✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15Sg3PNj9X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌏 *_भूगोल दिन_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील १४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••*२०००:ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.**१९९८:दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान जाहीर.**१९९४:मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.**१९४८:’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.**१९३४:विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर स्थापना दिवस**१९२३:विदर्भ साहित्य संघाची स्थापना कवीभूषण अण्णासाहेब खापर्डे यांनी केली**१७६१:मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: प्रफुल्ल राजेंद्र शेजव -- लेखक**१९८३: सुरेश किसनराव भिवगडे -- कवी**१९७९: प्रा. डॉ .पृथ्वीराज भास्करराव तौर -- कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरकार आणि संशोधक**१९७७: कुमार राम नारायण कार्तिकेयन-- भारतीय रेसिंग ड्रायव्हर**१९७१: महेंद्र दाजीसाहेब देशमुख -- कवी**१९६६: श्रीनिवास वारुंजीकर -- कवी, पत्रकार,अनुवादक**१९६६: पुष्पराज गावंडे -- प्रसिद्ध कवी, कादंबरीकार* *१९६५:सीमा बिस्वास -- भारतीय अभिनेत्री* *१९६१: निर्मला रामदास पाटील -- कवयित्री* *१९५७: डॉ. शैलेजा शंकर कोरडे -- लेखिका, कवयित्री* *१९५३: प्रा.डॉ.प्रदीप विटाळकर -- लेखक**१९४२: योगेश कुमार सभरवाल -- भारताचे ३६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: ३ जुलै २०१५ )**१९३९: प्रा. सुरेश श्रीकृष्ण पांढरीपांडे -- लेखक**१९३८: रघुवीरसिंग यादवसिंग राजपूत -- प्रसिद्ध लेखक* *१९३८: राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार**१९३५: श्रीकांत शंकरराव सदावर्ते -- कवी, लेखक* *१९३२: डॉ. विठ्ठल बाबू तथा वि.बा. प्रभुदेसाई -- साहित्य संशोधक, मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख (मृत्यू: ३ मे २०१८ )**१९३२: प्रभा पार्डीकर -- प्रसिद्ध साहित्यिक* *१९३१:सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू:२५ ऑगस्ट २००८)**१९३१: प्राचार्य डॉ. नारायण यशवंत डोळे -- उत्तम लेखक, प्रभावी वक्ते (मृत्यू: ३० ऑक्टोबर २००१ )**१९३०: पंढरीनाथ केशवराव कांबळे -- लेखक**१९२८: अॅड. माधव गणेश सराफ -- लेखक**१९२६: विठ्ठल शंकर पारगावकर -- प्रसिद्ध लेखक**१९२६; महाश्वेता देवी – प्रसिध्द बंगाली लेखिका (मृत्यू: २८ जुलै २०१६ )**१९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९ )**१९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२ )**१९१२:द्वारकानाथ भगवंत कर्णिक -- महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक व लेखक (मृत्यू: १४ ऑक्टोबर २००५ )**१९०५: डॉ. ग. शि. पाटणकर -- लेखक* *१९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री.’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१ )**१८९६: सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी.डी.देशमुख-- ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२ )**१८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा.दिनकर बळवंत तथा दि.ब.देवधर –भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३ )**१८८३: कृष्णाजी केशव कोल्हटकर -- ग्रंथकार, योग व वेदान्त अभ्यासक (मृत्यु: २६ एप्रिल १९७५ )**१८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७० )**१८८२: रघुनाथ धोंडो तथा र.धों.कर्वे –महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठपुत्र (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३ )*🌏 *मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: शिवाजीराव बापूसाहेब देशमुख -- महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती (जन्म: १ सप्टेंबर १९३५ )**२००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते* *१९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७ )**१९८६: मालती माधव दांडेकर -- कथाकार, कादंबरीकार (जन्म: १३ एप्रिल १९१५ )**१९४६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर-- लेखक (जन्म: २ जानेवारी १८८६ )* *१७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३० )**१७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२ )**१७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ,भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत*तिळगुळ घ्या - गोड गोड बोला*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिंदे, पवारांची हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, विभागाच्या वतीने 100 दिवसांचा आराखडा सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात विजेची विक्रमी मागणी, शनिवारी 25,808 मेगावॅट वीज पुरवठा; कृषीपंपांमुळे मागणीत वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रयागराज - जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा कुंभमेळ्याला प्रारंभ, देश-विदेशातून भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीडमधील केजच्या कन्येकडं भारताच्या खो-खो संघाची धुरा, वर्ल्ड कपमध्ये प्रियंका इंगळेकडं नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वप्नील पाटील👤 दीपक उशलवार👤 शिवहार चपळे👤 सुधाकर एम. कदम👤 तानाजी कदम👤 कैलास तालोड👤 रमेश बंडे👤 पवन कुमार तिकटे👤 सुनील मुंडकर👤 राजू वाघमारे👤 गौतम सोनकांबळे👤 मोनाली सोमवंशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुलाच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलाचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. -- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील प्रथम मुस्लीम महिला शिक्षिका कोण ?२) लोणार सरोवराची उत्पत्ती कशामुळे झाली असे मानले जाते ?३) बॉर्डर - गावस्कर कसोटी मालिकेत 'मालिकावीर' पुरस्कार कोणी जिंकला ?४) 'शेज' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत ? *उत्तरे :-* १) फातिमा शेख २) उल्कापात ३) जसप्रीत बुमराह, भारत ४) बिछाना, अंथरूण, शय्या ५) राम शिंदे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच " गड्डा " यात्रा*सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंधीध्व्ज उभारले जातात.चार दिवस चालणार्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आद्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढरे वस्र्त परीधन केलेले असतात,यास बाराबंदी असे म्हटले जाते.१२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लीगाना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा सपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात निदीध्वजाच्या वस्त्रावीसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते,सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही ,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥ वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥ नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणावरही का असेना विश्वास करताना थोडा विचार करावा म्हणतात. पण, एकदा अवश्य विश्वास करून बघावा. बरेचदा असं होतं की, एकाद्या व्यक्तीवर अविश्वास केल्याने नुकसान आपलेच होते कारण काही चांगल्या गोष्टी किंवा मदत प्रत्येकांकडूनच मिळतात असेही नाही म्हणून विश्वास करताना थोडे माणसं वाचूनही विश्वास करावा. बरेचदा त्यातून अनुभव ही येत असतो सोबतच शिकायला सुद्धा मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवनाचे सार*एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्यसने करीत असे आणि आपल्याबरोबरच तो प्रधानालाही म्हणायचा," मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे आता जो जन्म मिळाला आहे त्याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्या." प्रधान हा सन्मार्गी माणूस होता. त्याला बादशहाच्या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दुःख व्हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्हते. बादशहा आपल्या मौजमजेच्या इतका आहारी गेला होता की त्याला आपल्या प्रजेची आठवण नसायची. प्रजेमध्ये बादशहाबाबत असंतोष होता मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्याने कोणीही काही करू शकत नव्हते. एकेदिवशी प्रधानाने केलेल्या काही कामामुळे बादशहा फारच खुश झाला. त्याने दरबारामध्ये प्रधानाचा सत्कार केला व त्याला एक अत्यंत भरजरी व मौल्यवान अशी शाल भेट म्हणून दिली. पण प्रधानाने दरबाराच्या बाहेर येताच त्या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्ट नेमकी प्रधानाच्या विरोधात असलेल्या एकाने राजाला जाऊन सांगितली. बादशहाला राग आला, त्याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्यवान वस्तूचा अनादर करण्याचे कारण विचारले असता प्रधान म्हणाला," बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्ही मला शिकवत आला आहात." बादशहा विचारात पडला की आपण असे काय शिकवले. प्रधान परत बोलू लागला, "महाराज, देवाने आपल्याला या शालीपेक्षा मौल्यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्याचा गैरवापर करत आहात. व्यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात. तो जेव्हा आपणाकडे पाहत असेल तेव्हा परमेश्वराला किती वाईट वाटत असेल की इतक्या मौल्यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्याची घाण करत आहात. परमेश्वराचा प्रत्येक हृदयात वास असतो आणि त्याच शरीराला तुम्ही वाईट मार्गाने वापरत आहात." प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्हा कधीही त्याने गैरवर्तन केले नाही.तात्पर्य – ईश्वराने दिलेल्या शरीरसंपदेचा योग्य मागनि वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्वराकडून मिळाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment