✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AkYWf7dMs/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.• १९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.• १९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.• १९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.• १९४२: भारत छोडो दिन🎂 जन्म :- • १९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक• १९२०: घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब• १९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू• १९९१: अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी🌹 मृत्यू :- • १९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे• १९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर• २००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी• २०२२: भारतीय अभिनेते प्रदीप पटवर्धन • २०२२: भारतीय राजकारणी, खासदार माया थेवर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राखी : एक अतूट बंधन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत अमेरिकेकडून शस्त्रे-विमाने खरेदी करणार नाही, संरक्षणमंत्र्यांनी वॉशिंग्टन दौरा रद्द केला; ट्रम्पच्या 50% करवाढीनंतर मोदी सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार, लष्कराला 120 आणि हवाई दलाला 80*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - कर्जमाफी आणि हमीभावासाठी राज्यव्यापी आंदोलन, शेतकरी संघटनांचे एकत्रित लढ्याचे आवाहन, राजू शेट्टींचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यातील वाहतूक वेग प्रतितास 30 किमी करण्याचा प्रयत्न, पुढील 30 वर्षांसाठी 1 लाख 30 हजार कोटींचा विकास प्रकल्प राबवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद, महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली जिल्ह्यात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता विशेष मोहिम राबविणार मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंढरपूरचे प्रसिद्ध गझलकार वैभव कुलकर्णी यांना गझलदीप पुरस्कार प्रदान, गझल करताना संयम आणि तटस्थता आवश्यक, गझलभान निर्माण करणे महत्त्वाचे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बुद्धभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर 👤 नवाब पाशा शेख, पंचायत समिती, धर्माबाद 👤 समाधान बोरुडे 👤 शिवाजी अंबूलगेकर, अध्यक्ष, मायबोली परिषद, मुखेड 👤 विलास कोळनूरकर, शिक्षक तथा कवी, उमरी 👤 गणेश पांचाळ 👤 बालाजी तेलंग, शिक्षक, कंधार 👤 विलास पानसरे 👤 सुशीलकुमार भालके👤 ऋषिकेश जाधव👤 विलास पाटील करखेलीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 48*अशी कोणती गोष्ट आहे**जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टेलिफोन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले सत्यस्वरूप सिद्ध करण्यास सुवर्णाला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घनाचे घाव सोसावे लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणते इंद्रिय करते ?२) नकाशात हिरवा रंग कशासाठी वापरतात ?३) कमलापुरा हे शासकीय हत्ती संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) 'व्याख्यान देणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) संदेश वहनासाठी वातावरणाच्या कोणत्या थराचा उपयोग केला जातो ? *उत्तरे :-* १) मूत्रपिंड ( किडनी ) २) वनक्षेत्र ३) गडचिरोली ४) व्याख्याता ५) आयनांबर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *प्लीहा म्हणजे काय ?* 📕प्लीहा हे इंद्रिय आपल्या शरीरात डाव्या बाजूला असते. छातीच्या पिंजऱ्यामध्ये छाती व पोट यांमध्ये असलेल्या डायफ्रेंम या स्नायूच्या खाली प्लीहा असते. श्वसनाबरोबर प्लीहा वरखाली होत असते. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्तीसाठी एखाद्या लसिकाग्रंथीप्रमाणे प्लीहा कार्य करते. शरीरात कोणताही 'परकीय' पदार्थ शिरला की, प्लीहेमध्ये टी व बी प्रकारच्या लिम्फोसाईट्स (पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार) तयार होण्याचे प्रमाण वाढते. या पेशी रोगप्रतिकारशक्तीसाठी कारणीभूत असतात. 'बी' प्रकारच्या लिम्फोसाईट्स परकीय पदार्थ वा अँटीजेनच्या विरुद्ध प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) तयार करतात, तर 'टी' प्रकारच्या पेशी अँटीजेन बाबत 'स्मरणशक्ती' निर्माण करतात.प्लीहेचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे दुखापत झालेल्या निरुपयोगी झालेल्या रक्तपेशींचा नाश करणे. याचबरोबर लाल रक्तपेशीतील हिवतापाच्या जंतूंना मारण्याचे कामही प्लीहेतील पेशी करतात. त्यामुळेच हिवतापात प्लीहेचा आकार वाढलेला असतो. प्लीहा रक्तातील एकूण रक्तबिंबीकांपैकी (प्लॅटलेट) ३० ते ४०० टक्के रक्तबिंबीका गाळून साठवून ठेवते.गर्भावस्थेत ५ व्या महिन्यापासून मूल जन्माला येईपर्यंत प्लीहेमध्ये रक्तनिर्मितीचे कार्य होत असते. मूल जन्माला आल्यानंतर मात्र हे कार्य थांबते.कधीकधी काही रोगांमुळे प्लीहा लाल रक्तपेशींचा खूपच जास्त प्रमाणात नाश करू लागते. त्यामुळे लीहेचा आकार वाढतोच, पण त्याबरोबरच अॅनेमिया वा रक्तपांढरीही होते. अशावेळी किंवा प्लीहेमध्ये कर्करोग झाल्यास प्लीहा शस्त्रक्रिया करून काढून टाकावी लागते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नथनि घडावा ग …..हळदी ग कुंकवाच घेऊन ताट एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग …..लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..रायगड चा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडावा ग …..उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुलामगिरी एकदा एक कुत्रा एका सिंहाला म्हणाला, 'अरे, तुझं जीवन किती दुःखी आहे. सगळा दिवस उपाशीपोटी भक्ष्य शोधत हिंडावं आणि ते मिळालं नाही तर प्रेतासारखं पडून रहावं. मला तर तुझी कीवच येते. त्यापेक्षा मी बघ कसा धष्टपुष्ट आहे, सुखी आहे.' यावर सिंहाने उत्तर दिले, 'मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. तुला वेळच्या वेळी व्यवस्थित खायला मिळतं हे अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर तुला गळ्यात साखळीही सतत बाळगावी लागते. माझं तसं नाही. मला खाणं मिळालं नाही तरी मी स्वतंत्र आहे. गुलामगिरीतल्या चैनीपेक्षा स्वतंत्रतेत भुकेनं मरण आलेलं परवडलं !'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑगस्ट 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BCJvnwhaW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 इतिहासातील ठळक घटना :-• १९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.• १९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.• १९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.• २०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.🎂 जन्म :-• १९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील• १९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके• १९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी• १९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर• १९८९: भारतीय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माली🌹 मृत्यू :- • १९९८: लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे• १९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशाची युवा भारत म्हणून ओळख निर्माण करू या*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गरजू, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, कर्जमाफीसाठी समिती नियुक्त, अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जम्मूत CRPFची गाडी 200 फूट दरीत कोसळली:उधमपूरच्या बसंतगड भागात अपघात; 3 जवानांचा मृत्यू, 5 गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *NDA चा निर्णय- उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार मोदी-नड्डा ठरवतील, लोकसभा-राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *Deep fake साठी सरकार कठोर कायदा करणार, वाढत्या धोक्यामुळे घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य सरकारने नारळी पौर्णिमा आणि जेष्ठा गौरी विसर्जनानिमित्त मुंबई व उपनगर पुरते मर्यादित सुट्टी जाहीर केली, मुंबईतील विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अरुण वि. देशपांडे, बालसाहित्यिक, पुणे 👤 घनश्याम पाटील संपादक, चपराक प्रकाशन 👤 अवधूत पाटील सालेगावकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 रेखा बालाजी सुंकेवार, देगलूर 👤 अतुल उदाडे 👤 योगेश पाटील ढगे 👤 ऋषिकेश सोनकांबळे 👤 लक्ष्मण कामशेट्टी 👤 नागेश कानगुलवार 👤 रावजी मारोती बोडके 👤 संतोष वाढवे 👤 चंदू नागूल👤 संतोष हसगुंडे 👤 रवी वाघमारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 47*रिंग आहे, परंतु बोट नाही**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कणीस ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसांना कर्तव्याचा मार्ग दाखवणारा आचारधर्म म्हणजे सुधारणा. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू आयात करतो तेव्हा त्या वस्तूवर सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या कराला काय म्हणतात ?२) वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण ?३) 'आदि पेरुक्कू' हा सण ( नदीची पूजा ) कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?४) 'विमान चालवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? *उत्तरे :-* १) टॅरिफ २) जगदीशचंद्र बोस ३) तामिळनाडू ४) वैमानिक ५) खलिल जमिल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाण कणीस*पाण कणी (रामबाण, जंगली बाजरी; हिं. पटेर, गोंड पटेर; गु. घबाजरीन; क. आपिनतैन; सं. एरका; इं. बुलरश, कॅट टेल,एलेफंट ग्रास; लॅ. टायफा अँगुस्टॅटा; कुल-टायफेसी). ही गवतासारखी दिसणारी, परंतु एकदलिकित फुलझाडांपैकी टायफेसी कुलातील व सु. १.५-३ मी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी उत्तर आफ्रिकेत व उत्तर आशियात आढळते. भारतात सर्वत्र दलदली जमिनीत वाढलेली आढळते. पाने साधी, एकाआड एक, बिनदेठाची, फार लांब, अरुंद व जाड असून पर्णतल आवरक (खोडास वेढणारा) व अर्धचितीय असतो. मूलक्षोड (जमिनीखालील आडवे खोड) जाडजूड असून त्यावर बहुतेक पाने दोन रांगांत असतात. ह्या भूमिस्थित (जमिनीतील) बहुवर्षायू खोडावर ऑगस्ट महिन्यात लांब, सरळ व दंडगोलासारखा फुलोरा (स्थूलकणिश) येतो; तो बाजरीच्या कणसासारखा दिसतो. त्याच्या अक्षावर काही पाने येतात. फुले एकलिंगी, फार लहान, एकाच अक्षावर, लवकर गळून पडणाऱ्या महाछदाच्या बगलेत, पुं-पुष्पे वर व स्त्री-पुष्पे खाली अशी येतात. परिदले केसासारखी; पुं-पुष्पात तीन एकसंध केसरदले, क्वचित अधिक; स्त्री-पुष्पात एकच किंजदल असून किंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजधर व किंजल लांबट आणि किंजल्क जिव्हिकाकृती [⟶ फूल]. बीजक एकच व लोंबते असते. कधीकधी दोन प्रकारची फुले भिन्न झाडांवर असतात. वंध्य किंजदले ही स्त्री-पुष्पात आढळतात. फळ (पकालिका) शुष्क व लहान. बी सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांशयुक्त), एकच व रेषांकित असते.खोडाचा व पानांचा अनेक प्रकारे उपयोग करतात. काश्मीरमध्ये चाळणी आणि झोपड्यांच्या व शिकाऱ्यांच्या छपरांकरिता उपयोग करतात; पंजाबमध्ये चटया, दोर व टोपल्या करतात. मुळे नदीकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात व त्यामुळे धूप थांबते; याकरिता ही झाडे लावली जातात. नदी पार करण्यास खोड व पाने यांच्या ‘तिन्हो’ नावाच्या तात्पुरत्या नावा करतात. फुलांपासून सिंधी लोक ‘बूर’ हा खाद्यपदार्थ बनवितात. सुकी फुले उष्णतारोधक वजनाने फार हलकी असतात. गाद्या व उशा भरण्यास ती वापरतात. मूलक्षोड स्तंभक (आकुंचन करणारे) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून कांजिण्या, हगवण व प्रमेह यांवर उपयुक्त असते. पक्व कणसातील मऊ भाग जखमेत भरल्यास जखम भरून येण्यास मदत होते.एलेफंट ग्रास हे इंग्रजी नाव दोन गवतांच्या जातींसही वापरतात. टायफा एलेफंटिना ही पाणकणसाची दुसरी जाती असून ती भारतात सामान्यपणे आढळते. तिचे उपयोग वर दिल्याप्रमाणेच आहेत.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रुपी गुंतले लोचन, पायी स्थिरावले मन …. || धृ ||देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला …. || १ ||देवा काळोनेदी सुखदु:खा, तहान हरपली भूक …. || २ ||तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुती …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र‌ आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बगळा व लांडगा एकदा एका लांडग्याच्या गळ्यात बोकड मारून खाताना त्याचे हाडूक अडकले, त्यामुळे लांडग्याचा जीव कासावीस झाला. भेटणार्‍या प्रत्येक प्राण्याला ते हाडूक काढून देण्यासाठी विनवू लागला. तसेच ते काढून देणार्‍याला बक्षीसह देण्याचे त्याने कबूल केले. तेव्हा एक बगळा बक्षीसाच्या आशेने ते काढून देण्यास तयार झाला. त्याने आपल्या लांब चोचीने ते हाडूक काढून दिले. नंतर तो बक्षीस मागू लागला. तेव्हा रागाने लांडगा त्याला म्हणाला, 'तू किती मूर्ख आहेस. तू माझ्या तोंडात मान दिली होतीस तरी ती न चावता मी तुला जिवंत सोडलं, हे बक्षीस कमी आहे का?'तात्पर्य- दुष्टांवर उपकार केले तरी ते त्याची फेड अपकारांनीच करतात हे आपण विसरू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1ZkQKdjaYh/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🗓️ महत्त्वाच्या घटना :• १९०५: बंगालच्या विभाजनाविरोधात स्वदेशी चळवळीचा प्रारंभ झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा.• २०१५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केले.🎂 जन्म :• १८७८: जतींद्रनाथ मुखर्जी – क्रांतिकारक, 'बघा जतिन' म्हणून प्रसिद्ध.• १९४२: चेल्ला कुमार – भारतीय राजकारणी.• १९७५: चार्ली हूनॅम – इंग्रज अभिनेता ("Sons of Anarchy" प्रसिद्ध मालिका).🕯️ मृत्यू :• १९७४: वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय – क्रांतिकारक, सरोजिनी नायडू यांचे बंधू.• २०२०: बिक्रमजीत कंवरपाल – भारतीय अभिनेता आणि माजी सैन्य अधिकारी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त लेख*हातमाग उद्योगाला अच्छे दिन..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 120 नव्या वसतिगृहाची उभारणी, 25 हजार विद्यार्थ्यांना मिळणार निवासी सुविधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठ मोळी अभिनेत्री अमृता खानविलकरळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या 302 विशेष गाड्या जाहीर, मुंबई व पुणे येथून कोकणासाठी स्पेशल ट्रेन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - 15 व्या वित्त आयोगाची रक्कम ग्रामपंचायतींना देताना भेदभाव, जि. प.कडून पाठपुरावा तरीही सरकारकडून प्रतिसाद मिळेना‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तराखंड दुर्घटना- 5 जणांचा मृत्यू, 11 सैनिकांसह 100 हून अधिक जण बेपत्ता, 400 जणांना वाचवले; केरळमधील 28 प्रवाशी बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25 टक्के टॅरिफ लावले, भारतावर एकूण टॅरिफ आता 50 टक्के झाले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्ता डांगे, इसाप प्रकाशन, नांदेड 👤 श्रीनिवास मस्के, कवी व साहित्यिक, नांदेड 👤 रवींद्र चातरमल, फोटोग्राफर, धर्माबाद 👤 मंगेश पेटेकर 👤 तुकडेदास डुमलवाड 👤 मनोज रापतवार, धर्माबाद 👤 मोहन हडोळे👤 शिवाज्ञा साकोरे, दुगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 46*पाटील बुवा राम राम**दाढी मिशा लांब लांब ?**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - Keyboard••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अविरत उद्योग हा शांती- समाधानाचा अखंड पाया होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'दिशोम गुरु' असे कोणत्या आदिवासी नेत्याला ओळखले जाते ?२) नुकत्याच झालेल्या भारत - इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेचा मालिकावीर पुरस्कार कोणी पटकावला ?३) 'परीक्षा पे चर्चा' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपक्रमात एका महिन्यात सर्वाधिक नागरिकांनी सहभाग घेतल्यामुळे कोणत्या रेकॉर्डमध्ये नोंद झाली ?४) 'वाडवडिलांकडून मिळालेली' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) रक्तातील ऑक्सिजनचे वाहकतत्व कोणते आहे ? *उत्तरे :-* १) शिबू सोरेन २) शुभमन गिल, भारत - ७५४ धावा हॅरी ब्रूक, इंग्लंड - ४८१ धावा ३) गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ४) वडिलोपार्जित ५) हिमोग्लोबिन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕*पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वयअसताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कानडा राजा पंढरीचावेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||निराकार तो निर्गुण ईश्वरकसा प्रगटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा … || १ ||परब्रह्म हे भक्तांसाठीउभे थकले भिमेसाठीउभा राहिला भाव सांवयवजणू कि पुंडलिकाचा … || २ ||हा नाम्याची खीर चाखतोचोखोबाची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मावाली दामाजीचा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारांची देवाणघेवाण झाली की, संवाद वाढायला सुरूवात होते. त्यातून बऱ्याच अडीअडचणी, समस्या सुटत असतात. आणि एकमेकांना मदत होत असते. म्हणून एकमेकांच्या विचारांचा आदर करावा व स्नेहबंधनाचे धागे विणण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मधमाशी पोळे* एका चोराने एकदा बागेतली मधमाशांची पोळी चोरली. बागेच्या मालकाने येऊन पाहिले तो पोळी नाहीशी झालेली ! तेव्हा ती कोणी चोरून नेली असावीत याचा विचार करीत असतानाच बाहेर गेलेल्या मधमाशा, मध घेऊन तेथे आल्या व पोळी नाहीत असे पाहून यानेच आपली पोळी नेली असावीत. असे समजून त्यांनी एकदम त्या मालकावरच हल्ला चढवला.तेव्हा तो मालक त्यांना म्हणाला, 'अरे, कृतघ्न प्राण्यांनो ज्याने तुमची पोळी चोरून नेलीत त्याला तुम्ही सोडलंत. अन् मी जो तुमचा मालक, तुमची पोळी चोरीला गेल्याने तुमची आता काय व्यवस्था करावी या काळजीत पडलोय. तर तुम्ही मलाच नांग्या मारून दुखावता ? वा रे वा !'तात्पर्य - कधी कधी आपला खरा जो मित्र आहे त्यालाच शत्रू समजून आपण त्रास देतो. परंतु तसे करणे मूर्खपणाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑगस्ट 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1C7GxTy2W4/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔥 महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना :-• 1945 – हिरोशिमा दिवस: दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर "लिटल बॉय" नावाची अणुबॉम्ब टाकला. या भीषण घटनेत लाखो लोक मृत्युमुखी पडले व ही मानवतेसाठी काळीकपाटी ठरली.• 1962 – जमैका या देशाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.🎂 जन्म :- • 1888 – सर अॅलेक्झांडर फ्लेमिंग, पेनिसिलिन या प्रतिजैविक औषधाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ.• 1928 – अँडी वॉरहॉल, प्रसिद्ध अमेरिकन चित्रकार आणि पॉप आर्ट चळवळीचे प्रवर्तक.🕯️ मृत्यू• 1978 – पोप पॉल सहावा, कॅथोलिक चर्चचे प्रमुख.• 2004 – रूथ एलिस, इंग्लंडमध्ये फाशी दिली गेलेली शेवटची महिला.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे असं का घडतं ?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी सिनेमाला मिळणार अधिक शोज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने स्थापन केली उच्चस्तरीय समिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळांची कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी दिवाळी नंतर; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ राजकारणी सत्यपाल मलिक यांचे वयाच्या 79 व्या वर्षी दिल्लीत झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भिडे वाडा स्मारकाच्या बांधकामासाठी पुण्यात वाहतूक बदल, 25 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक रात्री बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. मनिषा मोरे 👤 गंगाधर दगडे, बिलोली 👤 सुदर्शन पाटील जोगदंड, शिक्षक, धर्माबाद 👤 नरसिंह पावडे देशमुख 👤 दिनेश दारमोड 👤 राजेंद्र पोकलवार 👤 दीपक पाटील हिवराळे👤 गणेश धुप्पे 👤 हर्ष पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 45*माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत**तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही**सांगा पाहू मी आहे कोण…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - घाम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दिव्या देशमुख भारताची कितवी महिला ग्रँडमास्टर झाली ?२) श्वसनसंस्थेतील फुप्फुसाचे कार्य काय आहे ?३) भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत ?४) 'डोंगरकपारीत राहणारे लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ? *उत्तरे :-* १) चौथी २) ऑक्सीजन रक्तात शोषून घेणे ३) अमित शहा ४) गिरिजन ५) मध्यप्रदेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞 ************************सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे.सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल.हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल. स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फिरत्या चाकावरती देसी मातीला आकारविठ्ठला तू वेडा कुंभार … || धृ ||माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसाराआभाळाच मग ये आकारातुझ्या घाटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार … || १ ||घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या दैव वेगळेतुझ्या विना हे कोणा न कळेमुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार … || २ ||तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळसी तू तूच जोडीशीन कळे यातून काय सांधीशीदेसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाचे मन दुखावून स्वतः आनंदीत रहाणे याला माणुसकी म्हणत नाही. बरेचदा अशा वागण्याने एखाद्याच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून कोणी सावरतात तर कोणी चुकीचे पाऊल उचलतात. म्हणून कोणाचे मन जाणता येत नसेल तर कोणाला दुखावण्याचा प्रयत्न करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ*विचारात गुंग असलेले चोरोबा कुणाच्या तरी अंगावर आदळले. तो एक साधू होता. साधू बघतच चोरोबांना फार आनंद झाला. एकदम लोटांगणच घातले बोवाजीपुढे. बोवाजींनी आशीर्वाद दिला,'' बेटा सुखी राहा!'' तरी चोरोबांनी साधूच्या चरणावरून डोके उचलले नाही, ''बोल, काय हवं तुला ? तू मागशील ते मी देईल.'' ''साधू महाराज , मी एक चोर आहे. मला चोरी करतानाच नेहमी शिपाई पकडतात. तरी अशा वेळी मला कोणी बघू शकणार नाही अस करा .'' साधूबाबांच्या गालाला खळी पडली. ते म्हणाले,' ठीक आहे ! ही घे जादूची भुकटी नाकात ओढताच तू दिसेनासा होशील, '' चोरोबा खुश झाले. चांदोबा डोईवर आला, भुकटी कमरेला खोचून ते कामगिरीला निघाला. सावकाराच घर आलं. चोरोबांनी भिंत पार केली, खिडकीतून तिजोरी जवळ गेले. तिजोरी उघडायचे समान मेजावर ठेवले आणि साधू बाबांचे नाव घेत जादूची भुकटी नाकात कोंबली . ''फड....! फड......!आ ..क शी!!'' चोरोबांना शिंकांनी अगदी हैराण केले. जानवे चाचपत सावकार उठला. दांडे सावरीत नोकर उठले..दिवे लागले... उजेडात तिजोरीशी खाट-खुट करीत असलेले चोरोबा दिसले. ताबडतोब या मंडळींनी चोराला पकडले. भोळसट चोरोबांना जादूची भुकटी चांगलीच भोवली ! कारण ती तपकीर होती . तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15T8BNngCe/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घडामोडी :- • १८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.• १९१४: ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.• १९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.• १९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.• १८८२: स्टँडर्ड ऑइल कंपनी (एक्सॉनमोबिल) - स्थापन झाली.• १८७४: जपान या देशाने टपाल बचत योजना सुरू केली.🎂 जन्म :- • १८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे• १८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार • १९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग • १९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष • १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा • १९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद • १९७४: भारतीय अभिनेत्री काजोल• १९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा🎂मृत्यू :- • १९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा• १९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन• १९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन • २०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज• २००१: अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका • २०२२: भारतीय नृत्यांगना गोरिमा हजारिका••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला मित्र बनवू या .........!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *PPC 2025 ने रचला इतिहास, परीक्षा पे चर्चा ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संसदेत गोंधळ, लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब, विरोधकांचा फेर तपासणीवर आक्षेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *OBC आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 102 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकरी व घरगुती ग्राहकांसाठी 24 तास वीज, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, राष्ट्रपती, पंतप्रधानासह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 6 धावाने ऐतिहासिक विजय, मालिका 2-2 ने बरोबरीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम पा. जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 अभिनंदन प्रचंड, पदवीधर शिक्षक, धर्माबाद 👤 भारती सावंत, लेखिका, मुंबई 👤 दत्तात्रय सितावार, कराटे मास्टर, धर्माबाद 👤 किरण सोनकांबळे 👤 देवराव कोलावाड 👤 शेख वाजीद👤 सय्यद जाफर 👤 विकास कांबळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 44*ऊन बघता मी येतो**सावली पाहता मी लाजतो**वाऱ्याचे स्पर्श होताच**मी नाहीसा होतो**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नाणे coin••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कित्येक संकटे येतात आणि जातात, परंतु या संकटांना न्याय आणि सत्याचा पाठपुरावा करीत जो सामोरा जातो तोच खरा शूर.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात किती व कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे ?२) 'भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना ...आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना' या प्रसिद्ध गीताचे गीतकार कोण ?३) यकृत कोणत्या इंद्रिय संस्थेचा भाग आहे ?४) 'वनात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ? *उत्तरे :-* १) सहा - सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग २) कविवर्य सुरेश भट ३) पचनसंस्था ४) वनचर ५) आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वनस्पतींची अन्नप्रक्रिया* 📙 *************************वनस्पती व प्राणी यांत फरक काय ? या प्रश्नाची उत्तरे विविध प्रकारे पटापट दिली जातात. म्हणजे हालचाल करीत नाहीत, प्राण्यांप्रमाणे आक्रमण करीत नाहीत, आरडाओरडा करीत नाहीत वगैरे वगैरे. पण सर्वात महत्त्वाचे उत्तर सहसा कोणीच देत नाही. ते आहे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, प्राणी तसे करू शकत नाहीत. हे उत्तर पटवून घ्यायलासुद्धा अनेकदा अनेकांना जड जाते. अर्थात पटल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट वेगळी. केवळ सूर्यप्रकाशातून मिळणारी ऊर्जा, जमिनीतून पाणी व अनावश्यक नत्र पदार्थ व हवेतून कार्बन डायऑक्साइड मिळाला की, वनस्पतींची अन्नप्रक्रिया सुरू होते. त्यातूनच त्यांचे पोषण व वाढ होते. एवढेच नव्हे, तर त्या वनस्पतींवरच अन्य प्राण्यांचे उपोषण सुरू होते. ही सारी किमया वनस्पतींतील हरितद्रव्यामुळे घडते. सजीवाची उत्पत्ती झाली, तेव्हा दोन प्रकारच्या पेशी निर्माण झाल्या. एकीमध्ये हरितद्रव्य होते (Chlorophyll) व त्या पेशीला पेशीभित्तिकाही होती. ही झाली वनस्पतिज पेशी. दुसरी होती प्राणिजपेशी. तिच्या पेशीभित्तिकेमध्ये कडकपणा नव्हता. सेल्युलोज या घटकाचा त्यात अभाव होता. सूर्यप्रकाशातील किरणांतून वनस्पतींची पाने जी मुख्यत: हरितद्रव्यांनी जास्त भारीत असतात, ज्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाशकिरण पडावेत, अशी त्यांची रचना असते ती उर्जा घेतात. जमिनीतून नत्र पदार्थांचे शोषण पाण्याबरोबर होतच असते. पण मुख्यतः हरितद्रव्यामुळे पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साइड यांपासून विविध पिष्टमय पदार्थ व शर्करांची निर्मिती होते. त्यातूनच मग वनस्पतीच्या वाढीला पोषक अशी अन्यद्रव्ये बनतात व ती योग्य जागी म्हणजे खोडात वा मुळात साठवली जातात. झाडाच्या स्वरूपाप्रमाणे मग त्यांचे नंतर रूपांतर फळे व बियांतही होत जाते.केवळ जमिनीवरील वनस्पतींतच ही प्रक्रिया घडते, असे नाही; तर पाण्यातील, समुद्रातील वनस्पतीसुद्धा याच पद्धतीने अन्न तयार करतात. यामुळेच पाण्यामध्ये जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तिथवरच वनस्पतींची वाढ झालेली आढळते. याखालील पातळीवर वनस्पतिजीवन आढळत नाही. जमिनीवरसुद्धा ज्या भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तेथे वनस्पतिजीवन फार वाढू शकत नाही.वनस्पती स्वतःचे अन्न तयार करताना समस्त प्राणिजीवनावर दोन प्रकारे उपकार करत असतात. एकात प्राणवायू बाहेर टाकला जात असल्याने प्राण्यांना अत्यंत आवश्यक अशा वायूचे वातावरणातील प्रमाण कायम राखले जाते, तर अनावश्यक असा, प्राण्यांनी हवेत सोडलेला कार्बन डायऑक्साइड त्यात शोषून घेत असतात. वनस्पतींची अन्नप्रक्रिया अन्न तयार करूनच थांबते, असे नव्हे; तर ज्या वेळी वनस्पती नाश पावतात, त्या वेळी त्यांच्या अवशेषांतूनसुद्धा पुन्हा वनस्पतींना उपयुक्त अशा स्वरूपाचे घटक तयार होऊन जमिनीला मिळतात. अन्नसाखळीचा वनस्पती हा एक प्रमुख घटक आहे, तो यामुळेच.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागाअमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठलाअभंगाला जोड टाळ चीपल्याचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आईआ आ आ लेकरांची सेवाकस पांग फेडू आता कस उतराईतुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाईजन्मभरी पूजा तुझ्या पाउलाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || २ ||पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो. पण अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेणाच्या सड्याएवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते. तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये. कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा व साप* एकदा एक साप नदीच्या किनारी झोपून उन्हाचा आस्वाद घेत होता. त्यावेळी तिथे अचानकपणे एक कावळा आला व त्याने त्या विषारी सापाला आपल्या पायांच्या नखांनी घायाळ करून त्याला आपल्या नखांमध्ये घेऊन उडू लागला. त्या सापाने कावळ्याच्या पंजातून निघण्याचा खूप प्रयत्न केला. सापाने कावळ्याच्या शरीरास दंश केला व त्याच्या दंशाने कावळा जखमी झाला. तो आकाशातून थेट जमिनीवर येऊन पडला. साप कावळ्याच्या पंजातून पळ काढून निघून गेला. पण कावळ्याच्या शरीरात विष पसरल्याने तो मरणाच्या दारात आला. मग त्याने मनात विचार केला की, जर मी त्या सापाला पंजात उचलले नसते, तर आज तोच साप माझ्या मृत्यूचे कारण झाला नसता. तात्पर्य :- विचारी माणसं विचार करून कृती करतात ; परंतु अविचारी माणस कृती केल्यानंतर विचार करत बसतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16UpuAfG35/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १९४७ – भारताची पहिली महिला पोलीस अधिकारी के. हेमलता पोलीस सेवेत दाखल• १९४७: जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.• १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.• २००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.🎂 जन्म :- • १८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके• १९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार• १९३१: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर• १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी• १९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा🌹 मृत्यू :- • १९९७ – जी. एम. करवे, नामवंत मराठी लेखक, समीक्षक व इतिहासकार यांचे निधन.• २०२०: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला कवितेच्या जगात*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर महसूल परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरणत्मक निर्णयावर भाष्य, जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ओबीसींच्या जागरासाठी नागपुरातून मंडल यात्रा, 9 ऑगष्टपासून शरद पवार करणार प्रारंभ, विदर्भातील 11 जिल्ह्यांत होणार सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिर्डी नगरपरिषदच्या हद्दीमध्ये ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली - राज्यात 03 ते 15 ऑगस्ट काळात अवयवदान पंधरवाडा, विविध उपक्रमाद्वारे होणार जनजागृती, आरोग्य विभागाचा पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक :- उल्हास-वैतरणा नदजोड प्रकल्पाचे उदघाटन, मंत्री विखे पाटील, छगन भुजबळ यांची उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मतदार याद्यासाठी काम करणाऱ्या बिलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात केली वाढ, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंड समोर ठेवले 374 धावाचे लक्ष, इंग्लंडला विजयासाठी 35 धावाची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अहमद मुल्ला, शिक्षक, मुखेड 👤 निवेदक विठ्ठल पवार, बीड 👤 व्यंकटेश अमृतवार, उमरी 👤 गणेश गं. उदावंत 👤 शिलानंद बुद्धेवार, बिलोली 👤 अमित सूर्यवंशी👤 प्रभाकर रेब्बावार, देगलूर👤 आनंदराव आवरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 43*मला Head पण आहे.**मला Tail पण आहे.**पण मला Body नाही.**सांगा पाहू मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सावली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहीत होऊन केलेले आत्मसमर्पण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मॉर्निंग स्टार/इव्हिनिंग स्टार असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?२) पाण्याच्या गोठणबिंदू किती असतो ?३) अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो ?४) 'लोकांचे नेतृत्व करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोल्हापूर येथे केव्हा स्थापन होणार आहे ? *उत्तरे :-* १) शुक्र २) ०° सेल्सियस ३) -११४° सेल्सिअस ४) लोकनायक ५) १८ ऑगस्ट २०२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *नारू म्हणजे काय ?* 📕नारू, 'नारू निर्मूलन' या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच, नारूमध्ये शरीरातून धाग्यासारखे जंतू बाहेर येतात असेही आपण कुठेतरी वाचलेले असते. नारू हा ड्रॅकन्क्युलस मेडीनेन्सीस नावाच्या जंतापासून होणारा रोग आहे. त्वचेखालच्या भागात हा जंत राहतो. या रोगामुळे रुग्ण मरत नसला, तरी हैराण मात्र होतो. नारूची प्रौढ मादी रुग्णाच्या शरीरात सामान्यपणे पायाच्या त्वचेखालील असते. तिची लांबी ५५ ते २२० सेंमी. एवढी असते. तर नर २ ते ३ सेंमी लांब असतो. फलन झालेली मादी रुग्णाच्या अंतः त्वचेत दाह निर्माण करते व परिणामी पायाच्या त्वचेवर फोड येतो. अशी व्यक्ती पाण्यात गेल्यास हा फोड फुटतो व मादी पाण्यात सुमारे १० लाख इतक्या सूक्ष्म अळ्या सोडते. पाण्यातील सायक्लोप नावाचे कीटक या अळ्यांना खातात सायक्लोपच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होतो. दुसऱ्या निरोगी व्यक्तीने हे पाणी प्याले, तर पाण्यातील सायवलोप्स त्याच्या पोटात जातात. जठरात सायक्लोपचे पचन होते व या अळ्या बाहेर पडतात. कालांतराने या अळ्या लहान आतड्यातून बाहेर पडतात. मजल दरमजल करत त्वचेखालच्या भागात पोहोचतात.९ ते १२ महिन्यांत अळ्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे मादी व नर तयार होतात व पुन्हा हे चक्र चालू राहते. नारू टाळण्याचे अनेक उपाय आहेत, पण परिणामकारक उपचार नसल्याने त्याचा प्रतिबंध करणेच जास्त महत्त्वाचे ठरते. पायऱ्या असलेल्या विहिरीमुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विहिरींना पायच्या नसाव्यात. त्या पक्क्या बांधणीच्या असाव्यात. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी वारंवार बाहेर खावेप्यावे लागणाऱ्या लोकांनी रुमालाची चौपदरी घडी पाण्याच्या ग्लासवर ठेवावी व पाणी गाळून प्यावे, त्यामुळे सायक्लोप्स पोटात जाणार नाहीत व नारू होणार नाही. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, सायक्लोप्स मारण्यासाठी किटकनाशकांचा वापर व लोकांना आरोग्यशिक्षण या तीन मार्गांनी हा रोग नियंत्रणाखाली आणता येईल. भारत सरकारने केलेल्या अविरत परिश्रमांमुळे पाच वर्षापूर्वी या रोगाचे आपण निर्मूलन करू शकलो आहोत. देवी नंतर देशातून निर्मूलन झालेला हा दुसरा रोग आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी … || धृ ||बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई … || १ ||पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय … || २ ||माझी बहिण चंद्रभागा, करीसे पापभंगा … || ३ ||एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण … || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपले दु:ख इतरांना, आपली माणसं समजून सांगत असतो. पण आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते.असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ* एकदा एका सिंहाने आणि अस्वलीने एकच झडप घेऊन एका हरणीला यमसदन दाखविले .पण गंमत अशी की ,ही शिकार कोणाची या गोष्टीसाठी सिंहात आणि अस्वलीत चढाओढ सुरु झाली. दोघांचाही संघर्ष समतोल सुरु होता व हे सर्व दृश्य एक कोल्हा लपून बघत होता .त्यांचे युद्ध थांबले .अस्वल आणि सिंह दोघेही थकून जमिनीवर पडले ते एवढे थकले होते की ,त्यांना जागेवरून उठताही येत नव्हते .या सर्व गोष्टींची खात्री करून तो कोल्हा पुढे सरकू लागला .त्याने त्या हरिणीला त्या दोघांमधून उचलून पळवून नेले .तेव्हा तो सिंह म्हणाला ,''अरे ,अरे ! काय आपलं भाग्य बघा .हा एवढा जीवाचा आटापिटा, हा त्रास कशासाठी सोसला? तर या कोल्ह्यासाठी.''तात्पर्य - दोघांच्या भांडणात कधी कधी तिसऱ्याचाच लाभ होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1XtQS8ETGz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासात आजचा दिवस:• १८५८ – ब्रिटीश संसदेमध्ये "गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट" मंजूर, ज्यामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपवून ब्रिटीश सरकारने थेट प्रशासन सुरु केले.• १८७६ – व्हाईल्ड वेस्ट शोचे जनक "वाईल्ड बिल हिकॉक" याचा मृत्यू.• १९३२ – महात्मा गांधींनी "हरिजन" या शब्दाचा वापर पहिल्यांदा केला.• १९८० – भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय.🎖️ जन्म :• १९२४ – जेम्स बाल्डविन, अमेरिकन लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता.• १९७५ – सनी देओल, बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी.🕯️ पुण्यतिथी :• १९२२ – सर एडवर्ड हेनरी, भारतीय पोलिस सेवेतील "फिंगरप्रिंट सिस्टीम"चे जनक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्यार्थी अप्रगत का राहतो...?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे - रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन, अण्णा भाऊंच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोल्हापूरकरांच्या गेल्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं असून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ कार्यरत होणार, नोटिफिकेशन जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनची खास भेट, जुलै महिन्याचा हप्ता लवकरच होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्तम अभिनेतेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकोला - घरोघर येणाऱ्या घंटागाडी चालकाला द्यावा लागेल आता 50 रुपये महिना, महानगर पालिकेचा दरमहा लाख रुपयांचा खर्च वाचणार‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामान्यात दुसऱ्या दिवशी भारत 224 धावावर सर्वबाद तर इंग्लंड सर्वबाद 247 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जी. पी. मिसाळे, पत्रकार संघटना अध्यक्ष, धर्माबाद 👤 दिगंबर वाघमारे, संपादक, कंधार 👤 आनंद पाटील धानोरकर 👤 दयानंद भूत्ते 👤 दुर्गा डांगे 👤 प्रतिक गाडे 👤 शिलानंद गायकवाड 👤 रवींद्र वाघमारे 👤 काशिनाथ उशलवार, धर्माबाद 👤 कैलास बी. चांदोड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 42*रंग आहे माझा काळा**उजेडात मी दिसते**अंधारात मी लपते**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टेबल, खुर्ची, पलंग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले काम शेवटास नेण्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, नाहीतर त्या कामाच्या चांगुलपणाला बट्टा लागतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा होणार आहे ?२) भारत कोणत्या वर्षापर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक स्थापन करणार आहे ?३) राष्ट्रीय सहकार धोरण - २०२५ कधी जाहीर करण्यात आले ?४) 'लोकांचा आवडता' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) शाश्वत शेती दिन २) सन २०३५ ३) २४ जुलै २०२५ ४) लोकप्रिय ५) २९०० किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परागफुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व प्रकटबीज वनस्पतींच्या अनुक्रमे फुलातील व शंकुतील [शंकूच्या आकाराच्या प्रजोत्पादक इंद्रियातील;⟶ कॉनिफेरेलीझ] केसरदलावर (पुं-केसरावर) असलेले परागकेश (प्रजोत्पादक सूक्ष्म घटक-बीजुके-पराग निर्माण करणारे भाग) पक्व झाल्यावर त्यांतून बाहेर पडणाऱ्या पांढरट किंवा पिवळट रंगाच्या भुकटीसारख्या सूक्ष्म कणांना पराग म्हणतात [⟶ फूल].पराग हा मूळचा संस्कृत शब्द ‘धूळ’ या अर्थी वापरला जातो व परागाचे कण धुळीच्या कणांसारखेच सूक्ष्म आकारमानाचे असतात. श्रीशिवांनी श्रीविष्णूंना⇨ बाहव्याच्या परागांनी प्रथम स्नान घालून नंतर गंगाजलाने स्नान घातल्याचा उल्लेख पुराणात आला आहे. संस्कृत वाङ्मयात परागांचा (पुष्परेणुंचा) अनेकदा उल्लेख केलेला आढळतो.बीजी वनस्पतींतील [⟶ वनस्पति, बीजी विभाग] परागकण वस्तुतः अबीजी वनस्पतींतील लघुबीजुकेच असून त्यांपासून पुं-गंतुकधारी (नर किंवा पुं-जननेंद्रिये धारण करणारी पिढी) व पुं-गंतुके (प्रजोत्पादक नर-कोशिका म्हणजे पेशी) तयार होतात; म्हणजेच ते प्रजोत्पादक घटक आहेत.एका फुलातील (किंवा शंकूतील) पराग त्याच फुलातील (किंवा शंकूतील) अथवा त्याच जातीतील दुसऱ्या वनस्पतीच्या फुलातील (किंवा शंकूतील) स्त्री-केसरावर पडल्या शिवाय [⟶ परागण] प्रजोत्पादनाच्या कार्यास आरंभ होत नाही. फुलझाडांत पराग किंजदलाच्या (स्त्री-केसराच्या) टोकावर (किंजल्कावर) आणि प्रकटबीज वनस्पतींत (उदा., चीड, सायकस, गिंको, देवदार इ.) प्रत्यक्ष बीजकाच्या टोकावर (बीजकरंध्रावर) पडावे लागतात.परागांचा प्रजोत्पादनातील महत्त्वाचा तपशील अलीकडेच पूर्णपणे माहीत झाला असला, तरी त्याची मोघम कल्पना सु. ५००० वर्षांपूर्वी अॅसिरियन पुरोहितांना होती, हे खात्रीलायक पुराव्याने सिद्ध झाले आहे. ते आपल्या हातांनी खजुराच्या नर-वृक्षावरील फुलोरे स्त्री-वृक्षा-वरच्या स्त्री-फुलोऱ्यांवर शिंपीत, कारण त्याशिवाय फळे धरत नाहीत हे त्यांना माहीत होते. आता अन्नोत्पादनाच्या प्रक्रियेत हे ‘हस्तपरागण’ महत्त्वाची कामगिरी बजावीत आहे [⟶ परागण] ; संकरज (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांपासून निर्माण झालेली) धान्ये, फळे, फुले ही सर्व या प्रक्रियेची आधुनिक देणगी आहे.परागकणप्रत्येक परागकण अतिसूक्ष्म असून त्याचा सरासरी ध्यास २४-५० μ (१μ= १ मायक्रॉन = १० -³ मिमी.) असतो; द्विदलिकित वनस्पतींता तो २-२५० μआणि एकदलिकितांत १५ - १५० μ असतो. विद्यमान प्रकटबीजींत १५-१८० μ व जीवाश्म (शिळाभूत झालेल्या पुरातन) जातींत ११-३०० μअसा व्यासांचा पल्ला आढळतो.एखाद्या कुलातील वनस्पतींच्या जातींत परागकणांचे आकारमान सारखे असतेच असे नाही; त्यात अनेकदा बराच फरक आढळून येतो. पक्व परागकणाचे वजन ०.०००००३५ ते ०.००००७ मिग्रॅ. या पल्ल्यात असते.प्रत्येक सामान्य फुलातून शेकडो परागकण बाहेर पडतात व कित्येक वनस्पतींतून बाहेर पडणाऱ्या अशा परागकणांची संख्या कित्येक सहस्र किंवा लक्ष इतकीसुद्धा भरते (उदा., सायकस, पाइन, खडशेरणी, गवते, पाणकणीस इ.). सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यावर असे कळून येते की, प्रत्येक परागकणाचा आतला भाग सूक्ष्म थेंबासारख्या (ठिपक्याएवढ्या) जीवद्रव्याचा ( सजीवाच्या कोशिकेतील जिवंत द्रव्याचा; प्राकलाचा) असून त्यात प्रकल (कोशिकेतील प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज), संचित स्टार्च व तेल असतात. त्याभोवती दोन संरक्षक वेष्टने असतात; आतील पातळ वेष्टनाला ‘आलेप’ आणि बाहेरच्या जाड उपत्वचायुक्त किंवा मेणासारख्या पदार्थाने बनलेल्या वेष्टनाला ‘अधिलेप’ म्हणतात.अधिलेपामुळे बहुतेक अम्ले व सु. ३००° से. पर्यंतचे तापमान यांपासून संरक्षण मिळते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे आलेप व अधिलेप यांची अतिसूक्ष्म रचना समजून येते व त्याचा उपयोग परागकणांची विविधता व त्यांतील सूक्ष्म फरक समजून घेण्यास करतात.त्यांचे आकार, आकारमान व अधिलेपाचे स्वरूप यांत बरीच विविधता असते; परंतु कोणत्याही एकाच कुलातील, जातीतील किंवा वंशातील वनस्पतींचे परागकण मात्र वरील बाबतीत सारखेच असतात. उदा., गवताचे आणि सूर्यफुलाचे परागकण वाटोळे, खजुराचे लंबगोल व गुलाबाचे त्रिकोणी असतात.चौरस, अर्धगोल इ. भिन्न आकारांचे परागकणही आढळतात. झोस्टेरा या पाण्यातील वनस्पतीचे परागकण लांब व बारीक केसासारखे (२,५५० x ३.७μ) असतात. परागकण सामान्यतः हलके असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहत दूर जातात; मूळ ठिकाणापासून सहाशे किमी. पेक्षा अधिक दूर गेलेल्या परागकणांची उदाहरणे आहेत. एफेड्रा व नोथोफॅगस यांचे पराग द. अमेरिकेहून पूर्वेकडे सु. ३,८५० किमी. (ट्रिस्टन द कुना) आणि सु. २,२५० किमी. (द. जॉर्जिया बेट) दूरच्या पीटयुक्त प्रदेशात गेलेले आढळतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगदेवाजीच्या व्दारी आज रंगला अभंग …. || धृ ||दरबारी आले रंक आणि रावझाले एकरूप नाही भेदभावगाऊ नाचू सारे या हो, होऊनी नि:संग …. || १ ||जन सेवेपायी काया झिजवावीघाव सोसुनिया मने रिझवावीताल देऊनिया बोलतो मृदुंग …. || २ ||हरीभजनाचे सुख मी लुटावेगात गात माझे डोळे मी मिटावेनका करू कोणी माझ्या समाधीचा भंग …. || ३ ||ब्रह्मनंदि देह बुडोनिया जाईएक एक खांब वारकरी होईकैलासीचा राणा, झाला पांडुरंग …. || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नक्कल म्हणजे अनुकरण नव्हे* सातवीतला तनिष हा नकला चांगल्या करायचा. मित्रांच्या बोलण्याच्या लकबी, शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे. शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय, पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षकदिनाच्या दिवशी सगळी मूले वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते. तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला. त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या. फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवताना त्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे, याचा विचारच त्याने केला नव्हता. सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली.तात्पर्य - नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~