✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जून 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16ZEi27xdj/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-• १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.• १९९८ - कुआलालम्पुर विमानतळ खुला.💥 जन्म :-• १८६९ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.• १९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.• १९३० - रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.• १९५१ - मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.• १९६३ - मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री.💥 मृत्यू :-• १९९९ - जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा.• २००८ - सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टी तशी सृष्टी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Axiom 4 : ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर अंतराळवीरांसहा स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जोडलं गेलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलै दरम्यान, हिंदी सक्ती, शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर वादळी ठरण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरात पावसाची रिपरिप वाढली, मराठवाड्यात 65 महसूल मंडळात अतिवृष्टी; विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट, IMD चा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तिपीठ महामार्ग असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधातील मोर्चाची तारीख बदलली, 6 ऐवजी 5 जुलैला निघणार मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहच्या जागी अर्शदीप सिंगला भारताच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुशील कापसे👤 अनुपमा जाधव👤 हिरालाल पगडाल, एस बी सी नेते, पुणे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 11*पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तरी तोंड कसं रंगलं …?*ओळखा पाहू मी कोण ?उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - सावली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मन आशावादी हवे, बरेचदा काम केले तरी यश मिळत नाही तरीही तुम्ही काम सोडू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अँक्झीऑम - ४ मोहिमेअंतर्गत कोणत्या भारतीय अंतराळवीराने अंतराळात झेप घेतली आहे ?२) १९८४ मध्ये राकेश शर्मा यांनी कोणत्या देशाच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता ?३) रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंद केले ?४) 'पायात जोडे न घातलेला' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ? *उत्तरे :-* १) शुभांशू शुक्ला २) रशिया ३) उमाजी नाईक ४) अनवाणी ५) छत्रपती संभाजी नगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌎 *पृथ्वीचा जन्म केव्हा झाला ?* 🌎आपण कोणालाही त्याची जन्मतारीख विचारतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं वय किती आहे, हेच विचारात असतो. पृथ्वीचा जन्म केव्हा झाला हे विचारताना पृथ्वीचं आजमितीचं वय काय आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. ते आता वैज्ञानिक प्रणालींच्या मदतीने जवळजवळ अचूकपणे सांगणे शक्य झालं आहे.पहिली प्रणाली ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्रॅटिग्राफिक अॅनॅलिसिस म्हणतात त्याची आहे. भूगर्भात आणि धरतीच्या पृष्ठभागावरही निरनिराळे कातळांचे थर सापडतात त्यांची चिकित्सा करून ते किती पुरातन आहेत याचा छडा लावण्याची प्रक्रिया या प्रणालीत अंतर्भूत आहे. त्यासाठी उपयोगात आणलेले बहुतेक कातळ रूपांतरित म्हणजेच मेटॅमाॅर्फिक जातीचे आहेत. या कातळांच्या रूपांचं तसंच त्यांच्या वेगवेगळ्या थरात सापडलेल्या जीवाश्मांचं परीक्षण करून त्या कातळांचं वय ठरवलं जातं. ते साधारण साडेतीन अब्ज वर्षे एवढं असल्याचं निदान केलं गेलं आहे. म्हणजेच पृथ्वीचं वय किमान तेवढं असलं पाहिजे. परंतु रूपांतरित खडक अग्निजन्य तसंच गाळांच्या खडकांचं रूपांतर होत होत तयार होत असतात. याचाच अर्थ असा की पृथ्वीचं वय त्याहीपेक्षा जास्त असलं पाहिजे.त्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंग प्रणालीचा अवलंब केला गेला. रेडिओकार्बन डेटिंगमध्ये कोणत्याही पदार्थातील कार्बनच्या बारा अणुभाराच्या आणि चौदा अणुभाराच्या अशा दोन समस्थानकांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण तपासलं जातं. यापैकी चौदा अणुभाराचं समस्थानक किरणोत्सारी आहे. निसर्गात या दोन रुपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण निश्चित आहे. जेव्हा वनस्पती हवेतून कार्बनडायआॅक्साईड शोषून घेतात तेव्हा या दोन रुपांचं वनस्पतींमधील प्रमाणही निसर्गात जेवढं असतं तेवढंच भरतं. पण एकदा का वनस्पती मृत झाली की त्यात त्या वेळी असलेल्या किरणोत्सारी कार्बनच्या रूपाचं प्रमाण घटत जातं. त्यामुळे वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अवशेषांमधील या दोन रूपांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजून त्या जीवाश्मांचे वय निश्चित करता येते. याच तत्त्वावर आधारित पण कोट्यवधी वर्षे पुरातन असलेल्या वस्तूंचं, खडकांचं वय निश्चित करण्यासाठी युरेनियम शिसं, थोरियम शिसं, रुबिडियम स्ट्रॉन्शियम यासारख्या मूलतत्त्वांच्या जोड्यांचं एकमेकांशी असलेलं प्रमाण मोजण्याची पद्धत विकसित केली गेली आहे.तिसरी प्रणाली भूगर्भातील शिशाचं निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या तसंच सौरमालिकेत इतरत्र असलेल्या त्याचं प्रमाण मोजण्याची आहे. या पद्धतीनुसारही पृथ्वी किमान साडेचार अब्ज वर्षांपूर्वी प्रस्थापित झाल्याचं निदान झालं आहे. म्हणजेच पृथ्वीचा जन्म साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाला असं आपण म्हणू शकतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निघालो घेवून दत्ताची पालखीआम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||रत्नाची आरास साज मखमलीचीत्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||सात जन्माचि हो लाभली पुण्याईम्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||वात वळणाची जवालागे ओढीदिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण कोणाचे वाईट करत नाही किंवा त्यांच्याविषयी चुकीचे विचार करत नाही त्यावेळी आपले वाईट होईल ह्या प्रकारची भीती आपल्याला वाटत नसते. म्हणून कोणाविषयी का असेना त्यांच्याप्रती आपल्या मनात आदराचीच भावना असायला पाहिजे. भीती मुळात वाटणार नाही. जरी त्यावेळी कोणी आपला मुद्दामहून जरी अनादर करत असतील तरी तो आपला अपमान होत नाही कदाचित त्यांच्यात असलेल्या विचाराचा व वागणुकीचा अपमान होत असतो. फरक एवढेच की त्याविषयी त्यांना वेळेत, कळत नाही. म्हणून या प्रकारची वागणूक किंवा विचार आपल्यात नसायला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जंगलचा राजा*एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'*तात्पर्य - आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment