✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण**१९९८:ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना 'ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर**१९९६:पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड**१९९५:आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.**१९७९:शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.**१९५५:पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण**१९२०:अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.**१९१९:अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.**_१६८१:छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला._**१६६०:रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:प्रा.विनय अमृतराव पाटील -- कवी**१९६०:साहेबराव विश्वनाथ कांगुणे-- लेखक, वक्ते**१९५८:श्रीकांत सदाशिव मोरे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६:नारायण भगवानराव पांडव-- कवी* *१९५१:डॉ.जयप्रकाश रामचंद्र कुलकर्णी -- लेखक**१९५०:मधुकर सदाशिव वाघमारे -- कवी, लेखक* *१९४७: सिद्धार्थ यशवंत वाकणकर-- हस्तलिखितशास्त्र व भाषाशास्त्रज्ञ,संशोधक**१९४६:कबीर बेदी – चित्रपट अभिनेते**१९४३:नलिनी भीमराव खडेकर -- कवयित्री, लेखिका**१९४२:कृष्णा चौधरी --कवी,लेखक**१९२८:बाळासाहेब पित्रे--ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९२८:रामचंद्र दत्तात्रेय लेले--वैद्यकशास्त्रज्ञ**१९२७:कामिनी कौशल-- भारतीय अभिनेत्री**१९२६:ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (मृत्यू:२८ जानेवारी २००७)**१९२०:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू:११ डिसेंबर २००२)**१९१९:मधुसूदन ऊर्फ लालजी रघुनाथराव गोखले-- ज्येष्ठ तबलासम्राट(मृत्यू:१६ नोव्हेंबर २००२)**१९०९:विनायक रघुनाथ चितळे -- लेखक**१८५३:आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू:४ एप्रिल १९३१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अरुण जाखडे-- मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक(जन्म:७ जानेवारी १९५५)**२०१७:प्रा.पुरुषोत्तम पाटील-- मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते (जन्म:३ मार्च १९२७)**२०११:प्रभाकर कृष्णराव काळे-- कवी, संपादक (जन्म:१९३८)* *२००५:श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे* *२००३:रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९७:कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म:१९३३)**१९८८:डॉ.लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,मुत्सद्दी,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर,जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म:२२ नोव्हेंबर १९१३)**१९६७:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म:२० डिसेंबर १९०१)**१९६६:साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म:२५ नोव्हेंबर १८७९)**१९५४:बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,चित्रकार,शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म:३ जून १८९०)**१९३८:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक,त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा.कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म:१५ सप्टेंबर १८७६)**१९०९:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म:१८ जानेवारी १८४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या दौऱ्यात नौदलाच्या तीन नौकाचे केले राष्ट्रार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अखिल मराठा फेडरेशन कडून खासदार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द ग्रेट मराठा पुरस्कार जाहीर, अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश वापरण्यास बंदी, वैमानिकांच्या सुरक्षितता संबंधी आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई, पुण्यासह राज्यभरात सुरू होणार बाईक टॅक्सी सेवा, सरकारने बनविला कायदा, पुढील दोन महिन्यात लागू होण्याची शक्यता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कंधारच्या उरूस निमित्ताने उद्या नांदेड जिल्ह्यात कलेक्टर डिक्लेअर सुट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे विद्यापीठात राज्य क्रीडा दिन उत्साहात, खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाचा आयर्लंडवर विक्रमी विजय, एकदिवसीय मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - Kunal Paware 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग ५ (५/६) - मानवी वाटचालगोरिला आणि चिंपांझी या माकडांच्या शरीरातील रक्तातील प्रथिने, हिमोग्लोबिन आणि डी.एन.ए. यांचे माणसाच्या शरीरातील याच घटकांची मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. यावरूनच गोरिला, चिंपांझी आणि माणूस या तीन्ही शाखा सुमारे चाळीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून जन्मल्या असाव्यात, असा अंदाज केला जातो. उत्खननात सापडणाऱ्या जीवाश्मांच्या मदतीने मानवाच्या उत्क्रांतीतील वाटचालीचा खुणा धुंडाळाव्या लागतात.सर्वात प्राचीन जीवाश्म आहे रामपिथेकसचा. भारत आणि पूर्व आफ्रिकेत आढळून आलेल्या अवशेषांवरून आजच्या माणसाशी साम्य सांगणाऱ्या शारीरिक खुणा रामपिथेकसमध्ये होत्या हे लक्षात येते. त्याचा काळ होता सुमारे एक कोटी वीस लाख वर्षांपूर्वीचा.त्यानंतर भेटतो सुमारे पस्तीस लाख वर्षांपूर्वी वावरणारा ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेनिस. मागच्या दोन पायांवर उभे राहून ताठ चालणे हे मानवी प्राण्याचे वैशिष्ट्य या पूर्वजात पुर्ण रुजलेले आढळते. मात्र मेंदूचा आकार अद्याप लहानच होता. तर जबडा आणि दातांचा आकार मोठा होता. ऑस्ट्रेलोपिथेकस - आफ्रिकॅन्स ऑस्ट्रेलोपिथेकस - रोबोस्ट्स असे बदल होत सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी 'होमो' या जातीचा जन्म झाला.होमो इरेक्ट्स ही ऑस्ट्रेलोपिथेकस आणि आजच्या मानवाच्या मधली पायरी होती.आजचा मानव म्हणजे होमो सेपियन्स. जीवाश्म स्वरूपात हा होमो सेपियन्स भेटतो साधारण पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात.मेंदूच्या आकारात वाढ होत गेली होती.सुरुवातीला होमो सेपियन्स निअँडरथालच्या कवटीची हाडे जाड होती, कपाळ अरुंद होते.हे सगळे शारीरिक बदल होत आजच्या स्वरूपातील माणूस सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये भेटतो.सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे कोडे विचारवंतांना अनेक वर्षे पडलेले आहे. 'देवाने प्रत्येक प्रकारच्या प्राण्याची एकेक जोडी बनवली,' या बायबलमधील मताशी सहमत होणे अनेकांना जड जात होते. अनेकांनी या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.उपलब्ध पुरावे, सूक्ष्म निरीक्षण आणि साऱ्यांची सांगड घालून मांडलेली तर्कशुद्ध शास्त्रीय उपपत्ती अशा स्वरूपात उत्क्रांतीवाद मांडणारा पहिला शास्त्रज्ञ ‘चार्ल्स डार्विन'क्रमश :- ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- श्रीमती प्रमिला सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात मोठे धार्मिक सम्मेलन कोठे भरते ?२) प्रयागराज येथील महाकुंभ मेळावा कोणत्या तीन नद्यांचा संगमावर भरतो ?३) प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ किती दिवस चालणार आहे ?४) कुंभाचे तीन प्रकार कोणते ?५) महाकुंभ किती वर्षानंतर भरतो ? *उत्तरे :-* १) प्रयागराज, उत्तरप्रदेश २) गंगा, यमुना व सरस्वती ३) ४५ दिवस ४) अर्ध कुंभ, पुर्ण कुंभ व महाकुंभ ५) १२ पुर्ण कुंभ पुर्ण झाल्यावर ( १४४ वर्ष )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, शिक्षक, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥ मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥ सुजाणाच्या राया परिसें केशिराजा । भक्ताचिया काजा लाजों नको ॥३॥ भक्तकाजकैवारी हें ब्रीद चराचरीं । तें ठेविलें क्षीरसागरीं लक्ष्मीपाशीं ॥४॥ मज पाहतां अभिलाष धरिला मानसीं । मग तूं हषिकेशी विसरलासी ॥५॥ दीनानाथ ऐसें नाम बहुतांसी वांटिलें । निर्गुण तें उरलें तुजपाशीं ॥६॥ म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हां । विनवितसे नामा विष्णुदासा ॥७॥।। संत नामदेव महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून या प्रकारची समाजात एक प्रचलित असलेली म्हण नेहमीच ऐकायला, वाचायला मिळत असते. म्हणजेच असे होत असावे म्हणून कदाचित ही म्हण प्रचलित झाली असावी. पण, त्यात एक गोष्ट अवश्य लक्षात असू द्यावे जेव्हा आपण स्वतः चा समाधान करण्यासाठी काळजीपूर्वक दुसऱ्याकडे वाकून बघत असतो त्यावेळी आपल्याकडेही दहा पटीने लोक वाकून बघत असतात. जर बघायचं असेल तर एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू बघावे,कोणाच्या व्यथा जाणावे ,कोणाचे दु:ख बघून त्या दु:खात माणुसकीच्या नात्याने सहभागी व्हावे पापात जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17Lvzvmj3X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌼 *_भारतीय लष्कर दिन_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील १५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.**१९९९: गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.**१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.**१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.**१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१८८९: पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.**१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.**१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.**१५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: नील नितीन मुकेश चंद माथूर -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि लेखक**१९८१: रामकृष्ण माधवराव चनकापुरे -- कवी**१९७९: डॉ. आरतीशामल जोशी -- लेखिका**१९७६: प्रा. नेमिचंद चव्हाण -- लेखक**१९७५ नयना निगळ्ये -- कवयित्री तथा अभियंता संचालक न्यूयॉर्क**१९७२: सुरेखा अशोक बो-हाडे -- कवयित्री, ललित लेखिका* *१९७२: गजानन कमल जानराव सोनोने -- कवी, लेखक* *१९६७: भानुप्रिया -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९६६: शैलेश हिंदळेकर -- कवी**१९६५: श्रीकांत परशुराम नाकाडे -- लेखक**१९५९: प्रा.डाॅ. भारती निरगुडकर -- लेखिका, कवयित्री**१९५९: प्रभाकर गंभीर -- कवी**१९५७: वंदना पंडित -- मराठी अभिनेत्री**१९५७: सुब्रह्मण्यम जयशंकर(एस. जयशंकर) -- केंद्रीय विदेश मंत्री**१९५६: जीवन बळवंत आनंदगावकर -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा निवृत्त न्यायाधीश**१९५६: मायावती ( मायावती प्रभुदास) -- उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री* *१९५४: प्रभाकर धनाजी शेळके -- प्रसिद्ध कवी**१९५२: संजीव गोविंद लाभे -- लेखक**१९५१: प्रीतिश नंदी -- भारतीय, चित्रकार, पत्रकार, कवी, लेखक, राजकारणी, प्राणी आणि क्षेत्र, टेलिव्हिजन आणि स्ट्रीमिंग सामग्रीचे निर्माते (मृत्यू: ८ जानेवारी २०२५ )**१९५०: नेताजी राजगडकर -- माजी आमदार तथा आकाशवाणीचे वृत्त निवेदक (मृत्यू: १८ जुलै २०१४ )**१९४३: जयराम पोतदार -- हार्मोनियम आणि आॅर्गन वादक व लेखक**१९३९: निलकांत ढोले -- ज्येष्ठ गझलकार, कवी व लेखक (मृत्यू: १७ सप्टेंबर २०२२ )**१९३१: वासुदेव बेंबळकर -- लेखक* *१९३१: शरच्चंद्र वासुदेव चिरमुले -- कथाकार (मृत्यू: २७ मार्च १९९२ )**१९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८ )**१९२८: राज कमल -- प्रसिद्ध भारतीय संगीतकार (मृत्यू :१ सप्टेंबर २००५ )**१९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४ )**१९२३: चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर -- मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९ )**१९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ ] (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७ )**१९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८ )**१९१२: गजानन काशिनाथ रायकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १६ मे २००२ )**१९०५: यशवंत कृष्ण खाडिलकर -- कादंबरीकार, संपादक (मृत्यू: ११ मार्च १९७९ )* *१७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: १८३८ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९ )**२०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५ )**२०१०: मंदाकिनी कमलाकर गोगटे -- मराठी लेखिका (जन्म: १६ मे १९३६ )**२००२: विठाबाई भाऊ नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: १९३५ )**१९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८ )**१९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६ )**१९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६ )**१९१९: लक्ष्मण श्रीधर वाकणकर -- लिपिकार, संशोधक(जन्म: १७ सप्टेंबर १९१२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तरुण भारत देश घडवू या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत एक दिवसीय दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 25 खाटांचे रुग्णालय, 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्यशासनाकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे पर्यटन महोत्सवात 60 हून अधिक टूर कंपन्यांचा सहभाग, 17 ते 19 जानेवारीला होटेल सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडणारा देशव्यापी उपक्रम, एमआयटी पुण्यात 16 जानेवारीला 'उद्योमोत्सव 2025'चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सैनिक परिवारांसाठी 58 कोटींचे वाटप, माजी सैनिकांसाठी रोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू; लष्करप्रमुख द्विवेदींची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, युवा उद्योजक, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल रोटे👤 सतिश बोरखडे, शिक्षक👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकरंद - बा.सी.मर्ढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो दुसऱ्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही , त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. -- मुरारी बापू*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या खोखो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) शिक्षणासाठी प्रख्यात विद्यापीठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत ?३) हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा देण्यात आला ?४) 'शीघ्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चे आयोजन कोठे करण्यात आले ? *उत्तरे :-* १) प्रियंका इंगळे, बीड २) अमेरिका, १२९ विद्यापीठे ( भारत - १ विद्यापीठ ) ३) १४ सप्टेंबर १९४९ ४) जलद ५) भुवनेश्वर, ओडिशा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिजवणे* 📙 अग्नीचा शोध लागला आणि खाण्याच्या बाबतीत माणसाचे चोचले सुरू झाले. नैसर्गिक पदार्थ खाण्यातला आनंद माणूस खूपसा विसरलेलाच आहे. भारतातील खाण्याच्या सवयींचा विचार केला, तर पदार्थ शिजवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया झाल्याशिवाय आपले अन्न तयार होत नाही. भात शिजणे, भाजी शिजणे, आमटीसाठी डाळ शिजणे, उसळीला कडधान्य शिजणे वा कोंबडी या प्रत्येक बाबतीत 'शिजणे' हा एक टप्पाच असतो.अन्न शिजणे म्हणजे नेमके काय होते ? प्रत्येक वनस्पतीज पदार्थ हा पेशींनी बनलेला असतो. या पेशींना एक घट्टसर अशी सेल्युलोजची भिंत वा आवरण असते. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक व पेशीचा अन्नसाठाही असतो. अन्न शिजताना प्रथम नष्ट होते, ते सेल्युलोजचे आवरण. मग अन्नसाठ्याचे घट्ट पदार्थांत रूपांतर होते. केंद्रक तर नष्टच पावते. पेशीमधील द्रवपदार्थ एकमेकांत मिसळून जातात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखाद्या धान्याचे, भाजीचे, कोंबडीचे निरीक्षण केले, तर शिजवण्यापूर्वी सुस्पष्टपणे आढळणाऱ्या या सर्व गोष्टी शिजवल्यानंतर नाहीशा झालेल्या दिसतात. यामुळेच शिजवण्यापूर्वीची पालेभाजी शिजवल्यावर अगदी मऊ लागते. घट्टसर बटाटा मेणासारखा होतो. तांदळाचे कवच जाऊन त्याची पेस्ट बनू शकते. हे बदल झाल्यानंतर अन्न पुन्हा मूळ स्थितीत येऊ शकत नाही. पण या बदलांमुळे अन्नाच्या पचनासाठी मात्र मदत होऊ शकते. प्रत्येक बाबतीत 'सेलवॉल' नष्ट झाल्याने शरीरातील पाचकरसांची क्रिया सुलभ होते. प्राणिज पदार्थांमधील प्रथिने मानवी जठरातील पाचकरसांनी सहज पचत नाहीत. शिजवण्यामुळे ही क्रिया लवकर शक्य होते.अन्न शिजवणे ही क्रिया साधारणपणे थोडेसे पाणी घालून करण्याची पद्धत आहे. पाण्यामुळे उष्णता सर्वत्र पसरते व शिजणाऱ्या पदार्थातील विविध चवींचे रसही पदार्थात आतपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अन्न शिजताना निरनिराळे पदार्थ, मसाले, मीठ, तिखट, गोड व साखर घालण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व पदार्थांची एकजीव एकच चव येते. भाजी खाताना ती नीट शिजली नसेल, तर नुसती कच्चीच लागते, एवढेच नव्हे, तर तिच्या फोडींमध्ये आत्तापर्यंत तिखट मीठही नीट पोहोचलेले नसते. शिजणे या प्रकारामध्ये आणखीही एक खुबी अंतर्भुत आहे. शिजण्यातील नेमकेपणा व त्या पदार्थांची मुळची चव 'खुलुन' येणे हे जेव्हा साधते, तेव्हाच त्या पदार्थांच्या शिजवण्याबद्दल कौतुक होते. एखादा पदार्थ कच्चा राहतो, तसाच जेव्हा जास्त शिजतो, तेव्हाही त्याची चव गेलेली असते. यामुळे शिजण्यातील नेमकेपणा हाही महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी प्रत्येक पदार्थाची अंगभूत चव व ती स्पष्ट होईपर्यंतच शिजवणे अपेक्षित असते. यासाठी मदत म्हणून प्रत्येक देशात काही पदार्थांची मदतही घेतली जाते. चिनी पद्धतीत अजिनोमोटो, इटालियन पद्धतीत मिरे, भारतीय पद्धतीत आले व हळद, युरोपमध्ये कच्च्या पपईचे तुकडे, अरबी देशांत लवंग यांचा अगदी अल्प प्रमाणात वापर करण्याची पद्धत आहे. पदार्थ शिजताना त्याचे तापमान शंभर डिग्री सेंटिग्रेडच्या वर जात नाही. मंद शिजवल्यावर खुपशी जीवनसत्त्वेही राखली जातात. आपण म्हणतोच ना, शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून ? अगदी तसेच आहे. पदार्थ चांगला शिजल्यास त्याचे प्रत्येक शीतनशीत छान शिजलेले असते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळ्यांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17Lvzvmj3X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तरुण भारत देश घडवू या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत एक दिवसीय दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 25 खाटांचे रुग्णालय, 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्यशासनाकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे पर्यटन महोत्सवात 60 हून अधिक टूर कंपन्यांचा सहभाग, 17 ते 19 जानेवारीला होटेल सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडणारा देशव्यापी उपक्रम, एमआयटी पुण्यात 16 जानेवारीला 'उद्योमोत्सव 2025'चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, युवा उद्योजक, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल रोटे👤 सतिश बोरखडे, शिक्षक👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकरंद - बा.सी.मर्ढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो दुसऱ्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही , त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. -- मुरारी बापू*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या खोखो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) शिक्षणासाठी प्रख्यात विद्यापीठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत ?३) हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा देण्यात आला ?४) 'शीघ्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चे आयोजन कोठे करण्यात आले ? *उत्तरे :-* १) प्रियंका इंगळे, बीड २) अमेरिका, १२९ विद्यापीठे ( भारत - १ विद्यापीठ ) ३) १४ सप्टेंबर १९४९ ४) जलद ५) भुवनेश्वर, ओडिशा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिजवणे* 📙 अग्नीचा शोध लागला आणि खाण्याच्या बाबतीत माणसाचे चोचले सुरू झाले. नैसर्गिक पदार्थ खाण्यातला आनंद माणूस खूपसा विसरलेलाच आहे. भारतातील खाण्याच्या सवयींचा विचार केला, तर पदार्थ शिजवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया झाल्याशिवाय आपले अन्न तयार होत नाही. भात शिजणे, भाजी शिजणे, आमटीसाठी डाळ शिजणे, उसळीला कडधान्य शिजणे वा कोंबडी या प्रत्येक बाबतीत 'शिजणे' हा एक टप्पाच असतो.अन्न शिजणे म्हणजे नेमके काय होते ? प्रत्येक वनस्पतीज पदार्थ हा पेशींनी बनलेला असतो. या पेशींना एक घट्टसर अशी सेल्युलोजची भिंत वा आवरण असते. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक व पेशीचा अन्नसाठाही असतो. अन्न शिजताना प्रथम नष्ट होते, ते सेल्युलोजचे आवरण. मग अन्नसाठ्याचे घट्ट पदार्थांत रूपांतर होते. केंद्रक तर नष्टच पावते. पेशीमधील द्रवपदार्थ एकमेकांत मिसळून जातात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखाद्या धान्याचे, भाजीचे, कोंबडीचे निरीक्षण केले, तर शिजवण्यापूर्वी सुस्पष्टपणे आढळणाऱ्या या सर्व गोष्टी शिजवल्यानंतर नाहीशा झालेल्या दिसतात. यामुळेच शिजवण्यापूर्वीची पालेभाजी शिजवल्यावर अगदी मऊ लागते. घट्टसर बटाटा मेणासारखा होतो. तांदळाचे कवच जाऊन त्याची पेस्ट बनू शकते. हे बदल झाल्यानंतर अन्न पुन्हा मूळ स्थितीत येऊ शकत नाही. पण या बदलांमुळे अन्नाच्या पचनासाठी मात्र मदत होऊ शकते. प्रत्येक बाबतीत 'सेलवॉल' नष्ट झाल्याने शरीरातील पाचकरसांची क्रिया सुलभ होते. प्राणिज पदार्थांमधील प्रथिने मानवी जठरातील पाचकरसांनी सहज पचत नाहीत. शिजवण्यामुळे ही क्रिया लवकर शक्य होते.अन्न शिजवणे ही क्रिया साधारणपणे थोडेसे पाणी घालून करण्याची पद्धत आहे. पाण्यामुळे उष्णता सर्वत्र पसरते व शिजणाऱ्या पदार्थातील विविध चवींचे रसही पदार्थात आतपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अन्न शिजताना निरनिराळे पदार्थ, मसाले, मीठ, तिखट, गोड व साखर घालण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व पदार्थांची एकजीव एकच चव येते. भाजी खाताना ती नीट शिजली नसेल, तर नुसती कच्चीच लागते, एवढेच नव्हे, तर तिच्या फोडींमध्ये आत्तापर्यंत तिखट मीठही नीट पोहोचलेले नसते. शिजणे या प्रकारामध्ये आणखीही एक खुबी अंतर्भुत आहे. शिजण्यातील नेमकेपणा व त्या पदार्थांची मुळची चव 'खुलुन' येणे हे जेव्हा साधते, तेव्हाच त्या पदार्थांच्या शिजवण्याबद्दल कौतुक होते. एखादा पदार्थ कच्चा राहतो, तसाच जेव्हा जास्त शिजतो, तेव्हाही त्याची चव गेलेली असते. यामुळे शिजण्यातील नेमकेपणा हाही महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी प्रत्येक पदार्थाची अंगभूत चव व ती स्पष्ट होईपर्यंतच शिजवणे अपेक्षित असते. यासाठी मदत म्हणून प्रत्येक देशात काही पदार्थांची मदतही घेतली जाते. चिनी पद्धतीत अजिनोमोटो, इटालियन पद्धतीत मिरे, भारतीय पद्धतीत आले व हळद, युरोपमध्ये कच्च्या पपईचे तुकडे, अरबी देशांत लवंग यांचा अगदी अल्प प्रमाणात वापर करण्याची पद्धत आहे. पदार्थ शिजताना त्याचे तापमान शंभर डिग्री सेंटिग्रेडच्या वर जात नाही. मंद शिजवल्यावर खुपशी जीवनसत्त्वेही राखली जातात. आपण म्हणतोच ना, शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून ? अगदी तसेच आहे. पदार्थ चांगला शिजल्यास त्याचे प्रत्येक शीतनशीत छान शिजलेले असते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळ्यांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15Sg3PNj9X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌏 *_भूगोल दिन_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील १४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••*२०००:ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.**१९९८:दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान जाहीर.**१९९४:मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.**१९४८:’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.**१९३४:विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर स्थापना दिवस**१९२३:विदर्भ साहित्य संघाची स्थापना कवीभूषण अण्णासाहेब खापर्डे यांनी केली**१७६१:मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: प्रफुल्ल राजेंद्र शेजव -- लेखक**१९८३: सुरेश किसनराव भिवगडे -- कवी**१९७९: प्रा. डॉ .पृथ्वीराज भास्करराव तौर -- कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरकार आणि संशोधक**१९७७: कुमार राम नारायण कार्तिकेयन-- भारतीय रेसिंग ड्रायव्हर**१९७१: महेंद्र दाजीसाहेब देशमुख -- कवी**१९६६: श्रीनिवास वारुंजीकर -- कवी, पत्रकार,अनुवादक**१९६६: पुष्पराज गावंडे -- प्रसिद्ध कवी, कादंबरीकार* *१९६५:सीमा बिस्वास -- भारतीय अभिनेत्री* *१९६१: निर्मला रामदास पाटील -- कवयित्री* *१९५७: डॉ. शैलेजा शंकर कोरडे -- लेखिका, कवयित्री* *१९५३: प्रा.डॉ.प्रदीप विटाळकर -- लेखक**१९४२: योगेश कुमार सभरवाल -- भारताचे ३६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: ३ जुलै २०१५ )**१९३९: प्रा. सुरेश श्रीकृष्ण पांढरीपांडे -- लेखक**१९३८: रघुवीरसिंग यादवसिंग राजपूत -- प्रसिद्ध लेखक* *१९३८: राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार**१९३५: श्रीकांत शंकरराव सदावर्ते -- कवी, लेखक* *१९३२: डॉ. विठ्ठल बाबू तथा वि.बा. प्रभुदेसाई -- साहित्य संशोधक, मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख (मृत्यू: ३ मे २०१८ )**१९३२: प्रभा पार्डीकर -- प्रसिद्ध साहित्यिक* *१९३१:सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू:२५ ऑगस्ट २००८)**१९३१: प्राचार्य डॉ. नारायण यशवंत डोळे -- उत्तम लेखक, प्रभावी वक्ते (मृत्यू: ३० ऑक्टोबर २००१ )**१९३०: पंढरीनाथ केशवराव कांबळे -- लेखक**१९२८: अॅड. माधव गणेश सराफ -- लेखक**१९२६: विठ्ठल शंकर पारगावकर -- प्रसिद्ध लेखक**१९२६; महाश्वेता देवी – प्रसिध्द बंगाली लेखिका (मृत्यू: २८ जुलै २०१६ )**१९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९ )**१९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२ )**१९१२:द्वारकानाथ भगवंत कर्णिक -- महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक व लेखक (मृत्यू: १४ ऑक्टोबर २००५ )**१९०५: डॉ. ग. शि. पाटणकर -- लेखक* *१९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री.’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१ )**१८९६: सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी.डी.देशमुख-- ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२ )**१८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा.दिनकर बळवंत तथा दि.ब.देवधर –भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३ )**१८८३: कृष्णाजी केशव कोल्हटकर -- ग्रंथकार, योग व वेदान्त अभ्यासक (मृत्यु: २६ एप्रिल १९७५ )**१८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७० )**१८८२: रघुनाथ धोंडो तथा र.धों.कर्वे –महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठपुत्र (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३ )*🌏 *मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: शिवाजीराव बापूसाहेब देशमुख -- महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती (जन्म: १ सप्टेंबर १९३५ )**२००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते* *१९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७ )**१९८६: मालती माधव दांडेकर -- कथाकार, कादंबरीकार (जन्म: १३ एप्रिल १९१५ )**१९४६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर-- लेखक (जन्म: २ जानेवारी १८८६ )* *१७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३० )**१७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२ )**१७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ,भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत*तिळगुळ घ्या - गोड गोड बोला*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिंदे, पवारांची हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, विभागाच्या वतीने 100 दिवसांचा आराखडा सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात विजेची विक्रमी मागणी, शनिवारी 25,808 मेगावॅट वीज पुरवठा; कृषीपंपांमुळे मागणीत वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रयागराज - जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा कुंभमेळ्याला प्रारंभ, देश-विदेशातून भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीडमधील केजच्या कन्येकडं भारताच्या खो-खो संघाची धुरा, वर्ल्ड कपमध्ये प्रियंका इंगळेकडं नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वप्नील पाटील👤 दीपक उशलवार👤 शिवहार चपळे👤 सुधाकर एम. कदम👤 तानाजी कदम👤 कैलास तालोड👤 रमेश बंडे👤 पवन कुमार तिकटे👤 सुनील मुंडकर👤 राजू वाघमारे👤 गौतम सोनकांबळे👤 मोनाली सोमवंशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुलाच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलाचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. -- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील प्रथम मुस्लीम महिला शिक्षिका कोण ?२) लोणार सरोवराची उत्पत्ती कशामुळे झाली असे मानले जाते ?३) बॉर्डर - गावस्कर कसोटी मालिकेत 'मालिकावीर' पुरस्कार कोणी जिंकला ?४) 'शेज' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत ? *उत्तरे :-* १) फातिमा शेख २) उल्कापात ३) जसप्रीत बुमराह, भारत ४) बिछाना, अंथरूण, शय्या ५) राम शिंदे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच " गड्डा " यात्रा*सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंधीध्व्ज उभारले जातात.चार दिवस चालणार्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आद्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढरे वस्र्त परीधन केलेले असतात,यास बाराबंदी असे म्हटले जाते.१२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लीगाना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा सपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात निदीध्वजाच्या वस्त्रावीसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते,सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही ,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥ वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥ नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणावरही का असेना विश्वास करताना थोडा विचार करावा म्हणतात. पण, एकदा अवश्य विश्वास करून बघावा. बरेचदा असं होतं की, एकाद्या व्यक्तीवर अविश्वास केल्याने नुकसान आपलेच होते कारण काही चांगल्या गोष्टी किंवा मदत प्रत्येकांकडूनच मिळतात असेही नाही म्हणून विश्वास करताना थोडे माणसं वाचूनही विश्वास करावा. बरेचदा त्यातून अनुभव ही येत असतो सोबतच शिकायला सुद्धा मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवनाचे सार*एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्यसने करीत असे आणि आपल्याबरोबरच तो प्रधानालाही म्हणायचा," मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे आता जो जन्म मिळाला आहे त्याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्या." प्रधान हा सन्मार्गी माणूस होता. त्याला बादशहाच्या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दुःख व्हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्हते. बादशहा आपल्या मौजमजेच्या इतका आहारी गेला होता की त्याला आपल्या प्रजेची आठवण नसायची. प्रजेमध्ये बादशहाबाबत असंतोष होता मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्याने कोणीही काही करू शकत नव्हते. एकेदिवशी प्रधानाने केलेल्या काही कामामुळे बादशहा फारच खुश झाला. त्याने दरबारामध्ये प्रधानाचा सत्कार केला व त्याला एक अत्यंत भरजरी व मौल्यवान अशी शाल भेट म्हणून दिली. पण प्रधानाने दरबाराच्या बाहेर येताच त्या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्ट नेमकी प्रधानाच्या विरोधात असलेल्या एकाने राजाला जाऊन सांगितली. बादशहाला राग आला, त्याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्यवान वस्तूचा अनादर करण्याचे कारण विचारले असता प्रधान म्हणाला," बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्ही मला शिकवत आला आहात." बादशहा विचारात पडला की आपण असे काय शिकवले. प्रधान परत बोलू लागला, "महाराज, देवाने आपल्याला या शालीपेक्षा मौल्यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्याचा गैरवापर करत आहात. व्यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात. तो जेव्हा आपणाकडे पाहत असेल तेव्हा परमेश्वराला किती वाईट वाटत असेल की इतक्या मौल्यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्याची घाण करत आहात. परमेश्वराचा प्रत्येक हृदयात वास असतो आणि त्याच शरीराला तुम्ही वाईट मार्गाने वापरत आहात." प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्हा कधीही त्याने गैरवर्तन केले नाही.तात्पर्य – ईश्वराने दिलेल्या शरीरसंपदेचा योग्य मागनि वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्वराकडून मिळाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/188MvYzWzb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील १३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९६: 'पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.**१९८१: मुंबईतील चुनाभट्टी येथील 'भारतीय कला मनरम" या संस्थेच्या भव्य वास्तूचे उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले**१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.**१९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झाले.**१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी**१८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: वैभव भिवरकर -- प्रतिभावंत कवी, लेखक, वक्ते**१९८७: डॉ. कुणाल मुरलीधर पवार -- कवी* *१९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार**१९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७८: प्रा. कीरण नामदेवराव पेठे -- कवयित्री**१९७६: जीवन तळेगावकर -- कवी, लेखक**१९७१: संतोष दत्तात्रय जगताप -- कवी, लेखक**१९७०: स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर-- लेखिका* *१९७०: सत्यवान सीताराम देवलाटकर -- लेखक**१९६९: चंद्रशेखर बावनकुळे -- महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष* *१९६७: डॉ. गीतांजली शर्मा (कसमळकर)-- कवयित्री तथा नेत्रतज्ज्ञ* *१९६३: मोरेश्वर रामजी मेश्राम -- कवी* *१९५५: सरिता रमेश आवाड -- लेखिका**१९४९: राकेश शर्मा – अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय, आणि जगाचे १३८ वे अंतराळवीर**१९४८: आत्माराम कनिराम राठोड (तांडाकार) -- प्रसिद्ध लेखक, कवी (मृत्यू: २३ मे २००५ )**१९४७: प्रा. वसंत मारुतीराव जाधव -- कवी, संपादक* *१९४२: जावेद सिद्दीकी -- भारतातील हिंदी आणि उर्दू पटकथा लेखक,संवाद लेखक आणि नाटककार* *१९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार(मृत्यू: १० मे २०२२ )**१९३२: सुलभा ब्रह्मे -- प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, मार्क्सवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या ( मृत्यू: १ डिसेंबर २०१६ )**१९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९ )**१९२६:दिनकर बाळू पाटील -- भारतीय वकील, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: २४ जून २०१३ )**१९१९: एम. चेन्ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, माजी राज्यपाल(मृत्यू: २ डिसेंबर १९९६ )**१९१८: प्रा. अच्युत केशवराव भागवत -- लेखक संपादक, अनुवादक* *१९१५: प्रा. दत्तात्रय सखाराम दरेकर -- लेखक, चरित्रकार* *१९०८: रावसाहेब म्हाळसाकांत वाघमारे -- कवी, लेखक (मृत्यू: ७ मार्च१९८९ )**१८९६: मनोरमा श्रीधर रानडे -- मराठी कवयित्री,रविकिरण मंडळाच्या सदस्या (मृत्यू: १९२६ )**१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे -- विज्ञान लेखक व संपादक ( मृत्यू: ६ मार्च १९८१ )* ☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: प्रभा अत्रे -- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका व लेखिका (जन्म: १३ सप्टेंबर १९३२ )**२०१४: अंजली देवी -- भारतीय अभिनेत्री,चित्रपट निर्माती (जन्म: २४ ऑगस्ट १९२७ )**२०१४: पंडित पुरुषोत्तम वालावलकर -- हार्मोनियम वादक (जन्म:११ जून २०२३)**२०११: प्रभाकर विष्णू पणशीकर –मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (जन्म: १४ मार्च १९३१ )**२००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक.कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.* *१९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक* *१९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२ )**१९८९: श्रीकृष्ण जनार्दन जोशी -- लेखक (जन्म: १ ऑगस्ट १९१५ )**१९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: १९१५ )**१९७६:अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: १८९२)**१९६७: हरी दामोदर वेलणकर -- संस्कृत पंडित व ग्रंथकार (जन्म: १८ऑक्टोबर १८९३ )**१८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बंधुभावाचा संदेश देणारा सण - मकरसंक्रांत*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सार्वत्रिक निवडणुकात महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज येथे आजपासून महाकुंभमेळा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरणला मिळाला मोठा सन्मान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत 100 हून अधिक कामगारांना विषबाधा, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार सुरू, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथील तीन हत्तीणी 15 दिवसांच्या विशेष रजेवर, या काळात पर्यटकांसाठी हत्ती सफारी बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून होणार सुरू, म. शम्मीचे पुनरागमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश भांगे, शिक्षक, देगलूर👤 माधव सोनटक्के, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी देशमाने👤 विजयकुमार चिकलोड👤 सौदागर जाधव👤 जितेंद्र कुमार👤 संतोष माधवराव पाटील कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आनंद - वि.ल.बर्वे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव अशी गोष्ट आहे की , जी माणसाला पशु बनवते , विकृत करते. ---- जाॕन वेबस्टर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेतील प्रख्यात 'ट्रॅक अँड फील्ड न्यूज' ने *२०२४ मधील जगातील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू* म्हणून कोणाची निवड केली ?२) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?३) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?४) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?५) महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण असतो ? *उत्तरे :-* १) नीरज चोप्रा, भारत २) सरपंच ३) राज्यपाल ४) राष्ट्रपती ५) महापौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚆 *संदेशवहन व्यवस्था आगगाडीची* 🚆 जगातील आगगाड्या विविध वेगाने धावतात. काही ठिकाणी ती पाचशे किलोमीटर ताशी वेग घेते. काही ठिकाणी दर मिनिटाला एक अशी एकामागे एक आगगाडी सुटत असते. कोणतीही आगगाडी पूर्ण वेगात धावत असताना थांबण्यासाठी किमान एक किलोमीटरचे अंतर घेते; तर थोडाही वेग घेतला असला तरीही तिचे ब्रेक कार्यान्वित होऊन ती थांबायला किमान वीस फूट अंतर जावेच लागते.अनेक ठिकाणी आगगाडीच्या रुळांची एकच जोडी उलटसुलट वापरासाठी वापरली जाते. यालाच सिंगल ट्रॅक म्हणतात. काही ठिकाणी फोर वा सिक्स ट्रॅक्स वापरात असतात. पण हे सर्व एकमेकांत बदलता येऊन, सांधे बदलून एका ट्रॅकवरची गाडी दुसरीकडे जाऊ शकते. या ट्रॅकवर एकाच वेळी उलटसुलट, कमी जास्त वेगाने रूळ बदलत गाड्या धावताना पाहून मन थक्क होते. हे सारे शक्य झाले आहे, ते सतत बदलत गेलेल्या अत्याधुनिक संदेशवहन व्यवस्थेमुळेच.रेल्वे सिग्नलिंग हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. पण हा विषय एका पद्धतीने हाताळून सुटसुटीत केला जातो. संपूर्ण रेल्वेमार्गाचे अनेक सेक्शन पाडले जातात. प्रत्येक सेक्शनवर एका वेळी फक्त एकच रेल्वेगाडी धावेल हा मूलभूत नियम पाळला जातो. समजा एखाद्या वेळी एका सेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक गाड्या रुळावर असल्या तर एकच गाडी पळत राहते. अन्य फक्त उभ्या केल्या जातात व त्याही साइडिंगला असलेल्या रुळांवर.अर्थात हे सारे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. पण एकदा मूळ तत्त्व ठरले की ते काटेकोरपणे अंमलात आणले जाते. पूर्वी यासाठी मदत घेतली जायची ती खालीवर होणाऱ्या दांडीच्या सिग्नलची. रात्रीच्या वेळी लाल व हिरवे दिवे असत. आता बव्हंशी त्यांची जागा घेतली आहे ती दिव्यांनीच. दिवे मात्र आता फक्त दोनच प्रकारचे नसून अनेक प्रकारचे असतात. वेगाने जा, हळू वेगाने जा, मंद गतीने सरकत जा, पूर्णपणे जागीच थांबा, असे संदेश आता या दिव्यांतर्फे दिले जातात.समजा एखाद्या आगगाडीच्या ड्रायव्हरने हे संदेश पाळलेच नाहीत, तो ते बघायलाच विसरला, त्याला कळले नाही, तर त्याची आगगाडी तशीच पुढे जाते. पण या वेळी पुढच्या सिग्नलपाशी त्याची गाडी अडवण्याची व्यवस्था केली जाते. मार्गावर जर वीजपुरवठ्यावर इंजिन चालू असेल, तर तेही बंद करण्याची व्यवस्था केली जाते. आपोआपच तो मार्ग बंद होतो. अत्यंत गर्दीच्या सर्व मार्गांवर ही व्यवस्था केली गेली आहे.संदेशव्यवस्था कशी चालू आहे, कुठे कोणती आगगाडी किती वेगाने पळते आहे हे सतत दाखवण्याची व्यवस्था केंद्रीय नियंत्रण स्थानकात सतत कार्यरत असते. उदाहरणार्थ, मुंबई ते सोलापूर या मार्गावरील सर्व गाडय़ा मुंबईतील नियंत्रण केंद्रातील अधिकाऱयाच्या नजरेखाली असतात. त्यामुळे तातडीचे काही बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली तर तो तेथूनच सूचना पुरवू शकतो.इतके सर्व असूनही कधीतरी अपघात घडतात. ते भीषणच असतात. याला कारण यंत्रात अचानक उद्भवणारे दोष व धडधडीत मानवी चुका. दोन्ही एकत्रितपणे जर घडून आले तर अपघाताचे स्वरूप वाईट असते. यंत्रात अचानक उद्भवणारे दोष वा यंत्रणेचे अपयश (systems failures) यावर आता मात करण्यात शास्त्रज्ञांना खूपसे यश मिळालेले आहे. मानवी चुकांवर मात्र पूर्ण नियंत्रण मिळालेले नाही.स्वयंचलित 'ड्रायव्हरलेस' ट्रेनही काही ठिकाणी परदेशात वापरण्यास सुरुवात झाली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून दिल्या जाणाऱ्या संदेशांवर ती 'ड्रायव्हरलेस' ट्रेन काम करते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते.त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान,आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक हाताची टाळी*वनातील आश्रमात एक संत राहत होता. त्यांच्यासोबत एक अनाथ मुलगाही राहत होता. संतांना पाहून त्या मुलालाही ध्यानसाधना शिकण्याची इच्छा झाली. तो संतांजवळ जाऊन म्हणाला, "गुरुजी मला ध्यानसाधना शिकायची आहे." संतांनी त्याला समजावले की तुझे वय हे ध्यानसाधना करायचे नाही. आता तू भक्ती शिक. पण मुलगा आपल्या जिद्दीवर अडून राहिला. त्याचा हट्ट पाहून संतांनी दोन्ही हातांनी मिळून एक जोरात टाळी वाजवली आणि मुलाला म्हणाले," हा दोन हातांच्या टाळीचा आवाज आहे. आता तू बाहेर जा आणि एका हाताच्या टाळीचा शोध घे." मुलाने विचार केला की, एका हाताची टाळी म्हणजेच ध्यानसाधना असेल तेव्हा तो आवाज अत्यंत मधूर व अद्भूत असेल. मुलगा रात्रंदिवस एका हाताच्या टाळीचा आवाज शोधू लागला. एके दिवशी मुलगा जंगलात एकेठिकाणी बसला होता, तेथे मंद हवेमध्ये झाडांची पाने हलताना एकमेकांवर घासत होती. मुलाला वाटले की पानांच्या ह्या आवाजात दिव्य प्रकारची शांती आहे. हाच एका हाताच्या टाळीचा आवाज आहे. तो मुलगा पळतच संतांकडे गेला आणि संतांना या आवाजाची माहिती दिली. संत म्हणाले," हा तर पानांचा आवाज आहे. एका टाळीचा आवाज नाही. आणखी शोध घे." मुलाचा शोध सुरुच राहिला. प्रत्येक वेळी मुलगा संतांना काहीतरी सांगायचा व प्रत्येक वेळी संत नकार देत गेले आणि मुलाला आणखी शोध घे असे सांगितले. मुलगा आता अठरा वर्षाचा झाला होता. एक दिवस तो गुरुजींकडे जाऊन बसला आणि डोळे बंद करून गहि-या मौनामध्ये डुंबला. जणूकाही त्याची समाधीच लागली होती. गुरुजी काहीच बोलले नाहीत. गुरुजींनी मंदस्मित केले आणि शांत राहिले कारण त्यांच्या शिष्याला आता कुठे एका हाताच्या टाळीचा आवाज ऐकू येऊ लागला होता.तात्पर्य – ध्यान मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे आणि मनाची एकाग्रता, योग्य गुरुचे मार्गदर्शन यामुळे आपण आतूनबाहेरून पूर्णपणे बदलून जातो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18YUKZZAa9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना**१९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी**१९९६: नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला**१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.**१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.**१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.**१९४२: दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले**१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.**१७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.*🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: डॉ. मयूर बंडू लहाणे -- लेखक* *१९७९: डॉ. रेणुका शरद बोकारे -- लेखिका, संपादिका* *१९७५: दत्तप्रसाद द्वारकादास झंवर -- कवी, लेखक**१९७४: प्रा. डॉ. संभाजी व्यंकटराव पाटील-- लेखक* *१९७३: राहुल द्रविड- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, प्रशिक्षक,उत्कृष्ट फलंदाज**१९६७: प्रा.नरेश हरिश्चंद्र खोडे -- लेखक**१९६७: मधुकर गणपतराव कोटनाके -- कवी**१९६६: लक्ष्मण शंकर हेंबाडे -- कवी* *१९६५: धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलीकर-- स्तंभलेखक, कथा,कादंबरी, नाटक या वाड:मय प्रकारात लेखन* *१९६१: राधिका मिलिंद राजंदेकर -- कवयित्री* *१९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका**१९५४: चद्रकांत भोंजाळ -- प्रसिद्ध मराठी लेखक आणि ज्येष्ठअनुवादक**१९५०: अरुण गुलाबराव डावखरे -- लेखक, अनुवादक* *१९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री**१९४४: सुभाष विनायक पारखी -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९४२: प्रा. डॉ. यशवंत देशपांडे -- विज्ञान कथा लेखक**१९३६: डॉ. नरसिंह महादेव जोशी -- प्रसिद्ध मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक**१९२८: पं. अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर -- बासरीवादक, लेखक (मृत्यू: ३० मे २०१० )**१९२५: श्री. के. केळकर -- लेखक (मृत्यू: १० जानेवारी १९९६ )**१९२४: नासिर खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: ३ मे १९७४ )**१८९८: विष्णू सखाराम खांडेकर -- सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित (ययाति १९७४ )(मृत्यू: २ सप्टेंबर, १९७६ )**१८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५ )**१८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६ )**१८१५: जॉन ए.मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: पंडित भालचंद्र दामोदर देव -- ज्येष्ठ व्हायोलीन वादक (जन्म: १९३६)**२०२१: डाॅ. जुल्फी शेख -- संत साहित्याच्या अभ्यासिका,संवेदनशील कवयित्री डी.लिट.पदवीने संन्मानीत (नागपूर विद्यापीठ)(जन्म: ७ मे १९५४ )**२००८: य. दि. फडके – लेखक व इतिहास संशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१ )**२००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९ )**१९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११ )**१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.(जन्म: २ ऑक्टोबर१९०४ )**१९६४: शांताराम गोपाळ गुप्ते -- कादंबरीकार, नाटककार (जन्म: १९०७ )**१९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३ )**१९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••12 जानेवारी - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्ताने*राजमाता जिजाऊ भोसले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी खास सोय, पुणे-दिल्ली दरम्यान विशेष रेल्वे; 20 डब्यांसह स्लीपर क्लास आणि पँट्री कोच उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने वस्त्रोद्योग विषयक अभ्यासक्रम - उपक्रम सुरू करावेत - राज्यपाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व साहित्य संमेलन 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार, बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जनतेशी थेट संवाद, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक; शेती महामंडळाच्या जमिनींसाठी जिओ टॅगिंगचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी कर्मचारी भरतीचे 15 वर्षांचे ऑडिट करावे, हिंदू महासंघाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अपघात रोखणे आपल्या हातात:सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख निजाम गावंडगावकर👤 बालाजी पुलकंठवार, धर्माबाद👤 शुभम पाटील कदम👤 गणेश हिवराळे पाटील👤 हणमंत पांडे👤 राहुल ढगे👤 साई यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अमरशेख - मेहबूब पठाण*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणे राहू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील कोणत्या ठिकाणी पहिला काचेचा पुल उभारण्यात आला आहे ?२) जिल्हा नियोजन समितीचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?३) सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते ?४) 'शत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुले यांनी वयाच्या कितव्या वर्षी विवाह केला ? *उत्तरे :-* १) कन्याकुमारी २) पालकमंत्री ३) केरळ ४) अरी, रिपू , वैरी ५) १३ व्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 #उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग - १ (१/६)ही कहाणी सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ साडेचार अब्ज वर्षांपूर्वी.त्याच काळात केव्हातरी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. त्यावेळची पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप धातू, धूळ आणि वायू यांचा गोळा होता. अनेक लक्ष वर्षे गेली आणि गोळ्याचा पृष्ठभाग हळूहळू थंड होत त्याचे रूपांतर कठीण कवचात होत गेले. हे कवच म्हणजेच खडकांनी बनलेला पृथ्वीचा पृष्ठभाग. सुरुवातीच्या काळात हा पृष्ठभाग बनत होता. आतल्या तप्त द्रवाच्या धडकांनी पुन्हा फुटत होता, पुन्हा घडत होता, जागा बदलत होता. पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात पुरातन खडकाचे वय सुमारे चार अब्ज तीस लाख वर्षे आहे.पृथ्वीचा हा पृष्ठभाग बनत होता, त्याबरोबर त्या पृष्ठभागावर पाणी जमा होत होते आणि भोवती वातावरणाचा थरही बनत होता. मात्र हे वातावरण बनले होते मुख्यतः कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन या वायुंनी. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात ऑक्सिजन जवळजवळ नव्हताच. वेगवेगळ्या भौतिक व रासायनिक प्रक्रियांमधून हळूहळू अॉक्सिजनचे प्रमाण वाढत गेले. जीवसृष्टीच्या उदयाला हा बदल अत्यंत उपयुक्त ठरला. या सगळ्यांचे मिळून बनलेले हे रसायन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेले होते आणि त्यावर सतत आदळत होते सूर्याचे अतिनील किरण. त्या रसायनात घडत होता विजांचा चमचमाट. या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांमधूनच केव्हातरी पहिल्या सजीव पेशीच्या जन्माला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा मुख्यतः प्रथिने बनवणाऱ्या अमिनो अॅसिडचा उद्भव झाला.पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या काळाचे शास्रज्ञांनी वेगवेगळे भाग पाडले आहेत.अगदी सुरुवातीचा सुमारे दोन अब्ज वर्षांचा काळ आर्चिअन इऑन (आर्चिअन कल्प) या नावाने ओळखला जातो. या काळात पृथ्वीवर सजीव पेशी जन्माला आली नव्हती.आर्चिअन कल्पानंतरचा सुमारे एक अब्ज नव्वद कोटी वर्षांचा काळ प्रोटेरोझोइक इऑन (प्रोटोरोझोइक कल्प) या नावाने ओळखला जातो.या दोन्ही कालखंडांना मिळून प्रिकेंब्रिअन इरा (प्रक्रेंब्रिअन युग) असेही नाव दिले आहे. पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासापैकी जवळजवळ ८० टक्के काळ हा प्रिकेंब्रिअन युगानेच व्यापलेला आहे.क्रमश : सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते. त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान, आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *इंद्रियांवर ताबा*एक महात्मा रस्त्यातून घरी चालले होते. वाटेत त्यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती.महात्म्याच्या तोंडाला पाणी सुटले. लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्यांना वाटले. त्यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्वादिष्ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्या या चोचल्याचा मनाने धिक्कार केला. लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्मा पुढे गेले परंतु त्यांचा जिभेचा शौक हार मानत नव्हता. त्यांची जीभ लिंबांचा स्वाद घेण्यासाठी आसुसली होती. ते परत लिंबूवाल्याकडे आले. त्याच्याकडील लिंबे निरखून पाहू लागले. परत एकदा मनाने धिक्कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्मा परतले. चार पावले पुढे गेल्यावर परत एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते परत लिंबूवाल्याकडे आले. लिंबूवाला त्यांचे हेलपाटे पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला हे कळेना की हे महात्मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. शेवटी न राहवून त्याने विचारले, "महाराज, तुम्हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात." शेवटी महात्म्यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्यांनी पत्नीला चाकू मागितला. लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला, "वा रे वा महात्माजी, तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे." तितक्यात त्यांची पत्नी तिथे आली व तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले, "अहो, लिंबाचा स्वाद घेता घेता का थांबलात." महात्म्यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्हीही पत्नीच्या हातात देऊन तिला सांगितले," मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो."*तात्पर्य - इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/01/world-hindi-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *_विश्व हिंदी दिवस_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील १० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••*२००८: शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांना जीवन गौरव पुरस्कार* *१९७५: हिंदी ची महती भारताबाहेर पोचविण्यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा तर्फे विश्व हिंदी संमेलन* *१९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.**१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.**१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.**१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.**१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.**१८७०: बॉम्बे,बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B.B.C.I.Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.**१८६३ :चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.**१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.**१७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.**१६६६: सुरत वरून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: सुयश टिळक -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९८२: कालिदास अंकुश शिंदे -- लेखक* *१९८१: दीप्ती श्रेयस तळपदे -- निर्माती, दिग्दर्शिका, मानसशास्त्रज्ञ**१९७५: राजेश गंगाराम जाधव -- कवी* *१९७४: प्रा. विजय काकडे -- कथाकार, लेखक, वक्ते* *१९७४: हृतिक रोशन – प्रसिद्ध सिनेकलाकार**१९७३: रेशम टिपणीस -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९६९: प्रा. डॉ. विठ्ठल लक्ष्मणराव चौथाले -- लेखक* *१९६८: रमेश सूर्यभान डोंगरे -- प्रसिद्ध लेखक**१९६७: माला आनंद मेश्राम -- कवयित्री**१९६५: प्रा. डॉ. विलास विश्वनाथ तायडे -- लेखक, समीक्षक, संपादक* *१९६४: डॉ. समीरण वाळवेकर -- निवेदक, पत्रकारिता, वृत्त टेलिव्हिजन, शैक्षणिक टेलिव्हिजन, मनोरंजन टेलिव्हिजन, मालिका, चित्रपट,सहायक दिग्दर्शन, कादंबरी लेखन , निवेदन,या सर्व क्षेत्रात भरीव काम**१९५९: डॉ. सुरेखा विनोद -- कवयित्री तथा स्त्रीरोगतज्ञ**१९५६: अरुण भालचंद्र धाडीगावकर -- लेखक, संपादक,नाट्य परीक्षक, कलाकार**१९५५: नारायण सुमंत -- कवी**१९५५: डॉ. दिलीप गरुड -- प्रसिद्ध लेखक* *१९५२: सलीम घौस --भारतीय अभिनेते ( मृत्यू: २८ एप्रिल २०२२ )**१९५०: नजूबाई गावित-- आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या**१९४७: प्राचार्य डॉ. पंडितराव एस. पवार-- लेखक, संशोधक, संपादक* *१९४६: निरंजन घाटे -- विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक* *१९४२: डॉ. अशोक प्रभाकर कामत -- हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक**१९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार**१९३७: मुरली देवरा,-- उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते (मृत्यू: २४ नोव्हेंबर २०१४ )**१९३५: कमलाकर नाडकर्णी -- ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक**१९१९:प्रा.श्रीपाद रघुनाथ भिडे -- लेखक* *१९०३: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (मृत्यु: ३ ऑक्टोबर १९९९ )**१९०१: डॉ. गणेश हरी खरे -- इतिहास संशोधक (मृत्यू: ५ जुन १९८५ )**१९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३ )**१८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६ )**१८९६: दिनकर गंगाधर केळकर -- कवी, संपादक, संग्रहालयकार (मृत्यु: १७ एप्रिल १९९० )**१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: प्रभाकर भावे-- ज्येष्ठ रंगभूषाकार**२०१४: दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ -- पुण्यातील पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे मालक**२००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक,गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४ )**१९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत* *१७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ,वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.(जन्म: २३ मे १७०७ )**१७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: १७२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज विश्व हिंदी दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*हिंदी आमची राष्ट्रभाषा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जिनोम इंडिया उपक्रम देशाच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार गाव, विदर्भातील पहिले मॉडेल सोलर व्हिलेज बनले हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वसमत - निपुण हिंगोली उपक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांचा सत्कार, मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन, शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनावाल यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - संविधान सन्मान दौड 2025 ची नावनोंदणी सुरू, 25 जानेवारी रोजी होणार स्पर्धा, 6 ते 7 हजार स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. नामदेव राठोड👤 राजेंद्र सोनवणे, साहित्यिक, पंढरपूर👤 शुभम हिवराळे👤 आनंदराव कदम👤 अनिल यादव👤 बालाजी ईबीतवार👤 साईनाथ सोनटक्के👤 शिनू रेड्डी, धर्माबाद👤 विनोद गोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत सबनीस - रघुनाथ दामोदर सबनीस*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) दिल्ली विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ?३) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?४) 'शर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'टाईम्स ऑफ इंडिया' हे कोणत्या देशातील प्रमुख वृत्तपत्र आहे ? *उत्तरे :-* १) व्ही. नारायणन, अवकाश शास्त्रज्ञ २) ७० सदस्य ३) राजीवकुमार ४) बाण, तीर, सायक ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त* 💉 **************शरीरात रक्ताचे काम काय असते ? शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते. रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था. रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते. सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते. मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही. जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरुडावरी हरि बैसोनियां यावें । आम्हांसि रक्षावें दीनबंधू ॥१॥ अच्युता केशवा मुकुंदा मुरारी । येई लवकरी नारायणा ॥२॥ ऐकोनियां धांवा धांवला अनंत । उभा गरुडासहित मागें पुढें ॥३॥ वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें लिंबलोण ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उंची, उंची मध्ये सुध्दा खूप फरक असतो.जी व्यक्ती आपल्या प्रयत्नातून उंचीवर पोहोचत असते पण, त्याला जेव्हा व्यर्थ गोष्टींचा वारा लागतो तेव्हा तीच उंची हळूहळू कमी व्हायला लागते. पण, ज्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करुन आपले विचार तसेच स्वतः वरचा विश्वास आणि आपले कार्य नि:स्वार्थ भावनेने चालू ठेवते त्याची उंची भलेही प्रत्येकांना दिसत नसले तरी ती उंची शेवटपर्यंत कायम राहते. अशा उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तीकडून समाजातील अनेक लोक प्रेरणा घेत असतात. म्हणून ज्यांनी त्या ठिकाणा पर्यत पोहोचविले असतील त्यांना कधीच विसरू नये. कारण उंची जरी प्राप्त झाली असेल तरी त्यात अनेकांचे सहकार्य मोलाचे योगदान असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुसंवाद*एका शहरात एक दांपत्य राहत होते. पतीचा मोठा व्यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्ठा होती. कामाच्या व्यापात तो दिवसभर व्यग्र राहत असे.आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे तो पत्नीला वेळ देऊ शकत नसे यामुळे पत्नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्वस्थ राहायची, आपल्या मनातील गोष्टी ती कोणाला सांगूही शकत नव्हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्यासमोरून निघून जायचा. एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्हणाला, " तू तर माझ्या व्यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्या कामात तरी मदत करेल." त्याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्हणाली," तुम्हाला तर स्वतःचेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्यावर तरी तो माझी काळजी घेईल." दोघेही आपल्या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायीपर्यत येऊन पोहोचल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांच्यातील एका सज्जन माणसाने मध्यस्थ म्हणून तेथे प्रवेश केला व म्हणाला," अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्याला काय व्हायचे ते त्याला ठरवू द्या ना. तुम्ही काय उगीच ठरवून त्याच्यावर तुमची मते लादत आहात." हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्पच झाले. कारण त्यांना अजून मुलबाळ काहीच नव्हते आणि भविष्यात होणा-या मुलाच्या भवितव्याविषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्हणून निघून गेले.तात्पर्य - व्यर्थ गोष्टींवर वाद घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/06/blog-post_70.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *प्रवासी भारतीय दिवस* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.**२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.**१९९२: पहिले मराठी कामगार साहित्य संमेलन नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न**१९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन**१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा**१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.* 🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: अनुषा दांडेकर -- भारतीय मॉडेल चित्रपट अभिनेत्री**१९७४: पंडित रामाजी लोंढे -- कवी* *१९७४: फरहान अख्तर -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, लेखक, संवाद लेखक, गायक**१९६८: नंदिनी सोनवणे -- लेखिका, संपादिका**१९६८: शोभा चित्रे -- लेखिका**१९६७: विजय बाबुराव येलमेलवार -- लेखक**१९६५: फराह खान -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखिका, चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री, नृत्यांगना आणि कोरिओग्राफर**१९६३: डॉ. लीना पांढरे -- लेखिका, अनुवादक(मृत्यू: २६ सप्टेंबर २०२१)**१९६३: सुरेश कृष्णाजी पाटोळे -- प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक**१९६०: डॉ. किशोर रामचंद्र महाबळ -- अभ्यासू, लेखक तसेच अनेक वृत्तपत्रांतून लेखन (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१५ )**१९५८: डॉ. सायन्ना पिराजी मठमवार -- लेखक**१९५१: प्रा.अजित मधुकर दळवी -- प्रसिद्ध नाटककार**१९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य**१९४६: सुभाषकुमार अनंतराव बागी -- कवी, लेखक* *१९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणितज्ज्ञ (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४ )**१९३४: महेंद्र कपूर –पार्श्वगायक (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ )**१९२७: राजाराम भालचंद्र पाटणकर -- मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मे २००४ )**१९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ )**१९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११ )**१९१८: प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे -- पत्रकार, समीक्षक, मार्क्सवादी विचारवंत(मृत्यु: १० जुलै १९८९ )**१९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ एप्रिल १९९४ )**१८७७: केशवराव रघुनाथ देशमुख -- ज्ञानेश्वरी प्रवचनकार व संतकव्याचे अनुवादक (मृत्यू: २७ एप्रिल १९४२ )**१८५४: रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर -- मराठी कवी व भाषांतरकार (मृत्यू: ४ जून १९१८ )**१८३१: फातिमा शेख -- भारतीय शिक्षणतज्ज्ञ, पहिल्या मुस्लिम शिक्षिका, समाजसुधारक,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९०० )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: उस्ताद राशिद खान -- भारतीय शास्त्रीय संगीतकार (जन्म: १ जुलै १९६८ )**२०२३: विश्वास मेहेंदळे -- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते (जन्म: १० जुलै १९३९ )**२०१३: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९१९ )**२००४: शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म: १९११ )**२००३: कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: १९१९ )**१९४५: गोविंद रामचंद्र मोघे -- कवी, ग्रंथकार (जन्म: १८६० )**१९२३: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी(ICS)(जन्म: १ जून १८४२ )**१८४८: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले (जन्म: १६ मार्च १७५० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - मायेची ओढ*..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात कुठेही अपघात झाली तरी जखमींना कॅशलेस उपचार मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या रॉकेटची निर्मीती करणारे वैज्ञानिक ; डॉ. व्ही नारायणन होणार ISRO चे अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली विधानसभेसाठी तृणमूलचा आप ला पाठींबा, अरविंद केजरीवालने मानले दीदीचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कलिंगा फाउंडेशनला वसुंधरा मित्र पुरस्कार, किंग कोब्राच्या संवर्धनासाठी गांभीर्याने प्रयत्न आवश्यक, डॉ. पी. गौरी शंकर यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडने दुसरा एकदिवसीय सामना 113 धावांनी जिंकला, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी; तीक्षणाची हॅट्ट्रिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकुमार पंतुलवार👤 विष्णुकांत इंगळे👤 हमीद साब शेख👤 सुप्रिया ठाकूर👤 अजित राठोड👤 माधव नरवाडे👤 सुहास अनिल देशमुख👤 आमिर अली शेख👤 राजेश रामगिरवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाबा कदम - वीरसेन आनंद कदम*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १२०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ?२) भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या नावाने कोणत्या देशात 'ए. आर. रेहमान स्ट्रीट' असे रस्त्याचे नामकरण करण्यात आले ?३) महात्मा फुलेंनी 'तृतीय रत्न' ही नाटक कोणत्या साली लिहिली ?४) 'शक्ती' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'मित्रप्रेम' ही कादंबरी कोणी लिहिली ? *उत्तरे :-* १) पुष्पा २ - द रूल २) कॅनडा ( मरखम शहर ) ३) सन १८५५ ४) बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा ५) हुतात्मा अनंत कान्हेरे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *एन्डोस्कोपी म्हणजे काय ?* 📙 मानवी शरीराची बाह्यत: तपासणी सहज शक्य असते. काही भागांत छोटेसे उपकरण घालून अंतर्भागातील काही गोष्टी तपासणेही गेली अनेक दशके प्रचारात होतेच. उदाहरणार्थ, घशामध्ये लॅरिंगोस्कोप घालून स्वरयंत्रापर्यंतचा भाग बघणे वा गुदद्वारातून प्रोक्टोस्कोप घालून पाइल्सची तपासणी, योनिमार्गात व्हजायनोस्कोप घालून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागाची तपासणी करून आजाराचे निदान वा इलाज करणे चालूच होते. संपूर्ण शरीराच्या आतील भागाची क्ष किरण वा अल्ट्रा साऊंडद्वाराही तपासणी करणे काही दशके डॉक्टर्स करीत होतेच. पण या साऱ्यामध्ये एक उणीव कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रत्यक्ष अवयवाचा तपासायचा भाग डोळ्यांनी पाहता येत नव्हता. त्या जागेपर्यंत पोहोचून त्याचा छोटासा भाग तपासणीसाठी बाहेर काढता येत नव्हता.या अडचणीमागचे महत्त्वाचे कारण होते, प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच प्रवास करीत असल्याने दृश्यमान करण्याच्या भागात पोहोचताना आलेले कोणतेही वळण, बाक हा अडथळा ठरत होता. या सार्यावर उपाय सापडला, तो फायबरऑप्टिक तंत्रज्ञानाचा सरसकट वापर सुरू झाला त्यावेळी.कोठेही कशीही वळू शकणारी, शरीरातील प्रमुख रंध्रातून वा भोकातून प्रवेश करू शकणारी फायबर ऑप्टिक वायर, तिच्या तोंडाशी असणारा प्रखर उजेड टाकणारा दिवा व या साऱ्यांच्या मदतीने दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा फायबर ऑप्टिकमुळे दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचू लागल्या. त्यांना भिंगाद्वारे मोठे करून साध्या डोळ्यांनी तर पाहता येऊ लागलेच, पण आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे याच सर्व प्रतिमा शेजारी ठेवलेल्या टीव्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष रुग्ण व त्याचे सर्व डॉक्टर्सही पाहू लागले आहेत. गरजेनुसार याचे कॉम्पॅक्ट डिस्कवर आरेखन करून ठेवता येते व दुसर्या कोण्या तज्ञाचे मत घ्यायचे असेल, तर त्यालाही पाठवता येते.याचा महत्त्वाचा फायदा झाला, तो म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत लांबलचक असलेल्या काही मीटरच्या अन्नमार्गाचे संपूर्ण परीक्षण आता शक्य झाले आहे. अन्ननलिकेची सूज, जठरातील व्रण, छोट्या आतड्यातील अंतस्त्वचेतीलन बदल, मोठ्या आतड्यातील अडथळे एवढेच नव्हे, तर पित्ताशयाची तपासणीही यामुळे शक्य झाली. फुफ्फुसांकडे हवा पोहोचवणाऱ्या नलिकांची तपासणी, तेथे साचलेल्या कफाची विल्हेवाट लावणेही या पद्धतीने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानात भर पडली, ती लॅप्रोस्कोपी या शल्यप्रकाराची. फायबर ऑप्टिक प्रकाशाचा वापर करून शरीरातील विविध पोकळ्यांमधील कोणत्याही अवयवावर शस्त्रक्रिया करणे आज सहज शक्य झाले आहे. आत घातलेल्या नळीतूनच कात्री, चिमटा, रक्त थांबवणारी इलेक्ट्रिक कॉटरी - जिचा वापर करून तीव्र उष्णतेने रक्तवाहिन्यांची तोंडे बंद केली जातात - इत्यादी उपकरणे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात. शरीरावर म्हणजेच मुख्यत्वे पोटावर पूर्वी चार ते पाच इंचाचा छेद घेऊन करावी लागणारी अनेक शस्त्रकर्मे आता केवळ दोन वा तीन करंगळीच्या आकाराच्या नळ्या आत सारुन केली जातात. अर्थातच रुग्णाचा बरे होण्याचा काळ जखमा मोठ्या नसल्याने खूपच कमी होतो. पूर्वी ज्या शस्त्रकर्मानंतर किमान पंधरा दिवस रुग्णालयात खाटेवर राहणे गरजेचे होते, तो काळ आता या पद्धतीने जेमतेम एक ते तीन दिवसांपर्यंत येऊन पोहोचला आहे.याही पुढचा टप्पा म्हणजे छोट्या कॅप्सूलच्या आकाराचा 'बग' म्हणजे छुपा कॅमेरा रुग्ण गिळतो. त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चित्रणाच्या संदेशांचे टीव्हीवर वर मोठ्या पडद्यावर सतत प्रक्षेपण होत राहते. सोळा ते अठरा तासांनंतर हा 'बग' शरीराबाहेर टाकला जातो. आज जरी महागडी व प्रयोगाव्यवस्थेतील ही तपासणी असली, तरी काही वर्षात जगभर तिचा वापर जरूर सुरू होईल.साधी डॉक्टरी तपासणी जर दोन तीनशे रुपयात होत असेल, क्ष किरण व अल्ट्रासाऊंडसाठी चार पाचशे रुपये पडत असतील तर एन्डोस्कोपीसाठी मात्र दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्याचे कारण सरळच आहे. वापराव्या लागणाऱ्या सामग्रीची किंमत काही लाखांच्या घरात असते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥ मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥ गाईन तुझें नाम ह्रदयीं धरुनि प्रेम । हाचि नित्य नेम सर्व माझा ॥३॥ नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा । तूं आम्हां सोईरा आदिअंतीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे असतेच असेही नाही. कारण काहीजण आपली परीक्षा घेण्यासाठी नको ते,प्रश्न सुध्दा विचारू शकतात. म्हणून काही प्रश्नांची उत्तरे देण्याआधी विचार करावा व आपले कार्य निरंतर सुरु ठेवावे. सत्कार्य हेच आपले उत्तर ठरत असते. त्यातूनच आपली ओळख सुद्धा होत असते.म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. आपले कार्य सतत चालू ठेवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्यंग*चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण ! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"*तात्पर्य : दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CDWtH6u3E/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_ पंचशील ध्वज दिवस _* 🪩 🪩 *_ या वर्षातील ८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.**२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड**१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट,वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.**१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.**१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.**१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.**१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.**१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.**१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.* 🪩 *_जन्मदिवस /वाढदिवस/जयंती:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: विनोद शिंदे -- लेखक**१९८०: प्रशांत दत्तात्रय कोतकर -- कवी**१९७४: प्रतिभा रामचंद्र पाटील -- कवयित्री**१९७३: बालाजी पेटेकर खतगावकर -- कवी**१९७३: गणेश सहदेव सांगोळकर - कवी* *१९७१: संध्या विलासराव बोकारे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: व्यंकटेश कुलकर्णी -- कवी, गझलकार* *१९६२: चंद्रशेखर गोखले -- मराठी लेखक व कवी**१९५९: प्रा.डॉ. कुमार जानराव बोबडे -- लेखक**१९५७: प्रा. दिनकर विष्णू पाटील -- लेखक**१९५६: पंकज बेरी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९५६: प्रा.डॉ. निलांबर प्रभाकर देवता -- प्रसिद्ध लेखक**१९५५: दिलीप दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक* *१९५३: विठ्ठल अर्जुनराव साठे -- कादंबरीकार* *१९४५: डॉ. प्रभा गणोरकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका**१९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक(मृत्यू: १४ मार्च २०१८)**१९४१: नंदा -- भारतीय सिने-अभिनेत्री (मृत्यू: २५ मार्च २०१४ )**१९३९: कुमुद कृष्ण परांजपे -- लेखिका**१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: ३ जानेवारी २००५ )**१९३५: पंढरीनाथ धोंडू सावंत -- लेखक संपादक* *१९३५: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’(मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७ )**१९३३: सुप्रिया देवी -- बंगाली अभिनेत्री (मृत्यू: २६ जानेवारी २०१८ )**१९२९: सईद जाफरी – अभिनेता ( मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५ )**१९२६: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू: ७ एप्रिल २००४ )**१९२५: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३ )**१९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (मृत्यू: ४ मार्च २००० )**१८८७: कमलाबाई किबे-- कवयित्री, कथालेखक आणि सामाजिक विषयावर लेखन करणाऱ्या लेखिका* *१८५१: बाळकृष्ण आत्माराम गुप्ते -- लेखक (मृत्यू: १९२५ )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: पंडित मोहनराव कर्वे -- हिंदुस्तानी कला संगीत मधील ज्येष्ठ गायक ( जन्म:१६ सप्टेंबर १९२५ )**१९९६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६ )**१९९५: मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म: १ मे १९२२ )**१९७६: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ मार्च १८९८ )**१९७३: नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,स्वच्छ समाजदृष्टी,उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(जन्म: २० सप्टेंबर १८९८ )**१९६७: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ,संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(जन्म: १० डिसेंबर १८८० )**१९६६: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म: १२ जुलै १९०९ )**१९४१: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१८८४: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८ )**१८२५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म: ८ डिसेंबर १७६५ )**१६४२: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे बोलण्याची सवय आपणाला अनेक संकटातून वाचवू शकते. तर एक खोटं लपविण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावे लागते. *नेहमी खरे बोलावे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीचं कार्यक्रम जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रकृतीच्या कारणामुळे आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वाधार योजनेची ऑनलाईन अर्ज 15 जानेवारीपर्यंत भरता येणार, तांत्रिक अडचणी येत असल्याने समाज कल्याण विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कसोटी क्रमवारीत भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण, 2016 नंतर दुसऱ्यांदा टॉप-2 मधून बाहेर; 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पेटेकर खतगावकर, कवी, चित्रकार तथा कथाकार👤 मारोती गोडगे👤 आकाश गाडे, येवती👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 आनंदा कुमारे👤 करण भंडारी👤 पोतन्ना मुदलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गिरीश - शंकर केशव कानेटकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या तेलबियाला *'गरीब माणसाचे बदाम'* असे म्हणतात ?२) अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?३) नुकतीच झालेली ५ कसोटी सामन्यांची 'बॉर्डर - गावस्कर चषक' ऑस्ट्रेलियाने किती फरकाने जिंकली ?४) 'व्याकूळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली ? *उत्तरे :-* १) शेंगदाणे २) प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम ३) ३ - १ ने ४) दुःखी, कासावीस ५) सन १८६३*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस कोणकोणते अवयव दुसऱ्याला दान करू शकतो ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""दानाचे महात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानापेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना ? पण हे अगदी खरे आहे. हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.डोळ्यात फुल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मुत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात. अपघातांमध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णांचे हृदय नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैयक्तिक विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. "मरावे परि कीर्तीरुपी उरावे" या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥ मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥ होईल सिद्धीचा साधक । त्यासी देई स्वर्गसुखा ॥३॥ कोण होईल देहातीत । त्यासी करी संगरहित ॥४॥ नामा म्हणे जीवें साठीं । तुज मज जन्में पडिली गांठी ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कोणत्याही परिस्थितीत स्वतः हसत राहणे तसेच इतरांना हसवत ठेवणे ही एक प्रकारची उत्तम कला आहे सोबतच हे महान कार्य सुध्दा आहे. पण, त्यातच स्वतः च्या आनंदात हसत राहणे व दुसऱ्यांची टिंगल, टवाळी करून त्यांना दु:खी करणे याला माणुसकी म्हणत नाही. निदान माणुसकीच्या नात्याने तरी या प्रकारचे वागणे आपल्यात नसायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा- यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Gun1NBkub/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील सातवा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: एम.व्ही.चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.**१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.**१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.**१९३५:ज्ञकोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’चे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.**१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.**१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.**१७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.**१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: तुकाराम परसराम डोके -- कवी**१९८४: राजेश्वर वसंतराव जुबरे -- लेखक अनुवादक, संपादक**१९८३: प्रा. रत्नाकर प्रभाकर चटप -- लेखक, कवी* *१९८०: श्रीकांत रामभाऊ साबळे -- प्रसिद्ध लेखक, संपादक**१९७९: बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल**१९७२: अजय बारकू दानवे -- कवी, लेखक* *१९७१: सरला भिरुड -- कवयित्री,लेखिका* *१९६८: अनिल राव -- लेखक, कवी* *१९६७: प्रा.डॉ. संगिता अरुण खुरद -- लेखिका* *१९६७: इरफान खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २९ एप्रिल २०२० )**१९६६: डॉ. सुधीर अणासाहेब कुंभार -- लेखक* *१९६५: अभिराम भडकमकर -- प्रसिद्ध मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक* *१९६२: वंदना बोकील कुलकर्णी -- लेखिका, संपादिका* *१९६२: प्रा.डॉ.रजनी नकुल लुंगसे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संशोधिका* *१९६१: सुप्रिया पाठक – अभिनेत्री**१९६०: श्रीनिवास गडकरी -- प्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार* *१९५७: तुकाराम ज्योतीराम पाटील (टी.जे)- कवी तथा निवृत्त उपविभागीय अभियंता**१९५७: रीना रॉय -- प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री**१९५६: डॉ. किशोर सानप -- ललित आणि वैचारिक समीक्षा क्षेत्रात लेखन करणारे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक (मृत्यू: २१ मे २०२३ )**१९५६: हरी मल्हारराव धारकर -- कवी* *१९५६: टी.एस.चव्हाण -- कादंबरीकार, वेदनाकार**१९५५: अरुण जाखडे -- पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक, प्रसिद्ध लेखक, संपादक (मृत्यू: १६ जानेवारी २०२२ )**१९५३: रमेश कृष्णराव भोयर -- कवी**१९५२: आनंद विंगकर (शंकर नारायण ढोणे)-- प्रसिद्ध लेखक, कवी**१९५०: विलास मानेकर - सरचिटणीस विदर्भ साहित्य संघ**१९४८: शोभा डे – विदुषी व लेखिका**१९४६: कुमार केतकर -- पत्रकार, लेखक आणि व्याख्याते, अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली.( दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत )**१९४३: डॉ. गो. तु. पाटील -- प्रसिद्ध लेखक संपादक, 'ओल अंतरीची' आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०२४ )**१९४२: श्याम प्रभाकर तारे -- प्रसिद्ध लेखक कवी अनुवादक तथा स्तंभलेखक पुण्यनगरी* *१९४२: सुधाकर माधवराव दोखणे -- लेखक**१९२३: गंगाप्रसाद बालाराम अग्रवाल-- संपादक, लेखक (मृत्यू: ११ ऑक्टोबर २०१८ )**१९२१: चंद्रकांत गोखले – अभिनेते (मृत्यू: २० जून २००८ )**१९२०: सरोजिनी बाबर – प्रसिद्ध लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (मृत्यू: १९ एप्रिल २००८ )**१९१७: रामभाऊ विजापुरे -- हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील भारतीय हार्मोनियम वादक (मृत्यू: १९ नोव्हेंबर २०१० )**१८९४: वासुदेव विनायक जोशी -- कादंबरीकार, नाटककार, निबंधकार(मृत्य: १९ मे १९६५ )**१८९३: जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना,पद्म विभूषण पुरस्कारांनी सन्मानित. (मृत्यू: २१ मे १९७९ )**१८८५: माधव नारायण जोशी -- मराठीतील एक विनोदी नाटककार (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९४८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:चिंतामणी सदाशिव ऊर्फ अण्णासाहेब लाटकर -- ज्येष्ठ ग्रंथ मुद्रक आणि कल्पना मुद्रणालयाचे संस्थापक**२०००: डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले,विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ८ जानेवारी १९१९ )**१९९१: नरहरि भानुदास काळे (नरहरिप्रभू, काळे महाराज )-- दत्तसंप्रदाय, प्रवचनकार (जन्म: २२ मे १९१० )**१९८९: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वछता आणि आरोग्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणा, ओरिसा आणि जम्मू-काश्मीरमधील विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे ऑनलाईन उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *HMPV ने चिंता वाढवली, कर्नाटकात सापडले भारतातले पहिले 2 रुग्ण; महाराष्ट्र सरकारनेही जारी केल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महिलांना सक्षम बनवणे ही आपल्या देशाची खरी ताकद - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारी, हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली, आरोग्य विभाग अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - आनंदाश्रम संस्थेतर्फे दुर्मिळ संस्कृत हस्तलिखितांचे प्रदर्शन, 10 ते 12 जानेवारी दरम्यान रसिकांसाठी खुला होणार खजिना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आचार्य बाळशास्त्री जांभेकर अध्यासन मुंबई विद्यापीठात सुरू करावे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट :- आयर्लंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यासाठी स्मृतीकडे नेतृत्व, 10 जानेवारीपासून होणार प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, शिक्षक, देगलूर👤 संजय पवार, मा. नगरसेवक, धर्माबाद👤 आबासाहेब निर्मले, शिक्षक तथा साहित्यिक👤 धनराज बनसुडे, उपक्रमशील शिक्षक, उस्मानाबाद👤 रमेश माने👤 शिवाजी गुजेवार👤 फारुख शेख👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 परविंदर कौर महाजन, कोल्हापूर👤 धनाजी माडेवार, नायगाव👤 पद्माकर रामराव मुळे👤 रामानंद रामदिनवार, नांदेड👤 पंढरी यंगलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ग्रेस - माणिक शंकर गोडघाटे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र सम्मेलन* कोठे आयोजित करण्यात आले आहे ?२) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) कोणते वर्ष हे भारताचे हवामानाच्या इतिहासात १९०१ नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे ?४) 'व्रण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणता धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे ? *उत्तरे :-* १) शेवगाव, जि. अहिल्यानगर ( अहमदनगर ) २) ५ जानेवारी ३) सन २०२४ ४) खूण, क्षत ५) कॉपर ( तांबे )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *यकृत* 📙 ***************आपल्या शरीरातील फार मोठी रसायनशाळा असे यकृताबद्दल सहज म्हणता येते. यकृताच्या कामात अगदी किरकोळ अडथळा आला किंवा विकृती निर्माण झाली, तर साऱ्याच शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम होतो. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. श्वासपटलाच्या खाली उजव्या बाजूला बरगडीच्या आत यकृत सुरक्षित असते. यकृतदाह झाल्यास यकृताचा आकार वाढतो. तो पोटावरुन हाताला खालची कड लागून समजू शकतो. यकृतात मुख्यतः पित्ताची निर्मिती होत असते. ते पित्ताशयात साठवले जाते. अन्नपचनक्रियेत गरजेनुसार ते पाझरून आतड्यातील अन्नपदार्थात मिसळते. आहारातील स्निग्ध पदार्थांवर त्याची प्रक्रिया होऊन त्याचे दुधासारखे मिश्रण तयार होते. स्निग्ध पदार्थांच्या शोषणालाही पित्त हातभार लावते. अन्नमार्गातून शर्करा शोषून घेतल्यावर शिलकीतील साठा ग्लायकोजेन या रूपाने यकृतात साठवला जातो. जेव्हा शरीराला गरज असेल, तेव्हा ग्लायकोजेनचे पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतर केले जाते. याशिवाय यकृतामध्ये शरीरातील लाल पेशी तयार करणे व नष्ट करणे हाही उद्योग सतत चालू असतो. रक्त गोठवण्यासाठी आवश्यक फायब्रिनोजेन द्रव्याची निर्मिती यकृतातच होते. जीवनसत्त्वांचा साठा येथेच केला जातो. रक्तातील विषारी द्रव्ये नष्ट करणे, प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिया व युरिक आम्लाची निर्मिती व स्निग्ध पदार्थांचा शरीरव्यापारासाठी उपयोग ही कामे येथेच घडतात. एखाद्या माणसाचे यकृत काम करेनासे झाले, आक्रसले, तर त्याला लिव्हर सिरॉसिसचा आजार आहेत झाला आहे, असे म्हणतात. हळूहळू पण निश्चितपणे मृत्यूकडे वाटचाल करणारा हा आजार ठरतो. याची लक्षणे म्हणजे उदरपोकळीत पाणी भरणे, त्याला जलोदर असे नाव आहे. यकृतारोपणाची शस्त्रक्रिया हा एकमेव इलाज यावर गेल्या दशकात उपलब्ध आहे. पण तो सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा व भारतातही अगदी मोजक्या रुग्णालयांत उपलब्ध आहे. रक्ताच्या विविध चाचण्यांतून, अल्ट्रासोनोग्राफीतून किंवा आवश्यक असेल तर यकृताचा छोटा तुकडा बाहेर बारीक सुईवाटे तपासायला काढून (लिव्हर बायोप्सी) यकृताच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. अतिमद्यपान, वरचेवर झालेली कावीळ, पित्ताशयात खडे साचून त्याचा झालेला परिणाम यांमुळे यकृतात गंभीर विकृती निर्माण होतात. या विकृतींचा इलाज आजही आधुनिक वैद्यकाला सापडलेला नाही, तर आयुर्वेददीय इलाजांचे प्रमाणीकरण झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥ काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥ आणियलें आतां आपणासारिखें । गोपिकांसी रूपें दावी नाना ॥३॥ काय जीवेंभावें सकाळां संमता । सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला अनेक पर्यटन स्थळे बघायला आवडतात आणि त्यातून आनंद मिळत असतो. चांगल्या व्यक्तींची भेट घ्यायला आवडते. कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचे असते. पण ह्या दोघांकडून बरेच काही मिळत असले तरी जे, आपल्याला पाहिजे ते मात्र मिळत नाही. कारण आईची माया आणि बापाचा तो कणकर हात पाठीवर मिळत नसतो म्हणून जगात कितीही चांगले शोधण्याचा प्रयत्न करावा पण, घरच्या असलेल्या जिवंत देविदेवतांना क्षणभरासाठी सुद्धा विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा-यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15VnyfPhkK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📝 *_पत्रकार दिन_* 📝••••••••••••••••••••••••••• 📝 *_ या वर्षातील सहावा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_महत्त्वाच्या घटना:_* 📝•••••••••••••••••••••••••••••••••*१९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.**१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन**१९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता**१९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.**१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली.त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.**१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले**१६७३: कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.**१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.* 📝 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*📝 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: गोविंद तुकाराम भांड-मानोलिकर -- कवी**१९८४: दिलजीत सिंह दोसांझ -- पंजाबी व हिंदी चित्रपटाचे गायक**१९८१: मुरहारी कराड -- कवी, लेखक संपादक* *१९७३: किरण दत्तात्रय दशमुखे -- लेखक, संपादक* *१९७१: श्रीकांत अनंत उमरीकर-- कवी, संपादक* *१९६९: शिवा कांबळे -- लेखक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९६६: स्वाती संदीप दाढे -- कवयित्री, अनुवादक**१९६६: सदाशिव नारायण जोशी -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६६: ए. आर. रहमान – संगीतकार**१९६४: विनोद जनार्दन शिंदे -- कवी, लेखक**१९६३: प्रशांत प्रकाशचंद्र पनवेलकर -- प्रसिद्ध कवी**१९६२: बिंदिया गोस्वामी -- भारतीय माजी अभिनेत्री* *१९५९: कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार समालोचक व प्रशिक्षक**१९५८: डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर -- लेखिका**१९५८: तल्लुरी रामेश्वरी(रामेश्वरी) -- भारतीय अभिनेत्री* *१९५५: रोवान अॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक**१९३१: डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ,’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष**१९२८: विजय धोंडोपंत तेंडुलकर -- प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक,पटकथालेखक,तथा राजकीय विश्लेषक(मृत्यू: १९ मे २००८ )**१९२७: राम तेलंग-- कवी, लेखक**१९२६: डॉ. पद्मिनी भांडारकर -- लेखिका (मृत्यू: ४ मार्च २०१३ )* *१९२५: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८ )**१८८३: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१ )**१८६८: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’,’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२ )**१८१२: बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह,१८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला.’दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६ )* 📝 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*📝••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे -- लोकसाहित्याचे अभ्यासक,नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक.(जन्म: १५ मे १९५२ )**२०१७: ओम प्रकाश पुरी -- भारतीय अभिनेते(जन्म: १८ ऑक्टोबर १९५०)* *२०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३ )**१९८७: जयदेव(जयदेव वर्मा) -- हिंदी चित्रपटांतील संगीतकार (जन्म:३ ऑगस्ट १९१८)**१९८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४ )**१९८१: ए. जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६ )**१९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३ )**१९१९: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८ )**१९१८: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५ )**१८८५: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,१८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.(जन्म: ९ सप्टेंबर १८५० )**१८८४: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२ )**१८५२: लुई ब्रेल–अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९ )**१८४७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७ )**१७९६: जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती,मुत्सद्दी*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठी वृत्तपत्राचे जनक -----*दर्पणकार : बाळशास्त्री जांभेकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात धडकणार, येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एक ही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिजनेस जत्रेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन, नवीन ज्ञान दृष्टी देणाऱ्या बालसाहित्याची गरज - ज्येष्ठ लेखिका मंगला वरखेडे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अक्कलकोट - गेल्या 15 दिवसांत 15 लाख भाविकांनी अन्नछत्रचा लाभ घेतल्याची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटी सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅट कमिन्सने रचला इतिहास ! WTC मध्ये 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शीला पठारे👤 मोहन घोसले👤 रितेश जोंधळे👤 सुदर्शन कोंपलवार👤 अभिषेक अडकटलवार, नांदेड👤 इंजि. सुरेश दासरवार, नांदेड👤 अरुण गादगे, नांदेड👤 बजरंग माने👤 भगवान चव्हाण👤 शिवकुमार गंगुलवार👤 विजयकुमार भंडारे, शिक्षक, धर्माबाद👤 बाबुराव आगलावे👤 अंकुश आरेकर👤 शुद्धोधन कैवारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संजीवनी - संजीवनी रामचंद्र मराठे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक अनंत आव्हान , प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरोखर कसोटीच असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान कोणता ?२) क्रीडा मंत्रालयाने यंदा 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कारासाठी किती खेळाडूंच्या नावाची घोषणा केली ?३) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे ?४) 'वेश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अर्जून पुरस्काराचे स्वरूप काय आहे ? *उत्तरे :-* १) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २) चार - मनू भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार ३) पदक, प्रमाणपत्र व २५ लाख रु. ४) पोशाख ५) अर्जुनाची मूर्ती, प्रमाणपत्र व १५ लाख रु.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते.हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या.धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे.गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम. 'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय. असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥ संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥ जन्मजन्मांतरीं जाणावें कवणें । नेणोनि भोगणें कवणें स्वामी ॥३॥ नामा म्हणे केशवे भक्तवत्सले । आम्हांसि वेगळे होऊं नका ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी कोणी एकाकी खोटे सांगत नाही. कारण त्या विषयी त्याला चांगल्याप्रकारे अनुभव आलेला असतो. म्हणून ते, दुसऱ्यांदा चुकीचे घडू नये यासाठी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला कोणाच्या सांगण्यावरून नको त्या शब्दात बोलून त्याचा अवमान करू नये. बरेचदा सत्य न ऐकून घेतल्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाईट सवयींचा त्याग*एक व्यापारी होता. तो जितका व्यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली. मित्र म्हणाला, त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन. त्या व्यापा-याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले, मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला. मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते." मुलाला त्याच्या मित्रकाकांचा उपदेश सहजपणे लक्षात आला व त्याने चांगले वागण्याचे ठरवले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔵 *_जागतिक ब्रेल दिवस_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील चौथा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.**१९५९: लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.**१९५८:१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.**१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.**१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.**१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा**१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.**१८८१: लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.**१६४१: कर भरायला नकार देणार्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला.या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली.त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: प्रा. डॉ. विजय मेरसिंग जाधव -- लेखक, संपादक**१९७१: सुनील राम गोसावी -- लेखक, कवी**१९६७: जयश्री अनिल पाटील -- कवयित्री* *१९६७: श्रीमंत माने -- ज्येष्ठ पत्रकार, लोकमत नागपूरचे संपादक तथा लेखक* *१९६५: प्रा. गोविंद जाधव -- कवी**१९६४: प्रसाद कुलकर्णी - लोकप्रिय कवी, उत्तम व्याख्याते* *१९६४: मिलिंद शांताराम गांधी -- कवी, गीतकार* *१९६३: प्राचार्य डॉ. जगन्नाथ शामराव पाटील -- प्रसिद्ध लेखक**१९५९: सुनंदा सुहास भावसार -- कवयित्री, लेखिका**१९५९: मोतीराम रुपसिंग राठोड - लेखक**१९५७:गुरदास मान -- भारतीय गायक, गीतकार आणि अभिनेता* *१९५५: प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके -- विदर्भातील प्रसिद्ध लेखक व वक्ते**१९५०: पुरुषोत्तम खेडेकर -- मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक* *१९५०: वासंती प्रभाकर मार्कन्डेयवार -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४५: शैलजा राणे-घोरपडे -- कवयित्री, लेखिका**१९४१: कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ )**१९४०: श्रीकांत वसंत सिनकर -- प्रसिद्ध कथालेखक**१९३३: प्रा.मनोहर सप्रे-- प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक (मृत्यू: १३ डिसेंबर २०२४ )**१९३१: दिगंबर कुलकर्णी -- कथाकार कादंबरीकार* *१९३१: निरूपा रॉय -- भारतीय सिने-अभिनेत्री, पडद्यावर प्रामुख्याने नायकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या निरूपा रॉयने सुमारे ४७५ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या ( मृत्यू: १३ ऑक्टोबर २००४ )**१९२५: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१ )**१९२४: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६ )**१९२२: भालचंद्र शंकर भणगे-- लेखक, शिक्षणतज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (मृत्यू: २९ मार्च१९८० )**१९१४: इंदिरा संत –साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २००० )**१९०९: प्रभाकर आत्माराम पाध्ये -- संपादक, प्रसिद्ध साहित्यिक, सौंदर्यमीमांसक, समीक्षकज्ञ (मृत्यू: २२ मार्च १९८४ )**१९०५: कृष्णाजी बाबुराव मराठे -- चरित्रकार(मृत्यू: १९ नोव्हेंबर १९८७ )* *१८१३: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७ )**१८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सिंधूताई सपकाळ -- सामाजिक कार्यकर्त्या, अनाथाची माय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ नोव्हेंबर १९४८ )**२०१७: अब्दुल हलीम जाफर खान -- भारतीय सितार वादक (जन्म: १८ फेब्रुवारी १९२७ )**१९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९ )**१९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८ )**१९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७ )**१९१७: सखाराम कृष्ण देवधर(बापूसाहेब देवधर) -- गायत्री मंत्राचे उपासक,ज्ञानेश्वरीचे अभ्यासक**१९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ )**१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, 'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ )**१७५२: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भुवनेश्वर येथे 7 जानेवारीपासून प्रवासी भारतीय दिवस परिषद, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 समारंभाला उपस्थित राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीतल्या विविध विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी व उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नर्सी नामदेव येथील विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना, विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्यातील आराखडा शासनाला सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सरकार्यवाहपदाची जबाबदारी स्वीकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना फुले दाम्पत्यांनी केली, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपदान; पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामन्यात भारताची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी भारत सर्व बाद 185 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिघोळे , सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्राभिम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रघुनाथ पंडित - रघुनाथ चंदावरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्णावस्थेत पोचतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता ?२) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा विजेता संघ कोणता ?३) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा उपविजेता संघ कोणता ?४) PKL सीजन ११ चा बेस्ट रेडर कोण ठरला ?५) PKL सीजन ११ चा बेस्ट डिफेंडर कोण ठरला ? *उत्तरे :-* १) कबड्डी / हुतूतू २) हरियाणा स्टीलर्स ३) पटना पायरेट्स ४) देवांक दलाल, पटना पायरेट्स ( ३०१ रेड पॉइंट ) ५) नितेश कुमार, तमील थलायवाज ( ७७ टॅकल )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?*📙एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥ मोक्षासी साधन एका ते उपाधी । दाखवुनि बुद्धिभ्रंश केलें ॥३॥ एका पुत्र कलत्र राज्यचा संभ्रर्म । दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥ नामा म्हणे तुझ्या प्रेमालागीं भक्ति । घेतली म्यां सुतीं जन्ममरणें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांचे विचार सकारात्मक असतात अशी माणसे त्याच सकारात्मक विचारांना आत्मसात करून नित्यनेमाने कार्य करत असतात. कारण त्यांना वेळेचे भान असते सोबतच आपण इतरांसाठी काय केले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा विचारी माणसांना कशाचीही अपेक्षा नसते किंवा कोण काय म्हणतील याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. तीच माणसे अभिमानाचे दुसरे नाव असतात.म्हणून जे कोणी चांगले कार्य करत असतील त्यांचे गुणगान करता येत नसेल तर त्यांना नाव ठेवून स्वतः च्या नावाची प्रसिद्धी करू नये. माणसाचे जीवन एकदाच मिळते त्या मानवी जीवनाचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अतिरेक नको*एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसऱ्या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_बालिका दिन, महिला मुक्तिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील तिसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.**१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.**१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.**१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.**१४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: मधुकर बाळासाहेब जाधव -- लेखक, कवी**१९७९: गुल पनाग (जन्म (गुलकीरत कौर पनाग) -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल* *१९७५: प्रा. डॉ. विजय फकिरा राठोड -- कवी लेखक, व्याख्याते* *१९७१: सरिता सुवास परसोडकर -- कवयित्री**१९७१: अशोक गणपतराव पाठक -- कवी**१९६५: धनंजय माधवराव मुळे -- लेखक,कवी**१९६२: डॉ. मेघा उज्जैनकर -- लेखिका**१९६१: राजेंद्र खेर - सुप्रसिद्ध कादंबरीकार**१९६०: डॉ. वृषाली किन्हाळकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका तथा प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर* *१९५८: दिगंबर पवार -- कवी**१९५६: शिरीष श्रीकृष्ण गंधे -- कवी, लेखक, चित्रकार, व्याख्याते, अभिनेते**१९५४: सुभा आत्माराम लोंढे -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५२: श्रीराम वसंतराव ढवळीकर -- लेखक, पत्रकार**१९५१: अशोक निळकंठ सोनवणे -- प्रसिद्ध कवी लेखक तथा विविध पुरस्काराने सन्मानित**१९५०: प्रभाकर निलेगावकर -- मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत* *१९४९: प्रसाद तुकाराम सावंत -- लेखक**१९४७: मनोहर गणपत भारंबे -- लेखक**१९४६: प्रा. डॉ. दीनानाथ सिद्धराम फुलवाडकर -- कवी, कथाकार, संपादक* *१९४३: श्रीकांत दत्तात्रेय निंबवीकर -- प्रसिद्ध कथाकार**१९४१: संजय खान (शाह अब्बास अली खान) -- भारतीय अभिनेता, निर्माता* *१९४१: अमिताभ ( वामन नगराळे)-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९३७: सिंधू सदाशिव डांगे -- संस्कृत संशोधक, लेखिका,संपादक**१९३१: डॉ. य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८ )**१९२६: हरिश्चंद्र भास्कर उजगरे -- लेखक, संपादक**१९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७ )**१८८३: क्लेमंट अॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९६७ )**१८५३: कृष्णाजी नारायण आठल्ये -- संपादक,चित्रकार, टीकाकार, निबंधकार, कवी (मृत्यु: २९ नोव्हेंबर १९२६ )**_१८३१: सावित्रीबाई फुले – भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.(मृत्यू: १० मार्च १८९७ )_*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: डॉ.चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी -- भारतीय न्यायाधीश, लेखक (जन्म: २० नोव्हेंबर १९२७ )**२०१५: सरिता मंगेश पदकी -- कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका (जन्म: १३ डिसेंबर १९२८ )**२००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२० )**२०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४ )**१९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९ )**१९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २५ जून १९१९ )**१९८७: अरविंद देशपांडे -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेता आणि थिएटर दिग्दर्शक (जन्म: ३१ मे १९३२ )**१९७५: ललितनारायण मिश्रा--बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.(जन्म: २ फेब्रुवारी १९२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मी सावित्री बोलतेय....!*....!*नमस्कार .....मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्र्यांच्या दौऱ्यात आता पुष्पगुच्छ व मानवंदना बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत नागरिक व भाविकांची गर्दी, प्राण्यांचे बाजारही फुलले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 ते 20 फेब्रुवारी कालावधीत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर पैठणचे उद्यान 5 वर्षांनी होणार सुरू, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना कडक सुचना, 26 तारखेपासून पर्यटकांसाठी होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यामध्ये 2 महिला अधिकारीचा समावेश, सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेतील अर्जाची होणार पुन्हा पडताळणी, सरकारी नोकरीसह दुचाकीसह अन्य वाहने नावावर असणारे महिला ठरतील अपात्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्राच्या खेलरत्न पुरस्काराची घोषणा, मनू भाकर, डी. गुकेश सह अन्य दोघांना खेलरत्न पुरस्कार, 34 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक, नांदेड👤 ज्ञानेश्वर विजागत , शिक्षक👤 वर्षा भोळे , नांदेड👤 शुभांगी परळकर , नांदेड👤 संदीप जाधव👤 माधव पवार👤 योगेश पाटील👤 उत्तम जोंधळे👤 राजेश पिकले👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अनंत फंदी - शाहीर अनंत घोलप*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणाच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारीला बालिका दिवस* साजरा केला जातो ?२) महाराष्ट्रातील प्रथम महिला मुख्याध्यापिका कोण ?३) भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण ?४) भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या कोण ?५) पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले २) सावित्रीबाई फुले ३) सावित्रीबाई फुले ४) सावित्रीबाई फुले ५) सावित्रीबाई फुले *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समुद्रकिनाऱ्यावरचे प्राणिजीवन* 📙 समुद्र अनेकांनी नक्कीच पाहिला असेल. कदाचित अनेकांचा जन्मच समुद्राकाठी गेला असेल. विविध वेळी समुद्राची विविध रूपे न्याहाळत असताना, लाटांकडे बघत असताना त्याच्या पोटातील समुद्र प्राणीजीवनाची मात्र अजिबात जाणीव होत नाही. अगदी क्वचित एखादा मासा लांबवर सुळकांडी मारताना लाटेबरोबर दिसतो किंवा त्याला टिपण्यासाठी गलपक्ष्यांची झेप नजरेत भरते, एवढेच. जी गोष्ट समुद्राची तीच समुद्रकिनाऱ्याची. शिंपले, रंगीबेरंगी शंख, चमकते अभ्रकाचे पापुद्रे गोळा करण्यात किंवा समुद्रावर वाळूचे किल्ले बांधण्यात अनेकांनी ओहोटीच्या वेळी तासंतास घालवलेले असतील. पण याच किनाऱ्यावर विविध प्राण्यांचे वास्तव्य असते, हे फारसे कधी जाणवणार नाही. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते.किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्याचा भाग हा अत्यंत विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांनी खच्चून भरलेला असतो, असे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरू नये. जिथे खडकाळ किनारा असेल, तेथे तर हे प्रमाण कितीतरी जास्त असते, कारण मऊ माती व रेतीपेक्षा खडकाळ किनाऱ्याचा आधार घेऊन अल्गी, प्रवाळ, शिंपल्यातील प्राणी वाढतात. स्वतःची घरे करतात. त्याचा सलग असा सुंदर पृष्ठभाग खडकांवर तयार होत जातो. रेतीच्या किनार्यातही प्राणी असतातच; पण ते सर्व मऊशार शरीराचे असतात.किनाऱ्याचे ढोबळमानाने चार भाग केले जातात. लाटा फुटून विरतात, तो एक भाग. नंतरचा सर्वात उंच लाट ते तेथपासून भरतीच्या वेळच्या सर्वात कमी उंचीच्या लाटेपर्यंतचा दुसरा टप्पा. तिसरा भाग म्हणजे ओहोटीची सर्वात मोठी लाट व भरतीची सर्वात लहान लाट यांमधला. शेवटचा टप्पा ओहोटीच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान लाटेदरम्यानचा. या प्रत्येक टप्प्यातील पाण्याच्या मार्यानुसार, गरजेनुसार विविध प्राणी वास्तव्य करतात. वरवर पाहता फारसा पत्ता न लागणाऱ्या किनाऱयावर पूर्ण ओहोटी असताना सावकाशपणे हिंडत निरीक्षण केले, तर यांतील काही मंडळी दृष्टीला पडतात. निळसर गोलाकार डॉलरच्या आकाराचे गोल बिळात शिरताना दिसतात, तर दोहोबाजूंना असंख्य पाय असलेले आयसोपॉड्स हिंडताना व खाद्याच्या शोधात दिसतात. खिडक्यांची बिळेही दिसतात, तर ओहोटीच्या पाण्यात स्टारफिशही वळवळताना सापडतात. शिंपल्यांचे विविध प्रकार याच वेळी दिसतात, तर पाठीवर शंखांचे ओझे घेऊन चालणारे कोळसपण या वेळी हलताना दिसतात.या विविध प्राण्यांच्या गरजांप्रमाणे त्यांनी किनाऱ्याचे मघाशी सांगितलेले चार टप्पे आपलेसे केले आहेत. प्रत्येकजण वास्तव्यासाठी आपापला टप्पा पकडूनच राहतो, हे किनाऱ्याचे वैशिष्टय़ म्हणता येईल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥ ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥ जेथें जेथें मन जाईल हें माझें । तेथें तेथें तुझें रूप भासे ॥३॥ नामा म्हणे मी सर्वांपरी अज्ञान । विनवी आस करून पांडुरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रोध हा माणसाचा शत्रू आहे म्हणतात. या क्रोधामुळे आपण कधी, कधी उलट, सुलट बोलल्याने समोरील व्यक्तीचे मन दुखावत असते. अशा व्यक्तीशी संवाद ठेवण्यात अनेक इच्छुक नसतात. म्हणून बोलताना पुढच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेवून संयमाने बोलण्याचा प्रयत्न करावा.विणाकारण किंवा लहान, सहान गोष्टीवरून कोणाचे मन दुखावेल अशा शब्दात बोलू नये.क्रोध हा क्षणासाठी असतो मात्र ज्यावेळी आपल्याच माणसाला बोलून दु:खी केले जाते दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीच्या मनात तो स्थान असेलच असे नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टीकोन बदला*एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे असा भ्रम त्याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्याने वाटसरू येईनात, फळे नसल्याने पक्षी राहिनात अशी अवस्था झाली. झाडाला वाईट वाटले त्याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्या कल्याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणात राहणार आहेस. तेव्हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्याने दुःख न मानण्याचे ठरवले.तात्पर्य : कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील चांगल्या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्मक विचारसरणीने नुकसान होण्याचीही शक्यता असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EDAFxa7UU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_ या वर्षातील दुसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.**२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.**१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट.पदवी प्रदान**१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या**१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.**१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.**१९३६:मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.**१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.**१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.**१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शाल्मली खोलगडे -- भारतीय पार्श्वगायिका**१९८४: माणिक प्रल्हादबुवा गिरी -- लेखक* *१९८४: डॉ. चंदू हरी पवार -- कवी* *१९८०: गजानन नत्थुजी कावडे -- कवी* *१९७८: डॉ. शुभांगी गणेश गादेगावकर -- कवयित्री, लेखिका**१९७५: डॉ.देवेंद्र शेषराव तातोडे -- कवी लेखक* *१९६७: महेश गोविंद आफळे -- कवी, लेखक**१९६४: नंदू सामंत -- कवी* *१९६४: प्रा. राम कदम -- कथाकार**१९६३: अविनाश शरदचंद्र चिंचवडकर -- लेखक, कवी**१९६२: प्रा. मधुकर बळीरामजी वडोदे -- लेखक, कवी* *१९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९९८ )**१९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि माजी खासदार**१९५७: उर्मिला देशपांडे -- कथा, कादंबरी, नाट्य लेखन* *१९५६: प्रा. डॉ. दीपक गोपाळराव कासराळीकर -- समीक्षक* *१९५५: जनार्दन नारायण ठाकूर-शिंदे -- कवी, लेखक**१९५२: श्रीनिवास गेडाम -- कवी, गझलकार, लेखक**१९५०: प्रा. श्याम विद्याधरराव पाठक -- कवी, लेखक* *१९४९: निरंजन कचरुजी पाटील -- लेखक, कवी, संपादक* *१९४५: प्रा. आनंद जामवंतराव कदम -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५ )**१९३१: दिगंबर तुकारामजी होले -- लेखक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल १९९२ )**१९०१: महादेव मल्हार जोशी -- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक (मृत्यू: १९७८ )**१८९२: गणेश पांडुरंग परांजपे -- वैद्यकशास्त्र विषयक ग्रंथाचे कर्ते (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९७३ )**१८८६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर -- लेखक (मृत्यू: १४ जानेवारी १९४६ )**१८७६: भा. वा. भट -- इतिहास अभ्यासक (मृत्यु: २७ डिसेंबर १९५२ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: प्रा. डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे -- प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र नागपूर, विदर्भ संशोधन महर्षी, जीवन साधना, विदर्भ भूषण पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ७ सप्टेंबर १९३५ )**२०१६: अर्धेन्दु भूषण वर्धन -- भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वतंत्र सेनानी (जन्म: २४ सप्टेंबर १९२४ )**२०१५: वसंत रणछोड गोवारीकर -- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: २५ मार्च १९३३ )**२०१३: डाॅ. विनय वाईकर -- गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक ,भूलतज्ज्ञ (जन्म: १९४१ )**२००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: १९४७ )**१९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या* *१९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४ )**१९८७: हरे कृष्ण महाताब -- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते,ओडिशाचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २१ नोव्हेंबर १८९९ )**१९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३ )**१९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक,टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते,वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बावनकशी : सावित्रीबाई फुले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अन् सुरक्षेसाठी राबवणार तंत्रज्ञान; मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती बसवणार यंत्रणा; सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत चालू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गडचिरोलीला "स्टील सिटी ऑफ इंडिया" करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोगरे शंकर👤 शहाजी पालवे👤 कविता जोशी, नांदेड👤 म. विखार👤 साईनाथ ईबीतवार👤 संदीप ढाकणे, शिक्षक, छ. संभाजीनगर👤 श्रीकांत काटलेवार👤 संजय फडसे👤 नरसिंग पेंटम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरती प्रभु - चिंतामण त्र्यंबक खानोलकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद - २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतच्या कोणत्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) PKL इतिहासात १८०० रेड पॉइंट बनवणारा एकमेव खेळाडू कोण ?४) 'व्यथा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कुवैतचा सर्वोच्च सन्मान कोणता ? *उत्तरे :-* १) कोनेरू हम्पी, भारत २) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर ३) परदीप नरवाल ४) दुःख ५) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आजारानंतर केस का गळतात ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने याद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटिन, मेलानिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, ई, प्रथिने, स्निग्धांश यामुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते ; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्याची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिअोरकाॅर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे वाढले तरी पटकन उपटले जातात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥ भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥ नाम नारायण अंतीं उद्धारक । नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साहित्य कोणत्याही प्रकारचे असोत वरवर वाचून काढल्याने त्याचा खरा अर्थ कळत नाही. तसंच एखाद्याच्या जीवनातील व्यथा, वेदना, दु:ख,अडचणी आपुलकीने जाणून घेतल्याशिवाय तेही पूर्णपणे कळत नाही म्हणून कोणाला उगाचच नाव ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. या प्रकारे समजून घेतल्याने त्यांच्या व्यथा, वेदना,अडचणी आपल्या होऊन जातात. आणि हेच एकदा आपले झाले की, त्यातून अनेक मार्ग निघत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरं सत्य*एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला," साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे." साधू म्हणाला, "महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते." *तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)