*विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (१)🌺* *वसंत ,पिंपळ ,पिंगट, चांगला, रंग, संकट ,पसंत ,मुंगी ,चंदन, चांदणी, गंगा, चंदन ,भिंत ,वंदन, मंदिर ,संदेश, पितांबर, तांबडा ,तोंडली, कोंबडा, उंची, थंडी ,चिंट्या ,संक्रांत ,मंत्र चंद्र ,स्वतंत्र ,सोंगट्या, बांगड्या ,संध्याकाळ ,संतुष्ट, केंद्र ,वृंदावन ,हेमंत ,अंगण, संत्री ,पांढरा, मकरंद ,चंदन ,अभिनंदन, रघुनंदन, सुंदर, पंचमी, नंदादीप.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.
*📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚 विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (५)🌺* *छत्री , मुली, मीना, सीता, सीमा, भाजी ,भाजीपाला ,घरी ,गरीब ,खरीप,जरी, मयुरी, दरी,नशीब ,परीक्षा ,बरीच ,भरीव ,रवी, जमीन, गवळी, कवी, जीवन, वीस,वीज ,वीर ,वीण, भीती,पुरी, आमटी,हरीण,हीच ,सीमा ,शीत,शीळ , बसली, परी, हसली,खीर, पापडी, बारीक, मीठ, भाकरी, वाटली वारली, करामती, सकाळी, सजली, चिमणी, किती, माहिती, बारीक, वाडगिनी , घरी, पाणी, झरीपाडा, शेतकरी, भातशेती, घरातील, छोटी, गाणी, नदी.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.
*कविता - लळा ,जिव्हाळा* शब्द मज ओठांवर येऊन नयनी ओघळी अश्रूंचा धारा संवेदन भाव कोमेजून जाती का? देतोस वेदनेस थारा मी सारं मज जीवनाचे माझ्या शोधीले शब्दांतुनी तुझीया भाव मज सुकोमल जाहले लावलास तु लळा जिव्हाळा वाट पाहूनीया चांदण्याचा साज शृंगार तो गंधाळला अन् गंधाळलेल्या आसमंतात नयनमनोहर आसवांचा जाहला नेञास करारी लागे मग नजरेसमोर नजरेचा का आहेत आडवाटा ?? अन् ओसरलेल्या अश्रूतही संवेदना आहेत तुझ्या..... ➖➖➖➖➖➖➖ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*गुरूमाऊली चित्रचारोळी स्पर्धेसाठी* ➖➖➖➖➖➖➖ १) वाचन पुस्तकांचे करूया यशाची शिडी चढूया ग्रंथ हेच गुरु आपुले भविष्य आपुले घडवूया ➖➖➖➖➖➖➖ २) अपयश आले किती जरी हार ना मी कधी मानणार पुस्तकांच्या सहायाने मी यशाची शिडी मी गाठणार ➖➖➖➖➖➖➖ ३) पुस्तक हेच यशाचे गमक अभ्यासाचा ध्यास मी घेणार चढुनी यशाची शिडी मी जीवन माझे सफल करणार ➖➖➖➖➖➖➖ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*📚वाचन विकास उपक्रम📚* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (४)🌺* *निळा, विळा , ढिला, रिक्षा ,महिला , पिवळा, पिवळसर, हिरवा , विनायक, किराणा, किसन, किनारा, खिमा, चित्रपट,चिकट, जितका, टिळक, टिम , टिकाऊ,ठिकाण,ठिपका,डिझाईन,तिला ,तिचा,तिनं, विचार, हिमालय, ठिकाणा, किडा, हिरा, खिळा, ढिगारा, लिटर, सिताफळ, शिकार, शिरा, रिकामा, हिरवळ, तिसरा, निवाडा, खिरापत, चित्र, सचित्र, सचिन, मिठाई, वाढदिवस, लिहूया, परिसर, किरण, निघाला, गणित, शनिवार, निळे, बिरबल, दिसला, पाहिले, दिसत, पाहिजे, भिरभिर, विजय, बालवाटिका, विशाल, चिवडा, विनया, गिरजा, क्षितिज.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.
*कविता - साहित्यभूमी* मायबोली माझी असे मराठी साऱ्या जगात मान आहे असे अभिमान आम्हा मराठीचा मराठी भाषा आमची शान आहे साहित्य लेखनाची, वाचनाची असावी नित्य सर्वांस ओढ साहित्यभूमी च्या या समृद्धतेतुन मातृभाषा आहे किती गोड शब्दास शब्द जोडून लेखणीने मनातील संवेदना उतरती भाव काव्यातून प्रकटुनी लयबद्ध रचना तयार होती मायबोली भाषा आहे छान वैचारिक आदान - प्रदानाची मातृभाषा आहे एक वाण खाण आहे ती संस्काराची मायबोली आमुची आहे ज्ञानवर्धनी करूया तिचा सन्मान सारे आपण साहित्यभूमी च्या अभिव्यक्तीतून सदैव करू आपण तिचे संवर्धन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (३)🌺* *पान, फळा, ससा, ताक, चाक, नाव,पळा,दादा, बाबा, काका,मामा,ताई,राम,शाम,चला, वाच, नाग, काम,ढाल,छान,पाट, मका,भात,तास,आठ,खाता, कसा,मासा,पारा, काय, मला, आला, वाट,आता, वारा, मजा,राजा,बाळा, शाळा, दार, वाघ, ससा, तारा,फार , माझा,कान, नाक,मान,पाय,टाका, टापा,सात,बारा,दात, कार,पाच,घाम,घार,वाद,झाड,दान,वात,वाडा,ज्ञान ,आज्ञा, कासव,भारत, सकाळ, नाचत,बछडा,पारवा, कावळा, खाताना,धरला, आणला, एकदा,अकरा, बाजार, आकाश, वापर,लहान, आपला,पाचवा,ढगाळ,चालला,सामान,वादळ ,आवाज,दारात,खारट,सावध,हातात,गारवा,धावत,चालत,जहाज, भाकर,शासन.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.
*विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (२)🌺* *घर, नळ, कप, ऊस, समई, पपई, मगर , गवत, अहमद, अमर , टपटप , ढग , बघ , हसत, लवकर, उठ,आई, पाऊस, बघ, रमण, उगम, हळद, करण, गरम,फळ, कढई, जखम,वड, खडखड, बडबड, बबन,भरत, सरळ,परत,धरण, पण,थरथर ,दगड,गगन,जल,नग,नगर ,नमन,नऊ,छगन,खत,कसरत,कटकट,गडगड,घड,चरण,छत,जवस, वर, फणस, अननस, परस, वरण, सण, चल, भरभर, सरसर,गरज, पटकन, सरबत.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.
*गुरुमाऊली चित्रचारोळी स्पर्धेसाठी* दि.21/06/2021 ➖➖➖➖➖➖ 1) गव्हाची कापणी रानात करतो अभ्यासाचे धडे ल्योक गिरवीतो डोयात बाप मोठ सपनं पाहतो कष्टाने त्याचे भविष्य घडवितो ➖➖➖➖➖➖ 2) करून अभ्यास चांगला तो कष्टाचे पांग फेडणार आहे आईबाबाचे मोठेपणी तो सारे स्वप्न पूर्ण करणार आहे ➖➖➖➖➖➖➖ 3) बाप करी विचार मनी सपान पूर्ण होईल का? फेडूनी पांग मह्या कष्टाचे सार्थक त्याचे होईल का? ➖➖➖➖➖➖➖ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी* *दिनांक- १४/०६/२०२१.* १) चिंब पावसात भिजले मी बहरले अंग तुझ्या स्पर्शाने धुंदीत या तुझ्या प्रेमाचा मी शहारले मी तुझ्या स्पर्शाने २) प्रेमाच्या तुझ्या या नजरेने बेधुंद झाले मी आज रोमांच येती अंगावर माझ्या साजना वाटती मज लाज ३) डोक्यावरील छत्रीचे नाही भान बेधुंद झाले तुझ्या त्या प्रेमाने चिंब भिजले माझे तन मन शहारले मी तुझ्या त्या स्पर्शाने 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*कविता - लक्तरे* जन्मदाती माझी प्रिय आई बघताना तिच्याकडे मी येई जगण्यास स्फूर्ती माझ्या ममतेची मूर्ती माझी आई किती दुःख झेलले जीवनात लक्तरे अंगाची काढून ती जगली सतत काबाडकष्टात मुलाबाळास भरविते घास ती दिसे लेकरात सुख तिजला मायेचा पदर पांघरून आम्हा भासे झोपडीत पंढरी तिजला प्रेम साऱ्यांना देई आम्हा माझी आई आहे ज्ञानज्योती देती आम्हा मूल्यशिक्षणाचे धडे शिकवण संस्काराची मिळती पदोपदी वाट चांगली दावे गडे माझी आई आहे देवाचीये रूप पदर तिचा शितपंख्याहून थंड माझ्या आईरूपीची प्रेमज्योत सदा नित्य चालते अखंड 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*कविता - हा रूसवा सोड ना* असा रुसला का रे माझ्या बाळा काय पाहिजे सांगना तू मला पायी वाजे छमछम वाळा ढगांची गादी दाखवू का तुला हा रुसवा सोड ना बाळा किती विनवणी करू तुला किती लाविला तुला लळा दुर का लोटतोस असा मला दूर तुला कस लोटू आई असं गप्प मला राहवत नाही तू माझी आहेस प्रेमळ आई तुझ्याशिवाय मला करमत नाही आतुर झालो बोलण्यास तुला माझा जीव तुझ्यात आहे आई माय लेकराच्या ह्या नात्याला अपार जिव्हाळा आहे आई 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी १) महाराष्ट्राचे भाग्य बदलवणारा सुवर्ण दिवस आज उगवला छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा आज हर्षआनंदात जाहला २) बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावर आरुढ जाहले राजे शिवछत्रपती, मराठी जनांच्या मनावर अधिराज्य करणारे होऊन गेले फक्त शिवछत्रपती ३) संपन्न जाहला महाराज्यभिषेक सोहळा मिळाला आशीर्वाद भवानीमातेचा पूर्ण जाहले स्वप्न माता जिजाऊचे छत्रपतीने तोरण बांधले स्वराज्याचे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
कविता - मृगसरी पाऊस येता मृगसरीचा घालवी उकाडा उन्हाचा थंडावा वाटे मनाला छान पडता पाऊस मृगाचा झाडे,वेली,पशु,पाखरे सर्वत्र हर्षाने प्रफुल्लित होती बळीराजाची चाले लगबग गडबड पेरणीची चालती मृगसरीचा पाऊस पडता तहानलेली व्याकूळ धरती तृप्त होऊन थंडगार होती सौंदर्य निसर्गाचे खुलती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*कविता - निसर्ग आणि मी* निसर्ग आहे आपला सखा तोच देतो शुद्ध ताजी हवा निसर्गाचे जतन सर्वांनी राखा निसर्ग आपला अनमोल ठेवा निसर्ग आणि मी आहे असे अतूट नाते आमचे जिव्हाळ्याचे निसर्गासारखा दुजा नाही सखा रक्षण करू सारे त्यास जपण्याचे निसर्गात लता वेली हसे गाली रूप निथळले हिरवेगार राणी झुळझुळ वाहे झरा नदी नाली निसर्गच गातो मंजुळ गाणी साऱ्या सृष्टीचा सुंदर साज पाने,फुले ,फळे,झाडे,हवा आहे सजीवांचा श्वास आज प्रत्येकाने एकतरी झाडे लावा निसर्गाचा मोह प्रत्येकास हवा तेच खरे आहे आपले सोबती चला मिळुनी लावूया झाडे आपण सारेजण या भूमीवरती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
कविता - घुमजाव क्षण ते येती मोहाचे किती लालसा नको तू बाळगु प्रति अरे माणसा शुद्ध ठेव तू मती नाहीतर होईल जीवनाची माती इतिहासाचे किती दाखले आहेत सत्कर्मी किती होऊन गेले आहेत माणसा पुण्याची काम तू कर इतरांना घुमजाव नको आता कर घुमजाव केले किती जरी तुला वाट वाकडी कधी नको पाडू नेकी नीतीने वाग तु चांगला फसवेगिरीला बळी नको पडू रहावे लागेल तुला आता दक्ष नाहीतर लोक करतील घुमजाव यशाचे शिखर चढता क्षणीच लोकांचा नजरा घालेल घाव *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*कविता - बेधुंद आसमंत* सकाळच्या प्रहरी ऊन कोवळे सृष्टी चमके झळाळूनी सारी विलोभनीय हे सौंदर्य दृश्य साठवून ठेवावे नयनातून जरी अवधीत ढगांची आली स्वारी पावसात चिंब धरती नाहली निसर्गाची ही किमया न्यारी बाग-बगीचे शेती सारी फुलली झाला बेधुंद आसमंत सारा धो धो पाऊस बरसणार आता आनंदुनी गेला सृष्टीचा नजारा तृप्त होईल वसुंधरा माता ...✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*विषयः झुकझुक गाडी* 🚂🚃🚋🚃🚋🚃🚋🚃 आली आली बघा बघा झुकझुक गाडी (दोन वेळा) सरळ रेषेत चालणारी धावधाव धावणारी आली आली बघा बघा झुकझुक गाडी (दोन वेळा) झुक झुक गाडीत बसले कोण? आजी आजोबा आणखी कोण!👩🏫👨🏫 (दोन वेळा) आली आली बघा बघा झुक झुक गाडी.......(दोन वेळा) झुक झुक गाडीत बसले कोण? मामामामी आणखी कोण! (दोन वेळा)🙎♂👩🦰 आली आली बघा बघा झुक झुक गाडी.......(दोनवेळा) झुका झुक गाडीत बसले कोण? दादा वहिनी आणखी कोण (दोन वेळा)🙎♂🙎 आली आली बघा बघा झुक झुक गाडी झुक झुक गाडीत बसले कोण? काकाकाकु आणखी कोण 👳👩🏻 आली आली बघा बघा झुक झुक गाडी.....(दोनवेळा) ➖➖➖➖➖➖ *✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
कविता - कर्मबंधन समाजप्रबोधनकार संत गाडगेबाबा देवदूतच होऊनी गेले भूतलावरी स्वच्छतेचा मंत्र देऊनी सर्वास ऐसे संत अवतरले होते ते पृथ्वीवरी गावोगावी जाऊन केली त्यांनी स्वच्छतेची कामे अपार,करुनी कीर्तने त्यांनी मने ही केली साफ, उचलून फेकले त्यांनी अंधश्रद्धेचे निखारं शिक्षणाचा पथ सारे स्वीकारा, जोपासूनीया संस्कृतीला,जागविले त्यांनी साऱ्यांचे आत्मभान, म्हणूनच झाले ते संत महान कर्मबंधन ऐसे करूनी गेले गाडगेबाबा,सत्कार्याने झाला त्यांच्या, सुगंधीत आसमंत सारा, वंदनीय त्यांचे हे कार्य, आपण सारेच स्वीकारा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
Subscribe to:
Posts (Atom)