✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/06/blog-post_70.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *प्रवासी भारतीय दिवस* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.**२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.**१९९२: पहिले मराठी कामगार साहित्य संमेलन नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न**१९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन**१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा**१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.* 🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: अनुषा दांडेकर -- भारतीय मॉडेल चित्रपट अभिनेत्री**१९७४: पंडित रामाजी लोंढे -- कवी* *१९७४: फरहान अख्तर -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, लेखक, संवाद लेखक, गायक**१९६८: नंदिनी सोनवणे -- लेखिका, संपादिका**१९६८: शोभा चित्रे -- लेखिका**१९६७: विजय बाबुराव येलमेलवार -- लेखक**१९६५: फराह खान -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखिका, चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री, नृत्यांगना आणि कोरिओग्राफर**१९६३: डॉ. लीना पांढरे -- लेखिका, अनुवादक(मृत्यू: २६ सप्टेंबर २०२१)**१९६३: सुरेश कृष्णाजी पाटोळे -- प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक**१९६०: डॉ. किशोर रामचंद्र महाबळ -- अभ्यासू, लेखक तसेच अनेक वृत्तपत्रांतून लेखन (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१५ )**१९५८: डॉ. सायन्ना पिराजी मठमवार -- लेखक**१९५१: प्रा.अजित मधुकर दळवी -- प्रसिद्ध नाटककार**१९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य**१९४६: सुभाषकुमार अनंतराव बागी -- कवी, लेखक* *१९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणितज्ज्ञ (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४ )**१९३४: महेंद्र कपूर –पार्श्वगायक (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ )**१९२७: राजाराम भालचंद्र पाटणकर -- मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मे २००४ )**१९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ )**१९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११ )**१९१८: प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे -- पत्रकार, समीक्षक, मार्क्सवादी विचारवंत(मृत्यु: १० जुलै १९८९ )**१९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ एप्रिल १९९४ )**१८७७: केशवराव रघुनाथ देशमुख -- ज्ञानेश्वरी प्रवचनकार व संतकव्याचे अनुवादक (मृत्यू: २७ एप्रिल १९४२ )**१८५४: रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर -- मराठी कवी व भाषांतरकार (मृत्यू: ४ जून १९१८ )**१८३१: फातिमा शेख -- भारतीय शिक्षणतज्ज्ञ, पहिल्या मुस्लिम शिक्षिका, समाजसुधारक,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९०० )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: उस्ताद राशिद खान -- भारतीय शास्त्रीय संगीतकार (जन्म: १ जुलै १९६८ )**२०२३: विश्वास मेहेंदळे -- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते (जन्म: १० जुलै १९३९ )**२०१३: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९१९ )**२००४: शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म: १९११ )**२००३: कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: १९१९ )**१९४५: गोविंद रामचंद्र मोघे -- कवी, ग्रंथकार (जन्म: १८६० )**१९२३: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी(ICS)(जन्म: १ जून १८४२ )**१८४८: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले (जन्म: १६ मार्च १७५० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - मायेची ओढ*..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात कुठेही अपघात झाली तरी जखमींना कॅशलेस उपचार मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या रॉकेटची निर्मीती करणारे वैज्ञानिक ; डॉ. व्ही नारायणन होणार ISRO चे अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली विधानसभेसाठी तृणमूलचा आप ला पाठींबा, अरविंद केजरीवालने मानले दीदीचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कलिंगा फाउंडेशनला वसुंधरा मित्र पुरस्कार, किंग कोब्राच्या संवर्धनासाठी गांभीर्याने प्रयत्न आवश्यक, डॉ. पी. गौरी शंकर यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडने दुसरा एकदिवसीय सामना 113 धावांनी जिंकला, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी; तीक्षणाची हॅट्ट्रिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकुमार पंतुलवार👤 विष्णुकांत इंगळे👤 हमीद साब शेख👤 सुप्रिया ठाकूर👤 अजित राठोड👤 माधव नरवाडे👤 सुहास अनिल देशमुख👤 आमिर अली शेख👤 राजेश रामगिरवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाबा कदम - वीरसेन आनंद कदम*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १२०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ?२) भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या नावाने कोणत्या देशात 'ए. आर. रेहमान स्ट्रीट' असे रस्त्याचे नामकरण करण्यात आले ?३) महात्मा फुलेंनी 'तृतीय रत्न' ही नाटक कोणत्या साली लिहिली ?४) 'शक्ती' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'मित्रप्रेम' ही कादंबरी कोणी लिहिली ? *उत्तरे :-* १) पुष्पा २ - द रूल २) कॅनडा ( मरखम शहर ) ३) सन १८५५ ४) बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा ५) हुतात्मा अनंत कान्हेरे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *एन्डोस्कोपी म्हणजे काय ?* 📙 मानवी शरीराची बाह्यत: तपासणी सहज शक्य असते. काही भागांत छोटेसे उपकरण घालून अंतर्भागातील काही गोष्टी तपासणेही गेली अनेक दशके प्रचारात होतेच. उदाहरणार्थ, घशामध्ये लॅरिंगोस्कोप घालून स्वरयंत्रापर्यंतचा भाग बघणे वा गुदद्वारातून प्रोक्टोस्कोप घालून पाइल्सची तपासणी, योनिमार्गात व्हजायनोस्कोप घालून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागाची तपासणी करून आजाराचे निदान वा इलाज करणे चालूच होते. संपूर्ण शरीराच्या आतील भागाची क्ष किरण वा अल्ट्रा साऊंडद्वाराही तपासणी करणे काही दशके डॉक्टर्स करीत होतेच. पण या साऱ्यामध्ये एक उणीव कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रत्यक्ष अवयवाचा तपासायचा भाग डोळ्यांनी पाहता येत नव्हता. त्या जागेपर्यंत पोहोचून त्याचा छोटासा भाग तपासणीसाठी बाहेर काढता येत नव्हता.या अडचणीमागचे महत्त्वाचे कारण होते, प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच प्रवास करीत असल्याने दृश्यमान करण्याच्या भागात पोहोचताना आलेले कोणतेही वळण, बाक हा अडथळा ठरत होता. या सार्यावर उपाय सापडला, तो फायबरऑप्टिक तंत्रज्ञानाचा सरसकट वापर सुरू झाला त्यावेळी.कोठेही कशीही वळू शकणारी, शरीरातील प्रमुख रंध्रातून वा भोकातून प्रवेश करू शकणारी फायबर ऑप्टिक वायर, तिच्या तोंडाशी असणारा प्रखर उजेड टाकणारा दिवा व या साऱ्यांच्या मदतीने दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा फायबर ऑप्टिकमुळे दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचू लागल्या. त्यांना भिंगाद्वारे मोठे करून साध्या डोळ्यांनी तर पाहता येऊ लागलेच, पण आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे याच सर्व प्रतिमा शेजारी ठेवलेल्या टीव्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष रुग्ण व त्याचे सर्व डॉक्टर्सही पाहू लागले आहेत. गरजेनुसार याचे कॉम्पॅक्ट डिस्कवर आरेखन करून ठेवता येते व दुसर्या कोण्या तज्ञाचे मत घ्यायचे असेल, तर त्यालाही पाठवता येते.याचा महत्त्वाचा फायदा झाला, तो म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत लांबलचक असलेल्या काही मीटरच्या अन्नमार्गाचे संपूर्ण परीक्षण आता शक्य झाले आहे. अन्ननलिकेची सूज, जठरातील व्रण, छोट्या आतड्यातील अंतस्त्वचेतीलन बदल, मोठ्या आतड्यातील अडथळे एवढेच नव्हे, तर पित्ताशयाची तपासणीही यामुळे शक्य झाली. फुफ्फुसांकडे हवा पोहोचवणाऱ्या नलिकांची तपासणी, तेथे साचलेल्या कफाची विल्हेवाट लावणेही या पद्धतीने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानात भर पडली, ती लॅप्रोस्कोपी या शल्यप्रकाराची. फायबर ऑप्टिक प्रकाशाचा वापर करून शरीरातील विविध पोकळ्यांमधील कोणत्याही अवयवावर शस्त्रक्रिया करणे आज सहज शक्य झाले आहे. आत घातलेल्या नळीतूनच कात्री, चिमटा, रक्त थांबवणारी इलेक्ट्रिक कॉटरी - जिचा वापर करून तीव्र उष्णतेने रक्तवाहिन्यांची तोंडे बंद केली जातात - इत्यादी उपकरणे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात. शरीरावर म्हणजेच मुख्यत्वे पोटावर पूर्वी चार ते पाच इंचाचा छेद घेऊन करावी लागणारी अनेक शस्त्रकर्मे आता केवळ दोन वा तीन करंगळीच्या आकाराच्या नळ्या आत सारुन केली जातात. अर्थातच रुग्णाचा बरे होण्याचा काळ जखमा मोठ्या नसल्याने खूपच कमी होतो. पूर्वी ज्या शस्त्रकर्मानंतर किमान पंधरा दिवस रुग्णालयात खाटेवर राहणे गरजेचे होते, तो काळ आता या पद्धतीने जेमतेम एक ते तीन दिवसांपर्यंत येऊन पोहोचला आहे.याही पुढचा टप्पा म्हणजे छोट्या कॅप्सूलच्या आकाराचा 'बग' म्हणजे छुपा कॅमेरा रुग्ण गिळतो. त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चित्रणाच्या संदेशांचे टीव्हीवर वर मोठ्या पडद्यावर सतत प्रक्षेपण होत राहते. सोळा ते अठरा तासांनंतर हा 'बग' शरीराबाहेर टाकला जातो. आज जरी महागडी व प्रयोगाव्यवस्थेतील ही तपासणी असली, तरी काही वर्षात जगभर तिचा वापर जरूर सुरू होईल.साधी डॉक्टरी तपासणी जर दोन तीनशे रुपयात होत असेल, क्ष किरण व अल्ट्रासाऊंडसाठी चार पाचशे रुपये पडत असतील तर एन्डोस्कोपीसाठी मात्र दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्याचे कारण सरळच आहे. वापराव्या लागणाऱ्या सामग्रीची किंमत काही लाखांच्या घरात असते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥ मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥ गाईन तुझें नाम ह्रदयीं धरुनि प्रेम । हाचि नित्य नेम सर्व माझा ॥३॥ नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा । तूं आम्हां सोईरा आदिअंतीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे असतेच असेही नाही. कारण काहीजण आपली परीक्षा घेण्यासाठी नको ते,प्रश्न सुध्दा विचारू शकतात. म्हणून काही प्रश्नांची उत्तरे देण्याआधी विचार करावा व आपले कार्य निरंतर सुरु ठेवावे. सत्कार्य हेच आपले उत्तर ठरत असते. त्यातूनच आपली ओळख सुद्धा होत असते.म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. आपले कार्य सतत चालू ठेवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्यंग*चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण ! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"*तात्पर्य : दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment