✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक 31/12/2022 💠 वार - शनिवार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷 🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वर्षातील शेवटचा दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.💥 जन्म :-● १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव● १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर● १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला● १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान● १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स 💥 मृत्यू :- ● १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे● १९९७: स्वरराज छोटा गंधर्व*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर केलं जाहीर बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नव वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिवाळी अधिवेशनाचा समारोप, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्राकडून नव वर्षाचं गिफ्ट, NSC, KVC सह पोस्टातील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनाच्या व्याजात वाढ, सुकन्या समृद्धी योजना आणि PPF मात्र जैसे थे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिला मुखाग्नी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-शोध चार मूर्खांचा👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/KKsc86pLWPU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *मुरमान्स्कचे बंदर* 📙जगातील सर्वात उत्तरेकडचे बंदर म्हणजे मुरमान्स्कचे बंदर. रशियाच्या उत्तरेकडच्या भागातील बव्हंशी भाग कायमचा गोठलेला असतो. विशेषत: हिवाळ्यात तर विचारायलाच नको. बॅरेंट्स समुद्रातील कोला खाडीजवळील एक भाग मात्र तेथील समुद्रप्रवाहामुळे बाराही महिने गोठतच नाही. संपूर्ण उत्तरेकडील समुद्राचे निरीक्षण करताना हा न गोठणारा बिंदू शोधून काढला तो दुसर्या निकोलस झारने. १९१६ साली बंदराची जागा नक्की केली जाऊन बंदर उभारणीसाठी तंत्रज्ञ तेथे पाठवले गेले. या शेवटच्या झारला भूगोल व विज्ञान दोन्हींची विलक्षण जाण होती. देशाला बारमाही बंदर हवेच, या कल्पनेने त्याला पूर्ण झपाटले होते. त्यातूनच या बंदराची उभारणी त्याने सुरू केली. मात्र बंदर पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सत्ता जाऊन क्रूर हत्या झाली.१९१६ साली बंदरबांधणी झाली. त्या वेळी जेमतेम लाकडी घरातून उभारले गेलेले छोटेसे गाव आज आता मोठे शहर झाले आहे. सहा लाख वस्तीचे परिपूर्ण नांदते, रसरसते शहर ही सुद्धा या टोकाच्या हवामानातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल.झारची सत्ता गेली, तरी बंदर मोठ्या चिकाटीने उभे राहिले. ६९ अंश उत्तर अक्षांश व ३३ अंश पुर्व रेखांशांवर हे बंदर उभे आहे. आसपासचे वातावरण बहुधा वर्षभर शून्याच्या आसपास असते. रात्रीच्या वेळी उणे पंधरा ते उणे तीस सेंटिग्रेड यादरम्यान ते खाली जाते. आर्क्टिक प्रदेशातील झोंबरे वारे सतत वाहत असतातच.नोव्हेंबर महिन्यात इथला सूर्य शेवटचा मावळतो, तो एकदम संक्रांतीनंतरच उगवतो. प्रत्यक्ष बंदराच्या आसपास समुद्र जरी गोठत नसला तरी थोडा लांबचा टप्पा क्वचित गोठू लागतो. बंदरातील हिमफोड्या नौका ताबडतोब त्या दिशेने जाऊन रस्ते मोकळे करून देतात.अन्नधान्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाहेरून आणावा लागतो. पण मुरमान्स्क येथे दोन गोष्टींची उणीव नाही. खनिज तेल व मासे यांची प्रचंड साठवण व निर्यात या बंदरातून जगभर होते. सैबेरियन भागातून तेलाच्या विहिरीतून काढलेले तेल पाइपातून येथे आणून मग ते ठिकठिकाणी पाठवले जाते. या बंदराची भरभराट याच कारणामुळे होत गेली आहे.दोन्ही महायुद्धांमध्ये रशियाची रसद व नाविक हालचालींची ताकद मुरमान्स्क बंदरातच एकवटली होती. तिथपर्यंत पोहचायची सवय व या हवामानाला तोंड देण्याची ताकद फक्त रशियन नौदलातील नावीकांना होती. रशियाची पश्चिम बाजू जर्मनांनी व्यापली असल्याने या बंदरातून सर्व आवश्यक तो पुरवठा केला गेला व रशिया महायुद्धातून सुखरूप बाहेर येऊ शकला.आज भौगलिक उपयुक्ततेनुसार मुरमान्स्कचे स्थान अढळ बनले आहे, ते युरोपकडून जपानकडे वा जपानकडून युरोपकडे होणाऱ्या मोठ्या जलवाहतुकीमुळे. या वाहतुकीला मार्ग दोन. दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून. मध्यंतरी अनेक वर्षे सुवेझचा कालवा बंद होता, तेव्हा ही वाहतूक उत्तरेकडून वळवली गेली होती. आजही जेव्हा जेव्हा मध्य आशियात अस्वस्थपणा येतो, तेव्हा हाच रस्ता वापरला जातो. त्या प्रत्येक वेळी रसदीसाठी, मधल्या मुक्कामासाठी, दुरुस्तीसाठी मुरमान्स्कचा थांबा अटळ राहतो.दोन्ही ध्रुवांवर मानवाने पाय रोवला असला तरी जवळपास तितक्याच दुर्गम हवामानात पाय रोवून बारमाही व्यावहारिक जीवन जगायचे म्हणजे मुरुमान्स्कमध्ये काम करायचे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात.~ वपु काळे | पार्टनर*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'नगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी' म्हणून कोणत्या परिसराला ओळखले जाते ?२) आयपीएल २०२३ साठी पंजाब किंग्सने सॅम करनला किती बोली लावून खरेदी केले ?३) द्रव आणि स्थायु यांचे मिश्रण कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे ?५) वाळवंटामधील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) भंडारदरा परिसर २) १८.५० कोटी ३) जेली ४) नार्वे भुयार / सुरूंग ५) ओॲसिस *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल पावसकर, लेखक👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा👤 ताहेर पठाण, धर्माबाद👤 किरण अबुलकोड, समराळा👤 अमोल बुरुंगुले👤 शशांक पुलकंठवार👤 सचिन चव्हाण👤 करण यादव👤 मारोती बोलेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्याला कोणी विचारले, कसे आहात, की आपले उत्तर असते "ठिक आहे, बरं चालले आहे" पण, झकास चालले आहे, मजेत आहोत." असे म्हणणारे कमीच असतात. परंतु शेजा-याचे, परिचिताचे कसे काय चालले आहे, असे विचारले तर मात्र आपले उत्तर बदलते. अर्थात तेही शेजारी किती सख्खे आहेत, परिचित किती जवळचे आहेत वगैरेवर अवलंबून असते. "ते एकदम मजेत आहेत. त्यांना काय धाड भरली आहे." वगैरे उत्तरे आपण देतो. आपल्याबद्दल बोलताना असणारी सावधगिरी इतरांच्या बाबतीत फारशी नसते.**अर्थात हेही सारे सगळ्यांच्याच बाबतीत खरे असते असे नाही. स्वत:बद्दल गैरसमज असणारी मंडळीही असतात. आपण खूप विद्वान आहोत, खूप यशस्वी आहोत, खूप सुखी आहोत, असे मानणारे लोकही असतात. 'सुख' म्हणजे काय ? एक कल्पना? मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण सुखाच्या कल्पनेमागे धावणा-या माणसाला पाहून ते खरे वाटत नाही. समर्थ रामदास म्हणतात--* *"जगी सर्व सुखी असा कोण आहे.* *विचारी मना तूचि शोधूनी पाहे."* *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ज्याप्रमाणे प्रत्येक वस्त्रामध्ये आडवा आणि उभा तागा एकमेकांच्या साथीने मिळून घेतलेला असतो तेव्हा ते वस्त्र किंवा कापड तयार होते.त्याचप्रमाणे संसारातही पती-पत्नी आपल्या संसाररुपी वस्त्राला नेहमी जपत असतात.कुठे जरी फाटले तरी त्या संसाररुपी वस्त्राला आपल्या विचाररुपी सुईने आणि समजदारीच्या दो-याने सतत त्या संसाररुपी वस्त्राला शिवत राहतात.कितीही त्याला ठिगळ लागले तरी चालेल पण त्या ठिगळरुपी,वस्त्ररुपी संसारुपी गोधडी जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ही दोन धागे कार्यरत असतात.जर का त्यापैकी एकजरी धागा कमकुवत झाला तर ते संसारुपी वस्त्र वस्त्र म्हणून राहत नाही किंवा त्याला वस्त्रही म्हणत नाही.मग त्याला वापरुन वापरुन राहिलेली चिंधी म्हणून बाजूला फेकून दिली जाते.मग संसाररुपी वस्त्र एकसंघ राहत नाही.संसारात दोघांनाही तेवढाच अधिकार आहे तेवढा वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा एकमेकांत गुंतून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🏠🌷🏠🌷🏠🌷🏠🌷🏠•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *परीस*एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगडयेईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचादिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पणत्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मगतो फेकून द्यायचा....शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्यागळ्यातील साखळीकडे गेले...ती साखळी सोन्याची झाली होती.....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडेलक्षच गेले नाही....तात्पर्य:प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरीपरीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्यानात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काहीअसतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमीलोक या परीसाला ओळखू शकतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30/12/2022💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रिझाल दिन - फिलिपाईन्स*💥 ठळक घडामोडी :- ● १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.● १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.● १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.● १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.● २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.💥 जन्म :-● १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.● १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.● १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक.💥 मृत्यू :-● १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.● १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.● १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.● २००१ - हर्षद महेता, भारतीय शेअर दलाल.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मविआकडून अविश्वास प्रस्ताव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस; विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या किंवा इतर शहर आणि राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु, तर १६ जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांची बैठकी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'चीन, हाँगकाँग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड ' या सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यात आचारसंहिता लागू ! शिक्षक मतदारसंघासाठी मतदान 30 जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बांगलादेशमध्ये पहिली मेट्रो रेल्वे सुरू, पंतप्रधान शेख हसीना यांनी दाखवला हिरवा झेंडा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवे वर्ष २०२३मधील फेब्रुवारी महिन्यात टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-8वा/ The vet कविता👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/CM2Hp0ZcRrE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गरज तेथे मदत करा* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙***************************अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.~ वपु काळे | काही खरं काही खोटं*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) एकाच स्पर्धेत सर्वाधिक १७२ गोल करण्याचा नवा विक्रम कोणत्या विश्वचषकात झाला ?२) भारतातील पहिली सर्कस कोणी व केव्हा सुरू केली ?३) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे ?४) मराठी भाषेतून कोणत्या साहित्यकृतीला २०२२ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे ?५) चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?उत्तरे :- १) कतार फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ २) विष्णुपंत छत्रे, १८७८ ३) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ४) उजव्या सोंडेच्या बाहुल्या ( कादंबरी ) ५) ईरई नदी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद👤 मारोती छपरे, माध्यमिक शिक्षक, जिपहा धर्माबाद👤 निवृत्ती लोखंडे👤 राजेश्वर रामपुरे👤 साहेबराव कांबळे👤 आनंद यडपलवार, शिक्षक👤 संजय भोसीकर👤 भारत पाटील सावळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.**आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.*रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29/12/2022💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.● २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी💥जन्म● १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.● १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.● १९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी● १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.● १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.● १९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.💥मृत्यू● १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित● १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.● २०१२ - टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू व समालोचक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱ्या तब्बल 50 विद्यार्थ्यांना घडवली दिल्लीवारी; हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा अनोखा उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मुलाखतीत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या निकषांमुळे उमेदवार अपात्र, अट शिथिल करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमतानं मंजूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वर्षभरानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आयटीआर 31 डिसेंबरपर्यंत भरला नाही तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल, तुरुंगवासही होऊ शकतो*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रणजी ट्रॉफीत रियान परागचा कहर! 28 बॉलमध्ये कुटल्या 78 धावा, 4 विकेट्सही घेतल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*वर्ग-6वा/ The man who never lied 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rTmgulFPx4Q~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेखाधिकारी संतोष कंदेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माहितीपर लेखhttps://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_26.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रामानंद सागर*चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर ( जन्म - २९ डिसेंबर १९१७ - मृत्यू - १२ डिसेंबर २००५ ) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही मालिका प्रचंड यशस्वी झाली.सौजन्य :- विकिपीडिया••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्यांचा निर्धार व संकल्प अतूट आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या लेखकाचे नाव काय आहे ?२) भारताचा राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील ?३) आयपीएल २०२३ साठी सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?४) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या गोलार्धला असेही म्हणतात ?५) संगणकातील RAM चे फुल फॉर्म काय आहे ?*उत्तरे :-* १) प्रवीण बांदेकर २) केशरी, पांढरा, हिरवा ३) सम करन, इंग्लंड ४) भूगोलार्ध ५) Random Access Memory *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष ह. कंदेवार, लेखाधिकारी, नांदेड👤 किशोर प्रभाकर पेंटे👤 सुरेश सुतार👤 विजय रणभीडकर, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खूप हवे आहे. खूप गोष्टींचा हव्यास आहे. नाव पाहिजे. सन्मान पाहिजे. संपत्तीही हवीच आहे. समजा हे सर्व मिळाले तर त्यापेक्षा अधिक हवे आहे. पाहिजे ते मिळाले नाही तर स्वभाविकपणे निराशा आहे. मिळाले त्यापेक्षा अधिक मिळायला हवे होते. ते मिळाले नाही म्हणूनही निराशा आहे. अशा अवस्थेत,'ये सब मोह है, माया है' असे कोणी सांगतो. त्यातही दिलासा असतो. अखंड धडपड केल्यानंतरही कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्याला कमालीची निराशा येते. त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी मग तो त्या द्राक्षांनाच आंबट ठरवून मोकळा होतो. जे मिळत नाही ते 'आंबट' ठरवून मोकळे होणे काय किंवा त्याला 'मोह है, माया है' म्हणत बाद ठरविणे काय दोन्ही निराशेवर मात करण्यासाठी तेवढेच उपयोगी असतात.**अशा ताणाच्या, निराशेच्या वेळी थोडासा 'भ्रम' किंवा थोडीशी 'भूल' माणसांना हवी असते का? ती 'देव' आणि 'धर्म' यातून मिळते का? म्हणून देवधर्माचे व्यापारी नाडवणूक, शोषण करतात. हे उघड सत्य आहे. धर्म ही 'अफूची गोळी' आहे, असे मार्क्स म्हणतो. ऑपरेशनची वेदना नको म्हणून त्या दरम्यान भूल दिली जाते. तेवढ्यापुरत्या का होईना वेदना सुसह्य होतात. 'जगणे ते मरणे' या दरम्यानच्या आयुष्याचे जे ऑपरेशन होत असते. त्यासाठी तर 'देव' आणि 'धर्म' या कल्पनांची आवश्यकता नसेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्यांच्या पाठीवर अपेक्षांचे ओझे आहे तो माणूस जीवनात कधीही सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही.म्हणून माणसाने जीवनात निरपेक्ष वृत्तीने जीवन जगायला शिकले पाहिजे.*© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 28/12/2022 💠 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-●१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.●१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.● १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.● १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.💥 जन्म :-● १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.● १९३२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.● १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.💥 मृत्यू :-● १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.● १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.● १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.● २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.● २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.● २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.● २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.● २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राजधानी गारठली! तापमान 5 अंशांवर, दिल्ली धुक्यात हरवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत रंगणार माणदेशी महोत्सव; 5 जानेवारीपासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *2 जानेवारीपासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा, CBSE बोर्डाकडून गाईडलाईन्स जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अनिल देशमुखांची आज सुटका होणार, आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर बाईक रॅली काढण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांची चिंता वाढली, 10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - अहमदाबाद महामार्गावर केमिकल टँकरला भीषण आग, एकाच मार्गाने वाहतूक सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा विराट कोहलीने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*वर्ग-7वा/Two Fables गोष्ट The town mouse and country mouse👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/SvsWxV6eiuM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुरुदक्षिणा*मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?२) वनस्पतींना संवेदना असतात हा शोध कोणी लावला ?३) फोर्ब्सने जारी केलेल्या २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावले ?४) मराठी अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार कोणता ग्रंथ आद्यग्रंथ ठरतो ?५) बुद्धिबळाच्या पटावर एकूण किती घरे किंवा चौकोन असतात ?*उत्तरे :-* १) जिल्हाधिकारी ( कलेक्टर ) २) जगदीशचंद्र बोस ३) नाओमी ओसाका ( टेनिसपटू ), जपान ४) गाथा सप्तशती ५) चौसष्ट *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई पाटील, धर्माबाद श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस👤 वृषाली वानखडे, अमरावती सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक👤 श्रीधर सुंकरवार, नांदेड👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 अजय तुम्मे👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती👤 नंदकिशोर सोवनी, पुणे👤 ओमसाई सितावार, येवती👤 ओमकार ईबीतवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.**माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.* *'हे ईश्वरा माझे हाती काम दे* *परी ते करण्याची शक्ती दे.'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी जी व्यक्ती सदैव तयार असते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. संकटं ही प्रत्येकाच्या जीवनात कमी-जास्त तर असणारच.... पण संकटाला पाहून दूर पळून जाणारी फार असतात.कारण एकीकडे त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नसते,ते हतबल होतात,त्यांची मानसिकता नसते,दूरचा विचार करत नाहीत त्यामुळे त्यांचा जगण्याचा त्यांच्यावरच विश्वास नसतो.त्यामुळे संकटासमोर शरण जातात.तर दुसरीकडे काही व्यक्ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात.काही असो आपण त्या संकटाला तोंड दिलेच पाहिजे जर नाही दिले तर आपण जगणार कसे ? आपल्यासमोर उभे आयुष्य आहे ते कसे जगणार ?आज आपण सामोरे नाही गेलो तर जगण्याला अर्थच काय राहणार ? नाही आपल्याला जगायचे तर मग पुढे कसे जीवन जगणार ? जगायचेच असेल तर पहिल्यांदा आपला आपल्यावर आत्मविश्वास ठेवायला हवा आणि त्या आत्मविश्वासावरच पुढे पुढे पाऊल टाकायला हवे आणि त्याप्रमाणे जगायला हवे अशी सकारात्मक विचार घेऊन जगणारी व्यक्तीच जीवन चांगल्याप्रकारे जगू शकते. अशा आशादायी, ध्येयवादी असणा-या व्यक्तींचे अनुकरण करायला हवे आणि कोणत्याही संकटाला तोंड देणा-या अशा व्यक्तीकडे पाहिले तर अनुकरण करणा-या व्यक्तीला अधिक बळ मिळते आणि पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होते.म्हणून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊन जीवन जगायला शिकले पाहिजे.तरच जीवन जगण्याला अर्थ आहे.अन्यथा जीवन व्यर्थच आहे असे समजावे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाधान*मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/12/2022💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉ पंजाबराव देशमुख जयंती*💥 ठळक घडामोडी :-●१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.● १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.●१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.● १९४५ - कोरियाची फाळणी.●१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.● १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.💥 जन्म :-● १८९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.● १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-● १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.● १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.● २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पोटदुखीच्या त्रासामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, एम्समध्ये उपचार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप, राजीनाम्याची मागणी; फडणवीसांकडून आरोपांची गंभीर दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कर्नाटकात शाळा,कॉलेज, सिनेमागृह, पब अन् बारमध्ये मास्कसक्ती, नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ, फुल क्रीम दूध आता 66 रुपये लिटर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची आई मीनल गावस्कर यांचे मुंबईत निधन, ते 95 वर्षाच्या होत्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मरावे परी अवयवरूपी उरावे*जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ?गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना .............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🦈🐟 *मासे* 🐟🦈 ********************मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच.सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात.माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात.माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात.माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल.मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो.माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते.मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ख्रिसमसचा शब्दश: अर्थ काय आहे ?२) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बुट'चा पुरस्कार कोणी पटकावला ?३) एका झाडाच्या अन्नरसावर जगणाऱ्या दुसऱ्या झाडास काय म्हणतात ? ४) मांजर नराला बोका तर मांजर मादीला काय म्हणतात ?५) इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे ?उत्तरे :- १) क्राइस्टस मास अर्थात येशूच्या जन्मनिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना २) किलियन मबापे ३) परजीवी ४) भाटी ५) ऑक्सफर्ड विद्यापीठ *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पूजा बागूल, साहित्यिक, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *यशाचे बिजगणित*आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26/12/2022💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.● १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.● १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.💥 जन्म :-● १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग ● १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर ● १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.● १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी)● १९४८: डॉ. प्रकाश आमटे💥 मृत्यू :- ● १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.● १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा● २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2022मध्ये देशाला मिळाली गती, लोकांनी रचला इतिहास ; भारताची अर्थव्यवस्था 2022 मध्ये पाचव्या क्रमांकावर 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींकडून देशवासियांच्या पाठीवर शाबासकीची थाप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईत हुडहुडी वाढली, पारा 15 अंशावर ; यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *औरंगाबादेतील कचनेरच्या जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; रंग फिकट पडल्याने घटना उघडकीस, पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक, मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे म्हणणे आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीकरांना दोन दिवसीय शास्त्रीय संगीताची मेजवानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशभरात नाताळचा उत्साह, मध्यरात्री साजरा करण्यात आला प्रभु येशु ख्रिस्ताचा जन्मदिवस.. राज्यभरातील चर्च आकर्षक रोषणाईने सजल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बांग्लादेशला क्लिन स्वीप देत टीम इंडियानं रचला इतिहास, आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय, सामनावीर आर. अश्विनची ऐतिहासिक कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-7वा/Two Fables गोष्ट Two Friends and bear👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/MR09Z6mlqx0~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे*( जन्म २६ डिसेंबर १९१४ - मृत्यू ९ फेब्रुवारी ९ २००८ ) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपू, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते. याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे 'संत' या नावाने गौरवले आहे.अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💉 *लस म्हणजे काय ?* 💉*अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.**बर्याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.**शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.**आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बाबा आमटे यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) 'आधुनिक भारताचे संत' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?५) बाबा आमटे यांना समाजसेवेसाठी कोणकोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) हिंगणघाट, वर्धा ( २६ डिसेंबर १९१४ ) २) मुरलीधर देवीदास आमटे ३) बाबा आमटे ४) आनंदवन ५) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर👤 नागराज राजेश्वर डोमशेर👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद👤 कपिल जोंधळे👤 अशोक लंघे👤 शाडूल शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••*मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नशिब आणि परिश्रम हे जीवनाचे वेगवेगळे दोन भाग आहेत.पण जीवनात नशिबापेक्षा परिश्रमालाच अधिक महत्त्व द्यायला हवे.नशिब हे माणसाला परिश्रम करु देत नसल्याने तो फक्त आणि फक्त न्यूनगंडपणा निर्माण करतो त्यामुळे त्याच्या जीवनाची काहीच प्रगती होत नाही.तर परिश्रमाचे तसे नाही.परिश्रमाने माणूस काही ना काहीतरी करुन जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो.त्यामुळे त्याच्या जीवनात आपण काहीतरी करत असल्याची जाणीव निर्माण होते आणि चांगले जीवन जगण्याची आणि जीवनात परिश्रमाशिवाय प्रगती होत नाही असे कळायला लागते.म्हणून जीवनात नशिबापेक्षा परिश्रमालाच महत्वाचे स्थान द्यायला हवे तरच मग आपल्या नशिबाचे दार आपोआपच खुलते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 डिसेंबर 2022💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भारतीय ग्राहक दिन.*💥 ठळक घडामोडी :- १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.१७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.१८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.१८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.१९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.💥 जन्म :-१८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.१९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.१९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :- १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.१९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.१८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तर सिक्कीम मध्ये भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू; आर्मी ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोनामुळे चिंता वाढली! आजपासून मुंबई विमानतळावर प्रवाशांची कोविड चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोदी सरकारचा मोठा निर्णय, वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा, 25 लाख जणांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा, घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरल सॅम करन, 18.50 कोटींना पंजाबमध्ये सामिल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-रोज व रॉकी बनवतात निसर्गमित्र👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/I-kl1IrukTM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख*मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजीपांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मोहम्मद रफी*मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन , धर्मेंद्र , जितेंद्र आणि ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बॉल' विजेता कोण ? २) अर्जेंटिना या देशाची राजधानी कोणती ?३) भारतातील सर्कसीचे उगमस्थान कोणते ?४) 'गुळाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?५) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?*उत्तरे :-* १) लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना २) ब्यूनस आयर्स ३) सांगली, महाराष्ट्र ४) कोल्हापूर ५) सिकंदर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ नुतिवाड, पेंटर, धर्माबाद 👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार,👤 शिवकुमार शिंदे, धर्माबाद👤 नितेश पांचाळ, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बायबलमध्ये एक महान बोधकथा आहे. एका अविवाहित स्त्रीच्या हातून घडलेल्या चुकीचा आपल्या सोयीचा अर्थ लावून नादान लोक तिला दगड-धोंड्यांनी ठेचून मारायला धावतात. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते, खाली कोसळते तेव्हा तिच्यासमोर महाकारूणिक प्रभू येशू उभा असतो. ती त्यांचे पाय धरून आपले प्राण वाचविण्यासाठी गयावया करते. प्रभू तिला अभय देत उभं करतात आणि लोकांना विचारतात 'लोक हो., आपण हिच्या जीवावर का उठलात?' लोकातून क्रोधाने तप्त लाल झालेली वाक्य उत्तरतात 'हि पापीण आहे. हिने फार मोठे पाप केले आहे. हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा घोळका ओरडतो..मारा..मारा धोंड्यांनी मारा हिला..**तितक्यात प्रभू पुन्हा धीरगंभीर अन् शांत मुद्रेने त्यांना म्हणतात 'बाबांनो, हिने खरोखरच पाप केले असेल तर तुम्ही मानता त्या कायद्याप्रमाणे ती दोषी आहे आणि दोषीला तुम्हीच शिक्षा देणारे असाल तर पहिला दगड फक्त त्यानेच उचलावा, ज्याने आयुष्यात चुकूनसुद्धा एकही पाप केले नाही. असा प्रस्ताव मांडताच सर्वजण परस्परांच्या नजरा चुकवत एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हातातील दगडांची पकड सैल झाली. सर्वांच्या हातातले दगड धरतीवर लोळत येशूला शरण गेले. कारण त्या लोंढ्यात एकही निष्पाप नव्हता. प्रत्येकाचे हातून लहान-मोठी पापे झालेलीच होती. ते सर्व माना खाली घालून पराभूतागत पाठमोरे झाले. त्या स्त्रीचे प्राण वाचले. तिने तिची चूक मान्य केली, ती प्रभुभक्त झाली...**"लोकांच्या हातुन गळून पडलेले दगड आजही पूर्ण निष्कलंक माणसाच्या हाताच्या स्पर्शाची वाट पहात तिथेच पडून आहेत..पण निष्पाप हात त्यांना स्पर्शायला पुढे धजले नाहीत."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुई आणि वाघ*एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, 'सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?'सुई म्हणते, 'हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. 'सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ?विंचवाला सुई म्हणते... 'हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते.'सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का?सुई म्हणते 'हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल.सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात.थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो.शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/12/2022💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आज वेळ अमावस्या आहे. याला येळावस असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.*💥घडामोडी● १९२१ - शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.● १९२२- बीबीसी रेडिओचे दैनिक बातम्यांचे प्रसारण सुरू● १९७० - वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला● २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी💥जन्म● १८४५ -- रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष● १९०२ - चौधरी चरण सिंग, भारताचे पाचवे पंतप्रधान💥मृत्यू● २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.● २००८ - गंगाधर महांबरे, मराठी साहित्यिक.● २०१० - ज्ञानेश्वर नाडकर्णी, मराठी कला समीक्षक व लेखक.● २०१० - के. करुणाकरन, केंद्रीय उद्योगमंत्री, केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोल्हापूरमध्ये आजपासून अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजर वापरा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेईई अडव्हान्स 2023 चे वेळापत्रक IIT गुवाहाटीने जाहीर केले आहे. यंदा ही परीक्षा 4 जून रोजी होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लहान मुले व वृद्ध नागरिकांनी शक्यतो मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीसाठी प्रवीण बांदेकर यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, त्या आजारी असल्यानं त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या आर. अश्विन आणि उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेश संघाचा पहिला डाव 227 धावावर संपुष्टात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-1ला/Let's know new words👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/irTKkYVGU6U~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिनानिमित्त**शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिन*किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेती संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे राज्यस्तरीय महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे यजमानपद कोणत्या संस्थेला देण्यात आले आहे ?२) 'सम्राट अलेक्झांडरचे वंशज आम्हीच' असे हिमाचल प्रदेशमधील कोणत्या गावाने दावा केला आहे ?३) 'हळदीचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?४) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता ?५) सर्वाधिक घनदाट जंगलाच्या बाबतीत पहिले तीन देश कोणते ?*उत्तरे :-* १) इको - प्रो संस्था, चंद्रपूर २) मलाणा, शिमला ३) सांगली ४) चीन ५) रशिया, ब्राझील, कॅनडा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोहन बारदवार, धर्माबाद👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती👤 गंगा देवके👤 प्रवीण गुंटोड👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार👤 राजू पाटील कुरुंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.**पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते. तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच. परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते. म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा. तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंहाचा जावई*एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.तात्पर्यः*आपल्या कुवती बाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरलीतर स्वत:चाच नाश ओढवतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 डिसेंबर 2022💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आज उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते*💥घडामोडी●१६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.● १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.● १९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.● १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.● १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.💥 जन्म :-● १९६३- गोविंदा, हिंदी चित्रपट अभिनेता● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत, भारतीय क्रिकेटपटू● १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश💥 मृत्यू :-● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या; बाबा आढावांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक 2023 ग्रामपंचायती असल्याचा दावा, तर राष्ट्रवादीचे 1215 ठिकाणी वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बृहन्मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या, पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'; राज्य सरकारचं कोर्टात स्पष्टीकरण.. सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रजासत्ताकदिनी परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता, अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण, त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीच्या रामलीला मैदानात जमले 50 हजार शेतकरी, केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची करून दिली आठवण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार असून दुखापतीमुळे रोहित शर्मा व नवदीप सैनी अनफिट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-6वा/Ecofriendly celebration👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/SKXBbzS1ZNM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपक्रम :- वाचू आनंदे*इयत्ता पहिली ते आठवीसाठी उतारा खालील लिंकवर उपलब्ध आहे.http://projectforchild.blogspot.com/2019/12/21-2019.htmlउपक्रम वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📙 सस्तन प्राणी 📙*आईच्या पोटातुन जन्म घेणारे आईच्या दुधावर लहानपणी पोषण होणारे सर्व प्राणी म्हणजे सस्तन प्राणी होत. यांनाच 'मॅमल' असेही इंग्रजीत म्हणतात. मानव, मांजरे, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, घोडे, माकडे, जिराफ, हत्ती, डॉल्फिन व देवमासे हे सगळे सस्तन प्राणिगटात मोडतात. पृथ्वीवर एकूण चार हजार प्रकारचे सस्तन प्राणी सापडतात.इतर सर्व प्राणी अंडी घालतात. पण सस्तन प्राण्यांमध्ये मादीच्या पोटातच अंड्याची वाढ गर्भाशयात होते. पूर्ण वाढीचा काळ संपल्यावरच मग नवजात प्राणी आईच्या शरीरातुन वेगळा होतो. पण या पद्धतीतही तीन प्रकारचे बदल निसर्गात आढळले आहेत.गर्भाशयातील पोषण हे बाळाला जोडलेल्या नाळेद्वारे होते. हा एक प्रकार. त्याला इंग्रजीत (Placental) असे म्हणतात. हा बहुतेक सर्व जातींत दिसतो. दुसरा म्हणजे कांगारूचा. या प्रकारात (Marsupial) अगदी छोटा जीव आईच्या पोटाला असलेल्या एका पोतडीत जन्माला येतो. तेथेच राहतो, वाढतो. आईच्या दुधावर त्याचे पोषण होते. मोठा झाल्यावर मग आईपासुन तो सुटा होतो. तिसरा (Monoreme) प्रकार म्हणजे सशाचा आकार, पण बदकाचे पाय असा लांबुडका, शेपटी असलेला 'डक बिल्ड प्लॅटिपस' या जातीचा प्राणी. तो फक्त ऑस्ट्रेलियातच सापडतो. खरे म्हणजे हा प्राणी अंडी घालतो. पण त्याची पिल्ले मात्र आईच्या दुधावरच वाढतात. म्हणुन त्याला सस्तन गटात घेतले आहे. सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे देवमासा किंवा निळा व्हेल. सर्वात उंच जिराफ, सर्वात दांडगा हत्ती. स्वत:ला सर्वात हुशार समजणारा माणूस.'सृष्टीविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कोठे पार पडणार आहे ?२) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा विजेता देश कोणता ?३) सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहतो या बिंदूला काय म्हणतात ?४) 'डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?५) २१ डिसेंबर २०२२ रोजी दिवस किती तासांचा आहे ?*उत्तरे :-* १) चंद्रपूर २) अर्जेंटिना ३) विंटर सोल्सटाईल ( हिवाळा आयन दिवस ) ४) रायगड ५) १० तास ४७ मिनिटे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया👤 मन्मथ खंकरे👤 श्रीमती माणिक नागावे, साहित्यिक, कोल्हापूर👤 गजानन गायकवाड👤 संभाजी तोटेवाड👤 जयश्री फुले👤 माधव मुंडकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?**कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 20/12/2022 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस*💥घडामोडी● १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.● १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.● १९४५-मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.💥जन्म● १५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.● १९४२-राणा भगवान दास,पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश💥मृत्यू● २१७ - पोप झेफिरिनस.● १९५६-डेबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगेबाबा ● १९९६: बलुतंकार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला काही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शैक्षणिक सत्र 2023-24 साठी जेईई मेन 2023 जानेवारीतील परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *न्यायाधीश, पत्रकार डगमगले तर लोकशाही कोसळणार; न्या. बी.एन. श्रीकृष्णा यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी,शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूरमध्ये विमानतळही हवे आणि सिद्धेश्वर साखर कारखानाही! शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आर्थिक मदतीसोबतच लम्पी बाधित जनावरांवर मोफत उपचार करा; सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा वर्ल्डकप २०२२च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-6वा/News Flash👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/QLqM1Dx4aCY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धागत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *लहानपण देगा देवा*वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे.https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpanलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अश्फाकउल्ला खान*अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार."दुसर्या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा ,"फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ !वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥(अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.)अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले -I wish the downfall of the British Empire.(ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे)अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी...महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंधरामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर)देशाच्या स्वातंञ्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा अंतिम सामना कोणत्या दोन देशात झाला ?२) 'मिसेस वर्ल्ड २०२२' या स्पर्धेची मानकरी कोण ठरली आहे ?३) दृष्टिहीन टी - २० विश्वचषक स्पर्धा २०२२ कोणत्या देशाने जिंकली ?४) 'भवानी मातेचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?५) बुलेटच्या एका चाकावर अडीच किमीचा प्रवास करण्याचा विक्रम करून गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या स्टंटमॅनचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) अर्जेंटिना व फ्रान्स २) सरगम कौशल, भारत ३) भारत ४) उस्मानाबाद ५) मनीष राठी, मु. जिंदरान, हरियाणा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गजानन मुडेले, देगलूर👤 सोपान हेळंबे, उमरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••. *"गेले द्यायचे राहून,* *तुझे नक्षत्रांचे देणे !* *माझ्यापास आता कळ्या,* *थोडी ओली पाने !!"**पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.**बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील.पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे. आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पारंगत*खूप वर्षापूर्वी रामपूर गावात एक आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला, प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!'*तात्पर्य :- सुंदर जरी गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 17/12/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.● १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला.● १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली.● १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.● १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.● १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब.● १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.● १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.● २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.💥 जन्म :-● १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी● १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.● १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह ● १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम ● १९७८: हिंदी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख💥 मृत्यू :- ● १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.● १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.● १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.● १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर ● २०००: अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला● २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी..*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई होणार चकाचक! लवकरच नियुक्त होणार 5 हजार स्वच्छतादूत; दंडात्मक कारवाई नाही तर, जागरुकतेवर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारत जोडो यात्रेचे 100 दिवस आणि 2800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण ; पाच राज्यांच्या यात्रेनंतर राहुल गांधी आता राजस्थानमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाविकास आघाडीच्या मुंबईतील मोर्चासाठी अटीसह परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा, रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य, तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशला 471 धावांची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*गोष्टींचा शनिवार- कथा-रंगेबिरंगी खेळणी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rjpFGoRXVBA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतीय गणितज्ञ व शास्त्रज्ञ* http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/indian-scientist.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙 **************************प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते.अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'.ते चार टप्पे असे,१. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस*२. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस*३. *होमो इरेक्ट्स*४. *होमो सेपियन्स*अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते.माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी.आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो.मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते.*"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'एक जिल्हा एक खेळ' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?२) नुकताच भारताचा ७७ वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?३) काळ्या सोन्याचा जिल्हा ( दगडी कोळसा ) असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?४) अलीकडे कोणत्या मेट्रोने यशस्वीरीत्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे ?५) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणारे भारतीय क्रिकेटपटूंची नावे सांगा.*उत्तरे :-* १) उत्तरप्रदेश २) आदित्य मित्तल ३) चंद्रपूर ४) नागपूर मेट्रो ५) सचिन तेंडुलकर - २०० धावा, वीरेंद्र सेहवाग - २१९ धावा, रोहीत शर्मा - २०९, २६४, २०८ धावा, ईशान किशन - २१० धावा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. उषा रामवानी गायकवाड, ठाणे👤 विक्रम पतंगे, नांदेड👤 रामचंद्र पाटील बन्नाळीकर, धर्माबाद👤 डॉ. सुधीर येलमे, संपादक👤 विजय होकर्ने, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 डॉ. प्रदीप आवटे👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद👤 केशव कदम👤 नारायण मुळे, धर्माबाद👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी👤 दिगंबर बेतीवार, नांदेड👤 जितेंद्र वल्लाकटी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण नेहमी खरं बोलावं, असं म्हणतो. मग माणसं खोटं का बोलतात? स्वार्थासाठी! स्वत:ला लपविण्यासाठी! खरं ते झाकण्यासाठी! जितकं आपण स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करू तितकं आपण केव्हा ना केव्हा तरी समाजापुढं चक्क उघडं पडु शकतो. अनेक माणसं बोलताना 'मी म्हणतो तेच खरं' असं ठासून म्हणतात; परंतु 'खरं तेच माझं' म्हणणारी माणसं फारच कमी असतात. दहा वेळा खोटं बोललं की, लोकांना ते खरं वाटतं; पण खरं तेच केव्हातरी उघडकीस येतं. आपण स्वत: जसे असाल तसे समाजपुढे दिसावे हे चांगले असते. परंतु आपण स्वत: जसे नसतो तसं समाजापुढं दिसावं हे काही चांगलं नाही.**आपण नेहमीच खोटं बोलावं आणि समाजापुढं आपण नेहमीच खरं बोलतो असं भासवावं हे काही भल्या माणसाचं लक्षण नाही. आपण नेहमीच स्वार्थीपणानं जगावं आणि आपण नेहमी नि:स्वार्थीपणानं जगतो असं समाजापुढं भासवावं हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. आपण एकदा का खोटं बोललो की, ते लपविण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं. खोट्याला अनेक वाटा असतात. ख-याला मात्र पर्याय नसतो. खोटं बोलणं खोट्या पैशासारखं असतं. खरं बोलणं बंध्या रूपयासारखं असतं. खरं ते खरंच असतं आणि खोटं ते खोटंच असतं, हे काळच उघडकीस आणतो. म्हणून 'सत्य' हाच आपल्या जीवन यशाचा खरा सोबती समजला पाहिजे. 'सत्य' हेच आपल्या जीवनवैभवाचं खरं रहस्य समजलं पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे एक ध्येय निश्चित केलेले असते.ते ध्येय म्हणजे " जिंकू किंवा मरु..."समोर असलेल्या शत्रूला तोंड दिले तर आपण विजयी होऊ नाहीतर ठरवलेल्या ध्येयापासून थोडेजरी मन डळमळीत झाले तर निश्चित केलेले ध्येय पूर्ण करु शकत नाही.याचा अर्थ असा होतो की,आपण आपल्या ध्येयापासून दूर जात आहोत म्हणजे आपला पराभव निश्चित तर आहेच त्याचबरोबर आपला जीवही गमवावा लागत आहे.आपण आपल्या जीवनात अयशस्वी होत आहोत.त्यामुळे कोणताही जवान ध्येयापासून परावृत होत नाही.त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात जर चांगले ध्येय निश्चित केले तर त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला लागा तरच ते ध्येय पूर्ण करु शकाल. नाही तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून दूर राहाल.नाहीतर आपणच आपले गुन्हेगार ठरु शकू.त्यामुळे आपल्या जीवनात नैराश्य तर येईलच आणि आपल्या जीवनात जगण्याला काही अर्थ राहणार नाही असे वाटायला लागेल.आपणच आपले अपराधी आहोत असे वाटायला लागेल.त्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने पुढे आगेकूच करायला लागा.तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका.मनाची सकारात्मकता डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे चालायला शिका म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच यशस्वी होऊ शकाल यात वादच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣☀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.तात्पर्यःकोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते..*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/12/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहरैन - राष्ट्रीय दिन. बांगलादेश - विजय दिन. कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन.💥 ठळक घडामोडी :- ● १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बाँबफेक केली.● १९७१-भारत-पाक युद्ध,पाक सैन्याची शरणागती,बांगलादेश ची निर्मिती.● १९०३- मुंबईतील ताजमहाल हॉटेल पॅलेस ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.💥 जन्म :-● १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.● १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● २००४- लक्ष्मीकांत बेर्डे,मराठी चित्रपट अभिनेता● १९६०-चिंतामण गणेश कर्वे,मराठी कोशकार व लेखक● १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.● १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ, महसूल व वन विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसीसी आणि अंबुजा सिमेंट यांनी त्यांचे कारखाने बंद केल्याने सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जवळील वैजापूर येथे कारला भीषण आग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नंदुरबार मिरचीची बाजारपेठ ढासळली, लाखोंचा खर्च मात्र हजारो क्विंटल मिरची पाण्यात, अवकाळी पावसाने नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर येथील डॉ. आंबेडकर रुग्णालय कंत्राटीवरच; श्रेणीवर्धनचा प्रस्ताव रखडला, 1165 कोटींचा प्रकल्प थंडबस्त्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *FIFA World Cup 2022 : मोरक्कोला धूळ चारत फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, आता मेस्सीचं आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Story-Alyonushka👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FmvW7rOOdaU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक देश, एक ओळखपत्रhttp://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा* 🐝 ******************नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात.षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते.ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते.फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात.मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात.मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात.मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या शहरादरम्यान धावली ?२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचे नाव काय आहे ?३) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकूण किती द्विशतके झाली आहेत ?४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनास काय म्हणतात ? ५) भारतातील राष्ट्रीय पक्षांची नावे सांगा.उत्तरे :- १) नवी दिल्ली ते वाराणसी २) वडनगर, गुजरात ३) सहा ४) महापरिनिर्वाण दिन ५) भाजप, काँग्रेस, बसपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी, तृणमूल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. खा. हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा खासदार👤 डॉ. वसंत काळपांडे, मुंबई👤 डॉ. गजानन चौधरी, नांदेड👤 डॉ. शिवशक्ती पवार, नांदेड👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी👤 योगेश गुजराथी, धर्माबाद👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम👤 नरेश पांचाळ, धर्माबाद👤 श्याम पेरेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.**नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥*💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••हल्ली कुटुंबाची व्याख्याच सिमित झाली आहे.याचे कारणही तसेच आहे.आपापल्या स्वार्थापुरतं क्षेत्र निर्माण करुन तेवढ्यापुरतंच मर्यादित करुन जीवन जगताना दिसत आहे.आई-बाबा,भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि इतरही नाते नात्याची असलेली आणि विणलेली घट्ट वीण कुठल्यातरी कमी संस्कारामुळे ,स्वार्थामुळे सैल झाली आहे त्यामुळे आता ही नाती एकमेकांपासून दूर गेली आहेत हे पहायला मिळते.आपल्याच पिढीला नाते काय असते आणि कसे असते कुणाला काय म्हणावे हे सांगताना एखाद्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे होत आहे.अशा सर्व गोष्टींमुळे येणा-या पिढीच्या मानसिकतेवर फार मोठा आघात होत आहे.त्यासाठी कुटुंब आणि कुटुंबातील सारे सदस्य आपुलकीने,प्रेमाने, थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली टिकवण्याची गरज आहे,प्रत्येकातील असणारा स्वार्थरुपी नाते संपुष्टात आणायला हवे,घरामध्ये कमावणा-या व्यक्तींचा सन्मान आणि न कमावणा-या व्यक्तींचा अपमान आणि तिरस्कार करणे टाळायला हवे.हे जर आपण आपल्यामध्ये प्रथम सुधारणा करून येणा-या पिढीला आदर्श संस्कारांची मात्रा त्यांना अधिक प्रमाणात दिली तर नात्यांची घट्ट वीण तयार होऊन एकमेकांबद्दल प्रेम,आदर,नाती, संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.कुटुंब म्हणजे काय आणि नाते कसे असते हे निश्चितपणे पिढीला समजेल.मग ते कधीही कुणाच्या नात्यापासून दुरावणार नाहीत की,कुणाची मने दुखावणार नाहीत.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राणीने घेतलेली परीक्षा*एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध आणि चतुर राजाचा चातुर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे."दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती. राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली. सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या.राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस."*तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९१ - चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर💥 जन्म :-◆ १९३२ - टी.एन. शेषन, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त.◆ १९३५ - उषा मंगेशकर, भारतीय पार्श्वगायिका व संगीतकार.◆ १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.💥 मृत्यू :- ◆ १७४९ : छत्रपती शाहू महाराज◆ १९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर - १९९१)*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरपंचपदाच्या महिला उमेदवाराचा चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्पवर जाहीरनामा, अनोख्या जाहीरनाम्याची भंडारा जिल्ह्यात चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कर्नाटकचा FRP पॅटर्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल विक्रीचाही मिळणार लाभ, प्रतिटन पन्नास रुपयांचा वाढीव भाव, देशात पहिलाच प्रयोग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात X-Ray फिल्मचा तुटवडा, रुग्णांच्या मोबाईलमध्येच ट्रान्सफर करुन द्यावा लागतो एक्स-रेचा फोटो*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; विद्यार्थी, पालकांच्या विरोधानंतर बोर्डाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जानेवारी महिन्यात शासकीय लिपीक आणि टंकलेखक पदाची भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*P V Sindhu-An Icon of success👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LV2ug9x3P04~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक कप चहा*जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( International Tea Day ) साजरा केला जातो. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने काही आठवणी .......http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/world-tea-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल.येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते.मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत.मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात.जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस केव्हा धावली ?२) कोणत्या क्रिकेटपटूला 'पॉकेट डायनामाइट' असे संबोधल्या जाते ?३) भारतात राष्ट्रीय पक्ष किती आहेत ?४) वजनमापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली ?५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गावाचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) १५ फेब्रुवारी २०१९ २) ईशान किशन, भारत ३) सात ४) नंद राजा ५) मानसा, गुजरात *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी सुंकेवार, कलाशिक्षक, देगलूर👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 रामकृष्ण लोखंडे👤 शिवाजी रामदिनवार, सहशिक्षक👤 ऋषिकेश गरड, उस्मानाबाद👤 दीपक चावरे, सहशिक्षक👤 श्रीधर काटेगर, आरमुर, तेलंगणा👤 अनिल जाधव शिरपूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्या महापुरूषांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे, ज्यांनी समाजासमोर आपले आदर्श उभे केले आहेत, ज्यांच्या विचारांनी समाजाला दिशा आणि गती मिळाली. अशा महापुरूषांचे पुतळे आपण उभे करतो किंवा केले आहेत. त्यांच्या विचारांची एक रेष पुसण्यासाठी ताकद न काळात असते न व्यवस्थेत. अर्थात, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुरेपूर किमंत मोजलेली असते. शाळा-महाविद्यालय तथा विद्यापीठीय पदव्यांची भेंडोळी त्यांनी मिळवलेली नसते. त्यांनी ज्या परिक्षा दिलेल्या असतात; जे पेपर सोडवलेले असतात; ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.**त्यांचा व्यासंग, त्यांची साधना, त्यांचा त्याग, त्यांची सेवा, त्याचं कर्तृत्व यामुळे त्यांनी गगनाएवढी उंची गाठलेली असते. मात्र, त्यांना एका झटक्यात आपण दगडाचा पुतळा करून खुजं करून टाकतो. याचं भान जसं आपल्याला नसतं, तसंच त्यांनी उभ्या केलेल्या मूल्यांचा न आपला अभ्यास असतो न तपास केलेला असतो. जयंती-पुण्यतिथीत मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचून घेणे. ही त्यांच्या कार्याप्रती आपण परत केलेली पावती आपल्या स्वत:लाच वाटत असते. हाच मोठा विनोद आहे. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली, अशा महापुरूषांचे विचार आपल्या मनात रूजविण्याऐवजी आपण अतिशय उथळ कृतीत रममाण झालो आहोत. त्यांनी त्यांचे जे विचार इथल्या मातीत पेरलेले असतात, त्यांचे दरसाल उगवून येणे महत्वाचे असते. आपण थेट कोंभानाच खुरपं लावतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात सुंदरतेला अधिक महत्व आहे.सुंदरता ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजे बाह्यस्वरुपाची आणि दुसरी आंतरिक स्वरुपाची. तुम्ही कसेही असा तुम्हाला जे काही नैसर्गिक जन्माबरोबर शारीरिक सुंदरता मिळाली आहे ते आपल्याला जसे आहे तसे स्वीकारणे आवश्यक आहे. त्यात आपल्याला बदल करता येत नाही. काहीजण बदलण्यासाठी खूप प्रयत्न करायला पाहतात. त्यासाठी विविध प्रकारची सुंदरतेची सौंदर्य प्रसाधने, पेहराव वापरतात. परंतू त्यात काही बदल घडून येत नाही. फक्त त्यात बाह्यस्वरुपात राहणीमान बदलल्याचा फरक दिसून येतो. यामुळे आपण कसे आहोत हे जगासमोर बाह्यस्वरुपात काही काळ दिसू शकतो पण जास्त काळ त्यांच्या मनावर राज्य करु शकत नाही. त्यावर कितीही पैसा खर्च करुनही वाया जाणारच..! त्यापेक्षा आंतरिक सुंदरतेचा जर अधिक विचार केला तर आपलेही स्वत:चे कल्याण तर होईलच त्याचबरोबर इतरांचेही. कारण तुमच्या आंतरिक सुंदरतेला अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी जास्त काही धन अर्थात पैसा खर्च करायची गरज नाही. गरज आहे ती चांगल्या लोकांच्या सहवासात राहण्याची. चांगल्या लोकांच्या सहवासाने आपल्या मधील असणारे दोष काय आहेत ते स्वत:ला ओळखता येतात आणि त्यात बदल घडवून आणता येतात. चांगल्याच्या संगतीत सदैव राहिले तर आपले संकुचित असलेल्या विचारांना पायबंद घालून चांगल्या विचारांची वाढ करता येईल. अशासाठी धन किंवा पैसा खर्च करण्याची काही गरज नाही. यासाठी हवी आहे फक्त तुमच्या मनाची तयारी. तुम्ही जर आंतरिक सौंदर्याने समृद्ध झालात तर जग तुमच्या सोबत नक्कीच राहील आणि एक दिवस तुमचे नक्कीच अनुयायी बनतील. हे केवळ तुमच्या आंतरिक सुंदरतेच्या झालेल्या बदलामुळे. तुमच्या बाह्य सुंदरतेपेक्षा आंतरिक सुंदरता तुम्ही व तुमचे सुंदर जग बनवण्यासाठी अधिक मोलाचे किंवा महत्वाचे ठरु शकते. हे मात्र विश्वासाने सांगता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लालसेपायी प्राण गेले*जय आणि विजय यांच्यात घनिष्ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणा-या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात मृत्युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला.तात्पर्य- कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 13/12/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.● २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.💥 जन्म :-● १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.● १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.● १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक● १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका💥 मृत्यू :- ● १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री● १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.● १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.● २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला, नागपूर- शिर्डी विना वातानुकुलीत बस सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गेमिंग कंपन्यांकडून 23,000 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अर्थ राज्यमंत्र्यांकडून माहिती सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खाद्यपदार्थ आणि भाजीपाला झाला स्वस्त, किरकोळ महागाई नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्क्यांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयटीए अवॉर्डमध्ये एबीपीचा डंका, जिंकला सर्वाधिक लोकप्रिय हिंदी वृत्तवाहिनीसाठी पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचीही उपस्थिती होती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये तब्बल बावीस वर्षांनी साहित्य जत्रा, जानेवारीत मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *FIFA World Cup : इंग्लंडवर मात करून फ्रान्स सेमीफायनल्समध्ये, पुढची लढत मोरोक्कोशी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Story-Who is better?👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/5iYAdB8uFlQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत ?२) HIV चे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांत पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?३) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक केलेल्या खेळाडूचे नाव काय ?४) सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ? ५) राज्यातील 'धान उत्पादकांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?*उत्तरे :-* १) सुखविंदर सिंह सुक्खू २) दक्षिण आफ्रिका ३) ईशान किशन, भारत ( १२६ चेंडूत २०० धावा ) ४) आयोडीन ५) गोंदिया *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड👤 राजेश वाघ, बुलढाणा👤 विनोद राऊलवार👤 श्रीनिवास भोसले, नांदेड👤 राजेश जी गडाख, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.**थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रयत्नांती यश*एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला.राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 12/12/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.● १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.● २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.● २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.💥 जन्म :-● १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.● १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री● १९४९ - स्व. गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री● १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता.● १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- ● १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.● १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.● १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.● २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांचे सरकारविरोधात आमरण उपोषण, एसटीच्या विलिनीकरणासाठी हिवाळी अधिवेशनात उतरणार मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जळगाव जिल्हा दूध संघावर सात वर्षानंतर सत्तांतर, खडसेंच्या गडाला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाची एकहाती सत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी केंद्राची लवकरच मंजुरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयआयटी मुंबईच्या ७१ विद्यार्थ्यांना मिळाली परदेशातील नोकरीची ऑफर त्यापैकी ६३ विद्यार्थ्यांनी ऑफर स्वीकारली त्यातील २५ विद्यार्थ्यांना यंदा वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा पराभव करत फ्रान्सचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, रोनाल्डो आणि पोर्तुगालचं आव्हानं संपुष्टात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Poem-How creatures move👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/KrZpeN3ucRc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साहस कथा*सातव्या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं. अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ......वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 **********************विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र.यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले.आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात.उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते.उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात.रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) वर्ल्डवाईड कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे अहवालानुसार जगातील सर्वात महागडी शहरे कोणती ?२) भारतात पहिले गोल्ड ATM केव्हा व कोठे सुरू करण्यात आले आहे ?३) नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले ?४) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे ?५) सजीव व निर्जीव यातील दुवा कोणास संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) न्यूयॉर्क ( अमेरिका ), सिंगापूर, तेल अविव ( इस्त्रायल ) २) डिसेंबर २०२२, हैदराबाद ३) भाजपा ( १५६ सीटे ) ४) आर्क्टिक समुद्र ५) जीवाणू *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर👤 शुभानन गांगल, पुणे👤 अशोक पाटील कदम👤 समीर मुल्ला👤 वतनदार पवनकुमार नारायण👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 महेश शिवशेट्टी👤 माधव पाटील शिंदे👤 राजकुमार इंगळे👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर👤 विपीन कासलीवाल👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर👤*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.**एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही.त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 10/12/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अल्फ्रेड नोबेल दिन* *मानवी हक्क दिन*💥 ठळक घडामोडी :- २०१४-भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्थानची युसूफझाई यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००८-प्रा अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.१९०१-नोबेल पारितोषिक चे प्रथमच वितरण करण्यात आले.💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. १८९६-अल्फ्रेड नोबेल, स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या शिक्षकांची दरवर्षी परीक्षा होणार. शिक्षणाचा दर्जा ढासळल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा निर्णय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'आभा'मध्ये आधार कार्ड प्रमाणेच रुग्णाला 14 अंकी युनिक क्रमांक मिळेल. हा नंबरच संबंधित व्यक्तीची ओळख असेल. पूर्वीच्या आजारांसह उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवलेली जाईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन, वाचन चळवळीला गती देणार; पालकमंत्री दीपक केसरकरांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर :- सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या राज्य शासनाच्या बसेस सुरु. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक सरकारच्या बसेसही सुरु.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई :- बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 22 हजार खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी, पण...त्याबदल्यात 2.5 लाख रोपांची लागवड करण्याची अट घालण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्टइंडीजच्या अल्झारी जोसेफचा मोठा पराक्रम; 2022 मध्ये घेतल्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी हक्क दिन*लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो.भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो ?२) रोबोटने काम करणारी जगातील पहिली इमारत कोणती ?३) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे ?४) तंबाखूचा वापर कशासाठी करतात ?५) स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) राष्ट्रीयीकरणापूर्वी कोणत्या नावाने ओळखली जात असे ?*उत्तरे :-* १) १० डिसेंबर २) रोबोट फ्रेंडली इमारत ( सेऊल, दक्षिण कोरिया ) ३) इनलंड ताईपान ४) उत्तेजक ५) इंपिरियल बँक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप मस्के, सहशिक्षक👤 दशरथ एम. शिंदे👤 अनिल यादव, धर्माबाद👤 शिवानंद हिंदोले👤 श्रीकांत म्याकेवार👤 अमोल पाटील सलगरे👤 मच्छीन्द्र सपाटे👤 मिलिंद गायकवाड👤 स्वप्नील मसाने👤 दशरथ शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.**स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--**तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।**तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात. त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही. त्यांना वाटते की, आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो. अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत. इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन प्रवास*एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्याआणि तिच्याजवळ बसल्या.जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला"अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे."इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"*आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?सोडून द्या, शांत रहा, कारण*जीवन प्रवास खूप छोटा आहे.*कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.आपला प्रवास खूप छोटा आहे.आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया.कारण एकच की,*आपला प्रवास खूप छोटा आहे ..!**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/12/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन💥 ठळक घडामोडी :- १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू.१९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.💥 जन्म :-१६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.१९१९- ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.१९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.💥 मृत्यू :- १५६५ - पोप पायस चौथा.१६६९ - पोप क्लेमेंट नववा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मुंबई: गुजरातमध्ये तब्बल सातव्यांदा भाजपने (BJP) बाजी मारली असून जवळपास 157 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँगेसचा 39 जागांवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी होणार मतदान, अर्ज माघार घेण्याची मुदत काल 7 डिसेंबरला संपली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका सज्ज, 15 दिवसात कार्यादेश जारी करणार; आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी नोकरीसाठी तृतीयपंथीयांना अर्जासाठी पर्याय देण्यास दिरंगाई होत असल्याची हायकोर्टाने घेतली गंभीर दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे :- मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराने निधन; भाजपामध्ये मोठी पोकळी निर्माण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापुरात पहिल्यांदाच राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन देशभरातून येणार स्पर्धक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*At the Science fair👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Gq_A5KR_H8w~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा..............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••१) विदर्भात पहिला रेशीम कोश खरेदी बाजार कोठे भरला ?२) ग्लोबल एअरलाईन सेफ्टी रँकिंगमध्ये प्रथम तीन देश कोणते ?३) जगातील सर्वात गरीब देश कोणता ?४) नागपूर ते शिर्डी या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची लांबी किती किमी आहे ?५) जगातील पहिले गोल्ड ATM केव्हा व कोठे सुरू करण्यात आले ?*उत्तरे :-* १) बडनेरा, अमरावती २) सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण कोरिया ३) कांगो ४) ५२० किमी ५) २०१०, अबुधाबी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अक्षय जाधव पाटील👤 प्रतीक यम्मलवार👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 जय सिंग चौहान👤 आदित्य नलावडे, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*विकार आणि त्यावरील उपाय याचं सूत्रं स्वत:चं स्वत:ला शोधावं लागतं. एकदा ते सापडलं की मनामधील वैषम्य, मत्सर, तिरस्कार गळून पडायला सुरूवात होते. ही प्रक्रिया मन:शुद्धीकडे घेऊन जाणारी असते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली, की मन गंगेसारखं निर्मळ नि प्रवाही होतं. एका सुंदर व निरामय जीवनानुभूतीकडं ते आपल्याला घेऊन जातं. संत कबीरांनी अतिशय सोप्या शब्दांत ही अवस्था मांडली आहे.* *" बुरा जो देखन मैं चला,* *बुरा न मिलिया कोय,* *जो दिल खोजा आपना,* *मुझसे बुरा न कोय !"**आपलं मन हरवलं, त्यातील संवेदना संपल्या, तर जगातील सर्वात वाईट मीच आहे, हे चिंतन मनाला वास्तवाची जाणीव करून देणारं असतं. संत कबीर म्हणतात......**"एकदा मन शुद्ध झालं की जगणं सुंदर होतं नि आम्ही हवेहवेसे वाटायला लागतो."* ••●🌼 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भली खोड मोडली*एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 08/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार.◆१९६९ - ऑलिम्पिक एरवेझचे डी.सी.६-बी. जातीचे विमान अथेन्सजवळ वादळात कोसळले. ९३ ठार.◆१९७६ - ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.◆१९९१ - रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोवियेत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.💥 जन्म :-◆६५ - होरेस, रोमन कवि.◆१५४२ - मेरी स्टुअर्ट, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, स्कॉटलंडची राणी.◆१९१४ - अर्नी टोशॅक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.◆१९१७ - इयान जॉन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.◆१९३६ - पीटर पार्फिट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.◆ १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆ १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆ १६२६ - जॉन डेव्हीस, ब्रिटीश कवी.◆ १६३२ - फेलिपे व्हान लान्सबर्ग, फ्लेमिश अंतराळतज्ञ.◆ १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान.◆ १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवालच्या आप पार्टीला स्पष्ट बहुमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईचे सुशोभीकरण, खड्डेमुक्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कालपासून संसदीय अधिवेशनाला सुरुवात, 29 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रेपो दरात 35 टक्यांची वाढ केल्याचे रिझर्व्ह बँकेने केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागात नोकर भरतीचा महाघोटाळा उघड, बोगस नियुक्तीपत्र 50 ते 60 जणांची फसवणूक, किनवट पोलिसात गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड जिल्ह्यात कृषी विभागाकडून अकराशे वनराई बंधारे बांधण्यात आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय लढतीत बांगलादेश ने भारताचा 5 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••The two-gentleman story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/tpqp505esfc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळी उमलण्या आधी .....!*लघुकथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावेhttps://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detailकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *भूतलावरची येती पन्नास वर्षे* 📙५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अडमिशनची चिंता व्यक्त करेल !कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत.प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या -१. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण.१८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे.२. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते.३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे.४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल.५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते.या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी :जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल.५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशातील पहिली व्हेनम बँक ( सर्प विषपेढी ) कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे ?२) महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?३) ग्लोबल एअरलाईन सेफ्टी रँकिंगमध्ये भारताला कितवे स्थान मिळाले आहे ?४) दक्षिण कोरियाची राजधानी कोणती आहे ?५) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ३) ४८ वे ( चीनला ४९ वे ) ४) सेऊल ५) अंटार्क्टिक ब्ल्यू व्हेल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश जळकोटे👤 आनंद गजभारे👤 फारुख अली👤 अनिल सूत्रावे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.**देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहरात किती कावळे आहेत?*अकबर बादशाह आपल्या दरबारातील सरदारांना नेहमी निरनिराळे प्रश्न विचारायचा. निराळी कोडी घालायचा. ज्ञान, हुशारी आणि चातुर्य यांची परीक्षा घ्यायचा. एकदा त्याने आपल्या सरदारांना एक चमत्कारिक प्रश्न विचारला, " आपल्या शहरात किती कावळे आहेत?"बादशहा उत्तराच्या अपेक्षेन एकएका सदाराकडे पाहत होता. सरदार एकामागून एक उभे राहत होते आणि निमूटपणे आपली मान खाली घालत होते. एकही सरदार बादशाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नव्हता. इतक्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला. तो दरबारातील सर्वात हुशार सरदार होता. पाहिले की, इतर सरदार माना खाली घालून उभे आहेत. बादशहाने घातलेल्या कोड्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत, हे बिरबलाने ताबडतोब ओळखले. वाकुन सलाम केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. बादशहाने त्याला विचारले, " बिरबल, शहरात किती कावळे आहेत?" बिरबल लगेच उभा राहिला आणि म्हणाला," महाराज, आपल्या शहरात 50 हजार 378 कावळे आहेत."" बिरबल, तू हे एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस?" बादशहाने आश्चर्यचकित होऊन विचारले. बिरबल म्हणाला "महाराज, आपण कृपया कावळे मोजून पहा. जर ते 50 हजार 378 पेक्षा जास्त असले, परगावाहून काही कावळे आपल्या मित्रांना , नातेवाईकांना भेटायला आले आहेत, असे खुशाल समजा. जर ते त्यापेक्षा कमी असतील, तर आपल्या शहरातील कावळे त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना भेटायला बाहेरगावी गेले आहेत उघडच आहे."बादशहा बिरबलाच्या चतुराईवर खुश झाला व आनंदून म्हणाला, " शाब्बास बीरबल, शाब्बास."तुझे चातुर्य आणि बुद्धिमत्ता खूप उत्कृष्ट आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 07/12/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय लष्कर ध्वज दिन*💥 ठळक घडामोडी :- ◆ १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.◆ १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.◆ १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर.💥 जन्म :- ◆ १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.◆ १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १२५४ - पोप इनोसंट चौथा. ◆ १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. ◆ १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. ◆ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आता शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत, राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डिसेंबर 2022 नंतर महागाई कमी होत जाईल, एसबीआयच्या संशोधन अहवालातून भाकीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर भीमसागर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचील जनावरांना लम्पीचा विळखा, 15 दिवसांत 7 हजार जनावरं दगावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कुर्ल्यातील जमीन विक्रीच्या व्यवहारातून मनी लॉंड्रिंग, नवाब मलिकांचा यामध्ये सहभाग; न्यायालयाचं निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला. काल गुणवत्ता निर्देशांक 300 पार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह पाकिस्तानचा एक खेळाडू नॉमिनेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Teeny-tiny-story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/ODbmp0DahzQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्मार्ट बॉय : काळाची गरज*मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_35.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌳 *बोन्साय* 🌳 *****************जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात.वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो.अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात.एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वच्छ वायू सर्वेक्षणात देश स्तरावर तिसरा, तर राज्यस्तरावर पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकावला ?२) दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय विभाग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक धावांचा ( ५०६ धावा ) डोंगर कोणत्या देशाने केला ?४) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?५) उस्ताद झाकीर हुसेन कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अमरावती २) महाराष्ट्र ३) इंग्लंड ( पाकिस्तान विरुद्ध ) ४) व्हाईट हाऊस ५) प्रसिद्ध तबलावादक, पद्मभूषण *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर👤 साईनाथ जायेवाड, येवती👤 भीमाशंकर बच्चेवार👤 मनोज मनूरकर👤 बाळासाहेब तांबे👤 आश्विन जैस्वाल👤 संतोष अनालदास*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपल्या भोवती पसरलेला अथांग निसर्ग शत-शत पावलावर आपणांस आनंदाचे झोके देत असतो. डोंगराळ, खडकाळ प्रदेशातून खळखळ वाहणारा शांत निर्झर काय, सप्तरंगाने आकाशाला गवसणी घालणारा इंद्रधनुष्य काय, आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारे उंचच उंच वृक्ष काय किंवा काळ्याकुट्ट ढगाला लागलेली रुपेरी किनार काय, हे सर्व पाहून कोणाला वेड लागणार नाही? नव्या तेजाने, नव्या ज्ञानाने , नव्या सौंदर्याने आंणि नव्या चैतन्याने निसर्ग सतत बदलत असतो. तो सतत आम्हांस काही तरी नवीन सांगत असतो. ते आपण नीट समजून घेतले पाहिजे.**आपण विनाकारण निराश, दु:खी, अशांत, बेचैन, त्रस्त होण्यात काय अर्थ आहे? त्यासाठी निसर्ग हाच आपला गुरू आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे. अहंकाराचा मोती होऊन कोणा राजाच्या मुकुटात चमकत राहण्यापेक्षा कमल पत्रावरील अस्मितापूर्ण दवबिंदू होऊन एखाद्या तहानलेल्या चिमणीच्या तोंडात पडण्यात केवढा मोठा आनंद आहे ! म्हणून निसर्गातील चैतन्याचा स्फुल्लिंग मनी बाळगावा आणि आपल्या ध्येयपूर्तीची स्फूर्ती मस्तकी धारण करावी. मगच जगण्यात आनंद आहे असे वाटेल. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे हे समजले तरच जीवनातील 'आनंदाचे डोही आनंद तरंग' निर्माण करण्याची इच्छा बळावेल. स्वत: चंदनासारखे झिजत झिजत इतरांना सुगंधित करून सोडण्यात आपल्या जीवनाचे सार्थक आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दगडाने कधीच कुणाजवळ हट्ट केला नाही.जिथे आहे मी तिथे चांगलाच आहे.कुठेही ठेवा पायरीवर ठेवा,उंबरठ्यावर ठेवा,घराच्या मुळव्यामध्ये ठेवा, ओट्यावर ठेवा, देवाच्या पायाखाली ठेवा, मूर्तीरुपात ठेवा किंवा स्मारकात ठेवा,पण मला कसल्याही प्रकारचा कमीपणा नाही.माझा सा-यांनीच कुठे ना कुठे उपयोग केला आहे.त्यामुळे माझं अस्तित्व कुठे ना कुठे असल्यामुळे मला सा-यांनीच मान सन्मान केला असल्यामुळे मी दगड जरी असलो तरी माणसांच्या हृदयात माझं कुठं ना कुठं तरी स्थान आहे.माझी किंमत सा-यांनीच केली आहे.जर मी दगड नसलो असतो तर मला देवत्वही प्राप्त झाले नसते.मानवाच्या प्रत्येक गोष्टीसाठी हजर राहून सगळ्यांना आपलेसे झालो आहे.ज्याप्रमाणे एखादा दगडासारखा माणूस जरी असला तरी तो कुठे ना कुठे इतरांच्या मदतीला धावून जातोच.शेवटी माणूसही आपापल्या भावना ओळखून इतरांच्या मदतीला जातच असतो.दगडासारखा दगड भावनाशून्य असतानाही आपण त्याला उपयोगात आणतो तर माणूस म्हणून इतरांच्या मदतीला प्रसंगानुरूप मदतीला धावून जाणे आणि आपले जीवन कारणी लावणे हे देखील दगडाइतकेच कामाला आल्यासारखेच आहे.हा परोपकारी विचार प्रत्येकाने करायला हवा मग कुठे ना कुठे कुणाच्यातरी हृदयात आदराचे निश्चितच स्थान मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/12/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिन*💥 ठळक घडामोडी :- ● २०००-थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीयपुरस्कार' प्रदान करण्यात आला.● १९९२ - अयोध्येमध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली.त्यामध्ये उसळलेल्या दंगलीत सुमारे १५०० लोक ठार झाले● १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार.💥 जन्म :-● १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक.● १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९७६- क्रांतिसिंह नाना पाटील● *१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ*● २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचा अपमान,17 तारखेला भव्य मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राची शक्ती दाखवू: उद्धव ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील गोवर रुग्णांची संख्या 836 वर; टास्क फोर्सच्या बैठकीत अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं, 93 जागांसाठी 59 टक्के मतदानाची नोंद, 8 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील बाह्मणी परिसरात सोन्याचे साठे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचाही दुजोरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या पोलिस हवालदाराची हकालपट्टी, गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही रॅकेटमध्ये सामील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोरोनानंतर महापालिका शाळांतील विद्यार्थी संख्येत 42 टक्क्यांची वाढ, मात्र दहा वर्षात मराठी माध्यमातील संख्या 51 टक्क्यांनी घसरली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Astronomy Club अस्ट्रोनॉमी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/mTm6aAGdHHE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रज्ञासूर्य विशेषांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••••डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत.......खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा व विशेषांक download करून घ्यावे.https://drive.google.com/file/d/1kosTls7MJZs-ZqpbQIfouieMOvY65wbl/view?usp=drivesdk प्रज्ञासूर्य विशेषांक वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 ******************************तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कोणत्या राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे ?२) पुरुष विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२ स्पर्धेच्या सामन्यात रेफरिंग करणारी पहिली महिला रेफ्री कोण ठरली ?३) विजय हजारे ट्रॉफित सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणी केला ?४) नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेते कोणाला ओळखले जाते ?५) कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) स्टेफनी फ्रापार्ट, फ्रान्स ३) ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्र ४) मेधा पाटकर ५) बसवराज बोम्मई *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे👤 डी. आर. भोसके, येवती👤 अशोक हिंगणे👤 शंकर बोंबले👤 कैलास सोनकांबळे👤 बालाजी गैनवार, चिकना👤 नवनाथ राजीवाडे👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर👤 माधव हालकुडे👤 प्रा. मंगल सांगळे👤 दत्ता काशेवार👤 विवेक क्षीरसागर👤 देवानंद मुरमुरे👤 नरेश पांचाळ👤 राजेश आंपलवाड👤 कैलास सोनकांबळे👤 बाबासाहेब घागले👤 लवकुमार मुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणसाच्या स्वभावातील 'मी' पणा हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे 'मी' पणाच्या मगरमिठीतून त्याची सुटका होणे अशक्यप्राय असते. 'मी' पणा म्हणजेच अहंकार. हा अहंकार दगडी भिंतीसारखा असतो. सहज जरी दगडी भिंतीवर आपले डोके आपटले तरी ते रक्तबंबाळ होऊ शकते; परंतु अस्मिता ही खुल्या खिडकीसारखी असते. अशा खिडकीतून स्वच्छ आणि शुद्ध हवा आतून बाहेर खेळत असते. अहंकारी माणसे उगाचच सतत म्हणत असतात की, 'मी हे केले आणि मी ते केले'. 'मी' पणाची अशी वल्गना करण्यापेक्षा अस्मिता बाळगणारी माणसे म्हणत असतात की,'मी देखील हे करू शकतो, मी देखील ते करू शकतो.'**अस्मितापूर्ण भाषेत सौजन्य असते, नम्रता असते, शहाणपण असते. अहंकार हा एखाद्या महावृक्षासारखा असतो. घोर संकटाच्या वादळात तो मुळासकट जमीनदोस्त होऊ शकतो; परंतु अस्मिता लव्हाळ्यासारखी असते. ती वा-याच्या तालावर आनंदाने डोलत असते. अहंकाराच्या महापुरात मोठ मोठे वृक्ष वाहत जाऊन नाहीसे होतात ; परंतु अस्मितेच्या वाटेवर स्वार होऊन छोटीशी मुंगी पैलतीरावर जाऊन हसत असते. आपले जगणे हसण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. आपल्या जगण्यात आनंद आहे. तो अनुभवायाचा असतो. आपले जगणे आनंदाचे गाणे व्हावे असे वाटत असेल तर अहंकारमुक्त प्रांगणात स्वछंदपणे विहार करायला शिकले पाहिजे. अस्मितापूर्ण आकाशात गरूडभरारी घ्यायला शिकले पाहिजे. आपले जगणे मलयगिरी पर्वतावरील सुगंधित वा-यासारखे व्हावे असे वाटत असेल तर प्रथम आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कवी बा. भ. बोरकर म्हणतात..."जीवन त्यांना कळले हो । मीपण ज्यांचे पक्व फळापरि गळले हो ॥* ‼ *रामकृष्णहरी*‼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...!अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख,शांती,समाधान,संस्कार,योग्य दिशा,जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत.त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे.पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.📚📕📚📕📚📕📚📕📚•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता*पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 05/12/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.१९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.💥 जन्म :-१३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट.१४४३ - पोप ज्युलियस दुसरा.💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.१७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.१९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.२०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या वर्ष 2021 व 2022 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचे झाले वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात अमरावतीची हवा सर्वात स्वच्छ, तर चंद्रपूरची हवा देशात सर्वाधिक प्रदूषित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा, फडणवीसांच्या हातात स्टेअरिंग, शिंदे-फडणवीसांचा एकाच कारनं प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंढरपुरात माऊली कॉरिडॉरमुळे खुद्द विठुरायालाही व्हावं लागणार विस्थापित, पुरातन ताकपीठे, विठ्ठल मंदिराचे अस्तित्व धोक्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोरोनापेक्षा घातक विषाणूचं सावट; आता कॅमल फ्लूचा धोका, FIFA मुळे जगाची चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महापरिनिर्वाण दिनासाठी पालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे, तात्पुरता निवारा, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पाणी, शौचालये, स्नानगृह उभारण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात भारत पराभूत, एक गडी राखून बांगलादेशचा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे**06 डिसेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन*••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/dr-b-r-ambedkar.html••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••।। विनम्र अभिवादन ।।~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो.पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते.पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गुजरातमध्ये मतदारांत जागृती व्हावी यासाठी केवळ एका मतासाठी कोणत्या ठिकाणी मतदान केंद्र बनविण्यात आले होते ?२) जगात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी मॅडरिन भाषा कोणत्या देशाची आहे ?३) २०२२ च्या IPL अंतिम सामन्यादरम्यान सर्वाधिक प्रेक्षकांच्या ( १,०१,५६६ प्रेक्षक ) उपस्थितीसाठी कोणत्या स्टेडियमचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने गौरव झाला ?४) केरळमधील कोणत्या ठिकाणाला 'दक्षिण काश्मीर' म्हणून ओळखले जाते ?५) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) ने कोणत्या प्राण्याला खाद्य प्राणी ( food animal ) म्हणून मान्यता दिली आहे ?*उत्तरे :-* १) बाणेज, उना विधानसभा क्षेत्र २) चीन ३) नरेंद्र मोदी स्टेडियम, गुजरात ४) मुन्नार हिल स्टेशन ५) याक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास गणवीर, नागपूर👤 साईनाथ कल्याणकर, येवती👤 सूर्यकांत स्वामी👤 राज डाकोरे👤 संतोष रामराव शिंदे👤 अशोक चिंचलोड, येवती,👤 राजेश गटलावार👤 राजू अलमोड👤 योगेश पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....**माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...**काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!**"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"* ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पडलेल्या घराच्या भिंतीआत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उभ्या करतायेतात नि घर उभे करता येते,परंतु चार माणसांची मने जर तुटली तर ती माणसं पुन्हा जोडणेआणि त्यांचे हृदयात घर करणे अतिशय अवघड आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनातील तणाव दूर करणे.*एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली. प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहेकी रिकामा ? पण एक स्मित हास्य करुन मॅडमने प्रश्न केला, " या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का ?"कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम. एक जण तर म्हणाला - मॅडम, अर्धा किलो ! मॅडमने पुन्हा एकदा स्मितहास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार नाही. एकतास धरुन ठेवला तर हात दुखेल आणि दिवस भर असाच ठेवला तर . ? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा ...आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं. क्षण भर विचार करा ,काही वाटणार नाही. पण मनात धरुन बसालतर ... तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा व कायम आनंदी रहा. मनाला हलकं करा आणि निरंतर अल्हाददायक जीवन जगायला शिका ... आयुष्यखुप सुंदर आहे .....!आयुष्य जगण्याच्या दोन पध्दती :१) जे आवडते ते मिळवायला शिका.२) जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/12/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक विकलांग दिवस*💥 ठळक घडामोडी :- १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.२००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.💥 जन्म :-१८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.१९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.१९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.१९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा.१७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.१९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला समृद्धी महामार्गाची पाहणी करणार. ११ डिसेंबरला मोदींच्या दौऱ्याआधी शिंदे-फडणवीस महामार्गाचा आढावा घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लालपरीच्या ताफ्यात आणखी 8 हजार बस येणार, डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार बस येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नंबी नारायणन-इस्रो हेरगिरी प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून आरोपींना जामीन देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, केरळ हायकोर्टाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *CISCE बोर्डाकडून दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जारी, एसएससी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, नवी मुंबईत 10 हजार विद्यार्थी देणार परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ ; जीएसटीसह सोन्याचा दर 55 हजारांच्या पुढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राचे विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सौराष्ट्राने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPSCचं सुपरफास्ट काम ! PSI पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक विकलांग दिनानिमित्त लघुकथा ....... *पंगूम लंघयते गिरीम*वरील लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2021/03/blog-post_31.html लघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *रस्त्यांवर फेकलेल्या लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होते ?* 📙शाळेत जाताना सकाळच्या वेळी रस्त्यांवर अनेक दुकानांच्या समोर लिंबू मिरच्यांच्या माळा फेकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आई व वडिलांनी या लिंबू मिरच्यांवर पाय देऊ नकोस त्यांना ओलांडून जाऊ नकोस असही तुम्हाला बजावून सांगितले असेल. त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल. पण जर लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.कोणाची वाईट नजर लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे या समजापायी दुकानदार दुकानांवर लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या टांगून ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी ते लिंबू मिरची रस्त्यावर फेकून देतात. दिवसभरात त्या लिंबू मिरच्यांमध्ये अनेक दुष्ट शक्तींचा प्रभाव जमा झाल्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री वाटत असते !खरे तर जगात भूते खेते नसतात. दुकानदारांना खरी भीती चोरांची, आगीची वैगरे असते. नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक वा आग प्रतिबंधक यंत्रणा या कामाला येतील का टांगलेल्या लिंबू मिरच्यांच्या माळा ? याचे उत्तर अगदी शेंबडा मुलगाही सांगू शकेल. पण तरीही चांगले शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडून लिंबू मिरच्यांवर नाहक खर्च करत असतात. देशातील लाखो दुकानांवर दररोज लाखो लिंबे व करोडो मिरच्या टांगल्या जातात व दुसऱ्या दिवशी त्या फेकून दिल्या जातात. यात केवढे मोठे राष्ट्रीय नुकसान आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा.लिंबू मिरच्यांचे वास्तव तुम्हाला कळले. आता निदान तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या दुकानांवर लिंबू मिरच्यांच्या माळा दिसणार नाहीत आणि त्यावर पाय पडला तरी तुम्ही घाबरणार नाही याची मला खात्री वाटते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) पाकिस्तान कडून आलेला ड्रोन मारून पाडणाऱ्या पहिल्या BSF महिला जवान कोण ?२) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने रद्द कोणत्या देशाचे झाले आहेत ?३) भारतातली पहिली बोट रेस व जगातील सर्वात मोठी जलक्रीडा स्पर्धा २०२२ कोणी जिंकली ?४) टिपू सुलतान कोण होता ?५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केव्हा केली ?*उत्तरे :-* १) भाग्यश्री नाईक, सालेकसा, जि. गोंदिया ( महाराष्ट्र ) २) भारत ( ४२ सामने रद्द ) ३) ट्रॉपिकल टायटन्स ४) योद्धा, विद्वान, म्हैसूर राज्याचे शासक ५) १३ ऑक्टोबर १९३५ ( येवला, नाशिक )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली👤 शिवाजी कल्याणकर👤 सौ. अनुराधा श्यामसुंदर माडेवार👤 विरेश रोंटे👤 श्रेयस दिलीप धामणे👤 पांडुरंग तम्मलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.**जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे''छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)