✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/07/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महाराष्ट्र कृषी दिन* *डॉक्टर्स डे* 💥 ठळक घडामोडी :- १९५५-इमपीरिअल बँकेची स्टेट बँक ऑफ इंडिया नावाने स्थापना १९६१ -महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना २००२ - बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव्ह टीयु-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार. २००६ - चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन. 💥 जन्म :- १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. १९४७ - शरद यादव खासदार १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते १९६० - सुदेश भोसले गायक १९६० - गिरीश पंचवाडकर गायक १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर १९६१ - डायना, वेल्सची राजकुमारी. 💥 मृत्यू :- १९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९९४ - राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील अनेक राज्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : देशात ४४ टक्के डॉक्टर ताण-तणावाचे बळी असल्याची धक्कादायक बाब एका खासगी संस्थेने केलेल्या वैद्यकीय चिकित्सकांच्या आरोग्यविषयक अभ्यासातून समोर आली आहे. यात महिला डॉक्टरांचे प्रमाण सर्वाधिक आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ पाठविणार १ हजार २०० अत्याधुनिक बस, मूलभूत सुविधाही पुरविणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन : नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे आजपासून सुरु होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावण्यास आहेत उत्सुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बर्मिंगहम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने अपराजित असलेल्या भारतावर मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हरित क्रांतीचे प्रणेते - वसंतराव नाईक* http://blog.diecpdnanded.in/हरित-क्रांतीचे-प्रणेते-व/ वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ लेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही. त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली. त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं. *बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश इंग्रजी - मराठी सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• Knowledge is power. ( ज्ञान ही खरी शक्ती आहे. ) *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ?* लालबहादूर शास्त्री 2) *जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले ?* इंग्लंड 3) *भुंकपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात ?* भूकंपमापी 4) *बॉलपेनचा शोध कोणी लावला ?* लाजिओ जोसेफ बिरो (1931) 5) *भारतात पहिली सहकारी बँक कोठे स्थापन झाली ?* बडोदा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● एल वाय मुपडे ● श्रीकांत चरलेवार ● व्यंकटेश बतुलवार ● मारोती कांडले ● मोरेश्वर गायधने ● अशोक कांबळे ● बालाजी भगनुरे ● मधूसुदन पांचाळ ● गजानन कवळे ● हनुमंत भोपाळे ● सय्यद इलियास झुकलकर ● रामकृष्ण पाटील ● तुकाराम मुंगरे ● गणेश गोंटलवार ● विजय निलंगेकर ● हणमंतू देसाई ● पंढरी गड्डपवार ● विलास नांदूरकर ● पंढरीनाथ खांडरे ● मारोती भुसेवार ● विशाल कण्हेरकर ● राजू पांचाळ ● डी डी वाघमारे ● नागोराव रायकोड ● बालाजी बाबुराव डाके पाटील ● शहादेव सुराशे ● रघुनाथ नोरलावार ● निळकंठ पाटील ● त्रिरत्नकुमार भवरे ● बाबासाहेब ढोले ● शेषेराव आवरे ● बाबुराव दस्तुरे ● नितीन गाडे ● करुणा खंडेलोटे ● दिगंबर नागलवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्ञानाची गरज आहे.ज्ञानामुळे केवळ व्यक्तिमत्व विकास होत नाही तर आत्मविकासही होतो.ज्ञानाचा संचय जीवनासाठी तर आवश्यक आहेच आणि त्याबरोबरच जीवनव्यवहारात कसे जगायचे यासाठी ज्ञान दिशा दाखवते.आपल्यातील दुर्गुण घालविण्यासाठी,आत्मसन्मानासाठी आणि खरा माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानसंचयाची आवश्यकता आहे.स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच इतरांच्या कल्याणाच्याही बाबतीत विचार करायला प्रेरीत करते. ज्ञान आणि ज्ञानसंचय ह्यासाठी प्रत्येकाने अविरत प्रयत्नशील रहायला हवे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 📚🌷📚🌷📚🌷📚🌷📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तीन वाटसरु* एके दिवशी तीन वाटसरू एका धर्मशाळेत रात्रीसाठी एकत्र आलेले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं... तिघांनाही भूक लागलेली असते, मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं... पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू...?? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो... गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात... थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो...!! तिघेही चडफडत आणि एकमेकांना रागावून उपाशीच झोपतात....!!! तात्पर्यः स्वतःचा वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता, ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं आणि प्रश्न सुटत नाहीत म्हणून जे तावातावानं फक्त चर्चा करतात... *अशा सर्व "वाटसरूंना" ही गोष्ट अर्पण...* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/06/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १६१३ - विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात. १९५६ - अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर. 💥 जन्म :- १८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक. १९३४ - कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता. 💥 मृत्यू :- २००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासीक कादंबरीकार. २००३ - कॅथेरिन हेपबर्न अमेरिकन अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मांडला प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा म्हाडा घेणार ताबा, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोकणसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी जोर कमी राहिला. कोकणासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *'जात प्रमाणपत्राऐवजी वडिलांच्या हमीपत्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश द्या', शिक्षणमंत्री आशिष शेलार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्राची २० सूत्री व्यापक योजना, शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याची कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला हरवत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदविला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : आज ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणार लढत, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास दोन्ही संघ सज्ज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - व्यसन* https://storymirror.com/read/story/marathi/wkjlo9ps/vysn/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे. फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भूतकाळातील "अनुभूती", वर्तमानकाळातील "कृती", आणि भविष्याची "दूरदृष्टी", माणसाला "परिपक्व" बनवते.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पेरू या देशाची राजधानी कोणती ?* लिमा 2) *T V चा शोध कोणी लावला ?* जॉन लागी बेअर्ड 3) *जगातील सात वास्तू आश्चर्यापैकी भारतातील आश्चर्य कोणते ?* ताजमहाल 4) *ताजमहाल कोणी बांधला ?* शाहजहान 5) *आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ?* यमुना *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● चैतन्य दलाल ● हौसाजी ढेपाळे ● सदा वडजे ● सुनील मद्दलवार ● वर्षा लोखंडे ● किशनराव भाऊराव पाटील ● अनिल भाकरे ● सिद्धार्थ डुमणे ● दलित सोनकांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुस-याचं सुख पाहून सुखी होणारी आणि दुस-याचं दु:खं पाहून दु:खी होणारी माणसं सतत आनंदी वृत्तीनं जगतात. इतरांच्या सुखात आपलं सुख पाहण्यासाठी आपल्याजवळ मोठं अंत:करण असावं लागतं. माणसाच्या ठायीच्या ज्ञानापेक्षा कल्पकतेला आधिक महत्व असतं. कल्पनेला वास्तवतेचे पंख लाभले की, किती सुंदर काम होते याचं उत्तम उदाहरण आहे ताजमहाल! शहाजहानच्या मनात ताजमहालाची कल्पना आली आणि गड्यागवंड्यांच्या बोटांतून सफल साकारली. कलाकारांची पाच बोटं म्हणजे सुंदर महाकाव्यच असतं. कारण त्यातूनच अवीट सौंदर्याची निर्मिती होते. माणसाच्या जीवनातील खरी सौंदर्यप्रसाधनं कोणती ? शांतवृत्ती, उदार स्वभाव, सोशिकता, नम्रता, आचाराची शुद्धता आणि मानवतेचे प्रेम हीच खरी आपल्या आत्म्याची सौंदर्यप्रसाधनं.* *मानवी जीवन महान असल्यानं आपण आपल्या इच्छा-आकांक्षाही महान ठेवल्या पाहिजेत. यासाठी प्राप्त परिस्थितीचे दास होण्यापेक्षा स्वामी होण्यात आनंद असतो. एखादा माणूस यशस्वी होतो म्हणजे तरी काय ? तो आपला दृढ संकल्प सिद्धिप्रत घेऊन जातो. एकदा सिकंदरला एकानं विचारलं की, 'तुम्ही हे जग कसं जिंकलं?' त्यावर सिकंदर म्हणाला, 'अनिश्चित नीतीचा त्याग केल्यामुळे मी विजयी झालो.' आत्मनियंत्रण आणि आत्मसंयम हे तर यशप्राप्तीचे दोन धवल स्तंभच आहेत.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ● •• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कलि मंह कनक कामिनि, ये दौ बार फांद इनते जो ना बंधा बहि, तिनका हूॅ अमै बंद । सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी व्यक्ती स्वत:च्या आणि इतरांच्या जीवनशैलीचा फरक जाणते तेव्हा ती व्यक्ती नक्कीच चिंतनशील आहे असे समजावे.इतरांच्या जीवन जगण्यामध्ये काही उणीवा असतील त्या आपल्या जीवनात तर नाही ना याचा वेध घेऊन त्या सुधारणा करता येतात असाही विचार करण्यास प्रवृत्त होते तर काही चांगल्या गोष्टी असतील तर अनुकरण करायला काहीच हरकत नाही असाही विचार करून चांगले जीवन जगण्यासाठी तयार होते.म्हणजेच चांगले विचार सुधारण्याची संधी देतात तर वाईट विचार मनातून काढून टाकण्याची इच्छा प्रकट करतात.ह्या दोन्ही बाजूंनी विचार करणारीच व्यक्ती आपले सुंदर जीवन जगू शकते.उलट विचार न करणारी किंवा अविचारी व्यक्ती जीवनात कधीही आपल्या चुकांना सुधारण्याची संधी देऊ शकत नाहीत आणि जीवनात कधीही सुधारु शकत नाहीत हे मात्र खरे आहे. @ व्यंकटेश काटकर, नांदेड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारात्मक दृष्टिकोन* *एक बेडूक डोंगराच्या टोकावर चढण्याचा विचार करतो आणि पुढे सरकतो, तेंव्हा इतर सर्व बेडूक जोरजोरात ओरडायला लागतात, "हे अशक्य अाहे.... आजपर्यंत कोणीच चढू शकला नाही... हे संभव नाही....नाही चढू शकणार"* मात्र, कोणाचेही न ऐकता शेवटी तो बेडूक डोंगराच्या टोकावर पोहचतोच.... *तुम्हाला माहिती आहे याचे कारण काय आहे ते??* *कारण, तो बेडूक "'बहिरा"' होता... आणि सर्व बेडकांना ओरडताना पाहून त्याला वाटत होते की, ते माझा उत्साह वाढवत आहेत.* *म्हणूनच जर तुम्हाला तुमचे "'ध्येय"' गाठायचे असेल तर, नकारात्मक लोकांच्या प्रति "'बहिरे" व्हा.सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठा. ..!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/06/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिवराज्याभिषेकदिन - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. 💥 ठळक घडामोडी :- १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले. १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला. 💥 जन्म :- १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता. १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी. १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष. १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा. २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आशिया-प्रशांत समूहाने संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला ५५ देशांचा पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *एक कोटी घरे २०२२ मध्ये नव्हे, पुढील वर्षीच देणार, गृहनिर्माणमंत्री हरदीप सिंग पुरी यांची घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पालघर - जिल्ह्यातील 190 अनधिकृत शाळांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोल्हापूर : पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करेल - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अमिताभ कांत यांना नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दोन वर्षांची मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद तीन हजार धावा करणारा आशिया खंडातील पाकिस्तानचा बाबर आझम ठरला पहिला क्रिकेटपटू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतापुढे विश्वचषकाच्या सहाव्या साखळी सामन्यात आज वेस्ट इंडिजचे आव्हान, या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - गोष्ट एका आंबेगावाची* https://storymirror.com/read/story/marathi/lzuhb7d4/gosstt-ekaa-aanbegaavaacii/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎 आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे. पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे. तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते जे स्वत: सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* शी जिनपिंग 2) *पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ?* इमरान खान 3) *कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे ?* मॉरिशस 4) *भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* इंडियन एअरलाईन 5) *भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते ?* उत्तरप्रदेश *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुशील कापसे ● अनुपमा जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनात आपल्याला जे काही यश मिळते ते फक्त आपल्या स्वत:च्या प्रयत्नांचे फळ आहे, असे आपण कधीही प्रामाणिकपणे म्हणू शकत नाही. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टाला, पतीच्या किंवा पत्नीच्या मदतीला, मित्रांच्या व* *सहका-यांच्या योगदानाला आपण दिले नाही, तर तो स्वार्थ ठरेल. पण आपल्या यशप्राप्तीत एक अदृश्य हितचिंतक नेहमीच आपली साथ देत असतो आणि तो असतो सर्वसाक्षी परमेश्वर. गरजेच्या वेळी आपल्याला त्याची आठवण येते, पण गरज भागल्यावर त्याचे आभार मानायचे आपण बहुतेकदा विसरून जातो.* *परमेश्वराचे आभार आपण का आणि कशासाठी मानायचे? आपल्याला त्याने जीवन दिले म्हणून. जीवनात आपली सतत प्रगती होत राहिली म्हणून, आपण सुरक्षित, निरोगी राहिलो म्हणून नाही, तर आपल्यासाठी हे सगळे करत असताना परमेश्वर मात्र अदृश्य राहतो आणि तो कशासाठीच स्वत:ला श्रेय घेत नाही म्हणून त्याचे आभार मानले पाहिजेत.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जगाच्या पाठीवर असा एकच संप्रदाय आहे की,त्यात जातीयता नाही,धर्मभेद नाही,गरीब- श्रीमंत नाही,स्त्री-पुरुष असाही भेद नाही,कुणीही कुणाचे आणि एकमेकांचे एकमेकांबद्दल मन कलुषित होत नाही,जिथे मानवतेचे,एकात्मतेचे,भक्तीचे दर्शन घडते तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे.वारकरी संप्रदाय आमच्या मराठी भूमीत आणि अनेक शतकापासून संतांच्या पावनस्पर्शाने आणि विचाराने आजही त्यांच्या मार्गावर भगवंताचे नामस्मरण करीत भागवतांची पताका घेऊन अखंड चालू आहे.असा संप्रदाय अन्य इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही.म्हणून अशा संप्रदायाचा प्रत्येक वारक-याला सार्थ अभिमान आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌎🚩🌎🚩🌎🚩🌎🚩🌎 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जंगलचा राजा* एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.' तात्पर्य - आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/06/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन सामाजिक न्याय दिन 💥 ठळक घडामोडी :- १८१९ - सायकलचा पेटंट देण्यात आला. १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९९९-नांदेड तालुक्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका तयार करण्यात आला 💥 जन्म :- १८७४ - राजर्षी शाहू महाराज १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक. १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका. 💥 मृत्यू :- १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ. २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक. २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीबाबत केरळने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश व महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाने मोटर वाहन (संशोधन) विधेयकाला दिली मंजुरी, यामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा प्रस्ताव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बिहार- चमकी तापामुळे मृत पावलेल्या बालकांचा आकडा 131 वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर विदर्भात आज होत आहे शाळांची दारे उघडी, जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन केले जाणार त्यांचे स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रमेशचे शौर्य* https://storymirror.com/read/story/marathi/hqfwvd9w/rmeshce-shaury वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 😴 *आपण केव्हा घोरतो ?* 😴 तसंच पाहिलं तर सर्वच जण घोरतात. पण कोणी ते कबूल करायला तयार नसतो. तसा सबळ पुरावा दाखवून ते कबूल करून घेणंही सोपं नसतं. कारण माणूस घोरतो ते झोपेत. त्या वेळी त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. त्याला उठवलं तर तो घोरत होता याचा पुरावाच नष्ट होतो. तरी बरं अलीकडे अँड्रॉइड वगैरे प्रकारच्या मोबाइल फोनवर कोणाचाही साग्रसंगीत व्हिडिओ घेण्याची सोय आहे. त्याचा वापर करून माणूस घोरी घराण्याचा सदस्य असल्याचं सिद्ध करता येतं. माणूस गाढ झोपलेला असताना घोरतो हे तर स्पष्टच आहे. तरीही नेमकी कोणती परिस्थिती त्याच्या घोरण्याला कारणीभूत होते हेही समजून घेतलं, तर तो केव्हा घोरतो हे स्पष्ट होईल. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. आपल्या घरातील अवयवांचं नियंत्रण करणाऱ्या स्नायूंचीही तीच स्थिती असते. त्यामुळे मऊ टाळू, जीभ, पडजीभ वगैरे अवयवांची या नियंत्रणापासून सुटका होते. त्याच वेळी श्वासनलिकाही सुस्तावल्यामुळे अरुंद झालेली असते. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा तो या अरुंद श्वासनलिकेतून आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थात त्या अरुंद नलिकेकडून विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर पडून ते फडफडू लागतात. त्यांचाच जोराचा आवाज होतो. तोच आपल्याला घोरण्याच्या स्वरूपात ऐकू येतो. कधीकधी सर्दीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नाक चोंदलेलं असतं. त्यातून वाट काढणाऱ्या श्वासालाही विरोध होतो. त्यावर मात करण्यासाठी हवेला जास्त जोर लावावा लागतो. परिणामी हवेचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी खळबळल्यासारखा होतो. त्या खळबळीपोटी घशातल्या मृदू अवयवांची फडफड होते. माणूस घोरायला लागतो. घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही. तर घोरणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. कारण घोरण्यामुळे बर्याच वेळा झोप चाळवली जाते. काही वेळा तर जागही येते. परत झोप लागणं कठीण होतं. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे उठल्यावर माणूस तेवढा ताजातवाना राहू शकत नाही. जसा खोकला हा आजार नाही तर ते केवळ लक्षण आहे, तसंच घोरणंही हा आजार नाही. तेही एक गंभीर ठरू शकणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कधीकधी झोपेत असताना श्वासोच्छ्वासाला अडथळा होतो. याला अाॅब्स्टक्ट्रिव्ह स्लीपअॅंप्निया म्हणतात. झोपेत असल्यामुळे या अडथळ्याचं रूपांतर श्वासोच्छ्वास थांबण्यात कधी होतं ते कळतही नाही. तसं झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यामुळे अतिघोरणं होत असेल व त्यातून झोप वरचेवर चाळवली जात असेल तर डॉक्टरी तपासणी करून घेणं हिताचं ठरतं. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?* काबुल 2) *राष्ट्रगीतात 'जय' हा शब्द किती वेळा आलेला आहे ?* 9 3) *नागपूर हे नाव कशावरून पडले ?* नाग नदीवरून 4) *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* डोनाल्ड ट्रम्प 5) *रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?* ब्लादिमिर पुतीन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● रमेश इटलोड ● नारायण ईबीतवार ● राजेश पाटील उमरेकर ● संतोष रेड्डी बोमीनवाड ● सुरेश यादव ● अनिल पाटील भुसारे ● गणेश आरटवार ● कैलास स्वामी ● शेख बाशू ● मनीष अग्रवाल ● कृष्णा भोरे ● बालाजी सावंत ● लक्ष्मण नोमुलवार बाभळीकर ● अंकुश कामगोंडे ● पुरुषोत्तम रेड्डी चाकरोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुन्शी प्रेमचंद यांनी तारूण्याविषयी फार छान विचार मांडले. ते म्हणतात, 'तारूण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्वास आहे. गौरव आणि सर्वकाही आहे. तारूण्य व्यक्तीच्या जीवनाला उज्ज्वल आणि परिपूर्ण बनविते. परंतु एकदा का ते भरकटले तर सर्व सद्गुणांचा नाश होऊन जीवन सैरभैर होते.' तारूण्याला विश्वात्मकतेचे परिमाण द्यायचे असेल, तर तेवढे साहस आणि उदार असणे आवश्यक आहे. उदारता आणि साहस यांच्या संयोगामुळेच डाॅ. कोटणीस मानवतेच्या भावनेतून चीनमध्ये स्थिरावतात. भारत-चीन या देशांमध्ये मानवतेचा सांस्कृतिक बंध निर्माण करतात. तारूण्याचा खरा अर्थ कळलेली 'डाॅ. कोटणीस की अमर कहाणी' संपूर्ण जगाला आकर्षणाचा आणि आत्मसंवेदनाचा विषय वाटते.* *जनावरे राखता राखता अभ्यास करीत बौद्धिक कर्तृत्वावर आणि तारूण्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तात्याराव लहाणे यांच्यासारखा तरूण नेत्ररोग तज्ञ म्हणून नावारुपाला येतो. अलिशान हाॅस्पिटल उभारून खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याच्या नादी न लागता सरकारी दवाखान्यात नोकरी करून सामान्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो. तेही तारूण्याचा अर्थ समजल्यानेच. युवावर्गाने आपल्या तारूण्यावस्थेतील महत्वाचा काळ शक्ती, कार्यक्षमता, बुद्धिचातुर्य यांचा योग्य वापर केला तर कुटुंब, देश पर्यायाने मानवसमाज प्रगतीपथावर जाऊ शकतो.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उदर समाता अन्न ले, तन ही समाता चीर अधिक ही संग्रह ना करें, तिस्का नाम फकीर। सारांश संन्याशी कसा असावा ? याबद्दल महात्मा कबीर सांगतात की जो पोट भर अन्न घेतो आणि काया झाकण्यापुरती वस्त्र मिळाली की संतुष्ट व समाधानी धारण करतो. यापेक्षा अधिकचे द्रव्य,कपडेलत्ते जमा करीत नाहीं किवा त्यांचा संग्रह ही करीत नाही तोच खरा फकीर किवा संन्यासी असतो . अध्यात्म सांगण्याच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे प्रकार केले जातात. पूर्वी सामान्य माणसाला अध्यात्म किवा वेद पुराण कळायचं नाही. ते समजून घेण्यासाठी एखाद्या ज्ञानी पंडिताकडं जावं लगायचं. तो पंडितही भलता भाव खायचा .समोरच्याला माहिती सांगणे किवा मजकूर वाचण्याच्या मोबदल्यात त्या गरजू व्यक्तीकडून अंगमेहनतीची कामे फुकट करून घेणे. द्रव्यादी उकळणे असा प्रकार सर्रास चालायचा. आजही थोतांडी कर्मकांडाची भिती दाखवून लुबाडणूक होताना दिसते. भोळे भाबडे भक्तगण जादू छू मंतर हात चालाखीला भुलून बुवाबाजी व ढोगाला आहारी पडतात. ढोगी नाटकी सन्याशांचे आश्रम जागोजागी थाटले जातात. धर्म व पंथांच्या नावाखाली साध्या भोळ्या भक्तांना लुटून संन्यस्तपणाच्या बुरख्याआडून अधर्म करणार्यांना वेळीच ओळखून दूर राहावं. ऐसे कैसे झाले भोंदू| कर्म करूनी म्हणती साधू॥ अंगी लावुनिया राख| डोळे झाकुनिया करती पाप॥ दाखवुनिया वैराग्याची कळा| भोगी विषयाचा सोहळा॥ तुका म्हणे सांगो किती| जळो तयाची संगती॥ जगद्गुरू तुकोबांचा वरील अभंग ध्यानात घेतला तरी अशा ढोंगी सन्याशांपासून अलिप्त होता येईल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या विचारात आणि तुमच्या विरोधकांच्या विचारात खूप फरक आहे.तुमचा विचार हा सर्वसाधारण पणे त्रास होऊ नये,आपल्या बोलण्यामुळे मन दुखवू नये,तो जरी आपल्याकडे काकदृष्टीने पाहत असला तरी आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीनेच पाहणे.आपले एखादेवेळी नुकसान झाले तरी चालेल पण त्याचे नुकसान होऊ नये अशी आपली धारणा असते आणि यामुळेच समोरच्यापेक्षा आपले जीवन सुखावह जगण्याचे मंत्र्यांनी शिकवते.हाच जगण्याचा मंत्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत नसतो आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचे चित्रच बदलून जाते.शेवटी त्यांच्या जगण्यात आणि जीवनात तुमच्यासारखा अर्थच नसतो.म्हणून तुमची जगण्याची जीवनशैली ही खरोखरच सर्वसमावेशक आणि आदर्श आहे हे विसरु नका.आज नाही उद्या तरी तुमच्या जीवनशैलीचा नक्कीच स्वीकार करतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुरुकृपा* *विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे* एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले. तात्पर्यः गुरूचे कार्य महान असते.गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/06/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक कोड त्वचारोग दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता 💥 जन्म :- १९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय. १९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान. १९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक. २००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री. २००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,जि गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभारप्रदर्शनासाठी लोकसभेच्या कामाची वेळ 8 आणि राज्यसभेच्या कामाची वेळी 7.10 वाजेपर्यंत वाढविली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - मराठी शिक्षण कायदा संमत करण्यासाठी एक महिन्यात वटहुकूम काढणार, शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मालेगाव महानगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दुष्काळाची पार्श्वभूमी असताना राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून अद्याप सक्रीयही न झाल्याने राज्यभरातील धरणे कोरडीठाक पडली आहेत, मराठवाड्यात स्थिती बिकट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशने अफगाणिस्तानवर 62 धावांनी मिळविला विजय, शकीब अलहसन ठरला सर्वोत्तम खेळाडू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सर्कस* https://storymirror.com/read/story/marathi/d6oevpyb/srks/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌗 *दिवस व रात्र केव्हा सामान होतात ?* 🌗 हा प्रश्न सिंगापुरात कधीच विचारला जाणार नाही. विषववृत्तापासून अतिशय जवळ असल्यामुळे तिथे वर्षभर दिवस व रात्र समान असतात. उत्तर आणि दक्षिण, दोन्ही ध्रुवांजवळ हा प्रश्न विचारला जाणार नाही. कारण तिथं एक तर चोवीस तास रात्र तरी असते किंवा चोवीस तास दिवस. त्यामुळे दिवस आणि रात्र समान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरत्र मात्र दिवस आणि रात्र यांचे अवधी वर्षभरात सतत बदलत राहतात. कधी दिवस जास्त मोठे होतात तर कधी रात्र. त्यातही उत्तर गोलार्धात जेव्हा दिवस मोठे असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात रात्री मोठ्या असतात. वास्तविक दिवस आणि रात्र ही एका 'दिवसा'ची कृत्रिम विभागणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतःभोवतीही गिरकी घेत राहते. त्यामुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागावर दिवसभर सूर्य तळपत नाही राहत नाही. म्हणूनच जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर दिवस आणि सूर्यप्रकाश मिळणे बंद होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं की रात्र अशी विभागणी करण्यात आली आहे. तसंच पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर कमी जास्त होत राहतं. कललेल्या अासापायी सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ न पडता एका कोनातून पडतात. त्यामुळे गोलाकार पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात सूर्यप्रकाश असण्याच्या वेळात फरक पडला पडत जातो. उत्तरायणाच्या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठे असतात. तर दक्षिण गोलार्धात रात्री. जसजसा सूर्य दक्षिणायनाला प्रारंभ करतो तसतशी ही परिस्थिती उलट होत जाते. या परिस्थिती सतत उलट होण्याच्या प्रक्रियेमुळे दिवस मोठे होत जातात, कमाल पातळी गाठतात, परत लहान होत जातात, किमान पातळी गाठतात. रात्रीचीही हीच परिस्थिती असते. या उलटापालटीत दोन दिवस असे येतात की त्या दिवशी रात्र आणि दिवस यांचा कालावधी सारखाच म्हणजे बारा बारा तासांचा असतो. याला संपात म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवात करणारा वसंत संपात तर शरद ऋतूची सुरुवात करणारा शरद संपात. हे दोन दिवस २१ मार्च व २३ सप्टेंबर या तारखांना येतात. म्हणजेच या दोन तारखांना दिवस व रात्र समसमान व्हायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ते या दिवसांच्या आसपास होतात. याचं कारण म्हणजे सूर्य हा काही बिंदुवत नाही. त्याला निश्चित आकारमान आहे. आणि सूर्याची वरची कडा क्षितिजावर आली की दिवस सुरू होतो तर ती क्षितिजाखाली गेली की रात्र. यामुळेच दिवस व रात्र समान होण्याच्या तारखा २१ मार्च व २३ सप्टेंबरच्या आसपास येतात. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नाईल नदी किती देशांतून वाहते ?* 6 2) *फ्रांस या देशाची राजधानी कोणती ?* पॅरिस 3) *भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?* दिल्ली 4) *संसदेचे दोन सभागृह कोणते ?* लोकसभा व राज्यसभा 5) *भूतान या देशाची राजधानी कोणती ?* थिंम्पू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश कात्रे ● सुभाष लाखे ● प्रल्हाद कापावार ● ओम पालकृतवार ● सुरेश कात्रे ● रुपेश पांचाळ ● श्रेयश इंगळे ● संदेश कोडगिरे ● नागेश पाटील ● आदर्श गव्हाणे ● राजेश अलगुंडे ● रमाकांत गोणे ● नादयाप्पा स्वामी ● अशोक तनमुदले ● दीपक जायवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• यह जग कोठी काठ की, चहुं दिश लागी आाग भीतर रहै सो जलि मुअै, साधू उबरै भाग । सारांश महात्मा कबीर क्रोधाचे दुष्परिणाम लक्षात आणून देतात. हा संसार म्हणजे लाकडी महालासारखा आहे. कोणत्याही क्षणी हा महाल आगीचे भक्ष होवू शकतो. मानवाच्य्या ठायी षड्विकार उत्पन्न होत असतात, त्या सर्व विकारांमध्ये क्रोध हा फारच घातक असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की रागाची निर्मिती होते. रागाचं प्रकटीकरण क्रोधाद्वारे होत असतं. मनाची एकाग्र अवस्था साधली नाही की चिडचिड करणं , रागे भरणं अशा क्रिया सहज प्रकट होतात. त्यामुळे पुढचा कार्यभाग बिघडतो. राग ही क्षणिक स्वरूपात व्यक्त होणारी आणि नकारात्मक विचाराकडे नेणारी सहज भाव क्रिया होय. ती अचानक प्रकटत असली तरी ती माणसाचा जीवन विषयक सकारात्मक दृष्टीकोनच बिघडवून टाकते. क्रोधामुळे मानसिक संतुलन बिघडतं, रागाच्या भरात माणूस अविचाराने वागतो. स्वभावात चिडखोरपणा वाढायला लागतो. माणून आतल्या आत गुदमरून स्वतःचे नुकसान करून घ्यायला लागतो. शक्तीक्षय होवून शारीरिक दुर्बलता ओढवून घेतो. क्रोधामुळे मित्र नातलग दुरावतात. साधू, सज्जन मात्र आपल्या चित्त प्रवृत्ती स्थिर ठेवतात. क्रोधाचा वाराही अंगाला लागू देत नाहीत. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद, समाधान कधीही कमी होत नाही. म्हणून माणसानं क्षमाशिलता, समंजसपणा व धैर्य अंगी धारण करून क्रोधाला दूर पिटाळायला शिकलं पाहिजे एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎯 विचारवेध........✍🏻 ----------------------- जर एखादी व्यक्ती तुमच्या वर्तनातील तुमच्यासमोर दोष दाखवत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रागावू नका.कारण आपल्यात असलेला अवगुण आपल्याला कधीच कळत नाही.आपण आपलेच आंधळे झालेलो असतोत.तो जर आपले दोष दाखवून देत असेल तर आपणाला आपल्यातले दोष घालवून सुधारण्याची संधी देत आहे.उलट त्यांचे आभार मानायला विसरु नका.अशा व्यक्ती आपल्याला खूप कमी मिळतात.जे आपल्या दोषांवर पांघरूण घालतात ते मात्र आपल्याला एका वाम मार्गाने जाण्यासाठी अप्रत्यक्ष प्रेरीत करतात.त्यामुळे आपण कोणत्या प्रवाहाकडे जात आहोत हे कळत नाही आणि जेव्हा कळायला लागते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. ••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. तात्पर्य युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
*शब्दपिसारा* (दि.२४-०६-२०१९) शब्दांच्या गाभाऱ्यातुन काव्य असे स्फुरावे जणू मनातील मोरपिसे शब्दांंनी बहरावे हृदयाच्या कपारीतून शब्द हा उमटवावा जणू शब्दांचा गर्भातून काव्य हा उजळावा सप्तरंगी या जीवनी काव्य असे फुलते जणू अंतरंगातील अंतर्भावच स्पर्शूनी खुलते शब्दाचा पाझर जीवनी असा फुलवावा जणू शब्दाचा जीवनात सागर व्हावा दाही दिशांनी स्वर शब्दांचे घुमतात जणू दिशाहीन या जीवनास मार्ग दाखवतात मनी शुद्ध शब्दांचे पावित्र्य निर्मळ ते जपतात ओवूनी शब्दांची माळ काव्यात जणू दरवळतात. 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/06/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९४ - अमेरिकन वायुसेनेचे बी-५२ प्रकारचे विमान फेरचाइल्ड एरफोर्स बेस येथे कोसळले,४ ठार. १९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला 💥 जन्म :- १९०९ - गुरू गोपीनाथ, शास्त्रीय नर्तक. १९२७ - कवियरासू कन्नडासन, तमिळ लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अरविंद केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ; दिल्लीतील गरीब विद्यार्थ्यांना मिळणार १०० टक्के शिष्यवृत्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *१९७२ नंतर कोणत्याही एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब ; नौदलाने 21 दिवस घेतला शोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मालवणी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मुंबई विद्यापीठ कायम प्रयत्नशील असेल, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सहाव्या मालवणी बोली साहित्य संमेलनात दिले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विदर्भ व मराठवाड्यात दुधामुळेच क्रांती घडून येईल, असा विश्वास राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्णधार राणी रामपाल अंक ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह, विराट कोहलीला मिळणार विश्रांती; बीसीसीआयचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सुंदर* https://storymirror.com/read/story/marathi/e8iw53kn/sundr/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आधुनिक मानवाचा उदय केव्हा झाला ?* 📙 वैज्ञानिक भाषेत आधुनिक मानवाचं नाव होमो सेपियन्स असं आहे. पण हा आधुनिक मानव एकाएकी अकस्मात जन्माला आला नाही. डार्विननं सांगितल्याप्रमाणे वानर प्रजातींपासून हळूहळू उत्क्रांती होत होत त्याचा उदय झाला. म्हणून होमो या प्रजातीच्याही काही जाती आधुनिक मानवाच्या आधी उदयाला येऊन अस्ताला गेल्या. त्यांचेही पूर्वसुरी होमिनिड या नावानं आणि त्यांचेही पूर्वज होमोनाॅइड या नावाने ओळखले जातात. आफ्रिकेच्या जंगलात राहणारे होमिनाॅईड प्रजातीचे वानर साधारण ५० ते ८० लाख वर्षांपूर्वी वावरत होते. त्या कालखंडात पडलेल्या दुष्काळापोटी तिथल्या वनराजीला ग्रहण लागलं. त्यामुळे झाडांवर राहणाऱ्या या वानरांना आपलं बस्तान दुसरीकडे तर हलवावं लागलंच, पण अन्नाच्या शोधासाठी तसंच वास्तव्यासाठीही झाडांचा आश्रय सोडून जमिनीवर उतरावं लागलं. आफ्रिकेतल्याच सॅव्हॅन्ना या गवताळ जंगलांमध्ये ज्यांनी आश्रय घेतला, त्या वानरांचे वंश टिकून राहिले. ही वानरं दिवसा जमिनीवर उतरून अन्नाचा शोध घेत, पण रात्र झाली की परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामी परतत. जमिनीवरचं मिळालेलं अन्न परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामस्थळी हलवायचं तर ते पुढच्या दोन पायांमध्ये म्हणजेच हातांमध्ये धरून आणावं लागे. ते करण्याची क्षमता ज्यांनी मिळवली त्या जातींना तगून राहण्यास मदत झाली. त्यातूनच हळूहळू दोन पायांवर उभे राहणारे नवीन होमिनिड प्राणी उदयाला आले. हे मानवसदृश असले तरी त्यांनी वानरजातीचे गुणधर्म संपूर्णपणे त्यागलेले नव्हते. झाडांचा आश्रय त्यांनी संपूर्ण सोडलेला नव्हता. या प्रजातीतही उत्क्रांती होत गेली. आणि त्यातूनच पहिले होमो प्रजातीतले प्राणी उदयाला आले. यांना होमो हॅबिलिस म्हणतात. पुढचे दोन पाय म्हणजेच हात मोकळे झाल्यामुळे त्यांचा अधिकाधिक उपयोग करायला हे प्राणी शिकले होते. ते काही आयुधं आणि अस्त्रं बनवून त्यांचा वापर शिकारीसाठी किंवा घरटं खोदण्यासाठी करायला शिकले होते. पण अजूनही ते संपूर्णपणे दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. थोडे डगमगत होते. शिवाय त्यांचा मेंदूचाही फारसा विकास झालेला नव्हता. ही झाली १५ ते ३० लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर उदयाला आले ते होमो इरेक्ट्स. हे दोन पायांवर ताठ उभे राहू शकत होते. त्यांच्या मेंदूचीही चांगलीच वाढ झाली होती. परंतु ते अजूनही वन्य प्राण्यांप्रमाणे गुहांमध्ये राहून गोळा करून आणलेल्या कंदमुळांवर व शिकार करून आणलेल्या मांसावर गुजराण करत होते. अग्नीचा शोधही त्यांनी लावला होता. त्यांची आयुधंही जास्त प्रभावी होती. त्यांचीच उत्क्रांती होत होमो सेपियन्स म्हणजे बुद्धिमान होमोचा किंवा आधुनिक मानवाचा उदय झाला. त्याच्या मेंदूचा झपाट्याने विकास झाला होता. बुद्धिमत्तेत वाढ झाल्यामुळे शेती किंवा सांस्कृतिक विकास यांचाही प्रवाह सुरू झाला होता. होमो सेपियन्सचा उदय साधारण ३५००० ते १०००० वर्षांपूर्वी झाला यावर सर्वांचंच एकमत आहे. *बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवन चैनीची वस्तु नसुन कर्तव्याची भूमी आहे *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात गरीब देश कोणता ?* भूतान 2) *नेपाळ या देशाची राजधानी कोणती ?* काठमांडू 3) *भारतात 'चारमिनार' कोठे आहे ?* हैदराबाद 4) *रशिया या देशाची राजधानी कोणती ?* मास्को 5) *भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.निर्मला सीतारमन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सचिन रेनगुंटवार ● कल्पना डेव्हिड बनसोड ● कवी अनिल रेड्डी ● सदानंद कोडगळे ● लक्ष्मण सुरकार ● संदीप शंभरकर ● लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी ● रवी गंगाधर भोरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर गाफील क्यों फिरय, क्या सोता घनघोर तेरे सिराने जाम खड़ा, ज्यों अंधियारे चोर । सारांश महात्मा कबीर मृत्यूची आठवण करून देतात. हे मानवा तुला असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत आहेस ? कोणत्या घणघोर अंधार्या काळ कोठडीत तू स्वतःला जखडून घेत आहेस ? कुठल्याही संपत्तीच मोल देवूनही हा जन्म परत मिळणारा नाही . तुला मिळालेले ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात महान भेट आहे. इत्तर प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं अधिकचं वरदान तुला दिलं तर तू त्या वैभवाचा वापर करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी धडपडायला पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे , किमाण या सृष्टीला तरी विद्रुप करण्याचं कुकर्म करू नकोस ! हे वैविध्पाने भरलेले जग तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे डोळे उघडे ठेवून पाहिलेस. त्याच्या रचनेला धक्क् न देता त्याचा मानव कल्याणासाठी वापर करून घेतलंस तर भविष्य सुंदर नाही तर निसर्ग प्रकोप ठरलेलाच. तू कितीही सावध वागण्याचा प्रयत्न करीत असलास तरी हा मृत्यू रूपी चोर तुझ्यावर सारखी पाळत ठेवून आहे. तू भौतिक सुखसोयींचा कितीही इधार घेतलास तरी काचाच्या बंदिस्त महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी आत्म्याला तो कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला मोहवून हुरळून जातोस त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य दृष्टी देणार्या आत्मदृष्टीची जडणघडण चांगली होण्यासाठी मनाचा निकोप विकास होणे गरजेचे आहे. सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू शकतात. तेव्हा अज्ञानाचा अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान जाणून घे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थीवृत्ती* एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.' तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. फक्त स्वतःचाच फायदा पाहतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
बडबडगीत दि.२२-०६-१९ विषयः पोपट पोपटा पोपटा बोलशील का लाललाल चोच दाखवशील का हिरव्या हिरव्या रंगाची पांघरूण शाल डाळींबाचे दाणे खातोस लाल पोपटा पोपटा बोलशील का लाललाल चोच दाखवशील का? झाडावरून उडून जातोस का पेरूचा फोडी खातोस का? पोपटा बोलशील का लाल लाल चोच दाखवशील का? ➖➖➖➖➖➖➖ ✍ प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
*बडबडगीत* दि.२२-०६-१९ *विषयः आगगाडी नातेवाईकांची* *(मराठी गीत)* 🚂🚃🚋🚃🚋🚃🚋🚃 आली आली बघा बघा आगगाडी (दोन वेळा) सरळ रेषेत चालणारी धावधाव धावणारी आली आली बघा बघा आगगाडी (दोन वेळा) आगगाडीत बसले कोण? आजी आजोबा आणखी कोण!👩🏫👨🏫 (दोन वेळा) आली आली बघा बघा आगगाडी.......(दोन वेळा) आगगाडीत बसले कोण? मामामामी आणखी कोण! (दोन वेळा)🙎♂👩🦰 आली आली बघा बघा आगगाडी.......(दोनवेळा) आगगाडीत बसले कोण? दादा वहिनी आणखी कोण (दोन वेळा)🙎♂🙎 आली आली बघा बघा आगगाडी .. आगगाडीत बसले कोण? काकाकाकु आणखी कोण 👳👩🏻 आली आली बघा बघा आगगाडी.....(दोनवेळा) ➖➖➖➖➖➖ 🚂🚋🚃🚋🚃🚋🚃 ➖➖➖➖➖➖➖ *✍ प्रमिला सेनकुडे* *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/06/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १५१७ - अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अॅब्रायस्ते पेरी यांचा जन्म. १९४० - सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरनागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला. १९८३ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला. 💥 जन्म :- १९३५ - वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू. १८९६ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता. १९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक 💥 मृत्यू :- १९४० - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ. २००१ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नांदेड जिल्ह्यात कालरात्री जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, माहूर, किनवट,हिमायतनगर, हदगाव आणि अर्धापुर या भागात जाणवले धक्के* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, नांदेडमध्ये रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये योगाभ्यासासाठी मोठी गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा, मान्सून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अजून ही दाखल झालेला नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सातारा : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला संशय. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखालील पहिली जीएसटी काऊन्सिलची बैठक संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ICC World Cup 2019 : इंग्लंडचा धक्कादायक पराभव, लसिथ मलिंगा ठरला 'गेम चेंजर'!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - परीक्षा* https://storymirror.com/read/story/marathi/os217c0i/priikssaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *२१ जूनची माहिती* *21 जून म्हणजे वर्षातील सर्वात मोठा दिवस.* पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते.पृथ्वी २३. ५ अंशाने एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीच्या या कललेल्या आसामुळे नॉर्वेच्या उत्तरभागात अर्ध्या रात्रीपण सूर्य दिसतो. त्यालाच मध्यरात्रीचा सूर्य म्हणतात. दोन्ही ध्रुवावर तर सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र असते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किमी प्रती तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद अॅाडजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद अॅतडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अॅणन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप अॅाडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद अॅयडजेस्ट केला जातो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चुकणे ही प्रकृती, मान्य करणे ही संस्कृती आणि सुधारणे ही प्रगती आहे. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ?* कॅनबेरा 2) *जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ?* सहारा 3) *जगातील सर्वात मोठी नदी कोणती ?* नाईल (6650 Km) 4) *'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?* मुंबई 5) *'इंडिया गेट' कोठे आहे ?* दिल्ली *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● बालाजी राजापूरकर, ● भीमराव तायडे ● गंगाधरराव तोटलोड, ● स्वप्नील पाटील ● सुधीर मरवळीकर ● माधव बोडके ● श्याम गाडे ● निलेश दौडकर ● नंदकिशोर कोरे ● आशा मांकावार ● साईनाथ डब्बेवाड बामणी ● अभिषेक बकवाड यादव ● लक्ष्मण शीरमाने ● गंगाधर बोमलवाड ● दिनेश बंगारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तसं पाहिलं तर आपल्यापैकी बहुतेकांचं जीवन साचेबद्ध असतं. घर आणि नोकरी किंवा घर आणि व्यवसाय अशा दोन विश्वांतलं आपलं जीवन. त्यामधील माणसांभोवती फेर धरणारं जगणं. आपण स्वत:साठी जगत असतो; परंतु आई-वडिल, भावंडे, पती-पत्नी आणि मुलं, मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्यासाठीही जगत असतो. शिकत असतो त्यावेळी उत्तम गुण मिळवून परिक्षा उत्तिर्ण होण्याचं स्वप्न असतं आपलं. शिक्षणानंतर स्वप्न असतं ते करिअरचं. नोकरी वा व्यवसायात स्थिरावण्याचं आणि त्यानंतर स्वत:च्या कुटुंबाचं, घराचं. लग्नाचं आणि मग मुला-मुलींना वाढवण्याचं. म्हटलं तर हे चक्रच. त्या-त्या काळातील आपली महत्वकांक्षा हे चक्र फिरवित असते.* *महत्वकांक्षा हे एक मानवी मूल्य आहे. विद्यार्जनासाठी, कर्तृत्वासाठी, स्वयंप्रेरणेसाठी ते आवश्यकच असते. महत्वाकांक्षा नसेल तर मग आपण कशाचा ध्यास घेणार आणि त्याच्या मागे धावणार? आपली इच्छा असो वा नसो, आपण स्पर्धेत ओढलो जातोच. महत्वाकांक्षा आपल्यामधील स्पर्धात्मकता वाढविते, कष्ट करायला प्रेरणा देते, चिकाटी निर्माण करते. निसर्गाकडून आपल्या प्रत्येकाला कमी'-आधिक प्रमाणात प्रतिभाशक्ती मिळालेली असते. वैयक्तिक जीवनात महत्वाकांक्षा जशी आवश्यक, तशी ती समाजजीवनातही गरजेची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी, गांधीजींनी, नेहरूंनी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याची आकांक्षा बाळगली. देशवासियांना एकत्र करून त्यांनी त्याची पूर्ताताही केली. महत्वाकांक्षा समाजासाठी अशा प्रकारे उपयुक्त ठरते.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐🔹🔹🔹🔹🔹🔹⭐ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे. ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की, तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राप्त परिस्थितीत समाधान मानने. एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.' तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे. प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/06/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय योग दिन* *उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.* *दक्षिण गोलार्धातील सर्वात छोटा दिवस.* 💥 ठळक घडामोडी :- • १९८९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली. • १९९१ - पी.व्ही.नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी. 💥 जन्म :- •१९२३ - सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक. • १९८२ - विल्यम, इंग्लिश राजकुमार. 💥 मृत्यू :- • १९२८ - नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार. • १९४० - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक. • १९५७ - योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. • १९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* *जि प शाळा बिरसी,गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रामधील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक, त्यासाठी कठोर कायदा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जलधारा, 22-23 जूनला उर्वरित कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली - मत्स्य उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर, पहिल्या क्रमांकावर येण्याची क्षमता आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नांदेडमध्ये राज्यस्तरीय योगशिबिराचे आयोजन, योगगुरू रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली उपस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारी सेवेत 30 वर्षांहून अधिक काळ असलेल्या कर्मचाऱ्यांचं पुनरावलोकन, शारीरिकदृष्टया अकार्यक्षम किंवा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *शिखर धवन, भुवनेश्वरकुमार नंतर भारताला तिसरा धक्का, विजय शंकरलाही झाली दुखापत, भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - वेळ नाही मला* https://storymirror.com/read/story/marathi/xbrom5jq/vel-naahii-mlaa/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ : आळंदी* वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले . ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे. त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात. आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते. त्यात असंख्य वारकरी सामील होतात. आळंदी ते पंढरपूर हे अंतर (सुमारे २०५ कि. मी.) भाविक विठू माउलीच्या नामाचा गजर करत, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत, चालत पार करतात. आळंदी येथे अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास संजीवन समाधी म्हटले जाते. कीर्तन-प्रवचन-वेदाभ्यास यासाठीचे महाविद्यालय येथे आहे. संस्कृत व अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यास तेथे अविरत सुरू असतो.ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, मुक्ताईचे मंदिर, सोन्याचा पिंपळ अशी अनेक स्थाने या तीर्थस्थानी भक्तिभावाने पाहण्यासारखी आहेत. इंद्रायणी काठी , देवाची आळंदी लागली समाधी , ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव , मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती , सोपान , मुक्ताबाई *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?* 2 रा 2) *उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?* 21 जुन 3) *उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ?* 22 डिसेंबर 4) *अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?* वाशिंग्टन 5) *गुजरात या राज्याची राजधानी कोणती ?* गांधीनगर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● धाराजी जोगदंड ● संजयकुमार मांजरमकर ● शुभम साखरे ● वीरभद्र बसापुरे ● आनंद जाधव ● राहुल पाटील ● हणमंत जगदंबे ● माधव धोंडापुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• करनी बिन कथनी कथे, अज्ञानी दिन रात । कूकर सम भूकत फिरे, सुनी सुनाई बात ॥ कर्माविना कैसे वर्म बरळा अज्ञान भ्रम गल्लोगल्ली फिरे श्वान तया भुंकण्याचे कर्म अर्थ : अज्ञानी व्यक्ती रात्रंदिवस कामाशिवाय बिन कामाचेच जास्त बरळत असतो. याच्याकडे स्वताःचा विचारही नसतो किवा तर्क लावण्याची कुवतही नसते. ऐकलेल्या , कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी मग त्या अविवेकी असल्या तरी जशास तशा सांगत फिरतो. अफवांच्या कंड्या पसरवित फिरत असतो. अज्ञानामुळे बालिश वक्तव्ये करीत फिरत असतो. आपण सांगत असलेलंच बरोबर आहे. असा त्याचा भ्रम असतो. परंतु तो आपल्या विचार व वक्तव्याप्रती कधीच सारासार विचारही करीत नाही. जसा मोकाट कुत्रा सारखा या गल्लीतून त्या गल्लीत भुंकत फिरत असतो. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात. परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंतर्ज्ञान* दोघं मित्र एका गणपतीच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळाच्या गाभाऱ्यात एक आंधळा बसला होता. ते पाहून रमेश गोविंदाला म्हणाला, ‘ ‘ह्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तिला पाहिलसं का ? तो आंधळा आहे पण गावातील विद्वान पंडित आहे. ” रमेशचे म्हणणे गोविंदाला पटेना. शेवटी गोविंदा त्या आंधळ्याजवळ गेला. त्याला आपली ओळख सांगून गोविंदा त्याच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता तो जन्मापासून आंधळा आहे हे गोविंदाच्या लक्षात आले. पण तो पंडित आहे यावर त्याचा विश्वास बसेना. म्हणून गोविंदाने त्याला विचारले, ‘ ‘या देवळाच्या गाभाऱ्यात आपण रोज कुणाचं चिंतन करता? आपल्या अभ्यासाचा नक्की विषय कोणता आहे?” यावर तो आंधळा म्हणाला, ‘ ‘मी खगोलशास्त्राचा अभ्यासक आहे. ” हे त्याचे उत्तर गोविंदाला पटेना. ‘ ‘तुम्हाला अजिबात दिसत नाही मग तुम्ही ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण कसं करता?” या त्याच्या संशयाने विचारलेल्या प्रश्नावर आंधळा स्वतःच्या छातीवर हात ठेवून म्हणाला, ‘ ‘अरे, ह्याच्या आतील सर्व ग्रह ताऱ्यांचे मी निरीक्षण आणि अभ्यास करत असतो. आता तरी कळलं का?” तात्पर्य : बाह्य ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान जाणून घेण्यातच विद्वत्ता आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/06/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकष्ट चतुर्थी* 💥 ठळक घडामोडी :- २००१ - परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- १८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक १९३९ - रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७२ - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९७ - बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. १९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर. २००८ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - एक देश एक निवडणुकीच्या मुद्यावर सल्ला देणाऱ्या विविध पक्षांच्या प्रमुखांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले आभार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *बिहारमध्ये चमकी तापाचा कहर अद्यापही सुरूच असून यामुळे मृत बालकांची संख्या ११२ वर पोहोचली असून ३00 जण अद्यापही या गंभीर आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे, यावर्षी पाऊस लांबल्याने सोयाबीन आणि भात पीक धोक्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- चर्चगेटमधील बँक ऑफ इंडिया इमारतीत आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ICC World Cup 2019 भारताचा प्रमुख फलंदाज शिखर धवनचा वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार, भुवनेश्वर कुमार बाबत संभ्रम अवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विश्वचषक स्पर्धा 2019- न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर 4 विकेट राखून विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - अपेक्षाभंग* https://storymirror.com/read/story/marathi/u55819bp/apekssaabhng/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀ ************************** थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते. पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं. *बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ?* रविंद्रनाथ टागोर 2) *'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 2 ऑक्टोबर 3) *महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ?* न्हावाशेवा पळस्पे - 27 Km 4) *महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ?* 353 5) *महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ?* 33 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गणेश अंगरोड ● लक्ष्मण तुरेराव ● शंकर कदम ● रमेश मुनेश्वर ● महेश कुडलीकर ● बालाजी गाडे ● विनोद गुम्मलवार ● गंगाधर गट्टूवार ● लक्ष्मण चन्नावार ● मन्मथ मोकलीकर ● राजेंद्र पाटील ● धनंजय उजनकर ● संभाजी आटोळकर ● निमेश गावित ● अनिल राठोड ● रामचंद्र विश्वब्रम्ह ● गणेश दघाळे ● किरण बेंद्रे ● शादूल चौधरी ● साईराम सुरकूटवार ● दौलतराव वारले ● नितीन पवार ● अजित पिंगळे ● शिवा बोधने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *महात्माफुले यांची अखंड* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||१|| त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती || आर्ये कुरापती || तिर्थे केली ||२|| दाढी दोई वेण्या मुढ भाररीती || भट करिताती || द्रव्यलूटा ||३|| आर्यानी कल्पीली थोतांडे ||ही सारी || दर्गे सर्वोपरी || जोती म्हणे ||४|| एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती स्वत:च्या सौंदर्याकडे कधीच पाहत नाहीत परंतु जगाचे अर्थात इतरांचे सौंदर्य कसे अधिक चांगले दिसेल यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यातच त्यांच्या सौंदर्यात अर्थात इतरांच्या सौंदर्यात समाधान मानतात.जेव्हा अशी व्यक्ती समाजात क्वचित पहायला मिळते ते इतरांचे अहोभाग्य समजावे.हे लोक स्वत:कडे आणि स्वत:च्या जीवनाकडे कधीच झुकून पाहत नाहीत.त्यांना स्वत:च्या जीवनात काही रस नसतो.रस असतो तो जगाकडे आणि जगाला सुंदर करण्याकडे.अशी व्यक्ती कधीच स्वार्थी वृत्तीची नसते.म्हणूनच इतरांच्या हृदयात सामावले जातात.उलट ज्या व्यक्ती आपले स्वत:चे सौंदर्य अधिकाधिक कसे खुलेल आणि इतरांपेक्षा आपण कसे खुलून दिसू,लोक आपल्याकडे कसे पाहतील अशी जर भावना असेल तर ती व्यक्ती स्वार्थी आणि मतलबी समजावी.अशा व्यक्तींना कुठेही स्थान मिळत नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *त्यागाचे महत्व* फार वर्षापूर्वी एक स्वाभिमानी राजा होऊन गेला. त्याचे राज्य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्याचे महाल सोन्यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्याचे सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन देत होते. एकदा त्याच्या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्हणाला,''राजन, त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्हा त्याग समाविष्ट होते तेव्हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी तयार होते.'' फकीराच्या राजा खजील आला आणि त्याचे डोळे उघडले. त्याने गर्वाचा त्याग केला. तात्पर्य :- त्यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्याचे नुकसान करतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/06/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- • १९६६ - शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली. • १९७८ - गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण. • १९९९- "मैत्रेयी एक्सप्रेस" या नावाने कोलकाता ते ढाका बस सेवेचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन 💥 जन्म :- • १९४५ - ऑँग सान सू की, म्यानमारची राजकारणी. • १९४७ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक. • १९७० - खासदार राहुल गांधी 💥 मृत्यू :- • १८६७ - मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट (जन्म-१८३२), मृत्यूदंड. • १९०२ - आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - लोकसभा सभापतीपदासाठी एनडीएकडून भाजपाचे कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांना उमेदवारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - अकरावीच्या प्रवेशासाठी तुकड्यांमध्ये वाढ करणार, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत न येऊ देता गेटला कुलुप लावून मज्जाव करणाऱ्या तिघांविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दुचाकीस्वारांना पुणे पोलिसांनी केलेल्या हेल्मेट सक्तीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, शेकडो दिंड्यांचा सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प राज्य विधिमंडळात अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसी क्रिकेट विश्वचषक - इंग्लंडचा अफगाणिस्तानवर १५० धावांनी विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - संघर्ष* https://storymirror.com/read/story/marathi/k5sul23x/snghrss/detail वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय ?* 📙 घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठया अक्षरात 'आयोडिनयुक्त मीठ' असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडिन का मिसळतात, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ! आयोडिन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडिन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉईड ग्रंथींमध्ये या आयोडीनपासुन थायरॉक्सिन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते. त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भक व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतीमंद व मूकबधिर होतात. मोठ्या माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात. बौद्धिक क्षमता कमी होते. वाढ खुंटते. स्त्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडिन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व काॅड माशाच्या यकृताचे तेल इत्यादीपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोड्या प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडिनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते. त्यामुळे आयोडिनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ व खाद्यतेल यांचा वापर करता येतो. मिठाचा जेवणात समावेश गरीब श्रीमंत असे सर्वच लोक करत असल्याने मिठात टाकल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे मिठात आयोडिन १ किलोला १५ ते ३० मिलीग्रॅम या प्रमाणात आयोडिन मिसळले जाते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••• जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* *मुख्याध्यापिका प्रा.शा. पिठ्ठी ता पाटोदा* 📱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ?* बकीमचंद्र चॅटर्जी 2) *एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?* अनंत 3) *भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ?* सारनाथ येथील अशोकस्तंभावरून 4) *भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* थरचे वाळवंट (राजस्थान) 5) *'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ?* महात्मा गांधी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुभाष दरबस्तेवार ● खुशाल बोकडे ● भारत सोनवणे ● प्रताप भिसे ● नागेश कोसकेवार ● नारायण शिंगारे ● शंकर बेल्लूरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनुष्य समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजविकासाच्या दृष्टीने त्याच्याकडे जे काही गुण आवश्यक आहेत, त्यापैकी 'चारित्र्याचा' क्रमांक सर्वात वरचा लागतो. सामाजिक शांतता व प्रगती यामध्ये व्यक्तिचे चारित्र्य महत्वपूर्ण योगदान देते. चारित्र्याच्या अभावामुळे दुर्गुणांचे प्राबल्य वाढून सामाजिक अशांतता निर्माण होते तर सद्गुणांमुळे व्यक्ती व समाजाचे चारित्र्य सदृढ होते. कटु प्रवचनकार जैनमुनी तरूण सागर यांना, देशाचे संरक्षण प्रामाणिकपणे करणारा सैनिक व सामाजिक समतेसाठी झटणारा संत हे उत्तम चारित्र्याचे आदर्श नमुने वाटत.* *संत व सैनिक दोघांच्या चारित्र्य सामर्थ्यांचे महत्व सांगताना मुनी म्हणत,'संत आणि सैनिकाला झोपू देऊ नका. ते दोघे झोपल्यावर समाज आणि देशाचे भाग्य झोपी जाते. पापी माणूस आणि भ्रष्ट नेते यांना जागे होऊ देऊ नका. कारण ते जागे झाले तर देश आणि समाजातील शांतता, सुख चिरडले जाईल. ज्या देशातील संत आणि शिपाई जागे असतात, तो देश कधीही नष्ट होत नाही. जागरूक संत आणि प्रामाणिक शिपाई देशात शांतता आणि सुख निर्माण करू शकतात. आपल्या अवतीभवती असणा-या व्यक्तींच्या गरजा भागविण्याचे सामर्थ्य आपल्यात असावे. आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला सदैव पात्र राहण्याचे बळ आपल्याला मिळावे, अशी चारित्र्यसंपन्न व्यक्ती विश्वनियंत्याकडे प्रार्थना करताना दिसते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *संजय नलावडे, चांदीवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *महात्मा फुले यांची अखंड* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निर्मीकाने जर एक पृथ्वी केली || वाही भार भली || सर्वत्रांचा ||१|| तृणवृक्षभार फाळी आम्हासाठी || फळे ती गोमटी || छायेसह ||२|| सुखसोईसाठी गरगर फेरे || रात्रंदीन सारे || तीच करी ||३|| मानवांचे धर्म एक नसावे अनेक || निर्मीक तो एक || जोती म्हणे ||४| *संकलन : एकनाथ डुमणे, मुखेड* 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे काट्यातून गुलाबाला फुलण्यासाठी काट्याशी टक्कर द्यावीच लागते तेव्हा कुठे गुलाबाला इतरांना आनंदी पाहता येते.जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपले दुःख त्यांच्यासमोर मांडून चालणार नाही.जर मांडलेत तर त्यांना आनंदाने आपण पाहू शकणार नाही.उलट त्यांच्या आनंदावर विरजण टाकल्यासारखे होईल.इतरांना सुखात आणि आनंदात पहावयाचे असेल तर आपल्याला होत असलेले दु:ख बाजूला सारून त्यांना होणा-या दु:खावर फुंकर घालून सुखाचे काही क्षण देऊ शकतो आणि एवढी तयारी जर आपण ठेवली तर इतरांना जसा आनंद देता येईल त्या आनंदाबरोबरच आपल्या जीवनात आनंद लुटता येईल.नाही तर त्यांच्या डोक्यावर दु:खाचे ढग जसे दाटलेले पहायला मिळतील तसेच आपल्याही डोक्यावर दु:खाणे ढग अधिक गर्दी करुन राहतील.मग आपल्या सुखी जीवनाचे कोणतेही इप्सित साध्य होणार नाही.इतरांना दु:ख देण्यापेक्षा,मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवता येईल याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मैत्रीच्या मर्यादा* एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.' एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!' 'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा!!' तात्पर्य - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/06/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २०१३ - भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले. 💥 जन्म :- १९७३ - लियँडर पेस, भारतीय टेनिसपटू. १९८० - व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू. 💥 मृत्यू :- १८५८ - राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी (लढाईत). १८९५ - गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत. २००४ - इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विदर्भ वगळता आजपासून शाळेला सुरुवात, पहिल्याच दिवशी मुलांना मिळणार पुस्तके, नवागताचे होणार स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, डॉ. संजय कुटे, यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण खात्यावर मानावे लागले समाधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *रायगड - पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीत आग, मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *संसदेचे पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात, लोकसभेतील नेत्याविषयी काँग्रेसमध्ये अद्यापही अनिश्चितता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *World Cup 2019 मँचेस्टर - विराट कोहलीचे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 11 हजार धावा पूर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर हा सातवा विजय ठरला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *आजची कथा - मैत्रीचं झाड* * https://storymirror.com/read/story/marathi/eqz2hwpv/detail/detail?undefined कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राणी लक्ष्मीबाई* लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १८, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले. इ.स. १८४२मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• केवळ ज्ञान असून चालत नाही ते कस आणि केव्हा वापरायचं याचही ज्ञान असावं लागत. *संकलन : सौ. सुभद्रा खेडकर, बीड* *मुख्याध्यापिका प्रा.शा. पिठ्ठी ता.पाटोदा 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?* गॅलिलिओ 2) *सिग्नलचा शोध कोणी लावला ?* गॅरेट मॉर्गन 3) *प्लास्टिकचा शोध कोणी लावला ?* अलेक्झांडर पार्क्स 4) *महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?* गंगापूर ( गोदावरी नदीवर ) 5) *राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ?* 52 सेकंद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आकाश रेड्डी येताळकर ● गजानन पाटील ● गणेश गुंडेवार ● आप्पा यलकटवार ● दिग्विजय चव्हाण पाटील ● लालूभाई शंकरोड ● धनंजय गुडसुरकर ● गणपत कल्हाळे ● भास्कर भेदेकर चिटमोगरेकर ● साईबाबा बनसोडे ● प्रवीण जावळे ● अक्तर शेख *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• *संजय नलावडे, चांदीवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कबिराचे बोल.......!* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोइ एक राखै सावधां, चेतनि पहरै जागि । बस्तर बासन सूं खिसै, चोर न सकई लागि ॥ भौतिकाच्या नादे काढी जागुनिया सारी रात जे देई परमानंद त्याची सांग काय बात अर्थ : जो सर्वकाळ दक्ष व तत्पर म्हणजेच जागा असतो. त्याच्या घरी चोरी होणे. कपडे भांडी कुंडी चोरीला जाणे असा प्रकार घडत नाही. माणूस भौतिक क्षणिक बाबींना जपण्याचा किती आटापिटा करत असतो. नाशीवंत वस्तुंच्या मोहासाठी माणसाची केवढी मोठी धडपड चाललेली असते. मानसाचं जीवन व शरीरही नश्वर व क्षणभंगूर आहे. कोणत्याही क्षणी ते नष्ट होऊ शकतं. म्हणून माणसानं तत्पर असावं. सत्कर्म व सन्मार्ग सोडू नये. विकारांपासून अलिप्त राहण्यासाठी वाईट संगती, वाईट विचार व वाईट प्रवृत्तीं सोडून दिल्या पाहिजेत व सदैव दक्षता बाळगली पाहिजे. सद्गुण व सत्संगतीचा मार्ग अाचरावा लागेल - एकनाथ डुमणे, मुखेड ९०९६७१४३१७ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातील कोणत्याही व्यवहारात दोन बाजू असतात आणि जेव्हा मनुष्य दोन्ही बाजूंचा विचार करतो तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अवगत झाले आहे असे समजावे.जर एकाच बाजूने विचार करायला लागला तर कधी कधी कमी फायदा होतो तर जास्त नुकसान.नुकसान जेव्हा व्हायला लागते तेव्हा त्याला ख-या व्यवहाराचे ज्ञान अत्यल्प आहे असे समजावे.कुठेतरी त्याची बाजू कमी आहे.अशावेळी त्याच्या मनात नकाराची,नैराश्याची,परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे.त्यामुळेच वेळोवेळी अपयशाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.ह्या अशा नकारात्मक उर्जेचा त्याग करायचा असेल तर उलट विचार करायला हवे.जीवनात येणा-या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी.मन स्थिर ठेवून कृती करण्याची तयारी,ठाम विश्वास, कामात एकाग्रता आणि सातत्य ह्यावर जर अधिक भर दिला तर कोणतेही जीवनव्यवहारातले प्रश्र्न सोडवायला तत्पर व्हाल.तुमच्या मनातला नकार हा तुमच्या जीवनातला सदैव अपयशाकडे घेऊन जाणारा आहे की,त्यातून काहीच साध्य होणार नाही.त्यापेक्षा सकारात्मक बाजूने जर नेहमी जीवनात विचार करून मार्गक्रमण केले तर जीवनातले कितिही बिकट प्रश्न असले तरी सहजपणे सोडवता येतील.तेव्हा जीवनात ह्या दोन्ही बाजूने विचार करुन योग्य अयोग्य, चांगले वाईट ह्याचे ज्ञान असणे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साप आणि खेकडा एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशी साप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ? तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)