✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/188MvYzWzb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील १३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९६: 'पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.**१९८१: मुंबईतील चुनाभट्टी येथील 'भारतीय कला मनरम" या संस्थेच्या भव्य वास्तूचे उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले**१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.**१९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झाले.**१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी**१८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: वैभव भिवरकर -- प्रतिभावंत कवी, लेखक, वक्ते**१९८७: डॉ. कुणाल मुरलीधर पवार -- कवी* *१९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार**१९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७८: प्रा. कीरण नामदेवराव पेठे -- कवयित्री**१९७६: जीवन तळेगावकर -- कवी, लेखक**१९७१: संतोष दत्तात्रय जगताप -- कवी, लेखक**१९७०: स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर-- लेखिका* *१९७०: सत्यवान सीताराम देवलाटकर -- लेखक**१९६९: चंद्रशेखर बावनकुळे -- महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष* *१९६७: डॉ. गीतांजली शर्मा (कसमळकर)-- कवयित्री तथा नेत्रतज्ज्ञ* *१९६३: मोरेश्वर रामजी मेश्राम -- कवी* *१९५५: सरिता रमेश आवाड -- लेखिका**१९४९: राकेश शर्मा – अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय, आणि जगाचे १३८ वे अंतराळवीर**१९४८: आत्माराम कनिराम राठोड (तांडाकार) -- प्रसिद्ध लेखक, कवी (मृत्यू: २३ मे २००५ )**१९४७: प्रा. वसंत मारुतीराव जाधव -- कवी, संपादक* *१९४२: जावेद सिद्दीकी -- भारतातील हिंदी आणि उर्दू पटकथा लेखक,संवाद लेखक आणि नाटककार* *१९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार(मृत्यू: १० मे २०२२ )**१९३२: सुलभा ब्रह्मे -- प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, मार्क्सवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या ( मृत्यू: १ डिसेंबर २०१६ )**१९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९ )**१९२६:दिनकर बाळू पाटील -- भारतीय वकील, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: २४ जून २०१३ )**१९१९: एम. चेन्ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, माजी राज्यपाल(मृत्यू: २ डिसेंबर १९९६ )**१९१८: प्रा. अच्युत केशवराव भागवत -- लेखक संपादक, अनुवादक* *१९१५: प्रा. दत्तात्रय सखाराम दरेकर -- लेखक, चरित्रकार* *१९०८: रावसाहेब म्हाळसाकांत वाघमारे -- कवी, लेखक (मृत्यू: ७ मार्च१९८९ )**१८९६: मनोरमा श्रीधर रानडे -- मराठी कवयित्री,रविकिरण मंडळाच्या सदस्या (मृत्यू: १९२६ )**१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे -- विज्ञान लेखक व संपादक ( मृत्यू: ६ मार्च १९८१ )* ☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: प्रभा अत्रे -- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका व लेखिका (जन्म: १३ सप्टेंबर १९३२ )**२०१४: अंजली देवी -- भारतीय अभिनेत्री,चित्रपट निर्माती (जन्म: २४ ऑगस्ट १९२७ )**२०१४: पंडित पुरुषोत्तम वालावलकर -- हार्मोनियम वादक (जन्म:११ जून २०२३)**२०११: प्रभाकर विष्णू पणशीकर –मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (जन्म: १४ मार्च १९३१ )**२००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक.कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.* *१९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक* *१९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२ )**१९८९: श्रीकृष्ण जनार्दन जोशी -- लेखक (जन्म: १ ऑगस्ट १९१५ )**१९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: १९१५ )**१९७६:अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: १८९२)**१९६७: हरी दामोदर वेलणकर -- संस्कृत पंडित व ग्रंथकार (जन्म: १८ऑक्टोबर १८९३ )**१८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बंधुभावाचा संदेश देणारा सण - मकरसंक्रांत*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सार्वत्रिक निवडणुकात महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज येथे आजपासून महाकुंभमेळा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरणला मिळाला मोठा सन्मान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत 100 हून अधिक कामगारांना विषबाधा, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार सुरू, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथील तीन हत्तीणी 15 दिवसांच्या विशेष रजेवर, या काळात पर्यटकांसाठी हत्ती सफारी बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून होणार सुरू, म. शम्मीचे पुनरागमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश भांगे, शिक्षक, देगलूर👤 माधव सोनटक्के, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी देशमाने👤 विजयकुमार चिकलोड👤 सौदागर जाधव👤 जितेंद्र कुमार👤 संतोष माधवराव पाटील कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आनंद - वि.ल.बर्वे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव अशी गोष्ट आहे की , जी माणसाला पशु बनवते , विकृत करते. ---- जाॕन वेबस्टर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेतील प्रख्यात 'ट्रॅक अँड फील्ड न्यूज' ने *२०२४ मधील जगातील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू* म्हणून कोणाची निवड केली ?२) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?३) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?४) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?५) महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण असतो ? *उत्तरे :-* १) नीरज चोप्रा, भारत २) सरपंच ३) राज्यपाल ४) राष्ट्रपती ५) महापौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚆 *संदेशवहन व्यवस्था आगगाडीची* 🚆 जगातील आगगाड्या विविध वेगाने धावतात. काही ठिकाणी ती पाचशे किलोमीटर ताशी वेग घेते. काही ठिकाणी दर मिनिटाला एक अशी एकामागे एक आगगाडी सुटत असते. कोणतीही आगगाडी पूर्ण वेगात धावत असताना थांबण्यासाठी किमान एक किलोमीटरचे अंतर घेते; तर थोडाही वेग घेतला असला तरीही तिचे ब्रेक कार्यान्वित होऊन ती थांबायला किमान वीस फूट अंतर जावेच लागते.अनेक ठिकाणी आगगाडीच्या रुळांची एकच जोडी उलटसुलट वापरासाठी वापरली जाते. यालाच सिंगल ट्रॅक म्हणतात. काही ठिकाणी फोर वा सिक्स ट्रॅक्स वापरात असतात. पण हे सर्व एकमेकांत बदलता येऊन, सांधे बदलून एका ट्रॅकवरची गाडी दुसरीकडे जाऊ शकते. या ट्रॅकवर एकाच वेळी उलटसुलट, कमी जास्त वेगाने रूळ बदलत गाड्या धावताना पाहून मन थक्क होते. हे सारे शक्य झाले आहे, ते सतत बदलत गेलेल्या अत्याधुनिक संदेशवहन व्यवस्थेमुळेच.रेल्वे सिग्नलिंग हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. पण हा विषय एका पद्धतीने हाताळून सुटसुटीत केला जातो. संपूर्ण रेल्वेमार्गाचे अनेक सेक्शन पाडले जातात. प्रत्येक सेक्शनवर एका वेळी फक्त एकच रेल्वेगाडी धावेल हा मूलभूत नियम पाळला जातो. समजा एखाद्या वेळी एका सेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक गाड्या रुळावर असल्या तर एकच गाडी पळत राहते. अन्य फक्त उभ्या केल्या जातात व त्याही साइडिंगला असलेल्या रुळांवर.अर्थात हे सारे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. पण एकदा मूळ तत्त्व ठरले की ते काटेकोरपणे अंमलात आणले जाते. पूर्वी यासाठी मदत घेतली जायची ती खालीवर होणाऱ्या दांडीच्या सिग्नलची. रात्रीच्या वेळी लाल व हिरवे दिवे असत. आता बव्हंशी त्यांची जागा घेतली आहे ती दिव्यांनीच. दिवे मात्र आता फक्त दोनच प्रकारचे नसून अनेक प्रकारचे असतात. वेगाने जा, हळू वेगाने जा, मंद गतीने सरकत जा, पूर्णपणे जागीच थांबा, असे संदेश आता या दिव्यांतर्फे दिले जातात.समजा एखाद्या आगगाडीच्या ड्रायव्हरने हे संदेश पाळलेच नाहीत, तो ते बघायलाच विसरला, त्याला कळले नाही, तर त्याची आगगाडी तशीच पुढे जाते. पण या वेळी पुढच्या सिग्नलपाशी त्याची गाडी अडवण्याची व्यवस्था केली जाते. मार्गावर जर वीजपुरवठ्यावर इंजिन चालू असेल, तर तेही बंद करण्याची व्यवस्था केली जाते. आपोआपच तो मार्ग बंद होतो. अत्यंत गर्दीच्या सर्व मार्गांवर ही व्यवस्था केली गेली आहे.संदेशव्यवस्था कशी चालू आहे, कुठे कोणती आगगाडी किती वेगाने पळते आहे हे सतत दाखवण्याची व्यवस्था केंद्रीय नियंत्रण स्थानकात सतत कार्यरत असते. उदाहरणार्थ, मुंबई ते सोलापूर या मार्गावरील सर्व गाडय़ा मुंबईतील नियंत्रण केंद्रातील अधिकाऱयाच्या नजरेखाली असतात. त्यामुळे तातडीचे काही बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली तर तो तेथूनच सूचना पुरवू शकतो.इतके सर्व असूनही कधीतरी अपघात घडतात. ते भीषणच असतात. याला कारण यंत्रात अचानक उद्भवणारे दोष व धडधडीत मानवी चुका. दोन्ही एकत्रितपणे जर घडून आले तर अपघाताचे स्वरूप वाईट असते. यंत्रात अचानक उद्भवणारे दोष वा यंत्रणेचे अपयश (systems failures) यावर आता मात करण्यात शास्त्रज्ञांना खूपसे यश मिळालेले आहे. मानवी चुकांवर मात्र पूर्ण नियंत्रण मिळालेले नाही.स्वयंचलित 'ड्रायव्हरलेस' ट्रेनही काही ठिकाणी परदेशात वापरण्यास सुरुवात झाली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून दिल्या जाणाऱ्या संदेशांवर ती 'ड्रायव्हरलेस' ट्रेन काम करते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते.त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान,आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक हाताची टाळी*वनातील आश्रमात एक संत राहत होता. त्यांच्यासोबत एक अनाथ मुलगाही राहत होता. संतांना पाहून त्या मुलालाही ध्यानसाधना शिकण्याची इच्छा झाली. तो संतांजवळ जाऊन म्हणाला, "गुरुजी मला ध्यानसाधना शिकायची आहे." संतांनी त्याला समजावले की तुझे वय हे ध्यानसाधना करायचे नाही. आता तू भक्ती शिक. पण मुलगा आपल्या जिद्दीवर अडून राहिला. त्याचा हट्ट पाहून संतांनी दोन्ही हातांनी मिळून एक जोरात टाळी वाजवली आणि मुलाला म्हणाले," हा दोन हातांच्या टाळीचा आवाज आहे. आता तू बाहेर जा आणि एका हाताच्या टाळीचा शोध घे." मुलाने विचार केला की, एका हाताची टाळी म्हणजेच ध्यानसाधना असेल तेव्हा तो आवाज अत्यंत मधूर व अद्भूत असेल. मुलगा रात्रंदिवस एका हाताच्या टाळीचा आवाज शोधू लागला. एके दिवशी मुलगा जंगलात एकेठिकाणी बसला होता, तेथे मंद हवेमध्ये झाडांची पाने हलताना एकमेकांवर घासत होती. मुलाला वाटले की पानांच्या ह्या आवाजात दिव्य प्रकारची शांती आहे. हाच एका हाताच्या टाळीचा आवाज आहे. तो मुलगा पळतच संतांकडे गेला आणि संतांना या आवाजाची माहिती दिली. संत म्हणाले," हा तर पानांचा आवाज आहे. एका टाळीचा आवाज नाही. आणखी शोध घे." मुलाचा शोध सुरुच राहिला. प्रत्येक वेळी मुलगा संतांना काहीतरी सांगायचा व प्रत्येक वेळी संत नकार देत गेले आणि मुलाला आणखी शोध घे असे सांगितले. मुलगा आता अठरा वर्षाचा झाला होता. एक दिवस तो गुरुजींकडे जाऊन बसला आणि डोळे बंद करून गहि-या मौनामध्ये डुंबला. जणूकाही त्याची समाधीच लागली होती. गुरुजी काहीच बोलले नाहीत. गुरुजींनी मंदस्मित केले आणि शांत राहिले कारण त्यांच्या शिष्याला आता कुठे एका हाताच्या टाळीचा आवाज ऐकू येऊ लागला होता.तात्पर्य – ध्यान मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे आणि मनाची एकाग्रता, योग्य गुरुचे मार्गदर्शन यामुळे आपण आतूनबाहेरून पूर्णपणे बदलून जातो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment