✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15VnyfPhkK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📝 *_पत्रकार दिन_* 📝••••••••••••••••••••••••••• 📝 *_ या वर्षातील सहावा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_महत्त्वाच्या घटना:_* 📝•••••••••••••••••••••••••••••••••*१९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.**१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन**१९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता**१९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.**१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली.त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.**१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले**१६७३: कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्‍न पूर्ण केले.**१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.* 📝 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*📝 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: गोविंद तुकाराम भांड-मानोलिकर -- कवी**१९८४: दिलजीत सिंह दोसांझ -- पंजाबी व हिंदी चित्रपटाचे गायक**१९८१: मुरहारी कराड -- कवी, लेखक संपादक* *१९७३: किरण दत्तात्रय दशमुखे -- लेखक, संपादक* *१९७१: श्रीकांत अनंत उमरीकर-- कवी, संपादक* *१९६९: शिवा कांबळे -- लेखक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९६६: स्वाती संदीप दाढे -- कवयित्री, अनुवादक**१९६६: सदाशिव नारायण जोशी -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६६: ए. आर. रहमान – संगीतकार**१९६४: विनोद जनार्दन शिंदे -- कवी, लेखक**१९६३: प्रशांत प्रकाशचंद्र पनवेलकर -- प्रसिद्ध कवी**१९६२: बिंदिया गोस्वामी -- भारतीय माजी अभिनेत्री* *१९५९: कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार समालोचक व प्रशिक्षक**१९५८: डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर -- लेखिका**१९५८: तल्लुरी रामेश्वरी(रामेश्वरी) -- भारतीय अभिनेत्री* *१९५५: रोवान अ‍ॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक**१९३१: डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ,’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष**१९२८: विजय धोंडोपंत तेंडुलकर -- प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक,पटकथालेखक,तथा राजकीय विश्लेषक(मृत्यू: १९ मे २००८ )**१९२७: राम तेलंग-- कवी, लेखक**१९२६: डॉ. पद्मिनी भांडारकर -- लेखिका (मृत्यू: ४ मार्च २०१३ )* *१९२५: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८ )**१८८३: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१ )**१८६८: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’,’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२ )**१८१२: बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह,१८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला.’दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६ )* 📝 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*📝••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे -- लोकसाहित्याचे अभ्यासक,नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक.(जन्म: १५ मे १९५२ )**२०१७: ओम प्रकाश पुरी -- भारतीय अभिनेते(जन्म: १८ ऑक्टोबर १९५०)* *२०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३ )**१९८७: जयदेव(जयदेव वर्मा) -- हिंदी चित्रपटांतील संगीतकार (जन्म:३ ऑगस्ट १९१८)**१९८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४ )**१९८१: ए. जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६ )**१९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३ )**१९१९: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८ )**१९१८: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५ )**१८८५: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,१८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.(जन्म: ९ सप्टेंबर १८५० )**१८८४: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२ )**१८५२: लुई ब्रेल–अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९ )**१८४७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७ )**१७९६: जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती,मुत्सद्दी*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठी वृत्तपत्राचे जनक -----*दर्पणकार : बाळशास्त्री जांभेकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात धडकणार, येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एक ही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिजनेस जत्रेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन, नवीन ज्ञान दृष्टी देणाऱ्या बालसाहित्याची गरज - ज्येष्ठ लेखिका मंगला वरखेडे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अक्कलकोट - गेल्या 15 दिवसांत 15 लाख भाविकांनी अन्नछत्रचा लाभ घेतल्याची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटी सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅट कमिन्सने रचला इतिहास ! WTC मध्ये 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. शीला पठारे👤 मोहन घोसले👤 रितेश जोंधळे👤 सुदर्शन कोंपलवार👤 अभिषेक अडकटलवार, नांदेड👤 इंजि. सुरेश दासरवार, नांदेड👤 अरुण गादगे, नांदेड👤 बजरंग माने👤 भगवान चव्हाण👤 शिवकुमार गंगुलवार👤 विजयकुमार भंडारे, शिक्षक, धर्माबाद👤 बाबुराव आगलावे👤 अंकुश आरेकर👤 शुद्धोधन कैवारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संजीवनी - संजीवनी रामचंद्र मराठे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक अनंत आव्हान , प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरोखर कसोटीच असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान कोणता ?२) क्रीडा मंत्रालयाने यंदा 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कारासाठी किती खेळाडूंच्या नावाची घोषणा केली ?३) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे ?४) 'वेश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अर्जून पुरस्काराचे स्वरूप काय आहे ? *उत्तरे :-* १) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २) चार - मनू भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार ३) पदक, प्रमाणपत्र व २५ लाख रु. ४) पोशाख ५) अर्जुनाची मूर्ती, प्रमाणपत्र व १५ लाख रु.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते.हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या.धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे.गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम. 'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय. असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥ संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥ जन्मजन्मांतरीं जाणावें कवणें । नेणोनि भोगणें कवणें स्वामी ॥३॥ नामा म्हणे केशवे भक्तवत्सले । आम्हांसि वेगळे होऊं नका ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी कोणी एकाकी खोटे सांगत नाही. कारण त्या विषयी त्याला चांगल्याप्रकारे अनुभव आलेला असतो. म्हणून ते, दुसऱ्यांदा चुकीचे घडू नये यासाठी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला कोणाच्या सांगण्यावरून नको त्या शब्दात बोलून त्याचा अवमान करू नये. बरेचदा सत्य न ऐकून घेतल्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाईट सवयींचा त्याग*एक व्यापारी होता. तो जितका व्यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली. मित्र म्हणाला, त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन. त्या व्यापा-याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले, मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला. मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते." मुलाला त्याच्या मित्रकाकांचा उपदेश सहजपणे लक्षात आला व त्याने चांगले वागण्याचे ठरवले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment