✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 💥 जन्म :- १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स 💥 मृत्यू :- १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे १९९७: स्वरराज छोटा गंधर्व *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अहमदपूर (जि. लातूर) : येथील साहित्य संगीत कला अकादमीतर्फे दिला जाणारा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१७’ ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी (मुंबई) यांना जाहीर* ----------------------------------------------------- 2⃣ *दिल्लीमधील आनंद पारबत परिसरात केमिकल फॅक्टरीमध्ये आहे, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल.* ----------------------------------------------------- 3⃣ *जम्मू काश्मीर - लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी राजौरी सेक्टरवर जाऊन घेतला सुरक्षेचा आढावा.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - एमआरटीपी अंतर्गत कमला मिल मालक रमेश गोवानी, मोजोस आणि वन अबोव्ह संचालक विरुद्ध गुन्हा दाखल, पालिकेकडून तक्रार दाखल.* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त.* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशालता करलगीकर यांचे निधन, त्यांना 'आंध्रलता' म्हणून ओळखले जात असे.* ----------------------------------------------------- 7⃣ *२०१७ वर्ष क्रिकेटसाठी अत्यंत शानदार ठरले. अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन करताना हे वर्ष गाजवले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *सौदागर नागनाथ गोरे* सौदागर नागनाथ गोरे, ऊर्फ छोटा गंधर्व, (१० मार्च, इ.स. १९१८ - ३१ डिसेंबर, इ.स. १९९७) हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावात १० मार्च, इ.स. १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुणरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत इ.स. १९४३मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्याअध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत* 👉 रामनाथ कोविंद *२) प्रख्यात लेखिका तस्लीमा नसरीन कोणत्या देशाच्या आहेत?* 👉 बांग्लादेश *३) भारताचे २०वे सरन्यायाधीश कोण होते?* 👉 सब्यसाची मुखर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा 👤 ताहेर पठाण, धर्माबाद 👤 किरण अबुलकोड, समराळा 👤 अमोल बुरुंगुले 👤 शशांक पुलकंठवार 👤 सचिन चव्हाण *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *काळ* काळा सोबत चला तो कोणासाठी थांबत नसतो काळ कोणासाठी का कुठे सांगा तुम्ही लांबत असतो काळा सोबत चालतो त्याचा काळ चांगला जातो काळ वेळ न पाळणारा वर्षानुवर्षे ओरडत रहातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= पहायला आणि विचार करायला गेलो तर काळ आणि वेळ कुणासाठी कुणाच्या म्हणण्यानुसार थांबत नाही आणि थांबणारही नाही..मग एवढे असतानाही आपण उगीच म्हणत असतो की,आता हे वर्ष संपून नवे वर्ष लागत आहे.हे वर्ष केव्हा संपले काही कळलेच नाही. कळेल तरी कसे ? कारण आपण आपल्या धुंदीत होतो ना ! आपणास आपल्या कामामध्ये कुणाच्याही जीवनाकडे पहायला वेळही मिळाला नाही.जे काही आपण संकल्प केले होते ते पूर्ण झाले की नाही याचाही आपण विचार केला नाही. तुम्ही तुमच्या जीवनात संकल्प करा अथवा करु नका परंतु येणारा प्रत्येक दिवस,वार,महिना आणि वर्ष हे तुमच्यासाठी,तुमच्या जगण्यासाठी आव्हानात्मकच आहे. तुमच्यासाठी रोज काही ना काही प्रश्न घेऊन येणारच आहे.त्या प्रश्नांना किंवा येणा-या काळाला,वेळेला नि येणा-या नवीन वर्षाला रोजच्यासारखेच समजून जेवढे तुम्ही नव्या जोमाने काम करता तेवढ्याच पद्धतीने येणा-या वर्षाततही कामाला लागा निश्चितच तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी होईल. आपण समाधानी झालो तर इतरांनाही आपण काहीतरी करण्याची इच्छा प्राप्त होईल आणि तुम्ही आपोआपच सहज ते करु शकाल यासाठी संकल्प करायची गरजच नाही.चला तर मग नेहमीप्रमाणे आपण आपली कामे रोजच्यासारखीच करायला सज्ज रहा म्हणजे तुम्ही न ठरवताही तुमचे संकल्प पुर्णत्वाकडे जातील. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *वार काढा तोंडी* दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत १) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस, २) ३० तारिख ओलांडताना २ दिवस, ३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस, ४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल. उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१६ रोजी कोणता वार असेल? उत्तर:- ३१ मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल. तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *घार व कबुतरे* एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला. तात्पर्य - एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/12/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह. १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला. १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर. १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार. २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार. 💥 जन्म :- १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म. १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी. १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक. 💥 मृत्यू :- १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ. १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी. १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर. २००१ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई : शिक्षण क्षेत्रात परिवर्तन व्हायला हवे. यामध्ये शाळांचे आणि शिक्षणाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आता बदल करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करा, दिल्लीतील नागरिकांना पोलिसांचे आवाहन.* ----------------------------------------------------- 3⃣ *अंदमान - निकोबारमध्ये भूकंपाचा धक्का, भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी मोजण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज 2 जानेवारी 2018 पर्यंत तहकूब करण्यात आले.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - कमला मिल आग : निष्काळजीप्रकरणी पालिकेच्या पाच अधिका-यांवर निलंबनाची कारवाई, आयुक्त अजोय मेहता यांची माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय* ----------------------------------------------------- 7⃣ *जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आजपासून दोन दिवस विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा. जळगाव, धुळे व नंदुरबारमधील विद्यार्थी होणार सहभागी, विज्ञान भारतीचे सचिव जयंतराव सहस्रबुद्धे यांचीही उपस्थिती.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा : संघर्ष* आज सुनंदाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते. तिचा एकूलता एक मुलगा सुनील नौकरीसाठी मुंबईला चालला होता. अतिशय कठीण परिस्थितीत सुनीलने आपले कॉम्प्युटर इंलिनिअरींग कोर्स पूर्ण केला होता. कॅम्पस इंटरव्ह्यू मधूनच त्याला टाटा कंपनीने नौकरीसाठी कॉल पाठविला होता. देवगिरी ...... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विक्रम साराभाई* भारतीय शास्त्रज्ञ विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात. ~ वपु काळे | काही खरं काही खोटं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले गाव कोणते?* 👉 पंडरी *२) युनिसेफची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *३) वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये चीनचा कधी प्रवेश झाला?* 👉 २००१ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आसनं अन् दिसनं* सारखं दिसतं म्हणून सारखं असत नाही एकच गोष्ट प्रत्येकाच्या डोक्यात बसतं नाही आसनं अन् दिसनं यात खूप फरक असतो प्रत्येक घटने मागे एक विशिष्ट कारक असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एके दिवशी कुणीतरी आपल्यावर दया करुन दिलेल्या एका भाकरीपेक्षा कष्टाने आणि स्वाभिमानाने मिळवलेली अर्धी भाकरी अधिक सुखाची असते.ती लाचारी कधीच स्वीकारत नाही तर आपला स्वाभिमान जागृत करुन जगासमोर जगायला शिकवते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.* हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . *उदा.*-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सिंह व जंगलातील प्राणी* 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो* एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 *तात्पर्य* : - *आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल. २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी. 💥 जन्म :- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील. १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक. १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक. १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते. 💥 मृत्यू :- १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ. १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला, तापमानात घट.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- कमला मिल कंपाऊंडमधील भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू, 12हून अधिक जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *ऐतिहासिक दिवस ! तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर* ----------------------------------------------------- 4⃣ *दर महिन्याला घरगुती गॅसचे दर वाढवण्याचा निर्णय मागे, आता दर महिन्याला घरगुती गॅसचे दर वाढवणार नाहीत.* ----------------------------------------------------- 5⃣ *भारताने सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेने तामिळनाडूच्या 69 मच्छीमारांची सुटका केली.* ----------------------------------------------------- 7⃣ *मेलबोर्न : अॅलिस्टर कूकच्या विक्रमी द्विशतकी खेळीमुळे इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या अॅशेस कसोटीच्या तिस-या दिवशी पहिल्या डावात १६४ धावांच्या आघाडीसह सामन्यावर वर्चस्व मिळविले आहे.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *खरी संपत्ती* अमित हा बँकेत कारकून. त्याची पत्नी नयना प्राथमिक शाळेत शिक्षिका. दोघांनाही चांगला पगार होता. त्यांचं कुटुंब सुखी व समाधानी होतं, अमन व पूजा नावाची दोन गोंडस मुलं देवाने त्यांच्या पदरात दिली होती. त्यांच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची वाणवा नव्हती ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_37.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *राजेश खन्ना* भारतीय चित्रपट अभिनेते राजेश खन्ना (जन्म: 29, 1942 - मृत्यू: 18 जुलै 2012) हे एक भारतीय बॉलीवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती केली तसेच राजकारणात प्रवेश केला. ते 1991 ते 1996 दरम्यान पाच वर्षांसाठी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे खासदार होते . त्यानंतर ते राजकारणातून निवृत्त झाले. त्यांना काका या नावाने ओळखले जात असे. आनंद या चित्रपटातील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. 180 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे आणि 128 चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे आणि दुहेरी भूमिकांशिवाय 22 लघुपटांमध्ये 22 लघुचित्रपटही केले आहेत 1969 -71 मध्ये तीन वर्षांत, 15 एकटय़ा हिटमध्ये अभिनय करणे हा बॉलीवूड सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आणि 14 वेळा नामांकन करण्यात आले. बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशनने हिंदी फिल्मसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता पुरस्कार देखील चार वेळा सर्वाधिक नामांकीत केले आहे आणि 25 वेळा ते नामांकन करण्यात आले होते. 2005 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड मिळाले.राजेश खन्ना हिंदी सिनेमाच्या पहिले सुपरस्टार होते. त्यांनी 1966-1991 मध्ये 74 सुवर्ण जयंती चित्रपटांची निर्मिती केली. (गोल्डन ज्युबली हिट). *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= तुफान प्रेम करणारी जितकी माणसं जोडाल, तेवढी घरं तुमची झाली. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) केंद्राने २२ भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?* 👉 भारतवाणी *२) अ. भा. म. सा. संमेलनाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?* 👉 लक्ष्मीकांत देशमुख *३) इराकमधून कोणाचा नायनाट करण्यात आला आहे?* 👉 आयसीस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संतोष हणमंतराव कंदेवार उपायुक्त, मनपा, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *उंटावरून* बरं वाटतं कोणालाही उंटावरून शेळ्या हकायला कसं कळलं नेमकं कोणाचं काय लागलंय दुखायला उंचावरून शेळ्या हाकुन काम व्यवस्थित होत नाही कोणी कितीही मोठा केलेला संकल्प तडिस जात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाभारतात 'सोनेरी मुंगूस' ही कथा आहे. महायुद्ध संपल्यावर पांडवांनी राजसूय यज्ञ केला. अन्नदान केले, आनंदोत्सव केला. इतक्यात भटारखान्यातून काही बल्लवाचार्य श्रीकृष्ण आणि पांडवाच्या तंबूत आले. दानासाठी जिथे अन्न शिजविले त्या निखा-यांमध्ये कुठूनतरी एक मुंगूस येऊन लोळू लागले. सर्वांगाला राख फासून घेऊ लागले. काही वेळाने निराश होऊन ते बाहेर आले. त्याची एक बाजू सोनेरी असून चमकत होती. पांडवांनी छेडताच ते म्हणाले... एका दुष्काळात एक ब्राम्हण कुटुंब उपासमारीने दिवस काढीत होते. एके दिवशी ब्राम्हणाला चार पोळ्या मिळाल्या. प्रत्येकाला एकेक पोळी मिळणार इतक्यात अतिथी आला. प्रथम ब्राम्हणाने, नंतर मुलाने, मग ब्राम्हणाच्या पत्नीने त्याला आपला वाटा दिला. तरीही अतिथी याचक वृत्तीने पहात राहिला.* *शेवटी ब्राम्हणाच्या गरोदर सुनेने आपला भाग दिला. तेथे काही अन्नकण पडले होते. ते मुंगूस अन्नासाठी तिथे फिरले. त्याची जी बाजू त्या कणांना लागली ती सुवर्णासारखी तेजस्वी झाली. ब्राम्हण कुटुंब 'अतिथी देवो भव' वृत्तीने संतोष पावले..पण भुकेने मरण पावले. ही गोष्ट सांगून मुंगूस म्हणाले,'तुम्ही यज्ञ करून पुण्यसंचय केलात, अन्नयाग करून कृतार्थ झालात. हे ऐकूण इथे माझे सर्वांग सोनेरी होईल या आशेने मी आलो. पण कसले काय! युद्धात तुम्ही असंख्य योद्धे मारलेत, कित्येक सुहासिनी विधवा झाल्या. कित्येक गावे निर्मनुष्य झाली आणि हे सारे अहंकार सुखविण्यासाठी केलेत. तुमचा जय निर्मळ, नितळ आणि निष्कलंक नाही. हे ऐकून पांडव खजिल झाले. गरीब ब्राम्हण कुटुंबाने स्वत:चा विचार न करता 'दातृत्व' हे मूल्य मानले. उलट पांडवांच्या दातृत्वात विजयाची नशा होती. श्रीकृष्णाला हे जाणवले, तेव्हा तो हसला. यांचा 'अहम' यांना वेळीच दाखवायला हवा होता, असे त्याला वाटले. सोनेरी मुंगसाने ते काम अचूक केले..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल. अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे. तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *कविता करणे* *कृती -* 1) शब्दाच्या शेवटी ळा हे अक्षर येणारे शब्द लिहा उदा. शाळा 2) प्रत्येक शब्द शेवटी असेल असे वाक्य तयार करा. उदा. ही माझी सुंदर शाळा. 3) चार वाक्य एकाच विषयी संबंधित असेल असे वाक्य एकत्र करा 4) अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी वाक्यात थोडा बदल करू या मात्र शेवटचा शब्दाचा शेवटी ळा असावा म्हणजे कविता पूर्ण होईल. 5) पाहू आत्ता शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यानी कविता कशी तयार केली ? ही माझी सुंदर शाळा तेथे मुले झाली गोळा शाळेत आहे मोठा फळा त्याचा रंग आहे काळा अजुन भरपूर कविता मुले करू शकतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सुई आणि वाघ* एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, 'सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?' सुई म्हणते, 'हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. 'सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ? विंचवाला सुई म्हणते... 'हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते. 'सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का? सुई म्हणते 'हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल. सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात. थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो. शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बाॅक्समधून सर्व नाणी काढुन फ्राॅकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली. ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही. केमिस्टचा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता. त्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली. केमिस्ट तिच्याकडे आला , कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..? " मला चमत्कार पाहिजे " केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले.... बेटा तुला काय पाहिजे... ? ती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे .. केमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही... ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल ! केमिस्टने विचारले , बेटा तुला हे कोणी सांगितले?.... तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली.. माझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहेत, जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झालेत... त्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला , ( त्याला गुजराती भाषा येत होती. ) व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी ? तिने आपली छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते. तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला , बेटा, तु चमत्कार विकत घेतलास.... चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल.. तो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन "डाॅ. जाॅर्ज अॅडरसन " होता. त्या सर्जनने मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला. सर्जरी झाल्यानंतर हाॅस्पीटल मधुन बाहेर पडताना डाॅ.जाॅर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला ...... बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही ? जरुर मिळतो...जरुर मिळतो.. ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती. 💐 निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म,तिची श्रद्धा खरी ठरविली.💐 👍जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात निसर्ग तुमची मदत करतो.👍 😊हाच आस्थेचा चमत्कार आहे. 😊 जर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल, आणि तुम्हालाही इतरांसाठी समर्पण भावना असेल, तर निसर्ग तुमच्या कडुनही असा चमत्कार घडविलच.. 🤝आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तिंचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर त्या आनंदाचे सोने झाल्याशिवाय रहात नाही.⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜ ✌ निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे.✌
*कृतज्ञतेचा निर्देशांक* असंच एकदा एक मासिक चाळताना त्यातील एका लेखामधील एका वाक्याने विचारमग्न केलं. आयुष्यातली सकारात्मकता याविषयावरचा तो लेख होता. मूळच्या इंग्रजीमधील लेखामधील ते वाक्य असं होतं; "Sometimes, try calculating your gratitude index in life, you will realize how lucky you are!". *(कधीतरी तुमच्या आयुष्यातील कृतज्ञता निर्देशांक मोजण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती नशीबवान आहेत ते!).* मला 'कृतज्ञतेचा निर्देशांक' ही कल्पनाच भन्नाट आवडली. जसं स्टॉक मार्केट मध्ये स्टॉक इंडेक्स किंवा ट्रेडिंग इंडेक्स असतात आणि त्यांच्या मूल्यावरून बाजाराची तब्येत ठरवली जाते, तसाच कृतज्ञताभावनेचे चढउतार मोजणारा हा कृतज्ञता निर्देशांक आपल्या मानसिकतेची तब्येत ठरवू शकेल असं मनात आलं. लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं की माझ्या आयुष्यातल्या कृतज्ञता कशा मोजायच्या? कृतज्ञता निर्देशांक कसा ठरवायचा? आणि तो दैनंदिन जीवनात कसा आणायचा?. अधिक विचार केल्यावर मला काही कल्पना सुचल्या त्या अशा; *१. माझ्या निसर्गदत्त संपदांबद्दल कृतज्ञता मानणे :* म्हणजे धडधाकट शरीर मिळालं, धडधाकट अवयव मिळाले, विचारी संवेदनशील मन मिळालं, या बद्दल कृतज्ञता बाळगणे. मला लक्षात आलं की धडधाकट शरीर असणं, कार्यक्षम अवयव असणं हे आपण गृहीत धरतो, पण कार्यक्षम डोळ्यांची किंमत नेत्रविहीन व्यक्तींना विचारात घेतलं तर कळेल, धडधाकट हातपायांची किंमत अपंगांना विचारात घेतलं तर कळेल. संवेदनशील विचारी मनाची किंमत मनोरुग्णांची परिस्थिती पाहून कळेल. आणि एकदा हा मुद्दा लक्षात आला की निरोगी, सुदृढ शरीराबद्दल आपोआप कृतज्ञता मनात दाटून येईल. *२. मला मिळालेल्या नात्यांच्या बाबतीत कृतज्ञता मानणे :* आपल्याला लाभलेले माता, पिता, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी आपलं विस्तारित कुटुंब यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. ही नाती जन्म झाल्यावर आपल्याला सहज मिळतात म्हणून खूप वेळा किंमत नसते आपल्याला. छोट्या छोट्या कारणांनी रुसवे फुगवे धरतो आपण. पण या नात्यांची किंमत अनाथाश्रमात वाढणाऱ्या मुलांना पाहून कळेल. त्यांच्या डोळ्यात मायेचा एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं की सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करून झाल्यावर नमस्कार करण्यासाठी आईवडील असणं हे किती भाग्याचं लक्षण आहे ते. भांडायला, खेळायला, एकत्र वाढायला भावंडं असणं, हट्ट पुरवायला, लाड करायला मामा, काका, मावशी, आत्या असणं याची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं इतक्या महत्वाची नाती खचितच आहेत ही. *३. मला मिळालेल्या साधन संपदेबाबत कृतज्ञता मानणे :* म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, निजायला अंथरून असणे, पांघरायला पांघरून असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चालल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्टीत सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं कृतज्ञता बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? *४. माझ्या आयुष्यात आलेल्या इतर माणसांविषयी कृतज्ञता मानणे :* मला तळमळीने शिकवणारे शिक्षक, मार्गदर्शक, शेजारी पाजारी, आपले फॅमिली डॉक्टर, ड्राइवर, कामवाली मावशी, कचरा घेऊन जाणारी बाई, बिल्डिंगचा वॉचमन अशा एक नाही अनेक व्यक्तींबद्दलजाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणे महत्वाचं नाही का? विचार करू लागलो आणि ही यादी लांबच लांब होऊ लागली. यातून एक जाणवलं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य झालं आहे, सुरळीत झालं आहे, सुखावह झालं आहे त्या त्या प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीबद्दल मनात दररोज जो कृतज्ञताभाव निर्माण होईल त्यावरून त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक ठरवायचा. हा कृतज्ञता निर्देशांक मला दररोज जागृत ठेवणं इतकाच नाही तर वाढत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मी एक उपाय शोधून काढला आहे. जी जी व्यक्ती माझ्या संपर्कात येईल त्या व्यक्तीला शक्यतो संधी शोधून "धन्यवाद" देण्याचा परिपाठ अमलात आणला आहे. सकाळच्या दुधवाल्यापासून ते दररोज घरचा कचरा नेणाऱ्या बाई पर्यंत सगळ्यांना ते जेव्हा समोर येतील तेव्हा "थँक यू" असं ठरवून म्हणण्याची सवय स्वतःला लावून घेतो आहे. अगदी कुठे जात असेन आणि रिक्षा केली तर उतरल्यावर पैसे देऊन झाल्यावर रिक्षावाल्याचा खांद्यावर हलके थाप मारून आवर्जून "थँक यु" म्हणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. गम्मत म्हणून अशा किती जणांना मी दिवसभरात "थँक यु" म्हटलं याची माझ्यापुरती नोंद ठेऊन त्यादिवशीचा कृतज्ञता निर्देशांक दररोज रात्री निजण्यापूर्वी मी काढण्याचा प्रयत्न करतो. इतर कुठल्याही निर्देशांकासारखा दररोजचा हा आकडा कमी जास्त होतो खरा पण एकूण कृतज्ञता निर्देशांकाचा महिनाभराचा आलेख(ग्राफ) हा चढता असला पाहिजे याचा प्रयत्न मात्र जरूर करतो. या सगळ्या खटाटोपानंतर मला स्वतःला एक मोठा फायदा असा जाणवला की ज्यांना मी धन्यवाद देतो त्या व्यक्तींना बरं वाटत असेलही मनात, पण माझ्या दृष्टिकोनातून पाहता माझं मन एका अनामिक समाधानाने भरून जातं. पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्वात महत्वाचं की या सर्व व्यक्तीत वसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येकवेळी माझं "थँक यु" आपोआपच पोहोचतं ... 🙏🏻🙏🏻
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार. १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *हिमाचल प्रदेशमध्ये नवीन सरकारचा शपथविधी सोहळासंपन्न, जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री.* ----------------------------------------------------- 2⃣ *समृद्धी महामार्गावर टोल लागणारच. 'समृद्धी हा विषेश महामार्ग, टोल असणारच', सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *बीड : माजलगाव तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजा आनंदगावकर विजयी.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : लघुबचत योजनांच्या व्याज दरात 0.2 टक्कांची कपात करण्यात आली आहे.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूरः राज्यातील वातावरण बदलांमुळे विदर्भात थंडीची लाट. नागपूरमध्ये सर्वात कमी तापमान ७.८ अंश सेल्सिअस.* ----------------------------------------------------- 6⃣ *डोंबिवलीत २८ जानेवारी रोजी सायकल मित्र संमेलन :नाट्यगृहाने अखेर दिली तारिख* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत केरळ संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरुदक्षिणा* मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *धीरूभाई अंबानी* धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी (गुजराती: ધીરુભાઈ અંબાણી ) (डिसेंबर २८, इ.स. १९३२ - जुलै ६ इ.स. २००२) हे गुजराती व भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. धीरूभाई यांचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी डिसेंबर २८, इ.स. १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य. धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) एसबीआयने किती शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत?* 👉 १२०० *२) स्टेट बॅंकेचे प्रबंच निदेशक कोण आहेत?* 👉 प्रवीण गुप्ता *३) सध्या कोणती महाराष्ट्रीयन महिला पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे?* 👉 कश्मिरा पवार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साई पाटील, धर्माबाद श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस 👤 वृषाली वानखडे, अमरावती सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक 👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद 👤 अजय तुम्मे 👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती 👤 नंदकिशोर सोवनी, पुणे 👤 ओमसाई सितावार, येवती 👤 ओमकार ईबीतवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *नैतिकता* स्वहिता पुढे नैतिकता सहज विसरली जाते सुसंस्कृत माणसाची जीभ घसरली जाते छोट्याशा गोष्टीसाठी नैतिकता सोडतात लोक वागतात जसे की ते आहेतच बीन डोक शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *टिचकी मारूनी जावे.* *कृती—* 🔶प्रथम दहा दहा मुलांचे दोन गट करून समोरासमोर तोंड करून रांगेत बसवावे. त्यांच्या हातात शब्दाचे फलक द्यावे. *गटप्रमुखाने* रांगेतील एका मुलाचे डोळे झाकून पुढील वाक्य म्हणावे. *बदक ने यावे टिचकी मारूनी जावे.* 🔶ज्या मुलाजवळ ते शब्द फलक असेल तो मुलगा येऊन टिचकी मारून जाईल नंतर डोळे उघडल्यावर *बदक* शब्द फलक कोणाजवळ आहे त्याला ओळखेल. अचूक शब्द ओळखल्यास त्या मुलाला शाबासकी द्यावी. अशा प्रकारे आपण *अनेक कार्ड* हातात देऊन खेळ घेता येतो. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वासघात* एका धनगराचा आपल्या कुत्र्यावर फार विश्वास होता. जेव्हा त्याला कोठे तरी बाहेर जायचे असे, तेव्हा आपली मेंढरे तो कुत्र्याच्या स्वाधीन करत असे. कुत्र्याने आपली चाकरी इमानाने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला लोणी-भाकरी खाऊ घालत असे, पण त्याचा कुत्रा इतक्या विश्वासास पात्र नव्हता. त्याचा मालक त्याला इतक्या चांगल्यारीतीने वागवीत असूनही केव्हा तरी एखादी मेंढी खाण्यास तो कमी करत नसे. ही त्याची लबाडी एके दिवशी धनगराने पाहिली तेव्हा तो त्याला ठार मारू लागला, त्यावेळी कुत्रा त्याला म्हणाला, 'साहेब, माझ्याकडून चुकून एक वेळ अपराध घडला, तेवढय़ासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका. मला मारण्यापेक्षा जो लांडगा तुमच्या मेंढय़ा मारून खातो, त्याचा जीव तुम्ही का घेत नाही?' धनगर त्यावर म्हणाला, 'अरे लबाडा, लांडग्यापेक्षा तुझा दुष्टपणा अधिक भयंकर आहे. कारण लांडगा हा माझा शत्रूच आहे. त्याच्यापासून मला अपकार व्हायचाच, हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे त्याच्यासंबंधीने योग्य ती खबरदारी मी ठेवत असतोच, परंतु तू माझा विश्वासू नोकर असताना अन् मी तुला इतक्या चांगल्यारीतीने वागवत असताना तू ज्या अर्थी असा कृतघ्नपणा करायला प्रवृत्त झालास त्याअर्धी तू क्षमेला मुळीच पात्र नाहीस.' इतके बोलून त्याने त्याला एका जवळच्या झाडाला टांगून मारून टाकले. तात्पर्य :- विश्वासघातकी माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही व एकदा त्याचा विश्वासघातकीपणा उघडकीस आल्यावर लोकांनी जर त्याला यथायोग्य शासन केले, तर ते योग्यच झाले, असे म्हटले पाहिजे. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
माता म्हणा मदर म्हणा आई शब्दात जीव आहे .... पिता म्हणा पप्पा म्हणा बाबा शब्दात जाणीव आहे सिस्टर म्हणा दीदी म्हणा ताई शब्दात मान आहे .... ब्रो म्हणा भाई म्हणा दादा शब्दात वचक आहे.... फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा मित्र शब्दात शान आहे .... एन्ड म्हणा फिनिश म्हणा अंत शब्दात खंत आहे ..... दिवार म्हणा वॉल म्हणा भिंत शब्द जिवंत आहे रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा नातं शब्दात गोडवा आहे एनेमी म्हणा दुश्मन म्हणा वैर शब्द जास्त कडवा आहे.. हाय म्हणा हॅलो म्हणा हात जोडणे संस्कार आहे सर म्हणा मॅडम म्हणा गुरु शब्दात अर्थ आहे ग्रँड पा ग्रँड माँ शब्दात काही मजा नाही आजोबा आजी सारखे सुंदर नाते जगात नाही.. गोष्टी सर्व सारख्या पण फरक फार अनमोल आहे अ ते ज्ञ शब्दात ज्ञानाचे भांडार आहे म्हणुनच इंग्रजी पेक्षा आपल्या मराठीत जास्त आदर आहे.
संकलित
*एकच ध्यास,वाचन विकास।।* ••••••••••••••••••••••••••• *वाचणार रे वाचणार १००% वाचणार* 📚📚👍👍📚📚 *📚 १००% विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास कार्यक्रम-२०१७-१८* 〰〰अंतर्गत〰〰 👇 *🔰तालुका स्तरीय शिक्षक प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा* *🌅(दिनांकः २७ ते २९ डिसेंबर-२०१७)* टप्पा क्रमांक(३) (दिवस पहिला.) 🖼स्थळः- आर्य समाज मंदिर हदगाव जि.नांदेड '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' *प्रेरणा*💐💐 👇 *मा.नंदकुमार साहेब(प्रधान सचिव)* 〰〰〰〰〰〰 ---------------------------------- प्रशिक्षणास उपस्थित व भेट (अधिकारी वर्ग) प.समितीचे ग.शि.अ. मा.श्री .ससाणे साहेब, मा.श्री उत्तरवार सर , शि.वि.अ.मा.श्री पाटील साहेब, मा.श्री जाधव साहेब,मा.श्री पावणे साहेब केंद्रप्रमुख मा.श्री अंभोरे साहेब,मा.श्री वारकड साहेब, मा.श्री कदम साहेब 🙏🙏 *तालुका प्रशिक्षण सुलभक* 👇 *1⃣श्री एस.डी.शिंदे सर* *2⃣श्री संदेश चोंढेकर सर* *3⃣ श्री श्रीपाद देवमाने सर* *4⃣श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मँडम* ____________________ व (सर्व सहाय्यक सुलभक) *🔖प्रशिक्षणाचे उदिष्टे*🔖 👇 1⃣वाचन शिकण्याचे टप्पे व त्यासाठीची शिक्षकांची सुलभकाची भुमिका याबाबतचा शिक्षकांच्या संकल्पना स्पष्ट करणे. 2⃣प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास करण्यासाठी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करण्यासाठी शिक्षकाची क्षमता विकसीत करणे. ________________________ Rte-act-०९ च्या प्रभावी अंमलबजावणी करीता 🅿💲Ⓜ राज्यात कार्यान्वित आहे.प्रत्येक मुल शिकले पाहिजे. हेच कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. ________________________ *✴प्रशिक्षणाची गरज✴* शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या *वाचनाच्या व लेखनाच्या क्षमता विकसित* झालेल्या असणे ही प्रत्येक मुल *शिकण्यासाठीची प्राथमिक अट* आहे. काही वर्ष शाळेत राहुन मुलाला काही येत नसेल तर मुले शाळा सोडुन देतात.त्यांना शिकण्यात गोडी वाटत नाही.ही मुले अभ्यासात मागे राहतात.हीच परिस्थिती कायम राहिली तर मुले शाळा सोडुन देतात.हे जगभरातील झालेल्या संशोधनातुन सिद्ध झाले. *मुलांना १००% शिकते करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांचे पायाभुत वाचन कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे.* 〰〰〰〰〰 *वाचन व मूलभूत वाचन Ppt, नंतर पूर्व उत्तरचाचणी. 👇 *📚"वाचन म्हणजे लिहलेला किंवा छापलेल्या मजकुराची अर्थ शोधण्याची प्रक्रिया." .* 📚पायाभुत वाचन म्हणजे लिहलेले शब्द ओळखणे आणि महत्वाची विरामचिन्हे लक्षात घेऊन उच्चारणे.लिहलेला मजकुर काही एक अर्थ व्यक्त करण्यासाठी असतो हे समजणे अपेक्षित आहे. 🌼🌼🌼🌼🌼🌼 वैशिष्टेपुर्ण बाबी. *समता* समता व समानता यातील फरक जाणणे. *समता म्हणजे ज्याला जेवढी गरज आहे तेवढ देणं."* ही संकल्पना अनेक उदा.सह स्पष्ट करणे. 👉 *बहुभाषीक तासीका* यावर विविध प्रश्नावर गटचर्चा .. *👉आनंददायी गीत* 💃💃💃💃💃💃💃 👭👭👭👭👭👭 👉 *शिक्षणपूरक कृती* कृतीः १) कागद फाडणे २)शेंगा फोडणे ३)बाटलीचे झाकण लावणे,पाणी ओतणे..... ४)काचेची कलाकृती ५) सागरगोट्या व ह्याला अनुसरून विविध समांतर कृती ...... ●●●●●●●●●●●●●●● ____________________ *१००% मुलांना वाचता आलं पाहिजे,माझा हक्क काय?माझी उपयोगीता कोणती?इत्यादी बाबींवर सुलभकांकडुन चर्चा करण्यात आली.* ➖➖➖➖➖➖ *संकलन / सुलभक* *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (हदगाव) जिल्हा नांदेड* 🙏🙏🙏🙏🙏🙏
शब्द वाढवित नेणे. 💥शेजारची ठमी शाळेला आली. 💥💥शेजारची ठमी, ठमीचे दप्तर शाळेला आले. 💥💥💥 शेजारची ठमी.ठमीचे दप्तर, दप्तरातील पुस्तक शाळेला आले. 💥💥💥💥 शेजारची ठमी, ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक शाळेला आले. 💥💥💥💥💥 शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक,पुस्तकातील पाने शाळेला आली. 💥💥💥💥💥💥 शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक ,पुस्तकातील पाने,पानावरच्या ओळी शाळेला आले. 💥💥💥💥💥💥💥 शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक,पुस्तकातील पाने,पानावरच्या ओळी,ओळीतले शब्द शाळेला आले. 💥💥💥💥💥💥💥💥शेजारची ठमी,ठमीचे दप्तर,दप्तरातील पुस्तक ,पुस्तकातील पाने,पानातील ओळी,ओळीतले शब्द ,शब्दातील अक्षरे शाळेला आली. संकलित
🙏25 निकष🙏* *🙏25 निकष🙏* ➖➖➖➖➖➖➖➖ *1)निकष क्रमांक 01➖आपल्या शाळेत कोणत्याही वर्गातील मुले 100%पट व उपस्थिती टिकवने.* *2)निकष क्रमांक 02➖शाळा बाह्य बालके ,प्रत्यक्ष प्रवेशित बालके.* *3)निकष क्रमांक 03➖परिसर स्वच्छता* *4)निकष क्रमांक 04➖रचनावादी साहित्य प्रत्येक विषयासाठी किमान दहाघटकांच्या अध्यापनासाठी साहित्य असल्यास ➖(20प्रकारचे शिक्षकांनी स्वयंनिर्मिती साहित्य असल्यास)* *5)निकष क्रमांक 05➖कोणत्याही* *वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास किमान*पाच गणितीय संख्या अचूक* *लिहिता येणॆ* *इयत्ता १ली,२री साठी एक व दोन* *अंकी संख्या अचूक लिहीता -वाचता येणॆ* *इयत्ता ३री साठी तीन अंका पर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन* *इयत्ता ४थी साठी पाच संख्या वाचन लेखन* *इयत्ता ५तें ८साठी सात अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन लेखन करता येणॆ* *6)निकष क्रमांक 06➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान इयत्ता नुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून पाच बेरीजेची उदाहरणे सोडविता येणॆ*. *7)निकष क्रमांक 07➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान ईयत्तानुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून पाच वजाबाकीची उदाहरणे सोडविता येणॆ.* *8)निकष क्रमांक 08➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास किमान ईयत्तानुरुप शैक्षणिक साहित्याच्या सहाय्य्याने किमान एक गुणाकार अचूक करता येणॆ*. *9)निकष क्रमांक 09➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने अचुक भागाकार करता येणॆ* *10)निकष क्रमांक 10➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वजन ,मापे.आकारमान ,लांबी ,वेळ सांगता आली आणि त्यावर आधारित गणिताची शाब्दिक उदाहरणे सोडवता येणॆ* *11)निकष क्रमांक 11➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकुल आशयातील पाच वाक्ये वाचन करता येणॆ.* *12)निकष क्रमांक 12➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकूल आशयातील पाच वाक्ये श्रुतलेखन लिहिता येणॆ*. *13)निकष क्रमांक 13➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकूल आशयाच्या आकलनावर आधारित विचारलेल्या 5प्रश्नांची उत्तरे देता येणॆ* *14)निकष क्रमांक 14➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होत जाणारे आणखी एक एक असे पाठ्यपुस्तकाबाहेरिल पाच शब्द तयार करता येणॆ* *15)निकष क्रमांक 15➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता वैयक्तिक साभिनयासह करता येणॆ* *16)निकष क्रमांक 16➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास आशयाला अनुसरून चित्रवाचन करता येणॆ* *17)निकष क्रमांक 17➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यस कोणतेही तीन शब्द देऊनत्यावर पाच वाक्ये तयार करता येणॆ* *18)निकष क्रमांक 18➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर बोलण्यात ,उत्तरे देण्यात ,प्रतिसाद आणि वर्तनात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो* *19)निकष क्रमांक 19➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास कोणतेही तीन शब्द देऊन त्यावर गोष्ट तयार करता येणॆ* *20)निकष क्रमांक 20➖कोणत्याही वर्गात कोणत्याही विध्यार्थ्यास नाटिका 3ते 5मिनीट सादर करता येणॆ* *21)निकष क्रमांक 21➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास घड्याळातील काटे फिरवून अचूक वेळ दाखवता येणॆ.* *22)निकष क्रमांक 22➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास कोणतेही 3शब्द देऊन त्यावर कविता तयार करता येणॆ* *23)निकष क्रमांक 23➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास त्या वर्गातील आशयानुसार सामान्य ज्ञानावार आधारित इंग्रजीत विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे देता येणॆ.* *24)निकष क्रमांक 24➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही वि ध्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणॆ.* *25)निकष क्रमांक 25➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास उभे राहून वर्गानुकूल दिलेल्या विषयावर 4तें 5 वाक्यात विचार मांडता आले.* ➖➖➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले. १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार. 💥 जन्म :- १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर १९४८: डॉ. प्रकाश आमटे 💥 मृत्यू :- १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आज गुजरातमध्ये होणार भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा.* ----------------------------------------------------- 2⃣ *कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीचं पाकिस्तानकडून व्हिडीओ रेकॉर्डिंग, इंटरकॉमच्या सहाय्याने 40 मिनिटं साधला संवाद.* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : रेल्वे विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत 623 विनातिकीट प्रवास्यांवर कारवाई. एका दिवसात 2 लाखाचा दंड वसूल.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : मराठा समाजाचे राज्य शासनाला अल्टीमेटम, मागण्या मान्य न झाल्यास १९ फेब्रुवारीपासून उग्र आंदोलनाचा इशारा.* ----------------------------------------------------- 5⃣ *जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भव्य शोभायात्रा. तरुणांचे जोरदार शक्तिप्रदर्शन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक : नाशिककर गारठले, तापमानाचा किमान पारा ९.४ अंशावर पोहचला.* ----------------------------------------------------- 7⃣ *हैदराबादमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणा-या 4 जणांना अटक. एक लॅपटॉप, 6 मोबाईल फोन आणि 10 लाख रूपये रोख हस्तगत.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी - नांदेड जिल्हा परिषदेकडून आज प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आत्मकथा *मी एक शेतकरी बोलतोय.......* नमस्कार ....! मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा .......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाबा आमटे* मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे ( डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते. मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर माजासे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात. ~ वपु काळे | गुलमोहर *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दूरदर्शन न्यूजच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?* 👉 इरा जोशी *२) "योजना अवकाश" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कधी राबविण्यात गेल्या?* 👉 १९६६-६९ *३) मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्याने उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात?* 👉 ॲस्टीग्माटीसम *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 नरसिंग जिड्डेवार, सहशिक्षक, भोकर 👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद 👤 कपिल जोंधळे 👤 अशोक लंघे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *हवा* कोणत्याच माणसाने हवेत रहायला नको हवेत राहून दुस-याला पाण्यात पहायला नको हवेत रहाणाराचा फुगा कधी तरी फुटत असतो हवेतल वर्तन आठवून अपराधीपना वाटत असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना आशेचे पंख आहेत ते नक्कीच सुखी जीवनाचा मार्ग शोधून जीवन जगण्यासाठी तत्पर असतात. त्यांची महत्वकांक्षाही जबरदस्त असते.ते आपल्या जीवनातही निश्चितपणे यशस्वी होतात.परंतु ज्यांची कोणतीच इच्छा नसेल तर ते सुखाने जीवन जगण्याचे स्वप्न पाहत असतील तर ते कधीच सुखाने जगू शकत नाहीत.या जगात प्रयत्नाशिवाय कुणालाही काही प्राप्त झालेले नाही. प्रयत्नही आशारुपी ठेवून त्या मार्गाने सातत्याने मार्गक्रमण केल्यास नक्कीच जीवन सुखावह होईल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* विद्यार्थ्याना इंग्रजीतून दिलेल्या सूचना समजत नाही. कृती करताना चुकतात, त्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे हा उपक्रम राबवावासा वाटला. *🌀Leader says🌀* हा उपक्रम राबविताना सर्वप्रथम शिक्षकांनी इंग्रजीतील इ.१लीते४थी पर्यंतच्या सूचनांची यादी बनवली. त्यातील सर्व सूचनांच्या पट्ट्या बनवल्या. शिक्षकांनी प्रथम कृती करून दाखविली व सराव घेतला. जे विद्यार्थी निरीक्षणातून योग्यप्रकारे सूचना पालन करून कृती करतात. विसरत नाही. (stand up,sit down,go back,come forward) इ.सर्व सूचना लक्षात ठेवतात. त्यांना leader बनण्याची संधी दिली. त्यामुळे मुले आनंदाने खेळत सहभागी होतात,कृती करतात लक्षात ठेवतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *👉🏽कष्टाची कमाई श्रेष्ठ* एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संतांनी त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाले ,तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे का ? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संतांनी आपल्या झोळीतून एक सुरा काढला आणि त्यांना देत म्हणाले ,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा सुरा घ्या व याने माझ्या देहाचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले व म्हनाले महाराज तुंमचा देह हा आमच्याही काही कामाचा नाही व ईश्वराच्याही ; त्या मुळे हे पाप आम्ही कशासाठी करु, त्यावर संत महाराज हासले " व म्हनाले जसे हे तुंमच्या कामाचे नाही म्हनुन तुंम्ही ते करण्यास नाकार दिलात तसेच दुसर्यांचे लुबाडलेले धन ईश्वराच्या काय कामी येणार, संतांच्या बोलण्याचा आशय समजून ते दोघेही म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून आपल्या नव जिवनाच्या वाटेवर निघून गेले. *👉🏽तात्पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली. १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला. १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली. १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी. 💥 जन्म :- ६६६ - गुरूगोविंदसिंघ, शिख दहावे धर्मगुरू. १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ. १९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष. १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर - शिर्डी विमानतळाला श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा प्रस्ताव विधानाभेत एकमताने मंजूर, प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यस्थान सरकारने गुज्जर समाजाला व चार इतर मागासवर्गीयांना एक टक्टे आरक्षण देण्याच्या निर्णयाला दिली मंजूरी* ----------------------------------------------------- 3⃣ *शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील चित्रपटाच्या टिजर लॉन्चला उद्धव ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुरुवात* ----------------------------------------------------- 4⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा वेळीच निकाली काढण्याचा कोर्टानं राज्य सरकारला दिला आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरून 60 करणार. नागपूर हिवाळी अधिवेशनात राजकुमार बडोले यांचं आश्वासन.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सर्व आरोपी दोषमुक्त, ए. राजा आणि कनिमोळीसह सर्व दोषमुक्त* ----------------------------------------------------- 7⃣ *विदर्भाने रचला इतिहास, पहिल्यांदाच पोहोचला रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांच्या 'बोलावे ते आम्ही' काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, तर प्रसिद्ध अनुवादक सुजाता देशमुख यांच्या 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *अवयवदानाचे संकल्प* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरुगोविंद सिंह* गुरुगोविंद सिंह (डिसेंबर 22, इ.स. 1666 जन्म, 7 ऑक्टोबर, 1708 मरण) शीखाचे दहावा गुरू होते. 11 नोव्हेंबर 1675 रोजी , त्यांचे गुरु , गुरु तेग बहादूर यांच्या मृत्यूनंतर ते गुरू झाले. ते एक महान योद्धा, एक कवी, एक भक्त आणि आध्यात्मिक नेते होते.1699 मध्ये, बेसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली जी शिखांच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना मानली जाते. नांदेड येथे त्यांची समाधी असून गुरुद्वारा असे म्हटले जाते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)आंतरराष्ट्रीय वाररेषा ही कोणाच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात आली?* 👉 अमेरिकन प्राध्यापक डेव्हिडसन *२) आंतरराष्ट्रीय वाररेषा कधी निश्चित करण्यात आली?* 👉 १८८४ मध्ये *३) हवाई दलाने सुखोई-३० प्रकारच्या कोणती क्षेपणास्त्रे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे?* 👉 ब्रम्होस क्रूझ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सौ. राजश्री गैनवार-भुसेवार 👤 अनिल कोटीवले 👤 अनिल यादव 👤 दिलीप धुम्पलवर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अंतरीक झगडा* आतलं जग अन् बाहेरचं जग डोक्यात खुप झगडा आहे अंतरीक झगडा सोडवायला माणूस खुप तगडा आहे अंतरीक झगडा सुटेल बाहेरचा सोडता येत नाही कोण कुठे कसा वागेल कोणाला जोडता येत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.* *राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणे हे ध्येय उराशी ठेऊन आपले सारे आयुष्य समर्पित करणारे,विद्यार्थ्यांच्या अंगी स्वाभिमान, स्वावलंबन, आई-वडील आणि मोठ्यां विषयी आदराची भावना, दीनदुखितांची सेवा, समाजाप्रती आदर , राष्ट्राविषयी अभिमान व प्रेम तसेच आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ? १) शाळेत नवीन धडा शिकवण्यापूर्वी मुलांना वाचायला सांगा. २) धडा शिकवून झाल्यावर शिक्षकांना प्रश्न विचारून शंकेचे निरसन करणं गरजेचं आहे. याबद्दल मुलांशी बोला. ३) घरी पुन्हा धडा वाचायला सांगा. ४) त्यानंतर महत्त्वाच्या मुद्यांच्या नोटस् तयार करायला सांगा. ५) परीक्षेच्या वेळी स्वतच्या नोटस् वाचण्याकडे मुलांचा कल हवा. ६) प्रश्न-उत्तराचा सराव करताना लिहून काढायला सांगा. ७) लिहिलेले दीर्घकाळ स्मरणात राहते. अभ्यास करताना पिक्चर ज्या आवडीनं पाहतो, त्या आवडीनं झोकून देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. हे स्वानुभवाचे बोल आहेत. माझ्या मुलांनीअभ्यासक्रमासाठी ही पद्धत अनुसरली होती. त्यामुळे नोकरीला लागल्यावर शालेय पाठय़पुस्तकातील अभ्यास त्याच्या मनात ताजा आहे. अभ्यास करताना पालकांनी टीव्ही बंद करून पाल्याजवळ बसलं म्हणजे त्यांची एकाग्रता साधली जाते. बराच वेळ आई-वडील आपला अभ्यास घेतात. ही भावनिक सुरक्षितता पाल्यासाठी यशदायी ठरते *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वडिलांना मदत* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. 💥 जन्म :- १९५९: फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत १९०३: प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे १९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती 💥 मृत्यू :- १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी १९९७: भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम १९९७: सनईवादक पं. प्रभाशंकर गायकवाड *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन यापुढे डिसेंबर ऐवजी जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर गांभिर्याने विचार केला जात आहे. संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी नागपूर येथे दिली माहिती* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - ओबीसी आयोगाचा कार्यकाळ 12 महिन्यांनी वाढविण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर - २०११ पर्यंतच्या झोपड्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर दिले जाईल - मुख्यमंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *देशातील पहिल्या रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठाच्या स्थापनेस कॅबिनेटची मंजुरी, गुजरातमधील बडोदा येथे स्थापन होणार विद्यापीठ* ----------------------------------------------------- 5⃣ *कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला पाकिस्तानने आज जारी केला व्हिसा* ----------------------------------------------------- 6⃣ *यवतमाळ : शासकीय कृषी महाविद्यालयाची यवतमाळची मागणी पूर्ण होणार. शासनाला महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात येतील. - राज्यपाल* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत-श्रीलंका पहिला टी-20 सामन्यात भारताचा लंकेवर 93 धावांनी विजय, यजुवेंद्र चहलने या सामन्यात चार विकेट घेत अफगाणिस्तानच्या रशिदचा विक्रम मोडला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *हरवलेले डोळे* शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं. गावापासून जवळपास पन्नास कि.मी. वर जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्वेस्थानक असल्यामुळे रोज रेल्वेचा प्रवास ठरलेलाच. रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्याचा नित्यक्रम. त्यामुळे रेल्वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्या डब्यापुरते. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे खुप अभ्यास ........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4578780729835520 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *के श्रीकांत* कृष्णम्माचारी श्रीकांत हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आहेत. ते 21 डिसेंबर 1959 रोजी मद्रास , चेन्नई येथे जन्मले होते . त्याचा मुलगा अनिरुद्ध श्रीकांत एक क्रिकेटपटू आहे जो चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद साठी खेळतो. श्रीकांतही भारताचे कर्णधार होते. ते चिका या नावाने ओळखले जात असे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) ७८व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीट्ग ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले?* 👉 सायली वाघमारे *२) आयपीएल लीगमधील 'किंग्ज इलेव्हन पंजाब'च्या प्रशिक्षणपदी कोणाची नियुक्ती झाली?* 👉 ब्रॅड हॉज *३) राष्ट्रमाता जिजाऊचे जन्मस्थान कोणते?* 👉 सिंदखेडराजा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 मन्मथ खंकरे 👤 श्रीमती माणिक नागावे 👤 गजानन गायकवाड 👤 संभाजी तोटेवाड 👤 जयश्री सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *ऊर्मी* संकटावर मात करण्याची ज्याची त्याच्यात गुर्मी असते प्रत्येक जीवात जगण्याची एक सुप्त ऊर्मी असते जगण्याची ती ऊर्मी फक्त टिकवता आली पाहिजे तापलेली कांबी हवी तशी वाकवता आली पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते.* *'तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमची वाणी स्पष्ट,चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चढता उतरता क्रमाची लगोरी* कृती - लगोरीमध्ये दहा ठोकळे असावेत.सर्वात लहान ठोकळ्यावर बाजुने गोलाकार वेगवेगळ्या रंगात १०,२०,३०,४०,५०....अशाप्रकारे १०० पर्यत अंक लिहावेत.त्यानंतरच्या ठोकळ्यावर त्याच रंगाच्या क्रमाने ९,१९,२९३९,.....९९ व अशा प्रकारे सर्वात मोठया ठोकळ्यावर १,११,२१,३१,.....९१ असे अंक येतील. नियम - १) लगोरी लावतांना सर्वात मोठा ठोकळा हा सर्वात खाली रचला जातो.त्यानंतर लहान लहान ठोकळे रचले जातात. २) त्यामुळे सहाजीकच अंकाचा क्रम वर चढता येतो. ३) ठोकळे रचतांना १,२,३...अश्या चढत्या क्रमानेच रचणे आवश्यक असतील. ४) एकदा लगोरी लागल्यानंतर पुढे त्याच ठोकळ्यावरिल १,११,२१,हे क्रमांक एकावर एक येतील असे रचावे लागतील. ५) अशाप्रकारे जश्या जश्या लगो-या लागतील. लगोरीच्या वरिल क्रमांक पुढे पुढे वाढत जातील. ६) लगोरी पूर्ण न लागताच बाद झाल्यास त्याच क्रमांकानुसार परत लगोरी लावावी लागणार *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वभाव* एक शेतकरी नेहमी शेजार्याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे. त्यामुळे तो कोणालाही आवडेनासा झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला मुंगीचे स्वरूप दिले. त्यामुळे त्याचे रूप बदलले, परंतु दुसर्याचे धान्य चोरून नेऊन साठा करण्याची त्याची सवय मात्र बदलली नाही. तात्पर्य - कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*एकच ध्यास,वाचन विकास।।* ••••••••••••••••••••••••••• *वाचणार रे वाचणार १००% वाचणार* 📚📚👍👍📚📚 *📚 १००% विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास कार्यक्रम-२०१७-१८* 〰〰अंतर्गत〰〰 👇 *🔰तालुका स्तरीय शिक्षक प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा* *🌅(दिनांकः-१९ ते २१ डिसेंबर-२०१७)* 🖼स्थळः- आर्य समाज मंदिर हदगाव ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''""""" 💐💐💐प्रेरणा💐💐💐 👇 *मा.नंदकुमार साहेब(प्रधान सचिव)* 〰〰〰〰〰〰 ---------------------------------- *तालुका प्रशिक्षण सुलभक* 👇 1⃣श्री एस.डी.शिंदे सर 2⃣श्री संदेश चोंढेकर सर 3⃣ श्री श्रीपाद देवमाने सर 4⃣श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे मँडम ____________________ व सर्व (सहाय्यक सुलभक) *प्रशिक्षणास उपस्थित* शि.वि.अ.श्री जाधव साहेब,पावणे साहेब,बाच्छे साहेब,पाटील साहेब , श्रीमती आडगावकर मँडम,केंद्रप्रमुख श्री गोडघासे सर,शेख सर. *🔖प्रशिक्षणाचे उदिष्टे*🔖 👇 1⃣वाचन शिकण्याचे टप्पे व त्यासाठीची शिक्षकांची सुलभकाची भुमिका याबाबतचा शिक्षकांच्या संकल्पना स्पष्ट करणे. 2⃣प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मुलभुत वाचन क्षमतेचा विकास करण्यासाठी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करण्यासाठी शिक्षकाची क्षमता विकसीत करणे. ________________________ Rte-act-०९ च्या प्रभावी अंमलबजावणी करीता 🅿💲Ⓜ राज्यात कार्यान्वित आहे.प्रत्येक मुल शिकले पाहिजे. हेच कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. ________________________ *✴प्रशिक्षणाची गरज✴* शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या *वाचनाच्या व लेखनाच्या क्षमता विकसित* झालेल्या असणे ही प्रत्येक मुल *शिकण्यासाठीची प्राथमिक अट* आहे. काही वर्ष शाळेत राहुन मुलाला काही येत नसेल तर मुले शाळा सोडुन देतात.त्यांना शिकण्यात गोडी वाटत नाही.ही मुले अभ्यासात मागे राहतात.हीच परिस्थिती कायम राहिली तर मुले शाळा सोडुन देतात.हे जगभरातील झालेल्या संशोधनातुन सिद्ध झाले. *मुलांना १००% शिकते करायचे असेल तर सर्वात प्रथम त्यांचे पायाभुत वाचन कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे.* 〰〰〰〰〰〰〰〰 *🔰प्रशिक्षणाचा दुसरा दिवस.दिनांक:-२०.१२.२०१७.* 👇 *🔲क्षेत्र--(श्रवण)🔲* *📚उदिष्ट्ये* 👇 1⃣लक्षपुर्व ऐकता येणे. 2⃣ध्वनीतील सुक्ष्म भेद ओळखता येणे. 3⃣ध्वनीतील साम्य ओळखता येणे. 4⃣जाणीवपूर्वक ऐकण्याची सवय लावणे. """"""""""""""""""""""""""""""""" *🔖वाचन व मुलभुत वाचन* 👇 *📚वाचन म्हणजे लिहलेला किंवा छापलेला मजकुर .* 📚पायाभुत वाचन म्हणजे लिहलेले शब्द ओळखणे आणि महत्वाची विरामचिन्हे लक्षात घेऊन उच्चारणे.लिहलेला मजकुर काही एक अर्थ व्यक्त करण्यासाठी असतो हे समजणे अपेक्षित आहे. 🌼🌼🌼🌼🌼🌼 वैशिष्टेपुर्ण बाबी. 👇 📚आनंददायी मोकळीका. 📚कृती १)डबीतील विविध वस्तुंचे ध्वनी ऐकविणे व ओळखणे. २)प्राणी,पक्षी,वाहणे इत्यादी आवाज ऐकविणे व ओळखणे. ३)गोष्टी ऐकविणे व ओळखणे. 📚खेळ:-१)कानमंत्र२)राजा म्हणतो.....३)चिमणी भुर्रर---- ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ *सत्र👉2⃣क्षेत्र-भाषण संभाषण* 👇 🛤ओळख:-स्वतःची👉सादरीकरण. 🛤माहिती:-कुटुंब, मित्र,परिसर. 🛤चित्रवर्णन,चित्रगप्पा,चित्रवाचन. 👇 1⃣चित्राचे नाव सांगणे. 2⃣चित्रातील कृती सांगणे. 3⃣चित्रवर्णन. 4⃣चित्रगप्पा. 🛤गप्पा:-१)अनौपचारीक गप्पा(विषय ठरलेला नसतो)२)औपचारीक गप्पा(विषय ठरलेला असतो). ________________________ 🚇घटनाक्रम सांगणे. 🚇गोष्टी:-बोलीभाषेतील चित्रमय गोष्टी. 🚇कृतियुक्त गाणी. ●●●●●●●●●●●●●●●●●● 🏃♂खेळ(शब्दभेंड्या,अक्षरभेद,ध्वनीभेद) ________________________ *१००% मुलांना वाचता आलं पाहिजे,माझा हक्क काय?माझी उपयोगीता कोणती?इत्यादी बाबींवर सुलभकांकडुन चर्चा करण्यात आली.* ➖➖➖➖➖➖➖➖ ✍ *लेखन संकलन / सुलभक* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (हदगाव) 🙏🙏🙏🙏🙏🙏
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वातंत्र्य दिन - झांझिबार गोवा मुक्ती दिन 💥 ठळक घडामोडी :- १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन. २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण. 💥 जन्म :- १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू. १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी. १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९५३ - रॉबर्ट अड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता. १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधासभा निवडणुकीत भाजपाचे निर्विवाद यश* ----------------------------------------------------- 2⃣ *भाजपावर दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल धन्यवाद, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या विकासासाठी पुरेपूर प्रयत्न करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 3⃣ *जुनी पेन्शन देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुंडण करून विधानभवनावर मुंडण मोर्चा काढला.* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर : महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या 123 शाळा व कर्मशाळेतील विद्यार्थ्यांना परिपोषण व कर्मचा-यांना त्वरित पदमान्यता देऊन वेतन सुरू करण्यात यावे, कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णींची मागणी.* ----------------------------------------------------- 5⃣ *गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विजयासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन* ----------------------------------------------------- 6⃣ *सिंधुदुर्ग : महामार्ग विस्थापितांना योग्य मोबदला द्या, नागपुरात धरणे आंदोलन, शिवसेनेच्या आमदारांची आग्रही मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *सन २०२२ सालापर्यंत राज्यात १९ लाख ४ हजार घरे उभारण्यात येतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *हरवलेले डोळे* शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं. गावापासून जवळपास पन्नास कि.मी. वर जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्वेस्थानक असल्यामुळे रोज रेल्वेचा प्रवास ठरलेलाच. रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्याचा नित्यक्रम. त्यामुळे रेल्वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्या डब्यापुरते. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे खुप अभ्यास ........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4578780729835520 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *आर के लक्ष्मण* रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण ( थोडक्यात आर लक्ष्मण , 24 ऑक्टोबर 192l - 26 जानेवारी 2015 ) आघाडीच्या लेखक आणि भारत व्यंगचित्रकार होते. ते कॉमन मॅन त्याच्या निर्मिती आणि म्हणतात टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या दैनंदिन मालिका लिहिण्याची व्यंगचित्रे 1951 मध्ये सुरुवात केली. लक्ष्मण यांचा जन्म 1 9 21 साली म्हैसूर येथे झाला . त्यांचे वडील प्राचार्य होते आणि लक्ष्मण त्यांच्या छोट्या मुलांपैकी सर्वांत लहान होते. एक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध. लक्ष्मण पेड पापर ऑफ दिल्ली ( दिल्लीच्या चिठ्बुरा मुरलीवाला ) प्रसिद्ध आहे *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)२०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला?* 👉 कराटे *२) सध्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कोण आहेत? 👉 डी. के. शर्मा *३) घटना परिषदेची पहिली बैठक कोठे झाली?* 👉 दिल्ली *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर 👤 शंकर जाजेवार, येताळा 👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बाजींदे* जो माणूस शब्द देऊन मोठ्या ऐटीत मिरवतो तोच माणूस पुन्हा सहज आपला शब्द फिरवतो शब्द देऊन फिरवणारे मोठे बाजिंदे असतात चार माणसांत मात्र ते मिंधे होऊन बसतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणत्याही गोष्टीचे सखोल चिंतन चांगले काम करण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे जाणिवा तर समृद्ध होतातच; पण समजही वाढत जाते. कळण्याची पातळी उंचावते आणि जगण्यातही आनंद निर्माण होऊ लागतो. आनंद आला की सौंदर्य आले. अशी ही श्रृंखला आहे. त्यात धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावाने अडसर तयार करणे आनंद मिळविण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. त्यामुळे शरीरस्वास्थ्याचा, मन:स्वास्थ्याचा आणि परिणामी समाजस्वास्थ्याचा विचार करताना आकाशासारखा व्यापक गुणधर्म ठेवायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.* *त्यासाठी रोजच्या वेळेतील सकाळची अगदी दहा मिनिटे स्वत:ला द्यावीत. त्यात सुरूवातीची तीन मिनिटे काल काय केले आणि काय राहिले याची उजळणी, पुढची दोन मिनिटे त्यात झालेल्या चुका आणि उरलेली पाच मिनिटे आज काय करायचे याला द्यायला हवीत. त्यात काल ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न होऊ देण्याविषयी स्वत:ला बजावायला हवे. तरच निश्चयाने पाऊल पुढे टाकता येईल. अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या' किंवा 'जन्माला आला.....' या दोन प्रसिद्ध म्हणी आपल्यासाठीच आहेत असे समजायला हरकत नाही.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• 🌱⚜⚜⚜🌱⚜⚜⚜🌱 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना आशेचे पंख आहेत ते नक्कीच सुखी जीवनाचा मार्ग शोधून जीवन जगण्यासाठी तत्पर असतात. त्यांची महत्वकांक्षाही जबरदस्त असते.ते आपल्या जीवनातही निश्चितपणे यशस्वी होतात.परंतु ज्यांची कोणतीच इच्छा नसेल तर ते सुखाने जीवन जगण्याचे स्वप्न पाहत असतील तर ते कधीच सुखाने जगू शकत नाहीत.या जगात प्रयत्नाशिवाय कुणालाही काही प्राप्त झालेले नाही. प्रयत्नही आशारुपी ठेवून त्या मार्गाने सातत्याने मार्गक्रमण केल्यास नक्कीच जीवन सुखावह होईल यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे. मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विकल्प* 🐜मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..! 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 20/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले. १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान. १९९९: पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले. २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन १८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की १९०१: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद १९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती १९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी 💥 मृत्यू :- १९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट १९५६: डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने १९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट १९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरातमध्ये 25 तारखेला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा सरदार पटेल स्टेडिअमवर पार पडणार अधिकृत सूत्र.* ----------------------------------------------------- 2⃣ *उस्मानाबाद : सचिन तेंडुलकरने सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावातील विकासकामांची पाहणी केली.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - राज्यातील दुकानं आठवडाभर सुरु राहणार, कामगारांना साप्ताहिक सुट्टी अनिवार्य महाराष्ट्र दुकाने-अस्थापना अधिनियम लागू.* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपुरात, मंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *कल्याणमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या ६१ वर्षानिमत्त युवा संमेलन संपन्न* ----------------------------------------------------- 6⃣ *नाशिक- आता जेष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी नाशिकमधील सर्व बँकेमध्ये स्वतंत्र खिडकी, पंधरवाड्यासाठी मोहीम नाशिक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिका जिंकणारा भारतीय संघ आजपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० मालिकेत श्रीलंकेवर वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने उतरणार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *लहानपण देगा देवा* वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpan •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत गाडगेबाबा* गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबरइ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवाकरणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* ========ஜ۩۞۩ஜ========= *१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय बनावटीच्या कोणत्या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले?* 👉 कलवरी *२) राष्ट्रीय हरित लवादचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉 न्या. स्वतंत्र कुमार *३) भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?* 👉 नरींदर बात्रा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली 👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर 👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद 👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गजानन मुडेले, देगलूर 👤 सोपान हेळंबे, उमरी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्थितप्रज्ञ* प्रत्येकाचा ठरलेला सुखाचा काळ असतो बरं वाईट घडायलाही विशिष्ट वेळ असतो ब-या वाईट प्रसंगाला संयमाने घ्यावं लागतं स्थितप्रज्ञा सारखं माणसाला रहावं लागलं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे.* *'मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत उकार न शिकवता उ आणि ऊ उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करण्याचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावधगिरी* पूर्वी एकदा लांडगे व बोकड यांची फार दिवस लढाई चालली होती. वास्तविक पाहता लांडग्यांनी पहिल्याच दिवशी पराभव करून त्यांचा फन्ना उडविला असता, परंतु बोकडांच्या बाजूस जे कुत्रे होते त्यांच्यापुढे त्यांचे काही चालेना. शेवटी तहाची वाटाघाट होऊन उभयपक्षी असे ठरले की, लांडग्यांनी आपली पोरे बोकडांच्या स्वाधीन करावी व बोकडांनी आपले कुत्रे लांडग्यांच्य ताब्यात द्यावे. मग या अटी अमलात येताच बोकडांकडे गेलेल्या लांडग्यांच्या पोरांनी आपल्या आयांसाठी आरडाओरडा केला. तो ऐकताच लांडगे धावून आले आणि बोकडांस म्हणाले, 'दुष्टांनो, आमच्या पोरांना मारून तुम्ही तह मोडला, तेव्हा लढाईला तयार व्हा.' इतके बोलून ते बोकडांवर तुटून पडले व बोकडांजवळ कुत्रे नसल्यामुळे ते सगळे सहज मारले गेले. तात्पर्य :- शत्रूशी सख्य करताना ज्या वस्तूवर आपली सुरक्षितता अवलंबून असेल अशा वस्तू त्यांना कधीही देऊ नयेत. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/12/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रजासत्ताक दिन - नायजर.* 💥 ठळक घडामोडी :- २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार. २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या. 💥 जन्म :- १८५६ - सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार. १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू. १८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर १९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर २०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी २००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात कुणाचं? मतमोजणी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज.* ----------------------------------------------------- 2⃣ *औरंगाबादः जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण मंगळवारी* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नुकतीच इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली, देशातील पहिली इंपोर्टेड इलेक्ट्रिक कारची नोंदणी* ----------------------------------------------------- 4⃣ *रेल्वेतील प्रत्येक कर्मचा-याची वर्षातून एकदा मेडिकल तपासणी होणार, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.* ----------------------------------------------------- 5⃣ *अमरावती : राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळलेल्या पल्लवी पवारने १५२ किलो वजन उचलून सूवर्णपदक पटकावले.* ----------------------------------------------------- 6⃣ *विशाखापट्टणम वनडे - शिखर धवनचा शतकी तडाखा, लंकेचा आठ विकेटनं पराभव, मालिकाही खिशात* ----------------------------------------------------- 7⃣ *जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) - कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमार, साक्षी मलिकला सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *मुलांपेक्षा मुलगी बरी.....!* आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4739750601162752 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= विजय हजारे विजय शमूले हजारे ( 11 मार्च, 1 9 15 - डिसेंबर 18, इ.स. 2004 ) हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील भारतीय क्रिकेटपटू होता . 1951 ते 1953 पर्यंत ते भारतीय संघाचे कर्णधार होते. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताला प्रथम यश मिळवून दिले. 1960 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. 18 डिसेंबर 2004 रोजी त्यांचे निधन झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) राष्ट्रीय संरक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?* 👉 ०३मार्च *२) सध्या सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक स्पर्धेत कोणत्या महिलेने सुवर्णपदक मिलवले आहे?* 👉 कांचनमाला पांडे *३) १९वे राष्ट्रीय बंधुत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?* 👉 प्रकाश रोकडे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 रवी यमेवार, धर्माबाद 👤 विजयकुमार भंडारे, सहशिक्षक 👤 उदयराज कोकरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतः बदला* प्रत्येकालाच जग बदलाव वाटत असतं पण त्यासाठी स्वतःला बदलाव हे पटत नसतं जग बदलेल आधी स्वतः बदलावे लागेल आपण चांगले वागलो की जग चांगले वागेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावली ही अंधाराची आई आहे. वृक्ष उन्हाचा दाह पचवून प्राणिमात्रांना सावलीचा सुखद गारवा देतात, शीतलता देतात. मग तीचा एकुलता पुत्र 'अंधार' याचं काय? अंधार हा पापप्रेरक नाही. त्याचा पाप आणि पुण्याशी अंशमात्र संबंध नाही. पृथ्वीवरची अंधारी रात्र आणि माणसाच्या मनातील अंधार यात काय साम्यभेद असावेत? जन्मांधाला अंतर्चक्षूनं जीवनाचा संपूर्णानुभव घेता येतो. संत सूरदास यांचं उदाहरण पुरेसं आहे. पण डोळस लोक प्रसंगी गांधारीची भूमिका का बजावत असतात? धृतराष्ट्र द्रौपदीचं वस्त्रहरण अंध असूनही कसा अनुभवत होता? तर तो मनातल्या मनात वासनेची वासंती घडवून तीला अंतर्चक्षूनं उपभोगत होता. अंतर्मनातला अंधार गडद होत गेला की डोळसाच्याही नेत्रचंद्रावर झापड पदर ताणते. तेव्हा तो गृहस्थ शून्यभावस्थितीच्या अधीन होतो. हा डोळस असून त्या स्थितीत आंधळा तर धृतराष्ट्र अंध असून डोळस.* *प्रकाश हा सुंदर तर अंधार हा विरूप समजला जातो. प्रकाश हा अंधाराचा नाश करतो असंही तत्व विश्वमान्य आहे. परंतु खरंच अंधाराचा नाश होतो काय? तर नाही. ते कसे ते फक्त पहाटेलाच ठाऊक असतं. हा दृष्टांत अनुभवायचा असेल तर पहाट होऊन बघावं. अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. म्हणजेच अंधार हा दु:ख-क्लेशदायक आहे हा त्याचा अर्थ. अंधार कृष्णवर्णी असतो आणि आपण गौरवर्णाला सुंदरतेचं प्रतीक मानत असतो. प्रत्यक्षात चंद्रिका ही कृष्णवर्णीच आहै. ती अंधारकन्या आहे, सूर्यकन्या नाही. अंधार आणि दु:ख दोन्ही शाश्वत तर सुख हे उन्हाचं कवडसं आहे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे घड्याळातील काटे वेळ दाखवत दाखवत काळाला पुढे पुढे घेऊन जातात आणि गेलेला काळ भूतकाळ दाखवतात त्याचप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवासही घड्याळाच्या काट्यावर रहाणे पुढे पुढे सरकत जातो आणि एका वळणावर येऊन थांबतो.जेव्हा थांबतो तेव्हा खरंच कळायला लागतं की,आपण आपल्या आयुष्यात काय केलं ? असा प्रश्नही पडणे अपेक्षितही आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपण कधीही विचार केला नाही.पण तुम्ही नाराज होण्याचे कारण नाही.तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं आहे.सुखदु:खाचे व्यवहार,माणुसकी, मानसन्मान, नातेसंबंध, भेटीगाठी, दानधर्म,प्रेम, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही पुढील पिढीसाठी ठेवून देत आहात.ते तर तुम्ही तेव्हाच तुमच्या जीवनात होऊनही गेल्या.याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नाही. तुम्ही उद्या असाल किंवा नसाल परंतु तुमचा आदर्श नक्कीच येणारी पिढी अनुसरेल अगदी घड्याळातील काट्याप्रमाणे आहे ते जीवन दु:खी होऊन जगण्यापेक्षा सा-यांसोबत आनंदाने व्यतीत करा.यातच तुम्ही खूप काही केल्याचा आनंद शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= टिफिन पूरी तरह पोंछ कर खाने वाले एक बालक के दोस्त उसका मज़ाक उडाते थे... एक ने पूछा,'' तुम रोजाना टिफिन में एक कण भी क्यों नही छोड़ते ? बालक ने बड़ा ही सुन्दर जवाब दिया ... ''यह मेरे पिता के प्रति आदर है जो इसे मेहनत से कमाए रूपयों से खरीद कर लाते हैं और माँ के प्रति आदर है जो सुबह जल्दी उठकर बडे चाव से इसे बनाती हैं । यह आदर उन किसानो के प्रति है जो खेतो में कड़ी मेहनत से इसे पैदा करते हैं।" थाली में झूठा छोड़ना अपनी शान ना समझें *खाओ मन भर , छोडो ना कण भर* , *उतना ही ले थाली में , बाकी ना जाए नाली में* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 💥 जन्म :- १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम १९७८: अभिनेते रितेश देशमुख 💥 मृत्यू :- १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर २०००: अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर - राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली, आजपासून राहुलपर्व ला सुरुवात* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - 2009 कोळसा घोटाळा प्रकरण, विशेष सीबीआय न्यायालायने मधू को़डा यांना दिली तीन वर्षांची शिक्षा.* ----------------------------------------------------- 3⃣ *संत्र्याला प्रक्रियेच्या माध्यमातून शाश्वत मार्केट मिळेल, नोगाचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, शासन 49 टक्के भागीदारी करेल - देवेंद्र फडणवीस.* ----------------------------------------------------- 4⃣ *मिझोराम हे अतिरिक्त ऊर्जा असलेले ईशान्य भारतातील तिसरे राज्य ठरले आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.* ----------------------------------------------------- 5⃣ *उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन आणि 35 हजार रुपये दिला जाणार आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन ; सिंधूची फायनलमध्ये धडक, चीनच्या चेन युफायचा केला पराभव* ----------------------------------------------------- 7⃣ *पायाला दुखापत झाल्यामुळे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेणार नाही.* ------------------------------------------------------ *विशेष बातमी : काव्यांगण प्रतिष्ठान कडून यवतमाळ मध्ये आज राज्य स्तरीय काव्य महोत्सव, महिलांनी आयोजित केलेले पहिलेच काव्य संमेलन, महाराष्ट्रातील 250 हुन अधिक कवीचा यात समावेश असल्याची माहिती अध्यक्ष प्रीती माडेकर यांनी दिली.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा 2000 च्या वर वाचक मित्रांनी वाचलेली लघुकथा *🏍 ... लिफ्ट ....🛵* सहसा गाडीवार एकटे जाणे कधीच आवडत नाही. त्यामुळे कोणी लिफ्ट मागितली की नक्की त्यांना घेतो. मग गप्पा मारता मारता नियोजित ठिकाणी सहज पोहचता येते. तरी लिफ्ट देताना खुप विचार करावा लागतो, जसे की वयोवृद्ध किंवा ज्याला गाडी वर बसता येत नाही अश्याना लिफ्ट देणे शक्यतो टाळावे कारण करायला जावे चांगले काम आणि व्हावे भलतेच. म्हणून ती काळजी घ्यावी. महिला आणि तेही लेकुरवाळी यांना लिफ्ट........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/6152406281224192 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *✍🏽 नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ======== *यशवंत गोपाळ जोशी* य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) (१७ डिसेंबर, इ.स. १९०१:भिगवण, भारत - ७ नोव्हेंबर, इ.स. १९६३:पुणे). हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या.. प्रसाद प्रकाशाचे कै. मनोहर उपाख्य बापूसाहेब जोशी हे य. गो. जोशी ह्यांचे चिरंजीव. कै. श्रीमती श्यामला (शांता) बेडेकर , श्रीमती.सुमन (स्वाती)पेंडसे,श्रीमती उर्मिला भावे, सौ.अंजली पेंडसे , कै. श्रीमती मंगल नगरकर आणि सौ. अनुराधा (पुष्पा) देसाई ह्या त्यांच्या कन्या . य.गो. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकर्या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला. हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले. जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेले लोढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती. ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्निक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे. य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणार्या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मन:स्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?* 👉 विसर्ग संधी *२) लोकसभा सभापतीची निवड कोण करते?* 👉 लोकसभा सदस्य *३) सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?* 👉 कार्ल लिनिअस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुधीर येलमे, संपादक सा. इंद्रधनुष्य टाइम्स 👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद 👤 केशव कदम 👤 नारायण मुळे, धर्माबाद 👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी 👤 दिगंबर बेतीवर, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *उदयास्त* एकाचा उदय तर एकाचा अस्त असतो उदय अन् अस्तचा संबंध रास्त असतो उदय होतो त्याचा कधी तरी अस्त होतो निसर्गाचा फेरा कधीही एकदम रास्त होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *सावली ही अंधाराची आई आहे. वृक्ष उन्हाचा दाह पचवून प्राणिमात्रांना सावलीचा सुखद गारवा देतात, शीतलता देतात. मग तीचा एकुलता पुत्र 'अंधार' याचं काय? अंधार हा पापप्रेरक नाही. त्याचा पाप आणि पुण्याशी अंशमात्र संबंध नाही. पृथ्वीवरची अंधारी रात्र आणि माणसाच्या मनातील अंधार यात काय साम्यभेद असावेत? जन्मांधाला अंतर्चक्षूनं जीवनाचा संपूर्णानुभव घेता येतो. संत सूरदास यांचं उदाहरण पुरेसं आहे. पण डोळस लोक प्रसंगी गांधारीची भूमिका का बजावत असतात? धृतराष्ट्र द्रौपदीचं वस्त्रहरण अंध असूनही कसा अनुभवत होता? तर तो मनातल्या मनात वासनेची वासंती घडवून तीला अंतर्चक्षूनं उपभोगत होता. अंतर्मनातला अंधार गडद होत गेला की डोळसाच्याही नेत्रचंद्रावर झापड पदर ताणते. तेव्हा तो गृहस्थ शून्यभावस्थितीच्या अधीन होतो. हा डोळस असून त्या स्थितीत आंधळा तर धृतराष्ट्र अंध असून डोळस.* *प्रकाश हा सुंदर तर अंधार हा विरूप समजला जातो. प्रकाश हा अंधाराचा नाश करतो असंही तत्व विश्वमान्य आहे. परंतु खरंच अंधाराचा नाश होतो काय? तर नाही. ते कसे ते फक्त पहाटेलाच ठाऊक असतं. हा दृष्टांत अनुभवायचा असेल तर पहाट होऊन बघावं. अंधाराला दु:खाशीही जोडलं जातं. म्हणजेच अंधार हा दु:ख-क्लेशदायक आहे हा त्याचा अर्थ. अंधार कृष्णवर्णी असतो आणि आपण गौरवर्णाला सुंदरतेचं प्रतीक मानत असतो. प्रत्यक्षात चंद्रिका ही कृष्णवर्णीच आहै. ती अंधारकन्या आहे, सूर्यकन्या नाही. अंधार आणि दु:ख दोन्ही शाश्वत तर सुख हे उन्हाचं कवडसं आहे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चिंचोक्याचा एकक आणि दशक* मुले चिंचोके खेळतात. याचाच उपयोग करून चिंचोके फोडून त्याचे दोन भाग केले. ➡आपणास दोन बाजु मिळतील एक काळी व दूसरी पांढरी. ➡आता चिंचोके टाकावे . ➡ *काळी बाजु*असणारे चिंचोके *एकक*व *पांढरी बाजु* असणारे चिंचोके *दशक* समजावे.अशा प्रकारे एक संख्या मिळेल.ती लिहुन घ्यावी. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *पश्चाताप* एक व्यापारी होता. त्याने आपल्या कामासाठी एक घोडा आणि एक गाढव पाळले होते. तो घोड्याचा उपयोग स्वतः च्या सवारीसाठी तर गाढवाचा वापर माल वाहतूक करण्यासाठी करायचा. गाढवाच्या पाठीवर माल लादून गावोगावी जायाचा आणि माल विकायचा. व्यापार्याने घोड्याला जादा पैसे देऊन विकत घेतले असल्यामुळे तो त्याची अधिक खातिरदारी करायचा. काळजी घ्यायचा. घोड्याच्या पाठीवर ओझेसुद्धा लादायचा नाही. एक दिवस व्यापारी घोड्यावर बसून आणि गाढवावर ओझे लादून कोठे तरी निघाला होता. गाढवावर क्षमतेपेक्षा अधिकच ओझे लादले गेले होते. त्यात गाढव खूपच कृश होते. रस्ताही खाच-खळग्यांचा होता. त्यामुळे त्याला चालताना भलताच त्रास होत होता. तो एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत होता. त्याला त्याचे स्वतः चे मन एवढे मोठे ओझे वाहून नेण्याविषयी हमी देत नव्हते. त्याचा आत्मविश्वास आणि पाय गाळटले होते. तो घोड्याला म्हणाला," घोडे दादा, माझ्याच्याने चालवत नाही रे! आता मी इथेच दम तोडतोय की काय असं वाटायला लागलं आहे, माझा थोडा भार हलका करशील का? तुझे फार उपकार होती." परंतु, मालकाच्या लाडा-प्रेमाने लाडावलेला, वाढलेला घोडा मात्र मोठा गर्विष्ठ बनला होता. तो अहंकार भरल्या स्वरात म्हणाला," हे काय बरळतोयस तू? माझी पाठ ओझे वाहून नेण्यासाठी वाटली की काय तुला? मी का तुझे ओझे वागवू? खबरदार, पून्हा असा म्हणालास तर...?" बिचारे गाढव काहीच बोलले नाही. ते रडत-खड्त आपले पाय ओढत राहिले आणि शेवटी धापकन पडले. त्याचा एक पाय मोडला. ते पाहून व्यापार्याला मोठे वाईट वाटले. त्याची दया आली. लागलीच त्याने गाढवावरचे सगळे ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. आणि गाढवालासुद्धा वर चढवले. आता घोड्याचा सारा अहंकार गळून पडला. आता त्याला पश्चाताप वाटू लागला. मघाशी गाढवाची गोष्ट ऐकली असती आणि त्याचा भार थोडा हलका केला असता तर आता ही कंबरडे मोडणारी आपत्ती ओढवली नसती. त्याला मदत केली असती तर माझेही भले झाले असते आणि त्याचेही! पण आता नाईलाज होता. .... घोडा मान खाली घालून निमूटपणे चालू लागला. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/12/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= बहरैन - राष्ट्रीय दिन. बांगलादेश - विजय दिन. कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन. 💥 ठळक घडामोडी :- १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली. १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली. १९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. 💥 जन्म :- १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा. १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत. १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष. २००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आधार कार्ड लिंक करण्यासाठीची तारीख 31 मार्च करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला मान्य* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत. आता मी निवृत्त होणार. संसद परिसरात केलं वक्तव्य* ----------------------------------------------------- 3⃣ *दिल्ली - ट्रिपल तलाकवरील विधेयकाला मंजुरी. विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पुढील आठवड्यात विधेयक संसदेत मांडणार.* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर- बोंडअळी ग्रस्त पिकाचे पंचनामे 15 दिवसात पूर्ण होतील . बियाणे खरेदी केलेली पावती अर्जाला जोडली तरी अर्ज स्विकारण्यात येतील- सदाभाऊ खोत.* ----------------------------------------------------- 5⃣ *१० हजार कि.मी.च्या नव्या रस्त्यांवर टोल नाही; ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.* ----------------------------------------------------- 6⃣ *पुढील दोन दिवस गारठा कायम राहणार, असल्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारताविरुद्ध २० डिसेंबरपासून प्रारंभ होणा-या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज लसित मलिंगाला श्रीलंका संघात स्थान मिळालेले नाही.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *लक्ष्मीकांत बेर्डे* लक्ष्मीकांत बेर्डे ( नोव्हेंबर ३, इ.स. १९५४ - डिसेंबर १६, इ.स. २००४; मुंबई, महाराष्ट्र) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका (इ.स. १९८५), अशी ही बनवाबनवी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आहे?* 👉 ऋग्वेद *२) राष्ट्रपतीला महाअभियोगाद्वारे पदावरून दूर करणाचा अधिकार कोणाला आहे?* 👉 संसद *३) मंत्रीपरिषदेविरुध्दचा अविश्वासाचा ठराव कोठे मांडला जातो?* 👉 लोकसभेत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी 👤 योगेश गुजराथी, धर्माबाद 👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर 👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम 👤 नरेश पांचाळ, धर्माबाद 👤 श्याम पेरेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *बळी* कापूस पिकावर बोंड अळी आहे प्रत्येक संकटात शेतकरी बळी आहे अस्मानी सुलतानीला शेतकरीच बळी जातो विशिष्ट वर्ग मात्र नेहमी आनंदात रहातो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *बहिणाबाईंनी सांगितलयं ,'जगण्या मरण्यात काय तर एका श्वासाचं अंतर ! एकच श्वास, फक्त एकच. पण तो एकच श्वास केवढं मोठ अंतर निर्माण करतो. असण्या-नसण्यातलं अंतर, जन्मा-मरणातलं अंतर, होत्या-नव्हत्यातलं अंतर, जागण्या-झोपण्यातलं अंतर, क्षणांत आहे आणि क्षणांत नाही, ही असामान्य गोष्ट श्वासाच्या अंतराने प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते.* *माणूस जातो, स्मृती उरतात. त्या चांगल्या उराव्यात असं सा-यांनाच वाटतं पण त्यासाठी काही चांगलं करावं लागतं, हे विसरून कसं चालेल ? मृत्यू अनेक गोष्टी शिकवितो, अर्थातच जिवंत असणारांना ! पण मृत्यूची शिकवण तरी किती वेळ स्मरणात राहते ? मृत्यू नावाचे जळजळीत सत्य उत्तम वागण्याचे, जगण्याचे आत्मभान निर्माण करून देते. माणूस गेल्यावर होणारी कालवाकालव, त्याच्या स्मृतींची असंख्य फुलंच म्हणावी लागतील. या फुलांसाठी तरी श्वासात अंतर पडण्यापूर्वी ' जे जे उत्तम ' आहे तेच करावयास हवे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्या जीवनात येणा-या यशाचे खरे रहस्य जर कोणते असेल तर तुम्ही करत असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात ठेवलेले सातत्य हेच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *स्वरचिन्ह परिचय* पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे. स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे. कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे. मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे. अक्षर परिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *समय के पंख* एक बार एक कलाकार ने अपने चित्रों की प्रदर्शनी लगाई। उसे देखने के लिए नगर के सैकड़ों धनी-मानी व्यक्ति भी पहुँचे। एक लड़की भी उस प्रदर्शनी को देखने आई। उसने देखा सब चित्रों के अंत में एक ऐसे मनुष्य का भी चित्र टँगा है जिसके मुँह को बालों से ढक दिया गया है जिसके पैरों पर पंख लगे थे। चित्र के नीचे बड़े अक्षरों से लिखा था-अवसर चित्र कुछ भद्दा सा था इसलिए लोग उस पर उपेक्षित दृष्टि डालते और आगे बढ़ जाते। लड़की का ध्यान प्रारंभ से ही इस चित्र की ओर था। जब वह उसके पास पहुँची तो चुपचाप बैठे कलाकार से पूछ ही लिया-श्रीमान जी यह चित्र किसका है?’’ ‘अवसर का’ कलाकार ने संक्षिप्त सा उत्तर दिया। आपने इसका मुँह क्यों ढक दिया है? लड़की ने दुबारा प्रश्न किया। इस बार कलाकार ने विस्तार से बताया-बच्ची प्रदर्शनी की तरह अवसर हर मनुष्य के जीवन में आता है और उसे आगे बढ़ने की प्रेरणा देता है, किंतु साधारण मनुष्य उसे पहचानते तक नहीं इसलिए वे जहाँ थे वहीं पड़े रह जाते हैं। पर जो अवसर को पहचान लेता है वही जीवन में कुछ काम कर जाता है।’’‘‘और इसके पैरों में पंखों का क्या रहस्य है?’’ लड़की ने उत्सुकता से पूछा। कलाकार बोला-यह जो अवसर आज चला गया वह फिर कल कभी नहीं आता।’’ लड़की इस मर्म को समझ गई और उसी क्षण में अपनी उन्नति के लिए जुट गई। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर. 💥 जन्म :- १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी. १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस. १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका 💥 मृत्यू :- १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक. २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं मत* ----------------------------------------------------- 2⃣ *वर्ल्ड आॅरेन्ज फेस्टिव्हल'मध्ये संत्र्याला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची क्षमता असल्याचे मत पर्यटन व ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त ,केले* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - महापालिका शाळांमध्ये गेल्या 4 वर्षांत तब्बल 90 हजारांची विद्यार्थी संख्येत घट, प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा अहवाल मंगळवारी प्रेस क्लबमध्ये जाहीर* ----------------------------------------------------- 4⃣ *स्टीव्हन स्पिलबर्गच्या 'द पोस्ट' सिनेमाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सहा नामांकने.* ----------------------------------------------------- 5⃣ *आमदार-खासदारांशी संबंधित विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी 12 विशेष न्यायालये स्थापन करणार असल्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला माहिती.* ----------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - किरकोळ बाजारातील महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात 3.58 टक्क्यांवर होता तर नोव्हेंबरमध्ये वाढून 4.88 टक्क्यांवर पोहोचला* ----------------------------------------------------- 7⃣ *डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विद्याधर गंगाधर पुंडलिक* मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी. पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे. साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ? *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* *१) नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?* 👉 संत्र्यासाठी *२) लिंबामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?* 👉 क जीवनसत्व *३) जायकवाडी धरण कोठे आहे ?* 👉 पैठण औरंगाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद 👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड 👤 राजेश वाघ, बुलढाणा 👤 विनोद राऊलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* आवडीच्या कामात खुप उत्साह असतो त्रास झाला तरीही त्याचा दाह नसतो आवडीच्या कामात कशाचा आला त्रास कठीण काम वाटते उत्साही माणसाला खास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🚩🔻🔻🔻🚩🔻🔻🔻🚩 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्याजवळ खूप काही कला आहेत परंतु त्या कलेला प्रोत्साहन देऊन सादरीकरण करण्याची मनातून संधी द्या. त्यातून नवे काहीतरी करण्याची त्याला चालना द्या. तुमच्यातल्या कलेला बाजूला सारून दुस-याच्या कलेची नक्कल करु नका. ज्यामुळे तुमच्यातील सर्जनशीलतेला दडपून टाकून तुमच्या अस्तित्वाला ठेच पोहण्याची वेळ येईल असे प्रयत्नही करु नका. त्याच एका कारणाने तुमची मानहानी होईल व असे अपमानीत जीवन जगण्यास प्रेरित करेल असेही करु नका. तुमच्यातल्या नव्या अविष्काराला संधी देऊन स्वाभिमानाने आनंदी जीवन जगायला शिका म्हणजे तुम्ही खूप काही केल्याचे आणि जिंकल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *समान अर्थ व जोडशब्दांची ओळख.* हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . *उदा.*-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *रामबाण औषध* एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी. लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते . तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह म्हणाला . महाराज या प्राण्यांमध्ये मला कोल्हा दिसला नाही . नाही मी सहज विचारलं या कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही ,असे मला वाटते .नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे नंतर काय ते बोलावे. महाराज आजपर्यंत एवढे पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते औषध शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल . त्याच क्षणी लांडगा तेथे मारून पडला.कोल्हा म्हणाला,कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम ! 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/12/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ. 💥 मृत्यू :- १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - केंद्र सरकारनं आधार कार्डला बँक खात्याशी जोडण्यासाठी वाढवली मुदत, आत्ता 31 मार्च 2018 पर्यंत करता येणार लिंक* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- मुंबादेवी मंदिरात कायद्यानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था लागू करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पंढरपूर मंदिरासह अध्यक्ष नेमण्यासंदर्भातील विधेयक मंजूर.* ----------------------------------------------------- 3⃣ *मूग, उडीद, सोयाबीन यांच्या खरेदीची, काल संपणारी मुदत १ महिन्याने वाढवली, त्याचबरोबर नोंदणीची मुदतही वाढवण्यात आली सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती.* ----------------------------------------------------- 4⃣ *दिल्ली : कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी, दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निकाल.* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपूर : नॉन क्रिमीलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ८ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.* ----------------------------------------------------- 6⃣ *दुबई आेपन बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी, चीनच्या ही बिंगजीयाओचे कडवे आव्हान २१-११, १६-२१, २१-१८ असे परतावले.* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार रोहित शर्माची विक्रमी द्विशतकी खेळीमुळे अविस्मरणीय ठरलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 141 धावांनी धुव्वा उडवला.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आपली कामे आपणच करावीत* एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ग.दि. माडगूळकर* माडगूळकर गजानन दिगंबर : (१ ऑक्टोबर १९१९– १४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी (१९४२) आणि पहिला पाळणा (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संगृहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१). *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) रामायण हा ग्रंथ कोणी रचला?* 👉 वाल्मिकी ऋषी *२) महाभारत हा ग्रंथ कोणी रचला?* 👉 महर्षी व्यास *३) अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला?* 👉 कौटिल्य *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सारंग भंडारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *फसवलेले* हा म्हणतो फसवले तो म्हणतो फसवले आज पर्यंत खरं सांगा सामान्याला कोणी हसवले कोणाला ना कोणाला ईथे ज्याने त्याने फसवलेले आहे कशा वरून ना कशा वरून काळीज उसवलेले आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस हा एखाद्या हिमनगासारखा असतो. दिसतो छोटा, असतो मोठा. माणूस जसा नि जितका असतो, त्यापेक्षा कमी दिसतो नि समजतो. मनुष्य संबंधातले सारे ताण-तणाव निर्माण होतात, ते असण्या नि दिसण्याच्या गफलतीतून. माणसाचं असणं...त्याचा शोध-वेध घेऊ पाहाल तर कठिण! माणूस एकच असतो पण समाजजीवनात त्याला संबंधपूर्ततेचा भाग म्हणून वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात. पुरूष हा मुलगा, बाप, काका, मामा, भाचा, पुतण्या, शिष्य, प्रियकर, नवरा, बाॅस, नेता काहीही असतो. त्यामुळे एक माणूस एकास प्रिय तर त्याचवेळी दुस-या एखाद्या व्यक्तिस अप्रिय ठरतो.* *माहेरची मुलगी सासरी गेली की ती तेथे सून असते. माहेरी ती वळणाची असली तरी सासरच्यांच्या लेखी बिनवळणाची ठरू शकते. हे काय गौडबंगाल आहे माणसाचं? याचा शोध घेता लक्षात येतं की एकच माणूस अनेकांशी भूमिका, नाते, जबाबदारी संबंध लक्षात घेऊन नटासारख्या भूमिका वठवत असतो. त्यामुळे घरी मुलांना अतिशय प्रेमळ वाटणारा बाप कर्मचारी व सहका-यांना खाष्ट, कठोर वाटू शकतो. हे तो दायित्व म्हणून निभावत असतो, त्याच्यासाठी हे सारं अटळ होऊन बसतं. मग प्रश्न असा पडतो की नेमका माणूस कळायचा तरी कसा? ते कळणं महाकठीण गोष्ट आहे खरी! माणसातील ख-याचा शोध 'क्ष किरण' टाकले तरी लागणे अशक्य. पण एवढं नक्की म्हणता येईल..., जो माणूस भूमिका भान म्हणून स्विकारतो, तो आत-बाहेर एक असणं आदर्श असलं तरी कठीण! ते अवघड आहे. आपल्यातला हिंस्त्रपणा त्याने मारला, त्यामुळे खरंच का माणूस अहिंसक झाला?* ‼ *रामकृष्णहरी* ‼ ☀☀☀☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते. तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच. परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते. म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा. तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *वार काढा तोंडी* दिलेल्या तारखेचा वार काढण्याची एक सोपी पद्धत १) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस, २) ३० तारिख ओलांडताना २ दिवस, ३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस, ४) २८ तारिख ओलांडताना ० दिवस पुढे मोजावेत. म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल. उदा.१५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१६ रोजी कोणता वार असेल ? उत्तर:- ३१ मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल. तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा वार शुक्रवार मिळेल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ह्रदय परिवर्तन* एक भक्त थे, कोई उनका कपड़ा चुरा ले गया। कुछ दिनों बाद उस भक्त ने वह कपड़ा एक आदमी के हाथ में देखा जो उसे बाज़ार में बेच रहा था। वह दुकानदार उस आदमी से कहता है "यह कपड़ा तुम्हारा है या चोरी का, इसका क्या पता। हाँ कोई सज्जन पहचान कर बता दें कि तुम्हारा ही है तो मैं इसे ख़रीद लूँगा।" वह भक्त पास ही खड़े थे और उनसे दुकानदार का परिचय भी था। उन्होंने उस दुकानदार से कहा मैं इस आदमी को जानता हूँ, तुम इस कपड़े के दाम दे, दो। दुकानदार ने कपड़ा ख़रीदकर कीमत चुका दी। यह सब देखकर भक्त के एक साथी ने उनसे पूछा कि आपने ऐसा क्यों किया? इस पर भक्त बोले कि वह बेचारा बहुत ग़रीब है, ग़रीबी से तंग आकर उसे ऐसा करना पड़ा है। भक्त कहते हैं ग़रीब की तो हर तरह से सहायता ही करनी चाहिये। इस अवस्था में उसको चोर बतलाकर फ़साना अत्यन्त पाप है। भक्त की इस बात का चोर पर बड़ा प्रभाव पड़ा और वह भक्त की कुटिया पर जाकर अपनी ग़लती के लिए रोने लगा। उस दिन से वह चोर भी एक भक्त बन गया। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक. १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता. १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात, ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपुरात होतोय ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’, सलग तीन दिवस दरवळणार संत्रा, रंगारंग कार्यक्रम विविध स्पर्धा अन् पुरस्कारांचा पाऊस* ----------------------------------------------------- 3⃣ *राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड, राहुलपर्वला सुरुवात* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधान परिषदेत गोंधळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब.* ----------------------------------------------------- 5⃣ *दाट धुक्यामुळे पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर आणि मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस आजपासून तीन दिनांक १२ ते १४ डिसेंबरपर्यंत रद्द* ----------------------------------------------------- 6⃣ *रणजी करंडकमध्ये विदर्भ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत, विदर्भानं केरळचा 412 धावांत उडवला खुर्दा* ----------------------------------------------------- 7⃣ *आशियाई नेमबाजी : भारतीय युवांनी केली २१ पदकांची लयलूट, आगामी युवा आॅलिम्पिकसाठी ‘कोटा’ही मिळवला* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *साहस कथा* सातव्या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं. अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रजनीकांत* शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत ( डिसेंबर १२, १९५० ) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे.रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिळ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत प्रसिद्ध आहेत. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील ('शिवाजी द बॉस' या चित्रपटानंतर) सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. 'शिवाजी द बॉस' चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. रोबोट हा सर्वात जास्त चाललेला चित्रपट आहे, ज्याची दखल संपूर्ण जगाने घेतली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) वजनमापांची प्रमाणित पध्दत कोणी सुरू केली?* 👉 नंदराजांनी *२) बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली?* 👉 राजगृह *३) नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे काय होते?* 👉 धनानंद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली 👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर 👤 शुभानन गांगल, पुणे 👤 अशोक पाटील कदम 👤 समीर मुल्ला 👤 वतनदार पवनकुमार नारायण 👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 महेश शिवशेट्टी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपयश* कारणं सांगणारे लोक नेहमी अपयशी होतात अपयशी ठरण्याला नवे नवे कारणं देतात कारणं सांगणाराला यश जवळ येऊ देत नाही यशाची विजय माला गळ्यात घेऊ देत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वत:चं मरण पाहता येत नाही, इतरांच्या मरण्यातूनच हा अनुभव येतो. मृत्यू अटळ आहे, हे कळलेलं असतं. मरण आपल्या जाणिवेत केव्हा प्रवेश करतं ? घरात, शेजारी जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा. प्रत्येकजण या अनुभवातून जातो. मग सुरू होते आपले मरणरंजन. मरणाचे भय वाटत नाही, पण मरावेसे वाटत नाही. इतकी वर्ष जगलो, खूप झाले. तरी अजूनही जगावेसे वाटते. याचे काय उत्तर देणार ? आपले अध्यात्म जन्म-मरणाचा फेरा चुकवायला सांगतं. हा फेरा चुकविणे म्हणजे 'मोक्ष'. हीच 'मुक्ती.'* *निद्रा म्हणजे मरणाची छोटी आवृत्ती असते. आपण निद्रा घेतो म्हणजे नेणिवेच्या प्रांतात सुखनैव संचार करतो. तिथे सुखदु:खाचे भान नसते. निद्रा-जागृतीचा हा खेळ आपण नेहमीच खेळतो. झोपेत स्वप्न पडतात, ती जागेपणी आठवतात. अर्थ इतकाच, की आपण संपूर्णपणे जाणिवेच्या बाहेर गेलेलो नसतो. निद्रा ही विश्रांती आहे म्हणून आपणांस तिचे भय वाटत नाही.* *मरण हीसुद्धा अशीच निद्रा आहे...पण ती अंतिम, चिरनिद्रा आहे. मरण ही वस्तुस्थिती आहे. मरणाची भितीदायक कल्पना दूर सारून मूळस्वरूप न्याहळणे म्हणजे 'मरणसौंदर्य' पाहणे. एखादे ज्ञानेश्वर किंवा तुकारामच हे करू शकतात. मरणातील मरणपण काढायचे तर मरणापाशी समरस झाले पाहिजे.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯. विचारवेध............✍🏼 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परमेश्वराने मानवास एक सर्वात मोठी देणगी बहाल करुन टाकली आहे.ती ही "मन " या माध्यमातून.पहाना आपण आपल्या सा-या जीवनाची सूत्रे मनाच्याच ताब्यात दिली आहेत.मन करील तीच पूर्व दिशा असे ठरलेले असते.परंतू आपल्या मनाला सशक्त आणि आनंदी ठेवण्याचे काम,त्या मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचे आणि योग्य दिशेने पाऊल टाकण्याचे काम आपल्यावरच परमेश्वराने टाकले आहे.मनाला चांगले वाईट करण्याचा आणि ठेवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे तो कसा ठेवायचा आणि जीवन कशाप्रकारे सुंदर जगायचे हेदेखील तुम्हाला तुमच्याच मनाने ठरवावे लागेल.हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्र्न आहे.परमेश्वराने स्वत:कडे काहीच ठेवले नाही हे मात्र खरे आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *अभिव्यक्ती* दररोज परीपाठ झाल्यावर वर्गात आल्या आल्या फलकावर एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तीत जास्त वाक्ये लिह्ण्यास सांगावेत. थोड्या दिवसानंतर मुले खूप वाक्ये लिहू शकतील. लेखनाचाही सराव होईल. अभिव्यक्तीला वाव मिळेल. उदा. *पाऊस- ?* मला पाऊस आवडतो. माझी आई पावसाचे गाणे म्हणते . पाऊस आभाळातुन येतो. आज पण पाऊस आला. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस का शोध* एक दिन गाव की बाहर , नदी किनारे एक व्यक्ती लोहे की संकल गले में लटकाकर नदी की और बढ़ रहा था | किसीने पूछा ,”महाराज , कहाँ जा रहे हो?” उस व्यक्तीने कहाँ, “हमारे गुरदेव ने कहाँ है इस नदी की पत्थारोमे परिस भी मिलते है जिसके स्पर्श से लोहा सुवर्ण में बदल जायेगा | मै उस परिस की खोज करने जा रहा हूँ|” वह लोहे की संकल वाला व्यक्ति नदी की पानी में उतरा | नदिसे एक पत्थर उठाया और संकल को लगया | देखा कुछ परिवर्तन नहीं हुवा | पत्थर नदी में छोड़ दिया |फिर दूसरा पत्थर उठाया लोहे से स्पर्श करा के देखा, पत्त्थर नदी की पानी में छोड़ दिया | दो ,चार ,दस, बीस पत्थर पर वह अजमाते आगे बढ़ रहा था| एक घंटा हुवा , दो- तिन घंटे हुवे लेकिन परिस प्राप्त नहीं हुवा | परन्तु उसने अपना काम छोड़ा नहीं , वह शुरू रखा | शुरू सुरु में वह हर पत्थर को ध्यान से देखता था | लेकिन जैसा समय बढ़ते गया वैसे उसकी मन की एकाग्रता भंग हो गई |हात से पत्थर उठाना - लोहे से स्पर्श कराना - पत्थर पानी में छोड़ना .. यह क्रिया तो चल रही थी लेकिन मन और कुछ सोचने लगा था| 4-5 घंटे हो गए | उसका काम एक छोटा लड़का देखा रहा था | उसे उत्सुकता निर्माण हुई | उसने व्यक्ति के पास जा कर पूछा, “बाबा , क्या कर रहे हो ?” व्यक्तीने कहा , “लोहे को सोना बनाने वाला परिस ढूंड रहा हूँ |” बच्चे ने कहा ,” लोहा है कहाँ? संकल तो सोनेकी ही है?” व्यक्ति की तंद्री खुल गयी | उसके ध्यान में आया की लोहा तो सुवर्ण बन चूका था |लेकिन किस पत्थर से ? इस और उसका ध्यान ही नहीं था | क्रिया करते करते उसका हेतु ही वह भूल गया और बिना भाव के कर्मकांड करने लगा था | उसको अपनी भूल पर बड़ा दुःख हुवा लेकिन करता क्या ? समय निकल चूका था, परिस पानी के पत्थारोमे मिल चूका था | 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/12/2017 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर. १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नागपूर : बडोदामध्ये होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा विजय* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर: आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 19 विधेयकं मांडली जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती* ----------------------------------------------------- 3⃣ *राहुल गांधी 16 डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 4⃣ *पुण्यात थंडीचा कहर, तापमान कमाल २९.६ तर किमान १६ अंश सेल्सियसवर पोहोचले* ----------------------------------------------------- 5⃣ *महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा अशी मागणी जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना देण्यात आले निवेदन* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड हॉकी लीग 2017 मध्ये जर्मनीचा 2 - 1नं पराभव करत भारतानं जिंकलं कांस्यपदक* ----------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान भारताचा 7 विकेट्सने केला पराभव, या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा 1581 लोकांनी ही कथा ऑनलाईन वाचन केले आहे. आपण ही वाचावे. *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 📱 9423625769 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वनाथन आनंद* विश्वनाथन आनंद हा भारत बुद्धिबळ खेळाडू आहे, इंटरनॅशनल ग्रँडमास्टर आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. विश्वनाथन आनंदचा जन्म 11 डिसेंबर 1 9 6 9 रोजी झाला. विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळपटू. आनंदने पाच वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकले आहे आणि एक अविवादित विजेता आहे. विश्वनाथन आनंद 2003 च्या फिडे वर्ल्ड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनले आणि त्याला आपल्या काळातील क्रीडा खेळाडू म्हणून ओळखले जाते. 1988 मध्ये विश्वनाथन आनंद भारताचे ग्रँडमास्टर झाले. त्याला प्रथम राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, हा भारताचा सर्वात सन्माननीय क्रीडा पुरस्कार आहे (1991-92). विश्वनाथन आनंद यांना 2007 मध्ये भारताचे दुसरे सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषण प्रदान करण्यात आले होते, ज्यावरून ते या पुरस्कारासाठी भारतीय इतिहासात प्रथम खेळाडू ठरले. आनंदने चेस ऑस्कर जिंकला 6 वेळा (1 997, 1998, 1998, 2003, 2007, 2008). नोव्हेंबर 2010 मध्ये आनंद पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला, परंतु त्याला परत कार्ल्सनला परत करावे लागले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१)राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?* 👉. १८८५ *२). राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?* 👉. ॲलन ऑक्टेव्हियन ह्युम *३). पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते?* 👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 इलियास शेख, सर्पमित्र व शिक्षक जि. प. हायस्कुल जारीकोट 👤 प्रा. नितीन दारमोड, समाजभूषण संस्थापक व अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान 👤 दस्तगीर सय्यद शिक्षक व निवेदक 👤 दीपक पाठक, परभणी 👤 आकाश सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *तडजोड* देण्या घेण्याच्या मुद्द्यावर एकमेकांशी जोडले जातात देणी घेणी बिघडली की संबंध तोडले जातात देण्या घेण्या शिवाय ही माणूस म्हणून संपर्क असावा मतलबा पुरता फक्त द्वेष किंवा आदरभाव नसावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* विद्यार्थ्याना इंग्रजीतून दिलेल्या सूचना समजत नाही. कृती करताना चुकतात, त्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे हा उपक्रम राबवावासा वाटला. 🌀Leader says🌀 हा उपक्रम राबविताना सर्वप्रथम शिक्षकांनी इंग्रजीतील इ.१लीते४थी पर्यंतच्या सूचनांची यादी बनवली. त्यातील सर्व सूचनांच्या पट्ट्या बनवल्या. शिक्षकांनी प्रथम कृती करून दाखविली व सराव घेतला. जे विद्यार्थी निरीक्षणातून योग्यप्रकारे सूचना पालन करून कृती करतात. विसरत नाही. (stand up,sit down,go back,come forward) इ.सर्व सूचना लक्षात ठेवतात. त्यांना leader बनण्याची संधी दिली. त्यामुळे मुले आनंदाने खेळत सहभागी होतात,कृती करतात लक्षात ठेवतात *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यायामाचे महत्त्व* विनित आणि अनिकेतची दाट मैत्री होती. त्यांच्या तिसरीच्या वर्गाची ट्रीप डोंगरावर जाणार आहे असे प्राची टिचरांनी सांगताच सर्व मुले आनंदाने 'हुर्रे' ओरडली. होता होता तो दिवस उजाडला आणि सारी मुले सकाळी ठीक सात वाजता शाळेत हजर झाली. बस लगेचच सुटल्यामुळे सगळी मुलं खूपच एक्साईट झाली होती. सगळ्यांनी खाऊची अगदी जय्यत तयारी करुन आणली होती. साडे आठला गाडीतच सगळयांनी ब्रेकफास्ट करायचा ठरला. सर्वांनी आपआपले डबे उघडले. विनितनेही डब्यात आणलेला शिरा आणि ऍपलचा चट्टामट्टा करायला सुरूवात केली. अनिकेत मात्र कोल्डड्रिंक्स आणि भलमोठं वेफर्सच पाकीट खात होता. होता होता बस डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. सगळी मुले खाली उतरल्यावर टिचरांनी सांगितले ''मुलांनो उंचावरची लेणी पाहण्यासाठी आपल्याला डोगंर चढायचा आहे." मुलं तर काय तयारच होतीच. सर्वांनी आपल्या बॅगपॅक पाठीवर टाकल्या, टोप्या घातल्या आणि चढायला सुरूवात केली. मधून मधून उत्साह वाढावा म्हणून टिचर त्यांना '' हर हर महादेव'' म्हणायला सांगत होत्या. मुलांनाही आरोळया देतांना अगदी शिवाजीचे मावळे झाल्यासारखे वाटत होते. जसे जसे हे मावळे वर जात होते तसा त्यांचा उत्साह कमी कमी होत होता. त्यांना दम लागत होता. बरेच जण थांबत थांबत चढत होते तर काहीजण सारखे पाणी पीत होते. डोंगर चढायचा उत्साह फारच थोडया मुलांमध्ये शिल्लक होता अपवाद फक्त विनितचा! तो सर्वात आधी डोंगरावर जाऊन पोहोचला. विनितच्या मागोमाग सगळे पोहोचल्यावर सार्यांनी फिरुन डोंगर आणि लेणी पाहिली. संध्याकाळ होत आल्यामुळे खाली उतरणे आवश्यक होते. प्राची टिचरांनी सगळयांना जवळ बोलावले आणि त्या मुलांना समजावत म्हणाल्या, ''आज बहुतेक मुलांना डोंगर चढतांना दम लागला. अनिकेत तर सर्वात मागे राहिला होता. तुमच्यात न दमता जर कोणी डोंगर चढला असेल जर तो आहे विनित. असं का माहिती आहे का? " मुलांनी नाहीच्या माना डोलावल्या. टिचरांनी कारण समजावत सांगितले, "विनित अजिबात जंकफुड खात नाही. आईने केलेले पदार्थ कुरकूर न करता मनापासून जेवतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे चांगले पोषण होऊन शक्ती वाढते. दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे त्याचा स्टॅमीना पण वाढला आहे. तुम्ही जर त्याच्या सारखे वागलात तर तुमचाही स्टॅमीना वाढून न दमता तुम्हीही डोंगर चढू शकाल". "कधीतरी बदल म्हणून वेफर्स, बिस्किटे खायला हरकत नाही. पण संपूर्ण जेवण त्यावर नको. काय समजले ना? "मुलांनी मोठयाने हो म्हटले आणि उडया मारत डोंगर उतरायला सुरूवात केली. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी हक्क दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले. १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला. 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरात विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान* ----------------------------------------------------- 2⃣ *शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन* ----------------------------------------------------- 3⃣ *गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करणार गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *आगरी यूथ फोरम आयोजित १५ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन शनिवारी डोंबिवली क्रीडा संकुल मैदानात झाले.* ----------------------------------------------------- 5⃣ *बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून पाच झाला, मयतांच्या कुटुंबियाना मिळणार प्रत्येकी सहा लाख रु.* ----------------------------------------------------- 6⃣ *जळगाव : पर्यावरण संस्थेतर्फे जळगावात व्याघ्र परिषदेस प्रारंभ. व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे यांचे मार्गदर्शन. मुक्ताईनगर वनक्षेत्राला अभयारण्य घोषित करा. किशोर रिठे यांची मागणी.* ----------------------------------------------------- 7⃣ *आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल टी-२० क्रिकेटमध्ये ८०० षटकार ठोकणारा पहिला ठरला फलंदाज* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मानवी हक्क दिन* लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यंकटेश बळवंत पेंढारकर* व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?* 👉 शेकरू *२) औरंगाबादला किती दरवाज्याचे शहर म्हणून ओळखल्या जाते?* 👉 ५२ *३) जागतिक जलदिन म्हणून कधी साजरा केल्या जातो?* 👉 २२मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 संदीप मस्के, सहशिक्षक 👤 दशरथ एम. शिंदे 👤 अनिल यादव, धर्माबाद 👤 शिवानंद हिंदोले 👤 श्रीकांत म्याकेवार 👤 अमोल पाटील सलगरे 👤 मच्छीन्द्र सपाटे 👤 मिलिंद गायकवाड 👤 स्वप्नील मसाने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अर्ध्या हळकुंडाने* कोणी कोणी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात छोट्या यशानेही उतावळे की बावळे होतात छोट्याशा यशात असे उतावळे बावळे होऊ नये अर्ध्या हळकुंडाने कोणी उगीच पिवळे होऊ नये शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात.त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही.त्यांना वाटते की,आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो.अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत.इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *प्रसंग चित्र संभाषण ,लेखन* पाठ्यपुस्तक किंवा स्वतः विद्यार्थी निर्मित चित्र ..उपलब्ध करुन द्यावित.. प्रसंग चित्र पाहून मुल बोलती करण्यासाठी प्रश्न उत्तर स्वरूप आणि निरीक्षण मुलाबरोबर संवाद साधावा.. स्वनिर्मित चित्र मुलांच्या कल्पना आणि त्याची विचार करण्याची अभिव्येक्ती बाहेर येण्यास मदत होते. भाषा शिकण्यासाठी संभाषण खुप महत्त्वाचे असते .पाठ्यपुस्तकात प्रसंग चित्रे दिलेली असतात पण आपण त्याकडे तेवढे लक्ष देत नाहीत .प्रसंग चित्रे पाहून छोटी छोटी वाक्य लेखन करण्यास मुलांना सांगावे. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *वीणा का मर्म* मंदिर के पास प्रकोष्ठ में भगवान् सुब्रह्मन्यम की मूर्ति थी, उसी के सामने वाले भाग में एक सुंदर वीणा रखी हुई थी। मंदिर में कई लोग कुछ तो वीणा के दर्शन कर लेते और चले जाते। कुछ उसे बजाने की इच्छा करते पर उसे बजाने की इच्छा करने पर वहाँ बैठा हुआ मंदिर का रक्षक उनसे मना करता और वे वहाँ से चल देते। इस प्रकार सुंदर स्वरों वाली वह वीणा जहाँ थी वहीं रखी रहती थी। उसका कभी कोई उपयोग न होता था। एक दिन एक व्यक्ति आया। उसने वीणा बजाने की इच्छा व्यक्त की, पर उस व्यक्ति ने उसे भी माना कर दिया। वह व्यक्ति वहाँ चुपचाप खड़ा रहा थोड़ी देर में सब लोग मंदिर से निकलकर बाहर चले गए तो उस व्यक्ति ने वीणा उठा ली और उसका लयपूर्वक वादन करने लगा। वीणा का मधुर स्वर लोगों के कानों तक पहुँचा तो लोग पीछे लौटने लगे और उस मधुर संगीत का रसास्वादन करने लगे। वाद्य घंटों चला और लोग मंत्रमुग्ध सुनते रहे। जब वह बंद हुआ तब भी लोग ईश्वरीय आनंद की अनुभूति करते रहे। लोगों ने कहा-आज वीणा सार्थक हो गई।’’ इतनी कथा सुनने के बाद गुरु ने शिष्य से कहा-तात इस कथा का भावार्थ यह है कि भगवान् मनुष्य शरीर सब को देता है पर कुछ लोगों को तो अज्ञान और कुछ लोगों को अहंकार उस महत्त्वपूर्ण यंत्र का उपयोग करने नहीं देता। पर यदि कोई इन दोनों की उपेक्षा करके शरीर रूपी वीणा से मधुर लहरियाँ निकालने लगता है, तो यह शरीर इतना परिपूर्ण है कि न केवल उसे ही वरन् उसके संपर्क के सैकड़ों दूसरे लोग भी उसमें ईश्वरीय आनंद की झलके पाने लगते हैं।’’ 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/12/2017 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन 💥 ठळक घडामोडी :- १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू. १९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी. १९१९- ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री. १९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- १५६५ - पोप पायस चौथा. १६६९ - पोप क्लेमेंट नववा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्याचे मतदान, दक्षिण गुजरातमध्ये काट्याची लढत* ----------------------------------------------------- 2⃣ *छगन भुजबळांच्या जामिनावर 18 डिसेंबरला निर्णय. जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण. 18 डिसेंबरला पीएमएलए कोर्ट देणार निर्णय.* ----------------------------------------------------- 3⃣ *कुलभूषण जाधव यांना परिवाराची भेट घेण्याची परवानगी. आई व पत्नी 25 डिसेंबरला जाणार पाकिस्तानात. पाकिस्तान मीडियाचं वृत्त.* ----------------------------------------------------- 4⃣ *चंद्रपूरमध्ये 26 शाळकरी मुलांना विषबाधा. लालपेठ परिसरातील मनपा शाळेतील घटना. चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा. जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू.* ----------------------------------------------------- 5⃣ *भंडा-याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी दिला खासदारकीचा राजीनामा* ----------------------------------------------------- 6⃣ *सोमवारपासून सुरू होणारे नागपूरच राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता* ----------------------------------------------------- 7⃣ *भुवनेश्वर - हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ई. के. नायनार* एरम्पाला कृष्णन नायनार जन्म९ दिसम्बर १९१८ कल्याशेरी, मृत्यु 19 मई २००४, एक भारतीय राजनीतिक और भारत की कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) के एक प्रमुख नेता थे । केरल के मुख्यमंत्री थे । *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे आहे?* 👉 प्रवरानगर जि. अहमदनगर *२) महाराष्ट्रातील प्रसिद्ध आनंदसागर कोठे आहे?* 👉 शेगाव जि. बुलढाणा *३) ऱाष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे?* 👉 मोझरी जि. अमरावती *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अक्षय जाधव पाटील 👤 प्रतीक यम्मलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रेमाने प्रेम* द्वेष करून कोणाचा प्रेम मिळवता येत नाही डोक्यातलं ज्ञान जसं कोणाला पळवता येत नाही द्वेषाने द्वेष तर प्रेमाने प्रेम वाढतं असते आपल्या आचरणातून आपली फ्रेम घडतं असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *विकार आणि त्यावरील उपाय याचं सूत्रं स्वत:चं स्वत:ला शोधावं लागतं. एकदा ते सापडलं की मनामधील वैषम्य, मत्सर, तिरस्कार गळून पडायला सुरूवात होते. ही प्रक्रिया मन:शुद्धीकडे घेऊन जाणारी असते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली, की मन गंगेसारखं निर्मळ नि प्रवाही होतं. एका सुंदर व निरामय जीवनानुभूतीकडं ते आपल्याला घेऊन जातं. संत कबीरांनी अतिशय सोप्या शब्दांत ही अवस्था मांडली आहे.* *" बुरा जो देखन मैं चला,* *बुरा न मिलिया कोय,* *जो दिल खोजा आपना,* *मुझसे बुरा न कोय !"* *आपलं मन हरवलं, त्यातील संवेदना संपल्या, तर जगातील सर्वात वाईट मीच आहे, हे चिंतन मनाला वास्तवाची जाणीव करून देणारं असतं. संत कबीर म्हणतात......* *"एकदा मन शुद्ध झालं की जगणं सुंदर होतं नि आम्ही हवेहवेसे वाटायला लागतो."* ••●🌼 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हाला जर कोणी पडत्या काळात साथ दिली तर तुम्ही त्यांना कधी विसरु नका.ते तुमच्या जीवनात एका दृष्टीने देवदूतच म्हणून तुम्हाला मदत करायला आले आहेत असे समजावे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला विसरु नका.त्यांनी तुम्हाला केलेली मदत ही तुमच्या पुढील जीवनासाठी प्रेरणाच दिलेली आहे असे समजून पुढे तुम्ही नव्या जोमाने कामाला सुरुवात करा.त्यांचे नाव नेहमी स्मरणात ठेवा म्हणजे कळत नकळत ते तुमच्या पाठीशी आहेत असे समजून जीवन जगायला शिका.पण असेही करु नका की,त्यांचा विसर होईल आणि पुन्हा त्यांची तुमच्या जीवनात मदतीला धावून येतील आणि मदत करतील अशी पुन्हा अपेक्षा करु नका.कारण असंच जर करत राहिलात तर तुमच्या जीवनात जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही.आयुष्यात अशी माणसे पुन्हा भेटतील असे नाही.परंतू त्यांच्या सोबतची नातीही जपायला शिका.त्यांनीच तर तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले जीवन जगायला शिकवले. हेही तुमच्यासाठी काय कमी आहे ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *विद्यार्थीओळखणे* एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे.अश्या प्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरु की तीन बातें* राजा हरि सिंह बेहद न्यायप्रिय और बुद्धिमान था। वह प्रजा का हर तरह से ध्यान रखता था। लेकिन कुछ दिनों से उसे स्वयं के कार्य से असंतुष्टि हो रही थी। हालांकि वह यह प्रयास करता था कि राजा होने का अभिमान न पाले पर कुछ दिनों से यश व धन की वर्षा ने उसके चंचल मन को हिला दिया था। उसने बहुत प्रयत्न किया कि वह अभिमान से दूर रहे। एक दिन वह अपने राजगुरु प्रखरबुद्धि के पास गया। प्रखरबुद्धि नाम के अनुरूप अत्यंत तीव्र बुद्धि थे। वह राजा का चेहरा देखते ही उसके मन की बात समझ गए। उन्होंने कहा, 'राजन्। मैं ज्यादा कुछ न कहते हुए केवल यह कहूंगा कि यदि तुम मेरी तीन बातों को हर पल याद रखो तो जीवन के पथ में कभी भी नहीं डगमगाओगे।' प्रखरबुद्धि की बात सुनकर राजा बोला, 'कहिए गुरु जी। वे तीन कौन बातें कौन सी हैं? मैं उन्हें हमेशा याद रखूंगा।' प्रखरबुद्धि बोले, 'पहली, रात को मजबूत किले में रहना। दूसरी, स्वादिष्ट भोजन ग्रहण करना और तीसरी, सदा मुलायम बिस्तर पर सोना।' गुरु की अजीबो-गरीब बातें सुनकर राजा बोला, 'गुरु जी, इन बातों को अपनाकर तो मेरे अंदर अभिमान और भी अधिक उत्पन्न होगा।' इस पर प्रखरबुद्धि मुस्करा कर बोले, 'तुम मेरी बातों का अर्थ नहीं समझे। मैं तुम्हें समझाता हूं। पहली बात-सदा अपने गुरु के साथ रहकर चरित्रवान बने रहना। कभी बुरी आदत मत पालना। दूसरी बात, कभी पेट भरकर मत खाना। रुखा-सूखा जो भी मिले उसे प्रेमपूर्वक चबा-चबाकर खाना। खूब स्वादिष्ट लगेगा। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) - बल्गेरिया. मातृ दिन - पनामा. संविधान दिन - रोमेनिया. 💥 ठळक घडामोडी :- १९१४ - पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध - कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटीश नौदलावर हल्ला चढविला. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध - जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले. १९४१ - दुसरे महायुद्ध-हाँगकाँगचे युद्ध - आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हाँग काँगवर आक्रमण केले. १९४१ - ज्यूंचे शिरकाण - लॉद्झ जवळील चेल्म्नो काँसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला. १९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार. 💥 जन्म :- १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान. १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित; पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त वक्तव्य भोवले. काँग्रेसने बजावली कारणे दाखवा नोटीस* ----------------------------------------------------- 2⃣ *विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय, प्रसाद लाड यांना मिळाली 209 मतं* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक- नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जेन या चार ठिकाणी भरणार कुंभमेळा यूनोनोस्कोच्या यादीत समाविष्ट झाला आहे, गेल्या दोन वर्षापासून खासदार हेमंत गोडसे, त्रबकशेअर मंदिर विश्वस्त ललिता शिंदे प्रयत्नशील होते.* ----------------------------------------------------- 4⃣ *गडचिरोली- दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण* ----------------------------------------------------- 5⃣ *जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.* ----------------------------------------------------- 6⃣ *एसटी महामंडळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार, शयनयान(स्लीपर) शिवशाही सज्ज, 150 शिवशाही मार्च अखेर एसटी मध्ये दाखल होणार* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद: राष्ट्रीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाने पाच गटांमध्ये अंतिम फेरीत मारली धडक. चंदीगड, तमिळनाडू या राज्यांच्या संघांनी गाठली अंतिम फेरी* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= कानमंत्र *शाळेने तारला संसार* सर वर्गात आले. हजेरी घेतली. सर्वांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या टेबलावर ठेवल्या. सरांनी सर्व वह्या तपासून कोणाचे काय चुकले हे सांगत वही परत करत होते. नाव घेऊन बोलावत होते आणि वही देत होते. शेवटी गृहपाठाची वही कोण आणले नाही त्यांना उभे राहायला....... वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *हेमंत कानिटकर* कानिटकर यांनी दोन कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७४मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या कानिटकर यांनी पदार्पणातच विंडीजसारख्या तगड्या संघाविरुद्ध ६५ धावांची खेळी केली होती. दोन कसोटींत त्यांनी २७.७५च्या सरासरीने एकूण १११ धावा केल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी अमिट ठसा उमटविला. डिसेंबर १९६३ मध्ये सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्याद्वारे कानिटकर यांनी रणजी पदार्पण केले होते. या सामन्यांत त्यांनी नाबाद १५१ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा मान दोन वेळा मिळविला. १९७०-७१च्या मोसमात कानिटकर यांनी प्रथम श्रेणीतील नऊ सामन्यांत ८६.७७च्या सरासरीने ७८१ धावा केल्या होत्या. त्यात रणजीमधील सात सामन्यांत त्यांनी ९८.१४च्या सरासरीने ६८७ धावा केल्या होत्या. त्या जोरावरच महाराष्ट्राने १९७०-७१च्या रणजी मोसमात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. नेहरू स्टेडियममध्ये मार्च १९७१मध्ये झालेल्या राजस्थानविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी २५० धावांची खेळी केली होती. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर १९७१-७२च्या मोसमात ५१.६०च्या सरासरीने ५१६ धावा, १९७२-७३च्या मोसमात ५६.४५च्या सरासरीने ६२१ धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना १९७४मध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. १९६३ ते १९७८ दरम्यानच्या आपल्या प्रथण श्रेणीतील कारकीर्दीत कानिटकर यांनी ८७ सामन्यांत ४२.७८च्या सरासरीने तेरा शतके आणि २३ अर्धशतकांसह ५००६ धावा केल्या. तसेच, यष्टीरक्षक म्हणून ८७ विकेट्स मिळविल्या. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर कोण होते?* 👉 वर्धमान महावीर *२) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?* 👉 कुंडलपूर *३) वर्धमान महावीर यांचा जन्म कधी झाला?* 👉 इ. स. पू. ५९९ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विजय सूर्यवंशी, चिखलहोळ पत्रकार - फोटोग्राफर 👤 अनिल सुत्रावे, सहशिक्षक हु. पानसरे हायस्कुल, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसतं तसं नसतं* मूल्य संस्कारावर जे भरभरून बोलतात मंचावरून बोलणारे खरंच किती पाळतात बोलण्यात अन् वागणं कुठेच ताळमेळ नसतो दिसतं तसं कुठं नसतं हाच खरा घोळ असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *खेड्यात आठवड्याचा एखादा दिवस देवाचा समजून पाळण्याची प्रथा आहे. त्या दिवशी शेतातील सर्व कामे बंद असतात. तो मोडणा-याला दंड बसतो. नडीचे काम निघाले तर देवाला नारळ ठेवून व पंचांना पूर्वकल्पना देऊन औत, गाडी वगैरे जोडायची मुभा असते. त्याला 'पाळीक दिवस' असे म्हणतात. युरोप-अमेरिकेत आठवड्याचा शेवटचा दिवस (विकेंड) मौजमजा करण्यासाठी असतो. ज्याला जे वाटेल, पटेल ते करायला, पार्ट्या, पिकनिक किंवा मुशाफिरी करता येते.* *वर्षभरात मातृ, पितृ, शिक्षक, रोझ, एड्स, व्हॅलेटीन असे वेगवेगळे 'डे' साजरे केले जातात. अशा परिस्थितीत 'नो घटस्फोट डे' असा दिवस साजरा करायचे एखाद्या देशाने ठरविले तर..? त्या दिवशी कुणाचीही सोडचिठ्ठी-घटस्फोटाचा अर्जच घ्यायचा नाही. असा एक पाळीक दिवस 8 जुलै रशियातील नोव्हगोरोद प्रदेशात आहे. 'व्हॅलेंनटीन डे' च्या तोडीचा हा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. लग्नगाठ बांधायला महत्व दिले जाते. शुभमंगल विवाह करणे भाग्याचे समजले जाते.* *कुणाच्या तरी डोक्यातून आफलातून आयडिया निघते, समाज ती स्विकारतो. त्यामुळे घटस्फोट फार कमी होतील असे नाही... पण काडीमोडांच्या प्रकारावर किमान एक दिवस विचार करायला मिळेल. काही डोकी थोडीतरी थंडावतील. लग्नाचे आयुष्य एक दिवसाने वाढेल... तडजोड झालीच तर आनंदच आहे..!* •••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●••• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखाद्या गडावर चढतांना जेवढे शारीरिक कष्ट लागतात त्यापेक्षा गडावरुन खाली उतरताना लागत नाही. त्याचप्रमाणे एखादा हाती घेतलेला नवीन उपक्रम असेल तर तो सुरवातीला अवघड वाटतो.कारण त्यात असलेले तंत्र,हाताळत असताना येणा-या अडचणी, त्याबद्दलची शास्त्रशुध्द माहिती प्रात्यक्षिक करत असताना सुरवातीला अवघड जाते.अशावेळी जणू काही आपण गड चढतच आहोत असेच वाटते.पण नंतर जसजसा सराव होत जाईल तसतसा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सहज आणि सुलभ होत जातो.ज्याप्रमाणे आपण जसा गड सहजरित्या उतरतो आहोत असेच वाटायला लागते.त्याप्रमाणेच कोणत्याही कामात यश प्राप्त करायचे असेल तर पहिल्यांदा मनाची तयारी करायची, आत्मविश्वास वाढवून काम संपेपर्यंत तसाच ठेवायचा,त्यानंतर कामात एकाग्रता ठेवायची आणि काम पूर्ण करायचे. अशी कृती जर सातत्याने करीत राहिली तर आयुष्यातले कोणतेही अवघड कामाचे गड सहजपणे चढून यशस्वीपणे जिंकता येतील यात शंकाच नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *शब्दात लपलेले शरीराच्या भागांची नावे शोधणे* वेगवेगळ्या नावाच्या शब्दपट्टया तयार करुन घ्या दुकान, हकनाक, पाठवनी, सगळा, कानस, पायरी, पाठक, मुंगळा,उपाय,नाकतोडा, गालबोट, पाठपोट, नखरा,कानाडोळा,कपाळकरंटा,तोंड -पाठ,पायपोस्,तोंडसुख,मानव, समान, डोकेबाज,भटजी ईत्यादी शब्द मुलांना गटात किंवा प्रत्येकाला देवून त्यातीलशरीराच्या भागांची नावे शोधण्याची कृती मुलांकडून करुन घ्यावी . *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मां की सीख* इंग्लैंड में एक मरणासन्न मां ने अपने पुत्र से कहा - मुझे इस बात का अफसोस है बेटा कि मं तुझे पढ़ा न सकी और अब तो मेरे पास ज्यादा समय भी नहीं है। तेरे लिए कुछ नहीं कर सकती। यह समझ ले कि अब तेरे लिए सारा संसार ही पाठशाला है। तुझे जहां से जो मिल सके, वहां से सीखना, वही तेरे काम आएगा। उसी से तुझे रोशनी मिलेगी। यह कहकर मां ने हमेशा के लिए आंखें मूंद लीं। बेटा देखता रह गया। अपने भीतर उमड़ रहे आंसू को उसने रोका। उसने मां की सीख गांठ बांध ली। अपने दादा जी को पत्थर तोड़ते देख वह पत्थर तोड़ने का काम करने लगा। इस संबंध में जब उसका ज्ञान एक खास स्तर तक पहुंच गया तो वह गोताखोरी करने लगा और उसने समुद्री चट्टानों के विषय में पर्याप्त जानकारी हासिल कर ली। इसके बाद उसने संगतराश के घर नौकरी कर ली और पत्थरों के गुणों का अध्ययन करने लगा। धीरे-धीरे लाल पत्थर के बारे में उसका ज्ञान एक ऊंचाई तक पहुंच गया। वह उसका विशेषज्ञ माना जाने लगा। तब उसने अपने अनुभवों को लिखना शुरू किया। रात-दिन एक कर लिखता रहा। फिर वह अपने अनुभव लोगों से बांटने लगा। उसकी बातें सुन लोग आश्चर्यचकित रह जाते थे। धीरे-धीरे उसकी ख्याति फैलने लगी। पहले अपने देश में फिर उसके बाहर भी उसे लोग जानने लगे। वह समूचे विश्व में चर्चित हो गया। यह बालक और कोई नहीं ह्यू मिलर था, जो अपनी मां की सीख के कारण विश्वप्रसिद्ध भूगर्भशास्त्री बना। उसने साबित किया कि किताबी ज्ञान से कहीं ज्यादा महत्वपूर्ण है जीवन के अनुभवों से अर्जित ज्ञान। 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/12/2017 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *महापरिनिर्वाण दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले. १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार. २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 💥 जन्म :- १८६१: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा. १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ. २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, मुंबईवरील धोका टळला* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी मुंबई- बँक ऑफ बडोदा दरोड्याप्रकरणी 11 आरोपी अटक, 3 कोटी 43 लाखांच्या दागिन्यांपैकी 1कोटी 38 लाखांचे दागिने हस्तगत* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील वत्सलाबाई जोशी पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना जाहीर* ----------------------------------------------------- 5⃣ *राज्यातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या नव्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. या प्रोत्साहनापोटी राज्य शासन ६४८ कोटी रुपये खर्च करणार आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *खुल्या प्रवर्गातील पदोन्नती सुरू करण्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. त्या बाबत विभागाने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली कसोटी - भारत विजयापासून सात पावले दूर, चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 3 बाद 31 धावा, भारताने श्रीलंकेला विजयासाठी 410 धावांचे दिले लक्ष्य* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• *शिका संघटित व्हा संघर्ष करा* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत....... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/dr-babasaheb-ambedkar.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक* नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे दि. ६ डिसेंबर, इ.स. १८६१ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभूत असल्याची समजूत झाली. मुळात ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते. वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. नागपूर येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना बायबल वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. १० फेब्रुवारी इ.स. १८९५ या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. इ.स. १८९५ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत. दि. ९ मे इ.स. १९१९ रोजी टिळकांचे निधन झाले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= वेळ आणी शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहे, कारण शिक्षक हे धडा शिकवून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते............ *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) महापरिनिर्वाण दिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 ६ डिसेंबर *२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले?* 👉 ६ डिसेंबर १९५६ *३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली?* 👉 १४ ऑक्टोबर १९५६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 डी. आर. भोसके, येवती 👤 अशोक हिंगणे 👤 शंकर बोंबले 👤 कैलास सोनकांबळे 👤 बालाजी गैनवार, चिकना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *घोळ* कोण चोर कोण साव सगळाच येथे घोळ आहे सावां पेक्षा ईथे सारा चोरांचाच मेळ आहे प्रथम दर्शनी कोणीही कोणाला थोर वाटतात ईथे सावां पेक्षा जास्त कोणालाही चोर भेटतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* •••●🔆‼ *रामकृष्णहरी* ‼🔆●••• *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात सर्व काही मिळवता येते,परंतु दुस-याचा विश्वास मिळवता येते कठीण आहे. त्यासाठी पहिल्यांदा दुस-याच्या विश्वासासाठी आपण आपल्या विश्वासावर प्रामाणिक असणे आवश्यक आहे.त्यामध्ये खोट असू नये. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *ओंजळीने ग्लास भरणे* मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १०–१२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्येनुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणीओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेऊन त्यांना आपला ग्लास भरावा लागेल. या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक अपंग दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ : ओखी चक्रीवादळाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची केंद्र सरकारकडे मागणी* ----------------------------------------------------- 2⃣ *'ओखी’मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन, मुंबईत आकाश ढगाळ राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत या शाळा स्थलांतरित होत असल्याने, या शाळांमधील शिक्षकांच्या नोक-यांवर व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार नाही, असे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांची राज्याचे नेत्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून याबाबतची घोषणा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात केली.* ----------------------------------------------------- 5⃣ *हॉकी वर्ल्ड लीग फायनल 2017 - भारताचा 2-3 ने इंग्लंडकडून पराभव.* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुस-या शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर लंकेविरुद्ध ४ बाद ३७१ धावा उभारल्या.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. राजेंद्र प्रसाद *२) घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर *३) घटना समितीची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *" विचाराने "* कोणी कोणाच्या मागे तर कोणी सोबत आहे तू त्याच्या सोबत कसा कोणाची काय बाबत आहे सोबत असो की नसो ते विचाराने रहातात सगळं काही विचाराने वाटून वाटून खातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जमीवरुन सरपटणारा कोणताही साप कधीही सरळ चालत नाही तो वाकडातिकडा चालत ( सरपटत) असतो.त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली काही दुष्टप्रवृत्तीची माणसे वावरत असतात.त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगा ते कधीच तुमचे ऐकून घेत नाहीत.ते आपलेच खरे मानतात.आम्ही जे काही करतो ते चांगलेच करतो असे समजून सामान्य लोकांना त्रास देतात.तर अशा लोकांपासून दूर राहणे केव्हाही चांगलेच.अशांची मैत्री कधीही करू नये.कारण यांची जातच सापासारखीच असते ते केव्हाही उलटू शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे चटकन शिकणे* वर्गातील मुलांना नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे जसे प्र,ऋ,ष्ट्र,ट्र यांसारखे इतर अक्षरे अवघड वाटतात. किंवा लक्षात राहत नाही. म्हणून शाळा सुटते वेळी मुले जेव्हा अभ्यासातून बाहेर पडतात. तेव्हा दररोज फळ्यावर एक एक अक्षर लिहून देणे त्याचे वाचन घेणे. व घरी जाईपर्यंत लक्षात ठेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा तो लिहून वाचन करण्यास सांगणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणीवपूर्वक ते अक्षर विचारून, लिहून घेणे. दैनंदिन अभ्यासात मार्गदर्शन करून मूल्यमापन करावे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते. नवीन अक्षर शिकल्यानंतर आनंदी होतात. वाचण्याचा प्रयत्न करतात. कामात गुंतून राहतात. हा उपक्रम दररोज चालू ठेवा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शर्यत* एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ. सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची. माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते. लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल. पण बेडूक काही ऐकत नाहीत. स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’ तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात. टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल. एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात. एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो. वर जाऊन पाहतो. ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो. लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात. हे घडलं कसं? तो बेडूक खाली उतरतो. सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी? तरी तू डबकं कसं काय सोडलंस? तो बेडूक काहीच बोलत नाही. तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही. सगळे गप्प होतात.. त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, *टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.* इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल? यातून जमेल तर काहीतरी शिका..........प्रगती करताना लोकांच्या म्हणन्याकडे लक्ष देऊ नका. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त " शक्ती " असून चालत नाही , तर त्याला " सहनशक्तीचीही जोड असावी लागते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/12/2017 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *अमरावती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अधिवेशन व शिक्षण परिषद 26 ते 30 डिसेंबरदरम्यान सिंधुदुर्गमधील ओरोस येथे आयोजित केले आहे. शिक्षणाचे खासगीकरण थांबवा प्राथमिक शाळेतच सर्व शैक्षणिक सुविधा द्या, हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर लागली आग; घटनास्थळी 4 बंब दाखल. अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - 15 व्या वित्त आयोगाच्या सदस्यांनी घेतली वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट* ----------------------------------------------------- 4⃣ *ओखी चक्रीवादळ दक्षिण गुजरातच्या दिशेने, दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- बॉलिवूडचे चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते शशी कपूर यांचं निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई - श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व* ----------------------------------------------------- 7⃣ *दिल्ली कसोटी - तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 9 बाद 356 धावा, पाहुणा संघ अद्याप 180 धावांनी पिछाडीवर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *मुलांपेक्षा मुलगी बरी.....!* आज ती फारच अस्वस्थ होती. दवाखान्याच्या पायऱ्या चढताना तिच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. तिच्या सोबत तिची सासूबाई होती त्यामुळे तिला अजुन जास्त धडकी वाटत होती. अखेर दवाखान्यात पोहोचल्यावर तिथल्या खुर्चीवर तिने जरा आराम करण्यासाठी बसली. थोड्या वेळानंतर तिचा नंबर लागला. तशी ती आत गेली. सासुबाई डॉक्टरांकडे गेल्या आणि ती तिथल्या पलंगावर आडवी झाली. डॉक्टर येऊन........ https://marathi.pratilipi.com/pratilipi/4739750601162752 वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शशि कपूर* शशि कपूर ( जन्म: 18 मार्च, 1938, निधन : 04 दिसम्बर 2017 ) हिन्दी फ़िल्मों के एक अभिनेता थे। शशि कपूर हिन्दी फ़िल्मों में लोकप्रिय कपूर परिवार के सदस्य थे। वर्ष २०११ में उनको भारत सरकार ने पद्म भूषण पुरस्कार से सम्मानित किया। वर्ष २०१५ में उनको २०१४ के दादासाहेब फाल्के पुरस्कार से सम्मानित किया।इस तरह से वे अपने पिता पृथ्वीराज कपूर और बड़े भाई राजकपूर के बाद यह सम्मान पाने वाले कपूर परिवार के तीसरे सदस्य बन गये। शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. शशी कपूर यांनी आतापर्यंत 160 चित्रपटांत काम केलंय. त्यात 148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1938 मध्ये कोलकातामध्ये झाला होता. 60 आणि 70 च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. मेरे पास माँ है । हे त्याचे डॉयलॉग जनता विसरू शकणार नाही. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ======== *१). सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे?* 👉 चादरीसाठी *२). गाजरामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?* 👉. अ जीवनसत्व *३). महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?* 👉 गंगापूर धरण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 विकास गणवीर, नागपूर 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤 सूर्यकांत स्वामी 👤 राज डाकोरे 👤 संतोष रामराव शिंदे 👤 अशोक चिंचलोड, येवती, 👤 राजेश गटालावार 👤 राजू अलमोड 👤 योगेश पडोळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *भेव* कोणावर ठेवावी श्रद्धा कोणाला मानावे देव सभ्य माणसांचही आता वाटू लागलंय भेव सभ्य माणसांनी तरी का आपली सभ्यता सोडावी आपण का म्हणून किती कोणापुढे हातं जोडावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....* *माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...* *काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!* *"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"* ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून शांतपणे किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याचं किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला हर्षोल्हासित करतात. अशाच पध्दतीने मानवी मनाचेही तसेच आहे. काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चांगल्या चालत असलेल्या जीवनाला नुकसानच करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासार विचार पूर्वक निर्णय घेतले तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल. असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवन सुखावह जगले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *शब्दांचा डोंगर 📖* या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम एक शब्द दिला जातो. नंतर त्या शब्दास अनुसरन खालील प्रत्येक ओळीत एकेक शब्द / शब्दसमुह क्रमाने वाढवण्यास सांगणे. यावेळी विद्यार्थ्यांकडून खुप मोठ्या शब्दडोंगराची अपेक्षा करु नका. सुरुवातीला 3 ते 4 ओळींचा झाला तरी चालेल. मात्र हळूहळू तो वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. उदाहरणार्थ ✅आंबा ✅आंबा खातो. ✅रमेश आंबा खातो. ✅ रमेश गोड आंबा खातो. रमेश हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. ✅रमेश दररोज हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. ✅रमेश दररोज सकाळी हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नक्कल नाही ;अनुकरण करावे* सातवीतला तनिष हा नक्कला चांगल्या करायचा .मित्रांच्या बोलण्याच्या लकबी,शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे.शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय,पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . तनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षक दिनादिवशी सगळी मूल वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते.तनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठीगेला.त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या . फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवतानात्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .तनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ,याचा विचारच त्याने केला नव्हता .सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली. त्यावेळी तनिषच्या मनात एक गोष्ट पक्की रुजली की सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते .कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो .अन्यथा आपण केवळ एखाद्या व्यक्तीची नक्कल करू शकतो .पण त्या व्यक्तीसारखे श्रेष्ठ बनू शकणार नाही. तेव्हापासून तनिष चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यावर भर देऊ लागला . 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 *नमस्काराचे महत्व* 🙏 महाभारताचे युद्ध सुरु होते. दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की, "मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन" त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, "माझ्या सोबत चल". द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की, आत जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच, "अखंड सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की, "वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस?" "माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत" असे द्रोपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म म्हणाले, "माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करु शकतात" शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रोपदीला म्हणाले की, "बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले, हे तुझ्या लक्षात आले का?" जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर हि युद्धाची वेळच आली नसती" अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती! तात्पर्य, वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की, कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. 🙏 कारण - नमस्कारात प्रेम आहे नमस्कारात विनय आहे नमस्कारात अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कारात शीतलता आहे नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो नमस्कार आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे 🙏🙏🙏 🙏 सर्वांना सादर प्रणाम 🙏 (संकलीत व अनुवादित)
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक अपंग दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ : ओखी चक्रीवादळाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची केंद्र सरकारकडे मागणी* ----------------------------------------------------- 2⃣ *'ओखी’मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन, मुंबईत आकाश ढगाळ राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत या शाळा स्थलांतरित होत असल्याने, या शाळांमधील शिक्षकांच्या नोक-यांवर व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार नाही, असे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांची राज्याचे नेत्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून याबाबतची घोषणा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात केली.* ----------------------------------------------------- 5⃣ *हॉकी वर्ल्ड लीग फायनल 2017 - भारताचा 2-3 ने इंग्लंडकडून पराभव.* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुस-या शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर लंकेविरुद्ध ४ बाद ३७१ धावा उभारल्या.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. राजेंद्र प्रसाद *२) घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर *३) घटना समितीची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *" विचाराने "* कोणी कोणाच्या मागे तर कोणी सोबत आहे तू त्याच्या सोबत कसा कोणाची काय बाबत आहे सोबत असो की नसो ते विचाराने रहातात सगळं काही विचाराने वाटून वाटून खातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जमीवरुन सरपटणारा कोणताही साप कधीही सरळ चालत नाही तो वाकडातिकडा चालत ( सरपटत) असतो.त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली काही दुष्टप्रवृत्तीची माणसे वावरत असतात.त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगा ते कधीच तुमचे ऐकून घेत नाहीत.ते आपलेच खरे मानतात.आम्ही जे काही करतो ते चांगलेच करतो असे समजून सामान्य लोकांना त्रास देतात.तर अशा लोकांपासून दूर राहणे केव्हाही चांगलेच.अशांची मैत्री कधीही करू नये.कारण यांची जातच सापासारखीच असते ते केव्हाही उलटू शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे चटकन शिकणे* वर्गातील मुलांना नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे जसे प्र,ऋ,ष्ट्र,ट्र यांसारखे इतर अक्षरे अवघड वाटतात. किंवा लक्षात राहत नाही. म्हणून शाळा सुटते वेळी मुले जेव्हा अभ्यासातून बाहेर पडतात. तेव्हा दररोज फळ्यावर एक एक अक्षर लिहून देणे त्याचे वाचन घेणे. व घरी जाईपर्यंत लक्षात ठेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा तो लिहून वाचन करण्यास सांगणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणीवपूर्वक ते अक्षर विचारून, लिहून घेणे. दैनंदिन अभ्यासात मार्गदर्शन करून मूल्यमापन करावे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते. नवीन अक्षर शिकल्यानंतर आनंदी होतात. वाचण्याचा प्रयत्न करतात. कामात गुंतून राहतात. हा उपक्रम दररोज चालू ठेवा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शर्यत* एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ. सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची. माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते. लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल. पण बेडूक काही ऐकत नाहीत. स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’ तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात. टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल. एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात. एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो. वर जाऊन पाहतो. ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो. लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात. हे घडलं कसं? तो बेडूक खाली उतरतो. सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी? तरी तू डबकं कसं काय सोडलंस? तो बेडूक काहीच बोलत नाही. तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही. सगळे गप्प होतात.. त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, *टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.* इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल? यातून जमेल तर काहीतरी शिका..........प्रगती करताना लोकांच्या म्हणन्याकडे लक्ष देऊ नका. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त " शक्ती " असून चालत नाही , तर त्याला " सहनशक्तीचीही जोड असावी लागते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/12/2017 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक एड्स निर्मूलन दिवस* *लोकशिक्षण दिन (भारत)* 💥 ठळक घडामोडी :- १८३५ - हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित. १९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले. १९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना. १९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली. 💥 जन्म :- १८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. १९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा. १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दिल्ली- रस्ते अपघात रोखण्यासाठी समिती गठन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्या जाणा-या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी यलो फेम गौरी गाडगीळची निवड करण्यात आली* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि जोरदार वा-यासोबत तामिळनाडू आणि केरळ धडक मारणा-या ‘ओखी’ चक्रीवादळात 8 जणांचा मृत्यू, शाळा, महाविद्यालये बंद* ----------------------------------------------------- 4⃣ *पंजाब- लुधियाना- संगरुर भागाला आज संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का* ----------------------------------------------------- 5⃣ *पिंपरी चिंचवड : जागतिक एड्स दिनानिमित्त नॅशनल एड्स रिसर्च सेंटर भोसरी येथे विविध संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून एड्स विरोधी जनजागृती केली* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : शिवाजी सावंत लिखित पुस्तकाच्या मराठी प्रकाशनाचे सर्व अधिकार कॉंटिनेंटलकडे कायम, साडेपाच वर्षांनंतर लवाद मंडळाचा निर्णय.* ----------------------------------------------------- 7⃣ *वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपः भारताच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त प्रासंगिक लेख *खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय* संपूर्ण जगात 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘एड्स’ हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना काळीज धस्स करते. हा रोग कुणाला झाला असे कळले की अंगावर काटे उभे राहतात आणि त्या रुग्णला वेगळ्या नजरेने पाहिले जाते.पूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सर हा सर्वांत भयानक रोग असे मानले जात असे. कॅन्सर म्हणजे माणूस कॅन्सल असे बोलले जायचे. मात्र जसे ही ‘एड्स’ विषयी लोकांना कळायाला लागले तसे................ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/a-i-d-s.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाळ सीताराम मर्ढेकर* बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. सौंदर्य आणि साहित्य'साठी इ.स. १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) जागतिक एडस दिन कधी साजरा केल्या जातो?* 👉 १ डिसेंबर *२) एडस हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?* 👉 एच आय व्ही *३) भारतात एडसचा पहिला रुग्ण कधी सापडला?* 👉 १९८६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्यामसुंदर दरबस्तेवार, सहशिक्षक 👤 हेमंत बेंडे, सहशिक्षक, रातोळी 👤 मारुती गिरगावकर, सहशिक्षक 👤 विठ्ठलराव मुजळगे, सहशिक्षक 👤 राजकुमार दाचावर, सहशिक्षक 👤 श्याम नरवाडे 👤 योगेश पाटील जायशेट, धर्माबाद 👤 शिवाजी पुरी 👤 मारोती दिंडे 👤 सुभाष सोनटक्के 👤 श्रीकांत लाडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *अक्कल* नक्कल करायलाही अक्कल असावी लागते नकलेतूनही काही हुशारी दिसावी लागते अंगात हुशारी असेल तर नक्कल करता येते नक्कल करून कोणालाही नकलाकार ठरता येते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोणत्याही परिस्थितीत आपण धीर सोडू नये. आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या किंवा अडथळे आले तरी आपण खचून जाऊ नये. कारण परमेश्वर नेहमीच आपल्याबरोबर असतो. सुभक्तिचे जीवन जगणे म्हणजे परमेश्वराबरोबरचे आपले नाते काय आहे हे ओळखून असणे. ज्या गोष्टींना जगात मान्यता मिळते, त्या सगळ्या आपणही केल्या पाहिजेत असे नाही. आपल्या भोवतीचे लोक ज्या मार्गाने चालले आहेत तोच मार्ग आपणही निवडला पाहिजे असे नाही.* *आपले विकल्प, आपले विचार निराळे असू शकतात. आपले आचरण वेगळे असू शकते. सुभक्तिशील जीवनात समाधान प्राप्त होते. बंधुप्रेमाचा अर्थ हा की, यशाचे ध्येय गाठण्यासाठी आपण स्वार्थी होऊ नये. आपल्या सामाजिक, कौटुंबिक जबाबदा-या आपण विसरू नयेत. व्यक्तिमत्वाचा विकास पूर्ण होतो तो प्रीतीमध्ये. प्रीतीशिवाय आपण काहीच नाही, म्हणून असे म्हटले आहे की, शेवटी प्रीती ही सर्वश्रेष्ठ ठरते.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे मधमाश्या प्रत्येक फुलातील एक एक मध जमा करून मधाचे पोळे तयार करते. त्यामागे त्यांची शोधनवृत्ती आणि चिकाटी हा गुण अत्यंत महत्त्वाचा घेण्यासारखा आहे हे विसरुन चालणार नाही. माणसाने सुद्धा कितीही जीवनात खडतर प्रवास असलातरी न घाबरता जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास आपल्यापासून यश दूर जात नाही असे समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *चित्रांचा वापर करुन खेळ घेणे.* सलग तीन दिवस मुलांना चित्र शब्द कार्ड वाचन घ्यावे. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्यावे. सर्वांस शब्दकार्ड वाटावे व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवावे. चित्र शब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्यावे. अशीच सर्व चित्र शब्द कार्ड शोधण्याचा सराव घ्यावा. शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे असा खेळ घ्यावा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची* एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले. समोर हजारो लोक बसलेले होते. तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्यासाठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली. जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त वीस लोक असतांना का दिली ? तथागतांनी खुप छान उत्तर दिले, "ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसापर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले. परन्तु जे मला फक्त बघण्यासाठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले. मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आणणारे अनुयायी हवेत. म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला." *बोध : जो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही. किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.* 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝 संकलन* 📝 संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/11/2017 वार - गुरुवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीमद्भगवत गीता जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. १९३५ - आनंद यादव, मराठी लेखक. 💥 मृत्यू :- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *कोपर्डी प्रकरणातील तिन्हीही दोषींना फाशीची शिक्षा. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे सह भवाळ, भैलुमेला फाशीची शिक्षा.* ----------------------------------------------------- 2⃣ *कोपर्डीच्या निकालानंतर पीडितेला न्याय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. उज्ज्वल निकम यांचं केलं अभिनंदन.* ----------------------------------------------------- 3⃣ *शिर्डीच्या साई संस्थानासाठी दोन महिन्यात नवे विश्वस्त मंडळ स्थापन करा - न्यायालय* ----------------------------------------------------- 4⃣ *राज्यात थंडीचा कडाका वाढला. निफाडला आत्तापर्यंत सर्वात कमी 9.6 तापमानाची नोंद. तर नाशिकमध्ये 10.8, मालेगावात 13.6 आणि वर्ध्यात 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद* ----------------------------------------------------- 5⃣ *मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत 24 आणि 25 डिसेंबर ला भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती* ----------------------------------------------------- 6⃣ *ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी महसूल विभागाने पालघर येथे पार पडलेल्या कोकण विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक* ----------------------------------------------------- 7⃣ *बीसीसीआयने अनौपचारिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची 10 नंबरची जर्सीची केली निवृत्ती* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. जगदीशचंद्र बोस* पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडेएकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ========= *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २०२० साली होणारे ऑलिंपिक कोणते देशामध्ये होणार आहेत?* 👉 जपान *२) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?* 👉 झेलम *३) हेमाडपंत या मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?* 👉 यादवांचा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली 👤 राजेश्वर येवतीकर, येवती 👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा 👤 रवी बुगावार, धर्माबाद 👤 देविराज पिंगलवार, भोकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ========= *!!! @@ गुगली @@ !!!* =========ஜ۩۞۩ஜ========= *भाषा* कधी रागाची कधी लोभाची भाषा आहे लोभाची भाषा बोलली म्हणजे आशा आहे आशा असली म्हणजे बरोबर बदलते भाषा भाषा बदल करते ती मानवी मनाची आशा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *नव्वदीनंतर जन्माला आलेली आजची तरूण पिढी प्रामुख्याने घरातील विभक्त कुटुंबपद्धतीत वाढली. एकुलतं एक मूल असणं आणि आई-वडिल दोघांचीही नोकरी या विशिष्ट रचनेमुळे पालकांच्या सर्व आशा आणि प्रयत्न त्या एकट्या मुलावर केंद्रित झाले. ज्याचा मोठा परिणाम त्या लहान मुलाच्या मानसिकतेवर, किंबहुना व्यक्तिमत्वावर झाला. परिक्षेतील यशामुळे झालेल्या कोडकौतुकानं त्या मुलाला जसं प्रोत्साहित केलं; तसंच काही प्रमाणात कधीतरी किंवा बरेच वेळा अपयशाला सामोरं जावं लागल्यास होणारा अस्विकार किंवा त्रास लहान वयातच खच्चीकरण करणारा ठरला. नकाराचा स्विकारही ही पिढी सकारात्मकतेने करते का ? हे सुद्धा महत्वाचे आहे.* *यश मिळविल्यानंतर कोडकौतुकाला सातत्यानं सामोरी गेलेली एकुलती एक मुलगी वैवाहिक आयुष्यात तेच यश चाखेल असं नाही. तिच्या सतत 'परफेक्ट' बनण्याच्या धडपडीत ती जास्त आग्रही किंवा दुराग्राहीसुद्धा होऊ शकेल. आजची पंचविशीत असलेली पिढी खरंच स्वत:ला, स्वत:च्या भावना आणि दृष्टीकोन यांना ओळखते का ? बरेचदा भौतिक सुखाच्या मागे लागून माझा पगार, माझं कुटुंब आणि मी यातच त्यांच जीवन गुरफटताना दिसतं त्यांच करिअर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर अतिक्रमण तर करत नाही ना ? आजच्या जमान्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा 'व्हर्च्युअल डायलाॅग' आधिक वाढतोय. पण तो खराखुरा संवाद आहे की वेगळंच काही ? हे स्वत:शी तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात यश आणि अपयश हे आपल्या कर्मानुसार अथवा कृतीनुसार मिळत असते.जर तुम्ही तुमच्या निवडलेल्या कामात मन लावले आणि एकाग्रता ठेवली तर ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडले जाऊ शकते. त्याबरोबरच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.जर का तुम्ही कामात कामचुकारपणा केला की,नक्की समजून घ्या तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे. म्हणून यश अपयश मिळवणे हे आपल्या करणा-या ब-यावाईट कर्मानुसार मिळत असते.मग आपणच ठरवावे की,आपण जीवनात यशस्वी व्हायचे की अयशस्वी ..! *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजची काव्यसरिता 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *वात्सल्याचा कणा* (८क्षरी) आई माहेराची शक्ती देई जगण्याला बळं.. लेख सुखात नांदावी तिच्या आसवांची गळं.. माझ्या सुखाचा विसावा तिचा फाटका पदरं... डोळे भरून निरोप, मनी दगडाचा भारं... हक्क आईचा जेवढा देते वटीच भरून... माझ्या संसाराची चिंता आई सारते दुरून. . लेख हसावी ,रूसावी सौख्य भरून दिसावी.. भोग सासरी सोसत कूसं उजळून यावी.. डोळे भरले पाहून तिचा हात तोंडावर... नको रडू सातीसांजी पाणी कुंकू वाटावर... जीव लाव लेकरांना सांगे ममतेचा पान्हा... माय लेकीच्या नात्याने जगी वात्सल्याचा कणा... (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या *शेतीमाती* संग्रहातून..) ✍🏻 अशोक क. गायकवाड पारळकर, वैजापूर, औरंगाबाद 8390795676 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 📱 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
➰〰➿〰➰ *'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!* आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे! *'ळ' अक्षर नसेल तर* पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी तीळगूळ कसा खाणार ? टाळे कसे लावणार ? बाळाला वाळे कसे घालणार खुळखुळा कसा देणार घड्याळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार ? घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार वेळ पाळणार कशी ? मने जुळणार कशी ? खिळे कोण ठोकणार ? तळे भरणार कसे ? नदी सागरला मिळणार कशी ? मनातली जखम भळाभळा वाहणार कशी हिवाळा,उन्हाळा, पावसाळा नाही उन्हाच्या झळा नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा ! कळी कशी खुलणार ? गालाला खळी कशी पडणार ? फळा, शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा सगळे सारखे, कोण निराळा? दिवाळी, होळी सणाचे काय ? कडबोळी,पुरणपोळी ओवाळणी पण नाही ? तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ? भोळा सांब , सावळा श्याम जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ? मातीची ढेकळे नांगरणार कोण? ढवळे पवळे बैल जोततील कोण? पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ? निळे आकाश, पिवळा चाफा माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा ! नारळ, केळ, जांभूळ, आवळा, नवर्याला बावळट बोलणार कसे काळा कावळा, पांढरा बगळा ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा अळी मिळी गुपचिळी, बसेल कशी दांतखिळी? नाही भेळ, नाही मिसळ नाही जळजळ नाही मळमळ नाही तारुण्याची सळसळ पोळ्या लाटल्या जाणार नाहीत टाळ्या आता वाजणार नाहीत ! जुळी तीळी होणार नाहीत ! बाळंतविडे बनणार नाहीत ! तळमळ कळकळ वाटणार नाही ! काळजी कसलीच उरणार नाही ! पाठबळ कुणाचे मिळणार नाही सगळेच बळ निघून जाईल, काळ आला होता पण वेळ आली नव्हती *पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !* ळ अक्षराची महती सांगणारा लेख .संकलित
संकलन
81) forth - पुढे, बाहेर fourth - चौथा 82) ear - कान , धान्याचे कणीस year - वर्ष 83) air - हवा heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी 84) yes - होय ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात 85) red - लाल read - वाचले ( read चे भूतकाळी रूप) raid - अचानक केलेला हल्ला 86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे 87) ball - चेंडू bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे 88) team - संघ teem - मुसळधार पाऊस कोसळणे 89) check - तपासणे, ताबा, अडथळा cheque - धनादेश, चेक 90) pen - लेखणी , खुराडे pain - दु:ख, वेदना pane - काचेचे तावदान 91) not - नाही knot - गाठ 92) naughty - खोडकर knotty - अवघड, गहन 93) miner - खाणकामगार minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा 94) vacation - सुट्टी vocation - व्यवसाय 95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख plain - मैदान, सपाट पृष्ठभाग 96) date - तारीख , खजूर debt - (डेट) - कर्ज,ॠण 97) wine - दारू, मद्य vine - द्राक्षांचे वेल 98) site - खुली जागा, स्थळ sight - दृष्टी 99)mill - चक्की, गिरणी meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण 100 ) well - विहीर wail - आक्रोश wale - चाबकाचा, छडीचा वळ 101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त दिलेली मेजवाणी, विवाहोत्सव bridle - ब्राईडल - घोड्याचा लगाम 102) price - प्राईस - किंमत prize - प्राईझ - बक्षिस 103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या टोकाचा भाग tow - टो - साखळीने ओढणे 104)rest - रेस्ट - आराम wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे 105)men - मेन - माणसे main - मेन - मुख्य mane - मेन - आयाळ, मानेवरील केस 106) desert - वाळवंट, ओसाड प्रदेश dessert - जेवणानंतरचा फलाहार, मिष्टान्न 107) counsel - उपदेश, सल्ला council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ 108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका coarse - जाडेभरडे 109) duel - द्वंद्वयुद्ध dual - दुहेरी, संयुक्त 110) bell - बेल, घंटा belle - सुंदर तरूणी bale - गठ्ठा bail - जामीन, क्रिकेट खेळातील स्टंपवरील बेल 111) grin - दात काढून हसणे, दात विचकणे green - हिरवा 112) shed - छप्पर shade - सावली, छाया 113) illegible - वाचण्यास अवघड eligible - पात्र, लायक 114) canon - चर्चने केलेला कायदा cannon - तोफ (जुन्या प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे 115) corps - लष्करी तुकडी corpse - प्रेत 116) hart - हार्ट - हरण( नर) heart - हार्ट - हृदय hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा 117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा कारखान्यातील कर्मचारी वर्ग 118) fever - फिव्हर - ताप, ज्वर favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव 119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान 120)physic - फिझिक - औषध physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी 121)umpire - अम्पायर - पंच empire - एम्पायर - साम्राज्य 122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी 123) am - आहे yam - रताळे 124) don - सभ्य गृहस्थ dawn - पहाट 125) role - रोल - भूमिका roll - रोल - गुंडाळणे 126) pip - पिप - संत्री मौसंबी सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची ठिपका, फाशांवरील ठिपका peep - पीप - डोकावून पाहणे 127) nice - नाईस - छान niece - नीस - भाची , पुतणी 128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील केस fir - फर - देवदार वृक्ष 129) hill - हिल - टेकडी heel - हील - टाच heal - हील - जखम भरून आणणे, रोगमुक्त करणे 130) be - बी - असणे , होणे, घडणे bee - बी - मधमाशी 131) eight - एट - आठ ate - एट- खाल्ले ( eat चे भूतकाळी रूप) yet - येट - अद्यापपर्यंत 132) each - ईच - प्रत्येक itch - इच - खाज, खरूज etch - एच - कोरणे 133) fist - फिस्ट - मूठ feast - फीस्ट - मेजवाणी 134) pull - पुल - ओढणे, खेचणे pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह 135) sick - सिक - आजारी seek - सीक - शोधणे, सापडविणे 136) which - विच - कोणता? कोणती? कोणते? witch - विच - चेटकीण, जादुगारीण 137) met - मेट - भेटला mate - मेट - मित्र, सोबती, मात करणे 138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे.
*English उच्चारसाधर्म्य शब्द •●--- Homophones* 1) fair - यात्रा, गोरा, fare - भाडे 2) week - आठवडा, wick - बत्ती , काकडा , weak - अशक्त 3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी sell - विकणे sail - तरंगत जाणे 4) celler - तळघर seller -विक्रेता 5) once - एकदा one's - एखाद्याचा 6) sit - बसणे seat - आसन 7) wet - ओला weight - वजन wait - वाट पाहणे 8) test - चाचणी taste - चव 9) roe - मृगी , हरिणी ( मादी) row - रांग , ओळ।, वल्हवणे raw - कच्चा 10) feet - पाऊले fit - योग्य feat - पराक्रम , योग्यता 11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप) throne - सिंहासन 12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप) hailed - जयजयकार केला 13) career - व्यवसाय carrier - वाहून नेणे 14) our - आमचा, आमची , आमचे hour ( अवर) तास 15) bare - उघडा bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट bear - अस्वल , सहन करणे 16) road - रस्ता rod - गज, दांडा rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ) 17)meat - मटण meet - भेटणे 18)leave - सोडणे live - राहणे 19)piece - तुकडा peace - शांतता 20)hail - गारा, अभिवादन hale - तगडा, स्वस्थ hell - नरक 21) principle - तत्त्व principal - प्राचार्य 22) manager - व्यवस्थापक manger - गव्हाण , गोठा 23) letter - पत्र, अक्षर later - नंतर 24) dip -बुडविणे, बुडणे deep - खोल 25) quite - अगदी, जोरदार quiet - शांत quiot - लोखंडी कडी 26) deed - कृत्य did - केले 27) expect - अपेक्षा करणे aspect - पैलू, स्वरूप 28) feel - वाटणे, स्पर्श करणे fill - भरणे 29) floor - जमीन flour- पीठ flower - फूल 30)waste - रद्दी, वाया गेलेले waist - कमर , कंबर west - पश्चिम vest - बनियन 31) fell - पडणे fail - नापास 32) story - गोष्ट storey- मजला 33) slip - घसरणे sleep - झोपणे 34)in - आत, मध्ये inn - खानावळ yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे 35) whole - संपूर्ण hole - छिद्र vole - उंदराच्या जातीचा प्राणी 36)hit - टोला मारणे heat - उष्णता 37) of - चा, ची चे off - बंद करणे 38) self - स्वत:चा shelf - मांडणी , फडताळ 39) sheep - मेंढी ship - जहाज sheaf - गवताची पेंढी 40) beat - मारणे , पराभूत होणे bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप) beet - चुकंदर a bit - थोडेसे 41) wander - भटकणे wonder - आश्चर्य 42) rich - श्रीमंत reach - पोहचणे 43) deed - कृत्य did - केले 44) so - म्हणून, इतका, तर, sow - पेरणे saw - पाहिला, करवत 45) rain - पाऊस reign - शासन , राज्य rein - लगाम wren - रेन पक्षी ( युरोप) 46) lives - राहतो leaves - पाने, सोडून जातो 47) liver - यकृत lever - तरफ 48) tent - तंबू taint - कलंक , दोष 49) wedge - पाचर, wage -पगार, वेतन, खंड 50 ) neat - व्यवस्थित nit - लीख knit - विणणे 51) list - यादी least - कमीत कमी, किमान 52) horde - भटकी जमात hoard - साठा करणे , 53) jealous - मत्सरी zealous - उत्साही 54) metal - धातू , रूळ mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती 55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने too - सुद्धा two- दोन 56) lip - ओठ leap - उडी मारणे 57) sun - सूर्य son - पुत्र, मुलगा 58) pray - प्रार्थना prey - भक्ष्य 59) dear - आदरणीय, प्रिय deer - हरिण 60) root - मूळ route - मार्ग 61)full - पूर्ण भरलेला fool - मूर्ख 62) sum - रक्कम , बेरीज some - काही , थोडे 63) lesson - धडा , पाठ lessen - कमी करणे 64) night - रात्र knight - सरदार 65) sin - पाप seen - पाहीले scene - दृश्य, देखावा 66) gate - फाटक get - मिळणे, मिळवणे gait - चाल ( चालण्याची पद्धत) 67) male - पुरूष mail - टपाल, कवच 68) higher - अधिक उंच hire - हप्ता , भाड्याने घेणे 69) let - परवानगी देणे late - उशीर 70) tell - सांगणे tale - गोष्ट tail - शेपूट 71) new - नवा knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप) 72) bore - छिद्र करणे boar - रानडुक्कर 73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष voice - आवाज , प्रयोग 74) thirst - तहान thrust - खुपसणे 75) steel - पोलाद steal - चोरणे still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध 76) addition - वाढ, बेरीज edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप 77) chick - पक्ष्याचे पिल्लू cheek - गाल 78) it - तो, ती ते eat - खाणे 79) stationery - लेखन साहित्य stationary - स्थिर , न हलणारा 80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक, घडयाळाचा टक् टक् असा आवाज, टक् टक् असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत teak - सागवाणी लाकूड, साग tic - स्नायू आखडणे
81) forth - पुढे, बाहेर fourth - चौथा 82) ear - कान , धान्याचे कणीस year - वर्ष 83) air - हवा heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी 84) yes - होय ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात 85) red - लाल read - वाचले ( read चे भूतकाळी रूप) raid - अचानक केलेला हल्ला 86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे 87) ball - चेंडू bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे 88) team - संघ teem - मुसळधार पाऊस कोसळणे 89) check - तपासणे, ताबा, अडथळा cheque - धनादेश, चेक 90) pen - लेखणी , खुराडे pain - दु:ख, वेदना pane - काचेचे तावदान 91) not - नाही knot - गाठ 92) naughty - खोडकर knotty - अवघड, गहन 93) miner - खाणकामगार minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा 94) vacation - सुट्टी vocation - व्यवसाय 95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख plain - मैदान, सपाट पृष्ठभाग 96) date - तारीख , खजूर debt - (डेट) - कर्ज,ॠण 97) wine - दारू, मद्य vine - द्राक्षांचे वेल 98) site - खुली जागा, स्थळ sight - दृष्टी 99)mill - चक्की, गिरणी meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण 100 ) well - विहीर wail - आक्रोश wale - चाबकाचा, छडीचा वळ 101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त दिलेली मेजवाणी, विवाहोत्सव bridle - ब्राईडल - घोड्याचा लगाम 102) price - प्राईस - किंमत prize - प्राईझ - बक्षिस 103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या टोकाचा भाग tow - टो - साखळीने ओढणे 104)rest - रेस्ट - आराम wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे 105)men - मेन - माणसे main - मेन - मुख्य mane - मेन - आयाळ, मानेवरील केस 106) desert - वाळवंट, ओसाड प्रदेश dessert - जेवणानंतरचा फलाहार, मिष्टान्न 107) counsel - उपदेश, सल्ला council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ 108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका coarse - जाडेभरडे 109) duel - द्वंद्वयुद्ध dual - दुहेरी, संयुक्त 110) bell - बेल, घंटा belle - सुंदर तरूणी bale - गठ्ठा bail - जामीन, क्रिकेट खेळातील स्टंपवरील बेल 111) grin - दात काढून हसणे, दात विचकणे green - हिरवा 112) shed - छप्पर shade - सावली, छाया 113) illegible - वाचण्यास अवघड eligible - पात्र, लायक 114) canon - चर्चने केलेला कायदा cannon - तोफ (जुन्या प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे 115) corps - लष्करी तुकडी corpse - प्रेत 116) hart - हार्ट - हरण( नर) heart - हार्ट - हृदय hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा 117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा कारखान्यातील कर्मचारी वर्ग 118) fever - फिव्हर - ताप, ज्वर favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव 119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान 120)physic - फिझिक - औषध physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी 121)umpire - अम्पायर - पंच empire - एम्पायर - साम्राज्य 122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी 123) am - आहे yam - रताळे 124) don - सभ्य गृहस्थ dawn - पहाट 125) role - रोल - भूमिका roll - रोल - गुंडाळणे 126) pip - पिप - संत्री मौसंबी सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची ठिपका, फाशांवरील ठिपका peep - पीप - डोकावून पाहणे 127) nice - नाईस - छान niece - नीस - भाची , पुतणी 128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील केस fir - फर - देवदार वृक्ष 129) hill - हिल - टेकडी heel - हील - टाच heal - हील - जखम भरून आणणे, रोगमुक्त करणे 130) be - बी - असणे , होणे, घडणे bee - बी - मधमाशी 131) eight - एट - आठ ate - एट- खाल्ले ( eat चे भूतकाळी रूप) yet - येट - अद्यापपर्यंत 132) each - ईच - प्रत्येक itch - इच - खाज, खरूज etch - एच - कोरणे 133) fist - फिस्ट - मूठ feast - फीस्ट - मेजवाणी 134) pull - पुल - ओढणे, खेचणे pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह 135) sick - सिक - आजारी seek - सीक - शोधणे, सापडविणे 136) which - विच - कोणता? कोणती? कोणते? witch - विच - चेटकीण, जादुगारीण 137) met - मेट - भेटला mate - मेट - मित्र, सोबती, मात करणे 138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे.
Subscribe to:
Posts (Atom)