✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ac_c••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌟 महत्वाच्या घटना :-• १९०९ – भारतात ‘काळ्या कायद्यांविरुद्ध’ लढा देणारे ‘हिंद स्वराज’ हे महात्मा गांधींचं पुस्तक प्रथमच प्रकाशित झालं.• १९६२ – अमेरिकेने पहिला दूरसंचार उपग्रह "टेलस्टार-1" यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.• १९९३ – महाराष्ट्रात मुंबई येथे भीषण पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.🎉 जन्मदिवस :-• १८९५ – बकुळा रिव्हा (बौद्ध भिक्षुणी व भारतीय संसदीय सदस्य)• १९०४ – पाब्लो नेरुदा, नोबेल पुरस्कार विजेते चिलीचे कवी.• १९२७ – विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.🕯️ स्मृतिदिन :-• १९२० – जोसफ रॉक, प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ.• २००३ – बाळासाहेब देसाई, महाराष्ट्राचे शिक्षण व कायदा मंत्री.• २०१२ – राजेश खन्ना, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... विशेष लेख वाचण्यासाठीhttps://nasayeotikar.blogspot.com येथे क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड, राजगड सह 12 किल्यांचा युनेस्कोच्या यादीत नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *फिल्मफेअर 2025 च्या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आदिनाथ कोठारे यांचा पाणी चित्रपटाची झाली निवड, तर अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' ने बाजी मारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून १ जुलै ते १५ जुलै दरम्यान शोध मोहीम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला मिळाले सहा पुरस्कार; सीएमडी लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा पॉवर रिन्युएब्लने एप्रिल ते जून या तीन महिन्यात तब्बल ४५ हजार ५८९ घरांच्या छतावर उभारले रूफ टॉप सोलर पॅनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमरनाथ यात्रा: आतापर्यंत 1.45 लाख भाविकांनी घेतले दर्शन, 7,307 यात्रेकरूंचा एक नवीन गट रवाना; बालटाल, पहलगाम मार्गे यात्रा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लॉर्ड्स - तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंड सर्व बाद 387 धावा तर भारत 3 बाद 147 धावा, राहुलचे अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिल्पा जोशी, जेष्ठ साहित्यिक, मुंबई 👤 प्रवीण दाबाडे पाटील, शिक्षक तथा साहित्यिक, कन्नड👤 हरिहर धुतमल, पत्रकार, लोहा 👤 अविनाश पांडे 👤 माधव उमरे👤 दादाराव जाधव 👤 नागेश पडकुटलावार 👤 अभिजित राजपूत 👤 नंदकुमार कौठेकर 👤 साईनाथ पाटील गादगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 24*दात आहेत पण चावत नाही, गुंता होतो काळ्या शेतात, सगळे माझ्यावर सोपवतात, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - हत्ती ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणतेही ध्येय घेतले तरी त्याच्या सिद्धीसाठी उद्योग करावा लागतो. ध्येय आपण होऊन निरुद्योगी माणसाच्या हातात येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ चा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) श्वसन क्रियेद्वारे दूषित हवा आत जात राहिल्याने कोणता रोग होतो ?३) उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती कोण आहेत ?४) 'कमी आयुष्य असलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'कॅप्टन कूल' असे कोणत्या क्रिकेटपटूला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) महेश मांजरेकर, नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता २) दमा ३) जगदीप धनखड ४) अल्पायू, अल्पायुषी ५) महेंद्रसिंग धोनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लेसर* 📙 लेसर या प्रकाशकिरणांभोवती एक गूढ वलय सामान्य माणसाच्या मनात असते. काही वर्षांपूर्वीपर्यंत लेसरचा वापर अगदी मर्यादित होता; पण आज मात्र तो अगदी सामान्य माणसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या वस्तूच्या वेष्टनावरची किंमत, पुस्तकाचा क्रमांक किंवा क्रेडिट कार्डवरची माहिती वाचण्यासाठी लेसर किरणांचा वापर केला जातो. एवढेच काय, पण बाजारात नवीन आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क स्टिरिओमध्येही लेसरच वापरलेला असतो. डोळे व लेसर यांचे तर अतूट असे समीकरण होण्याइतका डोळ्यांच्या आजारात लेसरचा वापर वाढत आहे. त्यामानाने मेंदूतील कर्करोगात लेसर वापरणे अजून तितकेसे सुलभ झालेले नाही. हा वापर करताना लेसरचा एक महत्त्वाचा गुण वापरला जातो, तो म्हणजे लेसरच्या लहरी ठराविक वेगाने, ठरावीक काळाने एका मागोमाग अत्यंत सुसंघटितपणे वाहत असतात. नेमक्या जागी पाहिजे त्या आकाराचे, पाहिजे तितक्या लहान व्यासाचे लेसरचे किरण सोडता येतात व हे किरण अन्य प्रकाशाप्रमाणे पसरत नाहीत. एकाच तरंगलांबीच्या विद्युतचुंबकीय लहरी लेसरमध्ये असतात. त्यामुळे लेसरचा रंगही ज्या उद्गमातून लेसर निर्माण केला जाईल, त्यावर अवलंबून असतो. पण एका वेळी एकच रंग असतो. लेसर हे नाव नसून तो एक शोर्टफॉर्म आहे. लेझर (LASER) म्हणजे 'लाइट अॅम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन'.लेसरच्या निर्मितीचे सध्या विविध प्रकार वापरले जातात. काहींमध्ये क्र्वार्ट्झचा वापर केला जातो, तर काहींमध्ये हवाबंद नळीतील इलेक्ट्रोड काही विशिष्ट वायूंमध्ये काम करतात. हेलियम, निऑन, कार्बन डायॉक्साइड यांचा वापर या ट्यूबमध्ये केला जातो. दोन इलेक्ट्रोड्समध्ये उच्चदाबाचा विजेचा प्रवाह खेळवल्यावर लेसर निर्माण करण्यासाठी वापरलेल्या द्रव्यातील अणुंना जी ऊर्जा मिळते, त्यामुळे त्यातून प्रकाशकिरण बाहेर टाकले जातात. दिलेली विद्युतऊर्जा बाहेर टाकल्या जाणाऱ्या प्रकाशकिरणांची एक साखळी प्रक्रियाच या द्रव्यात सुरू होते. या नळीच्या दोन्ही बाजूंना समोरासमोरच्या दोन आरशांतुन हे प्रकाशकिरण पुन्हापुन्हा पर परावर्तित होत असल्याने ही साखळीप्रक्रिया वाढतच जाते. या अारशांपैकी एका आरशाला ठेवलेल्या पाहिजे त्या व्यासाच्या छिद्रातुन लेसर बीम वा झोत नळीच्या बाहेर टाकला जातो. प्रत्येक अणूतून बाहेर पडणारे किरण हे एकाच तरंग लांबीचे असल्याने बाहेर पडणारा झोतही तसाच असतो. प्रकाशाचा झोत सलग जोडायचा की पुंजक्या पुंजक्यात, हे लेसरच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून ठेवता येते. बाहेर पडणाऱ्या सर्व किरणांचा संघटितपणा (coherence) हा लेसरला नेहमीच्या प्रकाशापेक्षा वेगळा ठरवतो. लेसरची वैशिष्टय़े या गुणधर्मातूनच संभवतात.लेसर किरणांचा विनाशक व उपयोगी असा दोन्ही प्रकारे भरपूर वापर केला गेला आहे. अनेक प्रकारची लष्करी अस्त्रे, आयुधे, विमाने लेसरचा वापर करतात, तर अनेक अत्याधुनिक कारखाने अत्यंत काटेकोरपणे कापाकापी वा जोडाजोडीसाठीही लेसरच वापरतात. डोळ्यांच्या आतील दृष्टीपटल निखळले असता ते पुन्हा चिकटवण्यासाठी लेसरचा वापर केला जातो. विविध कथा, सिनेमा व विज्ञान गोष्टींत मात्र लेसर काल्पनिक बंदुकीचा मुक्त वापर आढळतो. कसलाही आवाज न करणारी, पण पाहिजे त्याचा बळी घेणारी ही बंदूकच लेसरबद्दलचे गूढवलय सर्वांच्या मनात वाढत जाते.लेसरबद्दल एक विशेष बाब म्हणजे १९१७ साली आइन्स्टाइन यांनी या स्वरूपाचे किरण निर्माण होऊन त्यांचा वापर करता येईल, असे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी १९६० साल उजाडले. थियोडोर मेमन यांनी पहिला लेसर त्या वर्षी वापरात आणला. त्यानंतरही अनेक वर्षांनंतर म्हणजे १९७५ सालच्या आसपास वैद्यकीय क्षेत्रात प्रगत देशात त्याचा वापर सुरू झाला. भारतात प्रमुख शहरात १९९० सालापासून लेसरचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात. प्रामुख्याने ते डोळ्यांच्या बाबतीत असतात.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभावे ||१||येणे सोसे मन झाले हावभरी | परत माघारी घेत नाही ||२||बंधनापासुनि उकलल्या गांठी | देता आले मिठी सावकाश ||३||तुका म्हणे देह भरीला विठ्ठले | कामक्रोध केले घर रिते ||४||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌷🌹🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई-वडिलांचे प्रेम*एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.तात्पर्य - स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1989LZFxLJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 182 वा दिवस 🌍 महत्त्वाच्या घटना :- • १९७९ – अमेरिका देशाचे अंतराळ यान स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.• १९८७ – जगाची लोकसंख्या ५ अब्ज झाली, म्हणून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित करण्यात आला.🎉 जन्मदिवस :- • १८९७ – नारायण माळी, प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक.• १९३४ – ज्योतीर्मयी सिकदर, भारताच्या सुवर्णपदक विजेत्या धावपटू (१९९८ आशियाई क्रीडा स्पर्धा).🕯️ मृत्यू :- • १९९६ – गोविंद निहलानी, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक व छायाचित्रकार.• २००६ – मुम्बईमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे २०९ लोकांचा मृत्यू झाला.🌐 महत्त्वाचे दिन :- 🌏 जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day)१९८९ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने साजरा केला जातो.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *लोकसंख्या शिक्षणात शिक्षकांची भूमिका*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विकसित भारतासाठी शैक्षणिक धोरण महत्वाचे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित; भाजप नेते आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर; शहरी नक्षलवादाला लगाम बसणार, सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुपचूप दिल्ली गाठली, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी; राजकीय वर्तुळात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यातच यशवंत विद्यार्थी योजनेत भ्रष्टाचार; आता सावेंकडून प्रकरणाची गंभीर दखल; म्हणाले, सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित, SIT चौकशी होणार; 5 कोटी घेऊन विधानसभा परिसरात फिरत असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड - लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेटच्या देवाचं पोट्रेट अनावरण, सचिन तेंडुलकरला आठवले 1989 चे दिवस; म्हणाला, माझ्यासाठी शब्दात व्यक्त न होता येणारा क्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रकाश नाईक, BDO, पंचायत समिती खुलताबाद👤 अनुपमा अजय मुंजे, शिक्षिका तथा साहित्यिक 👤 प्रभू देशमुख, मुख्याध्यापक, बिलोली 👤 स्वप्नील शिंदे 👤 इंजि. साईकिरण अवधूतवार, हैद्राबाद 👤 संतोष चव्हाण, शिक्षक👤 शिवाजी सूर्यवंशी, शिक्षक, हदगांव 👤 प्रमोद मंगनाळे, शिक्षक नेते, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 23*असा कोण आहे, जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कॅलेंडर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान हे बाहेरून आत ओतण्याची वस्तू नसून आतून बाहेरून अभिव्यक्त होणारी एक शक्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताची पहिली अम्पुटी जलतरणपटू कोण ?२) २१ एप्रिल १९४७ ला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधताना नागरी सेवकांना काय संबोधले ?३) पहिला नागरी सेवा दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?४) 'कुस्ती खेळण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतातील नागरी सेवांचा पाया कोणी घातला ? *उत्तरे :-* १) शाश्रुती विनायक नाकाडे, ताडगाव, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया २) भारताची पोलादी चौकट ३) २१ एप्रिल २००६ ४) आखाडा, हौद ५) वॉरन हेस्टिंग्ज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍 ************************या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी || १ ||चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ ||तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ऋषी अष्टावक्र*हिंदू धर्मशास्‍त्रामध्‍ये अष्‍टावक्र नावाचे एक विचारवंत होऊन गेले. असे म्‍हणतात की अष्‍टावक्र हे केवळ कुरुपच नव्‍हते तर त्‍यांचे शरीरही बेढब होते. त्‍यांचे शरीर आठ ठिकाणी वाकडे होते म्‍हणून त्‍यांना अष्‍टावक्र हे म्‍हटले जात होते. ही एक प्रसिद्ध कथा आहे. अष्‍टावक्र ऋषी एकदा राजा जनक यांच्‍या दरबारात गेले. दोन्‍ही बाजूंनी उंच आसनावर सभासद, ज्ञानी, पंडीत, ज्ञानकर्मी बसले आणि राजा जनकाचे सिंहासन होते. अष्‍टावक्र ऋषींना द्वारपालाने रोखले नाही. अष्‍टावक्र त्‍यावेळी किशोरवयीन होते. अष्‍टावक्राने जेव्‍हा राजा जनकाच्‍या मुख्‍य सभामंडपात प्रवेश केला तेव्‍हा त्‍याच्‍यावर नजर पडताच सर्वजण एकमेकांकडे पाहून हसू लागले होते. इतकेच नाही तर त्‍यांचे हसू थांबत नव्‍हते. हे पाहून अष्‍टावक्राला प्रथम काहीच समजले नाही, मात्र त्‍यानंतर त्‍याला आपल्‍यावर हे सर्वजण हसतात म्‍हणून लक्षात आले. हे पाहून तोही जोरजोरात हसू लागला. जनक राजाने सभेला शांत होण्‍याचे आवाहन केले, सभा शांत होताच राजा जनकाने अष्‍टावक्राला विचारले,'' हे साधू, हे लोक तुमच्‍यावर हसतात हे माझ्या लक्षात आले पण तुम्‍ही का हसता आहात हे समजले नाही'' अष्‍टवक्राने उत्तर दिले,'' महाराज, मला वाटले की राजा जनक जो ज्ञानी, विचारवंत आहे त्‍याच्‍या सभेत ज्ञानी, विचारवंत, हुशार लोक असतील पण इथे तर सर्वच जण कातडीकडे व बाह्य स्‍वरूपाकडे पाहणारे लोक आहेत. माझ्या रूपाकडे पाहून हे लोक मला हसत होते हे पाहून मला यांच्‍या बुद्धीची कीव आली व हसू फुटले.'' जनक राजासह सर्व सभा अष्‍टावक्र ऋषींच्‍या या उत्तराने शरमिंदी झाली. तात्‍पर्य - माणसाचे महत्‍व त्‍याच्‍या शरीरावर नाही तर त्‍याचे ज्ञान, परिश्रम आणि कर्मावर आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -https://www.facebook.com/share/p/1BFknE7oeM/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 181 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १९२५ – महात्मा गांधींनी 'हरिजन सेवक संघ' स्थापन केला.• १९९१ – बोरिस येल्त्सिन रशियाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष बनले.• २००२ – भारताचा ‘अग्नि-I’ क्षेपणास्त्राचा यशस्वी चाचणी झाली.🎉 जन्मदिन :-• १८७१ – मार्सेल प्रुस्त, प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार.• १९२० – मुल्क राज आनंद, इंग्रजी लेखक (भारत).• १९४९ – सुनील गावसकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रसिद्ध फलंदाज.• १९५१ – कौशल्या फडके, मराठी लेखिका.🕯️ पुण्यतिथी :-• १९२० – निकोला टेस्ला, महान शास्त्रज्ञ आणि संशोधक.• २००६ – राजेश पायलट, भारतीय राजकारणी.• २०१९ – गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकारणी व महाराष्ट्रातील लोकप्रिय नेता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रासंगिक लेख *आई माझा गुरु*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टप्पा अनुदानाचा प्रश्न सुटणार, शिक्षकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपन्न, शिक्षकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार - मंत्री गिरीश महाजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय गृह मंत्रालय मराठीतून आलेल्या पत्रांना आता मराठी भाषेतूनच उत्तर देणार; संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नामिबिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील हॉटेल उद्योग धोक्याच्या उंबरठ्यावर, शासनाच्या करवाढीमुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता, आहार संघटनेकडून चिंता व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीय वंशाचे सबीह खान होणार 'अँपल'चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी, ते जेफ विल्यम्स यांची जागा घेतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *'आयर्नमॅन 2025' ही स्पर्धा स्वीडनच्या जोनकोपिंग येथे पार पडली, त्यात अभिनेत्री सैयामी खेरने ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण करून वर्षभरात दुसऱ्यांदा रचला जबरदस्त रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश पांडुरंग लबडे, शिक्षक, छत्रपती संभाजीनगर👤 युवराज माने, शिक्षक तथा साहित्यिक, अंबाजोगाई👤 दत्तात्रय धूळशेट्टे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, नांदेड 👤 मिलिंद चवरे, शिक्षक, मनपा, नांदेड 👤 लक्ष्मण मुंडकर, शिक्षक, बिलोली 👤 नागनाथ वाढवणे, शिक्षक, नायगाव बा.👤 ज्ञानेश्वर जगताप, शिक्षक, नांदेड 👤 सुरेश सावरगावकर, शिक्षक, नांदेड 👤 दगडू गारकर, शिक्षक, लातूर 👤 चरणसिंह चौहान 👤 अभिजित वऱ्हाडे 👤 पिराजी चन्नावार 👤 भागवत गर्कल 👤 बालाजी दुसेवार 👤 संतोषकुमार यशवंतकर👤 गणेश अंगरवार 👤 प्रकाश येलमे, धर्माबाद👤 विठ्ठल रामलू चिंचलोड, हैद्राबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 22*अशी कोणती गोष्ट आहे, जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता, आणि वर्ष संपला कि फेकून देता ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टाईपरायटर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी नष्ट होतात. - शंकराचार्य*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणते प्रदूषक जलप्रदूषणासाठी जबाबदार आहेत ?२) एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ?३) तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष सध्या कोणत्या राज्यात आहे ?४) 'बातमी सांगणारा / सांगणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगातील सर्वात मोठा आईस्क्रीमचा निर्यातदार देश कोणता ? *उत्तरे :-* १) प्लॅस्टिक कचरा २) शुभमन गील, ४३० धावा ३) बिहार ४) वृत्तनिवेदक / वृत्तनिवेदिका ५) जर्मनी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?*🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज सोनियाचा दिनू | वर्षे अमृताचा धनु || १ ||हरी पहिला रे हरी पहिला रे |सबाह्यअभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी || २ ||दृढविटे मन मुळी | विराजित वनमाळी || ३ ||बरवा संतसमागमू | प्रगटला आत्मारामु || ४ ||कृपासिंधु करुणाकरू | बणररखुमादेवीवरू || ५ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोर उभी दिसणारी व्यक्ती गरीब असेल म्हणजे ती लाचार असेलच असेही नाही. बरेचदा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आपला वेगळा असतो म्हणून ती तशीच दिसत असते आणि तिथेच श्रीमंत दिसणाऱ्या व्यक्तीकडे आपण मोठ्या आदराने बघून मानसन्मान देतो कधीकाळी आपल्या याच वागणुकीमुळे लाचार बनण्याची आपल्यावर वेळ येत असते. म्हणून गरीब असेल त्याला लाचार समजू नये आणि श्रीमंत दिसणाऱ्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन फिरू नये.कारण ज्याला डोक्यावर घेऊन फिरल्याने लाचार बनण्याची वेळ येते अन् एखाद्याला हिनवल्याने आपल्यातील माणुसकी नावाची संपत्ती त्या क्षणातच संपत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1YHW8n3mJe/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📌 महत्त्वाच्या घटना :-🗓 १८१६ – दु:खद उन्हाळा दरम्यान अमेरिकेत बर्फवृष्टी झाली, जी जागतिक हवामानातील बदलामुळे झाली होती.🗓 १८७५ – बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना झाली.🗓 १९९१ – भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरण प्रक्रिया सुरू झाली.🎉 जन्मदिवस :-👨‍🔬 १८५६ – निकोला टेस्ला, प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विद्युत अभियंता (जन्म: क्रोएशिया).🎬 १९४६ – अमृता प्रीतम, पंजाबी साहित्यिक लेखिका.🎵 १९६४ – सोनू निगम, भारतीय गायक व अभिनेते.🕯 मृत्यू :- ⚰️ १९७४ – गुरुनाथ बेडेकर, मराठी साहित्यिक, समीक्षक.⚰️ २००२ – केशवसुत यांच्या पत्नी शारदा, ज्यांनी त्यांच्या कविता प्रसिद्ध केल्या.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*जरूर वाचावे आणि आपल्या प्रतिक्रिया तेथेच comment करावे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी केली भारत बंदची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एक देश-एक निवडणूक संविधानाच्या मूलभूत रचनेचे उल्लंघन नाही, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संसदीय समितीला लेखी मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत बसमध्ये मोफत प्रवास योजेनेत बदल, ट्रान्सजेंडर आणि दिल्लीचे रहिवाशी असलेले महिलाच बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डोनाल्ड ट्रम्प यांनी आता 14 देशांवर लादला कर, म्यानमारकडून आकारले सर्वाधिक शुल्क, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रातील सर्वात मोठे APMC मार्केट नवी मुंबईतून स्थलांतरित करण्याचे आदेश; NMMC ने सुचवला 14 गावांचा पर्याय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भूषण गवई यांची सर न्यायाधीश पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे विधानमंडळात सत्कार, भारताची राज्यघटना या विषयी ऐतिहासिक मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड - तिसरा कसोटी सामना उद्यापासून लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित पवळे, सेवानिवृत्त, शिक्षक 👤 महेश जाधव 👤 साईनाथ विश्वब्रह्मा 👤 अनिल उडतेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *लिहतो पण पेन नाही, चालतो पण गाडी नाही, टिक टिक करतो पण घड्याळ नाही, सांगा बर मी कोण आहे?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - रस्ता ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मसमर्पणाच्या भावनेने जे आपले जीवन घालवितात, त्यांना आपल्या पुढील मार्ग स्वच्छ दिसतो. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात एकूण अण्वस्त्रधारी देश किती आहेत ?२) १९ वर्षाखालील वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू शतक झळकविण्याचा विक्रम कोणी केला ?३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ( MPSC ) मुख्यालय कोठे आहे ?४) 'बातमी आणून देणारा / देणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) देशातील कोणते विद्यापीठ पहिले सहकार विद्यापीठ ठरणार आहे ? *उत्तरे :-* १) नऊ - रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, उत्तर कोरिया, भारत, पाकिस्तान २) वैभव सूर्यवंशी, भारत, ५२ चेंडू ३) बेलापूर, नवी मुंबई ४) वार्ताहर ५) त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, गुजरात*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 एनिमा म्हणजे काय ? 📕शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास 'एनिमा' असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीमध्ये गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. हथा चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी || २ ||तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मेहनतीचे फळ जेव्हा मिळते तेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. कारण मेहनत करताना आपला स्वाभिमान आणि सत्यता आपल्यात कायम असतो आणि यामुळेच समाधान तर मिळतोच सोबतच कोणासमोर मान खाली घालून राहण्याची आपल्यावर वेळ येत नाही म्हणून जे काही मिळवायचे असेल ते आपल्या मेहनतीने, स्वाभिमानाने मिळवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.तात्‍पर्य - फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जुलै 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16qqX9M8vD/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 189 वा दिवस 🔹 महत्वाच्या घटना :-• १४९७ – वास्को-द-गामा आपल्या पहिल्या भारतवारीसाठी पोर्तुगालमधून निघाला.• १८८९ – वॉल स्ट्रीट जर्नल या प्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.• १९६९ – भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथे उभारण्यात आले.• २०११ – अमेरिकेच्या 'स्पेस शटल' कार्यक्रमाचा अंतिम (१३५ वा) उड्डाण 'अ‍ॅटलांटिस' द्वारे करण्यात आला.🔹 जन्म :-• १६२१ – जाँ द ला फाँतेन, प्रसिद्ध फ्रेंच कथालेखक.• १८३६ – जोसेफ चेंबरलेन, ब्रिटिश राजकारणी.• १९१८ – क्रेग स्टीन, अमेरिकन पदार्थवैज्ञानिक.• १९५८ – केविन बेकॉन, हॉलीवूड अभिनेता.• १९७२ – सौरव गांगुली, भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार.🔹 मृत्यू :-• १८२२ – पर्सी बिश शेली, इंग्रजी कवी.• १९९७ – चेतन आनंद, प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक.🔹 विशेष दिन :-• व्हिडिओ गेम डे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सरकारी शाळेच्या व्यथेची कथा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागपूर व अमरावती जिल्ह्यातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधाचीकामे गतीने करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तिरुपती येथे भाविकांना दररोज दोन वेळा वडा मिळणार मोफत, तिरुमला तिरुपती देवस्थानम TTD चा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नागपूरसह इतर 24 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम, पंढरीत 27 ते 28 लाख भाविकांची गर्दी, AI च्या सहाय्याने केली मोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोला - मनपाच्या ३१ शाळा लवकरच होणार डिजिटल ! शाळांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर; डिजिटल बोर्ड, स्मार्ट बोर्ड सुविधा मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले असून, त्यातूनही पाण्याचा विसर्ग होत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती, ICC अध्यक्ष जय शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मल्लेश भुमन्ना बियानवाड, धर्माबाद 👤 आनंदराव नारायणराव सूर्यवंशी 👤 अहमद मुजावर 👤 अनिल बेद्रे 👤 सुरेश तायडे👤 अशोक पवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 20*अशी कोणती गोष्ट आहे, जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, परंतु एका ठिकाणावरून हलत नाही ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मीठ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्या पासून वेगळे सौंदर्य असू शकत नाही. सत्य हेच सौंदर्य, पण सर्व सौंदर्य सत्य स्वरूप असते असे मात्र नाही. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या भारत व इंग्लंड कसोटी मालिकेसाठी कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) देशाचे पहिले अंध आयर्न मॅन कोण होते ?३) कोकण रेल्वे कोणत्या चार राज्यातून जाते ?४) 'बसगाड्या थांबण्याची जागा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'हवा' कोणत्या प्रकारचे द्रव्य आहे ? *उत्तरे :-* १) अँडरसन - तेंडूलकर करंडक क्रिकेट मालिका २) निकेत श्रीनिवास दलाल ३) महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ ४) बस-स्थानक ५) मिश्रण*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त केव्हा गोठतं ?* 💉जेव्हा जेव्हा एखादी रक्तवाहिनी तुटते तेव्हा तेव्हा तिच्यातला रक्त बाहेर वाहू लागतं. रक्तस्राव सुरू होतो. हे अपघातापोटी घडतं किंवा शस्त्रक्रिया करताना जाणून बुजून केलेलं असतं. असा रक्तस्त्राव अनिर्बंधरित्या होऊ देणं शरीरात परवडणारं नाही. त्यामुळे शल्यविशारद चिमटा लावून लगेच त्या रक्तवाहिन्यांची उघडी तोंड बंद करतात, रक्तस्रावाला अटकाव करतात. पण अपघातांमुळे जखम होते तेव्हा काय होतं ? तेव्हा निसर्गच मदतीला धावतो. अश्या रक्तस्रावाचा बंद बंदोबस्त करणारी शरीरातली निसर्गदत्त प्रणाली कामाला लागते.रक्तामध्ये असलेल्या प्लेटलेट्स या नावांना ओळखल्या जाणाऱ्या इटुकल्या पेशींची या रक्त गोठण्याच्या क्रियेत कळीची भूमिका असते. त्या तुटलेल्या रक्तवाहिनीच्या तोंडाजवळ तातडीनं धावून जातात. त्याच वेळी एका रासायनिक प्रक्रियेनं या पेशींच्या बाह्य आवरणात बदल होऊन त्या चिकट होतात. रक्तवाहिनीच्या आतल्या भागाला त्या चिकटुन बसतात. तसंच एकमेकींशी चिकटून एक गुठळी बनवतात. पण ही गुठळी स्थिर करण्यासाठी फायब्रिन या प्रथिनाचं एक जाळंही तयार होतं. रक्तातल्या द्रव पदार्थात असलेलं प्रोथ्राॅम्बिन नावाचं प्रथिन कामाला लागतं. त्याच्या पासुन थाॅम्बिन नावाचं प्रथिन तयार होतं आणि त्याच्यापासुन पायरी पायरीनं फायब्रीन या धाग्यासारख्या प्रथिनाची निर्मिती होते.या सगळ्यात क्लाॅटिन्ग फॅक्टर्स या नावानं ओळखल्या जाणार्‍या नऊ घटकांचीही महत्वाची भुमिका असते. हे नऊ घटक एका विशिष्ट क्रमानं काही जीव रासायनिक प्रक्रिया घडवुन अाणतात. पहिल्या घटकानं कार्यान्वित केलेली प्रक्रिया पार पडेपर्यंत दुसर्‍या पायरीवरची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. तिच्याशिवाय तिसरी नाही. अशा आखुन दिलेल्या क्रमानंच या प्रक्रिया पार पडतात. त्यातली सर्वात शेवटची प्रक्रिया पार पडल्याशिवाय रक्ताची गूठळी तयार होत नाही. यापैकी कोणत्याही पायरीवरची घटना व्यवस्थित पार पडली नाही तर त्यांची साखळी तुटते आणि रक्त गोठत नाही. रक्तगळीचा म्हणजेच हिमोफेलियाचा विकार झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात आठव्या क्रमांकाचा घटक तयारच होत नाही. तो तयार करण्याचा आराखडा ज्या जनुकाजवळ असतो ते जनुकच त्यांच्या शरीरातुन बेपत्ता असतं. त्यामुळे मग जराशी जखम झाली तरी त्यांचं रक्त जे वाहायला लागतं ते थांबतच नाही. आता कृत्रिमरित्या हा आठवा घटक तयार करण्याची पद्धती विकसित झालेली असल्यामुळे तो बाजारात मिळू शकतो. त्याच्या मदतीने या विकाराने ग्रस्त झालेल्या व्यक्तींना दिलासा देता येतो.आवश्यकता नसताना रक्त गोठणे हेही शरीराला घातक असतं. त्यासाठी यकृतातून हेपॅरीन नावाच्या रसायनाचा पाझर होत असतो. ते रक्ताची गुठळी न होता त्याचा प्रवाह व्यवस्थित होत राहील याची दक्षता घेतं. पण ज्यावेळी जखम होते त्यावेळी रक्तप्रवाहातून वाहणारं थ्राॅम्बोकायनेज हे विकर हॅपेरीनच्या कामात तात्पूरती बाधा आणून रक्त गोठवायला मदत करतं.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा माझा करे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ ||बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ ||आम्ही देवा तुझी केली होती आशा | बरवे ऋषिकेश काळो आले || ३ ||नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव माझा घ्याव्या || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोंबडी आणि कोल्हा*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जुलै 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15s2mLnVD7/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 188 वा दिवस 🔹 महत्त्वाच्या घटना:• १९२८ – स्लाईस ब्रेड (स्लीस करून विकली जाणारी ब्रेड) प्रथमच विक्रीस आली. ही घटना "The best thing since sliced bread" या प्रसिद्ध वाक्याशी संबंधित आहे.• १९८३ – भारताने INS Virat या विमानवाहू नौकेची खरेदी केली.• २००५ – लंडनमध्ये चार आत्मघातकी बाँबस्फोट झाले, ज्यात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.🎂 जन्मदिवस / जन्म:• १८६५ – डॉ. अन्‌बेसेन्ट – भारतात होऊन गेलेल्या प्रसिद्ध थिऑसॉफिस्ट, शिक्षणतज्ज्ञ व महिला हक्कांच्या समर्थक.• १९०१ – व्ही. बी. कांबळे – दलित चळवळीतील एक विचारवंत व नेते.• १९५२ – महेंद्र कपूर – प्रसिद्ध पार्श्वगायक. (तारीख कधी कधी ९ जानेवारीही नमूद केली जाते.)• १९८५ – रवींद्र जडेजा – भारतीय क्रिकेटपटू.⚰️ मृत्यू:• १९९९ – कॅ. विक्रम बत्रा – कारगिल युद्धातील शहीद वीर योद्धा, परमवीर चक्र सन्मानित.• २००१ – सत्यजित राय – प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १९२१) – काही संदर्भांत तारीख वेगळी असते.🗓️ अन्य दिनविशेष:🌹 जागतिक चॉकलेट दिन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गरिबांसाठी शिक्षण झाले महाग*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सपत्नीक महापूजा; राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या 8 आणि 9 जुलै रोजी, अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यासाठी एकत्र येतील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 18 जुलै रोजी जमा होण्याची शक्यता !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दलाई लामा यांच्या 90 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सार्वजनिक वाहनामध्ये बसाविणार पॅनिक बटन, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एका आठवड्यात पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी होणार जाहीर - डॉ. महेश पालकर अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 336 रणने हरवून मालिका 1-1 बरोबरीत आकाशदीपचे सहा बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* ● दत्ताहारी पाटील कदम बेलगुजरीकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष, धर्माबाद● प्रज्ञा घोडके, साहित्यिक● रमेश चांडके, हैद्राबाद● ऋषीकेश देशमुख, साहित्यिक● सय्यद युनूस, मा. मुख्याध्यापक, उर्दू हायस्कुल● संदीप डोंगरे● महेश जोशी, पत्रकार, धर्माबाद ● श्रीकांत माने● प्रकाश गोरठकर● विजय पाटील रातोळीकर● माधव कांबळे● आशिद लाव्हाळे● ज्वालासिंह घायाळे● दिगंबर पांचाळ● हरी ओम राठोड● व्यंकट ताटेवाड● लक्ष्मण कांबळे● पिराजी कटकमवार● हणमंत जाधव● जगन्नाथ पुलकंठवार● बालासाहेब पेंडलोड● साईनाथ वाघळे● गजानन काठेवाडे, PSI, बरबडा ● साईनाथ हामंद, शिक्षक, धर्माबाद ● शंकर रामलू बलीकोंडावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 19*पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून,जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कोळसा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ताठ उभे रहा, ताठ बसा आणि आपल्या एकूण एक कामात व्यवस्थित आणि निर्मळ रहा. ही सर्व कामे तुमच्या आंतरिक स्थितीचे निदर्शक होऊ द्या. - महात्मा गांधी*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नऊ रंगाचा असलेला पक्षी कोणता ?२) एका कसोटीत द्विशतक आणि शतक झळकविणारे भारतीय फलंदाज कोण ?३) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?४) 'विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोकण रेल्वे कोणत्या साली सुरू झाली ? *उत्तरे :-* १) भारतीय पिट्टा, नवरंग, Indian Pitta २) सुनील गावस्कर, शुभमन गील ३) H2O ४) पाणपोई ५) सन १९९८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रिएन्फोर्समेंट* 📙छपरावर टाकलेला पत्रा पन्हाळीचा का असतो ? स्कूटरच्या पत्र्याला विविध गोलांवर आतून जोड का दिला जातो ? ट्रकचा व मोटारचा पुढचा बंपर इंग्रज सी आकाराचाच का बनवतात ? घराच्या कॉलम व तुळ्यांमध्ये सिमेंट काँक्रिटमध्ये सळ्या का घालतात ? पोलादी गर्डरचा आकार इंग्रजी I प्रमाणे का असतो ?या सर्वाचे उत्तर एकच आहे. ताण सहन करण्यासाठी कमकुवत जागी विशेष आधार म्हणजेच रिएन्फोर्समेंट (reinforcement) द्यायला या गोष्टी केलेल्या असतात. घरावरचा पत्रा सरळ असता, तर त्यावर कोणी पाय दिला तर तो त्या जागी वाकला असता. पन्हाळीच्या आकाराने तो वाकू शकत नाही. तीच गोष्ट स्कूटरच्या पत्र्याची. अन्यथा साधी जोरात बुट्टी मारली, तरी त्याला कोच आला असता. बंपरचा आकार इंग्रजी सीप्रमाणे केल्याने कितीही जोरात धडक बसली तरी तो वाकू शकत नाही. 'आय'चा आकार असलेला पोलादी गर्डर तर कित्येक टनांचे वजन लीलया पेलू शकतो.काँक्रिटच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती आहे. सिमेंट काँक्रीटचा ठोकळा केवळ वरून दाब दिला, तर कित्येक टनांचा दाब सहन करतो. पण समजा, काँक्रिटचा लांबुळका ठोकळा दोन बाजूंनी पकडून ओढायला सुरुवात केली; तर तो तडे जाऊन तुटायला वेळ लागत नाही. याउलट लोखंडाचे आहे. लोखंडावर प्रचंड दाब दिल्यास त्याचा आकार कदाचित बदलेल, पण लोखंड, सळई प्रचंड ताण सहन करू शकते. मग या दोन गोष्टी एकत्र केल्या तर ?नेमके तेच बांधकामशास्त्रात रिइन्फोर्स्ड काँक्रिट बनवून तयार केले आहे. सर्व प्रकारचा दाब काँक्रिट सहन करते, तर सर्व प्रकारचा ताण आतील लोखंडी सळ्या सहन करतात. कितीही उंच बांधकाम असो किंवा कितीही लांब अंतराची काँक्रिटची तुळई असो; रिएन्फोर्सड काँक्रिट वापरले असले की, चिंता करायचे कारणच राहत नाही.निसर्गातसुद्धा हे रिइन्फोर्समेंटचे तत्त्व कित्येक ठिकाणी अमलात आलेले दिसते. फक्त त्यादृष्टीने बघायची नजर मात्र पाहिजे. शंख बघा किंवा शिंपला; जिथे वक्राकृती आकार येतो, तिथे आतील बाजूने बारीक जाड रेषांनी रिइन्फोर्समेंट दिलेली असते.उंच वाढणारे मोठ्या बुंध्याचे कोणतेही झाड बघा, त्याच्या जमिनीपासून दोन तीन फूट उंचीचा बुंधा हा उलट्यासुलट्या दिशेने पन्हाळीप्रमाणे आकार घेऊन मगच जमिनीत शिरलेला दिसतो. म्हणजेच वाऱ्याचा ताण सहन करण्यासाठी या पन्हाळीमुळे बुंध्याला पूर्ण ताकद मिळत जाते.याच रिएन्फोर्समेंटच्या तत्त्वानुसार भरीव लोखंडी कांबीपेक्षा पोकळ लोखंडी कांब वजनाने हलकी असून जास्त ताकदवान असते, हे तुम्ही अनेकदा वाचले असेलच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इंद्रायणी कांठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची || धृ ||ज्ञानियांची राजा भोगतो राणीव | नाचती वैष्णव मांगे पुढे || १ ||मागे पुढे दाते ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे || २ ||उजेडी राहिले उजेड होऊन | निवृत्ती सोपान मुक्ताबाई || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या विषयावर चिंतन व मनन करावे. चिंतन व मनन केल्याने विचारशक्तीला चालना मिळते.यामुळे आपले काहीच नुकसान होत नाही उलट चांगले विचार करण्याची आपल्याला सवय लागत असते आणि त्याच सवयीमुळे आपल्यात परिवर्तन सुद्धा तेवढेच होत असते. आणि नवीन दिशा सुद्धा सापडत असते. त्यामुळे आपलाच विकास होत नाही तर त्यामुळे इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळत असते.म्हणून ह्या प्रकारची सवय लावावी जेणेकरून आपली लक्ष इकडे, तिकडे जाणार नाही. आणि आपला अनमोल वेळ ही वाया जाणार नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."तात्पर्य - भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Dy99TXq32/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 186 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १६८७ – औरंगजेबाच्या हुकुमावरून मराठ्यांची सिद्दी जौहरविरुद्ध किल्ले पन्हाळगड येथील लढाई सुरू झाली.• १८११ – वेनेझुएला स्पेनपासून स्वतंत्र झाले.• १९४६ – फ्रान्समध्ये 'बिकिनी' या पोशाखाची पहिली झलक पॅरिसमध्ये प्रदर्शित झाली.• १९९४ – भारत सरकारने भारतातील खासगी रेडिओ स्टेशनसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला.👶 जन्मदिवस :-• १८२० – विलियम जॉन मॅकेनजी – स्कॉटिश गणितज्ञ• १९२७ – श्रीराम लागू – प्रख्यात मराठी नाट्य व चित्रपट अभिनेते• १९५१ – रामनाथ कोविंद – भारताचे १४वे राष्ट्रपती• १९७५ – अमर उपाध्याय – हिंदी टीव्ही व चित्रपट अभिनेता⚰️ मृत्यू :-• १९६९ – वसंत कानेटकर – मराठी नाटककार, लेखक• २०२० – आनंद शिंदे – मराठी गायक, अभंग गायक🌍 विशेष दिन :-• राष्ट्रीय शिक्षक दिवस (झेक प्रजासत्ताक)• राष्ट्रीय संस्कृती दिवस (अल्जेरिया)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिपाठच्या माध्यमातून संस्कार*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेनच्या विमानतळावर उत्साहात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप 2025 स्पर्धेच्या चषकाचे केलं अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालार्थ आय डी तातडीने देण्याचा प्रस्ताव विचारधीन मंत्री पंकज भोयर यांनी अधिवेशनात दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वीस दिवस आधीच भंडारदरा धरणातून विसर्ग, 15 दिवसांत पाणी जायकवाडीकडे झेपावणार, जिल्हा प्रशासनाकडून प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंढरपुरात वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य व्यवस्था, 120 रुग्णवाहिकांद्वारे 8643 भाविकांना 24 तास आरोग्यसेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मालवाहतूक व्यवसायिकांचे राज्यव्यापी आंदोलन, जेएनपीटीत 100 टक्के तर पुणे जिल्ह्यात 75 टक्के व्यावसायिकांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड सर्वबाद 407 धावा, मोहम्मद सिराजने घेतले सहा विकेट, हैरी ब्रुक व जेमी स्मिथचे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष कांबळे, सहशिक्षक महाराष्ट्र विद्यालय, निलंगा, लातूर👤 गजानन बुद्रुक, हिंगोली 👤 गिरीश कहाळेकर, नांदेड 👤 नरेश शिलारवार, धर्माबाद 👤 मारोती कदम, साहित्यिक, नांदेड 👤 नागनाथ भत्ते, विशेष शिक्षक, धर्माबाद 👤 गणपत बडूरकर, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद 👤 संतोष शेळके, साहित्यिक, कर्जत 👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद 👤 डॉ. मनोज तानूरकर, हस्ताक्षर तज्ञ👤 रमेश आबूलकोडं, LIC प्रतिनिधी 👤 सुदर्शन जावळे पाटील 👤 सुधाकर चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद 👤 अशोक पाटील, देगलूर 👤 विजय प्रकाश पाटील गाडीवान 👤 मोतीराम तोटलोड, धर्माबाद👤 अजय चव्हाण *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 18*खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल, फेकल्यावर पांढरा, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चुंबक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक चांगले असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "जानी हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे लेकिन तब, जब बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा" हा प्रसिद्ध डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहे ?२) भारताची गुप्तहेर संस्था 'रॉ' च्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली ?३) विम्बल्डन स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?४) 'फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अणूच्या केंद्रकात कोणते कण असतात ? *उत्तरे :-* १) सौदागर ( १९९१ ) २) पराग जैन ३) टेनिस ४) सदावर्त, अन्नछत्र ५) प्रोटॉन आणि न्यूट्रॉन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅*************************रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ ||भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ ||माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा, कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अहंकारी राजाला धडा*एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~