विचारपुष्प क्रमांक २०१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
राबिया नावाची एक सूफी संत होती.रात्रीची वेळ होती. ती हातात कंदील घेऊन घराबाहेर काहीतरी शोधत होती.
 एकानं विचारलं, ' काय शोधताय ?'  राबिया म्हणाली , ' सुई हरवलीय. '
  दुसऱ्यान प्रश्न केला, 'कुठं?'
राबिया म्हणाली ,  'घरात '. मग घराबाहेर कशाला शोधताय? घरात शोधा.'
एकजण  म्हणाला.

एव्हाना सगळं गाव तिथे गोळा झालं. तेव्हा जमलेल्या लोकांच्याकडं पाहून राबिया हसून म्हणाली, 'लोक हो ! अनेक वर्षापासून मी हेच सांगत आलेय की; देवाला बाहेर शोधू नका, त्याला तुमच्या ह्दयातच शोधा.
 
खरं तर आपणच आपल्या मनातील 'आनंदाची वनराई' जपून ठेवली पाहिजे . या विचारतच आपल्या जीवनाचा खरा शोध लपलेला आहे.

==================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
💐🍀💐🍀💐🍀💐🍀

संकलन

*खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके*

*१. सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार*
मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ४५

*२. आकाशातील भ्रमंती - भाग- १, २, ३,*
मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ९०

*३. मला उत्तर हवयं !*
मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु.

*४. आकाशगंगा*
मोहन आपटे, ज्ञानदा ग्रंथ वितरण, डोंबिवली, रु. ३०

*५. काळाचा छोटासा इतिहास (अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम)*
वि. श. ठाकर, मौज प्रकाशन, मुंबई, रु २००

*६. आपला सौर परिवार*
डॉ. अ. वा. जोशी, जिज्ञासा प्रकाशन, पुणे, रु. ६०

*७. छंद आकाशदर्शनाचा*
डॉ. प्रकाश तुपे, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, रु. ७०

*८. तार्‍यांचे अंतरं*
डॉ. प्रभाकर कुंटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ३३

*९. हा तारा कोणता?*
गो. रा. परांजपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ११९

*१०. आपली नक्षत्रे*
ह. अ. भावे, वरदा बुक्स, पुणे, रु. २५

*११. नक्षत्र विहार*
एल. के. कुलकर्णी, संगत प्रकाशन, नांदेड, रु. ६०

*१२. नक्षत्र लोक*
पं. महादेवशास्त्री जोशी, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. ४०

*१३. आकाशातील गमती जमती*
स्मिता देवधर, योगेश प्रकाशन, पुणे, रु. २५

*१४. खगोलशास्त्र परिचय*
डॉ. मधुकर आपटे, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, रु. ४०

*१५. विश्वरचनेचे कोडे*
डॉ. चंद्रकांत मराठे, पुष्प प्रकाशन, पुणे, रु. १००

*१६. खगोल परिचय*
प्रदीप नायक, खगोल प्रकाशन, मुंबई, रु. १००

*१७. विज्ञानातील चमत्कार – लोणार*
प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. २५

*१८. अंतराळ आणि विज्ञान*
डॉ. जयंत नारळीकर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, रु. १००

*१९. चंद्र पृथ्वीचा उपग्रह*
ग. के. तेरणीकर, अनुसूया राव, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. १०

*२०. गनाच्या अंगणी*
शंकर आथरे, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. २५

*२१. वैज्ञानिकांचे अवकाश आणि पृथ्वी*
अमरेंद्र वैद्य, ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, रु. २५

*२२. पृथ्वीवरील ज्ञानज्योती*
अमरेंद्र वैद्य, अमोल प्रकाशन, पुणे, रु. २५

*२३. खगोलशास्त्राचे महान प्रणेते*
सुधाकर भालेराव, अश्वमेध प्रकाशन, पुणे, रु. ७०

*२४. विश्वाची रचना*
डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, पुणे, रु. २५

*२५. खगोलशास्त्र प्रश्नोत्तरी*
डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, मुंबई, रु.

*२६. पर्वणी सूर्यग्रहणाची*
प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. ४०

*२७. धूमकेतूची स्वारी*
डॉ. प्रभाकर कुंटे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. २५

*२८. विज्ञान पश्चिम दीप*
श्रीकृष्ण केसरी, मधुराज पब्लिकेशन, पुणे, रु. २५

*२९. हे विश्वची माझे घर*
जगदीश काबरे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. ८०

*३०. परग्रहावरील जीवसृष्टी*
मदन पाटील, ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे, रु. २५

*३१. क्षितिजाच्या पलीकडे*
अमित कोर्डे, प्रभात प्रकाशन, मुंबई, रु. ४०

*३२. जीवसृष्टीचा अखेर*
दा. कृ. सोमण, ढवळे प्रकाशन, मुंबई, रु. २५

*३३. मनोरंजनात्मक विज्ञान खगोलशास्त्र*
डॉ. किशोर पवार, अभिषेक पब्लिशर्स, पुणे, रु. ४०

*माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम*

संकलन :

*|| ज्ञानभाषा मराठी ||*

संकलन

*खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके*

*१. सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार*
मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ४५

*२. आकाशातील भ्रमंती - भाग- १, २, ३,*
मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ९०

*३. मला उत्तर हवयं !*
मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु.

*४. आकाशगंगा*
मोहन आपटे, ज्ञानदा ग्रंथ वितरण, डोंबिवली, रु. ३०

*५. काळाचा छोटासा इतिहास (अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम)*
वि. श. ठाकर, मौज प्रकाशन, मुंबई, रु २००

*६. आपला सौर परिवार*
डॉ. अ. वा. जोशी, जिज्ञासा प्रकाशन, पुणे, रु. ६०

*७. छंद आकाशदर्शनाचा*
डॉ. प्रकाश तुपे, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, रु. ७०

*८. तार्‍यांचे अंतरं*
डॉ. प्रभाकर कुंटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ३३

*९. हा तारा कोणता?*
गो. रा. परांजपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ११९

*१०. आपली नक्षत्रे*
ह. अ. भावे, वरदा बुक्स, पुणे, रु. २५

*११. नक्षत्र विहार*
एल. के. कुलकर्णी, संगत प्रकाशन, नांदेड, रु. ६०

*१२. नक्षत्र लोक*
पं. महादेवशास्त्री जोशी, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. ४०

*१३. आकाशातील गमती जमती*
स्मिता देवधर, योगेश प्रकाशन, पुणे, रु. २५

*१४. खगोलशास्त्र परिचय*
डॉ. मधुकर आपटे, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, रु. ४०

*१५. विश्वरचनेचे कोडे*
डॉ. चंद्रकांत मराठे, पुष्प प्रकाशन, पुणे, रु. १००

*१६. खगोल परिचय*
प्रदीप नायक, खगोल प्रकाशन, मुंबई, रु. १००

*१७. विज्ञानातील चमत्कार – लोणार*
प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. २५

*१८. अंतराळ आणि विज्ञान*
डॉ. जयंत नारळीकर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, रु. १००

*१९. चंद्र पृथ्वीचा उपग्रह*
ग. के. तेरणीकर, अनुसूया राव, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. १०

*२०. गनाच्या अंगणी*
शंकर आथरे, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. २५

*२१. वैज्ञानिकांचे अवकाश आणि पृथ्वी*
अमरेंद्र वैद्य, ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, रु. २५

*२२. पृथ्वीवरील ज्ञानज्योती*
अमरेंद्र वैद्य, अमोल प्रकाशन, पुणे, रु. २५

*२३. खगोलशास्त्राचे महान प्रणेते*
सुधाकर भालेराव, अश्वमेध प्रकाशन, पुणे, रु. ७०

*२४. विश्वाची रचना*
डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, पुणे, रु. २५

*२५. खगोलशास्त्र प्रश्नोत्तरी*
डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, मुंबई, रु.

*२६. पर्वणी सूर्यग्रहणाची*
प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. ४०

*२७. धूमकेतूची स्वारी*
डॉ. प्रभाकर कुंटे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. २५

*२८. विज्ञान पश्चिम दीप*
श्रीकृष्ण केसरी, मधुराज पब्लिकेशन, पुणे, रु. २५

*२९. हे विश्वची माझे घर*
जगदीश काबरे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. ८०

*३०. परग्रहावरील जीवसृष्टी*
मदन पाटील, ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे, रु. २५

*३१. क्षितिजाच्या पलीकडे*
अमित कोर्डे, प्रभात प्रकाशन, मुंबई, रु. ४०

*३२. जीवसृष्टीचा अखेर*
दा. कृ. सोमण, ढवळे प्रकाशन, मुंबई, रु. २५

*३३. मनोरंजनात्मक विज्ञान खगोलशास्त्र*
डॉ. किशोर पवार, अभिषेक पब्लिशर्स, पुणे, रु. ४०

*माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम*

संकलन :

*|| ज्ञानभाषा मराठी ||*

कथा क्रमांक ९१

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ९१ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *स्वकष्टाची प्रचिती मौलिक*
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला.त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी,असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला.त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले.परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात*.
    *ते  फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही .ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे,याची त्याला जाणीव झाली*.
      *आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा  लाभते.  पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही*.

*तात्पर्यः श्रमाचे,प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

म्हणी व अर्थ भाग क्रमांक १

*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
🙏  *सस्नेह नमस्कार* 🙏
*आजपासून नविन सदर सुरूवात करीत आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
   *भाग  ( क्रमांक १)*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१)जन्मा आला हेला पाणी वाहता मेला*
अर्थः आयुष्यात काहीही काम न करणाऱ्याचा जन्म फुकट गेला.

*📝२)नखाने काम होते त्याला कुर्हाड कशाला.*
अर्थः जे काम अल्पसाधनाने होते त्याला मोठी शक्ती कशाला?


*📝३)केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी*
अर्थः अत्यंत दारिद्रयाची अवस्था येणे.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰🎀
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

सुविचार भाग क्रमांक (१)

*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* 🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
 🙏 *सस्नेह नमस्कार🙏 आजपासून नविन सदर सुरूवात करीत आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
         *भाग ( क्रमांक १)*
       *✍आजचे प्रेरणात्मक अनमोल सुविचार ✍*
➖➖➖➖➖➖➖

*📚१)केळीच्या जसे पानात पान असते, तसे ज्ञानी माणसाच्या शब्दाशब्दात ज्ञान असते.*


*📚२) जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.*


*📚३) विवेकी मित्र मिळणे,हेच जीवनातील सर्वात मोठे वरदान आहे.*

*📚४)धैर्य आहे तेथे विजय आहे.*

*📚५) ज्ञानी दुस-याला पडताना पाहून स्वतःला सांभाळतो,तर अज्ञानी वारंवार पडूनही उन्मत्त होउन चालतो.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*
  *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
*जि.प.प्रा.शाळा वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड*
   http://www.pramilasenkude.blogspot.in

विचारपुष्प २००

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
मानवी जीवन हा विश्वजीवनाचा एक अंश आहे.
"सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला हीच सर्वश्रेष्ठ कला आहे."

मानवी जीवन म्हणजे कर्मच. प्रत्येक कर्माचे एक औचित्य असते. तत्पूर्वक ते केले तर त्यातून सौंदर्य निर्माण होते. या कर्मातून सौंदर्य निर्माण व्हावे असे वाटत असेल तर ते कर्म ईश्वरपूजा समजून केले पाहिजे. *(कर्मे ईशू भजावा.)* ते कर्म ईश्वराचे आवडते झाले पाहिजे.ईश्वराचा  प्रशस्तीचा हात  कर्माचा पाठीवर फिरला की त्यातून सौंदर्य प्रगट होते.
कर्माने व्यक्तीची आणि समाजाची धारणा होते आणि चित्ताची शुध्दी होते.
म्हणूनच शिक्षणतज्ञ *स्टँनले हाँल* ने म्हणले आहे
*"The hand is a potant instrument in opening the intellect as well as in training sense and will".*
         त्यामुळे कर्म हे जीवन-- विकासाचे एकमेव साधन यापूढे होणार आहे.
========================
🌻   जयमहाराष्ट्र  🌻
〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
💐🍀💐🍀💐🍀💐🍀