*कविता - निसर्ग आणि मी*
निसर्ग आहे आपला सखा
तोच देतो शुद्ध ताजी हवा
निसर्गाचे जतन सर्वांनी राखा
निसर्ग आपला अनमोल ठेवा
निसर्ग आणि मी आहे असे
अतूट नाते आमचे जिव्हाळ्याचे
निसर्गासारखा दुजा नाही सखा
रक्षण करू सारे त्यास जपण्याचे
निसर्गात लता वेली हसे गाली
रूप निथळले हिरवेगार राणी
झुळझुळ वाहे झरा नदी नाली
निसर्गच गातो मंजुळ गाणी
साऱ्या सृष्टीचा सुंदर साज
पाने,फुले ,फळे,झाडे,हवा
आहे सजीवांचा श्वास आज
प्रत्येकाने एकतरी झाडे लावा
निसर्गाचा मोह प्रत्येकास हवा
तेच खरे आहे आपले सोबती
चला मिळुनी लावूया झाडे
आपण सारेजण या भूमीवरती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment