✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/165bv8yyKZ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-• १९४० - रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.• १९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.• 2005 -कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा💥 जन्म :-• १९२१ - माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव• १९२६ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.• १९३० - इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-• १९१३ - मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.• १९१४ - आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.• १९१४ - काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन - शिक्षण अंकात प्रसिद्ध झालेला लेख *पालक नव्हे मित्र बना*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यभरातील 51 IPS अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : 61 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ठाकरे बंधूंच्या 5 तारखेच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा, जयंत पाटील यांचं ट्विटद्वारे आवाहन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पुणे येथे 'हेजिंग डेस्क' सुरू, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या भावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळेल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काटेवाडीत संत तुकारामांची पालखी दाखल, धोतराच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत, डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'काँटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अकरावी प्रवेशाची ऑनलाईन पहिली यादी आता सोमवारी होणार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मार्तंड भुताळे, सेवानिवृत्त अधिकारी, देगलूर👤 प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार, नायगाव👤 दीपक ईबीतवार👤 रामदास कदम👤 शुभम पाटील👤 अभिषेक लकडे👤 सय्यद खदीर पटेल👤 रवी जयंते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 12*आटंगण पटंगण, लाल लाल रान, अन् बत्तीस पिंपळांना एकच पान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पोपट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाग्याची दारे सर्वत्र आहेत प्रयत्नाने प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय कोण ?२) पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भूभाग वनाच्छादित असणे आवश्यक आहे ?३) शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे ?४) 'पाहण्यासाठी आलेले लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) ३३ टक्के ३) पहिले ४) प्रेक्षक ५) ३१ मार्च २०२६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस का घोरतो ?* 📙नातेवाईक, मित्र, शेजारी यांना आपल्या घोरण्याने त्रस्त करणारी व्यक्ती स्वतः मात्र सुखाने घोरत झोपलेली असते आणि अशा व्यक्तींचा आपण घोरतच नाही, असा पक्का विश्वास असतो.घोरण्याची अनेक कारणे आहेत. घोरण्याची सवय प्रौढ पुरुषांमध्ये अधिक आढळते. त्यातही लठ्ठ व्यक्ती जास्त घोरतात. झोपल्यावर स्वरयंत्रामधील आणि घशातील स्नायू शिथिल झाल्याने श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो आणि अशा अडथळ्यामुळे व्यक्ती घोरावयास लागते.वरील कारणांशिवाय घशातील टाॅन्सील, लहान मुलातील नाकाच्या मागच्या बाजूचे टॉन्सिल (अॅडेनॉइड्स) वाढलेले असणे, पडजीभ मोठी होणे, घशातील स्वरयंत्रातील ट्यूमर, नाकातील हाड वाकडे असणे; यांमुळेही माणूस घोरतो. तसेच काही झोपेची औषधे, झटक्यांवरची औषधे यांच्यामुळेही माणूस घोरू शकतो. खूप दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्येही घोरण्याची सवय आढळून येते. अशा या घोरण्यावर उपाय करता येतो. नाकाच्या, घशाच्या व्याधी असतील तर त्यावर उपचार करणे; दारूचे व्यसन बंद करणे, लठ्ठपणा कमी करणे, ज्या औषधांमुळे घोरतो ती औषधे बंद करणे; असे उपाय केले जातात. तसेच गरज पडल्यास औषधे दिली जातात. घोरण्यावर उपाय करून घेणे चांगले ; कारण घोरण्यामुळे फुप्फुसाचे, हृदयाचे आजार होऊ शकतात. काही घोरणाऱ्या व्यक्तींना झोपेत श्वास बंद होण्याची सवय असते. यामुळेही हृदयावर घातक परिणाम होतो. म्हणून घोरणे जसे दुसऱ्याला त्रासदायक ठरते तसे घोरणाऱ्या व्यक्तीलाही हानी पोहोचवू शकते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दत्त दर्शनाला जायचं जायचंआनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ता ची भेटया या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहरया या नजरेस आणि काही येईना || २ ||रुती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंगया भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळखेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्राप्त परिस्थितीत समाधान मानने.*एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'*तात्पर्य :- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे. प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment