✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18YUKZZAa9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना**१९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी**१९९६: नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला**१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.**१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.**१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.**१९४२: दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले**१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.**१७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.*🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: डॉ. मयूर बंडू लहाणे -- लेखक* *१९७९: डॉ. रेणुका शरद बोकारे -- लेखिका, संपादिका* *१९७५: दत्तप्रसाद द्वारकादास झंवर -- कवी, लेखक**१९७४: प्रा. डॉ. संभाजी व्यंकटराव पाटील-- लेखक* *१९७३: राहुल द्रविड- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, प्रशिक्षक,उत्कृष्ट फलंदाज**१९६७: प्रा.नरेश हरिश्चंद्र खोडे -- लेखक**१९६७: मधुकर गणपतराव कोटनाके -- कवी**१९६६: लक्ष्मण शंकर हेंबाडे -- कवी* *१९६५: धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलीकर-- स्तंभलेखक, कथा,कादंबरी, नाटक या वाड:मय प्रकारात लेखन* *१९६१: राधिका मिलिंद राजंदेकर -- कवयित्री* *१९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका**१९५४: चद्रकांत भोंजाळ -- प्रसिद्ध मराठी लेखक आणि ज्येष्ठअनुवादक**१९५०: अरुण गुलाबराव डावखरे -- लेखक, अनुवादक* *१९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री**१९४४: सुभाष विनायक पारखी -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९४२: प्रा. डॉ. यशवंत देशपांडे -- विज्ञान कथा लेखक**१९३६: डॉ. नरसिंह महादेव जोशी -- प्रसिद्ध मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक**१९२८: पं. अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर -- बासरीवादक, लेखक (मृत्यू: ३० मे २०१० )**१९२५: श्री. के. केळकर -- लेखक (मृत्यू: १० जानेवारी १९९६ )**१९२४: नासिर खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: ३ मे १९७४ )**१८९८: विष्णू सखाराम खांडेकर -- सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित (ययाति १९७४ )(मृत्यू: २ सप्टेंबर, १९७६ )**१८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५ )**१८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६ )**१८१५: जॉन ए.मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: पंडित भालचंद्र दामोदर देव -- ज्येष्ठ व्हायोलीन वादक (जन्म: १९३६)**२०२१: डाॅ. जुल्फी शेख -- संत साहित्याच्या अभ्यासिका,संवेदनशील कवयित्री डी.लिट.पदवीने संन्मानीत (नागपूर विद्यापीठ)(जन्म: ७ मे १९५४ )**२००८: य. दि. फडके – लेखक व इतिहास संशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१ )**२००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९ )**१९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११ )**१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.(जन्म: २ ऑक्टोबर१९०४ )**१९६४: शांताराम गोपाळ गुप्ते -- कादंबरीकार, नाटककार (जन्म: १९०७ )**१९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३ )**१९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••12 जानेवारी - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्ताने*राजमाता जिजाऊ भोसले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी खास सोय, पुणे-दिल्ली दरम्यान विशेष रेल्वे; 20 डब्यांसह स्लीपर क्लास आणि पँट्री कोच उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने वस्त्रोद्योग विषयक अभ्यासक्रम - उपक्रम सुरू करावेत - राज्यपाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व साहित्य संमेलन 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार, बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जनतेशी थेट संवाद, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक; शेती महामंडळाच्या जमिनींसाठी जिओ टॅगिंगचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी कर्मचारी भरतीचे 15 वर्षांचे ऑडिट करावे, हिंदू महासंघाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अपघात रोखणे आपल्या हातात:सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख निजाम गावंडगावकर👤 बालाजी पुलकंठवार, धर्माबाद👤 शुभम पाटील कदम👤 गणेश हिवराळे पाटील👤 हणमंत पांडे👤 राहुल ढगे👤 साई यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अमरशेख - मेहबूब पठाण*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणे राहू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील कोणत्या ठिकाणी पहिला काचेचा पुल उभारण्यात आला आहे ?२) जिल्हा नियोजन समितीचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?३) सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते ?४) 'शत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुले यांनी वयाच्या कितव्या वर्षी विवाह केला ? *उत्तरे :-* १) कन्याकुमारी २) पालकमंत्री ३) केरळ ४) अरी, रिपू , वैरी ५) १३ व्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 #उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग - १ (१/६)ही कहाणी सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ साडेचार अब्ज वर्षांपूर्वी.त्याच काळात केव्हातरी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. त्यावेळची पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप धातू, धूळ आणि वायू यांचा गोळा होता. अनेक लक्ष वर्षे गेली आणि गोळ्याचा पृष्ठभाग हळूहळू थंड होत त्याचे रूपांतर कठीण कवचात होत गेले. हे कवच म्हणजेच खडकांनी बनलेला पृथ्वीचा पृष्ठभाग. सुरुवातीच्या काळात हा पृष्ठभाग बनत होता. आतल्या तप्त द्रवाच्या धडकांनी पुन्हा फुटत होता, पुन्हा घडत होता, जागा बदलत होता. पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात पुरातन खडकाचे वय सुमारे चार अब्ज तीस लाख वर्षे आहे.पृथ्वीचा हा पृष्ठभाग बनत होता, त्याबरोबर त्या पृष्ठभागावर पाणी जमा होत होते आणि भोवती वातावरणाचा थरही बनत होता. मात्र हे वातावरण बनले होते मुख्यतः कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन या वायुंनी. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात ऑक्सिजन जवळजवळ नव्हताच. वेगवेगळ्या भौतिक व रासायनिक प्रक्रियांमधून हळूहळू अॉक्सिजनचे प्रमाण वाढत गेले. जीवसृष्टीच्या उदयाला हा बदल अत्यंत उपयुक्त ठरला. या सगळ्यांचे मिळून बनलेले हे रसायन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेले होते आणि त्यावर सतत आदळत होते सूर्याचे अतिनील किरण. त्या रसायनात घडत होता विजांचा चमचमाट. या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांमधूनच केव्हातरी पहिल्या सजीव पेशीच्या जन्माला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा मुख्यतः प्रथिने बनवणाऱ्या अमिनो अॅसिडचा उद्भव झाला.पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या काळाचे शास्रज्ञांनी वेगवेगळे भाग पाडले आहेत.अगदी सुरुवातीचा सुमारे दोन अब्ज वर्षांचा काळ आर्चिअन इऑन (आर्चिअन कल्प) या नावाने ओळखला जातो. या काळात पृथ्वीवर सजीव पेशी जन्माला आली नव्हती.आर्चिअन कल्पानंतरचा सुमारे एक अब्ज नव्वद कोटी वर्षांचा काळ प्रोटेरोझोइक इऑन (प्रोटोरोझोइक कल्प) या नावाने ओळखला जातो.या दोन्ही कालखंडांना मिळून प्रिकेंब्रिअन इरा (प्रक्रेंब्रिअन युग) असेही नाव दिले आहे. पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासापैकी जवळजवळ ८० टक्के काळ हा प्रिकेंब्रिअन युगानेच व्यापलेला आहे.क्रमश : सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते. त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान, आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *इंद्रियांवर ताबा*एक महात्मा रस्त्यातून घरी चालले होते. वाटेत त्यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती.महात्म्याच्या तोंडाला पाणी सुटले. लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्यांना वाटले. त्यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्वादिष्ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्या या चोचल्याचा मनाने धिक्कार केला. लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्मा पुढे गेले परंतु त्यांचा जिभेचा शौक हार मानत नव्हता. त्यांची जीभ लिंबांचा स्वाद घेण्यासाठी आसुसली होती. ते परत लिंबूवाल्याकडे आले. त्याच्याकडील लिंबे निरखून पाहू लागले. परत एकदा मनाने धिक्कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्मा परतले. चार पावले पुढे गेल्यावर परत एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते परत लिंबूवाल्याकडे आले. लिंबूवाला त्यांचे हेलपाटे पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला हे कळेना की हे महात्मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. शेवटी न राहवून त्याने विचारले, "महाराज, तुम्हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात." शेवटी महात्म्यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्यांनी पत्नीला चाकू मागितला. लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला, "वा रे वा महात्माजी, तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे." तितक्यात त्यांची पत्नी तिथे आली व तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले, "अहो, लिंबाचा स्वाद घेता घेता का थांबलात." महात्म्यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्हीही पत्नीच्या हातात देऊन तिला सांगितले," मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो."*तात्पर्य - इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment