✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_बालिका दिन, महिला मुक्तिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील तिसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.**१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.**१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.**१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.**१४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: मधुकर बाळासाहेब जाधव -- लेखक, कवी**१९७९: गुल पनाग (जन्म (गुलकीरत कौर पनाग) -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल* *१९७५: प्रा. डॉ. विजय फकिरा राठोड -- कवी लेखक, व्याख्याते* *१९७१: सरिता सुवास परसोडकर -- कवयित्री**१९७१: अशोक गणपतराव पाठक -- कवी**१९६५: धनंजय माधवराव मुळे -- लेखक,कवी**१९६२: डॉ. मेघा उज्जैनकर -- लेखिका**१९६१: राजेंद्र खेर - सुप्रसिद्ध कादंबरीकार**१९६०: डॉ. वृषाली किन्हाळकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका तथा प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर* *१९५८: दिगंबर पवार -- कवी**१९५६: शिरीष श्रीकृष्ण गंधे -- कवी, लेखक, चित्रकार, व्याख्याते, अभिनेते**१९५४: सुभा आत्माराम लोंढे -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५२: श्रीराम वसंतराव ढवळीकर -- लेखक, पत्रकार**१९५१: अशोक निळकंठ सोनवणे -- प्रसिद्ध कवी लेखक तथा विविध पुरस्काराने सन्मानित**१९५०: प्रभाकर निलेगावकर -- मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत* *१९४९: प्रसाद तुकाराम सावंत -- लेखक**१९४७: मनोहर गणपत भारंबे -- लेखक**१९४६: प्रा. डॉ. दीनानाथ सिद्धराम फुलवाडकर -- कवी, कथाकार, संपादक* *१९४३: श्रीकांत दत्तात्रेय निंबवीकर -- प्रसिद्ध कथाकार**१९४१: संजय खान (शाह अब्बास अली खान) -- भारतीय अभिनेता, निर्माता* *१९४१: अमिताभ ( वामन नगराळे)-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९३७: सिंधू सदाशिव डांगे -- संस्कृत संशोधक, लेखिका,संपादक**१९३१: डॉ. य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८ )**१९२६: हरिश्चंद्र भास्कर उजगरे -- लेखक, संपादक**१९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७ )**१८८३: क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९६७ )**१८५३: कृष्णाजी नारायण आठल्ये -- संपादक,चित्रकार, टीकाकार, निबंधकार, कवी (मृत्यु: २९ नोव्हेंबर १९२६ )**_१८३१: सावित्रीबाई फुले – भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.(मृत्यू: १० मार्च १८९७ )_*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: डॉ.चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी -- भारतीय न्यायाधीश, लेखक (जन्म: २० नोव्हेंबर १९२७ )**२०१५: सरिता मंगेश पदकी -- कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका (जन्म: १३ डिसेंबर १९२८ )**२००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२० )**२०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४ )**१९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९ )**१९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २५ जून १९१९ )**१९८७: अरविंद देशपांडे -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेता आणि थिएटर दिग्दर्शक (जन्म: ३१ मे १९३२ )**१९७५: ललितनारायण मिश्रा--बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.(जन्म: २ फेब्रुवारी १९२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मी सावित्री बोलतेय....!*....!*नमस्कार .....मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्र्यांच्या दौऱ्यात आता पुष्पगुच्छ व मानवंदना बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत नागरिक व भाविकांची गर्दी, प्राण्यांचे बाजारही फुलले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 ते 20 फेब्रुवारी कालावधीत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर पैठणचे उद्यान 5 वर्षांनी होणार सुरू, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना कडक सुचना, 26 तारखेपासून पर्यटकांसाठी होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यामध्ये 2 महिला अधिकारीचा समावेश, सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेतील अर्जाची होणार पुन्हा पडताळणी, सरकारी नोकरीसह दुचाकीसह अन्य वाहने नावावर असणारे महिला ठरतील अपात्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्राच्या खेलरत्न पुरस्काराची घोषणा, मनू भाकर, डी. गुकेश सह अन्य दोघांना खेलरत्न पुरस्कार, 34 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक, नांदेड👤 ज्ञानेश्वर विजागत , शिक्षक👤 वर्षा भोळे , नांदेड👤 शुभांगी परळकर , नांदेड👤 संदीप जाधव👤 माधव पवार👤 योगेश पाटील👤 उत्तम जोंधळे👤 राजेश पिकले👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अनंत फंदी - शाहीर अनंत घोलप*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणाच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारीला बालिका दिवस* साजरा केला जातो ?२) महाराष्ट्रातील प्रथम महिला मुख्याध्यापिका कोण ?३) भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण ?४) भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या कोण ?५) पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले २) सावित्रीबाई फुले ३) सावित्रीबाई फुले ४) सावित्रीबाई फुले ५) सावित्रीबाई फुले *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समुद्रकिनाऱ्यावरचे प्राणिजीवन* 📙 समुद्र अनेकांनी नक्कीच पाहिला असेल. कदाचित अनेकांचा जन्मच समुद्राकाठी गेला असेल. विविध वेळी समुद्राची विविध रूपे न्याहाळत असताना, लाटांकडे बघत असताना त्याच्या पोटातील समुद्र प्राणीजीवनाची मात्र अजिबात जाणीव होत नाही. अगदी क्वचित एखादा मासा लांबवर सुळकांडी मारताना लाटेबरोबर दिसतो किंवा त्याला टिपण्यासाठी गलपक्ष्यांची झेप नजरेत भरते, एवढेच. जी गोष्ट समुद्राची तीच समुद्रकिनाऱ्याची. शिंपले, रंगीबेरंगी शंख, चमकते अभ्रकाचे पापुद्रे गोळा करण्यात किंवा समुद्रावर वाळूचे किल्ले बांधण्यात अनेकांनी ओहोटीच्या वेळी तासंतास घालवलेले असतील. पण याच किनाऱ्यावर विविध प्राण्यांचे वास्तव्य असते, हे फारसे कधी जाणवणार नाही. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते.किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्याचा भाग हा अत्यंत विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांनी खच्चून भरलेला असतो, असे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरू नये. जिथे खडकाळ किनारा असेल, तेथे तर हे प्रमाण कितीतरी जास्त असते, कारण मऊ माती व रेतीपेक्षा खडकाळ किनाऱ्याचा आधार घेऊन अल्गी, प्रवाळ, शिंपल्यातील प्राणी वाढतात. स्वतःची घरे करतात. त्याचा सलग असा सुंदर पृष्ठभाग खडकांवर तयार होत जातो. रेतीच्या किनार्‍यातही प्राणी असतातच; पण ते सर्व मऊशार शरीराचे असतात.किनाऱ्याचे ढोबळमानाने चार भाग केले जातात. लाटा फुटून विरतात, तो एक भाग. नंतरचा सर्वात उंच लाट ते तेथपासून भरतीच्या वेळच्या सर्वात कमी उंचीच्या लाटेपर्यंतचा दुसरा टप्पा. तिसरा भाग म्हणजे ओहोटीची सर्वात मोठी लाट व भरतीची सर्वात लहान लाट यांमधला. शेवटचा टप्पा ओहोटीच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान लाटेदरम्यानचा. या प्रत्येक टप्प्यातील पाण्याच्या मार्‍यानुसार, गरजेनुसार विविध प्राणी वास्तव्य करतात. वरवर पाहता फारसा पत्ता न लागणाऱ्या किनाऱयावर पूर्ण ओहोटी असताना सावकाशपणे हिंडत निरीक्षण केले, तर यांतील काही मंडळी दृष्टीला पडतात. निळसर गोलाकार डॉलरच्या आकाराचे गोल बिळात शिरताना दिसतात, तर दोहोबाजूंना असंख्य पाय असलेले आयसोपॉड्स हिंडताना व खाद्याच्या शोधात दिसतात. खिडक्यांची बिळेही दिसतात, तर ओहोटीच्या पाण्यात स्टारफिशही वळवळताना सापडतात. शिंपल्यांचे विविध प्रकार याच वेळी दिसतात, तर पाठीवर शंखांचे ओझे घेऊन चालणारे कोळसपण या वेळी हलताना दिसतात.या विविध प्राण्यांच्या गरजांप्रमाणे त्यांनी किनाऱ्याचे मघाशी सांगितलेले चार टप्पे आपलेसे केले आहेत. प्रत्येकजण वास्तव्यासाठी आपापला टप्पा पकडूनच राहतो, हे किनाऱ्याचे वैशिष्टय़ म्हणता येईल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥ ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥ जेथें जेथें मन जाईल हें माझें । तेथें तेथें तुझें रूप भासे ॥३॥ नामा म्हणे मी सर्वांपरी अज्ञान । विनवी आस करून पांडुरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रोध हा माणसाचा शत्रू आहे म्हणतात. या क्रोधामुळे आपण कधी, कधी उलट, सुलट बोलल्याने समोरील व्यक्तीचे मन दुखावत असते. अशा व्यक्तीशी संवाद ठेवण्यात अनेक इच्छुक नसतात. म्हणून बोलताना पुढच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेवून संयमाने बोलण्याचा प्रयत्न करावा.विणाकारण किंवा लहान, सहान गोष्टीवरून कोणाचे मन दुखावेल अशा शब्दात बोलू नये.क्रोध हा क्षणासाठी असतो मात्र ज्यावेळी आपल्याच माणसाला बोलून दु:खी केले जाते दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीच्या मनात तो स्थान असेलच असे नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टीकोन बदला*एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे असा भ्रम त्याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्याने वाटसरू येईनात, फळे नसल्याने पक्षी राहिनात अशी अवस्था झाली. झाडाला वाईट वाटले त्याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्या कल्याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणात राहणार आहेस. तेव्हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्याने दुःख न मानण्याचे ठरवले.तात्पर्य : कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील चांगल्या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्मक विचारसरणीने नुकसान होण्याचीही शक्यता असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment