✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/04/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एप्रिल फूल दिवस*💥 ठळक घडामोडी● १८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.● १९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.● १९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.● १९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.● २००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.💥 जन्म :-● १५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.● १९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म● १९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.● १८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.💥 मृत्यू :-● एस.एम.जोशी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते, या वर्षात कार खरेदी महागण्याची चिन्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जळगावात जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत कोसळून 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, कुटुंबीयांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा, रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ नाही; राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संपकाळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री, पगारातून 1200 कोटींची कपात, 17 लाख कर्मचाऱ्यांना फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रस्तावित वीज दरवाढीला महावितरणच्या निवृत्त अभियंत्याकडूनच न्यायालयात आव्हान, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2023 : पहिल्या सलामीच्या सामन्यात गुजरात टायटनचा चेन्नई वर सुपर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एप्रिल फुल दिवस*एप्रिल फुल म्हणजे काय ? ही प्रथा कोठे आणि कशी सुरू झाली ? ही माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2023/03/april-fool-day.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतीय रिझर्व बँक ( RBI )*भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे. सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती.संसदेत ६ मार्च १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण) जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, १६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आयच्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते.रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रा हा भारतीय रिझर्व बँकच्या विशेष विभागांपैकी एक आहे ज्याद्वारे ते भारतीय बँक नोटा आणि नाणी टाकतात.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणुकीचा विस्तार करणे आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे दोन नवीन योजना सुरू केल्या. दोन नवीन योजनांमध्ये आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना यांचा समावेश आहे.सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३० जून १९३७ पर्यंत आपल्या पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटवर त्यांची स्वाक्षरी नाही. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर होते. डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले आहेत.*भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत :*◆ भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.◆ भारताची गंगाजळी राखणे.◆ भारताची आर्थिक स्थिती राखणे.◆ भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आळस हा अशा चोर पावलांनीयेतो कि गरिबी त्याला सहजच गाठते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?२) देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?३) मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करतांना 'जसे गरुडाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले आहे ?४) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?५) मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?*उत्तरे :-* १) वड २) गुजरात ३) अण्णाभाऊ साठे ४) ५० मिनिटे ५) छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री हणमंतराव कंदेवार, सेवानिवृत्त शिक्षक, नांदेड( 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा )👤 प्रकाश नांगरे, सहशिक्षक👤 चिं. शंतनू विजय भगत, वाशिम👤 चिं. अमोल गजानन पाटील, हिंगोली👤 गिरीश पांपटवार, धर्माबाद👤 स. सुरजितसिंघ पुजारी, नांदेड👤 दत्ता वंजे, साहित्यिक नांदेड👤 शीतल सांखे, साहित्यिक👤 पवन सुत्रावे👤 मंचक वाठोरे, वाशिम👤 हरिहर पाठक👤 रवि कोटूरवार, धर्माबाद👤 सतिश गर्दसवार, धर्माबाद👤 अनिल पाटील👤 दिगांबर जगदंबे👤 साईनाथ कंदेवाड, करखेली👤 अजय पेटेकर👤 शुभम मुतकुलवाड👤 कुणाल दिलीपराव सोनकांबळे👤 मनिषा जोशी👤 सदाशिव मोकमवार👤 विनायक भाई राजयोगी👤 सोमेश पाटील सूर्यवंशी👤 शहाजी गोरवे👤 संध्या जिरोणेकर👤 नयनतारा किरण कुलकर्णी, खारघर, मुंबई👤 राम कोयलवाड, नांदेड👤 इंजिनिअर नागेंद्र अलीशेट्टी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन समाजप्रबोधन करीत संतानी इतिहास घडविला. सात-आठशे वर्ष उलटून गेली, तरी त्यांचे स्मरण सर्वदूर होते. भक्तीला ज्ञानाची जोड देऊन जे कर्म त्यांनी उभे केले त्याला 'नमस्कार' म्हणूनच हे स्मरण केले जाते. भक्ती प्रकट करण्यासाठी मनामध्ये आसावा लागणारा भाव संताच्या प्रत्येक रचनेत आपल्याला दिसतो. म्हणूनच फकिरीतून उभे राहिलेले त्यांचे संतत्व शतकानुशके, पिढ्यानपिढ्या अढळ राहिले आहे. भवसिंधू पार करण्यासाठी संतानी घालून दिलेली भक्तीची पायवाट हा एक मानवी जीवनासाठी मार्गदर्शक असणारा भाव आहे.**प्रेम, ज्ञान, सुमार्ग, मनोरंजन, दया, क्षमा, शांती आणि आनंद हे सगळे रस्ते संतानी आखिल मानव जातीसाठी मोकळे करून दिल्यामुळेच माणसात देवत्व शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक नव्या पिढीत काही लोकांनी केला. त्यामुळे अगणित जणांचे आयुष्य सुखकर झाल्याच्या गोष्टी आपण ऐकू वाचू शकतो. जीवन आनंदी असणे आणि कोरडे असणे यातला भाव एकदा कळला की, सुलभता, सोपेपणा वाट्याला येते. दु:ख तर प्रत्येकाच्या आयुष्यात असते. त्यापासून कुणाचीही सुटका नाही. पण त्या दु:खाला योग्य तो उतार मिळावा आणि प्राप्त परिस्थितीत परमानंदाने व्यापून जाणे यासाठी संताचा भक्ती-विचार आपल्याला पावलोपावली मदत करीत राहतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ स्वार व त्याचा घोडा ❃* *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले. *_तात्पर्य_* *जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31/03/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १८६७ - प्रार्थना समाजची स्थापना.● १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.● १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.● २००१ - भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.💥 जन्म :-● १८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी 💥 मृत्यू :- ● २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग● २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हार्वर्ड विद्यापीठाच्या HSSPA संस्थेच्या अध्यक्षपदी अभिषेक सूर्यवंशी यांची निवड, मराठी माणसाला मिळाला हा मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक नवीन संसदेच्या इमारतीत अवतरले, कामाचा घेतला आढावा, संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी 1200 हून अधिक खासदार बसण्याची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशभरात राम नवमीचा उत्साह, शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, मराठवाड्यात रामजन्मोत्सव धुमधडाक्यात, छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यात उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवसात 694 रुग्णांची भर, 14 दिवसात तिप्पट रुग्णवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी व्यवस्था बनली निष्क्रिय आणि शिथिल, वेळेवर काम करत नसल्याचे ताशेरे ; द्वेषयुक्त वक्तव्यांवर सुप्रीम कोर्टाचा संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयपील 2023 : चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये कांटे की टक्कर, आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार लढत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *BCCI चा पाकिस्तानला दणका! आशिया कपचं यजमानपद काढून घेतलं, आशिया कप 2023 संयुक्त अरब अमिराती (UAE) किंवा कतार येथे आयोजित केला जाण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सैनिक : देशाचा संरक्षक*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हापूर*कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील मोठे शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. येथील महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. पंचगंगा इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. छत्रपती शाहूमहाराजांच्या काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध आहे.कोल्हापूर हे शहर व इथली माणसं ही मन जिंकून घेतात. कोल्हापूर हे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे तसेच कोल्हापुरी चपल ही खूप प्रसिद्ध आहे .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊची भेळ प्रसिद्ध आहे.हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. श्री करवीर निवासिनी चे मंदिर खूप सुंदर आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला ?२) बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतांना व्याजदर द्यावा लागतो, त्यास काय म्हटले जाते ?३) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?४) भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते ?५) गीत सेठी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*उत्तरे :-* १) सन १९०१ २) रेपो दर ३) ५९ टक्के ४) सिक्कीम ५) बिलियर्ड्स*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राम शेवडीकर संपादक, उद्याचा मराठवाडा👤 वंदना गुरुपवार, नांदेड👤 गंगाधर बेलूरवाड👤 एस. जे. पल्लेवाड👤 विश्वनाथ आडेराव, धर्माबाद👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद👤 सचिन अनमूलवाड👤 उस्मान चाऊस👤 वरद राजेंद्र चिंतलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती॥ जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.**ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !**एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कुरुक्षेत्रात युध्दभूमीवर जेव्हा कर्ण व अर्जुन समोरा-समोर आले तेव्हा,कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या! दिशेने सोडले. प्रत्येकाला वाटले की, आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करणार...तितक्यात,श्रीकृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला. रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेध न घेता मुकुट उडवून गेले. नंतर, सूर्य अस्ताला गेल्यानंतर जेव्हा, युध्द विराम होत असे. तेव्हा, पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे.जेव्हा पूर्ण युध्द संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, "पार्थ, आधी तू रथाच्या खाली उतर."त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरला.त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्यांचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतरच स्वतः रथाच्या खाली उतरला. दोघेही थोडे पावले चालून गेली तोच, रथाने धड धड करत प्रचंड पेट घेतला.जमलेले सर्व जण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते. तेव्हा अर्जुन म्हणाला, आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला "अरे श्रीकृष्णा हा काय प्रकार आहे? "तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, "युध्दात जितके शस्त्र-अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते, ते माझ्या मुळे तुला स्पर्श ही करू शकले नाहीत. ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या भोवती फिरत राहिले व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा ह्या अस्त्रांचा परिणाम आता तु पाहत आहेस."त्याच प्रमाणे मानवी देह आहे. जोपर्यन्त परमेश्वरानेआपले जीवनरुपी लगाम पकडले आहेत तो पर्यंत आपल्या देहात प्राण, आनंद ,सुख ,ऐश्वर्य नांदत आहे. पण जेव्हा तो आपणास सोडतो.. तेव्हा आपलीही अवस्था त्या रथासारखीच होते*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १८५७ : क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.● १९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.💥जन्म :- ● १९२९ : उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता💥मृत्यू :- ● १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.● १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.● १९९७ - श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदरात वाढ. या आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के असेल व्याजदर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत होणार वाढ, पेनकिलर, ॲंटिबायोटिक तसेच हृदयरोगपर्यंतच्या सर्व औषधांच्या किंमतीत होणार वाढ. महागाईने हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर वाढणार बोजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वसामान्यांना मोठा दिलासा, पॅन आणि आधार लिंक करण्यासाठीच्या मुदतीत वाढ , आता नवीन अंतिम मुदत 30 जून*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे- अहमदनगर रेल्वे सुरु करा; प्रवाशांची मागणी, केंद्रीय रेल्वे समितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन रेल्वे बोर्डाच्या अखिल भारतीय रेल्वे प्रवाशी सेवा सुविधा समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले 'योग्य निर्णय'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बनावट औषध प्रकरण - केंद्र सरकारची मोठी कारवाई ! 20 राज्यातील 18 फार्मा कंपन्यांची मान्यता रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लिट. पदवी प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुन्या चालीरीती आणि कोरोना काळ*लहान असतांना घरातले वाडवडील मंडळी काही गोष्टी आवर्जून करायला सांगायचे त्याचे महत्व आज कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून जी काळजी घेत आहोत, ती काळजी फार पूर्वीपासून आपल्या देशात घेतल्या जात होती याची प्रचिती येते. बाहेरून एखादा व्यक्ती मग ते घरातील सदस्य असो वा पाहुणे घरात येत असेल तर त्याला सर्वप्रथम हातपाय धुण्यास सांगितले जाते. ग्रामीण भागात आज ही हात पाय धुण्याची जागा ही घरात प्रवेश करण्यापूर्वीच असते. घरातल्या मुलानी बाहेर खेळून आले की, आई त्यांना हातपाय धुतल्याशिवाय घरात येऊ देत नाही. त्यामागे कारण हेच असू शकते की, बाहेरील कोणते जीवजंतू घरात प्रवेशित करू नये आणि त्याचा त्रास इतरांना होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जायची. घरात बाळंतपण झालेली असेल तर आई सर्वाना बजावून सांगत असे की, हातपाय धुतल्याशिवाय कोणीही बाळाजवळ येऊ नये. त्याचे ही कारण तसेच होते, लहानसे बाळ जीवजंतूला लवकर बळी पडतात, त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती देखील खूप कमी असते. म्हणून प्रत्येक घरातली आई अशी काळजी घेत. कुणाच्या अंत्यविधीला जाऊन आले की, अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करणे त्याज्य होते. अंत्यविधी ह्या प्रक्रियामध्ये अनेक जीवजंतू आसपासच्या परिसरात वावरतात आणि अंत्यविधीमध्ये सहभागी झालेल्या सर्वाना त्याचा संपर्क होऊन घरात जीवजंतू येऊ नये म्हणून अंत्यविधी करून आल्यावर अंघोळ करण्याची प्रथा योग्य वाटते. त्यानंतर महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी पाच दिवस सर्वांपासून वेगळे राहणे यात देखील असेच काही कारण आहे असे वाटते. आज आपण ज्या पद्धतीने विलगिकरण पद्धत पाहत आहोत ते काही अंशी येथे लागू पडत असेल असे वाटते. संसर्ग आणि संपर्कातुन प्रसार पावणारे रोगांचे फैलाव रोखण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही. जुने जाणते लोकं काही प्रथा किंवा चालीरिती पाळत असत, त्याचे शास्त्रीय कारण त्यांना कदाचित माहीत नसेल पण जीवजंतू, विषाणू, सूक्ष्मजीव घरात येऊ नये म्हणून ते फार पूर्वीपासून काळजी घेत आले आहेत. तेंव्हा आपणही साध्या साध्या बाबी काळजीपूर्वक करू या. कोरोनासारख्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी नियमित हातपाय धुणे, परक्याशी संपर्क न करणे, घराबाहेर न पडणे, शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्कचा वापर करणे इत्यादी बाबी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी पाळलेच पाहिजे.लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*श्रीमती पुपुल जयकर*(११ सप्टेंबर १९१५: इटावा, उत्तर प्रदेश,- २९ मार्च १९९७ : मुंबई, महाराष्ट्र) या इंग्लिश लेखिका होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या. पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली, ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत टिकली.लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले.इ.स. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेरअली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला.पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या पुढे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष झाल्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अपयशाच्या कठीण खडकाखालीचयशाच्या पाण्याचा झरा असतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तिबेटचा तिसरा धर्मगुरू म्हणून दलाई लामा यांनी कोणत्या ८ वर्षीय मुलाची निवड केली ?२) पहिले WPL ( वुमन प्रीमियर लीग ) चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?३) जिल्हा परिषद सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असते ?४) पृथ्वीचा आकार कसा आहे ?५) महाराष्ट्रात अपंगांसाठी पहिली बाग कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) मंगोलियन मुलाची २) मुंबई इंडियन्स ३) ७५ सदस्य ४) ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर ( जिओइड ) ५) नागपूर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दुष्यंत भाऊ सोनाळे, नांदेड👤 पंकजकुमार पालीवाल, सहशिक्षक👤 प्रदीप मनुरकर, धर्माबाद👤 उदय पवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 धीरज कोयले👤 पिराजी शेळके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा रामनामे वदा पुर्णकामें। कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥ मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत कबीर म्हणतात..."बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय."**'आदर्श व्यक्तिमत्व' एका दिवसात बनू शकत नाही. या जगात वाईटाचा शोध घेतला तर सर्वात वाईट आपण स्वत:च सापडतो.**'शिल्पकार' जसा एखादे शिल्प घडविताना, त्यातील नकोसा भाग काढतो व हवासा भाग ठेवून एक देखणे शिल्प तयार करतो. तद्वतच आपल्यातील दोष शोधून,ते काढून टाकून एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' बनण्याचा 'संकल्प' हिच खरी 'घटस्थापना.'**हि विधायक 'घटस्थापना' झाली कि आपोआपच ह्रदयात 'मानवतेची प्रतिष्ठापना' झालीच म्हणून समजा.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचा एक हसरा चेहरा इतरांसाठी खूप काही आनंद देऊन जातो. तुमच्या हस-या चेह-याकडे पाहून समोरच्या जीवनात कितीजरी दुःख असले तरी तो काही क्षण विसरुन तर जातोच पण दुसऱ्या क्षणी तो विचार करतो की,आपला रडका आणि पडका चेहरा करून राहिल्याने दु:ख थोडेच कमी होणार आहे असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. आपल्या चेह-यामुळे तर आपल्यासह समोरचाही चिंतेत पडतो आणि त्याच्या चेहऱ्यावर असणारा थोडा बहुत आनंदाला पारखा होतो एवढेच नाही तर त्याचा आनंद आपण हिरावून घेतल्यासारखा वाटतो. इतरांना आनंद देण्यापेक्षा आपण दु:खच देत आहोत आणि त्यांचे कारण आपणच आहोत असा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने कितीजरी दुःख असले तरी आपल्या चेहऱ्यावर थोडे तरी हास्य फुललेले असू द्यावे.©️ *व्यंकटेश काटकर,नांदेड* 9️⃣4️⃣2️⃣1️⃣8️⃣3️⃣9️⃣5️⃣9️⃣0️⃣🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ युक्ती ❃* सूर्य आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकटधरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली . *_तात्पर्य_* नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही .*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/03/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले● १९९२ : भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.● १९९८ : सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणकदेशाला अर्पण केले💥जन्म● १८६८ : मॅक्झिम गॉर्की, रशियन लेखक.● १९२६ : पॉली उम्रीगर, भारतीय क्रिकेटर💥मृत्यू● १९८४ : स्वातंत्र्यसंग्रामातील थोर पुढारी भाऊसाहेब रानडे.● १९९२ : आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.● २००० : शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ज्ञ आणि लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पहिली ते बारावीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम NCERT बदलणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरु करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरणकडून कृषीपंपधारकांसाठी सवलत योजना जाहीर, 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कृषिपंपाची 70 टक्के थकबाकी भरली तर 30 टक्के रक्कम माफ होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठवाड्यात आत्तापासूनच जाणवू लागली पाणीटंचाई, हिंगोलीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे स्थालंतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रत्नागिरीत समुद्रसपाटीपासून अंदाजे 390 मीटर उंचीवर 'रामगड' नावाचा किल्ला आढळून आल्याचा दुर्ग अभ्यासकांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईतही वाढता कोरोना! पालिकेने वाढवली रुग्णालयातील बेडची संख्या, कोरोनाचा वेग वाढला! देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजार पार, सुमारे दोन हजार नवे रुग्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आधार क्रमांक पॅन कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 अशी आहे. एक एप्रिल 2023 पासून लिंक नसलेले पॅन होतील निष्क्रिय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात घेऊ या काळजी* मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८ ते ४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल किंवा काळा गॉगल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक शाळांनी तयार करावे. काही दिवसांत शाळेतील परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली केव्हाही बरे. म्हणून आपण ही काळजी घ्या आणि इतरांना काळजी घ्यायला सांगू या. लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *क्रिकेटपटू पॉली उम्रीगर*२८ मार्च १९२६ रोजी सोलापूर येथे पॉली उम्रीगर यांचा जन्म झाला. पॉली उम्रीगर यांचे मूळ नाव पहलान रतनजी उम्रीगर. त्यांच्या वडिलांची कापडाची कंपनी होती. नंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले. पॉली उम्रीगर यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९४४मध्ये झालेल्या बॉम्बे पेंटॅग्युलर स्पर्धेत ते पारसी संघातर्फे खेळले. हा त्यांचा प्रथम श्रेणीतील पहिला सामना. त्या वेळी ते अठरा वर्षांचे होते. १९४८मध्ये भारतीय कसोटी संघात त्यांची निवड झाली. वेस्ट इंडिजविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. १९५५ ते १९५८ या काळात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. पॉली उम्रीगर मध्यम फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. १९६२ साली ते कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्या वेळी त्यांनी इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूपेक्षा अधिक म्हणजे ५९ कसोटी खेळल्या होत्या. त्यांची धावसंख्याही त्या वेळच्या भारतीय फलंदजांपेक्षा अधिक होती. त्यांनी एकूण ३६३१ धावा काढल्या. त्यात बारा शतकांचा समावेश होता. त्या वेळी भारतात सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्यांच्या नावे होता. सुनील गावस्कर यांच्यापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके उम्रीगर यांच्या नावावर होती.पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्विशतक ठोकले होते. पॉली उम्रीगर यांचे निधन सात नोव्हेंबर २००६ रोजी झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" जीवनाचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही, दुःख भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२१ चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' कोणाला प्राप्त झाला आहे ?२) जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी किती असते ?३) पृथ्वीच्या परिभ्रमणचा कालावधी किती आहे ?४) 'उगवत्या सूर्याचे राज्य' असे कोणत्या राज्याला ओळखले जाते ?५) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ? *उत्तरे :-* १) आशा भोसले २) ५० सदस्य ३) ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे, ५४ सेकंद ४) अरुणाचल प्रदेश ५) गुरू *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वानंद बेदरकर, नाशिक👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा साहित्यिक, वसमत👤 कवी स्टीफन कमलाकर खावडिया👤 पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, नांदेड👤 जयवर्धन भोसीकर👤 किरण कदम👤 प्रल्हाद धडे👤 रमेश राजफोडे👤 हर्ष प्रदिपकुमार मुक्कावार, उदगीर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*【माझ्या फेसबुक अकाउंटवरून वाढदिवसाची माहिती संकलित केली जाते. 】[ आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक वर follow करावे किंवा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुखानंदकारी निवारी भयातें। जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥ विवेके त्यजावा अनाचार हेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ? बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!**कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?**" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्या चेह-यावरचे थोडे हास्य द्या कारण तुमच्या थोड्या स्मितहास्याने इतरांच्या जीवनात असलेल्या दुःखाचा विसर काही काळ दूर होऊ शकेल.जर तुम्हाला कधी कुणाला द्यायचेच असेल तर तुमच्याकडे असणारे थोडे सहकार्य द्या की ज्या सहकार्यातून इतरांना जीवनात चांगले जीवन जगण्याचे बळ मिळेल.जर तुम्हाला द्यायचेच असेलतर थोडे प्रेमही द्यायला विसरु नका. कारण तुमच्या अंतःकरणातील प्रेमामुळे इतरांच्याजीवनात चैतन्यानेजगण्याची पालवी बहरेल.हाच तर तुमच्या आमच्या जगण्यातला माणुसकीचा खरा अर्थ आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ सचोटी ❃* *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’ *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागतिक रंगभूमी दिवस*💥 ठळक घडामोडी● १९९२ : ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.● २००४ : नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.💥जन्म● १७८५ - लुई सतरावा, फ्रांसचा राजा💥मृत्यू● १८९८ : सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवयवदानासाठी पुढे यावं, त्यासाठी कोणतीही अट नाही; मन की बातमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेडमध्ये केसीआर यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आव्हान, म्हणाले, तेलंगणातील शेतकरी कल्याणकारी कार्यक्रम आपल्या राज्यात राबवून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *इस्रोच्या सर्वात मोठ्या रॉकेटने 36 वनवेब उपग्रह यशस्वी झेपावले, सलग सहाव्यांदा दिमाखदार कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ, मुंबईत नागरिकांच्या जीवाशी खेळ; तीन जणांना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विधानपरिषदेचे 125 तास तर विधानसभेचे 165 तास कामकाम; दोन्ही सभागृहात 17 विधेयके संमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई -सोलापूर वंदे भारत ट्रेन सुसाट; 32 दिवसांत 4.3 कोटी रुपयांची केली कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीचा पराभव करत पहिल्या महिला आयपीएल स्पर्धेवर कोरले आपले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्याच्या रंगभूमीवर आपण अनेक भूमिका वठवित असतो. कधी मुलगा म्हणून, कधी भाऊ म्हणून, कधी दिर म्हणून, कधी नवरा म्हणून, कधी वडील म्हणून, कधी काका म्हणून, कधी आजोबा म्हणून, कधी शिक्षक म्हणून, कधी लेखक म्हणून, कधी कवी म्हणून, कधी मित्र म्हणून अबब..... किती त्या भूमिका अगदी सहजपणे लीलया केल्या आहेत. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा .......!~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर सय्यद अहमद खान ( ऑक्टोबर १७, १८१७ - मार्च २७, १८९८ ) हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला. सर सय्यद यांचा राष्ट्रीय सभेला विरोध होता कारण राष्ट्रीय सभा तिच्या धोरणांमध्ये जहाल आहे अशी त्यांची धारणा होती.सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा पर्दापद्धतीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरुवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.● हिंदुस्तानच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हां इंग्राजांकडून किताब● १८६४ ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना● मोहमेडन अग्लो ओरियंटल स्कुलची स्थापना ● २७ मार्च १८९८ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काही मिळविण्याच्या नादात मनुष्य बरेच काही सोडून देत असतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इस्त्रोचे अध्यक्ष कोण आहेत ?२) ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड कशी होते ?३) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ? ४) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?५) गुगलचे संस्थापक कोण आहेत ?*उत्तरे :-* १) एस. सोमनाथ २) थेट जनतेमधून ३) ३ लाख ८४ हजार किमी ४) विल्यम हर्षल ५) सर्जी ब्रिन व लॅरी पेज*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती गायत्री यनगंदेवार, सहशिक्षिका, धर्माबाद👤 स्वरुप सुंदरराज वैद्य, नांदेड👤 कल्याणकर साईनाथ, येवती👤 वैदेही चिलका👤 सुनील खंडेलवाल👤 धनंजय मांजरमकर👤 जगदीश्वर भूमन्ना जंगलोड👤 प्रमोद मोहिते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बळें आगळा राम कोदंडधारी। महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मडक्यासाठी लागणारी माती आणण्याला कुंभाराने गाढव पाळलेले असते. गाढव जेव्हा रिकामे असते तेव्हा ते मालकाच्या अंगणात थांबत नाही. ते सरळ उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात बसते. पालापाचोळा साली-टरफले सारे ते मटकावते. प्रत्येक प्राण्याच्या काही त-हा असतात. खाण्याच्या काही सवयी असतात. गाढवाला अगदी गूळपाण्यात भिजवलेली डाळ दिली तरी ते मनापासून खाणार नाही. उकिरड्यावर पडलेले उष्टे अन्न मनापासून खाईल.**माणसांचेही तसेच असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त-हा असतात, सवयी असतात. "विशिष्ट व्यक्तिला विशिष्ट गोष्टीच आवडतात, आणि विशिष्ट व्यक्ति विशिष्ट ठिकाणीच सापडते. त्यांना दुसरीकडे शोधायचे कारण नाही."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकटे राहून कधीच कोणते प्रश्न सुटत नसतात.त्यावर उपायदेखील सापडत नाही.उलट प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्याचा पश्चाताप स्वतःला फार होतो.पश्चातापाचे रुपांतर आपल्या मानसिकतेवर होऊन समोर येणा-या प्रश्नावरदेखील पर्याय शोधू शकत नाही.यासाठी आपल्या सर्व प्रश्नांसाठी कुणाचीतरी मदत घ्यावी लागते.आपल्या प्रश्नाचे उत्तर चर्चेतून किंवा कुणाच्यातरी सल्ल्यानुसार मिळू शकेल.म्हणून एकटे न राहता चार मित्रांच्या सहवासात,वडील माणसांच्या सहवासात आणि चार लोकांच्या समुहात राहणे पसंत करा.त्यामुळे तुम्हीसुखी,आनंदी, समाधानीव मानसिकदृष्ट्या संतुलीत राहाल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ सचोटी ❃* *एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती.* पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्हणाला,’’महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. *ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते*.’’ *_तात्पर्य_ ::~ ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.● अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.💥जन्म● १८९६ : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे.● १९३३ : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर.● १९३२ : व.पु. काळे, मराठी साहित्यिक.💥मृत्यू● १९९३ : सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वाराणसी इथे 1 हजार 780 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पाचं लोकार्पण व पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश केले जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेत 355 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी, 67 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'हाफ तिकीट'मुळे ताई, माई, आक्कांचा प्रवास जोरात; पुणे जिल्ह्यात 3 लाख महिलांनी केला एसटीतून प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *31 मार्चपर्यंत बँकांना राहणार नाही एकही सुट्टी, रविवारीही होईल काम ; आरबीआयने सर्व बँकांना रविवारी शाखा सुरु ठेवण्याचे दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गायिका आशा भोसले यांना सन 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सांगलीची प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरीची विजेती. कल्याणच्या वैष्णवी पाटीलवर प्रतीक्षाची मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1469220069871429&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत पुरुषोत्तम काळे ( वपु )*वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.व.पु.काळे मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार, अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार, असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. ज्या वेळी व.पु.चे निधन झाले. त्याच्या २ वर्षापासून ते एका विचित्र मन स्थितीमध्ये होते. त्यांना निराशा आली होती.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात - व. पु. काळे*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'टायगर कॅपिटल' असे कोणत्या शहराला ओळखले जाते ?२) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार आजही किती टक्के लोक अशुद्ध पाणी पितात ?३) जपानचे पंतप्रधान कोण आहेत ?४) कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप ( मलेरिया ) होतो ?५) आनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला ?*उत्तरे :-* १) नागपूर २) २६ टक्के ३) फुमिओ किशिदा ४) प्लाझमोडियम ५) ग्रेगल मेंडेल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. यश जितेंद्र आमटे👤 राजेश बाहे, अमरावती👤 पिराजी चव्हाण, कृतिशील शेतकरी, धर्माबाद👤 सचिन पेटेकर👤 नेताजी चव्हाण👤 अनिल पेंटावार👤 भीमराव भुरे👤 अभिनंदन एडके, धर्माबाद👤 जगदीश उराडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घनश्याम हा राम लावण्यरुपी। महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥ करी संकटीं सेवकांचा कुडावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.**रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.**महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.**"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजूबाजूला असलेल्या आणि एकसारख्याच दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी फरक दिसतो. काही लोक इतिहास वाचवण्यात वेळ वाया घालवतात, तर काही लोक इतिहास घडविण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करतात. या दोघांतील फरक समजून घेणे, आपल्याला ही उपयोगी ठरू शकते. काही लोकांकडे असे काय वेगळे असते ? ज्यामुळे त्या लोकांना इतिहास घडविणे शक्य होते, या प्रश्नाचे उत्तर शोधावेसे वाटत असतेच. शांतपणे कधीतरी समजून घेतले पाहिजे. डोबळमानाने एक मानाने एक बाब एकसारखी दिसते म्हणजे, त्या काही लोकांमध्ये जिद्द आणि चिकाटी भरपूर असते, तेच लोक इतिहास घडवत असतात. शिवाय, तो दृढनिश्चय टिकवून ठेवणे आणि विकसित करणे, हे खूप कठीण काम ते करत असतात, कारण तीच योग्य पद्धत असते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे लोक इतरांपेक्षा यशस्वी झालेले दिसतात. ते लोक कधीकधी इतरांवर रागावलेले असतात. हा राग येणेदेखील आपल्यासारखेच असते. पण एक छोटासा फरक असा असतो की, या काही लोकांनी त्यांना आलेल्या रागाचे रूपांतर हे संकल्पात केलेले असते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण* एका हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,' या विश्वासाने चरत असे , पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी , होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला. मरतांना हरीण मनात म्हणाले , " अरेरे ! ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला." *_🌀तात्पर्य_ ::~* *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हवामान दिवस*💥 ठळक घडामोडी● १९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला.💥जन्म● १९१० : डॉ. राम मनोहर लोहिया, भारतीय समाजवादी नेते● १९२६ : रविंद्र पिंगे.● १९७६ - स्मृती इराणी, अभिनेत्री व माजी केंद्रीय मंत्री● १९८७ - कंगना राणावत - अभिनेत्री💥मृत्यू● १९३१ सरदार भगतसिंग, सुखदेव, शिवराम राजगुरु या तिघांना लाहोर तुरुंगामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता फ़ाशी देण्यात आली. हे क्रांतीकारक देशासाठी हसतहसत फ़ासावर चढले. हुतात्म्यांचं पुण्यस्मरण.● २००८ - मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील● २०२२ - भारताचे ३५ वे सरन्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर द्या', कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत पंतप्रधानांच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महिलांना एसटी नंतर खाजगी बसमध्येही 50 टक्के सूट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमलबजावणी, महिला प्रवाश्यानी केले निर्णयाचे स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोणताही संप किंवा निदर्शनांमध्ये सहभागी होऊ नका, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 4 दिवस पावसाची शक्यता, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूरसह गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 28 एप्रिल रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत, राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएलनं महत्त्वाचा नियम केला लागू, आता नाणेफेकीनंतरही ठरवता येणार प्लेईंग 11*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जलसाक्षरता : काळाची गरज*https://m.facebook.com/story.php?story_fbid=1939782872815144&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हवामान दिन*जगभरात आज २३ मार्च हा दिवस 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्राबरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे. दरवर्षी त्यासाठी एक थीम ठेवली जाते. या थीमच्या आधारे वर्षभर काम केलं जातं. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था १९५० मध्ये स्थापन केली गेली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. ही संस्था पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकेल. जागतिक हवामान संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक हवामान दिन पाळला जातो. WMO ची निर्मिती १९५० मध्ये झाली आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यात मदत करण्यासाठी बरेच काही उपक्रम केले आहे. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. या आंतरराष्ट्रीय संघटनेचे १९१ सदस्य देश आणि प्रदेश आहेत. ही संघटना पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावण्यास मदत करते जेणेकरून लोकं त्यांच्यासाठी तयार होऊ शकतील आणि कोणतेही नुकसान होणार नाही. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या नियतीचे मालक बनापण परिस्थितीचे गुलाम बनू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक हवामान दिवस - २०२३ ची थीम काय आहे ?३) 'जागतिक हवामान संस्था'चे मुख्यालय कोठे आहे ?४) जागतिक हवामान संस्था केव्हा स्थापन झाली ?५) जागतिक हवामान दिवसाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?*उत्तरे :-* १) २३ मार्च २) जागतिक अन्न प्रणालीला समर्थन देणारी मोजमाप ३) जिनेव्हा, स्वित्झर्लंड ४) २३ मार्च १९५० ५) १९६१*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आचार्य सूर्यकांत, सेवानिवृत्त हिंदी शिक्षक👤 अशोक गड्डमवार👤 संजय मनुरे, हिंदी कवी, धर्माबाद👤 साईनाथ सुत्रावे, माध्यमिक शिक्षक👤 साईनाथ मुलकोड, येवती 👤 विनायक नरवाडे👤 नरसिंग यमेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ धरीं रे मना आदरें प्रीति रामी। नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.**कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण स्वतः केलेल्या कृतीतून मिळालेला अनुभव हा आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. आपण करत असलेल्या कृतीसाठी लागणारे साहित्य कौशल्य, एकाग्रता, पूर्वानुभव, समयसूचकता या गोष्टी शिकायला व अनुभवायला मिळतात. हे आपल्याला दुस-याच्या करण-या कृतीतून मिळत नाही.आपल्याला जो आनंद आणि कृती केल्याचे मनाला समाधान मिळते ते इतरांच्या कृतीतून मिळत नाही. यातून अजून एक आपल्याला स्वावलंबन कसे असते हे देखील शिकायला मिळते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लोभाची शिक्षा*एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस*तात्पर्य –* लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21/03/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक वनदिन* *पृथ्वी दिन**जागतिक कटपुतली दिन**जागतिक कविता दिवस*💥ठळक घडामोडी● १९७१ - जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिले वहिले शतक, ११६ धावा.● १९९२ : भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात सामील झाली● रात्र-दिवस समान असणारा दिवस आहे● २००३ - जळगाव नगरपालिकेची स्थापना💥जन्म● १८४७ - बाळाजी प्रभाकर मोडक● १९१६ : बिस्मिल्ला खाँ, भारतीय सनईवादक.● १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.💥मृत्यू● १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष● १९७३ - नटवर्य शंकर घाणेकर● १९७३ - यशवंत रामकृष्ण दाते, कोशकार२००५ - दिनकर द. पाटील, दिग्दर्शक● २०१० - अर्थशास्त्रज्ञ बाळ गाडगीळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर सुरुच, शेती पिकांचं नुकसान ; नांदेड जिल्ह्याला मोठा फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार, अडीच लाख सरकारी पदं भरणार; राहुल गांधींची कर्नाटकात घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक मंदीची चाहूल... मेटा कंपनीनंतर अमेझॉनमध्ये मोठी कर्मचारी कपात, 9,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, प्रतितोळा दर 62 हजारांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *22 मार्च रोजी होणाऱ्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना टीम इंडिया जिंकून मालिकेवर कब्जा करेल का ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक कविता दिवस त्यानिमित्ताने एक काव्य रचना *।। कविता ।।*शब्द हेच धन शब्द हेच मनशब्दामुळेच जिवंत आहे तनकवितेतील शब्द बोलाविते मलाकवितेतील शब्द जागविते मलाकवितेमध्येच गुंतला माझा प्राणकवितेनेच दिलाय मान सन्मानकविता आहे म्हणून मी आहेकवितेसाठी माझा जन्म आहेकवितेमुळे माझी ओळख झालीयाच कवितेने मला प्रसिद्धी दिलीकवितेने मला नेले सातासमुद्रापारकवितेनेच वाढविला माझा परिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक वन दिवस (International Day of Forests) दरवर्षी २१ मार्चला जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. परंतु दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर (३२ दशलक्ष एकर) पेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत, हे क्षेत्र जवळ-जवळ अंदाजे इंग्लंडच्या आकाराचे आहे. जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात: जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते – जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे. तितकीच महत्त्वाची, निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक 'कार्बन शोषकां'पैकी एक आहेत.जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत. जंगल वाचविणे भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टरबूजमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?२) टरबूजचा उगम कोठे झाला ?३) टरबूजला मराठीत काय म्हणतात ?४) टरबूज खाण्याचे फायदे कोणते ?५) टरबूजला इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) जीवनसत्त्व C, A, B6 २) इजिप्त ( आफ्रिकेच्या कलहरी वाळवंटात ) ३) कलिंगड ४) रोगप्रतिकार शक्ती वाढते, मन प्रसन्न, हृदयरोगावर प्रभावी etc. ५) Watermelon*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनय चव्हाण, उमरखेड, यवतमाळ👤 प्रकाश सालपे, यवतमाळ👤 श्रीधर बिरादार, अचवला👤 पेंडेला अनिल, चिंचालम, तेलंगना👤 शिवा गुडेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना। अती काम त्या राम चित्ती वसेना॥ अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा। अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.**शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अंगी नम्रता असणे, मधुर बोलणे, सत्याचा मार्गावर चालणेआळसाचा त्याग करणे व कठोर परिश्रम करण्याची तयारी असणे या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. जर ह्या गोष्टीपासून दूर झाले तर जीवनात यश मिळणे कठीन होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃* *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले. घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्याने पाहणार्या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.' ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !' *_तात्पर्य_* *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
मागणी जुन्या पेन्शनची👏👏👏👏👏👏 जुनी पेन्शनजगावे कसे?निवृत्तीनंतरनसेल कोणता आधारपेन्शनविना जीवन आमुचेविचार कराना सरकार 😴सरकार मायबाप तुम्हीच आमुचेनका सोडू आम्हास असे वाऱ्यावर......वृद्धपणी काय होईल?कसा पोसावा आम्ही परिवार 👩👩👧👧निवृत्तीनंतरचे दिवस कसे?पेन्शन विना निघणार!आयुष्यभराचे श्रम आमचेसांगा तुम्हा कधी दिसणार? 😎पंधरा वर्षापासून करतो मागणीआम्ही जुन्या पेन्शनचीसंपावर जाण्याची वेळ ही का हो तुम्ही आणायची?🤔देह आमचा परावलंबी सरकार कसे समजेना तुम्हाला पेन्शन आमच्या हक्काची द्यावीच लागेल आम्हाला ✊✊✊✊✊✊वयाच्या आमच्या येईल साठीहाती येईल ओ आमच्या काठीम्हणूनच लढतोय आम्ही सारेजुन्या पेन्शन साठी जुन्या पेन्शन साठी🤝🤝🤝🤝🤝🤝➖➖➖➖➖➖➖✍️ स्वरचित श्रीमती प्रमिला सेनकुडे(स.शि./कवयिञी)ता.हदगाव जि.नांदेड
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/03/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक दिव्यांग दिन*💥 ठळक घडामोडी● १९९७ - मुंबईत ए सी टॅक्सीला सुरुवात💥जन्म● १९०९ - भाषातज्ञ रामचंद्र दांडेकर● १९१० - समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ● १९६२ - भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला💥मृत्यू● १८८२ - विष्णूशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.● १९३७ - बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे● १९५७ - रॅमन मॅगेसेसे फिलिफाईन्सचे सातवे राष्ट्राध्यक्ष● १९५६ - नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ आयरीन क्युरी● २०१९ - गोव्याचे दहावे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेंशन योजना बाबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज चौथा दिवस, राज्यभरात आज ढोल बजाओ आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानपरिषदेत आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता आधार ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही, सरकारने देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना दिला मोठा दिलासा.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात; पंतप्रधानांच्या हस्ते 'जानेवारी 2024च्या तिसऱ्या आठवड्यात स्थापन होणार मूर्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकीकडे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सीरिजला मुंबईत आजपासून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कवयित्री इंदिरा संत*इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ?२) बॉर्डर - गावस्कर चषक २०२३ चा मालिकावीर कोणी पटकावला ?३) महात्मा गांधीजींची फोटो कोणत्या वर्षी नोटांवर छापण्यात आली ?४) मगरला किती दात असतात ?५) नागालँड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) मिशेल योह २) रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा, भारत ३) १९९६ ४) ८० दात ५) नेफ्यू रियो *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाराम उर्फ बाबू गुरुपवार, तळणी, बिलोली👤 किशन आसमोड👤 प्रतिक जाधव👤 अमरसिंह चौहान👤 अंगद मारोती कांडले👤 जयानंद मठपती👤 विलास पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला ॥६२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.**शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संत राबियासंत राबियाची ईश्वरभक्ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्वरनिर्मिती मानून त्यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला. त्याला राबियाच्या घरी धन तर सापडणार नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्याने डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्याला थोपटून पाहिले. तेव्हा त्याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्हा पुन्हा त्याची तीच अवस्थ झाली. चादर खाली ठेवली की त्याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्हा त्याला कोणीतरी म्हटल्याचा भास झाला,’’ तू स्वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्वत:चे अस्तित्व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्हा एक मित्र झोपतो तेव्हा दुसरा जागा असतो. मग त्याची कोणतीही वस्तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या राबियाचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.तात्पर्य :-ईश्वराशी आपण एकरूप झालो की ईश्वरही आपली मनापासून काळजी करतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९९५ - अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली●२००१ - नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार प्रदान२००० - हॉकीपटू धनराज पिल्ले यांना के के बिर्ला पुरस्कार जाहीर💥जन्म● १९०१ - पी. बी. गजेंद्रगडकर, भारताचे सातवे सरन्यायाधीश● १९३६ - चित्रकार प्रभाकर बर्वे● १९३६ - संगीतकार भास्कर चंदावरकर💥मृत्यू● १९४५ - गणेश दामोदर सावरकर, अभिनव भारत संघटनेचे संस्थापक● १९९० - वि स पागे, रोजगार हमी योजनेचे जनक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेंशन योजना :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आज तिसरा दिवस, संपामुळे राज्यतील आरोग्य सेवा झाली विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधीमंडळ कामकाजात मंत्र्यांना रस नाही, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले, देवेंद्र फडणवीस यांची दिलगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रद्दी विक्रीतून सरकारने कमावले 63 कोटी रुपये, 12 लाख चौरस फूट जागाही झाली रिकामी; सरकारची लोकसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं नुकसान, पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने 2341 कोटींच्या परकीय चलनाची बचत ऊर्जामंत्री आर के सिंह यांची राज्यसभेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंदगड आणि आजऱ्यात काजू फळ विकास योजनेसाठी 1,325 कोटी रुपयांची तरतूद; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची सुधारणा तर गोलंदाजीत आर. अश्विन अव्वल स्थानावर कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भ्रष्टाचार बनलाय शिष्टाचार*‘पाचशे रूपयाची लाच घेताना अमूक कर्मचा-यांस अटक’ अशा आशयाच्या बातम्या आत्ता रोजच वर्तमानपत्रातून प्रकाशित होत आहे. कदाचित अशा बातमी शिवाय त्या दिवशीचे पेपर पूर्णच होत नसेल! राज्यात कुठे ना कुठे अशी घटना घडतेच. कारण आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनत चालला आहे. तसेच भ्रष्टाचार करण्यासाठी ही मंडळी मागे-पुढे अजिबात कसलाही विचार न करता इतरांसोबत वागत असतात. सरकारी कर्मचारी त्यास शासनांकडून त्यांच्या कुटूंबाचे पालन पोषण होईल, एवढा पगार मिळतो. तरी सुद्धा त्यांची पैसा कमाविण्याची लालसा काही केल्या कमी होत नाही. मिळेल त्या पगारात जी व्यक्ती समाधानी असते त्याला कुठेच भ्रष्टाचार करण्याची गरज भासत नाही. असे म्हटल्या जाते की, आडमार्गाने कमावलेला पैसा कसा येतो आणि किती येतो हे जसे कळत नाही तसे गेल्याचे सुद्धा कळत नाही. कारण या पैश्यांसाठी आपल्या शरीरातील घाम गळत नाही. घामाचा पैसा असेल तर त्याचा हिशेब सुद्धा लागतो. आजकाल झटपट पैसा मिळविणे आणि आपले जीवन सुखी समृद्ध बनविण्यासाठी प्रत्येकजण आपली नैतिकता वेशीला टांगून अनैतिक कृत्य करीत आहेत. भ्रष्टाचाराची सुरूवात घराच्या दारांपासून सुरू होते ते थेट मंत्रालयाच्या दारात जाऊन पोहोचते. या दरम्यान अनेकांची दारे लागतात, त्या त्या ठिकाणी भ्रष्टाचार दृष्टीस पडतो. म्हणजेच भ्रष्टाचाराची सुरूवात स्वत:पासून करावी लागते. स्वत:पासून मग तो स्वत: खासदार असेल, आमदार असेल, उच्चपदस्थ अधिकारी असेल, साधा कर्मचारी असेल किंवा खाजगी कंपनीत काम करणारा असेल, त्यांनी भ्रष्टाचार करणार नसल्याचे जर ठरविले तर याचा नायनाट होऊ शकतो. महात्मा गांधीजी म्हणतात की, कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून करण्यात यावी. आपण मात्र इतरांकडे बोटं दाखवितो. त्यामुळे कामाची सुरूवात होतच नाही. या भ्रष्टाचाराला सुरूवात अगदी सहजपणे होते, तेव्हा आपणाला असे वाटत सुद्धा नाही की, माझ्यामूळे या भ्रष्टाचाराला सुरूवात झाली. एका कार्यालयातील काम संबंधित कर्मचा-याने अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण करून आपल्या हाती दिल्यानंतर आपल्याला आनंद होणारच. मग त्या आनंदाच्या भरात आपण त्या कर्मचा-याला ‘चला एक कप चहा घेऊ या’ असे म्हणणार. कर्मचारी ही मग आपली टेबल व खुर्ची सोडून चहा पिण्यास जाई. येथूनच मग सुरू होतो ‘चहा-पाण्याचा खर्च’. काही ठिकाणी यापेक्षा वेगळा अनुभव असेल ही कदाचित. परंतु व्यक्ती आपल्या कामाला जेव्हा सुरूवात करतो तेव्हा त्याला कामाची जाणिव अधिक प्रमाणात असते. मात्र जसे जसे सेवा वाढत जाते आणि त्या क्षेत्रात रूळले जातात तसे तसे कामाला प्राधान्य देण्याऐवजी ‘चहा-पानाला’ प्राधान्य देत असतो. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की, भ्रष्टाचाराला सुरूवात कोणी केली, आपण की कर्मचा-याने. प्रत्येक विभागात याचे वेगवेगळे अनुभव येतात जर यदा कदाचित लाच न घेणारा अधिकारी कार्यालयाला भेटला तर त्याचे जीवन हे लोक तंगवून टाकतात. त्याच्यावर वेगवेगळ्या स्तरांवरून दबाव टाकल्या जाते आणि प्रामाणिक असलेल्या कर्मचा-यास सुद्धा या भ्रष्टाचाराच्या खाईत ओढल्या जाते. त्यांची ईच्छा नसतांना सुद्धा जेव्हा भ्रष्टाचार करण्याची पाळी येते तेव्हा त्यांना स्वत:ला पश्चाताप वाटत असेल ही कदाचित परंतु काहीच करता येत नाही. राज्यात असे ही काही विभाग आहेत ज्या ठिकाणी भ्रष्टाचार न करणे एकप्रकारे अप्रामाणिक समजल्या जाते. लाच घेणारा व्यक्ती कामाचा निपटारा तात्काळ करतो, हे सत्य आहे. भ्रष्टाचाराची कीड समाजाला लागली आहे. ती कीड समूळ नष्ट करण्यासाठी आपल्यात बदल करावा लागेल. माझ्या कामांसाठी मी एक ही रूपाया न देता काम पूर्ण करून घेण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे. मग त्यासाठी दहा वेळा चकरा मारले तरी चालेल असा विचार केल्यास यात बदल होऊ शकतो. एखाद्या कर्मचा-यास लाच लुचपत विभागात पकडून दिल्याने समाजातील ही भ्रष्टाचाराची कीड नष्ट होणार नाही. या गुन्ह्यातून सुद्धा अनेक लोक सुटतात त्यामूळे यावर सुद्धा लोकांचा आज विश्वास कमी होत चालला आहे. शेवटी जाता जाता एक बाब सांगावेसे वाटते की, ज्या दिवशी एखाद्या गोष्टीत भ्रष्टाचार करून आपण पैसा कमाविला असेल त्या रात्री आपणांस गाढ झोप लागते का? जर झोप लागत नसेल तर आपण कमाविलेले लाखो रूपये काही कामाचे नाहीत. कारण त्या पैशातून झोप विकत घेता येत नाही. इकडे प्रामाणिक काम करणा-या व्यक्तीला पैसा कमी मिळत असेल परंतु रात्री समाधानाने झोप लागते. त्यासाठी झोपेची गोळी घ्यावी लागत नाही. यावरून प्रत्येकाने विचार करावा आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी स्वत: पहिले पाऊल उचलावे, याशिवाय भ्रष्टाचार संपविणे शक्यच नाही. लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर*बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक व हिंदुमहासभेचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी दामोदर व राधाबाई या सुशिक्षित दाम्पत्यापोटी भगूर (नाशिक जिल्हा)या गावी सनातन वैदिक कुटुंबात झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर होते. पण ‘बाबाराव’ या नावानेच ते सुपरिचित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. आईच्या मृत्यूच्या वेळी (१८९२) ते तेरा वर्षांचे होते, तेव्हा दामोदरपंतांनी बाबांचे लग्न करण्याचे ठरविले आणि यशोदा या मुलीबरोबर ते विवाहबद्घ झाले (१८९६). वडिलांच्या मृत्यूनंतर (१८९९) घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला.विनायकराव व नारायणराव या धाकट्या भावांचा त्यांनी सांभाळ केला आणि त्यांना उच्च शिक्षणही दिले. त्यांच्या देशकार्यातही त्यांनी तेवढाच सहभाग घेतला. नाशिक येथे स्थापन झालेल्या ‘मित्रमेळा’ या क्रांतिकारी व स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे ते कार्यवाह होते (१९००). सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्या ‘अभिनव भारत’ या संस्थेतही त्यांनी हिरिरीने भाग घेतला. क्रांतिकारकांचे संघटन करण्यात ते कुशल होते. बाबारावांनी अबोलपणे अनेक क्रांतिकारकांशी संधान बांधून त्यांना प्रेरणा व उत्तेजन दिले. क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी कवितांची एक पुस्तिका प्रसिद्घ करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्घ युद्घ पुकारले आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हा प्रश्न विचारणारी सुप्रसिद्घ कविता या पुस्तिकेत होती. त्यांना ८ जून १९०९ रोजी जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. येरवड्याच्या (पुणे) तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. ते आजारी पडले. पुढे त्यांची रवानगी अंदमानातील तुरुंगात झाली.अंदमानच्या तुरुंगातून या बंधूद्वयांची १९२१ च्या मे महिन्यात सुटका झाली. बाबारावांना प्रथम विजापूरच्या तुरुंगात व नंतर साबरमती येथील तुरुंगात हलविण्यात आले. तिथे त्यांना भयंकर आजाराने पछाडल्यानंतर १९२२ च्या सप्टेंबरमध्ये त्यांची सशर्त सुटका करण्यात आली तथापि त्यांच्या गुप्तबैठका, विनायकरावांच्या कार्यास मदत इ. कार्य चालू होते. औषधोपचारासाठी बाबा बनारसला जात असत. बनारसच्या बाबारावांच्या मुक्कामात तेथील विद्यापीठातील गोळवलकर गुरुजी, भय्याजी दाणी, तात्या तेलंग वगैरे दिग्गज मंडळी भेटत असत. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांची भ्रमंती चालू होती. त्यांनी महात्मा गांधींची १९३० मध्ये भेट घेऊन सुखदेव, भगतसिंग व राजगुरू या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी विनंती केली होती. मुंबईला एंपायर चित्रपटगृहात बाँबस्फोट झाला. त्याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून बाबारावांना अटक झाली (१० एप्रिल १९३३). या बाँबस्फोटाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता हे सिद्घ होऊनही त्यांना नाशिक येथे स्थानबद्घ करण्यात आले. १८ मे १९३७ रोजी बाबांची बिनशर्त सुटका झाली पण व्याधिग्रस्त शरीरामुळे त्यांना अखेरपर्यंत वेदनांशी सामना करावा लागला. अखेर १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ते ज्ञान काहीही कामाचे नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? ४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) २ - १ ने २) एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स ३) कर्नाटक ४) दुसरा ५) कोनराड संगमा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. सुरेश तेलंग, नांदेड👤 शिवराज भुसेवार, नांदेड👤 कैलास राखेवार, नांदेड👤 अनिलकुमार जैस्वाल, धर्माबाद👤 शिवम भंडारे, धर्माबाद👤 अनिल कांबळे, नांदेड👤 मुरली ईबीतवार👤 साईनाथ बोधनपोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.**जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाते असे तयार करा की, ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे. जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम, जिव्हाळा, मैत्री, आपुलकी इ. गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*यशस्वी क्रियाशीलता*ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !' प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं. एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता ! उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे! यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक ग्राहक हक्क दिन*💥 ठळक घडामोडी● १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना💥जन्म● १८६५ - आनंदी गोपाळ जोशी💥मृत्यू● १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.१९९२ - डॉ. राही मासुम रझा, उर्दू कवी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संपकरी कामगारांवर कारवाई करणारा मेस्मा कायदा संपुष्टात आल्याने हा कायदा पुनर्संचयित करण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले आणि चर्चेविना मंजूर ही करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोना महामारीच्या काळात थांबवण्यात आलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जाणार नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना करत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमेरिकेत आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने आता तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढली, कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी हिंसाचारामध्ये गेल्या 12 वर्षात 77 टक्क्यांची घट झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचं निधन; बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने अपघाती मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान*जीवनात सुखी राहायचे असेल तर सर्वप्रथम समाधान राहायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी निव्वळ धावपळ करून काही फायदा नसतो. धावपळ मध्ये कधी कधी थोडा वेळ घरातल्या लोकांसाठी, नातालगासाठी, मित्रांसाठी काढले की भरपूर सुख मिळते आणि तेथेच समाधान मिळते. ही गोष्ट जर पैश्याने मिळाली असती तर श्रीमंत लोकांएवढे समाधानी कोणीच राहिले नसते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769नियमित ही पोस्ट मिळविण्यासाठी या समुहात add व्हावे. त्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागो ग्राहक जागो*वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.15 मार्च 1962 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व चार हक्क प्रदान केले. त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मुलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचे आहे. ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. *ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी*● फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.● वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.● वस्तू खरेदी करताना बिल मागावे.● सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.● डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.● वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.● पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.● ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.● ~वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात लांब रेल्वे फ्लॅटफॉर्म कोणता ?२) सफरचंदांमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?३) घड्याळचा शोध कोणी लावला ?४) चीनच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली ?५) कोणता मासा हवेत उडतो ?*उत्तरे :-* १) हुबळी रेल्वे स्टेशन, कर्नाटक ( १५०७ मी लांब ) २) 'अ' जीवनसत्त्व ३) पिटर हेनलेन ४) ली कियांग ५) गरनाई मासा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेंद्र महाजन, औरंगाबाद👤 विलास फुटाणे, औरंगाबाद👤 शुभम सांगळे👤 लक्ष्मण चिंतावार👤 अंबादास पवार👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 बालाजी मामीलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना राम कल्पतरु कामधेनु। निधी सार चिंतामणी काय वानूं॥ जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता। तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'पंढरीची वारी' हा वारक-यांचा 'आचारधर्म' आहे. वारकरी म्हणजे वारी करणारा, शिवाय वार करणारा, घाल घालणारा. या शिकवणूकीतूनच शिवकाळात वारक-यांची एक भक्कम सेना उभी झाली.* *आम्ही विठ्ठलाचे वीर ।* *फोडू कळी काळाचे शीर ।।**तेराव्या शतकाच्या अस्ताला ज्ञानेश्वर महाराजांसारख्या प्रज्ञावंतानं भागवत धर्माची पताका महाराष्ट्र देशी उभारली आणि सतराव्या शतकात तुकारामाच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा मोठा उमाळा या मातीतून वर आला.* *ज्ञानदेवे रचिला पाया !* *तुका झालासे कळस' !!**इथपर्यंतचा प्रवास या मातीने डोळाभरून पाहिला. "आकाशाकडे झेपावणारा महाकवी म्हणूनच 'तुका आकाशाएवढा' असं म्हटलं जातं."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व सामान्य माणसांच्या निद्रानाशाची अनेक कारणे जरी असली तरी त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे एखादे हाती घेतलेले काम चांगल्याप्रकारे न होणे. त्यामुळे मनावर खूप ताण पडतो आणि मनाची चलबिचल अवस्था निर्माण होऊन निद्रानाश होतो.त्यासाठी हातात काम घेण्यापूर्वी कामाचे नियोजन करावे.कामाचावेळ आणि त्यासाठी लागणारे कौशल्य यांची सांगड घालावी व त्या कामात मन एकाग्रतेने ठेऊन त्यात सातत्य ठेवले तर हातातले काम उत्कृष्ट होते आणि मनाला समाधानही वाटते.एकदा का मनाला समाधान वाटले की, मग शांत झोप लागते.झोप ही ठराविक वेळेत झाली तर आरोग्यही चांगले राहते.त्यामुळे मानसिक समाधानही मिळते.पुढे येणारे कामही तितक्याच अधिक गतीने होण्यास मदत होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला! *तात्पर्य*शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली💥 जन्म :-१९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे 💥 मृत्यू :- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री१८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्नाटकच्या जनतेच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करणार, बंगळुरू-म्हैसूर महामार्गाचे उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशी गोवंश सुधारणा प्रकल्प हा क्रांतिकारी प्रयोग, नितीन गडकरींच्या हस्ते बारामतीत गोवंश गर्भ हस्तांतरण प्रयोगशाळेचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा, कापणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेत काँग्रेसकडून व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील, तर गटनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांना 12 तास वीज देऊ, शेतीचे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणणार : देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IND vs AUS 4th Test : विराट कोहलीची दमदार 186 धावांची खेळी, शुभमनचं शतक, 571 धावा करत भारताची 91 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...*शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गोपीनाथ गणेश तळवलकर*गोपीनाथ गणेश तळवलकर (२९ नोव्हेंबर, इ.स. १९०७ - ७ जून, इ.स. २०००) हे मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक होते. प्रौढ साक्षरांसाठीही त्यांनी लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. दर रविवारी सकाळी दहा वाजता बालगोपाळांच्या गच्च उपस्थितीत हा कार्यक्रम होत असे. यास स्टुडियोचे दार जेमतेम बंद करता येण्याइतकी गर्दी होत असत.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मेल - एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या शेवटच्या डब्याच्या मागे क्रॉस किंवा इंग्रजी अक्षर X असे का लिहिले असते ?२) पाकिस्तानातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर कोण आहे ? ३) कांदा उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?४) असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नसतात ?५) जागतिक श्रवण दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) संबंधित गाडी पूर्णपणे सुरक्षित समोर गेलेली आहे असा संकेत रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळतो. २) मारव्हिया मलिक ३) दुसऱ्या ४) किवी पक्षी ५) ३ मार्च *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भगवान शंकरराव कांबळे, पत्रकार, धर्माबाद👤 रुस्तुम शेख, नांदेड👤 सुरेश बोईनवाड👤 राजेश कवडे👤 साईनाथ बोंबले👤 लक्ष्मण वडजे👤 कामाजी धतुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिनाचा दयाळू मनाचा मवाळू। स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥ तया अंतरी क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.**समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.**"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्या घरात संस्कार आणि संस्कृतीचे जतन केले जाते त्याचबरोबर आदर्श नैतिक जीवनमूल्यांची जोपासना केली जाते अशा घरात नेहमी शांती, समाधान, स्थैर्य आणि समृद्धी लाभत असते.तेथे कधीही वादविवाद,दुरावा,भेद,मत्सर यांना वाव मिळत नाही.अशा घरातल्या शेजारी आपले घर आणि सहवास लाभला तर आपलेअहोभाग्य समजावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कड्यावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपल्याला जाता येणार नाही हे लक्षात घेऊन तो बकर्याला म्हणाला, 'अरे तू अशा उंच आणि अवघड जागी सगळा दिवस चरतोस, हे बरं नाही. एखादे वेळी पाय घसरून खाली पडलास तर तुझा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा या मैदानात कोवळे गवत आणि गोड अशी झाडाची पानं आहेत ती खा, त्याने तुला जास्त समाधान मिळेल.' त्यावर बकरा म्हणाला, 'बाबा रे, तू म्हणतोस ते खरं, पण मला तू भुकेला दिसतो आहेस, म्हणून तू जिथे आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.'तात्पर्य :- जे लोक स्वार्थी असतात, त्यांनी आपल्या हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्यावर विश्वास ठेवूं नये, कारण त्यात काहीतरी कपट असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १७०२ - पहिले इंग्लिश भाषा दैनिक 'डेली कौरंट' प्रकाशित● २००७ - २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन💥जन्म● १९१५ - विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज💥मृत्यू● १६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुनी पेन्शन योजना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नका, असं आवाहन केलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *युद्ध संपवण्यासाठी पुतिन अणुबॉम्बचा वापर करू शकतात; अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा मोठा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपुरात 30 एप्रिलपर्यंत रस्ते, चौकावर भीक मागण्यांवर बंदी; शहरात कलम 144 लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शेतकऱ्याला जात विचारु नये, राज्याच्या कृषी विभागाचं केंद्रीय खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशातून मका निर्यातीत मोठी वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अश्विनचा विकेटचा षटकार, ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपला, भारताची आश्वासक सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - राजू आणि कुत्र्याचे पिल्लू*http://nasayeotikar.blogspot.com/2021/05/02052021-dogs-story.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विजय हजारे*विजय हजारे यांचा जन्म मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. सांगलीतील शिक्षकाच्या आठ मुलांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता.प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये २३८ सामने ते खेळले. यामध्ये त्यांनी ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावांचा पाऊस पाडला. या प्रथमश्रेणी क्रिकेट मधील हा भारतीय धावांचा विक्रम प्रथम सुनील गावसकर आणि नंतर सचिन तेंडुलकर यांनी मोडला.प्रथमश्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यांनी 'द हिंदूज' विरुद्ध १९४३-१९४४ मध्ये ३०९ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३१६ आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रथमश्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावली.प्रथमश्रेणीत ६० शतके आणि सलग तीन कसोटींमध्ये शतक नोंदवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी गुल मोहंमद यांच्यासमवेत १९४७ मध्ये ५७७ धावांची भागीदारी केली होती.ती भागीदारी २००६ मध्ये श्रीलंकेच्या कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांनी साउथ आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावा करून मोडली.कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली. त्यामुळेच कदाचित ब्रॅडमन हे हजारेंच्या मध्यमगती गोलंदाजी समोर खूप सावधानता बाळगायचे.*विजय हजारे यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिला कसोटी विजय मिळवला.*हजारे हे मितभाषी असल्यामुळे, भारताने पहिला कसोटी विजय मिळवल्यानंतरही ते आपल्या सहकारी खेळाडूंना फक्त 'शाब्बास' म्हणाले.कसोटी क्रिकेटमधील विजय हजारे यांची कामगिरी पाहता त्यांचा सर्वोत्तम फलंदाजात समावेश होतो. मात्र नेतृत्व केलेल्या १४ पैकी १२ कसोटीत त्यांना धावांसाठी झगडावं लागलं. त्या १२ कसोटी सामन्यात त्यांनी २४.४२ च्या सरासरीने ५५५ धावाच केल्या.तेव्हापासून कर्णधार पदाचे दडपण त्यांच्या कामगिरीवर परिणाम पाडत असल्याचे क्रिकेट पंडित मानू लागले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पूर्वी भारतीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यामुळे त्यांना आद्य भारतीय विक्रमादित्य असेच म्हणावे लागेल.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची एक संधी होय.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोठे पार पडत आहे ?२) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडणार आहे ?३) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन कोण करत आहे ?४) ३५ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?५) महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?*उत्तरे :-* १) चंद्रपूर २) ११ ते १२ मार्च २०२३ ३) इको - प्रो संस्था, चंद्रपूर ४) राजकमल जोब, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक ५) डॉ. जयंत वडतकर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रलोभ माधवराव कुलकर्णी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि प हा वाघी जि. नांदेड👤 संतोष देवणी कर, देगलूर👤 भाऊसाहेब उमाटे, लातूर👤 विजयकुमार नागलवार, नांदेड👤 संदीप सूत्रावे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 विशाल इंगळे👤 नरसय्या गैनवार👤 जब्बार मुलानी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगीं होइजे धन्य या रामनामे। क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥ उदासीनता तत्त्वता सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *'दिव्यांना' भारतीय संस्कृतीत खूप महत्व असल्यामुळे अनेक मंगल कार्याच्यावेळी त्यांची पूजाही केली जाते. आमावस्येला घरातले सर्व दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहिलं जातं. घरभर दिवे लावले जातात. घराचा प्रत्येक कोपरा प्रकाशमान होऊन दारिद्ररूपी, अज्ञानरूपी अंधार दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदावी, अशी या पाठीमागे भावना असते.* *कोणताही सण-समारंभ असो वा जन्म किंवा मृत्यूचा प्रसंग, दिव्याचं आपल्याशी घट्ट नातं जडलेलं आहे. धर्म, जात कोणतीही असो, दिवा ज्योतीच्या रूपाने असेल किंवा मेणबत्तीच्या रूपाने, तो पुजनीय मानला जातो.* *दिव्यांचे जवळजवळ 250 प्रकार आहेत. दिवे लावताना या दिव्यांचा दैदिप्यमान इतिहास खचितच कोणाला माहित असेल. तो समजून घेऊन जपला तर हा तेजाचा, प्रकाशाचा प्रवास एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाण्यास आपलाही हातभार लागेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे सुगंधी फुले आपल्या सुगंधाने इतरांच्या मनाला आपल्याकडे आकर्षित करून मोहीत करतात.त्याप्रमाणे सज्जन माणसेदेखील आपल्या सद्विचाराने आपल्याकडे आकर्षित करून आपल्या सानिध्यात असलेल्या इतरांच्या जीवनाचा कायापालट करतात. सज्जनांच्या सहवासात राहिले तर आपलेही जीवन सन्मार्गी लागेल व आपल्या जीवनाला एक चांगली नवी दिशा मिळेल. ज्यामुळे आपली प्रगती होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अपमान आणि उपकार*एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत. *तात्पर्य*"माणसाने अपमान तात्काळ विसरून जावे आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09/03/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.१९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला.💥 जन्म :-१९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.१९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.💥 मृत्यू :- १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट.१९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा देण्याचा दिला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढणार, कोकणात उष्णतेच्या लाटेचा भारतीय हवामान विभागाने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडण्यासंदर्भातील शासन निर्णयात शिक्षण विभागाने केला बदल, आता इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4,640 सदनिका आणि 14 भूखंडसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरू, 10 मे रोजी सोडत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *WPL :- जेन जोनासनची अष्टपैलू खेळी, दिल्लीचा युपी वॉरिअर्सवर 42 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *संस्कारमोती चॅनल*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎁 *सावित्रीबाई फुले जयंती, जि प प्रा शा कासारखेडा*🎁*व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/7BkmAYy2aGo~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्याधर गंगाधर पुंडलिक*मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचा शेवट सुख आणि समाधानाच्या मार्गाने जातो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वाधिक वाघ असणारे पहिले तीन देश कोणते ?२) कोणत्या संघटनेमार्फत २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?३) 'कोसलाकार' असे कोणाला संबोधले जाते ?४) महाराष्ट्रातील सर्वात लहान किल्ला कोणता ?५) राष्ट्रध्वज केव्हा उतरवतात ?*उत्तरे :-* १) भारत ( २,९६७ ), रशिया ( ४३३ ), इंडोनेशिया ( ३७१ ) २) संयुक्त राष्ट्र संघ ३) डॉ. भालचंद्र नेमाडे ४) तुंग ५) सूर्यास्ताच्या वेळी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवा वसमतकर, वसमत👤 शिवाजी साखरे👤 अरविंद फुलसिंग आडे👤 सतीश उशलवार👤 गजानन शिंदे 👤 योगेश कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे मानसीं नष्ट आशा दुराशा। वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥ ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.**संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...? आहे....?...की.....?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,"This too shall pass "म्हणजे"हाही क्षण निघून जाईल"केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले," महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."This too shall pass !हे क्षणही निघून जातील.ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08/03/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *१९७५ : आंतरराष्ट्रीय महिला दिन*💥ठळक घडामोडी● १९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.● १९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.💥जन्म● १८६४ : मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे● १९२१ - साहीर लुधियानवी, हिंदी गीतकार.● १९२८ - वसंत अनंत कुंभोजकर, मराठी लेखक.● १९३० - चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू, मराठी साहित्यिक.● १९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९८९ - हरमनप्रीत कौर, भारतीय महिला क्रिकेट खेळाडू💥मृत्यू● १९५७ - बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर, स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री● १९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोदावरी नदीवरील डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान, कोपरगाव तालुक्यातील घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत, एकट्या नाशिक जिल्ह्यात 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, धुळ्यातही गारपिटीने पिकांचं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोनराड संगमा दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान ; दोन उपमुख्यमंत्र्यांनीही घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भविष्यातील संघर्षांसाठी आत्तापासून तयार राहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा सूचक इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *PCB ने पुन्हा केली BCCIची कॉपी! आता पाकिस्तानमध्ये वुमन्स लीगचं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने ........*कविता, लेख आणि लघुकथा* वाचा खालील लिंकवर ---http://nasayeotikar.blogspot.com/2023/03/world-women-day.htmlसाहित्य वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎁 *प्रसिद्ध महिला प्रश्नमंजुषा- महिला दिन विशेष माहिती*🎁*व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/FpDuS4HGmyM?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिन विशेष*● क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.★ याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.★ यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली.★ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती.★ त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.★ त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली.★ भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला.★ महिलांना सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले★ १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली, पहिलं घोषवाक्य होतं – ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं.’◆ 2023 सालच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम – ‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी आहे. ★ काही देशात जसे की, बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवाजाचे महत्त्व समजते – मलाला युसूफजाई*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ? २) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?*उत्तरे :-* १) प्रमोद चौगुले ( सलग दोनदा प्रथम क्रमांक ) २) मराठी ३) गरूड ४) फायलोक्विनोन ५) पुणे*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती भोसले, सहशिक्षक, धर्माबाद👤 साहेबराव बोने, देगलूर👤 शरणप्पा नागठाणे👤 शिवाजी पटारे👤 बालाजी पा. कदम चिरलीकर👤 श्रीनिवास भुतावळे👤 साई पेंटर नुतिवाड👤 संभाजी पाटील👤 विकास खानापूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.**ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रस्ता कोणताही असो तो कधीच कुणाला चुकीच्या दिशेकडे घेऊन जात नाही.चुकतो तो आपण..!आपल्या मनात जे काही विचार असतील त्या विचारानुसार आपण रस्त्यावरुन जातो.मग तुमच्या त्या विचारात चांगले किंवा वाईटही विचार असू शकतील.मग त्यात रस्त्याचा काय दोष ?दोष तर आपलाच आहे ना ? मग केव्हाही चांगले विचार मनात आणून जीवनाला समृद्ध करायचे असेल तर तुमचा कोणताही रस्ता तुमच्या चांगल्याच ध्येयाकडे घेऊन जाऊ शकतो.तो निरंतर तुम्हाला तुमच्या चांगल्या ध्येयाकडेच जा म्हणून सांगतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तृप्तता*प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्याआधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही.*तात्पर्य*तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/03/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १८९६ : पहिल्या ऑलिंपिक सामन्याचे (पुनरुज्जीवित) उदघाटन● १९५२ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.● १८६९ : दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.💥जन्म● १८९९ - शि.ल. करंदीकर, मराठी लेखक● १९६५ - देवकी पंडित, भारतीय शास्त्रीय गायिका💥मृत्यू● १९६८ - नारायण गोविंद तथा ना.गो. चापेकर, मराठी साहित्यिक● १९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांना लवकरच मोठी मदत मिळणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील नऊ विरोधी पक्षनेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप, राज्यपालांच्या भूमिकांवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण म्हाडाची 4,752 घरांची लॉटरी, 8 मार्चपासून अर्जविक्री तर 10 मे रोजी सोडत, विरार-बोळींजमध्ये तब्बल 2 हजार 48 घरांची होणार विक्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *होळीपूर्वी बरसाना-जयपूर शहर जल्लोषात तल्लीन; लाठमार-रासलीला रंगोत्सव उत्सवात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *WPL 2023 - मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच सामन्यात 143 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वूमेन्स प्रीमियर लीग तरुणींना प्रेरणा देईल, त्यांची स्वप्न सत्यात उतरवेल: नीता अंबानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Class-2nd, 4.7 Croosing the Road -poem**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/jfK_3KyfiVY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पळस, होळी आणि धुलिवंदन*होळीची चाहूल म्हणजे आजूबाजूच्या परिसरात फुललेला पळस. पळसाची फुले आपल्या विशिष्ट रंगामुळे सर्वाना आकर्षित करत असतात. मराठी वर्षातील शेवटच्या फाल्गुन महिन्याला सुरुवात झाली की शेतात आणि जंगलात पळसाच्या झाडाला अनेक फुले दिसू लागतात. असे म्हटले जाते की पूर्वीच्या काळातील माणसे ही पळसाची फुले एकत्र करून त्याचा रंग तयार करीत असत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांवर हा रंग टाकून धुलीवंदनाचा सण साजरा करीत. परंतु काळ बदलत गेला तसा लोकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धती देखील बदलत गेल्या. आज या पळसाच्या फुलांकडे लोकांचे फक्त लक्ष जात आहे मात्र त्याचा रंग म्हणून कोणी वापर करत नाहीत. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध रंगाचा वापर आज केल्या जात आहे, ज्यामुळे अनेकांना त्वचारोग होण्याचा धोका देखील संभवत असतो. काही महाभाग मंडळी वोर्निश कलर ही वापरतात. ज्यामुळे खूप त्रास होतो. मित्रा-मित्रात हा खेळ खेळताना कोण कशाचा वापर करेल हे सांगता येत नाही. एकमेकांवर अंडे फोडण्याचे प्रकार देखील काही ठिकाणी होतात. अंड्याच्या उग्र वासामुळे रंगाचा खेळ बेरंग होऊ शकतो. म्हणून सर्व बाबी लक्षात घेऊन नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमीचा सण साजरा केल्यास ते सर्वासाठी सोईस्कर होईल. सायंकाळच्या कातरवेळीशेतात करूया मुक्त विहाररखरखत्या वातावरणातपाहू पळस फुलांचा बहार*झजरी दादा, झजरी दादा*फाल्गुन महीना सुरु झाला की आमच्या बच्चे कंपनीला खुप आनंद व्हायचा कारण सर्वात आवडणारा आमचा होळीचा सण जवळ आलेला असायचा. होळीच्या पंधरा दिवासपूर्वीच आम्हाला वेध लागायाचे. तीन चार मित्र मिळून एक गट केल्या जायचे. सुताराजवळ जाऊन दोन छान लाकडे तासुन घ्यायचे, ज्यास आज टिपरी म्हणतात हे कळले. ते दोन लाकडे एकमेकावर आपटून प्रत्येकाच्या घरा समोर जाऊन *झजरी दादा, झजरी दादा* हे गीत म्हणून खांद्यावर असलेल्या झोळीमध्ये घरातील माई, ताई, अक्का वाटीभर ज्वारी टाकायचे. हे दिवस म्हणजे प्रत्येकांच्या घरी शेतातून ज्वारी आलेली असायची त्यामुळे ज्वारी देताना कोणी कुरकुर करायचे नाही. जर कोणी दान दिले नाही तर त्यांच्या नावाने बोंबा मारुन पुढे जायचो. असे आम्ही रोज पंधरा दिवसात पूर्ण गाव पिंजुन काढायचो. जवळपास एक-दीड पायली ज्वारी जमा व्हायची. ते सर्व ज्वारी दुकानात विकून मिळालेल्या पैश्यात खोबऱ्याचे व साखरचे हार प्रत्येकाला एक-एक मिळेल असे घ्यायचो आणि उरलेल्या पैश्यात रंग घेत असू. होळीच्या सायंकाळी आम्ही सर्व मित्र मारोतीच्या पाराजवळ जेथे होळी तयार केलेली असायची तेथे जमा व्हायचो. वेगवेगळ्या नावाने मग बोंबा मारायचो. गावातील मानकरी वाजत गाजत येऊन होळी पेटवायचा. आम्ही होळीतील जाळ घरी नेऊन छोटी होळी करायचे आणि त्यात खोबरा व हरभरा भाजून खायचो. मग रात्री जेवताना पूरणपोळी आणि कढीची मजा काही औरच असायची. दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याची वाटच पाहत असू. सकाळपासून मग मित्रामध्ये रंग खेळण्याची मजा यायची. कोणी कोणास ओळखू येणार नाही एवढा रंग लावले जायचे. दुपारपर्यंत रंग खेळून झाल्यावर स्नान करून मग घरातच बसायचो. आज परत ते सर्व दिवस आठवू लागले. ते मित्र परत दिसू लागले. परत एकदा छोटे व्हावे आणि खुप मजा करावे असे वाटते.*धुलिवंदन:-*होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. मनातील राग, द्वेष इत्यादी भावनाना मोकळी वाट करून देण्यासाठी हा सण अत्याधिक महत्वाचा आहे. एकीकडे मुले रंगात न्हाऊन निघतात तर याच दिवशी कुमारिका मुली प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवाळणी करतात आणि त्यांच्याकडून भेट म्हणून धान्य किंवा पैसे घेतात. घरात काम करणारे जे काही कामगार मंडळी असतात ते देखील खुशाली मागतात आणि घरधनी त्यांना खुशाली देऊन खुश करतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दरवेळी सण येतात नि जातातएकमेकांत प्रेम निर्माण करतातसणाचे महत्व समजून घेतले तरप्रत्येक सण सदा आनंदच देतात.*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून आपणा सर्वाना होळी आणि धूलिवंदनच्या रंगबिरंगी शुभेच्छा.*- नासा येवतीकर, संयोजकफ्रेश मॉर्निंग बुलेटिन 9423625769••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात एकूण किती वन्यजीव अभयारण्य आहेत ?२) ऑस्ट्रेलियाने महिला टी - २० क्रिकेट विश्वचषक कितव्यांदा जिंकले आहे ?३) 'प्रति शिवाजी' कोणाला म्हटले जायचे ?४) भारतातील सर्वाधिक अंडे उत्पादन करणारा राज्य कोणता ?५) सांचीचा स्तूप कोणी बनवला ?*उत्तरे :-* १) ५६५ २) सहाव्यांदा ३) नेताजी पालकर ४) आंध्रप्रदेश ५) सम्राट अशोक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक दगडे, सरपंच, चिरली👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर👤 मीनल आलेवार👤 श्रीकांत संतोष येवतीकर👤 अविनाश गायकवाड👤 कैलास वाघमारे👤 राजकुमार कांबळे👤 माधव गोतमवाड👤 सुरेश कटकमवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे। न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥ करी सुखसंवाद जो उगमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.**संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळेचे भान ठेऊन व कामाची गती पाहून किती आपण हाती घेतलेल्या कामात किती मेहनत घ्यायची हे आपण ठरवावे.कारण आपल्या कामाचा उत्कृष्ट दर्जा हा वेळ आणि काम यांच्यावरच अवलंबून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात केलेलं पाप लपत नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/03/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *औद्योगिक सुरक्षा दिवस*💥ठळक घडामोडी● १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले● १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.● १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.● १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.💥 जन्म :- ● १९२२ : दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.💥 मृत्यू :- ● १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बारावीचा पेपर फुटला नाही, त्यामुळे गणिताची पुन्हा परीक्षा होणार नाही, पेपरफुटी प्रकरणावर राज्य शिक्षण मंडळाने घेतला महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जागतिक बँक भारताला एक अब्ज डॉलर कर्ज देणार, आरोग्यसाठी होणार निधीचा वापर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र सीईटी सेलकडून परीक्षा नोंदणी आणि कॅप राऊंडसाठी मोबाईल अॅप लाँच करण्यात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासनाच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंत दोन वर्ष वाढवून देण्यात आली आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणुकीचा ओघ; 340 प्रकल्पातून 13 लाख कोटींची गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती, समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सलामीचा सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-चिनू व गोगो,fun in metro**व्हिडीओ-लिंक👇*https://www.youtube.com/live/DjS_bheqK64?feature=share~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?*👉 चादरीसाठी*२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?*👉 उस्मानाबाद*३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?*👉 माहूर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोणताही माणूस दुस-या माणसाला का फसवतो? विश्वासघात का करतो? कारण आहे त्या सुखात, आहे त्या समाधानात माणूस राहू शकत नाही. माणसाला थोडंफार सुख-समाधान मिळत असतंच. पण त्याची जगण्याची, विचार करण्याची बैठक पक्की नसते, कसं जगायचं, हे एकदा निश्चित ठरवलं की आहे त्या सुखा-समाधानातही माणूस छान राहू शकतो.**आहे त्या आनंदात समाधान न मानणारी माणसे स्वत:ला आणि इतरांनाही छळत असतात. सुख, समाधान कधी कुणाला मिळालेच नाही असे होत नाही. संकटे आली की माणूस म्हणतो, हे माझ्याच वाट्याला काय आले. एक! दु:खाच्या ठोकरीने तो सुखाच्या जागा विसरून जातो. सुखाशी कृतघ्न होतो. पण तो विसरतो, संकटे येण्यापूर्वी तो पावसात भिजला होता. त्याने सुर्योदय पाहिला होता. फुलांनी बहरलेली झाडं पाहिली होती. उन्हाळ्यात जांभळं खाताना एकमेकांना वाकुल्या दाखविल्या होत्या. सुखाच्या जागा आपल्याजवळच असतात.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पायरीच्या दगडावर उभे राहून लोक मंदिरावर असणा-या कळसाची स्तुती करतात.पण लोकांना कुठे माहित आहे की,कळस हा बांधलेल्या मंदिराच्या शिखरावर आहे ,मंदिर हे मजबूत असलेल्या पायावर उभे आहे आणि पाया हा पायरीपासूनच सुरू असतो आणि पायरी ही दगडाचीच बनलेली असते.जर एखाद्या पायरीचाच दगड बाजूला झाला तर मंदिरातही जाणे अवघड जाते आणि कळस पाहणेही त्यापेक्षा अवघड.एवढेच नाही तर पायरीविना कळस कसा बरे उभा राहील.कळसाला लोक दुरुन पाहतात तर पायरीला अगदी जवळून. पायरीवर डोक ठेऊन नमन करतात.पायरीचा दगड जरी असला तरी वरच्या कळसापेक्षा अधिक महत्व पायरीला देतात.त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसावरच मोठ्या माणसांचे जीवन अवलंबून आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. लहान आणि सामान्यपणे जीवन जगणा-या माणसाकडेदेखील इतरांनी त्यांच्याकडे वेगळ्यादृष्टीने पाहू नये. कारण त्यांच्या कष्टावरच मोठ्या लोकांचे जीवन अवलंबून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ परोपकार ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात. *_🌀तात्पर्य_ ::~* जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/02/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी● १९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी● १५६८- सम्राट अकबर बादशहाने राजपुतांचा मोठा पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.💥जन्म● १९८१: भारतीय अभिनेता शहीद कपूर● १९७४: दिव्या भारती● १८९४: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत,💥मृत्यू● भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी● १८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन● हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी● १९६४ : शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद झालं धाराशिव; केंद्राची परवानगी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *G20 परिषदे निमित्त औरंगाबादेत साकारली 456 फूट लांब आणि सात फूट उंचीचं वारली चित्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात स्वस्त इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करुन देण्यासाठी मारुती प्रयत्नशील : शशांक श्रीवास्तव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे, अजित पवार मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या पतीचं निधन; पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचा 14 मार्चपासून बेमुदत संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*📚गोष्टींचा शनिवार-खट्याळ उंदीर📚**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/S903rBGck6o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारुडकार संत एकनाथ*सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यl दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश २) विश्वभारती विद्यापीठ ३) बी. व्ही. आर. सुब्रमण्यम ४) होन व शिवराई ५) नायसिन*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई डिब्बेवाड, सहशिक्षक,👤 योगेश राजेश पापनवार, वसमत👤 बालाजी आगोड👤 प्रदीप वल्लेमवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'पावसाळा आला की कोकिळ मौन होते', कारण पावसाळा हा बेडकांचा असतो.' बेडकांच्या आरडाओरडीपुढे बिचा-या कोकिळेचे मधुर गायन कोण ऐकणार ? एक कवी म्हणतो, 'बाई कोकिळे, येथे समस्त बहिरे बसलेले आहेत. उगीच तू तुझे मधुर बोलणे का सुरू करतेस ? ज्यांना ऐकायला येत नाही, ते तुला तुझ्या काळ्या रंगावरून कावळाच समजतील. तेव्हा गप्प राहणे यातच शहाणपण आहे.**शहाण्याने अनुकूल, प्रतिकूल समय ओळखूनच वागावे. आपली उपेक्षा होत आहे, आपणांस कोणी ओळखत नाही असे समजून कुढत बसू नये. वसंत ऋतु आला म्हणजे कोकिळा कोण नि कावळा कोण हे जसे आपोआप कळते, तसेच जाणकार भेटला म्हणजे परिक्षा होते. गिधाड-गरूड, गाढव-घोडा, बगळा-राजहंस, यातील फरक वरवर कळत नसला तरी योग्य समयी खरे-खोटे, सोंग-ढोंग उघडे पडते.**"हंसाने आपली चाल सोडली नाही, कावळ्याची बढाई उघडी पडली. नुसती बढाई मारून लढाई जिंकता येत नसते. चढाई करतानाच स्वत:ची शक्ती, गुणवत्ता अजमावून पाहायची असते."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे एखाद्या गीताला सुमधुर संगीतात संगीतबद्ध करायचे असेल तर त्यासाठी अनेक वाद्यांचे सुर एकत्रित आणावे लागतील आणि त्या वाद्यांना वाजवणारे किंवा चालवणारे अनेक कलाकार एकत्रीत आणून गीताला तालबद्ध आणि स्वरबद्ध करावे लागेल तेव्हा कुठे सुमधुर गीत ऐकण्यासाठी तयार होईल.अर्थात इतरांना त्या गीताचा आस्वाद घेता येईल.त्याचप्रमाणे एखादी चांगली कृती करण्यासाठी किंवा ती कृती सर्वमान्य होण्यासाठी सर्वांच्याच सहभागाची गरज असते आणि त्यात सर्वांचेच सहकार्य असेल तर ते नक्कीच एखाद्या सुमधुर गीतासारखेच सुसंस्कारीत बनेल आणि नक्कीच लोक अनुकरण करायला लागतील.कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी अनेकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित, एकोप्याने राहणे गरजेचे आहे आणि तसे राहिल्यास सा-यांनाच चांगला फायदा होईल.नाहीतर एकटे राहून एकाकी जीवन जगण्याचा अट्टाहास केला तर त्या जगण्याला मीठविरहित जेवन केल्यासारखेच जीवन चवहिन होईल हे लक्षात असू द्यावे.जीवनात चांगल्या गोष्टींसाठी एकी आणि एकोपा असणे गरजेचे आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आजची बोधकथा* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)