✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑगस्ट 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1ZkQKdjaYh/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🗓️ महत्त्वाच्या घटना :• १९०५: बंगालच्या विभाजनाविरोधात स्वदेशी चळवळीचा प्रारंभ झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचा टप्पा.• २०१५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केले.🎂 जन्म :• १८७८: जतींद्रनाथ मुखर्जी – क्रांतिकारक, 'बघा जतिन' म्हणून प्रसिद्ध.• १९४२: चेल्ला कुमार – भारतीय राजकारणी.• १९७५: चार्ली हूनॅम – इंग्रज अभिनेता ("Sons of Anarchy" प्रसिद्ध मालिका).🕯️ मृत्यू :• १९७४: वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय – क्रांतिकारक, सरोजिनी नायडू यांचे बंधू.• २०२०: बिक्रमजीत कंवरपाल – भारतीय अभिनेता आणि माजी सैन्य अधिकारी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त लेख*हातमाग उद्योगाला अच्छे दिन..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 120 नव्या वसतिगृहाची उभारणी, 25 हजार विद्यार्थ्यांना मिळणार निवासी सुविधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठ मोळी अभिनेत्री अमृता खानविलकरळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या 302 विशेष गाड्या जाहीर, मुंबई व पुणे येथून कोकणासाठी स्पेशल ट्रेन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - 15 व्या वित्त आयोगाची रक्कम ग्रामपंचायतींना देताना भेदभाव, जि. प.कडून पाठपुरावा तरीही सरकारकडून प्रतिसाद मिळेना‎*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तराखंड दुर्घटना- 5 जणांचा मृत्यू, 11 सैनिकांसह 100 हून अधिक जण बेपत्ता, 400 जणांना वाचवले; केरळमधील 28 प्रवाशी बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25 टक्के टॅरिफ लावले, भारतावर एकूण टॅरिफ आता 50 टक्के झाले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्ता डांगे, इसाप प्रकाशन, नांदेड 👤 श्रीनिवास मस्के, कवी व साहित्यिक, नांदेड 👤 रवींद्र चातरमल, फोटोग्राफर, धर्माबाद 👤 मंगेश पेटेकर 👤 तुकडेदास डुमलवाड 👤 मनोज रापतवार, धर्माबाद 👤 मोहन हडोळे👤 शिवाज्ञा साकोरे, दुगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 46*पाटील बुवा राम राम**दाढी मिशा लांब लांब ?**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - Keyboard••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अविरत उद्योग हा शांती- समाधानाचा अखंड पाया होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'दिशोम गुरु' असे कोणत्या आदिवासी नेत्याला ओळखले जाते ?२) नुकत्याच झालेल्या भारत - इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी मालिकेचा मालिकावीर पुरस्कार कोणी पटकावला ?३) 'परीक्षा पे चर्चा' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपक्रमात एका महिन्यात सर्वाधिक नागरिकांनी सहभाग घेतल्यामुळे कोणत्या रेकॉर्डमध्ये नोंद झाली ?४) 'वाडवडिलांकडून मिळालेली' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) रक्तातील ऑक्सिजनचे वाहकतत्व कोणते आहे ? *उत्तरे :-* १) शिबू सोरेन २) शुभमन गिल, भारत - ७५४ धावा हॅरी ब्रूक, इंग्लंड - ४८१ धावा ३) गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड ४) वडिलोपार्जित ५) हिमोग्लोबिन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕*पोलिओने पाय लुळा का होतो ?* 📕 पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात.पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बऱ्याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत रतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते.रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेक्शन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषत: पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेक्शन देऊ नये.पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वयअसताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते.पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कानडा राजा पंढरीचावेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||निराकार तो निर्गुण ईश्वरकसा प्रगटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा … || १ ||परब्रह्म हे भक्तांसाठीउभे थकले भिमेसाठीउभा राहिला भाव सांवयवजणू कि पुंडलिकाचा … || २ ||हा नाम्याची खीर चाखतोचोखोबाची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मावाली दामाजीचा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारांची देवाणघेवाण झाली की, संवाद वाढायला सुरूवात होते. त्यातून बऱ्याच अडीअडचणी, समस्या सुटत असतात. आणि एकमेकांना मदत होत असते. म्हणून एकमेकांच्या विचारांचा आदर करावा व स्नेहबंधनाचे धागे विणण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मधमाशी पोळे* एका चोराने एकदा बागेतली मधमाशांची पोळी चोरली. बागेच्या मालकाने येऊन पाहिले तो पोळी नाहीशी झालेली ! तेव्हा ती कोणी चोरून नेली असावीत याचा विचार करीत असतानाच बाहेर गेलेल्या मधमाशा, मध घेऊन तेथे आल्या व पोळी नाहीत असे पाहून यानेच आपली पोळी नेली असावीत. असे समजून त्यांनी एकदम त्या मालकावरच हल्ला चढवला.तेव्हा तो मालक त्यांना म्हणाला, 'अरे, कृतघ्न प्राण्यांनो ज्याने तुमची पोळी चोरून नेलीत त्याला तुम्ही सोडलंत. अन् मी जो तुमचा मालक, तुमची पोळी चोरीला गेल्याने तुमची आता काय व्यवस्था करावी या काळजीत पडलोय. तर तुम्ही मलाच नांग्या मारून दुखावता ? वा रे वा !'तात्पर्य - कधी कधी आपला खरा जो मित्र आहे त्यालाच शत्रू समजून आपण त्रास देतो. परंतु तसे करणे मूर्खपणाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment