✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EDAFxa7UU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_ या वर्षातील दुसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.**२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.**१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट.पदवी प्रदान**१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या**१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.**१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.**१९३६:मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.**१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.**१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.**१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शाल्मली खोलगडे -- भारतीय पार्श्वगायिका**१९८४: माणिक प्रल्हादबुवा गिरी -- लेखक* *१९८४: डॉ. चंदू हरी पवार -- कवी* *१९८०: गजानन नत्थुजी कावडे -- कवी* *१९७८: डॉ. शुभांगी गणेश गादेगावकर -- कवयित्री, लेखिका**१९७५: डॉ.देवेंद्र शेषराव तातोडे -- कवी लेखक* *१९६७: महेश गोविंद आफळे -- कवी, लेखक**१९६४: नंदू सामंत -- कवी* *१९६४: प्रा. राम कदम -- कथाकार**१९६३: अविनाश शरदचंद्र चिंचवडकर -- लेखक, कवी**१९६२: प्रा. मधुकर बळीरामजी वडोदे -- लेखक, कवी* *१९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९९८ )**१९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि माजी खासदार**१९५७: उर्मिला देशपांडे -- कथा, कादंबरी, नाट्य लेखन* *१९५६: प्रा. डॉ. दीपक गोपाळराव कासराळीकर -- समीक्षक* *१९५५: जनार्दन नारायण ठाकूर-शिंदे -- कवी, लेखक**१९५२: श्रीनिवास गेडाम -- कवी, गझलकार, लेखक**१९५०: प्रा. श्याम विद्याधरराव पाठक -- कवी, लेखक* *१९४९: निरंजन कचरुजी पाटील -- लेखक, कवी, संपादक* *१९४५: प्रा. आनंद जामवंतराव कदम -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५ )**१९३१: दिगंबर तुकारामजी होले -- लेखक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल १९९२ )**१९०१: महादेव मल्हार जोशी -- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक (मृत्यू: १९७८ )**१८९२: गणेश पांडुरंग परांजपे -- वैद्यकशास्त्र विषयक ग्रंथाचे कर्ते (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९७३ )**१८८६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर -- लेखक (मृत्यू: १४ जानेवारी १९४६ )**१८७६: भा. वा. भट -- इतिहास अभ्यासक (मृत्यु: २७ डिसेंबर १९५२ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: प्रा. डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे -- प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र नागपूर, विदर्भ संशोधन महर्षी, जीवन साधना, विदर्भ भूषण पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ७ सप्टेंबर १९३५ )**२०१६: अर्धेन्दु भूषण वर्धन -- भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वतंत्र सेनानी (जन्म: २४ सप्टेंबर १९२४ )**२०१५: वसंत रणछोड गोवारीकर -- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: २५ मार्च १९३३ )**२०१३: डाॅ. विनय वाईकर -- गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक ,भूलतज्ज्ञ (जन्म: १९४१ )**२००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: १९४७ )**१९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या* *१९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४ )**१९८७: हरे कृष्ण महाताब -- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते,ओडिशाचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २१ नोव्हेंबर १८९९ )**१९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३ )**१९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक,टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते,वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बावनकशी : सावित्रीबाई फुले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अन् सुरक्षेसाठी राबवणार तंत्रज्ञान; मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती बसवणार यंत्रणा; सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत चालू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गडचिरोलीला "स्टील सिटी ऑफ इंडिया" करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोगरे शंकर👤 शहाजी पालवे👤 कविता जोशी, नांदेड👤 म. विखार👤 साईनाथ ईबीतवार👤 संदीप ढाकणे, शिक्षक, छ. संभाजीनगर👤 श्रीकांत काटलेवार👤 संजय फडसे👤 नरसिंग पेंटम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरती प्रभु - चिंतामण त्र्यंबक खानोलकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद - २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतच्या कोणत्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) PKL इतिहासात १८०० रेड पॉइंट बनवणारा एकमेव खेळाडू कोण ?४) 'व्यथा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कुवैतचा सर्वोच्च सन्मान कोणता ? *उत्तरे :-* १) कोनेरू हम्पी, भारत २) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर ३) परदीप नरवाल ४) दुःख ५) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आजारानंतर केस का गळतात ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने याद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटिन, मेलानिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, ई, प्रथिने, स्निग्धांश यामुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते ; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्याची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिअोरकाॅर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे वाढले तरी पटकन उपटले जातात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥ भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥ नाम नारायण अंतीं उद्धारक । नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साहित्य कोणत्याही प्रकारचे असोत वरवर वाचून काढल्याने त्याचा खरा अर्थ कळत नाही. तसंच एखाद्याच्या जीवनातील व्यथा, वेदना, दु:ख,अडचणी आपुलकीने जाणून घेतल्याशिवाय तेही पूर्णपणे कळत नाही म्हणून कोणाला उगाचच नाव ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. या प्रकारे समजून घेतल्याने त्यांच्या व्यथा, वेदना,अडचणी आपल्या होऊन जातात. आणि हेच एकदा आपले झाले की, त्यातून अनेक मार्ग निघत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरं सत्य*एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला," साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे." साधू म्हणाला, "महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते." *तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment