✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔵 *_जागतिक ब्रेल दिवस_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील चौथा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.**१९५९: लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.**१९५८:१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.**१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.**१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.**१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा**१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.**१८८१: लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.**१६४१: कर भरायला नकार देणार्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला.या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली.त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: प्रा. डॉ. विजय मेरसिंग जाधव -- लेखक, संपादक**१९७१: सुनील राम गोसावी -- लेखक, कवी**१९६७: जयश्री अनिल पाटील -- कवयित्री* *१९६७: श्रीमंत माने -- ज्येष्ठ पत्रकार, लोकमत नागपूरचे संपादक तथा लेखक* *१९६५: प्रा. गोविंद जाधव -- कवी**१९६४: प्रसाद कुलकर्णी - लोकप्रिय कवी, उत्तम व्याख्याते* *१९६४: मिलिंद शांताराम गांधी -- कवी, गीतकार* *१९६३: प्राचार्य डॉ. जगन्नाथ शामराव पाटील -- प्रसिद्ध लेखक**१९५९: सुनंदा सुहास भावसार -- कवयित्री, लेखिका**१९५९: मोतीराम रुपसिंग राठोड - लेखक**१९५७:गुरदास मान -- भारतीय गायक, गीतकार आणि अभिनेता* *१९५५: प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके -- विदर्भातील प्रसिद्ध लेखक व वक्ते**१९५०: पुरुषोत्तम खेडेकर -- मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक* *१९५०: वासंती प्रभाकर मार्कन्डेयवार -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४५: शैलजा राणे-घोरपडे -- कवयित्री, लेखिका**१९४१: कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ )**१९४०: श्रीकांत वसंत सिनकर -- प्रसिद्ध कथालेखक**१९३३: प्रा.मनोहर सप्रे-- प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक (मृत्यू: १३ डिसेंबर २०२४ )**१९३१: दिगंबर कुलकर्णी -- कथाकार कादंबरीकार* *१९३१: निरूपा रॉय -- भारतीय सिने-अभिनेत्री, पडद्यावर प्रामुख्याने नायकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या निरूपा रॉयने सुमारे ४७५ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या ( मृत्यू: १३ ऑक्टोबर २००४ )**१९२५: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१ )**१९२४: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६ )**१९२२: भालचंद्र शंकर भणगे-- लेखक, शिक्षणतज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (मृत्यू: २९ मार्च१९८० )**१९१४: इंदिरा संत –साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २००० )**१९०९: प्रभाकर आत्माराम पाध्ये -- संपादक, प्रसिद्ध साहित्यिक, सौंदर्यमीमांसक, समीक्षकज्ञ (मृत्यू: २२ मार्च १९८४ )**१९०५: कृष्णाजी बाबुराव मराठे -- चरित्रकार(मृत्यू: १९ नोव्हेंबर १९८७ )* *१८१३: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७ )**१८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सिंधूताई सपकाळ -- सामाजिक कार्यकर्त्या, अनाथाची माय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ नोव्हेंबर १९४८ )**२०१७: अब्दुल हलीम जाफर खान -- भारतीय सितार वादक (जन्म: १८ फेब्रुवारी १९२७ )**१९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९ )**१९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८ )**१९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७ )**१९१७: सखाराम कृष्ण देवधर(बापूसाहेब देवधर) -- गायत्री मंत्राचे उपासक,ज्ञानेश्वरीचे अभ्यासक**१९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ )**१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, 'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ )**१७५२: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भुवनेश्वर येथे 7 जानेवारीपासून प्रवासी भारतीय दिवस परिषद, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 समारंभाला उपस्थित राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीतल्या विविध विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी व उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नर्सी नामदेव येथील विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना, विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्यातील आराखडा शासनाला सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सरकार्यवाहपदाची जबाबदारी स्वीकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना फुले दाम्पत्यांनी केली, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपदान; पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामन्यात भारताची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी भारत सर्व बाद 185 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिघोळे , सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्राभिम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रघुनाथ पंडित - रघुनाथ चंदावरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्णावस्थेत पोचतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता ?२) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा विजेता संघ कोणता ?३) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा उपविजेता संघ कोणता ?४) PKL सीजन ११ चा बेस्ट रेडर कोण ठरला ?५) PKL सीजन ११ चा बेस्ट डिफेंडर कोण ठरला ? *उत्तरे :-* १) कबड्डी / हुतूतू २) हरियाणा स्टीलर्स ३) पटना पायरेट्स ४) देवांक दलाल, पटना पायरेट्स ( ३०१ रेड पॉइंट ) ५) नितेश कुमार, तमील थलायवाज ( ७७ टॅकल )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?*📙एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥ मोक्षासी साधन एका ते उपाधी । दाखवुनि बुद्धिभ्रंश केलें ॥३॥ एका पुत्र कलत्र राज्यचा संभ्रर्म । दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥ नामा म्हणे तुझ्या प्रेमालागीं भक्ति । घेतली म्यां सुतीं जन्ममरणें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांचे विचार सकारात्मक असतात अशी माणसे त्याच सकारात्मक विचारांना आत्मसात करून नित्यनेमाने कार्य करत असतात. कारण त्यांना वेळेचे भान असते सोबतच आपण इतरांसाठी काय केले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा विचारी माणसांना कशाचीही अपेक्षा नसते किंवा कोण काय म्हणतील याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. तीच माणसे अभिमानाचे दुसरे नाव असतात.म्हणून जे कोणी चांगले कार्य करत असतील त्यांचे गुणगान करता येत नसेल तर त्यांना नाव ठेवून स्वतः च्या नावाची प्रसिद्धी करू नये. माणसाचे जीवन एकदाच मिळते त्या मानवी जीवनाचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अतिरेक नको*एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसऱ्या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment