*कविता - बेधुंद आसमंत*
सकाळच्या प्रहरी ऊन कोवळे
सृष्टी चमके झळाळूनी सारी
विलोभनीय हे सौंदर्य दृश्य
साठवून ठेवावे नयनातून जरी
अवधीत ढगांची आली स्वारी
पावसात चिंब धरती नाहली
निसर्गाची ही किमया न्यारी
बाग-बगीचे शेती सारी फुलली
झाला बेधुंद आसमंत सारा
धो धो पाऊस बरसणार आता
आनंदुनी गेला सृष्टीचा नजारा
तृप्त होईल वसुंधरा माता
...✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment