✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/176rQKx7nF/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विश्व मानवतावादी दिवस**जागतिक फोटोग्राफी दिवस*🚩 ऐतिहासिक घटना :- • १९१९ – अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य. • १९४५ – व्हिएतनाममध्ये होची मिन्ह यांनी सत्ता प्राप्त केली. • १९९१ – मिखाईल गोर्बाचेव्ह यांची फोरोस येथे नजरकैद; सोव्हिएत संघात अर्धसैनिक ताबा. • १९९९ – बेलग्रेडमध्ये युगोस्लाव्हियातील जनतेने राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन. 🎂 जन्म :- • १९२२ - बबनराव नावडीकर – प्रसिद्ध मराठी गायकार• १९१८ - शंकरदयाळ शर्मा, भारताचे ९वे राष्ट्रपती व ८वे उपराष्ट्रपती• १९५१ - सुधा मूर्ती, शिक्षिका व लेखक, Infosys Foundation प्रमुख• १९४६ - बिल क्लिंटन, ४६वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष• १९६७ - जेन् सत्या नडेला, Microsoft चे सीईओ🌹 निधन :-• १९७५ - डॉ. विनायक विश्वनाथ (अप्पासाहेब) पेंडसे, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, ज्ञानप्रबोधिनी संस्थापक• १९९३ उत्पल दत्त, रंगभूमी आणि चित्रपट कलाकार• १९९३ - य. द. लोकुरकर, पत्रकार• १९९४ - लिनस कार्ल पॉलिंग, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेता रसायनशास्त्रज्ञ, अण्वस्त्रविरोधी कार्यकर्ता••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पौर्णिमा-अमावस्या आणि सण*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हवामानविभागाचा अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता ठाणे व मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी बांधवांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी 24 तास सुरू राहणारे तालुकानिहाय 'तक्रार केंद्र' उभारणे गरजेचे आहे, असं पत्र खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली :- येलदरी, इसापूर, सिद्धेश्वर धरण भरले, पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NDA उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अहिल्यानगर - ९ हजार विद्यार्थ्यांना जायचंय इस्त्रोला, झेडपी पाठवणार टॉपर ४२ विद्यार्थ्यांना, २० लाख निधीची तरतूद, इस्त्रोला जाण्यासाठी दिली ८९५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उत्तम सदाकाळ, शिक्षक तथा साहित्यिक 👤 डॉ. शिवा टाले, मुख्याध्यापक, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नांदेड👤 संदीपराजे गायकवाड, मुख्याध्यापक, साईबाबा प्राथमिक विद्यालय, बिलोली 👤 महेश हातझाडे 👤 मन्मथ चपळे👤 मोहन शिंदे 👤 कवयित्री अंतरा 👤 योगेश मठपती 👤 संभाजी वैराळे👤 संतोष कडवाईकर 👤 विलास वाघमारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 55*अवतीभोवती आहे लाल रान**32 पिंपळाना फक्त एकच पान**सांग भाऊ मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - Chair••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा विकास होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो ?२) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे ?३) अफजल खानाला कोणत्या गडाच्या पायथ्याशी मारले गेले ?४) 'संकट दूर करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमा किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) जिल्हाधिकारी २) ६२ वर्षे ३) प्रतापगड ४) विघ्नहर्ता ५) १,४५८ किमी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 'मीठा जहर' म्हणजे काय ? 📕 गोड बोलून विश्वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच 'मीठा जहर' असे म्हणतात. ॲकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात ॲकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे.पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसू येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्वसन थांबून मृत्यू होतो. १ ग्रॅम वजनाइतके मूळ वा २५० मि.ग्रॅ. इतके ॲकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो.वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केला जातो.पोटात गेलेले विष टॅनिक ॲसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमॅगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे 'मीठा जहर' चवीला गोड, पण भयंकर.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरीदुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरीकधी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटीपाहून सेवा घर, थांबला हरी तो पाहे विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरी || १ ||नाम देव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगलाटाळ घेउनी तरी, चला वारकरी, तो पहा विटेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरी || २ ||संत जनाई ओवी गाई, विठाई ग विठाईमाझी पंढरीची आई, कशी सखू अन बहिणाबाईविठाई ग विठाई, माझी पंढरीची आई,रखुमाई मंदिरी ऐकली परी तो पहा विठेवरीविठ्ठल विठ्ठल जय हरी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसात एकमेकांप्रती आपुलकीची भावना व आदर असायला पाहिजे आणि एकमेकांच्या भावनांची कदर सुद्धा केली पाहिजे. यामुळे संवाद टिकून राहतो पण, ती भावना मर्यादित राहणे गरजेचे आहे. पण,असे न होता त्या भावनेमध्ये जास्त वाहत गेल्याने विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून संवाद साधताना मर्यादा बाळगणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*धर्म म्हणजे काय ?*एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment