✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17Lvzvmj3X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तरुण भारत देश घडवू या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत एक दिवसीय दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 25 खाटांचे रुग्णालय, 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्यशासनाकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे पर्यटन महोत्सवात 60 हून अधिक टूर कंपन्यांचा सहभाग, 17 ते 19 जानेवारीला होटेल सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडणारा देशव्यापी उपक्रम, एमआयटी पुण्यात 16 जानेवारीला 'उद्योमोत्सव 2025'चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, युवा उद्योजक, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल रोटे👤 सतिश बोरखडे, शिक्षक👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकरंद - बा.सी.मर्ढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो दुसऱ्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही , त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. -- मुरारी बापू*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या खोखो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) शिक्षणासाठी प्रख्यात विद्यापीठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत ?३) हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा देण्यात आला ?४) 'शीघ्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चे आयोजन कोठे करण्यात आले ? *उत्तरे :-* १) प्रियंका इंगळे, बीड २) अमेरिका, १२९ विद्यापीठे ( भारत - १ विद्यापीठ ) ३) १४ सप्टेंबर १९४९ ४) जलद ५) भुवनेश्वर, ओडिशा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिजवणे* 📙 अग्नीचा शोध लागला आणि खाण्याच्या बाबतीत माणसाचे चोचले सुरू झाले. नैसर्गिक पदार्थ खाण्यातला आनंद माणूस खूपसा विसरलेलाच आहे. भारतातील खाण्याच्या सवयींचा विचार केला, तर पदार्थ शिजवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया झाल्याशिवाय आपले अन्न तयार होत नाही. भात शिजणे, भाजी शिजणे, आमटीसाठी डाळ शिजणे, उसळीला कडधान्य शिजणे वा कोंबडी या प्रत्येक बाबतीत 'शिजणे' हा एक टप्पाच असतो.अन्न शिजणे म्हणजे नेमके काय होते ? प्रत्येक वनस्पतीज पदार्थ हा पेशींनी बनलेला असतो. या पेशींना एक घट्टसर अशी सेल्युलोजची भिंत वा आवरण असते. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक व पेशीचा अन्नसाठाही असतो. अन्न शिजताना प्रथम नष्ट होते, ते सेल्युलोजचे आवरण. मग अन्नसाठ्याचे घट्ट पदार्थांत रूपांतर होते. केंद्रक तर नष्टच पावते. पेशीमधील द्रवपदार्थ एकमेकांत मिसळून जातात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखाद्या धान्याचे, भाजीचे, कोंबडीचे निरीक्षण केले, तर शिजवण्यापूर्वी सुस्पष्टपणे आढळणाऱ्या या सर्व गोष्टी शिजवल्यानंतर नाहीशा झालेल्या दिसतात. यामुळेच शिजवण्यापूर्वीची पालेभाजी शिजवल्यावर अगदी मऊ लागते. घट्टसर बटाटा मेणासारखा होतो. तांदळाचे कवच जाऊन त्याची पेस्ट बनू शकते. हे बदल झाल्यानंतर अन्न पुन्हा मूळ स्थितीत येऊ शकत नाही. पण या बदलांमुळे अन्नाच्या पचनासाठी मात्र मदत होऊ शकते. प्रत्येक बाबतीत 'सेलवॉल' नष्ट झाल्याने शरीरातील पाचकरसांची क्रिया सुलभ होते. प्राणिज पदार्थांमधील प्रथिने मानवी जठरातील पाचकरसांनी सहज पचत नाहीत. शिजवण्यामुळे ही क्रिया लवकर शक्य होते.अन्न शिजवणे ही क्रिया साधारणपणे थोडेसे पाणी घालून करण्याची पद्धत आहे. पाण्यामुळे उष्णता सर्वत्र पसरते व शिजणाऱ्या पदार्थातील विविध चवींचे रसही पदार्थात आतपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अन्न शिजताना निरनिराळे पदार्थ, मसाले, मीठ, तिखट, गोड व साखर घालण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व पदार्थांची एकजीव एकच चव येते. भाजी खाताना ती नीट शिजली नसेल, तर नुसती कच्चीच लागते, एवढेच नव्हे, तर तिच्या फोडींमध्ये आत्तापर्यंत तिखट मीठही नीट पोहोचलेले नसते. शिजणे या प्रकारामध्ये आणखीही एक खुबी अंतर्भुत आहे. शिजण्यातील नेमकेपणा व त्या पदार्थांची मुळची चव 'खुलुन' येणे हे जेव्हा साधते, तेव्हाच त्या पदार्थांच्या शिजवण्याबद्दल कौतुक होते. एखादा पदार्थ कच्चा राहतो, तसाच जेव्हा जास्त शिजतो, तेव्हाही त्याची चव गेलेली असते. यामुळे शिजण्यातील नेमकेपणा हाही महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी प्रत्येक पदार्थाची अंगभूत चव व ती स्पष्ट होईपर्यंतच शिजवणे अपेक्षित असते. यासाठी मदत म्हणून प्रत्येक देशात काही पदार्थांची मदतही घेतली जाते. चिनी पद्धतीत अजिनोमोटो, इटालियन पद्धतीत मिरे, भारतीय पद्धतीत आले व हळद, युरोपमध्ये कच्च्या पपईचे तुकडे, अरबी देशांत लवंग यांचा अगदी अल्प प्रमाणात वापर करण्याची पद्धत आहे. पदार्थ शिजताना त्याचे तापमान शंभर डिग्री सेंटिग्रेडच्या वर जात नाही. मंद शिजवल्यावर खुपशी जीवनसत्त्वेही राखली जातात. आपण म्हणतोच ना, शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून ? अगदी तसेच आहे. पदार्थ चांगला शिजल्यास त्याचे प्रत्येक शीतनशीत छान शिजलेले असते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळ्यांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment