✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जून 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19VPhMPCpW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन• सामाजिक न्याय दिन💥 ठळक घडामोडी :-• १८१९ - सायकलचा पेटंट देण्यात आला.• १९६० - सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.• १९६० - मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य. • १९९९-नांदेड तालुक्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका तयार करण्यात आला. 💥 जन्म :-• १८७४ - राजर्षी शाहू महाराज• १८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.• १८९२ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.💥 मृत्यू :-• १९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.• २००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.• २००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराजांचे महाराज*आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *CBSE चा मोठा निर्णय, 2026 पासून दहावीच्या परीक्षा दोन वेळा, नव्या नियमांना मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *Axiom-4 मिशन - शुभांशूसह चार अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार यांनी मारली बाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येत्या एक जुलैपासून रेल्वेकडून प्रवाशांना एसएमएस, पोर्टल, स्टेशन डिस्प्ले आणि सार्वजनिक सेवा देण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी, 3626 कोटींच्या खर्चाला मान्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *खरीप पेरण्यांच्या तोंडावर राज्यात युरिया अन् डीएपी खतांचा तुटवडा, पेरण्यांपूर्वीच शेतकऱ्यांची दमछाक*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवी दिल्ली :- आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादवकडेच राहणार भारताचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रमेश इटलोड, शिक्षक नेते, नांदेड 👤 नारायण ईबीतवार👤 राजेश पाटील उमरेकर👤 संतोष रेड्डी बोमीनवाड👤 सुरेश यादव👤 अनिल पाटील भुसारे👤 गणेश आरटवार👤 कैलास स्वामी👤 शेख बाशू👤 मनीष अग्रवाल👤 कृष्णा भोरे👤 बालाजी सावंत👤 लक्ष्मण नोमुलवार बाभळीकर👤 अंकुश कामगोंडे👤 पुरुषोत्तम रेड्डी चाकरोडs*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 10*रंगाने काळी आहे, ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही, मला सांगा की ते काय आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - गरम मसाला ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची तळमळ असणाराच वेगळे कार्य करून समाजधर्म पाळतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२५ मधील जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब कोणी पटकावला ?२) पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला ?३) ज्योतिबांना सावित्री कोणत्या नावाने हाक मारीत असे ?४) 'खूप मोठा विस्तार असलेले' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) पहिले बाजीराव पेशवे यांचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) डेमी मूर, अमेरिकन हॉलीवुड अभिनेत्री, वय ६२ वर्षे २) पहिले बाजीराव पेशवा ( सन १७३६ ) ३) शेठजी ४) विस्तीर्ण, ऐसपैस ५) विसाजी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••😴 *आपण केव्हा घोरतो ?* 😴 तसंच पाहिलं तर सर्वच जण घोरतात. पण कोणी ते कबूल करायला तयार नसतो. तसा सबळ पुरावा दाखवून ते कबूल करून घेणंही सोपं नसतं. कारण माणूस घोरतो ते झोपेत. त्या वेळी त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. त्याला उठवलं तर तो घोरत होता याचा पुरावाच नष्ट होतो. तरी बरं अलीकडे अँड्रॉइड वगैरे प्रकारच्या मोबाइल फोनवर कोणाचाही साग्रसंगीत व्हिडिओ घेण्याची सोय आहे. त्याचा वापर करून माणूस घोरी घराण्याचा सदस्य असल्याचं सिद्ध करता येतं.माणूस गाढ झोपलेला असताना घोरतो हे तर स्पष्टच आहे. तरीही नेमकी कोणती परिस्थिती त्याच्या घोरण्याला कारणीभूत होते हेही समजून घेतलं, तर तो केव्हा घोरतो हे स्पष्ट होईल. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. आपल्या घरातील अवयवांचं नियंत्रण करणाऱ्या स्नायूंचीही तीच स्थिती असते. त्यामुळे मऊ टाळू, जीभ, पडजीभ वगैरे अवयवांची या नियंत्रणापासून सुटका होते. त्याच वेळी श्वासनलिकाही सुस्तावल्यामुळे अरुंद झालेली असते. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा तो या अरुंद श्वासनलिकेतून आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थात त्या अरुंद नलिकेकडून विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर पडून ते फडफडू लागतात. त्यांचाच जोराचा आवाज होतो. तोच आपल्याला घोरण्याच्या स्वरूपात ऐकू येतो. कधीकधी सर्दीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नाक चोंदलेलं असतं. त्यातून वाट काढणाऱ्या श्वासालाही विरोध होतो. त्यावर मात करण्यासाठी हवेला जास्त जोर लावावा लागतो. परिणामी हवेचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी खळबळल्यासारखा होतो. त्या खळबळीपोटी घशातल्या मृदू अवयवांची फडफड होते. माणूस घोरायला लागतो.घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही. तर घोरणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. कारण घोरण्यामुळे बर्याच वेळा झोप चाळवली जाते. काही वेळा तर जागही येते. परत झोप लागणं कठीण होतं. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे उठल्यावर माणूस तेवढा ताजातवाना राहू शकत नाही.जसा खोकला हा आजार नाही तर ते केवळ लक्षण आहे, तसंच घोरणंही हा आजार नाही. तेही एक गंभीर ठरू शकणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कधीकधी झोपेत असताना श्वासोच्छ्वासाला अडथळा होतो. याला अाॅब्स्टक्ट्रिव्ह स्लीपअॅंप्निया म्हणतात. झोपेत असल्यामुळे या अडथळ्याचं रूपांतर श्वासोच्छ्वास थांबण्यात कधी होतं ते कळतही नाही. तसं झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यामुळे अतिघोरणं होत असेल व त्यातून झोप वरचेवर चाळवली जात असेल तर डॉक्टरी तपासणी करून घेणं हिताचं ठरतं.बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून 👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगाडोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला $...$..$..$..$अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची || १ ||लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवाकस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाहीओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची || २ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आपल्या डोक्यावर असलेल्या केसांमध्ये किती मळ आहे ते, आपल्याला माहीत नसते त्यासाठी आधी ते केस धुतल्यावरच कळत असते. तसेच दुसऱ्याच्या मनात काय सुरु आहे या विषयी सुद्धा आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून जसे आपण, आपले केस धुत असतो तसंच दुसऱ्याला ओळखण्यासाठी आपले विचार सुद्धा तेवढेच सकारात्मक असणे आवश्यक आहे. कारण बरेचदा असं होतं की, चांगले माणसं आपण ओळखू शकत नाही अन् चुकीचे माणसं जवळ करताना आनंद मिळत असतो पण,तोच मिळणारा आनंद एक दिवस आपल्या आयुष्याची वाट लावत असते म्हणून आपण थोडी सावधगिरी बाळगायला हवी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे*एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले.*तात्पर्य :- गुरूचे कार्य महान असते. गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment