✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑगस्ट 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14Kh2PqKmFG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासातील घटना :-• 1908 – क्रांतिकारक खुदीराम बोस यांना मुजफ्फरपूर येथे फाशी देण्यात आली. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले.• 1947 – पाकिस्तानच्या संविधान सभेत मोहम्मद अली जिन्ना यांचे प्रसिद्ध भाषण; तसेच पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत.• 1961 – दादरा आणि नगर हवेली यांचे भारताच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विलयन.• 2004 – भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यर्पण करारासंदर्भातील गुन्हेगारांची यादी अदलाबदल.• 2007 – मोहम्मद हमीद अन्सारी भारताचे 12 वे उपराष्ट्रपती झाले.• 2008 – अभिनव बिंद्रा याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.🎂 जन्म :- • १८९७: बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन• १९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया• १९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे• १९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा• १९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा🌹 मृत्यू :- • १९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे• १९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर• २०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज• २०१३ : भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली• २०२२: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक प्रशासक, गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलगुरू - पद्मश्री जे. एस. ग्रेवाल• २०२२: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार बाबुराव पाचर्णे• २०२२: भारतीय पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार शिमोगा सुबन्ना• २०२२: भारतीय पटकथा लेखक रणजित पटनायक यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मन करा रे प्रसन्न*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा, 14 ऑगस्टपासून प्रवासाला सुरुवात, सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या 12 तासांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बेल्जियममध्ये गणेशोत्सवात होणार 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना, महाराष्ट्र मंडळाच्या पुढाकाराने पुण्यातून अडीच फुटांची मूर्ती बेल्जियमला रवाना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाभार्थ्यांकडून जादा रक्कम घेताल तर परवाना रद्द करणार, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांची आपले सरकार सेवा केंद्राला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लासूर स्टेशन :- दोन लाख भाविकांनी घेतले महारुद्र मारुतीरायाचे दर्शन, साडेतीन क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहारच्या मतदार यादीतून 65 लाख नावे वेगळली, निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रो गोविंदा सीझन 3 च्या चषकावर नागपूर निंजास् संघाने उमटवली विजयाची मोहोर, 75 लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कपमध्ये शुभमन गिलला टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता, लवकरच होणार संघाची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सतिश सोनवणे, संपादक, नांदेड 👤 निळकंठ चोंडे, शिक्षक नेते, नांदेड 👤 उमेश खोसे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकदत्ताहरी पाटील पवार 👤 याहीया खान पठाण, संपादक👤 आशिष देशपांडे, पत्रकार, नांदेड 👤 ओमप्रकाश कहाळेकर 👤 भास्कर कुमारे, धर्माबाद 👤 विलास सूर्यवंशी 👤 विशाल ढगे 👤 शरद सूत्रावे👤 साईप्रसाद मठपती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 49*अशी कोणते गोष्ट आहे जी आपल्याला फुकट मिळते**पण हॉस्पिटलला गेल्यावर विकत घ्यावी लागते ?**सांगा पाहू काय आहे .....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तहान ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेलच असे नाही, पण प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात 'इनोव्हेशन'मध्ये कोणता देश आघाडीवर आहे ?२) मानवी शरीरातील हृदयाच्या ठोक्याची संख्या किती असते ?३) देशातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली ?४) घटक राज्यांच्या बाबत धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याच्या अधिकार कोणाला असतो ?५) आम्ल म्हणजे काय ? *उत्तरे :-* १) अमेरिका २) ७० ते ८० ३) वडधामना ४) विधानसभा अध्यक्ष ५) आंबट चवीचे पदार्थ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *विजेचे उत्पादन व वाटप *📙 आपण अलीकडे क्वचित वर्तमानपत्रात वाचतो, 'काल साऱ्या महाराष्ट्रात वीज गेली होती.' आता मनात येते की, महाराष्ट्र तर एवढा मोठा, तिथे कितीतरी वीजकेंद्रे आहेत. औष्णिक आहेत, जलविद्युत आहेत, आण्विक आहेत. मग सगळीच्या सगळी बंद पडून अख्खा महाराष्ट्र अंधारात कसा जातो ? फार पूर्वी असे नव्हते. कोयनेची वीज मुंबईला जाई. भुसावळ कोराडीचे उत्तर महाराष्ट्राला जाई. तर पुण्याला स्वतःचेच वीजकेंद्र काम करत होते. या पद्धतीत त्या त्या गावापुरते वीजनिर्मिती पुरवठा करण्याचे काम सोपवलेले असे.पण ही पद्धत महागडी होती, अनिश्चित होती. गाव वाढेल, तसतशी ही पद्धत अपुरी पडत असे. मग तेथील पुरवठा नेहमीसाठीच कमी पडे.यावर उपाय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मोठी केंद्रे एकमेकांना प्रथम थेट जोडली गेली. याला 'इलेक्ट्रिक ग्रिड' किंवा 'विद्युतकेंद्रांची साखळी' असे म्हणतात. मग या साखळीतून पुढे प्रत्येक गावांकडे फाटे काढून पुरवठा केला गेला.आता समजा, तुम्ही एकमेकांचे हात धरून साखळीची शिवाशिवी खेळत आहात आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या पायात अडकला. सर्वच मुले बदाबद पडतात की नाही ? अगदी हाच प्रकार या ग्रीडमुळे वीजकेंद्राच्या बाबतीत होतो.एखाद्या केंद्रात काही बिघाड झाला की, ते बंद पडते. पण दुसऱ्याच्या पायात पाय घालून ते दुसऱ्यालाही ओढते. पण हा प्रकार येथेच थांबावा, यासाठी तात्काळ त्या केंद्राशी असलेला जोड आपोआप काम करण्याचे थांबवतो. याच पद्धतीत सर्व जोड काम करेनासे होतात. सर्व महाराष्ट्रात अंधार पडतो, तो असा.पण मूळ केंद्रातील बिघाड थोड्या वेळात दुरुस्त केला जातो. ते सुरू झाले की, ओळीने सर्व जोड पुन्हा काम करू लागतात. अंधारात विझत गेलेले जाळे पुन्हा उजेडात प्रकाशू लागते. संपूर्ण भारतात आता नॅशनल ग्रिडचे जाळे जोडले गेले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीहे भॊळ्या शंकरा …. शंकराहे भॊळ्या शंकरा ….. महादेवाहे भॊळ्या शंकरा ….. हे भॊळ्या शंकराबेलाच्या पानाचीहे भॊळ्या शंकरा – २ आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीहे भॊळ्या शंकरागळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळागळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा, लाविलेते भस्म कपाळाआवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीत्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती …. हॊ – २ त्रिशूल डमरू हाथी, संगे नाचे पार्वती – २ आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाचीभॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी …. हॊ – २ भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी, कुठे हि दिसे ना पुजारी – २ आवड तुला बेलाची – २ बेलाच्या पानाची••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सौंदर्याचा घमंड, संपत्तीचा मोह आणि इतर गोष्टीचा ज्याला जास्त प्रमाणात अहंकार असते ती, व्यक्ती एक दिवस मनात दु:खी असते. मात्र त्यावेळी आपले दु:ख कोणासमोर व्यक्त करू शकत नाही. त्याचे कारण असे की, जेव्हा सर्व काही त्याच्याजवळ असते त्यावेळी इतरांना तुच्छ लेखत असल्यामुळे कोणीच त्यावेळी जवळचे आपुलकीचे माणसे नसतात. म्हणून जी वस्तू शेवटपर्यंत आपली कायम राहू शकत नाही अशा गोष्टीच्या जास्त लोभात, मोहात पडू नये. कारण ते, एक दिवस दु:खाचे कारण बनत असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मूर्ख कोळी* एकदा एक चिमणी माशा मारून खात होती. ते पाहून एका कोळ्याला फार राग आला. त्याला वाटले, माशा मारण्याचा हक्क फक्त आपल्यालाच आहे म्हणून त्याने चिमणीभोवती जाळे विणण्यास सुरुवात केली. परंतु, ते तोडून चिमणी उडून गेली. ते पाहून तो म्हणाला, 'पक्षी धरण्याच्या भानगडीत मी उगाच पडलो. ते माझं काम नाही.'तात्पर्य - आपले सामर्थ्य किती आहे याचा विचार न करता कुठली गोष्ट करू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment