✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_31.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_••••• नूतन वर्षाभिनंदन २०२४ •••••_**_धूम्रपान विरोधी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील पहिला दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.**१९३२:डॉ.ना.भि.परूळेकर यांनी 'सकाळ'वृत्तपत्र हे सुरू केले.**१९१९:गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.**१९०८:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.**१९००:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.**१८९९:क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.**१८८३:पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना**१८८०:विष्णूशास्त्री चिपळूणकर,लोकमान्य टिळक,गो.ग.आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.**१८६२:इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.**१८४८:महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.**१८४२:बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले.नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ.ना. भि.परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.**१८०८:यू.एस.ए.मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.**१७५६:निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:गणेश प्रल्हादराव आघाव-- कवी, लेखक**१९८२:धीरजकुमार रामदास नंदागवळी-- कवी**१९७६:वि.दा.पिंगळे -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७६:शेख बिस्मिल्ला शेख कासिम-- कवी**१९७४:आश्रुबा राघोजी कांबळे -- कवी,गायक**१९७३:प्रा.युवराज तानाजीराव खरात-- कवी,कथाकार,कादंबरीकार**१९७२:भारत मारोतराव दाढेल -- लेखक**१९७१:सीमा गजानन भसारकर-- कवयित्री**१९७०:हरिश्चंद्र रामचंद्र धीवार-- कवी**१९७०:प्रा.डॉ.सुनील रामटेके--- कवी,लेखक* *१९६९:डॉ.काशीनाथ विनायक ब-हाटे -- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९६८:प्रा.डॉ चंद्रकांत वाघमारे-- प्रसिद्ध लेखक* *१९६८:राजेश गोरखशेठ सोनार (अहिरराव)-- कवी* *१९६६:प्राचार्य वसंत माणिकराव बिराजदार-- प्रसिद्ध लेखक**१९६२:संजय आर्वीकर- प्रसिद्ध लेखक,कवी, समीक्षक* *१९६०:डॉ.सुरेश गोविंदराव सावंत-- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक,विविध पुरस्काराने सन्मानित**१९५९:नंदन नांगरे -- लेखक, तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५५:शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील-- शाहीर,लेखक**१९५२:यशवंत राजाराम निकम-- प्रसिद्ध लेखक निवृत्ती शिक्षणाधिकारी* *१९५१:नाना पाटेकर – सुप्रसिद्ध अभिनेता**१९५१:शंकर गोविंदराव पांडे-- लेखक**१९५२:शाजी नीलकांतन करुण-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर**१९५०:तुकाराम सीताराम ढिकले--कवी**१९५०:दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका**१९५०:राहत इंदोरी -राहत कुरेशी-- भारतीय बॉलीवूड गीतकार आणि उर्दू कवी(मृत्यू:११ऑगस्ट २०२०)**१९४८:नानासाहेब चिमणराव बोरस्ते-- संवेदनशील कवी,वक्ते,माजी आमदार**१९४८:नामदेव चंद्रभान कांबळे-- मराठी साहित्यिक,पत्रकार,साहित्य अकादमी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९४६:जगन्नाथ सोनू नहिरे-- कवी* *१९४६:डॉ.निवास पांडुरंग पाटील-- गणितज्ज्ञ, खगोल विषयाचे अभ्यासक,लेखक**१९४५:प्राचार्य डॉ.विठ्ठल भिकाजी वाघ-- सुप्रसिद्ध कवी आणि लेखक* *१९४५:मारुती हरिभाऊ दाढेल -- लेखक, दलित मित्र पुरस्कार**१९४३:रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक,पद्मश्री,पद्मभूषण**१९४३:मधुकर रूपराव वाकोडे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. लोकसाहित्याचे अभ्यासक-संशोधक, समीक्षक**१९४२:उत्तम बंडू तुपे--- मराठी साहित्यिक (मृत्यू:२६ एप्रिल २०२०)**१९४१:गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार**१९३६:राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू:२१ जुलै १९९७)**१९२८:डॉ.मधुकर आष्टीकर – लेखक,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)**१९२३:उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू:२४ नोव्हेंबर २००३)**१९१८:शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू:९ ऑगस्ट २००२)**१९०२:कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू:६ डिसेंबर १९७१)**१९००:श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू:१४ फेब्रुवारी १९७४)**१८९४:सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:४ फेब्रुवारी १९७४)**१८९२:महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू:१५ ऑगस्ट १९४२)**१८७९:इ.एम.फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू:७ जून १९७०)**१८७८:हसरत मोहानी-- थोर स्वातंत्र्य सेनानी,उर्दू शायर(मृत्यू:१३ मे १९५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:रामाश्रेय झा – संगीतकार,वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म:११ ऑगस्ट १९२८)**१९८९:दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार**१९७५:शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक,साहित्यिक व चित्रकार.(जन्म:८ आक्टोबर १८९१)**१९५५:डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म:२१ फेब्रुवारी १८९४)**१९४४:सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म:२९ मार्च १८६९)**१८९४:हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२२ फेब्रुवारी १८५७)**१७४८:योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म:२७ जुलै १६६७)**_ २०२४ नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, आशा आकांक्षा पार करणारे जावो करिता मनापासून नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवीन वर्ष सुखाचे जावो*मित्रांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ, राज्यभर राबवणार ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ अभियान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश:गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार':पुण्यातील 'स्व'-रूपवर्धिनीच्या पुष्पा नडे आणि आम्रपाली उत्कर्ष संघ नागपूर यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा पहिल्या टप्याचं समारोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तामिळनाडूमधील पूरग्रस्तांना भारतीय हवाई दलाने केली मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उदगीर : क्रीडा विभागाच्या वाढीव तरतुदीने क्रीडा चळवळ प्रगल्भ होणार - क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐜 *मुंग्या* 🐜 ***************एखादा साखरेचा कण पडलेला असो किंवा उघडा अन्नपदार्थ तसाच राहिलेला असो, घर कितीही स्वच्छ असो किंवा कितव्याही मजल्यावर आपण राहात असू दे, पदार्थ स्वयंपाकाच्या ओट्यावर असु देत वा जमिनीच्या कोपर्यात असुदे; पुरेसा वेळ गेला की, त्याला मुंग्या लागणारच ! मग त्या लाल असतील, वा काळ्या, या मुंग्या त्या पदार्थांपर्यंत वाट काढत कशा येतात, त्यांना हा पदार्थ शोधायची शक्ती कशी मिळते, याबद्दल आपण बरेचसे अंधारात आहोत. पण एक गोष्ट नक्की, ती म्हणजे अन्न मिळवण्याचे हे ज्ञान मुंग्यांना उपजतच असावे. मग ते इतक्या विविध पद्धतीचे असू शकते की, आपली विचारशक्ती कुंठीत व्हावी. विविध प्रकारची बुरशी जशी त्यांना चालते, तसेच एखादा मेलेला प्राणीही आवडतो. साखरेप्रमाणेच दुग्धजन्य पदार्थही आवडतात, तर काहीच नसल्यास कुजलेला पालापाचोळाही काम भागवू शकतो. साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या रंगछटांच्या, पंखांशिवायच्या व पंखांच्या मुंग्या आढळतात. मुंग्यांच्या जातीतील कीटकांच्या जवळपास १४००० जाती सापडतात. इंचभर लांबीपासून जेमतेम डोळ्यांना दिसेल एवढ्या छोट्या आकाराच्या मुंग्या सापडतात. सहसा मुंग्या हा प्राणी जमिनीखाली वारुळे करूनच राहतो. दिवसभर अन्न गोळा करण्याचे काम कामकरी मुंग्या करत राहतात, तर दिवसभर अंडी घालण्याचे काम राणी मुंगी करते. ही जमिनीखालील वारुळात असते. त्या वारुळातील सर्व म्हणजे किमान लाखभर मुंग्या या तिच्याचपासून झालेल्या असतात. कामकरी मुंग्यांना अंडी घालता येत नाहीत. अन्न गोळा करणे, राणी मुंगीला संरक्षण देणे ही त्यांची कामे भल्या पहाटेच सुरू होतात, ती थेट सूर्यास्तानंतरच थांबतात. मुंग्यांच्या संदर्भात अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मुंग्यांची संदेशवहनाची पद्धत, अन्नाच्या साठ्याची दिशा शोधणे व तिकडेच येण्यासाठी निरोप देण्याची व्यवस्था करणे या क्रियांबद्दल आजही फक्त अनुमानेच बांधावी लागतात. वारूळावर हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाल्यास वा भक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना अडथळा आल्यास मुंग्या चावतात. या चाव्यामुळे त्या जागी लहानशी गांध वा फुगवटा येऊन आग होते. बराच वेळ नंतर खाजही सुटत राहते. काही मुंग्यांचा चावा हा जास्त विषारी असल्याने त्या भागात भाजल्याप्रमाणे फोड येऊ शकतात व भाग तात्पुरता बधिर होतो. एक प्रकारचे प्रथिनद्रव्य नांगीद्वारे चावा घेतल्या जागी सोडले जाते, त्यामुळे हा प्रकार होतो. सामाजिक राहणीच्या दृष्टीने मुंग्यांचे वारूळ हे कायम एक अभ्यासाचा विषय आहे. इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या मुंग्या ठराविक पद्धतीने काम करून अन्नसाठा गोळा करण्याचा अविरत उद्योग ज्या पद्धतीने करतात, तिच्यातून मानवाला काही शिकता आले तर उत्तम. जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे, जखमी झालेले सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. जखमांनी हैराण झालेला प्राणी बघता बघता या चाव्यांनी हैराण होऊन जातो. प्रसंगी चक्क मुंग्याच त्याला नष्ट करून टाकतात. मोठ्या प्राण्यांच्या कलेवरावर प्रथम गिधाडे तुटून पडतात, तरी नंतर मुंग्याच ते पूर्ण खाऊन टाकतात. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. लाल काय किंवा काळ्या काय मुंग्यांना गोड आवडते, अशी आपली समजूत ही थोडीशीच बरोबर आहे. रक्तजन्य व प्राणिज पदार्थ त्यांना जास्त आवडतात. घरात मुंग्या येत असतील व विषारी औषध मारायची नसतील, तर चिमटीभर हळद पसरून टाकावी. त्या भागात मुंग्या हळदीच्या वासाने फिरकतच नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राहूल गांधी यांच्या नेतृत्वात मणिपूर ते महाराष्ट्र दरम्यान कोणती यात्रा होणार आहे ?२) अयोध्या येथील विमानतळ आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे ?३) जगातील पहिला 'एआय' नियमन कायदा कोणता देश करणार आहे ?४) गुजरातचा पहिला केरोसीनमुक्त जिल्हा कोणता ?५) फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे ? *उत्तरे :-* १) भारत न्याय यात्रा, ६२०० किमी. ( १४ जाने. २०२४ ते २० मार्च २०२४ ) २) महर्षी वाल्मिकी विमानतळ ३) युरोपीय महासंघ ४) गांधीनगर ५) जपान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिकेत भारती, ASP, मालेगाव, नाशिक👤 सविता धर्माधिकारी, शिक्षिका👤 अशोक गायकवाड, साहित्यिक👤 अमरसिंग चौहान👤 सौ. छाया बच्चेवार, सेवानिवृत्त शिक्षिका👤 शेख बिस्मिल्ला सोनोशी, साहित्यिक👤 धोंडीबा गायकवाड, शिक्षक व कवी👤 मुकुंद जोशी, शिक्षक👤 मधुकर गिरमे👤 पांडुरंग कोकुलवार, शिक्षक व कवी👤 संजय पाटील शेळगावकर, धर्माबाद👤 सतीश शिंदे, पत्रकार, धर्माबाद👤 राजेंद्र जैस्वाल, कुपटी ता. माहूर👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी👤 सुनेत्रा बेल्लूरकर, सेवानिवृत्त शिक्षिका👤 चंद्रकांत दामेकर, शिक्षक नेते, नांदेड👤 मनमोहन कदम, मुख्याध्यापक, गुरुकुल विद्यालय धर्माबाद👤 सुरेश सावंत, बालसाहित्यिक, नांदेड👤 दिलीप धामणे, शिक्षक व कवी, हिंगोली👤 उमेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरें शोधितां शोधितां शोधिताहे। मना बोधिता बोधिता बोधिताहे॥ परी सर्वही सज्जनाचेनि योगे। बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥सरळ अर्थ:सत्याचा शोध हा शोधता शोधता लागतो तसेच त्याचा बोधदेखील त्याला समजून घेता घेताच लागतो. पण यासाठी संतसज्जनांचा संग आवश्यक आहे आणि शिवाय मनात त्या सत्याचा शोध आणि बोध घेण्याविषयीची आस्था आणि दृढ भावना असणे देखील आवश्यक आहे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ब। क्षी। स* एका राजाची गोष्ट आहे. या राजाला आपल्या मंत्र्याच्या बुद्धीचीच नव्हे तर जनतेच्या ज्ञानीपणाची परीक्षा पहाण्याची लहर यायची. एके दिवशी दरबार भरल्यावर त्याने एक प्रश्न विचारला *" ईश्वर काय करू शकतो ? "*मंत्री व इतर दरबारी लोकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे ईश्वराच्या शक्तीबद्दलची उत्तरे दिली, पण राजाचं समाधान झालं नाही, राजाचा प्रधान अतिशय नाराज झाला व तशाच अवस्थेत घरी आला.बापाची नाराजी मुलीच्या लक्षात येताच तीने त्या बद्दल विचारले. प्रधानाच्या खुलाशानंतर ती त्याला म्हणाली, 'मी उद्या दरबारात येते आणि या प्रश्नाचं उत्तर देते?." दुसऱ्या दिवशी ती दरबारात आली, "मी तुमच्या प्रश्नाच उत्तर द्यायला तयार आहे" असं तिनं राजाला सांगितलं.राजा आश्चर्यचकित झाला आणि तिला उत्तर सांगण्याची आज्ञा केली. "पण त्या साठी माझी एक अट आहे," ती म्हणाली.'कसली अट ?' राजाने विचारले . 'तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर हवं असेल तर सिंहासना वरून खाली उतरावं लागेल आणि मी जिथे बसलेय तिथे येऊन बसावं लागेल."लागलीच राजा खाली उतरला तशी प्रधानाची मुलगी सिंहासनावर जाऊन बसली. सारा दरबार स्तब्ध झाला. राजा शांतपणे ती काय म्हणते याची प्रतिक्षा करत राहिला.राजाची नजर पाहून ती म्हणाली, "महाराज! मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर केव्हाच दिले आहे !"'पण मला समजलं नाही, काय उत्तर आहे ते ?''ईश्वर काय करू शकतो, हाच तुमचा प्रश्न आहे ना ?''होय.''मग पहा, काही क्षणापूर्वी तुम्ही या सिंहासनावर विराजमान होतात आणि मी जमिनीवर होते. आता तुम्ही जमिनीवर आहात आणि मी सिंहासनावर आहे..! ईश्वर असंच करीत असतो.सिंहासनावर बसलेल्याला मुदत पूर्ण झाली की, जमिनीवर बसवतो, तसंच जमिनीवरच्याला क्षणांत सिंहासनावर बसवितो.' उत्तर ऐकून दरबार चकीत झाला. राजा अंत:करणापासून खुश झाला व म्हणाला, "मुली, मी खुश झालोय व तूला वीस हजार सुवर्ण मोहरा बक्षीस देतोय!"मुलगी निर्विकार चेहरा करून ती राजाला म्हणाली, 'बक्षीस देत्याइतकं सामर्थ्य तुमच्यात नाही, महाराज!''कां बर, मी राजा आहे ना इथला ?' 'या क्षणी मी सिंहासनावर बसली आहे, ज्याचं सिंहासन त्याचं राज्य ! आज राज्य माझेकडे आहे आणि तुमच्याकडे काहीचं नाही.व बक्षीस देण्याचे सामर्थ्य आज माझेकडे आहे !''तुमची नम्रता पाहून मीच प्रसन्न झाले आहेतुम्ही मला वीस हजार सुवर्ण मुद्रा देण्याची गोष्ट करताय, पण मी तुम्हाला हे राज्य बक्षिसा दाखल देत आहे आणि पुन्हा सिंहासनावर विराजमान होण्याची विनंती करीत आहे,,!'ती लगबग सिंहासनावरून उतरली व राजाला सन्मानाने सिंहासनावर बसविले..!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
निरोप सरत्या वर्षाला गोड,कडू आठवणीत वर्ष हे संपते सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर मन सतत झुलतेजुळत गेले नाते मैत्रीचे अन् आपुलकीचे मनाचा गाभाऱ्यात जपुयाक्षण क्षण आनंदाचेवर्षे संपता आठवणी त्या भुतकाळात जमा होतात, प्रारंभीपासून राहुयाआनंदी नववर्षाचा आगमनातप्रार्थना करते मनापासून नुतन वर्षे सर्वांना यशाचे, आनंदाचे आणि सुख समृद्धी,निरोगी आरोग्याचे जावेपूर्ण व्हावे तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना आनंदाचे क्षण नववर्षात भरभरून लाभावे तुम्हा सर्वांना देऊन निरोप सरत्या वर्षाला संकल्प नव नवे करूयाएकमेकांप्रती राग ,द्वेष विसरून सकारात्मकतेने राहूयासर्वांना नववर्षाचा शुभकामना 💐💐💐💐💐💐💐 (२०२४)➖➖➖➖➖➖➖✍️श्रीमती प्रमिला सेनकुडेता.हदगाव जि.नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/12/welcome-2024.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१मध्ये झालेल्या आखाती युद्धाच्या अखेरीस पराभूत इराकच्या सैन्याने माघार घेताना थोडेथोडके नव्हे, तर तब्बल चाळीस लक्ष पिंपे (म्हणजे सुमारे ऐंशी कोटि लिटर) तेल आखाती समुद्रात सोडून दिले. एवढ्या प्रचंड प्रमाणावरील तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने समुद्रातील हजारो किलोमीटर क्षेत्रातील संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट झाली!**१९४३:सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला**१९२४:एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.**१९०६:ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:वैशाली बाबुराव कोटंबे-- कवयित्री**१९६९:रामप्रभू सोमाजी गरमडे -- कवी**१९६०:मीनाक्षी विठ्ठलराव दरणे-वेरुळकर -- लेखिका* *१९५९:तात्याराव धोंडिराम चव्हाण -- लेखक* *१९५१:श्रीरात झिटूजी केदार-- कवी* *१९४६:डॉ.श्रीनिवास टोणपे-- प्रसिद्ध मराठी व हिंदी कवी* *१९४१:जयसिंगराव पवार-- प्रसिद्ध मराठी इतिहास संशोधक**१९३८:स्नेहलता देशमुख-- प्रसिद्ध लेखिका**१९२६:दीनानाथ लाड-- कामगार रंगभूमीवर लाड मास्तर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ दिग्दर्शक (मृत्यू:१२ ऑगस्ट २०१९)**१९२२:गोपाळ मोरेश्वर कोलते-- लेखक,कवी(मृत्यू:४ जानेवारी २००४)**१९०१:अनंत जनार्दन करंदीकर-- मराठी पत्रकार आणि राजकारण,इतिहास व खगोलशास्त्रावर लिखाण करणारे पंडित लेखक(मृत्यू:१ नोव्हेंबर १९७७)**१९०२:डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,घटनासमितीचे सदस्य,राज्यसभा खासदार,वैदिक संस्कृत, तिबेटी,चिनी,मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)**१८८२: बळीराम जनार्दन आचार्य-- अध्यात्मक पुस्तकाचे कर्ते (मृत्यू:१७ जुलै १९५०)**१८७९:वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू:१४ एप्रिल १९५०)**१८८७:डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री,हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७१)**१८६५:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू:१८ जानेवारी १९३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:मंगेश केशव पाडगांवकर-- मराठी कवी लेखक १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार(जन्म:१० मार्च१९२९)**२०१३:लक्ष्मी शंकर शास्त्री-- प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका(जन्म:१६ जून १९२६)**२००६ :इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म:२८ एप्रिल १९३७)**१९९२:पिराजीराव रामजी सरनाईक-- महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर(जन्म:२८ जुलै १९०९)**१९८७:दत्ता बाबुराव नाईक ऊर्फ एन.दत्ता – संगीतकार* *१९८२:दत्तात्रय जगन्नाथ धर्माधिकारी उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक(जन्म:२ डिसेंबर १९१३)**१९८१:डॉ.अप्पासाहेब गणपतराव पवार-- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू(जन्म:५ मे १९१७)**१९७४:आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते* *१९७१:डॉ.विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ ऑगस्ट १९१९)**१९४४:रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म:२९ जानेवारी १८६६)**१६९१:रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म:२५ जानेवारी १६२७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Good Bye 2023 - Welcome 2024*2023 या वर्षात घडलेल्या घटनांचा आढावा ........!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राजस्थान, पंजाब, हरयाणा व उत्तरप्रदेशमध्ये धुक्याची चादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील दुष्काळसदृश्य तालुक्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येणार, गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू, मनोज जरांगेंचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा, ओबीसीनंतर आता धनगर समाजही आक्रमक, राज्यातील सर्व नेते पंढरपुरात जमले, 75 वर्षात न झालेला निर्णय होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, आवेश खानचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙***************************अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.~ वपु काळे | काही खरं काही खोटं*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली ?२) घुमर हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?३) कोणाच्या संकल्पनेतून हेमलकसा ( गडचिरोली ) येथे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी 'लोक बिरादरी प्रकल्पा'ला सुरूवात केली ?४) वैयक्तिक युट्यूब चॅनेलला दोन कोटीहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारे पहिले जागतिक तसेच भारतीय नेते कोण ठरले आहेत ?५) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच कोणता उत्सव साजरा केला ? *उत्तरे :-* १) कोयासन विद्यापीठ, जपान २) राजस्थान ३) बाबा आमटे ४) नरेंद्र मोदी, पंतप्रधान ५) शिवजयंती उत्सव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद👤 मारोती छपरे, माध्यमिक शिक्षक, जिपहा धर्माबाद👤 निवृत्ती लोखंडे👤 राजेश्वर रामपुरे👤 साहेबराव कांबळे👤 आनंद यडपलवार, शिक्षक👤 संजय भोसीकर👤 भारत पाटील सावळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही। नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥ म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले होण्यासाठी विचार करणे अजिबात वाईट नाही. ही एक प्रकारची चांगली सवय आहे. पण,नको त्या गोष्टींच्या मोहात पडून विचार करत बसणे कुठेतरी आपलीच वेळ वाया घालवणे होय. म्हणून त्या गोष्टीचा नाद सोडून द्यावे व जिथून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असेल किंवा नवी दिशा मिळत असेल तर त्याच विषयी विचार करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले विचार आपले आधार होत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.*रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.*तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९३०:सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला* *१९५९:नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.**१९५९:पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:रुपाली भोसले -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९७९:डॉ.संदीप तपासे -- लेखक* *१९७३:ट्विंकल खन्ना--भारतीय लेखिका, स्तंभलेखक,इंटिरियर डिझायनर,चित्रपट निर्माता आणि माजी अभिनेत्री**१९६०:डेव्हिड क्लेरेन्स बून-- ऑस्ट्रेलियन क्रिकेट सामनाधिकारी,माजी क्रिकेट समालोचक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९५५:प्रा.डॉ.जयंत वेलणकर-- लेखक* *१९५५:डॉ.गुरुप्रसाद गोविंदराव पाखमोडे-- लेखक* *१९४७:अशोक वसंत नायगावकर-- सुप्रसिद्ध, ज्येष्ठ विनोदी कवी**१९४२:राजेश खन्ना – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते,निर्माते (मृत्यू:१८ जुलै २०१२)**१९३३:दत्तात्रय नारायण दीक्षित-- लेखक**१९१७:रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू:१२ डिसेंबर २००५)**१९१४:गोविंद मल्हार कुलकर्णी-- मराठी साहित्यातील समन्वयशील वृत्तीचे समीक्षक.(मृत्यू:४ एप्रिल २००१)**१९०८:वासुदेव(भाऊसाहेब) वामन पाटणकर -- मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी (मृत्यू:२० जून १९९७)* *१९०४:कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू:११ नोव्हेंबर १९९४)**१९००:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू:२४ एप्रिल १९४२)**१८०८:अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:३१ जुलै १८७५)**१८००:चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू:१ जुलै १८६०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:सुबीर सेन-- भारतीय पार्श्वगायक, ज्याने बंगाली आणि हिंदीमध्ये आधुनिक गाणी गायली(जन्म:२४ जुलै १९३४)**२०१२:टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म:६ ऑक्टोबर १९४६)**१९८६:हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म:१० फेब्रुवारी १८९४)**१९८०:नानुभाई वकील-- हिंदी आणि गुजराती चित्रपट दिग्दर्शक(जन्म :२३ मे १९०२)**१९७९: राजाराम विनायक ओतुरकर-- भारतीय इतिहास संशोधक व इतिहासकार(जन्म:२४ऑक्टोबर १८९८)**१९७१:भाऊराव कृष्णाजी गायकवाड--ज्यांना दादासाहेब गायकवाड म्हणूनही ओळखले जाते,भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते(जन्म:१५ऑक्टोबर१९०२)**१९६७:पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक,१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:२४ जून १८९७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांनी शिकवावे की .....*केंद्र शासनाच्या शैक्षणिक अहवालानुसार महाराष्ट्रातील शिक्षणाची स्थिती खूपच चिंताजनक आहे. त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहे. मुळात ज्या बालकाचे प्राथमिक शिक्षण पक्के असते ते भविष्यात प्रत्येक संकटावर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करते आणि एक यशस्वी नागरिक म्हणून जीवन जगते. म्हणूनच भारताने राईट टू एज्युकेशन कायदा अंमलात आणून देशातील प्रत्येक सहा ते चौदा वयोगटातील बालकांना सक्तीचे मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ठरविले. तरी देखील राज्यातील शिक्षणाची स्थिती का सुधारली नाही ? यावर राज्यस्तरावर चिंतन होणे आवश्यक आहे .............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *३० डिसेंबरला अयोध्येत पंतप्रधान मोदी एअरपोर्ट-रेल्वे स्टेशनचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘कोविड’ उपाययोजनांसाठी राज्यात नविन ‘टास्क फोर्स’ची स्थापना, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वंदे भारत एक्सप्रेस संभाजीनगरमध्ये दाखल, आजपासून होणार मुंबई जाण्यासाठी बुकींग सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गो-ग्रीन’द्वारे वीज ग्राहकांची 25 लाख रुपयांची वार्षिक बचत:20 हजारांहून अधिक ग्राहकांचा छापील बिलांना 'टा-टा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डॉ. विजय माहेश्वरी अमरावती विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरु, आज घेणार पदभार, डॉ. प्रमोद येवलेंकडे होते अतिरिक्त सूत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साऊथ सुपरस्टार आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे संस्थापक विजयकांत यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. द. आफ्रिकेचा 1 डाव व 32 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रामानंद सागर*चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर ( जन्म - २९ डिसेंबर १९१७ - मृत्यू - १२ डिसेंबर २००५ ) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही मालिका प्रचंड यशस्वी झाली.सौजन्य :- विकिपीडिया••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्यांचा निर्धार व संकल्प अतूट आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी सुरू केलेल्या *'लोक बिरादरी प्रकल्पा'* ला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाली ?२) गाडगेबाबांना 'खराट्याचा बादशहा' कोणी म्हटले आहे ?३) संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी किती देशांच्या सहप्रतिनिधींनी 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' २१ जूनला साजरा करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता ?४) डॉ. प्रकाश आमटे यांनी 'लोक बिरादरी प्रकल्पा'ची स्थापना केव्हा केली ?५) हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी हे पुरस्कार कोणत्या खेळात दिले जाते ? *उत्तरे :-* १) ५० वर्षे २) आचार्य अत्रे ३) १७५ देश ४) २३ डिसेंबर १९७३ ५) कुस्ती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष कंदेवार, लेखाधिकारी👤 किशोर प्रभाकर पेंटे👤 सुरेश सुतार👤 विजय रणभीडकर, नांदेड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥जनीं पाहता पाहणे जात आहे।मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वत: च्या विषयी विचार न करता समाजाच्या हितासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांनाच वारंवार अपमान सहन करावा लागतो. आणि तेही सहन करण्यासाठी खूप मोठे काळीज असावे लागते. त्या प्रकारचे काळीज व सहनशीलता प्रत्येकांपाशी असेलच असे नाही. म्हणून कोणाचाही अपमान करू नये. आजपर्यंत अपमान सहन करणाऱ्यांचाच गजर करताना बघायला मिळत आहे व समोरही करताना बघायला मिळेल... पण, जे दुसऱ्यांचा अपमान करून स्वतः चा समाधान करतात त्यांचा गजर तर नाहीच पण, साध्या लहान मुलाच्या मुखातून आदराने त्यांचे नाव घेताना ऐकायला मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.*तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१८९५:ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले.**१८८५:मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना**१८४६:आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.**१८३६:स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६१२:गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:कुंदा बच्छाव -शिंदे-- लेखिका* *१९७९:प्रशांत मंगरु भंडारे-- कवी* *१९७५:राजेश लक्ष्मण व-हाडे -- लेखक* *१९६२:प्रशांत असनारे -- प्रसिद्ध कवी* *१९६०:दयानंद घोटकर-- पाश्वगायक, संगीतकार,लेखक,कवी दिग्दर्शक अभिनेता* *१९६०:प्राचार्य दीपा क्षीरसागर -- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९५२:अरुण जेटली –माजी केंद्रीय मंत्री व वकील (मृत्यू:२४ ऑगस्ट,२०१९)**१९४८:वि.ग.सातपुते-- भावकवी,व्याख्याते, लेखक* *१९४६:गोरख शर्मा-- भारतीय गिटार वादक(मृत्यू:२६ जानेवारी २०१८)**१९४५:वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू:१ जून २००१)**१९३७:रतन टाटा – उद्योगपती**१९३६:प्रा.वामन सदाशिव पात्रीकर-- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार(मृत्यू:१९ एप्रिल २००३)**१९३४:बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले-- मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक(मृत्यू:३० जुलै २०१२)**१९३२:धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू:६ जुलै २००२)**१९३१:देवीदास तुकाराम बागूल-- लेखक, छायाचित्रकार,कथाकार**१९२६:हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू:१० ऑगस्ट १९४२)**१९११:फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक(मृत्यू:१६ मे १९९४)**१९०३:पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर-- मराठी पोवाडेकार**१८९९:उधम सिंग-- भारतीय क्रांतिकारक(मृत्यू:३१ जुलै १९४०)**१८९९:गजानन त्र्यंबक तथा ग.त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार,समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू:२७ नोव्हेंबर १९७६)**१८९७:डॉ.शंकर दामोदर पेंडसे-- संत वाड्:मयाचे अभ्यासक (मृत्यू:२३ आॅगस्ट १९७४)**१८५६:वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:३ फेब्रुवारी १९२४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म:३० सप्टेंबर १९३३)**२००३: चिंतामण गणेश काशीकर--वेदशास्त्र अभ्यासक,लेखक(जन्म:१७ ऑगस्ट १९१०)**२०००:मेघश्याम पुंडलिक तथा मे.पुं.रेगे – तत्त्वचिंतक,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म:२४ जानेवारी १९२४)**१९८१:हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म:१९०९)**१९७७:सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म:२० मे १९००)**१९३१:आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: १८६०)**१६६३:फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२ एप्रिल १६१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरुदक्षिणा*मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ................. पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी पाच जानेवारीऐवजी आता ती २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * ‘साने गुरूजी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्ताने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी तीन जण मुंबई पोलिसांच्या ताब्यात, गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार, 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर जिल्ह्यातील करमाळा-नगर रोडवर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बोलण्याच्या जादूने अनेकांचं आयुष्य बदलणारा वक्ता हरपला, मोटिवेशनल स्पीकर वैभव कथारेचा अपघाती मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत के एल राहुलचे झुंझार शतक; सचिन आणि कोहलीचा विक्रम मोडला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'महाराष्ट्राचे शिल्पकार'* कोणाला म्हणतात ?२) जलधोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?३) 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव कोणत्या वर्षी मांडला होता ?४) भारतातील अक्षरधाम मंदिर कोणत्या शहरात आहे ?५) माती व चुनखडक योग्य प्रमाणात मिसळून कोणते सिमेंट तयार केले जाते ? *उत्तरे :-* १) यशवंतराव चव्हाण २) मेघालय ३) सन २०१४ ४) दिल्ली ५) पोर्टलँड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई पाटील, धर्माबाद श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस👤 वृषाली वानखडे, अमरावती सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक👤 श्रीधर सुंकरवार, पद्मशाली नेते, नांदेड👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 अजय तुम्मे👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती👤 नंदकिशोर सोवनी, पुणे👤 ओमसाई सितावार, येवती👤 ओमकार ईबीतवार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निराकार आधार ब्रह्मादिकांचा। जया सांगतां शीणली वेदवाचा॥ विवेके तदाकार होऊनि राहें। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात असे अनेक क्षण येतात आणि क्षणात निघूनही जातात. पण ज्या क्षणातून आपल्याला काही शिकायला मिळाले असेल किंवा अनुभव आले असतील तसेच मार्गदर्शन मिळाले असतील तर त्यांना क्षणांना कधीही विसरू नये. जीवनात आपल्याला बरेच काही मिळवता येते पण,गेलेले क्षण कधीच परत पुन्हा मिळवता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!*तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७५:बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.**१९४९:इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९४५:२९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.**१९११:भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:खेमचंद गणेश पाटील -- लेखक**१९७९:हबीब भंडारे--प्रसिद्ध लेखक व कवी**१९६९:आश्लेषा महाजन-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६७:संध्या विजय दानव-- लेखिका**१९६६:किरण अग्रवाल-- अकोला लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक**१९६५:सलमान खान -- प्रसिद्ध चित्रपट अभिनेता,चित्रपट निर्माता* *१९५४:जगदीश छोटू देवपूरकर -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९४४:विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू:२ फेब्रुवारी २००७)**१९३८:आशा भालचंद्र पांडे -- सुप्रसिद्ध साहित्यिक,मराठी,हिंदी,संस्कृत,इंग्रजी भाषेत लेखन,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९३६:सुधीर देव-- कवी,माझा ग्रंथसंग्रह’ योजना (माग्रस) या नावाच्या वाचक चळवळीचे संस्थापक (मृत्यू:२३ आक्टोबर २०२०)**१९२८:निर्मला गोपाळ किराणे-- जुन्या पिढीतील लेखिका(मृत्यू:२३ सप्टेंबर २०२२)**१९२७:सुमती देवस्थळे-- चरित्रकार(मृत्यू:२२ जानेवारी १९८२)**१९२७:बाळ गंगाधर देव-- लेखक* *१९२३:श्री.पु.भागवत -- संपादक आणि प्रकाशक (मृत्यू:२१ ऑगष्ट २००७)**१९१७:निर्मला वसंत देशपांडे--कवयित्री, कादंबरीकार(मृत्यु:१ मे २००८)**१९०४:वसंत शांताराम देसाई --नाटककार, समीक्षक,कादंबरीकार,चरित्रकार (मृत्यु:२३ जून १९९४)**१८९२:रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन-- ज्योतिष्याभ्यासक,ग्रंथकार (मृत्यू:१९ डिसेंबर १९६८)* *_१८९८:डॉ.पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(मृत्यू:१० एप्रिल १९६५)_**१८२२:लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू:२८ सप्टेंबर १८९५)**१७९७:मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू:१५ फेब्रुवारी १८६९)**१६५४:जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१६ ऑगस्ट १७०५)**१५७१:योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू:१५ नोव्हेंबर १६३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:विकास सबनीस --प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार (जन्म:१२ जुलै १९५०)**२००७:पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म:२१ जून १९५३)**१९७२:लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२३ एप्रिल १८९७)**१९२३:गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म:१५ डिसेंबर १८३२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मरावे परी अवयवरूपी उरावे*जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ?गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस इंफाळ नौदलात झाली दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यूट्यूबवरही PM मोदींचा डंका, सर्वाधिक सबस्क्रिप्शन मिळवणारे बनले पहिले राजकारणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राखीव आसन व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एसटी महामंडळाकडून एक जानेवारीपासून राखीव आसन क्रमांकामध्ये बदल करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात बोलावणार बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; भारताची आक्रमक भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेन जे मेंटेनन्स यार्डमध्ये उभी होती, त्यास भीषण आग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦈🐟 *मासे* 🐟🦈 ********************मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच.सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात.माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात.माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात.माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल.मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो.माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते.मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*“ ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. ”**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पूजा बागूल, साहित्यिक, नाशिक👤 विठ्ठलभाई श्रीगांधी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुटेना तुटेना चळेना ढळेना।सदा संचले मीपणे ते कळेना॥ तया एकरूपासि दूजे न साहे। मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जुने, पुराने किंवा फाटके कपडे घालून दिसणारी व्यक्ती भिकारी व लाचार असेलच असे नाही. समाजात राहणाऱ्या प्रत्येकांची राहणीमान, तसंच स्वभाव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणून कोणाच्याही विषयी पूर्ण माहीती न घेता त्यांनी घातलेल्या कपड्याकडे बघून त्याला लाचार समजू नये किंवा त्याची लायकी काढू नये. सांगता येत नाही कधी कोणाचे दिवसं निघतील.. आणि आपल्याला पश्चातापात पडण्याची वेळ येईल कारण प्रत्येकांकडेच त्या प्रकारची अजरामर संपत्ती नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *यशाचे बिजगणित*आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३६० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण झाली.या लाटेने भारत,श्रीलंका,इंडोनेशिया,थायलँड, मलेशिया,मालदीव आणि इतर अनेक देशात हाहा:कार माजवला. यात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पड्ले. त्यात एका धावत्या रेल्वेगाडीतील १७०० जणांचाही समावेश होता.**१९९७:विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार**१९८२:टाइम (TIME) मासिकातर्फे* दिला जाणारा ’मॅन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला**१९७६:कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.**१८९८:मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:सुनिता संदीप तांबे-- कवयित्री, लेखिका**१९६१:वृषाली विक्रम पाटील-- कवयित्री, लेखिका**१९६१:मिलिंद सुधाकर जोशी -- कवी, व्याख्याते* *१९५४:सुरेश पाचकवडे -- प्रसिद्ध कवी, कथाकार* *१९५१:प्रा.नीला विनायक कोंडोलीकर-- लेखिका**१९४९:सुरेखा भगत-- कवयित्री* *१९४८:डॉ.प्रकाश आमटे-- प्रसिद्ध समाजसेवक,लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९४१:लालन सारंग – मराठी नाट्यअभिनेत्री,लेखिका (मृत्यू:९ नोव्हेंबर २०१८)* *१९३५:डॉ.मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (मृत्यू:२७ डिसेंबर १९९९)**१९३८:दत्तात्रय दिनकर पुंडे-- मराठीतील ख्यातनाम समीक्षक,भाषाभ्यासक आणि संपादक* *१९२८:मार्टिन कूपर--- अमेरिकन अभियंता, मोबाईल फोनचे जन्मदाते* *१९२५:पं.कृष्णा गुंडोपंत तथा ’के.जी’ गिंडे – शास्त्रीय गायक,संगीतकार व शिक्षक (मृत्यू:१३ जुलै १९९४)**१९१७:डॉ.प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले.(मृत्यू:१७ जून १९९१)**१९१४:डॉ.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक,लेखक (मृत्यू:९ फेब्रुवारी २००८)**१९१४:डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री,महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर,गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (मृत्यू:३ जानेवारी २०००)**१८९३:माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार,मुत्सद्दी,मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (मृत्यू:९ सप्टॆंबर १९७६)**१७९१:चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (मृत्यू:१८ आक्टोबर १८७१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर – अभिनेते (जन्म:१५ सप्टेंबर १९२१)**२०००:प्रा.शंकर गोविंद साठे – नाटककार आणि साहित्यिक(जन्म:११मार्च १९१२)* *१९९९:शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (जन्म:१९ ऑगस्ट १९१८)**१९८९:केशवा तथा के.शंकर पिल्ले – व्यंगचित्रकार व लेखक,भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक,पद्मविभूषण (१९७६) (जन्म:३१ जुलै १९०२)**१९७२:हॅरी एस.ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:८ मे १८८४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दत्त जयंती*मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्त झाली.भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ' हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून पूजा करतात. दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. *संकलन*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशाच्या निर्मितीपासून ते समाजाच्या निर्मितीपर्यंत ख्रिस्ती समुदायाचं मोठं योगदान - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, 24 तासात 656 नवे रुग्ण; 3742 सक्रिय कोरोनाबाधित, आरोग्य मंत्रालयाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पेण तालुक्यातील उंबर्डे गावचे सरपंच महेश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहमदनगर येथे सन्मानित करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाची आत्महत्या:रेल्वेखाली उडी मारून जीवनयात्रा संपवली; मरणापूर्वी लिहिली होती सुसाईट नोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *लस म्हणजे काय ?* 💉*अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.**बर्याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.**शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.**आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बाबा आमटे यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) 'आधुनिक भारताचे संत' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?५) बाबा आमटे यांना समाजसेवेसाठी कोणकोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) हिंगणघाट, वर्धा ( २६ डिसेंबर १९१४ ) २) मुरलीधर देवीदास आमटे ३) बाबा आमटे ४) आनंदवन ५) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर👤 नागराज राजेश्वर डोमशेर👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद👤 कपिल जोंधळे👤 अशोक लंघे👤 शादूल शेख👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी। अकस्मात आकारले काळ मोडी॥ पुढे सर्व जाईल कांही न राहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कडून एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आनंद व चेहऱ्यावर हास्य फुलत असेल तर त्यातून जे समाधान मिळत असते तो,समाधान जगावेगळा असतो. पण, एखाद्या व्यक्तीकडून आपण करत असलेल्या कार्याला वारंवार विरोध होत असेल, वाट अडवणे होत असेल किंवा निंदा होत असतील तर जास्त मनावर घेऊ नये.कारण मेंदू तर प्रत्येकांपाशी असतो फरक एवढाच की, प्रत्येकांची विचारसरणी मात्र एकसारखी नसते म्हणून त्यांना त्यांचे काम करू द्या आपण आपले काम करत रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_30.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय गणित दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:प्रसिद्ध रंगकर्मी के.एन.पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर**१८५१:जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.**१८८५:सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:ईशा तलवार-- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८४:भूषण वर्धेकर-- कवी* *१९७५:आशा खरतडे-डांगे -- कवयित्री* *१९७३:प्रा.डॉ.संदीप रंगनाथ तापकीर -- लेखक**१९६८:अरुणा गजानन कडू -- कवयित्री* *१९६२:प्रा.प्रकाश जनार्दन कस्तुरे-- प्रसिद्ध लेखक**१९५८:डाॅ.आनंद नाडकर्णी-- मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ**१९५७:धनंजय वसंतराव मुजुमदार-- प्रसिद्ध लेखक* *१९५५:अभय वसंत मराठे -- लेखक* *१९५४:वासुदेव नामदेवराव राघोते -- कवी, लेखक तथा पूर्व प्राचार्य**१९४९:डॉ.सुभाष कृष्णराव पाटील-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४१:अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (मृत्यू:२६ मार्च२०१०)**१९०१:वामन श्रीधर पुरोहित -- लेखक,शिक्षण तज्ज्ञ(मृत्यु:१९ सप्टेंबर १९७५)**१८८७:श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती.'पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.(मृत्यू:२६ एप्रिल १९२०)**१८८२:डॉ.बाळकृष्ण -- नामवंत शिक्षणतज्ज्ञ, थोर इतिहासकार आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाराम महाविद्यालयाचे पूर्व प्राचार्य( मृत्यू:२१ ऑक्टोबर १९४०)**१८५३:भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू:२१ जुलै १९२०)* *१६६६:गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू:७ आक्टोबर १७०८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज (जन्म:२२ जुलै १९३७)**२००२:दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते* *१९९६:रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे-- संगीत समीक्षक व पत्रकार**१९८९:सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार,कवी आणि दिग्दर्शक (जन्म:१३ एप्रिल १९०६)**१९७५:वसंत देसाई-- मराठी, तसेच अन्य भारतीय चित्रपटांस संगीत देणारे मराठी संगीतकार(जन्म:९ जून १९१२)**१९४५:श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ -- रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (जन्म:११ नोव्हेंबर १८६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हर कॅलेंडर कुछ कहता है ।31 डिसेंबर संपला की घरातील भिंतीवर असलेले कॅलेंडर बदलले जाते आणि त्याठिकाणी नव्या वर्षाची जानेवारी महिन्याची कॅलेंडर लटकविली जाते. पाहता पाहता एक वर्ष संपून जाते. गेल्या एका वर्षात काय काय घडले ? याचा आढावा थोडक्यात घ्यायला बसलोत तर अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून सरकतात. काही बाबी तीव्रतेने आठवतात तर काही बाबी आठवण करण्यासाठी डोक्याला ताण द्यावा लागतो. वर्ष संपले की आपण कॅलेंडर फेकून देतो. पण जर हेच कॅलेंडर आपणास विविध प्रकारचे काम करू शकते..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतावरील कर्जाचा बोझा वाढला, 205 लाख कोटींवर पोहचला आकडा; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रिओ ऑलिम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकार अन् मनोज जरांगेंमधील बैठक निष्फळ ठरली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लष्कराच्या 2 वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, 4 जवान शहीद; पाकिस्तानी संघटनेने घेतली जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन, नगरमध्ये उपचार सुरु असताना घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 78 धावा ने पराभव करत 2-1 ने मालिकाही जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माळेगाव यात्रा*माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणाऱ्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती. खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रयत्नांची पाऊले पडले की, यशाचे ठिकाण गाठायला वेळ लागत नाही.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून सर्वात जास्त बोली कोणावर लागली ?२) भारतात दयेचा अधिकार कोणाला आहे ?३) 'लिटल मास्टर' असे कोणाला म्हणतात ?४) 'मिठागराचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?५) १९२० मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषविले ? *उत्तरे :-* १) मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया ( २४ कोटी ७५ लाख, केकेआर ) २) राष्ट्रपती ३) सुनील गावस्कर, भारत ४) रायगड ५) राजर्षी शाहू महाराज *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल पाटील👤 अजय गवळी👤 दिलीप डोम्पलवार👤 अनिल यादव👤 सौ. राजश्री शिवराज भुसेवार, मा. शिक्षिका, नांदेड👤 अजय डाकोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कळेना कळेना कळेना कळेना। ढळे नाढळे संशयोही ढळेना॥ गळेना गळेना अहंता गळेना। बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माझं तू जरा ऐक मी तुझे सर्व काम करून देतो. असं जर कोणी आपल्याला म्हणत असेल तर होकार देण्याआधी त्या व्यक्तीला वाचणे गरजेचे आहे सोबत त्यावर खोलवर जाऊन विचार करणे आवश्यक आहे. बरेचदा असं होतं की, त्या विषयावर विचार न करता होकार देल्याने केसानी गळा कापल्या जाते म्हणून जरा सावधगिरी बाळगली पाहिजे. तेही आपल्यावरच अवलंबून आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रुपयांची गोष्ट*एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला. शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला. हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली. तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई असते. त्याची किंमत ही कष्ट घेतले की मगच कळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८६:रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६५:दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.**१९१३:ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:डॉ.वैजंतीमाला जाधव-भोसले-- लेखिका,संपादिका* *१९८०:रमेश सुरेश पडवळ-- ज्येष्ठ पत्रकार,लेखक**१९७६:डॉ.हेमलता विजय काटे-- कवयित्री, लेखिका**१९७३:विवेक रंजन अग्निहोत्री-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९६८:माणिक क.नागावे-- कवयित्री, लेखिका**१९६८:वीरधवल परब-- प्रसिद्ध कवी**१९६३:सुरेंद्र रावसाहेब पाटील-- प्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९६३:गोविंदा – हिन्दी चित्रपट सुप्रसिद्ध कलाकार**१९५९:कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज,क्रिकेट कप्तान व निवड समितीचे माजी अध्यक्ष**१९५९:फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू(मृत्य़ू:२१ सप्टेंबर १९९८)**१९५४:ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५१:सुभाषचंद्र जाधव-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९४२:शुभांगी भरभडे-- प्रसिद्ध राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार,कथाकार,नाटककार संस्थापक अध्यक्ष पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान**१९३५:दत्ता टोळ-- मराठी लेखक,त्यांचे काही लिखाण 'अमरेंद्र दत्त' या नावाने केलेले आहे.**१९२१:पी.एन.भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश(मृत्यू:१५ जून २०१७)**१९१८:कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (मृत्य़ू:१४ जून २००७)**१९१४: गोविंद मल्हार कुलकर्णी-- जेष्ठ समीक्षक(मृत्यु:१ एप्रिल २००१)**१९०३:भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार,पद्मभूषण,डि.लिट.(पुणे विद्यापीठ),उद्योजक (मृत्य़ू:२ नोव्हेंबर १९९०)**१८४९:हरि माधव पंडित-- चरित्रलेखक (मृत्यू:१५ मार्च १८९९)**१८०४:बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्य़ू:१९ एप्रिल १८८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:उषादेवी विजय कोल्हटकर-- लेखिका (जन्म:२४ मार्च १९४६)**१९९७:निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.१९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.(जन्म:४ जुलै १९१४)**१९९७:पं.प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक**१९९३:मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार* *१९७९:नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म:१५ एप्रिल १८९३)**१९६३:जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म:१६ डिसेंबर १८८२)**१८२४:जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म:११ एप्रिल १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रदूषण : एक समस्या*मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखी देखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. नुकतेच एक बातमी वाचण्यात आली की सध्या आठ मृत्यूपैकी एक मृत्यू या प्रदूषणामुळे होत आहे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *साहित्य अकादमीकडून यंदाचे पुरस्कार जाहीर, मराठी कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या रिंगाण या पुस्तकाला पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान, भारतात पेट्रोलच्या किंमतीत 11.82 टक्के आणि डिझेलच्या किंमतीत 8.94 टक्के घट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान, विखे पाटलांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विदर्भाचा जलद गतीने विकास करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘26 फेब्रुवारी’ रोजी होणार सुरू!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीचा मोठा सन्मान! अर्जुन पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📙 सस्तन प्राणी 📙*आईच्या पोटातुन जन्म घेणारे आईच्या दुधावर लहानपणी पोषण होणारे सर्व प्राणी म्हणजे सस्तन प्राणी होत. यांनाच 'मॅमल' असेही इंग्रजीत म्हणतात. मानव, मांजरे, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, घोडे, माकडे, जिराफ, हत्ती, डॉल्फिन व देवमासे हे सगळे सस्तन प्राणिगटात मोडतात. पृथ्वीवर एकूण चार हजार प्रकारचे सस्तन प्राणी सापडतात.इतर सर्व प्राणी अंडी घालतात. पण सस्तन प्राण्यांमध्ये मादीच्या पोटातच अंड्याची वाढ गर्भाशयात होते. पूर्ण वाढीचा काळ संपल्यावरच मग नवजात प्राणी आईच्या शरीरातुन वेगळा होतो. पण या पद्धतीतही तीन प्रकारचे बदल निसर्गात आढळले आहेत.गर्भाशयातील पोषण हे बाळाला जोडलेल्या नाळेद्वारे होते. हा एक प्रकार. त्याला इंग्रजीत (Placental) असे म्हणतात. हा बहुतेक सर्व जातींत दिसतो. दुसरा म्हणजे कांगारूचा. या प्रकारात (Marsupial) अगदी छोटा जीव आईच्या पोटाला असलेल्या एका पोतडीत जन्माला येतो. तेथेच राहतो, वाढतो. आईच्या दुधावर त्याचे पोषण होते. मोठा झाल्यावर मग आईपासुन तो सुटा होतो. तिसरा (Monoreme) प्रकार म्हणजे सशाचा आकार, पण बदकाचे पाय असा लांबुडका, शेपटी असलेला 'डक बिल्ड प्लॅटिपस' या जातीचा प्राणी. तो फक्त ऑस्ट्रेलियातच सापडतो. खरे म्हणजे हा प्राणी अंडी घालतो. पण त्याची पिल्ले मात्र आईच्या दुधावरच वाढतात. म्हणुन त्याला सस्तन गटात घेतले आहे. सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे देवमासा किंवा निळा व्हेल. सर्वात उंच जिराफ, सर्वात दांडगा हत्ती. स्वत:ला सर्वात हुशार समजणारा माणूस.'सृष्टीविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहतो या बिंदूला काय म्हणतात ?२) 'डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?३) सूर्याची व ग्रहगोलांची उंची मोजणारे उपकरण कोणते ?४) जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ 'कैसर - ए - हिंद' पदवी कोणी परत केली ?५) मुंगी चावल्यानंतर कोणता Acid सोडते ? *उत्तरे :-* १) विंटर सोल्सटाईल ( हिवाळा आयन दिवस ) २) रायगड ३) Sextent ४) महात्मा गांधी ५) Formic Acid *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया👤 मन्मथ खंकरे👤 श्रीमती माणिक नागावे, साहित्यिक, कोल्हापूर👤 गजानन गायकवाड👤 संभाजी तोटेवाड👤 जयश्री फुले👤 माधव मुंडकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणे दास सायास त्याचे करावे। जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥ गुरू अंजनेवीण तें आकळेना। जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनसंपत्ती असो किंवा इतर काही कोणी कशाप्रकारे कमावले व किती कमावले त्यांच्यापाशी कितीही असेल तरी ते आपले कधीच होत नाही. म्हणून त्याकडे लक्ष देऊ नये. आपल्यापाशी जे, काही आहे त्यातच समाधान मानावे कारण कष्टाने व संघर्ष करून कमावलेले जे काही असते ते, कधीच संपत नाही. मग ते आपल्या विचारसरणीतून कमावलेले असोत किंवा माणुसकी धर्म निभावून कमावलेले असोत ते कायम पर्यंत अजरामर राहतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.*तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_24.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा 'साहित्य अकादमी पुरस्कार' जाहीर**१९९९:पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.**१९९४:राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान**१९७१:झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.**१९४५:मुंबई - बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.**१९२४:हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:डॉ.माधव सैनाजीराव कुद्रे-कंधारकर-- कवी**१९६९:तानाजी आसबे -- लेखक* *१९६८:प्रतिभा रवींद्र कुलकर्णी-- कवयित्री, लेखिका* *१९६८:प्रा.भारत काळे -- लेखक* *१९६६:प्रा.डॉ.राजेंद्र नाईकवाडे-- प्रसिद्ध लेखक,समीक्षक* *१९६०:रश्मी आनंद देवगडे-- कवयित्री* *१९५७:नंदिनी आत्मसिद्ध-- कवयित्री लेखिका**१९५२:शिरीष गोपाळ देशपांडे-- प्रसिद्ध लेखक,कवी,कादंबरीकार,* *१९५०:श्रीकांत रघुनाथ कोराभे-- लेखक, कवी* *१९४२:राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)**१९४०:नृसिंह दांडगे -- कवी,लेखक* *१९४०:यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका,पद्मश्री (१९६७)**१९३८:प्रा.मधुकर धोंडबा उपलेंचवार-- लेखक,सामाजिक कार्य**१९२८:मोतीलाल व्होरा-- माजी मुख्यमंत्री, राज्यपाल (मृत्यू:२१ डिसेंबर २०२०)**१९०६:चंदकांत विष्णू बावडेकर-- मराठी मुंबई साहित्य संघाचे १५ वर्ष कार्यवाह असणारे लेखक(मृत्यू:१९ जानेवारी १९७६)**१९०१:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१६ जानेवारी १९६७)**१८९०:जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.(मृत्यू:२७ मार्च १९६७)**१८६८:हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:नलिनी जयवंत – अभिनेत्री (जन्म:१८ फेब्रुवारी १९२६)**२०१०:सुभाष भेंडे – प्रसिद्ध लेखक (जन्म:१४ आक्टोबर १९३६)**१९९८:बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (जन्म:८ ऑगस्ट १९१२)**१९९६:कार्ल सगन –अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक.(जन्म:९ नोव्हेंबर १९३४)**१९९३:वामन नारायण तथा डब्ल्यू.एन.भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार* *_१९५६ : डेबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.(जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)_**१९३३:विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक,शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.(जन्म:२२ मे १८७१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नामकरण ते अंतीम संस्कार*माणूस जन्माला येतो तेंव्हा त्याचे नाव नसते. त्याला एक ओळख मिळावी म्हणून जन्मलेल्या बाळाचे सर्वात पहिल्यांदा जे संस्करण केल्या जाते त्यास नामकरण किंवा बारसे असे म्हटले जाते. हा विधी बारा दिवसानी, एकवीस दिवसानी किंवा सव्वा महिन्याच्या नंतर केल्या जाते. काही समाजात परंपरेनुसार हा सोहळा संपन्न केल्या जाते. नाव ठेवण्याची ही पद्धत फार पुरातन काळापासून चालू आहे. फार पूर्वीच्या काळाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, घरातील वाडवडिलांचे किंवा आजी - आजोबांचे नाव नातू-नातवाला दिले जात असत. त्यामुळे नाव शोधण्याची .....पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एका महिलेचा समावेश, सावित्री जिंदाल या 2023 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता प्रत्येक ग्रामपंचायतीत बसवणार पर्जन्यमापन यंत्र, राज्य कृषिमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे, खरगेंनी नाकारली ऑफर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; दक्षिणेतील राज्यांना झोडपून काढणार, हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, क्षणात पॅट कमिन्सला टाकले मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अश्फाकउल्ला खान*अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार."दुसर्या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा ,"फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ !वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥(अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.)अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले -I wish the downfall of the British Empire.(ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे)अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी...महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंधरामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर)देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आर्कटिक टर्न हा पक्षी एका वर्षात किती किमीचा प्रवास करतो ?२) 'भवानी मातेचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?३) वैनगंगा व पैनगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?४) मानवी शरीराच्या वाढीसाठी किती खनिजे आवश्यक असतात ?५) भारतात टीव्हीवर रंगीत प्रसारणाची सुरूवात कोणत्या महान व्यक्तीच्या भाषणापासून सुरू झाली ? *उत्तरे :-* १) ३० हजार २) उस्मानाबाद ३) गोदावरी ४) २४ खनिजे ५) इंदिरा गांधी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गजानन मुडेले, देगलूर👤 सोपान हेळंबे, उमरी👤 विलास राऊत, मु.अ. रेणापूर, भोकर👤 देगावे एस टी👤 माधव कुद्रे, साहित्यिक, नांदेड👤 संदीप खंडागळे👤 रामेश्वर आत्राम👤 अश्फाक मोमीन*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं। गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥ गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध त्याचाच केला जातो जो नेहमीच सत्य बोलतो.विरोध त्याचाच केला जातो जो, व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडत नाही व आपला स्वाभिमान कुठेही विकत नाही, स्वतः च्या विषयी विचार न करता इतरांच्या भल्यासाठी कार्य करत असतो. त्यावेळी विरोध करणारे दुरचेच लोक असतात असेही नाही तर घरून तसेच जवळच्याच लोकांपासून सुरूवात होत असते. म्हणून सत्याच्या वाटेवर चालत असताना कितीही विरोध करणारे मिळाले तरी चालेल पण, आपण मात्र कोणाचा विरोध करू नये. जमेल तेवढे कार्य करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले करणाऱ्यांचेच विरोधक वाढत असतात व जो काहीच करत नाही त्याचे जीवन शुन्यासमान असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पारंगत*खूप वर्षापूर्वी रामपूर गावात एक आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला, प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!'*तात्पर्य :- सुंदर जरी गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_गोवा मुक्ती दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:व्ही.एन.खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८३:ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.**१९६३:झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.**१९६१:पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.**१९४१:दुसरे महायुद्ध - अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.**१९२७:राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:संस्कृती संजय बालगुडे-- भारतीय अभिनेत्री**१९८४:अंकिता लोखंडे जैन-- भारतीय अभिनेत्री**१९७८:मनीषा कुलकर्णी अपशिंगकर-- कवयित्री**१९७६:मानव कौल-- भारतीय थिएटर दिग्दर्शक,नाटककार,लेखक,अभिनेता आणि चित्रपट निर्माता* *१९७४:रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट माजी कर्णधार व फलंदाज**१९६९:नयन रामलाल मोंगिया-- माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशिक्षक**१९५६:प्रमोद मारुती उर्फ भाऊ मांडे-- इतिहासकार,कादंबरीकार (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१७)**१९५५:प्रदीप म्हैसेकर -- प्रसिद्ध साहित्यिक**१९५४:प्रमोद मारुती मांडे-- प्रसिद्धभारतीय इतिहासकार आणि लेखक**१९५२:प्रकाश अकोलकर-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक* *१९४८:कमल शामराव कुरळे-- लेखिका* *१९४७:गजानन भास्कर मेहेंदळे-- मराठी इतिहास अभ्यासक**१९४३:प्रा.डॉ.लीला पाटील--शिक्षण तज्ञ, लेखिका* *१९४२:प्रा.कुंदबाला खांडेकर -- लेखिका* *१९४०:गोविंद निहलानी-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,सिनेमॅटोग्राफर,पटकथा लेखक आणि निर्माता**१९३४:यादवराव गोविंदराव कंदकूर्तीकर-- जेष्ठ इतिहास संशोधक* *१९३४:प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती**१९२८:प्रा.चंपा मधू लिमये-- लेखिका**१९२७:डॉ.वसंत कृष्ण वर्हाडपांडे-- प्रसिद्ध कथाकार,कवी,कादंबरीकार,नाटककार, समीक्षक,संपादक(मृत्यु:२९ जून १९९२)**१९२३:शालिनी अनंत जावडेकर--लेखिका**१९१९:ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (मृत्यू:२१ फेब्रुवारी १९१९)**१९०६:लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू:१० नोव्हेंबर १९८२)**१८९९:मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू:११ नोव्हेंबर १९८४)**१८९४:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण,अरविंद मिल्स,अशोक मिल्स,अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले(मृत्यू:२० जानेवारी १९८०)**१८५२:अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (मृत्यू: ९ मे १९३१)**१८४९:नारायण हरी भागवत--निंबधलेखक, पत्रकार,चरीत्रकार (मृत्यू: एप्रिल १९०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:चित्रा बेडेकर-- मराठी लेखिका (जन्म:७ ऑगस्ट १९४६)**१९९९:हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू,कुशल क्रीडा संघटक (जन्म:२४ मे १९३३)**१९९७:डॉ.सुरेन्द्र शिवदास बारलिंगे – कथाकार,कादंबरीकार,तत्त्वचिंतक,ललितलेखक,स्वातंत्र्यसैनिक,तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, (जन्म:२० जुलै १९१९)**१९५६:पांडुरंग श्रीधर आपटे-- गांधिवादी लेखक (जन्म:६ एप्रिल १८८७)**१९२७:राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म:११ जून १८९७)**१९१५:अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (जन्म:१४ जून १८६४)**१८६०:लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे - डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (जन्म:२२ एप्रिल १८१२)**१८४८:एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म:३० जुलै १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांचे स्वातंत्र्य .....?*देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वीची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे अध्यापन करू शकत नाहीत किंवा पूर्वीच्या शिक्षकांप्रमाणे विद्यार्थी घडवू शकत नाहीत. काय कारण असू शकते ? यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. ...........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *घुसखोरीच्या मुद्यावर सोमवारी एका दिवसात राज्यसभेतून ४५ तर लोकसभेतून 33 खासदारांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *६ लाख ५६ हजार वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारने दुसरा अहवाल स्वीकारला, आता मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक राहून कारवाई करावी ; मनोज जरांगे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केल ५.५ इतकी होती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : अन्न व औषध प्रशासनाचा भेसळयुक्त पनीर उत्पादनाच्या कारखान्यावर छापा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्यास शिक्षक भारती संघटनेचा विरोध, रस्त्यावर उतरणार, राज्य सचिव सुनील गाडगे यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल, गकेबरहाच्या सेंट जॉर्ज पार्क मैदानावर दुपारी साडे चार वाजता होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले.अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात स्पॅनर घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत. "त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग .संदर्भ : The Habit of Winning*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३३ व्या *'व्यास सन्मान'* या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?२) महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते ?३) भारतीय राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण ?४) ऑक्सफर्ड डिक्शनरीने २०२३ साठी 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली आहे ?५) जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने कोणत्या चवीचे ज्ञान होते ? *उत्तरे :-* १) पुष्पा भारती ( यादी, यादें और यादें ) २) भुसावळ ३) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ४) Rizz ५) गोड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर👤 शंकर जाजेवार, येताळा👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद👤 रविकुमार राऊत👤 सूर्यकांत स्वामी👤 पवन कल्याण धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुढें पाहता सर्वही कोंदलेसें। अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥ अभावे कदा पुण्य गांठी पडेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या भल्यासाठी चांगले सांगणे अजिबात वाईट नाही. एखाद्या व्यक्तीत वाईट गुण आढळून आले असतील किंवा वाईट सवयी लागलेल्या दिसून येत असतील तर, त्यावेळी त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करायलाच पाहिजे.पण, त्यावेळी ती व्यक्ती जर सांगून ऐकत नसेल तर ..तो त्याचा प्रश्न आहे. त्यात आपला काहीही दोष नाही. कदाचित त्यावेळी एक तर त्याचे मेंदू दुसरीकडे गहाण ठेऊन असेल.. नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे कारणे असू शकतात. म्हणून जास्त मनावर घेऊ नये आपले कार्य चालूच ठेवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कर्म पूजा*एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.*तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.**'कर्मे ईशू भजावा.'*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/01/blog-post_28.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अल्पसंख्याक हक्क दिन_**_आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००६:संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.**१९९५:अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.**१९८९:सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७८:डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३५:श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:स्वालिया नजरुद्दीन सिखलगार -- पत्रकार,लेखिका* *१९८६:ऋचा चढ्ढा-- भारतीय अभिनेत्री, निर्माती* *१९७६:राजेश काटोले --वऱ्हाडी स्तंभलेखक, कवी**१९७६:संदीप देशमुख गणोजेकर -- कवी* *१९७५:दादाराव डोल्हारकर -- कवी,लेखक तथा मुख्याधिकारी**१९६९:डॉ.चिंदानंद आप्पासाहेब फाळके-- कवी,लेखक* *१९६३:ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता**१९६२:हेमंत नारायण जोशी-- कवी* *१९६२:संजय नार्वेकर-- भारतीय अभिनेता**१९६१:लालचंद सीताराम राजपूत- भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५९:रमेश पांडुरंग पुंडलिक-- लेखक,कवी**१९५७: संजीवनी जयंत तोफखाने -- कवयित्री,लेखिका* *१९५४:विजय वसंत तरवडे-- लेखक संपादक**१९४०:कृष्णा कल्ले-- मराठी,हिंदी आणि कन्नड चित्रपटांमधील भारतीय पार्श्वगायिका (मृत्यू:१५ मार्च २०१५)**१९३५:प्रा.वामन सदाशिव पात्रीकर-- मराठीतले कथा-कादंबरीकार आणि मुलांसाठी नाटके लिहिणारे नाटककार (मृत्यू: १९ एप्रिल २००३)**१९३१:सदाशिव शिवराम भावे-- समीक्षक(मृत्यु:३ऑक्टोबर १९८६)**१९३०:रमेश अच्युत तेंडुलकर--कवी,लेखक आणि समीक्षक (मृत्यू:१९ मे १९९९)**१९२७:पंडित किसनराव पाडळकर-- लेखक, संपादक(मृत्यू:१६ जुलै १९९८)* *१९२६:सुरेश हळदणकर --भारतीय शास्त्रीय गायक,अभिनेता(मृत्यू:१८ जानेवारी २०००)**१९२६:प्रा.डॉ.वसंत अनंत शहाणे-- लेखक**१९२३:भास्करराव आनंदराव पांढरीपांडे-- कवी (मृत्यू:३ मे १९९३)**१९२२:सदानंद भटकळ -- लेखक,कवी* *१९२०:माधव कृष्ण पारधी -- जेष्ठ पत्रकार, कवी,लेखक,संपादक* *१९१८:वासुदेव यशवंत गाडगीळ-- नाट्य चित्र समीक्षक लेखक (मृत्यू:१७ जुलै २००१)**१८९०:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम.रेडिओचे संशोधक (मृत्यू:३१ जानेवारी १९५४)**१८८७:भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर’ (मृत्यू:१० जुलै १९७१)**१८७८:जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:५ मार्च १९५३)**१८५६:सर जे.जे.थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:३० ऑगस्ट १९४०)**१६२०:हेन्रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू:२० जून १६६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म:११ मार्च १९१५)**२०००:मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी – इतिहास संशोधक,वैदिक संस्कृतीचे अभ्यासक(जन्म:६ फेब्रुवारी १९२५)* *१९९५:कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार**१९९३:राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.* *१९८०:अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म:२० फेब्रुवारी १९०४)**१८२९:जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म:१ ऑगस्ट १७४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ऑफरचा भुलभुलैय्या*कमी श्रमात जास्त संपत्ती मिळावी असे प्रत्येक मनुष्याला वाटणे म्हणजे आपल्या अंगात असलेल्या आळशीपणाला उत्तेजन देणे होय. ज्या ज्या वेळी मनुष्य असे प्रयत्न करत आला आहे त्या त्यावेळी त्याला उदासीनते शिवाय काहीही मिळाले नाही. तरी सुद्धा माणूस अश्या घटनेतून काही बोध न घेता पुन्हा तश्याच काही बाबीच्या शोधात राहतो. मी गोष्ट करतोय ऑफरची .........!पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2024 मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, सूरतमध्ये पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्येसाठी 19 जानेवारी 2024 पासून 1000 हून अधिक रेल्वेगाड्या धावणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *या महिनाअखेर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात १० इलेक्ट्रिक वातानुकुलित डबलडेकर बसगाड्या दाखल होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक आक्रमक, तीन दिवस कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा संघटनेचे नेते एकनाथ ढाकणे यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लिबियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ बोट बुडून युरोपला जाणाऱ्या 60 स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूरच्या सोलार कंपनीतील स्फोटात ९ जणांचा मृत्यू, कामगारांची प्रवेशद्वारावर घोषणाबाजी, अखेर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *पोटात कावळे का ओरडतात ?* 📒 'पोटात कावळे ओरडतात' ही अलंकारिक भाषा झाली. खरोखरच पोटात कोणतेही पक्षी वा प्राणी जाऊन बसत नाहीत. पोटात होणाऱ्या आवाजाला उद्देशून ही भाषा वापरली गेली आहे. भूक लागली म्हणजेच पोटात कावळे ओरडतात किंवा हे आवाज होतात हेही खरं नाही. वास्तविक हे आवाज नेहमीच होत असतात.आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत पसरलेली एक लांबलचक पोकळ नळीच असते. तोंडातल्या घासावर दात आणि लाळ यांचा प्रभाव पडला की त्याचा एक लगदा तयार होतो. हा लगदा मग त्या नळीतून पुढे पुढे सरकू लागतो; पण तसं तो स्वतःच्या जीवावर करू शकत नाही. त्यासाठी त्याला तोंडातून अन्ननलिकेच्या मार्गानं जठरात उतरावं लागतं. तिथं त्याचं पचन होऊन तो आणखी पातळ होतो. तिथून तो मग आतड्यांच्या आणखी अरुंद नळीत उतरतो. या अरुंद नळ्यांमधला त्याचा प्रवास सुकर होतो. कारण त्या नळ्याही त्या प्रवासाला मदत करत असतात. आपल्या पायजम्याच्या नाड्यात एखादी पिन जेव्हा पुढे सरकवायची असते तेव्हा आपण ती पिन जिथे आहे तिथे दाब देऊन तो भाग आकसून घेतो. त्याच्या पुढचा भाग थोडासा पसरत असल्याने ती पुढे सरकते. तशी ती पुढे गेली की आता ती जिथे पोहोचली असेल त्या भागावर दाब देऊन तो आकसून घेतो.पचनसंस्थेच्या नळ्यांमध्येही अशीच हालचाल होत असते. त्यासाठी त्या नळ्यांशी जोडलेले स्नायू आलटून पालटून आकसतात आणि प्रसरण पावतात. स्नायू आकसले की त्या नळीला चिमटा बसतो. तिथे असलेल्या लगद्यावर दाब पडतो. नळीच्या पुढच्या भागाचं त्याचवेळी प्रसरण झालेलं असल्यामुळे सहाजिकच तो लगदा पुढे त्या भागात ढकलला जातो तोवर तो भाग अाकसतो. अशा रीतीने त्या नळीतून एखादी लहर दौडत गेल्यासारखी होते. तो लगदा पुढे पुढे सरकत राहतो.पचनसंस्थेच्या या नळ्यांची ही हालचाल सतत होत असते. हृदयाची जशी सतत होते तशीच. हृदयाच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटी हृदयाची धडधड होते. त्याचा ठोका पडतो. त्या ठोक्याचा आवाज आपण स्टेथोस्कोपमधून ऐकू शकतो. आतड्याच्या या सततच्या आकुंचन प्रसरणापोटीही असाच आवाज होतो. जेव्हा त्या नळ्यांमध्ये अन्नाचा गोळा असतो तेव्हा तो आवाज त्या लगद्यामध्ये जिरतो. तो घुमत नाही; पण जेव्हा त्या नळ्या मोकळ्या असतात तेव्हा तो शोषुन घेणे शक्य होत नाही. उलट तो घुमतो. मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. कदाचित आपल्याला पोषणाची गरज आहे, हे सांगण्यासाठी मेंदू त्या नळ्यांशी जोडलेल्या स्नायूंना अधिकच जोरानं आकुंचन प्रसरण करण्याचा आदेश देत असावा. त्यामुळेही तो आवाज मोठा होतो. आपल्याला सहज ऐकू येतो. पोटातल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते.डॉक्टर बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशात सर्वाधिक लांबीचे महामार्ग कोणत्या राज्यात आहेत ?२) २०२३ चा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला ?४) जगातील कोणत्या विद्यापीठात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या आहे ?५) मंगळ ग्रहाच्या दोन्ही चंद्राची नावे सांगा ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) डॅनियल बरेनबोईम - अर्जेंटिना व अली अबू अव्वाद - पॅलेस्टाइन ३) १० लक्ष ४) इंदिरा गांधी मुक्त राष्ट्रीय विद्यापीठ, भारत ५) फोबॉस व डिमॉस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नितीन वंजे👤 महेश जोगदंड👤 जनार्दन नेउंगरे👤 रवी यमेवार, धर्माबाद👤 उदयराज कोकरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले। जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना। जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ प्रसंगी एखादी वस्तू किंवा सामान गहाण ठेवणे वाईट नाही कारण ती, परिस्थिती त्या, प्रकारची असते काही दिवसांनी ते गहाण ठेवलेले सामान सुद्धा सोडवले जाऊ शकते.पण, आपला मेंदू जर गहाण ठेऊन असेल तर मात्र आपल्या स्वभावात किंवा व्यवहारात खूप काही फरक पडू शकतो. म्हणून कितीही काही झाले तरी अशी चूक करू नये ही छोटीशी चूक खुप महागात पडू शकते.म्हणून शक्य तेवढे स्वतंत्र निर्णय घेण्याचा व स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.तात्पर्यः कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते..•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ विजय दिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.**१९८५:कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित**१९७१:भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती,बांगलादेशची निर्मिती**१९४६:थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९३२:’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.**१९०३:मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.**१७७३:अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:शुभांगी सोमनाथ जाधव-काशीकर-- कवयित्री* *१९८६:हर्षदीप कौर-- भारतीय पार्श्वगायिका* *१९७२:डॉ.अस्मिता संजय हवालदार -- लेखिका**१९६९:वनिता अरुण गावंडे-- ज्येष्ठ लेखिका**१९६९:सुवर्णा गोरख पवार - जेष्ठ लेखिका* *१९५९:प्रा.हेमंत पंढरीनाथ जुन्नरकर-- लेखक* *१९५८:डॉ.लता प्रकाश महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९४९:डॉ.वसंत काळपांडे -- जेष्ठशिक्षण तज्ज्ञ,लेखक,मुख्य संयोजक,शिक्षण विकास मंच,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई.तथा निवृत्त शिक्षण संचालक**१९४४:उल्हास भगवान सुतावणे-- लेखक* *१९४२:सुरेश दत्तात्रय साठे-- लेखक**१९४०:दिगंबर गोविंदराव मुंढे -- कादंबरीकार**१९३८:प्रा.डॉ.योगेंद्र लक्ष्मण मेश्राम -- लेखक**१९३७:कल्याण वासुदेव काळे-- मराठी लेखक आणि मराठी भाषा,साहित्य ह्या विषयाचे अभ्यासक(मृत्यू:१७ जानेवारी२०२१)**१९३३:प्रभाकर भानुदास मांडे -- प्रसिद्ध लोकसाहित्य अभ्यासक,लेखक**१९२६:साजाबा विनायक (बबन) प्रभू -- लेखक (मृत्यू:२७ आगस्ट १९८१)* *१९२१:प्रा.कुसुमताई साठे -- लेखिका, कवयित्री,संपादिका (मृत्यू:३ फेब्रुवारी १९९१)**१९१७:सर आर्थर सी.क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू:१९ मार्च २००८)**१८८२:जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू:२१ डिसेंबर १९६३)**१७७५:जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू:१८ जुलै १८१७)**१७७०:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन,हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू:२६ मार्च १८२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म:३ नोव्हेंबर १९५४)**२०००:सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती.(जन्म: १८९९)**१९८०:कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म:९ सप्टेंबर १८९०)**१९६५:डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार(जन्म:२५ जानेवारी १८७४)**१९६०:चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक,महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश,शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म:४ फेब्रुवारी १८९३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक देश, एक ओळखपत्र*राष्ट्रीय मतदार पडताळणी मोहिमेतून मतदार याद्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असून बोगस मतदान टाळण्यासाठी देशभर एक व्यक्ती एक मतदान करण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. खरोखरच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे. आजची मतदार यादी जर नजरेखालून घातली तर असे लक्षात येते की ............पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांचा अनोखा उपक्रम : छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या नव्हे जिल्हा परिषदेने आयोजित केल्या चक्क पालकांच्या क्रीडा स्पर्धा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तर भारत गारठला ! शिमल्यापेक्षा दिल्लीत कमी तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आमदार अपात्रतेसंबंधी निकालासाठी विधानसभा अध्यक्षांची मुदत वाढवली, 10 जानेवारीपर्यंत निर्णय द्या, सुप्रिम कोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विरोधी पक्षातील मोजक्याच नेत्यांना निधी, बाकींच्यांना काहीच नाही, निधीवाटपावरून जितेंद्र आव्हाडांची नाराजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काशी बनतयं पर्यटन केंद्र, वार्षिक उलाढाल 20,000 कोटींच्या पुढे; अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे गारठणार! 18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशा* 🐝*****************नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात.षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते.ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते.फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात.मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात.मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात.मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शिंपी पक्षी कशापासून घरटे बनवतात ?२) राज्यघटनेत कलम ३७० चा समावेश कोणत्या दिवशी झाला होता ?३) भारतात सध्या पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळल्या जात आहे ?४) महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर कोणते ?५) 'महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा' हे उद्गार कोणाचे आहेत ? *उत्तरे :-* १) झाडांच्या पानांना शिवून २) १७ ऑक्टोबर १९४९ ३) १० टक्के ४) चंद्रपूर ५) सेनापती बापट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. खा. हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा खासदार👤 डॉ. वसंत काळपांडे, मुंबई👤 डॉ. गजानन चौधरी, नांदेड👤 डॉ. शिवशक्ती पवार, नांदेड👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी👤 योगेश गुजराथी, धर्माबाद👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम👤 नरेश पांचाळ, धर्माबाद👤 श्याम पेरेवार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। भयातीत तें संत आनंत पाहे॥ जया पाहतां द्वैत कांही दिसेना। भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• इतरांविषयी नको त्या शब्दात बोलून स्वतः चा समाधान करून घेण्यात स्वतःला धन्य समजणारे. समाजात अनेक दिसतील खऱ्या अर्थाने तेच रिकामे असतात, त्यांच्याकडे खूप वेळ असतो. इतरांचे भले कशाप्रकारे केले जाते याकडे मात्र लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. पण, आजही याच समाजात असे काही व्यक्तीमत्व आहेत की, स्वतः साठी जगायला त्यांना वेळ मिळत नाही ते व्यक्तीमत्व अभिमानाचे दुसरे नाव असतात. समाजात माणसं तर भरपूर आहेत पण, विचारसरणी मात्र एकसारखी दिसून येत नाही. जर इतरांसाठी चांगले करता येत नसेल तर चांगले करणाऱ्यांच्या वाटेत काटे पेरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राणीने घेतलेली परीक्षा*एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध आणि चतुर राजाचा चातुर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे."दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती. राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली. सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या.राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस."*तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 डिसेंबर 2023💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/world-tea-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्यांदा सुवर्णपदक**१९९१:चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर**१९७६:सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश**१९७०:व्हेनेरा - ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रमोदकुमार रहांगडाले -- लेखक**१९७८:बाबासाहेब तुकाराम बारजकर -- कवी* *१९७६:हरिदास भीमरावजी वानखडे -- कवी* *१९७२:संतोष पद्माकर पवार -- कवी,संगीतकार,अभिनेता,नाटककार,नाट्य दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९६२:प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे -- प्रसिद्ध लेखक, अभ्यासक**१९६०:अजीज हसन मुक्री- कवी* *१९५६:माया धुप्पड-- बालसाहित्याचे लेखन करणाऱ्या भावकवयित्री,गीतकार,लेखिका आणि समीक्षक**१९५४:रमेश नागेश सावंत-- कवी,लेखक अनुवादक* *१९४३:अरुण गणेश कुलकर्णी -- लेखक* *१९४०:रविंदर कपूर उर्फ गोगा कपूर -- भारतीय अभिनेता(मृत्यू:३ मार्च २०११)**१९४०:गजानन द्वारकानाथ रेळेकर-- लेखक* *१९३५:उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार**१९३२:टी.एन.शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रमॉन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.(मृत्यू:१० नोव्हेंबर २०१९)**१९३१:पंडित रनाथ सेठ-- ज्येष्ठ बासरी वादक (मृत्यू:१५ फेब्रुवारी २०१४)**१९३०:वसुधा पद्माकर पाटील--कथाकार, कादंबरीकार**१९२७:डॉ.अनुराधा पोतदार--मराठीतील जेष्ठ कवयित्री (मृत्यू:३ ऑक्टोबर २०१३)**१९२४:कृष्ण मुकुंद उजळंबकर--**कादंबरीकार, ग्रंथालयशास्त्राचे तज्ज्ञ**१९२३:शीलावती चिंतामण बाबकर -- बाल कथा लेखिका* *१९०५:इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू:११ ऑगस्ट १९७०)**१९०३:रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरुपानंद -- भारतीय आध्यात्मिक गुरू,संत वाड:मयावर लेखन(मृत्यू:१५ ऑगस्ट १९७४)**१८९२:जे.पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक,अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू:६ जून १९७६)**१८६२:विष्णू गणेश नेने--कवी (मृत्यू:२३ जानेवारी १९२४)**१८५२:हेन्री बेक्वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२५ ऑगस्ट १९०८)**१८३२:गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू:२७ डिसेंबर १९२३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म:१८ सप्टेंबर १९००)**१९६६:वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म:५ डिसेंबर १९०१)**१९५०:सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी,स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री,भारताचे लोहपुरुष,भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (जन्म:३१ आक्टोबर १८७५)**१७४९:छत्रपती शाहू महाराज-- पहिले मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती(जन्म:१८ मे१६८२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक कप चहा*जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( International Tea Day ) साजरा केला जातो. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने काही आठवणी .......~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन मांडल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी घेतला संप मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मार्च ते मे अखेर होतील 19 अभ्यासक्रमांच्या सीईटी:सीईटी सेलने घोषित केले अभियांत्रिकीसह सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वसामान्यांना मोठा झटका! तीन आठवड्यात दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, राज्य सरकारची कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोटक महिंद्रा बँकेची रोकड नेणारे वाहन दातीफाट्या जवळ उलटले:5 जण जखमी, आखाडा बाळापूर पोलिसांच्या सतर्कतेने 5 कोटींची रक्कम सुरक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 106 धावानी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल.येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते.मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत.मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात.जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) राजस्थान राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) कोणत्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीर या राज्याला 'विशेष दर्जा' बहाल करण्यात आले होते ?३) जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी हवाई बाजारपेठ म्हणून कोणत्या देशाला मानले जाते ?४) 'सायक्लोन मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?५) कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ? *उत्तरे :-* १) भजनलाल शर्मा २) कलम ३७० ३) भारत ४) मृत्युंजय महापात्रा ५) ८ राज्य *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी सुंकेवार, कलाशिक्षक, देगलूर👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 रामकृष्ण लोखंडे👤 शिवाजी रामदिनवार, सहशिक्षक👤 ऋषिकेश गरड, उस्मानाबाद👤 दीपक चावरे, सहशिक्षक👤 श्रीधर काटेगर, आरमुर, तेलंगणा👤 अनिल जाधव शिरपूरकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरीं रे मना संगती सज्जनाची। जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥ बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे। महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून वेळेला महत्व देणे आवश्यक आहे. वेळेचे महत्व समजून घेणे तेवढेच गरजेचे आहे. जीवन प्रवासात अनेक सोबती मिळत असतात. कोणी स्वार्थ साधून एकटे सोडून निघून जातात,तर कोणी पाठीशी उभे राहतात. पण,वेळ मात्र तशी नसते संधीचे सोने करायला शिकवते व आधार होते म्हणून अनमोल अशा वेळेकडे दुर्लक्ष न करता तिचे महत्व जाणावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लालसेपायी प्राण गेले*जय आणि विजय यांच्यात घनिष्ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणा-या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात मृत्युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला.तात्पर्य- कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६१:टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.**१९२९:’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९०३:किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.**१८१९:अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:कुलदीप यादव-- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९०:विनय पाटील-- कवी**१९८६:संवाद सतीश तराळ-- लेखक,कवी* *१९८०:आनंदराव नागनाथराव पाटील-- लेखक**१९७८:समीरा रेड्डी-- भारतीय अभिनेत्री**१९७२:विजय यशवंत सातपुते -- कवी,लेखक संपादक* *१९५७:शीतल श्याम दामले -- कवयित्री* *१९५३:विजय अमृतराज –भारतीय लॉनटेनिसपटू**१९५२:सुषमा रमेशचंद्र म्हैसेकर-इर्लेकर-- कवयित्री* *१९५१:विजय श्री.केळकर-- लेखक**१९५०:प्रल्हाद श्रीराम गावत्रे -- कवी* *१९४९:श्रीकांत शंकर बहुलकर-- संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक,बौद्धविद्या व वेदविद्या अभ्यासक**१९४९:डॉ.अनुपमा निरंजन उजगरे-- जेष्ठ लेखिका आणि प्रसिद्ध कवयित्री, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा**१९४६:संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू:२३ जून १९८०)**१९४४:अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशी -- जेष्ठ लेखक तथा निवृत्त सहा.पोलिस आयुक्त* *१९४३:विजय शंकर जोशी-- लेखक**१९४०:लक्ष्मण मोतीराम बांदेकर-- मराठीतील नामवंत नाटककार (मृत्यू:१२ फेब्रुवारी २०१५)**१९३९:सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू:१२ सप्टेंबर १९८०)**१९३८:प्रभाकर वामनराव ढगे-- कवी लेखक**१९३४:श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक**१९२८:प्रसाद सावकार – गायक व नट**१९२४:राज कपूर – अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू:२ जून १९८८)**१८२२:रेव्ह सॅम्युएल केअरबॅंक -- धर्मगुरू,दूरदर्शी शिक्षक,लेखक,संपादक (मृत्यू:३१ मे१९८८)**१९१८:योगाचार्य बी.के.एस.अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.(मृत्यू:२० ऑगस्ट, २०१४)**१९०५:विश्वनाथ पांडुरंग दांडेकर --मराठी लेखक,कादंबरीकार,लघुनिबंधकार आणि समीक्षक (जन्म:१ जानेवारी १९७४)* *१८९५:जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू:६ फेब्रुवारी १९५२)**१८९२:विठ्ठल कृष्ण नेरूरकर-- मराठी कथाकार,कवी आणि नाटककार(मृत्यू:१९ मार्च १९४९)* *१५४६:टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (मृत्यू:२४ आक्टोबर १६०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:श्रीराम ताम्रकर --चित्रपट विषयक विपुल लेखन (जन्म: ९ नोव्हेंबर १९३८)**२००५:सुधीर जोशी--विनोदी मराठी अभिनेते (जन्म:१९४८)**१९७९:गोविंद घाणेकर-- लेखक (जन्म:१५ जून १९११)**१९७७:गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर – गीतकार,कवी,लेखक, पटकथाकार,अभिनेते.गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म:१ आक्टोबर १९१९)**१९६६:शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार (जन्म:३० ऑगस्ट १९२३)**१७९९:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म:२२ फेब्रुवारी १७३२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आपली कामे आपणच करावीत*एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी .........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये महिनाभरात अॅलिकॉट मशिन उपलब्ध करून देणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *10 ते 12 जानेवारीला एमआयटीमध्ये भारतीय छात्र संसद:10 ते 12 हजार विद्यार्थ्यांचा असणार सहभाग ; राहुल कराड यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील तरुणांसाठी महत्त्वाची बातमी ; 23 हजार 628 पोलिस शिपायांची होणार भरती, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सरकारचं ओबीसी कार्ड, ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सख्खा भाऊ विनोदी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक अन् रिंकू सिंहची टी-20 रँकिंगमध्ये थेट हनुमान उडी !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गॅसेस का होतात ?* 📙खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो. लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया'* असे कोणाला म्हटले जाते ?२) मध्यप्रदेश या राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?३) भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार स्त्री व पुरूष यांना समान कामासाठी समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे ?४) 'सिटी ऑफ गोल्डन गेट' कोणत्या शहराला म्हणतात ?५) गुणात्मकदृष्ट्या आहाराचे कोणते प्रकार आहेत ? *उत्तरे :-* १) जादव पायेंग २) मोहन यादव ३) कलम ३९ ४) सन फ्रान्सिस्को ५) सात्त्विक, राजस, तामस आहार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारंग भंडारे, येवती👤 विजय सातपुते, पुणे👤 राज काकडे,वसमत👤 पवन धावनी, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे गर्व आंगी सदा वीतरागी। क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥ नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा। इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीचे ऋण फेडावे, ज्यांच्यामुळे जग बघायला मिळाले मग ते कसेही असोत त्यांची आठवण काढावे,ज्यांनी स्वतः साठी न जगता योगदान दिले त्यांचे विचार अंगिकारावे,ज्या समाजाचे आपण आहोत त्या समाजाला काहीतरी देणं लागतं. जीवनात कितीही कमावले तरी सोबत कोणी काहीच घेऊन जात नाही. देण्याऱ्याचे नाव मोठे आहे घेण्याऱ्याचे नाही असे अनेकजण म्हणतात. घेण्यासाठी तर..संपूर्ण आयुष्य पडले आहे पण,देण्यासाठी वेळ, सोबतच आपले काळीज मोठे असावे लागते त्यासाठी सर्वाप्रती आपल्यात आपुलकी व माणुसकी असणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरीब आणि श्रीमंत माणूस*एक गरीब माणूस आणि एक श्रीमंत माणूस शेजारी शेजारी राहत होते. गरीब माणसाचे चपला जोडे शिवण्याची दुकान होते. काम करता करता तो अगदी आनंदाने गाणे गात असे.तो अगदी निर्धास्त जीवन जगत असे. आपल्या घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, त्यांना कुलूप कड्या लावाव्यात असे त्याला कधीच वाटत नसे.रोज रात्री तो देवाची प्रार्थना करून झोपी जात असे.शेजारी राहत असलेला श्रीमंत माणूस या गरिब आनंदी माणसाकडे नेहेमी पाहत असे. श्रीमंत माणसाला अनेक चिंता होत्या; स्वतःच्या पैशाची आणि सुरक्षेततेची त्याला नेहमी काळजी वाटत असे. आपल्या घराची दारे खिडक्या घट्ट बंद करत असे. एवढे करूनही त्याला शांत झोप लागत नसे.एके दिवशी श्रीमंत माणसाने गरीब माणसाला घरी बोलावले त्याने त्याला पाच हजार रुपये दिले आणि म्हणाला , " हे पैसे तुझ्याकडे ठेव मला या पैशांची गरज नाही.ते तुझेच पैसे आहेत असे समज.एवढे पैसे मिळाले म्हणून गरीब माणसाला पहिल्यांदा खूप आनंद झाला.पण त्या पैशांमुळे त्याच्या जीवनातील शांतता पार नाहीशी झाली.त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या घराचे दार व सर्व खिडक्या बंद केल्या आणि त्यांना कड्या घातल्या आपले पैसे सुरक्षित आहेत ना, हे पाहण्यासाठी रात्री तो कितीतरी वेळा झोपेतून उठला.दुसऱ्याच दिवशी सकाळी तो गरीब माणूस श्रीमंत माणसाकडे आला. त्याने पाच हजार रुपये श्रीमंत माणसाला परत दिले आणि हात जोडून म्हणाला, " साहेब, हे तुमचे पैसे परत घ्या. आपण हे पैसे घेतलेत तरच माझं हसतं-गातं जीवन आणि शांत झोप मला परत मिळेल."*तात्पर्य :- सर्व सुख समाधान पैशात सामावलेले नसते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.**१९९१:मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४१:दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०:’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३:मेघना गुलजार-- भारतीय लेखिका, दिग्दर्शक आणि निर्माती**१९६६:डॉ.अनिल तानाजी सपकाळ-- मराठी नाटककार,चित्रपटकथा लेखक व समीक्षक साहित्यिक**१९६५:माधुरी साकुळकर -- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९६०:दग्गुबाती वेंकटेश -- भारतीय चित्रपट अभिनेता**१९५८:हेमंत दत्तात्रेय सावंत-- लेखक* *१९५७:डॉ.विद्यासागर जनार्दन पाटंगणकर-- संतसाहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक* *१९५६:प्रभाकर दुपारे -- आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक, नाटककार,जेष्ठ पत्रकार**१९५५:मनोहर पर्रीकर – गोव्याचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:१७ मार्च, २०१९)**१९४९:सुप्रिया मधुकर अत्रे-- लेखिका**१९४७:विद्युत रवींद्र भागवत-- स्त्रीवादी लेखिका,साहित्यिका**१९४५:अस्मिता इनामदार -- कवयित्री**१९४२:रमाकांत यशवंत देशपांडे -- खगोल अभ्यासक,लेखक,कवी* *१९४०:शरद केशव साठे-- मराठी ग्रंथसूचिकार म्हणून प्रसिद्ध(मृत्यू:१ आक्टोबर २०१५)**१९३२:डॉ.निला जोशीराव-- लेखिका* *१९३०:मधुसूदन कृष्णाची आगाशे-- लेखक* *१९२८:धनश्री हळबे-- मराठी लेखिका आणि अनुवादक**१९२८:सरिता मंगेश पदकी-- कवयित्री, कथालेखिका,बालसाहित्यकार,नाटककार आणि अनुवादिका(मृत्यु:३ जानेवारी २०१५)**१९२६:प्रमिला मदन भागवत: कवयित्री लेखिका (मृत्यू:२९ नोव्हेंबर २०१३)**१९२४:डॉ.विद्याधर गंगाधर पुंडलिक -- प्रसिद्ध कथाकार,नाटककार,समीक्षक (मृत्यु:९ ऑक्टोबर १९८९)**१९२४:मंगला दि.साठे-- लेखिका* *१९२३:रामभाऊ जोशी -- जेष्ठ पत्रकार, लेखक* *१९२०:प्रा.श्रीनिवास हरि दीक्षित-- तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,मराठी लेखक(मृत्यू:३ ऑक्टोबर २०१३)* *१९०२:इलचंद्र जोशी-- प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार(मृत्यू:१९८२)**१८९९:पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता,कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (मृत्यू:२१ ऑगस्ट १९७६)**१८०४:मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ,मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली,इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू:२६ फेब्रुवारी १८७७)**१७८०:योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ मार्च १८४९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:मोरेश्वर दिनकर पराडकर-- प्रकांड पंडित,अभ्यासक,संशोधक(जन्म:१७ नोव्हेंबर १९२५)**१९९६:श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक,क्रांतिकारक,कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार**१९९४:विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक(जन्म:१७ आक्टोबर १९१७)**१९८६:स्मिता पाटील – अभिनेत्री.पद्मश्री (१९८५),दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (जन्म:१७ आक्टोबर १९५५)**१९६१:अॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत.(जन्म: १८६०)**१९३०:फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म:३ सप्टेंबर १८६९)**१७८४:सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक,टीकाकार,पत्रकार व विचारवंत (जन्म:१८ सप्टेंबर १७०९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज, विधानसभेवर धडकताना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कार्यकर्तेही आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राज्य सरकारने आनंद निरगुडे यांचा राजीनामा स्विकारला, सुनील शुक्रे बनले नवे अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *इथेनॉल निर्मिती बंदीवरून अजित पवारांचं अमित शाहांना पत्र, साखर कारखान्यांची 35 हजार कोटींची गुंतवणूक धोक्यात येण्याची भीती व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा:दुष्काळ घोषित तालुक्यांना केंद्रीय पथक भेट देऊन पाहणी करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CBSE कडून इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी २०२४ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, उदय सहारणकडं संघाचं नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) छत्तीसगड राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) 'अग्नी मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?३) नुकतेच कोणत्या राज्याने 'सर्वोत्तम श्वास्वत वन्यजीव पर्यटन राज्य' पुरस्कार जिंकला आहे ?४) बहुजन समाज पक्षाच्या ( BSP ) अध्यक्षा मायावती यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून कोणाला घोषित केले ?५) नवीन सूर्यमालेचा शोध कोणी लावला ? *उत्तरे :-* १) विष्णू देव साय, आदिवासी नेता २) अविनाश चंदर ३) मध्यप्रदेश ४) आकाश आनंद, मायावतीचा भाचा ५) NASA *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड👤 राजेश वाघ, बुलढाणा👤 विनोद राऊलवार👤 श्रीनिवास भोसले, नांदेड👤 राजेश जी गडाख, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी। जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥ तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे। तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचे भले व्हावे या उद्देशाने त्या व्यक्तीला आपण कितीही सांगून सुद्धा ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर ते त्याचे दुर्दैव आहे. कारण, या समाजात चांगल्यासाठी सांगणारे फार कमी संज्जन लोक असतात व वाईट मार्गाने नेणारे असंख्य लोक असतात. शेवटी चांगले ऐकणाऱ्याचे भले होत असते आणि वाईट सांगणाऱ्यांमुळे वाईटच परिणाम झालेले बघायला मिळत असते. सोबत इतरांना त्यामुळे अपमानित व्हावे लागते म्हणतात ना की, शेवटी कुठेतरी कर्माचा हिशोब होत असतो. म्हणून चांगले काय व वाईट काय असते या विषयी विचार करणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रयत्नांती यश*एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला.राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९११:दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.**१९०१:जी.मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.**१७५५:डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:रमेश मच्छिंद्रनाथ वाघ -- लेखक* *१९८१:युवराजसिंग – प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९७७:डॉ.योगिता श्याम पिंजरकर -- लेखिका* *१९६९:बंडोपंत राजेश्वरजी बोढेकर -- प्रसिद्ध लेखक* *१९६६:भरत जाधव-- मराठी चित्रपट,थिएटर आणि टीव्ही शोमधील भारतीय अभिनेता आणि निर्माता**१९६४:दीपक तांबोळी -- कथाकार* *१९५९:डॉ.चंद्रकांत लेनगुरे --कवी,कथाकार* *१९५६:प्रभू राजगडकर-- कवी, लेखक**१९५०:रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते**१९५०:संध्या प्रकाश देशपांडे-- कवयित्री* *१९४९:गोपीनाथ पांडुरंग मुंडे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री(मृत्यू:३ जुन १९१४)**१९४७:शिवाजी धर्माजी साळुंके --कवी**१९४२:प्रा.मंदा विजय टेंबे-- लेखिका* *१९४०:शरद पवार – माजी केंद्रीय कृषी मंत्री, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९२२:कमल बाळकृष्ण आपटे-- लेखिका*@*१९२१:यशवंत कानिटकर -- मराठी भाषातज्ज्ञ ,पूर्व भाषासंचालक (मृत्यू:२२ जुलै २०१५)**१९१६:पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर-- स्वतंत्रता सेनानी,गोवा विधानसभेचे अध्यक्ष, लेखक (मृत्यू:५ सप्टेंबर २०००)* *१९१५:फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू:१४ मे १९९८)**१९१२:यशवंत भीमराव आंबेडकर (भैय्यासाहेब)-- भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते (मृत्यू:१७ सप्टेंबर १९७७)**१९०७:खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू:१०ऑगस्ट १९५०)**१९०५:डॉ.मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू:२८ सप्टेंबर २००४)**१८९२:गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (मृत्यू:११ मार्च १९६५)**१८९३:गोविंद सदाशिव घुर्ये--मानववंश समाज,लेखक,अभ्यासक (मृत्यु:२८ डिसेंबर १९८३)**१८७२:डॉ.बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते,नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू:३ मार्च १९४८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:पण्डित रवी शंकर – सतार वादक, *'भारतरत्न’ (जन्म:७ एप्रिल १९२०)**२००५:रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म:२९ डिसेंबर १९१७)**२००५:त्र्यंबक विनायक सरदेशमुख-- कादंबरीकार,समीक्षक (जन्म:२२ नोव्हेंबर १९१९)**२००४:निरंजन हरिश्चंद्र उजगरे--कवी, संपादक (जन्म:६ ऑक्टोबर १९४९)**२०००:जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच.पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (जन्म:१ आक्टोबर १९३०)**१९९२:पं.महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म:१२ जानेवारी १९०६)**१९६४:मैथिलिशरण गुप्त –हिन्दी कवी. ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.(जन्म:३ ऑगस्ट १८८६)**१९३०:परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: १९०८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - साहस*सातव्या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं. अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ......ही लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक कोटी हुन अधिक निवृत्तीवेतन धारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेशचा तिढा सुटला, मोहन यादव यांची मुख्यमंत्रीपदी निवड, शिवराजसिंह चौहानानंतर पदभार सांभाळणार, दोन उपमुख्यमंत्रीही मोहन यादवांच्या दिमतीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जम्मू काश्मीर स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग, कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम; एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्याचे आश्वासन, तर इथेनॉल बंदीविरोधात अमित शाहांची भेट घेणार, अजित पवारांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, कांदा प्रश्नावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, नाशिकच्या चांदवडमध्ये निर्यातबंदीविरोधात आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतमाता ज्ञानपीठातर्फे 42 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन:डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यात होणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 **********************विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र.यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले.आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात.उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते.उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात.रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या समाजसुधारकास *'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस'* म्हणून ओळखले जाते ?२) भारताच्या पहिल्या महिला आमदार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?३) 'Why didn't you come sooner ?' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?५) महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे ? *उत्तरे :-* १) म.गो. रानडे २) डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी ३) कैलास सत्यार्थी ४) कोपर्निकस ५) पुणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर👤 शुभानन गांगल, पुणे👤 अशोक पाटील कदम👤 समीर मुल्ला👤 वतनदार पवनकुमार नारायण👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 महेश शिवशेट्टी👤 माधव पाटील शिंदे👤 राजकुमार इंगळे👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर👤 विपीन कासलीवाल👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचारूनि बोले विवंचूनि चाले। तयाचेनि संतप्त तेही निवाले॥ बरें शोधल्यावीण बोलो नको हो। जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीचे भले व्हावे या उद्देशाने त्या व्यक्तीला कितीही सांगून सुद्धा ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर ते त्याचे दुर्दैव आहे. कारण, या समाजात चांगल्यासाठी सांगणारे फार कमी असतात व वाईट मार्गाने नेणारे असंख्य असतात. शेवटी चांगले ऐकणाऱ्याचे भले होत असते आणि वाईट सांगणाऱ्यांमुळे वाईटच परिणाम झालेले बघायला मिळत असतात. सोबत इतरांना त्यामुळे अपमानित व्हावे लागते म्हणतात ना की, शेवटी कुठेतरी कर्माचा हिशोब होत असतो. म्हणून चांगले काय व वाईट काय असते या विषयी विचार करणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अति तेथे माती*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही.त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अंतरराष्ट्रीय पर्वत दिवस (International Mountain Day)_* •••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश**१९९४:अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.**१९७२:अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.**१९६७:कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.**१९४६:युनिसेफ (UNICEF) ची स्थापना**१९४१:दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३०:सी.व्ही.रमण यांना नोबेल पारितोषिक**१८१६:इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:दीपराज दत्ताराम माने-- लेखक**१९६९:संगीता अनंत थोरात -- कवयित्री* *१९६९:विश्वनाथन आनंद –भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर**१९६९:दयानंद चंद्रशेक शेट्टी-- भारतीय चित्रपट अभिनेता**१९६५:किमी काटकर-- अभिनेत्री आणि मॉडेल**१९६३:प्रा.डॉ.माधव सरकुंडे -- प्रसिद्ध कवी,लेखक विचारवंत* *१९५७:डॉ.विकास हरिभाऊ महात्मे -- नेत्र शल्यचिकित्सक,राज्यसभेचे खासदार**१९५२:वेणू श्रीनिवासन-- भारतीय उद्योगपती, TVS मोटर कंपनीचे अध्यक्ष**१९५०:अविनाश शंकर डोळस-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक(मृत्यू:११ नोव्हेंबर २०१८)**१९३८:प्रा.डॉ.बा.धो.रामपुरे -- कवी,लेखक* *१९३६:डॉ.उमेश अच्युत तेंडुलकर-- लेखक**१९३५:प्रा.जयश्री दिगंबर खिरे -- लेखिका**१९३५:प्रणव मुखर्जी-- भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती(मृत्यू:३१ ऑगस्ट २०२०)**१९३४:सलीम अझीझ दुरानी-- भारतीय क्रिकेटपटू,अष्टपैलू खेळाडू,(मृत्यू:२ एप्रिल २०२३)**१९३१:त्र्यंबक लक्ष्मण कुलकर्णी-- लेखक**१९२९:सुभाष गुप्ते – लेगस्पिनर क्रिकेटर (मृत्यू:३१ मे २००२)**१९२५:राजा मंगळवेढेकर – प्रसिद्ध बालसाहित्यकार (मृत्यू:१ एप्रिल २००६)**१९२४:मधुसूदन/मधुकर सदाशिव घोलप-- लेखक* *१९२४:दत्ताराम कृष्ण सुकथनकर -- सुप्रसिद्घ गोमंतकीय कोकणी साहित्यिक.(मृत्यू:२९ ऑगस्ट २००५)**१९२२:मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता,पद्मभूषण (१९९१),दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४)(मृत्यू:७ जुलै २०२१)**१९२१:रा.व्य.जोशी -- लेखक* *१९१५:मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू:१७ जून १९९६)**१९०९:नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ( मृत्यू:३ मार्च १९८९)* *१९०९: गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये--**संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक (मृत्यु:१८ ऑक्टोबर २००२)**१८९९:पुरुषोत्तम यशवंत देशपांडे – कादंबरीकार,तत्त्वचिंतक विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे संपादक(मृत्यू:२६ जुलै १९८५)* *१८९२:अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते,पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष,पद्मभूषण (१९५४), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६),पद्मविभूषण (१९७७)(मृत्यू:१९८४)**१८८२:सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू:११ सप्टेंबर १९२१)**१८६७:’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार,आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू:२५ मार्च १९४०)**१८४३:रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू:२७ मे १९१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:गोविंदराव कुलकर्णी-- मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक(जन्म:१९२९)**२००४:एम.एस.सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म:१६ सप्टेंबर १९१६)**२००२:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म:१६ जानेवारी १९२०)**२००१:रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म:१७ मार्च १९०९)**१९९८:रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म:६ फेब्रुवारी १९१५)**१९९१:रघुनाथ गोविंद सरदेसाई--पत्रकार, संपादक,नाटय-चित्रपट समीक्षक (जन्म:७ सप्टेंबर १९०५)**१९८७:गुरूनाथ आबाजी तथा जी.ए.कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गूढकथालेखक (जन्म:१० जुलै १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मानवी हक्क दिन*लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना...........लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणमध्ये महिलांना मोफत बसप्रवास; गरिबांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा, सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आता यापुढे सरकारच्या पनवानगी शिवाय भंडारा किंवा भोजनदान करता येणार नाही. अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकच्या निफाडमध्ये शिवशाहीला भीषण आग,छत्रपती संभाजीनगर मार्गावर बस पेटली, चालकाची सतर्कता अन् प्रवासी बचावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळ नांदेडला महामेळावा घेणार, प्रकाश आंबेडकर, सिद्धरामय्या, तेजस्वी यादव यांना निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विविध मोर्च्यामुळे राजकीय वातावरण तापत असताना सोबतच थंडीसुद्धा तापणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *या वर्षी डास चावल्यामुळे दर तासाला सरासरी २ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामना पावसामुळे रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो.भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ चा *'टाईम ॲथलिट ऑफ द इयर'* हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जाहीर झाला आहे ?२) भारताचे नवे कृषिमंत्री म्हणून कोणाची निवड झाली ?३) 'वाटेवरल्या सावल्या' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?४) राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जातो ?५) बँकिंग प्रणालीशी संबंधित असणारा IFSC कोडचा विस्तारित रूप काय आहे ? *उत्तरे :-* १) लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना २) अर्जुन मुंडा ३) ग. दि. माडगूळकर ४) अमृत क्रांती ५) Indian Financial System Code*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इलियास शेख सर्पमित्र तथा शिक्षक, देगलूर👤 प्रा. नितीन दारमोड, वक्ते व लेखक, धर्माबाद👤 आकाश सोनटक्के👤 विशाल स्वामी👤 आदर्श मडावी👤 प्रिया बुडे👤 रमेश मेरलवार, व्यापारी, करखेली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भजाया जनीं पाहतां राम एकू। करी बाण एकू मुखी शब्द एकू॥ क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू। धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होत की, न केलेल्या कर्माचे फळ दुसऱ्यांच्या कर्मामुळे आपल्याला भोगावे लागत असते पण असं का..? हा एक मोठा प्रश्न आहे. कदाचित हा योगायोग असू शकतो.पण नको ते कर्म कराणारा आनंदाने हसत, हसत जगतो. आपण मात्र स्वतःला चिंतेच्या डोहात बुडवून घेतो. माणसाचा जन्म एकदाच मिळते. मनसोक्त जगून घ्यावे कारण सुखात जरी लाखो लोक असतील तरी शेवटच्या क्षणी मात्र सोबतीला कोणीच येत नाही हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन प्रवास*एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्याआणि तिच्याजवळ बसल्या.जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला"अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे."इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"*आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?सोडून द्या, शांत रहा, कारण*जीवन प्रवास खूप छोटा आहे.*कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.आपला प्रवास खूप छोटा आहे.आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया.कारण एकच की,*आपला प्रवास खूप छोटा आहे ..!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 डिसेंबर 2023💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९५:बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ**१९७१:संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६६:बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.**१९६१:ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म**१९००:लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:दिया मिर्झा-हेंड्रिच-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री व निर्माती**१९७८:किशोर नामदेव कवठे -- प्रसिद्ध कवी लेखक* *१९७५:डॉ.विशाल गोरखनाथ तायडे-- मराठी, हिंदी,इंग्रजी लेखन करणारे लेखक* *१९७४:अंजली अंबेकर-- लेखिका**१९७१:डॉ.जनार्दन पांडुरंग भोसले-- लेखक**१९६८:फराह नाझ हाश्मी--चित्रपट अभिनेत्री**१९६७:मृणाल घाटे-- कवयित्री**१९६५:अभिजीत टोणगावकर -- लेखक* *१९५७:माधुरी वरुडकर --कवयित्री,लेखिका**१९५६:मदन मार्तंडराव बोबडे-- कवी,लेखक**१९५०:प्रतीक्षा प्रकाश वखडेकर-- कवयित्री* *१९४८:विद्या वसंत पराडकर-- कवयित्री* *१९४६:सोनिया गांधी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:खुदराम गोविंद पुरामकर-- लेखक (मृत्यू:१९ डिसेंबर २००४)**१९३९:घन:श्याम धेंडे-- गझलखेरीज एकांकिका,लावनी,विडंबनगीत असे साहित्य प्रकार हाताळणारे (मृत्यू:१४ एप्रिल २०१७)**१९३८:प्रा.भास्कर कुलकर्णी -- लेखक,कथाकार,समीक्षक* *१९२८:प्रा.विजया प्रभाकरराव कुलकर्णी -- लेखिका* *१९२६:रामचंद्र श्रीपाद गोसावी (राम गोसावी)-- प्रसिद्ध कवी* *१९२५:शकुंतला सातपुते-- लेखिका**१९१२:कानू रॉय--हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधील भारतीय अभिनेता आणि संगीतकार(मृत्यू:२० डिसेंबर१९८१)* *१८७८:अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू:१६ मे १९५०)**१८६८:फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू:२९ जानेवारी १९३४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:के.शिवराम कारंथ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरणवादी,चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म:१० आक्टोबर १९०२)**१९९३:स्नेहप्रभा प्रधान --चित्रपट अभिनेत्री, लेखिका (जन्म:२० ऑक्टोबर१९१५)**१९४२:डॉ.द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म:१० आक्टोबर १९१०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा..............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणाचे नवे पंतप्रधान रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या खासदारकीचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरक्षणासाठी माझी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई सुरु राहणार नांदेड मधील सभेत जरांगे पाटील यांचे व्यक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेलमधील कैद्यांना खायला मिळणार पाणीपुरी आणि आईस्क्रीम; सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बाबा रामदेव 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रदीर्घ आजारानंतर ज्युनिअर महमूद कालवश; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना हा १० डिसेंबरला खेळवण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'भारतीय आरमाराचे जनक'* कोण आहेत ?२) जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारे पहिले तीन देश कोणते ?३) नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?४) केंद्रसरकारच्या NCRB अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात सलग तीन वर्षे सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदविण्यात आली ?५) भारतातील पहिले वैद्यकीय ध्यान केंद्र कोठे उभारले जात आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) चीन - ४०%, अमेरिका - १४%, भारत - ७% ३) काँग्रेस ( ११९ पैकी ६४ जागा ) ४) महाराष्ट्र ५) झानभूमी, चापर्डा, यवतमाळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अक्षय जाधव पाटील👤 प्रतीक यम्मलवार👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 जय सिंग चौहान👤 आदित्य नलावडे, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गतीकारणे संगती सज्जनाची। मती पालटे सूमती दुर्जनाची॥ रतीनायिकेचा पती नष्ट आहे। म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खोटेनाटे, रडगाणे करून आणलेले चेहऱ्यावरचे दु:ख साऱ्या जगाला सहजपणे दिसत असते पण, ज्याच्या अंतर्मनात वेदना, दु:ख,व्यथा किती कुटून भरलेले आहे ते कोणीही ओळखू शकत नाही.ज्याचं दुःख त्यालाच कळत असतं कारण चेहरा आणि मुखवटा यात फरक असतो मुखवटा धारण केलेल्या चेहऱ्यामुळे भविष्यात धोका होऊ शकतो. म्हणून खरे दु:ख जर ओळखायचेच असतील तर अंतर्मनाला ओळखण्याचा प्रयत्न करावे त्यासाठी आपली दृष्टी सुद्धा तशीच असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भली खोड मोडली*एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 डिसेंबर 2023💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_40.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय सेना ध्वज दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड**१९९५:फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण**१९९४:कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर**१९८८:यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.**१९७५:इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.**१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.**१९१७:पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.**१८२५:बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९:धनंजय शंकर पाटील-- लेखक,कवी**१९८७:सोनी प्रभाकर कानडे-- कवयित्री* *१९७३:ललित एकनाथ बोरसे -- कवी* *१९७१:अनिसा सिकंदर शेख-- कवयित्री, लेखिका* *१९६२:शेखर सुमन--भारतीय अभिनेता,अँकर,निर्माता,दिग्दर्शक आणि गायक**१९६१:प्रशांत दळवी-- मराठी नाटककार व चित्रपट-कथालेखक**१९५७:जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५६:डॉ.विठ्ठल ठाकूर -- लेखक* *१९५५:पांडुरंग सोमाजी भेलावे-- लेखक,कवी* *१९४८:प्रा.डॉ.भीमराव वाघचौरे--ज्येष्ठ साहित्यिक**१९४६:प्रा.माधवी कवी -- जेष्ठ लेखिका, तत्वज्ञान विषयाच्या अभ्यासक* *१९४०:जीवन चंद्रभान पाटील -- लेखक**१९३१:संगमेश्वर गुरव-- किराणा घराणा चळवळीशी संबंधित गायक(मृत्यू:७ मे २०१४)**१९२५:शोभना जयंत चांदूरकर -- कवयित्री**१९२२:जयरामदास धर्माजी सरकाटे-- लेखक (मृत्यू:११ डिसेंबर १९९९)**१९२०:बाबुराव सरनाईक-- ज्येष्ठ कवी लेखक (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१७)**१९१३:डॉ.दत्तात्रेय गंगाधर कोपरकर -- महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक, संपादक* *१९०२:जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे.जी.‘नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू:७ सप्टेंबर १९७९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म:१६ जुलै १९१३)**१९८२:बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (जन्म:१७ जून १९०३)**१९७६:डॉ.गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ**१९५७:नरहर शंकर रहाळकर-- मराठी कवी (जन्म:१८८२)**१९४१:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म:२७ आक्टोबर १८७४)**१८९४:सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन.(जन्म:१९ नोव्हेंबर १८०५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आणि उपक्रम*देशाला आणि समाजाला दिशा देण्याचे मुख्य काम शिक्षक करत असतो. शिक्षक जेवढा उत्साही आणि उपक्रमशील असेल तेवढे त्याचे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत असतात. पाठ्यपुस्तक हे एक साधन आहे, मुलांना शिकविण्याचे. वार्षिक आणि मासिक नियोजनानुसार जे शिक्षक फक्त धडेचे धडे पूर्ण करून विहित वेळेत अभ्यासक्रमपूर्ण करतात त्याच्या वर्गातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतील कदाचित मात्र सर्वगुणसंपन्न राहणार नाहीत. विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक आवडतात ? या प्रश्नांवर जरासा विचार केला तर लक्षात येईल की, जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी ..........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील Link वर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधीमंडळ हिवाळी अधिवेशनास आज होणार सुरुवात, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईनंतर आता नागपूरमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, शिंदे गटाची होणार उलट तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाचखोरी करत शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रवी बिश्नोई ठरला टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन गोलंदाज ! राशिद खानला टाकले मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌳 *बोन्साय* 🌳 *****************जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात.वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो.अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात.एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'सशस्त्र सेना ध्वज दिन'* केव्हा साजरा केला जातो ?२) नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?३) दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक हवामान परिषदेत एकूण किती देश सहभागी झाले होते ?४) भारतातील सर्वात मोठा २८७ किमीचा वर्तुळाकार रेल्वे मार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे ?५) पेट्रोलवर चालणाऱ्या पहिल्या कारचे इंजिन कोणी तयार केले ? *उत्तरे :-* १) ७ डिसेंबर २) भाजपा ( २३० पैकी १६४ जागा ) ३) १३० देश ४) बंगळुरू ५) कार्ल बेंज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर👤 साईनाथ जायेवाड, येवती👤 भीमाशंकर बच्चेवार👤 डॉ. मनोज मनूरकर👤 बाळासाहेब तांबे👤 आश्विन जैस्वाल👤 संतोष अनालदास*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं धन्य तो रामसूखें निवाला। कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥ देहेभावना रामबोधे उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात यश मिळविण्याची व यश प्राप्त करण्याची प्रत्येकांची तऱ्हा वेगवेगळी असते. कोणी धनसंपत्तीच्या आधाराने जिंकतात तर ,कोणी रूपाने जिंकतात, कोणी कटकारस्थान करून जिंकत असतात. आपण मात्र तसं जिंकण्याचा कधीही प्रयत्न करू नये. जे, सत्य व अजरामर होऊन गेलेले थोर संत महात्मे, महापुरुष आहेत त्यांच्या विचारांना आत्मसात करून जगण्याचा प्रयत्न केले पाहिजे कारण त्यांच्या विचारातच एवढी ताकद आहे की, आपल्याला नुसते जिंकायलाच नव्हे तर जगायला ही शिकवतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 डिसेंबर 2023💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2023/12/dr-babasaheb-ambedkar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महापरिनिर्वाण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.**१९९९:जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला 'ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.* *१९९२:अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.**१९८१:डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.**१९७८:स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.**१९७१:भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.**१९१७:फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.**१८७७:द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:श्रेयस संतोष अय्यर-- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९९३:जसप्रीत जसबीरसिंग बुमराह-- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९८८:रवींद्र जडेजा-- प्रसिद्ध भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू**१९८६:मिलिंद तेजराव जाधव-- लेखक**१९७६:उमेश विनायक कुलकर्णी-- मराठी चित्रपट दिग्दर्शक,लेखक* *१९७४:लवकुमार बलभीम मुळे-- कवी, लेखक**१९७२:सुरेश जिजाबा नरवाडे-- लेखक**१९६५:प्रसाद माधव कुलकर्णी-- प्रसिद्ध कवी, लेखक,संपादक,व्याख्याते* *१९५०:विजया ब्राम्हणकर-- प्रसिद्ध कवयित्री जेष्ठ लेखिका* *१९५०:प्रदीप भाऊराव विश्वेश्वर-- कवी* *१९४५: सुभाष बब्बर -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता आणि पटकथा लेखक**१९४५:शेखर कुलभूषण कपूर-- भारतीय चित्रपट निर्माता व अभिनेता**१९४४:श्रीकृष्ण बेडेकर -- जेष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक संपादक(मृत्यू:१० मार्च २०२३)**१९४२:प्रा.किसन धोंडिराम चोपडे -- लेखक संपादक* *१९४२:मेघा माधव किराणे-- लेखिका**१९४२:विनायक हरिभाऊ मुरकुटे-- लेखक* *१९४२:शशिकला शरदचंद्र उपाध्ये -- लेखिका,प्रकाशक* *१९४१:विजय नारायण कापडी--प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९३७:प्रा.डॉ.रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर -- पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक**१९३२:कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक,पटकथालेखक,दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू:२७ जानेवारी २००७)**१९२३:वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू:१५ आक्टोबर २००२)**१९१६:’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार-- मराठी गायक,नाट्य-चित्रपट अभिनेते,लेखक (मृत्यू:६ नोव्हेंबर १९९२)**१८६१:रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – प्रसिद्ध कवी व लेखक (मृत्यू:९ मे १९१९)**१८५३:हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ,इतिहासकार (मृत्यू:१७ नोव्हेंबर १९३१)**१८२३:मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू:२८ आक्टोबर १९००)**१७३२:वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू:२२ ऑगस्ट १८१८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:मोहनदास श्रीपाद सुखटणकर-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते(जन्म:२१ नोव्हेंबर १९३०)**२०१४:पद्मजा शशिकांत फाटक -- कथाकार, चरित्रकार,ललित लेखिका,बालसाहित्यकार (जन्म:१४ नोव्हेंबर १९४३)**२०१३:नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१८ जुलै १९१८)**१९८४:अनिल सदाशिव बर्वे-- नाटककार, कादंबरीकार (जन्म:१७ जुलै १९४८)**१९७६:क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक,समाजसुधारक,’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म:३ ऑगस्ट १९००)**१९७१:कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक(जन्म:१ जानेवारी १९०२)**_१९५६:डॉ.बाबासाहेब आंबेडकर – विश्वभूषण भारतरत्न,बहुआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,पहिले कायदेमंत्री,व मानवी हक्कांचे कैवारी (जन्म:१४ एप्रिल १८९१)_* *_महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*न भूतो न भविष्यति व्यक्तिमत्त्व - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी दिला. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारण्यासाठी ३८६ कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महावीर दिगंबर जैन मंदिराचा पुढाकार:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैन अध्यासनाला एक लाखाची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री, 7 डिसेंबरला होणार भव्य शपथविधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मेट्रोचे काम करताना जलवाहिनी फोडली; मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला ठोठावला एक कोटींचा दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *24 डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण दिलं नाही तर...' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; भुजबळांवरही साधला निशाणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तचा उपक्रम:विश्वविक्रमासाठी 1,11,111 विद्यार्थ्यांना 'डिजिटल प्रॉडक्टव्हीटी' वर प्रशिक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 2023 रोजी संपन्न होणार *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'महापरिनिर्वाण दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) नुकत्याच झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने पटकावल्या ?३) नुकतीच झालेली भारत - ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय टी - २० मालिका भारताने किती फरकाने जिंकली ?४) QR कोडचा विस्तारित रूप काय आहे ?५) भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे ? *उत्तरे :-* १) ६ डिसेंबर २) भाजपा ( १९९ पैकी ११५ जागा ) ३) ४ - १ ने ४) Quick response ५) तेरा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे👤 डी. आर. भोसके, येवती👤 अशोक हिंगणे👤 शंकर बोंबले👤 कैलास सोनकांबळे👤 बालाजी गैनवार, चिकना👤 नवनाथ राजीवाडे👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर👤 माधव हालकुडे👤 प्रा. मंगल सांगळे👤 दत्ता काशेवार👤 विवेक क्षीरसागर👤 देवानंद मुरमुरे👤 नरेश पांचाळ👤 राजेश आंपलवाड👤 कैलास सोनकांबळे👤 बाबासाहेब घागले👤 लवकुमार मुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनांकारणे देव लीलावतारी। बहुतांपरी आदरें वेषधारी॥ तया नेणती ते जन पापरूपी। दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...!अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख, शांती, समाधान, संस्कार, योग्य दिशा, जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत. त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे.पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.📚📕📚📕📚📕📚📕📚••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मनाची एकाग्रता*पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 डिसेंबर 2023💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक माती दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६३: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली* *१९५७:इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.**१९३२:जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.**१८४८:अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.हनुमंत वि माने -- कवी* *१९७७:रज्जाक सादिक शेख- कवी* *१९६४:अनिल बाबुराव गव्हाणे-- ग्रामीण साहित्यिक**१९६२:डॉ.शकुंतला काळे -- लेखिका तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९६०:सारिका ठाकूर(सारिका )-- भारतीय अभिनेत्री आणि कॉस्च्युम डिझायनर* *१९५८:बाबाराव निंबाजी मडावी -- प्रसिद्ध कवी,कथालेखक,कादंबरीकार* *१९५६:प्रा.डॉ.बजरंग सुखदेव कोरडे --इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक,संपादक* *१९५५:शरद तळदे - प्रसिद्ध चित्रकार व लेखक* *१९५३:सम्राट नाईक- कवी, व्यंगचित्रकार, गायक,वादक (मृत्यू:१० मे २०२१)**१९४८:शंकर वासुदेव अभ्यंकर-- संत वा्ङ्मयाचे अभ्यासक,लेखक व प्रवचनकार**१९४८:मनीषा हिरालाल शहा-- लेखिका* *१९४४:विलास वसंत खोले-- लेखक,समीक्षक(मृत्यू:१७ आक्टोबर २०२२)**१९४३:लक्ष्मण देशपांडे – ’वर्हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू:२२ फेब्रुवारी २००९)**१९४०:उस्ताद गुलाम अली-- पटियाला घराण्याचे पाकिस्तानी गझल गायक**१९३६:प्रा.सुरेश दत्तात्रेय देशपांडे-- लेखक संपादक* *१९३८:मोहन हरी आपटे-- विज्ञानलेखक (मृत्यु:१२ नोव्हेंबर २०१९)**१९३३:डॉ.भास्कर जनार्दन कविमंडन-- लेखक,संपादक* *१९३१:अॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख(मृत्यू:२जुलै २०१८)**१९०१:वेर्नर हायसेनबर्ग – ’क्वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१ फेब्रुवारी १९७६)**१९०१:वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू:१५ डिसेंबर १९६६)**१८९४:जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (मृत्यू:२२ फेब्रुवारी १९८२)**१८६३:पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू:२९ आक्टोबर १९३३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:जयललिता जयरामन-- तमिळनाडू राज्याच्या माजी मुख्यमंत्रीअनेक तमिळ,तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय (जन्म:२४ फेब्रुवारी १९४८)* *२०१३:नेल्सन मंडेला-- दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष(जन्म:१८ जुलै १९१८)**२००८:जयदेव सुब्बराव हट्टंगडी -- मराठीतले एक नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक(जन्म:२८ ओगस्ट १९४८)**२००७:म.वा.धोंड – टीकाकार (जन्म:३ आक्टोबर १९१४)**१९९९:वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक,समाजवादी नेते,आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक* *१९९१:डॉ.वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक* *१९७३:राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म:८ जानेवारी १९२५)**१९५९:कुमार श्री दुलीपसिंहजी – क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म:१३ जून १९०५)**१९५५:असरार-उल-हक (मजाझ लखनवी) -- भारतीय उर्दू कवी(जन्म:१९ ऑक्टोबर१९११)**१९५१:अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म:७ ऑगस्ट १८७१)**१९५०:योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक,योगी व कवी (जन्म:१५ ऑगस्ट १८७२)**१७९१:वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म:२७ जानेवारी १७५६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मृत्यू : एक अटळ सत्य*मृत्यूच्या दारात उभा राहून तो परत आला, मृत्यूच्या जबड्यातून डॉक्टरांनी त्याला वाचविला, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, एवढ्या मोठ्या अपघातातून एक वर्षाचे लहान बाळ वाचले अश्या मथळ्याची बातमी वाचतो त्यावेळी त्या त्या नशीबवान व्यक्तीविषयी मनात उत्कंठेची भावना निर्माण होते. नशीब चांगला होता म्हणून तो वाचला असे ही सहज बोलून जातो. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू, रस्ताच्या अपघातात एकाचा मृत्यू, उपचार चालू असताना एकाचा मृत्यू अश्या बातम्या जेंव्हा कानावर येतात त्यावेळी त्याच्या विषयी मनात दुःखाची भावना मनात तयार होते. मृत्यू हे कोणाच्या हातात नाही आणि ते कोणाला सांगून देखील येत नाही .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सिंधुदुर्ग हे शिवरायांच्या सामर्थ्याचं प्रतिक, त्यांच्या काळातलं समुद्री सामर्थ्य आपल्याला परत कमवायचं आहे, नरेंद्र मोदींचे आवाहन, पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची थेट लोकसभेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा दाखल, राजारामबापू कारखान्यावरील आंदोलनादरम्यान लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण भारतात 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे हाहाकार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, चेन्नईला पावसाने झोडपलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे विमान क्रॅशमध्ये 2 भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चिंता वाढवणारी बातमी! 50 हून अधिक कफ सिरप कंपन्या गुणवत्ता चाचणीत अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एडन मार्करामकडे भारताविरुद्धच्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघाची कमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात !*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख लपलेले आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुद्धिबळाच्या इतिहासातील *पहिली ग्रँडमास्टर बहिणभावाची जोडी* कोणती ?२) भारतीय अणुचाचणी केंद्र पोखरण कोणत्या राज्यात आहे ?३) क्यूआर कोडचा सर्वप्रथम वापर कोणी केला ?४) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी - २० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या संघाने केला ?५) आरोग्य सेवेत ड्रोनचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ? *उत्तरे :-* १) प्रज्ञानंद व वैशाली रमेशबाबू, भारत २) राजस्थान ३) मसाहेरो हारा, तंत्रज्ञ, 'डेन्सो वेव' ऑटो मोबाईल कंपनी ४) भारत ५) उत्तराखंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शिवाजी कऱ्हाळे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, मुखेड👤 साईनाथ कल्याणकर👤 अरुण सूर्यवंशी👤 मनोजकुमार गटलावार👤 माधव जंगलेकर👤 सुनील पांचाळ👤 शंकर भंडारे👤 अविनाश सुभेदार👤 कृष्णकांत पाटील सावरगावकर👤 राजू अलमोड👤 योगेश पडोळे👤 राज डाकोरे👤 अशोक चिंचलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनाथां दिनांकारणे जन्मताहे। कलंकी पुढे देव होणार आहे॥ तया वर्णिता शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 *विचारवेध...........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••*चतुर बिरबलाची चतुर उत्तरे*एकदा एका पाठोपाठ पाच प्रश्न बादशहाने दरबारातील मंडळींना विचारले. बिरबल वगळता सर्व मंडळींनी गुळमुळीत उत्तर दिली, पण बिरबलाने मात्र अगदी चतुर उत्तर दिले.प्रश्न पहिला बादशाह : सर्वात श्रेष्ठ फुल कोणत्या झाडाचे आहे?इतर मंडळी : गुलाबाचे.बिरबल : कपाशीचे, कारण त्या फुलावरील बोंडातून कापूस तयार होतो. त्या कापसापासून आपल्याला कपडे चोपडे मिळून, आपल्या शरीराचे उन व थंडीपासून रक्षण होते.प्रश्न दूसराबादशाह : सर्वश्रेष्ठ दात कोणाचा?इतर मंडळी : हत्तीचाबिरबल : नांगराचा, कारण त्याच्यामुळे शेतीची नांगरणी होते. त्यातूनच धान्य पिकते.प्रश्न तिसरा बादशाह : सर्वश्रेष्ठ पुत्र कोणाचा?इतर मंडळी : राजाचाबिरबल : गाईचा, कारण तो शेत नांगरतो, बैलगाडी ओढतो, जळण आणि खत देतो, एवढेच नव्हे तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चामड्या पासून अनेक गोष्टी बनवल्या जातात.प्रश्न चौथा बादशहा : सर्वश्रेष्ठ राजा कोणता?इतर मंडळी : सार्वभौम राजा व अकबर बादशाहबिरबल : मेघ राजा, कारण तो आपणास पाणी देतो. शेती फेकून आपणास अन्न मिळते.प्रश्न पाचवाबादशाह : सर्वश्रेष्ठ गुण कोणता?इतर मंडळी : विद्येची आवडबिरबल : धैर्य, कारण धैर्यामुळेच माणसाला त्याच्या अंगातील सर्व गुणांचा पुरेपूर उपयोग करून जीवनाचे सार्थक करता येते.बिरबलाची अशी सर्वश्रेष्ठ उत्तरे ऐकून बादशहा खुश झाला व त्याने दरबारातील सर्व मंडळी समोर चतुर बिरबलची पाठ थोपटली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 डिसेंबर 2023💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय नौदल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ३३८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान**१९९३:उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर**१९९१:पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.**१९७५:सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९७१:भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.**१९४८:भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१९६७:थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण**१९२४:मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्घाटन झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७२:माधवी दीपक जोशी-- लेखिका**१९७१:सुनील संपतराव हुसे -- कवी* *१९६९:प्रा.डॉ.पुरुषोत्तम माळोदे-- लेखक संपादक* *१९६८: डॉ.वसुधा वैद्य-- लेखिका* *१९६७:उमेश मोघे -- प्रख्यात तबलावादक, लेखक* *१९६७:मनीष लक्ष्मण पाटील-- लेखक* *१९६४:स्मिता प्रवीण खानझोडे -- कवयित्री* *१९६२:सय्यद जावेद अहमद जाफरी-- भारतीय विनोदी अभिनेता**१९६२:डॉ.सुलभा कोरे -- मराठी व हिंदी भाषेच्या कवयित्री व अनुवादक* *१९५७:प्रसाद सावंत -- लेखक,कवी* *१९५४:पंडित हिंदराज दिवेकर-- रुद्र वीणा आणि सतार वादक(मृत्यू:१९ एप्रिल २०१९)**१९५१:डॉ.अलका देव मारुलकर-- गायिका आणि संगीतकार**१९५०:पार्थ पोकळे-- लेखक* *१९४९:नारायण दत्तात्रेय कुडलीकर -- लेखक* *१९४२:निशिकांत धोंडोपंत मिरजकर-- समीक्षक,तौलनिक साहित्याचे अभ्यासक**१९४२:फादर फ्रान्सिस दिब्रिटो --ज्येष्ठ साहित्यिक,९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३५:शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (मृत्यू:२० जुलै १९९५)**१९३२:कमलाकर धारप-- जेष्ठ साहित्यिक* *१९३१:लीला श्रीवास्तव-- लेखिका* *१९१९:इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (मृत्यू:३० नोव्हेंबर २०१२)**१९१६:बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक,कादंबरीकार व लघुकथाकार (मृत्यू:२२ एप्रिल २००३)**१९१०:आर.वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू:२७ जानेवारी २००९)**१९१०:मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (मृत्यू:१७ जून १९६५)**१९०९:रंगनाथ नरहर होनप -- कवी**१८९८:काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशिनाथ चांदुरकर--मराठी कवी,कादंबरीकार आणि लेखक**१८३५:सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (मृत्यू:१८ जून १९०२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:विनोद दुआ-- दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये काम करणारे भारतीय पत्रकार(जन्म:११ मार्च १९५४)**२०१८:डॉ.लक्ष्मण रामदास नसिराबादकर-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक(जन्म:८ ऑगस्ट १९३५)**२०१७:शशी कपूर-- हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक(जन्म:१८ मार्च १९३८)* *२००७:पुरुषोत्तम नागेश ओक -- विद्वान इतिहासकार,इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषांत लेखन केले आहे.(जन्म:२ मार्च १९१७)**१९७४:शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (जन्म:२८ आक्टोबर १८९३)**१९०२:डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म:६ नोव्हेंबर १८५१)* *१८५०:विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म:२२ मे १७८३)* *११३१:ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ,खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म:१८ मे १०४८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षकांना स्वातंत्र्य हवे ....*देशाचे भवितव्य शाळेतून घडत असते कारण येथेच देशाचा भावी आधारस्तंभ बनणारा विद्यार्थी शिक्षण घेत असतो. याच माध्यमातून समाज देखील घडत असतो म्हणून शाळा आणि तेथील सर्व यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. पन्नास वर्षांपूर्वी ची शैक्षणिक स्थिती आणि आजची शैक्षणिक स्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक आणि आजचे शिक्षक यात देखील खूप फरक जाणवतो. आजचे शिक्षक पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा खूप बुद्धिमान असून देखील .........पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड मध्ये भाजप तर तेलंगणामध्ये काँग्रेस विजयी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तेलंगणात काँग्रेसचे रेवंथ रेड्डी होणार सीएम - सुत्राची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साहित्य संमेलनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला, सरकारवर हल्लाबोल अन् राजीनामे देण्याची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धनगर समाजाकडून आरक्षणासाठी पुण्यात रास्तारोको आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विज्ञान धारा यात्रा आरोग्ययात्रा नागपुरात दाखल, 12 जिल्ह्यातून यात्रा जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी एकूण 4 कोटी 77 लाखांचे दान आले असून मागील वर्षीच्या तुलनेत या दानाच्या रकमेत वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीने दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या T20 I सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 धावाने हरवून 4-1 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय नौदल दिन*भारतीय नौदलातर्फे दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ४ डिसेंबर याच दिवशी नौदलदिन का साजरा केला जातो हे जाणून घेऊया. १९७१ सालच्या सुरवातीपासूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तत्कालीन पूर्व पाकिस्तान मधून पाकिस्तानी हवाईदल सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही पाकिस्तान आपली खोड मोडायला तयार नव्हते. १९७१ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या पार्श्वभूमीवर सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीला मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी या बैठकीत स्पष्ट सांगितले की सध्याची परिस्थिती आणि ऋतू हे आपल्यासाठी अनुकूल नसल्याने सध्यस्थितीत युद्ध आपल्याला परवडणारे नाही. युद्धासाठी नोव्हेंबर पर्यंत थांबावे लागेल. नोव्हेंबर पर्यंत सैन्याची जुळवाजुळव व्यवस्थित करता येईल याची खात्री देण्यासही ते विसरले नाही. खरंतर एप्रिलमध्येच युद्ध व्हावे या मताच्या इंदिरा गांधी होत्या पण लष्करप्रमुखांनी परिस्थिती विषद केल्यानंतर नोव्हेंबर पर्यंत थांबण्याचा निर्णय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आपण काहीही केले तरी भारत आपल्याला उलट उत्तर देऊ शकणार नाही अशा आविर्भावात पाकिस्तान वावरू लागला. त्यांनी ३ डिसेंबर रोजी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याचवेळी भारतीय विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रांतला सागरतळात बुडवण्याची योजना पाकिस्तानने आखली. पाकिस्तानची ही योजना भारतीय नौदलाच्या लक्षात आल्याने भारतीय नौदलाने चुकीचा संदेश पाठवून पीएनएस गाझी ची दिशाभूल केली आणि डाव साधला. भारतीय नौदलाने चढवलेल्या हल्ल्यात गाझी या पाकिस्तानच्या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. भारताच्या आयएनएस विक्रांतला सागर तळाशी पाठवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाकिस्तानी नौदलाची सर्वात शक्तिशाली असलेली गाझी ही पाणबुडीच सागर तळाशी पोहचल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. गाझी पाणबुडीला जलसमाधी मिळाल्यानंतर बंगालच्या उपसागरात आयएनएस विक्रांतने आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. आयएनएस विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करुन लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरुन गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तानी नौदलाने केली नव्हती. ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर भारतीय नौदलाचा जगभरात दबदबा निर्माण झाला. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि दक्षिण महासागरात भारतीय नौदलाचे सामर्थ्य निर्माण झाले. आज भारतीय नौदल हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदल म्हणून ओळखले जाते. आज भारताचे नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. भारतीय नौदलाकडे एकूण ५५ युद्धनौका आणि ५८ हजार ३५० सैनिक आहेत. भारताकडे ९ विध्वंसक, १५ नौका, न्यूक्लिअर हल्ला करणारी एक पाणबुडी, १४ पारंपरिक पाणबुडीसह आधुनिक शस्त्रे आहेत म्हणूनच जगातील सर्वात शक्तिशाली नौदलामध्ये भारतीय नौदलाची गणना होते. भारतीय नौदलाला नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राजर्षी शाहू महाराजांना *'राजर्षी'* ही पदवी कोणत्या समाजाने दिली ?२) क्यूआर कोडचा शोध कोणत्या देशात लागला ?३) जन्मतः ज्या बाळाच्या हृदयात दोष असतो त्या बाळाला काय म्हणतात ?४) जगात सर्वात जास्त सिनेमाची तिकीट कोणत्या देशात आहे ?५) दिवस व रात्र कोठे समान असतात ? *उत्तरे :-* १) कुर्मी समाज २) जपान ३) ब्लू बेबी ४) स्वित्झरलँड ५) विषुववृत्त*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमाकांत शिंदे, नांदेड👤 शेख आलिम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तये द्रौपदीकारणे लागवेगे। त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥ कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे''छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)