✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जून 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CqZJ9v6V1/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक कोड त्वचारोग दिन*💥 ठळक घडामोडी :-• १९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारशीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली• १९८३ - क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत विजेता💥 जन्म :-१९०० - लुई माउंटबॅटन, इंग्लंडचा भारतातील व्हाइसरॉय.१९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग, भारतीय पंतप्रधान.१९७४ - करिश्मा कपूर, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७८ - आफताब शिवदासानी, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-१९९७ - जाक-इवेस कूस्तू, फ्रेंच संशोधक.२००९ - फाराह फॉसेट, अमेरिकन अभिनेत्री.२००९ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभ्यासाशिवाय पर्याय नाही*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *हिंदी भाषेबाबत अंतिम निर्णय सात दिवसात, त्रिभाषा सूत्राला विरोध करणाऱ्यांशी दादा भुसे चर्चा करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; तीन लाख शेतकऱ्यांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा विजय, विरोधी उमेदवाराचा सुपडा साफ, दादांना 101 पैकी 91 मते*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आंध्रप्रदेशातील डांगेती जान्हवी नासाचे प्रशिक्षण पूर्ण करणारी पहिली भारतीय, 2029 मध्ये अंतराळ प्रवास करणार; स्कूबा डायव्हिंग, चित्रकला यांचा छंद, चंद्रावर जाण्याचे स्वप्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाच जेष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार *•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचे निधन, क्रिकेट विश्वात शोककळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 5 विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रल्हाद कापावार, स.शि. विद्यानिकेतन प्रा. विद्यालय, बिलोली👤 योगेश कात्रे👤 सुभाष लाखे👤 प्रल्हाद कापावार👤 ओम पालकृतवार👤 सुरेश कात्रे👤 रुपेश पांचाळ👤 श्रेयश इंगळे👤 संदेश कोडगिरे👤 नागेश पाटील👤 आदर्श गव्हाणे👤 राजेश अलगुंडे👤 रमाकांत गोणे👤 नादयाप्पा स्वामी👤 अशोक तनमुदले👤 दीपक जायवाड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 09*अशी कोणती वस्तू आहे, जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तहान ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या वनस्पतीला 'फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट / फ्लेम ऑफ दि ट्री / जंगलाची ज्योत' असे संबोधले जाते ?२) धाबेपवनीचे 'जिम कार्बेट' असे कोणाला म्हणतात ?३) कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज कोण ?४) 'पाऊस मुळीच न पडणे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची गरज असते ? *उत्तरे :-* १) पळस २) माधवराव डोंगरवार पाटील ३) ऋषभ पंत ४) अवर्षण, अनावृष्टी ५) लोह*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌗 *दिवस व रात्र केव्हा सामान होतात ?* 🌗हा प्रश्न सिंगापुरात कधीच विचारला जाणार नाही. विषववृत्तापासून अतिशय जवळ असल्यामुळे तिथे वर्षभर दिवस व रात्र समान असतात. उत्तर आणि दक्षिण, दोन्ही ध्रुवांजवळ हा प्रश्न विचारला जाणार नाही. कारण तिथं एक तर चोवीस तास रात्र तरी असते किंवा चोवीस तास दिवस. त्यामुळे दिवस आणि रात्र समान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरत्र मात्र दिवस आणि रात्र यांचे अवधी वर्षभरात सतत बदलत राहतात. कधी दिवस जास्त मोठे होतात तर कधी रात्र. त्यातही उत्तर गोलार्धात जेव्हा दिवस मोठे असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात रात्री मोठ्या असतात.वास्तविक दिवस आणि रात्र ही एका 'दिवसा'ची कृत्रिम विभागणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतःभोवतीही गिरकी घेत राहते. त्यामुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही भागावर दिवसभर सूर्य तळपत नाही राहत नाही. म्हणूनच जोवर सूर्यप्रकाश आहे तोवर दिवस आणि सूर्यप्रकाश मिळणे बंद होऊन अंधाराचं साम्राज्य पसरलं की रात्र अशी विभागणी करण्यात आली आहे.तसंच पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्या दोघांमधील अंतर कमी जास्त होत राहतं. कललेल्या अासापायी सूर्याचे किरण पृथ्वीवर सरळ न पडता एका कोनातून पडतात. त्यामुळे गोलाकार पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात सूर्यप्रकाश असण्याच्या वेळात फरक पडला पडत जातो. उत्तरायणाच्या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठे असतात. तर दक्षिण गोलार्धात रात्री. जसजसा सूर्य दक्षिणायनाला प्रारंभ करतो तसतशी ही परिस्थिती उलट होत जाते. या परिस्थिती सतत उलट होण्याच्या प्रक्रियेमुळे दिवस मोठे होत जातात, कमाल पातळी गाठतात, परत लहान होत जातात, किमान पातळी गाठतात. रात्रीचीही हीच परिस्थिती असते. या उलटापालटीत दोन दिवस असे येतात की त्या दिवशी रात्र आणि दिवस यांचा कालावधी सारखाच म्हणजे बारा बारा तासांचा असतो. याला संपात म्हणतात. वसंत ऋतूची सुरुवात करणारा वसंत संपात तर शरद ऋतूची सुरुवात करणारा शरद संपात. हे दोन दिवस २१ मार्च व २३ सप्टेंबर या तारखांना येतात. म्हणजेच या दोन तारखांना दिवस व रात्र समसमान व्हायला हवेत. प्रत्यक्षात मात्र ते या दिवसांच्या आसपास होतात. याचं कारण म्हणजे सूर्य हा काही बिंदुवत नाही. त्याला निश्चित आकारमान आहे. आणि सूर्याची वरची कडा क्षितिजावर आली की दिवस सुरू होतो तर ती क्षितिजाखाली गेली की रात्र. यामुळेच दिवस व रात्र समान होण्याच्या तारखा २१ मार्च व २३ सप्टेंबरच्या आसपास येतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कानडा राजा पंढरीचावेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||निराकार तो निर्गुण ईश्वरकसा प्रगटला असा विटेवरउभय ठेविले हात कटीवरपुतळा चैतन्याचा … || १ ||परब्रह्म हे भक्तांसाठीउभे थकले भिमेसाठीउभा राहिला भाव सांवयवजणू कि पुंडलिकाचा … || २ ||हा नाम्याची खीर चाखतोचोखोबाची गुरे राखतोपुरंदराचा हा परमात्मावाली दामाजीचा … || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपड करत असतो. आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते.पण, ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *युक्तिच सर्वश्रेष्ठ*नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment