✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जून 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/197XC49VmY/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 181 वा दिवस 📜 इतिहासातील घटना:• १८५९ – फ्रेंच अकादमीने पहिल्यांदाच चार्ल्स डार्विनच्या 'ऑरिजिन ऑफ स्पिशिज' या ग्रंथाचा स्वीकार केला.• १९०५ – अल्बर्ट आइन्स्टाईनने ‘स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ (सापेक्षतावाद सिद्धांत) याचा पहिला संशोधन निबंध प्रसिद्ध केला.• १९०८ – तुंगुस्का स्फोट (रशिया) – सायबेरियामध्ये उल्कापाताने मोठा स्फोट झाला, २००० चौरस किमी परिसरातील झाडे नष्ट.• १९९७ – हाँगकाँग या ब्रिटिश वसाहतीचा चीनकडे अधिकृत ताबा सोपवण्यात आला.🎉 महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती / पुण्यतिथी:• १९१७ – सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता व्ही. शांताराम यांचा जन्मदिवस.• १९३६ – मराठी लेखक आणि समीक्षक शं. ना. नवरे यांचा जन्म.• २००३ – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दादा मुनि – अशोक कुमार यांचे निधन.🌍 जागतिक / राष्ट्रीय दिवस:🌐 आंतरराष्ट्रीय लिपा दिन (International Asteroid Day)→ हा दिवस तुंगुस्का स्फोटाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.→ यामागील हेतू: मानवजातीस धोका असणाऱ्या उल्का आणि अंतराळातील वस्तूंबद्दल जनजागृती करणे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लॉकडाऊन नंतरचे जीवन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारकडून हिंदीचा GR रद्द, ठाकरे बंधूंचाही मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अहिल्यानगर, जळगावात बनावट नोटांचे रॅकेट उघड:दोन्ही घटनांत सुमारे 67 लाखांच्या बनावट नोटा जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जनगणना 2027- पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार, घरांची यादी केली जाईल; राज्यांना सूचना- 31 डिसेंबर 2025 पर्यंत सीमांकन पूर्ण करा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गडचिरोलीतील 1000 शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालय, रत्ननिधी ट्रस्टकडून 50 हजार पुस्तकांचे योगदान, 1 लाख विद्यार्थी होणार लाभार्थी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन, सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते भूमिपूजन; 500 कोटींच्या इमारतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागोराव तिप्पलवाड, साहित्यिक, बरबडा👤 शिवाजी नाईकवाडे, विस्तार अधिकारी, नांदेड 👤 विष्णू सोरते, मुख्याध्यापक, नांदेड 👤 स्नेहल आयरे, शिक्षिका, मुंबई 👤 विठ्ठल जाधव, शिक्षक तथा साहित्यिक, बीड 👤 सतिश गादेवार, शिक्षक, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*दोन अक्षरी नाव आहे, नेहमी सर्दी असते नाकावर, कागद माझा रुमाल आहे, माझे नाव काय आहे ते सांगा…?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तोंड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रगती व्हायला हवी असेल तर मिळणाऱ्या अनुभवातून योग्य शहाणपण घेतच पुढे जात राहिले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिल्या संविधान उद्देशिका ( प्रास्ताविका ) पार्क कोठे उभारण्यात आला आहे ?२) आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणती पदवी प्रदान करण्यात आली ?३) पुरी येथील रथयात्रेत कोणत्या तीन देवी - देवतेचे रथ सजविले जातात ?४) 'पाण्याखालून चालणारी बोट' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) सिंधू नदीचा उगम कोठे होतो ? *उत्तरे :-* १) नागपूर २) धम्मचक्रवर्ती ३) श्री जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा ४) पाणबुडी ५) मानसरोवर जवळ, कैलास पर्वतरांग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 आपण झोपतो म्हणजे काय ? 📙 झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो. झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही आहे अनुभवले असेल. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलक्या येतात, कधी कधी चक्कर येते यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना सात ते आठ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र पाच ते सहा तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये.नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे हे तुम्हाला माहित आहे. झोपेचे इलेक्ट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की या काळात मेंदूच्या येणाऱ्या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणाऱ्या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी चार ते पाच चक्र त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचा परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते. झोप ही जीवनासाठी आवश्यक असते कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्य मंदावते. अशी ही झोप जास्त झाली तर मात्र झोपाळूपणाचा आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसलेमला हे दत्त गुरु दिसले || धृ ||माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनीकृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ ||चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचेघुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ ||तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी कायातुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपळ करत असतो आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते. पण ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सकारात्मक दृष्टिकोन**एक बेडूक डोंगराच्या टोकावर चढण्याचा विचार करतो आणि पुढे सरकतो, तेंव्हा इतर सर्व बेडूक जोरजोरात ओरडायला लागतात, "हे अशक्य अाहे.... आजपर्यंत कोणीच चढू शकला नाही... हे संभव नाही....नाही चढू शकणार"*मात्र, कोणाचेही न ऐकता शेवटी तो बेडूक डोंगराच्या टोकावर पोहचतोच.... *तुम्हाला माहिती आहे याचे कारण काय आहे ते??**कारण, तो बेडूक "'बहिरा"' होता... आणि सर्व बेडकांना ओरडताना पाहून त्याला वाटत होते की, ते माझा उत्साह वाढवत आहेत.**म्हणूनच जर तुम्हाला तुमचे "'ध्येय"' गाठायचे असेल तर, नकारात्मक लोकांच्या प्रति "'बहिरे" व्हा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले ध्येय गाठा. ..!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment