✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CDWtH6u3E/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_ पंचशील ध्वज दिवस _* 🪩 🪩 *_ या वर्षातील ८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.**२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड**१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट,वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.**१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.**१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.**१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.**१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.**१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.**१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.* 🪩 *_जन्मदिवस /वाढदिवस/जयंती:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: विनोद शिंदे -- लेखक**१९८०: प्रशांत दत्तात्रय कोतकर -- कवी**१९७४: प्रतिभा रामचंद्र पाटील -- कवयित्री**१९७३: बालाजी पेटेकर खतगावकर -- कवी**१९७३: गणेश सहदेव सांगोळकर - कवी* *१९७१: संध्या विलासराव बोकारे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: व्यंकटेश कुलकर्णी -- कवी, गझलकार* *१९६२: चंद्रशेखर गोखले -- मराठी लेखक व कवी**१९५९: प्रा.डॉ. कुमार जानराव बोबडे -- लेखक**१९५७: प्रा. दिनकर विष्णू पाटील -- लेखक**१९५६: पंकज बेरी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९५६: प्रा.डॉ. निलांबर प्रभाकर देवता -- प्रसिद्ध लेखक**१९५५: दिलीप दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक* *१९५३: विठ्ठल अर्जुनराव साठे -- कादंबरीकार* *१९४५: डॉ. प्रभा गणोरकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका**१९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक(मृत्यू: १४ मार्च २०१८)**१९४१: नंदा -- भारतीय सिने-अभिनेत्री (मृत्यू: २५ मार्च २०१४ )**१९३९: कुमुद कृष्ण परांजपे -- लेखिका**१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: ३ जानेवारी २००५ )**१९३५: पंढरीनाथ धोंडू सावंत -- लेखक संपादक* *१९३५: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’(मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७ )**१९३३: सुप्रिया देवी -- बंगाली अभिनेत्री (मृत्यू: २६ जानेवारी २०१८ )**१९२९: सईद जाफरी – अभिनेता ( मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५ )**१९२६: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू: ७ एप्रिल २००४ )**१९२५: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३ )**१९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (मृत्यू: ४ मार्च २००० )**१८८७: कमलाबाई किबे-- कवयित्री, कथालेखक आणि सामाजिक विषयावर लेखन करणाऱ्या लेखिका* *१८५१: बाळकृष्ण आत्माराम गुप्ते -- लेखक (मृत्यू: १९२५ )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: पंडित मोहनराव कर्वे -- हिंदुस्तानी कला संगीत मधील ज्येष्ठ गायक ( जन्म:१६ सप्टेंबर १९२५ )**१९९६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६ )**१९९५: मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म: १ मे १९२२ )**१९७६: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ मार्च १८९८ )**१९७३: नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,स्वच्छ समाजदृष्टी,उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(जन्म: २० सप्टेंबर १८९८ )**१९६७: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ,संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(जन्म: १० डिसेंबर १८८० )**१९६६: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म: १२ जुलै १९०९ )**१९४१: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१८८४: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८ )**१८२५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म: ८ डिसेंबर १७६५ )**१६४२: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे बोलण्याची सवय आपणाला अनेक संकटातून वाचवू शकते. तर एक खोटं लपविण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावे लागते. *नेहमी खरे बोलावे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीचं कार्यक्रम जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रकृतीच्या कारणामुळे आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वाधार योजनेची ऑनलाईन अर्ज 15 जानेवारीपर्यंत भरता येणार, तांत्रिक अडचणी येत असल्याने समाज कल्याण विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कसोटी क्रमवारीत भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण, 2016 नंतर दुसऱ्यांदा टॉप-2 मधून बाहेर; 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पेटेकर खतगावकर, कवी, चित्रकार तथा कथाकार👤 मारोती गोडगे👤 आकाश गाडे, येवती👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 आनंदा कुमारे👤 करण भंडारी👤 पोतन्ना मुदलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गिरीश - शंकर केशव कानेटकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या तेलबियाला *'गरीब माणसाचे बदाम'* असे म्हणतात ?२) अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?३) नुकतीच झालेली ५ कसोटी सामन्यांची 'बॉर्डर - गावस्कर चषक' ऑस्ट्रेलियाने किती फरकाने जिंकली ?४) 'व्याकूळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली ? *उत्तरे :-* १) शेंगदाणे २) प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम ३) ३ - १ ने ४) दुःखी, कासावीस ५) सन १८६३*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस कोणकोणते अवयव दुसऱ्याला दान करू शकतो ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""दानाचे महात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानापेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना ? पण हे अगदी खरे आहे. हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.डोळ्यात फुल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मुत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात. अपघातांमध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णांचे हृदय नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैयक्तिक विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. "मरावे परि कीर्तीरुपी उरावे" या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥ मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥ होईल सिद्धीचा साधक । त्यासी देई स्वर्गसुखा ॥३॥ कोण होईल देहातीत । त्यासी करी संगरहित ॥४॥ नामा म्हणे जीवें साठीं । तुज मज जन्में पडिली गांठी ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कोणत्याही परिस्थितीत स्वतः हसत राहणे तसेच इतरांना हसवत ठेवणे ही एक प्रकारची उत्तम कला आहे सोबतच हे महान कार्य सुध्दा आहे. पण, त्यातच स्वतः च्या आनंदात हसत राहणे व दुसऱ्यांची टिंगल, टवाळी करून त्यांना दु:खी करणे याला माणुसकी म्हणत नाही. निदान माणुसकीच्या नात्याने तरी या प्रकारचे वागणे आपल्यात नसायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा- यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment