✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AkYWf7dMs/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.• १९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.• १९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.• १९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.• १९४२: भारत छोडो दिन🎂 जन्म :- • १९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक• १९२०: घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब• १९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू• १९९१: अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी🌹 मृत्यू :- • १९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे• १९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर• २००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी• २०२२: भारतीय अभिनेते प्रदीप पटवर्धन • २०२२: भारतीय राजकारणी, खासदार माया थेवर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राखी : एक अतूट बंधन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत अमेरिकेकडून शस्त्रे-विमाने खरेदी करणार नाही, संरक्षणमंत्र्यांनी वॉशिंग्टन दौरा रद्द केला; ट्रम्पच्या 50% करवाढीनंतर मोदी सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार, लष्कराला 120 आणि हवाई दलाला 80*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - कर्जमाफी आणि हमीभावासाठी राज्यव्यापी आंदोलन, शेतकरी संघटनांचे एकत्रित लढ्याचे आवाहन, राजू शेट्टींचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यातील वाहतूक वेग प्रतितास 30 किमी करण्याचा प्रयत्न, पुढील 30 वर्षांसाठी 1 लाख 30 हजार कोटींचा विकास प्रकल्प राबवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उत्तरकाशीत अडकलेल्या पर्यटकांशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा संवाद, महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली जिल्ह्यात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता विशेष मोहिम राबविणार मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंढरपूरचे प्रसिद्ध गझलकार वैभव कुलकर्णी यांना गझलदीप पुरस्कार प्रदान, गझल करताना संयम आणि तटस्थता आवश्यक, गझलभान निर्माण करणे महत्त्वाचे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बुद्धभूषण कांबळे, साहित्यिक, लातूर 👤 नवाब पाशा शेख, पंचायत समिती, धर्माबाद 👤 समाधान बोरुडे 👤 शिवाजी अंबूलगेकर, अध्यक्ष, मायबोली परिषद, मुखेड 👤 विलास कोळनूरकर, शिक्षक तथा कवी, उमरी 👤 गणेश पांचाळ 👤 बालाजी तेलंग, शिक्षक, कंधार 👤 विलास पानसरे 👤 सुशीलकुमार भालके👤 ऋषिकेश जाधव👤 विलास पाटील करखेलीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 48*अशी कोणती गोष्ट आहे**जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टेलिफोन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले सत्यस्वरूप सिद्ध करण्यास सुवर्णाला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घनाचे घाव सोसावे लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याचे कार्य कोणते इंद्रिय करते ?२) नकाशात हिरवा रंग कशासाठी वापरतात ?३) कमलापुरा हे शासकीय हत्ती संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) 'व्याख्यान देणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) संदेश वहनासाठी वातावरणाच्या कोणत्या थराचा उपयोग केला जातो ? *उत्तरे :-* १) मूत्रपिंड ( किडनी ) २) वनक्षेत्र ३) गडचिरोली ४) व्याख्याता ५) आयनांबर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *प्लीहा म्हणजे काय ?* 📕प्लीहा हे इंद्रिय आपल्या शरीरात डाव्या बाजूला असते. छातीच्या पिंजऱ्यामध्ये छाती व पोट यांमध्ये असलेल्या डायफ्रेंम या स्नायूच्या खाली प्लीहा असते. श्वसनाबरोबर प्लीहा वरखाली होत असते. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्तीसाठी एखाद्या लसिकाग्रंथीप्रमाणे प्लीहा कार्य करते. शरीरात कोणताही 'परकीय' पदार्थ शिरला की, प्लीहेमध्ये टी व बी प्रकारच्या लिम्फोसाईट्स (पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार) तयार होण्याचे प्रमाण वाढते. या पेशी रोगप्रतिकारशक्तीसाठी कारणीभूत असतात. 'बी' प्रकारच्या लिम्फोसाईट्स परकीय पदार्थ वा अँटीजेनच्या विरुद्ध प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) तयार करतात, तर 'टी' प्रकारच्या पेशी अँटीजेन बाबत 'स्मरणशक्ती' निर्माण करतात.प्लीहेचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे दुखापत झालेल्या निरुपयोगी झालेल्या रक्तपेशींचा नाश करणे. याचबरोबर लाल रक्तपेशीतील हिवतापाच्या जंतूंना मारण्याचे कामही प्लीहेतील पेशी करतात. त्यामुळेच हिवतापात प्लीहेचा आकार वाढलेला असतो. प्लीहा रक्तातील एकूण रक्तबिंबीकांपैकी (प्लॅटलेट) ३० ते ४०० टक्के रक्तबिंबीका गाळून साठवून ठेवते.गर्भावस्थेत ५ व्या महिन्यापासून मूल जन्माला येईपर्यंत प्लीहेमध्ये रक्तनिर्मितीचे कार्य होत असते. मूल जन्माला आल्यानंतर मात्र हे कार्य थांबते.कधीकधी काही रोगांमुळे प्लीहा लाल रक्तपेशींचा खूपच जास्त प्रमाणात नाश करू लागते. त्यामुळे लीहेचा आकार वाढतोच, पण त्याबरोबरच अॅनेमिया वा रक्तपांढरीही होते. अशावेळी किंवा प्लीहेमध्ये कर्करोग झाल्यास प्लीहा शस्त्रक्रिया करून काढून टाकावी लागते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नथनि घडावा ग …..हळदी ग कुंकवाच घेऊन ताट एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग …..लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..रायगड चा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडावा ग …..उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुलामगिरी एकदा एक कुत्रा एका सिंहाला म्हणाला, 'अरे, तुझं जीवन किती दुःखी आहे. सगळा दिवस उपाशीपोटी भक्ष्य शोधत हिंडावं आणि ते मिळालं नाही तर प्रेतासारखं पडून रहावं. मला तर तुझी कीवच येते. त्यापेक्षा मी बघ कसा धष्टपुष्ट आहे, सुखी आहे.' यावर सिंहाने उत्तर दिले, 'मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. तुला वेळच्या वेळी व्यवस्थित खायला मिळतं हे अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर तुला गळ्यात साखळीही सतत बाळगावी लागते. माझं तसं नाही. मला खाणं मिळालं नाही तरी मी स्वतंत्र आहे. गुलामगिरीतल्या चैनीपेक्षा स्वतंत्रतेत भुकेनं मरण आलेलं परवडलं !'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment