✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 नोव्हेंबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक शाकाहार दिन_**_ या वर्षातील ३०५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००:सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९९९:कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कबीर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर**१९९४:मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड**१९८२:अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.होंडा मोटार कंपनीने मेरिज्व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अॅकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.**१९७३:‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.**१९७३:लखदीप,मिनिकॉय,अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप' असे ठेवण्यात आले.**१९६६:पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.**१९५६:भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.**१९५६:दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.**१९५६:केरळ राज्य स्थापना दिन**१९५६:कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.**१९५३:आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.**१९४५:ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१८४८:महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.**१८४५:’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा,मुंबई येथे सुरू झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:वी.वी.एस.लक्ष्मण – भारतीय क्रिकेटपटू**१९७३:धनाजी जनार्दन बुटेरे-- कवी,लेखक* *१९७३:ऐश्वर्या राय – अभिनेत्री**१९६५:पद्मिनी कोल्हापुरे-- भारतीय अभिनेत्री आणि गायिका**१९६४:डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी-- प्रसिद्ध कवी,सुप्रसिद्ध विनोदी लेखक* *१९५८:डॉ. कमलेश सोमण -- लेखक,समीक्षक,अनुवादक* *१९५८:शंकर वाडेवाले -- कवी,लेखक* *१९५७:डॉ.जिजा दौलतराव सोनवणे-- लेखिका* *१९५४:चारुदत्त दुखंडे -- मालिका,चित्रपट आणि माहितीपटांचे छाया दिग्दर्शक(मृत्यू:२७ मार्च २०१९)**१९४५:खलिल गुलामभाई मोमीन -- प्रसिद्ध कवी,गझलकार* *१९४५:नरेंद्र अच्युत दाभोलकर-- सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार (मृत्यू:२०ऑगस्ट २०१३)**१९४०:रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश**१९३८:प्रा.सुहास हरी जोशी--ज्येष्ठ इतिहास संशोधक,लेखक* *१९३६:किशोर अमृतराव प्रधान-- भारतीय मराठी चित्रपट आणि थिएटर अभिनेते, मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक (मृत्यू:१२ जानेवारी १९१९)**१९३२:रघुनाथ पांडुरंग जोशी-- लेखक**१९३२:अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (मृत्यू:२५ सप्टेंबर २००४)**१९२६:यशवंत देव – संगीतकार,गीतकार व लेखक (मृत्यू:३० ऑक्टोबर, २०१८)**१९२१:गजानन बाळकृष्ण पळसुले-- आधुनिक संस्कृत महाकवी(मृत्यू:२८ नोव्हेंबर २००५)**१९२१:शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (मृत्यू:२१ ऑगस्ट २००१)**१९१५:श्रीकृष्ण विठ्ठल गंधे (मामासाहेब)-- क्रीडा,साहित्य,प्रशासन,प्रकाशन,संपादन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य (मृत्यू:१३ ऑक्टोबर २००१)* *१८९३:इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (मृत्यू:१३ नोव्हेंबर १९५६)**१८८८:पुरुषोत्तम श्रीपद काळे -- चित्रकार, रंगभूमिविषयकग्रंथाचे लेखन(मृत्यू:२८ सप्टेंबर १९७६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५:योगिनी जोगळेकर –मराठी लेखिका, कवयित्री आणि शास्त्रीय गायिका(जन्म:६ ऑगस्ट १९२५)**१९९६:ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१७ सप्टेंबर १९०६)**१९९४:कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ,कामगार नेते (जन्म:१९१८)**१९९३:नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका* *१९९१:अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक(जन्म:२७ ऑक्टोबर,१९५४)**१९७८:हरिहर गुरुनाथ कुलकर्णी (कुंजविहारी) कवी (जन्म:१० नोव्हेंबर १८९६)**१९५०:विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक(जन्म:१२ सप्टेंबर १८९४)**१८७३:दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार (जन्म:१८२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*...... संत जनाबाई ......संत जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्याखेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे पंधरा माणसांचे हे कुटुंब होते. जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.संकलन :- नासा येवतीकर( वरील माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे. )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण - शाहू महाराज छत्रपतींनी मनोज जरांगेंची घेतली भेट. सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, शाहू महाराजांचं जरांगेंशी संभाषण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान मोदींकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांना पुष्पांजली, गुजरातसाठी 5950 कोटींची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *धाराशिवमध्ये पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांची 53 दिवसांनी तुरुंगातून झाली सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पाकिस्तानने बांगलादेशवर 7 विकेटनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कमलादेवी चटोपाध्याय* कमलादेवी चटोपाध्याय यांचा जन्म 3 एप्रिल 1903 साली मंगलोर येथे झाला.मद्रास येथे कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांचा विवाह इंग्रजीतील नामवंत कवी श्री हरींद्रनाथ चटोपाध्याय यांचे बरोबर झाला.पति बरोबर त्या इंग्लंड ला गेल्या.तेथे त्यांनी समाजशास्त्र व इंग्लिश रंगभूमी चा अभ्यास सुरू केला.त्याच दिवसात महात्मा गांधीजी च्या असहकार चळवळीने जोर पकडला होता.भारतातील बातम्या एकून, इंग्लंड मधील अभ्यासक्रम मधेच सोडून त्या भारतात परतल्या. भारतात परत आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला , त्यांना तुरुंगवास ही झाला.काही दिवसांनी त्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पक्षात प्रवेश केला. कमला देवींनी कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.भारतीय स्त्री परिषद ही संघटना स्थापन केली.स्त्रियांच्या जागृती साठी आणि उन्नती साठी त्यांनी प्रयत्न केले.स्त्रियांच्या साठी करीत असलेल्या कार्या ची जाण ठेवत भारत सरकार ने त्यांना भारतीय स्त्रियांचे प्रतिनिधी म्हणून बर्लिन,जीनेव्हा,प्राग इत्यादी ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांना पाठविले.परदेशातही त्यांनी आपल्या विचारांची आपल्या लिखाणा द्वारे छाप पाडली.त्यांनी केलेल्या स्त्री उन्नती साठी च्या कार्या बद्दल त्यांना 1962 मध्ये " बाबूमल" पुरस्कार तर 1966 साली त्यांना " मॅगसेस"पुरस्कार देण्यात आला.29 ऑक्टोबर 1988 साली त्यांचे निधन झाले. स्त्री अधिकारा विषयी जागृत असलेल्या व ते स्त्री ला मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या कमलादेवी यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शाती आणि आनंद विनामूल्य मिळवण्यासाठी सर्वांना नेहमी मदत करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला जागतिक अन्न पुरस्कार १९८७ मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला ?२) पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?३) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणकोणते बालछंद होते ?४) भारताचे लष्करप्रमुख कोण आहेत ?५) जगातील कोणत्या ठिकाणाला 'विमानांची स्मशानभूमी' म्हणून ओळखली जाते ? *उत्तरे :-* १) डॉ. एम. एस. स्वामिनाथन, भारत २) राष्ट्रपती ३) एकांती ध्यान, लोकांती कविता कीर्तन ४) जनरल मनोज पांडे ५) डेव्हिस मांथन एअरबेस, अरिझोना ( ४५०० विमाने एकत्र ठेवलेली आहेत. )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मीकांत बामणीकर, शिक्षक, नांदेड👤 संजय कांबळे खडकीकर, गटसमन्वयक, माहूर जि. नांदेड👤 प्रशांत सुरवसे👤 राहुल संत👤 ऋषिकेश मंदेवाड👤 संतोष डिके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥हितकारणे बंड पाखांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्यांकडून वारंवार मदत घ्यायची आपल्याला सवय झाली की, मग तिचे रूपांतर सवयीत होते. अशा प्रकारची, सवय लावून घेण्याऐवजी थोडेतरी इतरांना मदत करण्याची परोपकार वृत्ती ठेवावी व ते कार्य करण्यासाठी आपले मन मोठे असावे लागते. आजच्या घडीला संतोषी वृत्तीची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक कवी व श्रीमंत माणूस* *एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला. त्याने आपल्या सर्व कविता गाऊन दाखविल्या. कवीला वाटले आपल्याला काही तरी बक्षिस मिळणार परंतू तो श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता. तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता ऐकून मी फारच खुश झालो आहे. उद्या तुम्ही परत माझ्या घरी या म्हणजे मीही तुम्हाला खुश करून टाकेन. बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले. परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला.दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला. परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याचे नाव काढीना,अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला,कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन असं म्हणून खुश केलं, प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही, मीही तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला.या आता परत केव्हातरी.बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हकीकत बिरबलाला सांगीतली.बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली. तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत ही घरी आला व त्या गप्पात सामील झाला. परंतू बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला, जेवायचं नाही का ? त्यावर बिरबल म्हणाला आपल्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो, उद्या माझ्या घरी जेवायला या,कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्टीय एकता दिन_**_ या वर्षातील ३०४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या**१९८४:भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६६:दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना**१९४१:’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.**१९२०:नारायण मल्हार जोशी,लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली.लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.**१८८०:धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१८७६:भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार**१८६४:नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:आनंद घोडके -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७७:प्रा.डॉ.मंदा माणिकराव नांदुरकर -- लेखिका* *१९७५:निलेश नामदेव मालवणकर -- लेखक**१९७४:दीपा परब--मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री**१९७३:मंगेश शिवलाल बरई-- कवी* *१९५१:चंद्रकांत काळे -- रंगभूमीवरील गायक,अभिनेते,निर्माते**१९४६:रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू:११ ऑगस्ट १९९९)**१९३७:डाॅ.मुरलीधर बन्सीधर शहा-- गांधीवादी हिंदी-मराठी साहित्यिक(मृत्यू:९ ऑक्टोबर २०१७)**१९३०:शकुंतला फडणीस-- मराठी लेखिका आणि बालसाहित्यिक(मृत्यू:१६ एप्रिल २०२१)* *१९२६:कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर-- संस्कृतचे,संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक,व संशोधक(मृत्यू:३० जुलै २०१३)**१९२२:नॉरदॉम सिहानोक --कंबोडिया देशाचे पंतप्रधान (मृत्यू:१५ ऑक्टोबर २०१२)**१९१६:माधव प्रल्हाद काळे -- कवी**२९१३:लक्ष्मण रामचंद्र गोडबोले--लेखक**१८९५:सी.के.नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू:१४ नोव्हेंबर १९६७)**_१८७५:सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी,स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री,भारताचे लोहपुरुष,भारतरत्न (मरणोत्तर - १९९१) (मृत्यू:१५ डिसेंबर १९५०)_**१८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म.(मृत्यू: ५ एप्रिल १९७५)**१३९१:एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू:९ सप्टेंबर १४३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:गिरिजा कीर-- मराठी भाषेतील लेखिका आणि कथाकथनकार(जन्म:५ फेब्रुवारी १९३३)**२००९:सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.(जन्म: १९१९)**२००५:अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला.(जन्म:३१ ऑगस्ट १९१९)**१९८६:आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म:३ जून १८९२)**१९८४:शरच्चंद्र माधव मुक्तिबोध-- प्रसिद्ध मराठी कवी,कादंबरीकार आणि समीक्षक(जन्म:२१ जानेवारी १९२१)**_१९८४:भारताच्या ३ र्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली.(जन्म:१९ नोव्हेंबर १९१७)_**१९७५:सचिन देव बर्मन – प्रसिद्ध संगीतकार व गायक (जन्म:१ आक्टोबर १९०६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय एकता दिवस*आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय एकता दिन (National Unity Day)' साजरा केला जातो. अनेक भारतीय संस्थानांचे देशात विलीनीकरण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यामध्ये हैदराबादसह इतर संस्थानांचाही समावेश आहे.भारतासारख्या वैविध्यतेने परिपूर्ण अशा देशात, तेथील लोकांमधील एकता अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यावेळी अनेक संस्थानांचे तुकडे झाले होते, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या संकल्पनेचे समर्थन केले. त्यामुळे हा दिवस वल्लभभाई पटेल आणि इतर कार्यकर्त्यांनी देशाला जोडण्यासाठी केलेल्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. "विविधतेत एकता" च्या भावनेला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय अखंडता राखण्याला महत्त्व देणारा हा दिवस आहे.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये अधिकृतपणे 'राष्ट्रीय एकात्मता दिवसा'ची घोषणा केली. अखंड आणि सशक्त भारताचे कट्टर समर्थक असणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस त्यांचा वाढदिवसाचे अवचित्य साधून 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून भारत सरकारने जाहिर केला आहे. २०१८ मध्ये, सरदार वल्लभभाई पटेल (वल्लभभाई झावेरभाई पटेल) यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील नर्मदा नदीजवळ स्थित भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन केले. "एक भारत, श्रेष्ठ भारत" ही पटेल यांची प्रसिद्ध घोषणा आजही राष्ट्राला प्रेरणा देते.आज त्यांची जयंती त्यानिमित्ताने फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून विनम्र अभिवादनसंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजकीय पक्षांच्या देणग्यांची माहिती देणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाही; मोदी सरकारचे थेट सुप्रीम कोर्टात उत्तर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दुसरा झटका, दुसरं वेळापत्रकही फेटाळलं, आता 31 डिसेंबरची मुदत!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जालना ते छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्ग आजपासून 02 नोव्हेंबर असे तीन दिवसांसाठी बंद राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना पत्र लिहत त्यांचा पाठिंबा केला जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! आता पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार पाच रुपयात लीटरभर पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गॅसवर 500 रु. अनुदान व बचत गटाचे कर्ज माफ करू छत्तीसगड निवडणुकीत प्रियंका गांधीचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात खेळलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आचार्य नरेंद्र देव* नरेंद्र बलदेव देव यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सितापूर या गावी 30 ऑक्टोबर 1889 साली झाला. त्यांच्या वडिलांनचे नाव बलदेव प्रसाद व आईचे नाव जवाहर देवी होते. वडील वकील होते. नरेन्द्रचे प्राथमिक शिक्षण सितापूर या ठिकाणी झाले. ते बनारस ह्या ठिकाणी एल एल बी झाले. अलाहाबाद येथे शिक्षण घेत असताना देव यांना लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बीपीनचंद्र पाल, पंडित मदन मोहन मालवीय या सारख्या देश भक्तांची भाषणे ऐकावयास मिळाली. त्यामुळे त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. लोकमान्य टिळकांनी भेट झाल्यावर टिळकांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी फैजाबाद ह्या ठिकाणी होमरुल लीग या पक्षाची शाखा सुरू केली.1921 साली जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून त्यांनी वकिली व्यवसाय सोडून काशी विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी धरली. तेथे ते विना वेतन काम करीत. मात्र पुढे वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे ते आवश्यक तेव्हढाच पगार घेऊ लागले. 1926 साली नरेंद्र देव त्या विद्यापीठाचे प्राचार्य झाले. तेंव्हापासून लोक त्यांना आचार्य म्हणून संबोधू लागले. 1930 व 1942 मध्ये स्वतंत्र चळवळीत भाग घेतल्या मुळे आचार्यांना कारावास भोगावा लागला. 1946 मध्ये ते उत्तर प्रदेश विधिमंडळ वर निवडून आले. पण मंत्रिपद न स्वीकारता ते जनसेवेत राहिले.1947 ते 1951 या काळात आचार्यांनी लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. कुलगुरू पदावर असतांना त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात आमूलाग्र बदल केले. भारतात समाजवादी पक्षाचे स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. अश्या ह्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यागी पुरुषाचे 19 फेब्रुवारी 1956 मध्ये निधन झाले . आचार्य नरेंद्र देव यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा सोपा मार्ग*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केव्हा साजरी केली जाते ?२) राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे ?४) राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?५) जगातला सगळ्यात शांत, निवांत देश म्हणून कोणता देश ओळखला जातो ? *उत्तरे :-* १) ३१ ऑक्टोबर २) ३१ ऑक्टोबर ३) हैदराबाद ४) राष्ट्रपती ५) आइसलँड *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आप्पासाहेब सुरवसे, शिक्षक तथा स्तंभलेखक, उस्मानाबाद👤 नजमा शेख,क्रियाशील शिक्षक, बीड👤 आनंद घोडके, संयोजक, काव्यप्रेमी शिक्षक मंच👤 जागृती निखारे, जेष्ठ साहित्यिक, मुंबई👤 निलंजन यडपलवार, धर्माबाद👤 शीतल गांधी, बार्शी👤 सुनीता शिंदे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद त्याते म्हणावें। विवेके अहंभाव यातें जिणावें॥ अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सोबतीला अवतीभोवती कितीही जण असले तरी प्रवास शेवटी एकट्यालाच करावा लागतो. म्हणून नको त्या, गोष्टींकडे लक्ष देऊ नये व जे, आपल्यासाठी योग्य आहे त्याकडेच काळजीपूर्वक लक्ष देऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे. कारण जीवन हे अनमोल आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *गाणारा पोपट*📗*एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटाकडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.* *एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवून टाकेन ...समजलं ! ".* *सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीरभोवती लपेटून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नव्हते. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.* *सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा पाहावं. बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे. नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला. सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेला असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक काटकसर दिन_**_ या वर्षातील ३०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.**१९९५:कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.**१९७३:इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.**१९६६:शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.**१९४५:भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.**१९२८:लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.**१९२०सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६४:रोहिणी अमोल पराडकर-- कवयित्री, लेखिका**१९६२:कोर्टनी अँड्र्यू वॉल्श-- वेस्टइंडीज चा माजी क्रिकेटपटू* *१९६०:ॲड.गोविंद भेंडारकर-- लेखक* *१९६०:डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू**१९५४:धनराज गोविंदराव गोंडाणे -- लेखक* *१९५२:दलीप ताहिल-- भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि थिएटर अभिनेता* *१९४९:प्रमोद महाजन – माजी केन्द्रीय मंत्री (मृत्यू:३ मे २००६)**१९४८:हेमंत गोविंद जोगळेकर -- सुप्रसिद्ध कवी**१९४८:निर्मला उत्तरेश्वर मठपती-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका (मृत्यू:१० ऑक्टोबर२०२०)**१९४७:विक्रम गोखले-- मराठी नाट्य-चित्र अभिनेते* *१९४६:अशोक सुमितराव हिवाळे -- प्रसिद्ध लेखक,चरित्रकार* *१९४१:डॉ.सुधीर वसंत राशिंगकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९३८:डॉ.रवींद्रनाथ वामन रामदास-- लेखक* *१९३४:भुजंगराव दत्तराव वाडीकर-- लेखक**१९३०:गंगाधर नारायण मोरजे-- लोकवाङ्मयाचे अभ्यासक व मराठी ख्रिस्ती साहित्याचे संशोधक(मृत्यू:९ जुलै २००५)**१९२९:माधव गोठोस्कर-- माजी भारतीय क्रिकेट पंच* *१९०९:डॉ.होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ जानेवारी १९६६)**१८९८:दिनकर विनायक काळे-- लेखक, इतिहास संशोधक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९८०)**१८८७:सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक,चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू:१० सप्टेंबर १९२३)**१७३५:जॉन अॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (मृत्यू:४ जुलै १८२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:यशवंत देव-- प्रसिद्ध मराठी कवी आणि संगीतकार(जन्म:१ नोव्हेंबर १९२६)**२०११:अरविंद मफतलाल – उद्योगपती (जन्म:२७ आक्टोबर १९२३)**१९९८:विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (जन्म:१३ ऑगस्ट १९०६)**१९९६:प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक,पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म:२९ नोव्हेंबर १९२६)**१९९४:सरदार स्वर्ण सिंग –माजी केन्द्रीय मंत्री (जन्म:१९ ऑगस्ट १९०७)**१९९०:व्ही.शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते,पद्मश्री,दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते(जन्म:१८ नोव्हेंबर १९०१)**१९९०:विनोद मेहरा – प्रसिद्ध अभिनेता(जन्म:१३ फेब्रुवारी १९४५)**१९७४:बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(जन्म:७ आक्टोबर १९१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*...... समर्थ रामदास स्वामी .....समर्थ रामदास स्वामी यांचे जन्म नाव - नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च१६०८, जांब - १३ जानेवारी, १६८१, सज्जनगड) हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे. दासबोध व मनाचे श्लोक याचे लेखन त्यांनी केले आहे.समर्थ रामदासस्वामी (नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्यान्ही झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती, पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकर होता. लहानपणी नारायण साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते. एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा. एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्याने दिले होते. या मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी "सावधान" हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचेदर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला असे मानले जाते.नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी दिला थेट राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ब्रँड अॅम्बॅसेडर, 'कॅप्टन कूल'वर मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - लखनौ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये भारताने इंग्लडला 100 धावांनी हरविले, विश्वचषक मध्ये सलग सहावा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्ही. शांताराम चित्रपट महर्षी व्ही. शांताराम यांचे पूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुंद्रे. यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापूर येथे झाला. मॅट्रिकला असतांना त्यांना काही कारणाने शाळा सोडावी लागली. शाळेत असताना, शाळेच्या नाटकात ते नेहमी काम करीत असत. वयाच्या 19 व्या वर्षी1920 साली व्ही. शांताराम, बाबुराव पेंटर यांच्या फिल्म कंपनीत दाखल झाले. या कंपनीत त्यांनी सुभद्रा हरण, नेताजी पालकर, सिंहगड वगैरे सिनेमात त्यांनी कामे केली. 1929 साली त्यांनी दामले व फत्तेलाल यांच्या सहकार्याने प्रभात फिल्मची स्थापना केली.1932साली या कंपनीने मराठी भाषेतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात कंपनी मध्ये व्ही शांताराम यांनी सिंहगड, संत तुकाराम, माणूस, दुनिया न माने, कुंकू, ज्ञानेश्वर, शेजारी असे अनेक दर्जेदार चित्रपट निर्माण केले. ते सर्व लोकप्रिय झाले. 1941 साली व्ही शांताराम यांनी "राजकमल" ह्या नावाची संस्था काढली. या संस्थेने शाहीर, रामजोशी, अमर भूपाळी, पिंजरा अश्या एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती केली. हिंदी चित्रपट सृष्टीत ही या मराठी कलावंताने, दिगदर्शकाने सुंदर चित्रपट निर्माण केले. डॉ कोटणीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शकुंतला हा व्ही शांताराम यांनी तयार केलेला व अमेरिकेत प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला. 1985 साली चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार"दादा साहेब फाळके पुरस्कार" त्यांना देण्यात आला. भारत सरकारने त्यांना "पद्मश्री" हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. अश्या या थोर मराठी कलावंताचे 28 ऑक्टोबर 1990 रोजी निधन झाले. व्ही शांताराम यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.*संकलन :- सुरेखा खोत, बुलढाणा*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डॉ. होमी भाभा यांचा जन्म केव्हा झाला ?२) डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे ?३) जागतिक काटकसर दिन केव्हा साजरा केला जातो ?४) आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम कोणत्या देशाला भेट दिली ? *उत्तरे :-* १) ३० ऑक्टोबर १९०९ २) ट्रॉम्बे, मुंबई ३) ३० ऑक्टोबर ४) ३० ऑक्टोबर ५) भूतान ( १५ ते १६ जून २०१४ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शैलेंद्र सुरकुटवार👤 बसवराज पाटील, शिक्षक नेते, नांदेड👤 विजय जोशी, साहित्यिक👤 संग्राम टेकाळे👤 पंकज गादेवार, धर्माबाद👤 श्याम स्वामी, शिक्षक, हिंगोली👤 सोहम कवडे, कुपटी, माहूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा। जनीं वादसंवाद सूखे करावा॥ जगीं तोचि तो शोकसंतापहारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जसे प्रत्येकांचे आचार, विचार, रंग, रूप वेगवेगळे असतात. पुन्हा त्यात बरेच काही. तसेच त्यांचे जगणे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणून कोणाच्या आचार, विचाराला किंवा रंग, रूपाला कमी लेखू नये. किंवा त्यांचा अपमान करण्याचा विचार सुद्धा आपल्या मनात आणू नये असे केल्याने किंवा वागल्याने आपल्यात असलेल्या सदगुणाचाच अपमान होत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि लांडगा**एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला,'' महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले. त्याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला,'' महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत. इतक्या सा-या मेंढयामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.'' सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.**तात्पर्य :-आपली असहाय्यता लपविण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक दृकश्राव्य वारसा दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३०० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९८६:युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.**१९७१:डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.**१९६१:मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५८:पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू**१९७८:प्रा.अश्विन सुरेश खांडेकर-- कवी लेखक**१९७७:कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९७६:सना पंडित --लेखिका**१९६८:सुदेश लहरी-- चित्रपट व दूरदर्शन अभिनेता**१९६५:संजय पाटील-- कवी**१९६५:मोहन कपूर-- भारतीय अभिनेता आणि टेलिव्हिजन होस्ट**१९६४:मार्क टेलर - माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९५६:चंद्रशेखर पंडित -- लेखक* *१९५४:अरुणा पवार-चवरे -- कवयित्री (मृत्यू:२५ ऑक्टोबर २०१२)**१९५४:अनुराधा पौडवाल – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५४:रेखा भिवगडे-- कवयित्री**१९५२:डाॅ.आशा प्रभाकर कुलकर्णी-- कवयित्री,लेखिका* *१९५०:सीमा सुरेश गरसोळे -- गायिका, कवयित्री,लेखिका**१९४९:प्राचार्य पांडुरंग केशवराव गाडीलकर-- लेखक,संपादक* *१९४७:डॉ.विकास आमटे – महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक,लेखक**१९४५:प्राचार्य डॉ.नसीम महमद खान पठाण-- प्रसिद्ध लेखिका,विविध पुरस्काराने सन्मानित**१९४४:उषा प्रकाश ठाकरे-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९२८:माधव हरी पिटके -- लेखक**१९२३:अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू:३०आक्टोबर २०११)**१९२०:के.आर.नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू:९ नोव्हेंबर २००५)**१९०४:जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू:१३ सप्टेंबर १९२९)**१८७४:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – सुप्रसिद्ध कवी (मृत्यू:७ डिसेंबर १९४१)**१८५८:थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:६ जानेवारी १९१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:मदनलाल खुराना -- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री(जन्म:१५ऑक्टोबर१९३६)**२०१३:प्रा.डॉ.श्रीधर कृष्ण शनवारे-- मराठी कवी(जन्म:५ऑक्टोबर १९३५)**२००७:सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म:१९३१)**२००१:भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार,विज्ञानकथाकार, (जन्म:३१ मे १९१०)**२००१:प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म:४ जानेवारी १९२५)**१९८७:विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म:१२ आक्टोबर १९११)**१९७४:चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म:९ जानेवारी १९३८)**१९६४:वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म:२६ आक्टोबर १८९१)**१९३७:’संगीतरत्न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म:११ नोव्हेंबर १८७२)**१७९५:सवाई माधवराव पेशवा (जन्म:१८ एप्रिल १७७४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*श्री संत नामदेव महाराज श्री संत नामदेव महाराज यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या नरसिबामणी या खेड्यात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव दामासेठ व आईचे नाव गोणाबाई होते.विठ्ठल भक्तीचा छंद त्यांनी सर्वांना लावला.भागवत धर्माचे पहिले प्रचारक म्हणून नामदेवांचे नांव घ्यावे लागेल.ज्ञानेश्वरा बरोबर नामदेवांनी तीर्थयात्रा केल्या.उत्तर भारतात पंजाब पर्यंत जाऊन तेथे विठ्ठल भक्ती पोहोचविली.त्यांची हिंदी भाषेतील कवने,शिखांच्या ग्रंथ साहेबात संग्रहित आहेत.नामदेवांची अनेक मंदिरे पंजाबात आहेत.नामदेवांचे म्हणता येतील असे सुमारे पाच सहाशे अभंगच आज उपलब्ध आहेत.त्यांच्या कोमल आणि भावमधुर काव्या मुळे मराठी साहित्यात भाव कवितेचे नवीन दालन उघडले.आज सहाशे वर्षां नंतर ही घराघरातून नामदेवांचे अभंग भक्तीने गायिले जात आहेत.विठ्ठल भक्तीचा छंद त्यांनी साऱ्या महाराष्ट्राला लावला.त्यांच्या घरातील दासी जनाबाई सुद्धा नामदेवांच्या सानिध्या मुळे अभंग रचू लागली आणि संत जनाबाई झाली.महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांना धार्मिक आणि सदाचारी बनवून पंढरपूर ची वारी दरवर्षी करणारा प्रचंड वारकरी संप्रदाय त्यांनी निर्माण केला. वारकरी संप्रदायातील स्रेष्ट संत श्री नामदेव महाराज यांनी 3 जुलै 1350 या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महा द्वारात समाधी घेतली.विठ्ठल दर्शना साठी येणाऱ्या सर्व संत जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वारा च्या पहिल्या पायरी खालीच हे समाधी स्थांन तयार करण्यात आले आहे. अश्या थोर संताचे पुण्य स्मरण आणि त्यांना दंडवत।शब्दांकन :- सुरेखा खोत ( फेसबुक वरून साभार )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'बारा सुसज्ज वातानुकूलित हॉल, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी साई मंदिरात दर्शन रांगेचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, मराठवाड्यातील 400 गावात उपोषण; अनेक ठिकाणी नेत्यांना 'गावबंदी'*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मैदानात, 1 नोव्हेंबरपासून काढणार 'एल्गार यात्रा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयांचा दर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चक्रीवादळ 'हामून' बनले धोकादायक ! पुढील 12 तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर यांच्या 89 व्या वर्षी निधन, आज नवी मुंबईत होणार अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांदोबा मासिक*चंदामामा, चांदोबा, जन्हामामू, अंबुलीमामा अशा विविध नावाने भारतातील सुमारे 13 भाषांत प्रकाशित होणार्या चंदामामा या लहान मुलांच्या मासिकाला जुलै महिन्यात सुमारे 70 वर्षे पूर्ण झाली. या मासिकाचा पहिला अंक जुलै 1947 रोजी प्रकाशित झाला. या मासिकाचे संस्थापक संपादक होते बी. नागिरेड्डी तर कार्यकारी संपादक होते चक्रपाणी.प्रथम तेलुगू व तमिळ भाषेत ’अंबुलीमामा‘ या नावाने प्रकाशित झालेल्या या मासिकाने केवळ लहान मुलांतच नव्हे ते मोठ्या लोकांतही अमाप लोकप्रियता मिळवली. पौराणिक कथानके, मनोरंजक गोष्टी, आकर्षक चित्रे याने सजलेला चंदामामा पाहता पाहता प्रथम क्रमांकाचे लहान मुलांसाठीचे मासिक बनले. इंग्रजी, कन्नड, मराठी, मल्याळम, गुजराती, उडीया, सिंधी, बेंगाली, पंजाबी, आसामी, सिंहली, संस्कृत, व संथाली या भाषांतही हे मासिक प्रसिद्ध होऊ लागले.1947 ते 2006 म्हणजे सुमारे साठ वर्षे हे मासिक सुरू राहिले. मात्र, त्यानंतर या मासिकाचे हक्क दुसर्या कंपनीला विकण्यात आले. या मासिकाचा शेवटचा अंक 2013 साली प्रसिद्ध झाला. आता सुमारे सत्तर वर्षे उलटून गेली असली तरी या मासिकांची आबालवृद्धांमध्ये असलेली लोकप्रियता इतर कोणत्याही मासिकाने मिळवलेली नाही.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधानपदी असताना बॉयफ्रेंडपासून ब्रेकअप अशी जाहीर घोषणा करणाऱ्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?२) वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मनाव काय होते ?३) भारतीय पायदळ दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम ( RRTP ) या योजनेंतर्गत नव्या जलदगती रेल्वे गाड्यांचे नामकरण कोणत्या नावाने करण्यात आले आहे ?५) वैनगंगा नदीचा उगम कुठे झाला आहे ? *उत्तरे :-* १) जॉर्जिया मेलोनी, इटली २) माणिक ३) २७ ऑक्टोबर ४) नमो भारत ५) दरेकसा टेकड्या, सिवनी, मध्यप्रदेश*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गीता विश्वास केदारे, साहित्यिक, मुंबई👤 नीता आरसुले, क्रियाशील शिक्षिका, जालना👤 मोहिनी रावजीवार👤 शिव गंगूलवार👤 ओम माळवतकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कोपआरोपणा ते नसावी। मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥ मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं। मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलताना तोलून मोलूनच बोलले पाहिजे. इतरांचे मन दुखेल असे बोलू नये. बोलण्यातून अर्वाच्य शब्द प्रयोग करु नये. आपल्या बोलण्यातून जेव्हा इतरांसाठी अर्वाच्य शब्द निघतात तेव्हा, त्या जिभेचा किंवा मुखाचा काहीही दोष नसतो. आपल्यात असलेल्या नको त्या दुर्गुणांचा दोष असतो. म्हणून म्हणतात ना की, बोलताना जरा विचार करूनच बोलावे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अपमानित करून बोलतो त्याचा आनंद जरी आपल्या बाह्य मनाला होत असेल पण, अंतर्मनाला होईलच असे नाही. कारण आपले अंतर्मन हे अनुभवी असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *तीन माशांची गोष्ट*📗 *स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.**तात्पर्य - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २९९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर**१९९४:जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.**१९६२:वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.**१९०५:नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:आतिश सुरेश सोसे -- कवी,लेखक,संपादक विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७४:रवीना टंडन – अभिनेत्री**१९६७: हरिश्चंद्र लाडे--कवी लेखक विचारवंत* *१९६६:डॉ.रमेश रामजी राठोड -- लेखक* *१९६६:मंजुषा अभिजित आमडेकर-- लेखिका* *१९५५:मनिषा चिंतामणी आवेकर -- लेखिका,कवयित्री* *१९५४:शब्बीर कुमार-- भारतीय पार्श्वगायक**१९५४:लक्ष्मीकांत बेर्डे-- मराठी व हिंदी चित्रपट प्रसिद्ध विनोदी अभिनेता(मृत्यू:१६ डिसेंबर२००४)**१९४९:पंडित सुहास व्यास- शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान* *१९४४:प्रा.विद्या गंगाधर सप्रे-चौधरी-- लेखिका**१९३७:हृदयनाथ मंगेशकर – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९३०:दत्तात्रेय भास्कर धामणस्कर-- मराठी कवी**१९२५:शंकर भाऊ साठे-- कादंबरीकार आणि शाहीर(मृत्यू:१५ मार्च १९९६)* *१९१९:मोहम्मद रझा पेहलवी - शाह ऑफ इराण (मृत्यू:२७ जुलै १९८०)**१९००:कौतिक नारखेडे-- कवी कथाकार (मृत्यू:२१ सप्टेंबर १९८०)**१९००:इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू:७ मार्च १९९३)**१८९१:वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू:२७ आक्टोबर १९६४)**१८८८:हरी कृष्ण मोहनी-- लेखक,राष्ट्रीय शिक्षणाचे पुरस्कर्ते (मृत्यू:२९आक्टोबर १९६१)**१८३८:केशव सदाशिव रिसवूड -- लेखक (मृत्यू:४ नोव्हेंबर १९००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक,लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक,हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म:१४ नोव्हेंबर १९१९)**१९८१:दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे--- कर्नाटकामधील प्रसिद्ध साहित्यिक (जन्म:३१ जानेवारी १८९६)**१९७९:चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ(जन्म:२२ ऑगस्ट १८९५)* *१९३०:डॉ.वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म:१५ मार्च १८६०)**१९०९:इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म:१६ आक्टोबर १८४१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संतांची माहिती*..... संत तुकाराम महाराज ....तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती अभियानाचे कवी-संत होते. ते वारकरी धार्मिक समुदायाचे सदस्यही होते. पंढरपूरचे पांडुरंग हे तुकाराम महाराज यांचे आराध्यदैवत होते.माहिती नाही आणि त्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती इतिहासात उपलब्ध नाही पण शोधकर्त्यांच्या मते, त्याचा जन्म १५९८ किंवा १६०८ मध्ये महाराष्ट्रातील पुण्याच्या देहू गावात झाला आहे.त्यांच्या घरात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा पहिल्यापासून होती. तुकाराम महाराज यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई. तसेच त्यांना दोन भाऊ होते. मोठा भाऊ सावजी आणि लहान कान्होबा. संत तुकाराम महाराज यांचे पाहिले लग्न पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची मुलगी आवली सोबत झाले.त्यांचे कुटुंब कुणबी समाजातील होते. तुकाराम महाराज यांच्या कुटुंबाचा किरकोळ विक्री आणि पैसे उधारीवर देने असा व्यवसाय होता., तसेच त्यांचे कुटुंब शेती व व्यापार करत होते. त्यांचे वडील विठोबाचे भक्त होते. विठोबा हा हिंदू धर्मात भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. तुकाराम महाराजांच्या बालपणातच त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला.आणि त्यांना एक मुलगा संतू देखील होता. १६३० – १९३२ च्या दुष्काळात मुलगा आणि बायको दोन्ही मरण पावले.त्यांच्या मृत्यूचा आणि वाढणाऱ्या गरिबीमुळे सर्वात ज्यात प्रभाव संत तुकाराम महाराज यांच्यावर पडला. त्यानंतर त्यांनी भंडारा डोंगरावर जाऊन मौन धारणा करण्याचा निर्णय घेतला.यानंतर तुकाराम महाराज यांनी पुन्हा लग्न केले आणि त्यांच्या दुसर्या पत्नीचे नाव नवलाई (जीजा बाई) असे होते. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. परंतु त्यानंतर त्यांनी आपला बहुतेक वेळ पूजा, भक्ती, समाज कीर्तन आणि अखंड कवितांमध्ये घालविला.तुकाराम महाराज यांचे अध्यात्मिक गुरु बाबाजी चैतन्यहोतेहोते. ते स्वत: ते 13 व्या शतकातील विद्वान जननादेवाचे चौथ्या पिढीचे शिष्य होते.एका माहितीनुसार तुकारामांचा मृत्यू १६४९ किंवा १६५० मध्ये झाला.तुकाराम महाराज हे १७ व्या शतकातील महाराष्ट्रामधील भक्ती अभियानाचे कवी-संत होते. ते सर्ववादी, वारकरी धार्मिक समुदायाचे सदस्यही होते. तुकाराम त्यांच्या अखंड आणि भक्तिमय कवितांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कविता विठ्ठल आणि विठोबाला समर्पित होत्या.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, शिर्डीत साईबाबांच्या चरणी होणार लीन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इंडिया नाही आता भारतच! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, NCERT चा मोठा निर्णय!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 22 हजार 300 कोटींचं गिफ्ट, रब्बी हंगामासाठीही खतांवर सबसिडी कायम राहणार, युरियाच्या किमतीत वाढ नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा! धाराशिवमध्ये 109 गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी, लातूरमध्येही गावबंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आज गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 -सर्वात जलद शतक आता ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 पक्ष्यांची माळ बाणाच्या टोकासारखी का असते? 📒'बगळ्यांची माळ उडे अजून अंबरात' वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातल्या या गीताची मोहिनी अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहे. जेव्हा त्यांच्याच आवाजात त्यांचा नातू राहुल हे गीत गातो तेव्हा स्मरणरंजनाचा आनंद तर मिळतोच; पण नेहमीचा एक अनुभवही जागा होतो. तिन्हीसांजा झाल्यावर आपापल्या घरट्याकडे परतणाऱ्या बगळ्यांची, खरं तर इतर पक्ष्यांचीही आकाशातली माळ बाणाच्या टोकासारखी किंवा इंग्रजीतल्या 'व्ही' या अक्षरासारखी रचना करून उडताना दिसते. दिवसाकाठी चाऱ्याच्या शोधात आपल्या घरट्यापासून हे पक्षी दूरवर जात असले तरी त्यांना परतताना फार मोठं अंतर पार करावं लागत नाही; पण निरनिराळ्या ऋतूंमध्ये स्थलांतर करणारे पक्षी शेकडो, हजारो किलोमीटर दूरवरच्या प्रदेशात तात्पुरत्या वास्तव्यासाठी जात असतात. हिवाळ्यात हे पक्षी उबदार प्रदेशाकडे कूच करतात. उन्हाळ्याची चाहूल लागली की परत उलट दिशेनं झेप घेतात.अशा दूरवरच्या उड्डाणातही या पक्ष्यांची माळ अशीच बाणाच्या टोकासारख्या रचनेचा अवलंब करताना दिसते. साहजिकच तो पक्ष्यांचा कळप असं का करतो, हा सवाल त्या बाणासारखाच टोचत राहतो.त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, तसं केल्यानं त्यांना ऊर्जेची बचत करता येते. हवेतून उडताना त्यांना हवेच्या किंवा खरं तर वाऱ्याच्या विरोधाला तोंड द्यावं लागतं. त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांना काही ऊर्जा खर्च करावी लागते. एकापाठोपाठ सरळ रेषेत जर हे पक्षी उडत राहिले तर पुढच्याच्या उडण्यापायी हवेत उठलेल्या आवर्तनांचाही सामना त्यांना करावा लागतो. तो टाळण्यासाठी मग हे पक्षी पुढ्यातल्या पक्ष्याच्या जरा वर आणि बाजूला असे उडत राहतात. त्यामुळं त्यांना ऊर्जेची बचत करता येते. तसंच आपल्या जागा बदलत जरा थकलेल्या, पुढ्यात राहून मार्गदर्शन करणाऱ्या पक्ष्यांना विश्रांतीही देता येते. तसं केल्यानं एका दमात ते दूरवरचा पल्ला गाठू शकतात. हजारो किलोमीटरची मजल मारताना अधेमधे कमी मुक्काम करावा लागतो आणि आपलं गंतव्य स्थान लवकर गाठता येतं.दुसरं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अशा बाणाच्या टोकासारख्या रचनेत कळपातल्या प्रत्येक पक्ष्याकडे लक्ष ठेवणं सोपं जातं. त्यामुळं कोणीही वाट चुकून भरकटणार नाही, याची खात्री करून घेता येते. तसंच जर कोणाला काही कारणानं मदत लागलीच तर इतरांना सावध करून सर्वच कळप एका ठिकाणी उतरू शकतो. या कारणांमुळंच असावं; पण लढाऊ विमानांचा काफिला जेव्हा एकमेकांच्या साथीनं उडत असतो तेव्हा तोही याच प्रकारच्या रचनाबंधाचा अवलंब करतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले महाराष्ट्रातील पहिले अग्निवीर कोणते ?२) संत नामदेव महाराजांचा जन्म केव्हा झाला ?३) मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?४) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे ?५) इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत ? *उत्तरे :-* १) अक्षय लक्ष्मण गवते, बुलढाणा २) २६ ऑक्टोबर १२७० ३) डावीकडून उजवीकडे ४) महाभारत ५) जॉर्जिया मेलोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव गव्हाणे, क्रियाशील शिक्षक👤 अविनाश थोरात👤 नवनाथ शिंदे👤 सौ. संगीता नामेवार-कंदेवार👤 गणेश पालदेवाड, येताळा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू शापिता कष्टला अंबऋषी। तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥ दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वभावाला औषध नसते, स्वभाव बदलत नसतो असं म्हटल्या जाते. कदाचित हे सुद्धा खरं असू शकते. असा स्वभाव व्यक्तीला दुराग्रही व हट्टी बनवू शकतो. यातून स्वतःचेच नुकसान होण्याची भीती असते. अशी व्यक्ती इतरांपासून दूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वेळ, प्रसंग पाहून थोडे तरी आपल्या स्वभावात बदल आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण चांगल्या कामासाठी व त्यातून इतरांचे भले होत असेल तर...तो स्वभाव कल्याणकारी ठरू शकतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *कष्टाची कमाई श्रेष्ठ*📗 *एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.**तात्पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.**१९९९:दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे.एम.कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्यांदा मिळाले.**१९९४:ए.एम.अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६२:युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९५१:स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:प्रणिता सुभाष-- भारतीय अभिनेत्री**१९६०:माधव गरड-- ज्येष्ठ कवी ललित लेखक (मृत्यू:१२ ऑगस्ट२०२२)**१९५४:अजित वसंत राऊळ-- कवी**१९५४:अरुण म्हात्रे-- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी,गीतकार आणि निवेदक**१९५०:अरुण हरिभाऊ पुराणिक-- ज्येष्ठ सिने पत्रकार**१९४८:अनंत नरहर जोशी -- लेखक* *१९४५:अपर्णा सेन – अभिनेत्री,चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका**१९४२:सूर्यकांत गरुड -- कवी* *१९३८:आदिनाथ कल्लापा कुरुंदवाडे-- ग्रामीण कथाकार* *१९३८:मृदुला गर्ग-- हिंदी लेखिका* *१९३७:डॉ.अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू:३० जुलै २०११)**१९२६:डॉ.केशव रंगनाथ शिरवाडकर --साहित्यसमीक्षक,मराठीत वैचारिक लेखन करणारे लेखक(मृत्यू:२५ मार्च २०१८)* *१९२२:पांडुरंग नारायण कुळकर्णी -- प्राचीन मराठी वाड्:मयाचे संशोधक**१८८१:पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू:८ एप्रिल १९७३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:प्रा.डॉ.रुस्तुम अचलखांब-- मराठी लेखक व नाटककार(जन्म:१९४४)* *२०१२:जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म:३ मार्च १९५५)**२००९:कान्होपात्रा किणीकर-- विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री (जन्म:२ ऑक्टोबर१९३४)**२००९:चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म:१४ जानेवारी १९२३)**२००३:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(जन्म:१९ऑक्टोबर १९२०)**१९९९:सदाशिव अंबादास डांगे -- संशोधक,कोशकार,लेखक(जन्म:२३ ऑगस्ट १९२२)**१९८०:अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – प्रसिद्ध शायर व गीतकार (जन्म:८ मार्च १९२१)**१९५५:पं.दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, (जन्म:२८ मे १९२१)**१६४७:इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म:१५ आक्टोबर १६०८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील संताची माहिती*..... संत ज्ञानेश्वर .....संत ज्ञानेश्वर हे भारतीय संत आणि प्रसिद्ध मराठी कवी होते ज्यांचा जन्म १२७५ मध्ये भाद्रपदाच्या कृष्ण अष्टमीला आपेगाव पैठण येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुमध्ये जमिनीवर कोसळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका व बांगलादेश सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 149 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फिरकीचा जादूगार हरपला* भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सर्वोत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज अशी ज्यांची ओळख आहे ते भारताचे माजी कर्णधार, फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम फिरकी गोलंदाज हरपला आहे. २५ सप्टेंबर १९४६ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेले बिशन सिंग बेदी यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या पंधराव्या वर्षीच बिशन सिंग बेदी यांनी पंजाबच्या रणजी संघात पदार्पण केले. १९६८ पासून ते दिल्ली संघाकडून रणजी स्पर्धेत खेळू लागले. १९७४ - ७५ च्या रणजी हंगामात त्यांनी ६४ विकेट्स घेण्याचा विक्रम केला. हा त्यावेळी एका हंगामात रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळींचा विक्रम होता. आपल्या फिरकीच्या बळावर त्यांनी दिल्लीला रणजी चषकही मिळवून दिला होता. भारतीय संघात निवड झाल्यावर त्यांनी आपल्या फिरकीच्या तालावर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले. १९७० च्या दशकात बेदी, प्रसन्ना, चंद्रा आणि वेंकट या भारताच्या सुप्रसिद्ध फिरकी चौकडीने क्रिकेटवर अक्षरशः राज्य केले. हा त्या काळातीलच नव्हे तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी मारा समजला जातो. बिशनसिंग बेदी यांची डावखुरी गोलंदाजी खेळणे अनेकांना जड जायचे. ते चेंडूला भरपूर उंची द्यायचे. वेगातील बदल, टप्पा बाक ( लूप ) यांचा खुबीने वापर करून बेदी यांनी अनेक सामने गाजवले. त्यांनी ६७ कसोटीत २६६ विकेट्स घेतल्या. त्यांची सरासरीही २८.७१ इतकी चांगली होती. बिशन सिंग बेदी यांनी ६० षटकांच्या विश्वचषक सामन्यात सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. त्यांनी १२ षटकात ८ धावा देत केवळ ०.५० च्या इकॉनॉमी रेटने १ विकेट घेतली होती. काउंटी स्पर्धेतही त्यांनी चमकदार कामगिरी केली. नोर्थम्पटनशायर संघाकडून खेळताना त्यांनी ३७० विकेट्स घेतल्या तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १५६० विकेट्स घेतल्या. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर सुनील गावसकर यांच्या जागी त्यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली. बिशनसिंग बेदी हे निडर आणि स्पषटवक्ते होते त्यामुळेच काहीवेळा ते वादातही सापडले. १९७५ - ७६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात जमैका येथील कसोटीत त्यांनी दोन्ही वेळा भारताचा डाव लवकर घोषित केला, वेस्ट इंडिजच्या दहशतवादी गोलंदाजीचा निषेध म्हणून! एकदा न्युझीलंड दौऱ्यावर भारताचे प्रशिक्षक म्हणून गेले असता, आपल्या संघाच्या सुमार कामगिरीने वैतागले नि 'साऱ्या भारतीय संघाला हिंद महासागरात बुडवले पाहिजे ' असे बोलून गेले! त्यांच्या फिरकी गोलंदाजीप्रमाणेच बेदी यांचे रंगीबेरंगी फेटे ( पटके ) ही लक्षवेधी ठरायचे. आपल्या फिरकीच्या जोरावर क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम गोलंदाज ठरलेले बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे. फिरकीचे जादूगार बिशनसिंग बेदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!शब्दांकन :- श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस हे बुद्धविहार कोठे आहे ?२) ड्रॅगन पॅलेसला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?३) ड्रॅगन पॅलेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?४) प्रसिद्ध बुद्धविहार ड्रॅगन पॅलेसची स्थापना कोणी केली ?५) विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसचे बांधकाम कोणत्या शैलीत केले आहे ? *उत्तरे :-* १) कामठी, नागपूर २) लोटस टेम्पल ३) सन १९९९ ४) नोरिको ओगावा, जपान व सुलेखा कुंभारे, नागपूर ५) जपानी स्थापत्य शैली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीनिवास नक्का, लातूर👤 नितीन गुजराथी, धर्माबाद 👤 गोविंद येळगे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 विजय वाठोरे सरसमकर👤 प्रथमेश मच्छरलावार👤 मारोती गुरलोड, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद तेथें करावा। विविके अहंभाव हा पालटावा॥ जनीं बोलण्यासारिखे आचरावें। क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कसं वागल्याने काय होतं, विचार न करता बोलल्याने त्याचे परिणाम कशा प्रकारे भोगायला मिळतात, कोणाला धोका दिल्याने संकटाचा किती सामना करावा लागतो आणि बरंच काही या सर्वाविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती असताना सुद्धा आपण का म्हणून नको त्या रीतीने जगत असतो...? या विषयी एकदा तरी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. एक वेळचे इतरांचे उत्तर वेगवेगळे असू शकतात पण, आपले अंतर्मन कधीच चुकीचे उत्तर देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*📗 राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदी काठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्याआवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंचआवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवात्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’*तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान**१९७३:संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.**१९४४:दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.**१८९०:हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आशिष आत्माराम वरघणे -- लेखक* *१९८३:जोगिंदर शर्मा-- माजी क्रिकेटपटू**१९८१:सिद्धार्थ रामचंद्र जाधव- प्रसिद्ध मराठी चित्रपटांतील अभिनेता* *१९७९:उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू -- भारतीय अभिनेता**१९७२:एकनाथ नरहरी आव्हाड -- सुप्रसिद्ध बालसाहित्यिक**१९६७:प्रा.डॉ उल्हास सुधाकर मोगलेवार -- लेखक,संपादक**१९६३:गणेश विसपुते-- कवी,लेखक* *१९६०:नीरजा -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९५५:विलास माणिकराव रणभुसे -- लेखक,संपादक* *१९४५:शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू:१३ मार्च १९९६)**१९४०:डॉ.श्रीकांत व्यंकटेश मुंदरगी-- लेखक* *१९३९:रमेश भिकाजी तांबे-- लेखक (मृत्यू:१० जून १९९७)**१९३७:देवेन वर्मा-- भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता(मृत्यू:२ डिसेंबर २०१४)**१९२९:मनोहर महादेव देशपांडे -- वैदर्भीय कवी(मृत्यू:२५ डिसेंबर २००५)**१९२९:डॉ.नरेंद्रनाथ बळीरामजी पाटील-- लेखक**१९२४:’संगीतभूषण’ पं.राम मराठे – संगीतकार,गायक व नट (मृत्यू:४ आक्टोबर १९८९)**१९२३:दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू:२२ फेब्रुवारी २०००)**१८९८:राधाबाई पांडुरंग आपटे-- लेखिका**१८७९:शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू:२७ नोव्हेंबर १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म:७ सप्टेंबर १९३४)**२००१:आत्माराम पांडुरंग नारायणगावकर --गायक व लेखक(जन्म:३० ऑगस्ट १९१७)**१९२१:जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म:५ फेब्रुवारी १८४०)**१९१५:डब्ल्यू.जी.ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म:१८ जुलै १८४८)**१९१०:चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म:२० सप्टेंबर १८५३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*..... अमरावतीची अंबादेवी .....विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावती जिल्हा परिचित आहे. विदर्भाची कुलस्वामिनी कुलदैवत म्हणून आई अंबाबाई आणि एकविरा देवी यांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्र उत्सवात येथे देशभरातील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात. अंबादेवी संस्थान व एकविरा देवी संस्थान हे आध्यात्मिक कामासोबतच कला, संस्कृती, आरोग्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचं दिसून येते.विदर्भाचा राजा भिष्मक त्यांची मुलगी रुख्मिणी श्रीकृष्णाच्या धैर्य आणि सहसाच्या गोष्टी होऊन प्रेरित झाली होती. ती कृष्णावर प्रेम करत होती. तिचा भाऊ रूख्मीय याने त्याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्याशी तिचा विवाह ठरवला. रुख्मिणीने कृष्णाला गुप्त निरोप पाठविला, त्या दोघांनी मिळून योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्यापूर्वी तिने अमरावती (महाराष्ट्र) येथील एकविरादेवीच्या मंदिरास भेट दिली. काही यादवाच्या मदतीने येथून कृष्णाने रुख्मिणीला पळवून नेले. कृष्णा रुख्मिणीचा भाऊ रूख्मीय याच्याशी लढला. नंतर राजा भिष्मकाने त्या दोघांचा विवाह ठरवून दिल्याची माहिती अंबादेवी संस्थांचे सचिव रविंद्र कर्वे यांनी दिली.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिराची रचनादेखील तितकीच महत्त्वाची आहे. मंदिरात प्रवेश करताना दिसणाऱ्या दोन शिखरांवरील कळस तांब्याचे असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडपाचं काचेनं मढवलेलं नयनरम्य छत उत्कृष्ट कलेची प्रचिती देतं. काळ्या रंगाची, वालुका पाषाणाची श्रीअंबादेवीची स्वयंभू मूर्ती आहे. या पूर्णाकृती आसनस्थ मूतीर्चे दोन्ही हात मांडीवर विसावलेले असून डोळे अधोर्न्मिलीत आणि मुद्रा धीरगंभीर आहे. ही मूर्ती अतिप्राचीन असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.देवीचा मुखवटा सोन्याने मढवलेला असून मागे किरीट आहे. कपाळावर बिंदी, पायात वाळ्या, कानात बुगडी, नाकात नथ, गळ्यात ठुशी आणि सुवर्णाच्या सऱ्या, कमरेत कमरपट्टा अशा अनेक दागिन्यांसह देवीला नऊवारी साडी नेसवली जाते.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टोकाचं पाऊल उचलू नका, ते समाजाला आणि परिवाराला न परवडणारं, एकनाथ शिंदेंचं मराठा बांधवांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मेडीगड्डा धरणावरील पुलाचे खांब खचल्याने सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने २० गावातील शेतकऱ्यांना बसला फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा ; 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास आमरण उपोषण, पाण्याचा एक थेंबही घेणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असल्याची कोर्टात याचिका, 10 नोव्हेंबरला सुनावणी; अजित पवारांवरील आरोपाने गाजलंय प्रकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात ! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धूळ आणि प्रदूषणाने मुंबईकर त्रस्त; अखेर महापालिकेकडून उपाययोजना सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - धरमशाला येथे खेळलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताचा 4 विकेटनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दसरा - विजयादशमी*विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला दसरा, दशहरा किंवा दशैन या नावानेही ओळखले जाते. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विनच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांत येतो. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्धप्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी ही केली जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकत्र येणे सुरुवात आहे एकत्र ठेवणे प्रगती आहे एकत्र काम करणे हे यश आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'कविता आणि रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे ?२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी कोणती ?३) सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?४) भारताची प्रथम महिला शासक कोण होती ?५) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरूवात कोणी केली ? *उत्तरे :-* १) अण्णाभाऊ साठे २) यावली, अमरावती ३) पंचायत समिती सभापती ४) रझिया सुलतान ५) लॉर्ड मेकॉले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एकनाथ आव्हाड, कवी व साहित्यिक, मुंबई👤 प्रविण राखेवार, नांदेड👤 साई पा. नरवाडे, बाभळीकर👤 अभिषेक नागुल, नांदेड👤 ईश्वर डहाळे, नांदेड👤 व्यंकटेश येमेवार, धर्माबाद👤 स्वरदा खेडेकर गावडे👤 पंकज बदाने, शिक्षक, नंदुरबार👤 नरेंद्र रेड्डी चाकरोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काम लहान असो वा मोठे शेवटी कामच असते. त्यात कमीपणा वाटून घेऊ नये व काम मोठे असेल तर.. गर्वाच्या भोवऱ्यात अडकून पडू नये. प्रामाणिकपणे आपले काम करावे त्यातून जो समाधान आपल्याला मिळेल कदाचित तो समाधान जगावेगळा असू शकते म्हणून आपल्या कामाला पूजा समजावे कारण तेच काम दोन वेळचे अन्न देते व जगायला शिकवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❒ ❒ कृतघ्नता ❒ ❒* *_एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे._* *_अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला._* *_रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले._* *_हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला...,_* *_‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’_**तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 ऑक्टोबर 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर**१९९२:अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.**१९८९:जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.**१९८७:भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.**१९५१:डॉ.शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.**१९४५:फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.**१९४३:सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना**१९३४:जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.**१८५४:फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:शुभांगी सुनील सरोदे-- कवयित्री* *१९७४:राजेंद्र प्रल्हाद दिघे -- कवी,लेखक**१९६८:प्रतिभा जगदाळे--कवयित्री,लेखिका**१९६०:डॉ.रत्नाकर देवरावजी भेलकर-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५५:बाबू फिलिप डिसोझा ( कुमठेकर)-- प्रसिद्ध कवी* *१९५३:प्रा.डॉ.दाणा सदाशिव गजघाटे -- लेखिका**१९५२:डॉ.विश्वेश्वर भालचंद्र सावदेकर -- ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९४९:बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९ वे पंतप्रधान**१९४६:मच्छिंद्रनाथ तुकाराम वाटेकर-- कवी, कादंबरीकार,कथाकार* *१९४४:कुलभूषण खरबंदा--हिंदी आणि पंजाबी चित्रपटांतून भूमिका करणारे अभिनेते**१९४०:एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू**१९३९:माधव वझे-- आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटातील श्यामची (छोट्या साने गुरुजींची) भूमिका केल्याने प्रसिद्धीस आलेले मराठी नट**१९३१:शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:१४ ऑगस्ट २०११)**१९२३:श्री वामनराव पै-- महान समाजसुधारक,तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक (मृत्यू:२९मे २०१२)**१९२०:धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म,संस्कृती,तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले.(मृत्यू:२३ एप्रिल २००१)**१९१७:राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू:२६ सप्टेंबर २००२)**१८३३:अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू:१० डिसेंबर १८९६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म:२७ सप्टेंबर १९३२)**१९९५:लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म:९ एप्रिल १९२५)**१९८२:नरेंद्र बेदी-- बॉलीवूड दिग्दर्शक आणि लेखक(जन्म:१९३७)**१९८१:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म:३१ जानेवारी १८९६ )**१९३९:दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी-- मराठी कवी(जन्म:१६ सप्टेंबर,१८८७)**१८३५:मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म:२४ मार्च १७७५)**१४२२:चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म:१६ सप्टेंबर १३८०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*.... ज्ञानदेवी माता सरस्वती ....बासर हे ठिकाण तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील नांदेड - धर्माबाद रस्त्यावर धर्माबादपासून १५ km नांदेडपासून १०२ km अंतरावर आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले बासर हे गाव सरस्वती देवीचे जन्मस्थान समजले जाते. नवरात्रीच्या दिवसांत येथे तेलंगणा, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक दर्शनासाठी जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी याठिकाणी अक्षराभ्यास करण्यासाठी खूप गर्दी होते. श्री सरस्वतींची मंदिरे भारतात तीनच ठिकाणी आढळून येतात. काश्मिरातील श्री वैष्णोदेवी, दुसरे शृंगेरी येथील शारदादेवी व तिसरे बासर येथील श्री ज्ञान सरस्वतींचे मंदिर आहे . श्री सरस्वतीचे एक रूप शृंगेरी येथील शारदापीठात गुप्तरूपाने वास करते म्हणून त्यालाच अर्धे पीठ म्हटले जाते.महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी पाच हजार वर्षांपूर्वी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ' महाभारता' सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले. आचार्य परंपरेत त्यांचं स्थान सर्वोच्च आहे.ज्या परिसरात महर्षी व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. संपूर्ण भरत खंडात हे एकमेव श्री महासरस्वतीचं मंदिर आहे. त्यामुळे देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात. अनेकजण अनुष्ठानं करतात. श्री महासरस्वतीचं मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती जवळपास तीन फूट आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अर्ध्या भागात देवघर, गाभारा तर अर्ध्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पवित्र पादुका देवीपासून थोड्या अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचं शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते.नवरात्र महोत्सवात हा परिसर माणसांनी फुललेला असतो, देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण नुसतं आनंदानं ओसंडत असतं, धूप-दीप गंधांनी मन प्रसन्न होतं, शेकडो भक्त घरी बसलेले असतात दसर्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून गावभर मिरवणूक निघते, सारे रस्ते झाडून सडा शिंपडून सुंदर रांगोळ्यांनी रेखाटलेले असतात. तर माय माऊली दारासमोर जरीकाठी नेसून हातात पंचारती घेऊन मोठा प्रसन्न मनानं उभ्या असतात. औक्षण अन् फुलं उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. गावभर नुसता आनंदोत्सव असतो.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आमदार अपात्रतेसंदर्भात पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला, शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यास 25 ऑक्टोबरपर्यंतची वेळ, 34 याचिका 6 गटात विभागल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'अमर रहे' च्या घोषणात सुनील कावळेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंत्यसंस्कार, उपस्थितांना अश्रू अनावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुषमा अंधारेंना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली, शंभूराज देसाईंचा आक्रमक पवित्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई, नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबई ! मेगा प्लान तयार, ना सिग्नल ना चौक, आधुनिक रस्त्यांसाठी 12 हजार कोटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्व बहालीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने लाखाचा दंड ठोठावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - अहमदाबाद येथे खेळलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 62 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माँ वैष्णोदेवी .......वैष्णोदेवी (उत्तरेकडील प्रचलित नाव म्हणजे मातारानी. हिंदू धर्मामधील दुर्गा ह्या देवीचा एक अवतार समजला जातो. भारताच्या हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर हिंदू धर्मामधील एक लोकप्रिय मंदिर आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकूट पर्वतरांगेमधील ह्या मंदिराला दरवर्षी १ कोटी भाविक भेट देतात.वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा ह्या गावापासून १२ किमी अंतराचा घाट पायी चढावा लागतो. कटरा गाव जम्मूपासून ४५ किमी अंतरावर असून ते काश्मीर रेल्वेमार्गाद्वारे जम्मू तावीसोबत जोडले गेले आहे.वैष्णोदेवीची यात्रा वर्षभर सुरु असते, परंतु उन्हाळ्यात मे ते जून आणि नवरात्रीच्या काळात येथे जास्तीत जास्त भाविक दर्शनासाठी पोहोचतात.माता वैष्णो देवी मंदिर हे देशातील पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार, वैष्णो मातेचा जन्म दक्षिण भारतातील रत्नाकर येथे झाला. आईच्या जन्मापूर्वी तिचे पालक निपुत्रिक होते. असे म्हणतात की, जन्माच्या एक रात्री आईने मुलगी जे काही मागेल तिच्या इ्छेविरुद्ध तुम्ही जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. लहानपणी आईचे नाव त्रिकुटा होते. त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला, त्यामुळे त्यांचे नाव वैष्णवी पडले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पक्षी अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांनी कोणत्या पक्ष्यावर संशोधन करून पीएचडी मिळविली ?२) हॉर्नबील पक्ष्याच्या ( धनेश ) जगात एकूण किती प्रजाती आहेत ?३) आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणी केला ?४) कोणत्या वर्षी लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत टी-२० क्रिकेटचा समावेश होणार आहे ?५) भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक व्हावे असा ठराव पुणे महापालिकेने कोणत्या वर्षी मंजूर केला ? *उत्तरे :-* १) ग्रे हॉर्नबील २) ६२ प्रजाती ३) विराट कोहली, भारत ४) सन २०२८ ५) सन २००६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाबू फिलिप डिसूझा, साहित्यिक, निगडी, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हिताकारणे बोलणे सत्य आहे। हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥ हितकारणे बंड पाखांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सांगणारे बरेचजण चांगलेही सांगत असतात आणि वाईटही सांगत असतात. त्या प्रत्येकांचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे व काळजीपूर्वक लक्ष द्यावे. कारण त्यावेळी कानही आपलेच असतात, आपले मन आपल्यापाशी असते आणि मेंदू सुद्धा आपलाच असतो. त्या सांगणाऱ्याकडून काय घ्यायचे, काय नाही, काय पेरायचे काय नाही तेही आपणच ठरवावे. ती कला आपल्याला जमली तर आपल्यासाठी तसेच इतरांसाठी सुद्धा भल्याचेच आहे आणि तेही आपल्यावरतीच अवलंबून आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📗वक्ता आणि श्रोते📗**एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.*सौजन्य :- https://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:लिबीयन गृहयुद्ध - राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.**२००१:रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर**१९९५:’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर**१९९१:उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.**१९७१:मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.**१९७०:हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर**१९६९:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना**१९६२:चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.**१९५२:केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली.जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.**१९५०:कृ.भा.बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.**१९४७:अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९०४:चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज**१९७७:प्रा.डॉ.अनमोल तुळशीराम शेंडे -- लेखक,संपादक**१९६३:नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व राजकारणी**१९६२:क्रांति माधव साडेकर उर्फ क्रांति, रूह-- मराठी कवयित्री व लेखिका**१९५८:डॉ.संजय प्रभाकर हर्षे-- कवी* *१९५४:अरुण खोरे-- वरिष्ठ पत्रकार,संपादक व लेखक**१९५३:किरण कुमार -- चित्रपट अभिनेता**१९५२:श्रीकांत नारायण कुलकर्णी-- ज्येष्ठ मुक्तपत्रकार,संपादक तथा प्रसिद्ध लेखक**१९५०:प्रा.विजय दत्तात्रय काचरे-- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४७:अशोक नामदेव व्हटकर-- संशोधक, कथाकार,कादंबरीकार**१९४२:उद्धवराव पुंडलिकराव वाझुळकर -- कादंबरीकार,कवी**१९३९:निशिकांत माधव उर्फ नानासाहेब जोशी-- स्तंभलेखक संशोधक**१९३९:वसंत महादेवराव चिंचाळकर-- प्रसिद्ध लेखक(मृत्यू:२१ फेब्रुवारी २०२३)**१९३९:प्राचार्य सूर्यकांत वैद्य- प्रसिद्ध कवी लेखक* *१९२९:बाळकृष्ण केशव बन्नोरे -- मराठी, हिंदी,इंग्रजी,संस्कृत भाषेमध्ये काव्यलेखन (मृत्यू:२५ ऑगस्ट २०११)* *१९१६:मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’–लोकशाहीर (मृत्यू:२९ ऑगस्ट १९६९)**१९१५:सय्यद अमीन ---मराठी लेखक मुस्लिम विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन.. (मृत्यू:१७ डिसेंबर १९७३)**१९०५:स.के.नेऊरगावकर -- वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार,प्रवचनकार,संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक (मृत्यू:३१ मे १९७८ )**१८९३:जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२२ ऑगस्ट १९७८)**१८९१:सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:२४ जुलै १९७४)**१८५५:गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक,'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.(मृत्यू:४ जानेवारी १९०७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म:७ जून १९४२)**२०१०:पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म:५ जानेवारी १९४८)**२००९:वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म:४ मे १९२९)**१९९९:माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार (जन्म:१९१५)**१९९६:दि.वि.तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार,युद्धशास्त्राचे अभ्यासक* *१९८४:पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:८ ऑगस्ट १९०२)**१९७४:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’–प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (जन्म:२० जानेवारी १८९८)**१९६८:जगन्नाथबुवा पुरोहित-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक(जन्म:१२ मार्च१९०४)* *१९६४:हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१० ऑगस्ट १८७४)**१९६१:व्ही.एस.गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली.* *१८९०:सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी,संशोधक,मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म:१९ मार्च १८२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*कार्ल्याची श्री एकवीरा आईमहाराष्ट्रात देवींची साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी! लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे.महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! या लेण्यांत ऐश्वर्य असले, तरी डामडौल नाही. पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे.ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून, १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा आणि स्तवनाचा असतो. यात्राकाळात राज्याच्या विविध भागांतून कोळी बांधवांसह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक स्वतः न लढण्याचा शरद पवारांचा पुनरूच्चार, पक्ष बळकटीसाठी पवार देशाचा दौरा करणार, इंडिया आघाडीत समन्वयाची भूमिका पार पाडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्धाटन, राज्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये योजनेचा शुभारंभ.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत केली आत्महत्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नव्या संसदेनंतर आता नवीन विधानसभा आणि विधानपरिषद बांधण्याचा विचार सुरू; राहुल नार्वेकराचं मोठं वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांना पुण्यातील एमआयटी कॉलेजने जाहीर केलेला पुरस्कार राजकीय दबावापोटी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर - दूध उत्पादकांसाठी खुशखबर: गोकुळकडून १०१ कोटी बोनस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पुण्यात बांगलादेशचा सात विकेटने पराभव करीत टीम इंडियाचा विजयी चौकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाराणसी ....वाराणसीमध्ये नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, लोक गंगेच्या घाटांवर (नदीकडे जाणाऱ्या पायऱ्या) पारंपारिक दांडिया आणि गरबा नृत्य करतात. या वेळी शहरातील मंदिरे देखील सुंदरपणे सजविली जातात, ज्यामुळे उत्सवाच्या अध्यात्मिक पैलूचा अनुभव घेण्यासाठी हे एक परिपूर्ण गंतव्यस्थान बनते. वाराणसीतील नवरात्रीच्या खऱ्या उत्साहाचा आनंद घेण्यासाठी येथे काही पंडाल आहेत:हथुआ मार्केट पंडाल, सनातन धर्म पंडाल, शिवपूर पुर पंडाल, माचोदरी पंडाल, पांडेपूर पंडाल*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सांगली येथे होणाऱ्या ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा मुख्य विषय काय आहे ?२) राष्ट्रीय एकात्मता दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) भारतातील मुलींची पहिली शाळा कोठे भरली ?४) २०२३ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीयाला जाहीर झाला आहे ?५) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले ? *उत्तरे :-* १) पक्ष्यांची पिसे आणि पिसारा २) २० ऑक्टोबर ३) भिडेवाडा, पुणे ४) डॉ रवी कन्नन ५) एडियन माक्रम, दक्षिण आफ्रिका ( ४९ चेंडू )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड👤 राजेश्वर वावधाने, पदवीधर शिक्षक, मुखेड👤 लक्ष्मण आगलावे, शिक्षक, धर्माबाद👤 आनंद बलकेवाड, येवती👤 अतुल जाधव👤 इम्तियाज शेख👤 ओम धुळशेट्टे👤 दत्ता सूर्यवंशी👤 गजानन वडजे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।विवेके अहंभाव यातें जिणावें॥अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असलेली एखादी कला किंवा एखादा छंद मग ते कोणतेही असोत पूर्ण निष्ठेने, श्रध्देने, नि:स्वार्थपणे समर्पित होऊन सादर केल्याने व ती इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. हीच भावना आपल्यात ठेवून जर त्या कलेची किंवा छंदाची पूजा केल्याने ती अजरामर होऊन जाते. पण त्याच कलेचा किंवा छंदाचा दुरूपयोग केल्याने त्याचा व्यापार होऊन जातो. व्यापार किंवा व्यवसाय हा मालाचा केला जातो. कलेचा किंवा छंदाचा नाही म्हणून निसर्गाने दिलेल्या ह्या अनमोल देणगीला अपेक्षा ठेवून किंवा प्रसिद्धीच्या परड्यात कधीही तोलू नये त्यांना कायमस्वरुपी जपावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *मातेचा उपदेश*📗 *एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मनुष्य गौरव दिन*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.**२०००:पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान**१९९४:रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार’ जाहीर.**१९९३:पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी.व्ही.रामन पदक जाहीर**१९७०:भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द**१९४४:दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.**१९३५:इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.**१८१२:नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:कुंजीराम जनार्दन गोंधळे -- लेखक**१९८७:सुनील शिवाजी खवरे-- कवी* *१९७१:प्रा.रत्नमाला प्रभाकर भोयर- कोरडे -- कवयित्री* *१९६८:शामला पंडित दीक्षित-कवयित्री, लेखिका**१९६७: लतिका चौधरी -- कवयित्री,लेखिका* *१९६१:अजय सिंग देओल ऊर्फ ‘सनी देओल‘ – अभिनेता**१९६०:प्रा.डॉ.पुरुषोत्तम मारोतराव कालभुत-- लेखक**१९५६:जयंत शंकर कुलकर्णी-- लेखक**१९५४:प्रिया तेंडुलकर – रंगभूमी,चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री,लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.(मृत्यू:१९ सप्टेंबर २००२)**१९५२:गिरीश प्रभुणे-- सामाजिक कार्येकर्ते, लेखक,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित**१९५१:प्रा.व्यंकटेश वळसंगकर-- गुलबर्ग येथील मराठी कवी,लेखक**१९५०:अशोक अर्धापुरकर-- प्रसिद्ध लेखक**१९४९:आशा कर्दळे-- मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक**१९४१:डॉ.सुरेश विश्वनाथराव उपगन्लावार -- कवी* *१९३९:शशिकांत शामराव पवार -- विधिज्ज्ञ, लेखक**१९३६:शांताराम नांदगावकर – प्रसिद्ध गीतकार (मृत्यू:११ जुलै २००९)**१९३४:मधुकर विष्णू कोल्हटकर -- विनोदी कथालेखक,तत्वज्ञानाचे अभ्यासक* *१९२९:निर्मला देशपांडे -- सामाजिक कार्यकर्त्या व गांधीवादी नेत्या(मृत्यू:१मे २००८)**१९२५:डॉ.वामन दत्तात्रय तथा ’वा.द.’वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (मृत्यू:१७ एप्रिल २००१)**१९२०:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ.त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू:२५ आक्टोबर २००३)**१९११:असरार-उल-हक -मजाझ लखनवी म्हणून ओळखले जाणारे,भारतीय उर्दू कवी(मृत्यू:५ डिसेंबर १९५५)**१९१०:सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक.(मृत्यू:२१ ऑगस्ट १९९५)**१९०२:दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक,नाट्य लेखक(मृत्यू: ३१ मे १९७३)**१८९३:मोरेश्वर वासुदेव जोशी -- कादंबरीकार,कथाकार (मृत्यू:१६ सप्टेंबर १९८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: मनोहर सदाशिव नाईक-- लेखक, व्याख्याते (जन्म:१० मार्च १९४९)**२००५:मोहन सहगल-- निर्माता,दिग्दर्शक, अभिनेता(जन्म:१ डिसेंबर १९२१)**१९९५:बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग ऊर्फ ’बेबी नाझ’ यांचे निधन.(जन्म:२० ऑगस्ट१९४४)* *१९५०:विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म:९ एप्रिल १८८७)**१९३७:अर्नेस्ट रुदरफोर्ड – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ(जन्म:३० ऑगस्ट १८७१)**१९३४:विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक.१८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.(जन्म:२४ डिसेंबर १८६४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नवरात्र विशेष माहिती*.... वणीची सप्तशृंगी देवी ....नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "आर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो. हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य, एक गणवेश'; शासन निर्णय जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्री गिफ्ट; DA मध्ये 4 टक्के वाढीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मतदार याद्या अधिक शुद्ध करण्यावर भर द्या : पुणे जिल्ह्यात युवा लोकसंख्या 26 लाख मात्र, प्रत्यक्ष मतदार यादीत 13 लाख - जिल्हाधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटरराज्यभर बसविण्याची तयारी सुरू : महावितरणच्या 2 कोटी 41लाख ग्राहकांचे पारंपारिक मीटर बदलणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली दसरा महोत्सव:पोलिस अधीक्षकांसह साध्या वेशातील कर्मचाऱ्यांनी फिरून घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिल्ली .....राजधानी शहर आपल्या चैतन्यशील नवरात्री उत्सवांसाठी देखील ओळखले जाते, विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्री लोकांसाठी एक विशेष भावना असते आणि ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी विविध पंडाल, दांडिया कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल तयार केले जातात. येथे तपासण्यासाठी काही ठिकाणे आहेत.चित्तरंजन पार्क (सीआर पार्क), कालीबारी, मिंटो रोड पूजा समिती, दिल्ली हाट , पाच इंद्रियांची बाग *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) Greater Flamingo चे मराठी नाव काय आहे ?२) जगात रोहित पक्ष्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत ?३) मोठा रोहित पक्षी कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?४) फ्लेमिंगो हे नियतकालिक कोणत्या संस्थेकडून प्रकाशित होते ?५) जागतिक फ्लेमिंगो दिन केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) मोठा रोहित २) सहा ३) गुजरात ४) बर्ड काँन्झरवेसन सोसायटी गुजरात ५) २६ एप्रिल संदर्भ:- पक्षिमित्र त्रैमासिक, महाराष्ट्र*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिरुद्ध कोल्हटकर👤 विशाल शेपाळकर👤 लतिका चौधरी, साहित्यिक👤 योगेश्वर कंदुरके👤 श्रीनिवास बेंकट, करखेली👤 डॉ. साई रामोड, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।जनीं वादसंवाद सूखे करावा॥जगीं तोचि तो शोकसंतापहारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य बोलणाऱ्याला कोणी साथ देत नाही, सत्य लिहिणाऱ्याला सर्वच सहमत असतीलच असेही नाही, सत्य बघणाऱ्याला आंधळा म्हटल्याशिवाय राहणार नाही. पण इथेच मात्र खोट्याला व फसवणूक करणाऱ्या सोबत अतूट विश्वासाचे नाते जोडले जातात. या पृथ्वीतलावर जन्म घेणारा प्रत्येक मनुष्य निसर्गाला ओळखत असतो. फरक एवढाच की, निसर्ग नियमाचे पालन करण्याचे काम प्रत्येकाला जमत नाही. पण,जो पूर्ण श्रध्देने, निष्ठेने व संघर्ष करून जगत असतो उशिरा का होईना त्याचे जीवन इतरांपेक्षा वेगळे होऊन जाते. म्हणून प्रत्येक मनुष्य प्राण्यानी निसर्गाच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न केले पाहिजे. भलेही गती उशिरा मिळेल पण निसर्ग त्यालाच साथ देत असतो जो त्याच्या नियमाचे पूर्णपणे पालन करत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार*एका गावात एक मूर्तिकार राहत होता. तो देव देवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे. एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती त्याला गि हाईकाला पोचती करायची होती. त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले. ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव रस्त्याने निघाले. ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती. मुर्तीची स्तुती करत होती. काही माणसे वाकून त्या मूर्तीला नमस्कारही करत होती.त्या मुर्ख गाढवाला वाटले की, लोक आपलीच स्तुती करत आहेत. आपल्यालाच नमस्कार करत आहेत. म्हणून गाढव मोठ्या ऐटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठयाने ओरडू लागले. त्याच्या मालकाने त्याला चूचकारुन शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा हाणला. त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला. ते ताळयावर आले आणि निमुटपणे पुढे चालू लागले. ✍ *तात्पर्य*✍*"शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार"*सौजन्य :- http://dnyaneshwarkapti.blogspot.com/p/blog-page_29.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २९१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.**१९६७:सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.**१९२२:ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना**१९१९:राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.**१९०६:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.**१८७९:थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना**१८६७:सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:अजय ताराचंद पटले-- नाट्यलेखक**१९८०:प्रा.आशिष रमेश बोरकर-- लेखक**१९७६:प्रा.डॉ.विजया जितेंद्र राऊत-- लेखिका,समीक्षक,संपादिका* *१९७४:आमिश त्रिपाठी-- इंग्रजीतून लिहीणारा भारतीय लेखक त्यांची पुस्तके अनेक भाषांमध्ये भाषांतरित* *१९७०:रवींद्र मुकुंदराव मालुंजकर -- कवी**१९६८:मनोज अंबिके-- प्रसिद्ध लेखक**१९६७:प्रा.डॉ.माधुरी सुटे -- लेखिका* *१९६६:प्रा.नंदकुमार दिगंबरराव बालुरे-- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९५८:अंजली कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५६:मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू* *१९५०:ओम पुरी – प्रसिद्ध अभिनेता (मृत्यू:६जानेवारी २०१७)**१९४५:अरुंधती अरविंद बापट-- लेखिका**१९४५:मनोहर नामदेवराव पाटेकर-- कवी, लेखक**१९४३:सुनेत्रा पंडित-- लेखिका**१९३९:ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ.केनेडीचा मारेकरी (मृत्यू:२४ नोव्हेंबर १९६३)**१९३७:मंगला जगन्नाथराव आवलगांवकर -- लेखिका,कवयित्री**१९३३:राम मुखर्जी -- बंगाली-हिंदी चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक(मृत्यू:२२ ऑक्टोबर २०१७)**१९२५:इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक(मृत्यू:४ ऑगस्ट २०२०)**१८९३:हरी दामोदर वेलणकर--संस्कृत पंडित व ग्रंथकार(मृत्यू:१३ जानेवारी १९६७)**१८६१:’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश,कायदेपंडित,लेखक,आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. (मृत्यू:२० एप्रिल १९३८)**१८०४:मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा (मृत्यू:१आक्टोबर १८६८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:शांताराम काशिनाथ राऊत-- कल्पक बोधचिन्ह करण्यासाठी प्रसिद्ध* *२००२:गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये --संतकाव्याचे व भाषाशास्त्राचे अभ्यासक(जन्म:११ डिसेंबर १९०९)**१९९९:मंगेश भगवंत पदकी--कवी, कथाकार (जन्म:२७ मार्च १९२३)**१९९४:शंकर पाटील -- मराठी कथाकार.(जन्म:८ऑगस्ट१९२६)**१९९३:मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत.त्यांनी फाळके यांच्या 'कालियामर्दन’ या मूकपटात काम केले होते.* *१९८७:वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते.कार्ल मार्क्सच्या ’दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता.(जन्म:२०मे १९१३)**१९८३:विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (जन्म:२६ सप्टेंबर १९३१)**१९५१:हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार,गायिका,संगीतकार (जन्म:२२ नोव्हेंबर १८८५)**१९३१:थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (जन्म:११ फेब्रुवारी १८४७)**१९०९:लालमोहन घोष –देशभक्त,काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष,भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला.(जन्म:१७ डिसेंबर १८४९)**१८७१:चार्ल्स बॅबेज –इंग्लिश गणितज्ञ, संशोधक,अभियंता आणि तत्त्वज्ञ,पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक (जन्म:२६ डिसेंबर १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*.... कोल्हापूरची अंबाबाई ....महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी; 200 कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *100 युनिट वीज फ्री, महिलांना दरमहा 1500 रुपये, 500 रुपयांमध्ये सिलेंडर; मध्यप्रदेशात काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी, पर्यटकांमध्ये आनंदांचं वातावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - दक्षिण आफ्रिका व नेदरलँड सामन्यात नेदरलँडचा 38 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोलकाता ....कोलकातामध्ये, नवरात्री दुर्गा पूजा म्हणून पाळली जाते, जो दहा दिवसांचा उत्सव आहे. कोलकातामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, संपूर्ण शहरात, भव्य पँडल, सर्वत्र दुर्गा देवतेची कलात्मक शिल्पे प्रदर्शित केली जातात. बंगाली संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. नवरात्रीच्या काळात कोलकात्याला भेट द्यायलाच हवी आणि सणाची सत्यता पाहण्याची संधी मिळते. सणासुदीसाठी तुम्ही कोलकातामध्ये असताना चुकवू नये असे काही रोमांचक कार्यक्रम:घूमर दांडिया उत्सव , जलसा-अंतिम दांडियाउत्सव, जश्न-ए-दांडिया, टाळ दांडिया*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जुलै २०२३ मध्ये वैदिक संकल्पनेवर आधारित उद्यान कोठे उभारण्यात आले आहे ?२) भारतात दरवर्षी एका बॅचमध्ये किती IAS अधिकाऱ्यांची निवड करण्यात येते ?३) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ च्या पदकतालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले ?४) लोकायुक्तची नेमणूक कोण करतो ?५) भारतातील सर्वात पहिले भूअंतर्गत ट्रान्सफॉर्मर कुठे निर्माण करण्यात आले ? *उत्तरे :-* १) वाराणसी, उत्तरप्रदेश २) १८० ३) चौथे ४) राज्यपाल ५) बंगळुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास जाकापूरे, शिक्षक, धर्माबाद👤 शुभम पतंगे👤 श्रेणीक रणभीरकर, धर्माबाद👤 शशिकांत संगम, शिक्षक, धर्माबाद👤 गणेश कावळे👤 विक्की टेकाळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥क्रियेवीण वाचाळता ते निवारी।तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः विषयी काहीच न सांगता दुसऱ्यांच्या विषयी वारंवार कोणी आपल्याला नको त्या शब्दात बोलून सांगत असतील तर त्यावर कधीही डोळे झाकून विश्वास करू नये. कारण आज दुसऱ्या विषयी सांगायला ते कशाचाही विचार करत नाही कदाचित आपल्या विषयीही सांगायला ते एकही संधी सोडणार नाही. म्हणून ऐकताना आपल्या कानाला एवढेही गुलाम बनवू नये की, आयुष्यभर त्याचीच सवय लागून जगण्याची वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••... सकारात्मक दृष्टिकोन ... गरीब आदमी बड़ी मेहनत से एक-एक रूपया जोड़ कर मकान बनवाता है। उस मकान को बनवाने के लिए वह पिछले २० वर्षों से एक-एक पैसा बचत करता है, ताकि उसका परिवार छोटे से झोपड़े से निकलकर पक्के मकान में सुखी से रह सके।आखिरकार एक दिन मकान बन कर तैयार हो जाता है। तत्पश्चात पंडित से पूछ कर गृह प्रवेश के लिए शुभ तिथि निश्चित की जाती है लेकिन गृहप्रवेश के २ दिन पहले ही भूकंप आता है, और उसका मकान पूरी तरह ध्वस्त हो जाता है।यह खबर जब उस आदमी को पता चलती है तो वह दौड़ा दौड़ा बाजार जाता है और मिठाई खरीद कर ले आता है। मिठाई लेकर वह घटनास्थल पर पहुंचता है, जहां पर काफी लोग इकट्ठे होकर उसके मकान गिरने पर अफसोस जाहिर कर रहे थे।ओह! बेचारे के साथ बहुत बुरा हुआ, कितनी मुश्किल से एक – एक पैसा जोड़कर मकान बनवाया था। इसी प्रकार लोग आपस में तरह तरह की बातें कर रहे थे।वह आदमी वहाँ पहुंचता है और झोले से मिठाई निकाल कर सबको बाँटने लगता है। यह देखकर सभी लोग हैरान हो जाते हैं। तभी उसका एक मित्र उससे कहता है, कहीं तुम पागल तो नहीं हो गए हो, घर गिर गया, तुम्हारी जीवन भर की कमाई बर्बाद हो गई और तुम खुश होकर मिठाई बांट रहे हो।वह आदमी मुस्कुराते हुए कहता है, _तुम इस घटना का सिर्फ नकारात्मक पक्ष देख रहे हो इसलिए इसका सकारात्मक पक्ष तुम्हें दिखाई नहीं दे रहा है। ये तो बहुत अच्छा हुआ कि मकान आज ही गिर गया वरना तुम्हीं सोचो अगर यह मकान २ दिनों के बाद गिरता तो मैं मेरी पत्नी और बच्चे सभी मारे जा सकते थे, तब कितना बड़ा नुकसान होता।नकारात्मक दृष्टिकोण को त्याग दीजिये,अपने घर मे बच्चों तथा बुजुर्गो को कहिये- _”आप स्वस्थ रहिये, खुश हम आपको रख लेंगे”।•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक गरिबी निर्मूलन दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान**१९९६:अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर**१९९४:पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ.टी.जेकब जॉन यांना 'डॉ.शारदादेवी पॉल पारितोषिक’ जाहीर**१९७९:मदर तेरेसा नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित**१९६६:बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४३:बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.**१९३४:’प्रभात’चा ’अमृतमंथन’ हा चित्रपट पुण्याच्या ’प्रभात’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याच दिवशी या चित्रपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाली. हिन्दीत हा चित्रपट २९ आठवडे चालला. हिन्दी चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होण्याची ही पहिलीच वेळ होती.**१९३३:अल्बर्ट आइनस्टाइन नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आला.**१९३१:माफिया डॉन अल कपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.**१९१७:पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.**१८३१:मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर-- लेखक संपादक* *१९७७:संदीप बोडके-- पत्रकार,कवी, गझलकार**१९७४:धारा भांड-मालुंजकर-- लेखिका* *१९७३:सुनील वामन कुमरे -कवी,लेखक**१९७०:अनिल कुंबळे – भारतीय माजी क्रिकेटर,लेग स्पिनर गोलंदाज* *१९६५:अरविंद डिसिल्व्हा – श्रीलंकेचा क्रिकेटसंघाचा माजी कप्तान**१९५५:प्रा.डॉ.व्यंकटेश रा.जंबगी-- कवी, लेखक* *१९५५:स्मिता पाटील – सुप्रसिद्ध अभिनेत्री. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (मृत्यू:१३ डिसेंबर १९८६)**१९५३:शैला दिगंबर गिरनारकर-- कवयित्री* *१९५२:पुरुषोत्तम रोहणकर -- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९५१:प्र.द.जोशी -- कवी,बालसाहित्यिक* *१९४७:डॉ.बा.ह.कल्याणकर -- कवी,लेखक, संपादक,विचारवंत* *१९४७:सिम्मी गरेवाल – चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका**१९४६:अरुणा राजे पाटील--भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि संपादक**१९३२:प्राचार्य प.सी.काणे -- लेखक, विचारवंत* *१९३२:जयराम कुलकर्णी-- भारतीय मराठी -भाषेतील चित्रपट अभिनेते(मृत्यू:१७ मार्च २०२०)**१९३१:डॉ.शरद कोलारकर-- विदर्भातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ,विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष(मृत्यू:७ फेब्रुवारी २०१४)* *१९१७:विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (मृत्यू:१३ डिसेंबर १९९४)**१८९२:नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी,पहिले मराठी साखर कारखानदार,(मृत्यू:१६ फेब्रुवारी १९६८)**१८९०:अनंत हरी गद्रे -- नाटककार,संपादन (मृत्यू:४ सप्टेंबर १९६७)* *१८६९:’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक,बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू,’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू:८ एप्रिल १९२२)**१८१७:सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ,समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (मृत्यू:२७ मार्च १८९८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२प्रा.डॉ.विलास वसंत खोले --ज्येष्ठ लेखक-समीक्षक व संपादक(जन्म:५ डिसेंबर १९४४)**२०१७:केशव जगन्नाथ पुरोहित(शांताराम)-- सुप्रसिद्ध साहित्यिक,सन १९८९मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले(जन्म:१५ जून १९२३)* *२००८:रविन्द्र पिंगे – ललित लेखक (जन्म:१३ मार्च १९२६)**१९९३:विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट – चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व पटकथालेखक,(जन्म:१२ मे १९०७)**१९०६:जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली (जन्म:२२ आक्टोबर १८७३)**१८८७:गुस्ताव्ह किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ मार्च १८२४)**१८८२:दादोबा पांडुरंग तर्खडकर – इंग्लिश व्याकरणकार,ग्रंथकार व धर्मसुधारक,संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करुन व मराठी भाषेच्या रुपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून त्यांनी व्याकरण सिद्ध केले. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहिले. (जन्म:९ मे १८१४)**१७७२:अफगणिस्तानचा राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) याचे निधन. अहमदशाहने ’दुर्र-इ-ईरान’ असा आपला किताब जाहीर केल्यापासून अब्दाली टोळ्या ’दुर्रानी’ नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*... तुळजापूरची तुळजाभवानी ...तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमणे साजरा केला जातो या नवरात्र काळात नऊदिवस पुजा , घटस्थापना करण्यात येते ,छबिना , श्री देवीस विविध प्रकारच्या अलंकार पुजा करण्यात येतात असे अनेक कार्यक्रम साजरे होतात . या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक-भक्त तुळजापूरला येतात.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *काँग्रेसने मिझोराम निवडणुकीसाठी पहिली यादी केली जाहीर, 39 उमेदवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांना पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 2 चक्रीवादळांचा तडाखा बसण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंबाबाई मंदिरात दुसऱ्या दिवशी 1 लाख 36 हजारांवर भाविकांचे दर्शन; देवीची दुसऱ्या माळेला महागौरीच्या रुपात पूजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कंत्राटी नोकर भरतीने आरक्षणाचा प्रश्न बाजूला, कंत्राटी भरतीसाठी 9 एजन्सी नियुक्त; जयंत पाटलांची जोरदार टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यातील भिडे वाडा स्मारकाचा मार्ग मोकळा, 13 वर्षांनंतर गाळेधारकांची याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 5 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ..... मुंबई .....नवरात्री विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया कार्यक्रमांनी शहराला चैतन्य आणते. लोक जमतात आणि या कार्यक्रमांसाठी पूर्व-नियोजन करतात आणि त्यांच्या दांडिया प्रदर्शनासाठी आगाऊ सराव सुरू करतात. असे काही दांडिया क्लब आहेत जिथे या कार्यक्रमांप्रमाणेच रोषणाई केली जाते.1. फाल्गुनी पाठक सह नवरात्र उत्सव2. कोरकेंद्र नवरात्री नायडू क्लब3. सहारा स्टारचा तेजस्वी दांडिया 4. रंगीलो रे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक गरिबी निर्मूलन दिन केव्हा साजरा केला जातो ?२) भारत सरकारने इजरायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे ?३) न्युझीलंडच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूचे नाव सचिन तेंडूलकर व राहुल द्रविड यांच्या नावावरून आहे ?४) सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या भाषेतून मिळाले आहेत ?५) १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली ? *उत्तरे :-* १) १७ ऑक्टोबर २) ऑपरेशन अजय ३) रचिन रविंद्र ४) हिंदी भाषा ( १० वेळा ) ५) १०७ पदके ( २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४१ कांस्य )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चेतन भैराम, भंडारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक देशोन्नती 👤 निंबा पाटील👤 गजानन बापूराव भोसकर👤 धनराज भुमरे👤 अनिकेत कदम👤 विकास गायकवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना कोपआरोपणा ते नसावी।मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।होइ रे मोक्षभागी विभागी ॥१०७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली प्रशंसा किंवा आपली स्तुती कोणी करत असतील तर..ऐकून आपला आनंद गगणात मावत नाही. तसंच आपली कोणी निंदा, चुगली करत असतील तर ती सुद्धा ऐकून सहन करण्याची ताकद ठेवावी. कारण, बरेचदा प्रशंसा किंवा स्तुतीमुळे आनंद होत असला तरी नकळत गर्वाचे किंवा घमंडी पणाचे भागीदार बणवतात पण निंदा, चुगली मात्र पुढची वाट दाखवत असतात. म्हणूनच आमच्या थोर संतांनी 'निंदकाचे घर असावे शेजारी' म्हटले आहे त्यांच्या विचारांचा सदैव स्मरण करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇ मूर्ख डोमकावळा ◇◇एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्याइतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,'' या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''तात्पर्य - काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक अन्न दिन_*•••••••••••••••••••••••••••••••••*_जागतिक बधिरीकरण दिन किंवा जागतिक भूल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्स, स्नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्स खेळाडूसाठी दिला जाणारा ’फ्रेड डेव्हिस पुरस्कार’ भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.**१९८४:आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९७५:बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.**१९७३:हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.**१९६८:हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान**१९५१:पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.**१९२३:वॉल्ट डिस्ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्ने यांनी ’द वॉल्ट डिस्ने कंपनी’ची स्थापना केली.**१९०५:भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.**१८६८:डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्क ब्रिटिशांना विकले.**१८४६:डॉ.जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.**१७९३:फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्नी मेरी अॅंटोनिएत हिचा ’गिलोटीन’वर वध करण्यात आला.**१७७५:ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७१: कुंडलिक कनिराम पवार -- कवी,लेखक* *१९६५:भवानी शंकर-- भारतीय पखवाज ढोल वादक* *१९६१:जयश्री सुधीर देसाई-- लेखिका, अनुवादक**१९६०:डॉ.रमा मराठे-- लेखिका,कवयित्री* *१९५९:अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष(मृत्यू:३ जून २०१०)**१९५४:मंजुषा मनोहर शिनखेडे--कवयित्री, लेखिका**१९५०:अशोक श्रीधर थोरे -- कादंबरीकार* *१९४८:हेमा मालिनी –अभिनेत्री,दिग्दर्शिका, निर्माती,भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक**१९४०:नरेंद्र चंचल-- भारतीय गायक होते ज्यांना धार्मिक गाणी आणि भजन यात विशेष प्राविण्य प्राप्त(मृत्यू:२२ जानेवारी २०२१)**१९३६:वसंत दामोदर भट-- लेखक, व्याख्याते**१९१७:इंदुमती रामकृष्ण शेवडे--कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार, संशोधक, समीक्षक(मृत्यू:१४ मार्च १९९२)**१९१६:शकुंतला ना.दिवाणजी -- लेखिका* *१९१५: भानुदास बळीराम शिरधनकर-- लेखक(मृत्यू:१२ एप्रिल १९७७)**१९०७:सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(मृत्यू:४ आक्टोबर १९८२)**१८९६:सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती,साहित्यिक (मृत्यू:१८ जून १९७४)**१८९०:अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर,संपादक,थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक,(मृत्यू:३ सप्टेंबर १९६७)**१८८६:गिरिजाबाई महादेव केळकर-- कादंबरीकार,नाटककार(मृत्यू:२५ फेब्रुवारी १९८०)**१८५४:ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार,(मृत्यू:३० नोव्हेंबर १९००)**१८४१:इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू:२६ आक्टोबर १९०९)**१६७०:बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (मृत्यू:९ जून १७१६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:गोविंद पुरुषोत्तम देशपांडे (गो.पु.)-- मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक(जन्म:२ ऑगस्ट, १९३८)**२००२:नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक(मृत्यू:२३ नोव्हेंबर १९२३)**१९९७:दत्ता गोर्ले – मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक* *१९८१:मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (जन्म:२० मे १९१५)**१९५१:पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (जन्म:१ आक्टोबर १८९५)**१९५०:वि.गं.तथा दादासाहेब केतकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक* *१९४८:माधव नारायण तथा माधवराव जोशी – नाटककार. जळगाव येथे झालेल्या ३४ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष. पालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेले ’म्युनिसिपालिटी’ हे नाटक त्यांनी लिहिले होते. (जन्म:१८८५)**१९४४:गुरुनाथ प्रभाकर ओगले – उद्योजक, 'प्रभाकर कंदिल’चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक (जन्म:१८८७)**१७९३:मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (जन्म:२ नोव्हेंबर १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नवरात्र विशेष माहिती*... माहूरची रेणुकादेवी ....देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूर गडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला.माता रेणुकाची एक कथा आहे - या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर ' म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील 'ऊर' गाव असल्यामुळे 'माऊर' आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते.पुढील भागात - तुळजापूरची तुळजाभवानीसंकलन - ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना, नऊ दिवस भाविकांची मंदिरात दर्शनासाठी होणार गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवाब मलिकांच्या जागी राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी, शरद पवार गटाकडून नियुक्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली एनसीआर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. दिल्ली, गाझियाबाद, नोएडामध्ये 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, संभाजीनगरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यभरात ईडीची मोठी कारवाई, ईडीकडून 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोडमध्ये ईडीची झाडाझडती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण, वारकऱ्यांकडून पंढरपूरमध्ये भव्य ग्रंथदिंडीचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विजयाचा चौकार मारण्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; पुणेकरांमध्ये वर्ल्डकप सामन्याची उत्सुकता शिगेला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्री, देवी दुर्गा देवीच्या उपासनेला समर्पित नऊ दिवसांचा सण, हा भारतातील सर्वात प्रसिद्ध उत्सवांपैकी एक आहे. हा मोठा आनंद आणि उत्साहाचा काळ आहे आणि देशभरातील लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. जर तुम्ही नवरात्रीच्या दरम्यान भारताला भेट देण्याचा विचार करत असाल, तर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना भेट देण्याचा विचार करावा. गुजरात .......गुजरात त्याच्या भव्य नवरात्र उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे, विशेषत: अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत. नवरात्री दरम्यान, राज्याचा पारंपारिक नृत्य प्रकार, गरबा, मोठ्या उत्साहात, आपण रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेले लोक पाहू शकता. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा देखील होतात, ज्यामुळे तो एक्सप्लोर करण्यासाठी एक रोमांचक वेळ बनतो. नवरात्रीच्या उत्सवासाठी गुजरातमध्ये भेट देण्यासाठी ही ठिकाणे पहा - वडोदरा, युनायटेड वे ऑफ बडोदा, बडोदा विद्यापीठ, शिशू सांस्कृतिक गरबा, अहमदाबाद, भद्रा किल्ला*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सोपं आहे, लोकं गुंतागुंतीचं आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्र विशेष प्रश्नमंजुषा१) रेणुकादेवी मंदीर कोठे आहे ?२) तुळजाभवानी मंदीर कोठे आहे ?३) अंबाबाईचे मंदीर कोठे आहे ?४) सप्तश्रृंगी देवीचे मंदीर कोठे आहे ?५) एकविरा आईचे मंदीर कोठे आहे ? *उत्तरे :- १) माहूर जि. नांदेड २) तुळजापूर जि. उस्मानाबाद ३) कोल्हापूर ४) वणी जि. नाशिक ५) लोणावळा**संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विशाल धनगर👤 राम भांगे मुगटकर👤 दत्तप्रसाद यंगुलदास, विजय स्टेशनरी सप्लायर्स, नांदेड👤 साईकुमार शिंदे पाटील👤 संदीप अकोलकर👤 दिगंबर शिंदे पाटील👤 साईनाथ कळसे पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥दया सर्वभुतीं जया मानवाला।सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सरड्याची धाव जरी कुंपना पर्यत मर्यादित असेल तरी तो सरडा त्या कुपंनाशी कधीच बेईमानी करत नाही. कारण त्याला माहीत असते की, मला वेळोवेळी या तुटक्या, फाटव्या कुंपनानेच साथ दिली. म्हणून तो त्याला क्षणभरासाठी सुद्धा विसरत नाही. म्हणून नुसते त्या सरड्याला नाव न ठेवता त्याकडून शिकले पाहिजे भलाही तो, सरडा बोलत नसेल तरी आजच्या या बोलत्या, चालत्या माणसाला खूप काही शिकायला भाग पाडते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••◇◇● धनाचा विनियोग ●◇◇एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता. कोल्ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.'' नाग म्हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्हा पुन्हा म्हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्हणाला,'' कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,'' मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''तात्पर्य - ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला काहीच फायदा नाही.https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७०:फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४६:फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.**१९४४:दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.**१९२३:मुस्तफा कमाल पाशाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरुन अंकारा येथे हलवली.**१८८४:लंडन शहराजवळील ग्रिनिच या गावाजवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानणे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली व त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:कादंबरी कदम-देसाई-- भारतीय अभिनेत्री**१९७२:डॉ.योगेश देविदास वानखेडे -- लेखक,कवी* *१९६६:शरद पोंक्षे--- मराठी चित्रपट,नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते**१९६५:मोहन बा.देशपांडे-- कथा लेखक* *१९६४:प्रा.भुजंग दत्तराव वाडीकर -- लेखक, संपादक* *१९५७:ज्ञानेश्वर जानबाजी वांढरे -- कवी, लेखक* *१९५५:प्रा.डॉ मधुकर गणेश मोकाशी -- लेखक,समीक्षक* *१९४८:नुसरत फतेह अली खान – पाकिस्तानी सूफी गायक (मृत्यू:१६ ऑगस्ट १९९७)**१९४५:लक्ष्मण बाळकृष्ण लोंढे-- मराठीतले विज्ञानकथा लेखक(मृत्यू:६ ऑगस्ट,२०१५)**१९४२:अनुपमा अरविंद क्षीरसागर-- लेखिका,संशोधक* *१९४२:विमल वाणी म्हसावद-- प्रसिद्ध लेखिका,कवयित्री* *१९४१:जॉन स्नो – इंग्लिश क्रिकेटपटू**१९३८:राम देशपांडे-- यांना चालता बोलता ज्ञानकोश असे म्हटले जाते.त्यांच्याकडे साहित्यिकांची,मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते;तसेच,मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा,विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे,जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह आहे**१९३२:हरी अनंत फडके --संशोधक, अभ्यासक (मृत्यू:३ फेब्रुवारी २००७)**१९२५:मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (मृत्यू:८ एप्रिल २०१३)**१९११:अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी'– चित्रपट अभिनेते,पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९) (मृत्यू:१० डिसेंबर २००१)**१८८२:दत्तात्रेय चिंतामण मुजुमदार-- व्यायामकोशकर्ते(मृत्यू:२२ ऑगस्ट १९६४)**१८७७:भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित,त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते,(मृत्यू:६ मे १९४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:मनोहर म्हैसाळकर- विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष आणि कुशल संघटक, व्यवस्थापक(जन्म:१ऑगस्ट १९३२)**२०१७:डॉ.लिला गणेश दीक्षित-- बालसाहित्यिक,कवयित्री (जन्म:४ फेब्रुवारी १९३५)* *२००१:डॉ.जाल मिनोचर मेहता – कुष्ठरोगतज्ञ,नामवंत शल्यचिकित्सक,पुणे जिल्हा रेड क्रॉसचे अध्यक्ष,पद्मश्री (१९८२), ’सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’ चे संचालक,**१९९५:डॉ.रामेश्वर शुक्ल तथा ’अंचल’ – हिन्दी साहित्यिक (जन्म:१ मे १९१५)**१९८७:आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक,संगीतकार,गीतकार, निर्माता,दिग्दर्शक,आभिनेता व पटकथालेखक(जन्म:४ ऑगस्ट १९२९)**१९६८:वसंत प्रभू-- मराठी चित्रपटातील संगीतकार(जन्म:१९ जानेवारी १९२४)**१९४५:मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक(जन्म:१३ सप्टेंबर १८५७)**१९११:मार्गारेट नोबल ऊर्फ 'भगिनी निवेदिता' – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या,भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, (जन्म:२८ आक्टोबर १८६७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला* .... झुम्पा लाहिरी ....लेखिका झुम्पा लाहिरी या मूळच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६७ मध्ये झाला. `अनअकस्टम्ड` हे त्यांचं गाजलं पुस्तक. त्यांची कांदबरी `नेम सेक` खूप गाजली. या कादंबरीवर त्याच नावाने चित्रपटही साकारण्यात आला होता. अमेरिकी पुलित्झर पुरस्कार विजेत्या झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलं होतं.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *GST प्राधिकरणाकडून LIC वर कारवाई; तब्बल 36,844 रुपयांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, किरकोळ महागाई दर घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 2100 लोकांनी गमावला जीव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रिझर्व्ह बँकेचा Paytm पेमेंट बँकेला सर्वात मोठा झटका, KYC उल्लंघन केल्याने कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती, तीन हजार पदं भरली जाणार, गृह खात्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? सह्याद्रीवरील भेटीत राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 134 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या आरोग्यासाठी टिप्स*६. आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या. ७. जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम. ८. झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.९. मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.१०. वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण आहे. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आतापर्यंत झालेल्या १२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दोनदा सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणी केला ?२) महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू करण्यात आली ?३) स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा कोणी केला होता ?४) जगातील सर्वाधिक हळद उत्पादन करणारा ( २०२२-२३ ) देश कोणता ?५) D. N. A. चे विस्तारित रूप काय ? *उत्तरे :-* १) सचिन तेंडूलकर, भारत ( १९९६ मध्ये ५२३ धावा व २००३ मध्ये ६७३ धावा ) २) सन १९६२ ३) ग. वा. जोशी ४) भारत ( ७५ % उत्पादन भारतात ) ५) Deoxyribose Nucleic Acid*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागोराव कमलाकर, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 नरेश पत्राळे👤 अजय त्रिभुवन, साहित्यिक, औरंगाबाद👤 योगेश चंबोले, धर्माबाद👤 किशोर येमेवार, धर्माबाद👤 शैलेश शाह, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी।देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥परद्रव्य आणीक कांता परावी।यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट व संघर्ष करून सुद्धा ज्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात ते दुसऱ्यांदा कोणाच्याही मागे धावण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही. कारण हे सर्व करण्या आधी ते,स्वतः मध्येच सर्व काही शोधून बघितलेले असतात. म्हणून इतर गोष्टींविषयी त्यांना आकर्षन नसते. आपणही आधी स्वतः मध्ये शोधून बघण्याचा प्रयत्न करून बघावे इकडे, तिकडे शोधण्याची किंवा कोणाच्याही मागे धावण्याची आवश्यकता पडणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ●○ .. विजय असो .. ○●एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले. मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले. भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्या वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''तात्पर्य - ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संधिवात निवारण दिन_* *_ या वर्षातील २८५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.**२००१:संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर**२०००:भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल ’सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार’ जाहीर**१९९८:तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून 'इंटरनॅशनल वूमन मास्टर’ हा किताब मिळवला.**१९८८:जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.**१९८३:लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.**१९६८:मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१८७१:भारतात ब्रिटिश सरकारने ’क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’ या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.**१८५०:अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१:अक्षरा हासन- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९७८:कल्पना दुधाळ--कवयित्री**१९७२:सुरेश पुंडलिक गेडाम -- कवी* *१९६७:चित्रा सुधीर कहाते -- कवयित्री, लेखिका* *१९६५:लता सुरेश पाटील-- कवयित्री* *१९५५:अंजली माधव देशपांडे-- कवयित्री, लेखिका* *१९५५:सुहास कामत-- ज्येष्ठ रंगकर्मी* *१९५५:श्रीराम रावसाहेब गुंदेकर-- ग्रामीण साहित्यिक,समीक्षक,सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक,संशोधक व भाष्यकार(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९५४:प्रा.राजाराम बनसकर - बालकांसाठी लेखन करणारे कवी* *१९४६:अशोक मांकड – क्रिकेटपटू (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९४६ डॉ.प्रल्हाद कुलकर्णी -- कादंबरीकार**१९४५: भीमराव सीताराम विठ्ठले--कवी* *१९४५:टिनू आनंद (वीरेंद्र राज आनंद) -- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक,लेखक आणि निर्माता**१९३९:रामदास लिंगुसा दुमाने-- कवी,लेखक* *१९३९:रमेश शामराव मेंदूले-- लेखक**१९३८:मुक्तिदा हसन निदा फाजली --भारतीय हिंदी आणि उर्दू कवी गीतकार आणि संवाद लेखक,साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले(मृत्यू:८ फेब्रुवारी २०१६)**१९३५:शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर--लेखक, पूर्व केंद्रिय गृहमंत्री,पूर्व राज्यपाल पंजाब**१९३४:दीपा गोवारीकर-- बालसाहित्यिक, ज्येष्ठ लेखिका* *१९२२:शांता शेळके – समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका.त्यांनी कथा,कादंबरी,कविता, चित्रपटगीते,भावगीते,नाट्यगीते,बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले.(मृत्यू:६ जून २००२)**१९२१:जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते,गोवा मुक्ती संग्रामातील झुंजार सेनापती,लोकमान्य टिळकांचेनातू,साहित्य,पत्रकारिता,तत्त्वज्ञान,विज्ञान,इ.विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक (मृत्यू:२३ एप्रिल २००१)**१९२१:शरद खंडेराव मंत्री (सुमतीसुत)-कवी, लेखक* *१९१८:मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, (मृत्यू:१९ जानेवारी २०००)**१९११:विजय मर्चंट – क्रिकेटपटू,क्रिकेट समालोचक,उद्योगपती व समाजसेवक (मृत्यू:२७ आक्टोबर १९८७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:मुरलीधर कापडी--चित्रपट दिग्दर्शक (जन्म:६ मार्च १९३४)**१९९६:रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (जन्म:२ जुलै १९०४)**१९६७:डॉ.राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते,विख्यात संसदपटू,लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक(जन्म:२३ मार्च १९१०)**१९६५:पॉल हर्मन म्युलर – डी.डी.टी.या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९४८) मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१२ जानेवारी १८९९ )**१६०५:बादशाह अकबर – हिन्दुस्तानचा तिसरा मुघल सम्राट (जन्म:१५ आक्टोबर १५४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिलांची माहिती*.... बचेंद्री पाल ....बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातील सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.त्यांचा जन्म १९५४ मध्ये भारतातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही पुढील प्रमाणे:भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे गिर्यारोहणाकरिता सुवर्ण पदक (1984)पद्मश्री(1984) पुरस्काराने सम्मानितउत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे सुवर्ण पदक (1985)अर्जुन पुरस्कार (1986)कोलकाता लेडीज स्टडी ग्रुप अवार्ड (1986)गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड्स (1990) मध्ये नोंदभारत सरकार तर्फे एडवेंचर अवार्ड (1994)उत्तर प्रदेश सरकार कडून यशभारती सन्मान(1995)हेमवती नन्दन बहुगुणा गढ़वाल विश्वविद्यापीठाकडून मानद पी एच डी उपाधि (1997)संस्कृति मंत्रालय, मध्य प्रदेश सरकार कडून पहिला वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान (2013-14)पद्मभूषण पुरस्कार(२०१९)संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदा FRP पेक्षा 400 रुपये ज्यादा द्या, अन्यथा कारखाना सुरू होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपुरात खोदकाम करताना सापडली देवीची मुर्ती, बघ्यांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपाल रमेश बैस हे गुरुवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, ते दोन्ही विद्यापीठांना भेट देणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची शक्यता, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिर्डी साई भक्तांसाठी महत्वाची बातमी ! पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना सुनावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्माने मोडला सचिनच्या शतकांचा विक्रम, विश्वचषकात नवा रेकॉर्ड हिटमॅनच्या नावावर, अफगाणिस्तान वर 8 विकेटने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यासाठी महत्वपूर्ण टिप्स*१. बाहेरून घरी आल्यानंतर जेवण बनवण्याच्या आधी किंवा जेवणापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हाथ धुणे गरजेचे आहे.२. घरात साफ-सफाईवर ध्यान द्या. स्वयंपाक घर खास करून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. ३. जेवन बनवण्याआधी भांडी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ओली भांडी तशीच ठेवू नका. ४. आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा. ५. तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा. जेवणाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला ?२) चहाचा सर्वात जास्त उत्पादन जगात कोणत्या देशात होते ?३) जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश कोणता ?४) भारतातील 'चहाची बाग' म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ?५) भारतातील सर्वात मोठे चहाचे मळे कोणते आहे ?*उत्तरे :-* १) चीन २) चीन ३) भारत ४) आसाम ५) गटुंगा टी इस्टेट, आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमित शिंदे👤 माधव धुप्पे👤 संतोष शातलवार👤 जगन कुलवंत👤 संपन्न कुलकर्णी👤 बालाजी लक्ष्मणराव सातपुते👤 सायारेड्डी जरावाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अती लीनता सर्वभावे स्वभावें।जना सज्जनालागिं संतोषवावे॥देहे कारणीं सर्व लावीत जावें।सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध............✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात समस्या निर्माण झाल्या की,आपण कंटाळतो आणि जीवन जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणून जीवन जगायला अनुत्स्तुक होतोत.पण असे हतबल होऊन चालणार नाही.त्यापेक्षा परिस्थितीला दोन हात करायला शिकले पाहिजे.कारण या जगात परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय त्यातून मार्ग सापडत नाही.कारणे आणि पर्याय नक्कीच सापडतात आणि जे सापडतात ते आपल्या जीवनासाठी काहीतरी मिळालेले असते.त्यातून जीवनात कंटाळा येण्याऐवजी जगण्याची नवी दिशा आणि नवी प्रेरणा मिळते.त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळालेले असते.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●●○ राज ज्योतिषी ○●●अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्योतिष्याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. राजज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्यात पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले,''तुम्ही भविष्य कसे सांगता'' ज्योतिषी म्हणाला,''नक्षत्र पाहून'' राजाने दुस-या ज्योतिष्याला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला,''हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो'' राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णुशर्माची आठवण झाली. विष्णुशर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णुशर्माला विचारले,'' तुम्ही ज्योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्हाला राजज्योतिषी होणे आवडत नाही काय'' विष्णुशर्माने सांगितले,''महाराज मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही.'' राजाला विष्णुशर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णुशर्माला राजज्योतिषी म्हणून नियुक्त केले.तात्पर्य - ज्यांचा स्वत:वर व स्वत:च्या अभ्यासावर प्रचंड विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येतेhttps://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २८४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:’पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१:सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.**१८५२:’युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७३:प्रा.डॉ.सुनंदा मारोतराव चरडे-- लेखिका* *१९७०:डॉ.संजय बोरुडे-- प्रसिद्ध कवी,लेखक,संपादक**१९६८:अलका गोविंद पितृभक्त-- लेखिका* *१९५७:डॉ.अरुण गद्रे-- सुप्रसिद्ध पुरस्कार प्राप्त कादंबरीकार तथा डॉक्टर**१९५३:अनिल कांबळे-- नामवंत मराठी गझलकार,कवी(मृत्यू:१ ऑगस्ट २०१९)**१९५१:मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक**१९४६:विजय भटकर – सुप्रसिद्ध भारतीय संगणक शास्त्रज्ञ,संगणकतज्ञ, संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे**१९४४:डॉ.हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर--- सुप्रसिद्ध साहित्यिक,झाडीबोलीचे अभ्यासक, संशोधक विविध पुरस्काराने सन्मानित,निवृत्त शिक्षणाधिकारी**१९४३:कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (मृत्यू:११ आक्टोबर १९९६)**_१९४२:अमिताभ बच्चन-- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त_**१९३९:शरद गोविंद साटम-- कवी* *१९३८:लिलाधर महादेवराव सोनोने(ललित सोनोने)-- सुप्रसिद्ध गझलकार(मृत्यू:१ फेब्रुवारी २०२१)**१९३२:सुरेश दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक (मृत्यू:१० ऑगस्ट २०१२)**१९३०:बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ’बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक(मृत्यू:९ एप्रिल २००१)**१९३०:कमलिनी रघुनाथ देशपांडे -- कवयित्री**१९१६:चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक लोकसभा व राज्यसभा सदस्य,पद्मविभूषण.(मृत्यू:२६ फेब्रुवारी २०१०)**१९१६:रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री (मृत्यू:३ जून १९९७)**१९०२:’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (मृत्यू:८ आक्टोबर १९७९)**१९८९:नारायण गंगाधर लिमये-- बालसाहित्यिक (मृत्यू:१ डिसेंबर १९७३)**१८७६:चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार.(मृत्यू:१७ डिसेंबर १९३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२:दीना पाठक – अभिनेत्री (जन्म:४ मार्च १९२२)**१९९९:रमाकांत कवठेकर – ’नागीण’, ’आघात’, ’पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक**१९९७:विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य**१९९६:कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू (जन्म:११ आक्टोबर १९४३)**१९९४:दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९६८:माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर,ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध (जन्म:३० एप्रिल १९०९)**१८८९:जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (जन्म:२४ डिसेंबर १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाणमाजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... अवनी चतुर्वेदी ......स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी ही मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील एक भारतीय वैमानिक आहे. *तिला भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले*, त्यांच्या दोन सहकारी मोहना सिंग जितरवाल आणि भावना कांथ यांच्यासोबत २०१६ मध्ये या तिघांना भारतीय वायुसेनेच्या लढाऊ तुकडीमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना राष्ट्रसेवेसाठी १८ जून २०१६ रोजी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते.ऑक्टोबर २०१५ मध्येच भारत सरकारने महिलांसाठी लढाऊ प्रवाह उघडण्याचा निर्णय घेतला.चतुर्वेदी यांच्या यशामुळे भारताला ब्रिटन, अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तान या देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे, जेथे महिलांना लढाऊ विमाने उडविण्याची परवानगी आहे. अवनीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. तिचे वडील दिनकर चतुर्वेदी हे मध्य प्रदेश सरकारच्या जलसंपदा विभागात अधीक्षक अभियंता आहेत आणि तिची आई घर बनवणारी आहे. तिने शालेय शिक्षण मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील देओलंड या छोट्याशा गावातून पूर्ण केले. २०१४ मध्ये बनस्थली युनिव्हर्सिटी, राजस्थानमधून तिची बॅचलर इन टेक्नॉलॉजी पूर्ण करून ती कॉलेजच्या फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाली ज्याने तिला उड्डाण करण्यास आकर्षित केले. तिने AFCAT उत्तीर्ण केले आणि पुढे AFSB ने शिफारस केली.चतुर्वेदी यांना बुद्धिबळ, टेबल टेनिस खेळायला आणि स्केचिंग आणि पेंटिंग करायला आवडते.अवनीचा मोठा भाऊ, जो भारतीय लष्करात अधिकारी आहे, त्याने तिला भारतीय वायुसेनेत जाण्यासाठी प्रेरित केले. तिला तिच्या कॉलेज बनस्थली विद्यापीठाच्या फ्लाइंग क्लबमध्ये काही तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे . तिची वायुसेना अकादमीत प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि वयाच्या २५ व्या वर्षी तिने प्रशिक्षण पूर्ण केले. पुढील प्रशिक्षणानंतर चतुर्वेदी जून २०१६ मध्ये फायटर पायलट बनले. २०१८ मध्ये चतुर्वेदी मिग-21 मध्ये एकट्याने उड्डाण करणारी पहिली भारतीय महिला वैमानिक ठरली . २०१८ मध्ये अवनीला फ्लाइट लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. २०२३ मध्ये, तिने जपानमध्ये केलेल्या हवाई युद्ध गेममध्ये भाग घेणारी ती भारतीय हवाई दलाची पहिली महिला लढाऊ वैमानिक बनली. चतुर्वेदी हे भारतीय वायुसेना क्रमांक २३ स्क्वॉड्रन पँथर्समध्ये सुरतगड , राजस्थान येथे तैनात आहेत.२०१८ मध्ये, तिला बनस्थली विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले .९ मार्च २०२० रोजी, चतुर्वेदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अवनी चतुर्वेदीने नोव्हेंबर २०१९ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट विनीत चिकारासोबत लग्न केले.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांच्याकडून राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : लहान मुलांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दीड-दोन लाखांसाठी मुलांची विक्री; सहा जणांना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा ओव्हल मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चिनी कंपनी व्हिवो मोबाइल्सवर ईडीची मोठी कारवाई; बड्या अधिकाऱ्यासह चौघे अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार डॉ.मिलिंद बोकील यांना जाहीर, येत्या 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार्या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चार विकेटच्या जोरावर बांगलादेशचा 137 धावांनी धुव्वा उडवत इंग्लंडने ICC Cricket World Cup 2023मध्ये पहिला विजय नोंदवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रागावर नियंत्रण ठेवण्याचे काही टिप्स*जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, तर त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना सुरू ठेवा. आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. यामुळे तुमचा राग तर शांत होईलच. पण, त्या बरोबर विचार करण्यास वेळ मिळेल.जर तुम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल, तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जा आणि शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसून येईल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा तसे वाटत नसेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा.प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो. प्राणायाममुळे मन केंद्रीत करण्याचा सराव होतो. तसेच श्वास केंद्रित करण्याचा सराव होतो. त्यामुळे राग कमी होण्यास मदत होते. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चांमुळे तुमचा कमी होऊ शकतो.कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते. त्यामुळे राग लवकर फार लवकर येऊ शकतो. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदू शांत असणे फार जरूरी आहे. त्याकरता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामुळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार सक्षम होतो. किमान 7 ते 8 तासांची झोप मानवी शरीरासाठी आवश्यक असते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात भारतीय वायुदल कितव्या स्थानी आहे ?२) भारताचे वायुदल प्रमुख कोण आहेत ?३) भारताचे पहिले वायुदल प्रमुख कोण होते ?४) भारतीय वायुदलाची स्थापना केव्हा झाली ?५) भारतीय वायुदल स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) चौथ्या २) एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी ३) सुब्रतो मुखर्जी ४) ८ ऑक्टोबर १९३२ ५) ८ ऑक्टोबर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रवीकुमार सितावार, धर्माबाद👤 संदीप बोंबले👤 विजय केंद्रे👤 अजय वाघमारे👤 प्रवीण वाघमारे, धर्माबाद👤 सुमीत बोधने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया नावडे नाम त्या यम जाची।विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे।मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 विचारवेध.......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले मानसिक आरोग्य संतुलित ठेवायचे असेल तर आचार आणि विचार शुध्द असायला हवे.त्याबरोबरच वाईट व्यसन आणि इतरांसोबत करत असलेले खोटे व्यवहार यावरही प्रतिबंध घातले तर मानसिक आरोग्य नक्कीच आपल्या जीवनासाठीयोग्य राहील.व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●●● सेवा हाच धर्म ●●●एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली. यादरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदतकार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्यानंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,''स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.'' या स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,'' मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.''https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मानसिक आरोग्य दिन_* *_ या वर्षातील २८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:आदर्श सेन आनंद यांनी भारताचे २९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७५:पापुआ न्यू गिनी चा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९६४:जपानमधील टोकियो येथे १८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९६०:विद्याधर गोखले यांच्या ’सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९५४:आचार्य अत्रे निर्मित 'श्यामची आई’ चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यास या वर्षापासून सुरुवात झाली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ज्यूंचे शिरकाण - ८०० जिप्सी बालकांना ऑस्विच छळछावणीत ठार करण्यात आले.**१९४२:सोविएत युनियनने ऑस्ट्रेलियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.**१९१३:पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९७९:राहुल देशपांडे-- लोकप्रिय हिंदुस्तानी संगीतातील गायक**१९७९:दीपक शांताराम पवार-- कवी**१९७८: ज्योती मनोज मुळ्ये -- लेखिका* *१९७६:डॉ.केशव खटींग-- कवी* *१९७३:शिवराज किसनराव पारधे-- कवी* *१९७३:कोडुरी श्रीशैला श्री राजामौली उर्फ एस.एस. राजामौली-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७१:कमाल अहमद खान-- कवी,लेखक, संपादक**१९६७:प्रा.डॉ.विजय मारोतराव सोरते-- कवी, लेखक* *१९६६:दशरथ यशवंत झनकर-कवी**१९६१:महेश नामदेव कराडकर-- कवी,लेखक,संपादक**१९६१:किरण सीताराम जोशी -- कवी* *१९५४:डॉ.सुहास बहुकार-- प्रसिद्ध चित्रकार आणि कलेचे इतिहासकार व लेखक* *१९५४:रेखा – प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री**१९५४:प्रतिमा इंगोले-- प्रसिद्ध मराठी बालसाहित्यकार,कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका**१९४८:मोहन यशवंत मदवाण्णा-- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९४४:निशिकांत देशपांडे-- प्रसिद्ध कवी लेखक,गझलकार (मृत्यू:२९ सप्टेंबर २०२२)* *१९४२:भास्कर आर्वीकर-- ग्रंथप्रेमी,लेखक**१९३७:अनंत दत्तात्रय भावे -- जेष्ठ बालसाहित्यिक* *१९३५:डॉ.कृष्ण माधव घटाटे-- चरित्रकार, संपादक,लेखक* *१९३३:हरी गणपत देशमुख-- लेखक तथा निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९२९:उ.रा.गिरी --- गझलकार,कवी (मृत्यू:५ सप्टेंबर १९८६ )**१९१६:डॉ.लीला मूळगांवकर – सामाजिक कार्यकर्त्या,मुंबईच्या माजी नगरपाल, भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक (मृत्यू:२० मे १९९२)**१९१०:डॉ.द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (मृत्यू:९ डिसेंबर १९४२)**१९०९:क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन.डी.नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू:११ सप्टेंबर १९९८)**१९०६:रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण – लेखक. त्यांना सोविएत लँड नेहरू पुरस्कार, पद्मभूषण (१९६४), पद्मविभूषण (२००१), साहित्य अकादमी पारितोषिक व ए. सी. बेन्सन पदक (१९८०) या सन्मानांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू:१३ मे २००१)**१९०२:के.शिवराम कारंथ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (मृत्यू:९ डिसेंबर १९९७)**१८९९:कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते. (मृत्यू:२२ मे १९९१)**१८७१:शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त,समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक(मृत्यू:२३ एप्रिल १९५८)**१८४४:बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष (मृत्यू:१९०६)**१७३१:हेन्री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ फेब्रुवारी १८१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:निर्मला उतरेश्वर मठपती--प्रसिद्ध कवयित्री,लेखिका(जन्म:३०ऑक्टोबर १९४८)**२०१८:पंडित दामोदर केशव(डी.के.) दातार-- भारतीय व्हायोलिन वादक(जन्म:१४ ऑक्टोबर १९३२)**२०११:जगजीतसिंग – गझलगायक (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)**२००८:रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (जन्म:१४ नोव्हेंबर १९२४)**२००६:सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (जन्म:४ आक्टोबर १९१३)**२०००:सिरीमाओ बंदरनायके – श्रीलंकेच्या ६ व्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान. (जन्म:१७ एप्रिल १९१६)**१९८३:रुबी मायर्स ऊर्फ ’सुलोचना’ – मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री,दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या (१९७३) (जन्म: १९०७)**१९६४:वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक,निर्माते आणि अभिनेते.(जन्म:९ जुलै १९२५)**१८९८:मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक (जन्म:२६ सप्टेंबर १८५८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.... दुर्गाबाई कामत ....१९०० च्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना चित्रपट किंवा रंगभूमीवर काम करण्यास मनाई होती. त्या काळात नाटकात काम करणाऱ्या महिलांना हीन दृष्टीने पाहिले जात असे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना आपल्या पहिल्या चित्रपटात म्हणजे 'राजा हरिश्चंद्र' मध्ये महिला कलाकाराच्या भूमिकेसाठी पुरुष कलाकारांचा वापर करावा लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची पत्नी राणी तारामतीची भूमिका अण्णा हरी साळुंखे या पुरुष अभिनेत्याने साकारली होती. साळुंखे यांनी धार्मिक भावनेपोटी आपली मिशी काढण्यास नकार दिला होता. चित्रपटात त्यांची मिशी दिसून येऊ नये म्हणून दादासाहेब फाळके यांना खूप काळजी घ्यावी लागली होती.इ.स. १९०३ मध्ये दुर्गाबाई कामत या आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. त्यावेळेस त्यांची मुलगी कमला, ज्या लग्नानंतर कमलाबाई रघुनाथराव गोखले या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या, त्यासुद्धा त्यांच्या बरोबर राहात असत. आपला चरितार्थ भागवण्यासाठी दुर्गाबाई आणि कमला या दोघी मेळा आणि जत्रेत गाणी गाणे व विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या नाटकात काम करत असत. त्यानंतर दुर्गाबाई रंगमंचाशी जोडल्या गेल्या आणि त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीस योग्य ती सुरुवात झाली.दादासाहेब फाळके यांनी इ.स. १०१३ मध्ये 'मोहिनी भस्मासूर' या आपल्या दुसऱ्या मूकपटाची निर्मिती केली. या दुसऱ्या चित्रपटात त्यांनी महिला कलाकारांना घेण्याचे ठरवले. दुर्गाबाई कामत यांनी या चित्रपटात देवी पार्वतीची छोटी भूमिका केली. अशा प्रकारे दुर्गाबाई भारतीय चित्रपटात काम करणारी पहिली महिला अभिनेत्री बनल्या. त्यांची मुलगी कमलाबाई गोखले यांनी त्याच चित्रपटात बाल कलाकार म्हणून मोहिनीची भूमिका साकारली होती. या दोघी माय-लेकी यांच्या या कामामुळे चित्रपटात आणि नाटकात काम करण्याकरिता भारतीय महिलांना मोठे प्रोत्साहन मिळाले.दुर्गाबाई कामत यांचे नातू (आणि कमलाबाईंचा मुलगा) ज्येष्ठ मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले हे होते. चंद्रकांत गोखले तसेच त्यांचा मुलगा विक्रम गोखले यांनीसुद्धा त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट मंत्रिपद, 3 राज्यमंत्रिपदं मिळणार, घटस्थापनेनंतर विस्ताराची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, अतुलनीय कामगिरीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एक मराठा लाख मराठा! मनोज जरांगेंच्या अंतरवालीतील सभेसाठी संभाजीनगरमधून 700 वाहने जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शारदीय नवरात्रौत्सव! तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर; 24 ऑक्टोबरला सिमोल्लंघन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला, सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्राच्या 81 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताला मोठा धक्का, शुभमन गिल अफगाणिस्तानविरोधातही संघाबाहेर, चेन्नईमध्ये उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर आणि निरोगी केसांसाठी काही टिप्स*● केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणून दररोज आहारात किमान 45 ग्रॅम प्रथिने घ्या. ● प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ होतात. तसेच ते निस्तेज होतात व गळतात. ● झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी आहारात नट्स, अक्रोड, पेकान, काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.● तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स घ्या. व भरपूर प्रमाणात पाणी प्या.● ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे सेवन वाढवल्याने केसांची मुळे आणि सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात.● तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते. आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करा.● केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा. चुकीचे शॅम्पू आणि स्टाइलिंग एजंट वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. ● दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा.● केस ओले असताना हळूवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त आहे.● केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा.● केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी – प्रत्येक 10 ते 12 आठवड्यांनी – नियमितपणे केसांना खालून कट द्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३ चे सदिच्छादूत कोण आहेत ?२) रसायनशास्त्र २०२३ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?३) आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोठे आहे ?४) देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ?५) 'मिस वर्ल्ड'चा किताब मिळविणाऱ्या भारतीय सौंदर्यवती कोण आहेत ? *उत्तरे :-* १) सचिन तेंडूलकर, भारत २) मौंगी बावेंडी, लुई ब्रुस, अलेक्सी एकीमोव्ह ३) फिलिपिन्स ४) दिल्ली ५) रिटा पॉवेल ( १९६६ ), युक्ता मुखी ( १९९९ ), डायना हेडन ( १९९७ ), ऐश्वर्या रॉय ( १९९४ ), प्रियंका चोप्रा ( २००० ), मानुषी छिल्लर ( २०१७ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष खेडकर, शिक्षक, धर्माबाद👤 राजेश्वर भुरे, टीचर, आर्ट ऑफ लिव्हिंग👤 राजेंद्र वाघमारे👤 श्याम देसाई👤 विशाल अन्नमवार, देगलूर👤 पोतन्ना चंदेवाड👤 सतिश बोधनकर, मुख्याध्यापक, IGP स्कुल धर्माबाद👤 विठ्ठल धुळेकर, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 कैलास सांगवीकर👤 प्रभू पाटील कदम👤 शरद घुबे👤 प्रमोद यादव👤 श्रीकांत पाटील शिंदे👤 तानाजी पाटील👤 शंकर बत्तीनवार👤 तुकाराम डोळे👤 राम गायकवाड👤 वसंत पाटील कदम👤 विनोद लोणे👤 अरुण शंखपाळे👤 रोहित हिवरेकर👤 गंगाधर पापुलवार👤 राज वजीरे👤 सतीश बड्डेवाड👤 रेखा अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यथासांग रे कर्म तेंहि घडेना।घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥दया पाहतां सर्व भुतीं असेना।फुकाचे मुखी नाम तेंही वसेना ॥१००॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎯 *विचारवेध...........✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वासाचा पाया मजबूत असेल तर अपयशाच्या कितीही पाय-या असल्यातरी त्या चढून जाऊन शेवटी यशाच्या यशोशिखरावर नक्कीच पोहोचता येते. परंतु यश कितीही जवळ असेल आणि आत्मविश्वास जवळ नसेल तर नक्कीच आपल्या हातून यश निसटून जाईल आणि अपयश पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○● मूर्खांचे निष्कर्ष ●○*एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरविले. पण जमलेल्या काही लोकांपैकी एक जण चिकित्सक होता त्याने त्या ज्योतिष्याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्याने ती दुर्बिण तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.तात्पर्य :- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 ऑक्टोबर 2023💠 वार - सोमवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक टपाल दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.**१९६२:युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०:विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१८०६:प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:श्रीरंजन आवटे -- लेखक* *१९९०:लखन माणिक जाधव-- कवी,लेखक**१९६५:मोनिका अभिजित गजेंद्रगडकर-- प्रसिद्ध कथाकार**१९६४:प्रा.डॉ.ईश्वर केशवराव सोमनाथे-- लेखक* *१९५८:गोकुळ धनाजी वाडेकर -- कवी, लेखक* *१९५८:भुजंग मेश्राम-- प्रसिद्ध कवी ( मृत्यू:२७ ऑगस्ट २००७)**१९५६:प्रदीप दाते -- अध्यक्ष,विदर्भ साहित्य संघ,नागपूर* *१९५२:रेखा खराबे -- कवयित्री,लेखिका**१९५०:प्रा.सुबोध वसंतराव बल्लाळ-- लेखक**१९४५:अमजद अली खान-- प्रसिद्ध सरोद वादक,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४५:पंडित माधवराव हिंगे--कवी* *१९४३:प्रा.प्रकाश कामतीकर-- पत्रकार,संपादक,चित्रकार,लेखक* *१९४२:देविदास सखाराम चव्हाण-- लेखक**१९३९:महेश एलकुंचवार-- सुप्रसिद्ध नामवंत नाटककार व प्रतिभावंत लेखक**१९३५:रवी परांजपे-- चित्रकार,बोधचित्रकार, लेखक (मृत्यू:११ जून २०२२)* *१९३०:डॉ.वसंत सखाराम जोशी-- प्राचीन मराठी साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक(मृत्यू:१६ नोव्हेंबर २०१७)* *१९११: दत्तात्रय विनायक गुप्ते--लेखक**१८९३:शिवराम श्रीपाद वाशीकर--- कथा-पटकथा-संवादलेखक(मृत्यू:२३ जून १९६१)**१८७७:पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते,स्वातंत्र्यसेनानी,कवी व लेखक (मृत्यू:१७ जून १९२८)**१८७६:पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक (मृत्यू:४ जून १९४७)**१८५२:एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:१५ जुलै १९१९)**१७५७:चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)* *_ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५: रवींद्र जैन--हिंदी चित्रपटांचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार(जन्म:२८ फेब्रुवारी १९४४)* *२००८:प्राचार्य डॉ. सदाशिव रामचंद्र ऊर्फ स.रा. गाडगीळ--मराठीतील समीक्षक तसेच भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक(जन्म:८ ऑगस्ट १९१६)**१९९९:अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.(जन्म:१८ सप्टेंबर १९१५)**१९९८:जयवंत पाठारे –गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer)* *१९८९:विद्याधर गंगाधर पुंडलिक--मराठीतील एक प्रतिभावान लेखक (जन्म:१३ डिसेंबर १९२४)* *१९८७:गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (जन्म:२४ जून १९०८)**१९५५:गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार,नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार(जन्म:५ जून १८८१)**१९१४:विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे,कविता,निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली.(जन्म:२५ फेब्रुवारी १८४०)**१८९२:रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.(जन्म:१८ फेब्रुवारी १८२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*पहिली भारतीय महिला अंतराळवीर - कल्पना चावला17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. 1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली. 22 मिनिटांत कोलंबिया यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं तो दिवस होता 1 फेब्रुवारी 2003.तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं त्यात कल्पना चावला यांचा ही समावेश होता.संकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने राज्यातील निराधारांना देण्यात येणाऱ्या अनुदानात केली वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढण्याची शक्यता; गेल्या 13 वर्षांतील सर्वोच्च दर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईची हवा खराब! मान्सून माघारी फिरल्यानंतर हवेची गुणवत्ता खालवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाशिकमध्ये मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यलो मोझॅकमुळं 60 ते 70 टक्के सोयाबीन वाया, विदर्भातील बळरीजा संकटात; महसूल मंत्री विखे पाटलांनी केली पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जातीशी गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही, शेवटपर्यंत राजकारणात जाणार नाही, मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेटने मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरोग्यदायी टिप्स .....*कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे. तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) साहित्याचा २०२३ चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारताबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे ?३) 'मिस वर्ल्ड' या स्पर्धेला कोणत्या वर्षी सुरूवात झाली ?४) हिऱ्याचा सर्वाधिक वापर कशासाठी केला जातो ?५) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) जॉन फॉस, लेखक, नार्वे २) मेरीलँड, वॉशिंग्टन, अमेरिका ( १९ फूट ) ३) सन १९५१ ४) दागिने ५) गुरू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागनाथ बळीराम शिंदे, शिक्षक, धर्माबाद👤 नागेश अशोक धावडे👤 हणमंत सावंत👤 पिंटू कटलम👤 कु. स्नेहल श्यामसुंदर ढगे, चिरली👤 कु. पल्लवी मदन ढगे, चिरली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी। तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥ मुखे रामनामावळी नित्य काळीं। जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 विचारवेध............✍🏻🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घन पदार्थ असो किंवा द्रवपदार्थ असो त्यांना एका विशिष्ट परिमाणाने मोजता येते.परंतु मानवी मनाला मात्र कोणतेही परिमाण नाही.अशा मनाला लांबी,रुंदी,उंची आणि वजनही नाही.मग मनाचे जर कोणते परिमाण असेल तर ज्या मनाने माणसे जोडली जातात त्यावरुन मनाचे वजन किती आहे ते कळेल,ज्यांच्याबद्दल प्रेम आहे,आपुलकी आहे जिव्हाळा आहे आणि त्याचा प्रत्येक माणसाच्या हृदयाशी नि सुखदुःखाशी संबंध आहे ते एक मन मोजण्याचे परिमाण आहे.मनाचे परिमाण नसले तरी मनाचा संकुचितपणा आणि मोठेपणा हे मात्र माणूस माणसांमध्ये वावरत असताना नक्कीच कळतो की,माणसाचे वजन किती आहे.मन निर्मळ,पवित्र आणि लाघवी असले की,बाकीच्या परिमाणाची काहीच गरज नाही.व्यंकटेश काटकर नांदेड संवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*○○ समुद्रातील मासा ○○*एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहुन गेला. समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला,'देश, जात, कुळ या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा'. त्यावर समुद्रातील एक मासा त्याला म्हणाला, 'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस. जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघेही जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण ते कळेल.कोळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल.तात्पर्य : नुसत्या जात कुळ ह्यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते .https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 ऑक्टोबर 2023💠 वार - शनिवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.**१९७१:ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४९:जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना**१९३३:पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.**१९१९:महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.**१९१९:के.एल.एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.**१९१२:हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.**१९०५:पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:जहीर खान – भारतीय जलदगती गोलंदाज**१९७८:प्रिती तडस-वाडीभस्मे--कवयित्री लेखिका**१९७८:नवनाथ एकनाथ ठाकूर-- कवी**१९६७: अमृता संखे -- कवयित्री* *१९६५:डॉ.बळवंत हिरामणजी भोयर-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६०:आश्विनी भिडे-देशपांडे –लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका**१९५५:विश्राम गुप्ते-- मराठीतले आघाडीचे कादंबरीकार,समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध**१९५५:डॉ.लीना सुधाकर जोशी-- लेखिका**१९५५:घनश्याम डोंगरे -- कवी,कथाकार संपादक (मृत्यू:११ नोव्हेंबर २००५)**१९५४:दीपक करंदीकर-- गझलकार**१९५३:डॉ.अनिल नारायणराव कुलकर्णी-- लेखक* *१९५२:व्लादिमीर पुतिन - रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष**१९४९:-रवींद्र महाजनी: मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक(मृत्यू:११ जुलै २०२३)**१९४८:डॉ.ललिता मोहन कुंभोजकर -- लेखिका* *१९४१:उषा खन्ना-- हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय संगीत दिग्दर्शिका**१९३९:प्रा.प्रल्हाद विठ्ठलराव पांढरकर-- लेखक**१९३३:नामदेवराव दिवटे-- माजी खासदार तथा लेखक (मृत्यू:१८ जुलै २०१५)**१९३१:प्रा.त्र्यंबक महाजन-- लेखक, समीक्षक,संपादक* *१९३१:दिनेशचंद्र विश्वनाथ आठल्ये -लेखक**१९२७:मृणालिनी प्रभाकर देसाई --कादंबरीकार(मृत्यू:२९ नोव्हेंबर १९९४)**१९२१:जयवंत दत्तात्रेय जोगळेकर--समीक्षक, भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक, युद्धशास्त्र अभ्यासक(मृत्यू:१६ जुलै २०१६)**१९१७:विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू:१३ मे २०१० )**१९१४:बेगम अख्तर – गझल,दादरा आणि ठुमरी गायिका.गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.(मृत्यू:३०आक्टोबर १९७४)**१९०७:प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू:२० ऑगस्ट १९९७)**१९००:हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू:२९ एप्रिल १९४५)**१८८५:नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१८ नोव्हेंबर १९६२)**१८६६:कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ –मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५कविता आज उपलब्ध त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही.’केशवसुतांची कविता’हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह.ना.आपटे यांनी प्रकाशित केला.(मृत्यू:७ नोव्हेंबर १९०५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:प्रभाकर पेंढारकर-- मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते. ते मराठी चित्रपटनिर्माते भालजी पेंढारकर यांचे पुत्र होते(जन्म:७ सप्टेंबर १९३३)**१९९९:उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक,अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक,बालसाहित्यकार(जन्म:१५ ऑगस्ट १९२९ )**१९९८:भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री,काँग्रेसचे नेते,पद्मश्री(जन्म:९ फेब्रुवारी १९१४)**१९७५:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९)**१८४९:एडगर अॅलन पो –अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी(जन्म:१९ जानेवारी १८०९)**१७०८:गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म:२२ डिसेंबर १६६६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... डॉ. आनंदीबाई जोशी ...आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या.गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करीत होते, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः लोकहितवादींची शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी कळल्यावर लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ठरल्या.पुढील भागात :- अंतराळवीर कल्पना चावलासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधील मृत्यूबाबत देऊ नका, मूलभूत सुविधा पुरवणे हे सरकारचे काम; उच्च न्यायालयाने खडसावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निवडणूक आयोगाकडून घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता, निर्णय देईपर्यंत चिन्ह गोठवू नका, शरद पवार गटाचा प्रतियुक्तीवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरेगावात भीषण अग्नितांडव, आठ जणांचा मृत्यू, 58 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बांगलादेशचा पराभव करत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारली धडक!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पाकिस्तानने नेदरलँडवर 81 धावांनी मिळविला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्सत्वचेचे उन्हापासून संरक्षण करा. त्वचेची काळजी घेण्याची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय. सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या, त्वचेवर डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात व त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो.म्हणूनच उन्हात जाताना कमीतकमी 15 च्या SPF सह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. ढगाळ वातावरण असले तरीही सनस्क्रीन लावा, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. कारण या काळात सूर्याची किरणे सर्वात तीव्र असतात.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्यांचे शर्ट व फुलपँट घाला. शक्य असेल तर मोठ्या हॅटने तुमची त्वचा झाकून टाका धूम्रपान टाळा. धूम्रपानामुळे तुमची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात. धुम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते. धुम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घ काळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणी वापरा.हार्श साबण वापरू नका. साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात. त्याऐवजी, सौम्य प्रकारचा साबण वापरा.आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यापूर्वी शेव्हिंग करताना शेव्हिंग क्रीम, लोशन किंवा जेल लावा. तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा. केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेविंग करा. आंघोळ केल्यावर किंवा चेहेरा धुतल्यानंतर त्वचा खसाखसा न पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून कोणाला सुख देऊ नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा म्हणतात ?२) २०२३ ची 'मिस वर्ल्ड स्पर्धा' कोणत्या देशात होणार आहे ?३) गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?४) अलीकडेच गुगल या सर्च इंजिनला किती वर्षे पूर्ण झाली आहेत ?५) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची राजधानी कोणती होती ? *उत्तरे :-* १) गोदावरी नदी २) भारत ( १६ डिसेंबर ) ३) धर्मरावबाबा आत्राम ४) २५ वर्षे ५) महेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दिपाली सावंत, क्रियाशील शिक्षिका, वर्धा👤 जादू पतंगे, वसमत👤 साईनाथ औरोड👤 दत्तात्रय देवकत्ते👤 योगेश गाडे👤 साईनाथ सावंत👤 साया रेड्डी चाकरोड, धर्माबाद👤 सुदर्शन कदम👤 रवींद्र शेळके👤 अभिषेक निगम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची। अहंतागुणे यातना ते फुकाची॥ पुढे अंत येईल तो दैन्यवाणा। म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारवेध*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रयत्न करणारी माणसं कधीच आपल्या नशिबाला दोष देत नाहीत. कारण त्यांना माहित असते की, आपले नशीब घडवायचे असेल तर प्रथम आपल्या प्रयत्नांना कधीच कमकुवत करायचे नाही आणि जर का प्रयत्न कमी पडत असतील तर त्यात सातत्य अधिक ठेवायला हवे. मग आपल्या नशिबाचे दार आपोआपच खुलते. परंतु जर का प्रयत्नांना थांबवून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच सफल होणार नाही. मग नशिबालाच दोष देत आपला हात डोक्याला लावून काहीच उपयोग होणार नाही हे तितकेच खरे आहे. नशिबाला नेहमी आपल्या प्रयत्नांची आणि सातत्याची जोड द्यायला हवी.- व्यंकटेश काटकर,नांदेड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••○○लहान झाड○○नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वा-याने माझ्यासारखं मोठ झाड पाडलं, त्या वा-याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास? त्यावर लहान झाडाने उत्तर दिले , 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वा-यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'तात्पर्य : समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे. तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते ब-याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 ऑक्टोबर 2023💠 वार - शुक्रवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८७:फिजी प्रजासताक बनले.* *१९८१:इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या**१९७३:इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्ला केला.**१९६३:पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.**१९४९:पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.**१९२७:’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.**१९०८:ऑस्ट्रियाने बोस्निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९६ : विशाखा समाधान बोरकर-- कवयित्री,लेखिका* *१९८४: प्रा. शिवाजी जोगदंड-- कवी लेखक**१९८१:सतीश कोंडू खरात-- कवी* *१९७८:श्वेता मेहेंदळे-- मराठी अभिनेत्री**१९७२:सलील कुलकर्णी – संगीतकार**१९७०:प्रिया धारुरकर -- कवयित्री,लेखिका* *१९६७:खुशाल दादाराव गुल्हाने--कवी**१९६२:प्रदीप देविदासराव कुलकर्णी-- लेखक संपादक**१९५८:प्रा.डॉ.रमेश अंबादास जलतारे -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९४९:निरंजन हरिश्चंद्र उजगरे-- कवी, लेखक व अनुवादक(मृत्यू:१२ डिसेंबर २००४)**१९४८:नंदा अरुण कुलकर्णी-- कवयित्री**१९४६:विनोद खन्ना – प्रसिद्ध अभिनेते,चित्रपट निर्माते व माजी खासदार( मृत्यू:२७ एप्रिल २०१७)**१९४६:टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (मृत्यू:२९ डिसेंबर २०१२)**१९४५:देविदास रामचंद्र इंदापवार-- प्रसिद्ध कवी,लेखक,गायक* *१९४५:डॉ.सुरेश गरसोळे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४३:डॉ.रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक,साक्षेपी समीक्षक व संशोधक (मृत्यू:२० फेब्रुवारी २०१२)**१९३६: गोविंद गोपीनाथ कुलकर्णी -- लेखक, व्याख्याते* *१९३०:वसंत निनावे-- ज्येष्ठ गीतकार(मृत्यू: १० जून १९८८)**१९३०:रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक**१९१४:थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (मृत्यू:१८ एप्रिल २००२)**१९१३:वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – सुप्रसिद्ध कवी.तसेच अनेक ललित,स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत.(मृत्यू:८ सप्टेंबर १९९१)**१९१२:डॉ.हरी जीवन तथा एच.जे.अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ,प्राध्यापक (मृत्यू:२२ नोव्हेंबर २०००)**१८९३:मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९५६)**१७७९:माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला. (मृत्यू:२० नोव्हेंबर १८५९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे माजी मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (जन्म:१५ जानेवारी १९२१)**२००७:एल.एम.सिंघवी – माजी लोकसभा सदस्य,कायदेपंडित,विद्वान,मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत(जन्म:९ नोव्हेंबर १९३१)**१९८१:अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२५ डिसेंबर १९१८)**१९७९:महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी (जन्म:५ ऑगस्ट १८९०)**१९७४:व्ही.के.कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री(जन्म:३ मे १८९६)**१९५१:विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (जन्म: ७ एप्रिल १८६०)**१८९२:लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (जन्म:६ ऑगस्ट १८०९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारतातील कर्तृत्ववान महिला.... मदर तेरेसा ......मदर तेरेसा या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुसऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले.पुढील भागात - डॉ. आनंदी गोपाळ जोशीसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, लेखक जॉन फॉस्से यांच्या कार्याचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी मुंबई मेट्रोचं लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता, सीबीडी बेलापूर ते पेंढर पहिला टप्पा पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, 'मविआ'ने मंजुरी दिलेली विकासकामं रोखण्याचा निर्णय मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत, संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठमोळ्या ओजसला पुन्हा सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 21 गोल्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *World Cup 2023 - पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला नऊ विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये. (२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" कठीण वेळ जास्त काळ टिकत नाही, पण कणखर माणसं शेवटपर्यंत टिकतात. "*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत ?२) 'धाराशिव' या नावाने कोणत्या शहराचे नामकरण झाले आहे ?३) भारतात कोणत्या नदीवर सर्वात लांब रस्ता पूल बनवला आहे ?४) जीवनसत्त्व 'ड' चे रासायनिक नाव काय आहे ?५) शिवरायांनी शाहिस्तेखानाची काय छाटले होते ?*उत्तरे :-* १) १०३ राष्ट्रीय उद्याने २) उस्मानाबाद ३) गंगा नदी ४) कॅल्सीफेरॉल ५) बोटे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रकाश नागोराव चरपिलवार👤 श्वेता अंबाडकर👤 योगेश पाटील संगेपवाड👤 दशरथ बोईनवाड👤 माधव हाक्के👤 प्रा. शिवाजी जोगदंड👤 गोविंदराव धुतीवाले👤 मारोती रेड्डी👤 संभाजी मारोतराव हिवराळे👤 सूर्यकांत मोळे👤 रामरेड्डी अरकलवार👤 नागभूषण भालेराव👤 चिं. मेदांश शिवा वसमतकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।जपे रामनामावळी नित्यकाळीं॥पिता पापरुपी तया देखवेना।जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारवेध*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाने जीवनात वृक्ष बनून प्रत्येकाला सावलीचा आधार देण्याची भूमिका करावी.कारण वृक्ष कधीच स्वार्थी भूमिका करत नाहीत.ते नेहमीच परोपकारी वृत्तीची भूमिका करत असतात.प्रत्येक जीवाला स्वतः अंगावर ऊन झेलून सावली देतात,भूकेल्यांना फळांच्या रुपाने अन्न देतात,एवढेच नाही तर जमीनीची धूप थांबविण्यासाठी प्रयत्न करत प्रत्येक जीवाला शुद्ध हवा देत पर्यावरणाच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण करतात.अर्थात काहीच अपेक्षा न करता ते सतत देण्याचे काम करतात.म्हणून वृक्षासारखे माणसाने देखील अपेक्षा न ठेवता काहीनाकाही इतरांना देण्याचा गुण शिकायला हवा.- व्यंकटेश काटकर, नांदेड🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••●○यशप्राप्ती○●एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.*तात्पर्य :- कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.एका दिवसात यश प्राप्त होत नाही.सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑक्टोबर 2023💠 वार - गुरुवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शिक्षक दिन _* *_ या वर्षातील २७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ’इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ जाहीर**१९९५:कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ’जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर**१९८९:मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.**१९६२:’डॉ.नो’ हा पहिला जेम्सबाँड पट प्रदर्शित झाला.**१९५५:पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.**१९१०:पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.**१८६४:एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:लक्ष्मण मुरलीधर खोब्रागडे-- कवी लेखक* *१९७५:केट विन्स्लेट – इंग्लिश आभिनेत्री**१९७१:अर्जुमनबानो सु.शेख -- कवयित्री* *१९६९:संजीव अभ्यंकर-- लोकप्रिय हिंदुस्तानी गायक**१९६८:प्रा.डॉ.सुरेश दयाराम खोब्रागडे-- कवी, लेखक,संपादन* *१९६७:सुनील मारोतराव लव्हाळे-- कवी, पत्रलेखक**१९६२:लक्ष्मीकांत रांजणे -- कवी लेखक* *१९६०:डॉ.राजीव उन्हाळे -- लेखक* *१९५८:रामदास घुंगटकर-- कवी/गझलकार**१९५८:डॉ.करुणा गोखले-- अनुवादक**१९५६:सुहास रघुनाथ पंडित-- कवी,लेखक**१९५४:डॉ.अशा सतीश लांजेवार-- लेखिका**१९३५:प्रा.डॉ.श्रीधर कृष्ण शनवारे-- विदर्भातील मराठी कवी(मृत्यू:२७ ऑक्टोबर २०१३)**१९३२:माधव आपटे – क्रिकेटपटू**१९३१:राजाराम शिंदे-- पत्रकार,नाट्यलेखक, नाट्यअभिनेते,नाट्यनिर्माते,दिग्दर्शक, नेपथ्यकार,वक्ते**१९२४:जगत मुरारी-- प्रतिष्ठित भारतीय माहितीपट निर्माते,दिग्दर्शक(मृत्यू:१३ एप्रिल २००७)**१९२३:कैलाशपती मिश्रा – गुजरातचे माजी राज्यपाल (मृत्यू:३ नोव्हेंबर २०१२)**१९२३:विजया साने-- लेखिका, बालसाहित्यिक (मृत्यू:२९ ऑगस्ट २०००)* *१९२२:शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार(मृत्यू:२६ एप्रिल १९८७)**१९२२:यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक,लेखक,चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१० मे १९९८)**१८९०:किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते 'हरिजन’चे संपादक होते.(मृत्यू:९ सप्टेंबर १९५२)* *१८८४:हरी रामचंद्र दिवेकर -- वेदविद्याभ्यासक,संशोधक (मृत्यू:१५ आगस्ट १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:यशवंत बाळकृष्ण जोशी--ग्वाल्हेर घराण्याचे गायक (जन्म:१२ सप्टेंबर १९२७)**२०११:स्टीव्ह जॉब्ज – अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (जन्म:२४ फेब्रुवारी १९५५)**१९९७:चित्त बसू –संसदपटू,'फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस(जन्म:२५ डिसेंबर १९२६)**१९९२:बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त,नॉर्वे,ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत(जन्म:११ सप्टेंबर १९१२)**१९९१:रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक,स्वातंत्र्य चळवळीतील नेते (जन्म:३ एप्रिल १९०४)**१९९०:राजकुमार वर्मा – नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण (१९६३)(जन्म:१५ सप्टेंबर १९०५)**१९८३:अर्ल टपर – ’टपरवेअर’चा संशोधक (जन्म:२८ जुलै १९०७)**१९८१:भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार,एकांकिकाकार,पटकथाकार व नाटककार,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक(जन्म:३० ऑगस्ट १९०३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*.. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ..अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.पुढील भागात - मदर तेरेसासंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चंद्रकांतदादांऐवजी अजितदादा पुण्याचे पालकमंत्री,*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, 6 ऑक्टोबरऐवजी 9 ऑक्टोबरला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्था, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महागाईचा भार होणार हलका ! उज्ज्वला योजनेत आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यंदाच्या वर्षीचा रसायनशास्त्रातील माँगी जी. बॉएंडी, लुईस ई. ब्रुस आणि अॅलेक्सी आय. एकिमोव्ह यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा याने कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आजपासून विश्वचषकाला सुरुवात, गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सलामीचा सामना विश्वचषकाला सुरुवात, गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सलामीचा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा... तुमचं आयुष्य बदलू शकते."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणते ?२) पुण्यश्लोक अहिल्याबाईचे नाव कोणत्या विद्यापीठास देण्यात आले आहे ?३) जॉन रस्किनच्या कोणत्या पुस्तकाचा महात्मा गांधींवर प्रभाव पडला ?४) मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करते ?५) सर्वाधिक ६ वेळा कोणत्या देशातील तरुणींनी 'मिस वर्ल्ड'चा मुकुट मिळवला आहे ? *उत्तरे :-* १) युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, अमेरिका २) सोलापूर विद्यापीठ ३) अन टू धीस लास्ट ४) राज्यपाल ५) भारत, व्हेनेझुएला*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुभाष लोखंडे, पांगरी👤 श्रद्धानंद यरमलवाड, धर्माबाद👤 बालाजी घोणशेट्टे👤 किशन पचलिंग👤 काशिनाथ साखरे👤 बोडेला योगेश यादव👤 प्रदीप सोमोसे👤 अमोल सिंगनवाड👤 साईनाथ पवार👤 आकाश जाधव👤 दीपक रामराव कुलकर्णी👤 रविकांत डोळे👤 विशाल फाळके👤 पाशा शेख👤 दीपक पाटील बेळकोणीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥शुकाकारणे कुंटणी राम वाणी।मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🎯 ‼ *विचारवेध*‼✍🏻🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात काही माणसांचा असा एक गोड गैरसमज आहे की,चांगला माणूस रुपाने चांगला असला म्हणजे चांगला आहे,त्याच्या अंगावर भारी वस्त्र घातले आहे म्हणजे चांगला आहे,धनसंपत्तीने श्रीमंत आहे म्हणून चांगला आहे.परंतु हे कधीच शक्य नाही .चांगला माणूस होण्यासाठी त्याच्या अंगी पुढील काही गोष्टी असायला हव्यात.खरा माणूस होण्यासाठी त्याच्याजवळ काही गोष्टी मुळातच असायला हव्यात.जो माणूस इतरांना चांगली वागणूक देतो, इतरांचे सुखदुःख जाणून त्यांच्यासाठी धावून जातो, इतरांना आपले समजून प्रमाणिकपणाची वागणूक देतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांच्या विचारांचा आदर करुन चांगल्या विचारांची देवाणघेवाण करुन माणुसकीचे नाते अधिक चांगले दृढ करतो आणि माणसाला माणूस जोडून माणुसकीचे नाते घट्ट करतो तोच माणूस चांगला असतो.अशाच माणसाला समाज चांगला माणूस म्हणून स्वीकारतो हा खरा शुध्द समज आहे .अशीच माणसे इतरांच्या गळ्यातील ताईत बनतात.- व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद :- 9421839590🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••● सुभेदार व त्याचा घोडा ●एका सुभेदाराचा घोडा खुप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतीचा एक घोडा त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराच वेळ घालवू लागला. एकदा तो घोडा पहिल्या घोड्याला म्हणाला, 'दादा, तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात इतका आनंद वाटतो, याचे कारण काय ? पहिला घोडा म्हणाला, 'कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी जुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. आजकाल मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसांत तूही त्याला आवडणार नाहीस व तुझ्याजागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे'!तात्पर्य :- नव्याचे नऊ दिवस !सौजन्य :- https://ssakolkar.blogspot.com/p/blog-page_52.html?m=1•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 ऑक्टोबर 2023💠 वार - बुधवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक अंतराळ सप्ताह_* *_जागतिक प्राणी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील २७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८३:नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.**१९५७:सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.**१९५९:सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.**१९४३:दुसष,रे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.**१९४०:’ब्रेनर पास’ येथे अॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.**१९२७:गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.**१८२४:मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:गौतम राजू ढोके--कवी* *१९७५:संगीता उत्तमराव भांडवले--कवयित्री लेखिका**१९६७:शशिकांत शिंदे-- कवी* *१९५२:शैलेंद्र सिंग-- भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता**१९५१:मुकुंद मोरेश्वर टाकसाळे--विनोदी लेखन करणारे लेखक**१९५०:प्रा.डॉ.कल्पना सुरेश व्यवहारे -- लेखिका(मृत्यू:२०१४)**१९४९:छगनलाल फौजी पंचे-- कवी* *१९४८:विजय वसंतराव पाडळकर- समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार**१९४४:गुफी पेंटल वालिया-- भारतीय अभिनेता आणि कास्टिंग दिग्दर्शक (मृत्यू:५ जून २०२३)**१९४२: पुष्पा चंद्रकांत देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१९४०: माधुरी वासुदेव चौकीदार -- लेखिका, कथाकार* *१९३७:सुधाकर विनायक जोशी-- लेखक* *१९३७:जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री**१९३५:अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक (मृत्यू:२१ जून १९८४)**१९२८:ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक (मृत्यू:२७ जून २०१६)**१९२२:सदानंद महादेव पेठे--लेखक**१९१६:धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक**१९१४:मधुकर वासुदेव धोंड--मराठी समीक्षक(मृत्यू:५ डिसेंबर २००७)**१९१३:सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका (मृत्यू:१० आक्टोबर २००६)**१९११:नारायण गजानन जोशी-- कवी, छंदःशास्त्राचे अभ्यासक(मृत्यू:८ सप्टेंबर १९८६)**१८२२:रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१७ जानेवारी १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (जन्म:२३ आक्टोबर १९२४)**१९८२:सोपानदेव चौधरी – कवी,कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.(जन्म:१६ आक्टोबर १९०७)**१९७६:वासुदेव वामन भोळे--कथाकार, नाटककार,नाट्यसमीक्षक(जन्म:३० सप्टेंबर १८९३)**१९६६:अनंत अंतरकर – 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक (जन्म:१ डिसेंबर १९११)**१९४७:मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (जन्म:२३ एप्रिल १८५८)**१९२१:’संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ’संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते.(जन्म:९ ऑगस्ट १८९०)**१६६९:रेंब्राँ – डच चित्रकार (जन्म:१५ जुलै १६०६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला**राजमाता जिजाऊ भोसले*भारताच्या वीर माता जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याजवळील निजामशाहच्या सिंदखेड येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधवराव तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाबाईंना लहानपणी जिजाऊ म्हणून संबोधले जायचे.त्या काळी बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळे जिजाबाईंचा विवाहही अगदी लहान वयातच झाला होता. त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. शहाजी राजे भोसले हे विजापूरच्या सुलतान आदिलशहाच्या दरबारातील सेनापती आणि शूर योद्धा होते. जिजाऊ यांनी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण व महाभारतातील धाडसी व शौर्याच्या गोष्टी सांगून मोठे केले आणि त्यांच्यामध्ये असे गुण निर्माण केले, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि निर्भय योद्धा ठरले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना तलवारबाजी, भाला चालवण्याची कला, घोडेस्वारी, स्वसंरक्षण, युद्धकौशल्य यात पारंगत केले.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच पुढे शिवाजी महाराज समाजाचे रक्षक आणि अभिमान बनले. आणि त्यांनी हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि एका स्वतंत्र व महान राज्यकर्त्याप्रमाणे त्यांचे नाव तयार झाले आणि ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले.पुढील भागात - अहिल्याबाई होळकरसंकलन~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिवाळीनिमित्त 100 रुपयात आनंदाचा शिधा, मैदा आणि पोह्याचा देखील समावेश; मंत्रिमंडळाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी मोदींना पंतप्रधान बनवणे महत्त्वाचे, आवश्यकतेप्रमाणे त्याग करा; देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य सरकारकडून आतापर्यंत करण्यात येत असलेल्या तीन विभागांच्या भरती प्रक्रियेमधून 266 कोटी रुपयांचे शुल्क जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी तोडगा काढत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Asian Games 2023 : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, नेपाळचा 23 धावांनी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी*(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले निर्णय अनुभवातून येतात आणि अनुभव चुकीच्या निर्णयांमधून येतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक शांततेचे महान दूत' म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?२) जागतिक प्राणी दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले व्यक्ती कोण ?४) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सेनापती म्हणून कोणाची नेमणूक केली ?५) आंतरराष्ट्रीय टी - २० मधील सर्वात जास्त धावा कोणत्या संघाने पटकावल्या ? *उत्तरे :-* १) महात्मा गांधी २) ४ ऑक्टोबर ३) लालबहादूर शास्त्री ( १९६६ ) ४) तुकोजीराव होळकर ५) नेपाळ, मंगोलिया विरुद्ध ( ३१४ धावा )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय पळशीकर👤 ओमप्रकाश येवतीवाड👤 लक्ष्मण पंदोरे👤 साईनाथ पोरडवार👤 सौ संगिता भांडवले, शिक्षिका, उस्मानाबाद👤 सुरेंद्र माणिकराव गाडेकर👤 धनराज शेट्टीगर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां। निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥ जपे आदरें पार्वती विश्वमाता। म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांशी तुलना करण्यापेक्षास्वकर्तुत्वावर विश्वास ठेवून आपण थोरांचे व ज्यांनी स्वबळावर आपले जीवन जगून जो आदर्श निर्माण केला आहे तसे वागण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. इतरांशी तुलना करताना त्या व्यक्तींनी आपल्या जीवनात पदोपदी किती त्रास सहन केला असेल..सोबत आपत्ती, वाईट परिस्थिती, अडीअडचणी व संघर्ष कशाप्रकारे करून जगून दाखवले असेल किंवा आजही जगत असेल.. या विषयावर ची संपूर्ण माहीती आधी शोधून काढावी. बरेचदा बोलणं सोपे असते पण, त्याप्रकारचे जीवन जगणे तेवढेच कठीण असते. म्हणून बोलण्याआधी व तसे विचार करण्याआधी त्या सर्वच गोष्टी समजून घेतले पाहिजे.कारण फुले तर. .बरेच फुलत असतात पण,सर्वच फुलांचा जन्म काट्यातून होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मोठ्या भावाचा रुमाल*राजू तिसरीच्या वर्गात शिकतो, त्याचा मोठा भाऊ कार्तिकही त्याच शाळेत पाचवीत शिकतो. दोन्ही भाऊ एकत्र शाळेत जायचे. दोघेही वाटेत खूप मस्ती करायचे. कार्तिककडे रुमाल होता, तो नेहमी डेटॉलने धुवून स्वच्छ ठेवायचा. राजू नेहमी भावाकडे पाहतो, त्याला वाटतं भाऊ रुमाल सोबत ठेवतो का ? थोडी घाण असेल तर साफ करायची आणि मग दुमडून खिशात ठेवायची. रुमालाचा गोंधळ त्याला आवडला नाही. राजूला या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या, मोठा भाऊ असं का करतो, असं त्याला वाटायचं, पण त्याला कधीच कळलं नाही. एकदा राजू झुल्यावर डोलत होता, तेव्हा झुल्याचा हात सुटला आणि तो जमिनीवर पडला. जमिनीवर पडताच राजूच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या गुडघ्यातून रक्त वाहू लागले. कार्तिकने आपल्या भावाला पाहताच तो पटकन धावत आला आणि खिशातून रुमाल काढून जखमेवर बांधला. त्यामुळे रक्तस्त्राव थांबला. कार्तिक ताबडतोब त्याच्या भावाला दवाखान्यात घेऊन गेला तिथे डॉक्टरांनी मलम लावून राजूला बरे केले. राजूने तो रुमाल पाहिला जो भाऊ स्वच्छ करून नेहमी सोबत ठेवत असे. ज्याच्यावर तो खूप प्रेम करत होता, तो आता गलिच्छ झाला होता. मोठ्या भावाच्या प्रेमापुढे तो रुमाल फारसा गोंडस नव्हता.संकलन•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2023💠 वार - मंगळवार🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.**१९३५:जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.**१९३२:इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१७७८:ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६९:सुखचंद वाघमारे-- कवी* *१९६८:डॉ.शीतल शिवराज मालुसरे-- लेखिका, कवयित्री,निवेदिका* *१९६६:सुनील बर्वे -- मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते**१९६४:प्रा.डॉ.गंगाधर विठोबाजी कायंदे-पाटील-- लेखक,विचारवंत* *१९६०:श्रीपाद अनिल गोरे-- लेखक* *१९४९:जे.पी.दत्ता – चित्रपट दिग्दर्शक**१९४३:वामन नथुजी तिरबुडे -- लेखक* *१९४२:प्रा.प्रभाकर दत्तात्रय म्हारोळकर-- कवी,लेखक* *१९२८:प्रा.जनार्दन रा.कस्तुरे-- लेखक(मृत्यू:६ ऑगस्ट २००६)**१९२१:रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू:२३ जून १९९६)**१९१९:जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)**१९१४:म.वा.धोंड –टीकाकार (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)**१९०६: गोविंद विनायक देवस्थळी --संस्कृत विषयाचे अभ्यासक,संशोधक(मृत्यू:१४ मार्च १९९४)**१९०३:स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू:२२ जानेवारी १९७२)**१९०२: नारायण माधव सरपटवार-- विदर्भातील जुन्या पिढीतील नामवंत कवी (मृत्यू:२२ मार्च १९८८)**१९०२:केशव रावजी पुरोहित--पत्रकार, कादंबरीकार (मृत्यू:१० फेब्रुवारी १९६१)**१९००:श्रीपाद शंकर नवरे-- लेखक,संपादक(मृत्यू:७ डिसेंबर १९७८)* *१८९८:राधाबाई पांडुरंग आपटे -- कवयित्री, लेखिका* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०:प्रा.पुष्पा भावे-- स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या,समीक्षक,रंगभूमीच्या भाष्यकार( जन्म:२६ मार्च, १९३९)**२०१२:केदारनाथ सहानी – सिक्कीमचे माजी राज्यपाल,दिल्लीचे महापौर(जन्म:२४ आक्टोबर १९२६)**१९९९:शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक(जन्म:१० जानेवारी १९०३)**१९९९:अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म:२६ जानेवारी १९२१)**१९७३:साधना बोस--- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना (जन्म:२० एप्रिल १९७३)**१९५९:दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’- विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(जन्म:२२ सप्टेंबर १९०९)**१९४३:विष्णुपंत पागनीस-- ज्येष्ठ अभिनेते, गायक (जन्म:१५ नोव्हेंबर १८९२)**१८९१:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म:४ एप्रिल १८४२)**१८६७:एलियास होवे– शिवणयंत्राचा संशोधक (जन्म:९ जुलै १८१९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... झाशीची राणी लक्ष्मीबाई ...राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर तर जन्मनाव मनकर्णिका असे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली.मेरी झांशी नहीं दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत. झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.पुढील भागात :- राजमाता जिजाऊसंकलन :- नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यंदाचे मानकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहार सरकारकडून जातीय जनगणनेचे आकडे जाहीर, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय गणना करण्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रपिता महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींचं नमन, 'बापूंची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध'; देशभरात गांधी जयंतीचा उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ठाण्यानंतर आता नांदेड हादरलं! शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा मृतात समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधीमंडळ आयोग दोन दिवसांत निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी माहिती घेणार, तर सुनावणीआधीच दोन्ही गट आमने-सामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दसऱ्यापूर्वी हक्काचे 400 रूपये प्रतिटन न दिल्यास दिवाळी गोड होणार नाही, 'स्वाभिमानी'चा साखर कारखानदारांना ढोल वाजवत इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने झंझावती कामगिरी करताना बांगलादेशचा 12-0 ने धुव्वा उडवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फळांचे महत्व*फळामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने असतात. तसेच फळांमध्ये ८५ ते ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे फळे खाल्याने आपले शरीर dehydrate राहायला मदत होते.आपल्या दैनंदिन आहारात फळांचा समावेश असणे हे आपल्यासाठीच खूप फायद्याचे आहे वेगवेगळे फळांमधून आपल्याला वेगवेगळे महत्त्वाचे घटक मिळतात. फळांचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे आज आपण या लेखातून पाहणार आहोत. फळांमधील तंतुमय पदार्थफळांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात फळांमधून आपल्याला मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळत असतात.यांच्या सेवनामुळे आतड्यांचे आकुंचन – प्रसरण चांगले होते तसेच मलावरोध, पोटात दुखणे, बद्घकोष्ठता या आजारापासून आराम मिळतो. अंजीर पेरू, पेर यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. क जीवनसत्त्वक जीवनसत्त्वाच्या अभावामुळे ‘ स्कर्व्ही’ हा रोग होते. त्यामुळे क जीवनसत्त्वे आपल्यासाठी गरजेचे आहे.आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी अशा फळांमधुन मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व मिळते. त्याचा आपल्याला फायदा होतो(Fruits Information In Marathi). आजारपणात फळांचे महत्त्वआजारी व्यक्तीला शक्यतो फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये सर्व जीवनसत्त्वे, प्रथिने, शरीरासाठी आवश्यक खजिने उपलब्ध असतात. म्हणून आजारी व्यक्ती जर अशक्य झाली असेल तर त्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे त्यांचे पोषण होण्यास मदत होते. फळांचे इतर उपयोगफळांचा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी देखील उपयोग केला जातो. यामध्ये आईस्क्रीम, मिठाई मध्ये फळांचे फ्लेवर वापरले जाते. आमरस, शिकरण यासारखे अन्नपदार्थ हे फळे वापरून तयार केले जातात. सर्व प्रकारची फळे ही आपल्यासाठी उपयोगी आहेत*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःची चूक स्वत:ला कळली की बरेच प्रश्न सुटतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कासवाचे आयुष्य किती वर्षाचे असते ?२) महाराष्ट्रातील नृत्य प्रकार कोणते ?३) जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण आहे ?४) आंतरराष्ट्रीय टी - २० मधील सर्वात वेगवान अर्धशतक कोणी ठोकले ?५) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विमानतळ कोठे आहे ? *उत्तरे :-* १) १५० वर्षे २) लावणी, कोळी नृत्य ३) उसैन बोल्ट ४) दीपेंद्रसिंग ऐरी, नेपाळ ( ९ चेंडू - ६,६,६,६,६,६,२,६,६ ) ५) इंदूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर👤 कु. पूर्वा श्यामसुंदर माडेवार, पुणे👤 नागेश क्यातमवार, शिक्षक, नांदेड👤 साईनाथ राचेवाड, शिक्षक, बिलोली👤 संदीप कडलग, आरमुर, तेलंगणा👤 विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद👤 रणजित चांदवाले👤 पांडुरंग यलमलवाड👤 मारोती नरवाडे👤 शंकर पाटील👤 शंकर दरनगे👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं पाहतां देव हा अन्नदाता। तया लागली तत्त्वता सार चिंता॥ तयाचे मुखी नाम घेता फुकाचे। मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखात असतात कोणाची आठवण येत नाही. आणि दु:खात असताना मात्र आपल्या माणसांची पदोपदी आठवण येत असते. कारण त्यावेळी सुख महत्वाचे वाटत नाही तर आपल्या माणसांच्या साथीची आवश्यकता वाटत असते म्हणून सुखात असो किंवा दु:खात आपल्या माणसांना कधीच विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हा बंधारा मदनात आला. या पोतलीचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा गठ्ठा दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)