कविता - कर्मबंधन
समाजप्रबोधनकार संत गाडगेबाबा
देवदूतच होऊनी गेले भूतलावरी
स्वच्छतेचा मंत्र देऊनी सर्वास ऐसे
संत अवतरले होते ते पृथ्वीवरी
गावोगावी जाऊन केली त्यांनी स्वच्छतेची कामे अपार,करुनी कीर्तने त्यांनी मने ही केली साफ, उचलून फेकले त्यांनी अंधश्रद्धेचे निखारं
शिक्षणाचा पथ सारे स्वीकारा, जोपासूनीया संस्कृतीला,जागविले
त्यांनी साऱ्यांचे आत्मभान,
म्हणूनच झाले ते संत महान
कर्मबंधन ऐसे करूनी गेले
गाडगेबाबा,सत्कार्याने झाला त्यांच्या,
सुगंधीत आसमंत सारा, वंदनीय त्यांचे हे कार्य, आपण सारेच स्वीकारा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment