*कविता - हा रूसवा सोड ना*
असा रुसला का रे माझ्या बाळा
काय पाहिजे सांगना तू मला
पायी वाजे छमछम वाळा
ढगांची गादी दाखवू का तुला
हा रुसवा सोड ना बाळा
किती विनवणी करू तुला
किती लाविला तुला लळा
दुर का लोटतोस असा मला
दूर तुला कस लोटू आई
असं गप्प मला राहवत नाही
तू माझी आहेस प्रेमळ आई
तुझ्याशिवाय मला करमत नाही
आतुर झालो बोलण्यास तुला
माझा जीव तुझ्यात आहे आई
माय लेकराच्या ह्या नात्याला
अपार जिव्हाळा आहे आई
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment