✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार. १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.१९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी 💥 मृत्यू :- १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आतापर्यंत 1027 कोटी रुपयांची मदत* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : पहिल्या तिमाहीत देशाच्या विकासदराची झेप, एप्रिल ते जूनदरम्यान विकासदर 8.2 टक्के.* --------------------------------------------------- 3⃣ *रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावररील खड्डे ८ सप्टेंबरपूर्वी भरणार - चंद्रकांत पाटील* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : सोलापूर शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम तीव्र, देगाव रोड येथे अतिक्रमण काढण्याचे काम महापलिकेच्या वतीने सुरू* --------------------------------------------------- 5⃣ *नाशिक : तुकाराम मुंढेंच्या अविश्वास ठरावावर प्रश्नचिन्ह, अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश* --------------------------------------------------- 6⃣ *एशियन गेम्स 2018: महिला हॉकीमध्ये रौप्यपदकावरच मानावे लागले समाधान, भारताच्या पुरुषांसह महिला हॉकी संघालाही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाने दिली हुलकावणी.* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 119 डावात सहा हजार धावा पूर्ण करीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला टाकले पिछाडीवर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांच्या प्रगतीसाठी* वरील लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_23.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *परमवीर चक्र* परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत. एकवीसपैकी वीस पुरस्कार भारतीय सैन्य तर एक वायुसेनेच्या सदस्यांस प्रदान केले गेले आहेत. ग्रेनेडियर्स रेजिमेंट आणि गोरखा रायफल्स या पथकांना प्रत्येकी ३, शीख रेजिमेंट, कुमाऊँ रेजिमेंट, जम्मू काश्मीर रायफल्स आणि द पूना हॉर्सेस या पथकांना प्रत्येकी २ पुरस्कार दिले गेले. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांपैकी लेफ्टनंट अर्देशर तारापोर हे सगळ्यात वरच्या पदाचे अधिकारी होते. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने १९८३-८५ दरम्यान पंधरा तेलवाहू जहाजे विकत घेतली. यांना त्यावेळच्या १५ परमवीरचक्र विजेत्यांची नावे दिली गेली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?* मा.प्रतिभाताई पाटील *०२) मास्टर विनायकचे पूर्ण नाव काय ?* विनायक दामोदर कर्नाटकी *०३) महाराष्ट्रातील सहकारी कारखान्याचे आद्य प्रवर्तक कोण ?* पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील *०४) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हटले जाते ?* दादासाहेब फाळके *०५) संत एकनाथ यांचा जन्म कोठे झाला ?* पैठण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * विजय भगत वाशीम * धनराज पाटील बाभळीकर * गणेश गिरी धर्माबाद * प्रल्हाद जाधव * कोंडीबा मुत्तलेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *विज्ञाननिष्ठ* विज्ञाननिष्ठ माणूस वाटतो भोळा आहे आजच्या विज्ञानाला कुठे नवा डोळा आहे आजच्या विज्ञानाला नवा डोळा असला पाहिजे विज्ञाननिष्ठ माणूस कधी भोळा नसला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 08* *रात गवई सोय के* *दिवस गवाया खाय |* *हीरा जन्म अनमोल था* *कौड़ी बदले जाय ||* अर्थ : महात्मा कबीर मनुष्य जन्माची दुर्लभता पटवून देतात. सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव जन्म दुर्मिळ असून विश्वाची चिंता वाहण्याचं सामर्थ्य फक्त मानव जन्मातच आहे. मानव प्राणी चिंतनशील व विचारशील आहे. इतरांपेक्षा मानवाला बुद्धी आणि बोलीच वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे तो जगताची काळजी वाहू शकतो. भल्या वाईटाचा विचार करू शकतो,परंतु हल्ली मानव स्वार्थांध झाला आहे. जग आपल्यामुळं सुंदर होवू शकतं. हा भावही तो जणू विसरूनच गेलाय की काय ? अशी परीस्थिती बनलीय. मानवाने विवेकी अन निरामय जगण्यातच त्याची जीवन सार्थकता आहे. परंतु हे मानवा तू देह विलासी बणून रात्र झोपून आळसात गमावत आहेस. दिवसचे दिवस देह शृंगारात व जिभीचे चोचले पुरवण्यातच तू मश्गूल होवून संपवून टाकत आहेस. अशा प्रकारे तू हिर्यासमान असणारा अनमोल असा मनुष्यजन्म उगाच कौडीचेही सार्थक न करता व्यर्थच वाया घालवत आहेस. अशा प्रकारे तुझ्या या जन्माला अर्थच काय राहिला बरे ? असे जगणे तर सर्लच पशू पक्षीही जगत असतात. पुढील संत सुवचन पहा. गेला गेला रे जन्म वाया । फुकाची झिजवली काया । नाही केला रे विचार । नराचा झाला रे खर । एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराने आपल्याला या जगात इतर जीवापेक्षा वेगळा जीव जन्माला घालून काहीतरी आपल्या हातून चांगले कृत्य घडावे म्हणून पाठवले आहे. मनुष्यजन्म हा इतर जीवजन्मापेक्षा सर्वश्रेष्ठ जन्म आहे हेही आपण नाकारू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य घडावे, इतर जीवांना आपण आपल्यासारखाच जीव मानावा, त्यांची अवहेलना करु नये, संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जावे, आपण जशी सुखासाठी धडपड करत असतो मग इतर जीवांना का दु:ख द्यावे. परमेश्वराने सगळ्याच जीवांना समान जीव देऊन स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे त्यांचे स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये ही भावना आपल्या अंत:करणात सतत ठेवून जगायला शिकले पाहिजे,केवळ आपल्या स्वार्थासाठी जगणे नाही तर इतरांसाठी जगणे हा सर्वात मोठा उद्देश आपल्या मनुष्यजन्माचा आहे हे आपण लक्षात ठेऊन मनुष्यजन्माचे सार्थक करावे. ही मनुष्यजन्माची संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. म्हणून मनुष्य जन्माला विशेष महत्त्व आहे. या चांगल्या, सुंदर जन्माला कलंक लागू न देता जीवन जगायला शिकले पाहिजे तरच परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्यरुपी प्रतिनिधींचे कार्य पूर्ण झाल्याचे समाधान वाटेल. नाही तर " आला जन्माला आणि गेला वाराला " असेच होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधान - Solution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= मन निर्मळ हवे देवदत्त अतिशय अस्वस्थ झाला होता. मानसिक ताणाबरोबर त्याची प्रकृतीही बिघडायला लागली होती. गावात एक सिद्ध साधू महाराज होते. देवदत्त त्यांच्याकडे गेला आणि आपली व्यथा सांगू लागला. ‘ ‘महाराज, अति विचार करून मी त्रासून गेलो आहे. या विचारांमुळे रात्र रात्र झोप येत नाही त्यामुळे अस्वस्थपणा फारच वाढतो. आता तर प्रकृतीवरही परिणाम होऊ लागला. यावर काहीतरी उपाय सांगा. ” त्या साधू महाराजांनी देवदत्ताला आपल्या एका स्नेह्याकडे पाठविले आणि त्यांच्याकडे राहून चार-पाच दिवस त्यांची दिनचर्या पाहून येण्यास सांगितले. देवदत्त गुरुंची आज्ञा मानून त्याच्या स्नेह्यांकडे राहून त्यांची सर्व दिनचर्या पाहून परत आला. तरीही या सर्व गोष्टींचा त्याला कांहीच . उलगडा झाला नाही. ‘ ‘तू तिथे काय पाहिलंस?” या साधू महाराजांच्या प्रश्नावर देवदत्त म्हणाला, ‘ अभ्यासण्यासारखी तुमच्या स्नेह्यांची दिनचर्या नाही. ते रात्री सर्व भांडी धुतात आणि रात्रभर त्यांच भांड्यांवर थोडीशी धूळ बसली असेल म्हणून सकाळी पुन्हा ती सर्व भांडी धुऊन काढतात. मी जरा आश्चर्यानेच त्यांना या प्रकाराबद्दल विचारले? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘ ‘मी या मंगल कार्यालयाची व्यवस्था बघतो. धुळीने भरलेली भांडी किंवा कार्यालयातील अस्वच्छता मला आवडत नाही. धुळीने भरलेली भांडी स्वच्छ’ करून ठेवणे माझे कर्तव्य आहे. म्हणून ती मी सकाळ संध्याकाळ स्वच्छ करतो. हे ऐकल्यावर साधू महाराज म्हणाले, ‘ ‘देवदत्ता, जे पाहायला हवं, समजून घ्यायला हवं ते तू समजून नाही घेतलंस. अरे, चित्त निर्मळ तर सुखच सुख. ” *'नाही निर्मळ मन काय करील साबण'.* तात्पर्य : रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम मनातील जाळी जळमटं काढून मन स्वच्छ करून रात्रीला आणि दिवसाला सुरुवात करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ वर्गः पहिली / दुसरी विषयः गणित उपक्रमाचे नावः ओळख अंकाची. 👉उद्दिष्टः एकक दशक व शतकाची संकल्पना समजणे. 〰〰〰〰〰〰 *(ज्ञानरचनावाद) शैक्षणिक साहित्यः* १) एकक साठी सुट्या काड्या व दशक शतकासाठी काड्यांचे गठ्ठे २) सागरगोटे , मण्याची माळ नकली नोटा. .....इत्यादी ... कृतीः विद्यार्थ्यांच्या संख्येच्या लेखनाचा सरावासाठी व वाचनासाठी मुलांना दोन तीन गटात बसविणे. व त्यानंतर त्यांना काड्यांचे गठ्ठे व सुट्या काड्या देणे गटातील प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार त्या काड्या घेईल आणि बाजुला ठेवून देईल. त्यानंतर त्याने किती एकक दशक शतक ठेवले ते मोजेल आणि सर्वजण त्याचे निरीक्षण करून ती संख्या आपल्या वहित लिहितील *अंकात आणि अक्षरात* हा सराव घेत असताना विद्यार्थ्यांच्या अचूक लेखन व वाचनाचा सरावासाठी उजळणीचा वापर करण्यात येत आहे. असा सराव सागरगोटे शिरगोळे ह्याच्या साह्याने घेणे चालू आहे. गटाचा आवडीनुसार उपलब्ध साहित्याचा वापर केल्यास मुलांना लवकर समजेल आणि मनोरंजक वाटेल. हा सराव रोज , नेहमी घेणे आवश्यक आहे. *👉निष्पत्ती* - संख्या ओळख होणे. एकक दशक शतक ही संकल्पना स्पष्ट होते. 〰〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला. १९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोलायुनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले. 💥 जन्म :- १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट. १८७० - मारिया मॉँटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ. १९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू. १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - चौथ्या BIMSTEC परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यासाठी रवाना* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारचा दिलासा, मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्याची मुदत 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली* --------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून शासकीय कार्यालयांना वॉटर एटीएम भेट.* --------------------------------------------------- 4⃣ *सिंधुदुर्गः सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग* --------------------------------------------------- 5⃣ *नोटाबंदीनंतर 15 लाख नोकऱ्या गमावल्या, गरिबांच्या खिशात हात घालून पैसे काढण्यात आले आणि विकासदर 1 टक्का घसरला - अरुंधती रॉय* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी 4 हजार ठिकाणी काव्यांजली कार्यक्रम, अमित शाह यांची माहिती* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018 : भारताची सुवर्ण हॅट्ट्रिक हुकली, पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला रौप्यपदक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *यंदा कर्तव्य आहे* दैनिक जनशक्ती मध्ये प्रकाशित लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. http://epaper.ejanshakti.com/m5/1797019/Mumbai-Janshakti/31-08-2018#page/4/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *भारतरत्न पुरस्कार* भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'बंगदर्शन' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण ?* बंकिमचंद्र चट्टोपाध्याय *२) भारतीय अवकाश कार्यक्रमाचे पितामह कोण ?* विक्रम साराभाई *३) एएचक्यूचं विस्तारित रूप काय ?* आर्मी हेड क्वार्टर्स *४) छत्तीसगड या राज्यात किती जिल्हे आहेत?* २७ *५) अरवली पर्वत कुठे आहे ?* राजस्थान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * रत्नाकर कदम चोळखेकर * संतोष पाटील साखरे * सुभाष जाधव * सचिन वाघ * उदय मोहिते * अशोक जायवाड * साईनाथ वाघमारे * प्रकाश कल्याणकार * अशोक मुदलोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *विश्वास* आपल्या स्वप्नांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांचे भविष्य निश्चित खास म्हणजे खास आहे ज्याला कधीही चांगले स्वप्न पडतात त्यांचे स्वप्न कधीतरी नक्की खरे ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 07* *माया छाया एक सी* *बिरला जाने कोय...* *भागत के पीछे लगे,* *सन्मुख भागे सोय...* अर्थ: संपत्ती आणि पडछायेचा स्वभाव एक सारखा असतो. दोन्हीच्याही ठाई चंचलता ओतप्रोत भरलेली आहे. फारच कमी माणसांना दोन्हींचा चल स्वभाव लक्षात येतो. मात्र अज्ञान व हव्यासासापोटी माणसं ऊर फुटेस्तोवर यांच्या मागे लागतात आणि या दोघी जणी पुढे पुढेच धावत असतात. मोहापोटी माणूस आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्तीच्या संग्रहाच्या मागे लागलेला आहे. चालता चालता माणूस संगत करणार्या सावलीकडे वळून मागे पाहतो तर सोबत असणारी सावली दूर दूर जायला लागते. संपत्तीचेही तसेच आहे. तिच्याकडे वळून पाहिले की तीही दूर जावू लागते. न थांबता आपल्या कर्तव्य पथावर धवणार्या माणसांच्या मागे निमुटपणे संपत्ती आणि सावली पाठीराख्यांसारख्या धावत असतात. म्हणून माणसानं कर्मावर ध्यान देवून संपत्तीचा मोह नाही दाखवला की ती सावलीसारखी आपोआप मागेमागे येत असते. निर्मोही व कर्तव्य तत्पर माणसेच लक्ष्मीपुत्र असतात. धन मोही मात्र लक्ष्मीदासंच समजावेत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण कुणालातरी नाव ठेऊन त्याचा अपमान करुन स्वत: मी काही वेगळा आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा तुम्ही त्यांच्यातील चुका सुधारण्यासाठी प्रेरीत करत आहात हे निश्चित आहे. परंतू आपल्यातल्या दोषांना किंवा चुकांना वृध्दींगत करण्याची संधी देत आहात हे लक्षात असू द्या. कारण आपल्या दोषांना सुधारण्यासाठी संधीच देत नाही. इतरांचे ऐकून घेण्यासारखी मनस्थिती नसते. इतरांचे दोष काढण्यात धन्यता मानता त्यामुळे इतरांना संधी मिळते तर आपली संधी आपल्याच गर्वापायी सुधारण्याची संधी गमावली जाते. असे न करता पहिल्यांदा आपल्यातील दोष शोधून आपणच सुधारण्याची संधी शोधली म्हणजे इतरांना उपदेश देण्याइतपत हक्क आपल्याला कदाचित मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपदेश - Preaching* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *करावं तसं भरावं* उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य डोक्यावर आला होता. एक वाटसरू आपल्या गांवाकडे चालला होता. दमलेल्या, थकलेल्या त्या वाटसरूची नजर एका डेरेदार आंब्याच्या झाडाकडे गेली. त्या झाडाची जमिनीवर चांगली सावली पडली होती. झाडाखाली थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून तो झाडाखाली आडवा झाला. थोड्या वेळातच त्याला झोप लागली. त्या झाडावर एक कोकिळा रहात होती. ती परोपकारी होती. वाटसरूच्या तोंडावर ऊन यायला लागले हे पाहून त्या वाटसरूला सावली कशी मिळेल याचा ती विचार करू लागली. तिला एक कल्पना सुचली. आपले पंख पसरून तिने वाटसरूवर सावली धरली. पण एका दुष्ट कावळ्याला हे पहावलं नाही. कोकिळेला त्रास व्हावा या उद्देशाने त्याने तोंडात धरून आणलेला हाडाचा तुकडा त्या वाटसरूच्या तोंडावर टाकला आणि स्वतः त्या झाडाच्या वरच्या शेंड्यावर जाऊन कोकिळेची होणारी फजिती बघत बसला. हाडाचा तुकडा तोंडावर पडताच वाटसरू जागा झाला. त्याने वर पाहिले त्याला कोकिळा दिसली. संतापून त्याने बाजूला पडलेला दगड उचलला आणि जोराने कोकिळेच्या दिशेने फेकला. दगड इतका जोरात गेला की कोकिळेवरचा नेम चुकून तो वरच्या फांदीवर बसलेल्या कावळ्याला लागला आणि तात्काळ त्याचा मृत्यू ओढवला. *तात्पर्य – करावं तसं भरावं.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. १८३५ - ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना. १८३५ - अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना. १९८४ - स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन. 💥 जन्म :- १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. १९३० - वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती. १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १४२८ - शोको, जपानी सम्राट १९४९ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ* --------------------------------------------------- 2⃣ *पुरामुळे बंद केलेला केरळमधील कोची विमानतळ पासून पुन्हा सुरु* --------------------------------------------------- 3⃣ **पुणे - इयत्ता दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, बारावीप्रमाणे दहावीचा ही निकाल घसरला, यंदा 23.66 टक्के निकाल, मागील वर्षी 24.44 टक्के निकाल होता.** --------------------------------------------------- 4⃣ *बिग बी शेतकऱ्यांना देणार मदतीचा हात; शहिदांच्या कुटुंबांनादेखील करणार अर्थसहाय्य, 200 शेतकरी आणि 44 शहीद जवानांच्या कुटुंबांना करणारा मदत* --------------------------------------------------- 5⃣ *एन. टी. रामाराव यांचे पुत्र, तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि तेलुगू देसम पार्टीचे नेते नंदमुरी हरिकृष्ण यांचे भीषण अपघातात झाले निधन* --------------------------------------------------- 6⃣ *जालना : नंदुरबार येथे शासकीय अधिकाऱ्यास मारहाणीच्या निषेधार्थ जालना जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी महासंघाचे आज लेखणीबंद आंदोलन* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: तब्बल 48 वर्षांमध्ये भारताला तिहेरी उडीमध्ये पहिले सुवर्णपदक, भारताला अरपिंदर सिंगने तिहेरी उडीमध्ये जिंकवून दिले सुवर्णपदक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दर गुरुवारी प्रकाशित होणारे शैक्षणिक सदर *उपक्रमातून शिक्षण* *क्रांतिकारकांच्या आठवणीने भारावलेली पिसवली शाळा - अजय लिंबाजी पाटील, ठाणे* http://shikshakmitr.blogspot.com/2018/08/blog-post.html आपण ही आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम खालील मोबाईल क्रमांकावर whatsapp द्वारे पाठवू शकता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *घृष्णेश्वर मंदिर* घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिरअसून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करु नका. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) पुष्कर मेला कोठे भरतो ?* - जयपुर *०२) आजाद हिन्द फ़ौजची स्थापना कोठे झाली ?* - सिंगापुर *०३) क्षेत्रफळाच्याबाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक आहे ?* - सातवा *०४) जाकिर हुसैन कशाशी संबंधित आहेत ?* - तबला *०५) लाल बहादुर शास्त्री यांचीसमाधीकोठे आहे ?* - विजय घाट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * अरुण चव्हाण * नागभूषण माकोड, येवती * गणेश बोळसेकर * दिलीप झरेकर * कृष्णा श्याम दाभडकर * नीरज नागभूषण दुर्गम * नागेश कुऱ्हाडे * माधुरी हतनुरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिसतं तसं नसतं* दिसतं तसं अगदी सर्व असतं नाही दिसतं तसं नसतं लक्षात ठेवा माणूस फसतं नाही दिसतं त्यापेक्षा कुठेही फार वेगळ असतं विश्वास बसणार नाही असंच सगळं असतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 06* *पत्ता बोला वृक्ष से* *सुनो वृक्ष बनराय |* *अब के बिछड़े न मिले* *दूर पड़ेंगे जाय ||* अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण कुणालातरी नाव ठेऊन त्याचा अपमान करुन स्वत: मी काही वेगळा आहे असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा तुम्ही त्यांच्यातील चुका सुधारण्यासाठी प्रेरीत करत आहात हे निश्चित आहे. परंतू आपल्यातल्या दोषांना किंवा चुकांना वृध्दींगत करण्याची संधी देत आहात हे लक्षात असू द्या. कारण आपल्या दोषांना सुधारण्यासाठी संधीच देत नाही. इतरांचे ऐकून घेण्यासारखी मनस्थिती नसते. इतरांचे दोष काढण्यात धन्यता मानता त्यामुळे इतरांना संधी मिळते तर आपली संधी आपल्याच गर्वापायी सुधारण्याची संधी गमावली जाते. असे न करता पहिल्यांदा आपल्यातील दोष शोधून आपणच सुधारण्याची संधी शोधली म्हणजे इतरांना उपदेश देण्याइतपत हक्क आपल्याला कदाचित मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *बेवारस - Helpless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा* रविवारचा दिवस होता. पाय मोकळे करावे म्हणून घराबाहेर पडलो. फिरता फिरता मुख्य बाजाराच्या रस्त्यावर आलो. रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे बरीच दुकानं बंद होती. रस्त्यावर रहदारी सुद्धा तुरळक होती. मी रमत गमत निघालो होतो. तोच कांही अंतरावर एका बंद दुकानाच्या समोर बरीच गर्दी जमलेली दिसत होती. उत्सुकतेपोटी मी ही त्या गर्दीत सामील झालो. प्रत्येकजण दुकानाच्या पायरीच्या दिशेने पहात होता. मी पण डोकावून पाहू लागलो. दुकानाच्या पायरीवर एक स्वच्छ कापडी पिशवी ठेवलेली दिसत होती आणि ती कशाने तरी गच्च भरलेली होती. त्या पिशवीचा कोणी वारसदार तिथे नव्हता. त्यामुळे त्या पिशवी बद्दल प्रत्येकाच्या मनांत शंका येत होती. गर्दीतील प्रत्येक व्यक्ती त्या बेवारस पिशवीकडे पहात आपलं मत मांडत होती. एकजण म्हणाला, ‘‘कोणी यात्रेकरू चुकून विसरून गेलेला दिसतो आहे.’’ त्यावर दुसरा उद्गारला, ‘छे छे कांहीतरी चोरीची भानगड असावी. तर तिसर्याला वेगळीच शंका, ‘‘कशावरून आंतमध्ये काही वेगळे असू शकते. तात्पर्य – व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिन* *भारतीय क्रीडा दिन* *तेलगू भाषा दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९७४ - चौधरी चरण सिंह यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली. 💥 जन्म :- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू. १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली : महापुरामुळे केवळ केरळवासियांसाठीच केंद्र सरकराने प्राप्तिकर भरण्याची मुदत वाढविली असून ती आता 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे.* --------------------------------------------------- 2⃣ *उत्तर प्रदेशात 30 पोलीस अधिका-यांच्या करण्यात आल्या बदल्या* --------------------------------------------------- 3⃣ *पुणे - इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार ऑनलाइन जाहीर* --------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : डीबीटी रद्द करावी या मागणीसाठी स्टुटंड फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा* --------------------------------------------------- 5⃣ *चेन्नई - तामिळनाडूचे माजी अध्यक्ष एम. करुणानिधी यांना भारतरत्न देण्याची डीएमकेची मागणी* --------------------------------------------------- 6⃣ *डॉ. अविनाश सुपे यांची वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. बी सी रॉय पुरस्कारासाठी निवड* --------------------------------------------------- 7⃣ *एशियन गेम्स 2018: मनजित सिंगने जिंकले अॅथलेटीक्समध्ये सुवर्ण* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *तुझी जात कंची ?* मुंबईहुन प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. http://epaper.ejanshakti.com/m5/1794308/Mumbai-Janshakti/29-08-2018#page/4/1 जरूर वाचावे आणि आवडल्यास share पण करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *केदारनाथ* केदारनाथ हे भारताच्या उत्तराखंडराज्यामधील एक लहान गाव आहे. केदारनाथ येथील अतिप्राचीन केदारनाथ मंदिरासाठीप्रसिद्ध आहे. भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर भारतामधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड ह्या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) इ.स.१७७४ मध्ये भारतात कुठे कोळशाची पहिली खाण उत्पादनक्षम झाली ?* राणीगंज *२) 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन'ची स्थापना कधी झाली ?* १९ जुलै १९९० *३) भारतातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय कुठे आहे ?* अलिपूर कोलकाता *४) 'लोकनायक' ही पदवी कुणाला दिली गेली ?* जयप्रकाश नारायण *५) उत्तर प्रदेशमध्ये किती जिल्हे आहेत ?* ७५ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * योगिता सुरेश येवतीकर, नांदेड * शिवराज पाटील चोळाखेकर * आशिष जैन * रवींद्र केंचे * गणेश येडमे * ईश्वर सेठीए * सचिन बावणे * विनायक कुटेवाड * योगेश ढगे पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिखावा* हल्ली कामं कमी अन् दिखावा जास्त आहे प्रथम पहाणाराला वाटते हे एकदम मस्त आहे काम कमी अन् दिखावा जास्त व्हायला नको दिखावा करता करता महत्वाचे काम रहायला नको शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 06* *पांच पहर धंधा किया,* *तीन पहर गया सोय |* *एक पहर भी नाम बिन* *मुक्ति कैसे होय ||* अर्थ : दिवसाचे दिन आणि रात्र असे दोन भाग होतात. रात्रीचे चार प्रहर व दिनाचे चार प्रहर असतात. असे एका दिवसाचे आठ प्रहर होतात. त्यापैकी पाच प्रहर म्हणजेच पंधरा तास माणूस नित्याच्या दैनंदिन धावपळीत व्यथित करीत असतो. सहजतेने इतका वेळ नोकरी-चाकरी , मनोरंजन, आदि बाबीत उडवित असतो. तीन प्रहर म्हणजे नऊ तासांचा वेळ दररोज झोपण्यात निघून जातो. खरे तर मनुष्य जन्म इत्तर प्राण्यांपेक्षा भिन्न आहे. बुद्धी आणि बोली यांच्या वेगळेपणामुळे मनन, चिंतन ,चर्चा संवाद-सुसंवाद यांचे माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाचा वारसा मानव प्राणीच चालवू शकतो. गरज आहे ती आपल्या अष्टौ प्रहरापैकी अर्धा-एखाद प्रहर स्वार्थविरहित निरामय भावनेने जीवनाकडे बघण्याची. असा संकल्प सर्वांनी केला तर या अशा प्रगल्भ जगण्यानं या विश्वाचंं कल्याणंच होईल. सर्वांच्या दुःखाच्या व्याधीचं परिमार्जन होईल. अनावश्यक लालसा, मोह टाळता आले तर पृथ्वीवर नंदनवन बनवायला किती अवकाश लागणार आहे ! व्याधी व वेदना मुक्तीचा तोच तर खरा महामार्ग असणार आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे. कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी. दुसरे असे की, माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो. एखादी कुणी जरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते. अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते. एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे, आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात. अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात. अशा माणसांमध्ये स्वार्थ, मतभेद, दुरावा, गर्व अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत. म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रवृत्ती - Tendency* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *१००० आरशांची खोली* एका अध्यात्मिक गुरु ना एका माणसाने विचारले "माझे कामगार माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे. सगळे चुकीचेच वागतात. अस का?" तेव्हा गुरु हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्यात खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या. ती खुश व्हायची. ती हसली की त्या सगळ्या हसायच्या. तिने टाळ्या वाजवल्या की त्या सगळ्या टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे तिला ती खोली म्हणजे सर्वोत्तम जागा वाटायची. त्याच खोलीत एकदा एक खूप त्रासलेला, एकदम नाराज माणूस शिरला. त्याला त्याच्या भोवती सगळे चिडलेले, नाराज ,अस्वस्थ चेहरे दिसायला लागले. ते सगळे त्याच्याकडे रोखून पहात होते. त्याने एकदम भडकून त्यांच्यावर हात उगारला तर त्या सगळ्यांनी ही त्याच्यावर हात उगारला. त्याच्या मनात विचार आला अरेच्या काय ही खोली. जगात यापेक्षा वाईट जागा नसेल. हे जग म्हणजे अशाच हजारो आराशांची मोठी खोली आहे. आपण जसे असू तसे त्या आरशातून दिसू. जग म्हणजे स्वर्ग की नरक हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण जसं पाहू तसं ते दिसेल." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान 💥 जन्म :- १९२५ - नारायण धारप, मराठी लेखक १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल १९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *2019ची लोकसभा निवडणूक आणि 2018मध्ये होणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सोशल मीडियावर ठेवणार करडी नजर* --------------------------------------------------- 2⃣ *आर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा, कपूर कुटुंबाने घेतला विकण्याचा निर्णय !* --------------------------------------------------- 3⃣ *अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला दाखल.* --------------------------------------------------- 4⃣ *डेहराडून- बेबी राणी मौर्य यांनी स्वीकारला उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 5⃣ *रत्नागिरी - केरळ पुरग्रस्तांसाठी आनंदवनातील कुष्टरोग्यांच्यावतीने डॉ. विकास आमटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला रामगिरी येथे पाच लाख रुपयांचा धनादेश* --------------------------------------------------- 6⃣ *आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला.* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= राखीपौर्णिमा दिनानिमित्त प्रासंगिक कथा *रक्षाबंधन* https://goo.gl/ZUSUiy वरील कथा वाचल्यावर आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *काशी विश्वेश्वर* विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवणूक निघाली. कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले. अशी आख्यायिका सांगितली जाते. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचेआहे. विश्वनाथाचे दर्शनाअगोदर धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे. या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत. साक्षी विनायक, पश्चिमेला देहली विनायक, उत्तरेला पापशार्थी विनायक, दक्षिणेला दुर्गा विनायक, नैऋत्येला भीमचंद विनायक, वायव्येला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक. काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. तेथे दर्शन घ्यावयाचे तर तीन हार न्यायची पद्धत आहे. एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकव्याप्त काश्मीरची राजधानी कोणती ?* मुझफ्फराबाद *२) 'सेव्हन सिस्टर्स' म्हणून भारतातील कोणत्या भागाला संबोधले जाते ?* ईशान्य भारतातील सात राज्यं *३) दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा हक्क अमान्य करून आंतराष्ट्रीय लवादाकडे कुठल्या देशाने धाव घेतली होती ?* फिलिपिन्स *४) केळीचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं ?* तामिळनाडू *५) लष्करातील सर्वोच्च हुद्दा कोणता ?* जनरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अतुल वैद्य 👤 दत्तप्रसाद सुरकूटवार 👤 प्रशांत रुईकर 👤 बोसू वंगरा 👤 दिगंबर सोळंखे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अस्सल* सोन्यालाच अग्निची परीक्षा द्यावी लागते सोन्याला संकटात खंबीर व्हावे लागले अस्सल ते कोणत्याही कसोटीवर तरले जाते जे खरे आहे ते कुठेही खरे ते खरे ठरले जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 04* *तीर तुपक से जो लादे* *सो तो शूर न होय |* *माया तजि भक्ति करे* *सूर कहावै सोय ||* अर्थ : भात्यात ठेवुनी तीर बनतो का कुणी शुर पाश मायेचे त्यागिता भक्ता देव नसे दूर उगाच पाठीवर भात्यात बाण भरले. खांद्यास धनुष्य अडवून फिरले म्हणून कोणीही महान योद्धा होत नाही. त्यासाठी मरणाचे भय दूर सारून हाती तीरकमटा घ्पावा लागतो. प्रत्यंचा ओढून वेध घेण्यासाठी लक्ष्यावर शर सोडता आला पाहिजे. वेळ प्रसंगी समोरून येणार्या बाणांना छातीवर झेलण्याची तयारी ठेवतो तोच खरा योद्धा . मोह मायेचे फसवे पाश फेकून देवून निरपेक्ष भावनेतून जो ईश्वराची भक्ती करतो. सत्कार्यासाठी तत्पर असतो.त्यालाच ईश्वर प्राप्ती होत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगी नम्रता आहे त्यांच्या जीवनात समाधान नांदत असते. त्याचे कारणही तसेच आहे.अशी माणसे दुस-यांच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाहीत, दुस-यांबद्दल वाईट विचार आपल्या मनात आणत नाहीत, राग-द्वेष-मत्सर ही भावना दुस-याबद्दल करीत नाहीत, ते स्वत: प्रांजळ मतांचे असल्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही अधम कृत्य घडत नाही. सदैव इतरांचा आदर सन्मान करत असतात. अशा सद्गुणी माणसांच्या सहवासात राहिल्याने आपल्यातील असणारे दोष दूर तर होतीलच त्याचबरोबर आपल्यामध्ये नम्रताही हळूहळू वृध्दींगत होऊन आपल्या जीवनात खरे जीवन जगत आहोत ही सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होईल. जीवनात सुखी व समृध्द व्हायचे असेल तर नम्रता ही अंगिकारली पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संशय - Doubt* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याचा विजय* गोविंदा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला होता. पण लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आपले व आईचे पोट भरण्यासाठी त्याला एका सरदाराच्या घरी चाकरी करावी लागली. गोविंदाला त्या घरात घराची साफसफाई करणे, देवघर साफ करणे, पूजेची तयारी करणे याशिवाय कावडीने विहिरीचे पाणी भरायचे कामसुद्धा त्याच्याकडेच होते. सर्व कामं होता होता दिवस संपत असे त्याला रिकामा असा वेळच मिळत नसे. पण आज वडिलांच्या पश्चात त्याचा आणि आईचा उदारनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एक दिवस वाड्यात गोंधळ झाला होता. सरदार अतिशय रागवलेले होते. वाड्यात प्रत्येकजण कांहीतरी शोधत होता. सरदारांची हिऱ्याची अंगठी हरविली होती. आजपर्यंत वाड्यात कधी वस्तू हरविली नव्हती. गोविदा नवीनच वाड्यात यायला लागला होता त्यामुळे त्याच्यावरच संशय होता. त्याला बोलावून त्याबद्दल विचारले असता, ‘‘मी चोरी केलेली नाही’’ ठामपणे त्याने उत्तर दिले. पण सरदारांनी गोविंदाला देवघरात नेले व देवावरील फूल उचलून खरे बोलण्यास सांगितले. फूल उचलत गोविंदा म्हणाला, ‘‘देवा मी चोरी केलेली नाही. आता खरं काय ते तूच सांग’’ तेवढ्यात सरदारांचे लक्ष देवघरातल्या तीर्थ असलेल्या ताम्हनात गेले. त्यांना त्यात कांहीतरी चमकल्यासारखे वाटले. पाहातात तो अंगठी पूजा करताना त्यात गळून पडली होती. सरदारांनी गोविंदाला, ‘‘तू चोर नाहीस !’’ अशी कबुली दिली. त्यावर गोविदाने देवाला हात जोडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘सत्याचा वाली परमेश्वर !’’ *तात्पर्य – शेवटी सत्याचाच विजय असतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ======= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 27/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान 💥 जन्म :- १९२५ - नारायण धारप, मराठी लेखक १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल १९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री 💥 मृत्यू :- १९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *2019ची लोकसभा निवडणूक आणि 2018मध्ये होणा-या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता सोशल मीडियावर ठेवणार करडी नजर* --------------------------------------------------- 2⃣ *आर. के. स्टुडिओ होणार इतिहासजमा, कपूर कुटुंबाने घेतला विकण्याचा निर्णय !* --------------------------------------------------- 3⃣ *अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला दाखल.* --------------------------------------------------- 4⃣ *डेहराडून- बेबी राणी मौर्य यांनी स्वीकारला उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 5⃣ *रत्नागिरी - केरळ पुरग्रस्तांसाठी आनंदवनातील कुष्टरोग्यांच्यावतीने डॉ. विकास आमटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला रामगिरी येथे पाच लाख रुपयांचा धनादेश* --------------------------------------------------- 6⃣ *आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला.* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली. पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासने 45.69 सेकंदाची वेळ नोंदवली.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= राखीपौर्णिमा दिनानिमित्त प्रासंगिक कथा *रक्षाबंधन* https://goo.gl/ZUSUiy वरील कथा वाचल्यावर आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *काशी विश्वेश्वर* विश्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते. पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यावर अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी " श्रीएकनाथी भागवत" हा वारकरी सम्प्रदायाचा महान ग्रंथ लिहीला. येथे याची हत्तीवरुन मिरवणूक निघाली. कैलासावर भस्म फासून रहाणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने 'मला कुणी चिडविणार नाही अश्या ठिकाणी घेऊन चला' अशी विनंती शंकराला केली.त्यामुळे शंकर येथे येउन राहू लागला.तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर ते त्यात रहावयास गेले. अशी आख्यायिका सांगितली जाते. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत.त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचेआहे. विश्वनाथाचे दर्शनाअगोदर धुंडीराज किंवा ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा येथे प्रघात आहे. या मंदिराचे सभोवताल अष्ट दिशांचे अष्टविनायक आहेत. साक्षी विनायक, पश्चिमेला देहली विनायक, उत्तरेला पापशार्थी विनायक, दक्षिणेला दुर्गा विनायक, नैऋत्येला भीमचंद विनायक, वायव्येला उदंड विनायक आणि ईशान्येला सर्व विनायक. काशी विश्वनाथाचे मंदिरात मुख्य पिंडी गाभाऱ्याचे एका टोकाला आहे. त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे. तेथे दर्शन घ्यावयाचे तर तीन हार न्यायची पद्धत आहे. एक हार शंकराला, दुसरा पार्वतीला तर तिसरा हार तेथील पूजारी त्या भक्ताचे गळ्यात घालतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकव्याप्त काश्मीरची राजधानी कोणती ?* मुझफ्फराबाद *२) 'सेव्हन सिस्टर्स' म्हणून भारतातील कोणत्या भागाला संबोधले जाते ?* ईशान्य भारतातील सात राज्यं *३) दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा हक्क अमान्य करून आंतराष्ट्रीय लवादाकडे कुठल्या देशाने धाव घेतली होती ?* फिलिपिन्स *४) केळीचं सर्वाधिक उत्पादन कुठे होतं ?* तामिळनाडू *५) लष्करातील सर्वोच्च हुद्दा कोणता ?* जनरल *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अतुल वैद्य 👤 दत्तप्रसाद सुरकूटवार 👤 प्रशांत रुईकर 👤 बोसू वंगरा 👤 दिगंबर सोळंखे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अस्सल* सोन्यालाच अग्निची परीक्षा द्यावी लागते सोन्याला संकटात खंबीर व्हावे लागले अस्सल ते कोणत्याही कसोटीवर तरले जाते जे खरे आहे ते कुठेही खरे ते खरे ठरले जाते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 04* *तीर तुपक से जो लादे* *सो तो शूर न होय |* *माया तजि भक्ति करे* *सूर कहावै सोय ||* अर्थ : भात्यात ठेवुनी तीर बनतो का कुणी शुर पाश मायेचे त्यागिता भक्ता देव नसे दूर उगाच पाठीवर भात्यात बाण भरले. खांद्यास धनुष्य अडवून फिरले म्हणून कोणीही महान योद्धा होत नाही. त्यासाठी मरणाचे भय दूर सारून हाती तीरकमटा घ्पावा लागतो. प्रत्यंचा ओढून वेध घेण्यासाठी लक्ष्यावर शर सोडता आला पाहिजे. वेळ प्रसंगी समोरून येणार्या बाणांना छातीवर झेलण्याची तयारी ठेवतो तोच खरा योद्धा . मोह मायेचे फसवे पाश फेकून देवून निरपेक्ष भावनेतून जो ईश्वराची भक्ती करतो. सत्कार्यासाठी तत्पर असतो.त्यालाच ईश्वर प्राप्ती होत होत असते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्यांच्या अंगी नम्रता आहे त्यांच्या जीवनात समाधान नांदत असते. त्याचे कारणही तसेच आहे.अशी माणसे दुस-यांच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाहीत, दुस-यांबद्दल वाईट विचार आपल्या मनात आणत नाहीत, राग-द्वेष-मत्सर ही भावना दुस-याबद्दल करीत नाहीत, ते स्वत: प्रांजळ मतांचे असल्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही अधम कृत्य घडत नाही. सदैव इतरांचा आदर सन्मान करत असतात. अशा सद्गुणी माणसांच्या सहवासात राहिल्याने आपल्यातील असणारे दोष दूर तर होतीलच त्याचबरोबर आपल्यामध्ये नम्रताही हळूहळू वृध्दींगत होऊन आपल्या जीवनात खरे जीवन जगत आहोत ही सकारात्मक उर्जा निर्माण होण्यास मदत होईल. जीवनात सुखी व समृध्द व्हायचे असेल तर नम्रता ही अंगिकारली पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸🏕🌸 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संशय - Doubt* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सत्याचा विजय* गोविंदा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलेला होता. पण लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आपले व आईचे पोट भरण्यासाठी त्याला एका सरदाराच्या घरी चाकरी करावी लागली. गोविंदाला त्या घरात घराची साफसफाई करणे, देवघर साफ करणे, पूजेची तयारी करणे याशिवाय कावडीने विहिरीचे पाणी भरायचे कामसुद्धा त्याच्याकडेच होते. सर्व कामं होता होता दिवस संपत असे त्याला रिकामा असा वेळच मिळत नसे. पण आज वडिलांच्या पश्चात त्याचा आणि आईचा उदारनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. त्यामुळे काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एक दिवस वाड्यात गोंधळ झाला होता. सरदार अतिशय रागवलेले होते. वाड्यात प्रत्येकजण कांहीतरी शोधत होता. सरदारांची हिऱ्याची अंगठी हरविली होती. आजपर्यंत वाड्यात कधी वस्तू हरविली नव्हती. गोविदा नवीनच वाड्यात यायला लागला होता त्यामुळे त्याच्यावरच संशय होता. त्याला बोलावून त्याबद्दल विचारले असता, ‘‘मी चोरी केलेली नाही’’ ठामपणे त्याने उत्तर दिले. पण सरदारांनी गोविंदाला देवघरात नेले व देवावरील फूल उचलून खरे बोलण्यास सांगितले. फूल उचलत गोविंदा म्हणाला, ‘‘देवा मी चोरी केलेली नाही. आता खरं काय ते तूच सांग’’ तेवढ्यात सरदारांचे लक्ष देवघरातल्या तीर्थ असलेल्या ताम्हनात गेले. त्यांना त्यात कांहीतरी चमकल्यासारखे वाटले. पाहातात तो अंगठी पूजा करताना त्यात गळून पडली होती. सरदारांनी गोविंदाला, ‘‘तू चोर नाहीस !’’ अशी कबुली दिली. त्यावर गोविदाने देवाला हात जोडले आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘सत्याचा वाली परमेश्वर !’’ *तात्पर्य – शेवटी सत्याचाच विजय असतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ======= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत बहिणाबाई चौधरी यांची 139 वी जयंती* * 💥 ठळक घडामोडी :- १९९१ - युक्रेनला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. १९९२ - चीन व दक्षिण कोरियाने राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित केले. १९९२ - हरिकेन अँड्रु हे कॅटेगरी ५चे वादळ फ्लोरिडाच्या किनार्यावर आले. १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. २००६ - आंतरराष्ट्रीय खगोल संघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले 💥 जन्म :- १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक १८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू :- १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पाटणा- लालजी टंडन यांनी स्वीकारला बिहारच्या राज्यपालपदाचा पदभार* --------------------------------------------------- 2⃣ *पुणे - 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल* --------------------------------------------------- 3⃣ *जालना - शहरातील मोंढा मार्केटमध्ये नगरपालिकेच्या कारवाईत ५ लाख रुपयाचे तीन टन प्लास्टिक जप्त* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची केरळसाठी २५ लाखांची मदत, पूरग्रस्तांसाठी पंढरपूरचा पांडुरंग पावला* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई - एसटी महामंडळाकडून केरळ पूरग्रस्तांसाठी 10 कोटींचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द* --------------------------------------------------- 6⃣ *ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन, नवी दिल्लीमध्ये त्यांच्या पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार.* --------------------------------------------------- 7⃣ *आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा - कानमंत्र* http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_67.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रामेश्वरम* रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये स्थित असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे. रामेश्वरम श्रीलंकेच्या मन्नार द्वीपासून ५० किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर स्थित आहे. ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= नियम अगदी थोडा असावा, पण तो प्राणपलीकडे जपावा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) व्हॉलीबॉलच्या मैदानाची लांबीरुंदी किती असते?* 👉 १८× ९ मीटर *२) खो-खो च्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 २७× १६ मीटर *३) फूटबॉलच्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉 १२०×९० मीटर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 श्रीकांत भुजबळ, तहसीलदार 👤 श्याम ठाणेदार, पुणे 👤 सुनीलकुमार बावस्कर 👤 गोपाळ ऐनवाले, धर्माबाद 👤 संजय पाटील 👤 हणमंत बोलचेटवार, धर्माबाद 👤 ऋषिकेश शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* मोठ्यांच्या सावलीत छोटं वाढत नाही मोठ्याने वाढवले असे कुठे घडत नाही मोठयांची अपेक्षा मोठी मोठी असते मोठा वाढवली ही अपेक्षा खोटी असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 03* *जो तू चाहे मुक्ति को* *छोड़ दे सबकी आस |* *मुक्त ही जैसा हो रहे* *सब कुछ तेरे पास ||* अर्थ : माणसाला जर या मायावी जगात मुक्त जीवन जगायचे असेल तर मोहविणार्या बाबींचा मोह धरून चालणार नाही. त्या बाबींबद्दलची आसक्ती सोडावीच लागेल. गरजेपुरत्या वस्तूंचा संचय करायला शिकले पाहिजे. उगाच संचय वाढवला तर त्या वस्तू जवळ असूनही त्यांचा मनमुराद आस्वाद घेणंही जमणार नाही. त्यांच्या रक्षणातच जीवनाचा आनंदही गमावून बसावे लागेल. अनाठायी संचय करणे सोडून देता आले पाहिजे. तरच जीवन सुखी व समाधानी होईल. जीवनातल्या हावरट गरजा कमी केल्या की जगणं हलकं फुलकं व सोपं होतं. त्या गोष्टींसाठी माणसाला अनाठायी संघर्ष करण्याऐवजी तो जरा मुक्त राहू लागला तर त्या गोष्टी आपसुकंच माणसाच्या पुढ्यात आलेल्या असतील. मुक्ती आणि प्रबळ आसक्ती एकत्र नांदूच शकत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुमच्यापैकी किंवा तुमच्यातलीच एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप काही चांगले काम करत असेल तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा म्हणजे ते अधिक जोमाने काम करतील आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात अधिक, अद्वितीय कामगिरी करुन ते स्वत:चे आणि तुमचेही नावलौकिक करतील. तुमची प्रेरणा हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य असेल. पण तुम्ही असे करु नका की, तो आपल्यापुढे चालला आहे त्याचा आपल्याला काय फायदा ?असं म्हणून त्यांचे पाय मागे खेचू नका किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळा ही आणू नका.कारण त्यांच्या होणा-या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचे कारण तुम्ही बनू नका.असे न करता केव्हाही जर कोणी चांगले काम करत असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून थोड्यातरी तुमच्या अंत:करणातून शुभेच्छा द्या म्हणजे त्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी मूठभर मांस चढेल हे निश्चित *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *खंबीर - Steadfast* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *चाणक्यनीती* एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्रा बद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का? 'एक मिनिट थांबा' चाणक्ने उत्तर दिले. 'काही सांगण्या पूर्वी मी थोडाशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल? ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?' ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्रा बद्दल माझ्याशी बोलण्या पूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? ' थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुल पणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्रा बद्दल काही तरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?' ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्या बद्दल काही तरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?' 'नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली. 'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, *ते ना सत्य आहे,* *ना चांगले आहे ,* *ना मला उपयोगी आहे,* तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रियजना बद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, *हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणा.* *हीच आहे चाणक्य-नीती* खूपदा आपण कोणाच्या सांगण्यावरून कुठल्याही व्यवसायिकां बाबत अशीच भावना व्यक्त करतो ,त्या व्यक्ती बाबत अथवा त्याच्या सेवेबाबत आपल्याला स्वतःला काहीच अनुभव अथवा स्वतः डोळ्याने पाहिलेले पण नसते ,आणि एक समज मनात घर करून घेतो ..त्यामुळे कित्येक चांगल्या गोष्टी समोर येऊन किंवा त्यांच्या समवेत राहून त्याची महती कळत नाही म्हणून ही नीती वापरा स्वतः बरोबर इतरांचे पण हित जोपासा. *माणसे जोडुया* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌷आस🌷* ➖➖➖➖➖➖ अंधारलेल्या वाटेत लढा देणे शिकवतात प्रकाशाची आस वादळातही टिकवतात आव्हानाचा वादळाची लोटून इच्छाशक्ती जिद्द भरारीची आकाशी ठेवतात अन् प्रकाशाची आस वादळातही टिकवतात प्रतिकुलतेवर मात करुनी जग जिंकण्याचे स्वप्न पाहतात अंधार उजेडाचा प्रवास माञ चालूच ठेवतात अन् प्रकाशाची आस वादळातही टिकवतात अंधारात बसलेल्यांना दरीत कोसळलेल्यांना नवजीवनासाठीआवाहन ते करतात अन् प्रकाशाची आस वादळातही टिकवतात वादळातही टिकवतात. 👍👍👍👍👍👍 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. ➖➖➖➖➖➖➖
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १३०५ - देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध. १७०८ - मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक. १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली. १९३९ - दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघानेबाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली. १९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू. 💥 जन्म :- १८५२ - क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष. १९०९ - सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६३ - रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६७ - रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ६३४ - अबु बकर, अरब खलीफा. १८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ. १८९२ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शासकीय आकडेवारीनुसार राज्यात २१ हजार बालके तीव्र कुपोषित, मेळघाटात ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू* --------------------------------------------------- 2⃣ *राज्यांच्या पैशांच्या हव्यासामुळे पेट्रोल, डिझेल कधीही जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता कमी* --------------------------------------------------- 3⃣ *2019 पर्यंत राज्यातील रस्ते होतील झकास, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वास* --------------------------------------------------- 4⃣ *पॅराशूटशिवाय विमानातून उडी मारण्याचा नवा विश्वविक्रम, हॉलिवूड स्टंटमॅन ल्युक ऐकिन्सचा पराक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद* --------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर : पुत्रदा एकादशीनिमित्त काल पंढरीत भाविकांची गर्दी, चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ, अनेक मंदिरं व समाधी पाण्याखाली* --------------------------------------------------- 6⃣ *नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *ट्रेंट ब्रिज - तिसऱ्या कसोटीत भारताची इंग्लंडवर 203 धावांनी मात, जसप्रीत बुमराचे पाच बळी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *कमवा आणि शिका* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *भीमाशंकर ज्योतिर्लिंग* भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हांला रंजक वाटणाऱ्या व्यवसायाची निवड करा, यामुळे तुम्हाला आयुष्यात एकही दिवस काम करावे लागणार नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता?* 👉🏼 शुक्र *२) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?* 👉🏼 गुरू *३) हॅले हा धुमकेतू किती वर्षानी दिसतो?* 👉🏼 ७६ वर्षानी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * अनिलकुमार शिंदे, किनवट * सचिन बोरसे, नांदेड * आनंद यादव, धर्माबाद * बाबुराव पिराईवाड, धर्माबाद * रामदास पेंडपवार, निझामाबाद * भोजन्ना चिंचलोड, येवती * सुनील बेंडे * भारत सर्वे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *ती* मन चिंब भिजले आहे तनात बी रूजले आहे पेरलं की उगवतेच ती सर्वांना जगवतेच शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रमांक 02* *अंधो का हाथी सही,* *हाथ टटोल-टटोल ।* *आंखोंसे नहीं देखिया,* *ताते विन-विन बोल।* अर्थ : अंध व्यक्तीसमोर हत्ती उभा केला तर ती व्यक्ती हत्तीला चापळूनच त्याच्या आकृती बद्दलचे मत तयार करते, कारण तो हत्ती आंधळ्याचा आहे. त्याच्या अनुभूतीनुसार त्याची हत्तीविषयीची धारणा आहे. रंग,रूप,आकार जाणण्याइतकी दृष्टी त्याच्याकडे नाही. त्याचं समज विश्व स्पर्श, श्रवण, गंध व रसनेवरचं ! एकाद्या बाबीची अनुभूती घेताना त्या प्रसंगाशी पूर्णपणे एकरूप होता आलं की ती बाब लक्षात येते. पंचेंद्रिय कार्यरत असूनही अज्ञानी व मुढ व्यक्ती अनुभूतीमध्ये समरस होत नाहीत. त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्ती होत नाही व अज्ञानाचे भ्रमही दूर होत नाहीत. त्यामुळे बुद्धी व मनाची सांगड घालून ती बाब तपासायला हवी. तेव्हाच ईश्वराचे खरे स्वरूप कळते. नाही तर अशीच मंडळी निरर्थक बाबी सांगून ईश्वराविषयी अवडंबर वाढवतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही. केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल. म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कंत्राट - Contract* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *धनाचा गर्व* एकदा एका उंदराने हिरा गिळला हिऱ्याच्या मालकाने त्या उंदिराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा सगळे उंदिर एक घोळका करून एका दुसऱ्यावर चढून दाटीवाटीने बसले होते पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला होता शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता. हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच उंदराला कसे काय ओळखले? शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..! आयुष्यात धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा पण आपण ज्या समाजात वाढलो जगलो मोठे झालो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आपण ह्या समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका नाहीतर त्या मूर्ख उंदिरामध्ये आणि आपल्यात काहीच फरक उरणार नाही..! *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌹जीवन विचार🌹* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *माणसाच्या जीवनात चढउतार हा असतोच*.प्रत्येक सजीव जीवन जगत असतो आणि त्याचा अंतही हा अटळ असतोच.जीवनात माणसाला दु:ख , संकटे येणारच ती आली नाहीत तर ते जगणं पण एकतर्फी होऊन जाईल.व अशा एकतर्फी जीवनाची वाटचाल करताना माणूस हताश व निराश होणार व आयुष्याची व आयुष्यात येणाऱ्या माणसांची ओळख पण होणार नाही व किंमत पण कळनार नाही ,प्रत्येक श्वासासोबत क्षणक्षण आयुष्यपण संपत आहे. जगण्यातला हा क्षण अस्ताकडे झुकु लागला आहे. smt.senkude p.k. सहज सिंहावलोकन म्हणुन संपलेल्या आयुष्यावर नजर टाकली, आयुष्याचा मागोवा घेत असताना मन खिन्न होऊन विचारमग्न झाले, अन् खुप अस्वस्थ झाले कारण आयुष्य बरंच संपलं होतं.संपलेल्या आयुष्यात काय मिळवलं ह्याचा मनाला पडलेला प्रश्न अगदी नंदादिपातला ज्योतीसारखा प्रज्वलीत होऊन प्रकाशमय झाला होता???? हेच का ते जीवन? इतके दिवस जे जगले ते व्यर्थच का ?? हा विचार मनाला शिवून गेला.आणि संपलेल्या आयुष्यात आपण कितपत ? माणूसपण जपले ? सामाजिक हित कितपत जोपासले ? हे आणि अशा अनेक प्रश्नांची श्रृंखला ध्यानीमनी ठासत माणसानी माणसाशी माणसासम वागणे हा एकच विचार रुजलेला स्मरणार्थ राहीला, काही माणसं मरत-मरत जगत असतात.काही माणसं जगत-जगत मरत असतात. डोळयांना धुसर अंधारी पण आली पण त्या अंधारल्या वाटेतही काही पाऊलखुणा शाबुत दिसत होत्या.मी हताशपणे अधाशापणे न्याहाळल्याही त्या तेव्हा त्या पाऊलामध्ये मला तुमची छबी दिसली व माझा अस्वस्थपणा शांत झाला कारण जरी आयुष्य बरंच संपलं असलं तरी जगणंही बरंच बाकी आहे हा विचार पक्का झाला होता व मी गमावलेल्या आयुष्यात तुमच्यासारख्या माणसांना कमावलं होतं. माझ्यासाठी तुमचं अस्तित्व अनमोल आहे.ह्याच मला लौकिक आहे.शेवटी काय तर *'माणसाच जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय आणि माणसाचं मरण म्हणजे नियतीच रुदन होय.'* 〰〰〰〰〰〰〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍🔶शब्दांकन/ संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड.🙏
💦🍀💦🍀💦🍀💦 *स्वच्छतेची घेऊया आण* सख्यासोबत्यांनो या हो या स्वच्छता करूया मिळूनिया स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान राबवू या. सुंदर स्वच्छ गाव बनऊया अभिमान गावाचा वाढवूया या हो या हो बालजवानांनो सुंदर भारत स्वच्छ भारत करुया. स्वच्छतेचे दूत आपण आरोग्याचे धडे देऊया रोगराईला पळववून लावूनी निरोगी गाव करुया. घरी बांधूनीया शौचालय वापर त्याचा करुया अभिमान बाळगूनी गावाचा स्वाभिमानाने जीवन जगूया. कचरा कचरा वेचूया विल्हेवाट त्याची लावूया जाणूनी घेऊया पर्यावरणाचे संवर्धन प्रदूषणाला आळा घालूया. या हो या हो सख्यासोबत्यांनो या हो या हो बाल जवानांनो सारेच सारे या हो याहो दूत स्वच्छतेचे बनूया आण आपण घेऊया स्वच्छ भारत करुया. 🍀🌱🍀🌿🍀🌿🍀 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 〰〰〰〰〰〰〰
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/08/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- 💥 जन्म :- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. १९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :- १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *तिरुअनंतपुरम : केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने आज गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे, 400 हुन अधिक व्यक्ती मृत्युमुखी* --------------------------------------------------- 2⃣ *अमरावती - आठवड्याभरापासून राज्यात सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने धरणांतील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.* --------------------------------------------------- 3⃣ *गडचिरोलीत पावसाचे थैमान, भामरागडसह अनेक गावे जलमय* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबईच्या तीन प्रवेशद्वारांवर एक महिना टोल नाही; छोट्या गाड्यांना मोठा दिलासा* --------------------------------------------------- 5⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड च्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीचे दमदार शतक* --------------------------------------------------- 6⃣ *Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय* --------------------------------------------------- 7⃣ *जकार्ता - भारताच्या विनेश फोगाटने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनीगटात घातली सुवर्णपदकाला गवसणी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *हम सब एक है* http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/15.html वरील निळ्या अक्षरावर क्लिक करून आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *परळी वैजनाथ* परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारतात पहिलं पोस्ट ऑफिस कुठे सुरू झालं ?* कलकत्ता *२) फुजियामा पर्वत कोणत्या देशात आहे ?* जपान *३) 'कुली' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण ?* मुल्कराज आनंद मुल्कराज आनंद *४) सौर वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते ?* चैत्र *५) उत्तर आणि दक्षिण भारताच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेला पर्वत कोणता ?* विंध्य पर्वत *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * भूषण परळकर, नांदेड * विश्वास बदापूरकर, येताळा * साईनाथ राचेवाड, बिलोली * दत्ता नरवाडे, बिलोली * पुरुषोत्तम चंद्रात्रे * गोपाळ पवार * संतोष गुम्मलवार, नांदेड * भीमाशंकर जुजगार, धर्माबाद * साईनाथ हवालदार, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* का-हाळ कालून काही बाजूला उभे रहातात काय होईल याची ते लांबून मजा पहातात लांबून मजा पहायला काहींना असते आवड कामापेक्षा रिकाम्या कामला जास्त मिळते सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= आजपासून विचारधन ऐवजी कबीराचे बोल हे नवीन सदर सुरू करीत आहोत. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे. *क्रमांक 01* *आवत गारी एक है* *उलटन होय अनेक ।* *कह कबीर नहिं उलटिये* *वही एक की एक ॥* अर्थ : जशास तसे म्हणून जर शिवीला शिवी देत राहिलात तर शिव्यांची लाखोलीच तयार होईल. तुमची शक्तीही निरर्थक वाया जाईल. कोणी जर शिवी दिली आणि त्याला परत शिवी नाही दिली तर शिव्यांची संख्या न वाढता ती देणाराही एकाकी पडतो. शिवी न स्वीकारल्यामुळे ती देणार्याच्याच पदरी राहाते. तो खजिल होतो. पुढचा संघर्षही टळतो. म्हणून मुर्खांच्या तोंडास तोंड न देणे हे कधीही सुज्ञपणाचे लक्षण समजावे, असेच कबिरांचे म्हणणे आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काही जणांचे पाय जमिनीवर असले तरी ते कल्पनेच्या जोरावर आकाशातले तारे मोजण्यातच वेळ घालतात तरी त्यांचे तारे मोजणे होत नाहीत कारण जे अशक्य आहे ते कधी प्रत्यक्ष जीवनात साध्य होत नाही.मग विनाकारण वेळ वाया घालवून जीवन व्यर्थच घालवतात.अशांच्या पदरी घोर निराशाच पडते. तर काही लोक जमिनीवर राहूनच आपली पावले कुठपर्यंत जात आहेत याचा वेध घेतात.मग आपल्याला कशी आणि किती प्रगती करायची याचे नियोजन करतात.जे शक्य आहे ते आपल्या हातात आहे हे त्यांना माहीत असते.अशी विचार करणारीच माणसे जीवनात यशस्वी होतात.जे शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करता येते कल्पनेने नाही हे त्यांना माहीत असते. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विचित्र - odd* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *यशाचे गणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. 'खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १२०१ - रिगा शहराची स्थापना. २००८ - पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला. 💥 जन्म :- १६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान. १६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे. १८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. 💥 मृत्यू :- १२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट १९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.(चित्रित) १९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री. २००८ - नारायण धारप, मराठी लेखक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळमधील पूरप्रकोपात ३२४ जणांचा मृत्यू, २ लाख नागरिक बेघर, केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार पावसानं आलेल्या पुरात आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.* --------------------------------------------------- 2⃣ *माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मानस कन्येने दिला मंत्राग्नी* --------------------------------------------------- 3⃣ *इस्लामाबाद : इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी करण्यात आली निवड* --------------------------------------------------- 4⃣ *श्रावणसरी : 28 दिवसांच्या खंडानंतर राज्यात सर्वदूर पाऊस; कापूस, तूर पिकाला जीवदान* --------------------------------------------------- 5⃣ *पुणे - आतापर्यंत पावसाने ओढ दिलेल्या उत्तर-मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, हवामान खात्याने दिला इशारा * --------------------------------------------------- 6⃣ *भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतीम संस्कार* --------------------------------------------------- 7⃣ *आज ट्रेंट ब्रिज येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार कसोटी मालिकेतील निर्णायक सामना* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *लिहिन्याला पर्याय नाही* http://epaper.ejanshakti.com/m5/1780138/Pune-Janshakti/18-08-2018#page/6/1 आजच्या दैनिक जनशक्तीमध्ये प्रकाशित झालेला लेख आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *महाकालेश्वर ज्योतिर्लिंग* महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून ते भगवान शिव यांना अर्पण केलेले आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तीर्थक्षेत्रांमध्ये भगवान शिवचे सर्वात पवित्र निवासस्थान असे म्हटले जाते. हे मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या प्राचीन शहरामध्ये स्थित आहे. रुद्र सागर तलावच्या बाजूला हे मंदिर आहे. शिवलिंगाचे देवदेव, भगवान शिव हे स्वयंभू आहेत असे समजले जाते, इतर प्रतिमा आणि विधीपूर्वक स्थापित आणि मंत्रशक्तीसह गुंतविले जातात त्याप्रमाणेच स्वतःच्याच शक्ती (शक्ती) च्यामधून शक्तीचा प्रवाह आणला जातो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही, तिचा उगम आतूनच पाहिजे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) विजयघाट हे सुप्रसिद्ध स्थळ कोठे आहे ?* दिल्ली *२) राष्ट्रा-राष्ट्रांतील नागरिकांचे आरोग्यवर्धन व्हावे म्हणून कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली ?* जागतिक आरोग्य संघटना *३) सुवेझ कालव्यावरील इजिप्तच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय बंदर कोणते ?* अलेक्झांड्रिया *४) स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?* मौलाना अब्दुल कलाम आझाद *५) युनोची घटना कुठल्या संमेलनात मंजूर झाली ?* सॅनफ्रान्सिको *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * गजानन देवकर * गणेश थेटे * अगस्त्या तावारे * शेख समधानी * रोहित जंगलेकर * शेखर हेमके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *इंडिया फस्ट* प्रयत्नावर तुमचा अटल विश्वास होता देश विकास हाच एक ध्यास होता संयमाने तोडले तुम्ही सारे संकटाचे फास देश विकासासाठीच घेतला प्रत्येक श्वास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या जीवनात खरे यशस्वी व्हायचे असेल,आपले जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या कामात तुमचे हात सदैव क्रियाशील ठेवा, मन स्थिर ठेवा, कामातले लक्ष्य विचलित होऊ देऊ नका, कुणाचीही स्पर्धा करु नका की,ज्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन मन अस्थिर होईल आणि कामामध्ये निष्क्रियता येईल, दुस-या चे काम पाहून,त्याची होत असलेली प्रगती पाहून त्याबद्दल मनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका.आपण आपल्या कामात सदैव कार्यरत रहा त्यातच तुमच्या जीवनात खरे यशस्वी होऊन तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *लाचार - Helpless* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे* एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णुला भेटायला गेला. वैकुंठाच्या दारा जवळ ७ कबुतरं होते. त्यातील एका कबुतरा वर यमाची दृष्टी गेली. ते कबुतर खुप घाबरलं. आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सुचेना. इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडुन यमाला आत घेतलं. यम विष्णुला भेटायला गेला. ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलवुन गरुडाला विनंती केली. ” मला इथुन घेऊन जा साता समुद्रापार , कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर आला वैकुंठातुन कि मला घेऊन जाईल. मला घेऊन चल .” गरुडाला हि त्याची दया आली. गरुडाने मग कबुतराला सातासमुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं जिथे सुर्याची किरणे पण पोचत नव्हती. ती गुहा दलदलीनी भरलेली होती. इकडे यम विष्णुशी बोलुन वैकुंठाच्या दारात आले. त्यानी बघितलं जाताना तर सात कबुतरं होते , आता सहाच कशी काय ? एक कबुतर कुठे गेलं. मग यमानी गरुडाला विचारलं. गरुड म्हणाला , ” तुमची दृष्टी त्या कबुतरावर पडली. ते कबुतर म्हणालं मला सातासमुद्रापार सोड , मी सोडुन आलो. ” ज्या गुहेत गरुडानी कबुतराला सोडलं तिथे जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायु नसल्यामुळे त्याचे प्राण गेले. यम गरुडाला म्हणाला , ” मी विष्णुदेवाला हेच विचारायला आलो होतो कि हे कबुतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर सातासमुद्रापार जाणार असं विधीलिखित आहे . कसं करायचं ? ” पण बघा त्याचा प्राण तिथेच जाणार होता म्हणुन त्याला तशी बुध्दी झाली सातासमुद्रापार जायची व त्याचा जीव घुसमटुन घुसमटुन गेला. *तात्पर्य : तुमच्या नशिबात नियतीने जे लिहिले तसेच होणार. आपण त्यात कुठला हि हस्तक्षेप करु शकत नाही. पण जर आपण इष्टदैवतेची सेवा व भक्ती केली तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य इष्टदैवतेत आहे.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव *ता.हदगाव, जि. नांदेड* http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/08/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८७ - नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली. 💥 जन्म :- १९५७ - रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १८८६ - श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - देशभरात 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण* --------------------------------------------------- 2⃣ *माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटरवर ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली भेट* --------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली: डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक होत असल्यास त्याच वेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - वैयक्तिक कारणावरून आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष राणा यांचा राजीनामा, केजरीवालांनी नाकाराला आशुतोष यांचा राजीनामा* --------------------------------------------------- 5⃣ *केरळ - हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा, मुसळधार पावसाचा वर्तवला अंदाज.* --------------------------------------------------- 6⃣ *मेरठ: शरियतच्या धर्तीवर हिंदू महासभेनं देशातील पहिल्या हिंदू न्यायालयाची केली स्थापना केली आहे. या न्यायालयात हिंदूंशी संबंधित खटल्यांवर निकाल देण्यात येतील, असं हिंदू महासभेकडून जाहीर करण्यात आलं आहे.* --------------------------------------------------- 7⃣ *भारताचा महान कर्णधार काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन, जसलोक रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 •••••••••••••••••••••••••••••••••••••••• =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *उद्याची काळजी आज कशाला* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन* हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हैद्राबादपासून सुमारे २१० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व दिशेला नल्लमलाई डोंगर रांगात वसलेले हे (शिव) तीर्थक्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ४७६ मीटर आहे. येथील जंगल सदाहरित प्रकारचे आहे. तसेच येथे कृष्णा नदीच्या (पाताळगंगेच्या) काठावर जाण्यासाठी रज्जूमार्ग आहे. येथे श्रीशैलम् धरण असून भव्य जलविद्युत निर्मिमीती केंद्र आहे. कथा - येथे पूर्वी असलेल्या महाकाली मंदिरात नंदी तपस्या करत होता. या तपस्येत असलेल्या नंदीवर प्रसन्न होउन मल्लिकार्जुन आणि ब्रम्हरंभा रूपात शिव-पार्वती इथे प्रगट झाले. इतिहास - श्रीशैलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला. या नंतर अतिशय ताकदवान अशा विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्य नावारूपास आणणारे राजा कृष्णदेवराय यांनी राजगोपुर आणि सलुमंतापस व इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= जे काही दिसतंय त्या सगळ्यावरच विश्वास ठेवायचा नसतो. मीठ सुद्धा साखरेसारखं दिसत असतं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'रामाचा शेला' चे लेखक कोण ?* साने गुरुजी *२) कॉस्मिक किरणांचा शोध कुणी लावला ?* व्हिक्टर हेस *३) एका पदार्थातून दुसर्या पदार्थात सूर्यकरण जाताना त्याचा वक्रीभवन कोन मोजणारं उपकरण कोणतं ?* वर्णपटदर्शक *४) युरेनियम अणुकेंद्रावर शून्य कणांचा वर्षाव केला असता काय होतं ?* अणुकेंद्राचं विघटन *५) निरनिराळ्या शारीरिक व्याधींना कारक ठरणार्या अतिसूक्ष्म जंतूंना काय म्हणतात ?* विषाणू *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 निखील देवेंद्र खराबे, नागपूर 👤 नरेंद्र नाईक 👤 मिथुन बिजलीकर 👤 अशपाक सय्यद 👤 रमेश बारसमवार 👤 जी. के. प्रसाद 👤 सुभाष पालदेवार 👤 के. राम मोहन *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *झुला* प्रत्येकाच्या मनात एक आठवणींचा झुला असतो मनमोकळ झुलायला ज्याचा त्याला खुला असतो आठवणींच्या झुल्यावर प्रत्येकाला झुलता येत कटू आठवणी टाळून आनंदाने फुलता येत शरद ठाकर सेलू जि परभणी =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* ••●🔰‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= तुम्हाला यशाच्या दिशेने जायचे असेल तर पहिल्यांदा अपयश पचवावे लागेल आणि त्याची कारणेही शोधावी लागतील. असे असेल तर यश तुम्हाला सहज प्राप्त करता येऊ शकेल. अपयशानंतर मिळालेले यश तुमच्या जीवनाची उत्कर्षाकडे जाणारी वाट असेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उत्कर्ष - Flourish* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🐍नागरुपी भाऊ* पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा तीचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर उंच उंच झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – *जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.बहीण भावाची माया ह्या कथेतुन स्पष्ट होते.* *महत्त्व* वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते, तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक आणि ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते. ‘श्रावणमासातील नागपंचमीच्या दिवशी स्त्रियांनी झोका खेळणे, म्हणजे आनंद अनुभवणे होय. स्त्री झोका खेळतांना तिच्या दिशेने ईश्वरी आनंदाचा प्रवाह आकृष्ट होते *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट *आज या बुलेटीन ला तीन वर्षे पूर्ण, चौथ्या वर्षात पदार्पण* 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/08/2018 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* घडामोडी १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. जन्म १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *सध्या देश निर्णायक टप्प्यातून मार्गक्रमण करतोय- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर* ----------------------------------------------------- 3⃣ *स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन, नॉर्थ, साऊथ ब्लॉकला आकर्षक रोषणाई* ----------------------------------------------------- 4⃣ *मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे छत्तीसगडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त प्रभार* ----------------------------------------------------- 5⃣ *पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांचा नव सेना पदकानं सन्मान होणार* ----------------------------------------------------- 6⃣ *एक देश, एक निवडणूक घेणे अशक्य, पण 11 राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात - आे पी रावत, मुख्य निवडणूक आयुक्त* ----------------------------------------------------- 7⃣ *गोवारी समाजाची मागणी 23 वर्षानंतर अखेर पूर्ण, गोवारी आदिवासी आहेत, नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🔔 🔔 गुगलयान 🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वातंत्र्य दिन विशेष लेख* विचार बदला ; देश बदलेल http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय स्वातंत्र्य दिन* स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते संकलन :- प्रल्हाद कापावार ( स.शि.) विद्या निकेतन प्रा.वि. बिलोली. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *त्याग जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?* 👉🏼 पंडित जवाहरलाल नेहरू *२) भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा किती वर्षे पूर्ण झाली?* 👉🏼 ७१ वर्षे *३) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?* 👉🏼 लॉर्ड माऊंट बॅटन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रमोद शेलार, सहशिक्षक, कोहळी ता हदगाव जि नांदेड 👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक अहमदनगर 👤 शिवानंद सुरकुटवार, नांदेड 👤 साईनाथ चपळे, बन्नाळी 👤 किरणकुमार नामेवार, वसमत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *!!! @@ गुगली @@ !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अभिमान " भारतीय स्वातंत्र्य आमच्या अस्मितेची गाथा आहे तिरंग्या पुढे आमचा नतमस्तक माथा आहे तिरंगा म्हणजे आमचा जान की प्राण आहे तिरंगी झेंड्या आम्हाला तुझा अभिमान आहे *स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा* शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *माझा भारत देश महान* अनेक राज्ये अनेक प्रदेश विविध जाती विविध भाष नाही कोणी इथे लहान माझा भारत देश महान तीन रंगाची बात न्यारी निळ्या रंगात चोवीस आरी तिरंगा आमुची आहे शान माझा भारत देश महान दिल्ली आहे देशाची राजधानी सर्वांचे लक्ष घेतो वेधूनी कारभार चालतो एकदम छान माझा भारत देश महान इथे नांदतो सर्वत्र समानता एकमेकामध्ये आहे बंधुता सर्वच गातात एकच गान माझा भारत देश महान जगाच्या कोपऱ्यांत कुठेही एक तरी भारतीय राही कष्टाने राखतो देशाची मान माझा भारत देश महान - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विस्मरण* एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले. त्यांनी शाप दिला *पुढची 12 वर्षे पाऊस पडायचा नाही* व तशी आकाशवाणी हि केली. पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला. सर्वजण हताश झाले, पाऊस 12 वर्षे येणार नाही म्हणजे सर्व जण दुःकाळाने मरणार या विचाराने घाबरून गेली. एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा. थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला. शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले... *एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत हॊता.* त्या पिलांनी मोराला विचारले की जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा? मोर म्हणाला, पण *आपण आता पासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले तर जेव्हा 12 वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलो असेल.* शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला. तो धावतच घरी आला, शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला. आणि कोरडे शेत नांगरु लागला. मुलांना शेतिची कामे शिकवू लागला. मुले चकित होऊन बापाकडे पहात होती. त्यांनी त्याला विचारले, बाबा जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा ? शेतकरी म्हणाला, आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली तर 12 वर्षांनी पाऊस पडेल तोपयंत आपण सर्व कामे विसरून जाऊ. आणि पुनः कमाला लागला. इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचम्बित झाला. त्याने एका ब्राम्हणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले, *तू आकाशवाणी ऐकली नाहीस का?* शेतकरी म्हणाला, होय ऐकली. *पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील.* इंद्र सुन्न झाला, स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि 12 वर्षे मी पाऊस पाडला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन, मग सर्व सृष्टी करपुन जाईल, जैव सृष्टी नष्ट होईल. देवाने लगेचच विचार बदलला. आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली. तात्पर्य - *बाह्य परिस्थिती कशीही असो आपण न चुकता आपले कर्तव्य करीत राहायला हवंय. कठीण परिस्थिती मध्येच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते. मंदी व चणचण असली तरी, किती ही अडचणी आल्या तरी* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक देहदान दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९४३ - रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती. १९९१ - कन्नड साहित्यिक विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर २००२ - के.के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला 💥 जन्म :- १८८० - जॉन लोगी बेअर्ड, दूरचित्रवाणीसंचशोधक १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक. १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :- १७९५ - अहिल्याबाई होळकर. १९८० - पुरुषोत्तम भास्कर भावे मराठी साहित्यिक. १९८८ - गजानन जागीरदार, हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नासाची ऐतिहासिक झेप, सोलर प्रोब यान सूर्याच्या दिशेनं झेपावल.* --------------------------------------------------- 2⃣ *केरळ : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळमधील पुरग्रस्त भागाची केली पाहणी, 100 कोटीचे पॅकेज जाहीर* --------------------------------------------------- 3⃣ *सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला, साताऱ्याच्या टाकेवाडीने पटकावला वाॅटर कप* --------------------------------------------------- 4⃣ *रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने देशातील सामान्य जनतेला मोठा दिलासा, राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटीतून वगळण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.* --------------------------------------------------- 5⃣ *हैदराबाद - आयसिस दहशवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन हैदराबादे येथून दोघांना अटक, एनआयएची कारवाई* --------------------------------------------------- 6⃣ *बीसीसीआयमध्ये होऊ शकते ‘दादागिरी’, अध्यक्षपदावर सौरव गांगुली येण्याची चर्चा* --------------------------------------------------- 7⃣ *लॉर्ड्स कसोटीत भारताचा पराभव, इंग्लंडची भारतावर एक डाव आणि 159 धावांनी मात* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= जागतिक देहदान दिवस *अवयवदान संकल्प करू या* http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शिवराम हरी राजगुरू* शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातहौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेवहसत हसत फाशीला सामोरे गेले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= "जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मार्च २०१९ पर्यंत राज्यभरातील सगळ्या खेड्यांमध्ये शौचालये उभारण्याचं उद्दिष्ट कोणत्या राज्याने जाहीर केलं आहे ?* पश्चिम बंगाल *२) मौर्य साम्राज्याचा शेवटचा शासक कोण ?* बृहद्रथ *३) संस्कृतचं व्याकरण कोणी लिहिलं ?* पाणिनी *४) लोदी घराण्याचा संस्थापक कोण ?* बहलोल लोदी *५) फिलिपिन्सची राजधानी कोणती ?* मनिला *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुयोग पेनकर, पुणे 👤 प्रशांत सब्बनवार, कुंडलवाडी 👤 गणेश धाकतोडे 👤 नागेश गुर्जलवार 👤 नरेंद्र रेड्डी, बाळापूर 👤 योगेश येवतीकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *जुगार* पेरणी करून शेतकरी दरवर्षी जुगार खेळतो अस्मानी संकटांशी तो हारतो म्हणजे हारतो रात्रंदिवस फक्त कष्ट कष्टाला कमी नाही तरीही यश मिळेल याची मात्र हमी नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या जीवनात खरे यशस्वी व्हायचे असेल,आपले जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या दररोजच्या कामात तुमचे हात सदैव क्रियाशील ठेवा, मन स्थिर ठेवा, कामातले लक्ष्य विचलित होऊ देऊ नका, कुणाचीही स्पर्धा करु नका की, ज्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय निर्माण होऊन मन अस्थिर होईल आणि कामामध्ये निष्क्रियता येईल,दुस-या चे काम पाहून, त्याची होत असलेली प्रगती पाहून त्याबद्दल मनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका.आपण आपल्या कामात सदैव कार्यरत रहा त्यातच तुमच्या जीवनात खरे यशस्वी होऊन तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हाल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *व्यत्यय - Interruption* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रेरणा* संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले.त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले. *तात्पर्य - प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.त्यापेक्षा सुरूवात आपल्यापासूनच करावी.* *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌹जीवन विचार*🌹 〰〰〰〰〰〰〰 http://www. pramilasenkude.blogspot.in ➖➖➖➖➖➖➖ *जो मनन करु शकतो त्याला मनुष्य म्हणतात.आपल्याला मननामुळेच सर्व ज्ञान प्राप्त होते.मनन हा जसा मनाचा गुण आहे.त्याप्रमाणेच माणसाच्या जीवनात प्रसन्नता ही मानवाला मिळालेली दैवी देणगी आहे.ज्या मानवात प्रसन्न वृत्ती आहे अशा प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीची बुद्धी लवकर स्थिर होत असते.प्रसन्नतेमुळे आत्म्याला शक्ती मिळते.म्हणूनच कोणतेही कार्य हाती घेतले असता त्यात प्रसन्नता असले की ते कार्य हलके वाटते.* *प्रसन्नता ही माणसाच्या मनातून निर्माण होणारी क्रिया आहे.जसा दिव्यान दिवा लावता येतो तशी एका माणसाच्या मनातील प्रसन्नता अनेकांना हर्षउल्हासित करते.* smt.pramila senkude *यशस्वी जीवनासाठी प्रथमतः आपले मन आनंदी व प्रसन्न असायला हवे.ज्याप्रमाणे पारिजातक आपल्या फुलांच्या पडलेल्या सडा सुगंधाने सुगंधीत करून दुसऱ्याला आनंदी करतो त्याप्रमाणे माणसाच्या चेहऱ्यावरील झळकणार निर्मळ हास्य हे मन जिंकून घेत.* *म्हणूनच आपल्या जीवनातील जीवन जगण्यासाठीच ध्येयवाक्य असाव.' प्रसन्नतेचा एक एक क्षण पुरेसा,जोपासावा '.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ शब्दांकन / संकलन 🙏श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏 ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 11/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९५१ - रेने प्लेव्हेन फ्रान्सच्या पंतप्रधानपदी १९५२ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी. १९६० - चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य. १९८७ - ॲलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता. 💥 जन्म :- १९११ - पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. १९२८ - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक. १९५४ - यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५४ - मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७४ - अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९०८ - क्रांतिकारक खुदिराम बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती* --------------------------------------------------- 2⃣ *यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही; मराठा मोर्चा क्रांती समितीची मोठी घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *राज्यसभेचं कामकाज पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित; पावसाळी अधिवेशनाची सांगता* --------------------------------------------------- 4⃣ *स्टेट बँकेला सलग तिसऱ्या तिमाहीत तोटा, जून 2018 अखेर 4876 कोटी रुपयांचा तोटा. माफ केलेल्या कर्जाच्या वसुलीत 240 टक्क्यांची भरघोस वाढ* --------------------------------------------------- 5⃣ *माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सात आरोपींची सुटका करता येणार नाही : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.* --------------------------------------------------- 6⃣ *वाळूज एमआयडीसीत तोडफोड करणाऱ्यांवर कंपन्या करणार नोकरी बंदीची कारवाई* --------------------------------------------------- 7⃣ *लंडन : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून शिखर धवन आणि उमेश यादव यांना संघाबाहेर तर चेतेश्वर पुजारा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना संघात देण्यात आले स्थान* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने वाचकांच्या काही प्रतिक्रिया राजेश जेठेवाड बरबडेकर यांची प्रतिक्रिया http://fmbuleteen.blogspot.com/2018/08/blog-post_9.html आपल्या प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे. आपल्या प्रतिक्रिया 9423625769 येथे whatsapp करावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मदनलाल धिंग्रा* मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडनयेथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचाअनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंतघराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले. मदनलाल धीग्रा हे भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा. त्यांचा जन्मअमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टरहोते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाबविद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचाअभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला. ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारतमंत्र्याचा स्वीय साहाय्य्क कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्यासभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. मदनलाल यांना अटक होऊन फाशीचीशिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्घोषात फाशी गेले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सच्चा देशभक्त इतर कोणत्याही अन्याय सहन करेल पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत* 👉 रामनाथ कोविंद *२) प्रख्यात लेखिका तस्लीमा नसरीन कोणत्या देशाच्या आहेत?* 👉 बांग्लादेश *३) भारताचे २०वे सरन्यायाधीश कोण होते?* 👉 सब्यसाची मुखर्जी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सतीश सोनवणे, संपादक 👤 विनायक काकुळते, नाशिक 👤 पठाण सर 👤 उमेश खोसे, उस्मानाबाद 👤 ओमप्रकाश कहाळेकर 👤 लोकडोबा कौटवाड 👤 मुदलोड गंगाप्रसाद 👤 साईप्रसाद मठपती 👤 शरद सूत्रावे 👤 विशाल ढगे 👤 याह्या खान पठाण, संपादक 👤 भास्कर कुमारे 👤 प्रवीण संगमकर 👤 आशिष देशपांडे, कुंडलवाडी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *अपेक्षा* अपेक्षा भंग झाली की दुःख काय ते कळते अपेक्षा भंग करणाराला तरी सुख कुठे मिळते योग्य मार्ग निवडला की अपेक्षा भंग होत नाही योग्य मेहनत घेतली की कष्ट वाया जात नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....* *न मुंह छुपाके जियो* *और न सर झुकाके जियो...* *गमोंका दौर भी आये* *तो मुस्कुरा के जियो...* *ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!* *ये जिंदगी किसी मंजिल पे* *रूक नही सकती.....* *हर एक मकाम के आगे* *कदम बढा के जियो...*. ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वावलंबी - Self-supporting* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *विनम्रता* एक बार नदी को अपने पानी के प्रचंड प्रवाह पर घमंड हो गया। नदी को लगा कि मुझमें इतनी ताकत है कि मैं पहाड़, मकान, पेड़, पशु, मानव आदि सभी को बहाकर ले जा सकती हूँ। एक दिन नदी ने बड़े गर्वीले अंदाज में समुद्र से कहा - बताओ ! मैं तुम्हारे लिए क्या क्या लाऊँ ? मकान, पशु, मानव, वृक्ष आदि जो तुम चाहो, उसे मैं जड़ से उखाड़कर ला सकती हूँ। समुद्र समझ गया कि नदी को अहंकार हो गया है। उसने नदी से कहा यदि तुम मेरे लिए कुछ लाना चाहती हो तो, थोड़ी सी घास उखाड़कर ले आओ। नदी ने कहा बस ! इतनी सी बात ! अभी लेकर आती हूँ। नदी ने अपने जल का पुरा जोर लगाया पर घास नहीं उखड़ी। नदी ने कई बार जोर लगाया पर असफलता ही हाथ लगी। आखिर नदी हारकर समुद्र के पास पहुँची और बोली। मैं वृक्ष, मकान, पहाड़ आदि तो उखाड़कर ला सकती। जब भी घास को उखाड़ने के लिए पुरा जोर लगाती हूं तो वह नीचे की ओर झुक जाती है और मैं खाली हाथ उपर से गुजर जाती हूं समुद्र ने नदी की पूरी बात ध्यान से सुनी और मुस्कुराते हुए बोला - जो पहाड़ और वृक्ष जैसे कठोर होते है, ये आसानी से उखड जाते है, किन्तु घास जैसी विनम्रता जिसने सीख ली हो, उसे प्रचंड आंधी तूफान या प्रचंड वेग भी नहीं उखाड़ सकता। *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १५१९ - फर्डिनांड मेजेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला १८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना. १९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्य आपसांत वाटून घेतले. १९८८ - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले. 💥 जन्म :- १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ. १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष 💥 मृत्यू :- मृत्यू: १९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. २००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद ; अनेक ठिकाणी रास्ता रोको* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 27 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ईव्हीएम मशिनसंदर्भात होणार चर्चा.* --------------------------------------------------- 3⃣ *गडचिरोली - सीआरपीएफच्या 889 जवानांचा गडचिरोलीत देहदानाचा संकल्प.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर* --------------------------------------------------- 5⃣ *राज्यसभेच्या उपसभापतीपदी एनडीएचे हरिवंश नारायण सिंह ; यूपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचा पराभव* --------------------------------------------------- 6⃣ *सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरीत लागू करा, जुनी पेंशन योजना लागू करावी, रिक्त जागांची त्वरित भरती करा, तसेच पाच दिवसांचा आठवडा.. आदी मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेला दिवसांचा संप मागे* --------------------------------------------------- 7⃣ *लॉर्डस : भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने वाचकांच्या काही प्रतिक्रिया श्रीपाद राऊतवाड यांची प्रतिक्रिया http://fmbuleteen.blogspot.com/2018/08/blog-post.html आपण ही आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकावर कळवावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *करुणानिधी* तामिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924 रोजी तामिळनाडूच्या नागापट्टीणम जिल्हात झाला.ते एकूण 13 वेळा विधानसभेवर निवडून आले.1957 ला ते पहिल्यांदा आमदार झाले तर 1969 ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.आतापर्यंत त्यांनी एकूण 5 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविला.गोरगरीबांसाठी त्यांनी विशेष कार्य केले.हाथ रिक्षा त्यांनी बंद केल्या,महिलांना वडीलोपार्जित मिळकतीत त्यांनी अधिकार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. काल दि.7/8/2018 रोजी त्यांचे निधन झाले.मृत्यूसमयी ते 94 वर्षाचे होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) सरदार पटेलांनी मठाचा सत्याग्रह कुठून सुरू केला ?* बारडोली सत्याग्रह *२) नोव्हाक जोकोव्हिच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ?* सर्बिया *३) तिन्ही सेनादलांचा सर्वोच्च सेनापती कोण ?* राष्ट्रपती *४) 'इंडिपेंडंट' या वृत्तपत्राचे संस्थापक कोण ?* सच्चिदानंद सिंह *५) फ्रान्सची राजधानी कोणती ?* पॅरिस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= * व्यंकटेश पुलकंठवार * हेमंत पापळे * संतोष येवतीकर * गणेश मोहिते * तुकाराम यनगंदलवाड * डॉ. चंद्रकांत पांचाळ * राहुल मगरे * माधव परसुरे * सचिन सुरबुलवाड * अशोक मगरे * अविनाश गायकवाड * रामदास देशमुख * गोविंदराव शिवशेट्टे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *मौन* रागाला जिंकण्याचा उपाय मौन आहे थोडे दुर्लक्ष करा राग गौन आहे मौन पाळून रागावर विजय मिळवता येतो कितीही मोठा राग मौनाने पळवता येतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जेव्हा आपल्या मनाची घालमेल होऊन जाते तेव्हा आपल्याला कोणते निर्णय घ्यावे काही सुचत नाही. अशावेळी मनाची घालमेल होऊ न देता मन स्थिर ठेवण्यासाठी तुमची ज्यांच्यावर श्रध्दा आहे अशा परमेश्र्वराचे किंवा संत सज्जनाचे किंवा आपल्या गुरुंचे नामचिंतन, ध्यानस्मरण केल्यास त्यातून नक्कीच काही ना काही मार्ग सापडतो आणि आपल्या होणा-या मनाची घालमेल थांबू शकेल. होणारा संभाव्य धोका किंवा आपल्या हातून होणारी चूक नक्कीच टळू शकेल आणि चांगला मार्ग मिळू शकेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *निर्णय - Decision* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *तीन वाटसरु* तीन वाटसरू एका धर्मशाळेत रात्रीसाठी एकत्र आलेले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं... तिघांनाही भूक लागलेली असते, मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं... पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते. पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू...?? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो... गंमत म्हणजे exactly असाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात... थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो...!! तिघेही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपतात....!!!!! स्वतःचा वेळ, पैसा किंवा कष्ट अशी कोणत्याही प्रकारची तांदुळाची मूठ contribute न करता, ह्या समाजातले सर्व प्रश्न, इतर कोणाच्या तरी प्रयत्नातून आपोआप सुटतील असं ज्यांना वाटतं आणि प्रश्न सुटत नाहीत म्हणून जे तावातावानं फक्त चर्चा करतात... *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰 *🌺 जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 *जोवर प्रकृतीच्या वर उठण्याची धडपड करीत आहे तोवर माणूस हा माणूसच असतो.ह्या प्रकृतीतही अंतःप्रकृती व बहिःप्रकृती अशी दोन उभयविध भाग असते.बाह्य प्रकृतीला जिंकणे ही फार चांगली आणि फार मोठी बाब आहे ह्यात काही शंका नाही.पण आपली अंतःप्रकृती जिंकणे ही खचितच त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे.* आपल्या ह्या उपयुक्तततावादी जीवनात आपले चांगले कर्मच आपल्या सोबत आपल्या अंतदायी स्वरुपात आपल्या दृष्टीआड कामी पडतील कारण आपल्या जीवनाचा जाळ फार मोठ्या विपरीत तान्या-बान्यानी विनला गेला आहे.जे दृष्टीगत होते ते वास्तविक नाही आणि जे आम्हाला दिसत नाही ज्याच्याशी आमचा संबंध नाही ते वास्तविक आहे. smt.pramilatai senkude. सत्य आहे दोन विपरीत किनाऱ्यांच्या मध्ये वाहनार्या नदीचे नाव जीवन सरीता आहे पूर्वेने पश्चिमेकडील याञेवर निघणाऱ्या सूर्याचे नाव🌞जीवन आहे . लोक उगवत्या 🌞सूर्याला तर🙏प्रणाम करतात.परंतु डुबत्या सूर्याला कोणी प्रणाम करत नाही.हीच जीवनाची भूल आहे.जन्म आणि मरणाच्या मध्ये जीवनाचे नीर वाहते,या दोन तटांमध्ये जीवनाची धारा वाहते. जसे जन्माच्या सोबत मृत्यू आणि मृत्यूच्या सोबत जन्माची छाया चालते. सावलीला कोणी पण कधीही वेगळे करू शकत नाही.कोणाच्या सावलीवर पाय ठेवून उभे राहून जा सावली पायाच्या वरती येवून जाईल डोक्याच्या वरती येऊन जाईल परंतु नष्ट होणार नाही.मृत्यूची पण हीच स्थिती आहे. आपण जेव्हापर्यंत संसारामध्ये कर्माच्या सूर्याच्या खाली चालत आहात.तेव्हापर्यंत जन्म मरणाच्या छायेचा अंत करू शकत नाही. म्हणून आपले चांगले कर्मच आपल्या कामी येतात. "मनुष्याच्या रुपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही.माणसाच्या कार्यामुळे,त्याच्या कर्तूत्वामुळेच त्याचा गौरव वाढत असतो." *शेवटी 🙏'कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो'*. *'कर्मे ईशू भजावा'.*🙏 ================== 🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼 ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा. गोजेगाव, हदगाव, नांदेड 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/08/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला. १९४९ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना. 💥 जन्म :- १९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ. १९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू १९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७३ - शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९७७ - मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९८१ - रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू 💥 मृत्यू :- ८६९ - लोथार, लोथारिंजियाचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *दहशतवाद्यां विरोधातील कारवाईत जम्मू काश्मीरमध्ये चार जवान शहीद* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई - महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली शिफारस* --------------------------------------------------- 3⃣ *अकरावी प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी जाहीर, 49 हजार विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत प्रवेश* --------------------------------------------------- 4⃣ *मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन घेतले मागे.* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : सण- उत्सवात बेकायदेशीर मंडप नको, आदेश मोडल्यास कोर्टाच्या अवमानाची कारवाई होणार : हायकोर्ट* --------------------------------------------------- 6⃣ *तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे 5 सप्टेंबरपर्यंत बुजवणार, राज्य सरकारचं हायकोर्टात आश्वासन.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शहीद भगत सिंग* भगत सिंग एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना गळफासाची शिक्षा देण्यात आली व भारतीय स्वतंत्र्यचळवळीमध्ये त्यांचे नाव अजरामर झाले.भगतसिंगचा जन्म १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे किशन सिंग होते. ज्यावेळेस त्याच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारासा भगतसिंगांचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजितसिंगाच्या सैन्यात होते. त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते. त्याचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हर दयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते. त्याच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हा स्कूल येथे गेला नाही. त्याच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकार बद्दलची निष्ठा मंजूर नव्हती. बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्या विरुद्धच्या आंदोलनात तो सामील झाला. गांधीजींने असहकार चळवळ बंद केल्यानंतर सिंग हा गांधींच्या अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला, व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाला. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द हक्क आहे. - शहीद भगतसिंग *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) दुसरे पोप जॉन पॉल यांचे निधन कधी झालं ?* २ एप्रिल २००५ *२) 'देशी व्यापारोत्तेजक मंडळ'चे संस्थापक कोण ?* सार्वजनिक काका *३) जीआयसीचे विस्तारीत रूप काय ?* जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन *४) जून २००१ मध्ये कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला ?* राजेंद्र शहा *५) 'सार्स'चा भारतातील पहिला रुग्ण कोठे आढळला ?* गोवा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अरुण देशपांडे, साहित्यिक, पुणे 👤 शिवानंद बुद्धेवार 👤 बाळाप्रसाद सूर्यवंशी 👤 धनंजय पाटील 👤 ऋषिकेश सोनकांबळे 👤 लक्ष्मण कामशेट्टी 👤 देवन्ना पाशावर 👤 नागेश कानगुलवार 👤 रावजी मारोती बोडके 👤 संतोष वाढवे 👤 रवी वाघमारे 👤 संजय बंटी पाटील 👤 गजानन सावंत 👤 अवधूत पाटील सालेगावकर 👤 चंदू नागुल, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *गोंधळ* ज्याला काही करायचे नाही ते दोन्हीकडून बोलत असतात चिचभी मेरी पटभी मेरी म्हणून काही गोंधळ घालत असतात बेजबाबदार माणसं कसेही बोलू शकतात या बोटाचा थुका त्या बोटावर घालू शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *माघार - Retreat* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कथा विन्स्टन चर्चिलची* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा प्रश्न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/08/2018 वार - मंगळवार =======ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय हातमाग दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७६ - व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले. १९९१ - सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध. 💥 जन्म :- १९२५ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ. १९६६ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक. 💥 मृत्यू :- १९४१ - रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहरे थेट हवाई मार्गाने जोडल्यास उभय देशांमधील पर्यटन, व्यापार आणि संस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. यादृष्टीने उभय देशांमध्ये थेट हवाई सेवा सुरू करण्याच्या मानस अध्यक्ष स्टुअर्ट रॉबर्ट यांनी व्यक्त केले* --------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - इंदिरा नुयी यांच्याकडून पेप्सिको कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा* --------------------------------------------------- 3⃣ *राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर जाणार, मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह 17 लाख कर्मचारी जाणार संपावर* --------------------------------------------------- 4⃣ *इंडोनेशियात झालेल्या भूकंपात आतापर्यंत 82 लोकांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी* --------------------------------------------------- 5⃣ *राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्टला होणार मतदान* --------------------------------------------------- 6⃣ *मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर, राज्य सरकार आज हायकोर्टात देणार शपथपत्र* --------------------------------------------------- 7⃣ *India vs England Test : लॉर्ड्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला जसप्रीत बुमरा मुकण्याची शक्यता * --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय हातमाग दिवस - 07 ऑगस्ट* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्रांतिसिंह नाना पाटील* क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'रिडल्स इन हिंदूइझम'चे लेखक कोण ?* डॉ. बाबासाहेब आंबेडकर *२) भारताच्या राष्ट्रध्वजाची निवड कधी करण्यात आली ?* २२ जुलै १९४७ च्या घटनासभेत *३) क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?* सातवा *४) 'केसरी' या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष कोणते ?* १८८१ *५) सौर वर्षाची सुरुवात कधी येते ?* २१ किंवा २२ मार्च *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 दत्ता डांगे, प्रकाशक, नांदेड 👤 श्रीनिवास मस्के, साहित्यिक, नांदेड 👤 मनोज रापतवार, धर्माबाद 👤 रवींद्र चातरमल 👤 सिद्धार्थ सिरसे 👤 मोहन हडोळे 👤 मंगेश पेटकर 👤 तुकडेदास धुमलवाड 👤 सतिश कदम *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *शहाणे* उथळ पाण्याला खळखळाट फार असतो वर वर स्वच्छ वाटणा-या पाण्यातच गाळ असतो काही लोकांना वाटते आपण फार शहाणे आहेत माहित नसते त्यांना आपण किती अनजाने आहेत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *देव नाही देव्हा-यात,* *देव नाही देवालयी,* *देव मुर्तीत ना मावे,* *तीर्थक्षेत्रात ना दावे,* *तुझ्या-माझ्या जड देही* *देव भरूनिया राहे.....!* *देवाचे घर कोणते किंवा तो कुठे राहतो ? त्याची भेट घेण्यासाठी डोंगर चढून जायचे की दूर-दूर चालायचे ? परदेशी जायचे की नदीत स्नान करायचे. देवाची आरती ओवाळायची की सुवासिक धूप-अगरबत्ती लावायची ?* *" शेवटी देवाचा शोध हा प्रत्येक माणसाचा वैयक्तिक प्रयत्न आहे आणि जो कोणी देवाला खरेपणाने शोधतो त्याला तो नक्कीच सापडतो."* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे पाण्याचे महत्त्व तहान लागल्यावर कळते आणि ते आपल्या जवळ नसते तेव्हा अधिक कळायला लागते.जेव्हा आपल्याजवळ खूप असते तेव्हा त्याची किंमतही आपण करत नाही. अशाचप्रकारे काही सज्जन माणसांच्या बाबतीत असते.जेव्हा सज्जन आणि मोठ्यांच्या उपदेश करणा-यांच्या सहवासात राहतो तेव्हा आपल्याला त्यांनी केलेल्या उपदेशाची किंमत कळत नाही पण ती माणसे आपल्या पासून निघून जातात आणि मग कुठेतरी आपले चुकत आहे असे कळायला लागते तेव्हा त्यांची गरज आहे असे वाटायला लागते.अशावेळी मग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करायला लागतो तेंव्हा ती माणसे भेटत नाहीत. मग अशावेळी आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी जसे पाणी महत्त्वाचे आहे तसे आपल्या जीवनाला चांगला मार्ग दाखवणा-या सज्जन आणि मोठ्या उपदेशी करणा-या माणसांची गरज आहे .या दोघांनाही आपल्या जपायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपदेश - preaching* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *आवड* रोज शाळा सुटल्यावर भूक लागल्यामुळे चिन्मय धावतच घरी यायचा. त्याची आई रोज त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करायची. कधी इडली, ढोकळा, थालिपीठ, नूडल्स अगदी रोज काहीतरी वेगळे असायचेच. शाळेतल्या मित्रांना त्याचा हेवा वाटायचा. एके दिवशी घरी आल्यावर आई झोपलेली होती. तो घाईने आई जवळ गेला. आईला ताप आला होता. त्याला पाहून क्षीण आवाजात आई म्हणाली, " चिनू बेटा, मला ताप आल्यामुळे अजिबात उठवले जात नाही आहे. मी तुझ्यासाठी काही खायला करु शकले नाही. आजचा दिवस तू सकाळचीच पोळी-भाजी खा आणि दूध पी". हे ऐकल्यावर चिनूला खूपच राग आला. "हे काय डब्याही तेच आणि आताही तेच ? मी नाही काही खात जा" चिन्मय धूसफूसत म्हणाला. शेवटी काही न खाताच तो चिडून खेळायला गेला. आईला बरे नाही म्हणून संध्याकाळी बाबा स्वयंपाक करत होते. "चिनू आज तुझी मला मदत हवी आहे. मटार सोलून दे बरं", बाबा पोळया लाटता लाटता म्हणाले. नाखुषीनेच चिनूने मटार सोलायला घेतले. त्यानंतर तांदूळ निवडले. "बापरे किती वेळ लागतो हे करायला." चिनू वैतागला. बाबाही बराच वेळापासून स्वयंपाकघरात होते पण त्याच्या फक्त पोळया आणि भाजी करुन झाली होती. अजून कुकर लावायचा बाकी होता. "हो ना रे चिनू, आपण इतका वेळ स्वयंपाकघरात आहोत पण दोनच पदार्थ करु शकलो. आई रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ इतके पदार्थ कसे करत असेल ? ते सुध्दा आपली अजिबातच मदत नसतांना?" बाबाच्या ह्या प्रश्नाने चिनूला आपले संध्याकाळचे वागणे आठवले. ताप आलेला असतांनाही आपण आईशी किती वाईट बोललो हे आठवून त्याला खूप वाईट वाटले. धावतच तो आईच्या खोलीत गेला. आईच्या जवळ जाऊन तिला म्हणाला , "आई मला माफ कर. तू आमच्यासाठी किती कष्ट घेतेस. मी मात्र तुला बर नसतांनाही खायला करायचा हटट केला. कधी कधी तर तू प्रेमाने कलेले, मी मात्र आवडत नाही म्हणून सरळ टाकून देतो. माफ कर मला आई". चिन्यमचे हे बोलणे ऐकून आईने त्याला जवळ घेतले.बाबाही पाने आणायला स्वयंपाक घरात गेले.आणि सर्वजण मिळून आनंदाने जेवले. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/08/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार. 💥 जन्म :- १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार. 💥 मृत्यू :- १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान. २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राज्य सरकारी कर्मचार्यांना १ जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनलाभ देण्याची राज्य सरकारने केली घोषणा* --------------------------------------------------- 2⃣ *जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील मेगा भरती थांबवली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा* --------------------------------------------------- 3⃣ *धनगर आरक्षणप्रश्नी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १३ ऑॅगस्ट रोजी राज्यभर तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय धनगर समाज महासंघातर्फे घेण्यात आला* --------------------------------------------------- 4⃣ *एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट 'आ'वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त* --------------------------------------------------- 5⃣ *भारतातील सर्वात पहिला बेबी स्पा हैदराबाद शहरामध्ये सुरू, हा स्पा खास तान्ह्या मुलांकरिता असून यामध्ये केवळ नऊ महिन्यांपर्यंत वय असलेल्या तान्हय़ा मुलांना प्रवेश दिला जाणार* --------------------------------------------------- 6⃣ *रूपे कार्ड आणि भीम अँप याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास 'जीएसटी'मध्ये सवलत देण्याची योजना केंद्र सरकारच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत करण्यात आली.* --------------------------------------------------- 7⃣ *चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने केले पराभूत* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *मुलांना आळशी बनवू नये* https://storymirror.com/story/5966bd362086f79414698de6 पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *दामोदर हरी चाफेकर* दामोदर चाफेकर यांचा जन्म श्री. हरिभाऊ चाफेकर या एका कीर्तनकारांच्या घरी २५ जून १८६९ रोजी झाला. लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव दामोदरवर होता. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. इंग्रजांनी दामोदरपंतांना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील एरवडा तुरूंगात फाशी दिली. लहानपणापासूनच दामोदरला व्यायामाची आवड होती. समवयस्क मित्रमंडळींना संघटीत करून त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली होती. इंग्रजांच्या अत्याचाराची दामोदरपंतांना मनस्वी चीड होती. दामोदरपंतांचे लहान भाऊ बाळकृष्ण हरि चाफेकर व वासुदेव हरि चाफेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= *शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.* *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) सर्वात ज्यास्त उस उत्पादक असलेला राज्य कोणता ?* उतरप्रदेश *०२) भारतात हीरेची सर्वात जास्त ठेव कोणत्या राज्यात आहे ?* मध्यप्रदेश *०३) भारतीय संविधान मधील समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेण्यात आली ?* ऑस्ट्रेलिया *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 सुदर्शन पाटील जोगदंड 👤 गुलाबलाल जैस्वाल 👤 राजेंद्र पोकलवार 👤 नरसिंह पावडे देशमुख 👤 गंगाधर ढगे 👤 दिनेश दारमोड 👤 दीपक हिवराळे 👤 हर्ष पाटील 👤 इरेश वंचेवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूसकी* माणूसकीवरचा विश्वास रोज उडू लागला आहे इथे राजरोस फसवण्याचा प्रकार घडू लागला आहे दुस-याला फसवणारे समाधानी असू शकत नाहीत असले लोक कधीच आनंदाने हसू शकत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *_"मैत्री"_* *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.* *बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात होऊन गेलेल्या घटना ह्या भूतकाळातल्या असतात आणि त्या कुणालाही बदलता येत नाहीत. परंतु त्यात झालेल्या वाईट गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जपले पाहिजे आणि जी चांगली होऊन गेलेली घटना आहे त्या घटनेला अधिक चांगले कसे करता येईल हे करण्यासाठी आपल्यासमोर भविष्यकाळ आहे तो मात्र आपल्या हातात आहे. म्हणून भूतकाळाला जास्त महत्त्व न देता भविष्याला आपल्या डोळ्यांसमोर सदैव ठेवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा काळाचाच नियम आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *पुनरावृत्ती - Repeat* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कोल्हा आणि नगारा* एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढय़ात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्यावर एका झाडाची फांदी वार्यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्यावर आपला पंजा मारून लागला. तेवढय़ात त्याच्या लक्षात आले की नगार्याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्याचे कातडे कुरतडून फाडले तर.. आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या. तात्पर्य : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/08/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९४४ - ज्यूंचे शिरकाण - गेस्टापोने ऍन फ्रँक व तिच्या कुटुंबास अटक केली. १९४७ - जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. १९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी. १९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले. १९९३ - टॅक्सीचालक रॉडनी किंगच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल लॉस एंजेल्सच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना ३० महिन्याची कैद. २००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी. 💥 जन्म :- १९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक. १९३१ - नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी. 💥 मृत्यू :- १५७८ - सेबास्टियाव पहिला, पोर्तुगालचा राजा. १९१९ - डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९६७ - पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला घेण्याचा हायकोर्टाचा निर्णय, राज्यातील तीव्र आंदोलन, आत्महत्यांची हायकोर्टाकडून दखल.* --------------------------------------------------- 2⃣ *गडचिरोली - 2 महिलांसह एकूण 5 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचे यश* --------------------------------------------------- 3⃣ *भंडारा : येथील जवाहर नवोदय विद्यालय अल्पसंख्याक वसतिगृहाच्या स्थानांतरणास अल्पसंख्यांक विभागाची मान्यता.* --------------------------------------------------- 4⃣ *यवतमाळ : बोगस बिटी-३ बियाणे निर्माण करणाऱ्या कंपनी मालकाला यवतमाळ पोलिसांनी गुजरातमधून केली अटक.* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, यवतमाळ जि.प. समोर धरणे, मागणीचे निवेदन सादर* --------------------------------------------------- 6⃣ *भारताच्या सायना नेहवालचं जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेतलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात* --------------------------------------------------- 7⃣ *इंग्लंडला दुस-या डावात भारताचा गोलंदाज इशांत शर्मा याने एकामागोमाग धक्के दिले, भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा सातव्या स्थानावर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन बाबत प्रतिक्रिया* येत्या 15 ऑगस्ट रोजी फ्रेश मॉर्निंग बुलेटीन ही सेवा तीन वर्षे पूर्ण करून चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने या टीमविषयी आपले मत आम्हांला या गुगल फॉर्म द्वारे कळवावे. यापुढे अजून चांगली सेवा देण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न राहील. https://goo.gl/forms/pu7luhvU7SovaB673 तेंव्हा आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चांगल्या प्रतिक्रियेला प्रसिद्धी देण्यात येईल याची नोंद घ्यावी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= अनंत लक्ष्मण कान्हेरे अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. तो इ.स. १८९९ साली गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचा सदस्य होता. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्या नंतरचा सर्वांत तरूण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंताने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे असे समवयस्क साथीदारांची जोड मिळाली *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= 01) इटलीची राजधानी कोणती ? रोम 02) लिट्ल मास्टर या नावाने कोणाला ओळखले जाते ? सुनील गावसकर 03) चॉकलेटमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर होतो ? कोको *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 प्रभू रेब्बावार 👤 व्यंकटेश अमृतवार 👤 प्रतिभा येवतीकर 👤 अहेमद शेख 👤 आनंदराव आवरे 👤 अमित सूर्यवंशी 👤 विठ्ठल पवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वप्न* ऐन मोसमातच पावसाची दडी आहे लहरी पावसाची ही त-हा हर घडी आहे दडी मारल्याने सारे हवाल दिल होतात पाहिलेले स्वप्न सारे हवेत विरून जातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= ••••●🔸‼ *विचार धन* ‼🔸●•••• *तीन वर्षांपूर्वी ह्रदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. किडनी निकामी झालेला युसूफ अन्वर नावाचा एक तरूण मृत्यूच्या दारात होता. डायलिसीसवर त्याचा श्वास सुरू होता. दुसरी किडनी घ्यायची तर परिवारात रक्त जुळेना. जितेंद्रसिंग बिट्टा नावाचा दुसरा एक तरूण तिथं आला. त्याचीही किडनी गेलेली आणि कुटुंबात रक्त जुळत नव्हतं. एक दिवस अन्वर-जितेंद्रसिंग ओळख-भेट झाली. समदु:खी म्हणून घनिष्ठता वाढली. परस्परांना हात देण्याचा निर्धार झाला. योग असा की युसूफला जितेंद्रच्या पत्नीची व जितेंद्रला युसूफच्या मामाची किडनी जुळली. दोन्ही परिवारांच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली !* *माणसा-माणसांत भेद करणारे सारे पूल ढासळले आणि दोघांनाही जीवदान मिळालं. आपल्याच राखेतून उडणा-या फिनिक्स पक्षाप्रमाणे जगण्याची नवी उमेद मिळाली. हिंदू मुसलमान भाई-भाई झाले. शरीराला कुठं धर्म ठाऊक असतो ! रक्तालाही कुठला धर्म नसतो. रक्त धर्मावरून नव्हे, रक्तगटावरून जुळते. पण माणसा-माणसांत भिंती उभ्या केल्यात व्यवस्थेनं. या भिंती दगड-विटांच्या नाहीत. त्या धर्म-पंथ-संप्रदायाच्या आहेत. जाती-धर्मावरून तलवारी निघतात. अशा क्षुद्र, निरर्थक गोष्टींसाठी माणसानं आपसात लढायचं का ?* *"धर्म, जाती, पंथ झाले खूप आता* *कोणता झेंडा धरू माणूस व्हाया ?* *रक्त असते लाल सा-यांचे गडेहो..* *लोक का लढतात द्वेषाच्या लढाया ?"* ••●🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●•• ♦♦♦♦♦♦♦♦♦ *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात. असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत. अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी. काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे. अशा ठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे. ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो. या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत, हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *समाधान - Solution* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= सकारात्मक पाऊल एक प्राचीन चिनी कथा आहे. डोंगराळ भागात राहणारा एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे अनेक वर्षांपासून ठरवत असतो. अंतर खूप असल्याने साधारण रात्री 2 वाजेदरम्यान काळोखातच दर्शनासाठी चालत जावे लागत असे.काही झाले तरी त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायचीच,असा ठाम निश्चय मनाशी करत तो गावकर्यांना व त्या तीर्थक्षेत्राला भेट देणार्या भाविकांना मार्ग व सोबत लागणार्या सामानाविषयीची माहिती विचारतो.गावकरी त्याला आवश्यक सामानाची यादी देतात.सोबत कंदील घेऊन जा,असा सल्लाही देतात.मनाशी निश्चय केल्याप्रमाणे तो रात्री 2 वाजता तीर्थक्षेत्राकडे निघतो.अंधार असतो. कंदिलाच्या प्रकाशात त्याला केवळ दहा पावलांच्या अंतरावरील रस्ताच दिसत असतो.तो मनाशी विचार करतो 20 किलोमीटरचा रस्ता आणि अशा अंधारात कंदिलाच्या मंद प्रकाशात केवळ काही अंतरावरचेच दिसतेय.त्याची पावले जागीच थबकतात.त्याच्या मागोमाग एक साधु महाराज त्याला येताना दिसतात.तो साधुला थांबवतो.म्हणतो,तुमच्याकडे तर माझ्या कंदिलापेक्षाही मंद प्रकाश देणारा कंदील आहे.रस्ता धोकादायक आहे.तुम्ही जाऊ नका?साधु हसतो.त्याला म्हणतो,‘अरे एकदाच दहा पावले कुणाला टाकायचीत?एक पाऊल चालण्याइतका प्रकाश खूप झाला. एक एक पाऊल टाकत हजारो मैल दूरचा टप्पा आपण सहज गाठू शकतो.तो साधु महाराजांनाच गणिताचा तर्क सांगतो.मी तर्कनिष्ठ आहे.मी श्रद्धाळू नाही.मी गणितज्ज्ञ आहे.मला समजावण्याचा तुमचा प्रयत्न निष्फळ आहे.असे सांगत तो पुन्हा त्या मार्गावर न जाण्याची विनंती साधुला करतो.साधू त्याला म्हणतो,बाळा एक पाऊल,अर्थात पहिले पाऊल महत्त्वाचे आहे.पहिले सकारात्मक पाऊल कित्येक किलोमीटरचा तुमचा कठीण प्रवासही सुकर करतो,तर पहिल्याच पावलाला तुमचा विश्वास डगमगल्यास प्रवास कितीही छोटा असू दे,तुम्ही निश्चित ध्येयापर्यंत पोहचूच शकत नाहीत. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/08/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९०० - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना १९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले. १९२३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी. १९४६ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना. १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य. २००५ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव २०१४ - चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार. 💥 जन्म :- १७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा. १८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक. १८५५ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू १८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान. १८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा. १९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाड १९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू १९४८ - ज्यॉँ-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा. १४६० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा. १७९७ - जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती. १९२५ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९७७ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष. १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *आर्थिक सुधारणांच्या बाबतीत मोदी सरकारची कामगिरी उल्लेखनीय असल्याचं मत चिनी मीडियानं मांडलं आहे* --------------------------------------------------- 2⃣ *मध्य प्रदेश: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात* --------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - उल्हासनगरात अक्षर प्लास्टिक कारखाना सील, एका टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचे आढळले साहित्य* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज कझाकिस्तान, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर* --------------------------------------------------- 5⃣ *भारतात होऊ घातलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रशिया मीडियाच्या माध्यमातून हस्तक्षेप करण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ज्ञांनी वर्तवली* --------------------------------------------------- 6⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात दिनेश कार्तिकला शून्यावर त्रिफळाचीत करत बेन स्टोक्सने साजरे केले बळींचे शतक* --------------------------------------------------- 7⃣ *World Badminton Championships 2018 : भारताची महिला बॅटमिंटनपटू सानया नेहवालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक मारली* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *उमाजी नाईक* उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक. होते. नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कलालवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यासस्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 =========ஜ۩۞۩ஜ========= ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) कोणत्या किटकाच्या दंशानं हिवताप होतो ?* डास *२) सूक्ष्म वीजप्रवाह मोजणारं उपकरण कोणतं ?* सूक्ष्मवीजमापी *३) क्षय हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?* फुफ्फुस *४) तापमापकाचा शोध कोणी लावला?* डॅनियल फॅरेनहाइट *५) पेशीविषयक माहिती देणारं शास्त्र कोणते ?* पेशीवंशशास्त्र *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 अजय बिरारी 👤 पोतन्ना चिंचलोड 👤 शिरीष पद्माकर देशमुख 👤 प्रदीप काळे 👤 उत्तमराव नरवाडे 👤 भंवर सिंग *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ========= *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* =========ஜ۩۞۩ஜ========= *ध्यास* काही काहींना सतत नव्याचा ध्यास असतो यशस्वी होण्याचा तोच तर खरा श्वास असतो ध्यास धरणाराला खरं यशस्वी होता येत ख-या अर्थाने यशाचं गाणं त्याला गाता येत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟! ! *आजचा विचारधन* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.* *'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.* *--संजय नलावडे, मुंबई* 📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ========= *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= काल तुम्ही तुमच्याबद्दल जो काही विचार केला असेल त्याची आज थोडी उजळणी करून पहा. नक्कीच तुम्ही तुमच्याबद्दल चांगलाच विचार केला असेल आणि तुमच्याच हिताचा असेल की, ज्यामुळे तुमच्या जीवनात काही तरी परिवर्तन घडवून आणण्यासाठी असेल. आता तोच विचार जर तुमच्या जीवनात चांगले परिवर्तन घडून आणतो तर त्याच विचाराला तुम्ही इतरांसमोर मांडून पहा. कदाचित इतरांच्याही जीवनात तुम्ही सांगितलेल्या विचारांशी ते सहमत होतील आणि त्यांच्या जीवनात इष्ट तो बदल घडून येऊन चांगले जीवन बदलण्याची दिशा मिळेल. म्हणजेच तुमच्या हातून एखादे चांगले कार्य इतरांसाठी घडले त्याचे समाधान तुम्हाला वाटेल. तुमच्या एका चांगल्या विचारांमुळे तुमच्या जीवनात रोडवर इतरांच्याही जीवनाचा चांगला विचार करण्याची सुवर्णसंधी आली हे कधीही तुम्ही विसरणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ========= *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= परिवर्तन - Change संकलक - कुणाल पवारे, कुंडलवाडी 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वतः मध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला कधीही चांगले असते. *📝 संकलन* 📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Subscribe to:
Posts (Atom)