कथा क्रमांक ११४

*देवाचा मित्र*

एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्‍नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्‍य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्‍ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्‍य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.
*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? म्हणून "शीवभावे जीवसेवा "करा.व देवाचा मित्र व्हा*."जे का रंजले गांजले -त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधु ओळखावा -देव तेथेची जाणावा" ||

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖
 🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*राष्ट्रसंतानी  समाजातील दोष घालवून राष्ट्रीयता निर्माण केली . स्वतःच्या आचारांतून,  विचारांतून व उच्चारांतून जनतेला प्रखर राष्ट्रनिष्ठेचे धडे घालून दिले.*

    *त्यांच्या  शिकवणीतील तत्त्वे अनादी व अनंत होती. कालप्रवाहात समाज बदलतो; पण सत्य , नीती , मानवता, कर्मयोग , प्रेम , बंधुभाव , दीनदुबळ्यांची सेवा ही संतांची तत्त्वे ञिकालबाधीत व अविनाशी राहतात.असे हे संत म्हणजे खरोखरच समाजाचे सच्चे मार्गदर्शक आहेत. 🙏🙏 त्यांचा  हा विचारांचा सहवास ईश्वरप्राप्तीपेक्षा अधीक मोलाचा आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कविता

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    ☘☘ *कविता*  ☘☘
     *📒सावित्री मी📔*

*ज्योतिबांचे बोल  मनात परसा*

*जीवाचा आरसा   सावित्री मी l*

*मानवाचे नाते  ओळखती जे*
*सावित्री वदती  तेच संत ll*

*करी दुबळ्यांच्या  संसारी मदत l*

*हीच रितभात  ज्याची असेll*

*अज्ञानी लोकांना   करी ज्ञानदान l*

*मुलांना विद्वान   करीत से ll*
 *स्वार्थ नाही काही  सेवेत रमती l*

*तयांस वंदिती   सर्व लोक  ll*

*विद्याहीन पशू सारे  मानव भोक्ता विद्देचा l*

*विद्या नसे मानव ज्या*

*तो जंगली पशू साचा ll*

📔📒  *- सावित्रीबाई फुले*
🌻☘🌻☘🌻☘🌻🌻
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 🙏 *शब्दांकन /संकलन*🙏
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जी.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.

माझी शाळा माझा उपक्रम जयंती सावित्रीमायीची

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *🙏सस्नेह नमस्कार🙏*
📗📕📒📔📘📙📗📒
*आज दि.३ जानेवारी २०१७ क्रांतीज्योती , ज्ञानज्योती💡 सावित्रीबाई फुले यांची (१८५) वी जयंती अतिशय उत्साही वातावरणात जि.प.प्रा.शा.वाटेगाव  ता.हदगाव जि.नांदेड येथे साजरी करण्यात आली. सकाळी प्रतिकात्मक महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेतअनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आल्या. त्यानंतर गावातून प्रभात फेरी ढोल-ताशा सह मोठ्या आनंदाने  काढण्यात आली.*

*यानंतर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन🌻🌻🙏 केंद्राचे कें. प्र.👉मा.श्री जाधव साहेब व शाळेचे 👉मा.मु.अ.श्री चव्हाण  सर व शाळेतील आम्ही सर्व  शिक्षकवृंद  यांच्या हस्ते करण्यात आले.🌻🌼🌹🌺🌻🌹यानंतर लेक वाचवा-लेक शिकवा ,मुलींचे 👩‍👩‍👦‍👦 ‍👩शिक्षण , प्रगतीचे लक्षण , देशाचे रक्षण या विषयावरती इयत्ता पहिली ते सातवी चा काही विद्यार्थ्यांनिंचे 👫👭👫👭👫 🎤🎤🎤🎤भाषणे झाली व मायीचा जीवनावर आधारित गीते🎤🎤 विद्यार्थ्यानिंनी  म्हटली.त्यानंतर  सावित्रीबाई फुले जीवन चरित्र 🙏📒📗विद्यार्थ्यांना शिक्षकवृंदाचा माध्यमातून मार्गदर्शनपर लाभले.तसेच शाळेतील बदली होऊन गेलेल्या 👉निरोपमुर्ती सौ.बोगरे (पाटील) मँडम यांनाही निरोप देण्यात आला.🙏🙏*

👇👇👇👇
*आजच्या या मंगलमयी🌻🌻 सोहळ्यासाठी आम्ही सर्व शिक्षकवृदांनी अथक परिश्रम घेतले.🙏 सदरील उत्सवाचे👉 सूञसंचलन कु.संजीवनी जाधव ने केले तर 👉आभार प्रदर्शन कु.प्रणाली नरवाडे (सातवी) हिने केले.व अशाप्रकारे आजचा भव्य- दिव्य जयंती समारंभ सोहळा पार पडला. ' लेक शिकवा ' या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रम शाळेत मोठ्या उत्साहाने यापुढे घेऊ.*
*🙏पुनश्च एकदा सावित्री मायीस शतकोटी वंदन व विनम्र अभिवादन*🙏.
*⛳"जय जिजाऊ जय सावित्रीमायी "*📕

🌺🌺🌻🌺🌺🌻🌺🌺
*✒🙏शब्दांकन*🙏
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷

*〰〰〰〰〰〰〰🙏ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले🙏यांच्या जयंती निमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐*

 *📚 " विद्देविना गेले , वाया गेले पशू*
*स्वस्थ नका बसू विद्या घेणे."*📚

*शिकलेला समाजच देशाची सुधारणा करु शकतो.देशातील  शिकलेली सुसंस्कृत , स्वच्छ , सदाचारी, प्रामाणिक , शिष्टाचारी आणि शिस्तप्रिय लोक आपल्या भारत देशाच भवितव्य ठरवू शकतात.*
*माणसाला 'माणूस' बनवण्याच माध्यम आहे शिक्षण.शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण होय.*

*एक आदर्श स्त्री , एक आदर्श पत्नी आणि एक आदर्श माता म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्री ही पुरुषाची खरीखुरी कर्मसंगिनी आहे.स्त्रीच्या शब्दाला प्रेम सेवा आणि समर्पण वृत्तीचं तेज लाभलेल असतं आणि म्हणूनच सहकार्य आणि सुधारणा या शब्दांना जो अर्थ प्राप्त झाला आहे त्याचे श्रेय प्रथम स्त्रीकडेच जाते.*
☘☘☘
*"दूर फेकूनी रूढी वारे*
*परंपरेची मोडूनी दारे"*
                    ☘☘☘
*आजच्या स्त्रीने अधिकाधिक धीट बनले पाहिजे.आपली दृष्टी विशाल केली पाहिजे.मनातील भ्रम टाकून निर्भय बनलं पाहिजे तरच खर्या अर्थाने स्त्रीने आपले  स्थान समाजात निर्माण केले असे म्हणणे योग्य ठरेल.*

〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

संगम

महाराजांचा जन्म झाला तो किल्ला *शिवनेरी*

महाराजांचा मृत्यू  जेथे झाला तो किल्ला  *रायगड*

किती अजब संगम आहे  दोन्ही नावाची पहिली दोन अक्षरे घेतली तर  एक महान नाव तयार होते ते म्हणजे

      "  *शिवराय*  "👌👌nice 👌👌👌👌👌

कथा क्रमांक ११३

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग. ११३*
〰〰〰〰〰〰〰
🌺 *आठवण उपदेशाची*🌺
=================
〰〰〰〰〰〰〰
एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, 'तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !'

त्यावर घुबड म्हणाले, 'अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.'

पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.

*तात्पर्य - कोणी चांगले सांगितले तर त्यांचे ऐकून विचार करून कृती करावी. नाहीतर नंतर  पश्चात्ताप होतो.*
*-----------------------------------*