✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15T8BNngCe/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घडामोडी :- • १८६१: अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.• १९१४: ओहायो मध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिगनल बसवले.• १९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.• १९६२: कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.• १८८२: स्टँडर्ड ऑइल कंपनी (एक्सॉनमोबिल) - स्थापन झाली.• १८७४: जपान या देशाने टपाल बचत योजना सुरू केली.🎂 जन्म :- • १८५८: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे• १८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार • १९३०: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग • १९३३: लेखिका व समीक्षिका विजया राजाध्यक्ष • १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी महेंद्र कर्मा • १९६९: जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद • १९७४: भारतीय अभिनेत्री काजोल• १९८७: भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोझा🎂मृत्यू :- • १९९१: होंडा कंपनी चे स्थापक सुइचिरो होंडा• १९९२: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन• १९९७: स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते के. पी. आर. गोपालन • २०००: भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ भारद्वाज• २००१: अभिनेत्री ज्योत्स्‍ना भोळे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका • २०२२: भारतीय नृत्यांगना गोरिमा हजारिका••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला मित्र बनवू या .........!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *PPC 2025 ने रचला इतिहास, परीक्षा पे चर्चा ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संसदेत गोंधळ, लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब, विरोधकांचा फेर तपासणीवर आक्षेप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *OBC आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 102 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकरी व घरगुती ग्राहकांसाठी 24 तास वीज, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, राष्ट्रपती, पंतप्रधानासह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ओव्हल कसोटीत भारताचा इंग्लंडवर 6 धावाने ऐतिहासिक विजय, मालिका 2-2 ने बरोबरीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीराम पा. जगदंबे, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद 👤 मनोज मानधनी, धर्माबाद👤 अभिनंदन प्रचंड, पदवीधर शिक्षक, धर्माबाद 👤 भारती सावंत, लेखिका, मुंबई 👤 दत्तात्रय सितावार, कराटे मास्टर, धर्माबाद 👤 किरण सोनकांबळे 👤 देवराव कोलावाड 👤 शेख वाजीद👤 सय्यद जाफर 👤 विकास कांबळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 44*ऊन बघता मी येतो**सावली पाहता मी लाजतो**वाऱ्याचे स्पर्श होताच**मी नाहीसा होतो**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नाणे coin••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कित्येक संकटे येतात आणि जातात, परंतु या संकटांना न्याय आणि सत्याचा पाठपुरावा करीत जो सामोरा जातो तोच खरा शूर.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात किती व कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे ?२) 'भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना ...आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना' या प्रसिद्ध गीताचे गीतकार कोण ?३) यकृत कोणत्या इंद्रिय संस्थेचा भाग आहे ?४) 'वनात राहणारे प्राणी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ? *उत्तरे :-* १) सहा - सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग २) कविवर्य सुरेश भट ३) पचनसंस्था ४) वनचर ५) आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वनस्पतींची अन्नप्रक्रिया* 📙 *************************वनस्पती व प्राणी यांत फरक काय ? या प्रश्नाची उत्तरे विविध प्रकारे पटापट दिली जातात. म्हणजे हालचाल करीत नाहीत, प्राण्यांप्रमाणे आक्रमण करीत नाहीत, आरडाओरडा करीत नाहीत वगैरे वगैरे. पण सर्वात महत्त्वाचे उत्तर सहसा कोणीच देत नाही. ते आहे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, प्राणी तसे करू शकत नाहीत. हे उत्तर पटवून घ्यायलासुद्धा अनेकदा अनेकांना जड जाते. अर्थात पटल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट वेगळी. केवळ सूर्यप्रकाशातून मिळणारी ऊर्जा, जमिनीतून पाणी व अनावश्यक नत्र पदार्थ व हवेतून कार्बन डायऑक्साइड मिळाला की, वनस्पतींची अन्नप्रक्रिया सुरू होते. त्यातूनच त्यांचे पोषण व वाढ होते. एवढेच नव्हे, तर त्या वनस्पतींवरच अन्य प्राण्यांचे उपोषण सुरू होते. ही सारी किमया वनस्पतींतील हरितद्रव्यामुळे घडते. सजीवाची उत्पत्ती झाली, तेव्हा दोन प्रकारच्या पेशी निर्माण झाल्या. एकीमध्ये हरितद्रव्य होते (Chlorophyll) व त्या पेशीला पेशीभित्तिकाही होती. ही झाली वनस्पतिज पेशी. दुसरी होती प्राणिजपेशी. तिच्या पेशीभित्तिकेमध्ये कडकपणा नव्हता. सेल्युलोज या घटकाचा त्यात अभाव होता. सूर्यप्रकाशातील किरणांतून वनस्पतींची पाने जी मुख्यत: हरितद्रव्यांनी जास्त भारीत असतात, ज्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाशकिरण पडावेत, अशी त्यांची रचना असते ती उर्जा घेतात. जमिनीतून नत्र पदार्थांचे शोषण पाण्याबरोबर होतच असते. पण मुख्यतः हरितद्रव्यामुळे पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साइड यांपासून विविध पिष्टमय पदार्थ व शर्करांची निर्मिती होते. त्यातूनच मग वनस्पतीच्या वाढीला पोषक अशी अन्यद्रव्ये बनतात व ती योग्य जागी म्हणजे खोडात वा मुळात साठवली जातात. झाडाच्या स्वरूपाप्रमाणे मग त्यांचे नंतर रूपांतर फळे व बियांतही होत जाते.केवळ जमिनीवरील वनस्पतींतच ही प्रक्रिया घडते, असे नाही; तर पाण्यातील, समुद्रातील वनस्पतीसुद्धा याच पद्धतीने अन्न तयार करतात. यामुळेच पाण्यामध्ये जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तिथवरच वनस्पतींची वाढ झालेली आढळते. याखालील पातळीवर वनस्पतिजीवन आढळत नाही. जमिनीवरसुद्धा ज्या भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही, तेथे वनस्पतिजीवन फार वाढू शकत नाही.वनस्पती स्वतःचे अन्न तयार करताना समस्त प्राणिजीवनावर दोन प्रकारे उपकार करत असतात. एकात प्राणवायू बाहेर टाकला जात असल्याने प्राण्यांना अत्यंत आवश्यक अशा वायूचे वातावरणातील प्रमाण कायम राखले जाते, तर अनावश्यक असा, प्राण्यांनी हवेत सोडलेला कार्बन डायऑक्साइड त्यात शोषून घेत असतात. वनस्पतींची अन्नप्रक्रिया अन्न तयार करूनच थांबते, असे नव्हे; तर ज्या वेळी वनस्पती नाश पावतात, त्या वेळी त्यांच्या अवशेषांतूनसुद्धा पुन्हा वनस्पतींना उपयुक्त अशा स्वरूपाचे घटक तयार होऊन जमिनीला मिळतात. अन्नसाखळीचा वनस्पती हा एक प्रमुख घटक आहे, तो यामुळेच.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठू माऊली तू माऊली जगाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगासंसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागाअमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठलाअभंगाला जोड टाळ चीपल्याचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आईआ आ आ लेकरांची सेवाकस पांग फेडू आता कस उतराईतुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाईजन्मभरी पूजा तुझ्या पाउलाचीमाऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || २ ||पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शेणात आणि सारवणात त्याचा काहीच उपयोग नाही असे आपण अनेकदा म्हणत असतो. पण अंगण कितीही पाण्याने स्वच्छ करून धुतले तरी शेणाच्या सड्याएवढी योग्यता प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच अंगणात सडा टाकण्यासाठी शेणाची निवड केली जाते. तसंच माणसाचं सुद्धा आहे. कोणाच्या कलेला किंवा त्याच्या विचाराला कधीच कमी लेखू नये. कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रसंगातून गेलेला असतो कारण त्यातून त्याला अनेक अनुभव आलेले असतात त्याच अनुभवातून तो जगत असतो. अशा व्यक्तीकडून चुका होण्याची शक्यता फारसी नसते कारण अनुभव त्यांच्या पाठीशी असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा व साप* एकदा एक साप नदीच्या किनारी झोपून उन्हाचा आस्वाद घेत होता. त्यावेळी तिथे अचानकपणे एक कावळा आला व त्याने त्या विषारी सापाला आपल्या पायांच्या नखांनी घायाळ करून त्याला आपल्या नखांमध्ये घेऊन उडू लागला. त्या सापाने कावळ्याच्या पंजातून निघण्याचा खूप प्रयत्न केला. सापाने कावळ्याच्या शरीरास दंश केला व त्याच्या दंशाने कावळा जखमी झाला. तो आकाशातून थेट जमिनीवर येऊन पडला. साप कावळ्याच्या पंजातून पळ काढून निघून गेला. पण कावळ्याच्या शरीरात विष पसरल्याने तो मरणाच्या दारात आला. मग त्याने मनात विचार केला की, जर मी त्या सापाला पंजात उचलले नसते, तर आज तोच साप माझ्या मृत्यूचे कारण झाला नसता. तात्पर्य :- विचारी माणसं विचार करून कृती करतात ; परंतु अविचारी माणस कृती केल्यानंतर विचार करत बसतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment