✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जून 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1QgLd6g8JK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 इतिहासातील घटना:• १८५९ – सोल्फेरिनोची लढाई झाली. या लढाईनंतर रेड क्रॉस स्थापनेची प्रेरणा मिळाली.• १९०१ – पहिले संगणकीय संगणक आकडेमोडीचे पेटंट मिळाले.• १९८७ – लीबियन हवाई दलाने अमेरिकन सैन्याविरोधात मिसाइल हल्ला केला.• २०१० – विंबलडन टेनिस स्पर्धेतील सर्वात लांब चाललेला सामना (११ तास ५ मिनिटे) अमेरिकन जॉन इस्नर आणि फ्रान्सचा निकोला महूत यांच्यात झाला.🎂 जन्म:• १३०० – इब्न बतूता, प्रसिद्ध अरब प्रवासी आणि भूगोलज्ञ.• १९११ – जुआन मॅन्युएल फॅन्गिओ, अर्जेन्टिनाचा सुप्रसिद्ध फॉर्म्युला १ रेसिंग ड्रायव्हर.• १९२७ – मार्टिन विंटरकोर्न, जर्मन उद्योगपती.• १९८७ – लिओ मेसी, अर्जेन्टिनाचा जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू.🕯️ मृत्यू:• १९०८ – ग्रोव्हर क्लीव्हलँड, अमेरिकेचे २२वे व २४वे राष्ट्राध्यक्ष.• १९९७ – ब्रायन किट्सन, प्रसिद्ध इंग्लिश शिक्षणतज्ज्ञ.• २००० – नवाजिश लाहोटी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक.📅 विशेष दिन:• सैनिक दिन (पेरू)• इंटरनॅशनल फेरी डे (काही देशांमध्ये)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पावसाशी मारलेल्या गप्पा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेच्या इराणवरील हल्यानंतर संयुक्त राष्ट्रात आपत्कालीन बैठक, गुटेरेस यांचे शांततेचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विठू नामाच्या गजरात संत जनाबाई यांची पालखी वारीसाठी मार्गस्थ, गंगाखेडहून पंढरपूरकडे रवाना *•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय, राजकीय आणि सामाजिक चळवळींशी संबंधित फौजदारी खटले मागे घेणार, शासन आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकशाही ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ST महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, दरवर्षी 5000 नव्या बस; महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढवण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडसमोर 371 धावाचे लक्ष्य, ऋषभ पंत व के. एल. राहुल यांची शतकीय खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन रेनगुंटवार👤 कल्पना डेव्हिड बनसोड👤 कवी अनिल रेड्डी👤 सदानंद कोडगळे👤 लक्ष्मण सुरकार👤 संदीप शंभरकर👤 लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी👤 रवी गंगाधर भोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 08*अशी कोणती गोष्ट आहे, जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चष्मा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विद्यार्थी हा विद्येवर चरणारा राजहंस आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'पाखरं म्हणजे अरण्याचा उडता आत्मा' असे कोण म्हणाले होते ?२) नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे जनक कोणाला म्हटले जाते ?३) भारतीय संस्कृतीत मोराला कशाचे प्रतीक मानले जाते ?४) 'नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) प्राचीन भारतातील पहिला कीटकशास्त्रज्ञ कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) पद्मश्री मारुती चितमपल्ली २) माधवराव डोंगरवार पाटील ३) वैभव व पवित्रता ४) नट, अभिनेता ५) मांडव्य ऋषी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आधुनिक मानवाचा उदय केव्हा झाला ?* 📙वैज्ञानिक भाषेत आधुनिक मानवाचं नाव होमो सेपियन्स असं आहे. पण हा आधुनिक मानव एकाएकी अकस्मात जन्माला आला नाही. डार्विननं सांगितल्याप्रमाणे वानर प्रजातींपासून हळूहळू उत्क्रांती होत होत त्याचा उदय झाला. म्हणून होमो या प्रजातीच्याही काही जाती आधुनिक मानवाच्या आधी उदयाला येऊन अस्ताला गेल्या. त्यांचेही पूर्वसुरी होमिनिड या नावानं आणि त्यांचेही पूर्वज होमोनाॅइड या नावाने ओळखले जातात.आफ्रिकेच्या जंगलात राहणारे होमिनाॅईड प्रजातीचे वानर साधारण ५० ते ८० लाख वर्षांपूर्वी वावरत होते. त्या कालखंडात पडलेल्या दुष्काळापोटी तिथल्या वनराजीला ग्रहण लागलं. त्यामुळे झाडांवर राहणाऱ्या या वानरांना आपलं बस्तान दुसरीकडे तर हलवावं लागलंच, पण अन्नाच्या शोधासाठी तसंच वास्तव्यासाठीही झाडांचा आश्रय सोडून जमिनीवर उतरावं लागलं. आफ्रिकेतल्याच सॅव्हॅन्ना या गवताळ जंगलांमध्ये ज्यांनी आश्रय घेतला, त्या वानरांचे वंश टिकून राहिले. ही वानरं दिवसा जमिनीवर उतरून अन्नाचा शोध घेत, पण रात्र झाली की परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामी परतत.जमिनीवरचं मिळालेलं अन्न परत आपल्या झाडांवरच्या मुक्कामस्थळी हलवायचं तर ते पुढच्या दोन पायांमध्ये म्हणजेच हातांमध्ये धरून आणावं लागे. ते करण्याची क्षमता ज्यांनी मिळवली त्या जातींना तगून राहण्यास मदत झाली. त्यातूनच हळूहळू दोन पायांवर उभे राहणारे नवीन होमिनिड प्राणी उदयाला आले. हे मानवसदृश असले तरी त्यांनी वानरजातीचे गुणधर्म संपूर्णपणे त्यागलेले नव्हते. झाडांचा आश्रय त्यांनी संपूर्ण सोडलेला नव्हता. या प्रजातीतही उत्क्रांती होत गेली. आणि त्यातूनच पहिले होमो प्रजातीतले प्राणी उदयाला आले. यांना होमो हॅबिलिस म्हणतात. पुढचे दोन पाय म्हणजेच हात मोकळे झाल्यामुळे त्यांचा अधिकाधिक उपयोग करायला हे प्राणी शिकले होते. ते काही आयुधं आणि अस्त्रं बनवून त्यांचा वापर शिकारीसाठी किंवा घरटं खोदण्यासाठी करायला शिकले होते. पण अजूनही ते संपूर्णपणे दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. थोडे डगमगत होते. शिवाय त्यांचा मेंदूचाही फारसा विकास झालेला नव्हता. ही झाली १५ ते ३० लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यानंतर उदयाला आले ते होमो इरेक्ट्स. हे दोन पायांवर ताठ उभे राहू शकत होते. त्यांच्या मेंदूचीही चांगलीच वाढ झाली होती. परंतु ते अजूनही वन्य प्राण्यांप्रमाणे गुहांमध्ये राहून गोळा करून आणलेल्या कंदमुळांवर व शिकार करून आणलेल्या मांसावर गुजराण करत होते. अग्नीचा शोधही त्यांनी लावला होता. त्यांची आयुधंही जास्त प्रभावी होती.त्यांचीच उत्क्रांती होत होमो सेपियन्स म्हणजे बुद्धिमान होमोचा किंवा आधुनिक मानवाचा उदय झाला. त्याच्या मेंदूचा झपाट्याने विकास झाला होता. बुद्धिमत्तेत वाढ झाल्यामुळे शेती किंवा सांस्कृतिक विकास यांचाही प्रवाह सुरू झाला होता. होमो सेपियन्सचा उदय साधारण ३५००० ते १०००० वर्षांपूर्वी झाला यावर सर्वांचंच एकमत आहे.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाम घेता उठाउठी,होय संसाराची तुटी || धृ ||ऐसा लाभ बांधा गांठीविठ्ठल पायी मिठी || १ ||नामापरते साधन नाहीजें तू करिसी आणिक कांही || २ ||हाकरोनी सांगे तुकानाम घेता राहो नका || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• व्यक्ती मग कोणीही असो मनाने निर्मळ आणि स्वभावाने प्रेमळ असते सोबतच कोणाकडेही लक्ष न देता आपले कार्य नित्यनेमाने करत असते ती व्यक्ती स्वप्नात सुद्धा कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ती प्रत्यक्ष सुद्धा असे कधीच वागू शकत नाही अशा व्यक्तीला सज्जन म्हटले जाते. म्हणून अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे. भलेही अशा सज्जन व्यक्तीकडून काही मिळत नसेल तरी कधी न मिटणारी संपत्ती मिळते. त्या संपत्तीचा कधीही अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वार्थीवृत्ती*एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.फक्त स्वतःचाच फायदा पाहतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment