरात आजपासून 'जागरुक पालक सुदृढ बालक' अभियान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fTkTUcOqsrM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जन्म मृत्यूची नोंदणी*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गोविंद त्र्यंबक दरेकर*स्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर (जन्म: ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४ - २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले.नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघु अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? ', 'कारागृहाचे भय काय त्याला? ', 'नमने वाहुनि स्तवने उधळा', 'मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे? ' (लोकमान्य टिळकांवरील काव्य) अशा कवी गोविंदांच्या किती तरी कविता त्या काळी महाराष्ट्रभर गाजल्या आणि पुढे या कवितांमधील ओळींना सुभाषिते होण्याचे भाग्य लाभले.प्रखर देशभक्तिपर कविता लिहिणार्या या स्वातंत्र्यशाहिराच्या काही कविता स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारकडून जप्तही करण्यात आल्या होत्या.संकलन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" वयाने मान मिळतो पण आदर हा वर्तणुकीमुळे मिळतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'लोकशाहीचा पाळणा' असे कशास संबोधले जाते ?२) 'मिशन भगीरथ योजने'अंतर्गत सुरक्षित व मोफत पिण्याचे पाणी पुरविणारे देशाचे एकमेव राज्य कोणते ?३) 'जोहार मायबाप जोहार' ही रचना कोणाची आहे ?४) लाकडात कोणता प्रमुख घटक असतो ?५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या प्रबंधासाठी डी. एस्सी. पदवी मिळाली ?*उत्तरे :-* १) स्थानिक स्वराज्य संस्था २) तेलंगणा ३) संत चोखामेळा ४) सेल्युलोज ५) द प्रॉब्लेम ऑफ रूपी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें।प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'**ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.**याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यातील अहंकाराने आपल्या रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शेरास सव्वाशेर*एका शेतकर्याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.💥 जन्म :-१८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन💥 मृत्यू :- १९९४: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हज यात्रेकरुंना मिळणार 50 हजारांची सूट, VIP कोटा रद्द, अर्जही विनामूल्य; केंद्र सरकारचे नवे धोरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताची मदत तुर्कीला पोहोचली, NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत, भूकंपात 4000 हून अधिक जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *म्हाडाची लॉटरी निघाली, मराठवाड्यातील 936 घरांसाठी औरंगाबाद मंडळाची जाहिरात, 22 मार्चला सोडत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादीकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटेंना उमेदवारी; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अधांतरी, सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाकिस्तानचा प्रसिद्ध विकेटकीपर फलंदाज कामरान अकमलचा क्रिकेटला अलविदा, सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून घेतली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fij1JJI9a-I~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.संदर्भ : Noorani, A. G. Zakir Husain, Bombay, 1967.लेखक : मु. मा. घाणेकरस्त्रोत : मराठी विश्वकोश*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आदिवासींचा विश्वकोश' तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे ?२) "विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली..." असे कोणी म्हटले होते ?३) 'रडार' या यंत्रात कोणत्या लहरी असतात ?४) 'महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन' कोणास म्हणतात ?५) 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाचे मूळ नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) ओडिशा २) महात्मा ज्योतिबा फुले ३) विद्युतलहरी ४) कर्मवीर भाऊराव पाटील ५) भावार्थदीपिका*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'**ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.**याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/02/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.● १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.● २००१ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.● २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.● २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.💥 जन्म :-● १९१२ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.● १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.💥 मृत्यू :- ● १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.● १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.● १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस.● २००१ - बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.● २०२२ - भारताची गानकोकिळा लता मंगेशकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आंतरराष्ट्रीय युद्ध सरावात भाग घेणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या अवनी चतुर्वेदी; म्हणाल्या, रोमांचक होता अनुभव...*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Vande Bharat Express ची मुंबई ते इगतपुरी ट्रायल, 10 तारखेला सीएसएमटीवरुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजलं, वर्ध्यातील उत्तम आयोजनाचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेतून पुनर्विकास होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'मेक इन इंडिया' आता 'जोक इन इंडिया' झाला; तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथील जाहीर सभेत भाजपावर केली टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सातारा ते कोरेगाव रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा पॅसेंजर महिनाभरासाठी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Np63m86Rvu4~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्याध्यापकास पत्र*लिंक 👇🏼http://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लता मंगेशकर ( हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.त्यांना चार भावंडे होती, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.लता मंगेशकर यांना कोविड-१९ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आदिवासींचे श्रद्धास्थान असलेली कचारगड गुफा कोणत्या जिल्ह्यात आहे ?२) माघ पौर्णिमेला गोंडी भाषेत काय म्हटले जाते ?३) राहण्यासाठी, जगण्यासाठी जगातील सर्वाधिक महागडी शहरे कोणती ?४) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे ?५) डोंगर पोखरून आरपार गेलेल्या रस्त्यास काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) गोंदिया २) कोया पुनेम ३) न्यूयॉर्क, सिंगापूर, तेल अविव ४) कटक, ओडिशा ५) बोगदा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते, दै. सकाळ, जालना👤 प्रा. पंजाबराव येडे👤 वैभव गायकवाड👤 सादिक मोहंमद👤 माधव गणेशराव नारसनवाड👤 लक्ष्मण एडके👤 चंपती सावळे👤 सचिन गिराम👤 कोंडेवार साईनाथ, भैसा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे। वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥ पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो.त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.तात्पर्य - काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी⌛१९४४ : ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.⌛१९८८ : रशियाने नेहरु फुटबॉल चषक जिंकला💥 जन्म :-१९०६ : प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ.⌛१९२२ : स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.💥 मृत्यू :-⌛१६७० : कोंडाणा किल्ला लढविताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने झाली सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महागाईचा झटका, अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; नवे दर लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *परळी वैजनाथ-बीड-नगर नवीन रेल्वे मार्ग होणार; रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13 हजार कोटींची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर पाच वर्षे परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wHoX5fEylks~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांनो, लिहिते व्हा......!*http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील 'पिनकोड सिस्टिम' चेजनक...*कोकणातील 'राजापूर' मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची आपल्याला पुसटशी कल्पना ही नसेल !त्याचे नाव.. श्रीराम भिकाजी वेलणकरPIN म्हणजे Postal Index Number१९७२ पर्यंत ... जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा..!! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच !या सगळ्या अडचणीतून जात असताना, त्यावर उपाय म्हणून पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली. पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली ...*पिनकोडची रचना अशी आहे.*पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत,तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो.यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल११ - दिल्ली१२ व १३ - हरयाणा१४ ते १६ - पंजाब्१७ - हिमाचल प्रदेश्१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर्२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड३० ते ३४ - राजस्थान्३६ ते ३९ - गुजरात्४० ते ४४ - महाराष्ट्र४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड५० ते ५३ - आंध्र प्रदेश५६ ते ५९ - कर्नाटक६० ते ६४ - तामिळनाडू६७ ते ६९ - केरळ७० ते ७४ - पश्चिम बंगाल्५५ ते ७७ - ओरिसा७८ - आसाम७९ - पूर्वांचल८० ते ८५ बिहार आणि झारखंड९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस्म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला *पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो*.उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...! 💐••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" माता ही प्रेमाची सरिता आहे, म्हणून ती सदैव वाहत असते. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या आयसीसी १९ वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला ?२) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील वृद्ध व्यक्ती ( ११६ वर्षे ) म्हणून कोणाची नोंद झालेली आहे ? ३) नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या गीताला 'महाराष्ट्राचे राज्यगीत' म्हणून स्विकारण्यात आले ?४) क्रिकेट विश्वातील पहिल्या १२ मोठ्या स्टेडियमपैकी एकट्या भारतात किती स्टेडियम आहेत ?५) ऑस्ट्रेलियन पुरुष ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) भारत २) मारिया ब्रायांस मोरेरा, अमेरिका ३) जय जय महाराष्ट्र माझा ४) आठ ५) नोव्हाक जोकोविच, सर्बिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार, धर्माबाद👤 राजरेड्डी गडमोड, येताळा👤 संजय गायकवाड, धर्माबाद👤 डी. एन. पाटील बेंबरेकर, देगलुर👤 गोविंद राखेवार👤 शंकर कुऱ्हाडे👤 अहमद शेख👤 राजू माळगे👤 शेख इरफान👤 विलास थोरमोठे👤 सुमेध पावडे👤 मोहन रेड्डी👤 बालाजी थेटे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी, अनेक उत्सव हे मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा झाल्याशिवाय होऊ शकत नाही. या उत्सवांमध्ये 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र धाब्यावर बसवून आनंदी-आनंद केला जातो. आपल्या नाकासमोर जर कोणी सूत धरले, गुदगुल्या केल्या तर प्रचंड शिंका येतील. परंतु श्रीगणेशाच्या मूर्तीवर नाकातोंडात दूर्वा जाईपर्यंत थर मांडायला आपल्याला काही वाटत नाही. साधी झोपमोड आपल्याला चालत नाही, पण मंडपात कानठळ्या बसवणारा डी जे तो गणनायक आपल्या कानांच्या पाळ्यात आणि हा अपराध विशाल उदरात सामावून घेतो.**आपण सिग्नलला दोन मिनिटेही थांबत नाही, पण श्रीगणेशास मात्र दुपारच्या नैवद्याची संध्याकाळपर्यंत वाट पहावयास लावतो. प्रसंगी त्याला एकभुक्त ठेवतो. खरंतर पाहुण्यांचे 'स्वागत' आणि जाताना भावपूर्ण 'निरोप' ही आपली परंपरा. पण गणेशमूर्ती आणताना 'गोंधळ' आणि विसर्जनात 'कल्लोळ' ही नवपरंपरा आहे. मूर्तीपूजेचे हे भयानक स्वरूप आपणच इतर धर्मियांसमोर आणून ख-या पूजेपासून दूर गेलो आहोत. 'मूर्तीपूजन' हे सगुण रूपातील ईश्वरास अनुभवण्याचे साधन आहे, आणि ते समजावून घेतल्यास त्याचा खरा आनंद मिळेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण पुस्तके वाचायला शिकलो.त्यातून ज्ञान घेऊन जगायला शिकलो.पण माणसे जोडण्याचे काम मात्र शिकलो नाही.माणसे जोडण्यापेक्षा माणसापासून दूर दूर राहायला शिकलो.नातेसंबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपल्यातला हळुहळू कमी करायला शिकलो .खरे तर ज्ञानाने माणसे जोडली जातात पण माणसे तोडायला शिकलो. आम्ही चार पुस्तके शिकलो की,आमच्यासारखे या जगात कोणीच श्रेष्ठ नाही असे म्हणायला लागलो.अशा माणसांना खरे ज्ञान म्हणजे काय बहुतेक समजले नसावे .उलट अशी माणसे शिकून सवरुनही अज्ञानच आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनातील अज्ञान घालवणे आणि इतरांमधील असलेला अज्ञानपणा घालवून जीवन जगण्याची नवी दिशा दाखवने हा आहे. हा मुख्य उद्देश ठेऊन जगणे म्हणजे ज्ञान होय. अशा वर वर ज्ञान घेतलेल्या माणसांनी खरे ज्ञान म्हणजे काय हे शिकून माणसे जोडण्याचे काम शिकायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *करावे तसे भरावे*" एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्हा कोल्हा म्हणाला,'' मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.*तात्पर्य :*करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वकर्मा जयंती*💥 ठळक घडामोडी :- १९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.💥 जन्म :-१९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.💥 मृत्यू :- १९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक :- नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे, नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर आडबाले तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार, मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर करणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरता सूचना; मंडळाचे सर्व शाळांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या सर्व परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन, त्या 85 वर्षांच्या होत्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2024 च्या अखेरीस आम्ही अमेरिकेप्रमाणे रस्ते अन् उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करु : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/O5CM0SMK60c~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - गुरुदक्षिणा*वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रघुराम राजन*राजन यांचा जन्म १९६३ साली भोपाळ, मध्यप्रदेश येथे तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय गुप्तवार्ता केंद्रात वरिष्ठ अधिकारी होते. राजन यांनी ७वी ते १२वी पर्यंतचे शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये घेतले. त्यांनी १९८५ साली भारतीय प्रौद्योगीकी संस्थान, दिल्ली (आयआयटी) मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. १९८७ साली राजन यांनी भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबाद (आयआयएम) इथून उद्योग व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका संपादन केली. १९९१ साली राजन यांनी अमेरिकेतील मॅसाचुसेट्सच्या एमआयटीमधून व्यवस्थापनशास्त्रात पी.एच.डी. केलीरघुराम राजन भारतीय रिजर्व बैंकेचे 23 वें गवर्नर होते.4 सप्टेंबर 2013 रोजी डी. सुब्बाराव यांच्या सेवानिवृत्तिनंतर त्यांनी पदभार घेतला होता. त्यापूर्वी ते पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व शिकागो विश्वविद्यालयात बूथ स्कूल ऑफ बिजनेस मध्ये एरिक जे ग्लीचर फाईनेंसचे सर्विस प्रोफेसर होते. 2003 ते 2006 पर्यंत ते अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष चे प्रमुख अर्थशास्त्री व अनुसंधान निदेशक होते आणि भारतातील आर्थिक सुधार योजना आयोग द्वारा नियुक्त समितिचे नेतृत्व केले होते.राजन मैसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजी चे अर्थशास्त्र विभाग आणि स्लोन स्कूल ऑफ मैनेजमेण्ट; नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी चे केलौग स्कूल ऑफ मैनेजमेण्ट आणि स्टॉकहोम स्कूल ऑफ इकोनोमिक्स मध्ये अतिथि प्रोफेसर म्हणून ही काम पाहिले आहे. त्यांनी भारतीय अर्थ मंत्रालय, विश्व बैंक, फेडरल रिजर्व बोर्ड आणि स्वीडिश संसदीय आयोगाचे सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.सन 2011 मध्ये अमेरिकन फाइनेंस ऐसोसिएशन चे अध्यक्ष होते तथा सध्या ते अमेरिकन अकैडमी ऑफ आर्ट्स एण्ड साइंसेज़ चे सदस्य आहेत.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छासंकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जेव्हा कमजोरी शक्ती बनते, तेव्हा यश हमखास मिळते. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राष्ट्रपती भवनातील 'मुघल गार्डन' आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?२) कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) भारतीय टेनिस विश्वाची 'सोने की चिडिया' असे कोणाला संबोधले जाते ?४) जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते ?५) महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'ची रक्कम किती करण्यात आली ?*उत्तरे :-* १) अमृत उद्यान २) आशा बगे, ज्येष्ठ साहित्यिक ३) सानिया मिर्झा, टेनिसपटू ४) न्यूयॉर्क, अमेरिका ५) २५ लाख*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते. जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही.अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते. जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्याला जपायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य:ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02/02/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली. १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण. १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.💥 जन्म :- १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य. २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आयकर मर्यादा वाढवण्यात आली असून आता ७ लाखापर्यंत उत्पन्न असणा-यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करताना ही महत्वाची घोषणा केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *फुलेंचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यावर राज्य सरकार ठाम, 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोणतीही कर वजावट नसलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी प्रयत्न : अर्थमंत्री निर्मला सीतारमण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर पोलिसांत मोठी खांदेपालट; 18 पीआय आणि 5 एपीआयच्या बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डिजिलॉकर होणार वन स्टॉप सोल्यूशन; ओळखपत्र, पत्ता आणि इतर गोष्टी अपडेट करता येणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38 हजार शिक्षकांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Ind vs Nz 3rd T20: शुभमन गिलचं दमदार शतक! 15 चेंडूत कुटल्या 70 धावा, T-20 मधील पहिलं शतक पूर्ण, भारताचा 168 धावांनी तगडा विजय, मालिका 2-1 ने खिशात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fLMcdaLuXRM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक वसंता*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ नदीच्या अगदी पात्रात एक समाधी आहे. ती ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची आहे. त्यांचे नाव आताच्या पिढीला माहीत नसल्यास आश्चर्य नाही. विधी आणि वैद्यक या शास्त्रांचा अभ्यास केलेले अण्णासाहेब समाजकारणातील आणि राजकारणातील धुरिण होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा दिला. ते अत्यंत तेजस्वी बुद्धीचे स्वदेश व स्वधर्म याबद्दल प्रखर अभिमान बाळगणारे होते. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून न जाता भारतीय संस्कृतीच्या व संस्कारांच्या तागडीत ती तोलून पाहण्याची बुद्धी त्यांच्यात होती. इंग्रजी राज्य आणि पाश्चात्य संस्कृती यांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावाला मान देण्यापासून विधवा विवाहापर्यंत आणि परराष्ट्रीय चळवळीपर्यंत सर्व उपक्रम करण्याची त्यांची तयारी होती. यामध्ये संस्था स्थापन करणे, वृत्तपत्रे काढणे कारखाने उभारून स्वदेशी उत्पादन करणे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव होता.- जगदीश विष्णू जोशीसंकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हॉकी विश्वकप स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?२) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना २०२३ च्या कोणत्या पद्म पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले ?३) कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?४) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे ?५) 'महाराष्ट्राची लोकयात्रा' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?*उत्तरे :-* १) जर्मनी २) पद्मविभूषण ३) मध्यप्रदेश ४) वर्धा ५) डॉ. सदानंद मोरे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रुखमाजी भोगावार, धर्माबाद👤 चक्रधर ढगे👤 देविदास तारू, सहशिक्षक, नांदेड👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 बालाजी गोजे👤 विनोद गुंडेवार👤 किरण बासरकर👤 चेतन घाटे👤 राजू जगदंबे, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय संस्कृतीत सत्तावीस नक्षत्र म्हणजे जीव की प्राण. शेतकरी मृगाचा पाऊस पडला की पेरणीची लगबग करतो. पेरण्या झाल्या की पिकांच्या जोमदार वाढीसाठी त्यांची काळजी घेतो. जमिनीत पेरलेली स्वप्नं सफल झाली की शेतक-यांच्या डोळ्यांतल्या स्वप्नांतही आनंद उत्सव घडतो. पण जर का नक्षत्रांनी साथ दिली नाही तर गणित साफ चुकतं. खेड्यातल्या लोकांना निसर्गातल्या छोट्यामोठ्या घडामोडींचं अचूक ज्ञान असतं. 'अनुभव हीच त्यांची वेधशाळा.'**व्यंकटेश माडगूळकर यांचे लेखन म्हणजे निसर्गातली सूक्ष्म, हळूवार निरीक्षणं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रणात एक नानांची गोष्ट आहे. नाना म्हणतात.. मुलांनो, तुम्हाला वजाबाकी येते का ? मग सांगा बघू..सत्तावीसमधून नऊ गेले किती राहिले बाकी ? मुलं बोटं मोजून ओरडली, 'आठरा'. नाना म्हणाले, 'चूक'. एकूण नक्षत्र सत्तावीस. त्यातून पावसाची नऊ नक्षत्र कोरडी गेली, पाऊस पडला नाही तर काय उरतं ? काही नाही ! पाणी नाही, पिकं नाही, गुरंढोरं नाहीत म्हणून हिशोबाचं उत्तर शून्य. सत्तावीसमधून नऊ गेले, खाली उरतो भोपळा.* *महाराष्ट्रात असे अनेक नाना आहेत. पण ऐकणारे आहेत का कुणी ?* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना वादच करायचा असतो त्यांना कोणतेही कारण लावून करता येतो.अशा वादांमुळे माणसांचे असलेले चांगले संबंध विनाकारण बिघडून जातात.पण ज्यांना सुसंवाद साधायचा असतो ते मात्र एखादे चांगले कारण शोधून जीवनात काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे त्या जीवनात इष्ट बदल घडवून नवे करण्याची जीवनाला मिळावी व जीवन समृद्ध व्हावे यासाठी एक सुसंवादातून दिशा मिळते.म्हणून जीवनात वाद करण्यापेक्षा सुसंवाद साधण्याचे अधिक प्रयत्न करायला हवेत.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*॥ कथा 3 मित्रांची॥* ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. पण एक दिवस..... त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे..... त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले.... "आता आपण परत भेटणार केव्हा? कुठे? ? ? ज्ञान :-मी विद्यालयात भेटेन... धन:-मी तर श्रीमंताकडे भेटेन... विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. "कारे... ? का रडतोस?" विश्वास हुंदके देत-- *"मी एकदा गेलो तर* .... *पुन्हा* *कधी नाही भेटणार**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)