✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जुलै 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय काविळ दिन_* *_ या वर्षातील २०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९९:भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड**१९९८:सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन**१९८४:अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७९:भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.**१९३४:पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.**१९३३:अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३३:सोविएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१८२१:पेरु या देशाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८३:धनुष्य -- चित्रपट अभिनेता**१९७९:प्रा.डॉ सावन गिरीधर धर्मपुरीवार-- कथाकार**१९७२:आयशा झुल्का-- भारतीय अभिनेत्री* *१९७२:डॉ.प्रसन्न शेंबेकर-- कवी* *१९६५:प्रा.डॉ.सुहासकुमार वामनराव बोबडे -- प्रसिद्ध लेखक समीक्षक संपादक* *१९५४:ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च २०१३)**१९४९:बाबा साळूबा भांड-- कादंबरीकार, बालवाङ्मयकार, प्रकाशक**१९३९:दलपत सावजी बोरकर-- कवी, लेखक* *१९३६:सर गारफिल्ड तथा ’गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक**१९३५:डॉ.अरविंद दत्तात्रेय लेले -- माजी आमदार तथा कवी,लेखक(मृत्यू:१३ मे २००६)**१९२९:लतामाई जीवनराव बोधनकर -- कवयित्री* *१९२७:बाबासाहेब उर्फ पांडुरंग ज्ञानदेव पाटील(बाबा पाटील)-- लेखक,संपादक* *१९२५:बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग-- हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक (मृत्यू: ५ एप्रिल २०११)**१९२५:डॉ.क्षमा लिमये -- कादंबरी, कथा, बालसाहित्य,चरीत्र इत्यादी क्षेत्रात लेखन (मृत्यू:१२ जानेवारी २००९)* *१९११:गणेश वासुदेव तगारे-- पर्यावरण रक्षक, संस्कृत पंडित, अनुवादक(मृत्यू:१९ नोव्हेंबर २००७)**१९०७:अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (मृत्यू:५ आक्टोबर १९८३)**१९०३:कृष्णाबाई हरी मोटे --कथालेखिका, कादंबरीकार,नाटककार(मृत्यू:१७ फेब्रुवारी १९९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:कुमकुम -- हिंदी चित्रपटांमधील ज्येष्ठ अभिनेत्री (जन्म:२२ एप्रिल १९३४)* *१९८८:राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या (जन्म: १९६२)**१९८१:बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)**१९७७:गोविंद परशुराम तथा ’पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ’अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ’घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक(जन्म:२६ डिसेंबर १९१०)**१९७५:राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २६ नोव्हेंबर१९२३)**१९७३:शंकर बाळाजी शास्त्री -- गीतकार (जन्म:४ आगस्ट १९०४)**१९६८:ऑटो हान – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ मार्च १८७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौथा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2870250936434995&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांची घोषणा, सर्वसामान्य जनता मात्र अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका सुरु होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 रातांधळेपणा म्हणजे काय ? 📕रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ'चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ'चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ध्येयाचा ध्यास लागला, म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा *राष्ट्रीय पक्षी* कोणता ?२) 'मोर' हा पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?३) 'मोर' हा पक्षी कशाचे प्रतिक आहे ?४) मोराच्या आवाजाला काय म्हणतात ?५) भारतातील/महाराष्ट्रातील एकमेव मयूर अभयारण्य कोठे आहे ?*उत्तरे :-* १) मोर २) २६ जानेवारी १९६३ ३) शांतता व सौंदर्य ४) केका / केकारव ५) नायगाव, जि. बीड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिगंबर जैर मोड, समराळा, धर्माबाद👤 बालू उपलेंचवार, धर्माबाद👤 बालाजी गुट्टे, किनवट👤 अंकुश व्ही. शिंदे, धर्माबाद👤 चंद्रकांत पिलाजी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••एखादी वस्तू असो किंवा एखादी व्यक्ती जर वरवर कितीही चांगली दिसत असली तरी त्यासारखी असतीलच असे नाही. म्हणून कधी, कधी त्यांच्या विषयी सर्व कळल्यानंतर आपोआप दृष्टीतून उतरून जातात व पुन्हा त्यांच्यावर विश्वास करणे होत नाही. यालाच म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून पुढे दिसणाऱ्या वस्तूला असो, किंवा व्यक्तीला चांगल्याप्रकारे निरखून बघावे व वेळात, वेळ काढून त्यांना वाचायला शिकावे. त्यांच्यात जे, काही चांगले वाईट गुण असतील ते, कळायला जास्त वेळ लागणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घामाचा पैसा*धन्नाशेटचा मुलगा राम खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला. तिसर्या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.' तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जुलै 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१२:लंडन येथे ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**२००१:सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, सार्वजनिक वाहने या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवनावर व थुंकण्यावर तसेच या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९९:द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने मंजूर केला.**१९८३:कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.**१९५५:दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.**१९२१:रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.**१८९०:डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडुन घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.**१७६१:माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४ थे पेशवे बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:प्रा.गंगाधर चेपूरवार -- कवी लेखक**१९७९:प्रसाद पुरुषोत्तम कुमठेकर -- लेखक, निर्माता,दिग्दर्शक**१९७३:गौरी एकनाथ शिरसाठ-- कवयित्री* *१९७२:संतोष श्रीधर महाडेश्वर-- कवी लेखक* *१९७२:छाया अजबराव वाढेकर-- लेखिका* *१९६९:जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स- निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू ,सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक व कोच* *१९६९:हणमंत पडवळ -- कवी* *१९६२:सुनीलकुमार वसंतराव सरनाईक-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९६०: श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री**१९५६:प्रा.राज यावलीकर -- सुप्रसिद्ध साहित्यिक,'खडू शिल्प' कलेकरिता राष्ट्रीय पुरस्कार* *१९५५:अॅलन बॉर्डर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५३:डॉ.अक्षयकुमार मल्हारराव काळे-- सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०१७ मध्ये डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५०:विश्व मोहन भट्ट-- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादक* *१९३९:आशा अरविंद बगे-- मराठीतील जेष्ठ सुप्रसिद्ध लेखिका* *१९३०:चंद्रकांत रामचंद्र वर्तक--कथाकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार(मृत्यू:११ जुलै २०१०)**१९२८:कृष्ण राघव घरोटे -- कवी, कथाकार**१९२८:उत्तमराव बळीराम राठोड-- माजी खासदार,संस्थापक(मृत्यू:७ मार्च १९९७)**१९११:डॉ.पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)**१९०७:वामनराव हरी देशपांडे-- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक(मृत्यू:७ फेब्रुवारी १९९०)**१८९२:नारायण विनायक कुलकर्णी-- मराठी नाटककार(मृत्यू:१८जानेवारी १९४८)* *१६६७:योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१ जानेवारी १७४८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *-२०१५: डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम-- भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७)'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रियता.(जन्म:१५ऑक्टोबर १९३१)-**२०१०:रवी बसवानी-- भारतीय चित्रपट अभिनेता(जन्म:२९ सप्टेंबर १९४६)**२००७:वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (जन्म: ३० जानेवारी १९१७)**२००२:कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)**१९९२:अमजद खान–हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक (जन्म:१२ नोव्हेंबर १९४०)**१९८०:मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (जन्म: २६ आक्टोबर १९१९)**१९७५:त्र्यं.र.ऊर्फ मामासाहेब देवगिरीकर – गांधीवादी नेते, खासदार. भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर करुन २६ जानेवारी १९५० रोजीच ते वाचकांच्या हातात देण्याचे काम त्यांनी केले.* *१८४४:जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तिसरा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2864596340333788&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठं कन्व्हेन्शन सेंटरचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *PM Kisan Yojana: प्रतीक्षा संपली ! 27 तारखेला 14व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोयना धरणाची पाणीपातळी वाढली; कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोळसा घोटाळा प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलीसभरतीमध्ये कंत्राटीकरण होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मलेशिया विरुद्ध चीन यांच्यादरम्यान झालेल्या T-20 सामन्यात सयाजरुल इद्रसने घेतले सात बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात.""आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले...."कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.*शिकवण* - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतंच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता ?२) भाषेच्या आधारावर सर्वात प्रथम कोणत्या राज्याची निर्मिती झाली ?३) जगात सर्वाधिक विश्वासार्ह कोण ?४) पहिला जागतिक इमोजी दिवस केव्हा साजरा केला गेला ?५) 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' हे प्रसिद्ध गाणे कोणी लिहिले ?*उत्तरे :-* १) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २) आंध्रप्रदेश ३) डॉक्टर ४) १७ जुलै २०१४ ५) गीतकार राजेन्द्र कृष्ण*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हणमंत पडवळ, साहित्यिक, लातूर👤 शशिकला बनकर, साहित्यिक, पुणे👤 स्वाती राधाकिशन बोधगमवार👤 कु. जयश्री विठ्ठल कोंदापुरे, भोसी👤 उत्कर्ष मादसवार, हिमायतनगर👤 श्रीकांत क्यादरवाड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा। उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे,कोणी आपल्याला काही सांगत असतील तर त्यांचे बोलणे किंवा त्यांचे विचार आपण शांतपणे ऐकून घ्यावे.पण, आपल्या मनाला काय वाटते ते, आपणच ठरवावे कारण बरेचदा असं होतं की,आपल्या मनाचे ऐकून,न घेता जेव्हा आपण दुसऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा जे, चांगले करायचे राहते तेही राहून जाते अन् बऱ्याच अडचणींचा सामना सुद्धा आपल्यालाच करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*टोपीवाला आणि माकडे*एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना तो थांबतो व झाडाच्या खाली जरा वेळ विश्रांती घेतो. तेव्हा तेथे झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोडया वेळाने, त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात. शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून निघून जातो. तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जुलै 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_कारगिल विजय दिवस_* *_ या वर्षातील २०७ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००८:अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.**२००५:मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.**१९९९:भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड**१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.**१९९८:१९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान**१९९४:सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ’राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९६५:मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५६:जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.**१८९१:फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.**१८४७:लायबेरिया स्वतंत्र झाला.**१७४५:इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.**१७८८:न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९८५:मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल**१९७२:जुगल हंसराज--भारतीय अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माता**१९७२:प्रा.मिलिंद गोविंदराव जोशी -- प्रसिद्ध लेखक संपादक,वक्ते* *१९६७:संजय अप्पाराव घाटगे-- कवी* *१९५५:असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष**१९५४:व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)**१९४८:सुमन लाघवे-- लेखिका* *१९४३:डॉ.शंतनू चिंधडे -- नेत्रतज्ज्ञ, सुप्रसिद्ध कवी,लेखक* *१९४३:डॉ.नीला चंदकांत पांढरे-- प्रसिद्ध लेखिका(मृत्यू:२६सप्टेंबर २०२१)**१९४०:प्रा.डॉ.प्रकाश केजकर देशपांडे-- कादंबरीकार,कवी,समीक्षक,प्रभावी वक्ते* *१९३४:दत्तात्रय पंढरीनाथ जोशी-- संपादक* *१९११:यशवंत दत्तात्रय भावे-- कवी (मृत्यू:७ नोव्हेंबर १९८७)**१९०२:यशवंत बाळकृष्ण मोकाशी-- कादंबरीकार (मृत्यू:१९८८)**१८९४:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (मृत्यू:३० मार्च १९६९)**१८९४:अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)**१८९३:पं.कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक.राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.(मृत्यू:२२ ऑगस्ट १९८९)**१८८९: बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता-- सर्वोदय विचाराचे प्रचारक, लेखक (मृत्यू:२१ जानेवारी १९८२)**१८७५:कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू:६ जून १९६१)**१८७०:गोविंद सदाशिव आपटे-- ज्योतिर्गणितज्ज्ञ(मृत्यू:२९ नोव्हेंबर १९३६)**१८६५:रजनीकांत सेन-- भारतीय कवी आणि संगीतकार(मृत्यू:१३ सप्टेंबर १९१०)**१८५६:जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (मृत्यू:२ नोव्हेंबर १९५०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०१५:बिजॉय कृष्णा हांडिक--भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म:१ डिसेंबर १९३४)**२००९:भास्कर चंदावरकर – संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६)**१९७२:उमाकान्त केशव आपटे उपाख्य बाबासाहेब आपटे--प्राचीन भारताच्या इतिहासावरील संशोधक (जन्म:२८ आगस्ट १९०३)**१९४४:प्रभाकर वासुदेव बापट-- वाड:मय इतिहासकार (जन्म:१७ फेब्रुवारी १९०२)**१८९१:राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक,भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दुसरा भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2858875857572503&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पूर प्रवर्तन क्षेत्रातील २८गावांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईतील अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली, चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये चार ते पाच फ्लॅटवर डोंगराचा ढिगारा; सुदैवाने जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी दिल्लीत आंदोलन; सुदर्शन नच्चिअप्पन समितीच्या शिफारशींनुसार आरक्षण देण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका, चंद्रपूरमध्ये गावांना पुराचा विळखा, तर वाशिममध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जगातला सर्वात मोठा रामाचा पुतळा आंध्र प्रदेशात ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली पायाभरणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या दिवशी पावसाचा ख्वाडा, दुसरा कसोटी सामना अनिर्णित, भारतीय संघाने 1-0 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧠 वेड्या माणसाच्या मेंदूत काय बिघाड होतो ? 🧠 वेडा म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर कपडे फाडणारी, दगड मारणारी, असंबद्ध बडबड करणारी व्यक्ती उभी राहते. एक तर आपल्याला तिची भीती वाटते किंवा किळस वाटते. आपण पाहिलेल्या अशा व्यक्ती म्हणजे वेडातील एक प्रकार आहे.मनोविकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही व्यक्तींनाच वरील लक्षणे असतात. इतर प्रकारांमध्ये भ्रमिष्टपणा, उन्माद, अतिनैराश्य हे गंभीर आजार; तर तणावग्रस्त मानसिकता, नैराश्य, हिस्टेरिया हे कमी गंभीर आजार यांचा समावेश होतो. याशिवाय सदोष व्यक्तिमत्त्व - जसे संशयी स्वभाव, घुमेपणा, आत्मकेंद्रीपणा, हट्टीपणा, परावलंबित्व, तसेच समाजविघातक कृत्य करण्याची प्रवृत्ती; हे देखील सौम्य प्रकारचे मनोविकार समजले जातात. काही व्यक्ती घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीनदा ओढून तर पाहतातच, पण थोडे अंतर गेल्यावर परत येऊन पाहतात. हा सुद्धा एक प्रकारचा मनोविकारच आहे. अंगात येणे, लैंगिक विकृती व व्यसनाधीनता; हे देखील मनोविकारच आहेत.वरील मनोविकार पाहिल्यावर आपल्याला साहजिकच असा प्रश्न पडतो की, या व्यक्तींच्या मेंदूत काही बदल होत असतील का ?आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात. त्या पेशी अनेक धाग्यांसारख्या तंतूंनी एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. एका पेशीतील संदेश दुसऱ्या पेशीपर्यंत जाण्यासाठी तर तंतूत असणारे रासायनिक द्रव्य व त्यातून जाणारा विद्युतसंदेश यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या रासायनिक पदार्थांचे प्रमाण कमी जास्त झाले किंवा विद्युतसंदेशात बिघाड झाला, तर मेंदूचे कामकाज बिघडते. अर्थात मेंदूच्या रचनेत काही बदल होत नाही.मानसिक विकारांची कारणे बघितल्यास त्यात अनुवांशिकता (विशेषत: गंभीर मानसिक विकार), मातापित्याचे प्रेम व वागणूक, घरातील वातावरण, सामाजिक आर्थिक परिस्थिती, व्यसने व शारीरिक आजार, मेंदूच्या आवरणाचा दाह, गुप्तरोग, अपघातात मेंदूला इजा होणे; यांचा समावेश होतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनरूपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे'* ही घोषणा कोणी केली ?२) 'मून मॅन ऑफ इंडिया' ही पदवी कोणाला देण्यात आली ?३) मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?४) 'आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान' हे प्रेरणादायी गीत कोणी लिहिले ?५) चांद्रयान - ३ कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आले ?*उत्तरे :-* १) आचार्य विनोबा भावे २) मायलसामी अण्णादुराई ३) इरिस ४) साने गुरूजी ५) सतीश धवन अंतराळ केंद्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल मदनुरकर👤 वैभव भोसले👤 रमेश मस्के*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा देव सन्नीध आहे। कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थोर संतांनी तसेच महापुरुषांनी आपल्या संदेशातून समानतेचा व जीवन जगण्याची शिकवण दिली. त्यांच्या शिकवणुकीतून जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. पण, खरंच आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालतो का..? हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून जीवन जगत असतांना निदान एकदातरी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहावे तरच जीवनाचे सार्थक होईल..त्यासाठी आधी त्यांना वाचणे गरजेचे आहे तेव्हाच ते कळत असतात नुसते फोटोला वंदन केल्याने ते,महाविभूती कळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. तिची लेक दुसर्या गावाला रहात होती. रस्त्यांत मोठे जंगल होते. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुशार. ती म्हणाली, 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग तू मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला, 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग तू मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली, 'चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्यावर भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.तात्पर्य :- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचन विकास भाषिक उपक्रम http://www.pramilasenkude.blogspot.com विषय - मराठीशब्द वाचूया, शब्द लिहूया.✍🌺शब्दटोपली क्र. (७)🌺शेत, रेषा, पेढा,भेळ,मेघ, नवे, वेड, फळे,पाने, फुले देश,पिके , वेळ,असे , कसे, दिसे, नसे,रेघ,पेटी, चिञे,आहे, बेडूक, शेवटी,घेऊन, रेडकू,शेपटी, रूपेरी,रुपये, माणसे, करणे,पहाटे,दिलेले,दिलेली,दिलेला, असते, नसते, नसेल, साजरे,वेगाने , पिवळे,माकडे ,भेटला ,भेटले ,भेटून ,विशेष,केवळ ,खेकडा,घेतले,चेहरा ,जेवण ,टेबल ,ठेवला ,ठेवले ,ठेवणे,तेथील ,तेथून ,देणार,नेहमी ,पेपर,लेखक ,लेखन ,लेखात ,बेरीज ,वेगळे ,वेगाने ,वेगळा ,शेजारी ,शेअर ,शेतात ,शेतावर , शेतातील,दिसणारे, भातशेती, पलीकडे , अलीकडे, मदतीने, शेतकरी,बसलेले,तेलकट , सगळीकडे, विरघळलेले , विरघळणारे, चिकटलेले, आतबाहेर,देखभाल,देखरेख, नातेवाईक,ज्ञानदेव. ---------------------------✍संकलन लेखन प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जुलै 2023💠 वार - मंगळवार•••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०६ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००७:भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी**१९९९:लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.**१९९७:के.आर.नारायणन भारताचे १० वे, पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.**१९९७:इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड**१९९४:इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त**१९९२:स्पेनि,मधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८४:सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.**१९७८:जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.**१९१७:कॅनडात आयकर लागू झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९९२:सचिन जगन नांगरे -- कवी* *१९८३:संतोष ग्यानिदास गेडाम-- कथाकार, कवी* *१९६९:राजेश कुबडे उर्फ शेषराव अमृतराव कुबडे -- कवी,लेखक* *१९५८: महेन्द्र शामकांत देशपांडे -- पत्रकार, संपादक,लेखक आणि प्रकाशक* *१९५४:दिनेश केसकर-- बोईंग कमर्शियल एअरप्लेन्सचे एशिया-पॅसिफिक आणि भारतातील विक्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष* *१९४९:बकुळ पंडित-- मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री**१९३४:दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- मराठी साहित्यातील ख्यातनाम समीक्षक आणि ललितनिबंधकार.(मृत्यू:२७ जानेवारी, २०१६)* *१९३१:निळू फुले(निळकंठ कृष्णाजी फुले)-- मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते(मृत्यू:१३ जुलै २००९)**१९२९:सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे माजी सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते(मृत्यू:१३ आगस्ट२०१८)**१९२२:विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – सुप्रसिद्ध कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)**१९१९:सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – सुप्रसिद्ध गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)**१९१७:सदाशिव शंकर देसाई-- विख्यात साहित्यिक,पत्रकार आणि इतिहास संशोधक.(मृत्यू:३१ मे १९९६)**१८८७:नागेशशास्त्री गणेशशास्त्री नवरे-- कवी**१८७५:जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)**१८३२:करसनदास मुळजी -- भारतीय पत्रकार(मृत्यू:२८ ऑगस्ट १८७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०१५: रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई-- दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते,बिहार,सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल (जन्म:३० ऑक्टोबर १९२९)* *२०१२:बी.आर.इशारा–चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक(जन्म:७सप्टेंबर१९३४)**१९७७:कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक(जन्म:२५ एप्रिल १९००)**१८८०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)**_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मो: 9822695372 chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दीर्घकथा - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणारी कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------https://m.facebook.com/story.php?story_fbid=2854662371327185&id=100003503492582&mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत; अर्थमंत्री अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज, चालू आर्थिक वर्षासाठी 8.15% व्याजदराला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 21 हजार कोटी बुडाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशातील दरडोई उत्पन्नाची राज्यनिहाय यादी केंद्र सरकारने केली जारी, तेलंगणा प्रथम तर दुसऱ्या स्थानावर कर्नाटक, महाराष्ट्र चौदाव्या स्थानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पोर्ट ऑफ स्पेन कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कारगिल विजय दिवस*कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे. श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण ६० दिवस चालले. युद्धात ३०,००० भारतीय सैनिकांनी लढाई केली. ५५७ सैनिक मृत्युमुखी पडले, १३६३ जखमी झाले.लढाई आधीच्या पहिल्या तीन आठवड्याच्या अभ्यासाकरिता भारतीय हवाई सेनेच्या ३०० विमानांनी ६,५०० उड्डाणे केली. प्रत्यक्ष युद्धात मिग-२१, मिग-२३, मिग-२५, मिग-२७, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० ही विमाने आणि एमआय-१७ हे हेलिकाॅप्टर यांचा सहभाग होता. एकूण विमानांमध्ये १२०० लढाऊ विमाने होती. सर्वात जास्त काम वेस्टर्न कमांडच्या विमानांनी केले. त्यांनी ६,५०० टन दारूगोळा, पाणी आणि अन्य मालाची वाहतूक केली.कॅप्टन बत्राने ७ जुलै १९९९ रोजी कारगीलजवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टाॅप म्हणतात.कारगील युद्ध स्मारक हे भारतीय सैन्यदलाने द्रास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर टायगर हिलच्या दिशेने उभारलेले स्मारक आहे. हे तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी आहे. हे स्मारक श्रीनगर-लेह मार्गावर (`राष्ट्रीय महामार्ग क्र. १ डी'वर)आहे. स्मारकातील भिंतीवर कारगील युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची आणि सैन्याधिकाऱ्यांची नावे कोरली आहेत. दरवर्षी या स्मारकात २६ जुलै हा दिवस कारगील हुतात्म्यांचा स्मरणदिवस म्हणून पाळला जातो.कारगीलला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. जेथे पाकिस्तानने बॉंंब फोडले होते तेथे आज एक कारगिल हाईट्स नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलात एक जुना बंकर ग्राहकांच्या विलोकनार्थ शाबूत ठेवला आहे. (असे बंकर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीनंतर लडाखच्या प्रत्येक घरात बनले होते.) लोकांनी मागणी केल्यावरून 'लडाख हिल डेव्हलपमेन्ट काऊन्सिल' अस्तित्वात आले. त्यामुळे आता कारगीलमध्ये ४०हून अधिक हाॅटेले झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या घरांतही राहण्याची सोय होते. कारगीलला सन २०१६ या वर्षात ४२ हजार, २०१७मध्ये ६७ हजार तर २०१८ या एकाच वर्षात एक लाख सात हजार पर्यटकांनी भेट दिली.२६ जुलै २०१९ या दिवशी कारगील युद्धाला वीस वर्षे झाली. त्याच्या एक दिवस आधी जम्मू ॲन्ड कश्मिर रायफल्सच्या १३व्या बटालियनची एक बाईक रॅली उत्तराखंडातील दर्रापासून सुमारे १८५० किलोमीटरचा प्रवास करून २१ दिवसांनी लडाखमधील द्रासला पोचली. शेफ संजीव कपूर यांनी सैनिकांसाठी खास तिरंगी खीर बनवली होती. सर्व सैनिकांनी व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र भोजन केले. जवानांच्या हौतात्म्यावर भारतीय सेनेने ८.२४ मिनिटांची एक शाॅर्ट फिल्म जारी केली. त्याअगोदर कारगिल ट्रिबूट गीत गायले गेले व वाजवण्यात आले. गीताचे बोल होते, 'वीर जवानों, तुम्हें न भूलेगा तुम्हारा हिंदुस्तान!'*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्याच्या किरणांनी कमळे फुलतात, त्याप्रमाणे आईच्या मायेनं जीवन कळ्या फुलतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'भारताची रॉकेट वूमन'* म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' हे प्रसिद्ध गाणे कोणत्या चित्रपटातील आहे ?३) विम्बल्डन चॅम्पियनशिप - २०२३ पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला ?४) UPI चा full form काय आहे ?५) 'जागतिक इमोजी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) रितू करिधाल, ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ २) सिकंदर - ए - आजम ३) कार्लोस अल्काराज ४) Unified Payments Interface ५) १७ जुलै*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ कामीनवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 रामकुमार चिलकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्यामकुमार चिलकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक, केशव प्रा. शाळा धर्माबाद👤 लक्ष्मण सुरकार, सहशिक्षक, भोकर👤 प्रा. संगीता भालसिंग, साहित्यिक, अहमदनगर👤 संगीता चाके-मोहनकर👤 ऋचाली चंदेल बयास, संगमनेर👤 गंगाधर मंगरूळे👤 गोविंद मानेमोड, तळणी, बिलोली👤 गजानन महाजन, बिलोली👤 संतोष श्रीखंडी👤 नरेंद्र राठोड, सुरत, गुजरात👤 साईनाथ भोरे, कुंडलवाडी👤 ज्ञानेश्वर पाटील, अंमळनेर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस बोलता, चालता, समजदार,सुशिक्षित प्राणी असताना सुध्दा एक,एक सेंकदाला कितीतरी पाप करत असते.तरीही त्याची थोडीही त्याला कल्पना नसते तरीपण स्वत:ला मोठा समजत असते हे, किती विचित्र आहे...? त्यापेक्षा मुके प्राणी एकवेळचे बरे म्हणायला काहीच हरकत नाही. निदान माणसानी एवढेही पाप करू नये की, माणसाचे जीवनच व्यर्थ होऊन जाईल...आपण माणूस प्राणी आहोत आपला जन्म कशासाठी झालेला आहे याची थोडीतरी जाणीव ठेवावी.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलवायला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनात आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण बदल्यात तु मला तुझे डोळे दे.' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस का?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. शेवटी व्यापारी म्हणाला, 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस? कष्ट कर पैसे मिळव'.तात्पर्य :- आपल्या शरीराची किंमत आपण स्वतः जाणून घ्यावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०५ वा दिवस आहे_* *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.**२०००:विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.**१९९८:परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय**१९९७:माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान**१९९७:ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९१:अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला.**१९६९:सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.**१९४३:दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा - दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.**१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.**१८२३:चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* *१९८५:पंकज अडवाणी-- भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू* *१९७६: सप्तर्षी अ.माळी-- लेखक* *१९६९:जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका**१९६४:विष्णू सूर्या वाघ -- कवी लेखक तथा गोवा विधानसभेचे माजी सभापती* *१९४९:माधव अनंत विद्वांस-- लेखक* *१९४७:जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज**१९४५:अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन**१९३७:मनोज कुमार( हरिकृष्ण गोस्वामी )-- भारतीय अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक,गीतकार आणि संपादक**१९३२:प्रा.मधुकर तोरडमल-- मराठी अभिनेते,लेखक(मृत्यू:२ जुलै २०१७)**१९२९:बाळ जगन्नाथ पंडित-- क्रिकेट समालोचक, लेखक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०१५)**१९२८:केशुभाई पटेल – गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य(मृत्यू:२९ ऑक्टोबर, २०२०)**१९१७:दि.य.देशपांडे-- महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ तत्त्वज्ञ व प्राध्यापक(मृत्यू:३१ डिसेंबर २००५)**१९११:अमल ज्योती तथा ’पन्नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (मृत्यू: २० एप्रिल १९६०)**१९११:गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी(मृत्यू:२१ नोव्हेंबर २००२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* *२०२१:सतीश काळसेकर-- लोकप्रिय कवी, संपादक, अनुवादक(जन्म:१२ फेब्रुवारी १९४३)* *२०१४:वसंत विठ्ठल गाडे-- संघटक, संस्थापक(जन्म:२७ जानेवारी १९२७)* *१९८०:अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म:३ सप्टेंबर १९२७)**१९८०:पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)**१९७४:सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१)**११२९:शिराकावा – जपानी सम्राट *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7344359092247109/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 148 मंडळांमध्ये अतिवृष्टी; सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची हजेरी.. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे सरकारचे आदेश .. संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला..*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे ; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क, कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांशी गैरवर्तन केले जात आहे'; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली चिंता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सिराजने अर्धा संघ तंबूत पाठवला, कॅरेबिअन आर्मीची 255 पर्यंत मजल, भारताकडे 183 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *दातांवरून माणसाचे वय काढता येते का ?* 📙 काही वेळेस मृत्यूनंतर विशेषतः गुन्ह्याच्या तपासात मृत व्यक्तीचे वय किती आहे हे सांगावे लागते. त्यासाठी मृत व्यक्तीचे हाडे, दात यांचा उपयोग होतो. दातांचे दोन प्रकार आहेत. दुधाचे दात आणि कायमचे दात यांच्यामध्ये फरक असतो. दुधाचे दात येऊन ते पडून कायमचे दात येण्याच्या पद्धतीला एक विशिष्ट क्रम असतो. विशिष्ट वयात हे दात येत असतात आणि पडत असतात. जसे ३ वर्षांपर्यंतच दुधाचे सर्व दात येतात. कायमच्या व दुधाच्या दातांच्या रंगांमध्ये, आकारांमध्ये फरक असतो, त्यामुळे यावरून वय सांगता येते. २५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीचे वय यावरून काढता येते. या वयापर्यंत कायमचे सगळे दात आलेले असतात. वय काढण्यासाठी दातांच्या एक्सरेचाही उपयोग होतो. क्ष- किरण तपासणीने दातांच्या मुळाचे कॅल्सिफिकेशन झालेले आहे की नाही ते समजते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीस अक्कलदाढ आलेली नाही पण हिरड्यात त्याच्या मुळाचे कॅल्सिफिशन झालेले क्ष-किरण परीक्षेत दिसल्यास त्या व्यक्तीचे वय सत्तरच्या पुढे आहे, हे नक्कीच ठरते. काही वेळेस एकदम अचूक वय काढावे लागते. अशा वेळेस सूक्ष्मदर्शकाखाली दातांचा छेद घेऊन तपासणी केली जाते. दातावरील निर्माण झालेल्या आडव्या रेषांवरून वय काढले जाते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची दारे सर्वत्र आहेत, गती आणि प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोंबडीच्या अंड्यातील *पिवळ्या भागाला* काय म्हणतात ?२) कोंबडीच्या एका अंड्यात किती प्रोटीन ( प्रथिने ) असते ?३) अंड्यामध्ये सर्वात जास्त कोणता घटक असतो ?४) कोणत्या प्राण्याच्या अंड्यामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात ?५) चिकन अंड्याचे कवच कशाचे बनले असते ?*उत्तरे :-* १) बलक २) ६ ग्रॅम प्रथिने ३) प्रथिने ४) हंस ( १९.९७ ग्रॅम ) ५) CaCo3 ( कॅल्शियम कार्बोनेट )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 विठ्ठल सटवाजी कोंदापुरे, भोसी. ता.बिलोली👤 संतोष मुलकोड, LBS कॉलेज, धर्माबाद👤 संतोष लवांडे, सहशिक्षक, कर्जत👤 राजेश पाटील मनुरकर👤 विष्णू रामोड, धर्माबाद👤 सचिन टेकाळे, कुपटी, माहूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक पण, आपल्या मताप्रमाणे न होता क्षणातच ते,वेगळे झालेले बघायला मिळते. त्या विषयी आपण कल्पना सुध्दा करू शकत नाही. म्हणजेच आपल्या पेक्षा कोणीतरी दुसरा असते हे सर्व घडवून आणणारा व बघत राहणारा ती म्हणजेच नियती होय. ती कधी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून असे कोणतेच व्यर्थ काम करू नये की, आपल्याला दु:खात बुडण्याची वेळ येईल शेवटी सत्य हे अंतिम सत्यच असते आपण त्याचाच पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने स्वीकार करावा.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपकाराचे स्मरण*एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.' तात्पर्य : माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.**१९७७:चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.**१९४४:पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.**१९४२:वॉर्सा मधुन ज्यूंना हद्दपार करणे सुरू झाले.**१९३३:विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.**१९३१:फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे 'हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.**१९०८:’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९७०:देवेंद्र गंगाधर फडणवीस-- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री* *१९६९:संजय सुक्रीतदास बर्वे-- प्रसिद्ध लेखक* *१९६६:डॉ.नानासाहेब सूयवंशी-- लेखक, संपादक* *१९६६:विद्या शिशशेखर शिंदे-- लेखिका* *१९६५:सारंग शंतनू दर्शने-- वरिष्ठ सहसंपादक म.टा.मुंबई,लेखक,अनुवादक* *१९५९:अजित अनंतराव पवार-- महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री**१९५०:प्रल्हाद आवळसकर -- प्रसिद्ध लेखक* *१९३७:वसंत रांजणे–मध्यमगती गोलंदाज(मृत्यू: २२ डिसेंबर २०११)**१९३१: शकुंतला विष्णू गोगटे-- कथा व कादंबरी लेखिका (मृत्यू:५ नोव्हेंबर १९९१)**१९२५:गोविंद श्रीपाद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक(मृत्यू:२१ मार्च २०१७)**१९२३:मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – सुप्रसिद्ध पार्श्वगायक.(मृत्यू:२७ ऑगस्ट १९७६)**१९१८:गोपाळराव बळवंतराव कांबळे(जी. कांबळे)-- नावाजलेले मराठी चित्रकार(मृत्यू :२१ जुलै २००२)**१९०८:भालचंद्र मोरेश्वर गोरे-- लेखक, अनुवादक* *१८९८:पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक (जन्म:२आक्टोबर१९४६)* *२०१८:सुधा नरवणे-- आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका(जन्म:१४ सप्टेंबर १९३०)**२०१५:यशवंत कानिटकर-- मराठी भाषातज्ज्ञ, मुंबईतील सचिवालयात भाषासंचालक(जन्म:१२ डिसेंबर १९२१)* *१९९५:हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १४ नोव्हेंबर१९०४)**१९८४:गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक (जन्म: १९०९)**१९१८:इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (जन्म: २ डिसेंबर १८९८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7335079603175058/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईसह राज्यात सर्वदूर पावसाचं थैमान. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी शाळेला सुट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीतील गरीब कुटुंबांना केजरीवाल सरकार देणार मोफत साखर; 2.80 लाखांहून अधिक लोकांना मिळणार लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 7480 मेगावॉटवरुन 22840 मेगावॉट होईल : मंत्री जितेंद्र सिंह*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याने खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य शासनाने क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा; सत्यजीत तांबेची विधान परिषदेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *500 व्या सामन्यात कोहलीची विराट कामगिरी, कसोटीतील 29 वे शतक ठोकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *तोंडाला दुर्गंधी का येते ?* 📒ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चिपको आंदोलनाचे जनक कोण ?२) निसर्गऋषी सुंदरलाल बहुगुणा यांनी कोणत्या आंदोलनातून वृक्ष संवर्धनासाठी चळवळ उभी केली ?३) भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या देशाच्या घटनेच्या प्रस्तावनेने प्रेरित केली होती ?४) सध्या भारताबाहेर कोणत्या देशात UPI प्रणालीचा वापर सुरू आहे ?५) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?*उत्तरे :-* १) सुंदरलाल बहुगुणा, निसर्गऋषी २) चिपको आंदोलन ३) अमेरिका ४) सिंगापूर ५) मुख्य सचिव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय कदम, पत्रकार, धर्माबाद👤 महेश जाधव बिजापूर👤 अनुराधा हवेलीकर पदमे👤 श्रीनिवास वाघमारे👤 संतोषकुमार दुरगुडे👤 संतोष जाधव👤 पद्माकर गोपाळराव मुळे👤 अमोल बबनराव गायकवाड👤 धनराज वाघ👤 विश्वनाथ चित्रलवार👤 दामोदर साळुंके👤 सुमंत भांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी👤 प्रल्हाद तुमेदवार, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण बघितलेले एखादे स्वप्न योगायोगाने पूर्ण झाले की,आपला आनंद गगणात मावेनासा होतो व आपल्याला तसेच स्वप्न बघण्याची वारंवार सवय लागत असते.एखादेवेळी ते,स्वप्न एखाद्या वेळात पूर्ण झाले नाही तर , दु:ख होत असते. म्हणून नको त्या गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा आपल्याला नेमकं काय करायचं आहे त्याकडेच लक्ष द्यायला पाहिजे. वारंवार स्वप्न बघणे वाईट नाही. ते पूर्ण करण्याची जिद्द आपल्यात असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ मोठे असते*"वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खडयात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिल्लाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठया खडयात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*वाचन विकास भाषिक उपक्रम* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚 विषय - मराठी* शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (५)🌺* *कुणी,गुण ,गुरू ,चुल,जुना, सुई, रुई, जुडी,तुर, पुल,बुध,मुग,युती,रूप ,रूढ,शुभ ,सुरू , पुरी, दुपारी , फुगा, युग,हुशार ,हुशारी ,गुलाम,जुनाट ,जुळणी ,कोकरू, चुकल, बाहुली, फुल, सुटला, मुलगा, तुला, दुसरी, सुरई , बुटका, दुपार, हुरडा, दुकान, झुरळ, गुलाब, खुशाल, घुबड, रुपया, भुवई, भुवन, उजवा, डुलकी, तुळस, सुकी, खुराडा, कुत्रा, खाऊन, येऊन, घेऊन जाऊन, धुऊन,खुलासा,घुमत ,घुसला ,चुकीची,जुलमी ,तुमची ,दुसरा ,नुसता,पुढील, फुकट ,भुकटी,मुलगा,मुळीच,मुलाला,शुगर, टुणुक टुणुक , सुगावा,भुरभुर,सुरूवात,हुकुमशाही ,सुगरण, मुसळधार, खुदकन, नुकसान, कुरकुरीत, चुरचुरीत, खुळखुळा,टुणटुणीत, बुधवार, गुरुवार, सुरळीत, युवराज.* --------------------------- --------------------------✍️संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००२:जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.**१९८३:अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.**१९७६:आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या**१९६०:सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.**१९४४:२० जुलै १९४४ रोजी अॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.**१८३१:बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: सचिन रघुनाथ गांगुर्डे -- कवी, लेखक**१९७१:गणेश रत्नाकर मतकरी -- प्रसिद्ध लेखक,समीक्षक,चित्रपट पटकथा लेखक* *१९६६:श्रीधर नांदेडकर --लेखक,कवी* *१९५७:राजेंद्र यशवंत वैद्य -- लेखक* *१९५४:सुचित्रा मधुकर कातरकर -- कवयित्री, लेखिका* *१९४९:सुधा मधुसूदन जोशी-- कवयित्री, गायिका* *१९४८:डॉ जयश्री तोटे-- लेखिका,कवयित्री**१९४८:प्रा. केशवराव वसेकर -- लेखक, कवी, समीक्षक**१९४७:चेतन चौहान –माजी सलामीचे फलंदाज, आणि राज्यसभा सदस्य(मृत्यू:१६ आॅगस्ट २०२०)**१९४४:अँड.शालिनी पुरी -- कवयित्री**१९३९:प्रा.विनता गद्रे-- कवयित्री* *१९३४:चंदू बोर्डे – माजी क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष**१९३३:माधवी रणजित देसाई--कवयित्री, कथा,कादंबरीकार(मृत्यू:१५ जुलै २०१३)**१९३२:डॉ.उषा जोशी (भोसेकर)-- लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासक* *१९३०:डॉ.रा.चिं.ढेरे – सांस्कृतिक संशोधक(मृत्यू:१ जुलै २०१६)**१९२०:आनंद बक्षी – गीतकार (मृत्यू: ३० मार्च २००२)**१९१०:वि.स.पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)**१८९९:अर्नेस्ट हेमिंग्वे–नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक(मृत्यू:२ जुलै १९६१)**१८५३:शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००९:गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ५ मार्च १९१३)**२००१:विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)**१९९५:सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ )**१९९७:राजा राजवाडे – साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६)**१९९४:डॉ.र.वि.हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्मय समीक्षक, मराठी बखर वाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक(२५ सप्टेंबर १९१५)**१९९१:पं.बसवराज राजगुरू-- कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक(जन्म :२४आगस्ट १९१७)**१९७२:जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सातवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7333252366691115/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालं आहे. त्यातच अनुचित काही घडू नये म्हणून पुण्यातील दुर्गम भागातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सुजित पाटकर आणि डॉ किशोर बसुरेंना कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रायगड :- इर्शाळवाडीत दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली; 19 जणांचा मृत्यू, 98 जणांना वाचवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीवर बंदी; दर वाढ झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटला, राख आणि चिखल शेतात पसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाड्यातील 1023 गावांना बसू शकतो पुराचा फटका ; सर्वाधिक पूरप्रवण गावे नांदेड जिल्ह्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज 100 व्या ऐतिहासिक कसोटी सामना 20 जून पासून सुरुवात, किंग विराटचा 500वा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लाय डिटेक्टर* 📙नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो.या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो.श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो.लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिस्त, कार्यक्षमता आणि तत्परता या तीन गोष्टी वाढल्यानंतरच कर्तबगारी वाढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच फ्रान्सचा कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले ?२) विम्बल्डन चॅम्पियनशिप २०२३ महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला ?३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात 'वंदे मातरम्' हे गीत प्रथम गायले गेले ?५) महाराष्ट्राचे कृषीमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑनर २) मार्केटा वोंड्रोसोव्हा, चेक प्रजासत्ताक ३) सुरवंट ४) सन १८९६ ५) धनंजय*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजीव गंजगुडे, अध्यक्ष, शिक्षक परिषद, बिलोली👤 वृषाली शिंदे, साहित्यिक, ठाणे👤 चिंतामणी जाधव, साहित्यिक, मुंबई👤 श्रीकांत कांता विनायकराव👤 शशी खंडाळकर, पुणे👤 कवयित्री सोनाली चंदनशिवे👤 शिवराज मोरडे, नांदेड👤 विजय वाठोरे, साहित्यिक, सरसम हिमायतनगर👤 रविकांत कुलकर्णी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या वाटा जरी वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी सर्वांना एकच मुख्य रस्ता असतो आणि त्याच रस्त्याने एक दिवस प्रत्येकाला जावे लागते व त्या,मुख्य रस्त्याने जाणाऱ्याला शेवटी कोणीही अडवू शकत नाही. हे सत्य आहे याची जाणीव असू द्यावे. निदान माणुसकीच्या नात्याने तरी कोणाच्याही वाटेत काटे, कंकर पेरू नये व आपल्या जीवनाला नको ते वळण देऊ नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाल्याचा वाल्मीकी झाला*पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो, रानात एक मार्गातून येणार्या-जाणार्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनींना वाईट वाटले. वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला, तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल. ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले, ''अरे, तू हे पाप का करतोस? लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे.'' त्यावर वाल्या कोळी म्हणाला, ''मी हे पाप माझ्या बायका-मुलांना खायला-प्यायला मिळावे म्हणून करतो.'' तेव्हा नारदमुनी म्हणाले, ''तू त्यांच्यासाठी करतोस, तर मग जा. त्यांना विचार की, मी पाप करून सगळे तुम्हाला देतो. तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का?'' वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका-मुलांना विचारले. तेव्हा ती म्हणाली, ''तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही. तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळविता, तर त्याचे पाप तुम्ही भोगा.'' हे ऐकल्यावर वाल्या कोळ्य़ाला वाईट वाटले. आपण एवढी वर्षे निरपराध लोकांना फार त्रास दिला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप झाला. तो लगेच नारदमुनींना शरण गेला आणि म्हणाला, ''आपण मला क्षमा करा. या घोर पापातून मला मुक्त करा.'' तेव्हा नारदमुनी प्रेमाने म्हणाले, ''वाल्या, तुला पश्चात्ताप होतोय ना? आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू 'राम राम' असा नामजप कर. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस. मी लगेच जाऊन येतो,'' असे म्हणून नारदमुनी गेले. आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला. त्याला 'राम राम' असे म्हणता येत नव्हते; म्हणून तो 'मरा मरा' असा नामजप करायचा; पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता. असे करता करता एक दिवस गेला, चार दिवस गेले, एक आठवडा झाला, तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता. १ मास, २ मास असे करत करत वर्षे झाली; पण नारदमुनी आले नाहीत; पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता. तो ज्या रानात बसला होता, तेथे वाल्या कोळ्य़ाच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारूळ बनविले, तरीही वाल्या कोळी उठला नाही. हळूहळू वाल्याचे सगळे शरीर मुंग्यांच्या वारुळाखाली झाकले गेले. त्याने मनाशी निश्चय केला होता की, नारदमुनींनी सांगितलंय ना? ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार. असे न खाता-पिता शेकडो वर्षे नामजप करणार्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, ''मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे. तुझे सगळे अपराध मी क्षमा करतो. तू आता वाल्या कोळी नाहीस. आजपासून वाल्मीकी ऋषी आहेस. असे म्हणून देवाने त्याला आशीर्वाद दिला.'' याच वाल्मीकी ऋषींनी 'रामायण' लिहिले. वाल्मीकी ऋषी फार प्रेमळ होते. तात्पर्य : संगतीमुळे आपण चांगले बनतो; त्यामुळे नेहमी आपण चांगल्याच मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷 *जागर श्यामच्या कथांचा* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शालेय मुलांसाठी संस्करक्षम मालिका भाग - चौथा पुण्यात्मा यशवंतAudio Link ........https://drive.google.com/file/d/16FnXL-lMSiaFUe9r8FAM38ItKzTUKTs4/view?usp=drivesdkअभिवाचन निर्मिती :- श्री राजेंद्र जोशी, छ. संभाजीनगरअभिवाचन :- सौ. अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी, छ. संभाजीनगर••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर**१९७६:मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच व्हायकिंग -१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.**१९७३:केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.**१९६९:अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.**१९६०:सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाचीन जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख बनल्या.**१९५२:फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.**१९४९:इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.**१९४४:दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला.**१९२६:मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.**१९०८:बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.**१९०३:फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली.**१८७१:ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.**१८२८:'मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.इंद्रकला प्रीतमलाल बोपचे-- कवयित्री,लेखिका**१९८०:ग्रेसी सिंग-- भारतीय अभिनेत्री* *१९७९:रत्नकुमार निंबाजी गोरे -- कवी* *१९६७:मानसी किरण देशमुख-- कवयित्री, लेखिका* *१९५३:प्रा.श्रीरंग चोखोबा तलवारे -- लेखक**१९५२:प्रा.गणेश निवृत्ती आवटे-- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९५०:नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक**१९५०:रंगनाथ गबाजी पठारे-- कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक**१९४७:प्रा.मुरलीधर महादेव सायनेकर-- लेखक* *१९३८:कर्नल डॉ.नारायण जयरामराव देशमुख -- कादंबरी, कथा लेखन करणारे लेखक* *१९२९:राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै १९९९)**१९२३:विठ्ठल गोपाळ खोबरेकर-- भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार(मृत्यू:२००७)**१९१९:सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)**१९२१:पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.(मृत्यू: ३१ मे १९९४)**१९१९:सुरेंद्र शिवदास बारलिंगे--कथाकार, कादंबरीकार, तत्त्वचिंतक, ललितलेखक(मृत्यू:१९ डिसेंबर १९९७)**१८३६:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५)**१८२२:ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)**१९७३:ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)**१९७२:गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)**१९६५:बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)**१९५१:अब्दूल्ला (पहिला) – जॉर्डनचा राजा (जन्म: फेब्रुवारी १८८२)**१९४३:वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२)**१९३७:गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पाचवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7327232550626430/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची हजेरी, 'एसडीआरएफचे' जवान तळ ठोकून*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकच्या भाजप शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून नवी टीम जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आशिया चषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर ; भारत-पाकिस्तान 02 सप्टेंबर रोजी येणार समोरासमोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 11 कर्मचाऱ्यांना अटक, रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asia Cup 2023 : भारता ए संघाचा पाकिस्तान ए संघावर 8 विकेटने विजय; हंगरगेकरचा भेदक मारा, साई सुदर्शनचे दमदार शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *केस का गळतात ?* 📕केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिओस्कार या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वाधिक लोकप्रिय *इमोजी* कोणता ?२) इमोजी पेडियाचे संस्थापक कोण आहेत ?३) 'इमोजी' या शब्दाचा अर्थ काय आहे ?४) 'इमोजी' शब्दाचे मूळ कोणत्या भाषेत आहे ?५) ऑक्सफर्ड डिक्शनरीत इमोजीचा अर्थ काय आहे ?*उत्तरे :-* १) डोळ्यांतून अश्रू काढत हसणारा चेहरा २) जेरेमी बर्ज ३) चित्र वर्ण अक्षर ४) जपानी ५) इलेक्ट्रॉनिक संवादात वापरण्यात येणारे, भावना दर्शविणारे छोटे डिजिटल चित्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकट चिलवरवार, सहशिक्षक, नांदेड👤 साईनाथ माळगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर पालकृतवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीराम भंडारे, परभणी👤 दत्तात्रय तोटावाड, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 लक्ष्मण दावणकर, सहशिक्षक, लातूर👤 सचिन राजेंद्र पिसाळ, सहशिक्षक, बीड👤 दिनेश राठोड, जिजाईसुत👤 बजरंग अरगेलू, धर्माबाद👤 ज्ञानेश्वर कोकरे, करखेली👤 करुणा खंडेलोटे, नांदेड👤 साईनाथ ईबीतवार, येवती👤 मोहन कुलकर्णी, हदगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महासंकटी सोडिले देव जेणें।प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाचा जन्म संकटातून होतो, संपूर्ण आयुष्य संकटाचा सामना करत जगावे लागते व मृत्यू सुद्धा असंख्य संकटाचा सामना करुनच येतो.आपण ऐकले असणार. . माणसाचा जीवन हा, वेगळा असतो. सोबत सुख आणि दु:ख येतच असतात. म्हणून जगणे सोडायचं का. .? माणसाचा जीवन एकदाच येतो. प्रत्येक संकटाचा सामना करुन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे .व इतरांच्या जीवनात संकटे बणून न जाता त्यांच्या जीवनातील दु:ख कमी करण्यासाठी एकदातरी प्रयत्न करून बघायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदराची टोपी*एक उंदीर होता. तो एकदा रस्त्यावरून चालत होता. चालता चालता त्याला एक कापडाचा 'तुकडा' सापडला. तर तो तुकडा बघून उंदराला वाटलं अरे व्वा ! आता आपण याची टोपी शिवून घेऊया. मग तो एका शिंप्याकडे गेला. शिंप्याला म्हणाला, ""शिंपीदादा, शिंपीदादा, मला या कापडाच्या तुकडयाची टोपी शिवून द्या"". तर शिंपी म्हणाला, ""चल हट, मी नाही देत जा"". तसा उंदराला आला राग. तो म्हणाला ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". शिंपी घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण तो तुकडा, मी टोपी शिवून देतो"". म्हणत शिंप्यानं टोपी शिवून दिली. तसा तो उंदीर गेला, कुणाकडं? परटाकडं ! परटाला म्हणाला , ""परीटदादा, परीटदादा, माझी एवढी टोपी धुवून द्या"". परीट खूप कामात होता. तो म्हणाला, ""नाही रे उंदरा, मला वेळ नाही आता. जा"". तसा तो उंदीर म्हणाला, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". परीट घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपी धुवून देतो"". म्हणत त्याने टोपी धुवून दिली. तसा उंदीर गेला रंगार्याकडे व म्हणला, ""रंगारीदादा रंगारीदादा, माझी टोपी छान लाल रंगवून द्या"". रंगारी म्हटला, ""जा जा, मी नाही देत जा."" तसा उंदीर काय म्हटला? बरोब्बर! ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". रंगारी घाबरला आणि त्यानं टोपी छान लाल लाल रंगवून दिली. मग उंदीर गेला गोंडेवाल्याकडे व म्हणला, ""गोंडेवाले, गोंडेवाले, माझ्या टोपीला चार गोंडे लावून देता का?"" गोंडेवाला बोलला, ""मी नाही देत. ज्जा"" तसा उंदीर त्याला पण म्हणाला, काय?, ""राजाकडे जाईल, चार शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेल"". तसा गोंडेवाला घाबरला. म्हणाला, ""नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपीला गोंडे लावून देतो"". मग त्याने गोंडे लावून दिले. उंदीर झाला खूष. त्यानं टोपी घातली डोक्यावर आणि मजेत गाणी म्हणत चालला. तिकडून राजा चालला होता. राजाबरोबर होते शिपाई. राजाने उंदराला बघितले आणि शिपायांना म्हणाला, ""घ्या रे त्याची टोपी हिसकावून"". तशी शिपायांनी उंदराची टोपी हिस्कावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली. उंदीर पळाला आणि पळता पळता म्हणायला लागला, ""राजा भिकारी, राजा भिकारी! माझी टोपी घेतली, घेतली"". आता राजाला आला राग. त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडे भिरकावली. तशी ती टोपी उंदराने उचलली, झटकली आणि पुन्हा डोक्यात घातली आणि म्हणायला लागला , ""राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक, ढुम!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
📚वाचन विकास भाषिक उपक्रम http://www.pramilasenkude.blogspot.com विषय - मराठी *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* शब्दटोपली क्र. (४) *छत्री , मुली, मीना, सीता, सीमा, भाजी ,भाजीपाला ,घरी ,गरीब ,खरीप,जरी, मयुरी, दरी,नशीब ,परीक्षा ,बरीच ,भरीव ,रवी, जमीन, गवळी, कवी, जीवन, वीस,वीज ,वीर ,वीण, भीती,पुरी, आमटी,हरीण,हीच ,सीमा ,शीत,शीळ , बसली, परी, हसली,खीर, पापडी, बारीक, मीठ, भाकरी, वाटली वारली, करामती, सकाळी, सजली, चिमणी, किती, माहिती, बारीक, वाडगिनी , घरी, पाणी, झरीपाडा, शेतकरी, भातशेती, घरातील, छोटी, गाणी, नदी.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- ✍संकलन / लेखन श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागर श्यामच्या कथेचा*भाग तिसरा - मुकी फुलेhttps://drive.google.com/file/d/1Cu5V8zhc6FAU-bQSiykPqkGLpnMIV6Iu/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९६:अमेरिकेतील अटलांटा येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९९३:ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९९२:ऊर्दू कवी मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर**१९८०:सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९७६:नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.**१९६९:भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६९:नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.**१९५२:फिनलंडमधील हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९४०:दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई**१९३५:जगात ’पार्किंग मीटर’चा वापर प्रथमच अमेरिकेतील ओक्लाहोमा शहरातील वाहनतळावर सुरू झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:अजय आर्थर देसाई-- कवी* *१९६०:देविदास भावराव फुलारी -- प्रसिद्ध कवी लेखक* *१९५५:रॉजर बिन्नी – क्रिकेटपटू**१९५४:विष्णू श्रावण भेंडारकर -- कवी,लेखक* *१९५४:स्नेहलता विलास जोशी-- लेखिका**१९४६:इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू**१९३८:डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला.**१९३५:प्रा.सु.ग.शेवडे--भारताचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते,प्रवचनकार**१९३५:रमेश मुधोळकर-- बालसाहित्यकार व चित्रकार(मृत्यू:१३ मार्च २०१६)* *१९३१:प्रेमानंद वासुदेव मडकईकर-- लेखक* *१९३१:मधुकर सुदामा पाटील--समीक्षक**१९३०:प्रा.रुपराव पांडुरंग पाजणकर-- समीक्षक, संपादक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९१)* *१९०८:गोपाळ कृष्ण विनायक चिरमुले-- लेखक* *१९०२:यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (मृत्यू:८ फेब्रुवारी १९९४)**१८९६:ए.जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)**१८२७:मंगल पांडे – क्रांतिकारक (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:रजत मुखर्जी--भारतीयचित्रपट दिग्दर्शक**२०१८:गोपालदास नीरज-- गीतकार,कवी व हिंदी लेखक (जन्म :४ जानेवारी १९२५)**१९६८:प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (जन्म:२९ जून १९०८)**१९६५:सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ मार्च १८७५)**१८८२:फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)**१३०९:संत विसोबा खेचर (संत नामदेव यांचे गुरू) समाधिस्थ झाले.* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौथा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7323691734313845/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तळकोकणात मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला, पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हायकोर्टात आव्हान; प्रकल्प अदानींना देताना जनतेचे 3 हजार कोटी बुडवले, सौदी अरेबियाची कंपनी 'सेकलिंक'चा राज्य सरकारवर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गुंतवणूकदारांना दिलासा! सहारा रिफंड पोर्टल लाँच, लाखो नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बुलढाणा अर्बन बँकेत 80 लाखांचा घोटाळा, एका कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल; जमा पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक येणार, धनंजय मुंडेंचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि पत्नी सुधा मूर्ती तिरुपतीच्या दर्शनाला; सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती दान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 घोळाणा फुटल्यास काय करावे ?📕उन्हातून खेळून आल्यावर काही वेळा लहान मुलांच्या नाकातून रक्त येते. हा प्रकार तुम्हीही केव्हातरी अनुभवला असेल वा पाहिला असेल. यालाच घोळाणा फुटणे असे म्हणतात. नाकाच्या पुढच्या भागात नाजूक केशवाहिन्या असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या अशा रक्तवाहिन्यांतून रक्त येऊन या भागात अधिक रक्तपुरवठा होतो. या केशवाहिन्या उष्णतेने प्रसरण पावतात, प्रसरण पावून फुटतात व रक्त येते. या भागातच श्वसनावाटे घेतली जाणारी उष्ण हवा प्रथम संपर्कात येते. त्यामुळे या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर उपरोक्त परिणाम होतो.नाकाला इजा, दुखापत होणे, सतत नाक कोरण्याची सवय, खूप जोरात नाक शिंकरणे अशा साध्या कारणांबरोबर बन्याच गंभीर कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील वाढ, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयाच्या झडपेचे आजार, रक्ताचा कर्करोग, अॅस्पीरीन, क्वीनीन यांसारखी औषधे व रक्तश्राव होण्याची प्रवृत्ती यांचा समावेश होतो. अचानक कोणाचा घोळाणा फुटल्यास काय करावे? ते आता आपण पाहू. मानेखाली उशी द्यावी आणि झोपवून ठेवावे, श्वासावर नियंत्रण करत नाकानेच श्वास घ्यायला सांगावा. तरीही रक्त थांबत नसेल तर रक्तस्राव होत असताना नाकाचा पुढचा भाग दोन बोटात घट्ट धरून ठेवावा. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येऊन रक्तस्राव थांबवता येतो. तसेच ज्या नाकपुडीतून रक्त येत असेल, त्यामध्ये कापसाचा किंवा गॉझचा कपडा असल्यास तो नाकपुडीत पुढच्या भागात घालून थोडा वेळ दाबून धरावा व तरीही रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे न्यावे. वारंवार असा त्रास होत असेल, तर योग्य निदान करून घेणे व त्यानुसार उपचार करणे हेच योग्य ठरेल. उच्च रक्तवावामुळे असे होत असल्यास रक्तदाब कमी करणारी औषधे व्यावीत. नाकात काही वाढ असेल, लहान मुलांनी नाकात काही घालून घेतले असेल, तर ते काढून टाकावे इत्यादी.नाकातून रक्त येणे वा घोळाणा फुटणे १९ टक्के वेळा एक सौम्य स्वरूपाचे लक्षण असले, तरी क्वचित प्रसंगी (वयोमानानुसार) गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे रक्तस्राव होताना घाबरून न जाता प्रथमोपचार करणे व नंतर तपासण्या करून जर काही आजार असेल, तर त्यावर उपचार करणे हेच श्रेयस्कर ठरेल. काही गंभीर आजार नसल्यास व बारंबार घोळाणा फुटण्याची सवय असल्यास आयुर्वेदातील अडुळसा व गुड़ या वनस्पतींचा चांगला उपयोग होतो. ताजी अडुळशाची पाने मिळाल्यास त्यांचा वाफवून रस काढून त्यात साखर घालून सकाळ-संध्याकाळ एक छोटा कप भरून प्यावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनरूपी समुद्रात पुस्तके दीपगृहाचे काम करतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'पोवारी'* बोलीभाषेतील पहिला बालकथा संग्रह कोणता ?२) महाराष्ट्र राज्यातील 'चला जाणूया नदीला' या उपक्रमाचे प्रणेते कोण आहेत ?३) चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश किती व कोणते ?४) कोणती भारतीय लोकचळवळ महात्मा गांधी यांच्या 'दांडीयात्रे'ने सुरू झाली ?५) महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) खोपळीमाकी दिवारी ( लेखक - गुलाब बिसेन, गोंदिया ) २) राजेंद्र सिंग ३) तीन - अमेरिका, रशिया, चीन ४) सविनय कायदेभंग ५) अजित पवार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मनोज बडे👤 श्रीनिवास मुरके👤 गजानन एम. शिराळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समर्थाचिया सेचका वक्र पाहे। असा सर्व भुमंडळी कोण आहे॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हसणे एक प्रकारचे जीवन आहे. आपण नेहमीच हसत,खेळत रहावे. व दु:खी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे. पण, एखाद्यावर आलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यावर कधीही हसू नये.कारण, इतरांवर हसल्याने निसर्ग कधी रडायला लावेल . या विषयी कोणीही सांगू शकत नाही. म्हणून व्यर्थ, गोष्टींच्या नादी लागून वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बुड बुड घागरी*एकदा एका जंगलात उंदीर जातो. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी साखर आणतो'. मांजर म्हणाले 'मी दूध आणतो'. उंदीर म्हणाला 'मी शेवया आणतो'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'.इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. तात्पर्य : कधीही खोटे बोलू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागर श्यामच्या कथांचा*भाग दुसरा - अक्काचे लग्नhttps://drive.google.com/file/d/1PKkK3gfkiy94u7n9yTAf9o1eCQM0i3Mp/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९६:उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ’ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६:’तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.**१९८०:भारताने ’एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.**१९७६:मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.**१९६८:सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे ’इंटेल’ (Intel) कंपनीची स्थापना**१९२५:अॅडॉल्फ हिटलरने ’माइन काम्फ’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.**१८५७:मुंबई विद्यापीठाची स्थापना**१८५२:इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६:स्मृती श्रीनिवास मानधना-- भारतातील प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू**१९८२:प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ’मिस वर्ल्ड २०००’ विजेती**१९७९: राकेश काळू वानखेडे-- लेखक, कवी* *१९७५:डाॅ.कमलाकर कोंडिबा राऊत-- लेखक* *१९७२:सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: १७ एप्रिल २००४)**१९७१:सुखविंदर सिंग-- प्रसिद्ध भारतीय गायक**१९६९:अर्चना मिरजकर -- कथा,कादंबरी मराठी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित, अनेक ग्रंथांचे भाषांतर* *१९६०:विश्वास नेरुरकर-- संगीत संशोधक व अभ्यासक* *१९५८:रेणू राजाराम दांडेकर-- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका**१९४८:सुजाता देशपांडे-- मराठी व हिंदी भाषेतील कवयित्री,लेखिका**१९४८:गजेंद्र अनंतरामजी गजभिये -- कवी**१९४८:बाबुलाल माळी -- शैक्षणिक व चरित्रात्मक लेखन करणारे लेखक तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९४७: सुभदा मुळे-- लेखिका* *१९४१:निक्षुभा नंदकुमार जोशी -- कवयित्री**१९४०:डॉ.भागवत शिवराम भोयर-- लेखक, कवी* *१९२७:’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (मृत्यू: १३ जून २०१२)**१९२७: डॉ.चंद्रशेखर शिवलिंग कपाळे-- कवी लेखक संपादक**१९२४:श्रीधर उर्फ बापूराव दत्तात्रेय आगाशे--चरित्रकार, प्रवचनकार (मृत्यू:२५ एप्रिल १९९६)**१९१८:नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)**१८४८:डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २३ आक्टोबर १९१५)**१६३५:रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (मृत्यू: ३ मार्च १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९४२)**२००१:रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (जन्म: २८ जून १९३४)**१९९४:डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक* *१९८९:डॉ.गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक(जन्म: २मे १९१४)**१९६९:’लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक (जन्म:१ ऑगस्ट १९२०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तिसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7320107921338893/कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक ; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *710 कोटींचा खर्च ! अंदमान-निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार ऑनलाईन उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लातुरातील वडवळ नागनाथ गावात दरवर्षी 100 कोटींच्यावर उत्पन्न, पण यंदा टमाटेच लावले नसल्याने बसला आर्थिक फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यळकोट यळकोट, जय मल्हार! सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्यात न्हाऊन निघाली जेजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 जुलैदरम्यान गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asia Cup 2023 : नेपाळचा पराभव करत भारताची उपांत्य फेरीत धडक, बुधवारी पाकिस्तानसोबत सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ज्वालामुखीचा उद्रेक केव्हा होतो ?* 📙 ***************************आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग टणक आणि स्थिर वाटला तरी हे धरतीचं कवच अनेक खंडांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हे खंड पृथ्वीच्या पोटात असलेल्या द्रव पदार्थावर तरंगत असतात. पृथ्वीच्या गाभ्यामधलं तापमान अतिशय चढं असतं. त्यापायी तिथले कातळ, दगड वितळतात आणि त्यांचं द्रवरूप मॅग्मामध्ये रूपांतर होतं. हा मॅग्माही अतिशय तप्त अवस्थेत असतो. त्यापायी त्याचा दबाव वरच्या खंडांवर पडत असतो. ज्या वेळी हा दबाव एका मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो मॅग्मा वरवर चढू लागतो. ज्वालामुखीच्या पोटातल्या या मॅग्माला वर चढण्यासाठी एक नळीसारखी मोकळी जागा सापडते. हिलाच व्हेन्ट म्हणतात. व्हेंटचं वरचं टोक ज्वालामुखीच्या उघड्या तोंडाशी जोडलेलं असतं. हा तापलेला मॅग्मा वरवर चढत असताना वाटेत आलेल्या खडकांनाही वितळवतो. त्यामुळे त्यांचं प्रमाण व दबाव वाढत जातो. वरवर जातानाच त्याचं लाव्हामध्ये रूपांतर होतं. हा लाव्हा त्या मुखाशी पोचला की जोराने बाहेर फेकला जातो. यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. असा स्फोट झाल्यासारखा उद्रेक झाला की राख, धूळ आणि न वितळलेले खडकांचे तुकडे वातावरणात उंच फेकले जातात. राख व खडक परत जमिनीकडे ओढले जातात. पण बाहेर पडलेला लाव्हा मात्र द्रवरूप असल्यामुळे बहुतेक वेळा ज्वालामुखीच्या बाहेरच्या बाजुवरून ओघळत खाली उतरतो. त्याचा वेग जास्त असला तर तो झपाट्याने आसपासच्या प्रदेशात पसरतो. वाटेत आलेल्या सगळ्यालाच वितळवत, जाळत तो दूरदूरवर पसरत जातो. पुरातन पॉम्पे शहराजवळच्या व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक झाला तेव्हा ते सर्व शहर बेचिराख होऊन त्या लाव्हाखाली गाडलं गेलं होतं. हा लाव्हा जसा थंड होतो तसं त्याचं अग्निजन्य खडकांमध्ये रूपांतर होतं. जर उद्रेक झालेला ज्वालामुखी सागराच्या पोटात असेल तर अशा थंड झालेल्या लाव्हापासून बेटं तयार होतात. हवाई बेटांचा उगम असा झाला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक एकाएकी काहीही पूर्वसूचना न देता होऊ शकतो. पण उद्रेक होण्यासाठी पुरेसा मॅग्मा तयार होऊन व्हेन्टवाटे वरवर चढत जाण्याची आवश्यकता असते. ते होण्यासाठी काही कालावधी निश्चितच जातो. त्यामुळे काही पूर्वसूचना मिळू शकतात. त्यातल्या बहुतेक भूकंपाच्या छोट्या छोट्या धक्क्यांच्या स्वरूपातल्या असतात. तर काही वेळा तापलेल्या मॅग्माच्या हालचालीमुळे जमिनीचं तापमान वाढत जातं किंवा तिथं असलेल्या तसेच गरम पाण्याच्या झऱ्यांचं तापमानही वाढत जातं. काही वेळा जमिनीला फुगवटाही येतो. पण या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी संवेदनशील उपकरणांची गरज असते. सुप्त ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशात ठेवलेल्या अशा उपकरणांद्वारे पूर्वसूचना मिळाल्यास तेथील नागरिकांचं स्थलांतर करून जीवितहानी टाळता येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाचा उदात्त हेतू केवळ ज्ञान नसून, कृती होय.➖ हर्बट स्पेन्सर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) स्वीडन येथील शाळकरी मुलगी *'ग्रेटा थनबर्ग'* ने कोणत्या चळवळीनं वातावरणातील बदलांकडे जगाचं लक्ष वेधून घेतले ?२) 'कॅम्पनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?३) बीबीसी या प्रख्यात वृत्तवाहिनीचे विस्तारित रूप काय आहे ?४) कोणत्या पक्ष्याला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?५) महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे ?*उत्तरे :-* १) Friday For Future २) पंतप्रधान नरेंद्र मोदी ३) ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कॉर्पोरेशन ४) कबुत्तर ५) नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास पुसा, बिलोली👤 राज राठोड, औरंगाबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे। वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥ पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं। नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीकडून सल्ला घेणे अजिबात वाईट नाही. पण,तो मिळणारा सल्ला कशाप्रकारे मिळतो तेही जास्त आवश्यक आहे. कारण बरेचदा असं होतं की, मिळणाऱ्या सल्याकडे काळजीपूर्वक लक्ष न दिल्याने आपले मेंदू सुध्दा कायमसाठी गुलाम होऊन जाते आणि वेळ आल्यावर सर्वच विकण्याची वेळ येत असते. म्हणून पुन्हा अशी आपल्यावर वेळ येणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.शेवटी आपली परिस्थिती, आपले विचार ,आपले मत, आपले मेंदू ,कसेही असले तरी आपलेच असतात ते,स्वतंत्र असायला पाहिजेत.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लौकिक राजा*जनकराजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा. राजा जनक कीर्तन ऐकण्यात दंग होता. कीर्तन अगदी रंगात आले होते. इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच सांगितले, 'महाराज! राजवाडयाला आग लागली आहे.' जनक म्हणाला, 'मी कीर्तन ऐकतो आहे. देवाची भक्ती करतो आहे. आत्ता काही सांगू नको. नंतर ये.' थोडा वेळ गेला. रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, 'महाराज!आग भडकली आहे. कोठीघरार्पत थोडया वेळातच पसरेल.' तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते. तेवढयात रक्षकाने तिसरी बातमी आणली, 'महाराज! आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. सार्या प्रजेची घरं जळून खाक होतील.' हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन उठला. म्हणाला, 'किर्तन थांबवा. मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे.' म्हणजे राजाला स्वत:चा राजवाडयाचे दु:ख नव्हते. प्रजेचा जीव, मालमत्ता त्याला वाचवायची होती. तात्पर्य : कर्तव्याला लिप्त आणि स्वत:च्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_'जागर श्यामच्या कथांचा'_**_सप्रेम नमस्कार,_*_शिक्षणाबरोबरच सुसंस्कार व मनोरंजनही व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेच्या वतीने_*_पूज्य साने गुरुजींच्या 'श्यामचीआई'_* _पुस्तकातील ४२ कथांचा समावेश असलेल्या ' जागर श्यामच्या कथांचा' हा उपक्रम सोमवार, १७ जुलैपासून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे.__दररोज एक याप्रमाणे ऑडिओ स्वरूपातील कथा व्हाट्सअप ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल.__उपक्रमामध्ये सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.____________________*_सोमवार, १७ जुलै २०२३_*___________________*_सावित्रीचे व्रत_*___________________https://drive.google.com/file/d/1zwGOKGITCyWah7P0rStBTFogYXSmqQma/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आंतरराष्ट्रीय न्याय दिवस* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००४:तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.**२०००:अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना’भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर**१९९४:विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.**१९९३:तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'तेलगू थल्ली' हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान**१९७६:कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९५५:वॉल्ट डिस्ने यांनी अॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ’डिस्नेलँड’ सुरू केले.**१९४७:मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्या ’रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ’काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.**१९१७:किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ’विंडसर’ हे आडनाव लावतील.**१८४१:अतिशय गाजलेल्या ’पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१८१९:’अॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.**१८०२:मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७०:प्रा.डाॅ.अश्विनीकुमार पंजाबराव धांडे-- वैज्ञानिक विषयांवर मराठीतून लिहिणारे लेखक**१९६४:किरण जुनेजा-- भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री**१९६२:गजानन एकनाथ उल्हामाले -- कादंबरी व नाट्यलेखन**१९६४:प्रमोदकुमार अणेराव-- प्रसिद्ध कवी,कथाकार व चित्रकार**१९६०:प्रमोद प्रभाकर जोगळेकर--संपादक, लेखक**१९५७:डॉ.मिर्झा रफी अहमद बेग--प्रसिद्ध वऱ्हाडी कवी* *१९५६: देविदास मुरलीधरराव कुलकर्णी -- कवी,लेखक,संपादक* *१९५४:अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर**१९४६:अविनाश फणसेकर -- नाटककार, नाट्य दिग्दर्शक, संपादक (मृत्यू:८ आगस्ट २०११)**१९४४:रविंद्र बेर्डे-- मराठी चरित्र अभिनेते* *१९४२:अप्पासाहेब गोपाळ पाटील -- कादंबरीकार* *१९३६:मृणालिनी परशुराम जोगळेकर-- कथाकार,चरित्रकार(मृत्यू:३१ मार्च २००७)**१९३३: दिनकरराव देशपांडे-- बालसाहित्यिक,लेखक (मृत्यू:१८ मार्च २०११)* *१९३०:सचिन भौमिक-- भारतीय हिंदी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक(मृत्यू:१२ एप्रिल २०११)**१९३०:बाबुराव बागूल – प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:२६ मार्च २००८)**१९१९:स्नेहल भाटकर (वासुदेव गंगाराम भाटकर)-- मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार (मृत्यू: २९ मे २००७)**१९१७: बिजोन भट्टाचार्य-भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)**१८८९:अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (मृत्यू: ११ मार्च १९७०)**१८७०: गणेश बलवंत मोडक-- लेखक (मृत्यू:१८ फेब्रुवारी ९५३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*•••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: सी.शेषाद्री- पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक(जन्म: २ फेब्रुवारी १९३२)**२०१२:मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य (जन्म: २४ जून १९२८)**१९९२:शांता हुबळीकर – प्रभातच्या ’माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ’बालगंधर्व पुरस्कार’ (जन्म: १४ एप्रिल १९१४)**१९९२:काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०] (जन्म: २२ एप्रिल १९१६)**१७९०:अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (जन्म: ५ जून १७२३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दुसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7316755375007481/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *युरोपात हजारो भारतीय प्रवासी अडकले, एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आजपासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित, तब्बल दोन महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुष्काळाचे सावट ! नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 28.63 टक्के पाणीसाठा उपलब्ध ; परिस्थिती गंभीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर 141 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाबुराव बागुल यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘विहितगाव’ नावाच्या खेड्यात झाले. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईला माटुंग्याच्या लेबर कॅंपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरवादी विचारांचा परिणाम शालेय वयात असलेल्या बागुलांवरही झाला. चौथ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरगीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर त्यांना शिक्षण थांबवावे लागले. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्यादरम्यान मुंबईत बळावू लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कॅंपातच राहत असलेल्या अण्णा भाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव जाणवतो.१९५५ मध्ये रेल्वे वर्कशॉपात नोकरी मिळाल्यामुळे बागुल सुरतेस गेले. तेथे त्यांना जातीय भेदभावामुळे भाड्याने घर मिळत नव्हते. तेव्हा त्यांनी जात चोरून भाड्याचे घर घेतले. परंतु जात चोरून असे राहणे न रुचल्यामुळे नोकरी सोडून ते मुंबईस परतले. सुरतेतील त्या अनुभवांवर त्यांनी ‘जेव्हा मी जात चोरली होती’ ही कथा लिहिली.१९५७ मध्ये प्रथमच त्यांची कथा आचार्य अत्रेंच्या ‘नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ‘नवयुग’ व ‘युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली. २६ मार्च २००८ रोजी बागुलांचे नाशकात निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते, तेच खरे शिक्षण .➖ डॉ. जाॕन.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला *'दादा* असे संबोधले जाते ?२) आधुनिक भारतातील पहिले उल्का खगोलशास्त्रज्ञ कोणाला मानले जाते ?३) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?४) कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो ?५) कोणत्या नदीच्या पुरामुळे दिल्ली येथे महापूर आला आहे ?*उत्तरे :-* १) सौरभ गांगुली २) अश्विन शेखर ३) शट डाऊन ४) सिंह ५) यमुना नदी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मधुकर फुलारी👤 आरिफा शेख, सहशिक्षिका, पुणे👤 पुरुषोत्तम केसरे, देगलूर👤 आनंद पंगेवाड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनानाथ हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शहाणे तर सर्वजण असतात पण,खऱ्या अर्थाने तोच माणूस शहाणा असतो त्याला उचित, अनउचित, सत्य,असत्य सहजपणे ओळखता येतो. पण, कधी, कधी असं होतं की, जेव्हा,नकारात्मक विचार मनात प्रवेश करतात तेव्हा सर्व कळून सुध्दा वळत नाही असेही शहाणे कोणत्या कामाचे...? म्हणून आपण असे शहाणे बणावे जेथे ह्या साऱ्या गोष्टींना ओळखता येईल. आणि स्वतःसाठी तसेच इतरांनाही जास्त नाही तर थोडा तरी त्यातून फायदा होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संधीचा फायदा*एकदा, एका मंदिराच्या पुजार्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६:स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२:शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५:पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९५५:आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७:समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६:मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२:इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:सुभाष आ.मंडले -- लेखक* *१९८१:प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे-- लेखक,कवी* *१९८०:राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी लेखक* *१९७५:आबा गोविंदा महाजन-- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८:सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६०:प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे-- कवी**१९५६:डॉ.प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१:अनुराधा मराठे-- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट-- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९:प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४३:दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१:माधव गुणाजी कोंडविलकर--ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२०)* *१९३७:विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू:३१ जानेवारी १९८६)**१९३७:प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३)**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)**१९३१:विठ्ठल उमप-- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू:२६ नोव्हेंबर, २०१०)**१९२७:प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१०)**१९१९:बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:६ नोव्हेंबर २००६)**१९१८:चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१०)**१९०५:चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)**१९०४:गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)**१९०३:के.कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५)**१८९९:दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११:मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००४:डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)**१९९१:जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म:१९२०)**१९८०:गजानन विश्वनाथ केतकर--निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म:८ ऑगस्ट १८९७)**१९६७:नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म:२६ जून १८८८)**१९१९:एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२)**१९०४:अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - आत्मनिर्भर*स्त्री अबला नसून सबला आहे. ती स्वतःच्या बळावर आपले स्वतःचे विश्व निर्माण करू शकते. अश्याच एका महिलेची कथा ज्यास फेसबुकवर अनेक वाचकांनी पसंती दर्शविलेली आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7313550268661325/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर मिळणार, दूध दर निश्चिती समितीचा अहवाल सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचं खातेवाटप जाहीर.. शिंदे मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजप मंत्र्यांच्या खात्यातही बदल, भाजपची सहा तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्याच कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालच्या 171 धावा, टीम इंडिया तीन बाद 350 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 किरणोपचार म्हणजे काय ? 📙 अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे ध्येय सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे, हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'बटाट्याची चाळ' हे विनोदी पुस्तक कुणी लिहिले ?२) LCD चे Full Form काय आहे ?३) अंजिठा येथे एकूण किती लेण्या आहेत ?४) जगातील सर्वात मोठा असणारा अर्था पृथ्वीगोल अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी आहे ?५) मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी कोणते ?*उत्तरे :-* १) पु. ल. देशपांडे २) Liquid Crystal Display ३) २९ लेण्या ४) यारमथ ५) गिधाडे, कोल्हे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर डोमशेर, पदोन्नत मुख्याध्यापक, कोलंबी👤 श्रीकांत जोशी, सहशिक्षक, धर्माबाद👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 बालाजी हिवराळे, पत्रकार, बिलोली👤 विठ्ठल हिमगिरे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गंगाधर बीजेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड👤 शंकर हांड्रे, सहशिक्षक, बिलोली👤 संतोष ईबीतवार, येवती👤 पांडुरंग चंदेवाड, येवती👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 उत्तम पाटील चोळाखेकर👤 राजू कदम👤 वसंत सिरसाट👤 नवाज शेख👤 सचिन खांडगावे👤 वसंत बोनगिरे👤 एस के सागर👤 विष्णूराज कदम, पांगरी👤 विजयकुमार पाटील घुलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असे अनेकजण म्हणतात की,झोपलेल्या माणसाला उठवता येते पण,झोपेचे सोंग घेऊन झोपला असेल तर त्याला कधीच उठवता येत नाही. म्हणजेच ते, झोपेचे सोंग सुध्दा कदाचित भयानक असू शकते. म्हणून त्या झोपलेल्यांपासून जरा आपणही स्वत: थोडे सावध रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संधीचा फायदा*एकदा, एका मंदिराच्या पुजार्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते पुजार्याला आपल्याबरोबर यायला सांगतात, तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, की त्याचा देवावर विश्वास आहे आणि देव त्याच नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येत आणि पुजार्याकडे शिडी टाकतात, पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुळे सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्यांचाकडे तक्रार करतो, की त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस. पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. तात्पर्य : आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात, पण ती संधी ओळखून त्याचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०१३:डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.**१९७६:कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.**१९६०:चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.**१८६७:आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.**१७९०:फ्रेन्च राज्यक्रांती – पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. या घटनेने फ्रेन्च राज्यक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:जयश्री राजगोंडा पाटील -- लेखिका, कवयित्री**१९७५: प्रा.रुपाली अवचरे -- प्रत्रकार, लेखिका,संपादक* *१९६८:डॉ.विजयकुमार स.माने-- कवी* *१९६७:हशन तिलकरत्ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी**१९६४:अतुल सदाशिव पेठे-- मराठी नाट्यलेखक,नाट्यअभिनेते,नाट्यप्रशिक्षक, आरोग्यसंवादक व नाट्यदिग्दर्शक**१९५६: रोहिणी अशोक गंधेवार -- कवयित्री**१९५५:अरुण फडके-- प्रसिद्ध मराठी व्याकरणतज्ज्ञ(मृत्यू:१४ मे २०२०)**१९५४:प्रा.डॉ.भगवान लक्ष्मणराव अंजनीकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक,विविध साहित्य पुरस्काराने सन्मानित* *१९५१:मिलिंद सखाराम मालशे--समीक्षक, भाषावैज्ञानिक**१९४७:नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान**१९४३:जयराम विठ्ठल पवार(ज.वि.)-- मराठी साहित्यिक,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत* *१९२९:कैलाश चंद्र जोशी-- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२४ नोव्हेंबर २०१९)**१९२०:शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)**१९१७:रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)**१८९९: श्रीकृष्ण लक्ष्मण(भैयाजी)पांढरीपांडे -- थोर शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, लेखक (मृत्यू:८ एप्रिल १९९७)* *१८८४:यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधीत्व (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)**१८५६:गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ(मृत्यू: १७ जून १८९५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)**२००३:प्रो.राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)**२००३:लीला चिटणीस – अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)**१९९३:श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार* *१९७५:मदनमोहन – संगीतकार (जन्म: २५ जून १९२४)**१९६३:स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म:८ सप्टेंबर १८८७)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!एकोणिसावा शेवटचा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7309356719080680/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जर शिक्षकांनी योग्य पद्धतीने काम नाही केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवाब मलिकांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला, ईडीच्या तीव्र विरोधानंतर मनी लाँड्रिगंच्या प्रकरणात वैद्यकीय जामीन नाकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीत तब्बल 45 वर्षांनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी 208 मीटरच्याही पुढे; पूरस्थिती पाहता सरकार सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर, 'धनगड' हेच 'धनगर' असल्याच्या मुद्यावर पुरावे सादर करा; हायकोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युवा धावपटू ज्योती याराजी हिची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी बिनबाद 146 धावांची भागिदारी केली आहे. भारतीय संघ अद्याप 4 धावांनी पिछाडीवर आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जगाचा पोशिंदा'* असे कोणाला म्हटले जाते ?२) संविधान सभेची शेवटची बैठक कधी पार पडली ?३) चंद्रावर अंतराळयान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश ठरणार आहे ?४) फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?५) सर्वात लहान विषम संख्या कोणती ?*उत्तरे :-* १) शेतकरी /बळीराजा २) २४ जानेवारी १९५० ३) चौथा ४) जळगाव ५) एक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद व्यवहारे, जि. प. नांदेड👤 भागवान अंजनीकर, साहित्यिक, नांदेड👤 धनंजय गुम्मलवार, जि. प. नांदेड👤 नंदकिशोर मोरे👤 नागेश स्वामी👤 डॉ. अमान खान, धर्माबाद👤 नितीन काळे👤 इरवंत जामनोर👤 शंकर कंदेवाड, येवती👤 आकाश यडपलवार, जारीकोट👤 चंद्रकांत वाडगे👤 दीपक बोरगावे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठे लोक मोठ्या लोकांचे वैरी असतात असं कदाचित कुठेतरी ऐकण्यात आले असेल. पण,त्यात एक गोष्ट मात्र खरी आहे ती म्हणजेच योग्यता बघूनही नाते जोडले जातात व साथ दिल्या जाते.पण,कधी, कधी असं होतं की वेळ, प्रसंगी कोणी,कोणाचे होतांना दिसत नाही म्हणून कोणालाही तुच्छ लेखू नये. कारण ऐनवेळी जेव्हा परिस्थिती आपले रूप धारण करते त्यावेळी तिच्याजवळ लहान ,मोठा कोणीही नसते तर..ती सर्वाना एकाच तुतारीने हानत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेमळ बोल*एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.' यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.' तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०११:मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.**१९७७:रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे. न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.**१९२९:जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.**१९०८:लोकमान्य टिळकांवर दुसर्या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.**१८६३:सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:उर्वशी शर्मा-- भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री**१९८२:सुनील कालिदास जवंजाळ -- कवी, लेखक* *१९६१:गणेश निळकंठराव पांडे -- प्रसिद्ध कवी* *१९५८:प्रा.डॉ.नमिता अशोक शेंदरे-- लेखिका* *१९५२:प्रा.माधुरी शानभाग-- प्रसिद्ध मराठी लेखिका,अनुवादक* *१९५२:डॉ निर्मल सिन्नरकर-- कवयित्री, गीत लेखन**१९४७:डॉ.वासुदेव नारायण विष्णुपुरीकर -- प्रसिद्ध नाटयलेखक* *१९४२:हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता**१९२७:सावळाराम धागोजी म्हात्रे(सावळाराम महाराज)-- कीर्तनकार, समाजप्रबोधक (मृत्यू:१८ फेब्रुवारी १९९२)**१९१६:रामकृष्ण धोंडो बाक्रे-- ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार(मृत्यू:२२ डिसेंबर १९९६)**१९०३:विमलाबाई देशपांडे-- कवयित्री लेखिका* *१८९२:केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१)**२००९:निळू फुले – प्रसिद्ध अभिनेते (जन्म:४ एप्रिल १९३०)**२०००:इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४)**१९९४:पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)**१९९०:अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: १८९७)**१९६९:महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.(जन्म:१२ जानेवारी १९०२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!आठरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7308987079117644/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते15 जुलै 2023 दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई ) दौऱ्यावर जाणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *१० दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील, दुष्काळी भागाला पाणी मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रवाशांचा उदंड प्रतिसादमुळे लवकरच विनावाहक 'जन-शिवनेरी' राज्यातील इतर मार्गावर धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्राकडून राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जायस्वाल -ईशान किशन यांचं कसोटी पदार्पण, वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 अँटीबायोटीक्स म्हणजे काय ? 📕अँटीबायेटीक्स अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषधोपचारांत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉक्टर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करूच शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे.अलेक्झांडर फ्लेमिंगने अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळा ती जिवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत. कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानीकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात.जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले, तर जिवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकार शक्ती त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जिवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवी. पेनिसिलीन, अँपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, निओमावसीन, सेफलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषधोपचारांत वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकाचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी बावडे वा अंतर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते.प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्याजाणाऱ्या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी उपचार करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय आहे ?२) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे ?३) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?४) कोणार्क येथील सूर्यमंदिराला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?५) संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नामदेव दामाशेटी रेळेकर २) अरवली ३) ट्रॅक ४) ब्लॅक पँगोडा ५) सीपीयू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुराधा पहाडे राजूरकर👤 सुनील जंवजाळ👤 अहमद शेख👤 रवी येलमोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे ॥२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द जर .. वेळ,प्रसंगी किंवा अडचण आल्याने वेळेवर पाळला गेला नाही तर...त्याला खोटे व्हावे लागते. त्या प्रकारचा खोटेपणा सर्वसाधारण व्यक्तीला एक प्रकारची सजाच असते. पण,जो व्यक्ती व्यर्थ गोष्टींसाठी वारंवार खोटे बोलत असते त्याच्यावर मात्र डोळे झाकून विश्वास केला जातो. फरक एवढाच की, माणसं तर..एकसारखे दिसतात पण, त्यांना ओळखणे मात्र फार कठीण जाते.म्हणून खरं कोण बोलत आहे व खोटे बोलून कोण संधी साधत आहे ओळखणे फार आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रेमळ बोल*एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला. त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.' यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.' तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक 'पेपर बॅग' (Paper Bag Day* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना 'टिळक पुरस्कार’ जाहीर**१९९९:’महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.**१९९८:१६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.**१९९५:अभिनेते दिलीपकुमार यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर**१९८५:पी.एन.भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८२:राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना**१९७९:किरिबातीला *(इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२:लंडनमधील मार्क्वी क्लबमधे ’द रोलिंग स्टोन्स’ चा पहिला कार्यक्रम झाला.**१९६१:मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत व खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे २,००० लोक मृत्यूमुखी पडले तर १,००,००० लोक विस्थापित झाले.**१९३५:’प्रभात’चा ’चन्द्रसेना’ हा मराठी चित्रपट मुंबईच्या ’मिनर्व्हा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट याच नावाच्या मूकपटावर बेतलेला होता.**१९२०:पनामा कालव्याचे औपचारिक उद्घाटन झाले. पण याआधीच ६ वर्षे तो वाहतुकीस खुला झाला होता.**१७९९:रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:जयश्री संजय सातोकर -- कवयित्री, लेखिका* *१९६७: मीना घोडके -- लेखिका**१९६५:संजय मांजरेकर – क्रिकेटपटू**१९५९:प्रा.डॉ.शेषराव नत्थुजी जुडे-- लेखक**१९५२:शंकर किसन तांबे-- लेखक* *१९४७:सुहासिनी सुभाष जोशी, ऊर्फ सुहास जोशी-- मराठी नाट्य व चित्रपट अभिनेत्री**१९४५:डॉ.अंजली दामोदरराव टाकळीकर -- कवयित्री* *१९२२:मनोहर कल्लावार-- लेखक* *१९२०:यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १४ जुलै २००८)**१९२०:वसंत गोविंद देशमुख-- लेखक (मृत्यू:१ एप्रिल १९८४)**१९१३:मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (मृत्यू: १४ जून २०१०)**१९१०: गोविंद रामचंद्र दोडके-- लघु निबंधकार (मृत्यू:१३ जानेवारी १९६३)**१९०९:बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन-- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८८९:केशव गणेश आठल्ये(केशवबुवा)-- लेखक व प्रवचनकार**१८६४:वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)**१८६४:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)**१८५४:जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १४ मार्च १९३२)**१८१७:हेन्री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (मृत्यू: ६ मे १८६२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)**२०१२:दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)**१९९९:राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म:२०जुलै १९२९)**१९९४: वसंत साठे --हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानले जाणारे पटकथाकार** *१६६०:बाजी प्रभू देशपांडे (जन्म: १६१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सतरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7305295232820162/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *न्यूयॉर्कमधील भारतीय वंशाच्या संशोधकांनी बनवलं अनोखं उपकरण; पाच मिनिटांच्या आत ओळखता येणार विषाणू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारत जोडो नंतर काँग्रेसची बस यात्रा, डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातून सुरूवात, लोकसभेच्या जागा जिंकण्याचं टार्गेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठी बातमी! विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का ; ईडी संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे बेकायदेशीर, 31 जुलैपर्यंत पद सोडण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवण्यास विरोध करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी.. शाह फैसल आणि शेहला रशीद यांच्या याचिका मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेड इन इंडिया आयफोनचा मार्ग मोकळा.. आता टाटा भारतात बनवणार iPhone! ठरणार भारतातील पहिले आयफोन उत्पादक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या लेकींची कमाल.... बांगलादेशचा 87 धावांत खुर्दा, दीप्ती-शेफालीचा भेदक मारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी सचिन तेंडूलकरला कोणत्या पुरस्काराने सन्मान केला ?२) पातळ प्लास्टिक पिशवीवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे ?३) भारताबाहेर प्रदेशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था ( आयआयटी ) कोणत्या देशात स्थापन केली जाणार आहे ?४) महाराष्ट्र राज्याचा राज्यखेळ कोणता ?५) गोंडवाना विद्यापीठ कोठे आहे ?*उत्तरे :-* १) गार्ड ऑफ ऑनर २) न्युझीलंड ३) झांझिबार - टांझानिया ४) कबड्डी ५) गडचिरोली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रवीण दाभाडे पाटील, सहशिक्षक, कन्नड👤 शिल्पा जोशी, मुंबई👤 अविनाश पांडे👤 हरिहर धुतमल, पत्रकार, नांदेड 👤 साईनाथ पाटील गादगे नागणीकर👤 माधव उमरे👤 दादाराव जाधव👤 अभिजित राजपूत👤 नागेश पडकूटलावार👤 नंदकुमार कौठेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो ? ॥२३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कितीही दिले तरी ते जन्मभर पुरत नाही. व कोणी काहीच दिले नाही तरी कोणाचे, कोणापासून अडत नाही. पण, ज्यांनी वेळ, प्रसंग,अडचण जाणून आपुलकीने मदत केली असते ती,मदत जगापेक्षा वेगळी असते. म्हणून वेळ, प्रसंगी आपल्याला कोणी आपुलकीने मदत केली असेल तर त्यांना कधीही विसरु नये.व ज्यांनी त्या, प्रसंगी पाठ फिरवली असेल...त्यांचाही आदर करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर, कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पिल्लू पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ""आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या. दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही. हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ""वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव."" तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
विषय - मराठी http://www.pramilasenkude.blogspot.com 📚उपक्रम📚 शब्द वाचूया, शब्द लिहूया.🌺शब्दटोपली क्र. (२)🌺 *पान, फळा, ससा, ताक, चाक, नाव,पळा,दादा, बाबा, काका,मामा,ताई,राम,शाम,चला, वाच, नाग, काम,ढाल,छान,पाट, मका,भात,तास,आठ,खाता, कसा,मासा,पारा, काय, मला, आला, वाट,आता, वारा, मजा,राजा,बाळा, शाळा, दार, वाघ, ससा, तारा,फार , माझा,कान, नाक,मान,पाय,टाका, टापा,सात,बारा,दात, कार,पाच,घाम,घार,वाद,झाड,दान,वात,वाडा,ज्ञान ,आज्ञा, कासव,भारत, सकाळ, नाचत,बछडा,पारवा, कावळा, खाताना,धरला, आणला, एकदा,अकरा, बाजार, आकाश, वापर,लहान, आपला,पाचवा,ढगाळ,चालला,सामान,वादळ ,आवाज,दारात,खारट,सावध,हातात,गारवा,धावत,चालत,जहाज, भाकर,शासन.* --------------------------✍️संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस ’जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो._**_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.**२००१:आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सु,रू झाली.**१९९४:दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर**१९७९:अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.**१९७१:चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९५०:पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.**१९३०:ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.**१९०८:लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.**१८०१:फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:विकास वसंतराव गुजर-- लेखक* *१९६९:प्रणव हळबे -- कवी* *१९६५:अनुपमा अजय मुंजे -- कवयित्री* *१९५९:डॉ.अचला दि.तांबोळी -- कवयित्री लेखिका* *१९५५:प्रा.सुहास बारटक्के-- लेखक,पत्रकार* *१९५३:सुरेश प्रभू – माजी केंद्रीय मंत्री.**१९५०:सुप्रिया अनंत अय्यर -- कादंबरीकार, कथाकार**१९४७:शरद उर्फ गोविंद गणेश अत्रे -- कवी* *१९२१: शंकरराव रामचंद्र खरात – प्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार व इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१)**१८९१:परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१)**१८८९:नारायण हरी आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार, चित्रपट कथालेखक.(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१)**१८८७:शंकरराव रामचंद्र कानिटकर-- लेखक,प्राध्यापक आणि समाजसेवक(२५ जानेवारी १९६४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:मधुसूदन नानिवडेकर--प्रसिद्ध गझलकार व पत्रकार(जन्म: १८ मे १९६०)**२००९:शांताराम नांदगावकर –मराठी गीतकार,कवी त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. (जन्म:१९ आक्टोबर १९३६)**२००३:सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक(जन्म:१५ नोव्हेंबर १९४८)**१९९४:रामा राघोबा राणे--- भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी(जन्म:२६ जून, १९१८)* *१९८९:सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!सोळावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7302400636442955/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर ; 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्याचा शालेय शिक्षण दर्जा घसरला? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0' जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रिपाई आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार? रामदास आठवले यांचे महत्त्वाचं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर मंगळवारी सुनावणी, स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शाळा बंद; जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या निशाण्यावर; प्रशासनाकडून रेड अलर्टचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मिशन वेस्ट इंडिज ! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अँड कंपनी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भारताची लोकसंख्या*एप्रिल 2023 मध्ये भारताने चीनला मागे टाकत लोकसंख्येत पहिल्या स्थानी उडी मारलीय.2023 च्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाखांवर जाईल. तर चीनची लोकसंख्या ही 142 कोटी 57 लाख असू शकते.2011 नंतर भारतात जनगणना झालेली नाही. त्यामुळे भारताची लोकसंख्या नेमकी किती आहे, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.पण 2020 मध्ये नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशनने लोकसंख्येच्या अंदाजानुसार, एक अहवाल प्रकाशित प्रसिद्ध केला होता. त्यानुसार, 2011 ते 2036 दरम्यान 25 वर्षांमध्ये भारताची लोकसंख्या वाढून 152 कोटी 20 लाखांपर्यंत जाईल, असं सांगण्यात आलं आहे.त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची घनता ही 368 वरून वाढून 463 प्रति वर्ग किलोमीटर इतकी होईल.पण तज्ज्ञांच्या मते, भारतात पूर्वीपेक्षा आयुर्मान वाढलं आहे. शिवाय, जन्मदरही घटलेला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर खाली आला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार कोणता ?२) भारतातील 'अंतरिक्षनगर' म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) 'रसायनाचा राजा' म्हणून कोणाला संबोधतात ?४) धाराशिव जिल्ह्याचे 'उस्मानाबाद' हे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले होते ?५) 'युनिव्हर्सल डोनर' ( सर्वयोग्य दाता ) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारतरत्न २) श्रीहरिकोटा ३) सल्फ्युरीक अँसिड ४) मीर उस्मान अली खान असफ जाह, हैदराबाद संस्थानचा सातवा निजाम ५) o रक्तगट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री प्रकाश नाईक, गटविकास अधिकारी👤 प्रभाकर देशमुख, सहशिक्षक, बिलोली👤 शिवाजी सूर्यवंशी, सहशिक्षक, देगलूर👤 स्वप्नील शिंदे👤 नरेश गौतम👤 अनुपमा अजय मुंजे👤 संतोष चव्हाण, सहशिक्षक, नांदेड👤 अवधूतवार साई किरण, बोधन👤 प्रमोद मंगनाळे, सहशिक्षक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शंभर लोकांमध्ये जर.. आपण उपस्थित असाल..व स्वतः आपला कोणालाही परीचय न देता एका माणसाने जर...आपल्याला ओळखले असेल तर..हि सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण, ते सर्व लोक आपले असतील असेही नाही त्यातील एक माणूस सुद्धा आपला मार्गदर्शक, मित्र,गुरु व प्रेरणास्थान असू शकतो. त्या माणसाचा सन्मान करावे व तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचाही आदर करावे.आणि त्याच क्षणी वेळ वाया न घालवता स्वतः लाही ओळखावे आपली ओळख आपल्यालाच होईल. .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चोरावर मोर*रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला. 'हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोऱ्या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला. त्या रडणाऱ्या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, 'काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, 'मी या विहिरीत किती पाणि आहे हे पाहण्य़ासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.' तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचक त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, 'बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळ; मी तुला तुझी कंठी तुला विहिरीतून काढून देतो.' त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं, तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, विहिरीच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला. गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलीसांकडे नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षिस दिले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पंधरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7301148706568148/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *१० जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_मातृसुरक्षा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ’मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर**२०००:नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.**१९९५:म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता**१९९२:संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण**१९९२:मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.**१९७८:मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.**१९७८:मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.**१९७३:पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.**१९७३:बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९६२:’टेलस्टार-१’ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित**१९४७:ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.**१९४०:'बॅटल् ऑफ ब्रिटन' या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉबफेक सुरू केली. इंग्लिश हवाईदलाने जर्मनांचा यशस्वी प्रतिकार केला.**१९२५:’तास’ या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना**१९२३:मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.**१८९०:वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:एकनाथ विश्वनाथ पवार-- कवी, लेखक व चित्रपट गीतकार**१९८२:शंकर अभिमान कसबे -- नवोदित कवी,नियतकालिकांतून लेखन**१९८०:युवराज भुजंगराव माने-- लेखक* *१९८०:प्रा.डॉ.सखाराम डाखोरे-- कवी* *१९७८:सचिन वसंत पाटील -- प्रसिद्ध कथाकार* *१९६२: सुभाष प्रभाकर सबनीस-- लेखक, कवी**१९५९:तुकाराम पुंडलिक खिल्लारे-- कवी**१९५४: रविराज गंधे-- माध्यमतज्ज्ञ, लेखक-पत्रकार**१९५१: राजनाथ सिंह केंद्रिय संरक्षणमंत्री उतर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५०:’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका**१९४९:सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर – क्रिकेटपटू व समालोचक तथा लेखक**१९४७:ल.म.कडू-- चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक* *१९४४:डॉ.भास्कर व्यंकटराव गिरिधारी -- लेखक,वक्ते, प्रवचनकार* *१९४३:आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)**१९४१:अनिल दहिवाडकर -- प्रसिद्ध लेखक व प्रकाशक* *१९४०:लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद**१९३९:डॉ.विश्वास मेहेंदळे-- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते(मृत्यू:९ जानेवारी २०२३)**१९२३:गुरूनाथ आबाजी तथा जी.ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)**१९२१:असद भोपाली -- भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार(मृत्यू:९ जून १९९०)**१९१३:पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)**१९०३:रामचंद्र भिकाजी जोशी-- प्रवासवर्णनकार, समीक्षक(मृत्यू:६ नोव्हेंबर १९९१)**१८८३:दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन-- पहिले भारतीय वैमानिक(मृत्यू:१८ ऑक्टोबर १९४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:मंगेश तेंडुलकर -- जेष्ठ व्यंगचित्रकार (जन्म:१५ नोव्हेंबर १९३६)**२००५:जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)**१९९५:डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष* *१९८९:प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक(जन्म:९ जानेवारी १९१८)* *१९८६:शंकरराव श्रीपाद बोडस-- शास्त्रीय गायक (जन्म:२० एप्रिल १९००)**१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (जन्म: १८ डिसेंबर १८८७)**१९६९:डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सीएसएमटी स्थानकाचं लवकरच कायापालट होणार, 2400 कोटी खर्च करुन स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करुन 303 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेचा विक्रमी महसूल जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ * 'लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही', पोहरादेवीतून उद्धव ठाकरे यांचं विरोधकांवर टीकास्त्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळं आजारांचं प्रमाण वाढलं, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी वैज्ञानिकांनी प्रयत्न करावेत : केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मांडवीय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'भारतासारखी मदत आतापर्यंत कोणीही केली नाही'; वाईट आर्थिक संकटातून सावरल्याबद्दल श्रीलंकेने मानले भारताचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्ली, हिमाचल, पंजाबसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC विश्वचषक पात्रता फेरीत श्रीलंकेने नेदरलँडचा केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ऐक्य हेच बळ ते केवळ सुवचन नसून जीवनधर्म आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) लंडनमध्ये 'गव्हर्नर ऑफ द इयर' या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) स्वदेशी निर्मित असलेल्या 'सेमी हाय स्पीड ट्रेन - १८' चे नामकरण २०१९ मध्ये कोणत्या नावाने करण्यात आले ?३) 'माय रशिया - वॉर ऑर पीस' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) वनस्पतीचा कोणता अवयव जमिनीत वाढतो ?५) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती ?*उत्तरे :-* १) शक्तिकांत दास २) वंदे भारत एक्सप्रेस ३) मिखाईल शिष्किन ४) मूळ ५) १० जून १९९९*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ज्ञानेश्वर जगताप, सहशिक्षक, मुखेड👤 भागवत गरकल👤 लक्ष्मण मुंडकर, बिलोली👤 मिलिंद चवरे, नांदेड👤 प्रकाश येलमे, धर्माबाद👤 महेश पांडुरंग लबडे, छ. संभाजीनगर👤 शिवाजी वासरे👤 गणेश अंगरवार👤 संतोषकुमार यशवंतकर👤 बालाजी दुसेवार👤 दत्तात्रय धूळशेट्टे, माजी गटशिक्षणाधिकारी👤 प्रियंका घुमडे👤 मन्सूर शेख👤 पिराजी चन्नावार👤 नागनाथ वाढवणे, सहशिक्षक, बिलोली👤 दगडू गारकर, लातूर👤 युवराज माने, बीड👤 लक्ष्मीकांत पडोळे👤 चरणसिंह चौहान👤 विठ्ठल रामलू चिंचलोड, हैद्राबाद👤 कृष्णा चिंचलोड, येवती👤 अभिजित वऱ्हाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदैव सत्याच्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तीला लागलेला कलंक हा कोळशा पेक्षा काळा असतो तसच त्याच व्यक्तीला पुन्हा कलंक लावण्यासाठी दहा लोक नेहमीच सज्ज असतात. हे वास्तव सत्य आहे. तरीही ती व्यक्ती सत्याच्या बाजूने उभे राहून प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करते. अशा विचाराची व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. म्हणून ती, व्यक्ती कोणाचाही विरोध करत नाही व व्यर्थ गोष्टींना साथ देत नाही. आपणही त्याच व्यक्तीकडून थोडं शिकण्याचा प्रयत्न करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याची कला*एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणर्यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात? बुद्ध म्हणाले, मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे. मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो. मुलाने विचारले, ते कसे काय? बुद्ध म्हणाले, त्याची जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते. त्याला त्याची चूक कळून आली. तात्पर्य : ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!चौदावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7295910263758659/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••२०११ - भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली*जन्मदिवस*१९१४ - ज्योती बसू, बंगाली राजकारणी.१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.१९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.*मृत्यू*२००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *समृद्धी महामार्गावरील बुलढाणा बस अपघातातील बसचालक मद्यधुंद अवस्थेत, फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक माहिती समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल गांधींना कोर्टाचा दणका, गुजरात हायकोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ? राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *HDFC चे कर्ज महागले; ग्राहकांवर EMI चा भार वाढणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यांआधी यशस्वी जयस्वालने त्याच्या दमदार कामगिरीने वेधलं लक्ष.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सौरव गांगुली*सौरव गांगुली डावखुरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे. त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत. गांगुली भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे. याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत. गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,०००धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला. याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता. क्रिकेट विश्वात दादा या नावाने प्रसिद्ध होते. काही काळ त्यांनी BCCI चे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान आणि कर्म जीवनाचे पंख आहेत. यामुळे सुखरूपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो.➖जैन विचारदर्शन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) *'मुख्य निवडकर्ता '* म्हणून कोणाची निवड केली आहे ?२) महात्मा फुले यांनी कोणत्या ब्राम्हण विधवेला आत्महत्येपासून परावृत्त केले ?३) जगातील सर्वात मोठे उद्योग क्षेत्र कोणते ?४) महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणाला म्हटले जाते ?५) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अजित आगरकर, माजी गोलंदाज २) काशीबाई ३) कच्चे तेल ४) कर्मवीर भाऊराव पाटील ५) देवेंद्र फडणवीस व अजित पवार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पवार👤 सुरेश तायडे👤 अनिल भेदरे👤 अहमद काझी👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी👤 मल्लेश भूमन्ना बियानवाड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं सर्वच चांगलं आहे आणि इतरांचं सर्वच वाईट असते या प्रकारची जर...आपली विचारसरणी असेल तर ते, व्यर्थ आहे कारण, आपल्या परीने जर..आपले चांगलेच असेल तर...इतरांचेही त्यांच्या परीने थोडं तरी चांगले असू शकते प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असू शकतात. म्हणून उगाचच नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दोघां भावातील खटला*एकदा एक गावात, दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.तात्पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवले पाहिजे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
विषय - मराठी http://www.pramilasenkude.blogspot.com 📚उपक्रम📚 शब्द वाचूया, शब्द लिहूया.🌺शब्दटोपली क्र. (२)🌺 *पान, फळा, ससा, ताक, चाक, नाव,पळा,दादा, बाबा, काका,मामा,ताई,राम,शाम,चला, वाच, नाग, काम,ढाल,छान,पाट, मका,भात,तास,आठ,खाता, कसा,मासा,पारा, काय, मला, आला, वाट,आता, वारा, मजा,राजा,बाळा, शाळा, दार, वाघ, ससा, तारा,फार , माझा,कान, नाक,मान,पाय,टाका, टापा,सात,बारा,दात, कार,पाच,घाम,घार,वाद,झाड,दान,वात,वाडा,ज्ञान ,आज्ञा, कासव,भारत, सकाळ, नाचत,बछडा,पारवा, कावळा, खाताना,धरला, आणला, एकदा,अकरा, बाजार, आकाश, वापर,लहान, आपला,पाचवा,ढगाळ,चालला,सामान,वादळ ,आवाज,दारात,खारट,सावध,हातात,गारवा,धावत,चालत,जहाज, भाकर,शासन.* --------------------------✍️संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड
विषय - मराठी http://www.pramilasenkude.blogspot.com 📚 उपक्रम 📚 शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍ *🌺शब्दटोपली क्र. (१)🌺* *घर, नळ, कप, ऊस, समई, पपई, मगर , गवत, अहमद, अमर , टपटप , ढग , बघ , हसत, लवकर, उठ,आई, पाऊस, बघ, रमण, उगम, हळद, करण, गरम,फळ, कढई, जखम,वड, खडखड, बडबड, बबन,भरत, सरळ,परत,धरण, पण,थरथर ,दगड,गगन,जल,नग,नगर ,नमन,नऊ,छगन,खत,कसरत,कटकट,गडगड,घड,चरण,छत,जवस, वर, फणस, अननस, परस, वरण, सण, चल, भरभर, सरसर,गरज, पटकन, सरबत.* ---------------------------✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.ता.हदगाव जि.नांदेड.
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जुलै 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!तेरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7291567597526259/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *७ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.**१९८५:विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.**१९७८:सॉलोमन बेटांना (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४१:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.**१९१०:इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.**१८९८:हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.**१८९६:मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.**१८५४:कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी भारतातील पहिली कापडगिरणी मात्र भडोच येथे तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी नागपूरला सुरू झाली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:संतोष इमलीबाई पिचा पावरा-- कवी, लेखक* *१९८७: नवनाथ सोपान गोरे -- लेखक* *१९८१: महेंद्रसिंह धोनी – प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी माजी कर्णधार* *१९७७:हनुमंत चांदगुडे -- प्रसिद्ध कवी, गीतकार* *१९७३:कैलाश खेर-- प्रसिद्ध भारतीय पॉप-रॉक गायक**१९७०:छाया बेले -- कवयित्री,लेखिका* *१९६९: ज्योती धर्माधिकारी-- कवयित्री, लेखिका**१९६९: नरेंद्र सा.गुळघाणे-- कवी* *१९६५: प्रज्ञा दत्तात्रय घोडके-- कवयित्री, लेखिका* *१९६२:पद्मजा फेणे-जोगळेकर-- सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका**१९५५:डॉ.दत्तात्रेय तापकीर-- प्रसिद्ध लेखक**१९५०:पांडुरंग गायकवाड -- जेष्ठ लेखक* *१९४८:पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)**१९४८:सुभदा साने-- लेखिका, बालसाहित्यिक* *१९४७:राजे ग्यानेंद्र – नेपाळ नरेश**१९३३:श्यामकांत विष्णू कुलकर्णी--कवी, कादंबरीकार, कथाकार, लेखक (मृत्यू:२६ जानेवारी २०२२)* *१९३२:प.झो.उपाख्य अविनाश वरोकर- कवी लेखक* *१९२३:प्रा.लक्ष्मण गणेश जोग – कथाकार, कादंबरीकार, समीक्षक(मृत्यू:२५ जून १९८०)* *१९१४:अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार (मृत्यू: ३१ मे २००३)**१९०९: विनायक शामराव काळे-- कवी* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:दिलिप कुमार- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता (जन्म:११ डिसेंबर १९२२)**२०२०:रवी दाते-- ज्येष्ठ संगीतकार, गझलगायक आणि तबलावादक(जन्म:३ डिसेंबर १९३९)* *२०१३:सुधाकर बोकाडे-- भारतीय चित्रपट निर्माता(जन्म:१९५६)**१९३०:सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ’शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक (जन्म: २२ मे १८५९)**१३०७:एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म:१७ जून १२३९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *MPSC तर्फे घेण्यात आलेल्या PSI व STI परीक्षेचा निकाल जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीएचडी असल्यास नेट-सेट ची गरज नाही, यूजीसीचे स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चांद्रयान - 3 चे 14 जुलै रोजी होणार प्रक्षेपण, इस्रोची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाज्यांचे दर गगनाला, सामान्यांच्या बजेटला मोठी कात्री.. समस्यांमुळे जनता कोमात, राजकारण मात्र जोमात.. पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या, शेतकरी मेटाकुटीला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नेदरलँड्सच्या संघाने पात्रता फेरीत स्कॉटलंडला चार विकेट्स राखून पराभूत केले आणि त्यांनी विश्वचषकात दिमाखात प्रवेश केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी*महेंद्र सिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी राजपूत परिवारा मध्ये रांची येथे झाला. 'माही' व 'एम.एस.' या नावाने तो ओळखला जातो. त्या सोबतच तो 'कॅप्टन कूल' या नावाने देखील ओळखल्या जातो. त्याने २००७ पासून २०१६ पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये आणि २००८ पासून २०१४ पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले आहे. धोनी यांच्या नेतृत्वात २००७ च्या आयसीसी विश्वचषक टी -२०, २०१० आणि २०१६ आशिया कप, २०११ आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनी उजव्या हाताने फलंदाजी व विकेटकीपिंग करतो. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. धोनीने १०,०००पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये तो प्रभावी "फिनिशर" मानला जातो.*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा**संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर मुख हे व्यक्तीचे शिफारस पत्र आहे, तर सुंदर हृदय हे विश्वासपत्र आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'परमवीर चक्र - द टायगर्स ऑफ इंडियन वॉर्स'* या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत परिषद केव्हा घेतली ?३) फुटबॉल ची संस्कृती तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कोणत्या राज्याने *'फुटबॉल फॉर ऑल'* हा उपक्रम सुरू केला आहे ?४) विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये लावण्यात येत असलेल्या ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला ?५) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) शिवाजीराव बडे, अहमदनगर २) १ जून १९३६ ३) ओडिसा ४) डेव्हिड वॉरेन, ऑस्ट्रेलिया ५) महात्मा फुले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गजानन काठेवाडे, पीएसआय 👤 ऋषिकेश देशमुख, साहित्यिक, देगलूर👤 साईनाथ हामंद, करखेली👤 लक्ष्मण कांबळे👤 महेश जोशी, पत्रकार, धर्माबाद👤 दत्ताहरी पाटील कदम बेलगुजरीकर👤 जगन्नाथ पुलकंठवार, धर्माबाद👤 सय्यद युनूस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक👤 शंकर रामलू बलीकोंडावार👤 बाशेट्टी नागेश👤 बाळासाहेब पेंडलोड👤 श्रीकांत माने, धर्माबाद👤 प्रकाश गोरठकर👤 विजय पाटील रातोळीकर👤 ज्वालासिंह घायाळे👤 दिगंबर पांचाळ👤 हरिओम रामोड👤 व्यंकट ताटेवाड👤 पिराजी कटकमवार👤 पोषट्टी जाजेवार👤 संदीप डोंगरे👤 हणमंत जाधव👤 प्रज्ञा घोडके👤 रमेश चांडक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर आलेली चांगली, वाईट परिस्थिती किंवा नकळत आलेला एखादा भयानक प्रसंग जसा येतो तसाच एक, ना एक दिवस निघूनही जात असतो.पण, त्यावेळी ती,परिस्थिती बघून कोण आपुलकीने आपल्याला साथ देतो व कोण पाठ फिरवतो खरी माणसाची ओळख त्याच वेळी होत असते. म्हणून आपुलकीने साथ देणाऱ्याला कधीच विसरू नये व दिखावूपणाची आपुलकी दाखवून गोड बोलणाऱ्यावर मुळात विश्वास करू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लांडगा आला रे आला*एका गावात एक धनगर होता. त्याला दीपक नावाचा मुलगा होता. दीपक रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत. एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला.' लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा'. तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, 'कशी गंमत केली.' शेतकरी संतापले. पण काय करणार, तसेच निघून गेले.दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसर्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा दीपक कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले. तिसर्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला. दीपक जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. दीपक आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता. तात्पर्य : थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जुलै 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!बारावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7289700271046325/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *६ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.**१९८२:पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.**१९१०:भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची (Bhandarkar Oriental Research Institute) पुणे येथे स्थापना**१८९२:ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.**१८८५:लुई पाश्चर याने रेबीज या रोगावरील लशीची यशस्वी चाचणी केली.**१७८५’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.**१७३५:मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:रणवीर सिंग( रणवीर सिंग भवनानी) हिन्दी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता**१९७८:तन्वी अमित-- कवयित्री लेखिका* *१९७२:प्रा.डॉ विशाखा संजय कांबळे-- कवयित्री, लेखिका, संपादिका, संशोधक* *१९६७:ज्योती वामन बन्सोड (पांगुळ) -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९६१:अशोक शिंदे -- जेष्ठ मराठी अभिनेते* *१९५२:रेखा शिवकुमार बैजल – जेष्ठ मराठी व हिंदी लेखिका**१९४६:जॉर्ज डब्ल्यू. बुश–अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष**१९४३:कालिदास गणपतराव चिंचोळकर-- लेखक* *१९४१:अरविंद नारखेडे-- जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९३९:अरविंद प्रभाकर जामखेडकर --पुरातत्त्वशास्त्रज्ञ व इतिहासकार प्राच्यविद्या पंडित**१९३२: सिंधूताई मांडवकर-- जेष्ठ लेखिका* *१९३०:डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)**१९२७:व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)**१९२०:डॉ.विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ,’त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले (३० जुलै १९९५)**१९०५:लक्ष्मीबाई केळकर – लेखिका,राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)**१९०१:डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी –माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (मृत्यू: २३ जून १९५३)**१८८१:संत गुलाबराव महाराज--महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)**१८६२:एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)**१८३७:सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)**१७८१:सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (मृत्यू: ५ जुलै १८२६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००२:धीरुभाई अंबानी – उद्योगपती (जन्म: २८ डिसेंबर १९३२)**१९९९:एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज (जन्म: ३ मार्च १९३९)**१९९७:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ३ जानेवारी १९२१)**१९८६:’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)**१८५४:जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिकची पाणीकपात टळली! पाणीसाठा वाढला, गंगापूर धरण 31 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 88 टक्क्यांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईतील चुनाभट्टी येथे 50 फूट खोलपर्यंत जमीन खचली; जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुढील आदेश येईपर्यंत धाराशिवचे नाव उस्मानाबादच असणार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संभाजीनगर शहरातील हवेची गुणवत्ता मोजायला मनपा बसवणार 30 यंत्र, भुवनेश्वरस्थित 'ऑराशूअर' कंपनीसोबत केला करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *SAFF फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत, पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात 'चक दे इंडिया'चे नारे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संकष्टी चतुर्थी*हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू कॅलेंडरमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो (अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवडा). ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थी दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. १. मिठाची संकष्ट चतुर्थी व २. पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवतात. यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे. त्यानंतर भोजन करतात. या व्रताचा काल आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर मुख हे व्यक्तीचे शिफारस पत्र आहे, तर सुंदर हृदय हे विश्वासपत्र आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विविधांगी शैक्षणिक उपक्रमावर आधारित *'सृजनशाळा'* या पुस्तकाचे लेखक कोण ?२) हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिलं गाणं कोणतं ?३) UCC चा full form काय आहे ?४) भारताचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला संबोधले जाते ?५) एका मानवी किडनीचे वजन किती असते ?*उत्तरे :-* १) गुलाब बिसेन, गोंदिया २) दे दे खुदा के नाम पे प्यारे ( आलमआरा ) ३) Uniform Civil Code ४) स्वामी दयानंद सरस्वती ५) १५० ग्रॅम *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक इमनेलू, सहशिक्षक, धर्माबाद👤 आबासाहेब उस्केलवार, विषय शिक्षक, धर्माबाद👤 शंकर सोनटक्के, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 मोहन भूमकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 संतोष मानेलू, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीकांत पुलकंठवार, धर्माबाद👤 रेवती गायकवाड👤 बरकत खान👤 अभय कासराळीकर👤 अर्फत इनामदार👤 नारायण वानोळे👤 मधुकर कांबळे👤 शंकर स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नि:स्वार्थ भावनेने जे इतरांना द्यायला शिकतात त्यांना कोणाकडूनही घेण्याची अपेक्षा मुळातच नसते कारण अपेक्षा ठेवून ते दु:खाचे कारण बनत नाही. आणि होऊ शकेल तर..आपल्या परीने शेवटच्या क्षणापर्यंत ते देण्यासाठी धडपडतच असतात. आपण ही तशाच व्यक्तीकडून थोडं तरी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जेथे अपेक्षा केली जात नाही तर. .फक्त माणुसकी धर्म निभावून दाखवला जातो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी स्पर्श* ही गोष्ट एका लोभी श्रीमंत माणसाची आहे. एकदा वाटेत त्याला परी भेटली. परीचे केस झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले होते. पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे असा विचार करून, त्याने परीला मदतीच्या बदल्यात एक वर मागितला. तो म्हणाला "मी ज्याला स्पर्श करीन त्याचे सोन्यात रूपांतर झालं पाहिजे”. त्याची ही इच्छा कृतज्ञ परीने मान्य केली. लोभी मनुष्य त्याला मिळालेल्या नवीन वराविषयी, आपल्या मुलीला आणि बायकोला सांगण्यासाठी घराकडे धावला. सगळा वेळ दगड, गोट्यांना स्पर्श करून सोन्यात रूपांतर करीत राहिला. तो घरी आला तेव्हा त्याची मुलगी त्याच्याकडे धावत येऊन त्याला बिलगली. तो तिला कडेवर घेण्यासाठी खाली वाकला, मुलीला त्याचा स्पर्श होताच मुलीचे रूपांतर सोनेरी पुतळ्यात झाले. त्याला त्याची चूक लक्षात आली आणि नंतर तो मनुष्य, परीने दिलेला वर मागे घेण्यासाठी तिला शोधू लागला. तात्पर्य: लोभीपणा अधोगतीला कारणीभूत असतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!अकरावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7286872121329140/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *५ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००९:अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.**१९९७:स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.**१९९६:संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर**१९७७:पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव – झुल्फिकार अली भूट्टो तुरुंगात**१९७५:विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बनला.**१९७५:’केप व्हर्डे’ला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९७५:’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.**१९६२:अल्जीरीयाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९५०:इस्रायेलच्या क्वेन्सेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.**१९१३किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली.**१८८४:जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.**१८३०:फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.**१८११:व्हेनेझुएलाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:प्रा.डॉ.आनंद अहिरे -- कवी लेखक* *१९८५:राहुल गोविंद निकम-- कवी लेखक**१९८५:अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९८०: डॉ. चत्रभूज कदम-- लेखक संपादक* *१९७९: आनंद वासुदेव वाडे-- कवी* *१९७८:मारोती माधव काळबांडे -- कवी, लेखक* *१९७८:प्रा.डॉ.कैलास अंभुरे -- प्रसिद्ध लेखक* *१९७७: नवनाथ विष्णू गडेकर -- कवी* *१९७६:मंदा धनराज सुगिरे-- लेखिका, कवयित्री* *१९७३:डॉ स्मिता प्रमोद पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७३:गीता कपूर-- हिंदी चित्रपटांची (बॉलिवूड) कोरियोग्राफर**१९६६:प्रा.डॉ.बाबाराव मारोती ठावरी -- लेखक* *१९६३:लक्ष्मण मलगिलवार- प्रसिद्ध कवी, संपादक* *१९६२:डॉ.साहेब रामराव खंदारे -- कवी, समीक्षक,संपादक* *१९५८:अनुप वसंतराव गोसावी-- कथाकार**१९५७:अशोक हांडे-- मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक व नाटककार**१९५७:पांडुरंग वसंत कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५४:डॉ.कैलास शंकरराव कमोद-- लेखक, नाशिकचे अभ्यासक* *१९५४:जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९५४: नारायण गजीराम थोरात -- कवी**१९५२:रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २०००)**१९४९:पांडुरंग मोरे -- कथाकार* *१९४६:राम विलास पासवान – माजी केंद्रीय मंत्री,आणि लोक जनशक्ती पक्षाचे माजीअध्यक्ष(मृत्यू: ८ ऑक्टोबर, २०२०)**१९४३:बाळकृष्ण गणपतराव कवठेकर-- जेष्ठ साहित्यिक व समीक्षक**१९३३:सुरेंद्र आत्माराम गावस्कर-- सूचिकार, संपादक (मृत्यू:१३ जानेवारी १९७९)**१९२५:नवल किशोर शर्मा – माजी केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल(मृत्यू:८ आक्टोबर २०१२)**१९२०:आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)**१९१६:के. करुणाकरन – माजी केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)**१९१२:दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे---पत्रकार, कथाकार, विनोदकार, अनुवादक(मृत्यू:६ ऑगस्ट १९८३)**१८८२:हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:तुळशी परब-- कवी (जन्म:३० सप्टेंबर १९४१)**२००५:बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)**१९९६:चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – प्रसिद्ध रहस्यकथाकार(जन्म:९ जून १९०६)* *१८२६:सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री शिंदे यांच्या आरोग्य वारी संकल्पनेत 12 लाख वारकऱ्यांची झाली आरोग्य तपासणी, आरोग्य विभागाने दिली आकडेवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *म्हाडाच्या 4082 सदनिकांसाठी आतापर्यंत एक लाख ऑनलाईन अर्ज; 10 जुलै अंतिम मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समान नागरी कायद्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, पण मसुदा तयार झाल्याशिवाय निर्णय नाही, महाराष्ट्र दौराही करणार, विदर्भातून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजपकडून महत्त्वाचे निर्णय; चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू*पी. व्ही. सिंधू ( पुसारला वेंकट सिंधू ) या भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. सिंधूने 2016 च्या ब्राझीलमधील रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तसेच, ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी सिंधू ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. ती सध्या भारताची राष्ट्रीय विजेती आहे. 2012 मध्ये तिने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या टॉप 20 मध्ये स्थान मिळवले. 10 ऑगस्ट 2013 रोजी, पीव्ही सिंधू जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. पीव्ही सिंधू हैदराबादमधील 'गोपीचंद बॅडमिंटन अकादमी'मध्ये प्रशिक्षण घेते आणि 'ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट' नावाच्या ना-नफा संस्थेद्वारे समर्थित आहे. तिचा जन्म 5 जुलै 1995 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत येथे झाला.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानी मनुष्य हा स्वर्ग बनवू शकतो.➖स्वामी शिवानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय आहे ?२) माऊंट अबू कोणत्या पर्वत रांगेत आहे ?३) धावणे शर्यतीच्या मैदानास काय म्हणतात ?४) कोणार्क येथील सूर्यमंदिराला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?५) संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) नामदेव दामाशेटी रेळेकर २) अरवली ३) ट्रॅक ४) ब्लॅक पँगोडा ५) सीपीयू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. मनोज तानुरकर, धर्माबाद 👤 नरेश शिलारवार, आर्ट लाईफ, धर्माबाद👤 सुधाकर चिलकेवार, धर्माबाद👤 गंगाधर कांबळे, धर्माबाद👤 विजय प्रकाश पाटील गाडीवान, धर्माबाद👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद👤 मोतीराम तोटलोड, धर्माबाद👤 नागनाथ भत्ते, धर्माबाद👤 गणपत बडूरकर, धर्माबाद👤 सुदर्शन जावळे पाटील👤 राजरेड्डी बोमानवाड👤 मारोती कदम👤 सुभाष कुलकर्णी👤 चक्रधर ढगे पाटील👤 किशन कावडे👤 अनिल गायकांबळे👤 संभाजी कदम👤 संतोष शेळके, साहित्यिक👤 गजानन बुद्रुक, कळमनुरी👤 गिरीश कहाळेकर👤 फारुख शेख👤 अजय चव्हाण👤 अशोक पाटील👤 रमेश अबुलकोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रास त्यालाच होतो ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते.ज्याला ह्या साऱ्या गोष्टींविषयी काही वाटत नाही कारण त्याला काहीही फरक पडत नाही . म्हणून आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल पण, चुकीच्या वाटेवर चालून आपल्या जीवनाची दिशा कधीही बदलवू नये. व नको त्या आहारी जाऊन साथ देऊ नये. कारण त्रास आणि दु:ख भलाही कठोर असले तरी आपले मार्गदर्शक सुध्दा असू शकतात हे विसरता कामा नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वार्थी मांजर*एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.तात्पर्य :- स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!दहावा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7284168791599473/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *४ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:लष्कराच्या १८ व्या बटालियनने कारगिलमधील द्रास या उपविभागातील ’टायगर हिल्स’ हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला. याबद्दल लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी १८ व्या युनिटला ’युनिट सायटेशन’ हा विशेष सन्मान जाहीर केला.**१९९७:’नासा’चे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.**१९९५:टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान**१९४७:ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारताचे ‘भारत‘ व ‘पाकिस्तान‘ असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.**१९४६:सुमारे ३८१ वर्षे परकीय सत्तांनी राज्य केल्यानंतर फिलीपाइन्सला (अमेरिकेपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९३६:’अमरज्योती’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईच्या ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला.**१८२६;अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचे निधन झाले.**१७७६:अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासुन स्वतंत्र घोषित केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:गोविंद दत्तराम कवळे -- कवी**१९८०:संजय माणिक राठोड-- कवी,लेखक**१९७३:वृषाली सानप-काळे- मराठी आणि हिंदी भाषेतून लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९७०:शिल्पा देवळेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६६:डॉ.प्रभाकर शेळके-- कवी,कथाकार* *१९६५:रमेश पांडुरंग तांबे-- लेखक,कवी* *१९६०:देवेंद्र भुजबळ-- लेखक,संपादक तथा माजी माहिती संचालक* *१९५६:डॉ.संजीवनी मुळे- लेखिका,कवयित्री**१९५४: डॉ सुनंदा देशपांडे-- लेखिका* *१९४७:गणेश आप्पासाहेब धांडगे -- कादंबरीकार कथाकार* *१९४७:डॉ.आनंद पाटील -- जेष्ठ साहित्यिक* *१९३३:डॉ.अरविंद वामन कुलकर्णी-- प्रख्यात समीक्षक,लेखक,कवी(मृत्यू:२९ ऑक्टोबर २००३)**१९२६:विनायक आदिनाथ तथा ’वि.आ.’ बुवा – विनोदी साहित्यिक(मृत्यू: १७ एप्रिल २०११)**१९१४:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ –भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)**१९१२:पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९९४)**१८९८:गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (मृत्यू:१५ जानेवारी १९९८)**१८९०: नारायण केशव बेहेरे -- कवी, कादंबरीकार काव्य समीक्षक (मृत्यू:१९ जानेवारी १९५८)**१८९०:क्षमादेवी राघवेंद्र राव--संस्कृत भाषातज्ज्ञ(मृत्यू,:२४ एप्रिल:१९५४)**१८७२:काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)**१७९०:भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट (मृत्यू: १ डिमेंबर १८६६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:वसंत शिंदे – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ मे १९०९)**१९८२:भरत व्यास – भक्तिप्रधान, पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपटांचे गीतकार (जन्म: १९१८)**१९८०:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.(जन्म:२४ एप्रिल १८९६)**१९६३:पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार (जन्म:२ ऑगस्ट १८७६)**१९३४:मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७)**१९०२:स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली.(जन्म: १२ जानेवारी १८६३)**१८३१:जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ एप्रिल १७५८)**१८२६:थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (जन्म: १३ एप्रिल १७४३)**१८२६:जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (जन्म: ३० आक्टोबर १७३५)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कचरा वर्गीकरण न झाल्यास झोन अधिकाऱ्यांचे पगार थांबवले जाणार; संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा; आज दुपारी कॅबिनेटची बैठक, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत परत; आरबीआयचा खुलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवघ्या 999 रुपयांत जिओने आणला 4G फोन; महिन्याचा रिचार्ज फक्त 123 रुपयांत, 07 जुलै रोजी होणार चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका; जयंत पाटील यांचे पत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अशेस मालिकेतील लॉर्ड्स कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 43 धावांनी विजय मिळवला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतकार पी. सावळाराम*निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३ - २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते.मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले.भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते.पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती.पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.२०१० साली हा पुरस्कार संगीतकार यशवंत देव, २०१२ साली तो गायक सुरेश वाडकर तर २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना मिळाला होता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा, तो स्वर्गाचे फुल बनवतो.➖रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894Q••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'बटाट्याची चाळ' हे विनोदी पुस्तक कुणी लिहिले ?२) LCD चे Full Form काय आहे ?३) अंजिठा येथे एकूण किती लेण्या आहेत ?४) जगातील सर्वात मोठा असणारा अर्धा पृथ्वीगोल अमेरिकेतील कोणत्या ठिकाणी आहे ?५) मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी कोणते ?*उत्तरे :-* १) पु. ल. देशपांडे २) Liquid Crystal Display ३) २९ लेण्या ४) यारमथ ५) गिधाडे, कोल्हे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोविंद कवळे, साहित्यिक, उमरी👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड👤 बालाजी मंडलेकर, देगलूर👤 गणेश मंडाळे👤 प्रभाकर शेळके, साहित्यिक👤 प्रदीप यादव👤 श्याम उपरे👤 अविनाश खोकले👤 उदय स्वामी👤 परमेश्वर मेहेत्रे👤 बंडू अंबटकर👤 कमलाकर जमदाडे👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक👤 श्रीपाद वसंत जोशी👤 राजकुमार बिरादार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की, आपल्याला करायचं असते एक अन् होऊन जातं दुसरचं अशा वेळी निराश होऊ नये व खचून जाऊ नये. चांगले होण्यासाठी थोडा उशीर सुद्धा लागू शकतो. एवढेच नाही तर त्यावेळी काही अडी,अडचणी,प्रसंग येत असतात त्यांना पार करण्यासाठी आपल्यात हिंमत असायला पाहिजे सोबत प्रयत्न करणे आवश्यक आहे शेवटी सर्वच चांगले होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वेळेचे महत्व*एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.तात्पर्य - जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जुलै 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व गुरुवर्य मंडळींना साष्टांग दंडवत *कथा - नवऱ्याचे मी पण*माणसाचे नशीब कसे असते ? क्षणात काय घडणार आहे ? याची जराशी देखील कल्पना नसते. क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. दैव, नशीब, प्रारब्ध, ललाटरेषा आधारित फेसबुकच्या आम्ही साहित्यिक समुहात प्रचंड गाजलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!नववा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7283425418340477/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *३ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.**२००१:सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ’गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**२०००:विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.**१९९८:’ए मेरे वतन के लोगो ...’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर**१९३८:'मॅलार्ड' हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.**१८९०:आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.**१८८६:जर्मनीच्या कार्ल बेन्झ याने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.**१८८४:डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.**१८५५:भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.**१८५२:महात्मा फुले यांनी गरीब मुलांसाठी पहिली शाळा काढली.**१६०८:सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्वेबेक शहराची स्थापना केली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: तान्हाजी भगवान खोडे -- कवी* *१९८०:हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू**१९७६:हेन्री ओलोंगा – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू**१९७१:सपना अशोक बन्सोड -- कवयित्री* *१९६७:तिग्मांशु धुलिया-- भारतीय चित्रपट संवाद लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक, निर्माता**१९६४: शमसाद मुजावर -- कवयित्री* *१९६३:श्रीकांत साहेबराव देशमुख-- मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक,सनदी अधिकारी* *१९५७:अनिल दाभाडे -- कवी,लेखक* *१९५६: विशाखा बागडे -- लेखिका, शिक्षणतज्ज्ञ* *१९५१:सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू**१९४६:प्रा.फ.म. शहाजिंदे (फकीरपाशा महेबूब शहाजिंदे)-- साहित्यिक,कवी,समीक्षक, समाजसेवक* *१९४२:प्रा.अ.वि.विश्वरूपे _ लेखक संस्कृत,इतिहास विषयाचे अभ्यासक* *१९२६:सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)**१९२१:प्रा.त्र्यंबक हरी लागू-- लेखक* *१९१४:दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)**१९१२:श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (मृत्यू: १६ जून १९७७)**१९०९:बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (मृत्यू: २२ मार्च २००४)**१९०२:द. ह.अग्निहोत्री -- कोशकार,भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक(मृत्यू:२२ नोव्हेंबर १९९० )**१८८६:रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (मृत्यू: ६ जून १९५७)**१८३८:मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:सरोज खान-- हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय नृत्यदिग्दर्शिका(जन्म:२२ नोव्हेंबर १९४८)**२००३:स्नेहलता दसनूरकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ(जन्म:७ मार्च १९१८)**१९९६:कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा सुप्रसिद्ध हिन्दी चित्रपट अभिनेता (जन्म: ८ आक्टोबर १९२६)**१९६९:ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूंकप; राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, अजितदादांना 35 आमदारांचा पाठिंबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट, जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, पेरण्या खोळंबल्यानं बळीराजा चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बम बम भोले... अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात, पहिल्याच दिवशी 7,900 भाविक बाबा बर्फानींच्या चरणी लीन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे :- भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी; पावसामुळे वातावरण बहरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कर्नाटकहून दिल्लीला जाणाऱ्या केके एक्सप्रेस इंजिनला आग; सुदैवाने जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय फुटबॉल संघाने (Team India) शानदार विजयासह सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजवर विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गुरुपौर्णिमा विशेष*गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे :गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा नावाची कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनु यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास! पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले. ऋषि पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.➖साने गुरुजी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पहिली शाळा केव्हा उघडली ?२) 'कॉम्प्युटरचा पितामह' कोणाला म्हटले जाते ?३) नळदुर्ग हा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्हयात आहे ?४) जगातील सर्वात क्षारयुक्त समुद्र कोणता ?५) टाकसाळ म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) ३ जुलै १८८६ २) चार्ल्स बॅबेज ३) धाराशिव ( जुने नाव उस्मानाबाद ) ४) मृत समुद्र ५) नाणी बनवण्याचा कारखाना*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय लक्ष्मणराव लंके👤 साहेबराव कांबळे👤 सविता सावंत👤 दिगंबर माने👤 बालाजी मुंडलोड👤 संतोष नलबलवार👤 श्रीराम पाटील👤 उत्तम पाटील नरवाडे, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यावर आलेल्या परिस्थितीवर जर कोणी खळखळून हसत असेल तर.. त्याचा तो मूळ स्वभाव असू शकतो. त्या प्रकारचा स्वभाव कधीच बदलत नाही. पण, आपला स्वभाव मात्र त्या प्रकारचा नसायला पाहिजे. तर..एकाद्याची अडचण,परिस्थिती जाणून आपुलकीच्या नात्याने दोन शब्द बोलण्याची तसेच समजून घेण्याची आपल्यात थोडीतरी माणुसकी जिवंत असायला पाहिजे. कारण, आजच्या घडीला या प्रकारची माणुसकी जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .साधुनी त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)