✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Gun1NBkub/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील सातवा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: एम.व्ही.चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.**१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.**१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.**१९३५:ज्ञकोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’चे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.**१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.**१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.**१७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.**१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: तुकाराम परसराम डोके -- कवी**१९८४: राजेश्वर वसंतराव जुबरे -- लेखक अनुवादक, संपादक**१९८३: प्रा. रत्नाकर प्रभाकर चटप -- लेखक, कवी* *१९८०: श्रीकांत रामभाऊ साबळे -- प्रसिद्ध लेखक, संपादक**१९७९: बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल**१९७२: अजय बारकू दानवे -- कवी, लेखक* *१९७१: सरला भिरुड -- कवयित्री,लेखिका* *१९६८: अनिल राव -- लेखक, कवी* *१९६७: प्रा.डॉ. संगिता अरुण खुरद -- लेखिका* *१९६७: इरफान खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २९ एप्रिल २०२० )**१९६६: डॉ. सुधीर अणासाहेब कुंभार -- लेखक* *१९६५: अभिराम भडकमकर -- प्रसिद्ध मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक* *१९६२: वंदना बोकील कुलकर्णी -- लेखिका, संपादिका* *१९६२: प्रा.डॉ.रजनी नकुल लुंगसे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संशोधिका* *१९६१: सुप्रिया पाठक – अभिनेत्री**१९६०: श्रीनिवास गडकरी -- प्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार* *१९५७: तुकाराम ज्योतीराम पाटील (टी.जे)- कवी तथा निवृत्त उपविभागीय अभियंता**१९५७: रीना रॉय -- प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री**१९५६: डॉ. किशोर सानप -- ललित आणि वैचारिक समीक्षा क्षेत्रात लेखन करणारे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक (मृत्यू: २१ मे २०२३ )**१९५६: हरी मल्हारराव धारकर -- कवी* *१९५६: टी.एस.चव्हाण -- कादंबरीकार, वेदनाकार**१९५५: अरुण जाखडे -- पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक, प्रसिद्ध लेखक, संपादक (मृत्यू: १६ जानेवारी २०२२ )**१९५३: रमेश कृष्णराव भोयर -- कवी**१९५२: आनंद विंगकर (शंकर नारायण ढोणे)-- प्रसिद्ध लेखक, कवी**१९५०: विलास मानेकर - सरचिटणीस विदर्भ साहित्य संघ**१९४८: शोभा डे – विदुषी व लेखिका**१९४६: कुमार केतकर -- पत्रकार, लेखक आणि व्याख्याते, अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली.( दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत )**१९४३: डॉ. गो. तु. पाटील -- प्रसिद्ध लेखक संपादक, 'ओल अंतरीची' आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०२४ )**१९४२: श्याम प्रभाकर तारे -- प्रसिद्ध लेखक कवी अनुवादक तथा स्तंभलेखक पुण्यनगरी* *१९४२: सुधाकर माधवराव दोखणे -- लेखक**१९२३: गंगाप्रसाद बालाराम अग्रवाल-- संपादक, लेखक (मृत्यू: ११ ऑक्टोबर २०१८ )**१९२१: चंद्रकांत गोखले – अभिनेते (मृत्यू: २० जून २००८ )**१९२०: सरोजिनी बाबर – प्रसिद्ध लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (मृत्यू: १९ एप्रिल २००८ )**१९१७: रामभाऊ विजापुरे -- हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील भारतीय हार्मोनियम वादक (मृत्यू: १९ नोव्हेंबर २०१० )**१८९४: वासुदेव विनायक जोशी -- कादंबरीकार, नाटककार, निबंधकार(मृत्य: १९ मे १९६५ )**१८९३: जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना,पद्म विभूषण पुरस्कारांनी सन्मानित. (मृत्यू: २१ मे १९७९ )**१८८५: माधव नारायण जोशी -- मराठीतील एक विनोदी नाटककार (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९४८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:चिंतामणी सदाशिव ऊर्फ अण्णासाहेब लाटकर -- ज्येष्ठ ग्रंथ मुद्रक आणि कल्पना मुद्रणालयाचे संस्थापक**२०००: डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले,विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ८ जानेवारी १९१९ )**१९९१: नरहरि भानुदास काळे (नरहरिप्रभू, काळे महाराज )-- दत्तसंप्रदाय, प्रवचनकार (जन्म: २२ मे १९१० )**१९८९: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वछता आणि आरोग्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणा, ओरिसा आणि जम्मू-काश्मीरमधील विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे ऑनलाईन उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *HMPV ने चिंता वाढवली, कर्नाटकात सापडले भारतातले पहिले 2 रुग्ण; महाराष्ट्र सरकारनेही जारी केल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महिलांना सक्षम बनवणे ही आपल्या देशाची खरी ताकद - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारी, हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली, आरोग्य विभाग अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - आनंदाश्रम संस्थेतर्फे दुर्मिळ संस्कृत हस्तलिखितांचे प्रदर्शन, 10 ते 12 जानेवारी दरम्यान रसिकांसाठी खुला होणार खजिना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आचार्य बाळशास्त्री जांभेकर अध्यासन मुंबई विद्यापीठात सुरू करावे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट :- आयर्लंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यासाठी स्मृतीकडे नेतृत्व, 10 जानेवारीपासून होणार प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, शिक्षक, देगलूर👤 संजय पवार, मा. नगरसेवक, धर्माबाद👤 आबासाहेब निर्मले, शिक्षक तथा साहित्यिक👤 धनराज बनसुडे, उपक्रमशील शिक्षक, उस्मानाबाद👤 रमेश माने👤 शिवाजी गुजेवार👤 फारुख शेख👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 परविंदर कौर महाजन, कोल्हापूर👤 धनाजी माडेवार, नायगाव👤 पद्माकर रामराव मुळे👤 रामानंद रामदिनवार, नांदेड👤 पंढरी यंगलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ग्रेस - माणिक शंकर गोडघाटे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र सम्मेलन* कोठे आयोजित करण्यात आले आहे ?२) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) कोणते वर्ष हे भारताचे हवामानाच्या इतिहासात १९०१ नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे ?४) 'व्रण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणता धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे ? *उत्तरे :-* १) शेवगाव, जि. अहिल्यानगर ( अहमदनगर ) २) ५ जानेवारी ३) सन २०२४ ४) खूण, क्षत ५) कॉपर ( तांबे )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *यकृत* 📙 ***************आपल्या शरीरातील फार मोठी रसायनशाळा असे यकृताबद्दल सहज म्हणता येते. यकृताच्या कामात अगदी किरकोळ अडथळा आला किंवा विकृती निर्माण झाली, तर साऱ्याच शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम होतो. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. श्वासपटलाच्या खाली उजव्या बाजूला बरगडीच्या आत यकृत सुरक्षित असते. यकृतदाह झाल्यास यकृताचा आकार वाढतो. तो पोटावरुन हाताला खालची कड लागून समजू शकतो. यकृतात मुख्यतः पित्ताची निर्मिती होत असते. ते पित्ताशयात साठवले जाते. अन्नपचनक्रियेत गरजेनुसार ते पाझरून आतड्यातील अन्नपदार्थात मिसळते. आहारातील स्निग्ध पदार्थांवर त्याची प्रक्रिया होऊन त्याचे दुधासारखे मिश्रण तयार होते. स्निग्ध पदार्थांच्या शोषणालाही पित्त हातभार लावते. अन्नमार्गातून शर्करा शोषून घेतल्यावर शिलकीतील साठा ग्लायकोजेन या रूपाने यकृतात साठवला जातो. जेव्हा शरीराला गरज असेल, तेव्हा ग्लायकोजेनचे पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतर केले जाते. याशिवाय यकृतामध्ये शरीरातील लाल पेशी तयार करणे व नष्ट करणे हाही उद्योग सतत चालू असतो. रक्त गोठवण्यासाठी आवश्यक फायब्रिनोजेन द्रव्याची निर्मिती यकृतातच होते. जीवनसत्त्वांचा साठा येथेच केला जातो. रक्तातील विषारी द्रव्ये नष्ट करणे, प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिया व युरिक आम्लाची निर्मिती व स्निग्ध पदार्थांचा शरीरव्यापारासाठी उपयोग ही कामे येथेच घडतात. एखाद्या माणसाचे यकृत काम करेनासे झाले, आक्रसले, तर त्याला लिव्हर सिरॉसिसचा आजार आहेत झाला आहे, असे म्हणतात. हळूहळू पण निश्चितपणे मृत्यूकडे वाटचाल करणारा हा आजार ठरतो. याची लक्षणे म्हणजे उदरपोकळीत पाणी भरणे, त्याला जलोदर असे नाव आहे. यकृतारोपणाची शस्त्रक्रिया हा एकमेव इलाज यावर गेल्या दशकात उपलब्ध आहे. पण तो सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा व भारतातही अगदी मोजक्या रुग्णालयांत उपलब्ध आहे. रक्ताच्या विविध चाचण्यांतून, अल्ट्रासोनोग्राफीतून किंवा आवश्यक असेल तर यकृताचा छोटा तुकडा बाहेर बारीक सुईवाटे तपासायला काढून (लिव्हर बायोप्सी) यकृताच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. अतिमद्यपान, वरचेवर झालेली कावीळ, पित्ताशयात खडे साचून त्याचा झालेला परिणाम यांमुळे यकृतात गंभीर विकृती निर्माण होतात. या विकृतींचा इलाज आजही आधुनिक वैद्यकाला सापडलेला नाही, तर आयुर्वेददीय इलाजांचे प्रमाणीकरण झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥ काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥ आणियलें आतां आपणासारिखें । गोपिकांसी रूपें दावी नाना ॥३॥ काय जीवेंभावें सकाळां संमता । सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला अनेक पर्यटन स्थळे बघायला आवडतात आणि त्यातून आनंद मिळत असतो. चांगल्या व्यक्तींची भेट घ्यायला आवडते. कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचे असते. पण ह्या दोघांकडून बरेच काही मिळत असले तरी जे, आपल्याला पाहिजे ते मात्र मिळत नाही. कारण आईची माया आणि बापाचा तो कणकर हात पाठीवर मिळत नसतो म्हणून जगात कितीही चांगले शोधण्याचा प्रयत्न करावा पण, घरच्या असलेल्या जिवंत देविदेवतांना क्षणभरासाठी सुद्धा विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा-यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment