✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑक्टोबर 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -https://www.facebook.com/share/p/17Qf9h3aGL/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९५४: श्यामची आई चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.• १९६०: विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.• १९९८: आदर्श सेन आनंद भारताचे २९ वे सरन्यायाधीश.• २००७: शेख मुस्झाफर शुकोर - पहिले मलेशियन अंतराळवीर बनले.🎂 जन्म :- • १८४४: रा. काँग्रेसचे ३रे अध्यक्ष बद्रुद्दिन तैय्यबजी यांचा जन्म.• १८७१: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९५८)• १८९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९१)• १९०२: कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते के. शिवराम कारंथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ डिसेंबर १९९७)• १९०६: इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २००१)• १९०९: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९९८ – पुणे, महाराष्ट्र)• १९१०: हिंदी-चिनी मैत्रीचे प्रतीक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म.• १९१२: भारतीय कवी आणि समीक्षक राम विलास शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०००)• १९१६: सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लीला मूळगावकर यांचा जन्म.• १९५४: चित्रपट अभिनेत्री रेखा यांचा जन्म.• १९६६: झाई झिगांग - स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती• १९४६: भारतीय मुस्लिम विद्वान सलमान मझिरी यांचा जन्म (मृत्यू : २० जुलै २०२०)• १९१५: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचा जन्म (मृत्यू : ११ मे २००९)• १८९९: भारतीय इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक बलदेव उपाध्याय यांचा जन्म (मृत्यू : १० ऑगस्ट १९९९)🌹 मृत्यू :- • १८९८: अष्टपैलू लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८५८)• १९११: जॅक डॅनियल चे संस्थापक जॅक डॅनियल यांचे निधन.• १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरू दत्त यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९२५)• १९८३: मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना यांचे निधन• २००६: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १९१३)• २००८: कथ्थक नर्तिकारोहिणी भाटे यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)• २०११: गझल गायक जगजित सिंग यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)• २०२२: भारतीय लेखक आणि कथाकार सुब्बू अरुमुगम यांचे निधन (जन्म: १२ जुलै १९२८)• २०२२: उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री मुलामसिंह यादव यांचे निधन (जन्म: २२ नोव्हेंबर १९३९)• २०२१: भारतीय-पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते अब्दुल कादीर खान यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १९३६)• २०१५: भारतीय अभिनेत्री आणि गायिका - पद्मश्री मनोरमा यांचे निधन (जन्म: २६ मे १९३७)• १९९७: भारतात जन्मलेले अमेरिकन सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ मायकेल जेम्स स्टुअर्ट देवर यांचे निधन (जन्म: २४ सप्टेंबर १९१८)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन सुंदर आहे*या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गीत ऐकत असताना मन एका वेगळ्याचं विश्वात जातं. ज्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल त्याला हे जीवन सुंदरच दिसेल............... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत आणि जर्मनी यांचा एकमेंकावर विश्वास, पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे संबंध आणखी मजबूत झाले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात २ नोव्हेंबरला 'पुणे रन फॉर युनिटी' महामॅरेथॉन, सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजन, केंद्रीय मंत्री मोहोळ यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात ई-बस प्रवास होणार अधिक परवडणारा, प्रवाशांसाठी मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर, कवी ललित अधानेंच्या 'माही गोधडी छप्पन भोकी' या कवितासंग्रहाची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, अंतरवाली सराटीत बंद दाराआड चर्चा, भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 15 टक्के वाढ, 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला विश्वचषक- ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 107 धावांनी हरवले, बेथ मुनीने शतक ठोकले, 9 व्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश्वर भुरे, नांदेड 👤 सतिश बोधनकर, धर्माबाद 👤 संतोष खेडकर, शिक्षक, धर्माबाद 👤 ओमेश पांचाळ 👤 वसंत पाटील कदम 👤 विठ्ठल धुळेवार 👤 कैलास सांगवीकर 👤 प्रभू पाटील कदम 👤 शरद गुबे 👤 प्रमोद यादव 👤 तानाजी पाटील 👤 शंकर बत्तीनवार 👤 रामा गायकवाड 👤 विनोद लोणे 👤 रोहित हिवरकर 👤 गंगाधर पपुलवार 👤 सतिश बड्डेवाड 👤 विशाल अन्नमवार, देगलूर 👤 श्याम देसाई *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 96*मी आहे पांढराशुभ्र, पण उन्हात गेलं की मी विरघळतो. मी कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सूप••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. -- एमर्सन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) कोणत्या औषधामुळे मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील १४ बालके दगावली ?३) कोणत्या प्रक्रियेने एखाद्या वस्तूचे वय काढणे शक्य आहे ?४) जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे ?५) प्रसिद्ध फुटाळा तलाव कोठे आहे ? *उत्तरे :-* १) जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट, जॉन मार्टिनिस ( तिन्ही अमेरिका ) २) कोल्डरिफ ३) कार्बन डेटिंग ४) मध्यप्रदेश ५) नागपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *'इस्त्रो' चे कार्य काय ?* 📙 ************************आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्षेत्रांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. जगाच्या बरोबरीने भारताची वाटचाल ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र म्हणजे अंतराळ. चंद्रावर २००८ साली 'मून इम्पॅक्ट प्रोब' तर २०१४ साली पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे मंगळावर 'मंगळयान' पाठविणारा पहिला देश ठरण्यात भारत यशस्वी झालेला आहे. सन १९६२ मध्ये स्थापन झालेल्या 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' अर्थात 'Indian Space Reasearch organisation' (इस्रो) या संस्थेचे प्रमुख प्रवर्तक डॉक्टर विक्रम साराभाई होते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट उपग्रह आणि अग्निबाण यांची निर्मिती करणे, उपग्रह वाहकांची तसेच प्रक्षेपकांची निर्मिती करणे हे आहे. त्रिवेंद्रम जवळील थुंबा येथे भारताचे पहिले अग्निबाण प्रक्षेपण स्थळ कार्यान्वित झाले. भारताने १४ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या भूमीतून 'आर्यभट्ट' हा तीनशे साठ किलो वजनाचा पहिला उपग्रह अंतराळात सोडला आणि अंतराळयुगास प्रारंभ केला. 'भास्कर १' हा प्रायोगिक स्वरूपाचा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ७ जानेवारी १९७९ रोजी अंतराळात सोडण्यात आला. दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून 'इन्सॅट १ए' उपग्रह १० एप्रिल १९८२ रोजी अंतराळात सोडण्यात आला. पण सप्टेंबर १९८२ मध्येच तो निकामी झाला. त्यानंतर 'इन्सॅट १बी', 'इन्सॅट १सी', आयआरएनएसएस इत्यादी उपग्रह सोडण्यात आलेले आहेत. चंद्र आणि मंगळ भारतीयांच्या कवेत आलेलाच आहे आता फक्त वेध आहेत इतर ग्रह ताऱ्यांचे. त्यासाठी इस्त्रो विविध मोहिमांमध्ये गुंतलेली आहे. भूस्थिर उपग्रह पाठवणे किंवा इतर ग्रहांकडे यान पाठवण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची कमतरता भरून काढण्यासाठी LVM3 या अंतराळ वाहकाच्या मोहिमेमध्ये इस्रोचे वैज्ञानिक सध्या गुंतलेले आहेत. रशियाच्या मदतीने २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा हा अंतराळात जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर ठरला. त्याच्या बरोबर दोन रशियन अंतराळवीर सुद्धा होते. अंतराळयान भारतावरून जात असताना त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांचे बरोबर संपर्क साधला आणि विचारणा केली की 'आपको भारत कैसा दिखता है ?' त्यावेळी राकेश शर्मा यांचे उद्गार होते, 'सारे जहाँ से अच्छा'. आज प्रांतवाद, धर्मवाद, जमातवादाची भाषा करणारी, दंगलीच्या माध्यमातून माणसा माणसांतील अंतर वाढवणारी, संघटित आणि प्रस्थापित झालेली व्यक्तिमत्त्वे, आपण सर्व भारतीय म्हणून विचार करणार आहेत की नाही ? हा मुख्य मुद्दा आहे.भारतीय वंशाची परंतु अमेरिकेची नागरिक असलेली कल्पना चावला २००३ मध्ये नासाच्या मदतीने अंतराळात गेली. परंतु १ फेब्रुवारी २००३ मध्ये कोलंबिया यानातून पृथ्वीवर परत येत असताना दुर्घटना घडली. कल्पना चावलासहीत सात अंतराळवीर मृत्युमुखी पडले. अंतराळात जाणे जीवावर सुद्धा बेतू शकते याची प्रचिती या निमित्ताने आली. अमेरिकेने सर्व अंतराळवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशनींना नाव दिलेली आहेत. त्यातीलच एका अशनीचे नाव आहे 'अशनी ५१८२ कल्पना चावला'. भारत सरकारने हवामान संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहाला 'कल्पना १' आणि 'कल्पना २' ही नावे देऊन तिचा उचित सन्मान केला आहे. दिनांक ९ डिसेंबर, २००६ मध्ये भारतीय वंशाची परंतु अमेरिकेच्या नागरिक असलेल्या सुनीता विल्यम्सने अंतराळात जाण्याचा मान पटकावला. अंतराळात जास्त काळ राहणारी (जवळपास १९५ दिवस), बोस्टन मॅरेथॉनमध्ये अंतराळातच भाग घेणारी, अंतराळात जास्त काळ चालणारी महिला, अशा विविध वैशिष्ट्यांनी तिला सन्मानित करण्यात आलेलं आहे. जलद शतक काढणारा, एका षटकात जास्त धावा काढणारा, जास्त धावा देणारा, जास्त षटकार मारणारा, जास्त शतके काढणारा, रटाळ खेळणारा, असल्याच वैशिष्ट्यांचा मारा प्रसार माध्यमांच्याद्वारे सहन करणाऱ्या भारतीय समाजाकडून सुनीता विल्यम्सची वैशिष्ट्ये उपेक्षित राहणे स्वाभाविकच आहे. पहिली भारतीय महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावलाचे नाव बहुतांश वेळेला घेतले जाते. पण कल्पना चावला अथवा सुनीता विल्यम्स या अमेरिकेच्या अंतराळवीर आहेत. कारण त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. पहिली भारतीय महिला अंतराळवीर होण्याचा बहुमान अजून कोणीही पटकावलेला नाही. त्यामुळे शालेय अथवा महाविद्यालयीन युवतींना अजूनही संधी उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी साचेबद्ध शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडून संशोधनात्मक वृत्ती जोपासण्याची गरज आहे. स्थिर विश्वनिर्मितीच्या सिद्धांताचे १९९३ मध्ये फ्रेड हाॅएल, जेफरी बर्बीज आणि डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पुनरुज्जीवन केले आणि नवीन सिद्धांत मांडला 'स्थिरवत स्थितीचे विश्व' या नावाने. पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या 'आयुका' या संशोधन संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांचे खगोल विज्ञानाच्या प्रसारामध्ये आणि संशोधनांमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'चंद्रशेखर मर्यादा' किंवा Chandrashekhar Limit' या नावाने अजरामर झालेल्या अनिवासी भारतीय डॉक्टर एस चंद्रशेखर यांचेही योगदान खगोलविज्ञानामध्ये उल्लेखनीय आहे. श्वेतबटू ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट झाले की तारे आकुंचन पावण्यास सुरुवात होते आणि शेवटी या ताऱ्याचे न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये अथवा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते. यालाच चंद्रशेखर मर्यादा म्हणतात. या त्यांच्या संशोधनाला १९८३ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अशा या भारतीय खगोल वैज्ञानिकांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर मात्र प्रामाणिकपणे इस्रोच्या टीममध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे.*डाॅ. नितीन शिंदे**'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता उठाउठी,होय संसाराची तुटी || धृ ||ऐसा लाभ बांधा गांठीविठ्ठल पायी मिठी || १ ||नामापरते साधन नाहीजें तू करिसी आणिक कांही || २ ||हाकरोनी सांगे तुकानाम घेता राहो नका || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकता किंवा ऐक्य ही एखाद्याचे किंवा समाजाचे हीत ठेवून चांगले करण्यासाठी असेल तर त्याला सत्कर्म म्हणता येईल. पण, हीच एकता वाईट कार्य करण्याच्या हेतूने एकत्र येत असतील तर ते दुष्कृत्य ठरत असते. आजपर्यंत ज्यांनी, ज्यांनी असे दुष्कर्म केले आहेत ते वंदनीय झाले नाही. म्हणून कोणाचे चांगले व्हावे किंवा चांगले झालेले बघून आनंद होत नसेल तर त्या आनंदात सहभागी होऊ नये.पण, त्याचे वाईट करण्याआधी एकदा विचार करून बघावा. कारण जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून घडत असते ती व्यक्ती, स्वंयम प्रकाशित असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ**एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.**तात्पर्य-एकीचे बळ खूप मोठे असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑक्टोबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AJwupQfXR/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९४६: भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Serives, IFS) - सुरवात.• १९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.• १९७०: भारतीय वायू सेना - भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.• २००६: उत्तर कोरिया - देशाने पहिली आण्विक चाचणी घेतली.• २००७: २००८ आर्थिक मंदी - डाऊ जोन्स औद्योगिक सरासरीने १४,१६४पॉइंट्सच्या सर्वकालीन उच्चांक गाठला, त्यानंतर लावकरच २००८ ची आर्थिक मंदी येणार होती.🎂 जन्म :- • १८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)• १९२२: संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)• १९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)• १९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)• १९३५: द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.• १९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.• १९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.• १९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.• १९६८: भारतीय राजकारणी, खासदार अंबुमणी रामदोस यांचा जन्म• १९६६: इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांचा जन्म• १९४५: भारतीय शास्त्रीय सरोद वादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री अमजद अली खान यांचा जन्म• १९२४: भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते इमानुवेल देवेन्द्रर यांचा जन्म (मृत्यू : ११ सप्टेंबर १९५७)• १९०६: सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेघोर यांचा जन्म (मृत्यू : २० डिसेंबर २००१)• १८९७: भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४थे मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचा जन्म (मृत्यू : १३ फेब्रुवारी १९८७)• १८७७: भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी गोपबंधु दास यांचा जन्म (मृत्यू : १७ जून १९२८)• १८७६: भारतीय बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म (मृत्यू : ४ जून १९४७)🌹 मृत्यू :- • १८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)• १९१४: बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)• १९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)• १९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)• १९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.• १९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.• २००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९३४)• २०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)• २०२२: भारतीय कवी आणि लेखक टेमसुला एओ यांचे निधन (जन्म: २५ ऑक्टोबर १९४५)• २०२२: भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार भंवरलाल शर्मा यांचे निधन (जन्म: १७ एप्रिल १९४५)• २०१३: भारतीय अभिनेते श्रीहरी यांचे निधन (जन्म: १५ ऑगस्ट १९६४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार जागृती आवश्यक*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असलेल्या पहिल्या टप्प्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमताl*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात 35 ते 40 टक्के चालकांची कमतरता, चालकांना प्रशिक्षित करण्यासोबतच त्यांच्या संरक्षणासाठी कायदा आणणार - केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरण कर्मचाऱ्यांचा 9 ते 11 ऑक्टोबर असा तीन दिवसीय संप बेकायदेशीर, 'मेस्मा' कायदा लागू, वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पर्यायी यंत्रणा सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा शुल्क होणार माफ, राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींचे जिल्हा सल्लागार समिती बैठकीत निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, दिवाळीसाठी पुणे विभागातून 598 जादा बस गाड्या सोडणार, पिंपरी-चिंचवडमधून प्रथमच विशेष सेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC रँकिंग - भारताचा जसप्रीत बुमराह नंबर 1 कसोटी गोलंदाज, सिराज 12 वा, कुलदीपची 7 स्थानांनी झेप, फलंदाजांत जयस्वालची घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश अशोक धावडे 👤 हणमंत सावंत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 95*पाणी पिऊन पोट भरतं**तरीपण जेवणात दिलं जातं**ते नसे फळ की नसे भाजी**माझी ओळख सांगा पाहू !*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटसमयी तुम्ही हिम्मत ठेवाल तर अर्धी लढाई तुम्ही आधीच जिंकाल. -- फ्लाटस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) जागतिक टपाल दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) MSRTC ची पहिली महिला चालक बनण्याचा मान कोणाला मिळाला ?४) 'रविवार'चे जुने नाव काय होते ?५) भारतीय हवाई दलाची स्थापना केव्हा झाली ? *उत्तरे :-* १) मेरी ई. ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल ( दोन्ही अमेरिका ), शिमोन साकागुची ( जपान ) २) ९ ऑक्टोबर ३) अर्चना आत्राम ४) आदित्यवार ५) ९ ऑक्टोबर १९३१*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिंका का येतात ?* 📙हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।१।।ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ।।२।।नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।३।।जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।४।।तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।५।।बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें बोजा ।।६।।संत बहिणाबाई••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काट्यातून फुलणारा गुलाब बघून आपल्याला खूप आनंद होत असतो. क्षणात आपण आपल्या स्वार्थासाठी त्याला तोडून घेत असतो. तरीही त्या गुलाबाला आपल्या रूपाचा गर्व आणि अभिमान नसतो तसेच तोडणाऱ्याचा सुद्धा त्याला राग येत नाही. पण एखादी व्यक्ती सुंदर असेल तर त्या व्यक्तीला आपल्या सुंदरतेविषयी अफाट घमंड आणि अभिमान असतो. अशा व्यक्तींनी त्या निसर्गाच्या सान्निध्यात व संघर्षातून फुललेल्या गुलाबाकडून शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण सुंदरता कितीही असेल तरी काही वेळात किंवा वयानुसार कमी होत जाते. सुंदर दिसण्यासाठी काही साधनाचा कितीही उपयोग करून सुंदरता तात्पुरतासाठी मिळवता येऊ शकते पण कायमस्वरूपी नाही. म्हणून सुंदरता ठेवायची असेल तर मनाची तसेच विचाराची असायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तर तुमच्या जागी माझे नाव घालीन**एक सौदागर अकबर बादशहाकडे गेला. त्याने नेलेले उत्कृष्ट जातीचे दाहीच्या दाही घोडे बादशहाला अतिशय आवडल्याने, त्याने ते खरेदी केले, आणि तशाच तऱ्हेचे आणखी दहा घोडे आणण्यासाठी त्या सौदागराला दहा हजार रुपये दिले. बिरबल हा प्रकार निमूटपणे पाहत होता. सौदा झाल्यावर तो सौदागर तिथून निघून गेला आणि अकबर व बिरबल यांच्यात इतर गप्पागोष्टी सुरु झाल्या. गप्पांच्या ओघात दिल्लीच्या एका मूर्ख माणसाच्या मुर्खपणाचा विषय निघाला असता बादशहा म्हणाला, 'बिरबल, आपल्या राज्यातल्या अशा वेचक मुर्ख माणसांची यादी तुला सवडीप्रमाणे करुन ठेवता येणे शक्य आहे का ?'**बिरबल म्हणाला, 'का नाही तयार करता येणार ? अवश्य येईल. त्यातून मी तर म्हणतो अशा म्हत्त्वाच्या गोष्टीला विलंब कशाला लावायचा ? मी आत्ताच त्या कामाला हात घालतो.' असं म्हणून व एक कागद व लेखणी घेऊन बिरबलानं विचार करुन सुचतील ती विस पंचवीस नावं लिहून काढली. उत्कंठेपोटी बादशहानं ती यादी पाहिली असता, त्याला आपले नाव पहिल्या क्रमांकावर झळकत असल्याचे दिसले. रागानं लालबूंद होऊन बादशहानं विचारलं, 'बिरबल, या मुर्खांच्या यादीत माझं नाव आणि तेही पहिल्या क्रमांकावर लिहिण्याचं काय कारण ?'**बिरबल म्हणाला, 'तो घोडे विकायला आलेला सौदागर कोण, कुठुन आला, त्याचं नाव व पत्ता काय, त्याला इथे ओळखणारे कुणी आहे की नाही, यापैकी कशाकशाचीही चौकशी न करता, त्याला आपण आणखी दहा घोडे आणून देण्यासाठी दहा हजार रुपये दिलेत, म्हणून या यादीत मानाचं पहिलं स्थान आपल्याला दिलंय.' या उत्तरानं खजील झालेल्या अकबरानं विचारलं, 'पण असं समज, की त्याने दहा घोडे मला आणून दिले तर ?'**बिरबल म्हणाला, ' ती शक्यता नाही खाविंद. त्यातूनही त्याने ते आणून दिलेच, तर या यादीतील आपलं नाव खोडून, त्या जागी मी माझं नाव लिहिन.'*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 ऑक्टोबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CHQkmHHUf/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.• १९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.• २००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.🎂 जन्म :- • १८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)• १९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)• १९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)• १९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १८८८: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)• १९३६: हिन्दी साहित्यिक धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ मुन्शी प्रेमचंद यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८०)• १९७९: स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९०२)• १९९८: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा इंदिराबाई हळबे ऊर्फ मावशी यांचे निधन.• २०१२: केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९२५)• २०१२: पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन.• २०२२: भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते अवतार सिंग जौहल यांचे निधन (जन्म: २ नोव्हेंबर १९३७)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरज तेथे मदत करा* ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत ; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ऐतिहासिक वारसा जपा! स्मारके, समाधीस्थळांचे संवर्धन करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश; संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा पुनर्विकास*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पोलिसांच्या गणवेशात लवकरच महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दगडूशेठ ट्रस्टकडून पूरग्रस्तांना 1 कोटींची मदत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द, अनेक संस्थांकडूनही लाखोंची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच, नाशिक, जळगावसह अनेक जिल्ह्यांत नवीन कलेक्टर; सात जिल्हाधिकाऱ्यांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती, म्हणाले - एसटीला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाची 24,634 कोटींच्या 4 नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी, वर्धा-भुसावळ दरम्यान तिसरी-चौथी लाईन टाकली जाईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगदीश पाटील कळसकर👤 साईनाथ पोतलोड, येवती 👤 शांतीलाल कुमावत 👤 सारिका गांधी 👤 कैलास बागले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 94*असे कोण आहे, ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महाल नाही, आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया देखील नाही तरी तो राजा आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चंद्र ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लक्ष्याशिवाय मार्ग नाही, ध्येयाशिवाय जीवन नाही. -- शुची*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'भारतीय वायुसेना दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे ?३) 'शेष भारत' संघाचा पराभव करून विदर्भाने कितव्यांदा 'इराणी चषका'वर आपले नाव कोरले ?४) केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत ?५) मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ? *उत्तरे :-* १) ८ ऑक्टोबर २) सनाए ताकाईच ३) तिसऱ्यांदा ४) ज्ञानेश कुमार ५) मिलिंद जोशी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 वेधशाळा 📙वेधशाळांची बांधणी, वापर, जागा यांत गेली काही शतके सतत बदल होत आहेत. सध्या आकाशाचा वेध घेण्यासाठी विविध साधने वापरली जातात. त्यामुळे पारंपरिक वेधशाळा जशी शक्यतो उंच डोंगरावर, कोरड्या हवामानात, गजबजाटापासून दूर असायची, तशी आताची परिस्थिती राहिलेली नाही.आकाश वा अवकाशाचा वेध घेण्यासाठी पृथ्वीतलावरून मुख्यत: दोन प्रकारचे निरीक्षण चालते. एक म्हणजे डोळे व दुर्बिणीसारखी साधने वापरून चालणारे निरीक्षण व दुसरे म्हणजे रेडिओलहरींद्वारे केले जाणारे निरीक्षण. दोन्ही निरीक्षणांमध्ये एक साम्य मात्र आहे. जास्तीत जास्त मोठा आकार व विस्तार असलेली साधने वापरण्याची चढाओढ दोन्ही निरीक्षणांत चालते.दृश्य प्रकाशाने केल्या जाणाऱ्या निरीक्षणात विविध आकारांच्या दुर्बिणी वापरल्या जातात. अगदी हातभर लांबीच्या व दोन इंच व्यासाच्या दुर्बिणीपासून दहा ते बारा फूट व्यासाचा रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपपर्यंत साधने आज वापरली जातात. या अवाढव्य किंवा अतिलांब टेलिस्कोपची मांडणी एखाद्या उंच इमारतीच्या घुमटामध्ये केलेली असते. रात्री या घुमटातील खिडक्यांतून आकाशाचा वेध घेतला जातो. काही वेळा ही सर्व घुमटाची रचनाच सभोवताली फिरविण्याची व्यवस्था केलेली असते. रात्रीच्या वेळी प्रथम या घुमटातील अंधारात डोळे सरावल्यानंतरच आकाशनिरीक्षण सुरू केले जाते. हा सारा प्रकार क्वचित एखाद्या दिवशी मजा म्हणून करणाऱ्याला गमतीचा वाटत असेल; पण अंधाऱया रात्री उंच जागेवर वाहणारे झोंबणारे वारे, थंडी व तासनतास चिकाटीने केले जाणारे निरीक्षण यामध्ये मात्र गेल्या पन्नास वर्षात विशेष बदल घडत गेले आहेत. निरीक्षणाची जागा काही ठिकाणी कॉम्प्युटरनियंत्रित असते. यामुळे वातानुकूलित खोलीत बसून निरीक्षणाचे सर्व नियंत्रण व नोंदीकरण करणेही शक्य होते. अर्थातच हौशी खगोलशास्त्रज्ञांना या सुखसोयी आजही उपलब्ध नाहीत. त्यांचीच संख्या जगभर फार मोठी असावी.रेडिओलहरींद्वारे केल्या जाणाऱ्या निरीक्षण प्रकाराच्या वेधशाळा या मुख्यतः साखळी प्रकारात किंवा एकाच मोठ्या तबकडीद्वारे काम करतात. साखळी प्रकाराची वेधशाळा ही अनेक सलग ताबकड्यांचा वापर करते. विविध रेडिओलहरी पकडून त्यांचे सतत विश्लेषण करून त्यावर अवकाशातील ताऱ्यांच्या आणि आकाशगंगांच्या घडणाऱ्या घडामोडी व नवीन वस्तूंचा शोध घेणे खगोलशास्त्रज्ञ चालू ठेवतात. जॉड्रेल बँक वेधशाळा व पुण्याजवळील खोडद येथील प्रकल्प हे या प्रकारचे जगातील मोठे प्रकल्प आहेत. या प्रकारात ढगांचा, वातावरणाचा, उजेडाचा कसलाही अडथळा येत नाही. दिवसा व पावसाळी हवेतही वेध घेणे चालू राहते. या वेधशाळा सोयीच्या जागी उभारता येतात. अर्थातच तेथे खूप खगोलशास्त्रज्ञ सोयीनुसार काम करू शकतात.हवाई बेटावरील निद्रिस्त ज्वालामुखी मॉनाकिया शिखरांवरील, अमेरिकेतील किट पिरू अॅरिझोना येथे, दक्षिण ऑस्ट्रेलियामधील वेल्स, दक्षिण अमेरिकेत चिली देशात सेरो टोलोलोतील पारंपरिक वेधशाळा महत्त्वाचे काम बजावतात. सध्याचा काळ उपग्रहांचा आहे. वातावरणाचा अडथळा दूर करून उंच उपग्रहावरच एखादी वेधशाळा असली, तर उत्तम, या विचाराने अनेक प्रयोग झाले आहेत. त्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रयोग म्हणजे हबल टेलिस्कोपचा. हबल टेलिस्कोप १९९० साली कक्षेत पाठविल्यापासूनच शास्त्रज्ञांच्या अपेक्षा खूप वाढल्या. मात्र त्याचा प्रमुख आरसा योग्य प्रकारे ग्राइंड झाला नव्हता. त्यामुळे तो नीट काम करीत नव्हता. डिसेंबर १९९३ मध्ये स्पेस शटल एंडेव्हर मिशन एस टी एस ६१ मधील अंतराळवीरांनी अंतराळातच त्याची दुरुस्ती केली. नंतर २००२ पर्यंत अशा तीन मोहिमा झाल्या. आता अव्वल टेलिस्कोप मूळ योजनेपेक्षा अधिक कार्यक्षमतेने अंतराळाचे निरीक्षण करतो आहे. त्यातून मूल्यवान माहिती पृथ्वीकडे पाठवतो आहे. तसेच जेव्हा ग्रहणांचा वेध घ्यायचा असतो. तेव्हा ग्रहणकाळ एका जागी निरीक्षण केल्यास मोजकाच उपलब्ध होतो. म्हणून वेगवान विमानातून या स्वरूपाची निरीक्षणे केली जातात. सलग केल्या जाणाऱ्या छायाचित्रण पद्धतीने काही निर्मनुष्य प्रकारची वेधशाळाकेंद्रेही हल्ली वापरात आणली जातात.येत्या काळात अंतराळातूनच म्हणजे विविध अंतराळस्थानकांतून खगोल निरीक्षण करणार्या वेधशाळा अस्तित्वात येतील, असे वाटते. पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचा अडथळा टाळून हे निरीक्षण जास्त कार्यक्षमपणे होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. कदाचित या वेधशाळेतील सतत केल्या जाणाऱ्या नोंदी चित्रफितीद्वारे पृथ्वीवरील केंद्रात प्रक्षेपित केल्या जाऊन त्यांच्याविषयी निष्कर्ष काढले जातील; कारण दरवेळी नोंदी करण्यासाठी तज्ज्ञ तेथे उपलब्ध असेल हजार असेल, असेही नाही. पण क्ष-किरण, इन्फ्रारेड, अल्ट्रावॉयोलेट व गॅमारेजच्या वेधशाळा पृथ्वीतलावर असू शकत नाहीत. बाह्य प्रकाश पृथ्वीतलावर येताना शोषला जातो. म्हणूनच या वेधशाळांचे महत्त्व आहे. वेधशाळेच्या बाबतीत एक गोष्ट आजही महत्त्वाची आहे. यंत्रापेक्षा यंत्रामागे काम करणारे डोळे व मेंदू हे अधिक महत्त्वाचे असतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वनमाळी वनमाळी वनमाळीराधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ ||साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ ||एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हवा अंगाला स्पर्शून जातो आणि त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. तरीही आपण त्याला बघू शकत नाही. कारण त्याला बघण्यासाठी आपल्याकडे तशी दूरदृष्टी नसते. तसंच समोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात किती आदर, सन्मान आहे हे जाणून न घेता कोणाच्या सांगण्यावरून त्याचा अपमान करणे आपल्याला सहजपणे जमत असते.ही आजची वास्तविकता आहे. जसं वाऱ्याला बघण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी नसते तशीच दूरदृष्टी त्या व्यक्तीला जाणून घेण्याची नसते.हीच कमतरता आपल्यातील काही गुणांचा अंत करत असते. म्हणून जीवन जगत असताना आपल्यातही तेवढीच सत्यात ठेवणे गरजेचे आहे कारण, सत्याच्या वाटेवर चालणारी व्यक्ती कोणाचाही अपमान करत नाही हेच त्याच्यात महत्वाचे गुण असते🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरुंची शिष्याला साधनेत पुढे नेण्याची तळमळ* ━━━━━━━━━*एक शिष्य गुरूंनी त्याला दिलेली सेवा विनम्रपणे आणि सेवाभावाने आज्ञापालन म्हणून करत असतो. त्यामुळे गुरु त्या शिष्याला स्वतःचा उत्तराधिकारी नेमतात. या नवीन सेवेतही त्याची सेवेची तळमळ आणि सेवाभाव पूर्वीसारखाच असतो.* *काही कालावधीनंतर दुसरा एक कुशाग्र बुद्धीचा युवक या गुरूंचे शिष्यत्व पत्करतो आणि अल्प कालावधीतच तो गुरूंचे मन जिंकतो. त्याच्या बुद्धीला चालना मिळावी; म्हणून गुरु उत्तराधिकारपदी असलेल्या पूर्वीच्या शिष्याला स्वयंपाकगृहातील सेवेचे दायित्व देतात आणि या नवीन शिष्याला त्यांचे उत्तराधिकारी नेमतात. तरीही पूर्वीच्या शिष्याच्या मनात कोणताही विकल्प न येता तो दिलेली सेवा गुरूंना आवडेल, अशी करत असतो.* *काही दिवसांनतर उत्तराधिकारी केलेल्या शिष्याचा अहंकार वाढतो. परिणामी सहसाधक त्याच्या ऐवजी स्वयंपाकगृहात सेवा करणाऱ्या त्या पूर्वीच्या शिष्याकडून शंकांचे निरसन करून घेऊ लागले. हे पाहून त्या उत्तराधिकारी शिष्याच्या मनात पहिल्या शिष्याविषयी द्वेषभावना निर्माण होते.* *एक दिवस तो गुरूंकडे जाऊन ती द्वेषभावना व्यक्त करतो. त्या वेळी गुरु त्याला म्हणाले, त्या शिष्याला मी उत्तराधिकारीपदावरून काढून ते तुला दिले; कारण मला तुला यातून शिकवायचे होते, सेवा कोणती करतो, यापेक्षा गुर्वाज्ञा शिरसावंद्य मानून जो भावपूर्ण सेवा करतो, तोच गुरूंचे ख-या अर्थाने मन जिंकू शकतो. आजपासून तू आता स्वयंपाकघरात सेवेला असणार आणि तो शिष्य माझा उत्तराधिकारी असेल.* *यानंतर काही दिवसांनी हा दुसरा शिष्य गुरूंना घरी जाण्याची अनुमती मागतो. तेव्हा श्रीगुरु शांत रहातात. त्यांना या शिष्याने या काळात घरी जाणे अपेक्षित नसते; परंतु हा शिष्य गुरूंची अनुमती नसतांनाही घरी जातो. बऱ्याच काळानंतर तो परत येतो आणि गुरूंसमोर उभा राहतो. त्या वेळी गुरूंच्या डोळ्यांत पाणी येते आणि ते त्याच्याकडे केवळ पहातात; पण दुसऱ्याच क्षणी कठोरपणे त्यांच्या उत्तराधिकारी शिष्याला आज्ञा देतात याच्यासाठी आश्रमाचे दरवाजे बंद झाले आहेत. याने येथून चालते व्हावे.* *काही वेळाने उत्तराधिकारी शिष्य न रहावून गुरूंना विचारतो की, आपण त्या शिष्याला एवढा कठोर निर्णय दिला; पण आपले नेत्र का पाणावले होते ? त्यावर गुरु सांगतात, त्याची साधनेत पुढे जाण्याची पुष्कळ क्षमता होती; पण तो घरी गेला आणि वाईट संगतीमुळे साधनेचे सर्व वैभव गमावून आज भिकारी होऊन आला. ही गोष्ट वाचल्यावर माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑक्टोबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Hy19ofyyY/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९१९: महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले.• १९१९: के. एल. एम. (KLM) या विमान कंपनीची स्थापना झाली.• १९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.• १९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.• १९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू🎂 जन्म :- • १८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)• १९०७: गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागजी डोस्सा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)• १९१४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)• १९१७: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे २०१० – पुणे)• १९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे यांचा जन्म.• १९७८: भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १६६६)• १९७५: कन्नड कवी व विचारवंत देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९ – मुळबागल, कोलार, कर्नाटक)• १९९८: महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे निधन.• १९९९: साहित्यिक, वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोमरे यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ – अहमदनगर)• १९९२: भारतीय उद्योगपती आणि राजकारणी बाबू करम सिंग बल यांचे निधन• २०२२: भारतीय अभिनेते अरुण बाली यांचे निधन (जन्म: २३ डिसेंबर १९४२)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पर्यटकांनी जबाबदारीने वागावे*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ठाणे : उलवे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आमदारांच्या खर्चाला चाप, विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द ; सचिवालयाकडून आदेश जारी, अतिवृष्टीचे कारण केले पुढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकजवळ साकारणार भव्य चित्रपटनगरी, इगतपुरी येथे गोरेगावच्या धर्तीवर चित्रपट सृष्टी उभारणार, अजित पवारांच्या बैठकीत छगन भुजबळांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर, 17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 04 जानेवारी2026 रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल; 40 दिवसांत निवडणूक प्रक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाची अभिमानास्पद कामगिरी, विश्व कपच्या स्पर्धेत पाकिस्तानला 88 धावाने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दीपाली सावंत, उपक्रमशील शिक्षिका 👤 दत्तात्रय देवकत्ते👤 साईनाथ सावंत 👤 योगेश गाडे👤 सुदर्शन कदम 👤 सायारेड्डी चाकरोड 👤 रवींद्र शेळके 👤 अभिषेक निकम *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 93*रात्री येतो चांदीचा गोळा**ताऱ्यांबरोबर करतो खेळा**सूर्य गेला की मीच राजा**सांगा पाहू मी कोण भला ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बंदूक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्याजवळ धैर्य आहे व जो मेहनत करायला घाबरत नाही, अशा हिम्मतवानाची सफलता दासी असते.-- दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**जि. प. प्रा. शाळा झरी ता. लोहा जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तृतीयपंथीय समुदायाच्या सबलीकरणासाठी देशातील पहिले रेशन दुकान कोठे सुरू होत आहे ?२) भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानुने नार्वेच्या फोडे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले ?३) कोणत्या मोसमी वाऱ्यांमुळे भारतात ८५% पाऊस पडतो ?४) कृत्रिम दात बनविण्यासाठी कोणत्या प्लास्टिकचा वापर करतात ?५) चितगाव बंदर कोणत्या देशात आहे ? *उत्तरे :-* १) कोल्हापूर २) रौप्यपदक ३) नैऋत्य ४) ॲक्रेलिक रेझिन ५) बांगलादेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 विषुववृत्त 📙 पृथ्वीचा अप्रतिम फोटो (उपग्रहातून काढलेला) एका कार्यक्रमात स्लाइड प्रोजेक्टरमधून दाखवला गेला. ते विलोभनीय दृश्य पाहून अनेकजण भारावून गेले होते. निरनिराळ्या छटांतून फोटोमधील काय भाग व्यक्त होतो, याचे यथार्थ वर्णनही केले जात होते. एवढ्यात एकाने उठून शंका विचारली, "फोटो छानच आहे, पण त्यावर व विषुववृत्त - ते कुठे कसे दिसत नाही ? अक्षांश व रेखांश यांच्याशिवाय ही पृथ्वी कशी म्हणायची ?"प्रत्येकाच्या मनातील पृथ्वीची आकृती व पृथ्वीचा गोल हा असा ठसलेला असतो. पृथ्वीवर प्रत्यक्षात अक्षांश, रेखांश वा वृत्ते नाहीतच, तर त्या काल्पनिक रेषा आहेत, हे लक्षातच राहत नाही. अशीच काही फसगत बोटीवरून प्रथम विषुववृत्त ओलांडणाऱ्यांची होते. प्रत्येक बोटीवर विषुववृत्त ओलांडण्याचा एक सोहळा अावर्जून पार पाडला जातो. पृथ्वीच्या एका गोलार्धातून दुसऱ्या गोलार्धात जाणे हे जरा कौतुकाचेच नाही काय ? निदान पुर्वी तरी तसे समजले जायचे. डेकवर सगळे जमून जेव्हा विषुववृत्त 'पार' करतात - म्हणजे नेव्हिगेटर तसे सांगतो - तेव्हा हा सोहळा साजरा केला जातो. नव्याने बोटीवर आलेला कॅडेट मात्र डोळे फाडफाडून विषुववृत्ताची रेषा शोधायचा व या सोहळ्याचा संदर्भ सापडायचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पुढच्या खेपेला मात्र तो नवीन दाखल झालेल्या कॅडेटला विषुववृत्त पार करायच्या सोहळ्याचे वर्णन आधीपासून सांगू लागतो.तर असे हे विषुववृत्त म्हणजे पृथ्वीची मध्यभागी बरोबर दक्षिण व उत्तर गोलार्धात फोड करणारी काल्पनिक रेषा आहे. विषुववृत्तावर पृथ्वीचा परीघ ४०,०७७ किलोमीटर भरतो. मुख्यतः २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तर या दोन तारखांच्या दरम्यान जवळपासच असतो. त्यामुळे या प्रदेशात तापमान नेहमीच चांगले उष्ण असते. अनेक विषुववृत्तीय प्रदेशात दुपारी भरपूर हवा तापत जाते व सायंकाळच्या वेळी एखादी पावसाची सर येऊन हवेत गारवा येतो. भरपूर ऊन, भरपूर पाऊस यामुळे सर्व विषववृत्तीय प्रदेश दाट जंगलांनी भरलेला आहे.विषुववृत्ताची आठवण विमानातून पृथ्वी प्रदक्षिणेचे उच्चांक करायला जाणाऱ्यांनाही हमखास होत असते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तो हा भक्तांचे तोडरीं । वाचे उच्चारितां हरी ॥१॥काम होऊनि निष्काम । काम भावभक्ति प्रेम ॥२॥तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥३॥काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥४॥संत जनाबाई ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गंमत बघणारे आणि गंमत करणाऱ्यामध्ये खूप फरक असतो. कारण गंमत करणारा कधी काळी दु:खात असणाऱ्या व्यक्तीला कसं हसवता येईल या प्रयत्नात असतो आणि गंमत बघणारा व्यक्ती, एखाद्याचे वाटोळे कधी होईल आणि ते सर्व होताना बघून आनंद कशाप्रकारे घेता येईल याची वाट बघत असतो. अशा विचारसरणीमुळे अनेकांची वाट लागत असते म्हणून कोणाला हसवता येत नसेल तर कोणाची गंमत बघण्यात आनंद घेऊ नये.आपली कधी, कोण गंमत बघणार आहे ती वेळ कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *थोडं-फार येतं* ━━━━━━━━━*आधी न कळवता आजारी बिरबलाला पाहण्यासाठी अचानक बादशहा त्याच्या घरी गेला. घरापुढील अंगणात प्रवेश करता-करता, बिरबलच्या तिथेच खेळत असलेल्या दहा-बारा वर्षांच्या मुलीस बादशहाने उर्दूत विचारले, ''बेटी, तुझे वडील घरात आहेत का ?'' बादशहाच्या याच नाही, तर आणखी दोन-तीन उर्दूत विचारलेल्या प्रश्नांना बिरबलच्या त्या चुणचुणीत मुलीने अगदी योग्य अशी समर्पक उत्तरे उर्दूतूनच दिली. *ती उत्तरं ऐकून त्याने तिला विचारले, ''बेटी, तुला उर्दू बोलता येतं वाटतं?''**त्यावर बिरबल कन्या म्हणाली, ''थोडं-फार येतं.''**तेव्हा बादशहानं विचारलं*, *''थोडं-फार म्हणजे किती?''**यावर बिरबलाची मुलगी म्हणाली, ''महाराज, ज्यांना उर्दू फार येतं त्यांच्याशी तुलना केली तर मला 'थोडं, येतं आणि ज्या लोकांना ते अगदीच 'थोडं' येतं, त्यांच्याशी तुलना केली तर, मला ते फार येतं.'' बापाचे चातुर्य बेटीतही सहीसही उतरलेले पाहून* *बादशहाने कौतुकाने तिची पाठ थोपटली.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑक्टोबर 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1DUqigpKCn/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.• १९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.• १९४०: ब्रेनर पास येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.• १९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.• १९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.• १९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.• १९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.• २००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.🎂 जन्म :- • १८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)• १९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)• १९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.• १९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.• १९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)• १९९७: भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत यांचा जन्म• १९६१: जपानी लेखक आणि चित्रकार, युगीओहचे निर्माते काझुकी ताकाहाशी यांचा जन्म (मृत्यू : ४ जुलै २०२२)• १९४५: भारतीय राजकारणी, खासदार सेदापट्टी मुथिया यांचा जन्म (मृत्यू : २१ सप्टेंबर २०२२)🌹 मृत्यू :- • १८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)• १९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)• १९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)• १९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)• १९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)• १९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)• १९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)• १९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.• २००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.• २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४)• २०२२: भारतीय लेखक शेखर जोशी यांचे निधन (जन्म: १० सप्टेंबर १९३२)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ठेविले अनंते तैसेचि राहावे*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रीमंडळाने देशभरात 57 नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे एकूण 142 केंद्रीय विद्यालये कार्यरत होतील.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्याने लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत 13 ऑक्टोबरला, नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी होणार जाहीर, दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात बालविवाहाच्या घटनांमध्ये 6 पट वाढ, आसाममध्ये सर्वाधिक प्रकरणे; 16,000 हून अधिक मुलींचे लग्नासाठी अपहरण झाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रातील तीन विमानतळांची नावे बदलली, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी मालिकेत केएल राहुल, ध्रुव जुरेल व रवींद्र जडेजाचे धमाकेदार शतक, भारताकडे 248 धावाची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संगीता भांडवले, शिक्षिका व लेखिका, धाराशीव 👤 सुरेंद्र माणिकराव गाडेकर 👤 विजय पळशीकर 👤 ओमप्रकाश येवतीवाड👤 लक्ष्मण पंढोरे 👤 साईनाथ पोरडवार 👤 धनराज शेट्टीवार 👤 साई पांचाळ *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 91*बारीक असते लांब पण असते**तरीही मी काठी नाही**दोन तोंडे आहेत मला, तरीही मी गांडूळ नाही**श्वास घेते मी पण तुम्ही नाही**ओळखा पाहू मी आहे तरी कोण…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात. प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. -- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) '२०२५ वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉईस अवार्ड'साठी जगातील कोणत्या शाळेची निवड झाली ?२) ब्रिटनस्थित 'टी4 एज्युकेशन संस्थे'ने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट शाळा जालिंदरनगर जि. पुणे या शाळेचे मुख्याध्यापक कोण ?३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली ?४) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षात किती सरसंघचालक लाभले ?५) राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? *उत्तरे :-* १) जि. प. प्राथ. शाळा जालिंदरनगर ता. खेड, जि.पुणे २) दत्तात्रय वारे गुरुजी ३) २७ सप्टेंबर १९२५ ४) सहा ५) ६ वर्षे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *दूरचित्रवाणी (Television)* 📙**************************दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला. नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते. दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो. टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो. टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ ||जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ ||चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ ||झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ ||आता राऊळासी जाता, झाली जीवाची मुक्तता || ४ ||विष्णुदास नामा म्हणे, आता नाही येणे जाणे || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखात असतात कोणाची आठवण येत नाही. आणि दु:खात असताना मात्र आपल्या माणसांची पदोपदी आठवण येत असते. कारण त्यावेळी सुख महत्वाचे वाटत नाही तर आपल्या माणसांच्या साथीची आवश्यकता वाटत असते म्हणून सुखात असो किंवा दु:खात आपल्या माणसांना कधीच विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हा बंधारा मदनात आला. या पोतलीचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा गठ्ठा दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समूहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/GgeQRfsgyQ18yrKVK0a44a?mode=ems_copy_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.• १७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.• १९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.• १९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.• १९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.• १९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.• १९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.🎂 जन्म :- • १९०३: हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)• १९०७: निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)• १९१४: टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)• १९४९: चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९५९: विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९०९)• १९९५: भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन. (जन्म: २६ जुन १९०६)• १९९९: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२१)• २००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.• २००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म: ८ जून १९३०)• २०१२: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२६)• २०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)• २०२२: भारतीय राजकारणी, गोव्याचे आमदार पांडुरंग राऊत यांचे निधन (जन्म: १३ जुलै १९४६)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले शिक्षण आत्मविश्वास वाढवते. ते आपल्याला स्वप्न पाहण्याची शक्ती देते आणि ती स्वप्ने साध्य करण्याचे धाडस देते. ते आपल्याला भविष्याला तोंड देण्यासाठी आणि मजबूत, स्वतंत्र व्यक्ती बनण्यासाठी तयार करते. शिक्षणाविषयी अजून माहिती वाचण्यासाठी nasayeotikar ह्या नावाने google search करावे आणि वाचनाचा आनंद घ्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर - डॉ. हेडगेवार आणि बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आश्चर्यकारक साम्य, RSS च्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोल्हापुरातील शाही दसरा मेळावा प्रमुख मान्यवर उपस्थित संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशातच आता ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या नव्या उन्नत (एलिव्हेटेड) रस्त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे जिल्ह्यात मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारत ‘अ’ संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा 171 धावांनी केला पराभव, ज्यामध्ये श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य यांच्या शतकांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ 162 धावावर सर्व बाद तर भारताने दोन गडी च्या मोबदल्यात 121 धावा केल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ राचेवाड, तंत्रस्नेही शिक्षक, बिलोली 👤 विश्वनाथ अरगुलवार, धर्माबाद 👤 नागनाथ लाड 👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागेश क्यातमवार, तंत्रस्नेही शिक्षक, हिमायतनगर 👤 शंकर दरंगे👤 मारोती नरवाडे 👤 पांडुरंग यलमलवाड 👤 संदीप कडलग👤 सचिन लाडे, विशेष शिक्षक, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 90*चार खंडांचा एक शहर**चार विहीरी बीना पानी**18 चोर त्या शहरी 1 राणी**आला 1 शिपाई**सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पेन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयाने व्याप्त असणारे या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणाने राहू शकतो.- भगवान बुद्ध*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गुजरात राज्यातील एकूण जिल्हे किती ?२) गुजरात राज्याची राज्यभाषा कोणती ?३) गुजरात राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?४) गुजरात राज्यातील सर्वात लांब नदी कोणती ?५) गुजरात राज्यातील नृत्य प्रकार कोणता ? *उत्तरे :-* १) ३४ जिल्हे २) गुजराती ३) गिरनार ४) नर्मदा ५) गरबा, दांडिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंनेवस्तु अमोलिक दी मेरे सतगुरुवस्तु अमोलिक दी मेरे सतगुरुकृपा कर अपनायोपायो जी मैंने कृपा कर अपनायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन पायोजन्म जन्म की पूंजी पाईजन्म जन्म की पूंजी पाईजग में सबी खुमायोपायो जी मैंने जग में सबी खुमायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन खर्च ना खूटे चोर ना लूटेखर्च ना खूटे चोर ना लूटेदिन दिन बढ़त सवायोपायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायोपायो जी मैंने राम रतन धन पायोपायो जी मैंने राम रतन धन पायोसत की नाव खेवटिया सतगुरुसत की नाव खेवटिया सतगुरुभवसागर तऱयायोपायो जी मैंने भवसागर तऱयायोपायो जी मैंने राम रतन धन पायो मीरा के प्रभु गिरिधर नागरमीरा के प्रभु गिरिधर नागरहर्क हर्क जस गायोपायो जी मैंने हर्क हर्क जस गायोपायो जी मैंने राम रतन धन पायो••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष करावाच लागतो. कारण संघर्ष हे मानवाच्या जन्मतापासून असते. आणि याच संघर्षाला आपला गुरु मानून जे जगतात त्यांचे जगणे इतरांपेक्षा वेगळे असते. सर्वच जर सहजपणे मिळाले तर त्याचे फारसं महत्व राहत नाही पण, संघर्षाच्या वाटेवर चालत मिळालेले असते.त्याचे महत्व कधीच कमी होत नाही. म्हणून जीवन जगत असताना संघर्षाला कधीही घाबरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अधिक चतुर**बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले.**पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण ?**बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.**पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?**बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.* *बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)