✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔹 विशेष दिन :- • जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन• इंटरनेट दिन🚩 महत्त्वाच्या घडामोडी :- • १८२१ – पेरू देश स्वतंत्र झाला.• १९११ – लिओनार्डो दा विंचीचे सुप्रसिद्ध चित्र मोनालिसा पॅरिसच्या लुव्हर संग्रहालयातून चोरीस गेले.• १९४७ – भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेपाळने भारताशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.• १९८३ – फिलिपाईन्सचे नेते बेनिग्नो अक्विनो यांची मनिलामध्ये हत्या झाली.🔹 जन्म :- • १८७९ – भारताचे सहावे सरन्यायाधीश मीर्ज़ा हामिदुल्ला बेग.• १९०४ – कॉमेडियन अभिनेते केशवराव कोळे.• १९०४ – कवी, लेखक, समीक्षक शंकर पाटील.• १९३१ – नोबेल पारितोषिक विजेते लेखिका टोनी मॉरिसन.🔹 मृत्यू :- • १९४० – प्रसिद्ध रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की.• १९६४ – प्रसिद्ध शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर.• २००२ – ज्येष्ठ नाटककार व अभिनेते जयवंत दळवी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन - गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे *शालेय परिपाठ* व्यवस्थितपणे राबविण्यासाठी परिश्रम घेत आहे. तेव्हा आपण देखील या whatsapp समूहात जरूर join व्हावे. ..... समूहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून 15631 पदांच्या पोलीस शिपाई भरतीला मान्यता, शासन निर्णय जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, एकही जागा मिळाली नाही, महायुतीला 7 जागा, शशांक राव पॅनलने 14 जागा जिंकत मैदान मारलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीला पूर; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांची पिकं पाण्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर नवी मार्गिका, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारणीस मंत्रिमंडळ समितीची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करणार, सात दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाला परवानगी; मंत्री आशिष शेलार यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या; पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताज्या वनडे क्रमवारीची केली घोषणा, फलंदाजीत शुभमन गिल तर गोलंदाजीत केशव महाराज पहिल्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भीमाशंकर जुजगार, सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक, धर्माबाद 👤 साईनाथ राचेवाड, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 रघुनाथ सोनटक्के, साहित्यिक, तळेगाव दाभाडे, पुणे 👤 भूषण परळकर, नांदेड 👤 संतोष गुम्मलवार, मनपा, नांदेड 👤 दत्ता नरवाडे, शिक्षक, बिलोली 👤 विश्वास बदापूरकर, येताळा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 57*हिरवी पेटी काट्यात पडली**उघडून पाहिली तर मोत्याने भरली**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ट्रॅक्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदाचार, कर्तव्यनिष्ठा हे माणसाचे अलंकार आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) भारतात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत ?३) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या ठिकाणी पहिली कायमस्वरूपी वखार स्थापन केली ?४) 'सिनेमाच्या कथा लिहिणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'जागतिक आदिवासी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सी. पी. राधाकृष्णन २) महाराष्ट्र, २९ ३) सुरत ४) पटकथालेखक ५) ९ ऑगस्ट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात ?* 📙 स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे (अंडी) अनुक्रमे तयार होतात.दुय्यम लैंगिक लक्षणात आवाज फाटणे, कंठ फूटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे ह्यांचा समावेश मुले मुली या दोहोत होतो. मुलींमध्ये स्तनांची वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू होते. मुलांमध्ये दाढी मिशा येऊ लागतात. बिजाची निर्मिती होऊ लागते. मुली मुलांमध्ये वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असल्याने मुलींना दाढी मिशा येत नाहीत. तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात घ्यायला हवे की मुलींमध्ये टेस्टेस्टेरॉन असतो. पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यांमुळे वा विकारांमुळे या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यास मुलींमध्ये दाढी मिशासारखी पुरुषी लक्षणे तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे दिसून येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला …. || १ ||नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया… || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तहान पाण्याने भागत असते. भूक अन्नाने मिटत असते. एखाद्या व्यक्तीजवळ दु:ख सांगल्याने मन थोडे हलके होते आणि योग्य माणसावर विश्वास केल्याने आपला कधीच विश्वासघात होत नाही. आज अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. म्हणून आधी स्वतःला ओळखावे आणि मगच योग्य व्यक्तीला वाचण्याचा प्रयत्न करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आचार्य विनोबा भावे*भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment