✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जून 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16V3HpGQaH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌹 महत्त्वाच्या घटना :• १९४८ – सी. राजगोपालाचारी भारताचे पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल झाले (ब्रिटीश नसल्यानं हा मान मिळवणारे ते एकमेव भारतीय).• १९८५ – ग्रीनलँडमध्ये जून सॉल्स्टिस (उन्हाळ्यातील सर्वांत मोठा दिवस) साजरा करण्यास सुरुवात.• २००६ – प्लूटो हा ग्रह नाही, असे अधिकृतपणे मान्य करण्याच्या हालचाली सुरू.🎉 विशेष दिन / जागतिक दिवस :🌞 आंतरराष्ट्रीय योग दिन⮕ संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेने २०१५ पासून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मांडला होता.⮕ २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने योगासाठी महत्त्वाचा मानला जातो.🌍 जागतिक संगीत दिन⮕ १९८२ पासून फ्रान्समध्ये सुरू झालेला हा दिवस जगभर साजरा केला जातो.👶 जन्मदिवस :• १७३२ – जोसेफ हायडन, ऑस्ट्रियन संगीतकार.• १९२५ – जीन पॉल सार्त्र, प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ.• १९५३ – बेनाझीर भुट्टो, पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान⚰️ मृत्यू :• १५२७ – निकोला मॅकियावेली, इटालियन राजकारणतज्ज्ञ व लेखक.• १९७० – सुब्रतो मुखर्जी, भारतीय वायुसेनेचे पहिले प्रमुख.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सहशालेय उपक्रम आणि योग*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विशाखापट्टनम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 11 व्या अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शाळेच्या स्पर्धेत पुण्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं पहिल्या दहामध्ये मिळवलं स्थान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संत तुकारामांची पालखी पुण्यात दाखल, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही लवकरच पोहोचणार; वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईला २३ व २४ जूनला होणार संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेडच्या व्यापाऱ्याला स्वस्त सोन्याचा मोह नडला, 15 लाखाच्या बदल्यात दिले एक किलो बनावट सोने*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे मेट्रोचे खडकी स्थानक आजपासून होणार सुरु, ज्यामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी सुधारणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलची शतकीय खेळीनंतर टीम इंडियाच्या 3 गडी बाद 359 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा फटाले, शिक्षण विस्तार अधिकारी, जि. प. नांदेड 👤 विरभद्र बसापुरे, शिक्षक नेते, धर्माबाद👤 आनंद पाटील जाधव 👤 राहुल पाटील 👤 हनमंत जगदंबे👤 संजयकुमार मांजरमकर 👤 धाराजी जोगदंड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 06*दोन बहिणी एकच रंगाच्या, घट्ट यांचे नाते, एक बहिण हरवली तर दुसरी कामी न येते…*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - दिशा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः निर्माण केलेल्या सृष्टीच्या कानाकोपऱ्यात जाण्यास आपण असमर्थ आहोत हे लक्षात येताच; ईश्वराने वात्सल्याचा सागर असणाऱ्या ' आई ' ला निर्माण केले. - एडिसन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) पद्मश्री अरण्यऋषी पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या गुरुचे नाव काय होते ?३) क्रोएशिया या देशाचा अधिकृतपणे दौरा करणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?४) 'होडी चालवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) एड्स हा रोग कोणत्या व्हायरसने होतो ? *उत्तरे :-* १) २१ जून २) अरण्यपुत्र माधवराव पाटील डोंगरवार, धाबेपवनी, गोंदिया ३) नरेंद्र मोदी ४) नावाडी, नाखवा, नाविक ५) शिव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गॅसेस का होतात ?* 📙खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो.‍ लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीनरूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावूविठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येतीपंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीच्या विषयी सर्व काही माहीत असताना सुद्धा नको त्या शब्दात बोलणे तसेच त्याच ठिकाणी एखाद्या व्यक्ती विषयी माहिती नसताना किंवा त्याला न वाचता जसं तोडांला आलं त्याच शब्दात बोलून मोकळे होणे या दोघांमध्ये काहीच फरक नसतो. त्यामुळेच अशा या आपल्या विचारामुळे त्या व्यक्तीला दु:ख तर होतोच पण, समोर असलेल्या काही व्यक्ती समोर आपल्या विषयी किंवा आपल्या विचारांचा आदर असेलच असेही नाही. कारण प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून गेलेली असते त्यामुळे माणसं ओळखण्याची कुठेतरी त्यांना दिव्यदृष्टी असतेच म्हणून कोणालाही न वाचता किंवा त्याच्याविषयी माहीती नसताना स्वतः च्या मनाचे समाधान करण्यासाठी कोणत्याही शब्दात बोलू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपकार स्मरावे*अज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ? चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.*तात्पर्य :- उपकाराची जाण ठेवावी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment