*कविता - साहित्यभूमी*
मायबोली माझी असे मराठी
साऱ्या जगात मान आहे
असे अभिमान आम्हा मराठीचा
मराठी भाषा आमची शान आहे
साहित्य लेखनाची, वाचनाची
असावी नित्य सर्वांस ओढ
साहित्यभूमी च्या या समृद्धतेतुन मातृभाषा आहे किती गोड
शब्दास शब्द जोडून लेखणीने
मनातील संवेदना उतरती
भाव काव्यातून प्रकटुनी
लयबद्ध रचना तयार होती
मायबोली भाषा आहे छान
वैचारिक आदान - प्रदानाची
मातृभाषा आहे एक वाण
खाण आहे ती संस्काराची
मायबोली आमुची आहे ज्ञानवर्धनी
करूया तिचा सन्मान सारे आपण
साहित्यभूमी च्या अभिव्यक्तीतून
सदैव करू आपण तिचे संवर्धन
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
8308096851
ReplyDelete