✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑगस्ट 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घडामोडी :-• १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.• १९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.• १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.• १९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.🎂 जन्म :-• १९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान• १९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार• १९५४: पार्श्वगायिका हेमलता• १९५७: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील • १९६८: आप पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल• १९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला• १९७०: अभिनेता सैफ अली खान 🌹 मृत्यू • १८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय• १८८८: कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन• १९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक• १९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर • १९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान• २०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा • २०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे• २०१८: भारताचे १० वे पंतप्रधान व कवी अटलबिहारी वाजपेयी• २०२२: भारतीय अभिनेते नेदुंबरम गोपी • २०२२: भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार नारायण • २०२२: भारतीय राजकारणी, खासदार रुपचंद पाल • २०२२: भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार सुभाष सिंग• २०२०: भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार चेतन प्रतापसिंग चौहान••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन ला काल 15 ऑगस्ट ला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षात आमच्या टीमने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक डोळ्यासमोर ठेवून माहिती देण्याचे काम करत आले आहे. आपण सर्व वाचकांनी देखील खूप प्रतिसाद दिलात त्यामुळे गेली 10 वर्षे सलगपणे ( कोराना काळ वगळून ) ही पोस्ट अजून ही जोमात चालू आहे. या बुलेटीनसाठी अनेकांचे हातभार लाभले, त्या सर्वांचे टीम आभार व्यक्त करते. रोज सकाळी सूर्य किरणासोबत येणारी पोस्ट म्हणून फ्रेश मॉर्निंग बुलेटिन ला ओळखले जाते. यापुढे ही उपयुक्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही पोस्ट सर्वदूर पोहोचण्यासाठी सर्व Admin मंडळीनी आपल्या समूहात पोस्ट करून सहकार्य करावे. ही नम्र विनंती. ..... या समूहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.नासा येवतीकर, संयोजक ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सैन्याने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, ऑपरेशन सिंदूरने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, काश्मीरमध्ये ट्रेन पोहोचणे ही मोठी कामगिरी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला राज्य पातळीवर मोठा मान, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालेय शिक्षणात नवे उपक्रम येणार, छत्रपती संभाजीनगरमधील दशसूत्री उपक्रमाची मंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात, कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास शासन कटिबद्ध - पालकमंत्री झिरवाळ यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे सर्वात मोठे भाषण, 103 मिनिटे, त्यांनी त्यांचाच 98 मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला; 2017 मध्ये सर्वात छोटे 56 मिनिटे भाषण दिले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 25 हजार कर्मचारी बेमुदत संपाच्या तयारीत, कायम सेवेसह 18 मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन, आरोग्यसेवेवर परिणाम होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *देशभरात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रवीण खुमसे, MIT अंबाजोगाई 👤 सदानंद वटपलवाड👤 अशपाक सय्यद 👤 रमेश बारसमवार👤 प्रसाद कामूलवार 👤 निखिल देवेंद्र खराबे, कुही नागपूर 👤 सुभाष पालदेवार 👤 कोंगारी राम मोहन *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 53*पाच अक्षराचा एक पदार्थ**पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव**पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज**पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरमी / उष्णता ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून परमेश्वर दिसेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १५ ऑगस्ट २०२५ ला आपण कितवा 'स्वातंत्र्य दिन' सोहळा साजरा केला आहे ?२) भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल कितव्यांदा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा किताब जिंकला ?३) 'रानकवी' म्हणून कोणत्या कवीला ओळखले जाते ?४) 'सतत निंदानालस्ती करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) औरंगजेबाची कबर कोठे आहे ? *उत्तरे :-* १) ७९ वा २) चौथ्यांदा ३) ना. धों. महानोर ४) निंदक ५) खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतीय चलनी नोटांमध्ये गांधीजींचे चित्र कधी आणि कुठून घेतले ?देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधींचे योगदान कधीही विसरता येणार नाही. देशाने त्यांना राष्ट्रपिताचा दर्जा दिला आहे. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांचे चित्र भारतीय चलनी नोटांमध्ये आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की पूर्वी चलनी नोटांमध्ये गांधीजींऐवजी इतर चित्रे असायची. अनेक वर्षांपासून अशोक स्तंभ, तंजोर मंदिर, लॉयन कॅपिटल, गेट वे ऑफ इंडियाची चित्रे भारतीय चलनी नोटांवर छापली जात होती. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश नोटांवर किंग जॉर्जची चित्रे छापत असत. नोटांवर गांधीजींचे चित्र प्रथम 1969 मध्ये छापण्यात आले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चित्र नोटांवर छापले. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात असलेल्या सेवाग्राम आश्रमाचे चित्रही त्याच्या मागे होते. या आश्रमात गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाची 14 वर्षे व्यतीत केली होती. तथापि, नंतर त्याचे चित्र अनेक नोटांवर छापले जाऊ लागले. गांधीजींचे हे हसणारे चित्र कोठून घेतले आहे हे तुम्हाला माहिती आहे का?स्वातंत्र्यानंतरही छापले ब्रिटिश राजाचे चित्र!आजकालच्या नोटांवर छापलेल्या गांधीजींच्या चित्राबाबत जाणून घेऊ, पण त्याआधी हे जाणून घ्या की ब्रिटिशांनी भारत सोडण्यापूर्वी ब्रिटिश किंग जॉर्जचे चित्र भारतीय चलनात छापले होते. 1947 पर्यंत असे चलन देशात चालू होते. वास्तविक, ब्रिटिश किंग जॉर्जचे चित्र नोटांवर राहू नये अशी सरकार आणि सामान्य जनतेची इच्छा होती. परंतु यासाठी सरकारला थोडा वेळ हवा होता. काही काळानंतर, सरकारने किंग जॉर्जचे चित्र भारतीय चलनातून काढून टाकले आणि त्याच्या जागी सारनाथमधील लायन कॅपिटलचे चित्र लावले.गांधीजींच्या चित्रासह नोटा कधी छापल्या गेल्या ?रिझर्व्ह बँकेने 1969 मध्ये पहिल्यांदा नोटांवर गांधीजींचे चित्र स्मरणपत्र म्हणून छापले होते. त्यावेळी गांधीजींच्या चित्रासह 100 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. 1869 मध्ये जन्मलेल्या गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त हे करण्यात आले होते. सेवाग्राम आश्रमात राहताना गांधीजींचे हे चित्र काढण्यात आले. आजकाल नोटांमध्ये गांधीजींचे हसणारे चित्र असते, ते चित्र पहिल्यांदा 1987 मध्ये चलनी नोटांवर छापले गेले. ऑक्टोबर 1987 मध्ये गांधीजींच्या चित्रासह 500 रुपयांची पहिली नोट चलनात आली. तेव्हापासून त्याचे हेच चित्र इतर चलनी नोटांवरही छापले गेले.1996 मध्ये छापल्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटाकेंद्रीय बँक RBI ने 1996 मध्ये नोटमध्ये अनेक बदल केले. वॉटरमार्क बदलला. यासह, विंडोड सिक्युरिटी थ्रेड, लेटेंड प्रतिमा आणि दृश्य अपंग लोकांसाठी इंटॅग्लिओ वैशिष्ट्ये देखील जोडली गेली. आता गांधीजींच्या चित्रासह 5, 10, 20, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. या दरम्यान, अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींचे चित्र लावण्यात आले आणि राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ नोटांच्या खालच्या डाव्या बाजूला स्थानांतरित करण्यात आले. तेव्हापासून या स्वरूपात नोट्स छापल्या जात आहेत.गांधीजींचे हे चित्र कुठले आहे ?नोटांवर छापलेले महात्मा गांधींचे छायाचित्र सध्याच्या राष्ट्रपती भवनात म्हणजेच 1946 मध्ये व्हाईसराय हाऊसमध्ये काढण्यात आले होते, जेव्हा गांधीजी म्यानमार म्हणजेच तत्कालीन सचिव फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांना भेटण्यासाठी पोहोचले होते. तिथेच त्यांचा फोटा काढला होता. फोटो कोणी काढला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या नवीन नोटांचे रंग बरेच बदलले आहेत. पण एक गोष्ट शिल्लक आहे ती म्हणजे गांधीजींचे हसणारे चित्र.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोपाला गोपाला देवकीनंदन*गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापालाही धोंड्याला म्हणती देवता भगत धुंडती तया जोगता स्वतःच देती त्यास योग्यता देव म्हणुनी कुणी न भजावे फुका शेंदरी दगडाला !कुणी न रहावे खुळे अडाणी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी यासाठी ही झिजते वाणी मी जातीचा धोबी देवा, धुवीन कपडा मळलेला !हेच मागणे तुला श्रीहरी घाम गाळी त्या मिळो भाकरी कुठेच कोणी नको भिकारी कुणी कुणाचा नको रिणकरी, कुणी न विटो नर जन्माला !••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही गोष्टी विचारपूर्वक असतील तर त्या ऐकून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी त्या प्रकारची मानसिकता असणे गरजेचे असते. या प्रकारची मानसिकता असल्याने बरंच काही चांगले घडून येते. आणि इतरांना ही त्यातून शिकायला मिळत असते.म्हणून कोणत्याही गोष्टींवर बोलताना त्या पासून स्वतःला ही आणि इतरांनाही काही घेता येईल अशाच विचारपूर्वक गोष्टी असायला पाहिजेत🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकीचे बळ सर्वश्रेष्ठ*एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment