✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/01/world-hindi-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *_विश्व हिंदी दिवस_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील १० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••*२००८: शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांना जीवन गौरव पुरस्कार* *१९७५: हिंदी ची महती भारताबाहेर पोचविण्यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा तर्फे विश्व हिंदी संमेलन* *१९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.**१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.**१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.**१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.**१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.**१८७०: बॉम्बे,बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B.B.C.I.Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.**१८६३ :चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.**१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.**१७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.**१६६६: सुरत वरून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: सुयश टिळक -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९८२: कालिदास अंकुश शिंदे -- लेखक* *१९८१: दीप्ती श्रेयस तळपदे -- निर्माती, दिग्दर्शिका, मानसशास्त्रज्ञ**१९७५: राजेश गंगाराम जाधव -- कवी* *१९७४: प्रा. विजय काकडे -- कथाकार, लेखक, वक्ते* *१९७४: हृतिक रोशन – प्रसिद्ध सिनेकलाकार**१९७३: रेशम टिपणीस -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९६९: प्रा. डॉ. विठ्ठल लक्ष्मणराव चौथाले -- लेखक* *१९६८: रमेश सूर्यभान डोंगरे -- प्रसिद्ध लेखक**१९६७: माला आनंद मेश्राम -- कवयित्री**१९६५: प्रा. डॉ. विलास विश्वनाथ तायडे -- लेखक, समीक्षक, संपादक* *१९६४: डॉ. समीरण वाळवेकर -- निवेदक, पत्रकारिता, वृत्त टेलिव्हिजन, शैक्षणिक टेलिव्हिजन, मनोरंजन टेलिव्हिजन, मालिका, चित्रपट,सहायक दिग्दर्शन, कादंबरी लेखन , निवेदन,या सर्व क्षेत्रात भरीव काम**१९५९: डॉ. सुरेखा विनोद -- कवयित्री तथा स्त्रीरोगतज्ञ**१९५६: अरुण भालचंद्र धाडीगावकर -- लेखक, संपादक,नाट्य परीक्षक, कलाकार**१९५५: नारायण सुमंत -- कवी**१९५५: डॉ. दिलीप गरुड -- प्रसिद्ध लेखक* *१९५२: सलीम घौस --भारतीय अभिनेते ( मृत्यू: २८ एप्रिल २०२२ )**१९५०: नजूबाई गावित-- आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या**१९४७: प्राचार्य डॉ. पंडितराव एस. पवार-- लेखक, संशोधक, संपादक* *१९४६: निरंजन घाटे -- विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक* *१९४२: डॉ. अशोक प्रभाकर कामत -- हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक**१९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार**१९३७: मुरली देवरा,-- उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते (मृत्यू: २४ नोव्हेंबर २०१४ )**१९३५: कमलाकर नाडकर्णी -- ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक**१९१९:प्रा.श्रीपाद रघुनाथ भिडे -- लेखक* *१९०३: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (मृत्यु: ३ ऑक्टोबर १९९९ )**१९०१: डॉ. गणेश हरी खरे -- इतिहास संशोधक (मृत्यू: ५ जुन १९८५ )**१९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३ )**१८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६ )**१८९६: दिनकर गंगाधर केळकर -- कवी, संपादक, संग्रहालयकार (मृत्यु: १७ एप्रिल १९९० )**१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: प्रभाकर भावे-- ज्येष्ठ रंगभूषाकार**२०१४: दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ -- पुण्यातील पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे मालक**२००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक,गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४ )**१९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत* *१७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ,वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.(जन्म: २३ मे १७०७ )**१७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: १७२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज विश्व हिंदी दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*हिंदी आमची राष्ट्रभाषा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जिनोम इंडिया उपक्रम देशाच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार गाव, विदर्भातील पहिले मॉडेल सोलर व्हिलेज बनले हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वसमत - निपुण हिंगोली उपक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांचा सत्कार, मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन, शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनावाल यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - संविधान सन्मान दौड 2025 ची नावनोंदणी सुरू, 25 जानेवारी रोजी होणार स्पर्धा, 6 ते 7 हजार स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. नामदेव राठोड👤 राजेंद्र सोनवणे, साहित्यिक, पंढरपूर👤 शुभम हिवराळे👤 आनंदराव कदम👤 अनिल यादव👤 बालाजी ईबीतवार👤 साईनाथ सोनटक्के👤 शिनू रेड्डी, धर्माबाद👤 विनोद गोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत सबनीस - रघुनाथ दामोदर सबनीस*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) दिल्ली विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ?३) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?४) 'शर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'टाईम्स ऑफ इंडिया' हे कोणत्या देशातील प्रमुख वृत्तपत्र आहे ? *उत्तरे :-* १) व्ही. नारायणन, अवकाश शास्त्रज्ञ २) ७० सदस्य ३) राजीवकुमार ४) बाण, तीर, सायक ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त* 💉 **************शरीरात रक्ताचे काम काय असते ? शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते. रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था. रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते. सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते. मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही. जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरुडावरी हरि बैसोनियां यावें । आम्हांसि रक्षावें दीनबंधू ॥१॥ अच्युता केशवा मुकुंदा मुरारी । येई लवकरी नारायणा ॥२॥ ऐकोनियां धांवा धांवला अनंत । उभा गरुडासहित मागें पुढें ॥३॥ वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें लिंबलोण ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उंची, उंची मध्ये सुध्दा खूप फरक असतो.जी व्यक्ती आपल्या प्रयत्नातून उंचीवर पोहोचत असते पण, त्याला जेव्हा व्यर्थ गोष्टींचा वारा लागतो तेव्हा तीच उंची हळूहळू कमी व्हायला लागते. पण, ज्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करुन आपले विचार तसेच स्वतः वरचा विश्वास आणि आपले कार्य नि:स्वार्थ भावनेने चालू ठेवते त्याची उंची भलेही प्रत्येकांना दिसत नसले तरी ती उंची शेवटपर्यंत कायम राहते. अशा उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तीकडून समाजातील अनेक लोक प्रेरणा घेत असतात. म्हणून ज्यांनी त्या ठिकाणा पर्यत पोहोचविले असतील त्यांना कधीच विसरू नये. कारण उंची जरी प्राप्त झाली असेल तरी त्यात अनेकांचे सहकार्य मोलाचे योगदान असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुसंवाद*एका शहरात एक दांपत्य राहत होते. पतीचा मोठा व्यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्ठा होती. कामाच्या व्यापात तो दिवसभर व्यग्र राहत असे.आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे तो पत्नीला वेळ देऊ शकत नसे यामुळे पत्नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्वस्थ राहायची, आपल्या मनातील गोष्टी ती कोणाला सांगूही शकत नव्हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्यासमोरून निघून जायचा. एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्हणाला, " तू तर माझ्या व्यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्या कामात तरी मदत करेल." त्याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्हणाली," तुम्हाला तर स्वतःचेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्यावर तरी तो माझी काळजी घेईल." दोघेही आपल्या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायीपर्यत येऊन पोहोचल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांच्यातील एका सज्जन माणसाने मध्यस्थ म्हणून तेथे प्रवेश केला व म्हणाला," अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्याला काय व्हायचे ते त्याला ठरवू द्या ना. तुम्ही काय उगीच ठरवून त्याच्यावर तुमची मते लादत आहात." हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्पच झाले. कारण त्यांना अजून मुलबाळ काहीच नव्हते आणि भविष्यात होणा-या मुलाच्या भवितव्याविषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्हणून निघून गेले.तात्पर्य - व्यर्थ गोष्टींवर वाद घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment